Wednesday, June 17, 2020

लातूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

      लातूर जिल्हयाला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. त्यानन्तर हे शहर बऱ्याच राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेले.. जिल्हा मुख्यालय लातूर हे "लट्टा" वा राष्ट्रकुट राजांचे मुळ निवासस्थान होते. राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष पहिला हा लट्टालूट नगरचा अधिपती "स्वामी" असल्याचे नमूद आहे व त्यानेच हे शहर निर्माण केले. इ.स. ७५३ मध्ये बदामीच्या चालुक्यानन्तर आलेले राष्ट्रकुट राजे स्वतःला लट्टालूट पूर्वाशिष म्हणजे लट्टालूट निवासी असेच म्हणवून घेत. चालुक्य घराण्यातील "विक्रमादित्य" ६ व्या नन्तर त्याचा पुत्र सोमेश्वर तिसरा हा गादीवर आला. त्याने "अभिलाषीतीर्थ" हा ग्रन्थ लिहिला, त्यामुळे त्याला "सर्वज्ञ चक्रवर्ती" असे म्हणत. लातूर जिल्ह्यात त्याचे राज्य असल्याचा व त्याच्या कारकिर्दीची नोन्द असलेला कोरीव लेख सापडला आहे. त्यामध्ये लातूर येथील पापविनाशी देवीचे मन्दिर बान्धल्याचा उल्लेख आहे. सदर कोरीव लेख शके १०४९ (इ.स.११२९) मध्ये कोरल्याचा उल्लेख आहे. चालुक्यानन्तर हा भाग देवगिरीच्या यादवाच्या अधिपत्याखाली आला
     .इ.स. १३३७ मध्ये यादवांचे राज्य दिल्लीच्या सुलतानाच्या ताब्यात आले व दक्षिणेत मुस्लिम सत्तेचा अंमल सुरु झाला. इ. स. १३५१ मध्ये दिल्लीच्या सुलतानाच्या साम्राज्यातील हा भाग बहामणी साम्राज्यात आला. बहामणी साम्राज्याची राजधानी गुलबर्गा होती.
      लातूर शहर ही या जिल्ह्याची राजधानी आहे. १९ व्या शतकात ते हैदराबाद संस्थान संस्थानच्या अधिकारक्षेत्रात आले. १९४८ मध्ये हा भाग स्वतन्त्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात आला. कालान्तराने उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ऑगस्ट १६, १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला.
या नवनिर्मित लातूर जिल्ह्यात पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा व औसा अशा पाच तालुक्यांचा तसेच १५ ऑगस्ट, १९९२ रोजी पूर्वीच्या तालुक्याची पुनर्रचना करण्यात येऊन रेणापूर व चाकूर हे दोन तालुके अस्तित्वात आले. तसेच २३ जून, १९९९ रोजी पुर्वीच्या तालुक्यांची पुनर्रचना करण्यात येऊन देवणी, जळकोट व शिरूर अनन्तपाळ हे तीन तालुके अस्तित्वात आले. सद्या लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनन्तपाळ, अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत.
      तदनन्तर बहामणी राज्याची शकले होऊन शेवटी निजामशाही मध्ये हा भाग आला. निजामाचे हैद्राबाद राज्य १९४८ मध्ये स्वतन्त्र भारतात सामील झाल्यानन्तर हा भाग महाराष्ट्र राज्यात आला.

भुगोल

    महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर आणि कर्नाटकाच्या ईशान्य सीमेजवळ हा लातूर जिल्हा येतो. नान्देड, बीड, उस्मानाबाद हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा लातूरला जोडून आहेत.लातुर समुद्र सपाटीपासुन ६३६ मिटर उंचीवर महाराष्ट्र कर्नाटक राज्य सिमेवर, बालाघाट पठारावर स्थित आहे.लातुरला मांजरा नदीतुन पिण्याचे पाणी मिळते, जिचे पर्यावरणीय विघटन व धुप २० व्या आणि २१ व्या शतकात झाले. त्यामुळे व जल व्यवस्थापन नियोजनाच्या अभावामुळे २०१० ला दुष्काळ उद्भवला. 
नदी:- तालुका गोदावरी नदीच्या खोर्यात येतो. नगरात बहुतांश पाणी मांजरा नदीतुन येते, जिने २० व २१ व्या शतकात प्रदुषणाचा सामना केला. रेणा, मनार, तावरजा, तिरु व घरणी या इतर प्रमुख नद्या आहेत. सिंचन व पिण्यासाठी या नद्यांवर धरणे बान्धली आहेत. देनरगण, घरणी, मसलगा, सोलवरील साकोळ, तावरजा व तिरु यांचा मोठ्या धरणांत समावेश होतो. मन्याड, लेण्डी व तिरु या उत्तर पठारावरील ३ प्रमुख नद्या आहेत.

प्रेक्षणीय स्थळे :

