Saturday, July 23, 2022

रेणीगुंटा, महाबलीपूरम, पाँडिचेरी, रामेश्वरम आणि मदुराई

दर वर्षी दिवाळी मध्ये कुठे जायचं याची तयारी माझ्या मित्रांचे कुटुंब जून जुलै मधेच ठरवतो आणि तसे मग ट्रेन चे बुकिंग करतो. बाकी सगळे नेहेमी प्रमाणे एक एक कारण सांगून बाहेर पडले आता उरलो मी आणि माझा एक मित्र असे आम्ही दोघेच. तर या वर्षी ठरला कि तिरुपती आणि महाबलीपूरम करावं. तसे ट्रेन चे बुकिंग बघितले पण दिवाळी च्या नंतरचे सगळे बुकिंग वेटिंग लिस्ट ला होते. पण ९ च वेटिंग असल्यामुळे पुणे ते तिरुपती हे बुकिंग करून ठेवले होते.आणि त्या अनुषंगाने पुढची सगळी बुकिंग पण करून ठेवली ती सगळी कन्फर्म होती . आता फक्त वाट पाहणे बाकी होतं.
माझे आणि मित्राचे अधे मध्ये वेगळी वेगळी ठिकाण शोधणं पण सुरूच होतं. मग या सगळ्या शोध शोधी मध्ये आम्ही रामेश्वरम आणि मदुराई पण आमच्या ठिकणा मध्ये ऍड केलं मग आता उरलेले ट्रेन चे बुकिंग केले.पण सस्पेन्स काही शेवटपर्यंत संपणार नव्हता.
आमच्या जायच्या ट्रेन चे आरक्षण कन्फर्म होताच नव्हता आमचा जीव टांगणीला लागला, मधेच मित्राचा फोने पण आला कि यावर्षीचा सगळं बुकिंग कॅन्सल करूयात का थोडी अडचण आहे. माझ्या आशा पण मावळायला लागल्या होत्या. मग तेवढ्यात कोल्हापूर ते तिरुपती हि स्पेशल ट्रेन दिसली आणि त्याचा पटकन बुकिंग करून टाकला. ट्रेन ११.४० ची होती. पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही कोल्हापूर ला राज्य परिवहन च्या गाडी ने गेलो आणि नाश्ता करून धावत पळत आमच्या ट्रेन मध्ये स्थानापन्न झालो. आणि सुरु झाली आमची एक यादगार सफर दक्षिण भारत.

दिवस १ रेल्वे प्रवास.
दाटले रेशमी आहे धुके धुके

झुक झुक आगीनगाडी

माझा मुलगा

रिक्षा वाल्यांचा वाईट अनुभव मागे टाकून आम्ही पुढचा प्रवास सुरु केला

श्री कालहस्ती मंदिर गोपुर

इस्कोन मन्दिर

रेणीगुंटा स्टेशन च्या शेजारच्या हॉटेल जवळ शिवाजी महाराजांचा फ्लेक्स

पाऊस तर जोरात सुरु होता आणि मंदिरांमध्ये मोबाइलला परवानगी नव्हती मग तिथे जास्ती फोटोस काढता आले नाहीत 

