Saturday, July 26, 2025

 
discovermh.com

वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra

Discover Maharashtra

प्राचीन भारतीय मंदिरस्थापत्याचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विविध कालखंडात झालेली त्यांची निर्मिती किंवा एकाच मंदिरात विविध कालखंडात काही कारणाने झालेले बदल. हे असे बदल महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहायला मिळतात. वर्षानुवर्ष होणारे ऊन-पावसाचे तडाखे, त्यामुळे होणारी दगडाची झीज, परकीय आक्रमणांमुळे झालेली मंदिराची नासधूस अशा अनेक कारणांमुळे मंदिरांच्या वास्तूमध्ये हे बदल वारंवार होत गेले. अशा मंदिरांचा इतिहास आणि त्यांचं स्थापत्य यांचं नीट निरीक्षण केलं तर हे बदल चटकन लक्षात येतात. अशाच धाटणीचं एक सुंदर मंदिर वाईजवळच्या वाकेश्वर इथं पहायला मिळतं.Wakeshwar Temple, Wai.

वाकेश्वर मंदिराची मूळची रचना उत्तर यादवकालीन आहे. परंतु मंदिराचं शिखर साधारण पेशवाईच्या कालखंडात नव्याने बांधलेलं आहे. वाई आणि परिसरात तुरळक आढळणाऱ्या शिवपूर्वकालीन मंदिरांपैकी वाकेश्वर मंदिर एक आहे. अतिशय सुबक आणि भक्कम बांधणी असलेल्या या शिवमंदिराला तितकाच भक्कम तट आहे. मंदिराच्या मुख्य सभामंडपात प्रमुख असे चार खांब आहेत. हे चार खांब आणि आजूबाजूला असलेले वीस खांब यांच्या आधाराने मंदिराचे छत तोलले गेले आहे. हे मंदिर कुणी बांधलं, कधी बांधलं याचे फारसे लिखित पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु उत्तर पेशवाई कालखंडात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असं म्हणता येईल. सभामंडपातील खांबावर चौकोनी आकारात नक्षी कोरलेली आहे. छोट्याशा असलेल्या अंतरालातून काही पायऱ्या उतरून गेलं की आपण गर्भगृहात प्रवेश करतो. या गर्भगृहातील शिवलिंगाच्या मागच्या बाजूला पार्वतीची मूर्ती आहे.

मंदिराच्या बाहेरील बाजूस छोट्या जोत्यावर नंदीमंडप आहे. प्रदक्षिणा मार्ग किंबहुना सर्वच मंदिर परिसर घडीव अशा फरसबंदीने सज्ज केला आहे. याच प्रदक्षिणामार्गावर जाऊन बघितलं की यक्ष, शरभ, हत्ती, हरीण यांची शिल्पं कोरलेली आढळतात. मंदिराचे शिखर त्रिस्तरीय स्वरूपाचे आहे. या शिखरावर चुनेगच्ची बांधकामातील मूर्ती कोरलेल्या आढळतात.आज इतक्या वर्षानंतरही या शिखरावरील मूर्ती सुस्थितीत पहायला मिळतात. मुख्य मंदिराला लागूनच एक छोटसं कुंड आहे. परंतु हे कुंड उघड्या स्वरूपाचं नाही. या कुंडाच्या चारही बाजूंनी भक्कम दगडी बांधकाम केलेलं आहे. कुंडात उतरण्यासाठी छोट्या स्वरूपाचं सुबक असं महिरपी कमान असलेलं प्रवेशद्वार आहे. पूर्वीच्या काळी या कुंडाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मंदिराच्या परिसरात विठ्ठल-रुक्मिणी, दत्तगुरू यांचीदेखील छोटी छोटी मंदिरे आहेत. तसेच जवळच एका पारावर शंकराचेच छोटेसे मंदिर आहे.

याच परिसरातून एक फरसबंदी वाट खालच्या बाजूला नदीच्या दिशेने जाते. या वाटेने पुढे गेलं की कृष्णा नदीचं विस्तीर्ण पात्र लागतं.नदीच्या काठावर एक सुबक असा घाटदेखील बांधलेला आहे. मुख्य मंदिराच्या तटबंदीला बुरूज आहेत. नदीपात्राच्या दिशेला असलेल्या बुरुजांवर विविध रूपातील मारुतीच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात. प्राचीन काळापासून या भागामध्ये शैव आणि गाणपत्य मंडळींचं बऱ्यापैकी वास्तव्य राहिलेलं आहे. त्यामुळे मंदिराच्या बाहेरील बाजूस याच पंथांच्या काही सत्पुरुषांच्या समाधी पहायला मिळतात. वाकेश्वरचं हे मंदिर बावधन गावाच्या हद्दीत येतं. महाशिवरात्रीला इथं मोठ्या संख्येने भाविक येतात. श्रावण महिन्याच्या दर सोमवारीदेखील इथे भाविकांची गर्दी असते.

वाई, जिल्हा सातारा.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

© आदित्य माधव चौंडे.

santsahitya.in

श्री वाटेश्वर मंदिर वाटेगाव - shri vateshwar mandir vategav - sant sahitya


श्री वाटेश्वर मंदिर वाटेगाव

वाटेगाव येथे पुर्वाश्रमीची भोगावती नदी गावाच्या मध्यभागातून वहात आहे. नदीच्या पश्चिम किना-यावर पुरातन हेमाडपंती श्री वाटेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुखी आहे. या मंदिराचे काम हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून मंदिराला पूर्व, दक्षिण, उत्तर तीन दरवाजे आहेत. मंदिराच्या गाभान्यातील शिवलिंगापासून अंदाजे चाळीस फूट लांबीचा पुर्वाभिमुखी भामंडप आहे. या सभामंडपातून आत गाभान्यात असलेल्या.

श्री वाटेश्वर मंदिरातील शिवलिंगास (पिंडीस) सूर्योदयावेळी सूर्यकिरणांचा स्पर्श होऊन किरणोत्सव उत्सवास प्रारंभ होतो. याचा कालावधी २० मिनिटेचा असतो. हा किरणोत्सव ५ दिवस साधारण असतो.

या मंदिराचा वेळोवेळी जिर्णोद्धार झालेला आसून एका मंदिराच्या पायरी वरील शिलालेखात भिडे नामक व्यक्तीचा उल्लेख येतो. हे वाटेगावच प्रमुख ग्रामदेवत आसून मंदिराला उंच तटबंदी व घाट व बुरुज याच्या साह्याने मंदिराची सुरक्षित रचना पाहायला मिळते. मंदिराला ओव-या असून त्यात आत्ता बदल केलेला दिसतो.

 

पावनखिंड-विशाळगडच नव्हे तर ‘पालेश्वर’चा धबधबा, ‘मानोली’ही आहे खास

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम घाटाचे सौंदर्य काय आणि किती वर्णावे. पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले विशाळगड हे निसर्ग संपन्न असलेले पर्यटन स्थ‍ळ होय. अणुस्कुरा खिंड आणि आंबा घाट हे कोल्हापूरच्या बाजारपेठेला कोकण बंदरांशी जोडणारे ठिकाण. (Maharashtra Day Special Explore Sahyadri) अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार 'विशाळगड' आहे. नावाप्रमाणेच विशाल असणारा हा गड सर करण्यासाठी अनेक ट्रेकर्स, पर्यटक आणि भाविक इथे येतात. राम मंदिर, मलिक रेहान दर्गा याठिकाणे असंख्य हिंदू-मुस्लिम भाविक हजेरी लावतात. खासकरून कर्नाटकातून इथे येणारी भाविकांची संख्या खूप आहे. आम्ही तुम्हाला या लेखामध्ये पावनखिंड, विशाळगड, पालेश्वर धबधबा, मानोली धरण, कोकण दर्शन अशा असंख्य पर्यटनस्थळांची माहिती देणार आहोत. कोल्हापुरातून विशाळगडला जाणार असाल एका दिवसात ही स्थळे तुम्हाला पाहता येतील. पण थोडी विश्रांती हवी असल्यास यासाठी दोन दिवसांचा वेळ लागेल. दुचाकी-चारचाकीने ही ट्रीप अविस्मरणीय ठरेल. (Maharashtra Day Special Explore Sahyadri)

पैजारवाडी –

कोल्हापुरातून विशाळगडला जात असाल तर वाटेत पैजारवाडी हे गाव लागते. कासवाच्या आकारातील चिले महाराजांचे खूप मोठे मंदिर येथील आकर्षण आहे.

हे मंदिर पाहण्यासारखे आहे. या मार्गाने पुढे जाताना अनेक भाविक-पर्यटक याठिकाणी आवर्जुन भेट देतातचं.

गरमागरम चहा आणि भजी

गरमागरम चहा आणि भजी

विशाळगड –

गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दमछाक होऊ नये म्हणून गडावर चढताना स्थानिक लोकांची थंडगार पेय असलेली छोटी दुकाने आहेत. वृद्ध लोकांसाठी पालखीप्रमाणे डोली उपलब्ध आहे. विशाळगडावर पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे स्वत: पाण्याची सोय करणे, हे कधीही उत्तम.

फोटो – शंभूराज पचिंद्रे

फोटो – शंभूराज पचिंद्रे

विशाळगाडवर राहण्यासाठी छोट्या-छोट्या खोल्या भाड्याने मिळतात. पण पाण्याअभावी गडावर अनेक पर्यटक राहत नाहीत. त्याऐवजी जाताना अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत, त्याठिकाणी राहणे पसंत करतात.

अमृतेश्वर महादेव मंदिर

अमृतेश्वर महादेव मंदिर

विशाळगडला दोन मार्गाने जाता येते –

१) पावनखिंड मार्गे – बांबवडे-मलकापूर-पांढरपाणी-भात तळी-गजापूर-पावनखिंड लागते. येथून काही किलोमीटर अंतरावर विशाळगडला जाता येते.

विशाळगडावरील जलसाठे

विशाळगडावरील जलसाठे

२) आंबा वाघझरा मार्गे – बांबवडे- शाहूवाडी-मलकापूर-आंबा-विशाळगडला जाता येते. मलकापुरातून विशाळगडला थेट रस्ता आहे.

बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधी

बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधी

विशाळगडमध्ये काय काय पाहाल?

खोकलाईदेवीचे मंदिर, विशाळगड किल्ला, राम मंदिर, अमृतेश्वर महादेव मंदिर, हजरत मलिक रेहान दर्गा (२ दर्गा आहेत), मुंडा दरवाजा, कोकण दरवाजा, अहिल्याबाई समाधी मंदिर, वाघजाई मंदिरे, वीर बाजीप्रभू देशपांडे समाधी, शिवकालीन लहान पूल, मारुती मंदिर, पाण्याच्या टाक्या, गडावर चार दरवाजा, नरसोबा मंदिर, तलाव, टकमक कडा, बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधी, दोन विहिरी (चौकोनी आणि अर्धचंद्राकार विहिर), पंत अमात्य यांच्या जुन्या राजवाड्याचे अवशेष.

रामचंद्र पंत अमात्य वाड्याचे अवशेष

रामचंद्र पंत अमात्य वाड्याचे अवशेष

जुन्या दर्गाजवळ एक मोठे पठार असून याठिकाणी सह्याद्रीच्या डोंगररांगा जवळून पाहता येतात. विशालकाय दरी आणि भिरभिरणारा वारा सर्वकाही सुखावह ठरणारे असते.

शिवकालीन पूल (फोटो – शंभूराज पचिंद्रे)

शिवकालीन पूल (फोटो – शंभूराज पचिंद्रे)

याठिकाणी हत्ती अन्‌ गायब झालेली वरात दगडी स्वरुपात डोंगरामध्ये वसलेली दिसते.

विशाळगडावरील चंद्रकोर विहिर

विशाळगडावरील चंद्रकोर विहिर

गजापुरातून विशाळगडला जाताना कोकणी पद्धतीची कौलारु घरे, कुक्कुटपालन. शेळीपालन करणारे शेतकरी, कोकणी पद्धतीची नऊवारी साडी नेसलेल्या महिला, लाल माती अन् सभोवताली सह्याद्रीच्या डोंगररांगा असा निसर्गाचा पसारा दृष्टीत भरणारा आहे.

फोटो – शंभूराज पचिंद्रे

फोटो – शंभूराज पचिंद्रे

याठिकाणाला एकदा का होईना, नक्की भेट द्या.

विशाळगडावरील पाणी

विशाळगडावरील पाणी

काय खाल?

गडावर मात्र स्वत: जेवण बनवावे लागेल. प्यायचे पाणीदेखील याठिकाणी पैसे देऊन विकत घ्यावे लागते. उन्हाळ्यात रानमेवा भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.

कोंबडी वडे थाळी

कोंबडी वडे थाळी

काळी मैना, जांभूळ, काजुचे बोंड, फणस, चिकन्या, नेरली, जरदाळू, शिवाय तमालपत्री याठिकाणी भरपूर प्रमाणात सापडते. (तमालपत्रीची पाने मसाले भात करताना वापरली जातात)

पालेश्वर धरण आणि धबधबा –

मलकापुरातून ३ कि.मी. आतमध्ये हे धरण आणि धबधबा आहे. येथे पावसाळ्यात असंख्य पर्यटक पालेश्वर धबधब्याचा आनंद लुटतात.

फोटो – शंभूराज पचिंद्रे

फोटो – शंभूराज पचिंद्रे

कसे जाल?

कोल्हापूर-बांबवडे-मलकापूर बाजारपेठ. बाजारपेठेतून डावीकडे एक रस्ता गेला आहे जो पांढरेपाणी – पावनखिंड मार्गे विशाळगडला जातो. पांढरेपाणीच्या अलिकडे उजव्या बाजूला एक छोटा कच्चा रस्ता गेला आहे, जो पालेश्वर धरण आणि धब्याधब्याकडे जातो.

पावनखिंड आणि धबधबा –

पालेश्वरमधून बाहेर पडल्यानंतर पावनखिंडीकडे जाता येते. पांढरपाणी अशी त्याची मुख्यत: ओळख आहे. पावनखिंडीचे मुख्य प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे वर्तुळाकार दिसते. भगवा ध्वज इथे फडकताना दिसतो. इथे पार्किंगची सोय आहे.

घाटातील सुंदर निसर्ग

घाटातील सुंदर निसर्ग

पुढे गेल्यानंतर मोठा बुरुज दिसतो. या बुरुजावर सहजपणे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पुढे गेल्यानंतर इतिहासाची माहिती देणारे फलक इथे दिसतात.

पावनखिंडीत उतरण्यासाठी लोखंडी जिना

पावनखिंडीत उतरण्यासाठी लोखंडी जिना

बाजीप्रभूंना वीरमरण प्राप्त झाले, त्यामुळे ही जागा पवित्र झाली. अशा या पावनखिंडीत ढाल-तलवारी प्रतिक असलेले बाजीप्रभूंचे स्मृतीस्थान आहे.

लागूनचं मोठा धबधबा पावसाळ्यात प्रवाहित होतो. तरुणांची इथे प्रचंड गर्दी असते.

हा धबधबा नयनरम्य असून धबधब्याच्या वरून प्रवाहित होणाऱ्या पाण्यात बसून आनंद लुटता येतो. इतरवेळी धबधबा आटला की, या खिंडीत उतरण्याची सोय आहे.

कोंबडी वडे

कोंबडी वडे

अनेक ट्रेकर्स खिंडीतून ट्रेक करण्यासाठी याठिकाणी येत असतात.

बांगडा-मच्छि करी-चिंचेचा कोळ

बांगडा-मच्छि करी-चिंचेचा कोळ

काय खाता येईल?

उन्हाळ्यात य़ाठिकाणी स्थानिक लोक मसाले ताक, कोकम , सरबत, कोकम फळे, करवंद, जांभूळ, चिकन्या, कलिंगड, चहाची विक्री करतात. तर पावसाळ्यात गरमागरम मक्याचे कणीस, मॅगी, मसाले चहा, भजी विकतात. किंवा तुम्ही घरचे जेवण आणून याठिकाणी बसून जेवलात तरी चालते. येथे ऐसपैस जागा आहे.

पावनखिंडीतील धबधबा

पावनखिंडीतील धबधबा

कोकण दर्शन –

'कोकण दर्शन' या नावाने सह्याद्री सनसेट पॉईंट आहे. असंख्य पर्यटक याठिकाणी सुर्यास्त पाहण्यासाठी गाड्या थांबवून उपस्थिती लावतात. कोकणचे दर्शन याठिकाणाहून होते. सह्याद्रीच्या एका मागोमाग अनेक विशाल रांगा जवळून पाहता येतात.

दुसरा मार्ग आहे – आंबा घाटातून. आंबा गावातून पुढे गेल्यानंतर वाघझरा हे ठिकाण विश्रांतीसाठी उत्तम ठिकाण आहे. (कोकणात जाणाऱ्यांसाठी आंबा घाटाची सुरुवात याठिकाणापासून होते) वाघझरा येथे पर्यटकांना विश्रांतीसाठी सोय केली आहे. वाघझऱ्यातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत, जिथे जंगलाची सुरुवात होते. इथे एक गोड्या पाण्याची विहिर बांधण्यात आली आहे. पूर्वी याठिकाणी खुले तळे होते.

विशाळगडावरील तोफेचे अवशेष

विशाळगडावरील तोफेचे अवशेष

मानोली धरण –

आंब्यातून पुढे आल्यानंतर मानोलीचे धरण दृष्टीस पडते. या धरणापर्यंत गाडीने जाता येते. पावसाळ्यात हे धरण भरल्यानंतर खळखळ वाहणारे पाणी, सभोवतालचा सुंदर परिसर अनुभवता येतो. मानोली धरणाच्या साचलेल्या पाण्यात बोटिंग रायडिंगची सोयदेखील आहे. मानोलीतून पुढे गेल्यानंतर एक रस्ता विशाळगडाकडे गेला आहे.

पंत अमात्य राजवाडा – फोटो – शंभूराज पचिंद्रे

पंत अमात्य राजवाडा – फोटो – शंभूराज पचिंद्रे

ट्रीपचा अवधी वाढवला तर बर्कीचा धबधबा देखील पाहता येईल. या धबधब्याला जाण्यासाठी जंगलातून पायवाट असून थोडे चालावे लागते. कोकणात जाणाऱ्यांसाठी पावनखिंडीतून अणुस्कुरा घाटा मार्गे जाता येईल. या मार्गावरून राजापूरला जाण्यासाठी रस्ता आहे.

विशाळगडावरील चौकोनी आकाराची विहिर

विशाळगडावरील चौकोनी आकाराची विहिर

जाण्यासाठीची योग्य वेळ –

वरील सर्व ठिकाणी १२ ही महिने जाऊ शकता. उन्हाळ्यात मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही या ठिकाणी कुटुंबासह जाऊ शकता.

पावसाळ्यात याठिकाणी धो-धो पाऊस पडतो. हा पाऊस जर अनुभवायचा असेल तर नक्की जा! पण, पावसाळ्यानंतर याठिकाणी जाणे स्वर्गाहून कमी नाहीये. हिरव्यागार धरतीने ओढलेली धुक्याची चादर, पडणाऱ्या हलक्या सरी, हवेतील गारवा आणि ओलेचिंब झाडांवरून पडणारे टपटप पाणी, भिजलेल्या रस्त्यावरून प्रवास अनुभवणे हे भाग्यात असावे लागते. हिवाळ्यात विशाळगड पाहणे, डोळ्याचे पारणे फेडणारे ठरते.

अमृतेश्वर महादेव मंदिर (फोटो – शंभूराज पचिंद्रे)

अमृतेश्वर महादेव मंदिर (फोटो – शंभूराज पचिंद्रे)

ट्रेकिंग –

तुम्ही जर ट्रेकर्स असाल तर तुम्हाला पन्हाळा – पावनखिंड ट्रेकिंग करता येते.

सह्याद्रीच्या रांगा

सह्याद्रीच्या रांगा

आंबा फाट्यावर अनेक दुकाने आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. येथून तुम्ही कोरडा खाऊ विकत घेऊ शकता अथवा अनेक चांगले हॉटेल्स असल्यामुळे याठिकाणी जेवणदेखील करू शकता.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Thursday, July 24, 2025

अहमदनगर जिल्हा ( अहिल्यानगर जिल्हा )

 प्रस्तावना


प्रत्येक गावालाही एक आगळंवेगळ व्यक्तिमत्व असतं. त्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू असतात. काही आपल्याला माहीत असतात काही नसतात. अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि त्यामधील गावांचे असे हे तेजस्वी पैलू उलगडून दाखवण्याचे काम श्री. पांडव पुरी यांच्या 'अंतरंग अहमदनगर जिल्हा' या पुस्तकाने केले आहे.
अहमदनगर जिल्हा विविधतेने किती समृद्ध आहे याची जाणीव आपल्याला हे पुस्तक वाचून होते. यातील गावे आधुनिकता आणि पारंपरिकता दोन्ही जपणारी आहेत. कोणते गाव कशासाठी प्रसिद्ध आहे. तेथे नेमके काय पाहण्यासारखे आहे, त्या गावाची भौगोलिक, तसेच तेथे होऊन गेलेल्या थोर व्यक्ती यांचीही माहिती या पुस्तकात एकत्रित दिली आहे. प्रत्येक गावाच्या नावाची व्युत्पत्ती हे एक या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. उदा. 'दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांनी आपल्या सामर्थ्याने कोपराने गोदावरी नदीचा प्रवाह बाजूला लोटल्याने तो बाजूने वाहू लागला. त्यामुळे या गावाला ‘कोपरगाव' हे नाव पडले. त्या त्या गावाशी निगडीत कथाही दिल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे. उदा. कळसुबाईच्या शिखराविषयीची कथा. 
एखादे स्थळ नुसते पहाणे व त्यामागचे ऐतिहासिक, सामाजिक असे विविध संदर्भ माहीत करून घेऊन पहाणे यात खूप फरक आहे. उदा. श्रीक्षेत्र देवगडला जाऊन नुसते दर्शन घेणे व त्यामागील कथांचे संदर्भ माहीत असताना पहाणे यात निश्चित फरक आहे. प्रत्येक गावामागील विविध संदर्भ परंपरा कळल्यामुळे ते ते गाव आपल्यासमोर जिवंत साकार होते. ते गाव, तेथील प्रेक्षणीय ठिकाणे अगोदरच माहिती मिळाल्याने आपण अधिक जाणीवपूर्वक पाहून अधिक आनंद मिळवू शकतो. शिवाय अगोदर माहिती मिळाल्यामुळे एखादे गाव पाहून आल्यावर तेथील एखादे प्रेक्षणीय स्थळ आपण पाहिले नाही तर जी चुटपूट लागते ती लागणार नाही.
पर्यटकांना प्रत्यक्ष प्रवासात उपयुक्त ठरणारे, ज्यांनी प्रवास केला त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद देणारे आणि जे प्रवास करू शकत नाहीत त्यांना घरबसल्या प्रवास घडवून ते ते स्थान प्रत्यक्ष पाहिल्यासारखा आनंद देणारे असे हे पुस्तक आहे. पर्यटकांना मार्गदर्शक म्हणून जसे हे पुस्तक महत्वाचे आहे तसाच एक संदर्भग्रंथ म्हणूनही त्याचे मूल्य अधिक आहे.
अहमदनगर जिल्हा किती वैशिष्ट्य पूर्ण आहे हे श्री. पांडव पुरी यांच्या या पुस्तकामुळे कळते. श्री. अण्णा हजारे, श्री. पोपटराव पवार यांचे आगळेवेगळे, सर्व भारताला भूषणावह असे प्रयत्न या जिल्ह्यातलेच. त्यांच्या आदर्श गावांचा परिचय आपल्याला होतो. 

 
नेवासे, पुणतांबे अशा गावांमुळे तो संतांची भूमी म्हणून जसा प्रसिद्ध आहे तसाच भंडारदरा, मुळा धरण अशांमुळे तो आधुनिकतेशी नाते जोडणाराही आहे. अनेक मंदिरांमुळे प्राचीन संस्कृती, शिल्पकला, कथा जोपासणारा जसा आहे तसाच साखर कारखाने, विविध शैक्षणिक संस्था, रेहकुरी अभयारण्य यांच्यामुळे तो प्रगतीच्या दिशेने झेपावणाराही आहे. भुतकाळाच्या संपन्न वारशाबरोबर समृद्ध भविष्य काळाकडे वाटचाल करणारा आहे. याचा अचूक वेघ या पुस्तकाने घेतला आहे.
अनेकदा आपण देशभर, जगभर फिरून येतो. पण आपला महाराष्ट्र, आपले गाव यांची व त्यांच्या समृद्ध वारशाची आपल्याला माहिती नसते. ती माहिती करून देणारे हे पुस्तक परगावहून येणाऱ्या पर्यटकांनाही उपयुक्त आहे. पुस्तकाचे हिंदी व इंग्रजी अनुवाद झाल्यास अनेकांना त्याचा अधिक फायदा होईल.
लेखक श्री. पांडव पुरी यांची जिद्द व अभ्यासुवृत्ती पुस्तकातून जाणवते. दोन वर्षे सर्वत्र प्रवास करून अथक प्रयत्नानंतर हे पुस्तक त्यांनी साकार केले. प्रत्येक गावाला भेट देऊन तेथे काय प्रसिद्ध आहे ते पहाणे, त्या गावाच्या संदर्भातील सर्व माहिती गोळा करणे, त्यांची सत्यासत्यता पारखून पाहणे ही अत्यंत जिकिरीची कामे त्यांनी उत्साहाने केली आहेत. स्थानिक मंडळींकडून माहिती मिळण्याबाबत त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. वाचलेल्या अनेक संदर्भग्रंथाची यादीही त्यांनी दिली आहे. मिळालेली माहिती संकलित करणे, तालुकावार त्यांची मांडणी करणे ही गोष्ट सोपी नाही. माहितीत काही त्रुटी असतील किंवा चूक असेल तर वाचकांनी ती दाखवून द्यावी असे सांगण्याचा मोठेपणाही त्यांनी मनोगतात व्यक्त केला आहे.
शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी अशा विविध पदांवर काम करीत असतानाच या पुस्तकाची संकल्पना श्री. पुरी यांच्या मनात होती. 'प्रवास हा खरा शिक्षक आहे.' असे इटालियन प्रवासी मनुची याने म्हटले आहे. मात्र हा प्रवास डोळसपणे करायला हवा. प्रवासात जे काही पाहिल, अनुभवलं ते मनुची, चिनी प्रवासी यू एन त्संग ७वे शतक यांनी लिहन ठेवलं त्याचा आजही आपल्याला उपयोग होतो. प्रवास करून आजपर्यंत ज्या ज्या लेखकांनी लिहून ठेवलं त्यामुळे पुढच्या पिढीला उत्तम मार्गदर्शन झालेलं आहे. ज्ञानात भर पडली आहे. श्री. पुरी यांचे 'अंतरंग अहमदनगर जिल्हा' हे पुस्तक प्रवास वर्णन नसले, तरी दोन वर्षे अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र सतत प्रवास करून सर्व गावांमध्ये काय पाहण्यासारखे आहे यांच्या तपशीलवार नोंदी केल्या आहेत. त्या सर्वांनाच मार्गदर्शक आहेत. खरेतर प्रत्येक जिल्हा व त्यातील गावासंबंधी असे पुस्तक लिहिले जायला हवे. रंगीत फोटो, आकर्षक मुखपृष्ठ यामुळे या पुस्तकाचा दर्जा उंचावला आहे.

प्रा. मेधा काळे
अहमदनगर जिल्ह्याविषयी काही ठळक वैशिष्ट्ये.


आपल्या भारत देशाचा कारभार गतीमान आणि न्यायिक होण्यासाठी देशात भाषावार प्रांतरचना आस्तित्वात आली. तेव्हांपासुन मराठी भाषिकांचे राज्य म्हणून “महाराष्ट्र राज्य” निर्माण झाले. महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी १७०४८ चौ कि मीटर क्षेत्र असलेला सर्वात मोठया क्षेत्रफळाचा ४०८८०७७ लोकसंख्या असलेला आणि नावात काना, मात्रा, वेलांटी, उकार व जोडाक्षर नसलेला ७ अक्षरी सर्वात मोठे नाव असलेला जिल्हा म्हणजे आपला 'अहमदनगर' जिल्हा, महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असल्याने संताची पावनभूमि म्हणून ओळख आहे.
आशिया खंडातील सहकारी तत्वानुसार पहिला साखरकारखाना १९५० साली सुरू झाल्याचा मानही अहमदनगर जिल्हयातील प्रवरानगरला मिळाला आहे. देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानचा मान जसा 'तिरुपति बालाजी' या देवस्थानला लागला आहे तसा आठरापगड लोकांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या साईबाबांच्या शिर्डीला महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत देवस्थानचा मान प्राप्त झाला आहे. घराला दरवाजा नसलेले गाव म्हणजे जगप्रसिद्ध शनिमहाराजांचे पवित्र तीर्थस्थान असलेले 'शनि शिंगणापूर' हे जगावेगळे अनोखे गाव अहमदनगर जिल्ल्यातच आहे. अहमदनगर जिल्हा म्हणजे संतांची पावनभूमि असलेला, सहकारातून ग्रामोध्दार झालेला 'आण्णासाहेब हजारेंचा जिल्हा आहे. श्री पोपटराव पवारांनी दिलेला ग्राम विकासाचा मंत्र देशाने स्वीकारण से पोपटराव पवार अहमदनगर जिल्ह्याचे भूषण आहे. जिल्हयात १४ तालुके असून जिल्हयाचे हवामान उष्ण आणि कोरडे आहे. जिल्हयाचा भूस्तर जाव्हा रसापासून तयार झाला असल्याने 'दख्खन टापू' म्हणूनही जिल्ह्याची ओळख आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागातून सह्याद्रिच्या रांगा गेल्यामुळे तो भाग डोंगराळ व उंच सखल आहे. सहयाद्रि पर्वतरांगामधील सर्वात उंच शिखर १६४६ मीटर हे ‘कळसुबाई’ नावाने ओळखले जाते त्याशिवाय हरिश्चंद्रगड, रतनगड, कुलंग, मलंग आजुबा ही महत्वाची उंच शिखरेही अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहेत, जिल्ह्यातील गोदावरी, प्रवरा, मुळा, ढोरा, सीना, कुकडी, घोड, भीमा या प्रमुख नद्यामुळे जिल्हयातील बागायत क्षेत्राचा   भरपूर विकास झाला आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे १५ सहकारी आणि ७ खाजगी साखर कारखाने सुरू असल्यामुळे अनेकांना रोजगारी मिळाल्याने येथील शेतकरी व कामगार सुखी झाला आहे.

शिडींचे श्री संत साईबाबा, ज्ञानेश्वरांनी येथे ज्ञानेश्वरी लिहिली ते श्री क्षेत्र नेवासे, शांतिमहाराजांचे अनोखे पवित्र स्थान श्री क्षेत्र शनिशिंगणापूर, प्रवरा तीरी वसलेले दत्त महाराजांचे पवित्र स्थान श्री क्षेत्र देवगड, हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पवित्र स्थान श्री क्षेत्र कगवानगड, पुण्यपावन असलेला श्री क्षेत्र मोहटागड, नवनाथांपैकी श्री कानिफनाथांचे समाधीस्थान असलेले श्री क्षेत्र मढी, मच्छिद्रनाथांचे समाधीस्थान श्री क्षेत्र भायंबा गड, गोरक्षनाथांचे समाधी स्थान डोंगरगण, जालिंदरनाथांचे समाधीस्थान श्री क्षेत्र खोकरमोह, रेवननाथांचे सभासी स्थान ईट ता. जामखेड, उद्बोधननाथांचे आणि केसरी नाथांचे समाधीस्थान कारखेल ता. नगर अशा पद्धतीने विचार केला तर नवनाथांचे कार्य त्यांचा संचार, वावर, वास्तव्य व शेवट प्रामुख्याने अहमद्‌नगर जिल्ह्यातच जास्त प्रमाणात झाल्याचे दिसून येते. त्यादृष्टीने महान संतपरंपरा या जिल्ह्याने अनुभवली आहे.
पारनेर तालुक्यातील सिध्देश्वर मंदीर, टाकळी ढोकेश्वर येथीद ढोकेश्वर लेणी व शीव मंदीर, सोनई येथील सोमेश्वर भंदीर, प्रवरा गोदावरी संगमावरील सिध्देश्वर, विष्णू मंदीर भव्य घाट, घोटज येथील श्री क्षेत्र मल्लीकार्जून मंदीर, रतनवाडीतील अमृतेश्वर मंदीर, नाथ संप्रदायाचे सर्वश्रेष्ठ आदिनाथ (म्हातारदेव) हे वृद्धेश्वर मंदीर, ताहाराबादचे महिपती मंदीर ही आणि अनेक पुरातन मंदीरे या सर्वांनी अनेक संत महात्म्यांनी अहमदनगर जिल्हा पावन केला आहे. 
भंडादरा धरण, रंधा फॉल, मुळा धरण, खर्ड्याचा ऐतिहासिक किल्ला, रेहकुरीचे अभयारण्य, चांदबिबी महाल, राहुरीचे कृषि विद्यापीठ, नगरचा भुईकोट किल्ला, रनगाडा प्रदर्शन केंद्र, निघोजचे निसर्गनिर्मित रांजण खळगे (पॉट होल्स), पेमगिरी येथील प्रचंड मोठा वटवृक्ष, रामेश्वर सौनाडा कौक, आगडगांवचे भैरवनाथ मंदीर येथे भूतांची यात्रा भरते अशा सारखी अनेक प्रेक्षपिय, धार्मिक, ऐतिहासिक स्थळे आपण ‘अहमदनगर’ जिल्ह्यात पाहू शकता. सुख, समाधान, आनंद व मनोरंजन घेऊ शकता. सविस्तर माहिती पुस्तकात तालुकावार आहेच.






$$$$$
वाचकांशी हितगुज....


