https://www.maayboli.com/node/81728

संपूर्ण
जगाचा नकाशा न्याहाळणे हा एक छान विरंगुळा असतो. आज अखेरीस जगभरात एकूण
१९६ देश असून याव्यतिरिक्त ‘देशा’चा दर्जा न मिळालेली अनेक बेटे किंवा
भूभाग आहेत. (देशांच्या एकूण संख्येबाबत 195 ते 249 असे विविध अंक जालावर
वाचायला मिळतात; तूर्त तो विषय नाही). नकाशातून जगातले एखादे अपरिचित शहर
शोधण्याचा खेळ शालेय जीवनात बऱ्यापैकी खेळला जातो. गेले काही महिने https://worldle.teuteuf.fr/
या संकेतस्थळावर ‘नकाशावरून देश ओळखा’ हा दैनंदिन खेळ सादर केला जातो. तो
नियमित खेळत असताना बऱ्याच अपरिचित देशांचा परिचय झाला. त्यातल्या काहींची
नावे कुतुहल चाळवणारी निघाली. त्यांचे उच्चारही मजेशीर वाटले. मग स्वस्थ
कुठले बसवणार? त्या नावांची व्युत्पत्ती आणि त्या मागचा इतिहास व भूगोल
इत्यादी गोष्टी धुंडाळून काढल्या. त्यातून काही रंजक माहिती गवसली. त्याचे
संक्षिप्त संकलन करण्यासाठी हा लेख.
देशनामांच्या विविध व्युत्पत्त्यांवर नजर टाकता बऱ्याच गमतीजमती वाचायला
मिळतात. या व्युत्पत्त्यांचे अशा प्रकारे वर्गीकरण करता येते :
1. संबंधित ठिकाणच्या प्राचीन जमाती, राज्य किंवा वंशाची नावे
2. भूभागाचा भौगोलिक प्रकार
3. भूगोलातील दिशा
4. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
5. अनिश्चित/वादग्रस्त व्युत्पत्ती
वरील प्रत्येक वर्गातील काही मोजकी रंजक देश-नावे आता पाहू. उदाहरणे निवडताना शक्यतो मोठ्या देशांऐवजी छोटे, तुलनेने अपरिचित किंवा माध्यमांमध्ये विशेष चर्चेत नसलेले देश निवडले आहेत.
१. प्राचीन जमाती / वंशाची नावे
क्रोएशिया
हा युरोपमधील एक देश. त्याचे नाव एका स्लाविक जमातीवरून ठेवलेले आहे.
मुळात हा शब्द इंडो-आर्यन होता. नंतर तो जुन्या पर्शियनमध्ये गेला आणि
अखेरीस लॅटिन भाषेत स्थिरावला. या देशात Neanderthals या अतिप्राचीन मानवी
पूर्वजांचे जीवाश्म सापडले आहेत.
या गटातील काही देशांची नावे थेट जमातीची नसून त्या जमातींचे गुणवर्णन करणारी देखील आहेत.
Burkina Faso
असे मजेशीर नाव असलेला हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश. त्याचे जुने नाव
Upper Volta हे Volta या नदीवरून ठेवलेले होते.1984 मध्ये त्याचे नामांतर
होऊन नवे नाव लागू झाले. या नावातील दोन शब्द भिन्न भाषांमधले आहेत :
Burkina (Mossi भाषा) म्हणजे प्रामाणिक व सरळमार्गी
Faso (Dioula भाषा) म्हणजे वडिलांचे घर.
थोडक्यात, या देशाच्या नावातून तिथले लोक भ्रष्टाचारविरहित सज्जन आहेत असे
अभिप्रेत आहे ! या देशात पूर्वी अनेकदा हिंसात्मक उठाव होऊन सत्तांतरे
झालेली आहेत. एक अतिशय अविकसित देश असे त्याचे वर्णन करता येईल.
Guinea हा शब्द नावात असलेले काही देश आहेत. त्यापैकी Papua New Guinea हे एक गमतीदार नाव. यातल्या Papua चा अर्थ (बहुधा) कुरळे केस असलेले, तर Guinea चा अर्थ काळ्या वर्णाचे लोक. हा देश Oceania तील एक बेट आहे. भाषावैविध्य हे या देशाचे वैशिष्ट्य असून तेथे सुमारे 851 भाषा प्रचलित आहेत.
२. भौगोलिक प्रकार
जगातील सुमारे एक चतुर्थांश देश या व्युत्पती-प्रकारात मोडतात. बेट, आखात
किंवा जमिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलावरून अशा देशांची नावे ठेवली गेलीत.
Sierra Leone हा एक पश्चिम आफ्रिकेतील देश. याचे मूळ नाव पोर्तुगीजांनी ठेवले. त्याचा शब्दशः अर्थ ‘सिंह पर्वतराजी’ असा आहे. परंतु याचा संबंध सिंहांशी अजिबात नाही. तेथील पर्वतराजीतून होणाऱ्या प्रचंड विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेवरून ते नाव दिले गेले आहे. पुढे मूळ नाव इटालियन पद्धतीने बदलून सध्याचे करण्यात आले. हे नाव प्रथम ऐकल्यावर सनी लिओनी या अभिनेत्रीची सहजच आठवण झाली !
Costa rica हा अमेरिका खंडातील एक छोटा देश. या नावाचा
शब्दशः अर्थ किनारपट्टीचा श्रीमंत भाग असा आहे. मूळ नाव (la costa rica)
स्पॅनिश भाषेतील असून ते बहुधा नामवंत दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस यांनी
दिलेले असावे. त्यांच्या समुद्रपर्यटना दरम्यान ते जेव्हा या किनाऱ्यावर
पोहोचले तेव्हा त्यांना येथील स्थानिक लोकांनी अंगावर भरपूर सोन्याचे
दागिने घातलेले दिसले.
या देशाने नागरिकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले असून देशाच्या सकल
उत्पन्नातील बऱ्यापैकी भाग शिक्षणावर खर्च केला जातो. या खर्चाचे प्रमाण
जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.
3. भूगोलातील दिशा
सुमारे पंचवीस देशांना त्यांच्या पृथ्वीगोलातील दिशेनुसार नाव दिलेले
आहे. त्यापैकी नॉर्वे, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तर सर्वपरिचित देश.
त्यांची व्युत्पत्ती अशी :
• नॉर्वे = Northern Way = उत्तरभूमी
• जपान (निप्पोन) = उगवता सूर्य (पूर्व)
• ऑस्ट्रेलिया = दक्षिणभूमी
आता Timor-Leste या अपरिचित देशाबद्दल पाहू.
हा देश आग्नेय आशियातील एक बेट आहे. देशाच्या जोड नावातील दोन शब्दांचा अर्थ असा :
Timor(मलय भाषेत) = पूर्व
Leste(पोर्तुगीज) = पूर्व
हा देश जावा व सुमात्राच्या पूर्वेस असल्याने हे नाव दिले गेले.
येथे पूर्वी दीर्घकाळ पोर्तुगीजांची वसाहत होती. त्यानंतर इंडोनेशियाने
लष्करी कारवाई करून तो ताब्यात घेतला होता. 2002 मध्ये त्याला स्वतंत्र
अस्तित्व प्राप्त झाले. स्वतंत्र अस्तित्व मिळवणारा तो एकविसाव्या शतकातील
पहिला देश ठरला. हा अतिशय गरीब देश असून कुपोषणाच्या समस्येने ग्रासलेला
आहे.
४. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
जगातील सुमारे 25 देश या गटात येतात. त्यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतेकांची नावे स्थानिक प्रभावशाली पुरुषावरून दिलेली आहेत.
बोलिविया हा दक्षिण अमेरिका खंडातील देश. तो पूर्वी स्पॅनिश लोकांच्या ताब्यात होता. कालांतराने स्थानिकांचे स्पेनविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध झाले. त्यामध्ये व्हेनेझुएलाचे नेते Simón Bolívar यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सन्मानार्थ या नव्या देशाला Bolívar असे नाव दिले गेले. पुढे ते मधुरतेसाठी Bolívia असे बदलण्यात आले. हा बहुवांशिक असलेला विकसनशील देश आहे. तेथील भूमी अनेक खनिजांनी समृद्ध आहे.
मॉरिशस या पूर्व आफ्रिकेतील बेटाच्या नावाची कथा तर
खूप रंजक आहे. चालू नाव Maurice या डच राजपुत्रावरून दिलेले आहे. परंतु हा
देश बऱ्याच नामांतरांतून गेलेला आहे. सुरुवातीस पोर्तुगीज दर्यावर्दींनी
त्याला
Dina Arobi >> Do-Cerne >> Mascarene
अशी नावे दिली होती. त्यानंतर इथे फ्रेंचांची वसाहत झाल्यानंतर त्याचे नाव
Isle de France असे झाले. पुढे फ्रेंचांनी शरणागती पत्करून ब्रिटिशांनी
यावर कब्जा केला तेव्हा मॉरिशस हे नाव पुन्हा प्रस्थापित झाले.
या गटातील दोन देशनावे स्त्रियांवरुन दिलेली आहेत.
त्यापैकी ऐतिहासिक खऱ्या स्त्रीवरून दिलेले (बहुधा) एकमेव नाव म्हणजे St. Lucia. हे एक वेस्टइंडीज मधील बेट आहे. त्याचे नाव Lucia या संत स्त्रीवरून दिले आहे. कॅथोलिक पंथात ज्या आठ गौरवलेल्या स्त्रिया आहेत त्यापैकी ही एक. या भागातून जात असताना फ्रेंच दर्यावर्दींचे जहाज 13 डिसेंबर रोजी बुडाले. हा दिवस ल्युसिया यांचा स्मृतिदिन असल्याने कोलंबसने त्यांचे नाव या बेटाला दिले. हे बेट त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा मोठा आहे.
५. अनिश्चित/वादग्रस्त व्युत्पत्ती
सुमारे २० देशांच्या बाबत अशी परिस्थिती आहे. त्यापैकी दोन उदाहरणे पाहू.
माल्टा
हा पर्यटकांचे आकर्षण असलेला युरोपातील एक छोटासा देश (बेट). किंबहुना
स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेले हे एक शहर (city-state) आहे. याच्या दोन
व्युत्पती प्रचलित आहेत:
a. ग्रीक भाषेत Malta चा अर्थ मध. या बेटावर एक विशिष्ट प्रकारच्या मधमाशा असून त्यांच्यापासून एक अतिमधुर मध तयार होतो.
b. Maleth या शब्दाचा अर्थ निवारा किंवा बंदर असा आहे.
सरतेशेवटी आपल्या सख्खा शेजारी नेपाळबद्दल. याच्या अनेक व्युत्पत्ती असून भाषातज्ञात त्याबाबत भरपूर मतभिन्नता आहे. ४ प्रकारच्या व्युत्पत्ती प्रचलित आहेत :
a. पशुपती पुराणानुसार ‘ने’ नावाचे मुनी होते (नेमी). त्यांनी संरक्षित केलेला हा प्रदेश आहे.
b. नेपा नावाच्या गुराख्यावरून हे नाव पडले.
c. निपा =पर्वताचा पायथा. आल= आलय= घर. >> पर्वताच्या पायथ्याशी असलेला प्रदेश.
d. तिबेट -बर्माच्या भाषेनुसार:
ने= गाई-गुरे आणि
पा = राखणदार
असे हे व्युत्पत्तीपुराण. काही देशांच्या नावांच्या संदर्भात ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध असतात; त्याबाबत दुमत नसते. मात्र जिथे अशी कागदपत्रे उपलब्ध नसतात तिथे भाषा अभ्यासकांना लोककथा किंवा दंतकथांचा आधार घ्यावा लागतो. काही वेळेस अनेक मूळ नावांचे अपभ्रंश होत समाजात शेवटी कुठलेतरी भलतेच नाव देखील रूढ होते. अशा तऱ्हेने काही देशांच्या नावाबाबत अधिकृत माहितीखेरीज अनेक पर्यायी व्युत्पत्ती वर्णिलेल्या असतात.
“नावात काय आहे?” हा शेक्सपियर निर्मित आणि बहुचर्चित लाखमोलाचा प्रश्न.
त्याचे उत्तर, “नावात काय नाही?” या प्रश्नाद्वारेच अन्य कोणीतरी देऊन टाकलेले आहे !
प्रत्येक शब्दातून त्याचा इतिहास डोकावत असतो. तो आपल्याला कित्येक शतके
मागे घेऊन जातो. विविध देशांच्या नावांवरून आपल्या लक्षात येईल की त्यातील
बऱ्याच नावांमधून भूगोल देखील डोकावतोय. देशाचे नाव त्या संस्कृतीचे
प्रतीक असते आणि तो राष्ट्रीय अस्मितेचाही भाग असतो. नमुन्यादाखल काही
देशनावे या लेखात सादर केली.
ही छोटीशी जागतिक शब्दसफर वाचकांना रोचक वाटेल अशी आशा आहे.
…………………………………………………………………………………………………………………………………………….