महाबलीपूरम - दिवस पहिला :
रेल्वे ने निघालो आणि महाबलीपूरम च्या जवळचा स्टेशन चेंगळपट्टू ला उतरलो रेल्वे जवळपास दोन तास उशिरा पोचली. रेल्वे स्टेशन जवळच बस स्टॅन्ड होतं तिथून मग एक दोन जणांकडे चौकशी करून एका बस मध्ये बसलो. बस पूर्ण खचाखच भरलेली होती. तिथल्या एक दोन जणांनी सांगितलं कि महिलांना बस चा तिकीट नाही त्यांना मोफत प्रवास आहे पण त्या प्रवासाचा तिकीट कंडक्टर कडून घ्या. सगळे सोपस्कार पार पडले जवळपास एक तासाने मग आम्ही महाबलीपूरम च्या बस स्टॅन्ड ला पोचलो. बुकिंग.कॉम वर हॉटेल अगोदरच बुक करून ठेवलेला होतं. गुगल मॅप वर हॉटेल तर जवळच दाखवत होतं मग चालतच हॉटेल वर पोचलो. त्याने आधीच सांगितलं कि फक्त इंग्लिश मध्ये बोला आम्हाला हिंदी येत नाही. मग सगळयांचे ओळखपत्र दाखवून खोल्या ताब्यात घेतल्या हॉटेल च्या रूम आणि आजूबाजूचा परिसर तास छान होतं आणि प्रत्येक मजल्यावर दोरीचा झोपाळा टांगलेला होता. मुले त्यातच बसून लगेच खेळायला पण लागली. मग आम्ही फ्रेश होऊन थोडासा खाऊन आजच्या उरलेल्या दिवसात काय करता येईल हे बघत होतो, तर जवळच सी शेल म्युझीयम होत. मग तिकडे रिक्षा करून गेलो. ३५० रुपये एन्ट्री फी प्रति व्यक्ती भरून आत गेलो. आणि शंख शिंपले यांचे असंख्य प्रकार आणि तेच वापरून केलेल्या वेगळ्या वेगळ्या वस्तू आणि डिनोसॉर पार्क हे बघून मुले खुश झाली. तिथेच खूप वेळ गेला. तिथून पुन्हा रिक्षा ने हॉटेल जवळ आलो आणि तिथेच रात्रीचा जेवण करून झोपायला गेलो.

हॉटेल

शिंपल्यां मधून साकारलेल्या वेगळ्या वेगळ्या कलाकृती

म्युझीयम

डायनो पार्क

 

रेणीगुंटा, महाबलीपूरम, पाँडिचेरी, रामेश्वरम आणि मदुराई - ३
सकाळी जाग आली तीच पावसाच्या आवाजाने. रात्र भर पाऊस पडत होता. आणि रस्त्यात सगळं पाणी साचला होतं. सगळे यावरून बसलो होतो. मुलांना भूक लागली होती मग तसाच चालत चालत पुढे गेलो आणि एक चहाची टपरी दिसली त्याला चहाची ऑर्डर दिली आणि जवळपासची सगळी दुकान बंद होती मग त्यालाच विचारला आणि त्याने सांगितलेल्या ठिकाणी गेलो. त्याच्याकडं इडली, ,मेदु वडा, आणि पुरी भाजी होती. ३० रुपयांमध्ये ४ इडल्या १ वडा आणि भरपूर सांबर आणि नारळाची चटणी त्याच्याकडून आणि चहा वाल्याकडून पार्सल घेऊन हॉटेल वर गेलो. सगळ्यांनी नाश्ता केला आणि तसेच बसून राहिलो होतो, पाऊस कधी थांबतोय याची वाट पाहत. एक दोन तास असेच गेले पाऊस काही थांबायची लक्षणे दिसत नव्हती. पण आम्ही पण सहयाद्रीच्या कुशीत वाढलोय एवढयाश्या पावसाला घाबरतो होय. तसेच पावसात निघालो, आदल्या दिवशी एका रिक्षा वाल्याने नंबर देऊन ठेवला होता त्याला बोलावलं तर तो लगेच १० मिनटात आला. ४५० रुपये ४ तास असं ठरवून तो आमच्या सोबत आला. सगळी ठिकाण चालत जायच्या अंतरावर होती खरं तर पण पाऊस असल्यामुळे आम्हाला दुसरा काही पर्याय नव्हता. मग रिक्षा वाल्याने आम्हाला सगळी ठिकाण २-३ तासाच्या आतच दाखवली. सगळ्यात शेवटी शोर मंदिराच्या इथून त्याला जायला सांगितलं.आणि मुलांसोबत थोडा वेळ समुद्रकिनाऱ्यावर घालवून विंडो शॉपिंग करत करत चालत चालत हॉटेल वर आलो

शोर टेम्पल

कृष्णा बटरबॉल. अतिशय कमी जागा असून पण हा महाकाय दगड एकाच ठिकाणी आहे. त्याला लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सरकारने हलवायचा पण प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश नाही आल.