महाराष्ट्र राज्यात अहमदनगर जिल्हा जसा विस्ताराने मोठा तसाच पौराणिक, धार्मिक, पर्यटन, उद्योगधंदे या संदर्भातही बराच आघाडीवर असल्याने महाराष्ट्रातील अनेक भागातून तसेच महाराष्ट्रा बाहेरूनसुद्धा अनेक भाविकभक्त तसेच पर्यटकांची जिल्ह्यात सारखी रीघ लागलेली असते. शिर्डी, शनिशिंगणापूर, नेवासा, देवगड, मोहटादेवी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, रेहकुरी वगैरे ठिकाणी दूरवरून माणसे या ना त्या कारणाने येतात. बरेच वेळा असे होते त्यांच्याकडे पैसा व वेळ असतो, ठराविक स्थळ सोडून जिल्ह्यात आणखी काही पहायची इच्छा असते. परंतु नेमकी माहिती नसते. त्यामुळे अशांची फारच कुचंबणा होते. अशा पर्यटकांना, भाविक भक्तांना आपल्या वेळेचा, पैशाचा पुरेपूर उपयोग करता यावा यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पौराणिक, धार्मिक, निसर्गरम्य, ऐतिहासिक स्थळांची तालुकावार माहिती देण्याचा या पुस्तकामध्ये प्रयत्न केला आहे. अनेक ऋषीमुनींनी पावन झालेली गावे, प्रभू रामचंद्र, नाथपंथीय नवनाथ यांनी आपल्या दिव्य शक्तिने प्रभावित केलेला प्रदेश, स्थळे यांची पौराणिक माहिती देताना काही दंतकथा यात घेतल्या आहेत. तसेच ज्ञानेश्वर महाराज, श्री साईबाबा, शनिमहाराज, उपासनी बाबा, किसनगिरी बाबा, मेहेरबाबा, आचार्य आनंदऋषी महाराज, भगवान बाबा, शेख महंमद बाबा, गोदडमहाराज, महिपति महाराज इ. संतांच्या कर्मभूमी असलेल्या स्थळांची माहिती यात समाविष्ट केलेली आहे.
भंडारदरा, रंधा धबधबा, कळसुबाई शिखर, रेहकुरी अभयारण्य, नाथसागर इ. निसर्गसुंदर स्थळांची माहितीही पुस्तकामध्ये घेतलेली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, हिवरेबाजार, राळेगणसिद्धी, जामखेडचे आरोग्य केंद्र यासारखी विकास केंद्रे तसेच नगरचा भुईकोट किल्ला, लष्करी केंद्रे, वाहन चाचणी केंद्र अशासारखी महत्त्वाची माहिती यामध्ये सामील केली आहे. शिवाय पूर्ण अहमदनगर जिल्ह्याचा अद्ययावत नकाशा तसेच स्थळांची माहिती देताना स्थळ कोणत्या मार्गावर अहमदनगर अथवा तालुक्याच्या ठिकाणापासूनचे अंतरही देण्याचा प्रयत्न केल्यामुळे पर्यटकांना इच्छित स्थळापर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार आहे. पुस्तक वाचताना वाचकांना एखादी माहिती चुकीची वाटल्यास व आपल्याकडे काही पुराव्यानिशी माहिती उपलब्ध असल्यास त्यासंदर्भात संपादकाकडे कळविल्यास त्याचे निश्चित स्वागतच केले जाईल व येणाऱ्या आवृत्तीत त्याची फेररचना करणे सोईस्कर होईल. आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्थळांची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला 
$$$$$
आहे. ह्या माहितीचा निश्चित आपल्याला उपयोग होईल, अशी मला आशा वाटते. सध्याच्या धकाधकीच्या गतिमान जीवनात पर्यटनासाठी आवर्जून वेळ काढला तर वेळ मिळू शकतो व मनाला भगवंताच्या अगाध लिलेची जवळून ओळख होऊन मनाला शांती, सुख, समाधान मिळू शकते. आपणाला हे सुख मिळावे म्हणून पुस्तकरूपाने ही सेवा वाचकांचे हाती देताना मला फार आनंद होत आहे. हे पुस्तक संपादीत करीत असताना अनेक स्थळांना मी समक्ष भेटी देऊन माहिती संकलित केली आहे. तसेच अनेक वृत्तपत्रातून, मासिकांतून, अनेक स्थळांच्या माहितीच्या पुस्तकातून माहिती संकलित केली आहे. अशा सर्व संबंधीतांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच पुस्तक प्रकाशित करीत असताना अनेक मित्रांचे मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यामध्ये श्री. बा. ग. एळवंडेसाहेब, मा. शि. वि. अधिकारी, श्री. सुभाष बोन्हुडेसाहेब पाटबंधारे खाते, भाऊसाहेब शिंदे शेतकरी संघटनेचे नेते, तसेच शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सचिव सुनीलजी गोसावी, सौ. शर्मिला गोसावी यांचेही मोलाचे योगदान मला मिळाले. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या सर्वांच्या सहकार्यामुळेच मला या पुस्तकनिर्मितीची प्रेरणा मिळाली आहे.
या पुस्तकाला प्रा. मेधाताई काळे यांनी प्रस्तावना देऊन पुस्तकाची उपयुक्तता पटवून देऊन मला उपकृत केले. त्यांचाही मी आभारी आहे. नवोदित लेखकांना शब्दगंध साहित्यिक परिषदेकडून सतत प्रेरणा मिळत गेल्यामुळे नवनवे कवी, लेखक प्रकाशात आले आहेत. शब्दगंध साहित्यिक परिषदेतील सर्व ज्ञात-अज्ञात पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो.

श्री. पांडव शाम पुरी
शिवम कलेक्शन, गजानन वसाहत, एम.आय.डी.सी., अ.नगर
मोबा. ९२२६३८९५४४









$$$$$
हार्दिक शुभेच्छा!


गुरूवर्य श्री. पांडव पुरी यांनी लिहिलेल्या व अहमदनगर येथील 'शब्दगंध प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रेक्षणीय व तिर्थस्थळांची माहिती देणाऱ्या पुस्तकाची पहिली आवृत्ती वाचण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात विविध वैशिष्ट्याने व नैसर्गिक सृष्टी सौंदर्याने नटलेली अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. तसेच ऐतिहासिक घटना आणि विविध देवादिकांच्या व साधुसंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक व धार्मिक स्थळे आहेत. अशा सर्व स्थळांची भटकंती करून तेथील 'महात्म्य' एकत्रीतरित्या पुस्तक रूपाने मांडण्याचा 'अथक प्रयत्न' श्री. पुरी गुरुजी यांनी केला आहे. तो निश्चितच वाखाणण्यासारखा आहे. वाचकांना नगर जिल्ह्यात कोठे काय आहे? याचे घरबसल्या ज्ञान व्हावे या उदात्त हेतूने त्यांनी केलेला हा खटाटोप आहे.
शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त झाल्यानंतर 'स्वतःला बंद खोलीत कोंडून ठेऊन आत्मचिंतन करत एका ठिकाणी आयुष्य घालविण्यापेक्षा समाजास उपयुक्त ठरेल असा उपक्रम आपल्या हातून घडावा' या भावनेने गुरुजींनी वाहत्या प्रवाहाप्रमाणे पायपीट करून नगर जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या व तेथील 'सत्य' माहितीचा खजिना या पुस्तकाद्वारे खुला करण्याचे कार्य केले. अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांना प्रत्यक्ष भेटीद्वारे तेथील माहिती संकलीत करून जनतेला उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या लोकोपयोगी कार्यास माझ्याप्रमाणेच सर्व जनतेच्या सुद्धा शुभकामना निश्चित पाठिशी राहतील यात शंका नाही. 
भौतिक घडामोडींबरोबरच अध्यात्मावरही गुरुजींची गाढ 'श्रद्धा' असल्याचे मला स्वतःला वेळोवेळी जाणवले. 'श्रद्धा' ही मनाची एक अवस्था असते. प्रेमाचे अंकुरातून 'श्रद्धा' निर्माण होते. ती गुरुजींच्या ठायी निश्चितच दिसते, राग, द्वेष, घृणा, वैर आळस, चिडखोरपणा व तिरस्कार या अपप्रवृत्ती व्यक्ती सापेक्ष असतात. या सर्व प्रवृत्तींना गुरुजींच्या ठायी अजिबात वाव नाही. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन्' या भगवत गीतेतील श्लोकाप्रमाणे गुरुजींचे कार्य या वयातही अखंडपणे चालू आहे. हे असेच अविरतपणे चालू रहावे व त्यांच्या हातून अहमदनगर जिल्ह्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील बारीक सारीक सर्वच प्रेक्षणीय, ऐतिहासिक व धार्मिक पवित्र स्थळांच्या माहितीचा पर्यटनप्रेमी लोकांना 'दीपस्तंभ' ठरेल असा 'महाखंड' प्रकाशित व्हावा ही या निमित्ताने अपेक्षा.

- भाऊसाहेब कि. शिंदे 
पिंपळगाव कौडा, ता. नगर, 
मो. ९८२२२८८४१५
$$$$$
अनुक्रमणिका

अ.नं.      
१)  कोपरगाव     
१. कोपरगाव २. संवत्सर ३. कोकमठाण ४. धामोरी ५. उक्कडगाव.

२) राहाता        
१. शिर्डी २. साकुरी ३. पुणतांबे ४. कोल्हार ५. भगवती ६. एकरूखे                              ७. लोणी.

३) संगमनेर 
१. निझर्णेश्वर २ समनापूर ३. संगमनेर ४. हिवरगाव ५. जवळे बाळेश्वर 
६. पेमगिरी ७. नांदूर खंदरमाळ ९. देवगड खंडोबा १०. नेमबाई.

४) अकोला
१. अगस्ती आश्रम २. टाहाकारी ३.कळसुबाई ४. कोकणकडा ५. रतनगड ६. भंडारदरा 
७. हरिश्चंद्रगड ८. रंधा धबधबा ९. जीवधन किल्ला १०. ऐतिहासिक गुहा.

५) श्रीरामपूर
१. केशवगोविंद बन २. श्रीरामपूर ३. वडाळा महादेव ४. हरिगाव ५. सरालाबेट 
६. कमालपूर ७. दायमाबाद ८. वाकडी.

६) नेवासा 
१. नेवासा २. नेवासा बु।। ३. बहिरवाडी ४. देवगड ५. टोके ६. वरखेड ७. शिरसगाव 
८. भानसहिवरा ९. कुकाणा १०. तरवडी ११. देडगाव १२. रांजणगाव १३. त्रिवेणीश्वर १४. श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर १५. सोनई १६. खेडले परमानंद १७. प्रवरासंगम १९. चांदा.

७) राहुरी
१. मानोरी २. राहुरी ३. कणगर ४. ताहाराबाद ५. म. फुले कृषि विद्यापीठ ६. मुळा धरण ७. ब्राह्मणी ८. वांबोरी ९. देवळाली प्रवरा १०. मांजरी ११. रोकडेश्वर.



$$$$$
८) अहमदनगर 
१. विशाल गणपती २. अमृतेश्वर ३. पारशी ४. बंगालीबाबा दर्गा ५. रुमीखान मशीद 
६. व्ही. आर. डी.ई. ७. रणगाडा प्रशिक्षण केंद्र ८. अहमदनगर वस्तू संग्रहालय ९. श्रीदत्त देवस्थान १०. साईबन ११. आनंदधाम १२. हुतात्मा स्मारक 
१३. मेहेराबाद १४. चांदबिबी महाल १५. भिंगार १६. पांजरपोळ १७. बुऱ्हाणनगरदेवी १८. ह्युम चर्च १९. कापूरवाडी तलाव २०. भुईकोट किल्ला २१. डोंगरगण २२. केडगाव देवी २३. आगडगाव भैरवनाथ मंदिर २४. नागरदेवळे महानुभाव पंथ आश्रम २५. धरमपुरी राम मंदिर २६. शेंडी पोखर्डी २७. पिंपळगाव कौडा २८. हिवरेबाजार २९. पिंपळगाव माळवी तलाव ३०. गुंडेगाव ३१. केकताई देवी ३२. संजीवनीगड ३३. चिचोंडी पाटील ३४. अकोळनेर ३५. भातोडी ३६. ब्रिटीश कालिन लोखंडी पूल.

९) पारनेर
१. कोरठण खंडोबा २. टाकळी ढोकेश्वर ३. सिद्धेश्वर मंदिर ४. पळशी ५. जामगाव 
६. वडगाव आमली ७. दैठणे गुंजाळ ८. चिंचोली ९. वाळवणे १० जातेगाव ११. पिंपळनेर
१२. देवीभोयरे १३. निघोज १४. सुपा १५. हंगा १६. कामठवाडी १७. वडगाव दर्या 
१८. निघोज (पॉट होल्स) १९. राळेगण सिद्धी २०. पारनेरकर आश्रम २१. घाणेगाव

१०) कर्जत
१. कर्जत २. दुर्गाव ३. राशीन ४. रेहकुरी ५. सिद्धटेकचा गणपती ६. मांदळी.

११) श्रीगोंदा
१. श्रीगोंदा २. राजधानी खंडोबा ३. कोळगाव ४. विसापूर ५. मांडवगण ६. पेडगाव 
७. हंगेवाडी ८. चिंचणी डॅम ९. देवदैठण.

१२) जामखेड
१. जामखेड २. खर्डा ३ रामेश्वर सौताडा ४. चोंडी.

१३) पाथर्डी
१. पाथर्डी २. मोहटादेवी ३. मढी ४. वृद्धेश्वर ५. भगवानगड ६. लोहसर ७. दैत्यनांदूर 
८. काशिकेदार ९. मिरी १०. तिसगाव ११. धामणगाव १२. चिचोंडी.

१४) शेवगाव
१. शेवगाव २. वरूर ३. आव्हाणे ४. मुंगी ५. बोधेगाव ६. लखमापुरी ७. कांबी ८. हातगाव ९. अमरापूर १०. वाघोली ११. चापडगाव १२. घोटण १३. बालमटाकळी 
१४. काशीकेदारेश्वर १५. भावीनिमगाव. १६. घोटण
$$$$$
१. कोपरगाव तालुका

१. कोपरगाव -
श्रीप्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरीच्या तिरी नगर-मनमाड रस्त्यावर नगरपासून सुमारे ९६ कि. मी. अंतरावर कोपरगाव हे पौराणिक आणि नगर जिल्ह्यातील राजकियदृष्ट्या आघाडीवरील तालुक्याचे शहर. या शहराच्या नावाची पौराणिक आख्यायिका अशी आहे. फार पूर्वी दैत्यांचे गुरू शुक्राचार्य गोदावरी नदीच्या पात्रात असलेल्या बेटावर तपश्चर्या करीत होते. तपश्चर्या चालू असताना गोदावरी नदीला महापूर आला. महापुरामुळे त्यांचे आसन डळमळायला लागले. तेव्हा त्यांच्या तपश्चर्येत अडथळा निर्माण व्हायला लागला. तेव्हा त्यांनी कोपराने आपल्या सामर्थ्याने नदीचा प्रवाह बाजूला लोटला. तेव्हापासून प्रवाह बाजूने वाहू लागला. कोपराने नदी प्रवाह बाजूला केला म्हणून गावाला कोपरगाव नाव पडले. येथेच शुक्रचार्यांना संजीवनी विद्या प्राप्त झाली. अशा थोर ऋषीमुनींचा हा परिसर आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला असताना या परिसरात निबीड अरण्य होते. 'दंडकारण्य' म्हणून पुराणात याचा उल्लेख सापडतो. या परिसरात प्रभू रामचंद्रांनी वास्तव्य केलेले होते. कच आणि देवयानी यांचे अमर प्रेम या भूमीत बहरल्याचे पुराणात दाखले आहेत. या परिसरात बक्तरपूरला शुक्राचार्यांचा, वडगावला अंगीरसांचा, कुंभारी येथे गौतमऋषींचा, सवंत्सर येथे विभांडकऋषी व शृंगऋषींचा आश्रम होता. कोपरगावजवळ संत जनार्दनस्वामीचा आश्रम सध्या अस्तित्वात असून भव्य असे काशिविश्वेश्वर शिवमंदिर आहे. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. पेशवेकालीन राघोबादादांचा इ. स. १७८२ला बांधलेला भव्य वाडा आज मोडकळलेल्या अवस्थेत हिंगणी येथे इतिहासाची साक्ष देत आहे. राघोबादादा १७८४ पर्यंत तेथेच वास्तव्यास होते. नदी किनाऱ्यावर दुर्गादेवीचे मंदिर असून 'गंगादेवी' म्हणून प्रसिद्ध आहे. गोदावरीला १९६९ व १९७६ ला महापूर आला होता. तेव्हापासून गणेशोत्सवात तुळजापूरच्या देवीसाठी जी पालखी राहुरीला तयार केली जाते त्या पालखीचा दांडा कोपरगावला आणला जातो. बगळगाड्यावर बसून नवस बोलले जातात. नदीकाठाच्या परिसरात साईबाबांची तपोभूमी असून अनेक लहान-मोठी मंदिरे गोदावरी पुलावरून पहायला मिळतात. प्राचीन संतांनी, ऋषींनी पावन झालेला वैभवशाली परिसर पर्यटकांनी आवश्य पहावा.

२. संवत्सर
कोपरगावपासून आग्नेय दिशेला ६ कि. मी. अंतरावर पुरातन पार्श्व भूमी असलेले कोकमठाण सवंत्सर ही गावे आहेत. पूर्वी दंडकारण्य असल्यामुळे तपश्चर्येसाठी निवांत ठिकाण म्हणून या परिसराची एका ऋषींनी निवड केली आणि आपल्या तपश्चर्येला आरंभ 
$$$$$
केला. तपश्चर्या करीत असताना ऋषींच्या डोक्यावर शिंगे उगवली म्हणून त्या ऋषींना 'शृंगऋषी' म्हणून ओळखू लागले. त्यांच्या वडिलांची समाधी दक्षिणेला शृंगऋषींच्या उत्तरेकडे गोदावरी नदीच्या काठी आहेत. या ऋषींच्या हस्ते आयोध्येमध्ये 'पुत्र कामेष्ठी' यज्ञ पार पडला त्याचा प्रसाद म्हणून राजा दशरथाला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशी चार आपत्ये झाली. शृंगऋषीचे मंदिर सवंत्सर येथे गादावरी काठी आहे. नुकताच १९८९ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन तेथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाशिवरात्रीला येथे भव्य यात्रा भरते. द्वापारयुगात नारद आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये याच ठिकाणी मोठा विस्मयकारक संवाद घडला. भगवान श्रीकृष्णाला सोळा सहस्त्र बायका होत्या. त्यामुळे नारदाला स्त्रीमोह झाला त्यांनी भगवान श्रीकृष्णाकडे आपल्यालाही गृहस्थाश्रमी करा असा हट्ट धरला. तेव्हा भगवानांनी या ठिकाणी गोदावरीमध्ये स्नान कर म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला. नारदाने त्याप्रमाणे स्नान करताच नारदाचे 'नारदीत' रूपांतर झाले. नारदीला ६० पूत्र झाले तिच ६० सवंत्सरे व एक मुलगी झाली ती म्हणजे 'कामधेनू'. मुले मोठी झाल्यावर त्यांनी राक्षसांबरोबर युद्ध केले. त्या युद्धातून फक्त एक मुलगा वाचला. त्यांच्या समाध्या आजही गोदावरी तिरावर पहायला मिळतात. येथे विभाडक ऋषींचाही आश्रम होता.

३. कोकमठाण
प्रभू रामचंद्रांनी वनवासातील काही काळ कोकमठाण येथे व्यतीत केल्याची साक्ष त्या गावात आजही आपल्याला पहायला मिळते. सितामाईंनी लावलेला वटवृक्ष अद्यापही तेथे पहायला मिळतो. याच वटवृक्षाखाली सितामाईंनी निवास केला, याच वृक्षाखाली कुंकू लावले म्हणून गावाला 'कुंकुमस्थान' हे नाव पडले. पुढे त्याचा अपभ्रंश "कोकमठाण' असा झाला. याच वटवृक्षाच्या छायेत देवयानी (लक्ष्मीमाता) मंदिर आहे. 'कच देवयानी आख्यान येथेच घडले. कोकमठाण व सवंत्सर या दोन गावांमध्ये अक्षय तृतीयेपासून गोफण गुंड्याची पाच दिवस लढाई चालते. या लढाईला 'गोफणगुंडा' लढाई म्हणून प्रसिद्धी आहे. परिसरातील अनेक लोक ही लढाई पहायला येतात. रामदासी महराजांचा आश्रमही येथे होता.

४. धामोरी -
कोपरगावपासून ३० कि. मी. अंतरावर रवंदे रस्त्यावर धामोरी हे प्राचीन अख्यायिका असलेले ठिकाण आहे. पूर्वी येथे निबीड अरण्य होते. त्या ठिकाणी 'अडंबगनाथ' यांनी घनघोर तपश्चर्या केली होती. या ठिकाणी प्राचीन सुमारे ७०० वर्षांपूर्वीचा गोरख 
$$$$$
चिंचेचा एक मोठा वृक्ष आहे. त्याला बरोबर नऊ फांद्या आहेत. या फांद्या नऊ नाथांच्या आहेत. असे मानले जाते. या वृक्षांची फळे, फुले, पाने, साल सर्व औषधी असल्याने अनेक व्याधीग्रस्त या ठिकाणी येऊन बरे झाल्याचे सांगितले जाते.
५. उक्कडगाव
कोपरगाव वैजापूर मार्गावर हे गाव असून 'तांदूळजा देवी' चे मोठे मंदिर आहे. देवीची अख्यायिका सांगताना परिसरातील भक्त सांगतात की, एक शेतकरी शेत नांगरीत असताना ही देवी जमिनीतून वर आली. हे अतिशय जागृत असे रेणुका 'देवी' चे ठाणे समजले जाते. अनेक भक्तांच्या नवसाला ही देवी पावते. नवरात्रौत्सवात येथे फार मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतील अनेक भक्तगणांचे हे महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. ४०० वर्षापूर्वी हे रेणुकादेवी मंदिर बांधलेले आहे.

६. हिंगणी
कोपरगाव शहरालगत गोदावरी नदीकाठी १७८३ साली इंग्रजाशी झालेल्या कराराप्रमाणे राघोबादादांना पेशव्यांच्या स्वाधीन करण्यात आले ते आपल्या कुटुंबासह या इतिहास प्रसिद्ध राघोबादादांच्या वाड्यात रहायला आले ही वास्तू आज जीर्ण अवस्थेत पेशवाईच्या आठवणी जागवते. ४ ऑगस्ट १७८३ रोजी राघोबांनी नारायणरावांच्या हत्येबद्दल येथेच प्रायश्चित घेतले. येथे राघोबादादांची समाधी आहे. 













$$$$$
२. राहाता तालुका

१. राहाता -
अहमदनगर-मनमाड महामार्गावर अहमदनगरपासून सुमारे ८५ कि. मी. वर आंतर राष्ट्रीय कीर्तीचे श्रीसाईबाबांचे शिर्डी हे देवस्थान आहे. 'श्रद्धा सबुरी' हा साईबाबांचा अतिशय साधासोपा संदेश सर्वदूरपर्यंत सातासमुद्रापलिकडे पोहोचला असल्याने दररोज हजारोंच्या संख्येने भक्तगण शिर्डीचे साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. बाबांनी हाताळलेल्या वस्तू अजूनही येथे जतन करून ठेवलेल्या आपल्याला पहायला मिळतात. त्यांचे दुर्मिळ छायाचित्र, पायतला जोडा, त्यांचे जेवणाचे पात्र, धान्य दळायचे जाते, चिलीम, पलंग, बिछाना, नंदादीप, अंगावरील व इत्यादी पहायला मिळतात. एवढेच नाही तर त्यांनी पेटविलेली धुनी, धान्याचे पोते, ते बसत असलेला मोठा दगड पहायला मिळतो. ते सिद्धपुरूष होते. ते कोठून आले, कोणत्या जाती धर्माचे होते हे अद्याप न उलगडणारे कोडे आहे. त्यामुळे सर्व धर्मियांचे सर्व जातीपातीच्या भिंती पलिकडे त्यांचे अस्तित्व होते. त्यांनी आपल्या हाताने अनेक वृक्ष लावले. आज त्या 'लेंडीबागेचे' नूतनीकरण करण्यात आले आहे. अतिशय मनमोहक धबधबा, लाईटींग, बगीचामध्ये भक्तांना बसण्यासाठी सुंदर प्रकारची व्यवस्था केली आहे. साई मंदिराचे, परिसराचे पूर्णपणे नुतनीकरण केल्यामुळे भक्तांचे व पर्यटकांचे 'शिर्डी' हे आवडते ठिकाण बनले आहे. संस्थानतर्फे भक्तांना राहण्यासाठी फार मोठ्या धर्मशाळा बांधल्या आहेत. खाजगी लॉज, महाराष्ट्र पर्यटन विकास केंद्राचे विश्रामगृह, पंचतारांकित हॉटेल आहेत. तसेच बाबांचा 'प्रसाद' मिळण्याची अतिशय चांगली व्यवस्था आहे. भक्तांना अत्यल्प दरात जेवणाची व्यवस्था संस्थानने केलेली असून एका वेळी दोन हजारांपर्यंत भक्तांना एकाचवेळी जेवण घेता येते. संस्थानतर्फे परिसरातील रुग्णांसाठी अत्यल्प दरात उपचार केले जातात. तसेच मोठ्या व्याधीग्रस्त रुग्णांना लोणी किंवा इतर ठिकाणी उपचार घेणाऱ्यांना आर्थिक मदतही मागणी केल्यास मिळते. बाबांच्या दानपेटीत दररोज लाखो रुपये, दागिने असे गुप्तदान संस्थानला मिळते. त्यातून मंदिर परिसरात अनेक लोकोपयोगी विकासाची कामे चालू असतात. तिरुपती बालाजीनंतर शिर्डी संस्थानचा भक्त व पर्यटनामध्ये बराच वरचा नंबर लागतो. परराज्यातील पर्यटकांसाठी, भक्तांसाठी रेल्वेने येता यावे म्हणून दौंड-मनमाड रूटवरील पुणतांबे स्टेशनवरून शिर्डीकडे सरळ भक्तांना येण्यासाठी नव्या रेल्वे मार्गाने शिर्डीला येता येते. तसेच विमानाने साईभक्तांना व पर्यटकांना येण्याच्या दृष्टीनेही हालचाली सुरू आहेत.
$$$$$
गुरूपौर्णिमा उत्सव, रामनवमी, साईबाबा स्मृतिदिन उत्सव, आश्विन शु । १० ते आश्विन शु।। १२ इत्यादी उत्सव आणि उन्हाळी, दिवाळी, नाताळ सुट्या असताना पर्यटकांची विशेष गर्दी असते. अनेक भाविकांशिवाय मान्यवरांची, नेतेमंडळींची, उद्योगपतींची, कलाकारांची गर्दी व विशेष भेटी शिर्डीला असतात. संस्थानतर्फे त्यांचा योग्य तो सन्मान केला जातो. देशातील एक श्रीमंत देवस्थान म्हणून 'शिर्डी' कडे पाहिले जाते. 'शिर्डी' अहमदनगर जिल्ह्याचे भूषण आहे.

२. साकुरी
शिर्डीपासून नैऋत्येला सुमारे ५ कि. मी. अंतरावर उपासनी महाराजांचे साकुरी हे स्थान आहे. शिर्डीला आलेले पर्यटक हे स्थळ अगदी जवळ असल्यामुळे जातात. उपासनी महाराज हे साईबाबांचे समकालीन संत होते. हिंदू धर्मातील धार्मिक विधींचे वेद अभ्यास केंद्र या आश्रमात महाराजांनी सुरू केले. या अभ्यासकेंद्रात सर्व स्त्रिया अभ्यास करतात. सती गोदावरी मातांनी अनेक वर्षे या आश्रमाचे काम पाहिले. सध्या सती देवीताईच्या माध्यमातून आश्रमाचे काम सुरू आहे. उपासनी महाराजांची समाधीपूजा तसेच कन्याकुमारी माताजींची त्रिकाल यथासांग पूजा अर्चना केली जाते.. भक्तांसाठी निवासव्यवस्था अल्प दरात संस्थानतर्फे केली जाते. तेथील वातावरण अतिशय शांत पवित्र असल्याने अनेक भक्तांचे व पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.

३. पुणतांबे -
महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून या स्थानाची महती असून दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर हे स्थान आहे. दक्षिण गंगा समजली जाणारी गोदावरी नदीकाठी आहे. योगिराज चांगदेव महाराजांचे येथे समाधीस्थळ असल्याने महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून गणले जाते. शिर्डी, पुणतांबा रेल्वे मार्गाने जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. शिर्डीसाठी व पुणतांब्याच्या विकासासाठी या मार्गाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. काशिविश्वेश्वर मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर येथे आहे. वद्य आषाढी एकादशीला येथे भाविकांची मोठी यात्रा भरते. चांगदेव महाराज ज्ञानेश्वर माऊलींची कीर्ती ऐकून त्यांना भेटायला वाघावर बसून व हातात महाभयंकर विषारी नाग घेऊन आपले सामर्थ्य दाखवायला निघाले त्यांना निर्जीव भिंतीवर ऊन खात बसलेले ज्ञानेश्वर महाराज निर्जीव भिंत चालवून सामोरे गेले. तत्पूर्वी त्यांनी मी आपल्या भेटीसाठी येत आहे असे पत्र ज्ञानेश्वर माऊलींना लिहायला घेतले. परंतु आशीर्वाद द्यावा की, नमस्कार लिहावा हा प्रश्न पडल्याने कोरेच पत्र पाठवावे लागले, असे हे चांगदेव महाराज पुणतांब्यात समाधीस्त झाले.

$$$$$
४. कोल्हार भगवती -
नगर-मनमाड महामार्गावर अहमदनगरपासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर कोल्हार भगवतीपूर हे पुरातनगाव आहे. कोल्हार नाव कसे पडले त्याबद्दल अख्यायिका सांगितली जाते ती अशी प्रभू रामचंद्र वनवासात - असताना ते प्रवरातिरी स्नानासाठी आले. स्नानानंतर पुजेसाठी वाळूचे शिवलिंग बनवून पूजा केली. त्यावेळी भगवान शंकर 'कोल्हाळेश्वर' रूपाने प्रकटले. आज तेथे कोल्हाळेश्वराचे मंदिर पहायला मिळते. त्यावरून गावाला 'कोल्हार' नाव पडले. कोल्हाळेश्वर मंदिर ते भगवती माता मंदिरापर्यंत भुयारी मार्ग आहे असे म्हणतात.. महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत. तुळजापूरची भवानी माता, माहूरगडची रेणुकामाता आणि कोल्हापूरची आंबाबाईमाता ही पूर्ण पिठे आहेत आणि वणीची सप्तशृंगीमाता हे अर्धेपीठ असे एकूण साडेतीन पिठे येथे एकत्रित असल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून दूरवरून भाविक भक्त या देवींच्या दर्शनासाठी व नवसासाठी येतात. पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमापर्यंत येथे एक महिना मोठी यात्रा भरते या यात्रेसंबंधीची अख्यायिका अशी की, फार पूर्वी कोल्हार गावात 'लोटांगणी' बाबा वास्तव्य करून रहात होते. ते दरवर्षी कोल्हारपासून वणीपर्यंत पायी किंवा कोणत्याही साधनाने न जाता लोटांगण घालीत दर्शनाला जायचे म्हणून त्यांना ‘लोटांगणीबाबा' असे नाव पडले. पुढे ते वृद्ध झाले त्यांना एवढ्या दूर लोटांगण घालून दर्शनाला जाता येईना. त्यांना अपार दुःख झाले. ते शोक करू लागले त्यांची भक्ती ओढ पाहून वणीच्या देवीने त्यांना दृष्टांत दिला की, मी दरवर्षी पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमेपर्यंत तुझ्यासाठी कोल्हारला वास्तव्य करून राहील. तेव्हापासून या कालखंडात दरवर्षी मोठी यात्रा भरते. नवरात्रातसुद्धा १० दिवस मोठा उत्सव, पूजा, अर्चना होते. मोठी यात्रा भरते. नुकतेच मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम झाले असून ६४ फूट उंचीवर कळस ३५ फूट उंचीची दीपमाळ उभारली असून २०८ फूट ×८० फूट असा भव्य सभामंडप भक्तांसाठी बांधला आहे.

५. एकररूखे
राहाता-चितळी रस्त्यावर राहात्याजवळ एकरूखे गाव सुमारे ८ कि. मी. अंतरावर आहे. या ठिकाणी वज्रेश्वरी देवीचे ठाणे असून ती नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. या देवीच्या प्रकटनाची अख्यायिका सांगतात की, पूर्वी त्या गावात चंदू गाढवे नावाचा शेतकरी आपल्या शेतात विहिरीचे खोदकाम करीत असताना विहिरीत एका दगडाला टिकाव लागला. त्याबरोबर त्यातून रक्ताची धार वाहू लागली. विहिरीतील पाणी रक्ताने लालभडक झाले. हा चमत्कार गावकऱ्यांनी पाहिल्यावर पंचक्रोशीतील अनेकांनी तेथे गर्दी केली. त्याच रात्री गावातील एका भक्ताला दृष्टांत झाला. 'मी आदिमाता वज्रेश्वरी माता आहे 
$$$$$
मला सन्मानाने वर घ्या' त्यानुसार त्या ठिकाणी देवीची प्राणप्रतिष्ठा करून तेथे सुंदर मंदिर उभारले. अनेक भक्त दर्शनासाठी व नवसासाठी येथे येतात. तेथे वर्षातून तीनवेळा यात्रा भरते.

६. लोणी
नगर- संगमनेर रस्त्यावर नगरपासून सुमारे ७६ कि. मी. अंतरावर जागतिक दर्जाचे लोणी हे गाव आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी या ठिकाणी आशिया खंडातील पहिला सहकारी तत्त्वावर साखर कारखाना १९५० साली उभा केला म्हणून या कारखान्याला व गावाला विशेष महत्व आहे. 
आज लोणी परिसर म्हणजे 'प्रवरा उद्योग समूह' या नावाने ओळखला जातो. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी लावलेल्या रोपट्याचा आता मोठा वटवृक्ष झाला असून साखर कारखान्यासोबत आसवनी कारखाना, पायरेन्स केंद्र, प्रवरा बँक, वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये, साईशरण इन्स्टिट्यूट, अतिभव्य ग्रंथालय बगैरे ३० प्रकारचे उद्योग येथे सुरू असून हा उद्योग समूह अहमदनगर जिल्ह्याला भूषणावह ठरला आहे. या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार परिसराला मिळाला असून सामान्य कुटुंबातील मुलांना मोठमोठ्या पदवीपर्यंत शिक्षणाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. प्रवरा विखे फाउंडेशनच्या विळदघाट, शेवगाव इत्यादी जिल्ह्यातील अनेक भागात शैक्षणिक व वैद्यकीय सेवा सुरू आहेत. या परिसराचा सर्वांगीण विकास हा महाराष्ट्रात एक आदर्श असे उदाहरण ठरले आहे.
ग्रामीण महाराष्ट्राच्या दुर्गतीला जितकी आर्थिक दुरावस्था तितकीच शैक्षणिक अनास्था कारणीभूत ठरली आहे. महात्मा फुलेंनंतर ज्यांना कळले त्यात महर्षी कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, पद्मश्री विखे पाटील यांचा समावेश होतो.
सहकारी साखर कारखानदारीच्या रूपाने दुबळ्या शेतकऱ्यांना कारखानदार बनविण्याचा चमत्कार विखे पाटलांनी महाराष्ट्रात घडविला. ग्रामीण, अडाणी व दारिद्रयाने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या हातात पहिल्यांदाच पैसा उभा राहिला. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून ग्रामीण भागात अनेक शाळा सुरू केल्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ७५० बेडचे हॉस्पिटल प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून प्रवरानगरला सुरू केले. अहमदनगर जवळ विळद घाटांतही मोठा दवाखाना सुरू करून अनेक गरीब कुटुंबांना अल्पदरात आरोग्य सेवा सुरू केली आहे. सहकारी कारखानदारीचे आद्य प्रवर्तक पद्मश्री विखे पाटलांचा पूर्णाकृती पुतळा ११ जानेवारी २०१४ ला राज्य सरकारने पुण्याच्या साखर संकुलात उभारला आहे.


$$$$$
३. संगमनेर तालुका

१. निझर्णेश्वर -
अहमदनगर - संगमनेर रस्त्यावर कोकणगाव शिवारात २ कि. मी. आत निसर्गरम्य निझर्णेश्वरचे मंदिर आहे. आजूबाजूला डोंगर, हिरवीगार झाडी, झुळझूळ वाहणारा ओढा, पक्षांचा चिवचिवाट यामुळे दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांना तेथेच थांबावेसे वाटते. श्रावणातील दर सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परिसरातील गावांचे हे एक आकर्षण ठरले आहे. महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा भरते.

२. समनापूर -
संगमनेर शहराचे अतिशय प्रिय दैवत म्हणून समनापूरच्या महागणपतीचा उल्लेख केला जातो. संगमनेर-नगर मार्गावर ३ कि. मी. अंतरावर अतिशय सुंदर असे हे मंदिर असून भाविक भक्त आवर्जून गाड्या थांबवून येथे दर्शनासाठी थांबतात. हे दैवत स्वयंभू असून नुकतेच या मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले आहे. संकष्टी चतुर्थीला भाविकांची गर्दी होते. या दिवशी मूर्तीला शेंदूर चढविला जातो. नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती आहे. 

३. संगमनेर -
संगमनेर शहराचे आराध्यदैवत असलेले सप्तशृंगी देवी' हे ठाणे आहे. देवीची मूर्ती साडेपाच फूट उंचीची असून नवरात्रात देवीच्या चेहऱ्यावर भाव व छटा आश्चर्यकारक रितीने बदलतात. असा भाविकांचा दावा आहे. देवीला १८ भुजा आहेत. याच मंदिरात पुरातन रेणुकामातेचे मंदिर असून साडेतीन ते चार फूट गोलाकार चेहरा असलेली मूर्ती आहे. सोमवंशी क्षत्रीय समाजातर्फे मंदिराची देखभाल केली जाते. नवरात्रात येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.

४. हिवरगाव पावसा -
महाराष्ट्रात खंडेरायाची जी महत्त्वाची ठिकाणे आहेत त्यापैकी हिवरगाव पावसा या ठिकाणाला वेगळे महत्त्व आहे. महाराष्ट्रातून दसऱ्याला ज्या काठ्या जेजुरीला जातात त्यापैकी मानाची काठी हिवरगावची जाते. जेजुरीला त्या काठीला विशेष महत्त्व असते. हिवरगाव हे ठिकाण संगमनेरच्या दक्षिणेला सुमारे २० कि. मी. अंतरावर आहे.


$$$$$
५. जवळे बाळेश्वर
संगमनेरच्या दक्षिणेला सुमारे ४० कि. मी. अंतरावर जवळे बाळेश्वर हे ठिकाण आहे. पूर्वीच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे भुयारी मार्ग होते त्यापैकी जवळे बाळेश्वराजवळ असाच एक भुयारी मार्ग आहे. तो सात दालनाच्या गुहेसारखा दिसतो. चंदनापुरीच्या घाटाजवळ डोंगरात ही सात दालनी गुहा दिसून येते. ऐतिहासिक महत्व असलेले हे ठिकाण समजले जाते.