       प्रसिद्ध स्थापत्य विशारद श्री.फैयाजुद्दीन यांच्या कल्पना आविष्कारातून साकारलेली लातूर शहरातील ‘गंजगोलाई’ ही वर्तुळाकार बाजारपेठ तिच्या रचनेमुळे आकर्षक ठरते. शहरातील अनेक रस्ते या बाजारपेठेस वेगवेगळ्या बाजूंनी येऊन मिळतात. येथील सुरतशाहवाली दर्गा, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर, लातूर-औसा रस्त्यावरील विराट हनुमानाची मूर्ती व पार्श्र्वनाथ मंदिर या सारखी धार्मिक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. लातूर-आंबेजोगाई रस्त्यावर लातूरपासून आठ कि.मी. अंतरावर मांजरा नदीकाठी महापूर येथे नमानंद महाराजंचा मठ आहे.प्राचीन ऐतिहासिक परंपरा आणि भक्तिमार्गाचा वसा लाभलेल्या लातूर जिल्ह्यात अनेक मंदिरे, दर्गे असून उदगीर व औसा येथील भव्य व प्रशस्त भुईकोंट किल्ले हे प्रवाशांचे आकर्षण आहे. सांप्रत दोन्ही किल्ल्यांची बरीच पडझड झाली असून आतील काही वास्तू जीर्ण अवस्थेत आहेत.
    मराठे व निजाम यांच्या लढाईचे साक्षीदार असणारे उदगीर शहर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण असून येथील यादवकालीन भुईकोट किल्ला प्रसिद्ध असून किल्ल्याभोवती असणारा ४० फूट खोलीचा खंदक आणि जमीन पातळीपासून ६० फूट खोलीवरील श्रीउदयगीर महाराजांची समाधी हे येथील मुख्य आकर्षण आहे.
    येथून जवळच असणार्‍या देवर्जन येथे श्रीगंगाराम महाराजांची समाधी आहे.उदगीर तालुक्यातील देवणी गाव देखण्या व मजबूत गाई – बैलांसाठी भारतात प्रसिध्द आहे. देवणीला जनावरांचा मोठा बाजार भरतो. तसेच त्याच तालुक्यातील हळ्ळा हंडरगुळी आणि लातूर तालुक्यातील रेणापूर येथेही जनावरांचा बाजार भरतो. रेणापूरला रेणुकादेवीचे सुंदर देवालय असून मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे. तिला धक्का दिला असता ती हलते, हे तिचे वैशिष्ट्य.
      औसाचा किल्ला मलिक अंबरने बांधला असून तो अंबरपूर वा आम्रपूर या नावाने प्रसिद्ध होता. औसा किल्ल्याच्या सभोवती खंदक असून दुहेरी तटबंदी आहे आणि त्यावर अर्धवर्तुळाकर भक्कम बुरूज होते. त्यांवर तोफा ठेवीत. अवशिष्ट काही तोफांवर तुर्की अभियंत्यां ची नावे कोरलेली आढळतात. किल्लयात प्रेक्षणीय अशी एकही इमारत नाही तथापि जुन्या इमारतीत काही वर्षे शासकीय कार्यालये होती. किल्ल्याच्या पहारा चौकीतील एका दगडावर नागरी लिपीत मुर्तजा निजामशाह आणि १५२९ साल यांचा उल्लेख आहे मात्र उदगीरचा किल्ला केवळ त्याच्या तटबंदीमुळे एक भव्य वास्तू दिसतो. त्याच्या नजीकच्या लेंडी नदीकाठचा ख्वाजा सादुद्दीन अवलियांचा दर्गा प्रसिद्ध आहे.याशिवाय येथील श्रीबीरनाथ महाराजांचे देऊळ, श्रीमल्लिनाथ महाराजांचा मठ व औरंगजेबाने बांधलेली मशीद प्रसिद्ध आहे.
     औसा तालुक्यातील खरोसा या गावातील हिंदू व बौद्ध लेण्यांमधील शैव पद्धतीची शिल्पे प्रेक्षणीय आहेत.या गुहा लातूर – बीदर महामार्गावर लातूरपासून सु. २६ किमी. वर आहेत. यांपैकी महादेव व लकोला या दोन गुहा शिल्पकामासाठी प्रसिद्ध असून येथील शैवशिल्पे उल्लेखनीय आहेत. विधान शिल्पशैली इत्यादींवरून तज्ञांनी यांचे साधर्म्य बदामी येथील हिदू गुहांशी दर्शविले आहे. त्यांच्या मते त्या सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात केव्हातरी खोदल्या असाव्यात. औसा तालुक्याच्या पश्चिमेला हेरगाव या खेड्यात नामदेव व एकनाथ महाराज यांची मंदिरे व पादुका आहेत. तेथे नामदेव पुण्यतिथी उत्साहाने साजरी होते. औसा गावात वीरनाथ मल्लिनाथ महाराज यांचा मठ असून हे भागवत परंपरा सांभाळणारे लिंगायत पंथीयांचे पूज्य स्थान आहे. तेथे कर्नाटक व मराठवाड्यातून अनेक लिंगायत भक्तगण जमतात. औरंगजेबाने बांधलेली येथील जामा मशीद इस्लाती वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहे. उजनी (औसा तालुका) येथील संत गणेशनाथ महाराजांची समादी व मठ ख्यातनाम आहेत. तेथे कार्तीक महिन्यात मोठी यात्रा भरते. मातोळा (औसा तालुका) खेड्याजवळ सु. साडेतीन किमी. वर देवनळा येथे अंबाबाईचे प्राचीन मंदिर आहे. लामजना या औसा तालुक्यातील आग्नेयीस १७ किमी. वर वसलेल्या गावात शेख सुलतान व शेख अब्दुल्ला यांचे दर्गे असून त्यांच्या स्मरणार्थ मार्च – एप्रिलदरम्यान मो ठा उरूस भरतो. अहमदपूर येथे अक्कलकोट स्वामींचे गुरू नागेंद्र भारती यांची समाधी एका मठात आहे . जिल्ह्यातील चाकूर शहरापासून जवळच श्री सत्य साईबाबांचे सुंदर मंदिर उभारण्यात आले असून सदर ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून वेगाने विकसित होत आहे. चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील दुर्मीळ औषधी वनस्पतींची टेकडी प्रसिद्ध आहे.
    उपरोक्त स्थानांबरोबरच निलंगा येथील नीलकंठेश्वराचे (महादेवाचे) मंदिर व स्वयंभू शिवलिंग असलेले पूर्वामिभुख त्रिकुटेश्वर (तीन गर्भगृहे) मंदिर यादव वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध असून ते माळव्यातील भूमिज या उप – वास्तुशैलीतील बांधलेले आहे. तीन गर्भगृहांव्यतिरीक्त गूढमंडप व आंतरालय यात मंदिर विभागलेले असून त्याचे विधान तारकाकृती आहे. सभामंडपातील सोळा स्तंभ अलंकृत आहेत. सभामंडपात डाव्या बाजूस सप्तमातृकांच्या मूर्ती एकसंध दगडात कोरलेल्या आहेत. त्यांत गणेश व वीरभद्राच्या मूर्तीही आहेत. मुख्य गर्भगृहात स्वयंभू लिगं आहे. उत्तरेकडील गर्भगृहात विष्णू व दक्षिणेकडिल गर्भगृहात हर – गौरी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर देव – देवता, उप – देवता व मिश्र ढंगांतील सुरसुंदरींच्या त्रिभंगातील अनेक सुबकमूर्ती आहेत.तसेच येथील शाह पीर पाशा कादरी ह्यांचा दर्गा उजना येथील श्रीगणेशनाथ यांची समाधी व रेणापूर येथील रेणुकादेवीचे मंदिर आणि या परिसरातील हलणारी दीपमाळ ही जिल्ह्यातील ठिकाणे जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकतात.

संस्कृती आणि वारसा

लातूरचे लोक हिंदू, इस्लाम, ईसाई धर्म आणि जैन धर्माप्रमाणे वेगवेगळ्या धर्माचे अनुकरण करतात आणि त्यांची संस्कृती ही सर्वांचे मिश्रण आहे.बहुतेक परंपरा ज्या त्या धर्मासाठी विशिष्ट आहेत. लातूर येथे आयोजित केलेली वार्षिक श्री सिद्धेश्वर मेळा हा लोकप्रिय आहे. गंगाराम महाराज समाधी सोहळा हजारो लोकांना आकर्षित करतो. पहिले लातूर महोत्सव जानेवारी 2011 मध्ये आयोजित करण्यात आले होते, आणि प्रचंड यशस्वीीमुळे, सांस्कृतीक कॅलेंडरवर दरवर्षी हे एक नियमित वैशिष्ट्य बनले आहे. लातूरच्या लोकांसाठी नृत्य आणि संगीत याची प्रचंड आवड आहे. लोकसंगीत आणि नाट्य संगीत हे येथे लोकप्रिय संगीत प्रकार आहेत, ज्यात भजने, भालेरी, भरूड, पालणे, गोंधळ आणि अभंग यासारखे अनेक प्रकारचे लोकसंगीत आहे. लातूरमध्ये प्रचलित असणारे लोकप्रिय नृत्य म्हणजे धनगारी गाजा , लावणी आणि पोवाडा , कोल्हापुरी चप्पल्स, कोल्हापूरचे दागिने आणि पैठणी साडी लातूरच्या लोकांकडून बनविलेल्या विशेष कलाकृती आहेत.
 कसे पोहोचाल?:

विमानाने

या ठिकाणाजवळ पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे पुणे (370 कि.मी.), हैदराबाद (2 9 8 किमी), औरंगाबाद (264 किमी).

