
पुष्कर्णी, नांदेड किल्ला
|

![]() |
नांदेडच्या तलवारींचा खणखणाट :-
शीख धर्मीयांच्या दृष्टीने नांदेडला असे महत्त्व असल्यामुळे नांदेडमध्ये
काही घटकांना चालना मिळाली. त्यापकी एक म्हणजे येथील शस्त्रांची बाजारपेठ.
खालसा पंथीय केस, कडं, कंगवा (लाकडी), कच्छा आणि कृपाण या पाच गोष्टींचे
धारण करतात. यापकी कृपाण म्हणजे धारदार शस्त्रच. धर्मकारणासाठी शीख
धर्मीयांना ते बाळगायची परवानगी आहे. अर्थातच दक्षिण काशी म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या क्षेत्री जगभरातून शीख भाविक येत असतील तर त्यांच्या धर्माशी
निगडित अशा अनेक गोष्टींची नांदेडमध्ये विक्री वाढणार हे अगदीच साहजिक आहे.
कृपाण हे त्यापैकीच एक. भारतीय कायद्यानुसार नऊ इंचांपेक्षा जास्त धारदार
शस्त्र बाळगणे, विकणे बेकायदेशीर ठरत असल्याचे नांदेडचे पोलिस सांगतात.
कृपाण हे सर्वसाधारणपणे या मर्यादेच्या आत असते. पण कृपाणाबरोबरच शीख
धर्मीय तलवारदेखील बाळगतात. आणि त्याला धर्माचा आधार असल्यामुळे कायदा –
सुव्यवस्थेचं रक्षण करणारे पोलीस शिखांच्या तलवार हे शस्त्र बाळगण्याला
आक्षेप घेत नाहीत. त्यामुळेच नांदेड येथे कृपाण आणि तलवार सहजगत्या उपलब्ध
झाली तर त्याबद्दल आश्चर्य वाटायला नको. पण येथे शीख धर्मीयांबरोबरच शीख
नसलेल्या लोकांनादेखील या गोष्टी विकत घेता येतात असे समजले होते. आणि केवळ
तलवारीच नाही तर त्या आडून अँटिक तलवारी विकण्याची एक बाजारपेठच येथे
विकसित झाली आहे, असेही समजले.
नांदेड़ के गुरूद्वारे
![]() |
| गुरुद्वारा तखत सचखंड श्री हज़ूर साहिब, नांदेड़, महाराष्ट्र |
हैदराबाद में दो दिन रुकने के बाद हम नांदेड़ की ओर बढे. निर्मल में एक रात आराम किया ( ये शब्द 'निर्मल' एक जिले का नाम है जो तेलंगाना में है! ). वहां से अगले दिन गुरुद्वारों के शहर नांदेड़ में प्रवेश किया.
नांदेड़ जिला महाराष्ट्र के मराठवाड़ा क्षेत्र के पूर्वी भाग में गोदावरी नदी के किनारे है. नांदेड़ मुम्बई से 600 किमी, हैदराबाद से 275 किमी और नागपुर से 425 किमी दूर है. रेल और सड़कों से जुड़ा हुआ शहर है. एक छोटा एयरपोर्ट - इंदिरा गाँधी एयरपोर्ट भी है पर कम ही इस्तेमाल होता है. इसका शहर का नाम नांदेड़-वाघला, अब्चल नगर या अबिचल नगर भी बताया जाता है. नांदेड़ में तेलगु के अलावा हिंदी, मराठी, उर्दू और लम्बाडी भाषाएं भी बोली जाती हैं. 2011 की जनगणना के अनुसार यहाँ की आबादी 33 लाख से ज्यादा थी.
नांदेड़ में दसवें सिख गुरु श्री गुरु गोबिंद सिंह का निधन 7 अक्टूबर 1708 में हुआ था. अंतिम दिनों में उन्होंने 'गुरु' की पदवी किसी व्यक्ति को ना दे कर 'ग्रन्थ साहिब' को दी. श्री गुरु गोबिंद सिंह के अंतिम विश्राम स्थल को 'तखत सचखण्ड श्री हज़ूर साहिब' कहा जाता है. सिख धर्म के अन्य चार तखत हैं - 1. अकाल तखत अमृतसर, 2. तखत केशगढ़ साहिब आनंदपुर, 3. तखत पटना साहिब बिहार और 4. तखत दमदमा साहिब भटिंडा.
पहला गुरुद्वारा यहाँ महाराजा रणजीत सिंह ( 1780 - 1839 ) ने बनवाया था. इसके लिए पैसे, सामान, कारीगर और और मजदूर पंजाब से भेजे गए थे. इनमें से ज्यादातर लोग यहीं बस गए. आसपास के इलाके में काफी संख्या में सिख आबादी है. ऑटो ड्राइवर ने बताया कि जिले में 28 बड़े गुरूद्वारे हैं. स्थानीय लोग इन्हें 'नानक टेम्पल' कहते हैं.