चित्रे जालावरून साभार !
भारताचे नाव भारत कोणत्या कालखंडात होते ?
अगदी प्राचीन काळात जांबुद्वीप होते. पाटलीपुत्र ते पंजाब हा नद्यांचा प्रदेश आर्यावर्त नावाने होता.
अफगाणिस्तानातल्या मोठ्या भागाला गांधार देश म्हणत. दक्षिणेला मद्रदेश
म्हणत होते. ही वर्णने तर महाभारतातच आहेत. देशोदेशींच्या राजांची वर्णने
आहेत त्यात.
वायुपुराणात भारतवर्ष असा उल्लेख आहे.
आपल्या देशाचे संस्कृतमधील अधिकृत नाव भारत गणराज्य असे स्वीकारण्यात आले आहे.
मागे एकदा मी स्वातंत्र्य वर्धापनदिनाच्या दिवशी सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम ऐकला होता. त्यात सांगितलेली माहिती अशी होती :
“ब्रिटिशांनी इंडियाची फाळणी केली आणि दोन देश निर्माण झाले. त्यांची अधिकृत नावे अशी ठेवण्यात आली :
१. इंडिया that is भारत व
२. इंडिया that is पाकिस्तान.
यातून असे सुचवायचे आहे की, भारत हा पूर्णपणे स्वतंत्र नवा देश आहे. त्याच्या नावाला फाळणीचे जोखड नको.
फाळणी झाली ती इंडियाची !"
उदयगिरी इथल्या डोंगरात २२०० वर्षांपूर्वीचा एक शिलालेख सापडला आहे त्यात
भारतवर्ष हा शब्द असल्याचा दावा आहे. पण हा शब्द भारत या राजाच्या
नावावरून आला असेल किंवा भारतयुद्धावरून आला असेल यावर मतभेद आहेत.
कारण वेदांमधे अशा कोणत्याही युद्धाचा उल्लेख नाही. वायुपुराण,
विष्णूपुराणात महाभारताचा उल्लेख येतो. पण असे युद्ध झालेच नाही असे
इतिहासकार सरकार म्हणतात.
टर्की या देशाने त्याचे नाव आजपासून टर्कीये केले आहे.
नेदरलँडसने २०२० सालापासून हॉलंड हे नाव कायमचे टाकून दिले आहे.
झिंबाब्वेचे नाव पूर्वी होंडुरास होते.
म्याममारचे पूर्वीचे नाव ब्रह्मदेश तर श्रीलंकेचे पूर्वीचे नाव सिलोन होते.
झिंबाब्वेचे नाव पूर्वी होंडुरास होते. >>> नाही.
होंडुरास अमेरिका खंडात आहे.
विकिपीडियानुसार...
ऱ्होडेशिया हा दक्षिण आफ्रिके चा भाग होता.
पुढे त्याचे विभाजन झाले :
उत्तर ऱ्होडेशियाचा झाला झांबिया तर दक्षिणेचा झाला झिंबाब्वे.
गिनी म्हणजे काळे लोक हे माहित नव्हते. गिनी हा पश्चिम आफ्रिकेतला देश आहे. त्यावरून न्यू गिनी नाव दिले असावे.
अमेरिकेत इटालिअन लोकांना ते इतर युरोपिअनांच्यापेक्षा काळे असल्यामुळे (रेशिअल स्लर) गिनी म्हणतात.
असे ३ गिनी आहेत :
Guinea-Bissau (आफ्रिका)
Equatorial Guinea (आफ्रिका)
व
Papua New Guinea (Oceania)
गिनी नावाचा अजून एक देश आहे गिनी बिसावच्या शेजारी.
देशांच्या नावांच्या अनुषंगाने आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते. ते म्हणजे demonyms - देशिकांची नावे. भारतदेशिकांना भारतीय म्हणतात. पाकिस्तानदेशिकांना पाकिस्तानी म्हणतात. इंग्रजीत इंडियाचे डेमनिम इंडियन (अनेकवचन इंडियन्स). अनेक देशांची इंग्रजीतील डेमनिम आपण अंदाज बांधू शकतो - काँगो देशाच्या लोकांना (दोन्ही काँगो देश) काँगोलिज (Congolese) म्हणतात हे माहीत असेल तर त्यावरून टोगोदेशीयांना टोगोलिज असेल असा अंदाज करू शकतो. पण वर लेखात ज्या Burkina Faso चा उल्लेख आहे त्याला मात्र हा न्याय लागू नाही. त्या देशाच्या लोकांना Burkina Fasolese म्हणत नाहीत. तिथे मात्र Burkinabé. लेखात Guinea बद्दल लिहिले आहे. आफ्रिकेतल्या Guinea शेजारचा देश Guinea-Bissau. तो जेव्हा निर्माण झाला तेव्हा शेजारी आधीच Guinea अस्तित्वात होता. म्हणून नवींन देशाच्या लोकांनी देशाच्या नावात देशाची राजधानी टाकली - Bissau ही Guinea-Bissau ची राजधानी. या देशाच्या लोकांना म्हणायचं Bissau-Guinean. लेसोथो आणि बोटस्वाना यांची गंमत वेगळीच. Demonym चा अंदाज करायचा झाला तर मी म्हणेन lesothoan/lesotholese आणि botswanian. पण यातले काहीच नाही. एका लेसोथोदेशी व्यक्तीला म्हणायचं Mosotho. अनेकजण असतील तर ते Basotho. तसेच एका बोटस्वानादेशी व्यक्तीसाठी Motswana आणि अनेकांसाठी Batswana. म्हणजे एकवचन आणि अनेकवचन वेगळे असतात पण तसा नेहमीचा फॉर्म इथे नाही. इथे suffix लागत नाहीत. सगळे बदल नावाच्या सुरवातीमध्ये! किंवा Vatican City घ्या. त्यांना काही demonym च नाहीये. निदान अधिकृत तरी नाही.
देश आणि demonym च्या या काही जोड्या पाहा -
Cyprus - cypriot
San Marino - Sammarinese,
Monaco - Monégasque किंवा Monacan, Liechtenstein - Liechtensteiner
Madagascar - Malagasy
Seychelles - seychellois(e)
Honduras - honduran
Philippines - Filipino (पु.) आणि Filipina (स्त्री.)
एकच demonym एकापेक्षा जास्त देशांसाठी असेही आहेत -
Democratic Republic of the Congo आणि Republic of the Congo - Congolese
Dominican Republic आणि Dominica - dominican
ज्या देशांच्या नावांच्या अखेरीस land हा प्रत्यय येतो असे युनोचे सभासद असलेले एकूण १० देश आहेत.
त्यापैकी the Netherlands , New Zealand, Solomon Islands व Marshall Islands ही नावे दोन स्वतंत्र शब्दांनी युक्त आहेत.
टर्की या देशाने त्याचे नाव आजपासून टर्कीये केले आहे>>>
त्याचा उच्चार तुर्किये आहे
त्रिनिदाद व टोबॅगो ही करीबिअन मधली देशं येऊन गेली का?!
त्रिनिदाद
हे कोलंबसने लॉर्ड ट्रिनिटी वरून दिले होते म्हणे, वर्तकांच्या 'वास्तव
रामायणात' हे नाव त्रिशूळ-ट्रायडंट वरून आलेले असल्याचा उल्लेख आहे.
उत्तर मेक्सिकोतील 'Aztec' समूहाचा Aztec हा शब्द ही 'आस्तिक'( ऋषी) वरून आलेला आहे, हे त्यातच वाचलेलं होतं.
टोबॅगो
हे टोबॅको अर्थात तंबाखू वरून आले आहे असे विकि दाखवतंय.
Kiribati आणि Nauru सुद्धा ! Nauru चा शब्द्शः अर्थ “मी समुद्रकिनारी जातो” असा आहे !
कॅलिफोर्नियातील सॅन होजे (San Jose) व कुपर्टिनो या दोन्ही शहरांचा
संबंध स्पॅनिश व इटालियन शब्दांच्या ओरिजिन वरून आला असावा - "Saint Joseph
de Cupertino" या मूळ इटालियन नावातून आलेले आहे असे त्या शहरांच्या
इतिहासात आहे. पण कॅलिफोर्नियात इटालियन लोकांचा काहीच संबंध नाही. तेथे
आले ते स्पॅनिश लोक आत्ताच्या मेक्सिकोवर त्यांची सत्ता असताना. त्यात ते
सेण्ट जोसेफ चे स्पॅनिश मधे सॅन होजे झाले असेल असे दिसते
त्यामुळे उद्या भारतीयांनी त्याचे "सॅन जोस" हे नाव रूढ केले तर तो ही एक अपभ्रंशच असेल 
आपल्या मुंबईतील सांताक्रूझ बद्दल एक मजेदार निरीक्षणः त्याचा "सांताक्रूझ" हा मराठी उच्चार डाउनमार्केट समजला जातो. त्याचा हाय सर्कल्स मधला उच्चार हा इंग्रजाळलेला "सॅण्टा क्रूझ" होतो. पण मूळ स्पॅनिश उच्चार हा मराठीलाच जवळचा आहे.
युरोपियन भाषांत पूर्व दिशेकरता "इस्ट" शब्दांची विविध रूपे रूढ असावीत.
वरती "Leste" आहे ते ही "east -> este > le este > leste" असे
काहीतरी झाले असावे. आता माझ्या अंदाजात स्पॅनिश/फ्रेंच्/ पोर्तुगीज मिश्रण
झाले असेल पण साधारण असेच असावे
तसेच ऑस्ट्रिया ची व्युत्पत्तीही "इस्ट" च्या जर्मन रूपातूनच आहे. जर्मन
कल्चर मधे "राइख" (Reich) शब्द आपण वाचला आहे. पूर्वेचे राइख -
Oosterreich->Austria असे काहीतरी ते दिसते. ऑस्ट्रियाच्या विकीपेजवरही
आहे.
यावरून व वरच्या अफाट व्युत्पत्तीवाल्य पोस्ट्सवरून पुलंचे एक वाक्य
आठवले. बहुधा अपूर्वाई मधले - "एका मित्राच्या म्हणण्यानुसार प्रशिया हे
पुरूषीय व ऑस्ट्रिया हे स्त्रीय या शब्दांपासून आलेले आहे. त्यामुळेच
त्यांच्या आसपासच्या छोट्या देशांना बाल्कन राष्ट्रे म्हणतात"
(त्यातही पश्चिमेच्या देशांच्या दौर्याच्या वर्णनाला अपूर्वाई हे नाव, हा ही खास पुलं टच)
एकाच नावाचे गाव किंवा शहर जगात अनेक देशांमध्ये आढळते. मुख्य म्हणजे अगदी भिन्न संस्कृती असलेल्या आणि जगाच्या दोन टोकांना असलेल्या देशांमध्येही तेच नाव आढळते.
अशी काही रंजक माहिती :
१. दिल्ली एकूण १५ आहेत
२. मद्रास ८ ( अमेरिका, द. आफ्रिका इ )
३. लखनऊ ७ ( भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ )
४. वेलिंग्टनचा तर कदाचित विक्रम असेल : एकूण 34 गावे (न्यूझीलँडची राजधानी, तामिळनाडूतले गाव, इ).
५. सिंगापूर (देश व महाराष्ट्रात रायगडजवळचे खेडे).सिंगापुर तालुका पुरंदर जिल्हा पुणे
एकाच नावाची गावे/ठिकाणे जगात शोधण्यासाठी हे संस्थळ :
https://geotargit.com/called.php?qcity
सिंगापुरातील एका मेट्रो स्टेशनचे नाव 'धोबी घाट' आहे.
होय अगदी अगदी. मलाही तिथे असताना हे फार आश्चर्य वाटले होते. पण त्याला इतिहास आहे म्हणे. इंग्रज लोक भारतातून धोब्यांना घेऊन गेले होते. सध्या जिथे मेट्रो आहे तिथे पूर्वी छोटी नदी होती व हे धोबी तिथे कपडे धूत असंत
१. दिल्ली एकूण १५ आहेत
२. मद्रास ८ ( अमेरिका, द. आफ्रिका इ )
३. लखनऊ ७ ( भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ )>>>>> भारीच !
देशांचे नावबदल हा एक रोचक विषय आहे. काही देशांनी अनेक वेळा नामांतर केलेले दिसते. उदाहरणार्थ,
कंबोडियाने चार वेळेस नामांतर करत पहिल्या नावापाशीच वर्तुळ पूर्ण केले !
Kingdom of Cambodia >> Khmer Republic >> Democratic Kampuchea >> State of Cambodia>>> Kingdom of Cambodia.
जगातील कुठल्याही भूभागापासून दूर असणारे आणि दक्षिण अटलांटिक महासागराच्या जवळपास मध्यात वसलेला चिमुकला २५१ +/- लोकसंख्या असणारा ट्रिस्टन द कून्हा द्विपसमूह ! , जवळपास ३८ वर्ग मैल इतकं छोटं बेट आहे मुख्य
ब्रिटिश ओवरसीज टेरीट्रीचा भाग असणारे ट्रिस्टन द कून्हा द्विपसमूह
केप टाऊन किनाऱ्या पासून २७८७ किलोमीटर
सेंट हेलेना बेटांपासून २४३७ किलोमीटर
आणि
फॉकलंड बेटांपासून ४००२ किलोमीटर अंतरावर आहे, इथं एअरस्ट्रीप नाही, त्यामुळे सगळ्यात जवळचा अन लवकर होणारा प्रवास म्हणजे सहा दिवसांचा केप टाऊन पर्यंतचा बोटीचा प्रवास होय.
गर्दी अन जगापासून दूर कुठंतरी जायची ईच्छा असणाऱ्या लोकांसाठी आयडियल डेस्टिनेशन ??