६. पेमगिरी -
संगमनेरपासून नैऋत्येला सुमारे २७ कि. मी. अंतरावर इतिहास प्रसिद्ध पेमगिरीचा किल्ला पहायला मिळतो. शहाजीराजांनी याच किल्ल्यावर मुर्तुजा निजामशाह याचा राज्याभिषेक करून या नामधारी निजामशाहच्या आडून स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने जमवाजमव करून स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. पेशवे काळात थोरल्या बाजीरावांची प्रेयसी मस्तानी हिला याच किल्ल्यावर काही काळ ठेवले होते. येथे एक प्राचिन वटवृक्ष प्रेक्षणिय आहे. सातवाहन कालीन पाण्याची टाकी पेमगिरीवर आजही पहायला मिळते. पेमगिरीचा चुना फार प्रसिद्ध आहे. असे हे ऐतिहासिक महत्व असलेले ठिकाण पहायला पर्यटकांनी अवश्य जावे. 

७. नांदूर खंदरमाळ
संगमनेर-पुणे रस्त्याजवळ संगमनेरपासून सुमारे ३५ कि. मी. अंतरावर दक्षिण बाजूला नांदूर खंदरमाळ हे ठिकाण आहे. येथे पूर्वाभिमुखी भगवती देवीचे जागृत ठाणे प्रसिद्ध आहे. मंदिर जुने असून हेमाडपंथी बांधकाम असलेले आहे. येथे सामुदायिक पद्धतीने घटस्थापना करण्याची पद्धत आहे. अक्षयतृतीयेला या देवीची मोठी यात्रा भरते. दूरदूरचे लोक या यात्रेला आवर्जून येतात. नवसाला पावनारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.

८. देवगड खंडोबा
हे संगमनेरजवळ ठिकाण असून खंडोबाचे जागृत ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला प्रतिजेजुरी म्हणून ओळखले जाते. येथे खंडोबाची मोठी यात्रा भरते. नवस फेडायला अनेक भक्त आवर्जून या ठिकाणी येतात.

९. जागृत नेमबाई देवस्थान -
मनोली व ओझर याच्या मध्यावर एका डोंगराच्या गुहेत हे नेमबाईचे जागृत ठाणे प्रसिद्ध आहे. या देवस्थानची अख्यायिका मोठी चमत्कारिक सांगितली जाते. श्रीक्षेत्र निझर्णेश्वराच्या दर्शनासाठी फार पूर्वी पांडव आले होते. त्यांच्या सोबत दर्शनासाठी एक दानव आलेला होता. तो दानव असून ही माता पार्वतीचा परमभक्त होता. भगवान शंकराला 
$$$$$
पांडवासोबत आलेल्या या दानवाचे येणे आवडले नाही त्याला पाहताच भगवान शंकराने क्रोधीत होऊन त्याला ठार मारण्याचा आदेश आपल्या गणांना दिला. असा आपल्या भक्ताला अचानकपणे ठार मारण्याचा आदेश मातेला आवडला नाही. त्या तेथून रूसून या डोंगरावर येऊन बसल्या. तेव्हापासून या स्थानाला महत्व प्राप्त झाले हे जागृत ठिकाण असल्यामुळे अनेक भक्त येथे नवस फेडायला येतात. सुमारे ४०० वर्षांपूर्वी मनोलीच्या गुलाबगिरीबाबांना मी या डोंगरावर वास्तव्य करून आहे असा दृष्टांत व वर्णन सांगितले. त्याप्रमाणे हे दुर्लक्षित ठिकाण वर्णनाप्रमाणे बाबांनी शोधले. तेथे मंदिर बांधले येथून जवळ एक भुयार आहे. तेथे पूर्वी एक लग्नाचे वऱ्हाड गडप झाल्याचे सांगतात. अद्यापही दर अमावस्या पौर्णिमेला त्या ठिकाणी वाजंत्रीचा आवाज आपणास ऐकायला मिळतो. हे जागृत स्थान आहे. 




























$$$$$
४. अकोले तालुका

१. अगस्ती आश्रम
अकोलेपासून सुमारे ३ कि. मी. अंतरावर अगस्ती आश्रम असून या आश्रमाची फार पुरातन काळातील हकीगत सांगितली जाते. प्रभू रामचंद्र वनवास काळात या ठिकाणी वास्तव्य करून होते. ज्या बाणाने रावणाचा वध झाला तो अमोल बाण अगस्तीऋषींनी प्रभू रामचंद्रांना याच ठिकाणी दिला होता. त्या काळातील दंडकारण्यातील अनार्याची पहिली वसाहत अगस्तीऋषींच्या आश्रमात झाल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथात सापडतो. तसेच या आश्रमात अनार्यांना कृषी विद्यादान दिले जात होते. नुकतेच या आश्रमाचे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम येथे नियमितपणे सुरू असतात.

२. टाहाकारी -
अकोल्याच्या वायव्येला गर्धणी मार्गाने पुढे सुमारे २५ कि. मी. वर तसेच समशेरपूरपासून १६ कि. मी. अंतरावर टाहाकारी हे ठिकाण असून टाहाकारी या नावाची अख्यायिका प्रसिद्ध आहेत. हे मंदिर ७०×६३ मीटर x ५ फुट उंचीच्या चौथऱ्यावर बांधलेले आहे. या गावचे वैशिष्ट्य या गावात एकही हनुमान मंदिर नाही. जवळच 'विश्रामगड' पहायला मिळतो.

३. कळसूबाई -
सहयाद्रि पर्वनातील सर्वात उंच शिखर आहे. याशिवाय हरिश्चंद्‌गड, रतनगड, कुलंग, मलंग आणि आजुबा ही सुध्दा सह्याद्रीतील इतर काही महत्त्वाची शिखरे अकोले तालुक्यातच आहे.
अहमदनगरची सरहद्द असलेल्या घाटघरजवळ कळसूबाई हे सर्वाधिक म्हणजे १६४६ मीटर उंचीचे शिखर आहे. अहमदनगरपासून सुमारे १७७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. कळसावर स्वयंभू शिळेची मूर्ती असलेले 'कळसूबाईचे' मंदिर आहे. या परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने पर्यटकांनी सावधानता बाळगणे महत्वाचे आहे. येथे घनदाट जंगल असल्याने अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती येथे मिळतात. 'कळसूबाई' नावाची आख्यायिका येथील स्थानिक लोक सांगतात. जवळच 'बारी' गावात राहणाऱ्या मुलीचे नाव कळसा होते. ती तेथील पाटलाच्या घरी घरकाम करायची तिचा नियम असा असायचा की, ती घरकाम आटोपल्यावर दररोज कळसाचे दर्शन घ्यायला वर डोंगरावर जायची दर्शन घेऊन पुन्हा 'बारी'ला परतायची. काही दिवसाने ती कळसावरच मुक्काम करायची. अशीच $$$$$
एक दिवस ती कळसावर दर्शनाला गेली ती पुन्हा आलीच नाही. तिथेच तिचा अंत झाला. त्या दिवशी 'दसरा' होता. तेव्हापासून त्या कळसाला 'कळसूबाईचे शिखर' नाव पडले.
पुराणकाळात भगवान विष्णू लक्ष्मीमातेसह येथे निवास करीत होते. असा पुराणात दाखला आहे. तसेच अगस्तीऋषींचे सुद्धा या शिखरावर काही काळ वास्तव्य असल्याचा दाखला मिळतो. असे हे निसर्गाने नटलेले अतिशय उंच रमणीय ठिकाण सावधतेने पाहणे आवश्यक आहे. शिखराच्या पायथ्याशी अभयारण्य असून येथे बिबट्यांचा संचार असतो. दुर्मिळ जुनी झाडे असून कोळी, ठाकर येथे राहतात.

४. कोकणकडा
कळसूबाई जवळ व घाटघरजवळ सुमारे ६ हजार मिलिलिटर पाऊस पडत असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडत असलेले ठिकाण म्हणून याची ओळख आहे. घाटघरपासून अर्धा कि. मी. वर कल्याण, ठाणे परिसराचे व कोकणाचे विहंगम दृश्य पहायला मिळते. मे, जून महिन्यामध्ये येथे भरपूर करवंदे विकायला येतात. 

५. रतनगड
अमृतवाहिनी प्रवरा नदीचे उगमस्थान असलेले हे ठिकाण असून पुरातन असा वारसा असलेले हे ठिकाण आहे. रतनगडच्या पायथ्याला ११व्या शतकातील चालुक्य अप्रतिम शिल्पकाम असलेले निसर्गाने नटलेले 'अमृतेश्वरा' चे प्राचीन मंदिर पहायला मिळते. प्रवेशद्वारावर दुर्मिळ 'मैथुनशिल्प' कोरलेले पहायला मिळते. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. परिसरात अनेक देवदेवतांची लहान-मोठी मंदिरे आहेत. पावसाळ्यात भंडारदरा धरणातून नावेने मंदिरापर्यंत जाता येते. रतनगडाची पौराणिक हकिगत अशी सांगतात भगवान विष्णूने अमृतकुंभाचे अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या राहूचे मस्तक उडविले राहुरीला आणि ते उडून जेथे पडले ते ठिकाण म्हणजे 'रतनगड' अशी दंतकथा सांगितली जाते. 

६. भंडारदरा -
नगरपासून १६२ कि. मी. अंतरावर भंडारदरा हे निसर्गाने नटलेले सुंदर 'दगडी धरण पहायला मिळते. हे धरण ब्रिटीश काळात प्रवरा नदीवर बांधलेले असून अतिशय सुंदर पद्धतीने हे अप्रतीम स्थापत्यकाम केलेले आहे. या धरणाची उंची २७० फूट असून १९०३९ दशलक्ष घ. फुट क्षमता असलेले हे धरण पाहण्यासाठी शेकडो पर्यटक येतात. अनेक फिल्मचे चित्रीकरण या परिसरात सतत सुरू असते. धरणाच्या पायथ्याशी असलेले उद्यान अतिशय मनमोहक आहे. 'अम्ब्रेला फॉल' पाहण्यासाठी शेकडो पर्यटक येतात. जलविहारासाठी 
$$$$$
लाँचची व्यवस्था सुद्धा आहे. पर्यटकासाठी येथे काही विश्रामगृहाची व्यवस्था केलेली आहे. आगावू परवानगी घेतल्यास विश्रामगृहात उत्तम सुखसोयी उपलब्ध होतात. भंडारदरा जलाशयाला 'आर्थरलेक नावाने ओळखले जाते. तसेच या ब्रिटीश कालिन धरणाला 'विल्सन डॅम' म्हणूनही ओळखले जाते. विश्रामगृह भव्य असून साधारण ११० पर्यटकांना उत्तम प्रकारे निवासाची व्यवस्था होऊ शकते. संपर्कासाठी एस. टी.डी.सी (०२४२४) ५१७७१, ५१७७० तसेच जलसिंचन विश्रामगृह ५१६१७, वीज मंडळाचे कृष्णवंती विश्रामगृह ५१६०७ या क्रमांकावर आपण संपर्क करू शकता. जाण्यासाठी नाशिककडून घोटी मार्गाने किंवा नगरहून संगमनेर, अकोले मागनि बससेवा उपलब्ध आहे.

७. हरिश्चंद्रगड
संगमनेरहून माळशेज घाटाकडे जाणाऱ्या महामार्गाजवळ कोतूळपासून सुमारे ३० कि. मी. अंतरावर 'हरिश्चंद्रगड' हे ठिकाण आहे. हरिश्चंद्रगडावर 'हरिश्चंद्राचे' हेमाडपंती मंदिर असून तेथे काही लेण्या आहेत. तसेच येथे फार मोठी गुहा पाहण्यासारखी आहे. संत चांगदेव महाराजांची या ठिकाणीच 'तत्वसार' हा ग्रंथ लिहिला. या ठिकाणी काही शिलालेख पहायला मिळतात. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेवांचा त्या शिलालेखावर उल्लेख पहायला मिळतो. या गडाजवळ ताराराणीचे एक शिखर आहे. या कड्यावरच मुळा नदीचा उगम होत असून या ठिकाणाची उंची १,४२४ मीटर एवढी आहे. येथूनच मुळा नदी उगम पावते. येथील पाण्यात असलेल्या शिवलिंगाला फेऱ्या मारीत असताना वर्तुळाकार सुंदर इंद्रधनुष्य पाहण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होते.

८. रंधा धबधवा
अहमदनगरपासून सुमारे १५२ कि. मी.वर प्रवरा नदी ५० ते ६० मीटर उंचीवरून धो धो कोसळते तो हा नयनरम्य 'रंधा धबधबा' पर्यटकांचे खास आकर्षण ठरले आहे. या ठिकाणी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असते. अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य लाभलेले हे अतिशय रम्य असे हे ठिकाण आहे. धबधब्याजवळच घोरपडा देवीचे मंदिर असून जवळच कोंदणी जलविद्युत केंद्र आहे. या ठिकाणी विद्युतनिर्मितीसाठी ९०० मीटर बोगदा खोदून नदीचा प्रवाह त्यात सोडून विद्युतनिर्मिती केली आहे. येथून १० कि. मी. वर भंडारदरा आहे. 



$$$$$
९. जीवधन किल्ला
हा किल्ला अतिशय जुना म्हणजे सुमारे २००० वर्षांपूर्वी बांधलेला असावा. या किल्ल्यावरील गजशिल्प पाहण्यासारखे आहे. एवढ्या उंचीवर असलेले पाण्याचे टाके प्रेक्षणिय आहे. हा किल्ला ३७५४ फूट उंचावर आहे. या किल्ल्यावर एक कोठी पहायला अनेक प्रेक्षक येतात. अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य लाभलेला हा परिसर असल्याने इतिहासातील अनेक रहस्ये या ठिकाणी आल्यावर लक्षात येतात.

१०. ऐतिहासिक गुहा -
हिवरगाव नजीक आढळा परिसरात डोंगरामध्ये गुराख्यांना एक खूप खोल अरुंद गुहा सापडली असून खूप दूरपर्यंत भुयार असण्याचे आढळून आले आहे. आढळा परिसर हा रामायण कालिन दंडकारण्याचा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात जटायू पक्षाचे समाधीस्थान आहे. अगस्ती ऋषींनी आगस्त्य बाण याच ठिकाणी दिला होता. या भुयारी मार्गाने प्रभू रामचंद्र पंचवटीला गेल्याचे दाखले पुराणात आहेत. या गुहेचे संशोधन करण्याची गरज आहे. आणखी माहिती यातून हाती लागण्याची शक्यता आहे. 
















$$$$$
५. श्रीरामपूर तालुका
 

१. केशव गोविंदबन -
बेलापूरपासून २ कि. मी. अंतरावर एक निसर्गरम्य स्थान आहे. या परिसराला 'बन' म्हणून ओळखतात. श्रावणात येथे मोठी यात्रा भरते. देवाच्या चौथऱ्यावर दरवर्षी अनेक विवाह येथे पार पडतात. प्रवरा नदीकाठी केशवगोविंदाचे मंदिर असून स्तंभरूपी मूर्तीच्या स्वरूपात दोन लाकडी शिवलिंग आहेत. या मंदिराजवळ स्वामी विद्यानंद सरस्वती यांची समाधी आहे.

२. श्रीरामपूर -
श्रीरामपूर हे बेलापूरचे रेल्वे स्टेशन. कालांतराने या ठिकाणी व्यापारी वसाहत निर्माण झाली. परिसरात अशोकनगर, लोणी व त्या काळात हरेगाव, टिळकनगर वगैरे साखर कारखाने असल्याने साखरेची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध. रेल्वे स्टेशनमुळे मोठी उलाढाल. समृद्ध परिसरामुळे बाजारपेठ विकसीत झाली. काळाराम मंदिर प्रसिद्ध आहे. येथे रामनवमी उत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा होतो.

३. वडाळा महादेव –
श्रीरामपूरजवळ नेवासा रोडवर वडाळा महादेव हे स्थान आहे. जुने शिवमंदिर प्रसिद्ध आहे.

४. हरेगाव
श्रीरामपूरपासून सुमारे ५ कि. मी. अंतरावर ख्रिश्चन धर्मियांचे धर्मस्थान आहे. येथे मतमाऊलीची फार मोठी यात्रा भरते. दरवर्षी ८ ते १२ सप्टेंबरपर्यंत धन्यकुमारी मारियाची यात्रा भरते. या उत्सवाला खूप दूर दूरचे ख्रिश्चन बांधव हजेरी लावतात. नवसाला पावणारी मतमाऊली म्हणून अनेकजण नवस फेडायला येतात.
महाराष्ट्र शेती महामंडळाची १०८४१ एकर शेती मूळ मालकांना मिळण्यासंदर्भात जोराचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक आंदोलने झाली असून शासनाने मूळ मालकांना ही शेती देण्याचे तत्त्वतः मान्य केले आहे. या शेतीमध्ये सध्या ऊसशेती, फलोद्यान, रोपवाटिका अशा पद्धतीने विविध पिके घेतली जातात.

$$$$$
५. सराला बेट -
'दक्षिण गंगा' गोदावरी काठी गंगागिरी महाराजांचे वास्तव्याने पुनीत झालेले 'सराला बेट' सर्वदूर परिचित आहे. गोदावरी बेटाच्या दोन्ही बाजूने वाहते. या ठिकाणी सतत कीर्तन, प्रवचन, हरिनाम सप्ताह असे उत्सव अखंडपणे चालू असतात. दरवर्षी महाराजांनी ठरविलेल्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात सप्ताहाचे आयोजन केले जाते. फार मोठ्या प्रमाणात भाविक या धार्मिक उत्सवात सहभागी होतात. काल्याच्या कीर्तनाला फार मोठ्या प्रमाणात अन्नदान भंडारा म्हणून दिले जाते. अनेक मोठमोठ्या व्यक्ती यथाशक्ती या भंडाऱ्यासाठी देणगी देतात. अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजली जातात. सध्या रामगिरी महाराजांच्या अधिपत्याखाली ही गादी चालविली जाते. गंगागिरी महाराजांच्या काळातील आख्यायिका भक्तगण सांगतात. बेटावर काल्याच्या कीर्तनानिमित्त अन्न शिजविण्याचे काम सुरू असते. गंगामाई दुथडी वाहत असल्याने बेटाचा सर्व बाजूंनी संपर्क तुटतो. अचानक तूप कमी पडल्याने धावाधाव होते. गंगागिरी महाराजांनी चिंता करू नका गंगामाईकडून उसने तूप आणा असा आदेश दिला जातो. भक्तगण रिकामे डबे घेऊन गंगामाईकडे जातात. डबे भरून घेताच साजूक तूप त्यात दिसते. मोठे संकट टळले जाते. पूर ओसरल्यावर गंगामाईकडून उसने घेतलेले तूप पुन्हा परत केले गेले. असे सिद्ध पुरुष गंगागिरी महाराजांच्या अनेक चमत्काराच्या कथा भाविक भक्तांकडून ऐकायला मिळतात. अनेक भक्तांचे हे बेट श्रद्धास्थान आहे.

६. कमालपूर
याला डोमेगाव म्हणूनही ओळखले जाते. गोदावरी काठी हे स्थान असून श्रीचक्रधर स्वामींचे चरित्र लिहिणारे माईमभट्ट व स्वतः चक्रधरस्वामींची या कमालपूरला भेट झाली. चक्रधरस्वामींचे प्रमुख स्थान येथे असून महानुभाव पंथीयांचे हे मोठे श्रद्धास्थान आहे. 
येथे शिखांचे पवित्र मंदिर असून दूरदूरचे शिखबांधव या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने दर्शनासाठी येत असतात. अनेक धार्मिक उत्सव येथे साजरे होतात.

७. दायमाबाद -
या गावाला इनामगाव म्हणूनही ओळखले जाते. शासनाने १९७४ साली अनेक ठिकाणी उत्खन्न करून अनेक जुन्या संस्कृतिची ओळख करून देण्यास मदत झाली. दायमाबादलासुद्धा अशा प्रकारचे उत्खन्न होऊन इ. स. पू. ३५०० ते ३०० या कालखंडातील ताम्रयुगातील अनेक अवशेष सापडले. यामध्ये हत्ती, गेंडा, रेडा, रथ वगैरे धातुंच्या खेळण्या सापडल्या हे मोहोजोदरो व हडप्पाचे समकालीन अवशेष समजले जातात. प्रवरा नदीला आलेल्या महापुरात हे पुरातन शहर गाडले गेले असावे.

$$$$$
८. वाकडी गावचे दैवत मल्हारी मार्तंड
श्रीरामपूरपासून थोड्या कि.मी. अंतरावर खंडोबाची वाकडी हे मल्हारी मार्तंडाचे देवस्थान प्रसिद्ध आहे. शिवमल्हार खंडेराय महाराज चंदनापुरी येथे बानूला आणण्यासाठी जेजुरीहून त्यांचे भक्त व १२ हजार सैन्य घेऊन भुलेश्वर मुक्कामी आले व पाचव्या मुक्कामी आले व पाचव्या मुक्कामी इ. स. १४२७ शके १३४९ चैत्र शु ।। १५ पौर्णिमेच्या दिवशी वाकडी मुक्कामी आले. देवाच्या सांगण्यावरून प्रधानाने नवरत्नांच्या झारीत बानूकडून चंदनापुरीहून पाणी आणले व देवाने प्रधानास सैन्यासह पुन्हा जेजुरीस जाण्यास सांगितले. तेव्हा सैन्य व प्रधान घोड्यावर बसून निघाले. घोड्याच्या माना वाकड्या झाल्या म्हणून तेव्हापासून गावाला वाकडी नाव पडले, अशी अख्यायिका येथील लोक सांगतात. चंपाष्टीला, चैत्र पौर्णिमेला लोक मोठ्या संख्येने दर्शनास येतात. देवाची पालखी मिरवतात. छबीना होतो मोठी यात्रा भरते.

















$$$$$
६. नेवासा तालुका

१. नेवासा -
नगर-औरंगाबाद महामार्गावर नगरपासून सुमारे ५६ कि. मी. अंतरावर श्रीक्षेत्र नेवासा हे पवित्र ठिकाण असून प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. नेवासा हे फार पुरातन असे शहर असून 'ग्रंथराज ज्ञानेश्वरी' चे जन्मस्थान म्हणून या गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नेवासा गावाचे महत्त्व महालया महात्म्यात खालीलप्रमाणे वर्णन केले आहे.

दक्षिणतटे पंचक्रोशात्मकंक्षेत्रं प्रवरा यत्र नदी शुभा ।
तथा पापहरा लोकविख्याता भक्तिमुक्तिदा तस्यास्तु निधीनिवासः ।।

यामध्ये 'निधीनिवासः' म्हणजे आजचे श्रीक्षेत्र नेवासा. मराठी सारस्वताचे एक अभिजात लेणे म्हणजे ज्ञानेश्वरी' मराठी मनाला सुखशांती, समृद्धी देणारा हा महान अद्भूत ग्रंथ. ज्या संन्याशांच्या पोरांना त्याकाळी लोकांनी जगणे मुश्किल केले होते. त्या समाजासाठी विश्वासाठी वयाच्या १२व्या वर्षी हा महान ग्रंथ नेवासा येथील श्रीकपेश्वर ऊर्फ श्रीवीरेश्वर मंदिरात एका खांबाला टेकून इ. स. १२३९ लिहून सर्व विश्वाला कल्याणासाठी परमेश्वराला 'पसायदान' ज्या खांबाला टेकून मागितले तो पवित्र खांब आजचा 'पैस' खांब. अलिकडेच पुरातन मंदिराच्या जागेवर आजचे भव्य ज्ञानेश्वर मंदिर ह.भ.प. बन्सीमहाराज तांबे यांचे प्रेरणेने बांधले. फाल्गुन व ।। ११ ते १३ ला येथे फार मोठी यात्रा भरते. दरवर्षी श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला जातो. येथून दरवर्षी आषाढी एकादशीसाठी येथून मोठी दिंडी निघते. येथून औरंगाबाद ५६ कि. मी. तर शनिशिंगणापूर २३ कि. मी. अंतरावर आहे. या तिर्थक्षेत्रासाठी विकास आराखडा मंजूर होऊन विकासकामे सुरू आहेत. सन १९७४ मध्ये करण्यात आलेल्या उत्खनन इ. स. पू. ३५०० ते २००-३०० या कालखंडातील ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे वसाहतीचे अवशेष सापडले आहेत. नेवासा परिसरात १ ।। लाख वर्षापूर्वीची मानवी वसाहत असावी असे तेथे झालेल्या संशोधनावरून स्पष्ट झाले आहे. इ. स. पू. ७०० मध्ये प्रवरा नदीला आलेल्या महापुरात ही मानव वसाहत पुन्हा गाडली गेली असावी असे अनुमान काढले जाते.

मोहिनीराज मंदिर – 
अतिप्राचीन काळी समुद्र मंथनातून प्राप्त झालेले 'अमृता'च्या वाटपावरून देव आणि दैत्यामध्ये वाद सुरू झाला. तेव्हा हे अमृत फक्त देवांनाच मिळण्यासाठी भगवान श्रीविष्णूंनी मोहिनीरूप धारण केले. अद्वितीय लावण्याने सारे असूर मोहीत झाले. त्यांनी अमृतकलश 
$$$$$
त्या लावण्यखणी त्रिभुवन सुंदरी मोहिनीने सर्व सूर असुरांना वाटावे अशी इच्छा व्यक्त केली. मोहिनीने प्रथम देवाच्या पंक्तीला अमृत वाटप करायला सुरुवात केली. त्याच वेळी 'राहू-केतू' दैत्यांनी रूप पालटून देवांच्या पंक्तीस बसून कपटाने अमृत मिळविले. मात्र चंद्र-सूर्याला हे कपट समजले. मोहिनी रूपातील भगवान विष्णूंनी अमृत प्राशन करण्यापूर्वीच सुदर्शन चक्राने त्यांना ठार केले. ती जागा म्हणजे 'नेवासा'.
आज मोहिनीराजाचे जे सुंदर दगडी मंदिर दिसते त्या ठिकाणी मोहिनी रूपातून मूळ रूपात येऊन आसुरांचा वध करून भगवान विष्णू प्रकट झाले. अहिल्याबाई होळकरांचे दिवाण 'चंद्रचूड' यांनी इ. स. १७७३ मध्ये त्यांनी केलेल्या नवसाची पूर्तीनिमित्त हे सुंदर मंदिर बांधले. माघ शु. १५ ते माघ व ॥ ५ या कालखंडात मोठी यात्रा भरते.

तुकाराम महाराज मंदिर –
ज्ञानेश्वर मंदिराजवळच श्रीसंत शिरोमणी तुकाराम महाराजांचे दुर्मिळ मंदिर नुकतेच बांधलेले आहे. वारकरी पंथाचे आधारवड म्हणून तुकाराम महाराजांच्या गाथेकडे पाहिले जाते. तुकाराम बिजेला येथे मोठी यात्रा भरते. 
पूर्वी नेवाशाची वस्ती लाडमोड टेकडीवर होती. पुढे नदीस महापूर आल्याने ती वस्ती दोन्ही काठावर वसली.

लाडमोड टेकडी – 
ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या पश्चिम बाजूला प्रवरा नदीच्या काठावर १९८५ साली पुराणवस्तू संशोधनासाठी जे उत्खन्न करण्यात आले. तेव्हा तेथे ६ कालखंडातील मानवी वसाहतीचे बहुमोल पुरावे प्राप्त झाले.
१. २ लाख वर्षांपूर्वीची गेंड्याची हाडे सापडली.
२. ५० हजार वर्षांपूर्वीची पाषाण युगातील मानवी हत्यारे, दगडी कुऱ्हाडी. 
३. इ. स. पू. १५०० ताम्र युगातील पुरावे.
४. इ. स. पू. ३रे शतक ते १ ले शतक सातवाहनकालीन अवशेष. 
५. सातवाहन काळाच्या उत्तरार्धातील इ. स. पू. १ ते ३ रे शतक काळ.
६. १४व्या १५ व्या शतकातील मुस्लिम राजवटीचे पुरावे.
अशा पद्धतीने वेगवेगळ्या कालखंडातील प्राचीन अवशेष सापडले. त्यापैकी काही महत्त्वाचे अवशेष भांडे, बांगड्या, खेळण्या, विटा मूर्ती अशा अहमदनगरच्या वस्तू संग्रहालयात जतन करून ठेवल्या आहेत. नदीच्या वेळोवेळी झालेल्या महापुरामुळे मानवी वसाहती गाडल्या गेल्याचे या उत्खननातून स्पष्ट होते. प्राचीन काळी येथे संपन्न संस्कृती होती याचे मिळालेले पुरावे साक्ष देतात. याच टेकडीवर महानुभाव पंथाचे प्रमुख संस्थापक 
$$$$$
चक्रधरस्वामी यांचे वास्तव्य होते. येथेच त्यांना आत्म साक्षात्कार झाला. तसेच नेवासे तालुक्यात १८ ठिकाणी त्यांनी जी प्रवचने केली त्याचा उल्लेख 'लिळाचरित्रात' आहे. चक्रधरांनी या टेकडीवर 'दिवाळी' साजरी केली होती.

२. नेवासा बुद्रुक 
या गावात फार पुरातन वसाहत आहे. या गावात अतिशय दुर्मिळ असे नारदाचे मंदिर आहे. देवगडच्या किसनगिरी महाराजांचे गुरु नाथबाबांची येथे भव्य समाधी मंदिर आहे. देवी म्हाळसा खंडेरायांच्या पत्नीचे माहेर म्हणून पुराणात उल्लेख आहे. म्हणून नेवासे हे फार महत्त्वाचे ठिकाण आहे. आपणास यामुळे लक्षात आले असेलच. 

३. बहिरवाड़ी
नेवाशाच्या उत्तरेला सुमारे ५ कि. मी. अंतरावर श्रीक्षेत्र बहिरवाडी हे भैरवनाथांचे प्राचीन स्थान आहे. भैरववाडीचे अपभ्रंश बहिरवाडी असे झाले. या ठिकाणी असलेल्या कुंडात राहुच्या मुखातून अमृत सांडले अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे प्रवरा नदीचे पाणी 'अमृत'मय झाले आहे. तिच्या काठावरील सर्व गावे तीर्थक्षेत्र आहेत. ज्या ठिकाणी राहुच्या मुखातून अमृत बाहेर पडले ते ज्या ठिकाणी प्रवरेच्या पाण्यात पडले तेथे कुंड निर्माण झाला आणि तेथे भैरवनाथ प्रकट झाले व त्यांनी खडकाच्या कपारीत हे अमृत त्याच ठिकाणी स्थिर केले अशी या अमृतकुंडाची आख्यायिका आहे. या कुंडात स्नान केले असता सर्व रोगराई जाते. भुतबाघा जाते अशी श्रद्धा आहे. पूर्वी भक्तांना नैवेद्याचा स्वयंपाक करताना कुंडातून भोजन तयार करण्यासाठी आपोआप भांडी वर येत असत व काम होताच परत कुंडात विसर्जित केले जायचे. परंतु कलियुगात मानवीबुद्धी भ्रष्ट झाल्याने काहींनी ही भांडी घरी नेली. तेव्हापासून भांडी यायचे बंद झाले.
अशीच दुसरी आख्यायिका सांगतात. पूर्वी मुंबईच्या एका व्यापाऱ्याला मूलबाळ होत नसल्याने बहिरवाडीस नवस करायला जा असा सल्ला त्याला मिळाला. त्याप्रमाणे त्याने येऊन दर्शन घेऊन संततीचा नवस केला. त्याची इच्छा फळाला आली. पुत्ररत्न झाले. नवस फेडायला आला तेव्हा त्याच्या मनात विकल्प आला. कुंडात पाळणा सोडला तर पाळणा नाहीसा झाला. शोक केला देवाची विनवणी केली पुन्हा त्यांना दुसरे मूल झाले. पुन्हा दर्शनाला आले. तेव्हा प्रसन्न मनाने पाळणा कुंडा जवळ सोडला तेव्हा पाळणा बुडाला नाही, तर अगोदरच्या मुलाचा काही दिवसांपूर्वी नाहीसा झालेला पाळणा त्या पाळण्यासोबत काठावर आला. दोन्ही बाळे सुखरूप मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेना असे अनेक चमत्कार येथे घडत असतात. म्हणून श्रद्धेने भक्तिभावाने नवस केला व सर्व भार कालभैरवावर सोपवून नितांत श्रद्धा ठेवली तर मनोवांछित कामना या ठिकाणी पूर्ण होतात, असा येथील परिसरातील भाविक भक्तांचा दावा आहे. 
$$$$$
पौष महिन्यात प्रत्येक रविवारी येथे मोठी यात्रा भरते. नगर, नेवासा, औरंगाबादहून जादा एस. टी. बसेसची व्यवस्था भाविकांसाठी केली जाते.
४. देवगड
नगर-औरंगाबाद महामार्गावर पश्चिमेला महामार्ग सोडून सुमारे ५ कि. मी. अंतरावर नगरपासून ५० कि. मी. वर तपस्वी किसनगिरी महाराजांनी निर्माण केलेले देवगड हे अतिशय निसर्ग सुंदर, रमणीय, स्वच्छ, शांत, पवित्र असे ठिकाण आहे. जवळून प्रवरा नदी शांतपणे वाहत असते. अशा पवित्र ठिकाणी तपस्वी किसनगिरी महाराजांनी देवगड हे दत्त महाराजांचे सुंदर असे स्थान निर्माण केले. किसनगिरी हे अशिक्षित, कोळी समाजाचे परंतु लहानपणापासून ते शिवभक्त म्हणून वावरत असत. त्यांनी त्या माळरानावर दत्त देवस्थान मंदिर बांधायचा संकल्प केला व तो अनेकांच्या लोकवर्गणीतून साकार केला. त्यांचे अनेक चमत्कार सांगितले जातात. एकदा ते पंढरपूरला जायला आपल्या साथीदाराबरोबर जाण्यासाठी निघाले. आपल्या लोकांना त्यांनी पुढे जा मी मागून येतो सांगितले. त्या दिवशी ते गेले नाहीत येथे जे भक्त होते ते सांगतात बाबा दिवसभर येथेच होते व पंढरपूरला गेलेले सांगतात बाबा दिवसभर पंढरपूरला आमच्या सोबत होते. असे अनेक चमत्कार त्यांनी करून दाखविले. अनेक दुःखी पिडीतांची दुःखे त्यांनी नाहीसी केली. म्हणून श्रद्धेने लोक देवगडला येतात. ते सिद्ध पुरूष होते.
दत्त जयंती उत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते. तसेच अनेक उत्सव वर्षभर येथे सुरू असतात. त्यांच्या पश्चात देवगड संस्थानचा कारभार ह.भ.प. भास्करगिरी महाराज आता पाहत आहेत.
देवगड हे जसे भक्तांचे श्रद्धास्थान आहे तसेच ते अतिशय सुंदर निसर्गाने नटलेले ठिकाण असल्याने पर्यटकही तेथे येत असतात. भक्तांना राहण्यासाठी येथे संस्थानतर्फे भक्तनिवास निर्माण केले आहे. त्यामुळे पर्यटकांची येथे निवासाची सोय झाली आहे. राज्य सरकारने आता या स्थळाला 'क' वर्ग तीर्थक्षेत्रात समाविष्ट केले आहे.