रेल्वेने

लातूर जिल्हा रेल्वे  मुंबई (430 कि.मी.), पुणे (338 कि.मी.), नांदेड (186 किमी), हैदराबाद (243 कि.मी.)जोडलेला आहे. रेल्वेगाड्यांची सुविधा रेल्वे स्थानक लातूर , लातूर रोड रेल्वे स्टेशन आणि हरंगुळ रेल्वे स्थानक लातूर हेडक्वाटर्स अंतर्गत आहे.

रस्त्याने

कोणत्याही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकमधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.राष्ट्रीय महामार्ग 62 लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातून जातो.

LATUR DIVISION bus stand depot contact number
Sr. No Designation Functioning Area STD Code No. Telephone No. Email_id
Office
1 Divisional Controller Latur, 02382 228994 dcstlatur@rediffmail.com

1 Divisional.Traffic Officer Latur Division, (02382) 228991
2 Divisional. Accounts Officer Latur Division (02382) 228368
3 Divisional. Personnel Officer Latur Division (02382) 228993
4 Labour Officer Latur Division (02382) 228993

1 Depot Manager Latur bus stand depot contact number (02382) 243626
2 Depot Manager Udgir bus stand depot contact number (02385) 256156
3 Depot Manager Nilanga bus stand depot contact number (02384) 242013
4 Depot Manager Ahmedpur bus stand depot contact number( 02381) 262278
5 Depot Manager Ausa bus stand depot contact number (02383) 222049
जगदंबामाता मंदिर गंजगोलाई :-
गंज गोलाई
    लातूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या शहराचा विकास अमोघवर्षा या राजाने केला. लातूर शहराच्या मध्यभागी असलेली गंजगोलाई ही इमारत प्रसिद्ध आहे. या इमारतीचे बांधकाम १९१७ रोजी करण्याचे आले आहे. या वास्तुच्या मध्यभागी अंबाबाई देवीचे मंदिर आहे. या वास्तुला १६ रस्ते एकत्रित जोडले गेले आहेत.या मार्गांच्या बाजुस सर्व प्रकारच्या पारम्पारिक स्थानिक दागिने, पादत्राणे ‌व मिरची ते गुळापर्यन्त अन्नपदार्थांची मण्डई आहे. अशाप्रकारे, गोलाई तालुक्याचे मुख्य वाणिज्य व व्यापार केन्द्र बनले आहे.  प्रसिद्ध स्थापत्य विशारद श्री.फैयाजुद्दीन यांच्या कल्पनेतून साकारलेली लातूर शहरातील ‘गंजगोलाई’ ही वर्तुळाकार बाजारपेठ तिच्या रचनेमुळे आकर्षक ठरते.
     राष्ट्रकुटांच्या काळातले हे मंदिर लातुर वासियांचे आराध्य दैवत आहे. तुळजापुरच्या भवानीचे हे प्रतीरूप मानल्या जाते. लातुर वासियांची या देवी प्रती निस्सीम भक्ती असुन या मंदीरात दर्शनाकरता नेहमीच गर्दी पहायला मिळते. नवरात्राच्या दिवसांमधे या ठिकाणी पारंपारीक वस्तुंचा आणि वेगवेगळया खाद्यपदार्थांचा बाजार लोकांना आकर्षीत करतो. काळया पाषाणातील देवीची अतिशय देखणे कोरीव काम केलेली ही मुर्ती पाहाताक्षणीच लक्ष वेधुन घेते, देवीच्या मुर्ती व्यतीरिक्त या ठिकाणी गणपतीची आणि शंकराची मुर्ती देखील विराजमान आहे. मंदिराच्या आत आरश्याचे नक्शीकाम अत्यंत सुबक आणि सुंदर असुन भाविक कितीतरी वेळ या कलाकुसरीकडे पाहात राहातात.

सिद्धेश्र्वर आणि रत्नेश्वर मंदिर लातूर

शिधेश्वर मंदिर लातूर
मुख्य शहरापासुन २ किमी अन्तरावर आहे. हे सम्राट 'ताम्रध्वज'ने निर्माण केले आहे व सोलापुरच्या सिद्धरामेश्वर स्वामीला समर्पित आहे, ते हिंदू धर्माचतील लिंगायत वीरशैव पंथाचे संत होते. कुला कडिजी समाजाचे ते एक आध्यात्मिक नेते आणि कवी होते. 12 व्या शतकात कवी कन्नडमध्ये कविता लिहिल्या. या वेळी, ते 12 व्या शतकातील बासवन्नाच्या वीरशैव विद्रोहाचा देखील एक भाग होते.हे लातुरचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी इथे १५ दिवसांची जत्रा असते. रामलिंगेश्वर, भूतेवार, केशवराज, राम, दत्ताचे मंदिर आहेत जे लातूर शहराच्या प्राचीन सांस्कृतिक परंपरेला जोडतात.
मंदिर पत्ता- सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर, हट्टेनगर, लातूर, महाराष्ट्र,
बुद्ध गार्ड्न (मंदिर)
बुद्ध गार्डन मंदिर लातूर
बुद्ध उद्यान मन्दिरात विशाल बुद्ध मुर्ती आहे. बुद्ध गार्ड्न (मंदिर) कान्हेरी रोड, नारायण नगर, लातूर, महाराष्ट्र 413512
श्री विराट हनुमान मंदिर :-

श्री विराट हनुमान मंदिर हा औसा रोड लातूरजवळील पारिवार हाऊसिंग सोसायटीमध्ये आहे. या मंदिराचे बांधकाम इतर मंदिरापासून वेगळे आहे. हे मंदिर सुंदर बागेच्या वातावरणात उभा केलेल आहे या मंदिराच्या पायथा जवळ जवळ 12 फूट उंच आहे. हा पयथा संगमरवरी बांधकामावर आहे. ही मूर्ती 25 फूट उंच असून लाल रंगात (शेंद्री) रंगवलेली आहे. मूर्तीच्या चेहर्‍यावर अतिशय शांत भाव आहेत, एका हातात गदा धारण केलेली आहे आणि दुसरा हात कमरवर आहे. या मंदिरासंदर्भात वातावरण अतिशय आनंददायक आहे.

अष्टविनायक मन्दिर, लातूर:

     हे शिवाजी नगरमध्ये स्थित आहे. शहरातील अष्टविनायक मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान आहेभगवान गणेशाच्या मुर्ती व्यतिरीक्त येथे अष्टविनायकाच्या मुर्ती देखील विराजमान आहेत या मंदिराच्या आजुबाजुला बाग असुन कारंजे देखील आहेत त्यामुळे लहानांपासुन मोठयांपर्यंत सर्वांनाच हे ठिकाण आकर्षीत करत असतं.
    मंदिरासमोर जवळपास १० फुट उंचीची भगवान शंकराची मुर्ती विराजमान आहे शिवाय नवग्रहविठ्ठल रूक्मिीणीहनुमानशेषनागआणि देवी सरस्वती च्या मुर्ती देखील येथे स्थापण्यात आल्या आहेतसंध्याकाळच्या वेळेस येथे विशेष गर्दी होते.