ट्रिस्टन द कून्हा चे जमिनीपासून असलेले ढोबळ अंतर आणि त्याचे दक्षिण अटलांटिक मधील स्थान

ट्रिस्टन द कून्हाचा जुना नकाशा
सियेरा लिऑन ( Landof Lion )मधे खरोखरच बसलेल्या सिंहासारखा डोंगर आहे . समृद्र किनाऱ्यावरून दिसतो मी पाहिला आहे .
तिमोर म्हणजे भाषा इंडोनेशियात East .
अजून एक गंमत म्हणजे बहासा इंडोनेशीयात west यासाठी बारात हा शब्द आहे .
बारात म्हणजे भारत . भारत इंडोनेशियाच्या पश्चिमेला आहे . म्हणजे देशाच्या
नावावरून दिशा मिळाली
दोन मोठ्या देशांच्या सीमेवर जर एखादा भूभाग असेल तर दोन्ही देश तो बळकावण्यासाठी उत्सुक असतात. पण या वृत्तीला अपवाद म्हणून Bir Tawil (= उंच विहीर) चे उदाहरण पाहता येईल.

इजिप्त व सुदान यांच्या सीमेवरील हा छोटासा भूभाग ( वरच्या चित्रातील छोटीशी पांढरी जागा). परंतु या दोन्ही देशांपैकी कोणीही त्याच्यावर हक्क सांगायला तयार नाही ! (अर्थात यामागे काही अन्य कारणे आहेत).
Alastair Bonnett यांच्या मते पृथ्वीवरील राहण्यायोग्य पण अद्याप बिलकूल वस्तीविरहित असा हा भाग असून कुठल्याच देशाने त्यावर हक्क सांगितलेला नाही.
समर सॉल्स्टिसच्या वेगवेगळ्या देशातील प्रथानेटफ्लिक्सवर मॉर्गन फ्रिमनचा 'The Story of God ' नावाचा माहितीपट आहे, त्यात मेक्सिकन समर सॉल्स्टिस उत्सव व तेथील संस्कृतीचा निसर्गाशी खास करुन सूर्याचा ईश्वराशी लावलेला संबंध फार छान समजावून सांगितला आहे.
तो संपूर्ण माहितीपटच(सिझन १) सुरेख आहे. वेगवेगळ्या संस्कृतीतल्या/देशातल्या ईश्वरी संकल्पनांचा व त्यांच्या परंपरांच्या मूळाशी असलेल्या शक्यतांचा सुरेख आढावा घेतलाय.
जगातील तीन देशांचे (San Marino, Vatican City व Lesotho ) एक समान भौगोलिक वैशिष्ट्य आहे.
या प्रत्येक देशाभोवती संपूर्णपणे दुसऱ्या देशाने वेढा घातलेला आहे.
या तिघांना enclave असे म्हणतात.
Enclave व वेढणारे देश कंसात असे :
San Marino (इटली)
Vatican City (रोम, इटली )
Lesotho (द. आफ्रिका)
जसे enclave असतात त्याच्या बरोबर उलट exclave असतात. म्हणजे एका देशाचा प्रांत जो देशाच्या मुख्य भुभागापासून तुटलेला आहे आणि दुसऱ्या देशाने वेढला आहे. पण यात बेटे धरत नाहीत. (अंदमान आणि निकोबार भारताची exclaves नाहीत.) उदा. कलिनिंग्राद ओबलास्त (Kaliningrad Oblast) हे रशियाचे exclave पोलंड आणि लिथुएनिया यांना खेटून बाल्टिक समुद्रावर वसले आहे. त्याचे ठिकाण नकाशात बघा. रशियासाठी त्याचे व्यापारी आणि सामरिक महत्व लगेच लक्षात येईल. खास करून युक्रेन युध्दासाठी तर खूपच.
Enclave आणि exclave तसेही खूप fascinating असतात. पण त्यातही दोन प्रांत weird आहेत.
पहिला म्हणजे भारत - बांगलादेश यांचे एकमेकांमध्ये असलेले एकूण 162 enclaves. 162 - विश्वास बसत नाही ना! आता ते अस्तित्वात नाहीत. 2015 साली दोन्ही देशांनी enclaves ची अदलाबदल केली. फक्त भूभाग नाही तर नागरिकांची सुद्धा अदलाबदल केली. त्यांचा super weirdness जाणून घ्यायचा असेल तर हे वाचा -https://www.migrationpolicy.org/article/india-and-bangladesh-swap-territ...
हेसुद्धा पाहा
https://www.washingtonpost.com/news/worldviews/wp/2015/08/01/say-goodbye...
दुसरा विचित्र किस्सा आहे ऑस्ट्रियाच्या Jungholz या exclave चा. याची
खासियत म्हणजे हा भाग ऑस्ट्रियापासून पूर्ण तुटलेला नाही. अगदी चिंचोळ्या
जमिनीच्या पट्ट्याने ऑस्ट्रियाशी जोडला आहे. चिंचोळी किती? ही पट्टी 1
मीटरपेक्षा कमी रुंद आहे. पण हे काहीच नाही. Jungholz चा विचित्रपणाची ही
फक्त सुरवात आहे. हे बघा -
https://www.bbc.com/travel/article/20220214-jungholz-a-ski-town-stuck-in...
ज्या देशनावाचे इंग्लीश स्पेलिंग काहीसे मजेदार आहे तो म्हणजे रवांडा ( Rwanada). या देशाची तीन ठळक वैशिष्ट्ये आहेत :
१. एका बाबतीत त्यांनी जगात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यांच्या संसदेत स्त्री खासदारांचे बहुमत आहे. सध्या एकूण खासदारांपैकी ६१ % खासदार स्त्रिया आहेत. असे होण्यामागे अंशतः एक भीषण घटना कारणीभूत आहे. 1994 मध्ये तिथे एका वंशाच्या दहा लाख लोकांच्या अवघ्या तीन महिन्यात ठरवून हत्या करण्यात आल्या. त्यानंतर राहिलेल्या लोकसंख्येमध्ये स्त्रियांचे प्रमाण 60 ते 70 टक्के असे राहिले.
२. प्लास्टिक-बंदीची कठोर अंमलबजावणी
३. गोरिला माकडांची १० कुटुंबे उद्यानात ठेवलेली आहेत. ही जगातील सर्वाधिक आहेत.
रवांडा बद्दल अजून रोचक माहिती म्हणजे, रवांडा ही मूलतः फ्रेंच वसाहत होती, स्वातंत्र्य मिळून हुतु तुतसी युद्ध अन नरसंहार होऊन आता सत्तेवर आलेत पॉल कागमे, त्यांना फ्रेंच गुलामीचा भयानक तिटकारा असल्यामुळे त्यांनी सत्तेत आल्या बरोबर पहिले प्रथम तर हुतू अन तुतसी समझोते घडवून आणले, त्यानंतर विरोधक भयानक चिरडले, त्यानंतर फ्रेंच अस्तित्व असणाऱ्या खुणा मिटवायला सुरुवात केली, ह्या कामात विध्वंस कमी अन दुसरे बोट लांब करणे हा प्रकार त्यांनी केला, फ्रेंच ऐवजी इंग्रजीला सरकारी आश्रय देणे, पन्नास हजार क्षमतेचे क्रिकेट स्टेडीयम बांधून क्रिकेट हा खेळ प्रमोट करणे, कॉमनवेल्थ मध्ये प्रवेशासाठी अर्ज भरणे इत्यादी इत्यादी त्यांनी केले,
पण एकेकाळी नरसंहार अन युद्धाने ग्रस्त हा देश आज आफ्रिकेतील काही निवडक विकसनशील देशांत मोडतो, पायाभूत सुविधा, शिक्षण, कायदा सुव्यवस्था इत्यादींवर ते झपाट्याने पुढे गेलेले आहेत.
एखाद्या घराचे स्वयंपाक घर एका देशात तर त्याच घराचे शयनगृह दुसऱ्या देशात, हे ऐकायला कसे वाटते ?
पण असे उदाहरण आहे...
नागालँड मधील लोंगवा या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ते गाव भारत व म्यानमार या दोघांनी वाटून घेतलेले आहे. इथे
या दोन देशांदरम्यानची सीमारेषा या गावच्या सरपंचांच्या घरामधून जाते.
https://www.outlookindia.com/outlooktraveller/explore/story/70646/did-yo...
जनपद = देश (community, nation, people)
हा शब्द वाचनात आला.
या संस्कृत शब्दाचा उगम इथे दिल्याप्रमाणे दिसतो आहे (https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A...).
थोडक्यात, समूह असे त्यातून अभिप्रेत असावे.
मराठीत आपण देशासाठी ‘देश’ हा एकच शब्द सहसा वापरतो. परंतु इंग्लिशमध्ये खालील प्रकारचे वेगवेगळे शब्द आहेत आणि त्यांच्या आपापल्या व्याख्या आहेत :
• Country
• Nation
• Nation-State (उदा. नेपाळ)
• Sovereign State ( UN सदस्य + अन्य)
• Non Sovereign State (e.g. Hong Kong)
(https://www.thoughtco.com/country-state-and-nation-1433559#:~:text=When%....)
परंतु तेथून ७००० किमी दूर असलेल्या टोंगामधील ज्वालामुखीच्या प्रकाशामुळे तिथे आसमंत उजळून निघत आहे. त्याचे काही सुंदर फोटो इथे पाहता येतील.:
https://i.stuff.co.nz/national/300638089/antarcticas-midwinter-darkness-...
जर्मनीला अन्य भाषक लोक काय काय म्हणतात ?
एका जर्मनीस्थिताकडून समजले :
स्पॅनिश लोक : अलेमानिया
फ्रेंच लोक : अलेमान्ये,
पोलिश लोक : नीम्सी
हाँगकाँगमध्ये : दं क्वॉक्
चीनमध्ये : दं ग्वो,
जपान मध्ये : दोइत्सं.
पृथ्वीचा
८वा खंड Zealandia मानला जातो. अर्थात तो 94% पाण्याखाली बुडालेला आहे.
उरलेला सहा टक्के जमिनीवर असून त्याचा न्यूझीलंड हा एक भाग आहे.
अशा देशांच्या सागरी हद्दीवरून बराच खल झालेला आहे. त्या संदर्भात काही आंतरराष्ट्रीय नियमही आहेत.
न्यूझीलंडबाबत एक रंजक माहिती वाचली. जर का त्यांनी सिद्ध केलं, की ते या आठव्या खंडाचेच एक भाग आहेत, तर मग त्यांना त्यांची सागरी हद्द सध्याच्या सहा पट मंजूर होईल !
https://www.bbc.com/future/article/20210205-the-last-secrets-of-the-worl...
रवांडाला 'आफ्रिकेचे सिंगापूर' म्हणतात.
रवांडाने २००८ पासून प्लास्टिक पिशव्या बंदीचे धोरण कसे कडकपणे राबवले आणि त्याचे दिसणारे सुपरिणाम :
https://www.channelnewsasia.com/world/plastic-bag-ban-charge-waste-rwand...
हंगेरी देशाची राजधानी असलेली बुडापेस्ट नगरी ही मुळात बुडा आणि पेस्ट अश्या दोन जुळ्या शहरांपासून बनलेली आहे असे वाचण्यात आले हल्लीच, बुडा पश्चिम भाग अन् पेस्ट पूर्वभाग आहे म्हणतात अन् ही दोन शकले danube नदीने केली आहेत.
एक देश आणि त्याला असलेल्या राजधान्या बोलायचे झाले तर एकही अधिकृत राजधानी नसलेले देशसुद्धा आहेत.
स्वित्झर्लंडला अधिकृत राजधानी नाही. बर्न शहरात जरी त्यांची संसद आणि अनेक
देशांचे दूतावास असले तरी बर्न ही देशाची Hauptstadt (capital city) नाही.
ती Bundestadt (federal city) आहे. दुसऱ्या भाषेत बोलायचे तर बर्न de
facto राजधानी आहे, पण de jure नाही.
ओशियानिया खंडामधल्या नौरू या देशालासुद्धा अधिकृत राजधानी नाही. Yaren
District मध्ये सरकारी इमारती आहेत पण ती अधिकृत राजधानी नाही. नौरुचा
झेंडा नक्की बघा. देश खूपच छोटा आहे आणि अनेकांना माहितीच नसतो कुठे आहे.
त्यामुळे त्यांनी झेंड्यावर त्यांना शोधण्याचा नकाशाच दिला आहे. पिवळी रेषा
म्हणजे विषुववृत्त. त्याच्या थोडंसं खाली असलेला तारा म्हणजे देशाचे
स्थान.
वेगळी अधिकृत राजधानी नसलेले obvious देश म्हणजे city-states - सिंगापोर, व्हॅटिकन सिटी आणि मोनॅको. तीनही देश city-states असल्यामुळे त्यांना वेगळी राजधानी अस्तित्वात नाही.
दक्षिण आफ्रिका बहुतेक एकमेव देश आहे ज्याला तीन राजधान्या आहेत.
ओशीयानियावरून अजून एक आठवले.
पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण दोन्ही गोलार्धात असलेले देश आहेत. म्हणजे
विषुववृत्त ज्या देशांमधून जाते ते सगळे देश. तसेच पूर्व आणि पश्चिम
गोलार्धात असलेले देश आहेत. म्हणजे 0 अंश आणि 180 अंश रेखावृत्ते ज्या
देशांमधून जातात ते देश.
पण एकच देश असा आहे जो चारही गोलार्धात आहे - Kiribati (उच्चारी किरीबास
किंवा किरीबाती). हा सुद्धा ओशियानीया मध्ये आहे. याचे पूर्वीचे नाव
Gilbert's Island. स्थानिक भाषेत गिल्बर्टचे झाले किरिबाती. या देशांच्या
बेटांमधल्या समुद्रात विषुववृत्त आणि 180 अंश रेखावृत्त एकमेकांना छेदतात.
त्यामुळे देशाची बेटे चारही गोलार्धात आहेत.
किरिबाती हा चारही गोलार्धात असलेला एकमेव देश ही माहिती भन्नाट आहे. या
देशाला काहींच्या मते अजून एक मान आहे. तो म्हणजे, वर्षाच्या ठराविक
कालावधीतील "उगवत्या सूर्याचा देश".
….
उगवत्या सूर्याचा देश कोणता?
याचे एकच असे उत्तर दिसत नाही.
यासंदर्भात जालावर वाचले असता बरीच उलट-सुलट आणि घोळदार माहिती मिळते.
जपानची तशी नोंद खूप प्राचीन काळी झालेली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा वगैरे गोष्टी अस्तित्वात आल्या आणि संदर्भ बदलले.
काहींच्या मते वर्षाच्या पहिल्या सहामाहीत न्युझीलंड हा प्रथम सूर्याचा मानकरी आहे तर दुसऱ्या सहामाहीत Samoa.
अन्य काहींच्या मते किरिबातीचा पहिला नंबर आहे वगैरे.
पाकीस्तानातील मकरान भागाबद्दल हा लेख वाचनात आला. मकरानचं नाव कसं पडलं हे मजेशीर आहे
https://www.bbc.com/marathi/international-61052184
जसे enclave असतात त्याच्या बरोबर उलट exclave असतात. म्हणजे एका देशाचा प्रांत जो देशाच्या मुख्य भुभागापासून तुटलेला आहे आणि दुसऱ्या देशाने वेढला आहे. पण यात बेटे धरत नाहीत. (अंदमान आणि निकोबार भारताची exclaves नाहीत.) उदा. कलिनिंग्राद ओबलास्त (Kaliningrad Oblast) हे रशियाचे exclave पोलंड आणि लिथुएनिया यांना खेटून बाल्टिक समुद्रावर वसले आहे. त्याचे ठिकाण नकाशात बघा. रशियासाठी त्याचे व्यापारी आणि सामरिक महत्व लगेच लक्षात येईल. खास करून युक्रेन युध्दासाठी तर खूपच.
Enclave आणि exclave तसेही खूप fascinating असतात. पण त्यातही दोन प्रांत weird आहेत.
पहिला म्हणजे भारत - बांगलादेश यांचे एकमेकांमध्ये असलेले एकूण 162
enclaves. 162 - विश्वास बसत नाही ना! आता ते अस्तित्वात नाहीत. 2015 साली
दोन्ही देशांनी enclaves ची अदलाबदल केली. फक्त भूभाग नाही तर नागरिकांची
सुद्धा अदलाबदल केली. त्यांचा super weirdness जाणून घ्यायचा असेल तर हे
वाचा -
https://www.migrationpolicy.org/article/india-and-bangladesh-swap-territ...
या बातमीत fig 1 बघा. अदलाबदलीच्या आधी तिथे राहणाऱ्या लोकांना काय काय
अडचणींना तोंड द्यावे लागत असेल? इतकी विचित्र परिस्थीती इतर कुठे असेल का?
हेसुद्धा पाहा
https://www.washingtonpost.com/news/worldviews/wp/2015/08/01/say-goodbye...
दुसरा विचित्र किस्सा आहे ऑस्ट्रियाच्या Jungholz या exclave चा. याची
खासियत म्हणजे हा भाग ऑस्ट्रियापासून पूर्ण तुटलेला नाही. अगदी चिंचोळ्या
जमिनीच्या पट्ट्याने ऑस्ट्रियाशी जोडला आहे. चिंचोळी किती? ही पट्टी 1
मीटरपेक्षा कमी रुंद आहे. पण हे काहीच नाही. Jungholz चा विचित्रपणाची ही
फक्त सुरवात आहे. हे बघा -
https://www.bbc.com/travel/article/20220214-jungholz-a-ski-town-stuck-in...
"Bagmen would arrive with suitcases handcuffed to their wrists, enter their room, lock the door and never leave until the banks opened. It happened all the time." थेट आपले अजित, रणजित, जीवन वगैरेंचे चित्रपट आठवले
देशांच्या नावांना लिंग (जेंडर) ही लावलं जातं.
भारत पुल्लिंगी तर इंडिया स्त्रीलिंगी.
अमेरिका , जर्मनी , रशिया स्त्रीलिंगी. इंग्लंड , फ्रान्स पुल्लिंगी किंवा नपुं.
हे पुष्कळसं नावाच्या उच्चारावरून ठरतं.
पनामा /मेक्सिको सिटी इ.>>>
अशा देशांच्या बाबतीत राजधानीचे नाव देशावरून दिले, की देशाचे नाव मूळच्या
शहरावरून पडले, असा एक प्रश्न उपस्थित होतो. तो काही अंशी, आधी कोंबडी की
आधी अंडे यासारखा आहे. थोडेफार वाचले असता अशी माहिती मिळाली:
१.काही देशांच्या बाबतीत मूळ शहराचे नाव देशाला दिले गेले. हा मुद्दा पटू शकतो कारण -
टोळी >> वसाहत>> शहर>> साम्राज्यविस्तार >>देश असा क्रम लक्षात घेतल्यावर ही बाजू पटते.
२. अन्य काही देशांच्या बाबतीत आधी देशाचे नाव होते तेच नाव (किंवा
अगदी थोडासा फरक करून) राजधानीला दिले गेले. इथे ब्राझील हे ठळक उदाहरण
आहे. कारण त्यांची मूळ राजधानी जेव्हा बदलली तेव्हा ब्राझीलिया केली गेली.
काही देशांना एकाहून अधिक राजधान्या देखील आहेत.
अर्थात हे अजून स्पष्ट होण्यासाठी भूगोलाचे काही खात्रीशीर संदर्भ मिळवावे लागतील.
एक देश आणि त्याला असलेल्या राजधान्या बोलायचे झाले तर एकही अधिकृत राजधानी नसलेले देशसुद्धा आहेत.
स्वित्झर्लंडला अधिकृत राजधानी नाही. बर्न शहरात जरी त्यांची संसद आणि अनेक
देशांचे दूतावास असले तरी बर्न ही देशाची Hauptstadt (capital city) नाही.
ती Bundestadt (federal city) आहे. दुसऱ्या भाषेत बोलायचे तर बर्न de
facto राजधानी आहे, पण de jure नाही.
ओशियानिया खंडामधल्या नौरू या देशालासुद्धा अधिकृत राजधानी नाही. Yaren
District मध्ये सरकारी इमारती आहेत पण ती अधिकृत राजधानी नाही. नौरुचा
झेंडा नक्की बघा. देश खूपच छोटा आहे आणि अनेकांना माहितीच नसतो कुठे आहे.
त्यामुळे त्यांनी झेंड्यावर त्यांना शोधण्याचा नकाशाच दिला आहे. पिवळी रेषा
म्हणजे विषुववृत्त. त्याच्या थोडंसं खाली असलेला तारा म्हणजे देशाचे
स्थान.
वेगळी अधिकृत राजधानी नसलेले obvious देश म्हणजे city-states - सिंगापोर, व्हॅटिकन सिटी आणि मोनॅको. तीनही देश city-states असल्यामुळे त्यांना वेगळी राजधानी अस्तित्वात नाही.
दक्षिण आफ्रिका बहुतेक एकमेव देश आहे ज्याला तीन राजधान्या आहेत.
जर्मनीला अन्य भाषक लोक काय काय म्हणतात ?
एका जर्मनीस्थिताकडून समजले :
स्पॅनिश लोक : अलेमानिया
फ्रेंच लोक : अलेमान्ये,
पोलिश लोक : नीम्सी
हाँगकाँगमध्ये : दं क्वॉक्
चीनमध्ये : दं ग्वो,
जपान मध्ये : दोइत्सं.
न्युझीलँड हे नाव मुळात डच लोकांनी दिलेले आहे. त्याच्या शोधापूर्वी Zeeland या नावाचा डच परगणा अस्तित्वात होता. त्यावरून New Zeeland करण्यात आले. पुढे इंग्लिशमध्ये त्याचे स्पेलिंग बदलले.
रंजक भाग असा आहे: न्यूझीलंड आणि “ओल्ड Zeeland’ एकमेकांपासून 17700 किलोमीटर दूर आहेत !
(पृथ्वीवरील कोणत्याही दोन बिंदूमधले जास्तीत जास्त अंतर 20,000 किलोमीटर असते).
असे न्यु नाव असलेले बरेच प्रांत आहेत. न्यु यॉर्क, न्यु जर्सी , इ.
या लेखात म्हटलंय की डच लोकांनी ऑस्ट्रेलियालाही न्यु हॉलंड हे नाव दिलं होतं.
हॉलंड हा नेदरलँडसचा भाग आहे. मला वाटत होती, दोन्ही एका देशाची नावं आहेत. त्या देशाच्या रहिवाश्यांना डच का म्हणत असावेत?
ड्युइश वरून डच असं एक उत्तर दिसलं.
आफ्रिकेचे शिंग
Djibouti, Eritrea, Ethiopia, and Somalia या एकमेकांच्या सान्निध्यात
असलेल्या देशांमुळे आफ्रिकेच्या नकाशावर एक वैशिष्ट्यपूर्ण आकार दिसतो
त्याला शिंग असे म्हणतात