नांदेड़ में रहने के लिए होटल भी हैं और बहुत से लॉज और धर्मशाला भी हैं जिनमें अच्छी व्यवस्था है और बहुत कम पैसों में कमरे उपलब्ध हैं. ऑटो से शहर के सभी गुरुद्वारे देख सकते हैं. पूरे दिन की टैक्सी कर लें तो दूर दूर के गुरुद्वारों में भी जा सकते हैं. कुछ फोटो प्रस्तुत हैं.
![]() |
| शाम के समय का दृश्य |
![]() |
| बुरका पहने कुछ दर्शनार्थी भी गुरूद्वारे में दिखे |
![]() |
| गुरुद्वारा नानक सर साहिब |
![]() |
| द्वार 4. विशालकाय परिसर में इस तरह के कई द्वार हैं |
![]() |
| द्वार 5 |
![]() |
| द्वार 6 |
![]() |
| गुरुद्वारा श्री लंगर साहिब. गोदावरी नदी के किनारे बना हुआ है जहाँ 24 x 7 खाने की सेवा सभी को दी जाती है |
![]() |
| गुरुद्वारा श्री गोबिंद बाग साहिब जी. यहाँ बहुत बड़ा हरा भरा पार्क, जिम और लेज़र शो की व्यवस्था है |
![]() |
| गुरुद्वारा श्री बंदा घाट साहिब. ये स्थान माधो दस बैरागी का आश्रम हुआ करता था. 1708 में गुरु गोबिंद सिंह से मुलाकात के बाद वो बंदा सिंह बहादुर कहलाए. उन्हीं के नाम पर यह गुरुद्वारा बना. |
![]() |
| गुरुद्वारा साहिब नांदेड़ |
![]() |
| गुरुद्वारा साहिब नांदेड़ |
![]() |
| गुरुद्वारा साहिब नांदेड़ |
![]() |
| नांदेड़ शहर का एक दृश्य |
गुरूद्वारे के आसपास का एक दृश्य



शंखतीर्थ

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा


.अपंरपार महादेव मंदिर पाटनूर, ता.अर्धापूर

महाविहार बावरी नगर दाभड, ता.अर्धापूर


श्रृंगऋषी देवस्थाडन मौजे रेणापुर ता भोकर

मुखेडची ऐतिहासिक बारव


श्रीक्षेत्र माहूर हे नांदेड जिल्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्रीरेणुकादेवीमंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत. पण त्याचबरोबर ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत.
भागिरथी नदीच्या तीरावर सूर्य वंशीय रेणु राजा प्रजापालनदक्ष होता. पण त्यास संतती नसल्यानं तो फ़ार उदासीन असे. नंतर त्यानं कन्याकामेष्टि यज्ञ केला. त्या यज्ञकुडांतून श्री रेणुका उत्पन्न झाली. ही अयोनीसंभव होती. तिला पाहून राजास फ़ार आनंद झाला. तिचं पालनपोषण करण्यात राजाराणीचे दिवस उत्तम त-हेनं जाऊ लागले. ही शक्ती पार्वतीचा अवतार होती. ती लावण्यसंपन्न असून गुणानं अत्यंत तेजस्वी असल्यानं तिला क्षत्रिय पुत्र कोणीच मागनी घालीना. शेवटी राजानं तिचं स्वयंवर करण्याचं ठरविलं. स्वयंवरास ऋचीक व त्यांचा पुत्र जगदग्नि आले होते. पुष्कळ राजपुत्रही होते. रेणुकेनं जगदग्नि पति समजून त्याच्या गळ्यांत पुष्पमाला घातली. त्यावेळी इतर राजांनी जगदग्नीशी लढाई केली. त्यांत जगदग्नि यशस्वी झाले. नंतर त्यांचे लग्न मोठया थाटांत झालं. रेणुकेलाच मातंगी हेसुद्धा नाव आहे. विष्णुरूप परशुरामाची माता व जगन्माता शिवपत्नी अनादी अनंत आहे व रेणुका हे तिचंच रूप आहे. म्हणून श्री रेणुकेच्या रूपात शाक्त आणि वैष्णव या दोन्ही पंथांचा समन्वय आहे.