सूरत शावली दर्गा लातूर

हजरत शाली सूरत मोठी
 सूरत शावली दर्गा लातूर शहराचा एक भाग असलेल्या पटेल चौक राम गली येथे स्थित आहे. १९३९ च्या सुमारास एका मुस्लिम संत सैफ उल्ला शाह सरदार यांच्या स्मृत्यर्थ हा दर्गा बांधण्यात आला.ज्यांनी इथे समाधी घेतली.जून किंवा जुलै महिन्यात दरवर्षी वार्षिक मेळावा होतो जो ५ दिवसाचा असतो.
 विलासराव देशमुख उद्यान, लातूर:

हे नाना नानी उद्यान होते. हे मध्यवर्ती ठिकाणी महानगर पालिकेजवळ स्थित आहे व आरामदायक वातावरणामुळे जनतेत प्रसिद्ध आहे. नागरिक इथे परिवार, अपत्य व मित्रांसह वेळ घालवतात. मुक्त सभागृहसुद्धा उपलब्ध आहे. उद्यानाच्या केन्द्रात सार्वजनिक बैठकांसाठी जागा आहे.
औसाचा किल्ला :-

लातूर जिल्ह्यातील उदगीर व औसा हे दोन सुंदर भूईकोट किल्ले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे किल्ले निजामाच्या संस्थानात असल्यामुळे नांदते होते. संस्थानाची सरकारी कार्यालये या किल्ल्यात असल्याने या किल्ल्यांवरील बहुतेक इमारतींचा वापर बदलला तरी त्या शाबूत आहेत. तसेच हे किल्ले पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून त्यांनी डगडूजी केल्याने किल्ल्यांची शान अजूनही टिकून आहे. भूईकोट किल्ल्यांची सर्व वैशिष्ट्ये या किल्ल्यांमध्ये पहायला मिळतात. औसा किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आढळणारे मोर. किल्ल्यावरील झाडी, आजूबाजूची शेती व कमी माणसांचा वावर यामुळे या किल्ल्यात अनेक मोर पहायला मिळतात. स्वत:चे वहान असल्यास औसा किल्ल्याबरोबर खरोसा येथील लेणी, निलंग्याचे निलकंठेश्वर मंदिर व उदगीरचा किल्ला ही ठिकाणे एका दिवसात पहाता येतात. 


औसा गावातून गाडीने आपण थेट किल्ल्याच्या लोहबंदी दरवाजा पर्यंत जाऊ शकतो. औसा गाव व किल्ला एकाच पातळीवर असल्यामूळे  किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी ४० फूट खोल व २० फूट रूंद खंदक खोदलेला आहे. हा खंदक दोनही बाजूनी बांधून काढलेला आहे. पूर्वीच्या काळी खंदकात पाणी सोडलेले असे व प्रवेशव्दारासमोर खंदकावर उचलता येणारा पूल ठेवलेला असे. हा पूल सूर्यास्तानंतर व युध्द प्रसंगी उचलून (काढून) घेतला जात असे. आज गावाच्या बाजूला असलेला खंदक बुजलेला असल्यामुळे थेट किल्ल्यात प्रवेश करता येतो. लोहबंदी दरवाजातून आत शिरल्यावर खंदकात काही घर (वस्ती) आहेत व इतर बाजूच्या खंदकात सध्या शेती केली जाते.
औसा किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. बाहेरील तटबंदीची उंची ७० फूट असून त्यात १२ बुरुज आहेत. बाहेरील तटबंदीवर २ फूट रुंद व ३ फूट उंच चर्या आहेत. आतील तटबंदी १०० फूट उंच असून त्यात १२ बुरुज आहेत. चर्या, तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. खंदक ओलांडून जातांना खंदकात पायर्‍या असलेल्या दोन विहिरी आहेत. किल्ल्याला एकामागोमाग एक असे ४ दरवाजे आहेत. किल्ल्यात चांद विहिर, तवा विहीर, कटोरी विहिर अशा तीन विहिरी आहेत. किल्ल्यात अनेक वैशिष्य़्पूर्ण तोफ़ा आहेत. त्यात एक  ७ फूट ४ इंच लांब व २ फूट ४ इंच व्यासाची पंचधातूची तोफ आहे.या तोफेवर फारसीतील शिलालेख आहे व मागच्या बाजूला सूर्यमुख कोरलेल आहे. 
औसा किल्ल्यावरील अजून एक वेगळी वास्तू म्हणजे "जलमहाल". एका बांधीव तलावाच्या खाली हा महाल आहे . महालात उतरण्यासाठी तलावाच्या एका बाजूला जीना आहे. विजेरी घेऊन यात उतरावे लागते. खाली उतरल्यावर आतमध्ये अनेक कमानी असलेला महाल पहायला मिळतो. या महालात हवा आणि प्रकाश आत येण्यासाठी छ्तामध्ये झरोके अशाप्रकारे बांधलेले आहेत की त्यांचे तोंड तलावाच्या पाण्याच्या पातळीच्या वर उघडेल. यामुळे तलावात पाणी भरले तरी महालाच्या  छ्तामध्ये असलेल्या झरोक्यातून पाणी खाली येत नसे. या महालाचा उपयोग उन्हाळ्याच्या दिवसात रहाण्यासाठी केला जात असे. जमिनी खाली बांधलेला महाल व वर असलेले तलावातील पाणी यामुळे महालात गारवा असे. या महालाचा उपयोग खलबतखाना म्हणूनही होत असावा.औसा किल्ल्यापासून २३ किमी अंतरावर खरोसा लेणी आहेत.
श्री केशव बालाजी मंदिर :-
    औसा तालुक्यात तयार करण्यात आलेले हे श्री केशव बालाजी मंदिर आज लातुर जिल्हयाचे वैभव बनु पाहात आहे. अतिशय पवित्र वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे मंदिर पाहाण्याकरता आणि दर्शनाकरता असंख्य भाविक रोज या ठिकाणी येत असतात. काळया पाषाणातील श्री केशव बालीजीची मुर्ती अतिशय रेखीव आणि सुरेख असुन मन मोहुन घेते. रोज प्रातःकाळी या मुर्तीला पंचामृताचे स्नान मंत्रोच्चारात घालण्यात येते तो अमृत जलाभिषेक डोळयाचे पारणे फेडणारा आहे. महाराष्ट्रातील बसलेली हनुमानाची सर्वात मोठी आणि भव्य मुर्ती या ठिकाणी विराजमान आहे. श्री गणेशाची, विठ्ठल रूक्मिणीची, केशवनंद बापुंची अतिशय रेखीव मुर्ती या ठिकाणी आहे.
मंदिर दर्शनाकरता रोज सकाळी सहा वाजता खुले होते ते रात्री ९ वाजेपर्यंत! बाहेरगावावरून येणा.या दर्शनार्थीं करता सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अन्नदान होते. दर शुक्रवारी सकाळी 10 ते सकाळी 6 या वेळेत महाप्रसाद आयोजित केला जातो.
     हे मंदिर ‘धर्म वा संस्कार नगरी … श्री मा कानकेश्वरी देवी रेसिडेन्सी’ या प्रकल्पाचा एक भाग आहे.अतिशय विस्तिर्ण परिसरात नियोजन पुर्वक उभारण्यात आलेल्या या मंदिरातुन भाविकाला माघारी फिरावेसे वाटत नाही असे वातावरण या मंदिरात आहे. हे मन्दिर औसाजवळ याकतपुर मार्गाजवळ आहे.तिरुपती बालाजी मन्दिराच्या धरतीवर हे बान्धले आहे. हे मन्दिर व शेजारील परिसर खासगी मालकीचा आहे पण प्रत्येक भक्त दर्शन व पर्यटनासाठी तिथे जाऊ शकतो. किल्ल्यानन्तर औसा नगरातील हे दुसरे आकर्षक स्थळ आहे. मन्दिराजवळ निवासी सुविधा उपलब्ध आहे.
खरोसा लेणी  (Karosa Caves)