५. टोके 
येथून आषाढी एकादशीसाठी दरवषी मोठी दिंडी निघते. शिस्तबद्ध दिंडी म्हणून या दिंडीचा लौकिक आहे. प्रवरा नदी गोदावरीला जेथे मिळते त्या संगमाजवळ 'टोके' हे स्थान आहे. नगरपासून ७५ कि. मी. अंतरावर सिद्धेश्वर मंदिर आहे. पेशवेकालिन सुंदर घाट, मंदिरे, त्यावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. पेशवेकालिन धर्मकार्य करण्याचे ते पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध होते. नानासाहेब पेशव्यांचे रियासदार विष्णूपंत गजरे यांचे हे गाव. त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी या ठिकाणी अनेक वास्तू निर्माण केल्या.
सिद्धेश्वराचे शिवलिंग स्वयंभू आणि पुरातन असून रामायण काळातील आख्यायिका या ठिकाणचे लोक सांगतात. प्रभू रामचंद्र वनवासात असताना कपटी मारिच राक्षसाने 
$$$$$
सुवर्ण हरिणाचे मायावी रूप धारण करून सितामाईंना मोहात पाडले. तेव्हा या हरिणाला प्राप्त करण्याविषयी माईंनी इच्छा व्यक्त केल्यामुळे प्रभू रामचंद्रांना नाशिकच्या पंचवटीपासून त्याचा दूरपर्यंत पाठलाग करावा लागला. जिवंत मिळत नाही म्हणून एक बाण मारला. परंतु तो त्याने चातुर्याने चुकविला. तेव्हा दुसरा बाण नेवासा बुद्रुक जवळ 'बाणगंगा' या ठिकाणावरून मारला तो बाण लागल्याने त्याचे डोके तुटून पडले ते स्थान 'डोके' याचा अपभ्रंश होऊन 'टोके' हे नाव पडले आणि धड जेथे पडले ते 'कायागाव'चे अपभ्रंश 'कायगाव'.
दुसरी कथा सांगतात पांडव कालातील पांडव वनवासाला असताना त्यांचे टोक्याला वास्तव्य होते. त्यावेळी त्यांनी शिवलिंगाची स्थापना करून एक मंदिर या ठिकाणी बांधले. या ठिकाणी तपश्चर्या व यज्ञ केल्याचा पुराणात उल्लेख आहे.
पेशवेकाळात येथे ८ दगडी घाट बांधण्यात आले. अनेक देवदेवतांच्या मूर्तीचे शिल्पकाम, ५ फुट नंदी, भव्य दगडी सभामंडप, भव्य कोट, भव्य नगारखाना, १२ शिवालये, प्रति १२ ज्योतिर्लिंगे, दक्षिण काशी म्हणून या स्थानाचे महत्त्व आहे. सध्या येथे बालब्रह्मचारी महाराजांनी वास्तव्य करून या सुंदर बेटाचे नंदनवन केले आहे. सुंदर बगीचा, दुर्मिळ वनौषधी वाटिका, त्रिकाल आरती व दर सोमवारी महाभिषेक होतो. महाशिवरात्रीला येथे फार मोठी यात्रा भरते. 'ज्याने नाही केली काशी त्याने यावे सिद्धेश्वराशी'. हे स्थान नेवाशापासून १५ कि. मी. अंतरावर आहे आणि प्रवरासंगमपासून २ कि. मी. नगर-औरंगाबाद मुख्य रस्त्यापासून १ कि. मी. अंतरावर आहे.

६. वरखेड
गोदावरी काठी राज्यातील हजारो भाविकांचे कुलदैवत असलेली वरखेडची लक्ष्मीआई नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे. लक्ष्मी आईचे माहेर पैठण असून सासर वरखेड आहे. यात्रेच्या वेळी देवीची पालखी पैठणवरून वरखेडला येते. पैठणहून या पालखीला पैठणकर अजूनही निरोप देतात. वरखेडला हनुमान मंदिराजवळ तिचे भव्य स्वागत केले जाते. चैत्र पंचमीला देवीची मोठी यात्रा भरते. मुलबाळ नसणारे देवीला नवस करायला येतात व अपत्य प्राप्तीनंतर नवस फेडायलाही येतात. महाराष्ट्रातून भिल्ल, आदिवासी व पोतराज विशेष करून या यात्रेचे औचित्य साधून एकत्र येतात.

७. शिरसगाव
नेवाशापासून सुमारे २५ कि. मी. अंतरावर येथे जगदंबा देवीचे जागृत स्थान प्रसिद्ध आहे. सुमारे ४०० वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी बारव खोदताना ग्रामस्थांना शेंदराने माखलेला देवीचा तांदळा सापडला. त्यावेळी खोदकाम करताना पाचजण मृत्यूमुखी पडले. 
$$$$$
त्यांच्या समाध्या देवी मंदिर परिसरात आजही आहेत. त्यावेळी ग्रामस्थांनी २१ खणी मंदिर बांधले. मंदिरात मूर्तीची स्थापना एक पुरुष खोलवर केलेली आहे. गावात दोन मजली इमारत बांधीत नाहीत. व्यसनमुक्ती कार्यक्रम येथे राबविला जातो. चैत्री पौर्णिमेला फार मोठी यात्रा भरते. 

८. भानसहिवरा 
भानसहिवरा हे ऐतिहासिक प्रसिद्ध ठिकाण असून येथील गढ़ी इतिहासाची साक्ष देते. हे गाव मुसलमान आमदानीत 'कविजंग' यास जहागीर म्हणून दिलेले होते. कविजंगने गावच्या संरक्षणासाठी फार मोठी गढी बांधली.

९. कुकाणा
नेवासा- शेवगाव मार्गावर कुकाणा व्यापारी पेठेचे मोठे गाव असून येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले 'हजरत न्यामत शहावलीबाबा'चे पिराचे स्थान बस स्टँडजवळच आहे. बाबांचा उरूस वप्रसिद्ध हंगामा येथे दरवर्षी दीपावलीनंतर येणाऱ्या अमावस्येनंतरच्या गुरुवारपासून तीन दिवस हा उत्सव असतो. बाबांना स्नानासाठी व वरखेडहून गंगेचे पाणी कावडीने आणून स्नान घालतात. हजारो भाविक श्रद्धेने दर्शनासाठी व नवसासाठी येतात. बाबांना स्नान घालण्याचा मान हिंदूंना आहे. रात्री दारूकामाची भव्य आतषबाजी पहायला मिळते. यात्रेत करमणुकीसाठी अनेक लोकनाट्य तमाशा फड येतात. तिसऱ्या दिवशी दूरदूरचे मल्ल कुस्तीसाठी येतात. हिंदू-मुस्लिम एकत्रित हा यात्रा उत्सव प्रेमाने साजरा करतात.

१०. तरवडी
कुकाण्याजवळ उत्तरेला १ कि. मी. अंतरावर 'दीनमित्र'कार मुकुंदराव पाटलांचे गाव. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून बहुजन समाज धार्मिक रूढी, परंपरा, अंधश्रद्धापासून जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विचारांची परंपरा ‘दीनमित्र' हे वृत्तपत्रातून १९१० ते १९६७ या कालखंडात सातत्याने प्रकाशित करण्याचे बहुमोल कार्य तरवडी गावातून केले. त्यांनी स्वतः काव्य, कादंबऱ्या, कथा, अग्रलेखातून आणि 'आसुडाचे फटके' या सदरातून अनिष्ट प्रथेविरुद्ध इंग्रजांच्या धोरणाविरुद्ध प्रखरपणे लिहिले. भारतातील ते पहिले ग्रामीण पत्रकार म्हणून संबोधले जातात. ४ डिसेंबर १९६७ मुकुंदराव पाटलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या कार्याची ओळख होण्यासाठी १९९० साली 'दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती'ने बहुमोल काम केले. स्मारक 
$$$$$
मुलींसाठी माध्यमिक विद्यालय, वाचनालय, गरीब मुलांसाठी वसतिगृह वगैरे कार्य केले. भाई माधवराव बागल यांनी मुकुंदरावाबद्दल जे उद्गार काढले ते फार मोलाचे आहे. ते म्हणतात, "मुकुंदराव पाटील म्हणजे बहुजन समाजाचे शिल्पकार तरवडीला मुकुंदरावांची भेट घेण्यासाठी भाई माधवराव बागल, आचार्य अत्रे, शंकरराव मोरे, बाळासाहेब भारदे, यशवंतराव चव्हाण, संत तुकडोजी महाराज वगैरे मान्यवर मंडळींनी समक्ष येऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

११. देडगाव
नगरपासून सुमारे ५५ कि. मी. अंतरावर 'देडगाव' येथे प्रसिद्ध बालाजीचे मंदिर अलिकडेच निर्माण झालेले आहे. अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.

१२. रांजणगाव
नेवासा-शेवगाव रस्त्यावरील भानसहिवरे गावापासून दक्षिणेला तीन कि. मी. अंतरावर रांजणगाव हे देवीचे रांजणगाव म्हणून प्रसिद्ध आहे. तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुकामाता व वणीची सप्तशृंगी या तिन्ही देवींचा त्रिवेणी येथे आहे. तुळजापूरहून तुळजाभवानीचा तांदळा आणून येथे स्थापित केला आहे. जुने दगडी मंदिर आणि भव्य दीपमाळ आहे. गावच्या पेहेरे कुटुंबीयांना पुजेचा मान आहे. जवळच रेणुकामाता मंदिर, सप्तशृंगीमाता मंदिर आहे. यांचा पुजेचा मान धुमाळ कुटुंबीयांना आहे. नवरात्रात येथे भाविकांची फार मोठी गर्दी होते.

१३. त्रिवेणीश्वर 
नेवाशापासून सुमारे पाच कि. मी. अंतरावर नगर-औरंगाबाद महामार्गावर सुरेशनगरजवळ त्रिवेणीश्वर स्वयंभू महादेवाचे जागृत स्थान आहे. याची अख्यायिका अशी सांगतात की, प्रभू रामचंद्र वनवास काळात त्यांनी या ठिकाणी मुक्काम केला होता. त्यावेळी त्यांनी शिवपिंडीची स्थापना करून त्यांनी येथे पूजा केली. तेथे तीन लहान नद्या आहेत. संगमावर हे स्थान असल्याने 'त्रिवेणीश्वर' या नावाने स्थानाची ओळख होते. अतिशय निसर्गसुंदर परिसर आहे. वर्षभर येथे अनेक समाजोपयोगी प्रकल्प सुरू असतात. प्रवेशद्वारावर सुंदर कमान असून संकल्प गणेश मंदिर, दक्षिणमुखी मारुती, शनि मंदिर, अन्नपूर्णामाता मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर अशी मंदिरे आहे. वड, पिंपळ, उंबर एकत्रित असल्याने याला मनोभावे प्रदक्षिा घातल्यास मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला येथे फार मोठी यात्रा भरते. 
$$$$$
१४. श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर 
नगर-औरंगाबाद रस्त्याने घोडेगावजवळ नगरपासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर हे अद्भूत असे शनि भगवानांचे स्थान आहे. जगाच्या पाठीवर घरांना दरवाजे नसलेले हे बहुदा एकमेव गाव असावे. शनि भगवानांची मूर्ती म्हणजे शिळा रूपात उघड्यावर चौथऱ्यावर स्थापलेली आहे. त्याबाबत आख्यायिका सांगतात.
सुमारे ३५० वर्षांपूर्वी या परिसरात घनघोर पाऊस झाला. त्यावेळचे गाव २५ ३० झोपड्या असलेले छोटेवस्ती वजा होते. त्या गावाजवळून पानसनाला वाहतो. त्याला मोठा महापूर आला. त्या महापुरातच गावाजवळ एक दगडी शिळेसारखी मूर्ती वाहन येऊन ओढ्याच्या कडेला असलेल्या एका बोरीच्या झाडाला अडकली. पूर ओसरल्यावर गावातील गुराखी मुले जनावरे चारण्याला ओढ्याच्या कडेने जात असताना त्यांना ही बोरीच्या झाडाला अडकलेली मूर्ती दिसली. गुराखी मुले भोवती गोळा होऊन मूर्ती न्याहाळू लागली. एकाने सहज आपल्या काठीने त्या मूर्तीला डिवचले आणि काय आश्चर्य त्या मूर्तीतून रक्तस्त्राव होऊ लागला. दगडी मूर्तीतून रक्तस्त्राव होऊ लागल्याने मुले खूप घाबरली गुरे सोडून गावाकडे ही वार्ता सांगायला धावली. हा हा म्हणता सारा गाव तिथे गोळा झाला. सर्व गाव आचंबित झाला. पाहता पाहता संध्याकाळ झाली तशी मंडळी गावाकडे परतली. गावातील एका भक्ताला दृष्टांत झाला की मी शनिदेव असून मला तुम्ही गावात न्या आणि माझी स्थापना करा. त्याप्रमाणे सर्व तयारीनिशी गावकरी गेले. आदल्या दिवशी अनेक गावकऱ्यांना न उचलणारी मूर्ती त्या दोन्ही मामाभाच्यांनी बैलगाडीत ठेवलेल्या बोराटीच्या काट्यावर सहजपणे उचलून ठेवली. सर्व गावकरी हर्षभराने मिरवीत गावात चालले. ज्या भक्ताला दोन वेळा दृष्टांत झाला त्याचे घर काही अंतरावर होते.. त्याची इच्छा होती आपल्या घराजवळ मूर्तीची स्थापना व्हावी परंतु परमेश्वरी इच्छा तशी नव्हती. सध्या मूर्ती आहे त्यापुढे बैलगाडी तसूभरही पुढे सरकेना. बरेच प्रयत्न केले तरी गाडी पुढे नेता येईना. अखेर त्याच ठिकाणी त्या मूर्तीची स्थापना करावी लागली. हळूहळू परिसरातील लोक भक्तिभावाने येऊन तेथे सेवा करू लागले. भक्तांना सतत दर्शन घेता यावे म्हणून गावातील घरांना सुद्धा दरवाजे नाहीत. तेथे चोरी होत नाही म्हणूनच भक्तगण म्हणतात, 'देव आहे, पण देऊळ नाही, घरे आहेत पण दरवाजे नाहीत' कदाचित भक्तांच्या मदतीला धावून जाता यावे म्हणून, भक्तांचे रक्षण करण्यासाठी जणू भगवान शनिदेव जागता पहारा देत आहे.
साडेसाती काळात भक्तांनी शनिदेवाच्या चरणी लिन होण्यासाठी आवश्य या ठिकाणी यावे व साडेसाती काळात आपल्या सोईने २३ हजार महामंत्राचा जप केल्यास साडेसातीची तीव्रता पुष्कळ कमी होते तो महामंत्र खालीलप्रमाणे- 

ॐ निलंजन समाभासम्। रविपुत्रम् यमाग्रजम् ।
छाया मार्तंड सम्भूतम् तम् नमामि शनैश्चरम् ॥ 

$$$$$
जप करताना शुद्ध सात्विक भोजन, ब्रह्मचर्य, चटईवर बसून एकाच स्थानी हा जप करणे आवश्यक आहे. शनिग्रहाचे 'नीलमणि' हे रत्न पारखून आणून सुचीभूत होऊन मधल्या बोटात शुभदिनी वापरण्यास सुरूवात करावी. या पद्धतीने भगवान शनिदेवांची मनोभावे सेवा केल्यास शनिदेवाची कृपादृष्टी होते.
पुजा साहित्य- रुईचे पान, फुलहार, दीपक, अगरबत्ती, गोडेतेल किंवा मोहरीचे - तेल, त्या ऋतुतले फळ, पवित्र नदीचे पाणी, नारळ, घोड्याचा नाल, लवंग, विलायची, पान, सुपारी, कापूर, उडीद, नैवेद्य, तेलात तळलेल्या पुऱ्या यापैकी यथा शक्ति कोणत्याही वस्तू अर्पण केल्या तरी चालतात. सर्वच वस्तू अर्पण करायला पाहिजेत असा अट्टाहास नाही.
पुजा कशी करावी - फक्त पुरुष भक्तांनीच ओल्या पंचाने चौथऱ्यावर दर्शनासाठी जावे. डोक्यावरील टोपी काढूनच दर्शन करावे. महिलांनी शुद्ध स्नानानंतर चौथऱ्याच्या खाली राहूनच दर्शन घ्यावे व खालूनच पूजा साहित्य अर्पण करावे. एखादे नवीन शुभ कार्यारंभ करीत असाल किंवा करणार असाल तर शनिदर्शन, अभिषेक, जप, सौरसुक्त पाठ, रविकवच, त्रिसंध्या विधी, गायत्री मंत्रजप, सत्यदेवपूजा, गणेश याग, विष्णूसहस्त्र नाम यापैकी यथा शक्ती आपणास जो विधी अथवा पूजा, जप, पठण, विधी करणे शक्य असेल ते करावे, कार्यसिद्धी, मनःशांती मिळते.
शनि अमावस्या उत्सव दर शनि अमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. त्यावेळी लाखो भक्त पर्वणी काळात दर्शनाचा लाभ घेतात. या दिवशी सूर्यदेव तिन्ही लोक प्रकाशित करून चंद्रासह प्रसन्न असतो म्हणून शनिदर्शन विशेष फलदायी असते.
शनि जयंती शनि महाराजांचा जन्म दिवस वैशाख अमावस्येला असतो. या - दिवशी शनिमूर्ती नीळसर भासते. या दिवशी देवस्थानच्या वतीने 'सामाजिक सेवा' वेगवेगळी शिबिरे घेतली जातात.
गुढीपाडवा - हा दिवस नववर्षारंभ दिन असल्याने या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ दिवस असल्याने संकट निवारणासाठी अनेक भक्तगण या सोहळ्यात शनिदर्शनाचा लाभ घेतात. या दिवशी गंगोदकाने शनिभगवानांना स्नान घातले जाते. या दिवशी शनिशिंगणापूरचा प्रत्येक घरातील किमान एकजण भक्तिभाव जोपासून कावडीच्या मंगलउदकाने शनि भगवानांना स्नान घालतो. हा सोहळा पाहण्यासाठी व शनिदर्शनाचा लाभ घेण्यासाठी अनेक भक्त या दिवशी हजेरी लावतात. याशिवाय नाथषष्टीला पायी दिंडी सोहळा शनिशिंगणापूर ते पैठण आषाढी एकादशीनिमित्त शिंगणापूर-पंढरपूर पायी दिंडी सोहळा दरवर्षी चैत्र शु।। १० ते वद्य १ ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम सप्ताह, हरिकीर्तन सोहळा संपन्न होत असतो. ज्या वर्षी पुनर्वसू नक्षत्रापर्यंत पाऊस न पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. त्यावर्षी देवाला कौल लावून पाऊस पडेल काय याचा 

$$$$$
विधी केला जातो. त्याला 'शिते लावणे' म्हणतात. त्यावेळी लाखोंच्या संख्येने भक्तगण शनिदरबारात हजर राहून हा .अद्भूत सोहळा पाहतात.
मार्ग - अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावर घोडेगावपासून पश्चिमेला ५ कि. मी. अंतरावर राज्यमार्ग क्र. ६०. अहमदनगर-मनमाड रस्त्यावर राज्यमार्ग क्र. १०. राहुरीपासून ३२ कि. मी. अंतरावर (सोनई मार्गाने) एस. टी. महामंडळ यात्रेच्या वेळी नगर, राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव येथून जादा गाड्या सोडतात.

१५. सोनई
अहमदनगरपासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर सोनई पुरातन गाव आहे. गावाला सोनई नाव कसे पडले याची स्थानिक लोक अख्यायिका सांगतात. नाथपंथाचे गुरू मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात गेले असता त्यांचे शिष्य गोरक्षनाथ यांनी आपल्या प्रयत्नांची शर्थ करून स्त्री राज्यातून आपल्या गुरूंना तीर्थयात्रेच्या निमित्ताने बाहेर काढले. गुरू मच्छिंद्रनाथांना स्त्री राज्यातून बाहेर पडताना राणीसाहेबांनी सोन्याची वीट भेट म्हणून झोळीत दिली. प्रवासात अंधार पडू लागल्यावर गुरू-शिष्यांना म्हणाले, “यहाँ कोई डर है' तेव्हा अंतर्ज्ञानाने शिष्याने प्रकार ओळखून गुरूची मोहातून सुटका करण्यासाठी सोन्याची वीट रस्त्यात टाकून देऊन त्या ऐवजी त्याच वजनाचा एक दगड झोळीत टाकून पुढील प्रवास सुरू केला. गुरूंचा पुन्हा प्रश्न 'यहाँ कोई डर है' शिष्यांनी सांगितले. 'डर तो पिछे रह गया, अब कोई डर नही है' अशा पद्धतीने ज्या गावात सोन्याची वीट टाकली होती ते गाव सोनई. या गावात पुरातन बालाजी मंदिर आहे. चैत्री पौर्णिमेला तेथे उत्सव होतो. तिरूपती बालाजी देवस्थानाकडून पूर्वी येथे मदत मिळत असे. असे जुने लोक सांगतात. हेमाडपंथी पुरातन शिवमंदिर असून त्यास तीन लिंग आहेत. तीन लिंग असलेले शिवमंदिर दुर्मिळ ठिकाणी पहायला मिळते. जवळच पश्चिमेला सुमारे तीन कि. मी. वर रेणुकादेवीचे अतिशय सुंदर असे आकर्षक बिलोरी काचेचे रेणुकामातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. वै. हरिहरानंद महाराजांच्या परिश्रमातून मातेच्या कृपाशीर्वादाने हे मंदिर साकारले आहे. श्रीक्षेत्र रेणुकामाता दरबारात अन्य देवतांची स्थापना केलेली आढळते. जलदेवता, सहयोगिनी, काळभैरव, वेताळ, छाया, नागदेवता, चतुराई इत्यादी देवतांचीही येथे पूजा अर्चना होत असते. येथे नवरात्रौत्सव, गुरूपौर्णिमा, वासंतिक, शारदीय नवरात्रौत्सव येथे मोठ्या भक्तीभावाने साजरे केले जातात. अनेक विधी याग येथे साजरे केले जातात. संस्कृत वेदाभ्यासासाठी वेदशाळा चालविली जाते. अनेक बुद्धीमान विद्यार्थी येथे वेद, संगीत, कला व वाद्यांचे शिक्षण घेत आहेत.


$$$$$
उत्तर भारतातून ४०० वर्षांपूर्वी तीन योगी फिरत फिरत दक्षिणेकडे आले. त्यापैकी एक जोगींदर महाराज सोनईला माळ्याच्या वस्तीवर थांबले. त्यांची कीर्ती परिसरात पसरू लागली. ते अनेक आजारांना आपल्या सामर्थ्याने बरे करीत. ते सिद्ध पुरुष होते. त्यामुळे त्यांच्याकडे पिडीतांची गर्दी होत असे. गावचे त्यावेळचे गडाख पोलिस पाटील संतान नसल्याने दुःखी होते. ते ही त्यांच्याकडे आपले दुःख घेऊन गेले. त्यांना महाराजांनी आशीर्वाद दिला व आपल्याला संतान होतील. परंतु होणारे पहिले मूल मला शिष्य म्हणून आपण दिले पाहिजे अशी अट घातली. अट मान्य झाल्यावर गडाख पाटलांना संतान झाले. ठरल्याप्रमाणे पहिले मूल महाराजांना शिष्य म्हणून दिल्यामुळे त्यांचा खुंटलेला वंशवेल बहरला. महाराजांना जो पुत्र शिष्य म्हणून दिला त्याला महाराजांनी घरभारी होण्यास परवानगी दिली. आज 'पुरी' घराण्याची १३वी पिढी नांदत असून जोगींदर महाराजांचा मठ व त्यांचे समाधी मंदिर आजही अस्तित्वात आहे. अनेकांना महाराजांनी दृष्टांत दिला आहे. दर श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी मोठा उत्सव होतो. अनेक भक्तगण तेथे या उत्सवात आवर्जून सहभागी होऊन पावन प्रसादाचा लाभ घेतात. 

१६. खेडले परमानंद – 
सोनईपासून ५ कि. मी. आणि अहमदनगरपासून ४५ कि. मी. अंतरावर हे ऐतिहासीक स्थान आहे. सुमारे ४०० वर्षांपूर्वी उत्तर भारतातून तीन योगी दक्षिणेकडे येऊन ते तीन ठिकाणी स्थीर झाले. खेडले परमानंदमध्ये महंत परमानंद महाराज, मांजरीमध्ये महंत चंद्रगिरी महाराज आणि सोनईमध्ये महंत जोगींदर महाराज, खेडले परमानंदचे महंत परमानंद महाराज सिद्धपुरूष होते. परिसरातील अनेक गावातील गरिबांचे ते कैवारी होते. कोणत्याही प्रकारची अडचण त्यांच्या पुढे नेली तर त्याचे निवारण ते करीत. आर्थिक अडचण असली तरी ते सोडवत पैसे नेणारानेच पैसे कधी परत करणार हे ठरवून ते परत करायचे अशी त्यांची पद्धत असे. त्यामुळे मुदत संपताच परतफेड होत असे. कोणी नाठाळपणा केला तर त्याचीही ते दखल घेत. त्यांच्याकडे एक सोटा असे मुदत संपून परतफेड झाली नाही, तर तो सोटा त्याचा पाठलाग करीत असे आणि त्या धाकाने नाठाळ सुद्धा परतफेड करीत असत. असे अद्भुत चमत्कार परिसरातील जुनी मंडळी सांगतात. मुळा नदी किनारी आज भग्न अवस्थेत मोठा किल्ले वजा दोन कोट असलेला वाडा इतिहासाची साक्षीदार आहे. अहमदनगर पुराण वस्तू संशोधक श्री. सुरेश जोशी यांनी येथे भेट दिली असता त्यांनी अनेक फोटो घेऊन माहिती घेतली. जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. महाराजांची समाधी वाड्यात असून तो 'सोटा' समाधी शेजारी अजूनही पहायला मिळतो. त्यांचे वंशज वास्तूची देखभाल करीत आहेत. दरवर्षी महंत परमानंद महाराजांची यात्रा भरते. या ऐतिहासिक वास्तुची पडझड झाली असून त्याचा जीर्णोद्धार होणे आवश्यक आहे.

$$$$$
१७. प्रवरा संगम
प्रवरा व गोदावरी यांच्या संगमावर गौतमेश्वर, घाटेश्वर, संगमेश्वर ही मंदिरे आहेत. देव दैत्यांनी समुद्रमंथन करून जे अमृत मिळाले ते या ठिकाणी साठविण्यात आल्याची पौराणिक कथा आहे. त्या ठिकाणी एक मंदिर बांधण्यात आले. ते मंदिर घाटेश्वर म्हणून ओळखले जाते. 

१८. चांदा
घोडेगाव व कुकाणा मार्गावर चांदा हे धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. या गावात सर्व धर्म समभावसाठी लाभलेली चाँद सावलीबाबांची पुरातन गढ़ी (किल्ला) आहे. १८व्या शतकात गढीचे बांधकाम झाल्याची नोंद आहे. हिंदू मुस्लिमांचे हे श्रद्धास्थान असल्याने सर्व धार्मिय येथे दर्शनाला येतात. नवसाला पावणारी देवता म्हणून ओळख आहे. नाथ संप्रदायातील नाथांचे शिष्य चांदा बऱ्हाणपूर रोड लगत (खारिपीर) जानपीर येथे समाधिस्त झाले असल्याने येथे भाविक श्रद्धेने दर्शनासाठी जातात. गावाच्या पूर्वेस सोमेश्वराचे भव्य मंदिर उत्तराभिमुख असून आत दुसरे मंदिर पूर्वाभिमुख आहे. हे शिवलिंग स्वयंभू असून चतुर्मुखी आहे. पांढरे शुभ्र शिवलिंग महाराष्ट्रात दुर्मिळ आहे. जागृत देवस्थान असल्याने भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी असते. तसेच येथे ऐतिहासिक शिवकालीन वाडा येथे पहावयास मिळतो.











$$$$$
७. राहुरी तालुका

१. मानोरी
राहुरीपासून सुमारे १० कि. मी. ईशान्येला रेणुकादेवी जागृत स्थान असून अनेक भक्तांचे ते श्रद्धास्थान आहे. माहूरगडच्या देवीचे हे ठाणे असल्याचे सांगतात. अनेक भक्तांच्या नवसाला पावणारी ही रेणुकामाता असल्याने नवस फेडायला येथे भक्त येतात. नुकतेच मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम झाल्याने आता मंदिर भव्य व आकर्षक झाले आहे. दरवर्षी देवीची मोठी यात्रा भरते. नवरात्रात मोठा उत्सव होतो.

२. राहुरी
नगर-मनमाड महामार्गावरील नगरपासून सुमारे ४० कि. मी. उत्तरेला हे पुरातन शहर आहे. राहुरी हे आदिशक्ती तुळजाभवानीमातेचे माहेर समजले जाते. दरवर्षीच्या नवरात्रौत्सवासाठीची तयार केलेली पालखी येथूनच तुळजापूरला जाते असते. या पालखीला तेथील उत्सवात मोठा मान आहे. दरवर्षी गणेशोत्सवात या पालखीचा दांडा तुळजापूरहून राहुरीला आणला जातो. समाजातील विविध कारागिरांकडून पालखी तयार केली जाते. सजविली जाते. भाद्रपद शु।। १ ला ही पालखी राहुरीहून पूजाअर्चा करून सन्मानाने नेतात. तेथून तिसऱ्या माळेपर्यंत सुप्याहून बुऱ्हाणनगरला येते या पालखीला तेथे उत्सव होतो. जवळ जवळ ४० गावांचा प्रवास करून ती रेल्वेने सोलापूरमार्गे तुळजापूरला पोहोचती केली जाते. राहुरीला रेणुकामातेचे मंदिर, तिरूपती बालाजी प्रतिकृती मंदिर, खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे.
गावाला राहुरी नाव कसे पडले याची अख्यायिका सांगतात. पुराण काळात अमृत वाटपाचे वेळी राहू अमृत मिळण्यासाठी देवाच्या पंगतीत बसला ओळख पटताच त्याचा तेथे वध करण्यात आला. राहुच्या वधाचे ठिकाण म्हणून राहुरी नाव पडले. येथे खंडेरायाची फार मोठी यात्रा भरते. भक्त माणसांनी भरलेल्या १२ गाड्या आपल्या शेंडीने ओढतो हे पाहण्यासारखे आहे. तसेच तिरूपती बालाजीची प्रतिकृती असलेले भव्य तिरूपती मंदिर प्रेक्षणीय आहे. तेथे मोठा उत्सव होतो. येथे ख्रिस्ती बांधवांचे जुने चर्च असून नववर्षाला मोठा उत्सव होतो. 

३. कणगर -
राहुरीपासून सुमारे २० कि. मी. पश्चिमेला हे पुरातन गाव असून येथे गहिनीनाथांचा जन्म झाला आहे. येथे २००० वर्षापूर्वीचे अनेक मंदिराचे वास्तुंचे भन अवशेष पहायला मिळतात. येथे यादवकालीन बुबुळेश्वराचे मंदिर प्रेक्षणीय आहे. मंदिराची शिल्प कला अतिशय चांगली आहे. त्यामुळे त्या काळात शिल्पकला किती प्रगत होती याची साक्ष येथे पटते.
$$$$$
४. ताहाराबाद 
राहुरीपासून सुमारे १५ कि. मी. अंतरावर अनेक संतांचे चरित्रकार ह.भ.प. महिपती महाराजांचे समाधी मंदिर आहे. नुकतेच हे मंदिर बांधलेले असून अतिशय भव्य असा सभामंडप, पारायण व्यवस्था आहे. संत महिपती महाराजांनी अनेक संताची चरित्रे लिहिली. भक्तिविजय, तुलसीमहात्म्य, भक्ती लिलामृत, दत्तात्रय चरित्र, कथासार, गणेशपुराण, संतलिलामृत, संतविजय, पंढरीमहात्म्य, व्रतकथा, हरिविजय वगैरे ग्रंथ लिहिले. तसेच सुमारे २८४ महापुरूषांची चरित्रे त्यांनी लिहिली. महिपती महाराजांना संजीवन समाधीस्त ज्ञानेश्वर महाराजांनी अजानवृक्षाखाली प्रत्यक्ष दर्शन देऊन 'भगवतभक्तांचे वर्णन करणारी तुमची वाणी जगाला तारक होईल' असा आशीर्वाद त्यांनी दिला. पैठणचे एकनाथ महाराजांनीही त्यांना दर्शन दिल्याचा दाखला मिळतो. वयाच्या ७३व्या वर्षी त्यांना वारीत पंढरीला जाता न आल्याने प्रत्यक्ष पांडुरंगानी 'ताहाराबाद' ला येऊन दर्शन दिले. सध्या तिथे पांडुरंगाचे पुरातन मंदिर आहे. नाना महाराज वनकुटेकर हे महिपती महाराजांचे सहावे वंशज होते. त्यांनी महिपती महाराजांचे सोप्या भाषेत चरित्र लिहिले. महिपती महाराजांच्या आईचे नाव गंगाबाई, वडिलांचे दादोपंत कांबळे ते गावचे कुलकर्णी व ग्राम जोशी होते. महिपती महाराजांच्या पत्नीचे नाव सरस्वती त्यांची सासुरवाडी जामगाव, ता. पारनेर. सासरे श्रीधरपंत पोळ महाराजांना विठ्ठल व नारायण असे दोन पुत्र होते. त्यांचा 'चरित्रग्रंथ' श्री. महिपती महाराजांचे चरित्र, लेखक ह.भ.प. नाना महाराज वनकुटेकर, प्रकाशक ग्रामविकास प्रतिष्ठान, पृष्ठे ८३, मूल्य ५० रु. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी हा ग्रंथ आवश्य वाचावा.

५. महात्मा फुले कृषी विद्यापीठ
नगर-मनमाड महामार्गावर नगरपासून सुमारे ३० कि. मी. अंतरावर महात्मा फुले कृषि विद्यापीठ आहे. या विद्यापिठाच्या कार्यकक्षेत धुळे, जळगाव, नगर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर असे नऊ जिल्हे येतात. कृषिविषयक विशेष संशोधन, प्रयोग या ठिकाणी केले जातात. नवीन वाण येथे निर्माण होतात. पाणी व्यवस्थापन, रोपवाटिका, शेतकरी माहिती केंद्र, ग्रंथालय असून कृषि पदव्युत्तर महाविद्यालय येथे कार्यरत आहे. नुकताच विद्यापीठास उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार मिळाला आहे. विद्यापिठाची स्थापना १९६९ साली झाली आहे.


$$$$$
६. मुळा धरण 
नगरच्या उत्तरेला सुमारे २५ कि. मी. अंतरावर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असून 'ज्ञानेश्वर सागर' नावाने ओळखले जाते. याची पाणी साठवण क्षमता २६ द. ल. घनफूट एवढी आहे. परिसर अतिशय विलोभनीय असल्याने पर्यटक येथे मोठ्या संख्येने आकृष्ट होतात. भेट देणाऱ्यासाठी भव्य विश्रामगृह आहे. शासनाच्या महत्त्वाच्या गुप्त मिटींगा बहुदा येथे होतात. जवळच वन खात्याची बारागाव नांदूरला रोपवाटिका आहे. अहमदनगर शहर व अनेक गावांना, औद्योगिक वसाहतींना या धरणातून पिण्याचे पाणी पुरविले जाते. आठमाही शेतीसाठीही येथून पाणी मिळते. नुकतीच नेवासा, पाथर्डी, राहुरीच्या दुष्काळी भागाला तलाव भरण्याची योजना सुरू आहे. नगर जिल्ह्याचे 'संजीवनी केंद्र' म्हणून या धरणाकडे पाहिले जाते.

७. ब्राह्मणी 
सोनई-राहुरी मार्गावर सोनईपासून ८ व राहुरीपासून १२ कि. मी. वर ब्राह्मणी हे पुरातन गाव असून येथे बल्लाळआई मुक्ताई वरदायिनी ब्रह्मदायिनी ही आदिशक्ती तुळजाभवानीचे रूप समजले जाते. आदिशक्ती ही विद्युल्लते प्रमाणे मुक्त झाली आणि म्हणूनही 'मुक्ताई' अशी देवीमातेची ओळख आहे. बल्लाळआई पार्वतीमातेचे रूप समजले जाते. देवीचे मंदिर हेमाडपंथी असून येथे गोरक्षनाथाची सुंदर मूर्ती आहे. येथे ८ फुटी सतीस्तंभ, निद्रीस्त रेडा प्रसिद्ध आहे. येथून गर्भागिरी डोंगरापर्यंत गोरक्षनाथ गडापर्यंत भुयारी मार्ग आहे असे सांगतात. गावात घराला पांढरा रंग देत नाहीत. तसेच दुमजली इमारत बांधीत नाहीत. चैत्री पौर्णिमेला येथे भव्य यात्रा भरते. नवरात्रौत्सवातही मोठा उत्सव केला जातो. 