डायोमीड बेटांची मजेशीर केस
डायोमीड बेटं ही बिग डायोमीड आणि लिटिल डायोमीड बेट अशी दोन बेटं आहेत. त्यातील बिग डायोमीड हे रशियाच्या मालकीचे असून लिटिल डायोमीड हे अमेरिकेच्या मालकीचे आहे. दोन्ही बेटांत फक्त २.४ मैल अंतर आहे, तरीही इंटरनॅशनल डेट लाईनच्या अलीकडे पलीकडे असल्यामुळे दोन्ही बेटांत २१ तासाचा टाईम गॅप असतो, ह्या बेटांचे टोपण नाव टूमोरो आयलंड आणि येस्टरडे आयलंड असे पडलेले आहे

Sichuan ( Szechuan or Szechwan) हा चीनचा प्रसिद्ध प्रांत. इथल्या पाकक्रिया पण चविष्ट.
आपण भारतात ज्या ‘शेझवान’ नूडल्स खातो ते नाव यावरून घेतलेले.
जर्मनीला रशियनमध्ये Германия (गिर्मानिया) म्हटले जाते.
रशियाचे पूर्वेकडचे सर्वात मोठे शहर - Владивосток (व्लदिवस्तोक) व्लदि म्हणजे देव आणि वस्तोक म्हणजे पूर्व. व्लदिवस्तोक म्हणजे पूर्वेकडच्या देव.मॉस्को शहराला त्यातून वाहणाऱ्या मॉस्को (Москва - रशियन उच्चार मस्क्वा) नदीवरून पडले आहे.
Volga नदीच्या नांवावरून ओळखले जाते Волгоград व्हल्गऽग्राद. ग्राद म्हणजे छोटे शहर/town
सीलँडः फक्त दोन खांबावर उभा असलेला देश तुम्हाला माहिती आहे का?
- माईक मॅकएचरन
- बीबीसी ट्रॅव्हल

फोटो स्रोत, ROBERT HARDING/ALAMY
सीलँड
ही सगळी भन्नाट गोष्ट सुरू झाली एका इमेलमुळे. हा ईमेल आणि त्यापुढे घडत गेलेल्या घटना मी कधीच विसरू शकणार नाही. मे (2020) महिन्यात मला सीलँडचे राजकुमार मायकल यांचा आपण बोलू शकतो का असा संदेश मिळाला.
या एका संदेशामुळे इतिहासाच्या आणि भूगोलाच्या एका वेगळ्याच विश्वात ओढला गेलो. स्वयंभू राजे, जमिनीवर अधिकार सांगणारे दावे, ऐतिहासिक विसंगती, दुसऱ्या महायुद्धातला ब्रिटन, पायरेट रेडिओ स्टेशन, कॉल पकडणे अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यावेळेस मला करता आल्या.
या इमेलमुळे तर मी एकदम रोमांचित झालो होतो. मला याआधी कधीही कोणत्याही राजकुमाराने इमेल पाठवलेला नव्हता आणि भविष्यातही असं होण्याची शक्यता नव्हती.
सीलॅँड हे चिमुकलं संस्थान इंग्लंडच्या सफॉक किनाऱ्याजवळ आहे. हा जगातला सर्वात लहान देश आहे असं म्हटलं जातं.
खरंतर हा दुसऱ्या महायुद्धात अँटीएअरक्राफ्ट प्लॅटफॉर्म होता. 1942मध्ये तो तयार करण्यात आला होता आणि त्यावेळेस त्याचं नाव ठेवण्यात आलं होतं एचएम फोर्ट रफ्स.
समुद्रात तोफांनी सज्ज असलेला किल्ला
हा किल्ला ब्रिटनच्या सीमेबाहेर होता. शस्त्रांनी सज्जही होता. युद्धकाळात इथं रॉयल नेव्हीचे 300 सैनिक तैनात होते. 1956मध्ये इथून नौदल पूर्णपणे हटवलं आणि हा किल्ला बेवारशासारखा एकाकी झाला.
1966 पर्यंत हा किल्ला निर्जनच होता. मग एकेदिवशी ब्रिटिश फौजेतला एक निवृत्त मेजर इथं आला आणि त्यानं नव्या देशाची स्थापना केली.
हा किल्ला किनाऱ्यापासून 12 किमी दूर आहे आणि नावेतून पाहाता येतो. दिसायला आजिबात खास वाटत नाही. दोन खांबांवर एखाद्या कंटेनरसारख्या इमारतीचं बांधकाम आहे.
नावेतून तिथं गेलं की क्रेनने वर ओढावं लागतं. मगच वर जाता येतं. पण समुद्राचा भणाणता वारा आणि रौद्र लाटा मनात भीती निर्माण करतात.
याच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. त्याच्याशी अनेक कथा निगडित आहेत. हेलिकॉप्टरने घातलेला छापा, गँगस्टर्स, युरोपीय व्यापाऱ्यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न अशा अनेक घडामोडी इथं घडल्यात.
ब्रिटिश सरकारनं जी कागदपत्रं जाहीर केली आहेत त्यामध्ये या किल्ल्याला 'इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यावरचा क्युबा' म्हटलं आहे.

फोटो स्रोत, MARTYN GODDARD/ALAMY
युवराज आणि युवराज्ञी बेट्स
याची एकेक माहिती ऐकायला सुरुवात केली की हॉलिवूडच्या एखाद्या पटकथालेखकानं पटकथा लिहिल्यासारखं वाटतं. एका कुटुंबानं या आऊटपोस्टला चिमुकल्या राष्ट्र बनवून टाकलं. हे पटतच नाही.
तरीसुद्धा या एकाकी जागेमध्ये एका नव्या स्वप्न पाहिलं गेलं. कोणत्याही सरकारचा आपल्यावर अंमल नसून आपण स्वतंत्र आहोत असं घोषित करण्यात आलं. ब्रिटनच्या नाकावर टिच्चून इथे स्वतंत्र सरकार आहे.
सीलँडच्या राजकुमार मायकल यांच्याशी फोनवर बोलणं झालं तेव्हा त्यांच्याकडे सुरस कथांचा खजिना असल्याचं मला जाणवलं.
यातल्या काही गोष्टी त्यांनी 'होल्डिंग द फोर्ट' पुस्तकात छापल्या आहेत. परंतु सीलँडसंबंधी ज्या कथा जगाला माहिती नाहीत त्या कथा ते मला सांगायला तयार झाले होते.
पूर्व किनाऱ्यावरचं क्युबा
भाग
End of पॉडकास्ट
आम्ही एसेक्स किनाऱ्यावरच्या त्यांच्या मुख्य घरात भेटलो. राजकुमार म्हणाले, "मी 14 वर्षांचा होतो. तेव्हा शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यावर मी बाबांना मदत करायला पहिल्यांदा तिथं गेलो होतो. तेव्हा मी सहा आठवडे तिथं राहिल्याचं मला आठवतं."
"मग या त्या बेटावरच्या वाऱ्या पुढे 50 वर्षे चालतील असं वाटलं नव्हतं. ते एक वेगळंच आयुष्य असायचं. इंग्लंडच्या भूमीवरून नाव आली तर काही खाणं-पिणं मिळेल यासाठी कधीकधी आम्हाला कित्येक महिने वाट पाहावी लागे. मी सतत क्षितिजाला डोळे लावून बसे पण समुद्राच्या पलिकडे काहीच दिसत नसे."
सीलॅंडची स्थिती थोडी वेगळी आहे. कोणत्याही देशांना त्याला मान्यता दिलेली नाही. पण राजकुमार म्हणतात, मी कोणाकडे मान्यता मागितलेलीच नाही.
युद्धाच्या काळात ब्रिटनने हा प्लॅटफॉर्म आपल्या सामुद्रसीमेबाहेर अवैधरित्या बांधला होता. पण तेव्हा युद्धाच्या धामधुमीत त्याकडे लक्ष द्यायला कोणाकडे वेळ नव्हता.
खरंतर तेव्हाच हे नष्ट करण्याची संधी ब्रिटिशांकडे होती पण त्यांनी तिकडं ढुंकूनही पाहिलं नाही. अनेक दशकं सीलँड तिथंच उभा आहे.
सीलँडचं क्षेत्रफळ फक्त 0.004 चौ. किमी आहे. हा आकार पाहिला की लहान देशांची आपली संकल्पनाच बदलून जाते. पण मग लोक इतक्या लहान देशांची स्थापना का करतात हा प्रश्न उरतोच.
मायक्रोनेशनः द लोनली प्लॅनेट गाईड टू होम-मेड नेशन्स या पुस्तकाचे सहलेखक जॉर्ड डनफोर्ड म्हणतात, की याला वर्तमान सरकारविरुद्धचा असंतोष आणि आपल्या पद्धतीनं काम करण्याची असणारी इच्छा कारणीभूत असते.
डनफोर्ड म्हणतात, सीलँड हे एक विशेष प्रकरण आहे. कारण दीर्घकाळापासून ते सुरू आहे आणि कायद्याच्या कचाट्यातून नेहमी सुटलेलं प्रकरण आहे.
अमेरिकेत अशा कुटुंबाला एक असंतुष्ट कुटंब म्हणून पाहिलं गेलं असतं. पण 1960 च्या दशकात ब्रिटन अधिक उदार होत. तेव्हा हे प्रकरण सोडवण्यात काही फायदा नाही असं अधिकाऱ्यांना वाटलं असेल. एकदोनदा प्रयत्न करुन त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला पण त्यातून सीलँड सुटलं.
मान्यता मिळण्यासाठी नियम
लहान देशांना मान्यता देण्याचे नियम 1933 साली मॉंटेव्हीडिओ संमेलनात तयार करण्यात आले होते. त्यात अशा राज्यांचे अधिकार आणि कर्तव्यं निश्चित केली होती.

फोटो स्रोत, MIROSLAV VALASEK/ALAMY
अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्टसह आंतरराष्ट्रीय नेत्यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. याच संमेलनात राज्यासाठी चार मापदंड ठरवण्यात आले होते.
लहान देशांना या मापदंडाच्या आधारावरच मान्यता मिळते असं डनफोर्ड सांगतात. राज्य (देश) म्हणवलं जाण्यासाठी लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, सरकार आणि इतर देशांशी संबंध यांचा विचार केला जातो.
चौथा आणि शेवटचा मापदंड लहान देशांना जास्त जेरीस आणतो कारण ते सतत आपल्याला मान्यता द्या यासाठी इथर देशांकडे भूणभूण लावत असतात. सीलँड मात्र असं करत नाही. ते स्वतःला सार्वभौम समजतात आणि त्यावर आपलाच हक्क असल्याचं समजतात.
प्रत्येक देशाच्या उत्पत्तीची, जन्माची एक कहाणी असते. सीलँडची कहाणी 1965 पासून सुरू होते. मायकल यांचे वडील पॅडी रॉय बेट्स ब्रिटिश सैन्यात मेजरपदावरुन निवृत्त झालेले होते. त्यानंतर त्यांनी मासेमारी सुरू केली होती. त्यांनी रेडियो इसेक्सची स्थापना केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
पॅडी रॉय बेट्स आणि जोन
एचएम फोर्ट रफ्स जवळ एक नॉक जॉन नावाचा किल्ला होता. त्याचा वापरही बंद करण्यात आला होता. त्या किल्ल्यात पॅडी यांनी एक पायरेट रेडिओ स्टेशन सुरू केलं होतं.
त्यावेळेस अवैध रेडियो स्टेशन्सची लोकप्रियता इतकी वाढली की ब्रिटिश सरकारला 1967 साली सागरी प्रसारण अपराध कायदा तयार करावा लागला. अशा प्रकारची स्टेशन्स बंद पाडणे हा एकमेव उद्देश होता.
त्यामुळे संधी पाहून बेट्स यांनी आपलं स्टेशन रफ्सवर नेलं. ही जागा ब्रिटिश सागरी सीमेपासून दूर आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात होती.
रेडिओ स्टेशन
नॉक जॉनप्रमाणे हा सुद्धा निर्जन सागरी किल्ला होता आणि त्याची अवस्था वाईट होती. 1966च्या ख्रिसमसच्या आधी त्यांनी हे ठाणं ताब्यात घेतलं. नऊ महिन्यांनी 2 सप्टेंबर 1967मध्ये त्यांनी सीलँडची घोषणा केली. त्याच दिवशी त्यांची पत्नी जोन हिचा वाढदिवस होता. काही दिवसांनी सगळं कुटुंब तिथं राहायला लागलं.

फोटो स्रोत, KIM GILMOUR/ALAMY
एचएम फोर्ट रफ्स.
1970 च्या दशकात इथं 50 लोक राहात असत. त्यामध्ये सर्व डागडुजी करणारे, स्वच्छता करणाऱ्यांचे कुटुंबीय आणि मित्र सहभागी होते. ब्रिटनच्या सराकरविरोधातील आंदोलनाचं ते प्रतिक बनलं होतं.
सीलँडच्या काही समस्याही होत्या. मायकल म्हणतात, काहीच उपयोगाला यायचं नाही. आमची सुरुवात मेणबत्त्यांपासून झाली होती. मग हरिकेन लुप आणि जनरेटर आले.
सीलँडनं आपलं राष्ट्रीयत्व तयार केलं. शासकीय चिन्हं तयार केली. घटना लिहिली. त्यांचा स्वतःचा झेंडा आहे. फुटबॉलची टीम आणि राष्ट्रगीतही आहे.
सीलँडच्या चलनावर युवराज्ञी जोन यांचं चित्र आहे. आतापर्यंत त्यांनी 500 पासपोर्ट दिलेत. स्वातंत्र्यावर प्रेम हे त्यांचं बोधवाक्य आहे.
मायकल त्यांची तीन मुलं (जेम्स, लियाम आणि शार्लोट) आणि दुसरी पत्नी (मेई शी, या चीनच्या पिपल्स रिबरेशन आर्मीमधल्या निवृत्त मेजर आहेत) सीलँडचा राजवंश चालू ठेवत आहेत.
ब्रिटनशी भांडण
मायकल सांगतात, माझे वडील स्वतःचा देश तयार करावा अशा मताचे नव्हते. पण ब्रिटन सरकार आपलं रेडिओ स्टेशन बंद करण्याच्या प्रयत्नात आहे हे पाहून ते त्रासले होते. आम्ही ब्रिटिश सरकारशी लढलो आणि जिंकलो. सीलँड आतापर्यंत स्वतंत्र अबाधित ठेवू शकलं आहे.
या देशाचा स्वतःचा झेंडा आहे
सीलँडसंदर्भात सर्वात वादग्रस्त घटना 1978मधली आहे. त्यावर ताबा मिळवण्यासाठी जर्मनी आणि हॉलंडचे लोक आले होते. मात्र बंदुक रोखून बेट्स परिवाराने त्या सर्वांना ताब्यात घेतलं.

फोटो स्रोत, NATANAELGINTING/GETTY IMAGES
सीलँडचा झेंडा
त्यांना सोडवण्यासाठी लंडनमधून जर्मनीचे राजदूत व शिष्टमंडळ हेलिकॉप्टरने आलं. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला मान्यता दिली.
स्वातंत्र्य सहज मिळत नाही. सीलँडच्या डागडुजीचा खर्च आहे. पहारेकरी तेथेच राहातात. हा खर्च भरुन काढण्यासाठी सीलँडवासी ऑनलाइन स्टोअरवर टीशर्ट, पोस्टाची तिकिटे, राजकीय पदव्या विकतात. लॉर्ड, लेडी. बॅरोन, बॅरोनेस या पदव्या 29.99 पौंडात विकत घेता येतात.
इथं सीमा शुल्क आणि इमिग्रेशनचे सामान्य कायदे लागू नाहीत. राजकुमारांचं अधिकृत आमंत्रण मिळाल्याशिवाय सीलँडवर जाता येत नाही. ते स्वतः तिथं वर्षातून फक्त दोन ते तीन वेळा जातात. बाकी कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही तिथं राहात नाही.