लेणी म्हटल की आपल्या डोळ्यासमोर अजिंठा, वेरुळ आणि सह्याद्रीच्या कानाकोपर्‍यात काळ्या बेसॉल्ट मध्ये खोदलेली सुबक लेणी येतात. बेसॉल्ट व्यतिरीक्त महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात आढळणारा दुसरा दगड म्हणजे जांभा दगड. हा दगड सच्छिद्र आणि ठिसूळ असल्याने लेणी खोदण्यासाठी हा दगड निकृष्ठ प्रतीचा  समजला जातो. त्यामुळे जांभा दगडात सहसा लेणी खोदलेली पाहायला मिळत नाहीत. कोकणापासून काहीशे मैल दुर असलेल्या लातूर जिल्ह्यातील खरोसा गावाजवळ एक चक्क जांभा दगडाचा डोंगर आहे. लाखो वर्षापूर्वी पृथ्वीच्या पोटात झालेल्या उलथापालथीमुळे याठिकाणी या जांभ्या दगडाच्या डोंगराची निर्मिती झाली. ती का आणि कशी झाली ह्यावर भूगर्भशास्त्रज्ञांची अनेक मत आहेत. ती आपण बाजूल ठेऊया. पण याभागात असलेल्या या वेगळ्याच प्रकारच्या लालसर रंगाच्या दगडाचे त्यावेळच्या लेणी खोदणार्‍या कलाकारांना आकर्षण वाटल असेल आणि त्यातूनच या ठिसूळ दगडात त्यांनी लेणी कोरायचे आव्हान स्विकारल असेल. इसवीसनाच्या सातव्या आठव्या शतकात चालुक्य राजवटीत या लेण्यांची निर्मिती झाली असे मानले जाते.

लातूर निलंगा रस्त्यावर लातूरपासून ४५ किमी अंतरावर खरोसा गाव आहे. गावाच्या पुढे रस्त्याला लागून असलेल्या छोट्या डोंगरावर १२ लेणी आहेत. महामार्गावरून थेट लेण्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. पहिले लेणे बौध्द लेणे असून लेण्याच्या बाहेर स्तुपाचा उरलेला भाग पाहायला मिळतो. लेण्यात बुध्दाची मुर्ती आहे. दुसरे लेणे हे ब्राम्हणी (हिंदु) लेणे असून ते दोन मजली आहे. लेण्याच्या खालच्या आणि वरच्या मजल्यावर सभामंडप आणि गर्भगृह, प्रदक्षिणापथ अशी रचना पाहायला मिळते. लेण्याच्या भिंतीवर शिव, विष्णू, ब्रम्हा, व्दारपाल, शिवलिंग कोरलेली आहेत. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी अरुंद जीना आहे. जीन्याने वर गेल्यावर खांबांवर तोललेला भव्य सभामंडप आणि गाभार्‍यात शिवलिंग पाहायला मिळते. तिसरे लेणे महादेव लेणे हे महत्वाचे लेणे आहे. येथे शैव आणि वैष्णव पंथांचा मिलाप झालेला पाहायला मिळतो. लेण्याच्या बाहेरच्या भिंतीवर डाव्या बाजूला शंकर आणि उजव्या बाजूला कोदंडधारी राम आणि लेणी बांधण्यासाठी दान देणार्‍या दांपत्याच शिल्प कोरलेल आहे. आतल्या बाजूला सभामंडपाच्या डाव्या भिंतेवर शिवाची गजासूरवध, उमामहेश्वर, रावणानुग्रह इत्यादी शिल्प कोरलेली आहेत. तर उजव्या बाजूच्या भिंतीवर विष्णु अवतारातील गोवर्धन पर्वत उच्लणारा कृष्ण, वराह, नृसिंह, वामन यांची शिल्प कोरलेली आहेत. गाभार्‍यात शिवलिंग आहे. गाभार्‍याच्या दारावर व्दारपाल व नाग कोरलेले आहेत. गाभार्‍याच्या भिंतीवर राम रावण युध्द आणि अमृतमंथनाचे शिल्प कोरलेले आहे. पुढचे महत्वाचे लेणे म्हणजे लाकोले लेणे यात महिषासूरमर्दिनी, गणेश यांची शिल्पे आहेत आणि गाभार्‍यात विष्णुची मुर्ती आहे. याशिवाय सहाव्या - सातव्या लेण्यासमोर ठळकपणे दिसणारे हत्ती आपले लक्ष वेधून घेतात. लेण्यांच्या वरच्या बाजूला डोंगर माथ्यावर रेणुकादेवीच मंदिर आणि सीता न्हाणी नावचा पाण्याचा साठा आहे. खाजगी वहानाने औसा किल्ला, खरोसा लेणी आणि निलंगा गावातील प्राचीन नीलकंठेश्वराचे मंदिर एका दिवसात पाहुन होते. 
जाण्यासाठी :-
लातूर - निलंगा - बिदर रस्त्यावर लातूर पासून ४३ किमीवर व औसा पासून २३ किमी अंतरावर खरोसा गाव आहे. गावापुढे असलेल्या डोण्गरावर लेणी आहेत. एक पक्का रस्ता थेट डोंगरावरील लेण्यांपर्यंत जातो. 
खरोसापासून १० किमीवर निलंगा गाव आहे.
निलंगेश्वर मंदिर