जमदग्नि हे भगवान शंकराचे अवतार मानले जातात. ते अत्यंत रागीट होते. त्यांचा आश्रम नर्मदा तीरावर होता. तिथं हाटकेश्वर तीर्थ होतं. एकदा हे लीलेनं बाण आणण्यास रेणुकेस सांगत होते. ती वेळ कडक उन्हाची असल्यामुळं रेणुका दमली व विश्रांतिस्तव एका झाडाखाली बसली व विश्रांती घेऊ लागली. थोडी विश्रांती घेऊन बाण घेऊन गेल्यावर जगदग्नींनी मोठ्या रागानं बाण आणण्यास का उशीर झाला, असं विचारलं. रेणुकेनं सूर्याचा ताप झाल्यानं थोडी विश्रांती घेऊन आल्याचे सांगताच ते सूर्यावर संतापले व बाणानं सूर्याचा वेध घेण्यास तयार झाले. तेव्हा त्यांना सूर्य शरण आला व त्याने त्यांना छत्री व पादत्रानं दिली. शिवाय मी तुझ्या पोटी येईन असे जमदग्निस सांगितलं. पुढं तो परशुरामाच्या रुपानं जमदग्निच्या पोटी जन्मला अशी कथा विष्णुधर्मोत्तरांत १-३६ त व महाभारत अनुशासन पर्वात ९४-९५ अध्यायांत आहे.
त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. ' तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस .' परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले . या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ' मातापूर ' म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ' ऊर ' म्हणजे गाव ते ' माऊर ' आणि पुढे ' माहूर ' झाले.!! तसेच कालांतराने माहूर ला (मा=मायेच,(आई) हूर:-हृदय) "आई चे हृदय" असलेले ठिकाण म्हणजे "माहूर " असे संबोधले जाऊ लागले .
रेणुकादेवी मंदिर
दत्तात्रेय मंदिर
पुराणात हे दत्ताचें शयनस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. बाराव्या शतकांतील दत्तभक्त चांगदेव राऊळ यांना येथेंच दत्त साक्षात्कार झाला चांगदेव राऊळांच्याही पूर्वी या स्थानाची विशेष प्रसिद्धी होती. हे एक शक्तिपीठही आहे. परशुरामाची आई रेणुका येथे सती गेली, असे पुराणात म्हटले आहे. गुरुचरित्रात या स्थानाचे ओझरते उल्लेख आहेत.
माहूरच्या एका स्त्रीचा पती श्रीगुरूंनी संजीवित केला, अशी कथा गुरुचरित्रात (अध्याय ३०) आहे. महानुभाव संप्रदायांत माहूराचा महिमा विशेष आहे. 'स्थानपेथी'च्या काही प्रतीत तेराव्या शतकांतील माहूरविषयी विस्तृत वर्णन आले आहे. अलीकडच्या काळात विष्णुदासांचा निवास माहूर येथे होता. दासोपंतांनी बारा वर्षे या ठिकाणी तप करून दत्तप्रभूला प्रसन्न करून घेतले होते.
माहूरच्या तीर्थमहिम्यात देवदेवेश्वर (महानुभावीय दत्तस्थान), रेणुकादेवी, अनसूया, दत्तात्रेय या देवांची मंदिरे आणि अमृतकुंड, सर्वतीर्थ, कमलतीर्थ, शिखर ही स्थानें महत्त्वाची गणली जातात. दत्तात्रेयाचे मंदिर माहूरपासून सहा मैलांवर एका शिखरावर आहे. महंत मुकुंदभारती या नावाच्या महंतांनी सध्याचे मंदिर सन १२९७ मध्ये बांधले. मूळ मंदिर फक्त १०' X १२' या आकाराचे आहे. त्यानंतर भोवतींच्या ओवऱ्या व प्राकार यांची बांधणी झालेली आहे.
या देवस्थानाला औरंगजेबाकडून अनेक जहागिऱ्या मिळालेल्या आहेत. देवस्थानाचे वार्षिक उत्पन्न पन्नास हजारांवर आहे. 'माळवातीर्थ' म्हणून ओळखले जाणारे तीर्थ म्हणजे महानुभावी साहित्यात व ज्ञानेश्वरांच्या अभंगांत उल्लेखिलेला मेरुवाळा तलाव होय.
‘प्रणिता प्रदक्षिणा वाहते । दुजें वैकुंठ महीवतरें’ असा महिमा या क्षेत्राचा विष्णुदासांनी वर्णन केला आहे. आमलीग्राम, सिद्धपूर, देवनगर, मातापूर अशी विविध नावे निरनिराळ्या युगात या क्षेत्रास मिळालेली दिसतात. काशीक्षेत्रापेक्षाही याचे महात्म्य मोठे असल्याने ‘जवा आगळी काशी’ असे माहूरसंबंधाने म्हटले जाते. काशी क्षेत्रास जसा काळभैरव तसा या क्षेत्रास झंपटनाथ हा क्षेत्रपाल कोतवाल आहे.