८. वांबोरी
अहमदनगरपासून सुमारे २८ कि. मी. अंतरावर बांबोरी घाटातून अहमदनगरला येता येते. या गावाला वांबोरी नाव कसे पडले याबाबतची अख्यायिका सांगतात. पुराणकाळात अमृत वाटपाचे वेळी राहुरीला सुदर्शन चक्राने राहूचा वध झाला. राहूचा डावा हात – वाम म्हणजे डावा व उरी म्हणजे खांदा. बांबोरीला तुटून पडला म्हणून गावाला 'वांबोरी' नाव पडले. वाल्मिकी ऋषींनी पुरातन बारवेजवळ बसून 'वाल्मिकी रामायण' लिहिले. वाम म्हणजे बारव पुरातन बारव अजूनही अस्तित्वात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ व पुरातन नगरपालिका होती हेमाडपंती खोलेश्वर मंदिर, जयरामस्वामी, विद्यारण्य स्वामींचा मठ येथे असून नव्याने स्वामी समर्थांचे सुंदर मंदिर येथे बांधलेले आहे. राहुरी तालुक्यातील प्रमुख गाव म्हणून ओळख.
$$$$$
९. देवळाली प्रवरा 
राहुरीपासून ५ कि. मी. अंतरावर हे पुरातन शहर आहे. समुद्र मंथनानंतर देवदानवामध्ये अमृताचे वाटप करताना देव ज्या ठिकाणी रांगेने बसले होते ते ठिकाण 'देवाची आळी' देवळाली अशी येथील आख्यायिका सांगितली जाते. एक व्यापारी पेठ असलेले शहर असून राहुरी साखर कारखाना यांच्या अगदी जवळ आहे.

१०. मांजरी 
राहुरीपासून सुमारे २५ कि. मी. अंतरावर हे गाव असून येथे महंत चंद्रगिरी महाराज हे सिद्ध पुरूष होऊन गेले. या महाराजांच्या कार्याचा प्रभाव या परिसरावर आहे. महाराजांचे अनेक संकेत अजून तिथे पाळले जातात. गावात काळा कपडा, छत्री, पलंग वापरीत नाहीत तसेच दुमजली इमारत येथे बांधीत नाहीत. चंद्रगिरी महाराजांची मोठी यात्रा भरते.

११. रोकडेश्वर मंदिर
मुळा धरणाच्या जवळ बारागाव नांदूरपासून पुढे थोडे डोंगरावर पुरातन कालिन दुर्लक्षित शिव मंदिर आहे. १९९६ साली बारागावचे शब्बीरभाई देशमुख या अपंग मुस्लिम गृहस्थाला दृष्टांत झाल्यावर डोंगरावर त्यांनी तीन भग्न पिंड, देवी पद्मावती, गणेशमूर्ती, नंदी, देवीपार्वती अशा मूर्त्या दिसल्या. त्या मूर्त्यांचे पूजन करून विसर्जन केले. नवीन मूर्त्यांची स्थापना करून सुंदर मंदिर बांधले. आता लोक श्रद्धेने या देवालयात दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो. 








 
$$$$$
८. नगर तालुका

अहमदनगर परिसर
१. विशाल गणपती
अहमदनगर शहरात प्रवेश केल्याबरोबर अगदी बस स्टैंडजवळ माळीवाडा वेशीजवळ विशाल गणपतीचे स्थान प्रसिद्ध आहे. अहमदनगर वासियांचे ग्रामदैवत असून नावाप्रमाणे गणपतीची मूर्ती विशाल म्हणजे ११ ॥ फूट उंचीची डोक्यावर पगडी, पूर्वाभिमुख, बैठक नेहमीच्या गणेशमूर्तीपेक्षा वेगळ्या पद्धतीची, उजव्या सोंडेचा असून नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध. त्यामुळे सतत गर्दी असते. शहरातील गणेशोत्सवात पहिला मान या गणपतीला दिला जातो. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून १९९३ पासून काम अद्याप सुरू आहे. आतापर्यंत २ कोटीच्या पुढे खर्च झाला असून मंदिराला तीन शिखरे असून मुख्य शिखर ७० फूट उंच आहे. अतिशय कलाकुसर असलेले हे मंदिर अहमदनगर शहराच्या वैभवात भर घालणारे आहे.

२. अमृतेश्वर मंदिर
बस स्टँडपासून सुमारे २ कि. मी. वर नवीपेठ मध्ये हे मंदिर असून याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी हे मंदिर बांधले. या मंदिरालगत सरकारवाड्यात शहाजीराजे रहात असत. नगरच्या स्वारीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य या मंदिराजवळ असल्याची इतिहासात नोंद आहे.

३. पारशी अग्री मंदिर 
अग्यारी, ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाजवळ पारशी धर्मीयांचे हे प्रार्थना मंदिर असून इ. स. १८४७ साली ही वास्तू बांधली असून तेव्हापासून आज तागायत येथे 'पवित्र अग्नी' येथे सतत पेटत ठेवलेला आहे. येथे पारशी धर्मियांचे धार्मिक विधी लग्न वगैरे समारंभ होतात. येथे प्रार्थना मंदिरालगत भव्य सभागृह असून येथे धार्मिक विधी होतात.

४. बंगाली बाबांचा दर्गा 
बंगालमधून इ. स. १४९५ साली एक मुस्लिम साधू नगरमध्ये वास्तव्य करून राहिला त्याने हा दर्गा बांधला. हा दर्गा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असून नवसाला पावणारा म्हणून सर्व धर्मिय लोक येथे दर्शनाला येतात. येथे जून महिन्यात मोठा उरूस भरतो. त्यावेळी मुसलमानाप्रमाणे अनेक धर्मिय येथे नवस फेडायला व दर्शनाला येतात.
$$$$$
५. रुमीखान मशीद
मंगलगेट परिसरात ही ऐतिहासिक मशीद पहायला मिळते. हिचे वैशिष्ट्य म्हणजे हिचे दगडी खांब थेट मक्केहून आणण्यात आले होते. ही मशिद रुमीखान याने सुमारे ४५० वर्षांपूर्वी बांधली. या मशिदीचे खांब प्रचंड मोठे ८ फूट उंच व ३ फूट घेर असलेले पाहून त्या काळात ते कसे आणले असतील याचे आजही आश्चर्य वाटते.

६. कोठला बारा इमाम 
मुसलमानात शिया व सुन्नी असे दोन पंथ अस्तित्वात आहेत. सुमारे ४५० वर्षांपूर्वी शियापंथीय 'मुसलमानांचे विद्यापीठ' म्हणून रूमी मशिदीजवळ ही वास्तू आहे. मोहरमच्या पहिल्या १० दिवसांत येथेच ताबूत बसतात. येथे जुन्या पवित्र तलवारी प्रदर्शित केल्या जातात. महंमद पैगंबरानंतर १२ धर्मगुरू होऊन गेले त्यांच्या स्मरणार्थ या भागाला '१२ इमाम कोठला' म्हणून संबोधले जाते. निजामशाहने शिया पंथाचा स्वीकार केल्यानंतर ही ऐतिहासिक वास्तू बांधून येथे धार्मिक विद्यापीठ सुरू केले होते. नगरच्या मोहरमला जसे महत्व आहे तसेच महत्व ईदलाही आहे. इराण इराकच्या सीमेवरील 'मशहद' येथून पैगंबराचे पवित्र केस सय्यद हुसेन शहा यांनी नगरला आणले. आता त्याची १७वी पिढी या केसाचे पावित्र्य राखण्याचे काम करीत आहे. 'तख्ती महेल' या ठिकाणी हे केस ठेवण्यात आले आहेत. वर्षातून एकदाच (ईदच्या दिवशी) हे केस दर्शनासाठी खुले केले जातात. मोगलकालीन लेखक मोहम्मद कासीम (फरीश्ता) यांच्या पुस्तकातही नगरच्या या पवित्र केसाबद्दल माहिती देण्यात आली आहे. तख्ती दरवाजा येथे दर्शनासाठी मोठी गर्दी होते. 'ईद-ए मिलाद' म्हणजे मोहम्मद पैगंबराची जयंती व पुण्यतिथी आहे. मात्र मुस्लिम बांधव जयंतीचा उत्सव साजरा करतात. गोड शेरणी, गोड जेवण करतात. दुपारची नमाज पठण झाल्यावर जुम्मा मशिदीकडे सर्वजण जातात. यतीमखान्यापासून झेंडा मिरवणूक सुरू होऊन तख्तीदरवाजा, भिंगारवाला चौक, एम. जी. रोड, मोची गल्ली, बेलदार गल्ली, झेंडीगेट, रामचंद्र खुंट, हातमपुरा, जुना मंगळवार बाजार, जुनी महापालिका मार्गे मिरवणूक पुन्हा तख्ती दरवाजाजवळ येऊन विसर्जित होते. मशहद येथून आणलेले पवित्र केसामधून काही केस काश्मिरच्या दर्ग्यात व अजमेरच्या दर्ग्यात नेण्यात आले ते केस सुद्धा भाविकांच्या दर्शनासाठी तिकडे नेल्याची माहिती शहा कादरी चिश्ती यांनी दिली.

७. व्ही. आर. डी. ई. 
अहमदनगरचे लष्कर हे भारतातील प्रमुख लष्कर दलापैकी एक आहे. नगर अरणगाव रस्त्यावर बस स्टँडपासून सुमारे ५-६ कि. मी. अंतरावर 'व्हेईकल रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट 

$$$$$
एस्टॉलिशमेंट' ही लष्करी विभागाची अग्रगण्य संस्था असून देशातील नव्या प्रकारच्या वाहनाला रस्त्यावर आणण्यापूर्वी प्रथम येथे आणले जाते व येथे त्याची चाचणी घेऊन व्यवस्थित वाटले तरच त्याला येथून परवानगी दिली जाते. असे हे महत्त्वाचे केंद्र आहे. येथे २१ प्रकारचे ट्रॅक आहेत त्यावर ही चाचणी घेतली जाते. वाहनाचा दर्जा, वाहनाची सुरक्षितता, वाहनाची क्षमता या संबंधात या चाचण्या असतात. लष्करासाठी लागणाऱ्या लढाऊ वाहनांचेही संशोधन येथे केले जाते. बुलेट प्रुफ वाहनांची निर्मिती या ठिकाणी केली जाते. भारतीय लष्करासाठी कोणतेही नवीन वाहन तयार झाले की, त्या वाहनाची अगोदर अहमदनगरच्या व्ही. आर. डी.ई. संस्थेत तपासणी केली जाते. तसेच कोणत्याही खाजगी कंपनीने विकसीत केलेले वाहनही पात्र होण्यासाठी येथे आणले जाते. वाहनांच्या चाचण्या घेण्यासाठी आशिया खंडात केवळ दोनच संस्था आहेत. एक टोकिओ (जपान), दुसरी अहमदनगर ६०० एकर क्षेत्रावर हे केंद्र कार्यरत आहे. तसेच युद्धकाळात सैन्याला जेवण देता यावे यासाठी फिरते स्वयंपाकगृह असलेले वाहन या संस्थेने तयार केले आहे.
ब्रिटिशांनी नगरला महत्वाचे मानले. १८०३ साली ब्रिटिश सेनापती ज. वेलल्सी नगरवर चालून आला व त्यावेळी ब्रिटिश आर्मी नगरमध्ये दाखल झाली. येथे रायफल रेंज विकसीत करण्यात आली. अश्व दलाला महत्व असल्याने येथील लष्करात उत्तमोत्तम घोड्याची पैदास होत होती. १९२४ मध्ये नगरला रॉयल टैंक कॉर्प्स स्कूलची स्थापना झाली. देशाच्या फाळणीचे वेळी सैन्य ६ तुकड्या पाकिस्तानला १२ तुकड्या भारताला मिळाल्या. लखनौ येथे स्थापना करण्यात आलेले लढाऊ वाहन प्रशिक्षण केंद्र तसेच ए. डी. डेपो व रेकॉर्ड या अस्थापना १९४८ मध्ये अहमदनगर येथे हालविण्यात आले. त्याचेच रूपांतर आर्मर्ड कॉर्स रेजिमेंटल सेंटर अॅण्ड स्कूल आणि ए. सी. रेकॉर्डस् या अस्थापनेत झाले. देशातील हे एकमेव रणगाडा प्रशिक्षण केंद्र आहे. विजयंता हा भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा अहमदनगर येथे समारंभपूर्वक दाखल झाला.

८. रणगाडा प्रशिक्षण केंद्र
अहमदनगरमधील लष्कराने उभे केलेले युद्ध स्मारक येथे पहायला मिळते. १९४८ मध्ये ही यंत्रणा येथे दाखल झाली. येथे रणगाड्याचे प्रशिक्षण दिले जाते. बा दलाला चिलखतीदल म्हणून ओळखतात. भारताच्या गौरव गाथेतील जनरल अरुण वैद्य काही काळ या विभागाचे प्रमुख म्हणून होते. १९५५ मध्ये रणगाड्याच्या सरावासाठी विळद जवळ के. के. रेंजची निर्मिती करण्यात आली. देशातील हे उत्कृष्ट सराव केंद्र आहे. आर्मर्ड कोअरच्या अस्थापनेत काम केलेले. १. कै. अरुण वैद्य २. जन के. सुंदरजी ३. राजेंद्रसिंह ४. शंकरराय चौधरी ५. जन शर्मा ६ जन. सुरेश जोशी ही सर्व पुढे आपल्या देशाचे सरसेनापती (लष्करप्रमुख) झाले ही आपल्या अहमदनगरसाठी केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे. एम. आय.आर.सी. २ एप्रिल १९७९ मध्ये यांत्रिक पायदळाचा जन्म झाला. यांत्रिक पायदळाला 
प्रशिक्षण देण्यासाठी अहमदनगर हे देशातील एकमेव प्रशिक्षण केंद्र आहे. २५०० एकर 
$$$$$
क्षेत्रावर हे केंद्र सध्या सुरू आहे.

९. रणगाडा संग्रहालय 
अहमदनगर-सोलापूर रस्त्यावर जुन्या बसस्थानकापासून ५ कि. मी. अंतरावर आशिया खंडातील एकमेव असे रणगाडा संग्रहालय सर्वासाठी पाहण्यासाठी १६ मे १९९४ पासून खुले करण्यात आले असून सकाळी ९ ते ५ या वेळात विनामूल्य पाहता येते. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, रशिया, इंग्लंड इ. देशातील निरनिराळ्या युद्धात वापरलेले रणगाडे येथे पहायला मिळतात. 'सिल्वर फॉक्स' हे चिलखती वाहन जे जालियनवाला युद्धात वापरण्यात आले होते ते ही येथे पहायला मिळते. पाण्यावर तरंगणारे रणगाडे, पुरलेले सुरूंग नष्ट करणारे रणगाडे, सैन्यासाठी रस्ता तयार करणारे रणगाडे, असे विविध प्रकारच्या कामगिया बजावणारे ४० चे वर रणगाडे येथे पहायला मिळतात. पाक युद्धात महत्वाचे काम बजावणारा 'पॅटर्न' रणगाडे ही येथे पहायला मिळतो. या सोबत काही रणगाड्यांची छायाचित्रे, लष्करी ध्वज, काही रणगाड्यांच्या प्रतिकृतीही येथे पहायला मिळतात. १९१७ सालचा सर्वात जुना रणगाडा 'रोल्स राईस' येथे पहायला मिळतो.

१०. अहमदनगर वस्तू संग्रहालय 
जुन्या बस स्टँडपासून सुमारे २ कि. मी. अंतरावर हे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आहे. श्री. सुरेश जोशी यांनी १ मे १९६० ला याची स्थापना केली. हे ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असून अतिशय जुने ५० हजाराहून अधिक दस्तऐवज, ताम्रपट, जुनी दुर्मिळ शस्त्रे, अनेक जुनी नाणी विविध जुन्या मूर्ती, जुन्या दुर्मिळ पोथ्या, नेवासे, जोर्वे, दायमाबाद येथे उत्खननात सापडलेल्या वस्तू येथे संग्रहीत केल्या आहेत. शिळा प्रेस, १७७५ साली तयार केलेली कड्याच्या देशमुख घराण्यातील २०० फूट लांबीची जन्म पत्रिका, उलट-सुलट वाचता येणारे रामकृष्ण काव्य, ताम्रपाषाणयुगातील दुर्मिळ भांडी, विविध प्रकारचे गणपती इत्यादी विविध वस्तू या संग्रहालयात पहायला मिळतात. सकाळी १० ते ५ या वेळात नाममात्र प्रवेश शुल्कात गुरुवार सुटी सोडून पाहता येते. संपर्कासाठी दूरध्वनी २३४४७६७, २४७११८२, ५६२२८९५. ०२४१

११. श्रीदत्त देवस्थान 
जुन्या बसस्थानकापासून ६ कि. मी. अंतरावर नगर-मनमाड रस्त्यालगत 'वेदांत' ही देखणी वस्तू पहायला मिळते. गुरूकुल पद्धतीने वेद विद्यादानाचे कार्य येथे सन १९८८ 
$$$$$
पासून सुरू आहे. येथे १०० विद्यार्थ्यांची सोय विनामूल्य केली जाते. 'गुरू दत्तात्रय' मंदिरात हातपाय धुवूनच दर्शन घ्यावे लागते. चारही पिठांच्या शंकराचार्यांनी या स्थानाला भेट दिलेली आहे. येथे दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, शंकराचार्य जयंती, सद्गुरू वर्धापन दिन इत्यादी उत्सव दरवर्षी साजरे केले जातात. अनेक पुस्तकांचे प्रकाशन संस्थेने केले असून भक्तगण परिसरात स्वतः फिरून देवस्थान साहित्याची बिक्री करून प्रसिद्धी देतात. ११ जुलै २००७ रोजी शंकराचार्य स्वामी भारती तीर्थ यांच्या हस्ते उत्तरायणात दत्त मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. भारतात दत्तात्रयाचं असं भव्य मंदिर एकमेव आहे. वेदांत वर्णनानुसार ही दत्तमूर्ती असून ब्रह्मा, विष्णू, महेश या शास्त्रशुद्ध क्रमाने ही सालंकृत ३ ।। फूट मूर्ती आहे. हे मंदिर १५७'×८७' व उंची ८७ आहे. पायऱ्या, शृंगार चौकी, अंतराळ व सभामंडप, गर्भगृह, प्रदक्षिणा मार्ग व कळस अशी रचना आहे. मंदिर सकाळी ७ ते १२ व दुपारी ३ नंतर दर्शनार्थ खुले। असते. पहाटे ५ वाजता अभिषेक व षोडशोपचार पुजा व त्रिकाळ आरती होते. गुरूपौर्णिमा, दत्त जयंती, गुरूदेव जयंती, आद्य शंकराचार्य जयंती हे मोठे उत्सव होतात. त्यावेळी मोठी गर्दी असते.

१२. स्नेहालय 
जुन्या बसस्थानकापासून ११ कि. मी. अंतरावर नगर-मनमाड रोडजवळ एम. आय. डी. सी. वसाहतीत 'स्नेहालय' हा एक समाजातील दुर्लक्षित घटकांचा विचार करून अतिशय प्रभावी असा उपक्रम येथे सन १९८९ पासून सुरू आहे. वेश्या, देवदासी यांच्या निराधार व उपेक्षित संततीच्या सर्वांगिण विकासासाठी ही संस्था काम करीत आहे. बळजबरीने वेश्या व्यवसायात लोटल्या गेलेल्या मुली, एड्ससारख्या व्याधीग्रस्त वेश्या यांनाही सावरण्याचा ही संस्था भरीव प्रयत्न करून समाजाच्या प्रवाहात उपेक्षित वर्गाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्यासाठी वसतिगृह, आधार वसाहत, उपचार केंद्र, संस्कार केंद्र, स्नेहाधार अशा वेगवेगळ्या विभागातून त्यांना सावरून नव्याने या व्यवसायात मुली येऊ नयेत यासाठीचे 'नॅकसेट' च्या मदतीने मोठी चळवळ उभी करून एक मोलाचे योगदान येथे चालू आहे. संपर्कासाठी दूरध्वनी ०२४१-२७७८३५३, २३४२३२२.

१३. साईबन
अहमदनगर-मनमाड रोडलगतच्या विळदघाटात जुन्या बस स्थानकापासून सुमारे १४ कि. मी. अंतरावर ओसाड, डोंगराळ भागात कल्पकतेने 'नंदनवन' बनलेले साईबन हे स्थळ म्हणजे नगरकरांचा निसर्गाचा मानबिंदू ठरला आहे. थुईथुई उडणारे कारंजे, घोड्यावर स्वार होण्याची मजा, मस्त बोटीत रमण्याचे ठिकाण, उन्हाळ्यातही गारवा देणारी हिरवाई 
$$$$$
आणि रूचकर स्वादीष्ट भोजनासाठी तत्परता असा सुंदर योग साईबनमध्ये अनुभवायला मिळतो. ठिबक सिंचन, साठवण बंधारे, पवनचक्की, ग्रीनहाऊस, स्टॉबेरीची उत्तम प्रकारची शेती सुंदर बगीचा, अनेक प्रकारची फुलझाडे पाहून मन साईबन सोडायला तयार होत नाही, असे हे नगरकरांसाठी खास पाहुण्यांना घेऊन दाखविण्योगे सहलस्वप्न पूर्तीचे अजोड ठिकाण सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. सुधा कांकरिया या जोडीने हे स्थळ निर्माण करून नगरवासियांना एक आनंद देणारे मोठे दालन खुले करून दिले आहे. संपर्कासाठी दूरध्वनी - ०२४१ २७७७४०२, २७७७६४७. 

१४. आनंदधाम
जुन्या बसस्थानकापासून अगदी १ कि. मी. अंतरावर यशवंतराव चव्हाण सभागृहापासून जवळच आनंदधाम हे राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराजांचे स्मारक येथे उभारलेले आहे. राष्ट्रसंत आनंदऋषी नगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी धार्मिक परीक्षा बोर्डात वास्तव्यास होते. शिराळ चिचोंडी (ता. पाथर्डी) येथे त्यांचा जन्म झाला. १३व्या वर्षी मिरी येथे त्यांनी जैन धर्माची दीक्षा घेतली. २८ मार्च १९९२ला आनंदऋषीजी महाराजांचे महानिर्वाण येथे झाले. अंतिमसंस्कार जेथे झाले त्या ठिकाणी 'आनंदधाम' साकारले आहे. या वास्तूचा आकार कमळाच्या आकाराचा असून मध्यभागी आनंदऋषींचा अस्थिकलश ठेवण्यात आला आहे. तेथे महाराजांच्या वापरातील वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. धार्मिक परीक्षा बोर्ड, ग्रंथालय आणि जवळच अद्ययावत रुग्णसेवेसाठी रुग्णालय आहे. येथे अल्पदरात अत्याधुनिक पद्धतीच्या उपकरणाद्वारे उपचार केले जातात.

१५. हुतात्मा स्मारक
जुन्या बसस्थानकापासून नगर-मनमाड रस्त्यावर ३ कि. मी. अंतरावर मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या माध्यमिक शाळेसमोर कोल्हापूरचे चौथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्मारक व समाधीस्थळ आपणास दिसते. ब्रिटीश राजवटीत १८८१ मध्ये महाराजांना नगरच्या भुईकोट किल्ल्यात स्थानबद्ध करून ठेवले होते. त्यावेळी त्यांचे वय अवघे २० वर्षांचे होते. त्यांच्यावर अतोनात जुलूम व छळ झाला. २५ डिसेंबर १८८३ त्यांचा त्यातच मृत्यू झाला. ज्या जागेवर त्यांचा अंत्यविधी झाला तेथे आज हे स्मारक उभारले आहे. जवळच खुले वाचनालय व स्वातंत्र्यसैनिकांचा स्तंभ उभारलेला आहे.

१६. मेहेराबाद 
जुन्या बसस्थानकापासून सुमारे ८ कि. मी. अंतरावर नगर-दौंड मार्गावर अरणगावजवळ अवतार मेहेरबाबांचे हे आश्रमस्थान आहे. सन १९२३ मध्ये बाबांनी हा 
$$$$$
आश्रम सुरू केला. १९२५ पासून बाबांनी मौनव्रत स्वीकारले. ३१ जानेवारी १९६९ ला त्यांनी देहत्याग केला. अखेरपर्यंत त्यांनी मौनव्रत चालू ठेवले होते. टेकडीवर त्यांची समाधी आहे. जवळच बाबांची कुटी आणि संग्रहालय आहे. त्यात त्यांच्या वापरातील अनेकवस्तू ठेवलेल्या दिसतात. संग्रहालय सकाळी १० ते ५ या वेळात पाहता येतात. बाबांचे शिलालेख परिसरात उभारलेले आजही पहायला मिळतात. दरवर्षी २५ फेब्रुवारी आणि ३१ जानेवारीला जयंती व पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. शांतीचा संदेश देणाऱ्या या थोर महात्म्याच्या उत्सवासाठी जगातून भक्त गण येतात. नगर-डोंगरगण रस्त्यावर पिंपळगाव तलावाजवळ बाबांचे आवडते ठिकाण 'मेहेराझाद' असून येथील टेकडी विशेष पवित्र मानली जाते. जगभरात बाबांचे लाखो भक्त आहेत. जवळ जवळ ३० देशांचे राष्ट्राध्यक्ष बाबांचे भक्त आहेत असे बोलले जाते. अमेरिके त मर्टला बीच येथे ५०० एकरावर बाबांचे केंद्र आहे. कॅलिफोर्निया येथे २०० एकर, ऑस्ट्रेलियात सिडनी जवळ मोठे केंद्र आहे. संपर्कासाठी दूरध्वनी - ०२४१-२५८४४८, २५४८७३५.

१७. चांदबिबीचा महाल 
जुन्या बसस्थानकापासून १२ कि. मी. अंतरावर नगर पाथर्डी रस्त्यालगत उंचावर हा अष्टकोनी महाल दूरवरून आपणास दिसतो. याची उंची ३०८० फूट असून महालाला तीन मजले आहेत. सलाबतखान याने आपल्या मृत्युनंतर या महालात दफन करण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार त्याची कबर या वास्तुच्या तळघरात आहे. सोबत पत्नीही कबर येथे आहे. वास्तुच्या आवारात दुसऱ्या पत्नीची व पाळीव कुत्र्याची कबर आहे. पायथ्याला वीरभद्र मंदिर आहे. जवळ छोटा तलाव व धबधबा आहे. निजाम काळात लष्कराच्या टेहळणीच्या दृष्टीने या वास्तुला विशेष महत्व होते. ब्रिटिश काळातही दुर्बिण महाल म्हणून ही वास्तू ओळखत व तसा उपयोग ब्रिटिश काळामध्ये होत होता.
वास्तुभोवतालचा परिसर अतिशय निसर्गरम्य असून पर्यटनासाठी हे एक आकर्षक असे केंद्र आहे. पर्यटनासाठी येथे हॉटेलची व्यवस्था आहे. वरपर्यंत डांबरी रस्ता तयार केलेला असून रात्रीच्या वेळी महालावर प्रकाशझोत टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

१८. भिंगार
अ.नगर शहरापासून जवळच नगर-पाथर्डी रस्त्यावर हे शहर असून नगर शहरा अगोदर हे वसलेले आहे. महानुभाव पंथाचे स्वामी चक्रधर हे या ठिकाणी वास्तव्य करून होते. टेकडीवर भृंगऋषींचा आश्रम आहे. यावरून गावाला भिंगार नाव पडले. शुक्लेश्वर मंदिर, बेलेश्वर मंदिर, रोकडोबा, दत्त मंदिर, कँपमध्ये राधाकृष्ण मंदिर आता लष्कराने अनेक उद्याने या ठिकाणी परिसरात निर्माण केली आहेत.

$$$$$
१९. पांजारपोळ 
गोसंवर्धनासाठी देशात निवडलेल्या १० संस्थेपैकी अहमदनगरची पांजारपोळ संस्था आहे. हिची स्थापना १८९४ मध्ये झाली. येथे जातीवंत गायींचे संगोपन करून दूध संकलन करून शहरात पाठविले जाते. महाराष्ट्रात गुळभेंडी या रूचकर हुरड्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हुरड्याच्या सीझनमध्ये दूरदूरचे लोक येथे हुरडा पार्टीसाठी आवर्जून येतात. येथे निर्भेळ दूध व फुलांची विक्री केली जाते. ही संस्था अरणगाव रस्त्यावर असून महाराष्ट्रात तीन ठिकाणी संस्थेची शेती आहे. दुष्काळी परिस्थितीत अनेक ठिकाणाहून गोसंगोपनासाठी मदत दिली जाते.

२०. बुऱ्हाणनगरची देवी 
अहमदनगरच्या जुन्या बसस्टँडपासून सुमारे ४.५ कि. मी. अंतराव बुन्हऱ्हाणनगरच्या देवीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. तुळजापूरच्या देवीचे हे जाज्वल्य ठाणे मानले जाते. या देवीच्या स्थापनेचा इतिहास मोठा रंजक आहे. सातवाहन कुलातील राजा संभुराय याला आपल्या राजधानीचा त्याग करावा लागल्याने त्याने आपल्यासोबत कुलस्वामीनी अंबाबाईची मूर्ती व सिंहासन नगर जवळच्या जंगलात सध्याचे बुऱ्हाणनगरला घेऊन आला. सातवाहन कुलातील शेवटचा राजा भीम याने संभुरायाचा पराभव करून देवीची मूर्ती त्याने आपल्या बरोबर नेली. सध्याचे मंदिर १९१३ मध्ये लहानू भगत याने बांधले. नुकताच मंदिराचा जीर्णोद्धार झाला. तेली समाजाचे भगत यांच्याकडे परंपरेने पुजेचा मान आहे. येथून तुळजापूरला पलंग वाजतगाजत नेला जातो. मूर्ती काळ्या गंडकी शिळेची असून समोर सिंहाची मूर्ती आणि तेलाचा घाणा आहे. नवरात्रौत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. भाविकांची या काळात प्रचंड गर्दी असते. तुळजाभवानी मातेचे बुऱ्हाणनगर माहेर आहे असे स्थानिक लोक म्हणतात. बुन्हाणनगरचे पुरातन नाव अंधेरी नगरी असे होते. या ठिकाणी पूर्वी तेलंगा राजा राज्य करीत होता. मूर्ती सुमारे ४०० वर्षांपूर्वीची असल्याचे मानले जाते. २८वी पिढी देवकर आडनावाने पुढे भगत आजही आहे. २९वी पिढीचे पुजारी विजय अर्जुन भगत हे आहेत. 
तेलंगा राजा कर्नाटकावर स्वारी करण्यासाठी गेले असता देवीची मूर्ती बरोबर घेऊन गेले होते. लढाईच्या वेळी मूर्ती चिंचपूर (सध्याचे तुळजापूर) येथे सुरक्षित ठेवली. लढाईत तेलंगा राजाचा अंत झाला. तुळजापूर येथे टेकडीवर आजही समाधी पहायला मिळते. बहामनी राजवटीत मूर्ती पुन्हा बुन्हाणनगरला आणली. नगरच्या निजामाला त्रास होऊ लागल्याने मूर्ती पुन्हा तुळजापूरला नेली. अफजलखानने तुळजापूरवर स्वारी केली त्यावेळी त्याच्या मदतीला पिराजी मोहिते, प्रतापराव मोटे, नाईक, पांढरे, घोरपडे, शिवाजी महाराजांचे चुलते मुबाजीराव भोसले सुद्धा होते. आदिशाही बेगमचा त्यांना तसा हुकूम होता. परंतु उत्तर काही सरदार गुपचूप व जनकोजी देवकर भगत यांनी पालखीत घालून मूर्ती पुन्हा बुन्हाणनगरला आणली. अफजल खानाच्या मृत्युनंतर मूर्ती पुन्हा तुळजापूरला नेण्यात आली. धामधुमीच्या काळात जानकोजीचे मन बुऱ्हाणनगरला रमेना. धंदा बसला 
$$$$$
परंतु त्याची देवीवर अपार श्रद्धा होती. एके दिवशी त्यांच्या स्वप्नात लहान मुलीच्या रूपात देवी त्याच्याकडे धावत आल्याचे त्याला दिसली आणि त्याने झोपेतच ये अंबिका ये अंबिका अशी हाक मारली परंतु त्याला लगेच जाग आली. रात्री स्वप्नात आलेल्या दृष्टांताप्रमाणे खरोखरच सकाळी गावात केस मोकळे सोडलेली असाध्य रोग झालेली मुलगी त्याच्या दाराजवळ आली. तेव्हा त्याला ही रात्री स्वप्नात आलेलीच मुलगी असल्याची खात्री झाली. ती अनाथ होती. जानकोजीने तिला घरात घेतले व मुलगी म्हणून सांभाळ केला. आजारावर उपचार केले. पुढे ती तेजस्वी, रूपवान दिसू लागली. तिचे नाव अंबिका असे ठेवले. तिने जानकोजीला तेल्याचा घाणा घेण्यास सांगितले. दिवस पालटले परिसरात तो मोठा व्यापारी म्हणून ओळखला जाऊ लागला. जानकोजीने आपली मानलेली मुलगी अनाथ नसून प्रत्यक्ष देवी असल्याचे त्याच्या लक्षात आले. अंबिकेच्या सौंदर्याची चर्चा बादशहापर्यंत गेली. बादशहाने तिला नेण्यासाठी सैन्य पाठविले. परंतु देवीने शाप दिला बुऱ्हाणनगर निर्मनुष्य होईल रोगराई होईल भक्त सोडून सर्व गाव सोडून निघून गेले. जानकोजी वेड्यासारखा झाला. तुळजापूरला जाऊन देवी पुढे करूणा भाकू लागला व कंटाळून जीव द्यायला निघाला असता अंबिका प्रकट झाली व म्हणाली तू पिढ्यानपिढ्या देवीची सेवा करशील तू पाठविलेल्या पलंगावर मी ५ दिवस निद्रा करीत जाईल. तेव्हापासून आजपर्यंत तुळजापूरला बुन्हाणनगरहून आलेल्या पलंगावर देवी निद्रा करीत असते. देवीने जानकोजी भगताला खरे रूप दाखविले व तेथेच लुप्त झाली. आज त्या ठिकाणी देवीचा देव्हारा आहे. १९९३ साली लहानू भिकू भगत (देवकर) याने आपली शेत जमीन विकून देवीचे मंदिर बांधले. त्याचा नातू अर्जुन किसन भगत याने नवीन सभामंडप बांधला व तेच आज पुजाव्यवस्था पाहतात. 

२१. ह्युमचर्च 
अहमदनगर शहरात मिशनरी ख्रिस्ती या मंडळींचा फार जुना वारसा आहे. ख्रिस्तगल्लीमध्ये धुम मेमोरियल चर्च १९०२ ते १९०६ मध्ये बांधले ही इमारत दगडी असून वरच्या बाजूला मनोऱ्याऐवजी घुमट आहे. घुमटाजवळ फार मोठी घंटा आहे.. या इमारतीवर रेखाटलेली कमळाची फुले फार सुंदर आहेत. सुमारे १३०० लोक प्रार्थनेला बसू शकतील एवढी ही इमारत ओ. १८४२ मध्ये सुरू केलेले ज्ञानोदय नियतकालिक आजतागायत सुरू आहे. नगरमध्ये १८३१ मध्ये अमेरिकन मिशनने आपले कार्य सुरू केले. 
$$$$$
नगर शहर हे भारतीय ख्रिस्ती समाजात महाराष्ट्राचे यरूशलेम म्हणून ओळखले जाते. हे आगळे वेगळे रेखीव वास्तूशिल्प पाहण्यास आवर्जून लोक येतात. पौर्वात्य व पाश्चिमात्य वास्तुशास्त्राचा संगम या वास्तूत दिसून येतो. वास्तुने १०० वर्षेओलांडली आहे. ११० ७५' घुमटापर्यंतची उंची १०० फूट आहे. डॉ. रॉबर्ट अॅलन ह्युम यांच्या स्मृत्यर्थ त्यांचेच नाव चर्चला देण्यात आले आहे.

$$$$$
२२. कापूरवाडी तलाव 
जुन्या बसस्थानकापासून ५ कि. मी. अंतरावर बुन्हऱ्हाणनगरच्या देवी मंदिरापासून जवळच उजव्या बाजूने जाणारा रस्ता कापूरवाडी तलावाकडे जातो. हा तलाव निजामशाहीत बांधला असून या तलावातील पाणी पूर्वी खापरी नळाने नगरला पिण्याचे पाण्यासाठी वापरले जात असे. आजही तारकपूर परिसरात हे खापरी नळ पहायला मिळतात. अनेक वर्षेहे पाणी नगरकरांना मिळत होते. हा तलाव वटवृक्षांनी वेढलेला असून अनेक प्रकारचे पक्षी येथे विहारताना दिसतात. सहलीसाठी हे स्थळ अतिशय चांगले आहे. अनेक स्थलांतरीत दुर्मिळ पक्षी येथे आपल्याला पहायला मिळतात.