सीलँडची पोस्टाची तिकिटे
डनफोर्ड म्हणतात, "सीलँडची स्थिती नेहमीच बेताची राहिली. परंतु सध्याच्या राजकुमारांनी त्याला चांगल्या पद्धतीनं सांभाळलं आहे. लहान देशांची हीच गोष्ट मला आवडते. ते अस्सल राष्ट्रवादाचं जे रुप दाखवतात ते एकदम शानदार असते."
नागरिकत्वाची नागणी
सीलँडला नागरिकत्व मिळवण्यासाठी दररोज 100 इमेल्स येतात. दिल्लीपासून टोकियोपर्यंतचे लोक सीलँडशी प्रामाणिक राहाण्याची शपथ घ्यायला तयार आहेत.
मायकल म्हणतात, आमची एकूणच गोष्ट लोकांना असा विचार करायला भरीस घालते. जिथं लोकांना काय करा हे सांगितलं जातं अशा समाजात आम्हाला राहात नाही. सर्वजणांना सरकारपासून सूटका हवी आहे. जगाला आमच्यासारख्या प्रेरकशक्तींची गरज आहे. जगात अशा जागा फारच कमी आहेत.
सीलँड अजूनही त्याच जागेवर आहे आणि समुद्र गेली अनेक दशके याचं शांतपणे निरीक्षण करत आहे. ब्रिटनपासून जवळ असूनही जागा ब्रिटनपासून लांब आहे. हे किती वेगळं आणि अशक्यप्राय वाटतं ना?...
https://www.bbc.com/marathi/international-53777671
किंग्डम ऑफ टवोलारा: केवळ 11 लोकांचा देश, जिथला राजा प्रवाशांसाठी बोट चालवतो...

फोटो स्रोत, ELIOT STEIN
आपण आजवर अनेक विशाल साम्राज्यांच्या रंजक कथा ऐकल्या आहेत. कधीही सूर्य मावळत नव्हता, असं ब्रिटिश साम्राज्य, चीनपासून भारताच्या वेशीपर्यंत पोहोचलेलं चंगेज खानचं वर्चस्व किंवा काबूल-कंदाहारपासून कर्नाटकपर्यंत पसरलेलं मुघलांचं साम्राज्य यांचा त्यात समावेश आहे.
पण आज आपण जगातील सर्वात लहान अशा एका साम्राज्याची सफर करणार आहोत. याला साम्राज्य म्हणावं का? असाही प्रश्न पडतो. कारण या ठिकाणी केवळ 11 जण राहतात आणि तेही अर्धवेळ.
याठिकाणी असा राजा आहे जो स्वतः प्रवासी वाहतुकीसाठी बोट आणि रेस्तराँ चालवतो. हाफ पँट तसेच सँडल परिधान करून जीवन तो जीवन जगतोय. हे रंजक असं साम्राज्य आहे किंगडम ऑफ टवोलारा.
छोटंसं बेट
भूमध्य सागरामध्ये इटलीच्या सार्डीनिया प्रांताजवळ असलेलं हे एक छोटंस बेट आहे. याठिकाणी अजूनही एक साम्राज्य आहे. इटलीला देश म्हणून मान्यता मिळण्याच्या पूर्वीपासून ते अस्तित्वात आहे. किंगडम ऑफ टवोलारा... हे प्रत्यक्षात टवोलारा नावाच्या एका छोट्याच्या बेटावर वसलेलं आहे. याचं एकूण क्षेत्रपळ हे पाच चौरस किलोमीटर एवढं आहे.
या साम्राज्याच्या राजाचं नाव आहे, आंतोनियो बर्तलिओनी. तुम्ही जर कधी फिरण्यासाठी टवोलारा गेले तर कदाचित तुम्हाला इथल्या राजांना शोधणं जरा कठीण जाईल. कारण ते राजासारखे दिसतच नाही. पेहराव किंवा राहणीमान काहीही तसं नाही. आंतोनियो बर्तलिओनी म्हणतात की, राजा म्हणून त्यांना केवळ जेवण मोफत मिळतं. तेही त्याच्या स्वतःच्या रेस्तराँमधून.
टवोलारा सारखे इतर काही छोटे-छोटे देश
1. रेडोंडा - इंग्लंडच्या साऊथम्पटन परिसरातील या प्रदेशानं धूम्रपानावरील बंदीपासून वाचण्यासाठी स्वतःला स्वतंत्र देश घोषित केलं होतं.

फोटो स्रोत, ELIOT STEIN
2. टवोलारा - 5 चौरस किलोमीटरवर पसरलेल्या या देशात एकूण 11 नागरिक आहेत. इथले राजा आंतोनियो हेच इथं असलेलं एकमेव रेस्तराँ चालवतात.
3. टोंगा - प्रशांत महासागरात असलेला हा देश 748 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला आहे. या देशाची लोकसंख्या 1 लाख 6 हजार आहे. 1773 मध्ये कॅप्टन जेम्स कूक यांनी याचा शोध लावला होता. कॅप्टन कूक यांनी याला 'मैत्रीचं बेट' असं नाव दिलं होतं. पण प्रत्यक्षात याठिकाणच्या नागरिकांना कॅप्टन कूक यांना मारायचं होतं.
4. ब्रुनेई - 5 हजार 765 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या ब्रुनेईची लोकसंख्या 4 लाख 13 हजार आहे. येथील लोकांना कधीही कर भरावा लागत नाही. ब्रुनेईचे सुल्तान (राजा) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.
5. स्वाजीलँड - आफ्रिकेतील या देशाचं क्षेत्रपळ 17 हजार 360 चौरस किलोमीटर आहे. निसर्ग सौंदर्यामुळं या देशाला गूढ रहस्यांचा देश असं म्हटलं जातं. येथील एकूण लोकसंख्या जवळपास 13 लाख आहे.

फोटो स्रोत, Getty Images
6. लेसोथो - दक्षिण आफ्रिकेत वसलेला हा देश 30 हजार चौरस किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर असलेल्या या देशाची लोकसंख्या सुमारे वीस लाख आहे.
किंग्डम ऑफ टवोलारा
किंग्डम ऑफ टवोलारामध्ये यंदा स्थापनेला 180 वर्ष पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा होत आहे. आजच्या काळामध्ये खरं तर एका बेटावरील साम्राज्याचा विषय हा गमतीचा ठरू शकतो.
पण याठिकाणचे लोक आणि राजा आंतोनियो बर्तलिओनी याबाबत अत्यंत गंभीर आहेत. याबाबत विचारलं असता ते अनेक पिढ्यांचा इतिहास उलगडून सांगतात.

फोटो स्रोत, RICCARDO FINELLI
राजे आंतोनियो
एंतोनियो बर्तलिओनी यांच्या मते त्यांच्या पणजोबांचे पणजोबा, गुसेप बर्तलिओनी 1807 मध्ये दोन बहिणीशी लग्न करून इटलीमधून पळून आले होते. त्यावेळी इटली हा देश नव्हता, तर सार्डिनिया हा इटलीचा एक भाग वेगळं साम्राज्य म्हणून कारभार चालवत होता. याठिकाणी दोन विवाह करणं हा गुन्हा होता. त्यामुळं गुसेप बर्तलिओनी पळून या बेटावर आले आणि तिथंच स्थायिक झाले.
बकऱ्यांची शिकार
गुसेप हे जीनिव्हा शहरातील होते. त्यांना काही दिवसांतच या बेटावर असलेल्या सोनेरी दातांच्या बकऱ्यांबाबत माहिती मिळाली. ही जगातील अशाप्रकारची बकऱ्यांची एकमेव प्रजाती आहे.
काही दिवसांतच इटलीपर्यंत या बकऱ्यांची माहिती पोहोचली. सार्डिनियाचे राजा कार्लो अल्बर्टो या बकऱ्या पाहण्यासाठी आणि त्यांची शिकार करण्यासाठी टवोलारा बेटावर आले.

फोटो स्रोत, REDA &CO SRL/ALAMY
ही घटना 1836 च्या दरम्यानची आहे. त्यावेळी गुसेप यांचा मुलगा पाओलोनं कार्लो अल्बर्टो यांना बकऱ्यांच्या शिकारीसाठी मदत केली आणि संपूर्ण बेटावर फिरवलं. आंतोनियो सांगतात की, जेव्हा सार्डिनियाचे राजा अल्बर्टो या बेटावर पोहोचले तेव्हा त्यांनी स्वतःची ओळख सार्डिनियाचे राजा अशी करून दिली. त्यावेळी पाओलो यांनी स्वतःची ओळख टवोलाराचा राजा अशी करून दिली होती.
भूमध्य सागर
टवोलारामध्ये तीन दिवस राहिल्यानंतर कार्लो अल्बर्टो जेव्हा त्यांच्या देशात परतले तेव्हा त्यांनी एक आदेश काढला आणि टवोलारा हा सार्डिनिया राज्याचा भाग नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतर पाओलो बर्तलिओनी यांनी स्वतःला राजा जाहीर केलं. त्यावेळी या बेटावर एकूण 33 नागरिक होते. त्यामुळं तेव्हा पाओलो त्या 33 जणांचे राजे बनले.

फोटो स्रोत, REALY EASY STAR/ALBERTO MAISTO/ALAMY
पाओलो यांनी मृत्यूपूर्वी एक शाही स्मशानभूमी (कब्रस्तान) तयार करून घेतलं. त्यांनी मृत्यूपत्रामध्ये असं लिहिलं की, मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीनंतर त्यांच्या कबरीवर एक मुकूट लावावा. विशेष म्हणजे पाओलो बर्तलिओनी यांनी जीवंत असताना कधीही मुकूट परिधान केला नाही. नंतरच्या काळात टवोलाराच्या राजांचे अनेक किस्से भूमध्य सागरात गाजत होते.
शांतता करार
टवोलाराच्या राजांनी अनेक देशांच्या राजांबरोबर करारही केले. त्यामध्ये इटलीचे संस्थापक म्हणून ओळख असलेल्या गॅरीबाल्डी यांचाही समावेश होता. सार्डिनियाचे तत्कालिन राजा व्हिटोरियो इमॅन्युअल द्वितीय यांनी तर 1903 मध्ये टवोलारा बरोबर शांतता करारही केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
एकोणीसव्या शतकात ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांनी जगभरातील राजांचे फोटो गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. त्यावेळी त्यांनी टवोलारा मधल्या शाही कुटुंबाचा फोटो काढण्यासाठी एक जहाज इथंही पाठवलं होतं.
त्यानंतर अनेक वर्ष इंग्लंडच्या बकिंघम पॅलेसमध्ये हा फोटो होता. सध्या हा फोटो एंतोनिओ बर्तलिओनी यांच्या रेस्तरॉमध्ये लावलेला आहे.
नाटो सैनिकांचा तळ
नाटोच्या सैनिकांनी 1962 मध्ये याठिकाणी तळ उभारल्यानं या छोट्याशा साम्राज्याचं सार्वभौमत्व संपुष्टात आलं. त्याच्या बहुतांश भागावर कुणालाही येण्या-जाण्याची परवानगी नव्हती. पण इटलीनं कधीही अधिकृतरित्या टवोलाराला त्यांचा भाग म्हणून स्वीकारलं नाही किंवा ताबाही घेतला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
तसं पाहिलं तर टवोलाराला जगातील कोणताही देश मान्यता देत नाही. टवोलाराचे राजा आंतोनियो आणि त्यांच्या कुटुंबातील लोक इटलीपासून या बेटापर्यंत पर्यटकांची ने आण कराणाऱ्या प्रवासी बोटी चालवतात. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक फिरण्यासाठी येतात. ते याठिकाणी बकऱ्या आणि गरुडांच्या एका लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातीला पाहण्यासाठी येतात.
कुटुंबाचा व्यवसाय
टवोलारा बेटाच्या आसपासच्या सुमद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे सागरी जीव आहेत. अनेक पर्यटक हे त्यांना पाहण्यासाठी येत असतात. आंतोनियो आणि त्यांचा पुतण्या हे याठिकाणी प्रवासी बोट चालवतात, तर त्यांचा दुसरा पुतण्या मासेमारी करतो.