मराठवाडा हा मंदिरस्थापत्याने बहरलेला आहे. गावोगावी आपल्याला देखणी मंदिरे आणि त्यावर केलेली सुंदर शिल्पकला बघायला मिळते. लातूरच्या दक्षिणेला अंदाजे ४७ कि.मी. अंतरावर असलेल्या निलंगा या तालुक्याच्या ठिकाणी इ.स. च्या १२ व्या शतकाच्या अखेरीस बांधलेले एक सुंदर शिवमंदिर उभे आहे. नीलकंठेश्वर मंदिर हे त्याचे नाव. कल्याणी चालुक्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या या मंदिरावर एकापेक्षा एक सुंदर, सुडौल अशा सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. खूपच प्रमाणबद्ध आणि विविध अशा या सुरसुंदरींनी हे मंदिर नटलेले आहे. नुसत्या सुरसुंदरीच नव्हे तर या मंदिराची अजूनही काही वैशिष्ट्ये दिसून येतात. हे मंदिर त्रिदल म्हणजे तीन गाभारे असलेले आहे. मंडपातून या तीनही गाभाऱ्यात जाण्यासाठी प्रवेशमार्ग आहेत. प्रत्येक गाभारा आणि मंडप याच्यामध्ये अंतराल आहे. पूर्वाभिमुख मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग असून दक्षिणाभिमुख गाभाऱ्यात विष्णूची केशव रूपातली अत्यंत सुंदर मूर्ती उभी आहे. या गाभाऱ्याच्या ललाटावर कोरलेली भूवराह प्रतिमा खूप सुंदर. इथल्या तिसऱ्या म्हणजेच उत्तराभिमुख असलेल्या गाभाऱ्यात एक आगळीवेगळी आणि सर्वांगसुंदर अशी मूर्ती दिसते. ती आहे उमामहेश्वर आलिंगनमूर्ती. इथे शिवाच्या डाव्या मांडीवर देवी बसलेली असून शिवाचा डावा हात तिच्या डाव्या खांद्यावर ठेवलेला दिसतो. यांच्या पायाशी एका बाजूला मोरावर बसलेला कार्तिकेय तर दुसरीकडे गणपती दिसतो. पण हिला म्हणायचे हरगौरीची मूर्ती. त्याला कारणही तसेच आहे.
 पार्वती ही कधी उमा असते तर कधी ती गौरी असते. तिच्या ह्या रूपांतील फरक मूर्तिकारांनी अतिशय कौशल्याने आणि नेमकेपणाने दाखवलेला आहे. जेव्हा पार्वती ही गौरी रूपात दाखवायची असते तेव्हा तिच्या पायाशी तिचे वाहन म्हणून गोधा किंवा घोरपड आवर्जून दाखवली जाते. घोरपड चिवटपणासाठी प्रसिद्ध आहे. एखाद्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी कठोरातील कठोर तप करण्याचे सामर्थ्य हे घोरपडीच्या रूपाने दाखवले जाते. पार्वतीने शिवाच्या प्राप्तीसाठी अत्यंत तीव्र आणि कठोर तपश्चर्या केली होती. तिची शिवप्राप्तीची इच्छा अत्यंत प्रबळ होती. तिची अवस्था एखाद्या पर्णहीन वृक्षाप्रमाणे झालेली होती या वरूनच तिला अपर्णा असेही नाव मिळालेले आहे. तिचा हा चिवटपणा, गोधेच्या रूपात दाखवला जातो. हेच वैशिष्ट्य निलंगा इथल्या मूर्तीत आहे. इथे शिव आणि पार्वती ज्या पीठावर पसलेले दाखवले आहेत त्याच्या पायाशी एका घोरपडीचे शिल्प कोरलेले आहे. ‘गोधासना भवेदगौरी’ असे तिचे वर्णन रूपमंडन या ग्रंथात केले असल्यामुळे ह्या निलंग्याच्या प्रतिमेला शिवपार्वती असे न म्हणता हरगौरी प्रतिमा असे संबोधले जाते. शिव म्हणजे हर आणि पार्वतीची होते गौरी. ह्या हरगौरी प्रतिमा खूपच दुर्मीळ आहेत. या अत्यंत देखण्या प्रतिमेवर दक्षिण भारतातल्या शिल्पकलेची छाप पडल्याचे जाणवते. हिंदू विवाह पद्धतीत गौरीहराची पूजा करण्याचा विधी प्रामुख्याने केला जातो. त्याचा संदर्भ याच संकल्पनेशी जोडलेला आहे.
मंदिराच्या मंडपात एका देवकोष्ठात महिषासुरमर्दिनी तर दुसऱ्या देवकोष्ठात अजून एक दुर्मिळ अशी अनंतविष्णूची स्थानक प्रतिमा पाहायला मिळते. कल्याणी चालुक्यांच्या मंदिरात दिसणारे अजून एक शिल्प म्हणजे सप्तमातृका. या मंदिरात सप्तमातृकांचा पट बघायला मिळतो. या सात मातृकांच्या सोबत गणपती कोरलेला आहे. मंदिराच्या बाह्यांगावर विविध सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. त्यात डालमालिका, दर्पणा, नुपूरपादिका, कर्पूरमंजरी, शुकसारिका सारख्या नितांत देखण्या सुंदरी दिसून येतात. यांच्याचबरोबर, मदन, विष्णू, चामुंडा, गौरी यांच्याही मूर्ती मंदिराच्या बाह्यांगावर कोरलेल्या आहेत. मंदिराला शिखर नाही. आणि सध्या या मंदिराला ऑइल पेंट दिलेला आहे. तरीसुद्धा इथल्या मूर्ती आणि त्यांचे सौंदर्य यात कुठेही कमीपणा आलेला नाही. देखणे शिल्पसौंदर्य आणि सुडौल अशा मूर्तींची मांदियाळी या मंदिरावर बघायला मिळते. लातूरच्या जवळ असलेले इतके सुंदर मंदिरस्थापत्य वेळ काढून बघावे असे आहे.

लेखन- आशुतोष बापट                

उदगिर (Udgir Fort)