२३. ऐतिहासिक भुईकोट किल्ला
जुन्या बसस्थानकापासून २.५० कि. मी. अंतरावर भिंगारकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ही जुनी वास्तू पहायला मिळते. १४९० मध्ये सुरुवातीला मातीच्या तटाने येथे बांधकाम सुरू झाले. १५५९ ते १५६२ या काळात दगडी तटबंदीचे बांधकाम झाले. सुमारे १ मैलाचा परीघ आणि २२ बुरूज असलेला हा जमिनीवर बांधलेला जुना किल्ला अहमदनगर शहरापूर्वी निर्माण झालेला असल्याने याला इतिहासात महत्वाचे स्थान आहे. तटाभोवती विस्तीर्ण खंदक खोदलेला असल्याने शत्रूला यावर चाल करणे अवघड होते. १८३२ मध्ये ब्रिटीश काळात या खंदकावर झुलता पूल बांधण्यात आला. पूर्वी किल्ल्यात सोनमहल, गगनमहल, मीनामहाल वगैरे महाल होते. चार मोठ्या विहिरी होत्या. या किल्ल्यात पेशवे काळात तुळाजी आंग्रे, मोरोबादादा, नाना फडणवीस, सदाशिव भाऊ तोतया, संभाजीराजांची पत्नी येसुबाई, मुलगी भवानीबाई, चौथे शिवाजी महाराज, तसेच अलिकडे पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, नरेंद्र देव इ. नगरच्या किल्ल्यात बंदिवान म्हणून रहावे लागले. त्यामुळे या दृष्टीने किल्ल्याला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. याच किल्ल्यात पंडित नेहरूंना जेथे बंदी करून ठेवले त्या खोलीत त्यांनी वापरलेल्या वस्तू व काही त्यांची हस्तलिखिते आजही जतन करून ठेवली आहेत. पंडित नेहरूंनी या किल्ल्यात 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' ग्रंथ लिहिला. आता किल्ला लष्कराच्या ताब्यात आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला तो आम जनतेला पाहण्यासाठी खुले केला जातो. निजामशाहीचे काही 
$$$$$
अवशेष आजही अहमदनगर परिसरात पहायला मिळतात. अ) 'हस्तबेहरत बाग' बादशाहाच्या स्त्रियांचा हमामखाना नगर-मनमाड रस्त्याजवळ बसस्थानकापासून ८ कि. मी. हस्त बेहस्त बाग (भिस्तबाग) उत्कृष्ट जलमहाल दुमजली अष्टकोनी वास्तू राजघराण्यातील स्त्रियांसाठी हमामखाना यामध्ये खापरी नळयोजनेतून डोंगरातून पाणी आणले जात असे. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना पहायला मिळतो. ब) बागरोजा - ३ कि. मी. अंतरावर अहमदशाह ज्याने अहमदनगर शराची स्थापना केली त्याच्या पत्नीची समाधी 
$$$$$
'बागरोजा' मध्ये पहायला मिळते. बागरोजा त्याकाळी देखणे उद्यान होते. तालिकोटच्या लढाईत विजय मिळवून देणाऱ्या हत्तीची मेघडंबरी असलेली देखणी कबर जवळच आहे. राजघराण्यातील अनेक कबरी अहमदशाहाच्या पत्नीची समाधी येथे आहे. आज हे ठिकाण पहायला शेतातून जावे लागते. तसेच त्याच्या शेजारी तालिकोट लढाईचे हत्तीचे स्मारक पहायला मिळते. तसेच बसस्थानकापासून ३.५ कि. मी. अंतरावर बुऱ्हाणनगर रस्त्यावर 'दमडी मशीद' किंवा 'सहेलखानी मशीद' पहायला मिळते. फराहबक्ष महाल नगरच्या आग्रेयेस सोलापूर रस्त्यावर ३ कि. मी. अंतरावर अष्टकोनी दुमजली दमडी मशीद आशियातील १० आदर्श आणि सौंदर्यशाली मशिदीमध्ये हिची गणना होते. दगडात कोरलेली कुराणातील वचने मजुरांनी दमडी दमडी जमवून बांधली म्हणून 'दमडी' मशीद म्हणून ती ओळखली जाते वयाचे कमलपुष्पांचे कोरीव काम प्रसिद्ध आहे. 
बसस्थानकापासून ४ कि.मी. नगर-सोलापूर रस्त्यावर असलेली 'फराहबाग' पूर्वी बादशाहाची नाचगाणे चालत असलेला हा सुंदर महाल होता. फराहबक्ष महाल (फबाग) या वास्तूवरूनच ताजमहालाची कल्पना सुचली असे म्हणतात. आता हा भाग लष्करी हद्दीत येतो. भव्य कमानी, कारंजी असलेला तलावाचे १५०x१७ मध्यभागी हा महाल भग्न अवस्थेस आहे. ३० घुमट सज्जा, २५ उंचीचा पहायला मिळतो. बसस्थानकापासून ६ कि. मी. अंतरावर नगर-पाथर्डी रस्त्यावर एक मशीद, भटारखाना, बारादरी आहे. येथे औरंगजेबाच्या वयाच्या ९१ व्या वर्षी येथे अंत झाला ते हे ठिकाण. तसेच कासिमखानी महाल, चंगेजखानी महाल सध्याचे जिल्हा न्यायालय, कविजंग महाल-अमेरिकन मिशन हायस्कूल, दोबोटी चिराग, जिल्हा न्यायालयाजवळ, न्यामतखानी नगरपालिकेजवळ, हुसेनी मशीद मदरसा कारागृह, अडीच घुमट-झोपडी कँटीनच्या मागे, मिरावली पहाड नगरपासून १० कि. मी., हत्ती बारव नगरपासून ६ कि. मी. जामखेड रस्ता, वगैरे स्थाने अवशेष रूपाने इतिहासाची साक्षीदार म्हणून उभे आहेत. 

२४. डोंगरगण
जुन्या बसस्थानकापासून १८ कि. मी. अंतरावर नगर-वांबोरी रस्त्यावर निसर्ग सौंदर्याचा खजिना डोंगरगण हे स्थान प्रसिद्ध आहे. सहलीसाठी एक उत्तम ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. प्रभू रामचंद्र वनवासात असताना या डोंगरदऱ्यात त्यांनी वास्तव्य केले होते. दरीमध्ये जिवंत पाण्याचा झरा असून तेथे रामाने बाण मारून पाणी काढले होते अशी अख्यायिका आहे. दरीत रामेश्वराचे मंदिर, जवळच भुयारासारख्या जागी ‘सितामाईची न्हाणी' म्हणून प्रसिद्ध आहे. या डोंगराला गर्भगिरीचा डोंगर म्हणतात. जवळच जंगले महाराजांचा वैष्णवपंथी आश्रम असून तेथे भजन, कीर्तन, पखवाजाचे शिक्षण दिले जाते. 
$$$$$
जवळच मांजर सुंब्याजवळ हत्तीची मोट, मर्दानखाना ही ऐतिहासिक स्थळे प्रसिद्ध आहेत. जवळ उंच डोंगरावर गोरक्षनाथांचे समाधी मंदिर आहे. त्याची उंची २९८२ फूट आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. गुरू मच्छिंद्रनाथांना स्त्रीराज्यातून आणीत असताना गोरक्षनाथांनी येथे वास्तव्य केले होते. तपश्चर्या व यज्ञ केला होता हाच गर्भगिरी डोंगर गुरूची मोहातून सुटका होण्यासाठी योग सामर्थ्याने पूर्ण डोंगरच सोन्याचा केला होता म्हणून हा परिसर धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे. आज हा निसर्ग सुंदर परिसर पर्यटनासाठी अतिशय चांगला आहे. झुळझुळणारे झरे, थंडगार हवा, हिरवीगार झाडी व सुंदर घाट ही निसर्गाची देणगी असलेला हा परिसर मनाला मोहून टाकल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. या दरीत फार पूर्वी शरभंग ऋषींचा आश्रम होता. या ठिकाणी राम-लक्ष्मणाचे दोन दिवस वास्तव्य होते. त्यावेळी शरभंग ऋषींच्या स्नानासाठी गरम पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी लक्ष्मणाने केली. तेव्हा रामाने त्या ठिकाणी अग्रिबाण मारून गरम पाण्याचा झरा निर्माण केला. आजही तो तलाव व ते पाणी पहायला मिळते.

२५. केडगावची देवी
नगरपासून ५ कि. मी. अंतरावर नगरकरांचे आराध्य दैवत म्हणून ही देवी प्रसिद्ध आहे. ग्वाल्हेरच्या राजवाडे घराण्याने हे मंदिर बांधले. येथे ५ झाडांची पंचवटी आहे. येथील पुजा गुरव घराण्याकडे आहे. मंदिराच्या तटबंदीमध्ये ओवऱ्या, नगारखाना व प्रवेशद्वाराजवळ भव्य दीपमाळ आहे. नवरात्रात हजारो भाविकांची येथे फार मोठी गर्दी होते. या देवीची अख्यायिका सांगतात की देवदैठणला जात असताना (हल्लीच्या केडगावला त्यावेळी हे स्थान निर्मनुष्य होते), थांबले त्यांना फार भूक लागली तेव्हा त्यांनी देवीची प्रार्थना केली. देवीने गौळणीचे रूप घेऊन त्यांना दूध पाजले व देवी अंतर्धान पावली. तेथे तांदळा निर्माण झाला. तेथे मंदिर बांधण्यात आले व कावडीचे पाणी बारवेत ओतले. १० दिवस नवरात्रात सप्तशतीपाठ वाचन होते. विजयादशमीला शस्त्रपुजा केली जाते. हे रेणुकामातेचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

२६. आगडगावचे भैरवनाथ मंदिर
अहमदनगरपासून १७ कि. मी. अंतरावर कालभैरवाचे जागृत देवस्थान आहे. इतर यात्रेपेक्षा या गावची यात्रा वेगळी आहे. अनेक गावात देवदेवतांची यात्रा भरते. परंतु या ठिकाणी मात्र 'भुतांची यात्रा' भरते. आगडमल, रतडमल आणि देवमल अशी या भुतांची नावे आहेत. या राक्षसांनी हेमाडपंती धाटणीची ही मंदिरे बांधली आहेत अशी अख्यायिका आहे. मंदिर परिसरात निंबाचे झाड आहे त्याची पाने कडू न लागता तुरट लागतात. त्याला 
$$$$$
निंबोळ्या येत नाहीत. विषबाधा झाल्यास या झाडाचा पाला खायला दिल्यास विषबाधा नाहीसी होते अशी श्रद्धा आहे. दर रविवारी येथे आमटी भाकरी सोबत ठेचा, कांदा महाप्रसाद मोफत दिला जातो. 

२७. नागरदेवळे महानुभाव पंथ आश्रम
महानुभाव पंथाचे दुसरे आचार्य भावेदेवव्यास किंवा नाईदेवव्यास हे नागरदेवळ्याचे राहणारे होते. त्यांनी महानुभाव पंथासाठी पूजावस्वर हा ग्रंथ लिहिला. महानुभाव पंथाच्या भक्तांचे हे महत्वाचे स्थान मानले जाते.

२८. धरमपुरीचे राम मंदिर
नगरपासून १५ कि. मी. अंतरावर एम. आय. डी. सी. च्या पश्चिमेला जवळ निंबळक गावाजवळ हे रमणीय असे स्थान आहे. रेल्वे लाईनजवळ नवीन स्थान निर्माण झाले आहे. हे मंदिर दोन मजली असून राम-लक्ष्मण सीतेच्या ६ फुटी काळ्यामूर्ती वरच्या मजल्यावर स्थापन केल्या असून खाली गजानन महाराजांची मूर्तीची स्थापना केली आहे. येथे रामजन्मोत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते. या ठिकाणी जाण्यासाठी नागापूर तसेच एम. आय. डी. सी. मधून रिक्षा मिळू शकतात. सहलीसाठी अगदी निसर्गरम्य, शांत असे हे ठिकाण आहे. भक्तांसाठी दुपारी १२ नंतर मोफत अन्नदान (भंडारा) असतो.

२९. शेंडी-पोखर्डीची गौराई यात्रा -
नगर-औरंगाबाद रोडलगत बाह्यवळण रस्त्याजवळ शेंडी व पोखर्डी अशी दोन लहान गावे आहेत. दोन्ही गावांमधून ओढा वाहतो. दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गौराईची मोठी यात्रा भरते. दुपारनंतर दोन्ही गावांच्या सुवासिनींची अटीतटीची लढाई होते व लढाईत एकमेकींना ओढून आपल्या बाजूला नेण्याचा शिकस्तीने प्रयत्न केला जातो. ज्या बाजूच्या महिलेला ओढून नेले जाते तिचा पाहुणचार करून जेवणखाण करून व साडी-चोळी देऊन तिला परत पाठविले जाते. हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील अनेक गावची मंडळी आवर्जून उपस्थित राहतात. 

३०. पिंपळगाव कौडा
नगर-पुणे रस्त्यावरील कामरगावपासून ३ कि. मी. अंतरावर हे लहानसे गाव असून पेशव्यांचे सेनापती अंताजी माणकेश्वर यांचा येथे कोरीव लाकडी महाल होता. या महालाचे कोरीव खांब अहमदनगरच्या वस्तुसंग्रहालयात पहायला मिळतात. पिंपळगाव कौडाच्या चहूबाजूने डोंगर आहेत. डोंगरावर कौडेश्वराचे जागृत जुने शिवमंदिर असून साईबाबांचे समकालीन रघुनाथ महाराज होऊन येथे होऊन गेले. ते सिद्ध पुरुष होते. ते अंध होते. परंतु 
$$$$$
ते भल्या पहाटे उंच डोंगरावरील कौडेश्वराचे दर्शनासाठी जात. ते काही काळ कोकणगाव येथे रहात होते. साईबाबांची व त्यांची भेट होत असे. पिंपळगाव कौडा हे अहमदनगर जिल्ह्यातील पहिली 'कृषीपंढरी' म्हणून ओळखली जाते. १० पाझर तलाव व १६५ नालाबंडिंगची कामे येथे झाल्यामुळे ‘पाणी आडवा पाणी जिरवा' हा मंत्र या गावाने साकार केला आहे. गावच्या डोंगरावर अनेक पवनचक्क्या असून तेथे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होत असते.

३१. हिवरेबाजार 
नगरपासून १७ कि. मी. अंतरावर नगर-कल्याण रस्त्यालगत हे स्वयंपूर्ण असे आदर्श गाव म्हणून लौकिक पावलेले असून या गावचे शिल्पकार सरपंच श्री. पोपटराव पवार यांनी शासनाच्या पाणलोट प्रकल्पाच्या योजना येथे राबवून गावाचा कायापालट केला आहे. ग्रामस्थ सर्व एकजिनसी असल्याने शासनाच्या अनेक योजना येथे यशस्वीपणे राबवून गाव आदर्श झाले आहे. त्यामुळे अनेक राज्यातील लोक या गावाला भेटी देऊन त्यांचा आदर्श घेत आहेत.

३२. पिंपळगाव माळवी तलाव  
अहमदनगरपासून १४ कि. मी. नगर-वांबोरी रस्त्यावर हा तलाव पहायला मिळतो. सन १९१३ ते १९२३ या काळात हा बांधला गेला. याचे पाणी नगर शहराला अनेक वर्षे पिण्यासाठी वापरले जात होते. याचे पाणलोट क्षेत्र २४ चौ. मैल असून साठवण क्षमता २०५ द. लक्ष घनफूट एवढी आहे. अलिकडे बराच गाळ साचल्यामुळे तलाव उथळ होत चालला आहे. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना मोफत गाळ वाहून न्यायला परवानगी दिली जाते. अनेक स्थलांतरीत पक्षी या तलावाकडे आकर्षीत होतात. निसर्ग सुंदर असा परिसर असून रस्त्यालगत असल्याने अनेकजण पर्यटनाचा आनंद लुटतात. जवळच पर्यटकांसाठी मोठे हॉटेल आहे.

३३. गुंडेगाव
अनेक टेकड्यांनी वेढलेले हे गाव असून गावाला जायला रस्ता नव्हता. एका पेन्शनर शिक्षकाने आपली सर्व पेन्शन खर्च करून श्रमदानाने हा रस्ता तयार केला व अनेकांना श्रमदानाचा आदर्श घालून दिला. गावाजवळ पाच टेकड्या असून संतोबा डोंगरावर अनेक पशुपक्ष्यांचा संचार आहे. हरीण मोठ्या प्रमाणात येथे मुक्त संचार करताना दिसतात. जवळच चिखली घाट असून येथून दूरवरचे दृश्य पाहून मनाला आनंद मिळतो.


$$$$$
३४. केकताई देवी
नगर एम. आय. डी. सी. च्या बाजूने विखे ग्रामीण रुग्णालयाजवळ केकताई देवीचे मंदिर असून ओढा खडकावरून वाहताना अनेक लहान लहान धबधबे दिसतात. हिरवागार परिसर व खडकावरून उड्या मारणारे पाणी मनाला मोहून टाकते. येथे जवळच अल्पदरात दवाखाना, इंजिनिअरींग कॉलेज, फार्मसी, आयटीआय वगैरे सोयी उपलब्ध आहेत.

३५. संजीवनी गड
नगर-पाथर्डी रस्त्यावर नगरपासून सुमारे २० कि. मी. अंतरावर मेहेकरी गावाजवळ दक्षिणेला डोंगरावरील पठारावर संजीवनीगड आश्रम असून तेथे भगवान शंकराचे, गुरूदेव दत्ताचे, श्रीगणेशाचे, विठ्ठल-रुक्मिणीची मंदिरे असून मोठा सभामंडप बांधलेला आहे. गुरू खुशालभारती यांचे समाधी मंदिर आहे. या गडावर महंत शंकर भारती हे वास्तव्य करून आहेत. त्यांनी गडावर २००६ पासून इंग्लिश मीडियम स्कूल, मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी निवासी विद्यालय सुरू केले असून ५०० खाटांचा दवाखाना सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी नवरात्रौत्सव, दत्त जयंती वगैरे उत्सव होत असतात. त्यावेळी मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते. महाराजांनी १४ वर्षेवृद्धेश्वर जवळ असलेल्या गुहेत तपश्चर्या केली होती. त्या ठिकाणी त्यांना साक्षात्कार झाला. तेव्हापासून लोककल्याणाचे कार्य सुरू आहे. महाराज परिसरातील अनेक शिष्यगणांसह दरवर्षी काशीप्रयाग, मथुरा, गया वगैरे ठिकाणी तीर्थाटनास जातात. महाराजांचे गडावर अनेक लोककल्याणकारी उपक्रम सुरू असतात. बाबांच्या आशीर्वादासाठी कर्नाटक, ध्र, गुजरात, मध्य प्रदेश मधून भक्तगण गडावर येत असतात. संपर्कासाठी फोन नंबर - ०२४१-६९५२८०६ मोबा. ९२२६३६२८२५, ९४२३३९००८५.

३६. चिचोंडी पाटील
अहमदनगरपासून १० कि. मी. अंतरावर जामखेड रोडवर हेमाडपंती बालाजी मंदिर असून अनेक भाविक दर्शनासाठी येतात. हे स्थान जागृत असून भाविकांना अनेक समस्या येथे आल्यावर सुटतात असा भाविकांचा अनुभव असल्याने येथे नेहमीच गर्दी पहायला मिळते. अनिल गायकैवारी येथे पुजारी म्हणून सेवा करतात. स्वयंभू बालाजी मूर्तीला अलिकडेच वज्रलेप करण्यात आला असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. ही मूर्ती स्वयंभू असून १४०० वर्षांपूर्वीची प्राचीन आहे.


$$$$$
३७. अकोळनेर
दासगणू महाराजांची जन्मभूमी त्यांच्या जीवन कार्याची माहिती आता देशविदेशांतील भाविकांना घरबसल्या वेबसाईटद्वारे मिळते. राष्ट्रहीत संवर्धक मंडळातर्फे www.shridasganu.in या वेबसाईटवर त्यांचे कार्य व त्यांची एकूण सर्व माहिती यावर मिळू शकेल. अकोळनेर येथे दासगणू महाराजांच्या १०४ वा जयंती उत्सव नुकताच साजरा करण्यात आला. त्यावेळी अनेक मान्यवर तेथे उपस्थित होते. जन्मस्थळ विकास आराखडा आर्थिक निधीबाबतचा प्रस्ताव शिर्डी संस्थानकडे दिलेला आहे. तो मंजूर होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

३८. भातोडी -
नगरपासून १६ कि. मी. अंतरावर ऐतिहासिक महत्व असलेले भातोडी हे गाव आहे. इ. स. १६२४ मध्ये झालेल्या लढाईत शहाजीराजांनी विशेष पराक्रम गाजविला. तेव्हापासून निजामशाहीमध्ये त्यांचा दबदबा वाढला. परंतु दुर्दैवाने त्यांचे बंधू या लढाईत कामी आले. दगडी भिंत असलेला ४०० वर्षांपूर्वीचा तलाव एकग बझी मैदान, कलावंतीणीचा रंग महाल, तसेच नृसिंह मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिरात मूर्तीऐवजी तांदळा आहे. तांदळ्यासमोर असलेल्या खिडकीतून रात्री उत्तरेकडे पाहिले असता ध्रुव ताऱ्याचे दर्शन होते.

३९. ब्रिटिश कालिन लोखंडी पूल
अहमदनगर रेल्वे स्टेशनकडे जाताना या लोखंडी पुलावरून जावे लागेल. ब्रिटिशकालिन भक्कम कामाची साक्ष देणारा लोखंडी पूल १८७३ सालचा आज १४१  वर्षेपूर्ण झाली. त्याचे आयुष्यमान संपलेले असूनही तो दिमाखात उभा आहे. याची लांबी ५३० फूट असून १८ फूट रुंद आहे. त्याला ८ धनुष्याकृती कमानी आहेत. त्याला त्याकाळी ९०३११ रूपये खर्च आल्याची नोंद आहे. त्याची मुदत १०० वर्षेठरविण्यात आली असल्याने ब्रिटिश कंपनीने नगरपालिकेला दक्षपणे कळविले. 

४०. मिरावली बाबांचा पहाड 
अहमदनगर शहरापासून सुमारे ३ कि.मी अंतरावर हा पहाड आहे. हजारो हिंदू- मुस्लिम भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अनेकांना मनोकामना येथे पूरी होत असल्याचा विश्वास आहे. यात्रेचे वेळी अहमदनगर बस स्थानकातून भक्तांच्या सोईसाठी स्पेशल गाड्या सोडतात.


$$$$$
९. पारनेर तालुका

१. कोरठण खंडोबा
हे स्थान नगर-पुणे रस्त्यावर नगरपासून १५ कि. मी. अंतरावर पिंपळगाव रोठा या गावी आहे. हे जागृत खंडोबाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या देवस्थानाची चंपाषष्टीला फार मोठी यात्रा भरते. अलिकडेच या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. २००५ या साली चंपाषष्टीनिमित्त राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांचे हस्ते कलशाचे अनावरण झाले. येथे दर्शनासाठी दूरदूरचे मान्यवर श्रद्धाळू दर्शनासाठी येतात. हे स्थान प्रतिजेजुरी म्हणून समजले जाते. मकर संक्रांतीनंतर तीन दिवस मोठी यात्रा भरते. चार ते पाच लाख भाविक या ठिकाणी जमतात. तीन दिवसांच्या यात्रौत्सवात लोकरीचे जान, ग्रामीण कारागिरांनी केलेला तवा, पोळपाट तसेच अनेक ग्रामीण वस्तुंची विक्री मोठ्या प्रमाणात होते. बांबूपासून बनविलेल्या शिड्या, टोपले, सूप, महिलांचे अलंकार, मिठाई वगैरेंची विक्री मोठ्या प्रमाणात होते. यात्रेत गुटखा, तंबाखू विक्रीवर बंदी असल्याने हा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे.

२. टाकळी ढोकेश्वर 
ढोकेश्वर मंदीर लेणी स्वरूपात कोरलेले असून ते आठव्या शतकातील असावे. उंच डोंगरावर असून मंदीरांजणात गोड पाण्याचे टाके भक्तांची तहान भागवते. पूरी घराण्याकडे या मंदीराची पुजेचा मान आहे.
नगर-कल्याण रस्त्यावर अहमदनगरपासून ४० कि. मी. अंतरावर हे पौराणिक स्थान आहे. ढोकेश्वरचे मंदिर गावापासून ४ कि. मी. अंतरावर डोंगरावर असून डोंगरातच मंदिर कोरून तयार केले आहे. पांडव लेण्यामधून अनेक देवता येथे भिंतीवर कोरल्या आहेत. श्रीगणेश, भैरव, महादेव, सहामाता, तांडवेश्वर, अष्टसिद्धी वगैरे लेण्यांमधून दाखविल्या आहेत. यामध्ये १० फूट लांब व ५ फूट उंच असा अजस्त्र नंदी कोरलेला आहे. पूर्वी शिवरात्रीला या नंदीच्या मागील बाजूस हात घालून नाणे मिळत असत व ते नाणे त्या यात्रेतच खर्च करायचे असा संकेत असायचा त्यामुळे यात्रा फार मोठी भरायची. परंतु कालांतराने काहींनी ते नाणे घरी नेले तेव्हापासून नाणे निघायचे बंद झाले अशी स्थानिक लोक अख्यायिका सांगतात. श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारीही येथे मोठी यात्रा भरते. टाकळी ढोकेश्वर येथे जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी केंद्रीय विद्यालय असून तेथे गुणवत्तेनुसार ५ वीमध्ये प्रवेश दिला जातो. 

३. सिद्धेश्वर मंदिर
पारनेरपासून ५ कि. मी. अंतरावर दरीमध्ये निसर्गाने नटलेल्या ठिकाणी सिद्धेश्वराचे अतिशय सुंदर असे मंदिर आहे. जवळ धबधबा पाहण्यासारखा आहे. स्वच्छ नितळ पाणी 
$$$$$
त्या पाण्यातल्या कुंडात स्नान करता येते. काही खाचखळग्यामधून वाट काढीत या मंदिरापर्यंत जावे लागते. सेनापती बापटांनी येथे एका गुहेत तपश्चर्या केली होती. ती गुहा आजही पहायला मिळते. मंदिराची फार मोठी घंटा तिला 'नारोशंकराची घंटा' म्हणून ओळखतात. हे ही एक वैशिष्ट्य आहे. हे देवस्थान अतिशय शांत व निसर्गाच्या सौंदर्याचा वर्षाव झाल्याचा भास होतो. गेल्यावर तेथून निघायचे मन होत नाही.

४. पळशी
नगरपासून ६० कि. मी. अंतरावर पेशवेकालीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर अतिशय सुंदर आहे. आनंदराव पळशीकर या पेशव्याच्या सरदाराने सुरत लुटीतून मिळालेल्या संपत्तीतून हे मंदिर बांधल्याचा दाखला आहे. विठ्ठल-रुक्मिणी एकत्र असलेले हे मंदिर १८ कोरीव खांब असल्याने जणू १८ पुराणांची आठवण करून देतात. गावात पळशीकरांचा भव्य वाडा आहे. लाकडी कारीवकाम अतिशय सुंदर आहे. प्रति पंढरपूर म्हणून या परिसरातील लोक मानतात. हे मंदिर मध्य प्रदेशातील मंदिराच्या शैलीचे असून कळसाजवळ गरूडध्वज शिल्पही पाहण्यासारखे आहे. मंदिर विस्तृत चौथऱ्यावर स्थापन केले असून भव्य असा सभामंडप आहे. ऐतिहासिक वारसा जपलेले हे स्थळ आहे. सुंदर तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार इ. स. १७३५ ला मल्हारराव होळकरांनी बांधले आहे.

५. जामगाव
नगर-पारनेर - भाळवणी मार्गावर जामगावचा ऐतिहासिक महादजी शिंदे यांनी बांधलेला भव्य वाडा पहायला मिळतो. मंदिर आणि पिराचे ठाणेसुद्धा आहे. सध्या येथे डी. एड. महाविद्यालय आहे. जामगावात आणखी काही जुन्या ऐतिहासिक वास्तू आहे. त्यापैकी केळकरांचा वाडा पाहण्यासारखा आहे. याच वाड्यात 'वास्तूपुरूष' या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. तसेच 'झाले मोकळे आकाश' या दूरचित्रवाहिनीचे चित्रीकरणही येथेच झाले. या वास्तू पाहात असताना आपण पेशवेकाळाचे वैभव जाणू शकतो. जामगावच्या किल्ल्याला 'साहेबगड' या नावाने ओळखतात आणि महादजी शिंदे यांनी बांधलेल्या वाड्याला 'माधव विलास' असे नाव आहे. वाड्याला तटबंदी असून १९ बुरूज आहेत. परिसरात आंबेमहाल, प्रधानाचा वाडा, मच्छिमहाल पाहाताना जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.




$$$$$
६. वडगाव आमली 
नगर-कल्याण मार्गावर भाळवणीपासून ३ कि. मी. अंतरावर दक्षिणेला है टुमदार नव्या युगाचा ध्यास घेतलेले गाव पहायला मिळते. नगर जिल्ह्यातील पहिले 'हागणदारीमुक्त' गाव म्हणून याचा गौरव झाला. हे स्वच्छ सुंदर गाव पाहण्यासाठी लोक आवर्जून गावाला भेट देतात.

७. दैठणे गुंजाळ 
नगर- कल्याण मार्गावर भाळवणीच्या दक्षिणेला ४ कि. मी. कवड्या डोंगराच्या उत्तरेकडे हे गाव असून खंडोबाचे देवस्थान प्रसिद्ध आहे. 'चंपाषष्टी' ला येथे मोठी यात्रा भरते. जिल्ह्यातील नामवंत मल्ल पै. सहादू गुंजाळ हे याच गावचे रहिवासी आहेत.

८. चिंचोली
पारनेर-आळेफाटा रोडवर पारनेरपासून ६ कि. मी. अंतरावर पारनेर साखर कारखान्याजवळ हे गाव असून उत्तरेला दरीमध्ये 'मळगंगा' देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या देवीची यात्रा वाळवण्याच्या यात्रेनंतर सात दिवसांने भरते. परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होते.

९. वाळवणे 
सुप्यापासून ४ कि. मी. पूर्वेला वाळवणे गाव असून येथे भैरवनाथांची फार मोठी यात्रा भरते. हे मंदिर पुरातन असून हे स्थान जागृत असल्याने अनेक भाविकभक्त येथे दर्शनासाठी येतात. 

१०. जातेगाव
नगर-पुणे रोडवर पळवे गावच्या नैऋत्येस सुमारे ४ कि. मी. अंतरावर दरीमध्ये पुरातन भैरवनाथांचे मंदिर असून निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. तेथे एक झरा यात्रेच्या रात्री आपोआप पाण्याने भरून वाहू लागतो. हा चमत्कार यात्रेच्या दिवशी पहायला मिळत असल्याने भक्तजनांची अलोट गर्दी होते. 

११. पिंपळनेर
राळेगण सिद्धीपासून २ कि. मी. अंतरावर वारकरी सांप्रदायाचे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून पिंपळनेरचा उल्लेख होतो. संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे परमभक्त निळोबाराय यांचे हे वास्तव्याचे ठिकाण. तुकाराम महाराजांचे नातू नारायण महाराजांचे 
$$$$$
देहू येथे कीर्तन ऐकल्यावर त्यांना आध्यात्मिक ओढ लागली. १७१० ला ते पारनेरला नोकरी करीत होते. परंतु त्यांचे मन नोकरीत रमेना १७९२ पासून पिंपळनेरला वास्तव्य करून राहिले. तेथून ते पंढरीच्या वाऱ्या करायचे. तुकाराम महाराजांचे परमभक्त असल्याने त्यांचा धावा करताना साक्षात पांडुरंगाचे त्यांना दर्शन झाल्याचे निळोबा गाध्यात उल्लेख सापडतो. पिंपळनेर हे प्रतिपंढरपूर म्हणून परिसरात ओळखले जाते. वर्षभर येथे दिंड्या येत असतात. या ठिकाणी अध्यात्मिक वातावरण असते.

१२. देवीभोयरे
पारनेरपासून १८ कि. मी. वर असलेल्या देवीभोयरे गावात अष्टभुजा आंबिका देवीचे स्थान प्रसिद्ध असून भुयारातून ही देवी प्रकट झाली असे स्थानिक लोक सांगतात म्हणून गावाला देवीभोयरे म्हणून ओळखतात. 'शितलादेवी' म्हणूनही देवीची ओळख आहे. दक्षिणमुखी मंदिरातील गाभाऱ्यात गोवराई व कांजण्याईचे तांदळे आहेत. श्रावण महिन्यात आणि चैत्र महिन्यातील दर मंगळवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. दसऱ्याला पालखी सोहळा पाहण्यासारखा आहे.

१३. निघोजची मळगंगा देवी
निघोजच्या मळगंगा देवीची अख्यायिका स्थानिक लोक अशी सांगतात की, मळगंगा देवी ही मूळची काशिखंडातील तेथून ती दक्षिणेत नगर जिल्ह्यातील प्रवराकाठी नेवासे येथे आली. तेथे मुक्काम करून ती पारनेर तालुक्यातील निघोजला आली. माता मळगंगेला ७ बहिणी. १. घोलवड ता. जुन्नर २. बेलापूर ता. श्रीरामपूर ३. दरेवाडी ता. नगर ४. उंब्रज ता. जुन्नर ५. करंडी ता. पारनेर ६. चिंचोली ता. पारनेर आणि ७. निघोज ता. पारनेर.
दरवर्षी मळगंगा देवीची यात्रा चैत्र व ॥ ८ला भरते. त्या दिवशी सायंकाळी ५ नंतर देवीची बगळगाड्यावर बसून नवस बोलण्याचा कार्यक्रम होतो. तो पूर्ण होताच त्याची फेड करावी लागते अशी प्रथा आहे. त्या दिवशी रात्री बाराच्या सुमारास बारवेतून पाण्याने भरलेली घागर पायरीवर आपोआप येते. मग त्या घागरीची यथासांग पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी घागरीची पुजा करणाऱ्याच्या डोक्यावर ठेवून मिरवणूक काढली जाते. या बारवेमध्येच एका कोनाड्यात तांदळा व गणेशमूर्ती आहे. नोव्हे. ९७ला ज्येष्ठ समाजसेवक बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते मंदिराचे जीर्णोद्धाराचे भूमिपूजन झाले. १ कोटी रुपये खर्चून काम पूर्ण झाले असून आकर्षक मंदिर गाभारा १५’×१५', सभामंडप ३२'×३२', कळसाची उंची ८५ फूट मंदिर राजस्थानी कारागिरांनी बांधून पूर्ण केले.

१४. सुपा
नगर-पुणे रस्त्यावर सुपा हे जुने गाव. सासवडचे सरदार शितोळे आणि सरदार 
$$$$$
पवारांचे भव्य वाडे इतिहासाचे साक्षीदार आहेत. येथील तटबंदी मातीची असूनही अजून शाबूत आहे. अप्रतिम कोरीव काम असलेले महादेवाचे मंदिर आहे. १ ते १.५ कि. मी. अंतरावर एक मंदिर आहे. एक भुयार तेथपर्यंत जाते. त्या मंदिराजवळ एक दर्गा आहे. जुन्या अवशेषावरून इतिहासाची ओळख पटायला निश्चित मदत होते. ऐतिहासिक वारसा असलेले हे गाव संशोधनासाठी आव्हान देणारे आहे.

१५. हंगा
हंगा नदीच्या तिरावर प्राचीन महादेवाचे श्रीक्षेत्र हंगेश्वर मंदिर असून अतिशय जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचे हे जन्मगाव आहे. सुप्यापासून ४ कि. मी. अंतरावर हंगा नदीकाठी २००' x २००' आवर ५०' x७५' उंच दगडी चौथऱ्यावर हे मंदिर. फार प्राचीन सन १६९९ बांधण्यात आले. या देवाची श्रावणातल्या सोमवारी मोठी यात्रा भरते. यात्रेच्या आदल्या दिवशी गावातील घराघरातून तांदूळ गोळा केले जातात व ते मंदिरात पुजाऱ्याच्या ताब्यात देतात. तिसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवाच्या पिंडीवर कोरड्या तांदळाच्या ५ पिंडी तयार झालेल्या पहायला मिळतात. ही अद्भूत स्थिती दरवर्षी अजूनही पहायला मिळते. या दिवशी मोठी यात्रा भरते.