फोटो स्रोत, Getty Images
तेच मासे आणि इतर सागरी जीव बेटावरील त्यांच्या रेस्तरॉमध्ये पर्यटकांना विविध पदार्थांच्या स्वरुपात उपलब्ध करून दिले जातात. आंतोनियो म्हणतात की, टवोलारावर राज्य करणं हाच जणू आमचा पिढीजात व्यवसाय आहे. पर्यटकांची वर्दळ वाढल्यानं आंतोनियो यांच्या राज्याचं उत्पन्नही वाढलं आहे. पण त्यांना सामान्य लोकांप्रमाणंच जीवन जगायला आवडतं.
ड्यूक ऑफ सेवॉय
आंतोनियो यांना रोज सकाळी उठल्यानंतर पत्नीच्या कबरीवर जाऊन फुलं वाहायला सर्वाधिक आवडतं. पण त्यासाठी ते प्लास्टीकची फुलं घेऊन जातात. खरी फुलं नेल्यास बकऱ्या ती खाऊन टाकतात, असं आंतोनियो म्हणतात. या स्मशानात बर्तलिओनी कुटुंबातील अनेकांच्या कबरीदेखिल आहेत.
तांत्रिकदृष्ट्या आंतोनिओ आणि त्यांचे सर्व नातेवाईक हे इटलीचे नागरिक आहेत. त्यांना एकदा असंही मनात आलं होतं की, ड्यूक ऑफ सेवॉयकडे त्यांच्या राज्याला मान्यता देण्याबाबत विचार करण्याची विनंती करावी. पण नंतर त्यांनी हा विचार सोडून दिला. आंतोनियो यांच्या मते, आमच्याकडं महाल म्हणून एवढं मोठं बेट असताना, आम्हाला अशा औपचारिकतांची गरज नाही.
https://www.bbc.com/marathi/international-57458397
आता बादरायण संबंध पहा...
Vatican City चे नाव वाटिका (बाग) वरून आले आहे. त्या शहरात सध्याही अनेक उद्याने आहेत ज्यावरून याची सत्यता पटते.
सौदी अरेबियाचे मूळ नाव स्वस्ति अर्वस्थान आहे. अर्व म्हणजे घोडा.
Spectacles हा शब्द स्पष्टकरस (स्पष्ट करून दाखवणारा) यावरून आला आहे.
कौरवपांडवयुद्धापर्यंत जगात सर्वत्र वैदिक क्षत्रियांचे साम्राज्य होते. त्या साम्राज्यात संस्कृत हीच सर्व मानवांची भाषा होती. चार-पाच हजार वर्षांपूर्वी सिरिया, असिरिया, बाबिलोनिया, मेसोपोटेमिया ही प्राचीन राष्ट्रे होती. परंतु सुर व असुरांत वैर होते. वैदिक साम्राज्य मोडल्यानंतर सुरांचे राज्य सुरिय (Syria) व असुरांचे Assyria झाले." बाबिलोनीया म्हणजे बाहुबलनीय व मेसोपोटेमिया म्हणजे महिषीपट्टनीयम = राणिपूर. "वैदिक संस्कृती लोप पावत केवळ सिंधु प्रदेशातच टिकून राहिली म्हणून तिचे नाव हिंदू. वैदिक विश्वसाम्राज्याची भाषा संस्कृत असल्याने प्राचीन काळी देशांची, सागरांची वगैरे नावे संस्कृतच होती." त्या नावांचा नंतर अपभ्रंश झाला. "उदा. सिंधुस्थानचे हिंदुस्थान, त्याप्रमाणे अर्बस्थान, तुर्गस्थान, कझाकस्थान, बलुचिस्थान, अफगाणिस्थान इत्यादि. रशिया हे मूळचे ऋषिय होते. सैबेरिया - शिबिरिय, प्रशिया - प्रऋषिय, पार्थिया - पार्थीय, ग्रीस - गिरीईश, युरोप - ससुरूप, ऑस्ट्रेलिया - अस्त्रालय, अमेरिका - अमरिश, ऑस्ट्रिया - अस्त्रीय, इजिप्त - अजपती, केनडा - कणाद, उरूग्वे - उरूगावः, ग्वाटेमाला - गौतमालय, जर्मनी अर्थात Deutschland - दैत्यस्थान, Dutch - दैत्य."
तर या पुराव्यांवरून विश्वात पूर्वी वैदिक संस्कृती होती!
इस्लामचे वैदिक मूळ
इस्लाम हा धर्मही मूळचा वैदिकच आहे! `इस्लामचे वैदिक मूळ'
मक्का नगर इस्लामपूर्व आंतरराष्ट्रीय वैदनक धर्माचे एक प्रख्यात
तीर्थक्षेत्र होते. मक्का = मखः (म्हणजे यज्ञ) आणि मदिना = मेदिनी (म्हणजे
पृथ्वी). यावरून मक्कामदिना ही मखमेदिनी म्हणजे यज्ञभूमी होती.
मक्का-मदिनेची उत्पत्ती लागली. पण काबाचे काय? तर "मक्केत शेषशायी विष्णूचे
विशाल मंदिर होते. त्याच्या गर्भगृहास संक्षेपाने गाभा म्हणत. त्याचाच
अपभ्रंश काबा असा झाला." काबा या स्थानी विविध देवदेवतांच्या 360 मूर्ती
होत्या. इ. स. 930 ह्या वर्षी कारमेथियन लोकांनी काबा लुटून त्यातले
शिवलिंग पळवून नेले,"
शिवाय अर्वा म्हणजे घोडा. यावरून अर्बस्थान - अर्वस्थान म्हणजे घोड्यांचा देश हे नाम तयार झाले. "यावरून वैदिक क्षत्रियांनी तेथे जातिवंत घोड्यांची उत्पत्ती शास्त्रीय पद्धतीने करविली होती."
इस्लामचा प्रेषित महंमद पैगंबर याचे मूळही वैदिकच होते. ते कसे, तर महंमद हा संस्कृत बहुब्रीही समास आहे. 'महान मदः यस्य इति महंमद'. महंमदाच्या कुलाचे नाव कुरेशी. कुर + ईशी. हे कौरव कुलातील लोक होते. अल्ला, अंबा, अक्का ही देवीची द्योतक समानार्थी नावे आहेत. महंमद पैगंबराची कुलदेवता अल्ला (ऊर्फ अंबा) होती.
ह्सू नका
मस्त माहिती आणि प्रतिसादही.
एकदा शब्दांचे अपभ्रंश इतर भाषांत "सापडू" लागले की ओळखायला मजा येते. कोस्टा रिका म्हणजे "रिच कोस्ट" हे इंग्रजीत. तसेच पोर्टो रिको म्हणजे रिच पोर्ट हे ही. व्यक्तींच्या नावात जसे पेद्रो - पीटर, कार्लोस - चार्ल्स, होजे - जोसेफ असे होत जाते तसेच देशांच्या व गावांच्या नावातही होत असावे.
कॅलिफोर्नियातील सॅन होजे (San Jose) व कुपर्टिनो या दोन्ही शहरांचा
संबंध स्पॅनिश व इटालियन शब्दांच्या ओरिजिन वरून आला असावा - "Saint Joseph
de Cupertino" या मूळ इटालियन नावातून आलेले आहे असे त्या शहरांच्या
इतिहासात आहे. पण कॅलिफोर्नियात इटालियन लोकांचा काहीच संबंध नाही. तेथे
आले ते स्पॅनिश लोक आत्ताच्या मेक्सिकोवर त्यांची सत्ता असताना. त्यात ते
सेण्ट जोसेफ चे स्पॅनिश मधे सॅन होजे झाले असेल असे दिसते
त्यामुळे उद्या भारतीयांनी त्याचे "सॅन जोस" हे नाव रूढ केले तर तो ही एक अपभ्रंशच असेल 
आपल्या मुंबईतील सांताक्रूझ बद्दल एक मजेदार निरीक्षणः त्याचा "सांताक्रूझ" हा मराठी उच्चार डाउनमार्केट समजला जातो. त्याचा हाय सर्कल्स मधला उच्चार हा इंग्रजाळलेला "सॅण्टा क्रूझ" होतो. पण मूळ स्पॅनिश उच्चार हा मराठीलाच जवळचा आहे.
युरोपियन भाषांत पूर्व दिशेकरता "इस्ट" शब्दांची विविध रूपे रूढ असावीत.
वरती "Leste" आहे ते ही "east -> este > le este > leste" असे
काहीतरी झाले असावे. आता माझ्या अंदाजात स्पॅनिश/फ्रेंच्/ पोर्तुगीज मिश्रण
झाले असेल पण साधारण असेच असावे
तसेच ऑस्ट्रिया ची व्युत्पत्तीही "इस्ट" च्या जर्मन रूपातूनच आहे. जर्मन
कल्चर मधे "राइख" (Reich) शब्द आपण वाचला आहे. पूर्वेचे राइख -
Oosterreich->Austria असे काहीतरी ते दिसते. ऑस्ट्रियाच्या विकीपेजवरही
आहे.
यावरून व वरच्या अफाट व्युत्पत्तीवाल्य पोस्ट्सवरून पुलंचे एक वाक्य
आठवले. बहुधा अपूर्वाई मधले - "एका मित्राच्या म्हणण्यानुसार प्रशिया हे
पुरूषीय व ऑस्ट्रिया हे स्त्रीय या शब्दांपासून आलेले आहे. त्यामुळेच
त्यांच्या आसपासच्या छोट्या देशांना बाल्कन राष्ट्रे म्हणतात"
(त्यातही पश्चिमेच्या देशांच्या दौर्याच्या वर्णनाला अपूर्वाई हे नाव, हा ही खास पुलं टच)
एकाच नावाचे गाव किंवा शहर जगात अनेक देशांमध्ये आढळते. मुख्य म्हणजे अगदी भिन्न संस्कृती असलेल्या आणि जगाच्या दोन टोकांना असलेल्या देशांमध्येही तेच नाव आढळते.
अशी काही रंजक माहिती :
१. दिल्ली एकूण १५ आहेत
२. मद्रास ८ ( अमेरिका, द. आफ्रिका इ )
३. लखनऊ ७ ( भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ )
४. वेलिंग्टनचा तर कदाचित विक्रम असेल : एकूण 34 गावे (न्यूझीलँडची राजधानी, तामिळनाडूतले गाव, इ).
५. सिंगापूर (देश व महाराष्ट्रात रायगडजवळचे खेडे).
एकाच नावाची गावे/ठिकाणे जगात शोधण्यासाठी हे संस्थळ :
https://geotargit.com/called.php?qcity
सिंगापुरातील एका मेट्रो स्टेशनचे नाव 'धोबी घाट' आहे.
होय अगदी अगदी. मलाही तिथे असताना हे फार आश्चर्य वाटले होते. पण त्याला इतिहास आहे म्हणे. इंग्रज लोक भारतातून धोब्यांना घेऊन गेले होते. सध्या जिथे मेट्रो आहे तिथे पूर्वी छोटी नदी होती व हे धोबी तिथे कपडे धूत असंत
देशांचे नावबदल हा एक रोचक विषय आहे. काही देशांनी अनेक वेळा नामांतर केलेले दिसते. उदाहरणार्थ,
कंबोडियाने चार वेळेस नामांतर करत पहिल्या नावापाशीच वर्तुळ पूर्ण केले !
Kingdom of Cambodia >> Khmer Republic >> Democratic Kampuchea >> State of Cambodia>>> Kingdom of Cambodia.
चलनाचे पुनर्मूल्यांकन
एखाद्या गरीब देशाच्या चलनाचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात सतत ढासळत राहिला तर काही काळाने त्या चलनाचे पुनर्मूल्यांकन करतात.
लेखात उल्लेख असलेल्या Sierra Leone या देशाने नुकतेच तसे केले आहे. हे करताना त्यांनी सध्याच्या चलनाच्या किमतीला 1000 ने भागायचे ठरवले आहे.
आता त्यांच्याकडील सर्वाधिक किमतीची १०,००० Le ची नोट फक्त १० Le ची होईल.
गेल्या काही वर्षांत झिंबाब्वे आणि तुर्किये सकट अन्य काही देशांनी अशी कृती केलेली आहे.
https://sierraloaded.sl/feature/insight-into-sierra-leone-currency-reden...
जगातील कुठल्याही भूभागापासून दूर असणारे आणि दक्षिण अटलांटिक महासागराच्या जवळपास मध्यात वसलेला चिमुकला २५१ +/- लोकसंख्या असणारा ट्रिस्टन द कून्हा द्विपसमूह ! , जवळपास ३८ वर्ग मैल इतकं छोटं बेट आहे मुख्य
ब्रिटिश ओवरसीज टेरीट्रीचा भाग असणारे ट्रिस्टन द कून्हा द्विपसमूह
केप टाऊन किनाऱ्या पासून २७८७ किलोमीटर
सेंट हेलेना बेटांपासून २४३७ किलोमीटर
आणि
फॉकलंड बेटांपासून ४००२ किलोमीटर अंतरावर आहे, इथं एअरस्ट्रीप नाही, त्यामुळे सगळ्यात जवळचा अन लवकर होणारा प्रवास म्हणजे सहा दिवसांचा केप टाऊन पर्यंतचा बोटीचा प्रवास होय.
गर्दी अन जगापासून दूर कुठंतरी जायची ईच्छा असणाऱ्या लोकांसाठी आयडियल डेस्टिनेशन ??

ट्रिस्टन द कून्हा चे जमिनीपासून असलेले ढोबळ अंतर आणि त्याचे दक्षिण अटलांटिक मधील स्थान

ट्रिस्टन द कून्हाचा जुना नकाशा
आज 21 जून. वर्षातील सर्वात मोठा दिवस.! पृथ्वीवरील खालील देशांत काही ठिकाणी तो तब्बल 21 तासांहून अधिक काळ असणार आहे:
Iceland, Greenland, Alaska, Canada, Norway, Sweden, Finland, Northern Russia, and the North and South Poles
तिमोर म्हणजे भाषा इंडोनेशियात East .
अजून एक गंमत म्हणजे बहासा इंडोनेशीयात west यासाठी बारात हा शब्द आहे .
बारात म्हणजे भारत . भारत इंडोनेशियाच्या पश्चिमेला आहे . म्हणजे देशाच्या
नावावरून दिशा मिळाली
दोन मोठ्या देशांच्या सीमेवर जर एखादा भूभाग असेल तर दोन्ही देश तो बळकावण्यासाठी उत्सुक असतात. पण या वृत्तीला अपवाद म्हणून Bir Tawil (= उंच विहीर) चे उदाहरण पाहता येईल.