मातापूर’ अर्थात माहूर या नावाने श्रीदेवीच्या साडेतीन शक्तिपीठांपकी एक महत्त्वाचे तिर्थक्षेत्र ‘प्राचीन दत्तक्षेत्र’ म्हणूनही तितकंच प्रसिद्ध आहे. अतिशय प्राचीन अशा या क्षेत्री असलेल्या ‘दत्तशिखरा’वर श्रीदत्तात्रेयांचा वास आहे. माहूर गावापासून चार-पाच कि. मी. अंतरावर असलेल्या दत्तशिखरावरील मूळ मंदिर १०-१२ फूट एवढय़ाच लांबीरुंदीचे आहे. मूळ मंदिराची बांधणी संवत १२९७ मध्ये महंत मुकुंदभारती यांनी केली. येथे आपणांस एकमुखी दत्ताची मूर्ती पाहावयास मिळते. येथे ‘भारती’ परंपरेतील गोसाव्यांचा नित्य वावर आहे. दत्तस्थानापासून मलभर अंतरावर सती अनुसयेचे मंदिर आहे. येथून जवळच अत्री ऋषींच्या पादुका व आश्रम आहे. येथील दत्तमंदिराच्या प्रशस्त आवारात दत्तपादुका, शिविलग आदी स्थापित आहेत. श्रीदत्तात्रेय हे संचारी दैवत आहे. दत्तात्रेयाचा आश्रम सिंहाचळाजवळ प्रयागवनात आहे. तो स्वेच्छाविहारी अर्थात संचारी असल्याने माहूर, पांचाळेश्वर, कोल्हापूर ही त्याची विहारस्थाने आहेत. यांतील माहूर हे पुरातन दत्तक्षेत्र दत्तात्रेयाचे शयनस्थान समजले जाते. तो पांचाळेश्वरी स्नान करतो आणि कोल्हापुरी भिक्षाटन करतो, अशी श्रद्धा रूढ आहे. मात्र दिवसाची अखेर अर्थात निद्रास्थानासाठी मात्र तो मातापूर ‘माहूर’ येथे सती अनुसयेच्या वात्सल्यभरल्या कुशीत येतो. दत्तमहाराजांसारखे सर्वश्रेष्ठ दैवतही अखेर आईच्या ओढीने या दत्तशिखरावर येते हीच या क्षेत्राबद्दलची अपूर्वाई आहे.
दत्त शिखर माहूर येथील जागृत धुनी
दत्त शिखर माहूर येथील जागृत धुनी
यवतमाळहून महामार्गानं माहूरला जाताना अवघ्या १५ किमीवर 'मनदेव' नावाचं क्षेत्र आहे. तेथील महादेवाच्या सुंदर मंदिरामागं एक तलाव आहे. माहूर बसस्टँडपासून ३ किमीवर 'मातृतीर्थ' नावाचा तलाव आहे. परशुरामानं माता रेणुकेच्या अंत्यविधीसाठी बाण मारून हे मातृतीर्थ निर्माण केलं, अशी वदंता आहे. आजही रेणुकादेवीच्या स्नानासाठी येथील पाणी नेलं जातं. मातृतीर्थाकडं जाणाऱ्या रस्त्यावर 'झंपटनाथा'चं मंदिर आहे. 'तुझ्या आज्ञेवाचून हा गड कुणी चढणार नाही आणि कुणी चढल्यास त्याला माझं दर्शन पावणार नाही', असा वर रेणुकामातेनं झंपटनाथास दिला होता. त्यानुसार भक्तगण खरोखरच प्रथम झंपटनाथाचं दर्शन घेऊन मातृतीर्थावर स्नान करतात आणि मगच गड चढून रेणुकादेवीचं दर्शन घेतात. रेणुकामातेचं परमभक्त 'विष्णुकवी' यांचा मठही याच वाटेवर आहे. माता रेणुकेनं दर्शन दिलेलं रूप ते वनस्पतींच्या सहाय्यानं तयार केलेल्या रंगांनी हुबेहूब रेखाटत. झंपटनाथाच्या मंदिरानंतर येतं ती 'जमदग्नी खोरी'. हे जमदग्नी ऋषींच्या तपश्चर्येचं ठिकाण समजलं जातं. तपश्चर्येसाठी इथली नीरव शांतता किती उपयोगी होती याचा अनुभव येतो. पुढं 'मूलझरी' नावाचं तीर्थस्थान लागतं. पौराणिक कथेनुसार आजही इथं झाडं उगवत नाहीत. जमिनीतून सतत भस्म बाहेर येत राहतं. हे भस्म कपाळी लावूनच भक्तगण पुढं जातात. अर्धा रस्ता चालून गेल्यावर सतत वाहणारं गोमुख लागतं. त्याचा उगम आणि ते कसं निर्माण झालं, याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यानंतर रेणुकामातेच्या मंदिराच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. तिथून ३०० पायऱ्यांचा गड चढून गेल्यानंतर रेणुकामातेचं दर्शन होतं.