     लातूर जिल्ह्यातील उदगीर शहराला प्राचीन इतिहास आहे. बालघाटाच्या डोंगर रांगेत वसलेल्या उदगीरचे प्राचीन नाव "उदयगिरी" होते. काही ठिकाणी याचा उल्लेख "उदकगिरी" या नावानेही येतो. या डोंगररांगेत लेंडी नदीचा उगम होत असल्यामुळे या परीसराला हे नाव मिळाले असावे. अगदी पुराण काळापासून या नगरीचे उल्लेख सापडतात त्यामुळे या शहराला  ऎतिहासिक व आध्यात्मिक मह्त्व आहे. सदाशिवराव (भाऊ) पेशव्यांनी निजामा विरुध्दची लढाई उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्यामूळे हा किल्ला सर्वांना परीचित आहे.
उदगिर किल्ल्याचा उल्लेख ११ शतकातील शिलालेखांमध्ये येत असला तरीही या नगरीचा उल्लेख पूराण कथांमध्येही आढळतो. करबसवेश्वर ग्रंथ या पोथीतील कथे नुसार उदलिंग ॠषींनी शंकराची तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न होऊन ॠषींनी आशिर्वाद दिला,"मी या ठिकाणी लिंग रुपाने येथे प्रगट होईन." त्यानुसार काही काळाने जमिनीतून एक लिंग हळूहळू वर आले. पुढील काळात याठिकाणी वस्ती वाढून नगर वसले त्याला उदलिंग ॠषींच्या नावावरून उदगीर हे नाव पडले. आजही किल्ल्यात उदगिर महाराजांचा मठ व शिवलिंग आहे.
उदगीर हा भूईकोट किल्ला आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होईपर्यंत हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता. त्यामूळे त्यातील अवशेष आजही अस्तित्वात आहेत. किल्ल्याला चार भक्कम दरवाजे आहेत. दिवाने आम, दिवाने खास, नर्तकी महाल, हवा महाल इत्यादी महाल आहेत. किल्ल्यात अनेक फ़ारसी शिलालेख आहेत.
उदगीर हत्तीबेट-देवर्जन
      लातूर जिल्ह्य़ाच्या उदगीर तालुक्यात मौजे हत्ती बेट नावाचं ठिकाण उदगीर शहराच्या पश्चिमेस १६ किमीवर वसले आहे. हत्ती बेटाला पुरातन काळापासून महत्त्व प्राप्त झालं आहे. या ठिकाणी पुरातन मंदिरांबरोबरच गुहा, कोरीव शिल्पं मोठय़ा प्रमाणात पाहावयास मिळतात. हत्ती बेट देवर्जनाला प्रादेशिक पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये रझाकारांविरुद्ध स्वातंत्र्यसैनिकांनी युद्ध करून शेवटपर्यंत हत्ती बेट रझाकारांना जिंकू दिलं नाही असा इतिहास इथं सांगितला जातो. हत्ती बेटावर दत्ताचं मंदिर आहे तसेच गंगाराम महाराजांची समाधी आहे. लोकांच्या श्रद्धेचा भाग असलेल्या या ठिकाणाला आसपासच्या गावांतून तसेच शेजारच्या राज्यांतून मोठय़ा प्रमाणात भाविक भेट देत असतात. पौर्णिमेला इथं भजन, कीर्तन आणि प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.


       हत्ती बेट पूर्वी उजाड आणि बोडका डोंगर होता. इथली जमीन निकृष्ट दर्जाची असल्याने नैसर्गिक झाडं डोंगरावर नव्हती. हे वन क्षेत्र मौजे हणमंतवाडी, धर्मापुरी, करवंदी आणि देवर्जन या गावांच्या सीमेलगत असून त्याचं क्षेत्र ४१ हेक्टर एवढं आहे. लोकांनी ठरवलं, प्रशासनाला लोकांनी आणि गावकऱ्यांनी साथ दिली तर किती उत्तम काम होऊ शकतं याचं हत्ती बेट हे एक उत्तम उदाहरण आहे. या सर्वानी मिळून या उजाड बोडक्या डोंगरावर हिरवाई फुलवली आहे. त्याचं रूपडंच पालटून टाकलं आहे.
लोहारा: 
उदगिर तालुक्यातील गाव महादेव बेट (टेकडी) व गैबिसाहेब बेटासाठी प्रसिद्ध आहे. निजामशाही वंशाच्या काळापासुन बेनिनाथ मठ प्रचलित आहे.

व्रिंदवन पार्क, चाकूर

लातूर शहरापासून सुमारे 35 किमी अंतरावर लातूर-नांदेडच्या राज्य महामार्गावर चकुर स्थित आहे. हे ठिकाण भगवान शिव मंदिर आणि एक करमणुकीचे उद्यान या पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. 

  • नौकाविहारा वृंदावन पार्क
  • पाण्याची घसरगुंरडी वृंदावन पार्क चाकूर
साई नन्दनवन, चाकूर: 
चाकुरजवळील आणखी एक पर्यटन स्थळ. ४०० एकर (१.६ किमी२) मध्ये पसरलेले, इथे आम्ब्याचा मळा, जल उद्यान व मनोरंजन उद्यान आहे. उद्यानाच्या केन्द्रात सत्यसाई बाबा मन्दिर स्थित आहे.
डोंग्रज: 
पाच गावांच्या सिमेवर स्थित चाकुर तालुक्यातील हे गाव मल्लप्पा शिव मन्दिरासाठी विख्यात आहे. श्रावण महिन्यात मल्लप्पा मन्दिर व सन्त अम्बादास मन्दिरात डोंग्रज येथे तिर्थयात्रेचे आयोजन होते. अनेक क्रिडा स्पर्धांचे आयोजन होते.
वनस्पती बेट, वडवळ: 
     ही टेकडी दुर्मिळ आयुर्वेदिक औषधी व वनस्पतींचे माहेरघर आहे. हे ठिकाण लातुरपासुन ३९ किमी व चाकुरपासुन १६.५ किमी दुर आहे. टेकडी भुमीपासुन ६५० फुट (२०० मि) उंच व वडवळ गावापासुन ३ किमी दुर आहे.

रेणापुरचे राजे हाके

लातूर जिल्ह्यातील रेणापूर हे ऐतिहासिक शहर असून सध्या ते तालुक्याचे ठिकाण आहे. लातूरचे उल्लेख राष्ट्रकुट काळापासून मिळतात. राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष यांच्या काळातील शिलालेख मध्ये लट्टलुर असा लातूरचा उल्लेख मिळतो. तर मराठ्यांच्या उत्कर्ष काळात हा भाग बहुतांश पणे निजामाच्या ताब्यात दिसून येतो.

याच लातूर च्या रेणापूर ची पारंपरिक वतनदारी हाके घराण्याकडे असून त्यांना राजे हा किताब होता. हा किताब कधी पासून त्यांच्या घराण्याकडे चालू होता हे स्पष्ट कळत नाही परंतु हाके यांचेच सोयरे असलेले राजे पांढरे, राजे कोकरे, राजे मदने या घराण्याकडे शिवकाळात व त्याच्या पूर्वीपासून राजे किताब दिसून येतो त्यामुळे कदाचित हाकेना देखील शिवकाळापासूनच राजे किताब असावा.

रेणापूर च्या राजे हाके शाखेतील मानसिंग राजे हाके हे ज्ञात मूळपुरुष असून ते छ. शाहू महाराजांच्या काळात सक्रिय दिसून येतात. निजाम व पेशवे यांच्या झालेल्या चकमकी मध्ये मानसिंग राजे हाके निजामाच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसतात.

तर त्याच वेळी दाभाडे व पेशवे यांच्या मध्ये वैमनस्य निर्माण झाले असता, मानसिंग हाके यांनी दाभाडे यांची न्याय बाजू घेतल्याचे दिसून येते. ह्याच काळात मानसिंग राजेहाके यांचे पुत्र खंडेराव राजेहाके हे मराठ्यांच्यावतीने दिसतात. रेणापूर मध्ये ऐतिहासिक रेणुका माता मंदिर असून ते अहिल्यादेवी होळकर यांनी बांधल्याचे सांगितले जाते.

तेथील हलती दीपमाळ वैशिष्ट्यपुर्ण आहे. तसेच गावात राजे हाके व ब्राम्हण पाटील यांचा एकत्रित राजवाडा आहे. राजवाडा मोठा ऐसपैस असून दोन मोठे प्रवेशद्वार आहेत. आत मधे चौसोफा असून धान्य ठेवण्याचे कोठारे आज ही सुस्थितीत आहेत.