इजिप्त व सुदान यांच्या सीमेवरील हा छोटासा भूभाग ( वरच्या चित्रातील छोटीशी पांढरी जागा). परंतु या दोन्ही देशांपैकी कोणीही त्याच्यावर हक्क सांगायला तयार नाही ! (अर्थात यामागे काही अन्य कारणे आहेत).
Alastair Bonnett यांच्या मते पृथ्वीवरील राहण्यायोग्य पण अद्याप बिलकूल वस्तीविरहित असा हा भाग असून कुठल्याच देशाने त्यावर हक्क सांगितलेला नाही.
इंग्लंड मध्ये Stonehenge हे एक जागतिक वारशाचे ठिकाण आहे. इथे दरवर्षी लोक 21 जून ला सूर्योदय पाहण्यासाठी जमतात आणि मोठा उत्सव असतो कोविड काळात तो होऊ न शकल्याने यंदाचा उत्साह जोरदार होता:
https://www.euronews.com/2022/06/21/summer-solstice-celebrated-at-stoneh...
समर सॉल्स्टिसच्या वेगवेगळ्या देशातील प्रथा
नेटफ्लिक्सवर मॉर्गन फ्रिमनचा 'The Story of God ' नावाचा
माहितीपट आहे, त्यात मेक्सिकन समर सॉल्स्टिस उत्सव व तेथील संस्कृतीचा
निसर्गाशी खास करुन सूर्याचा ईश्वराशी लावलेला संबंध फार छान समजावून
सांगितला आहे.
तो संपूर्ण माहितीपटच(सिझन १) सुरेख आहे. वेगवेगळ्या
संस्कृतीतल्या/देशातल्या ईश्वरी संकल्पनांचा व त्यांच्या परंपरांच्या
मूळाशी असलेल्या शक्यतांचा सुरेख आढावा घेतलाय.
राष्ट्रकुल एक मोठा देशसमूह आहे. 1952 मध्ये जेव्हा एलिझाबेथ राणी त्याची प्रतिकात्मक अध्यक्ष झाली तेव्हा त्यात फक्त ८ देश होते.
आज ही संख्या ५६ झाली आहे. त्यापैकी Togo व Gabon हे दोन देश नुकतेच सभासद झालेले आहेत.
अन्य काही देश या समूहातून पूर्वी बाहेर पडले आहेत.
आज Dijibouti या देशाचा स्वातंत्र्य वर्धापन दिन असल्यामुळे गुगल डुडल त्यांचे आहे:
होय, दुपारी बघितला तो Dijibouti डूडल
खाली त्या देशात Sabaayad नामक ब्रेड खातात असं लिवलंय. ब्रेड कसला, तो तर आपला आलू / खिमा पराठा सोमालियात याला Kimis म्हणतात
इंग्लिश मध्ये सगळ्याचेच Flatbread होतात
जगातील तीन देशांचे (San Marino, Vatican City व Lesotho ) एक समान भौगोलिक वैशिष्ट्य आहे.
या प्रत्येक देशाभोवती संपूर्णपणे दुसऱ्या देशाने वेढा घातलेला आहे.
या तिघांना enclave असे म्हणतात.
Enclave व वेढणारे देश कंसात असे :
San Marino (इटली)
Vatican City (रोम, इटली )
Lesotho (द. आफ्रिका)
जसे enclave असतात त्याच्या बरोबर उलट exclave असतात. म्हणजे एका देशाचा प्रांत जो देशाच्या मुख्य भुभागापासून तुटलेला आहे आणि दुसऱ्या देशाने वेढला आहे. पण यात बेटे धरत नाहीत. (अंदमान आणि निकोबार भारताची exclaves नाहीत.) उदा. कलिनिंग्राद ओबलास्त (Kaliningrad Oblast) हे रशियाचे exclave पोलंड आणि लिथुएनिया यांना खेटून बाल्टिक समुद्रावर वसले आहे. त्याचे ठिकाण नकाशात बघा. रशियासाठी त्याचे व्यापारी आणि सामरिक महत्व लगेच लक्षात येईल. खास करून युक्रेन युध्दासाठी तर खूपच.
Enclave आणि exclave तसेही खूप fascinating असतात. पण त्यातही दोन प्रांत weird आहेत.
पहिला म्हणजे भारत - बांगलादेश यांचे एकमेकांमध्ये असलेले एकूण 162
enclaves. 162 - विश्वास बसत नाही ना! आता ते अस्तित्वात नाहीत. 2015 साली
दोन्ही देशांनी enclaves ची अदलाबदल केली. फक्त भूभाग नाही तर नागरिकांची
सुद्धा अदलाबदल केली. त्यांचा super weirdness जाणून घ्यायचा असेल तर हे
वाचा -
https://www.migrationpolicy.org/article/india-and-bangladesh-swap-territ...
या बातमीत fig 1 बघा. अदलाबदलीच्या आधी तिथे राहणाऱ्या लोकांना काय काय
अडचणींना तोंड द्यावे लागत असेल? इतकी विचित्र परिस्थीती इतर कुठे असेल का?
हेसुद्धा पाहा
https://www.washingtonpost.com/news/worldviews/wp/2015/08/01/say-goodbye...
दुसरा विचित्र किस्सा आहे ऑस्ट्रियाच्या Jungholz या exclave चा. याची
खासियत म्हणजे हा भाग ऑस्ट्रियापासून पूर्ण तुटलेला नाही. अगदी चिंचोळ्या
जमिनीच्या पट्ट्याने ऑस्ट्रियाशी जोडला आहे. चिंचोळी किती? ही पट्टी 1
मीटरपेक्षा कमी रुंद आहे. पण हे काहीच नाही. Jungholz चा विचित्रपणाची ही
फक्त सुरवात आहे. हे बघा -
https://www.bbc.com/travel/article/20220214-jungholz-a-ski-town-stuck-in...
१६२ >>>भारत-बांगलादेशची माहिती सुंदर !
enclaves मध्ये पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या ऑर्डरची enclaves असेही प्रकार आहेत.
देशिआ म्हणजे देश असे असेल का असे उगीच वाटले.
>>>
रोचक. शोधायला पाहिजे.
.........
ज्या देशनावाचे इंग्लीश स्पेलिंग काहीसे मजेदार आहे तो म्हणजे रवांडा ( Rwanada). या देशाची तीन ठळक वैशिष्ट्ये आहेत :
१. एका बाबतीत त्यांनी जगात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यांच्या संसदेत स्त्री खासदारांचे बहुमत आहे. सध्या एकूण खासदारांपैकी ६१ % खासदार स्त्रिया आहेत. असे होण्यामागे अंशतः एक भीषण घटना कारणीभूत आहे. 1994 मध्ये तिथे एका वंशाच्या दहा लाख लोकांच्या अवघ्या तीन महिन्यात ठरवून हत्या करण्यात आल्या. त्यानंतर राहिलेल्या लोकसंख्येमध्ये स्त्रियांचे प्रमाण 60 ते 70 टक्के असे राहिले.
२. प्लास्टिक-बंदीची कठोर अंमलबजावणी
३. गोरिला माकडांची १० कुटुंबे उद्यानात ठेवलेली आहेत. ही जगातील सर्वाधिक आहेत.
Tutsi ची वंशहत्या झाली.
......
देशाच्या संसदेतील स्त्रियांच्या अधिक प्रमाणासंदर्भात पहिले तीन क्रमांक असे आहेत :
१. रवांडा ( 61%)
२. क्युबा ( 53 %)
३. निकाराग्वा (51%)
हुतु आणि तुतसी नरसंहार विषयावर हॉटेल रवांडा नावाचा एक सुंदर चित्रपट बघितल्याचे आठवते डॉन शिडल/ चिडल ह्याचा अत्युत्तम अभिनय होता
रवांडा बद्दल अजून रोचक माहिती म्हणजे, रवांडा ही मूलतः फ्रेंच वसाहत होती, स्वातंत्र्य मिळून हुतु तुतसी युद्ध अन नरसंहार होऊन आता सत्तेवर आलेत पॉल कागमे, त्यांना फ्रेंच गुलामीचा भयानक तिटकारा असल्यामुळे त्यांनी सत्तेत आल्या बरोबर पहिले प्रथम तर हुतू अन तुतसी समझोते घडवून आणले, त्यानंतर विरोधक भयानक चिरडले, त्यानंतर फ्रेंच अस्तित्व असणाऱ्या खुणा मिटवायला सुरुवात केली, ह्या कामात विध्वंस कमी अन दुसरे बोट लांब करणे हा प्रकार त्यांनी केला, फ्रेंच ऐवजी इंग्रजीला सरकारी आश्रय देणे, पन्नास हजार क्षमतेचे क्रिकेट स्टेडीयम बांधून क्रिकेट हा खेळ प्रमोट करणे, कॉमनवेल्थ मध्ये प्रवेशासाठी अर्ज भरणे इत्यादी इत्यादी त्यांनी केले,
पण एकेकाळी नरसंहार अन युद्धाने ग्रस्त हा देश आज आफ्रिकेतील काही निवडक विकसनशील देशांत मोडतो, पायाभूत सुविधा, शिक्षण, कायदा सुव्यवस्था इत्यादींवर ते झपाट्याने पुढे गेलेले आहेत.
एखाद्या घराचे स्वयंपाक घर एका देशात तर त्याच घराचे शयनगृह दुसऱ्या देशात, हे ऐकायला कसे वाटते ?
पण असे उदाहरण आहे...
नागालँड मधील लोंगवा या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ते गाव भारत व म्यानमार या दोघांनी वाटून घेतलेले आहे. इथे
या दोन देशांदरम्यानची सीमारेषा या गावच्या सरपंचांच्या घरामधून जाते.
https://www.outlookindia.com/outlooktraveller/explore/story/70646/did-yo...
जनपद = देश (community, nation, people)
हा शब्द वाचनात आला.
या संस्कृत शब्दाचा उगम इथे दिल्याप्रमाणे दिसतो आहे (https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A...).
थोडक्यात, समूह असे त्यातून अभिप्रेत असावे.
मराठीत आपण देशासाठी ‘देश’ हा एकच शब्द सहसा वापरतो. परंतु इंग्लिशमध्ये खालील प्रकारचे वेगवेगळे शब्द आहेत आणि त्यांच्या आपापल्या व्याख्या आहेत :
• Country
• Nation
• Nation-State (उदा. नेपाळ)
• Sovereign State ( UN सदस्य + अन्य)
• Non Sovereign State (e.g. Hong Kong)
(https://www.thoughtco.com/country-state-and-nation-1433559#:~:text=When%....)
सध्या अंटार्टिकावर सलग संपूर्ण रात्र चालू आहे.
परंतु तेथून ७००० किमी दूर असलेल्या टोंगामधील ज्वालामुखीच्या प्रकाशामुळे तिथे आसमंत उजळून निघत आहे. त्याचे काही सुंदर फोटो इथे पाहता येतील.:
जर्मनी देशात Stadtstatt(शहर हेच राज्य) अशी संकल्पना आहे. बर्लिन, ब्रेमेन आणि हॅम्बुर्ग ही ३ Stadtstatt आहेत.
आपल्याकडेही दिल्ली आणि पुदुच्चेरी यांचा दर्जा “अर्ध-राज्य” असा असतो. म्हणजे मुळात ते केंद्रशासित प्रदेश असून त्यांना स्वतंत्र विधानसभा दिलेली आहे.
या विधानसभा अन्य पूर्ण राज्यांच्या तुलनेत ‘ब’ दर्जाच्या मानल्या जातात. तेथील काही बाबींवरचे अधिकार केंद्र सरकारने राखून ठेवलेले असतात.
Germany हे "इंग्लिश" नाव असून मूळ जर्मन भाषेतील नाव Deutschland आहे.
Germany : exonym
Deutschland : endonym
जर्मनीला अन्य भाषक लोक काय काय म्हणतात ?
एका जर्मनीस्थिताकडून समजले :
स्पॅनिश लोक : अलेमानिया
फ्रेंच लोक : अलेमान्ये,
पोलिश लोक : नीम्सी
हाँगकाँगमध्ये : दं क्वॉक्
चीनमध्ये : दं ग्वो,
जपान मध्ये : दोइत्सं.
भारताला आपण मातृभूमी म्हणतो तर जर्मन त्यांच्या देशाला पितृभूमी समजतात. असे इतर देशांतही आहे का? इतर कोणते देश मातृभूमी समजले जातात का?
राश्या दिसतंय इथे. https://www.dictionary.com/e/motherland-vs-fatherland/
आम्रविकेत होमलँड बोलण्यात कोणी वापरत नाही/ नसेल, पण होमलँड सिक्युरिटी इ. वापरतात.
बरेच आहेत.
https://en.wikipedia.org/wiki/National_personification
देशांच्या नावांना लिंग (जेंडर) ही लावलं जातं.
भारत पुल्लिंगी तर इंडिया स्त्रीलिंगी.
अमेरिका , जर्मनी , रशिया स्त्रीलिंगी. इंग्लंड , फ्रान्स पुल्लिंगी किंवा नपुं.
हे पुष्कळसं नावाच्या उच्चारावरून ठरतं.
Vatican City बद्दल नेहमी कुतुहल वाटते.
त्या नावाच्या अनेक उगम कथा आहेत.
१. va हा बालकाने उच्चारलेला पहिला शब्द
२. vātēs = प्रेषित व
canō = गाणे.
पृथ्वीचा ८वा खंड Zealandia मानला जातो. अर्थात तो 94% पाण्याखाली
बुडालेला आहे. उरलेला सहा टक्के जमिनीवर असून त्याचा न्यूझीलंड हा एक भाग
आहे.
अशा देशांच्या सागरी हद्दीवरून बराच खल झालेला आहे. त्या संदर्भात काही आंतरराष्ट्रीय नियमही आहेत.
न्यूझीलंडबाबत एक रंजक माहिती वाचली. जर का त्यांनी सिद्ध केलं, की ते या आठव्या खंडाचेच एक भाग आहेत, तर मग त्यांना त्यांची सागरी हद्द सध्याच्या सहा पट मंजूर होईल !
https://www.bbc.com/future/article/20210205-the-last-secrets-of-the-worl...
रवांडाला 'आफ्रिकेचे सिंगापूर' म्हणतात.
रवांडाने २००८ पासून प्लास्टिक पिशव्या बंदीचे धोरण कसे कडकपणे राबवले आणि त्याचे दिसणारे सुपरिणाम :
https://www.channelnewsasia.com/world/plastic-bag-ban-charge-waste-rwand...
आज काहीतरी वाचून पहिल्यांदा अंगावर काटा आला एकदम
खालील फोटोज म्हणजे कदाचित जगातील १.२ बिलियन (आजच्या) लोकांचे पूर्वज
असणाऱ्या लोकांचा "हिंदू" म्हणून झालेला पहिला उल्लेख असावा, ह्या
उल्लेखाच्या पूर्वी हिंदुधर्माचे "नाव" काय होते ते मला तरी माहिती नाही,
सनातन धर्म असे पण म्हणले जाते पण उल्लेख मला तरी सापडलं नाही.