पाऊस झाल्यानंतर लगेच गेलात तर माहूरगडची खरी मजा कळेल तुम्हाला. माहूरगडचे जंगल खूप मोठे आहे. पौर्णिमेला लोक माहूरची परिक्रमा करतात. परिक्रमेमध्ये माहूरच्या पायथ्यापासून सुरु करून संपूर्ण जंगलाला प्रदक्षिणा घालतात. जंगलात बिबटे, अस्वल मुबलक असल्याने खूप सावधपणेच फिरावे लागते. पुसदकडून येणाऱ्या घाटात स्वयंभू शिवपिंड आहे, ज्यावर १२ महिने झऱ्यासारख्या ओहोळातून पाणी पडत राहते. (पूर्वी एसटीतुन लक्षपूर्वक पाहिल्यावर हि पिंडी दिसायची, आता मंदिर बांधले आहे. ) तिथून पुढे गाव सुरु झाल्यावर डाव्या बाजूला सोनापीर दर्गा आहे. सोनापीरच्या थोडं पुढे पायी गेल्यावर पांडवलेणी लागतात. दाताळा मोताळा तलाव, तलावावरून रेणुकादेवी मंदिरापर्यंत जाणारी पायवाट सगळे काही बघण्यासारखे, रेणुकादेवी गडावरून त्या वाटेने तलावावर अंघोळीस जायची/ जाते अशी आख्यायिका आहे. पहाटे पहाटे या तलावावर वाघ यायचे पूर्वी. ते देवदेवेश्वर मंदिर, (स्थानिक भाषेत देवदेवसरी) महानुभाव पंथीयांसाठी विशेष असे हे मंदिर फार गूढ आहे. एरवी साखळ्यांनी बांधलेले निपचित पडलेले लोक,ज्यात महिला, पुरुष आणि लहान बालके सुद्धा असतात, संध्याकाळच्या आरतीच्या वेळी मोठमोठ्याने "सोड दत्त्या सोड" म्हणत शिव्या देतात, आवारातल्या खांबावर चढतात, उड्या मारतात वगैरे अचाट प्रकार सुरु असतात.
माहूर गावापासून दक्षिणेस उंच अशा दोन टेकड्यांवर किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे.

माहूरची पांडवलेणी
पण माहुर येथे असलेली लेणी पर्यटकांची वाट बघत असतात. माहूर येथील लेण्यांना पांडवलेणी म्हणून ओळखले जाते. पांडवलेणी माहूर एसटी स्थानकापासून जास्तीत जास्त १५ मिनिटावर असूनसुद्धा येथे फारसे कोणीही येत नाही.माहूर येथील लेणी उत्तराभिमुखी असून एका टेकडीत कोरलेली आहेत. लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. लेणी साधारणपणे ६व्या ते ७व्या शतकात म्हणजे राष्ट्रकुट काळात कोरलेली आहेत. ही हिंदू लेणी असून लेणी संकुलात चार लेणी आहेत. संकुलाच्या मध्यभागी दगडी खांबांनी युक्त असे मोठे लेणे आहे. या लेण्याच्या दर्शनी भागात दोन पूर्ण स्तंभ आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. वरांड्यातून मुख्य दालनात प्रवेश करताना सहा पूर्ण स्तंभ आणि २ अर्ध स्तंभ आपले लक्ष वेधून घेतात. या खांबांवर शंकर, पार्वती, दुर्गा, महिषासुरमर्दिनी आदी शिल्पे कोरलेली आहेत. पण खांबाना पांढरा रंग मारलेला असल्यामुळे मूर्ती पटकन ओळखता येत नाहीत. या दालनाला जोडून गर्भगृह आहे. गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. गर्भगृहाच्या दरवाज्यावर दोन्ही बाजूला द्वारपालांची भव्य शिल्प कोरलेली आहेत. गर्भगृहाला पूर्ण प्रदक्षिणा मारता येते.मुख्य लेण्याच्या डाव्या बाजूला दोन अर्धवट कोरलेली असून एका लेण्यात गणपतीची मूर्ती कोरलेली आहे, दुसरे लेणे रिकामे आहे. मुख्य लेण्याच्या उजव्या बाजूला असलेल्या लेण्यांच्या दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. स्तंभांच्या पलीकडे मोठा वरंडा असून वरांडाच्या दोन्ही बाजूना विहार कोरलेले आहेत. हे दोन्ही विहार दिसायला सारखे असून दोघांच्याही दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ कोरलेले आहेत. या लेण्याच्या अंतर्भागात आणखीन तीन लेणी कोरलेली असून यात देवतांच्या मूर्ती पण कोरलेल्या आहेत. पण लेण्यात असलेल्या अंधारामुळे या मूर्ती पटकन दिसून येत नाहीत. या तिन्ही लेण्यात दगडी बाकसुद्धा कोरलेले आहेत.पांडव वनवासात असताना भीमाचे आणि हिडिंब राक्षसाचे युद्ध, भीम आणि हिडिंबेचा विवाह आणि घटोत्कचाचा जन्म याच पांडवलेण्यांच्या परिसरात झाला, असा स्थानिक लोकांचा समज आहे.