१६. कामठवाडी
पारनेरजवळ कामठवाडी येथे एक मंदिर असे आहे जे एका कारागिरीने हात नसताना हातांना कामट्या बांधून दगड घडवून निर्माण केले आहे. त्याच्या स्मरणार्थ गावाला 'कामठवाडी' नाव पडल्याचे स्थानिक लोक सांगतात.

१७. वडगाव दर्या
निघोजपासून २५ कि. मी. अंतरावर हे निसर्ग सुंदर असे स्थान खडकाध्ये दगडी स्तंभ नैसर्गिकरित्या तेथे निर्माण झाले असून त्याला 'लवण स्तंभ' असे म्हणतात. असा निसर्ग चमत्कार क्वचितच पहायला मिळतो. गुहेत वेल्हाबाई व दर्याबाईचे मंदिर प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात धबधब्याचे दृश्य अतिशय विलोभनीय दिसते. येथे निसर्गसंपदा भरपूर असल्याने हिरव्यागार वनराईत माकडे आणि मोर यांचा मुक्त संचार पाहून डोळे सुखावल्याशिवाय राहत नाही.

१८. निघोज (पॉट होल्स) -
नगरपासून ७० कि. मी. अंतरावर निघोज गावापासून ३ कि. मी. अंतरावर कुकडी नदीपात्रात नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तेथील खडक घासून अतिशय सुंदर असे 
$$$$$
खडक तयार झाले आहेत. निसर्गनिर्मित सौंदर्य क्वचितच पहायला मिळते. हे खडक व्हेसीक्युलर बसाल्ट जातीची असल्याने रांजणासारखे सुंदर असे खडकांचे प्रकार पहायला मिळतात. (पॉट होल्स) जवळच मळगंगा देवीचे मंदिर असून तेथे मोठी यात्रा भरते. 

१९. राळेगणसिद्धी
नगर-पुणे महामार्गावर वाडेगव्हाण फाट्याने नगरपासून ५२ कि. मी. अंतरावर राळेगणसिद्धी हे गाव असून श्री. अण्णासाहेब हजारे यांनी गावाचा सर्वांगिण विकास कसा करावा याचा आदर्श साऱ्या देशासमोर ठेवला. ते आदर्श गाव म्हणजे राळेगणसिद्धी. गाव छोटे पण देशासमोर गांधीजींच्या स्वप्नातले खेडे प्रत्यक्ष गावाला भेट दिल्यानंतर समजू शकते. एक संघ गाव, गावची शेती आपली शेती, पाणलोट क्षेत्रविकास, व्यसनमुक्ती, सहकारी तत्वावर ग्रामीण विकास, ऊर्जा बचत, शैक्षणिक विकास, कार्यकर्ता प्रशिक्षण, गांडूळ प्रकल्प, निसर्ग शेती, सहकारातून क्षेत्रविकास, साक्षरता, भ्रष्टाचारमुक्ती, आरोग्य स्वच्छता इ. सर्व बाबींवर लक्ष केंद्रीत करून अण्णासाहेबांनी व्यसनी, मागासलेल्या खेड्याचे आदर्श व स्वयंपूर्ण गाव बनविले. अण्णांनी आपले पूर्ण जीवन गावाला अर्पण केले असून ते स्वतः यादवबाबा मंदिरात वास्तव्य करतात. निरपेक्ष पद्धतीने त्यांचे कार्य सुरू आहे. देशातील व देशाबाहेरील अनेक संस्था, व्यक्ती त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन वाटचाल करीत आहेत. देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचा त्यांनी संकल्प केला असून त्यादृष्टीने ते प्रयत्नशील आहेत. भारतीय नागरिकांना देशाचा, राज्याचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा, गावाचा संस्थेचा कारभार कसा चालतो हे समजण्यासाठी महत्वपूर्ण माहितीचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्यात त्यांचा मोठा वाटा आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक - ०२४८८-२४०२२७, २४०२२४
जनलोकपालच्या लढ्याने जगभर परिचित झालेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवनावर आता अमेरिकेतही फोटोबायोग्राफी निघणार आहे. यातून त्यांचा राळेगणसिद्धी ते अमेरिका असा जीवनप्रवास उलगडणार आहे. अण्णा हजारे यांनी दोन वर्षापूर्वी दिल्लीतील रामलीला मैदानावर जनलोकपालसाठी आंदोलन केले आणि त्यावेळी देशभरातील जनता रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी तर झालीच, पण जगभरातही आंदोलनाचे कौतुक झाले. शांततेने आंदोलन झाल्याने देशाचे दुसरे महात्मा गांधी अशी बिरूदावली अण्णांच्या मागे आता लागली आहे. नुकताच अण्णांनी अमेरिकेचा दौरा केला. तेथे सुद्धा मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता अमेरिकेतही अण्णांचे चाहते वाढले आहेत. जगभरात नावाजलेला छायाचित्रकार जय मंडल याने अमेरिका दौऱ्यावर अण्णांची भेट घेतली. अण्णांच्या विचारांनी तो भारावून गेला. त्याने तेव्हापासून अण्णांची फोटोबायोग्राफी प्रसिद्ध करायची असा ध्यास घेतला होता.
$$$$$
अमेरिकेतील सर्व दौऱ्यात तो बरोबरच होता. काही महत्वाची क्षणचित्रे त्याने कॅमेऱ्यात कैदही केली. त्याने राळेगणसिद्धीतील यादवबाबा मंदिरापासून तर अण्णा हजारे यांनी केलेल्या पाणलोट विकासकामे, अण्णांच्या पहिल्या आंदोलनातून उभी राहिलेली नापासांची शाळा, जिल्हा परिषद शाळा यासह गावातील काही निवडक भागांची पाहणी केली. त्यांची छायाचित्रेही काढली. अण्णांच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्षण व त्यांनी वापरलेल्या वस्तूंच्या छायाचित्रांचा संग्रह त्याने केला आहे. असे अण्णांचे सहाय्यक दत्ता आवारी यांनी यांनी सांगितले. पारनेर येथील महाविद्यालयात येऊनही त्याने पारनेर महाविद्यालयाचा गौरव केला. प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनीही अण्णांबद्दल त्याला माहिती दिली. 

२०. पारनेरकर महाराजांचा आश्रम
जगात अनेक धर्म, पंथ, सांप्रदाय अस्तित्वात आहेत. त्यापैकी एक ईश्वरभक्तिचा सोपा मार्ग 'पूर्णवाद' पारनेरकर महाराजांनी सुरू केला. त्यांचे कार्य देशात व परदेशात सुद्धा सुरू आहे. पारनेरकर महाराजांचे समाधी मंदिर व इतर मंदिरे आश्रमात आहेत. शिष्य परंपरेतून हे कार्य चालू आहे. सध्या विष्णू महाराज पारनेरकर हे आश्रमाचे कार्य व व्यवस्था पाहतात. 

२१. घाणेगाव
पारनेर-सुपा रस्त्यावर घाणेगाव आहे. बबन वाबळे व कांताबाई वाबळे यांनी अनाथ मुलांसाठी अनाथांच्या आधाराचा प्रयत्न बालकाश्रम नावाने आश्रम सुरू आहे. मुलांना आपण पोरके किंवा अश्रीत आहोत याची जाणीव होऊ नये म्हणून हे नाव देण्यात आले आहे. पाहुणे किंवा दाते यांनी मुलांचा 'अनाथ' म्हणून उल्लेख करू नये म्हणून दक्षता घेतली जाते. १ ते ८ पर्यंत विद्यार्थी आश्रमात आहेत पहाटे ५ ते रात्री १० पर्यंत मुलांना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्यायाम, उत्तम जेवण, स्वरक्षणासाठी कराटे, अभ्यासिका अशा पद्धतीने वेळापत्रक बसविले असून शासकीय मदतीशिवाय हे कार्य सुरू आहे. मुलांना संगणक शिक्षणही दिले जात आहे. सौ. कांताबाई पूर्ण वेळ मुलांच्या सोबत आश्रमात राहून 'आई'ची सेवा देतात. प्रकाश शिंगवी, शिरीष शेठिया, अर्जुन भालेकर, राजू शेख, सादिक राजे हे व आणखी अनेकांच्या बहुमोल मदतीवर हे मोठे काम सुरू आहे. अशा संस्थेला आपण देणगी दिल्यास ती नक्कीच सत्कारणी लागून मोठे पुण्यकर्म ठरेन. 


$$$$$
१०. कर्जत तालुका

१. कर्जतचे गोदड महाराज 
कर्जतचे ग्रामदैवत व तालुक्याचे भूषण म्हणून गोदड महाराजांची गणना होते. गोदड महाराजांचे गुरू नारायणनाथ यांनी प्रसाद म्हणून स्वतःची गोधडी महाराजांना दिली म्हणून त्यांना तेव्हापासून गोदड महाराज म्हणून ओळखू लागले. गोदडमहाराज पंढरीच्या पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. ते नेमाने पंढरीची वारी करीत. परंतु मध्यंतरी काही अडचण आल्याने त्यांना वारीला जाता आले नाही. तेव्हापासून दरवर्षी पांडुरंग स्वतः आषाढ व ।। ११ ला गोदड महाराजांच्या भेटीला येत असतात अशी तेथील लोकांची गाढ श्रद्धा आहे. म्हणून आषाढ व ।। ११ला येथे गोदड महाराजांची मोठी यात्रा भरते. पांडुरंगाची मूर्ती ठेवून कर्जत शहरात दरवर्षी भव्य मिरवणूक काढली जाते. महाराजांनी काही साहित्य निर्माण केले त्यापैकी 'जग तारक' हा ग्रंथ फार मोलाचा होता. ६० संवत्सरांचे भविष्यकथन त्यांनी करून ठेवले आहे. दरवर्षी चैत्री पाडव्याला चालू संवत्सरांचे वाचन भक्तगण करतात ते ऐकण्यास मोठा भक्तगण जमा होतो. फार पुरातन 'नकटीचे देऊळ' प्रसिद्ध आहे. कर्जतला 'धाकटी पंढरी' म्हणून स्थानिक लोक ओळखतात. त्या उत्सवात कर्जतकर बाहेर कोठेही असले, तरी त्यावेळी आवर्जून उपस्थित राहतात. कर्जतला तीर्थस्थळाचा दर्जा मिळण्यासाठी तालुक्यातील भक्तगण प्रयत्नशील आहेत.

२. दुर्गाव 
प्रचलित मंदिरे जसे मारुतीचे, गणेशाचे, रामाचे, महादेवाचे मंदिर जसे गावोगाव दिसतात तसे दुर्योधनाची मंदिरे दुर्मिळ आहेत. दुर्गावला हे अनोखे दुर्योधनाचे मंदिर आहे. हेमाडपंथी महादेवाच्या मंदिराच्या कळसाजवळ खोबणीत दुर्योधनाची मूर्ती आहे. दुष्काळात दुर्योधन प्रथेनुसार कोंडला जातो. गावात परंपरेने दुष्काळात दुर्योधन कोंडून ठेवला जातो. या मंदिराच्या जवळच अश्वत्थामाचे सुद्धा दुर्मिळ असे मंदिर आहे. या मंदिरामुळे गावाचे नाव दुर्गाव असे पडले असे स्थानिक लोक सांगतात.

३. राशीन (यमाईचे)
नगरपासून ९० कि. मी. अंतरावर राशीन गाव असून यमाई देवीच्या नावामुळे राशीनला यमाईचे राशीन म्हणून ओळखले जाते. हे मंदिर इ. स. १७६८च्या सुमारास अकाप्पा भुजंगाप्पा जंगम-शेटे यांना झालेल्या दृष्टांतामुळे त्यांनी बांधल्याचा शिलालेख बारवेवर आहे. ४५ ओवऱ्या, तटबंदी, भव्य असे प्रवेशद्वार, दोन हालत्या दीपमाळा, भव्य आवारामध्ये एकसंघ कोरलेले सिंह शिल्प आहे. हे या देवीचे खास वैशिष्ट्य आहे. नवरात्रात 
$$$$$
आणि दसऱ्याला मोठी यात्रा भरते. स्वयंभू चतुर्भुज मूर्ती असून हे माहुरच्या रेणुकादेवीचे स्थान असून जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे १५०० वर्षांपूर्वीचा या मंदिराचा इतिहास आहे. अनेकवेळा मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचे लोक सांगतात. हलत्या दीपमाळा सध्या धोक्याच्या झाल्यामुळे वर चढणे बंद केले आहे. कोजागिरी पौर्णिमेला 'भलादे' किंवा 'भळंद' हा विधी केला जातो. सायंकाळी एका मातीच्या घागरीत हळद-कुंकू, खण, बांगड्या असे सौभाग्य लेणे ठेवून त्यावर सरकी टाकतात. ती पेटवून देवीची आरती म्हणत प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर आतील वस्तू न जळता तशाच राहतात. हा शुभशकुन व दैवी चमत्कार मानला जातो.
'येमाई' नावाची लोककथा प्रसिद्ध आहे. प्रभू रामचंद्र वनवासात असताना दंडकारण्यातून रावणाने सितेला पळवून नेले. त्यावेळी प्रभू रामचंद्र सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन रानोमाळ भटकत असताना देवी पार्वतीने पत्नी निष्ठा पाहण्यासाठी सीतेचे रूप धारण करून रामासमोर प्रकट झाली. रामाने पाहताच लहान लेकराप्रमाणे हात पसरून साद घातली 'ये माई' म्हणून देवीला 'यमाई' म्हणून ओळखले जाते.

४. रेहकुरी अभयारण्य
अहमदनगरपासून ७० कि. मी. अंतरावर विस्तीर्ण असे रेहकुरी अभयारण्य पहायला मिळते. पर्यटकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्राणीदर्शन या अभयारण्यात मिळते. लांडगा, मुंगुस, ससे, हरीण, खोकड, साळींदर, चिंकारा, काळवीट इ. प्राणी येथे पाहण्याची अपूर्ण संधी येथे मिळते. अभयारण्याचे क्षेत्र ३४० हेक्टर असून हे प्राणी पाहण्यासाठी अनेक मनोरे उभे केलेले आहेत. पर्यटकांनी सप्टेंबर ते डिसेंबर या कालखंडात या अभयारण्याला भेट देणे सोईस्कर आहे असे वन विभागाचे म्हणणे आहे. पर्यटकांच्या सोईसाठी अभयारण्यात विश्रामगृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. माळढोक पक्षाचेही येथे प्रत्यक्ष दर्शन होते. पर्यटकांनी योग्य वेळी भेट दिल्यास भरपूर आनंद मिळू शकतो. 

५. सिद्धटेकचा गणपती 
अष्टविनायकापैकी उजव्या सोंडेचे एकस्थान म्हणजे सिद्धटेकचा गणपती. अहमदनगरपासून १०० कि. मी. अंतरावर हे गणपतीचे स्थान आहे. सिद्धीविनायकाचे उत्तरमुखी मंदिर फार प्रसिद्ध आहे. हे मंदिर अहिल्याबाईंनी बांधलेले आहे. सध्या त्याचा जीर्णोद्धार व विस्तार सुरू असून महाराष्ट्र शासनाने विशेष असे आर्थिक सहाय्य या स्थळाला दिलेले असल्यामुळे भाविकांची गर्दी वाढत आहे. दौंडपासून १३ कि. मी. अंतरावरील या स्वयंभू स्थानाबाबत माहिती देताना येथील पुजारी सांगतात की, मोरया गोसावी यांनी पूर्वी या ठिकाणी घोर तपश्चर्या केल्यामुळे त्यांच्या तपश्चर्येमुळे हे स्थान निर्माण झाले. दर महिन्याच्या चतुर्थीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. माघ महिन्यात येणाऱ्या गणेश 
$$$$$
चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते. या ठिकाणी आल्यावर आपल्याला पेशवे सरदार हरीपंत फडक्यांचा पुरातन वाडा पहायला मिळतो. तसेच येथे व्यासांचे स्थानही पहायला मिळते. नवीन होत असलेल्या विकास आराखड्यातील सुविधांमुळे येथे पर्यटकांची व भाविकांची मोठी सोय झालेली आहे.

६. मांदळी 
या ठिकाणी एक तपस्वी महाराज असून त्यांचे मौनव्रत चालू आहे. त्यांनी एका मंदिराचे काम लोकवर्गणीतून सुरू केले असून अनेक भाविक तेथे महाराजांच्या दर्शनाला येतात. अनेक पिडीतांना त्यांनी व्याधीमुक्त केले असल्यामुळे पिडीत आपला आजार हमखास बरा होईल या आशेने येथे येतात. 



















$$$$$
११.श्रीगोंदा तालुका

१. श्रीगोंदा
श्रीगोंद्याचे ग्रामदैवत कबीराचे अवतार समजले गेलेले श्री. शेख महंमदबाबा म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव राजमहंमद तर आईचे नाव दुल्हेशा शेख महंमद बाबांना चांद बोधले यांनी १६ व्या शतकात अनुग्रह दिला. त्यांचे गुरू बंधू श्रीसंत जनार्दनस्वामी, शेख महंमदबाबांनी ‘योग संग्राम' हा १८ अध्यायाचा २३१९ ओव्या असलेला ग्रंथ महाराजांनी अवलोकनासाठी काशीच्या पंडितांकडे पाठविला. त्यांनी तो ग्रंथ शेख महंमद नावाच्या मुस्लिमाने लिहिल्याचा राग धरून तो रागाने गंगेत फेकून दिला. शेख महंमदबाबांना हे समजल्यावर त्यांना फार दुःख झाले. त्यांनी आपल्या एका शिष्याला तो गंगेत बुडालेला ग्रंथ आणायला पाठविले आणि आश्चर्य म्हणजे तो ग्रंथ गंगामाईने त्या शिष्याला अगदी जसाच्या तसा पुन्हा दिला अशी अख्यायिका तेथील भक्तगण सांगतात. त्यांनी आणखी काही ग्रंथ लिहिले त्यापैकी निष्कलंक प्रधान, पवनविजय, प्रबोधरूपके, ज्ञानसागर ग्रंथ काही भारूडे, अभंग इ. प्रसिद्ध आहेत. त्यांनी मराठी, हिंदू, ऊर्दू, फारशीत रचना केल्या. फाल्गुन शके १६१८ ला श्रीगोंदा येथे समाधी घेतली. त्यानिमित्त येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. मालोजी राजेभोसले त्यांच्या दर्शनासाठी येत. त्यावेळी त्यांनी अनुग्रह घेऊन मठ व जमीन दान दिली.
श्रीगोंद्यात आणखी काही मंदिरे आहेत. त्यापैकी सूर्यमंदिर, बारा महादेव मंदिर, व्यंकटेश मंदिर प्रसिद्ध आहे. साळवण देवीची अख्यायिका प्रसिद्ध आहे. पूर्वी एकनाथ पाठक नावाचा भक्त दर पौर्णिमेला माहूरगडावर जायचा. वयपरत्वे त्याला माहूरगडावर जाता येईना म्हणून गावाजवळ साळीच्या शेतात देवी प्रकट झाली व भक्ताला दर्शन दिले म्हणून 'साळवणदेवी' नावाने देवी प्रसिद्ध आहे. श्रीपूर, चांभारगोंदे ही या गावाची पूर्वीची नावे आहेत. श्रीगोंदा शहरात १०८ तीर्थस्थाने, पाच संत समाध्या, शिंदे घराण्याचा पराक्रम व ऐश्वर्याची साक्ष देणारे! पुरातन वाडे अशा या नगरीत जाती व्यवस्थेच्या चौकटी बाहेरची शिकवण संत शेख महंमद महाराजांनी दिली. ही शिकवण वर्षानुवर्षेश्रीगोंदेकर आचरतात. 

२. राजधानीचे खंडोबा मंदिर 
गुडगाव जवळ पंचटेकडी डोंगरावर हे प्रसिद्ध खंडोबाचे मंदिर असून त्याच्याजवळ एक मूर्ती नसलेले अनोखे मंदिर पहायला मिळते. या मंदिराचे आतल्या बाजूस अनेक पक्षी दगडावर कोरलेले पहायला मिळतात.


$$$$$
३. कोळगाव 
नगर-श्रीगोंदा रस्त्यावर कोळगाव हे लहानगाव आहे. तेथे 'कोळाईदेवी' चे जागृत स्थान प्रसिद्ध आहे. तेथे सय्यदबाबा दर्गा प्रसिद्ध असून बाळकेश्वर देवस्थान हेमाडपंती प्रकारचे मंदिर पहायला मिळते. दरवर्षी चैत्र शु ।। १५ ला कोळाईदेवीची मोठी यात्रा भरते. अनेक भक्तगण नवस फेडायला यात्रेला जमतात. कोळगावचा कबुतरखाना पाहण्यासारखा आहे.

४. विसापूर 
कुकडी कॅनॉलचे पाणी या तलावात सोडल्याने या तलावाचा परिसर समृद्ध झाला आहे. विसापूरचा तुरुंग प्रसिद्ध असून अनेक सत्याग्रहींना स्वातंत्र्यसेनानींना स्वातंत्र्य पूर्व काळात बंदीवान करून ठेवले होते. 

५. मांडवगण 
मांडवगण या गावाला मांडवऋषींनी घोर तपश्चर्या केली. त्यावरून त्या गावाला मांडवगण हे नाव पडले. आज त्यांची समाधी त्याची साक्ष म्हणून आहे. गावाजवळ उंच डोंगरात सुमारे १०० फूट खोल गुहा असून तेथे सिद्धेश्वराचे सुंदर असे मंदिर असून ते अहिल्याबाई होळकर यांनी बांधले आहे.
तसेच श्री. हरिदास, संतकवी त्र्यंबकजी काटे हे मूळ मांडवगणचे. आपले गुरू गोपाळ यांच्या आज्ञावरून त्यांनी 'प्रल्हाद चरित्र' लिहिले. दोन हजारांहून अधिक श्लोकांचे हे काव्य असून आज हे काव्य पूर्ण स्वरूपात उपलब्ध नाही. या शिवाय द्रौपदी दुर्वास आख्यान, श्रीकृष्ण उद्धव आख्यान, तसेच काही हिंदी आणि कन्नड पदे त्यांनी लिहिली.

६. पेडगाव 
संभाजी राजांची औरंगजेबाने उंटावरून धिंड ज्या ठिकाणी काढली ते गाव म्हणजे पेडगाव. हे गाव भिमानदी किनाऱ्यावर असून अनेक ऐतिहासिक अवशेष आज वाडे, भिंती, किल्ल्याच्या रूपाने भग्न अवस्थेत पहायला मिळतात. येथील भुईकोट किल्ला पाहण्यासारखा आहे. मल्लिकार्जुन, बाळेश्वर, लक्ष्मीनारायण, भैरवनाथाचे मंदिर येथे पहायला मिळते. अनेक इतिहासाच्या खुणा येथे इतिहासाच्या साक्षीदार आहेत. 



$$$$$
७. हंगेवाडी 
अहमदनगर दौंड रस्त्यावर नगरपासून ६० कि. मी. वर मढे वडगाव त्याच्या पश्चिमेस ७ कि. मी. वर चिंभळे व तेथून पुढे साधारण ३ कि. मी. अंतरावर हंगेवाडी हे पवित्र तीर्थस्थान आहे. पुण्यावरून वाघोली-शिक्रापूर-न्हावरे-चिंचणी मार्गेबसने येता येते. गावात रायकर, जायकर, पांढरकर या आडनावाचा माळी समाज व भोई समाज व इतर समाजाचे लोक येथे राहतात. १५-२० कि. मी. परिसरात येथे असणाऱ्या शिवालयाचे भक्त आहेत. हंगेवाडीचे हंगेश्वर हे शिवतीर्थ अतिशय जागृत असे स्थान आहे. हंगेश्वराचे पुजारी भाऊसाहेब गिरी, सूर्यवंशी, दळवी सर, जनार्दन काळे, रामदास काळे हे आहेत.
या संदर्भात भक्त अख्यायिका सांगतात. फार पूर्वी वहऱ्हाड प्रांतात गंगाधर सेन राजा होता. त्याला एक मुलगा होता. परंतु राजाचे नातू विश्वनाथ वर फार जीव होता. परंतु दुर्दैवाने त्याच्या अंगावर कोड फुटल्याने राजा फार दुःखी झाला. नाना उपाय केले परंतु गुण आला नसल्याने विश्वनाथ फार दुःखी होता. तो सारखा स्वतःशी विचार करायचा एवढे सारे वैभव असून माझ्याच वाट्याला हे दुःख का यावे? एके दिवशी कोणाला न विचारता तो राजवाड्यातून पळून गेला. भटकत भटकत एका नदीकाठी डोंगरावर पडक्या शिव मंदिरात थांबला. हेच ते हंगेश्वर मंदिर. तो तेथेच रमला शिवपुजा करायचा जवळ नदीवर स्नानाला जायचा परिसरातील लोक त्याची निस्सीम भक्ती पाहून त्याची सर्व प्रकारची काळजी घेऊ लागले. एके दिवशी भल्या पहाटे भगवान शंकराने दृष्टांत दिला तू ज्या चिंतेने घर सोडले ती चिंता दूर होईल. तो उपाय भगवान शंकराने सांगितला. नदीच्या प्रवाहाच्या दिशेने चालत जा मोठे वडाचे झाड व पूर्वेस थोड्या अंतरावर छोटे जीर्ण मंदिर दिसेल तेथे थांब. माझे त्या परिसरात नाग रूपात वास्तव्य आहे. तुला दुपारी १२ वाजता एक नाग गायीचे दूध पिताना दिसेल. दूध पिताना जो फेस खाली पडेल तो फेस सर्व अंगाला लाव. तुझे कोड जाऊन सुंदर कांती व सर्व गुण संपन्न होशील. त्याप्रमाणे त्याने केल्यावर त्याचे कोड जाऊन सतेज सुंदर रूप त्याला प्राप्त झाले. तो आनंदाने तेथेच राहून तपश्चर्या करू लागला. राजाच्या दुतांनी त्याचा शोध घेऊन त्याला गंगाधर सेनकडे नेण्याचा प्रयत्न केला. भगवान शंकराने स्वप्नात पुन्हा संदेश दिला टेकडीवर पाच पिंडरूपी शाळीग्राम थोड़े खोदल्यावर सापडतील तेथे शिवमंदिर बांध. त्याप्रमाणे त्याने सुंदर असे मंदिर बांधून तेथे सेवा करीत राहिला.
या देवस्थानच्या पुजेचा मान होणे आडनावाच्या कुटुंबाकडे तसेच घडशी, काळे या कुटुंबाकडे आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते.
जगावेळा लग्न सोहळा - फार पूर्वी सरदार गायकवाड यांच्यापूर्वीचे शिरसगाव काटा येथील जहागिरदार कदम यांच्या मुलाबरोबर लग्न निश्चित झाले. मुहूर्त ठरला हळद लागली ५ दिवसांनी लग्न असल्याने परिसरातील प्रथे प्रमाणे लग्नापूर्वी जोडीने हंगेश्वर दर्शनासाठी गेले. नवरी मुलीसोबत काष्टी, ता. श्रीगोंदे येथील राहिंज कुटुंबातील कलवरी सोबत होती. त्यांनी मंदिरात यथासांग पूजा केली व मतीभावे प्रार्थना करून दर्शनासाठी मस्तक जमिनीला टेकवली ते तिघे पुन्हा उठलेच नाहीत. त्यांच्या पाषाणरूपी तीन शिळा झाल्या. 
$$$$$
आजही हंगेश्वर मंदिरात या पहायला मिळतात. तेव्हापासून दरवर्षी वैदिक पद्धतीने काठी रूपात चैत्र शु ।। १५ वा वैदिक पद्धतीने विवाह सोहळा उत्सव साजरा केला जातो. त्यांच्या अतृप्त इच्छा अशा पद्धतीने दरवर्षी लग्न पद्धतीने भक्तिभावाने परिसरातील भाविक श्रद्धेने साजरा करतात.
काटेमोड सोहळा - हा सोहळा चैत्र व माघ महिन्यातील पौर्णिमेला वर्षातून दोन वेळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पुजारी कार्यक्रमाच्या अगोदर दीड महिना देवळात वास्तव्य करून राहतो. तसेच तो स्वतः आपले जेवण स्वतः बनवतो. स्त्रियांच्या हातचे त्या काळात खात नाही. म्हणजेच ब्रह्मचर्य व स्वावलंबन पद्धतीने तो देवळात वास्तव्य करून राहतो. मंदिरासमोरील पायऱ्यांच्या उजव्या बाजूस १० फूट त्रिजेचा व जमिनीपासून ६-७ फूट उंचीच्या वर्तुळाकार दगडी चौथऱ्यावर अडीच ते तीन फूट त्रिजेच्या वर्तुळाकार बाभळीचा जुन्या काट्यांचा ढीग साधारण तीन फूट उंच गोलाकार रचला जातो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी हा काटेमोड सोहळा सुरू होतो. भक्तगण हजारोच्या संख्येने हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी करतात. त्यांना आवरण्यासाठी कार्यकर्तेकडे करतात. पुजारी अंगातील सर्व कपडे मंदिरात उतरून ठेवतो. फक्त कमरेला धोतर व डोक्याला पागोटे गुंडाळून पालखी व वाजंत्रीच्या गजरात काटे अंथरलेल्या चौथऱ्याच्या दिशेने जयघोष करीत उड्या मारीत येतो आणि चौथऱ्यावर ठेवलेल्या काट्याच्या ढिगावर उडी टाकतो. त्याच्या सर्वांगाला काटे घुसलेले असतात. कार्यकर्तेसावधपणे त्याला काट्यातून बाहेर काढून मंदिरात ठेवलेल्या राखेच्या ढिगाऱ्यावर नेऊन झोपवतात आणि सर्व भक्त जगावेळाच लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी निघून जातात. हाच तो काटोमोड सोहळा अनेक वर्षांपासून येथे सुरू आहे. दैवीशक्तीमुळे पुजान्यास कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. या कार्यक्रमात हंगेवाडी, काष्टी, चिंभळे, शिरसगाव काटा व गुनाट या गावच्या भक्त मंडळीमार्फत पार पाडला जातो. हा सोहळा आनंदाने, एकोप्याने अनेक वर्षांपासून सुरू आहे. दूरदूरचे भक्त हा सोहळा व लग्न सोहळा पाहण्यासाठी जमत असतात. 

८. चिंचणी डॅम 
श्रीगोंदा तालुका व शिरूर तालुका, पुणे जिल्हा या भागाला शेतीसाठी या डॅममधून पाणी मिळते. त्यामुळे हा भाग समृद्ध बनला आहे. या डॅमला २७ मोऱ्या असून डॅम पाहण्यासारखा आहे. परिसरातील पर्यटक येथे आवर्जून सहलीसाठी येतात.

९. देवदैठण
अनेक जुनी मंदिरे या गावात असून त्यावरील शिल्पकाम, कोरीवकाम अतिशय चांगले असल्याने अनेक पर्यटक हौसेने येथे छायाचित्रे घेतात व आनंद लुटतात.

$$$$$

१२.जामखेड तालुका

१. जामखेड 
जामखेडपासून १ कि. मी. अंतरावर रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविलेल्या पद्मभूषण डॉ. रजनीकांत आरोळे यांचा सर्वंकष ग्रामीण आरोग्य प्रकल्प आहे. १९७१ पासून आरोग्य सेवेचे अखंड कार्य येथे सुरू असून परिसराचे जीवनमान सर्व पद्धतीने उंचावण्याचा या ठिकाणी अविरत प्रयत्न सुरू असल्याने जामखेडचे नाव केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतले जाते. याचे सर्व श्रेय डॉ. आरोळे दाम्पत्याकडे जाते. ग्रामीण भागातील लोकांच्या एकूणच जगण्याला नवा अर्थ या आरोग्य प्रकल्पाने प्राप्त करून दिला आहे.
कापड विक्री क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव म्हणजे एच. यू. गुगळे यांचे भव्य कापड दुकान. परिसरातील लोकांचे कापड खरेदीचे भव्य दालन. अनेक तऱ्हेचे कपडे व रेडिमेड नगरला येण्याऐवजी या ठिकाणी लोक खरेदी करणे पसंत करतात. जामखेड शहराच्या दक्षिणेला जटाशंकर मंदिराजवळ कलकत्याच्या कालिका मातेचे मंदिर असून २०० वर्षांपूर्वी या देवीची स्थापना झाली हे सोमवंशी कासार क्षत्रीय समाजाचे दैवत आहे. मंदिरामध्ये सिंहासनावर ४॥ फूट उंचीची एकसंघ चतुर्भुज दगडी मूर्ती असून ती मूर्ती चालुक्य राष्ट्रकुट काळातील असावी असे स्थानिक लोक सांगतात. या देवीचा उत्सव वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो. 

२. खर्डा 
अहमदनगरपासून ९७ कि. मी. वर जामखेडपासून २३ कि. मी. अंतरावर खर्ड्याचा भुईकोट किल्ला रस्त्यालगतच पहायला मिळतो. हा किल्ला उत्तर मुखी, चौकोनी असून तटबंदी व प्रवेशद्वार अद्याप चांगल्या परिस्थितीत आहे. किल्ल्यामध्ये एक बारव व एक मशीद आहे. खर्ड्याचे पूर्वीचे नाव शिवपट्टण असे होते. हा किल्ला १७७३ला सरदार सुलतानराव निंबाळकरांनी बांधला. मराठ्यांनी मोंगलाकडून हा किल्ला ११ मार्च १७९५ रोजी ताब्यात घेतला. त्यामुळे या किल्ल्याला विशेष ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. येथील ग्रामदैवत मायंबा गड (मच्छिंद्रनाथ) व कान्होबा गड (कानिफनाथ) येथील यात्रा मार्च महिन्यात ४ दिवस असते. हिंदू मुस्लिम समाजाचे आराध्य दैवत असल्याने सर्व समाजाचे लोक यात्रेस येतात. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेली ही यात्रा समजली जाते. खर्ड्याच्या उत्तरेला १ ॥ कि. मी. वर टेकडीवर समोरासमोर ही मंदिरे आहेत. पहिला दिवस गोपाळकाला (कंदुरी) व दुसरा दिवस तमाशा, तर तिसऱ्या दिवशी संदल मिरवणूक काढली जाते. देवाचे वाहन घोडा असून सजवून त्याची मिरवणूक काढली जाते. होळीच्या दिवशी खर्डा पंचक्रोशीतील लोक दर्शनासाठी येतात. दुपारी २ वाजता ४०-५० फुटी कानिफनाथाच्या मानाच्या काठ्या सजवतात. नवस बोलून काठीला नारळाचे तोरण बांधतात. ५ वाजता शिखरावर पुजा होते व मोठी यात्रा भरते.
$$$$$
३. रामेश्वर सौताडा 
नगर-बीड सीमेवर अहमदनगरपासून ९० कि. मी. अंतरावर रामेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराजवळ २५० फूट उंचीवरून कोसळणारा नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी दूरवरून पर्यटकांची सतत वर्दळ असते. या ठिकाणाहून विंचरणा नदी उगम पावते. जवळच बंधारा बांधण्यात आला असून पर्यटकांसाठी सुंदर असे उद्यान पर्यटकांना आकर्षित करीत असते. येथे पवनऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. निसर्गरम्य असा हा परिसर पर्यटकांनी आवर्जून पाहून निसर्गाचा आनंद जरूर लुटावा. येथे जाण्यासाठी सौताड्याहून थोडे अंतर चालून जावे लागते.

४. चोंडी 
नगर-करमाळा रस्त्यावर चोंडी फाट्यापासून जवळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे जन्मस्थान. इ. स. ३० मे १७२५ मध्ये अहिल्यादेवीचा येथे जन्म झाला. तो वाडा आजही पहायला मिळतो. त्या इमारतीचा अलिकडेच जीर्णोद्धार केला आहे. त्यांचे वडील माणकोजी शिंदे व शिंदे घराण्यातील काही समाध्या सीना काठी पहायला मिळतात. गावात अहिल्यादेवींनी बांधलेले शिवमंदिर व नदीला सुंदर घाट बांधलेला दिसतो. चौंडेश्वरीचे मंदिर सुंदर आहे. अलिकडे महाराष्ट्र शासनातर्फे विजयस्तंभ आणि भव्य असे सभागृह बांधले आहे. नदीवर गावात जाण्यासाठी अलिकडे पूल बांधण्यात आला आहे. भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महाराण्या होऊन गेल्या. त्यामध्ये उत्तुंग व्यक्तिमत्त्व, पावित्र्य, रयतेप्रती निस्सीम प्रेम, प्रशासकीय सक्षमता अशा पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी माळवा प्रांताचा ३० वर्षेउत्कृष्ट राज्यकारभार केला. भारतातील अनेक ठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, जलकुंभ, पाणपोया, घाट, पाठशाळा स्थापन करून धार्मिक कार्य केले.








$$$$$
१३. पाथर्डी तालुका

१. पाथर्डी 
पाथर्डी हे पौराणिक वारसा लाभलेले एक शहर आहे. 'पाथर्डी' नाव शहराला का पडले. त्याबाबतचा इतिहास जाणकार सांगतात. तो असा पाथर्डी ही बब्रुवाहन यांची राजधानी. अर्जुनाचे व बब्रुवाहनाचे येथे घनघोर युद्ध झाले. त्या प्रसंगी भगवान श्रीकृष्णांनी दोघांमध्ये मध्यस्थी केली. अर्जुनाची शिष्टाई केली. त्या प्रसंगी धनुर्धर अर्जुन अक्षरशः रडला. म्हणजे पार्थ रडला ते ठिकाण म्हणजे पाथर्डी. पाथर्डीला मोठी बाजारपेठ असून परिसरात मोठे गाव नसल्याने परिसरातील लोकांची ही बाजारपेठ आहे. येथील आठवडेबाजार मोठा भरतो.