मंदिरांमधली काही शिल्पे

पंच रथ

महाकाय हत्ती

निवांत आणि निर्जन समुद्रकिनारा

परत येताना एक वेगळीच गणेश मूर्ती दिसली ती कशावर उभी आहे ते कळत नाहीए लहान बाळ वाटतंय. पण तस नसावं. ज्याला माहिती असेल त्याने माहिती दिल्यास बर होईल.

 

पाँडिचेरी

पावसाची संततधार काही थांबायचं नाव घेत नव्हती आणि त्यामुळे आमची चिंता वाढतच चाललेली होती त्यात गूगल मॅप वर तामिळनाडू मध्ये पूर आला आहे रस्ते सुरु आहेत कि नाही ते तपासून घ्या असा सांगत होते. मित्राने पण तशाच आशयाचा फोटो पाठवला. पण आता काही पर्याय नव्हता. पाँडिचेरी चा पण बुकिंग आधीच केलेला होता. मग सकाळी सकाळी बस ने महाबलीपूरम ते पाँडिचेरी बस स्टेशन आणि बस स्टेशन ते हॉटेल असा प्रवास झाला. संपूर्ण रोड हा कोस्टल रोड असल्यामुळे थोड्या थोड्या वेळानंतर खाडी आणि दुतर्फा झाडी असा मस्त प्रवास सुरु होता. दुपारी आल्या नंतर एकटाच निघालो दुचाकीच्या शोधात पाऊस असल्यामुळे रिक्षाहि बघत होतोच. मग एका दुकानदाराने एकाच नंबर दिला त्याने गाडी आणि पेट्रोल असे ४०० रुपये एका दुचाकीचे घेतले. मग सर्वात पहिल्यांदा ऑरोविले ला जायचा ठरला हॉटेल पासून जवळपास ९-१० कि. मी. असेल.
सगळी ठिकाण जवळपास च होती. पण बोटॅनिकल गार्डन आणि paradise island हे पावसामुळे बंद होतं. दोन दिवस जेवढा जमेल तेवढा फिरून घेतला. पण पाँडिचेरी हे फिरण्यापेक्षा पण निवांत राहण्याचा ठिकाण आहे जस कि गोवा तसच हे पण, खा प्या आणि सुशेगात पडून राहा.

दुचाकी घेताना आधी सगळ्या बाजूने तिचे फोटोस काढून घेतले म्हणजे परत देताना काही कटकट नको.

ऑरोविले मध्ये चालत जाताना पायवाटेवर एक विशाल वटवृक्ष दिसला त्याच्या पारंब्यांच्या मधून पण नवीन झाडे येत होती काहीशे वर्ष पूर्वीचा असेल असा अंदाज

ऑरोविले

फ्रेंच कॉलनी

चिफ सेक्रेटरियात

वॉर मेमोरियल

पुडुचेरी म्युझीयम
.

पुडुचेरी म्युझीयमच्या बाहेर ठेवलेल्या काही पुरातन कालीन मुर्त्या

चुर्च

बीच

लक्षवेधी बुद्ध मूर्ती

पॅराडाइज बीच वरचा बोटींग बंद असल्यामुळे जवळच दुसऱ्या वॉटर स्पोर्ट्स रिसॉर्ट वर गेलो तिथला परिसर मस्त होता. पण सगळे वॉटर स्पोर्ट्स आपल्या इथल्या पेक्षा तिप्पट ते चौपट महाग असल्यामुळे आल्या पावली परत फिरलो.

पॉंडिचेरी पासून साधारण ३० कि मी अंतरावर विलूपुरं जंकशन आहे तिथून आमची रामेश्वरम ची ट्रेन टिकेट्स होती.