तीन क्रमांकाची लेणी कला आणि स्थापत्याच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय असून पूर्वाभिमुख असलेल्या या लेणीत सर्वाधिक शिल्प आहेत. यात द्वारपाल, कुबेर, गजलक्ष्मी, मुष्ठीयोद्धे, स्त्रीशिल्पे, सिंह, शिवपार्वती, गणेश या चित्राची रेलचेल आहे़ लेणी चार दक्षिणमुखी असून या लेणीत कोरीव गणेश शिल्प आहे. पाच क्रमांकाच्या लेणीचे दालन रिकामे आहे. या लेणीच्या पाठीमागील भिंतीत नागदेवतेचे पंचमुखी कोरीव शिल्प आहे़ अमेरिकेतील मिशीगण विद्यापीठातील कला आणि स्थापत्याचे अभ्यासक प्रो़ वॉल्टर स्पिक यांनी सर्वप्रथम माहूर येथील लेण्याचे सर्वेक्षण करून खोदकामाचा कालखंड राष्ट्रकुट इ़स़ ७५७ ते ९५४ काळातील असल्याचे नमूद केले. वेरूळ, कंधार, मान्यखेट या राष्ट्रकुटाच्या राजधान्या होत्या़ धाराशिव आणि माहूर येथील लेण्यांमध्ये साम्य आहे़ भगवान श्रीकृष्णांनी पाच पांडवांना माता कुंतीसह श्रीक्षेत्र माहूरला याच पांडव लेणीच्या भुयारी मार्गाने पाठविले. त्यामुळे या लेणीला पांडव लेणी नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. सदर लेणी १२ जानेवारी १९५३ रोजी औरंगाबाद पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. परंतु मागील ६५ वर्षाच्या काळात पुरातत्त्व विभागाकडून या पांडव लेण्याचा कसलाही विकास झालेला नाही. किंबहुना येथे रस्ता, विद्युत व्यवस्था नसल्याने ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा असलेला हा ठेवा आज विकासापासून दूर राहिला आहे. त्यामुळेच पर्यटकही या लेण्यांकडे पाठ फिरवित असल्याचे विदारक चित्र आहे.
माहूर वस्तुसंग्रहालय, माहूर (ता. किनवट, जि. नांदेड ) :
- नांदेडपर्यंत - नांदेड हे लोहमार्गानुसार मध्य रेल्वेवर येते. मुंबई, पुणे, हैद्राबाद, औरंगाबाद तसेच बंगळूर येथून नांदेडला आगगाडीने थेट जाता येते.
- माहूरपर्यंत - नांदेड ते माहूर अशी एस्टीची बससेवा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ चालविते. हा प्रवास सुमारे तीन तासाचा आहे.
- माहूर गांव ते टेकडीवरील मंदिर - शहरातून टेकडीच्या माथ्यावर जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या धावतात. त्याऐवजी काही खाजगी सेवादेखील मिळतात.
- नागपूर ते माहूर हे अंतर (वर्धा-यवतमाळ-मार्गे) रस्त्याने सुमारे २२० किलोमीटर आहे. या प्रवासासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या व काही अत्यल्प खाजगी वाहनेही मिळतात.

कंधार किल्ल्याचे बांधकाम राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणार्या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले. इ.स. १४०३ साली तुघलकाने वारंगळ जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली. परंतु नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला. त्याच्यानंतर काही काळ खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे.
हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच इ.स. १३३६ सालातील आहे. इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९० च्या सुमाराचा एक लेख शाही बुरूजावर आहे तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत. मलिक अंबर या प्रसिद्ध कारभार्यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या. मुहम्मदी मशिदीवर त्याचा शिलालेख आहे. मुर्तजा निजामाच्या कारकीर्दीत पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करुन बुरूज बांधले.
औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख बाग-ए-रश्के कश्मीर असा आहे. चौथ्या शतकात वरंगळचा काकतीय राजा नंदगिरीने कंधार किल्ला बांधला. त्याचा पुत्र सोमदेव याने कंधार ही राजधानी बनवली असा उल्लेख प्रतापरुद्र यशोभूषण या ग्रंथात आहे. इसवीसनाच्या सातव्या शतकात राष्ट्रकुट घराण्यातील राजा कृष्ण पहिला याने कंधार नगरास राजधानीचा दर्जा दिला . त्याच काळात कंधारला पाणी पुरवठा करण्यासाठी जगत्तुंग समुद्र या तलावाची निर्मिती करण्यात आली आणि कंधारचा किल्ला बांधण्यात आला. वेंगीचा चालुक्य राजा गुणग विजयादित्य तिसरा याने इसवीसनाच्या ९ व्या शतकात कंधार जाळून टाकले.
राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याने कंधार नगराची उभारणी केली. त्याच बरोबर किल्ला भक्कम केला. पुढील काळात राष्ट्रकुटानी त्यांची राजधानी गुलबर्गा जवळील म्यानखेटला याठिकाणी हलवली आणि कंधारला उपराजधानीचा दर्जा दिला. १२ व्या शतकात यादवांच्या ताब्यात हा किल्ला होता. १३ व्या शतकात मलिक काफूरने हा किल्ला जिंकून घेतला. महमद तुघलकाने १३४७ मध्ये हा किल्ला जिंकून घेतला. त्याने नसरत सुलतान याला कंधारचा किल्लेदार नेमले . १२ वर्ष किल्लेदार म्हणून राहील्यावर त्याने बंड केले ते तुघलकाने मोडून काढले. इसवीसन १३४७ मध्ये हसनगंगूने बहामनी सत्तेची स्थापना केली तेंव्हा कंधार किल्ला त्याच्या ताब्यात गेला.
बहामनी साम्राज्याचा अस्त झाल्यावर इसवीसन १५६५ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात किल्ला गेला. इसवीसन १५९६ मध्ये चांदबिबीने कंधार मोगलांच्या ताब्यात दिला. पुढे मलिक अंबरने हा किल्ला इसवीसन १६२० मध्ये मोगलांकडून जिंकून घेतला. त्याने किल्ला मजबूत केला . किल्ल्यात अंबरी बुरूज, दर्गा , मशीद बांधली आणि किल्ल्यात पाणीपुरवठा योजना राबवली . मोगल बादशाह शहाजहानने इसवीसन १६३१ मध्ये नसिरखान यास कंधार घेण्यास पाठवले. मोगलानी किल्ल्याला वेढा घातला. कंधारच्या किल्लेदाराने १९ दिवस किल्ला लढवला पण किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इसवीसनाच्या १८ व्या शतकात हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात कंधार किल्ला गेला. त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत तो निजामाच्या ताब्यात होता.
राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ला स्थापत्यकलेची अतिशय देखणी वास्तु मानली जाते़ २४ एकरवरील विस्तीर्ण बांधकाम इतिहासप्रेमी व पर्यटकांना भुरळ घालणारे आहे़ तटबंदी, बुरुज व आतील बारादरी, लालमहाल, राणीमहाल, शिशमहाल, बारूदखाना, कैदखाना, जलमहाल, दरबार महल, राजा महाल, राजबाग स्वार, अंबरखाना, प्रवेशद्वार, भुयारी मार्ग आदी किल्ल्यातील बांधकामे, कलाकुसर आदीने वास्तु भक्कम करण्यात आली़ या वास्तुला खंदकाचे संरक्षण कवच देण्यात आले़. ऐतिहासिक वास्तुचा बाराशे वर्षांचा वैभवशाली समृद्ध वारश्याचे संवर्धन करण्यात कमी पडत आहोत.
किल्ल्याचा विस्तार सुमारे 24 एकराचा आहे. या जागेभोवती प्रचंड कोट बांधलेला आहे. संपूर्ण किल्ल्याभोवती 18 फूट रुंद व 100 फूट लांबीचा खंदक आहे. या खंदकास लागून असलेली किल्ल्याची भिंत 120 फूट उंचीची आहे. किल्ल्यास सुमारे बाराशे वर्षांचा इतिहास आहे. इसवी सनाच्या 10 व्या शतकातले प्राचीन कंधारपूर, प्राचीन कला अवशेष आणि शांती घाटावरील तत्कालीन शिलालेख यामुळे महाराष्ट्राच्या प्राच्य परंपरेची आठवण करून देते.