२. श्रीक्षेत्र मोहटादेवी 
मोहटा देवी में मंदीर हे श्री यंत्राच्या आकारामध्ये साकारले आहे. अहमदनगर शहरापासून मोहटा मंदीर ८२ किलोमीटर अंतरावर आहे. 
पाथर्डीपासून ११ किलोमीटर अंतरावर डोंगरमाथ्यावर असलेले हे शक्तिपीठ 'मोहटादेवी' हे अतिशय जागृत स्थान म्हणून समजले जात असल्याने नगर जिल्ह्यातील शिर्डी, शनिशिंगणापूर प्रमाणे देशाच्या विविध भागातून रोज दर्शनासाठी येणारांचे हे श्रद्धास्थान बनले आहे. जुन्या दगडी मंदिरात दोन फूट उंचीचा शेंदूर लावलेला तांदळा त्यावर मातेचा चेहरा दिसून येतो. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे देणग्यांचा ओघही वाढतो आहे. तेव्हा विश्वस्ताकडून परिसरात व मंदिराची विकासकामे वाढत आहेत. मंदिराचे सुशोभिकरण, होमकुंड, कमानी, ओवऱ्या व सभामंडप प्रेक्षणीय आहे. देवीचे स्थान माहुरच्या रेणुकादेवी शक्तिपीठाचे अंशात्मक स्थान मानले जाते. नवरात्रौत्सवात देवीची मोठी यात्रा भरते. ही यात्रा आश्विन शु॥ ११ला भरते. मोहटादेवीचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आहेत. मंदिर परिसराची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. नवसाला पावणारी जागृत देवी म्हणून सतत भाविकांची गर्दी असते. देवीच्या महिम्याचा मराठी चित्रपट मोहट्याची रेणुका नुकताच प्रदर्शित झाला आहे. भक्तांच्या सोईसाठी पाथर्डी ते मोहटादेवी बससेवा सुरू आहे. भव्य सभामंडपात सतत अनेक कार्यक्रम, उत्सव, लग्न समारंभ होत असतात. भाविकांना अल्पदरात राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली जाते. रुग्णसेवेसाठी दवाखाना सुरू आहे. 
नवरात्रौत्सवात संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या मोहटादेवी येथे २५ लाखांपेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येतात. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक राज्यातून सुद्धा हजारोंच्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. शारदीय 
$$$$$
नवरात्र महोत्सव ते पौर्णिमेपर्यंत विशेष गर्दी असते. दर मंगळवार, शुक्रवार, रविवार, पौर्णिमेला परिसरातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. नवरात्रौत्सवात गडावर घटस्थापना केली जाते. त्यावेळी अनेक भाविक स्त्रिया मंदिरात उपास करून वास्तव्य करतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या त्या नवसपूर्ती करून समाधानी होतात. भाविक उपास काळात पायात चप्पल न घालता वावरतात. काही उभे राहून उपास करतात. मंदिर आता खूप विस्तर्ण व सुंदर प्रकारे बांधलेले असल्याने भाविकांना चांगल्या सुविधा मिळतात. भक्तनिवासामध्ये आता आणखी विस्तार झालेला आहे. अतिशय मनाला आनंद देणारा परिसर असल्याने पुन्हा पुन्हा जावेसे वाटते.

३. मढी 
नगर-पाथर्डी मार्गावरील निवडुंगे गावापासून वरती डोंगराकडे जाणाऱ्या फाट्याने थोड्या अंतरावर मढी येथे नवनाथापैकी कानिफनाथांची संजीवन समाधी मंदिर आहे. नगरपासून मढीचे अंतर ५१ कि. मी. आहे. होळी ते गुढीपाडवा या दरम्यान येथे फार मोठी यात्रा भरते. सर्व भटक्या जातीजमातीचे जातीमधील न्याय निवाडे 'जातपंचायत' मार्फत केले जातात. होळी पेटवायचा मान गोपाळ समाजाचा आहे. येथील गाढवांचा बाजार फार प्रसिद्ध आहे. दूरदूर वरून गाढवांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापारी व ग्राहक येतात. अनेक भटक्या जातींमध्ये विवाह सोहळे येथे पार पडतात. वैदू, कुंभार, परीट, कैकाडी, वडारी इ. भटके जमातीचे लोक विशेष करून या यात्रेत दिसतात. रंगपंचमी हा यात्रेतला फार महत्त्वाचा दिवस असतो. जातपंचायतचे उंच ठिकाणी विशिष्ट स्थान आहे. मंदिराचे दार अतिशय लहान असल्याने १२-१५ चे जथ्थे करून दर्शन घ्यावे लागते. मढीच्या जात पंचायतचे चित्रण 'आस्था' चित्रपटात दाखविण्यात आल्यामुळे दूरदूरच्या भाविकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या बाजारात मुंगुस आणि डुकराचे केस विक्री केली जाते.
डोंगरगण ता. नगर येथे गोरक्षनाथांची समाधी, तर मढी ता. पाथर्डी येथे कानिफनाथांची समाधी, जालिंदरनाथांची समाधी, खोकरमोहो. रेवननाथ समाधी ईट ता. जामखेड, दीनानाथांची समाधी मुखेड गुप्तनाथ, राशीन ता. कर्जत, केसरीनाथ आणि उपबोधननाथ कारखेल, ता. नगर अशी सह्याद्रीच्या डोंगर परिसरात नऊ नाथांचा संचार, वास्तव्य, कार्य आपल्याला दिसून येईल. 

४. वृद्धेश्वर
अहमदनगरपासून ३५ कि. मी. अंतरावर नाथ संप्रदायाचे सर्वश्रेष्ठ असे आदिनाथांचे म्हातारदेव हे स्थान फार पुरातन आहे. प्राचीन महादेवाच्या मंदिरात शिवलिंग सतत वाढत असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच या शिवलिंगातून सतत पाणी वाहत असलेले 
$$$$$
आपल्याला दिसून येते. परिसर अतिशय मनमोहक आहे. गर्भगिरी डोंगररांगेतील अतिशय सुंदर असे हे स्थान असल्याने भाविकांची येथे सतत वर्दळ असते. या परिसरात दुर्मिळ अशा औषधी वनस्पती सापडतात.
भव्य सभामंडप, गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग, पुढे नंदी, कमानीत विणाधारी नारद, धुनी, त्रिशूळ, हनुमान, नागमूर्ती या सर्व नाथपंथी दैवते असून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नेवासा येथे लिहून पूर्ण केली. परंतु पहिली ओवी वृद्धेश्वरासमोर लिहून आशीर्वाद घेतले असे सांगतात. संत ज्ञानेश्वरांनी येथे ध्यानधारणा केली तो औदूंबर वृक्ष आजही येथे आहे. दिनकर स्वामींनी सुद्धा येथे साधना केल्याचे सांगतात. (संदर्भ - नाथ संप्रदायाचा इतिहास - रा. चि. ढेरे) ९०० वर्षांपूर्वी श्रवणपदे व राजाने दिलेली घंटा आजही आहे. मंदिराची रचना इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की, बाराही महिने सूर्य मावळताना त्याची किरणे पिंडीवर पडतात. श्रावणी सोमवारी फार मोठी यात्रा भरते. महाशिवरात्रीला भक्त पैठणहून गंगेच्या पाण्याच्या कावड्या आणतात. वयस्कर निपुत्रिकांना संतती प्राप्त होते अशी श्रद्धा असल्याने या ठिकाणी नवसासाठी फार लोक श्रद्धेने येतात.

५. भगवानगड 
नगरपासून ९० कि. मी. अंतरावर नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर हे पावन असे स्थान आहे. पूर्वी या गडावर धौम्य ऋषींचा आश्रम होता. त्यामुळे या गडाला विशेष महत्व आहे. बीड जिल्हा व नगर जिल्ह्यातील भाविक विशेषतः वंजारी समाजाचे भक्तगण मोठ्या संख्येने या गडावर उत्सवाचे वेळी दिसून येतात. ह.भ.प. भगवानबाबांनी या गडावर जाण्यासाठी फार सुधारणा केल्या. येथे वारकरी संप्रदायाचे अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. गुढीपाडवा, दसरा तसेच भगवानबाबांचा पुण्यतिथी उत्सव वगैरे कार्यक्रम येथे होतात. त्यावेळी लाखो भाविक गडावर उपस्थित असतात. महाराष्ट्र शासनाने भाविकांच्या निवासाची, पाण्याची, वाहनाची, मंदिर परिसर विकासाचे कामासाठी भरीव मदत दिली आहे. सध्या गडावर ह.भ.प. महंत नामदेव शास्त्री हे गडाचा कारभार पाहतात. 

६. लोहसर खांडगाव 
नगरपासून सुमारे ३० कि. मी. अंतरावर कालभैरवाचे जागृत स्थान प्रसिद्ध आहे. चैत्र शु ।। १५ला येथे फार मोठी यात्रा भरते. पुराणकथेत अमृतमंथनाचे वेळी राहुरीला राहुचा वध झाला. परंतु त्याचे डोके लोहसरजवळच्या राघो हिवरे येथे पडले आणि गळ्यातील लोखंडी सरी लोहसरला जाऊन पडली म्हणून गावाला लोहसर असे नाव पडल्याची अख्यायिका स्थानिक लोक सांगतात. मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झाला असून सभामंडप, ओवऱ्या मंदिर परिसर अतिशय प्रशस्थ असल्याने भाविकांना या ठिकाणी 
$$$$$
मनाला समाधान लाभते. गावातील बरीच कुटुंबे पोटापाण्यासाठी बाहेरगावी गेलेली आहेत. परंतु कोणी कुठेही असले तरी यात्रेला मात्र सर्वजण गावाला आवश्य येतात. 

७. नांदूर निंबादैत्य
दैत्यांची पूजा करणारे अनोखे गाव म्हणून परिचित असणारे नांदूर निंबादैत्य (ता. पाथर्डी) येथे गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रा भरते. महाराष्ट्रात सर्व गावांमध्ये हनुमानाची मंदिरे आहेत. नांदूर या गावात हनुमानाचे मंदिर तर नाहीच, पण हनुमान मारुती नावाची व्यक्तीही नाही. ग्रामदैवत म्हणून सर्व गावकरी निंबा दैत्याची पूजा करतात. या देवस्थानाची अख्यायिका अशी आहे - प्रभू श्रीराम वनवासात असताना काशी केदार या परिसरात भटकंती करत होते. श्री निंबादैत्य रामभक्त होते. परंतु रामभक्त हनुमान व निंबादैत्य यांच्यात या गावाच्या परिसरात युद्ध झाले. या युद्धात निंबादैत्याने हनुमानाचा पराभव केला. हनुमान बेशुद्ध होऊन राम राम म्हणून जप करत होते. राम हे शब्द दैत्याच्या कानावर येताच आपल्याबरोबर युद्ध करणारी व्यक्ती ही रामभक्त आहे हे समजल्याने दैत्याने हनुमानास अभय दिले. हनुमानाने नंतर रामाला सर्व हकिगत सांगितली. नंतर हनुमानाने निंबादैत्यास वचन दिले की हे रामभक्त दैत्या, मी तुझ्या भागात कधीही वास्तव्य करणार नाही. तेव्हापासून आजपर्यंत हनुमान मंदिर नाहीच. परंतु हनुमानाचे नावही येथे कोणी काढत नाही. गावात दैत्यांचे मंदिर दोन मजली असून त्यांच्यापेक्षा आपण कमी म्हणून गावात दोन मजली इमारतही नाही.

८. काशिकेदार 
रसेश्वर संप्रदायाचे महान आचार्य आणि भारतातील आद्य विज्ञान रसायन आणि आयुर्वेदाचे श्रेष्ठ प्रवर्तक श्री सिद्ध नागार्जुनाचे समाधी मंदिर असलेले हे स्थान शेवगाव-पाथर्डी सीमेवर सोनकडा दरीत असून अतिशय निसर्ग सौंदर्याने नटलेले हे ठिकाण आहे. या ठिकाणी खांडदेवळी मंदिर भग्न अवस्थेत पहायला मिळते. हे ठिकाण सुंदर असूनही दुर्लक्षित आहे. 

९. मिरी
पाथर्डी तालुक्यातील हे सरहद्दीचे गाव असून ऐतिहासिक वारसा असलेले हे। गाव आहे. सरदार नानासाहेब मिरीकरांचे गाव म्हणून याची ओळख आहे. सरदार मिरीकर हे मोठे इतिहास संशोधक होऊन गेले. गोपाळराव मिरीकर हे ज्येष्ठ पत्रकार याच गावचे. आनंदऋषी महाराजांनी जैन धर्माची दीक्षा याच गावात घेतली होती. नाट्य क्षेत्रातील अग्रगण्य नाव 'बालगंधर्व' यांचा या गावाला मोठा कार्यक्रम झाला होता. येथील ख्रिस्ती समाजाचे जुने चर्च आहे. दसऱ्याला दरवर्षी एका धनगर भक्ताला साक्षात्कार होतो पुढील $$$$$
वर्षाचे भाकित तो साक्षात्कार झाल्यावर कथन करतो. त्यावेळी परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतो.

१०. तिसगाव 
पाथर्डी तालुक्यातील हे ऐतिहासिक गाव असून नगर-पाथर्डी मार्गावर हे गाव आहे. या गावचे पूर्वीचे नाव 'हुसेनाबाद' असे होते. वजीर सलाबतखान याने हे गाव वसविले होते. सलाबातखानाचा भव्य वाडा आणि मोठी मशीद या ठिकाणी आहे. या गावाला भव्य अशा ३० वेशी होत्या त्यावरून गावाला तिसगाव हे नाव पडले. सध्या २-३ वेशी आज अस्तित्वात आहेत. परिसरातील खेड्यातील लोकांना तिसगाव ही बाजारपेठ असल्याने गावाचा विकास झाला आहे. वसिष्ट स्वामी व दिनकर स्वामी यांच्या समाध्या येथे पहावयास पहावयास

११. धामणगाव 
पाथर्डीपासून ३ कि. मी. अंतरावर श्रीक्षेत्र धामणगाव हे रेणुकादेवीचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर पुरातन असून माहूरगडच्या देवी बरहुकुम येथील देवीची मूर्ती आहे. नवरात्रीला ९ दिवस या परिसरातील भाविकांची मोठी गर्दी असते. जागृत देवस्थान म्हणून हे स्थान ओळखले जाते.

१२. चिचोंडी 
श्री आचार्य आनंदऋषीजी महाराज यांनी आध्यात्मिक जीवन आणि मानवता या संदर्भात खूप अभ्यास केला. म्हणून १९९२ साली त्यांना मानाची ‘आचार्य’ ही पदवी प्राप्त झाली इ.स.१९९२ साली त्यांचा स्वर्गवास झाला. 
नगर-पाथर्डी-पांढरीपूल मार्गावरील बस चिचोंडीवरून जातात. जैन धर्माचे महान संत तपस्वी धर्मगुरू आनंदऋषी महाराजांचे हे गाव असून त्यांनी परिसरातील गरीब जनतेसाठी मोफत दवाखाना सुरू केला. अहमदनगर येथे सुद्धा मोठे हॉस्पिटल आनंदऋषी स्मृतिप्रित्यर्थ सुरू आहे. त्यांचे धार्मिक साहित्य भारतभर मोठ्या आदराने वाचले जाते. परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी शिक्षण संस्था सुरू केली असून हजारो विद्यार्थी त्यांच्या संस्थेत शिक्षण घेत आहेत. चिचोंडी, पाथर्डी, अहमदनगर येथे शाळा आहेत.




$$$$$
१४. शेवगाव तालुका


१. शेवगाव 
बहामनी राज्याच्या सैन्याचा सरदार बहिरामखानने १३९६ साली पराभव केला. बहामनी सैन्याचा तळ जेथे पडला होता तेथे बहिरामखानाने वस्ती करून काही काळ वास्तव्य केले. ती वसाहत म्हणजे आजचे शेवगाव शहर. शेवगाव शहरात आज काझी घराणे आहे. त्यांच्या पूर्वजांनी एक भव्य मशीद लोक वर्गणीतून इ. स. १६१९ साली बांधली. कलाप्रेमी मुगल बादशाह शहाजहान यांनी मशिदीच्या खर्चासाठी ४३० बिघे जमीन इनाम म्हणून दिली. आजही या घराण्याकडे ही इनामी जमीन ताब्यात आहे. गावात भारदे वाडा इतिहासाची साक्षी आहे. शिंदे सरकारच्या दिवानाने हा वाडा बांधला. स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब भारदे शेवगावचे. त्यांच्या बरोबर १९४९च्या लढ्यात १९ सत्याग्रही होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात शेवगावचे मोठे योगदान आहे. गावाला जुनी तटबंदी होती. सुफी संत सोनामियाँ म्हणजे सर्व धर्म समभावाचे प्रतिक. या उरुसात सर्व धर्माचे लोक सहभागी होतात. नवसाला पावणारे दैवत म्हणून प्रसिद्ध. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून शेवगावची मोठी बाजारपेठ. सर्वात जुने वाचनालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेले भव्य महादेव मंदिर. ग. ल. ठोकळ प्रसिद्ध लेखक, बाळासाहेब भारदे थोर स्वातंत्र्यसैनिक व गाढे विचारवंत शेवगावचेच. 

२. वरूर
शेवगावच्या दक्षिणेस सुमारे ५ कि. मी. अंतरावर वरूर गाव. या गावात विठ्ठल-रुक्मिणीचे भव्य मंदिर प्रसिद्ध आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीसारखी मूर्ती असून लांबून दर्शनासाठी भक्तगण येतात. आषाढी-कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. वरूरला 'धाकटी पंढरी' म्हणून ओळखले जाते. खांबट पाटलांच्या भक्तिने विठ्ठलाने येथे मूर्ती स्थापण्याचा दृष्टांत दिला. त्यांच्या भक्तिने गाव सभोवती वसले तेच आजचे वरूर गाव.

३. आव्हाणे बुद्रुकचा निद्रिस्त गणेश 
शेवगावपासून १६ कि. मी. अंतरावर अवनी नदी किनारी आव्हाने खुर्द व बुद्रुक अशी दोन गावे आहेत. गणेशभक्त दादोबा भालेराव यांनी मोरगावचे मोरया गोसावी यांचे चिरंजीव नारायण महाराजांचे शिष्यत्व पत्करून मनोभावे गुरूंची सेवा केली. गणेशदेव प्रसन्न होऊन तुम्ही आव्हाणे गावी मंदिर बांधून सेवा करा असा आदेश दिला. तेव्हापासून वंशपरंपरेने भालेराव वंशातील लोक पूजा करतात. श्रीमंत शाहूमहाराजांनी सात गावांची जहागिरी त्या काळात भालेराव कुटुंबीयांना दिली. दादोबा वारल्यानंतर त्यांचे चिरंजीव 
$$$$$
गणोबा देव यांना शेतात नांगरताना गणेशमूर्ती मिळाली. रात्री त्यांना दृष्टांत झाला की मूर्ती हालवू नका आहे त्या परिस्थितीतच ठेवून मंदिर बांधा. त्यानुसार या निद्रिस्त गणेशाचे मंदिर बांधले व निद्रिस्त गणेशमूर्ती जमिनीखाली २ फूट खोलीच्या ४ ×३' च्या हौदात तशीच ठेवली. आजही ही मूर्ती जमिनीखाली २ फुटावर निद्रिस्त अवस्थेत पहायला मिळते. सध्या मंदिराची व्यवस्था ट्रस्टतर्फे केली जाते. भाद्रपद शु ।। १ ते शु।। ८ या कालावधीत पूजा, अभिषेक, कीर्तन, भजन, जागर, भंडारा असा कार्यक्रम असतो.
माघ शु ।। ४ ला गणेश देवाची मोठी यात्रा भरते. नदी किनाऱ्यावर महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामींचे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. मंदिराच्या ठिकाणी पूर्वी चौथरा होता. तेथे बसून चक्रधर स्वामींनी उपदेश केल्याचा उल्लेख महानुभाव पंथाच्या 'लिळाचरित्रात' सापडतो.

४. मुंगी 
पैठणजवळ मुंगी हे पुरातन गाव आहे. मुगादेवी मुंगी गावचे नदीकाठी जागृत दैवत आहे. पुत्रप्राप्तीसाठी या देवीस नवस केला जातो. गावात लिंबाच्या झाडाची काळजी घेतात. झाड कोणी तोडत नाही. चैत्र महिन्यात देवीची यात्रा भरते. वेदांत तत्त्ववेत्ते निंबाकाचार्य यांची मुंगी ही कर्मभूमी होती. मुंगीला सनातन मठाचे अतिशय देखणे बांधकाम आहे. गोदावरी काठावर हा मठ असून येथे विठ्ठल मंदिर आहे. दशमस्कंदाचा मराठीत टिकाग्रंथ संत दयार्णव यांनी लिहिला त्या ग्रंथाचे नाव 'श्रीहरीवरदा' असून ४२ हजार ओव्या यात आहेत. संत विसोबा खेचर यांचे गाव मुंगी. ते औंढा नागनाथ येथे राहत असत. संत नामदेवांचे ते गुरू होते. विसोबांनी १३०९ साली बार्शी, जि. सोलापूर येथे समाधी घेतली. प्रभू रामचंद्र केदारेश्वरच्या अरण्यात वनवास काळात वास्तव्याला होते. त्यावेळी दररोज प्रभुरामचंद्र सीतामाई लक्ष्मण हे स्नानासाठी मुंगीला येत असत. पैठणपूर्वी वसलेले मुंगी गाव आहे. ब्रह्मदेवाने या ठिकाणी यज्ञ केला होता. त्यावेळी यज्ञात खूप मुंग्या निघाल्या व यज्ञात बाधा आल्यामुळे यज्ञाची जागा बदलून ती सध्या जेथे पैठण आहे तेथे यज्ञ स्थापला त्यावेळी पैठणचे नाव प्रतिष्ठान असे ठेवले. पुढे पैठण नाव पडले आजही पैठणचा उल्लेख मुंगी पैठण असा होतो. तो वरील कारणामुळे.

५. बोधेगाव 
अहमदनगरपासून ८७ कि. मी. वर शेवगावपासून ३० कि. मी. अंतरावर बोधेगाव आहे. गावात बोद्धेश्वराचे मंदिर आहे. त्यावरून गावाला बोधेगाव नाव पडले. गावात बन्नोमाँची यात्रा भरते. बन्नोमाँ त्या गावात वास्तव्य करून होत्या. शिर्डीच्या साईबाबांच्या त्या समकालीन होत्या. त्या दिगंबर अवस्थेत गावात फिरायच्या. त्यांनी अनेक चमत्कार केले. अनेकांचे आजार त्यांनी आपल्या कृपेने बरे केले. त्यांनी समभाव, सहिष्णुतेची जगाला 
$$$$$
शिकवण दिली. जातीभेद पाळू नका असा संदेश त्यांनी दिला. कोजागिरी पौर्णिमेनंतर आश्विन महिना नंतर येणाऱ्या गुरुवारी दरवर्षी मोठी यात्रा भरते. बन्नोमाँची यात्रा शेवगाव तालुक्यात नंबर १ची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. सर्व जाती धर्माचे लोक या यात्रेसाठी दूरवरून येतात.

६. लखमापुरी 
या ठिकाणी महालक्ष्मीचे भव्य असे मंदिर आहे. मूर्ती अतिशय तेजस्वी असून चेहऱ्यावर तेजोवलय दिसून येते. मंदिराचे बांधकाम लाल काळ्या चौकोनी चिऱ्यांनी बांधलेले कळसापर्यंत अनेक देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. समोर वाड्यासारखे चिरेबंदी काम मध्ये चौक आहे. या मंदिरातच विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती महादेवाची पिंड स्थापिलेली आहे. नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते. ही देवी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रतिरूप आहे. त्याबाबत स्थानिक लोक अख्यायिका सांगतात. लखमापूरचे शहाजी पाटील अंबाडे हे महालक्ष्मीचे निस्सीम भक्त होते. ते दरवर्षी न चुकता महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला जायचे. वय झाल्याने त्यांना जाणे शक्य होईना म्हणून त्यांनी देवीला साकडे घालून विनवले. आता वयामुळे मला वारी करता येणार नाही. त्यावर देवी प्रसन्न होऊन तुझ्याबरोबर मी तुझ्या गावी येते असे म्हणाली. पाटलांना आनंद झाला. ते लखमापूरकडे यायला निघाले. वाटेत पाथर्डी तालुक्यातील साकेगावी त्यांनी देवी मागे आली की नाही हे पाहण्यासाठी मागे वळून पाहिले तर साक्षात देवीने दर्शन दिले व देवी अंतर्धान पावली व मूर्ती रूपाने तेथेच थांबली. पाटील लखमापूरला आल्यावर त्यांना दृष्टांत झाला तू बैलगाडीत मला घेऊन जा. त्याप्रमाणे त्यांनी बैलगाडी देवीला आणण्यासाठी साकेगावला नेली. दरम्यान साकेगावच्या ग्रामस्थांनी बैलगाडीत मूर्ती हालविता आली नाही. हा काय नेणार म्हणून लोक कुतुहलाने पाहू लागले आणि काय आश्चर्य विनासायास एकट्याने मूर्ती आपल्या गाडीत ठेवली आणि मूर्ती घेऊन ते लखमापुरीला गेले. भव्य असे मंदिर बांधले. गावात महालक्ष्मी मंदिरासारखेच भैरवनाथाचे मंदिर आहे. गावात एक मोठा खांब असून त्याला 'रणखांब' म्हणून ओळखतात. महाभारत काळात बब्रुवाहन आणि अर्जुन यांचे युद्ध या ठिकाणी झाल्याची आख्यायिका आहे. त्यांचे स्मरण म्हणून हा रणखांब आज अस्तित्वात आहे. देवीची भव्य यात्रा भरते.

७. कांबी
काम्यक ऋषींचे आश्रमस्थान म्हणून गावाला कांबी असे नाव पडले. पूर्वी या भागात घनदाट जंगल होते. त्या जंगलात काम्यकवन म्हणून ओळखत असत. आता जायकवाडी प्रकल्पामुळे परिसर घनदाट वृक्षांनी नटला आहे. कांबी हे होळकरांचे जहागिरी गाव. माधवराव पेशव्यांनी होळकरांना हे गाव भेट म्हणून दिले. आजही तेथे होळकरांचे वंशज आहेत.
$$$$$
तेथे हेमाडपंथी महालक्ष्मीचे मंदिर असून हे मंदिर जगावेगळे आहे. या ठिकाणी महादेवाच्या मंदिरापुढे नंदी नाही आणि पार्वतीची मूर्ती छताला टांगलेल्या अवस्थेत आहे. या संबंधी दंतकथा आहे. भगवान शंकर एकदा रूसून रागाने नंदी न घेता एकटेच या जंगलात आले. तेथील सृष्टी सौंदर्याने ते तेथेच रमले व ध्यानधारणा करू लागले. पार्वतीमाला शंकराचा शोध घेत घेत वेषांतर करून तेथे पोहोचल्या. त्यामुळे शंकराची समाधी भंग पावली. त्यामुळे ते रागावले व त्यांनी पार्वतीला उलटे टांगले. त्याचे प्रतीक या मंदिरात दिसते. नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहाने येथे साजरा केला जातो. मार्गशिर्ष पौर्णिमेला मोठी यात्रा भरते.
सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री मधु कांबीकर याच गावची. 'शापित' चित्रपटाने जनमानसाने तिला डोक्यावर घेतले. वडिलांच्या स्मरणार्थ मधुताईंनी मोठे वाचनालय येथे सुरू केले आहे.

८. हातगाव 
रावराजे दिनकरराव यांच्या जहागिरीचे हे गाव. प्रचंड अशी किल्लेवजा गढी आजही पहायला मिळते. ही गढी पक्क्या विटांनी बांधलेली असून अतिशय रेखीव आहे. पूर्वी रझाकारावर व शत्रूवर नजर ठेवण्यासाठी ही गढी बांधण्यात आली होती. सध्या गढीचा मालकी हक्क गावचे पाटील भराट यांच्याकडे आहे. हत्तेश्वर हे महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. गावात अनेक जुने वाडे आहेत. रामेश्वरदास महाराज हे त्या परिसराची आदराची व्यक्ती म्हणून ओळखली जाते.

९. अमरापूर 
निजामशाहीतील कर्तृत्ववान वजीर मलिकांबर यांचे समाधीस्थान अमरापूरला आहे. मलिकांबर शेतसारा पद्धत, वजनमापाची पद्धत, जमीन मोजण्याची पद्धत ठरवून दिली. त्या अगोदर शेतकऱ्यांवर जुलमाने पट्टी आकारली जायची. शेतकऱ्यांना जाचातून सोडविणारा वजीर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या समाधीकडे आज दुर्लक्ष झालेले आहे. त्याचे स्मरण रहावे म्हणून तेथे बागबगीचा होणे आवश्यक आहे. येथे पुरातन भैरवनाथ मंदिर असून घुमटाकृती पद्धतीने बांधलेली आहे. सदाशिव अमरापूरकर हे प्रसिद्ध सिनेअभिनेते याच गावचे. दरवर्षी सवड काढून ते आजही सहकुटुंब गावी येतात. 

१०. वाघोली 
पूर्वी या परिसरात घनदाट जंगल होते व वाघांचा येथे मुक्त संचार असायचा त्यावरून येथील देवीला 'वाघेश्वरी देवी' म्हणून ओळखतात. पूर्वी हेमाडपंथी सुंदर असे मंदिर होते. पडझड झाल्याने आता नवीन मंदिर येथे बांधले आहे. पूर्वीचे शिलावेद आजही पहायला मिळतात. या मंदिराचा कारभार कोळी समाज पाहतो.
$$$$$
११. चापडगाव 
नाथ पंथातील चर्पट नाथांनी या ठिकाणी १२ वर्षेतपश्चर्या केली होती. त्यांच्या नावावरून गावाला चापडगाव असे नाव पडले. गावात प्रचंड मोठी बारव आहे. रेणुका मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवीने बांधले असावे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचे या गावात अनेक वर्षे वास्तव्य होते.

१२. घोटण 
या ठिकाणी १२ व्या ते १४ व्या  शतकादरम्यान मल्लीकार्जुन मंदीर बांधले गेले असून या मंदीराची दुरुस्ती पेशवे काळात झालेली आहे.
शेवगाव-पैठण रस्त्यावर पैठणपासून २२ कि. मी. अंतरावर घोटण गाव आहे. महाभारत काळात कौरव व जरासंध यांनी विराट राजाच्या गायी पळवून आणल्या. त्यावेळी गायी भयभीत होऊन दंडकारण्यात चौखुर पळत निघाल्या. मल्लिक ऋषींनी त्या गायांना आश्रय दिला त्या ठिकाणाला 'गोठाण' म्हणून संबोधत. पुढे तेथे वसाहत झाली. गोठाणचे घोटण असे अपभ्रंश होऊन गावाला 'घोटण' नावाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे पुरातन मल्लिकार्जुनेश्वर मंदिर बांधले. मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. चोहोबाजूंनी ८ फूट रुंदीचा मजबूत तट असून प्रवेशद्वार दुमजली आहे. नक्षीकाम, कोरीवकाम अप्रतीम आहे. बांधणी औंढ्या नागनाथ मंदिराशी मिळती जुळती आहे. सासुसुनेच्या बारवेमधून देवाला जलाभिषेक होतो. श्रावण महिन्यात येथे विशेष गर्दी असते. गावात क्षेत्रीय कासार समाजाचे कालिका भव्य मंदिर आहे. मूर्ती अतिशय सुंदर आहे. जवळच घोंगड्या म्हसोबा हे जागृत देवस्थान आहे. येथे चोरी होत नाही. पूर्वी गोदावरी नदी या गावाजवळून वहात होती असे म्हणतात. पुराण काळातील विराट राजाची राजधानी या ठिकाणी मल्लिकाऋषीचे आज्ञेवरून अर्जुनाने येथे तपश्चर्या केली व त्यामुळे अर्जुन शापमुक्त झाले. ते ठिकाण म्हणजे आजचे मल्लिकार्जुन मंदिर, पिंडीच्या दर्शनासाठी १५ खोल पायऱ्या उतरून जावे लागते. पिंडीभोवती कायम पाणी असते. हे स्थळ पुरातत्व खात्याकडे असल्याने दुर्लक्षीत आहे. केशव गोविंद शिंदे हे पुजारी आहेत. २० पिंढ्यांपासून त्यांच्या घराण्यात पुजेचा मान आहे. पांडव काळापासून गाईचा कळप या परिसरात आहे. गायी हाकलून दिल्या तरी जात नाहीत असा इतिहास आहे.

१३. बालमटाकळी
बालंबिका देवीचे जागृत स्थान या गावात आहे. गावात अनेक सुंदर टुमदार दोन मजली भव्य वाडे आहेत. भव्य अशी बाजारपेठ आहे. शेवगाव-गेवराई रस्त्यावर असल्याने मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख आहे. बालंबिका देवीचा तांदळा एका विहिरीत मिळाला. नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते. अनेकजण उभे राहून १० दिवस उपवास धरतात. 
$$$$$
१४. श्रीक्षेत्र काशी केदारेश्वर
शेवगाव तालुक्यातील बोधेगावपासून १० कि. मी. अंतरावर नागलवाडी येथे हे स्थान आहे. डोंगराच्या पठरावर मंदिर असून चोहोकडे दऱ्या, नद्या, दाटझाडी, रानफुले असल्याने पर्यटकांसाठी हे अतिशय चांगले ठिकाण आहे. वनवास काळात प्रभू रामचंद्रांनी येथे बराच काळ वास्तव्य केले होते. येथे राहून स्नानासाठी ते मुंगी वैदूर्यवहन उर्फ पिपिलिकानगर येथे जात असत. केदारेश्वर मंदिरालगत सीतामाईची न्हाणी आहे. श्रावणात मोठी यात्रा भरते. या भागात केदारेश्वर सहकारी साखर कारखाना आहे.

१५. भावीनिमगाव 
पूर्वीचे नाव भामानगर असे होते. माता भवानी मंदिराचे पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केला. समोर महादेव मंदिरही बांधले. पिण्याच्या पाण्यासाठी मोठी बारव खोदली. भक्तांसाठी माहूरगडची रेणुकादेवी येथे आली. शिवाजी महाराज आपल्या मातेसह येथे देवदर्शनासाठी येत. आजही लोक नवरात्रात खडी नवरात्र साजरी करतात. नवरात्रात मोठी यात्रा भरते. गावात भग्न बालाजी मंदिर आहे. चैत्र पौर्णिमेला गावात देवीची यात्रा भरते. नवस फेडायला आलेले भक्त जळत्या कोळशावरून चालून नवस फेडतात. या प्रकाराला रहाड म्हणतात. राणी व्हिक्टोरियाने दिलेली जमिनीबाबतची सनद पुजारी गोंधळी यांचेकडे आजही आहे. त्यात देवासाठी दिलेल्या जमिनीचे वाटप कसे करायचे हे दिलेले आहे. त्यानुसार कुळकर्णी, काझी, गोंधळी यांनी कोणती जमीन कोणी ताब्यात घ्यायची याचा उल्लेख आहे. कोणी म्हणतात देवीचे ठाणे तुळजापूर व मातापूरचे आहे. कोणी म्हणतात माहूरगडच्या देवीचे आहे. दंतकथा अनेक असून त्यामुळे संभ्रम निर्माण होतो. 

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...