मुख्य दरवाजा
आतील दरवाजा
आतील बाजू
धान्य कोठार

बांधकाम आजही मजबूत असून आजही राजे हाके कुटुंबीय वाड्यात वास्तव्यास आहे. गावातील आणखी एक ऐतिहासिक वास्तू म्हणजे राजा राणी यांची समाधी म्हणजेच मानसिंग राजे हाके व त्यांच्या पत्नी यांची समाधी होय.

मजबूत तटबंदी

मध्यकाळातील वास्तुना साजेशी अशी मुस्लिम प्रभाव असलेली ही समाधी असून ह्या जोड समाध्या आहेत. वरती घुमट असून चार बाजूस मिनार आहेत. अतिशय भव्य असणाऱ्या ह्या समाध्या राजे हाके घराण्याचे वैभवशाली परंपरेची साक्ष देतात.

जोड समाधी

समाधीच्या बाजूस बारव बांधली असून प्रशस्त अशी बारव आहे. तिच्या पाण्याचा वापर समाधीच्या पूजेसाठी होत असावा. ज्यांना राजे हाके घराण्याची ऐतिहासिक माहिती जाणून घेण्याची ईच्छा आहे त्यांनी नक्कीच एक वेळ रेणापूर गावाला भेट द्यावी.

बारव


Udgir Fort

Unknown

Marathwada Circuit- 1200 Kms, 7 forts, 2 Caves
Day 1: Pune-Madha-Paranda-Tuljapur (360 Kms)
Day 2: Dharshiv Caves
Day 3: Tuljapur-Ausa-Kharosa-Udgir-Nanded (280 Kms)
Day 4: Nanded-Kandhar-Dharur-Kunthaligiri (290 Kms)
Day 5: Kunthaligiri-Kharda-Bhadurgad AKA Dharmaveergad-Pune (265 Kms)

Type: Land Fort
Base Village: Udgir
Where:396Kms from Pune, 149Kms from Tuljapur
Route: Tuljapur-Ausa-Nilanga-Udgir
Time visited: August 2011
Time to see around: 1.5 hour
How to visit: After ST Bus stand take a right turn. It’s at the end of that lane.
Meter reading from Pune: 520 Kms

Udgir is famous for the historic battle between Marathas led by Sadashivrao Bhau and Nizam in 1759. Sadashivrao Bhau bravely defeated Nizam. The fort of Udgir is said to be built by the king of Bahamani.

The fort is bounded by a 40 feet deep trench which is now overgrown with bushes.

There are two main watch towers- one immediately at the entrance which overlooks the Udgir city.

There is a huge canyon called Suryamookhi on this buruj.

Another cannon.

There are few remains of palaces next to this tower. The second floor had rooms which seemed like Seesh-Mahal...

The other watch tower is at the far right end from where you can see Samadhi of Udaygir Maharaj below and the entire buildings in the fort.

There are several palaces and Durbar halls.

The fountain is worth dekko.

The scence from the other end watch tower.

The strength of this fort was in the double fortification. The Samadhi of Udaygir Maharaj is on the right hand side before you enter through second gate and is 60 feet under the normal ground level.

It is believed that the Udgir fort has a direct deep underground soorang (tunnel) connection with Bhalki & Dharur Fort.

Ugdgir landacape city from the buruj

We proceeded to Nanded for stay.

http://ekpravas.blogspot.com/2011/08/udgir-fort.html


Kharosa Caves

Unknown

Marathwada Circuit- 1200 Kms, 7 forts, 2 Caves
Day 1: Pune-Madha-Paranda-Tuljapur (360 Kms)
Day 2: Dharshiv Caves
Day 3: Tuljapur-Ausa-Kharosa-Udgir-Nanded (280 Kms)
Day 4: Nanded-Kandhar-Dharur-Kunthaligiri (290 Kms)
Day 5: Kunthaligiri-Kharda-Bhadurgad AKA Dharmaveergad-Pune (265 Kms)

Type: Caves
Base Village: Kharosa (Few kms before Nilanga)
Where:370 KMs from Pune, 42Kms from Latur, 27Kms from Ausa
Route: Off Latur
Time visited: August 2011
Time to see around: 1 hour
How to visit: There’s a left turn for caves of about 1 or 2 kms after the Kharosa village exit off Ausa-Udgir highway few kms before Nilanga. A tar road takes right up to the caves.
Meter reading from Pune: 445 Kms

There are around 12 caves believed to build in 6th century.

The first cave is Buddhist.

A freshly coloured statue of Lord Buddha is seen in sitting position.

There are few caves with shivling and one with lord Dutta.

The sculpture of yaksa (?) with bow and arrow outside one of the caves is worth dekko.

The second cave has Shivling and lot people come here for blessings.

The 4th or probably 5th caves is of 2 floors. The ground floor is slightly below ground level from where the mid-level floor can be accessed.

To climb to the Upper floor, one has to climb from a narrow staircase which is all broken down.

The upper hall has various Vishnu, Shiv-Parvati idols.

On the upper side of the hill you will find Renuka devi Temple.

Later proceeded to our next destination- Udgir Fort.

                                                                    

Ausa Fort

Unknown

Marathwada Circuit- 1200 Kms, 7 forts, 2 Caves
Day 1: Pune-Madha-Paranda-Tuljapur (360 Kms)
Day 2: Dharshiv Caves
Day 3: Tuljapur-Ausa-Kharosa-Udgir-Nanded (280 Kms)
Day 4: Nanded-Kandhar-Dharur-Kunthaligiri (290 Kms)
Day 5: Kunthaligiri-Kharda-Bhadurgad AKA Dharmaveergad-Pune (265 Kms)

Type: Land Fort
Base Village: Ausa
Where:311Kms from Pune, 63Kms from Tuljapur
Route: Tuljapur-Ausa
Time visited: August 2011
Time to see around: 1 hour
How to visit: Just before you take a turn to enter Ausa off Tuljapur-Latur highway, there’s a left turn (near college) which will take directly to the fort.
Meter reading from Pune: 420 Kms

After a stay in Tuljapur we preceded to Ausa early morning. This fort is also under the control of the ASI and lot of restoration work is done.

The fort is spread over 5 hectares with a 20 feet trench around the fort which now has overgrown shurbs.

There are 2 doors to enter and are in good condition.

There are several cannons neatly lined up in the entrance.

There are 4-5 peacocks which roam merrily in tranquil surroundings.

DiwaneAam walls can be easily identified.

There are few cannon balls still in good condition.

There is a huge well in between the fort and has a lot of water and water channels underneath.

You can walk over the fortification wall completely to watch the expanse of the fort.

There are two huge canyons on the fort out of which one is about 8 feet and has Nizam Shahs name on it.




On one of the west side buruj there’s a nameplate with year mentioned as 1529 when the damaged fortifications was reconstructed.

The villagers continue to do their daily chores peacefully around.

We preceded tour next destination- Kharosa caves.

http://ekpravas.blogspot.com/2011/08/ausa.html


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...