![]()
ही(न)दाऊस - हिंदूष - सिंधू नदीच्या प्रांतातील...अकमेनिड पर्शियन राज्याच्या काळात, ओल्ड पर्शियन कुनेईफॉर्म मध्ये "आपला" आढळलेला पहिला उल्लेख ! "हिदाऊस"
"इंडियन" हा शब्द अमेरिका खंडात वेगळ्या लोकसमूहासाठी वापरतात.
northern Andean Indian या प्रकारचे लोक ग्वाटेमाला देशात बऱ्यापैकी आहेत. या देशाच्या नावाचा उगमही विविध अंगी आहे :
१. इंडियन उगमानुसार त्याचा अर्थ फुलझाडांचा प्रदेश असा आहे. तर
२. अन्य एका गृहीतकानुसार त्याचा अर्थ "पाणी ओकणारा पर्वत " आहे (तिथल्या ज्वालामुखी वरून दिलेले नाव)
आदिवासी लोकल जमाती दर्शवायला नेटिव्ह इंडियन म्हणतात आणि भारतीय लोकांना दर्शवायला ईस्ट इंडियन किंवा इंडियन अमेरिकन म्हणत असावेत
बाकी अमेरिकावासी भारतीय डिटेल सांगू शकतील.
कोलंबसाला इंडिया शोधता शोधता अमेरिका गवसली म्हणून त्यांना तसं म्हणत असावेत.
----
वसईचे ख्रिश्चन लोक स्वतः:ला ईस्ट इंडियन म्हणवतात
हंगेरी देशाची राजधानी असलेली बुडापेस्ट नगरी ही मुळात बुडा आणि पेस्ट अश्या दोन जुळ्या शहरांपासून बनलेली आहे असे वाचण्यात आले हल्लीच, बुडा पश्चिम भाग अन् पेस्ट पूर्वभाग आहे म्हणतात अन् ही दोन शकले danube नदीने केली आहेत.
जगाच्या या भागात खूपच देश असे आहेत ज्यांच्या राजधान्या देशांच्या नावावरून आहेत. पनामा, एल साल्वाडोर, ग्वाटेमाला, मेक्सिको असे हारीने देश आहेत ज्यांच्या राजधान्या देशाच्या नावावरून आहेत. बेलिझ देश जेव्हा ब्रिटिशांच्या अंमलाखाली होता तेव्हा राजधानी बेलीझ सिटी हीच होती. आता राजधानी नसली तरी ते अजूनही देशातलं सगळ्यात मोठं शहर आहे. जगाच्या या भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर असे का झाले असेल?
पनामा /मेक्सिको सिटी इ.>>>
अशा देशांच्या बाबतीत राजधानीचे नाव देशावरून दिले, की देशाचे नाव मूळच्या
शहरावरून पडले, असा एक प्रश्न उपस्थित होतो. तो काही अंशी, आधी कोंबडी की
आधी अंडे यासारखा आहे. थोडेफार वाचले असता अशी माहिती मिळाली:
१.काही देशांच्या बाबतीत मूळ शहराचे नाव देशाला दिले गेले. हा मुद्दा पटू शकतो कारण -
टोळी >> वसाहत>> शहर>> साम्राज्यविस्तार >>देश असा क्रम लक्षात घेतल्यावर ही बाजू पटते.
२. अन्य काही देशांच्या बाबतीत आधी देशाचे नाव होते तेच नाव (किंवा
अगदी थोडासा फरक करून) राजधानीला दिले गेले. इथे ब्राझील हे ठळक उदाहरण
आहे. कारण त्यांची मूळ राजधानी जेव्हा बदलली तेव्हा ब्राझीलिया केली गेली.
काही देशांना एकाहून अधिक राजधान्या देखील आहेत.
अर्थात हे अजून स्पष्ट होण्यासाठी भूगोलाचे काही खात्रीशीर संदर्भ मिळवावे लागतील.
एक देश आणि त्याला असलेल्या राजधान्या बोलायचे झाले तर एकही अधिकृत राजधानी नसलेले देशसुद्धा आहेत.
स्वित्झर्लंडला अधिकृत राजधानी नाही. बर्न शहरात जरी त्यांची संसद आणि अनेक
देशांचे दूतावास असले तरी बर्न ही देशाची Hauptstadt (capital city) नाही.
ती Bundestadt (federal city) आहे. दुसऱ्या भाषेत बोलायचे तर बर्न de
facto राजधानी आहे, पण de jure नाही.
ओशियानिया खंडामधल्या नौरू या देशालासुद्धा अधिकृत राजधानी नाही. Yaren
District मध्ये सरकारी इमारती आहेत पण ती अधिकृत राजधानी नाही. नौरुचा
झेंडा नक्की बघा. देश खूपच छोटा आहे आणि अनेकांना माहितीच नसतो कुठे आहे.
त्यामुळे त्यांनी झेंड्यावर त्यांना शोधण्याचा नकाशाच दिला आहे. पिवळी रेषा
म्हणजे विषुववृत्त. त्याच्या थोडंसं खाली असलेला तारा म्हणजे देशाचे
स्थान.
वेगळी अधिकृत राजधानी नसलेले obvious देश म्हणजे city-states - सिंगापोर, व्हॅटिकन सिटी आणि मोनॅको. तीनही देश city-states असल्यामुळे त्यांना वेगळी राजधानी अस्तित्वात नाही.
दक्षिण आफ्रिका बहुतेक एकमेव देश आहे ज्याला तीन राजधान्या आहेत.
ओशीयानियावरून अजून एक आठवले.
पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण दोन्ही गोलार्धात असलेले देश आहेत. म्हणजे
विषुववृत्त ज्या देशांमधून जाते ते सगळे देश. तसेच पूर्व आणि पश्चिम
गोलार्धात असलेले देश आहेत. म्हणजे 0 अंश आणि 180 अंश रेखावृत्ते ज्या
देशांमधून जातात ते देश.
पण एकच देश असा आहे जो चारही गोलार्धात आहे - Kiribati (उच्चारी किरीबास
किंवा किरीबाती). हा सुद्धा ओशियानीया मध्ये आहे. याचे पूर्वीचे नाव
Gilbert's Island. स्थानिक भाषेत गिल्बर्टचे झाले किरिबाती. या देशांच्या
बेटांमधल्या समुद्रात विषुववृत्त आणि 180 अंश रेखावृत्त एकमेकांना छेदतात.
त्यामुळे देशाची बेटे चारही गोलार्धात आहेत.
de facto व de jure या संदर्भात अजून एक गंमत पहा.
अमेरिकेची केंद्र सरकारच्या पातळीवरील 'अधिकृत ' ( de jure) अशी कोणतीच भाषा नाही !
त्यांची राष्ट्रीय भाषा de facto इंग्लिश आहे.
याच्या कारणमीमांसेबाबत बरेच काही वाचनात येते.
पण एकच देश असा आहे जो चारही गोलार्धात आहे - Kiribati>>>
किरिबाती हा चारही गोलार्धात असलेला एकमेव देश ही माहिती भन्नाट आहे. या
देशाला काहींच्या मते अजून एक मान आहे. तो म्हणजे, वर्षाच्या ठराविक
कालावधीतील "उगवत्या सूर्याचा देश".
….
उगवत्या सूर्याचा देश कोणता?
याचे एकच असे उत्तर दिसत नाही.
यासंदर्भात जालावर वाचले असता बरीच उलट-सुलट आणि घोळदार माहिती मिळते.
जपानची तशी नोंद खूप प्राचीन काळी झालेली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा वगैरे गोष्टी अस्तित्वात आल्या आणि संदर्भ बदलले.
काहींच्या मते वर्षाच्या पहिल्या सहामाहीत न्युझीलंड हा प्रथम सूर्याचा मानकरी आहे तर दुसऱ्या सहामाहीत Samoa.
अन्य काहींच्या मते किरिबातीचा पहिला नंबर आहे वगैरे.
पाकीस्तानातील मकरान भागाबद्दल हा लेख वाचनात आला. मकरानचं नाव कसं पडलं हे मजेशीर आहे
https://www.bbc.com/marathi/international-61052184
जर्मनीला अन्य भाषक लोक काय काय म्हणतात ?
एका जर्मनीस्थिताकडून समजले :
स्पॅनिश लोक : अलेमानिया
फ्रेंच लोक : अलेमान्ये,
पोलिश लोक : नीम्सी
हाँगकाँगमध्ये : दं क्वॉक्
चीनमध्ये : दं ग्वो,
जपान मध्ये : दोइत्सं.
Submitted by कुमार१ on 18 July, 2022 - 16:43 <<<
Germany (Deutschland) : Often Heard People Pronounce It As डॉईशलँड, Its actually डॉईचलँत
Uruk, Ur, Meggido, Babylon, व Nineveh यांना आधुनिक जगातील सुरवातीची महानगरे मानतात. त्या संबंधी एक लेख :
https://www-nationalgeographic-co-uk.cdn.ampproject.org/v/s/www.national...
त्यापैकी Uruk >>>> ʿIrāq ( शहरावरून देशाचे नाव)
सुमेरिअन संस्कृतीत Urug = शहर.
इराकच्या अन्य व्युत्पती पण आहेत.
न्युझीलँड हे नाव मुळात डच लोकांनी दिलेले आहे. त्याच्या शोधापूर्वी Zeeland या नावाचा डच परगणा अस्तित्वात होता. त्यावरून New Zeeland करण्यात आले. पुढे इंग्लिशमध्ये त्याचे स्पेलिंग बदलले.
रंजक भाग असा आहे: न्यूझीलंड आणि “ओल्ड Zeeland’ एकमेकांपासून 17700 किलोमीटर दूर आहेत !
(पृथ्वीवरील कोणत्याही दोन बिंदूमधले जास्तीत जास्त अंतर 20,000 किलोमीटर असते).
असे न्यु नाव असलेले बरेच प्रांत आहेत. न्यु यॉर्क, न्यु जर्सी , इ.
या लेखात म्हटलंय की डच लोकांनी ऑस्ट्रेलियालाही न्यु हॉलंड हे नाव दिलं होतं.
हॉलंड हा नेदरलँडसचा भाग आहे. मला वाटत होती, दोन्ही एका देशाची नावं आहेत. त्या देशाच्या रहिवाश्यांना डच का म्हणत असावेत?
ड्युइश वरून डच असं एक उत्तर दिसलं.
अमेरिकेचा शोध लागल्यानंतरच्या सुरुवातीच्या राज्यसमूहाला देखील न्यू इंग्लंड म्हणतात/ म्हणायचे.
एकंदरीत जुन्या प्रस्थापित नावाच्या मागे 'न्यू' लावणे ही पाश्चिमात्य वसाहतवादाची खासियत होती
त्या देशाच्या रहिवाश्यांना डच का म्हणत असावेत? >>
इथे (https://www.dictionary.com/e/demonym/) सविस्तर उहापोह आहे.
High Dutch ( पर्वतराजीतील लोक ) >>>> southern Germany.
Low Dutch ( सपाटीवरील लोक) >>>> Netherlands.
बऱ्याच इंग्लिश भाषकांना इतर युरोपीय भाषांची जाण नसते. त्यांना युकेव्यतिरिक्त इतर युरोपमध्ये संभाषणाच्या समस्या येतात. ज्या बिगर-इंग्लिश मातृभाषक देशांमध्ये इंग्लिश संभाषण करणे सोपे असते त्यांची क्रमवारी अशी आहे :
१. नेदरलँडस
२. ऑस्ट्रिया
३. डेन्मार्क.
https://www.euronews.com/travel/2022/08/05/struggling-to-learn-the-langu...
Uruk, Ur, Meggido, Babylon, व Nineveh यांना आधुनिक जगातील सुरवातीची महानगरे मानतात<<< प्राचीन जगतातील पहिली महानगरं 
सर्वसामान्यांसाठी अगदी साधा, सोपा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करते आहे.
तपशीलांशी कोणतीही तडजोड न करता. त्यातील हा एक भाग जगातले पहिले
साम्राज्य: https://anchor.fm/aratikhopkar/episodes/16-e1l42ue
बऱ्याच देशनावांचा उगम खालील क्रमाने विकसित होत गेलेला आहे :
१. संबंधित ठिकाणी असलेली नदी/ झरा/ तलाव यांचे नाव (hydronym)
२. त्यावरून ठिकाणाचे नाव पडणे (toponym)
३. त्यावरून वंशाचे किंवा देशाचे नाव (ethnonym)
देशाच्या दिलेल्या नावांमध्ये दोन प्रकार पडतात:
a. देशाबाहेरील लोकांनी ठेवलेले नाव (exo..)
b. अंतर्गत नाव (endo..)
• जगातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान = उणे 94C, :अंटार्टिका (निर्मनुष्य ठिकाण)
• जगाच्या मनुष्यवस्ती असलेल्या भागातील नीचांकी तापमान= उणे ७१ C : Oymyakon, साखा , सायबेरिया, रशिया.
इथले नियमित तापमान उणे ५० C असते.
तिथल्या जनजीवनाचे काही फोटो इथे आहेत:
https://www-mirror-co-uk.cdn.ampproject.org/v/s/www.mirror.co.uk/news/wo...
ग्रीनलँड मधील कोसळलेल्या हिमनगाचे सुरेख ड्रोन-चित्रण ख्यातनाम चित्रकर्मी Daniel Haussmann यांनी केले आहे :
https://petapixel.com/2022/08/08/gorgeous-aerial-footage-showcases-green...
नेत्रदीपक !
आफ्रिकेचे शिंग
Djibouti, Eritrea, Ethiopia, and Somalia या एकमेकांच्या सान्निध्यात
असलेल्या देशांमुळे आफ्रिकेच्या नकाशावर एक वैशिष्ट्यपूर्ण आकार दिसतो
त्याला शिंग असे म्हणतात
Massachusetts आणि Connecticut च्या हद्दीवर Webster शहराजवळ हा तलाव आहे म्हणे, मला तर नाव कसे टाईप करायचे हा प्रश्न पडला, त्यामुळे स्क्रीनशॉट देतोय अमेरिकेतील अन् कदाचित जगातील सगळ्यात लांबलचक नाव एखाद भौगोलिक फिचरला दिलेले.

फोटोत जे बोल्डमध्ये केलेले नाव आहे ते खरे नाव लोकल native Indian भाषेत त्याचा अर्थ म्हणे "तुम्ही (तलावाच्या) तुमच्या भागात मासेमारी करा, आम्ही आमच्या भागात करतो, मध्ये कोणीच करू नये" असा काहीसा होतो, अर्थात स्थानिक लोक ह्या सरोवराला साधे सिंपल "वेबस्टर लेक" ह्याचं नावाने ओळखतात (म्हणे)
वर जे आफ्रिकेचे शिंग म्हणून वर्णन केले आहे त्यातील सोमालियाचा एक भाग असलेल्या सोमाली लँडबद्दल माहिती :

जागतिक पातळीवर हा सोमालियाचा भाग समजला जातो. परंतु त्या भागाचे स्वतंत्र सरकार आहे. म्हणजेच हा de facto प्रकारातील देश आहे. त्यांना de jure मान्यता नाही.
डायोमीड बेटांची मजेशीर केस
डायोमीड बेटं ही बिग डायोमीड आणि लिटिल डायोमीड बेट अशी दोन बेटं आहेत. त्यातील बिग डायोमीड हे रशियाच्या मालकीचे असून लिटिल डायोमीड हे अमेरिकेच्या मालकीचे आहे. दोन्ही बेटांत फक्त २.४ मैल अंतर आहे, तरीही इंटरनॅशनल डेट लाईनच्या अलीकडे पलीकडे असल्यामुळे दोन्ही बेटांत २१ तासाचा टाईम गॅप असतो, ह्या बेटांचे टोपण नाव टूमोरो आयलंड आणि येस्टरडे आयलंड असे पडलेले आहे

>>>
केवळ झ-का-स !!
Sichuan ( Szechuan or Szechwan) हा चीनचा प्रसिद्ध प्रांत. इथल्या पाकक्रिया पण चविष्ट.
आपण भारतात ज्या ‘शेझवान’ नूडल्स खातो ते नाव यावरून घेतलेले.
शेझवान नुडल्स मध्ये नावच फक्त सिचुआन शेझवान आहे, बाकी आपली देशी रेसिपी पाहता पितबंधू जीव देतील अशी गत आहे बघा
जर्मनीला रशियनमध्ये Германия (गिर्मानिया) म्हटले जाते.
रशियाचे पूर्वेकडचे सर्वात मोठे शहर - Владивосток (व्लदिवस्तोक) व्लदि
म्हणजे देव आणि वस्तोक म्हणजे पूर्व. व्लदिवस्तोक म्हणजे पूर्वेकडच्या
देव.
मॉस्को शहराला त्यातून वाहणाऱ्या मॉस्को (Москва - रशियन उच्चार मस्क्वा) नदीवरून पडले आहे.
Volga नदीच्या नांवावरून ओळखले जाते Волгоград व्हल्गऽग्राद. ग्राद म्हणजे छोटे शहर/town
*ग्राद म्हणजे छोटे शहर>>>>
ग्राद व ग्राम यांत साम्य आहे.
(इंडो युरोपीय कुळ?)
<<ग्राद व ग्राम यांत साम्य आहे.>>
हो रशियनमध्ये हिंदी, मराठी, संस्कृतशी साम्य असलेले बरेच शब्द आहेत.
जसे, сахар - रशियन उच्चार साखर, ананас - रशियन उच्चार अनानास, чай -
रशियन उच्चार चाय (चहा), брат - रशियन उच्चार ब्रात (भाऊ) इ.
आकडेही मराठी, हिंदी, संस्कृतशी साम्य दाखवणारे आहेत. : 1 - अजीन, 2 -
व्दा, 3 - त्री, 4 - चित्तीरि, 5 - प्याच, 6 - षेस्त, 7 - स्येम्, 8 -
वसिम्
आज भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा दणक्यात साजरा होत आहे.
भारतासोबतच आज पूर्वेचे उत्तर आणि दक्षिण दोन्ही कोरिया, खाडीतले बहरीन, आफ्रिकेतले काँगो रिपब्लिक आणि युरोपातील पिटुकल्या Liechtenstein ह्या देशांचाही स्वतंत्रता वर्धापन दिवस साजरा होत आहे.
बहरीन आणि भारताला ब्रिटिशांपासून, दोन्ही कोरियांना जपानपासून, काँगो ला फ्रेंचांपासून तर Liechtenstein ला जर्मन दास्यातून मुक्ती मिळाल्याचा एकच दिवस - १५ ऑगस्ट !!
(अर्थात वेगवेगळ्या वर्षांत)
* रशियनमध्ये हिंदी, मराठी, संस्कृतशी साम्य असलेले बरेच शब्द >>> छान माहिती.
....
* Liechtenstein बद्दल मागच्या वर्षी वाचले होते.
इतर देशांची माहिती रंजक.
मी मुद्दाम Liechtenstein चा उच्चार शोधला. बहुतेक ठिकाणी लिक्टनस्टाइन असा उच्चार दिसला. ऐकू आला. एके ठिकाणी लीश्टनस्टाइन असा उच्चार दिला आहे.
आपल्या देशाचं नाव INDIA -Independent Nation Declared in August असं ब्रिटिशांनी ठरवलं
in August असं ब्रिटिशांनी ठरवलं >>काहीही !
...
तसेच सर्वोच्च न्यायालयाने इंडिया चे नाव भारत केलेले आहे असे चुकीचे संदेश गेल्या काही वर्षात फिरत होते.
वास्तवात 2020 मध्ये तशी याचिका न्यायालयात दाखल झाली होती.
त्यासंदर्भात न्यायालयाने केंद्र सरकारला त्यावर विचार करण्यास सांगितले होते.
त्याची सविस्तर माहिती इथे आहे
https://factly.in/supreme-court-has-not-passed-any-judgement-to-rename-i...
... आपल्या देशाचं नाव INDIA -Independent Nation Declared in August असं ब्रिटिशांनी ठरवलं Lol....
खरंच या लोकांच्या बुद्धीची कीव वाटते. ब्रिटिशांनी साधारण ८० देशांवर राज्य केले, पैकी ५६ देश तर अजूनही राष्ट्रकुलात आहेत.
प्रत्येकाला स्वातंत्र्य देतांना असे नामकरण केले असते तर ८० देशांची बारशी करता-करता नाकी नऊ आले असते त्यांच्याLiechtenstein चा उच्चार लिष्टेनस्टाईन असा आहे. जर्मन नाव आहे.
भारताला स्वतःचा राष्ट्रध्वज असावा अशी कल्पना प्रथम मांडणाऱ्या Pingali Venkaiha यांना मानवंदना !
https://thelogicalindian-com.cdn.ampproject.org/v/s/thelogicalindian.com...
Monaco देशाचे पूर्ण नाव Principality of Monaco असे आहे.
Principality = 'प्रिन्स'च्या अधिपत्याखाली असलेले.
दिनार’ हे मध्यपूर्वेतील बऱ्याच देशांचे चलन आहे. परंतु त्याचा उगम रोमन आहे.
Denarius हे रोमचे चांदीचे नाणे होते. (Dena = 10)
दक्षिण पूर्व युरोपमधील सुमारे दहा देशांच्या समूहाला 'बाल्कन देश' असे जुने नाव आहे.
परंतु अलीकडे ते वापरायचे टाळले जाते.
काही अभ्यासकांच्या मते त्या नावातून वांशिक भेदभाव सुचवला जातो.
त्यामुळे या देशांना 'दक्षिण पूर्व युरोपीय देश' म्हटले पाहिजे.
उत्तर ध्रुवीय प्रकाश ( aurora borealis) अवकाशातून कसा दिसतो यासंदर्भात प्रसिद्ध झालेली एक छान चित्रफित इथे आहे :
आजमितीस १० लाख डॉलर्स मूल्य असलेले ६९ ए.डी. मधील इसराएलचे प्राचीन नाणे चोरण्यात आले होते. ते समारंभपूर्वक इसराएलला परत केले :
https://www.bbc.com/news/world-middle-east-62875673
shekel प्रकारची अशी फक्त ४ नाणी अस्तित्वात आहेत.
अजून ३०० दशलक्ष वर्षांनी !......
जगाचा नकाशा बदलणार?....तर आशियाला मिळणार अमेरिका
'अमासिया' हा महाखंड तयार होणार ?
https://www.tarunbharat.net/Encyc/2022/10/9/map-of-world-change.html
https://en.wikipedia.org/wiki/Amasia_(continent)
15 नोव्हेंबर 2022 च्या सुमारास जागतिक लोकसंख्या 8 अब्ज या टप्प्यावर पोचणार:
इंडोनेशिया त्यांच्याकडील शंभर बेटांचा समूह लिलावात विकायला काढणार आहे. त्यावरील
उलटसुलट प्र:
https://amp-theguardian-com.cdn.ampproject.org/v/s/amp.theguardian.com/w...
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.