 रामेश्वरम आणि धनुष्कोडी
याचसाठी केला होता हा अट्टहास. पाम्बन पुलावरून ट्रेन समुद्रातून ५-१० मिनटांसाठी जाते ते याची देही याची डोळा अनुभवायचे होते म्हणून विलुप्पुरम ते रामेश्वरम असं ट्रेन चे आरक्षण केला होता. आणि गाडी सकाळी सकाळी तिथे पोचणार होती. मुलांना सात वाजताच उठवला म्हणजे तोवर ते फ्रेश होतील. आणि मग वाट पाहायला लागलो. वाटेत असंख्य मोरांचा वेगळ्या वेगळ्या रूपात दर्शन होत होतच. शेवटी एकदाचा पाम्बन ब्रिज आला आणि ट्रेन एकदम सावकाश चालू लागली असं वाटत होतं कि हा क्षण जाऊच नये थांबून राहावा. पण काळ हा असाच वाळू सारखा आपल्या हातातून निसटतो जेव्हा वाटत हळू हळू जावा तेव्हा भर्रकन जातो आणि जेव्हा वाटत भर्रकन जावा तेव्हा युगांसारखा भासतो.
पुढच्याच थांबा रामेश्वरम होता. तिथे उतरुन फक्त अंघोळ आणि कपडे बदलण्यासाठी एक खोली घेतली कारण रात्रीच मदुराई ला जायचा होतं. समुद्रस्नान मग २२ कुंडांमध्ये स्नान तिथे एजंट लोक मागे लागत होते १०० रुपये २२ कुंड स्नानासाठी आणि प्रत्येक जण सोबत एक बादली घेऊन फिरत होता ते कोड काही आम्हाला समाजल नाही. आम्ही २५ रुपयांचा तिकीट घेऊन साधारण रांगेतून गेलो. आत गेल्यावर कळाल कि ज्यांनी १०० रुपये दिले आहेत त्यांच्या अंगावर पूर्ण बादली पाणी ओतणार आणि त्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी थोडा अजून पाणी देणार. माझा मुलगा प्रत्येक कुंडात ३-४ वेळा तरी पाणी अंगावर घेत होता. आणि लहान म्हणून ते पण त्याच्या अंगावर पाणी ओतत होते. स्नान करून परत रूम वर आलो आणि मग कपडे बदलून रामेश्वरम दर्शन. मंदीर खूप मस्त आहे एका रेषेत सरळ खांब आणि असे हजारो खांब आहेत. रेल्वे प्रवासावर निर्बंध असल्यामुळे गर्दी खूपच कमी होती मग आरामात दर्शन झाल. कार्यक्रम झाल्यानंतर एक रिक्षा ठरवली ९०० रुपये आणि रामेश्वरम आणि धनुष्कोडी फक्त रामेश्वरम साठी ४०० रुपये.
आम्हाला बराच उशीर झाला होता तरी पण रिक्षावाल्याने अजिबात घाई गडबड केली नाही आणि तरी पण सर्व स्थळ दर्शन व्यवस्थित करून आणलं. पण यात एक गडबड झाली माझ्याकडून आमच्या सौचा मोबाईल खराब झाला. गेल्या गेल्या दुरुस्त करून आणीन किंवा नवीन घेईन या बोलीवर पुढची ट्रिप कोणतीही भांडण न होता पार पडली.

पाम्बन ब्रिज

खरं तर त्या भावना शब्दात मांडता येणार नाहीत पण काही उधार शब्द आणि मोबाईल ची मदत घेऊन एक विडिओ तयार केला आहे. सर्वाना आवडेल अशी अपेक्षा

माणसाळलेला मोर मुलांच्या हातून खाऊ खाताना

समुद्रावरून ट्रेन जाताना असं नजारा दिसतो

समुद्रावरून ट्रेन जाताना असं नजारा दिसतो

रामेश्वरम मंदिर गोपुर आणि मी

त्सुनामी मध्ये उध्वस्त झालेले चर्च

राजबिंडा मोर

धनुष्कोडी समुद्राची सुरुवात आणि भारताचा शेवटचा टोक इथे आम्हाला वेलकम टू श्री लंका आणि रोमिंग चार्जेस पण आले

विभीषण मंदिर

सर अब्दुल कलाम यांचं घर अन म्युझीयम

अतिशय सुरेख असं नटराजन मंदिर

 

https://www.instagram.com/reel/CWJE8QWLgW7/?utm_medium=copy_link

विडिओ नीट प्ले होत नाहीए इंस्टाग्राम ची लिंक इथे तुम्ही तो विडिओ पाहू शकता

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...