कंधारचा दर्गाह

प्राच्य कंधारपुरातील शिल्पाविष्कार पाहायचा तो इथल्या अप्रतिम मूर्तिशिल्पातून. शहरभर विखरून पडलेला हा प्राच्य शिल्पसंभार शांती घाटावरील एका इमारतीत संग्रहित करून ठेवला आहे.
या शिल्पसंग्रहातील सहस्र कोटी स्तंभ, सप्त मातृकांची प्रचंड मूर्तिशिल्पे, लज्जागौरी लक्षणीय आहेत. याच संग्रहात 10 व्या शतकातला शिलालेखही पाहायला मिळतो. बौद्ध विहारातील सिद्धार्थ गौतम बुद्धांची मूर्ती ही नांदेड परिसरातील प्राचीनतम अवशेषांपैकी एक महत्त्वाचा वारसा आहे. शहरामधील जैन शिल्पावशेषही लक्षवेधी आहेत.
बिलोली मस्जिद
ह्या
मस्जिदीला हजरत नवाब सर्फराज खान शहीद मस्जिद असेही म्हणतात.तेथील
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हि मस्जिद ३३० वर्षापूर्वी बांधली गेली आहे .
हि मस्जिद बांधताना दगडाचा वापर केला आहे आणि हि मस्जिद चार स्तंभांनी
मिळून बनलेली आहे. खाली दिलेल्या फोटोत दिसून येईल कि कश्याप्रकारे हि
मस्जिद अति प्राचीन दगडांचा वापर करून तयार केली आहे या दगडी स्तंभावर
कोरीव काम पण पाहायला मिळते.
औरंगजेबाच्या
काळातील एक मशीद बिलोली येथे आहे. औरंगजेबाच्या सैन्यातील अधिकारी हजरत
नबाब सरफराजखान याचा दर्गा या मशिदीत बांधला गेला. ही वास्तू पूर्णपणे दगडी
बांधणीची असून चारमिनार व घुमट विशेष लक्षणीय आहेत. या मिनारावर साखळीच्या
आकाराचे शिल्पकाम आढळते. या मशिदीच्याजवळ एका कोपऱ्यात चौकोनी आकारातील
कुंड बारव आहे.
या शिल्पसंग्रहातील सहस्र कोटी स्तंभ, सप्त मातृकांची प्रचंड मूर्तिशिल्पे, लज्जागौरी लक्षणीय आहेत. याच संग्रहात 10 व्या शतकातला शिलालेखही पाहायला मिळतो. बौद्ध विहारातील सिद्धार्थ गौतम बुद्धांची मूर्ती ही नांदेड परिसरातील प्राचीनतम अवशेषांपैकी एक महत्त्वाचा वारसा आहे. शहरामधील जैन शिल्पावशेषही लक्षवेधी आहेत.

शिऊरच्या लेण्या

उनकेश्वर
शिव मंदिर, मुखेड
|
सिध्देश्वर मंदिर, होट्टल
|
सिध्देश्वर मंदिर, होट्टल
|
दगडी घट,सिध्देश्वर मंदिर, होट्टल
|
नृत्य गणेश
|
सुरसुंदरी
|
होट्टल : आतापर्यंत मला पुरातत्व खाते म्हणजे प्राचीन स्थळांच्या बाहेर निळी माहितीपट लावणारी संस्था वाटायची कारण सगळ्या प्राचीन स्थळांच्या देखरेखी साठी काही विशेष प्रयत्न हि संस्था करतच नाही हा माझा समज सहयाद्री मधील किल्ले आणि बरीच प्राचीन मंदिरे बघून झाला होता. माझ्या ह्या विचारला छेद बसला तो होट्टल येथील प्राचीन मंदिराचा पुरातत्व विभागाने केलेला कायाकल्प पाहून.
होट्टल हे नांदेड जिल्ह्यातील, देगलूर तालुक्या मधील एक लहानसे खेडेगाव
आहे, पण गावामध्ये असलेल्या मंदिरामुळे हे गाव प्राचीन काळी महत्व राखून
असणार यात शंका नाही.
होट्टल येथे जाण्या साठी देगलूरहुन जात येते, मुंबई- देगलूर एस. टी.
महामंडळाची डायरेक्ट बस आहे कुर्ला नेहरू नगर येथून, तसेच बऱ्याच खाजगी
बसेस पण जातात मुंबई वरून. मुंबई - देगलूर हे अंतर साधारण पाने ६५० कि. मी.
आहे. संध्याकाळी बसेस असतात व त्या सकाळी ७ ला सोडतात, देगलूर वरून होट्टल
१० कि. मी. अंतरावर आहे. जाण्यासाठी तुम्ही रिक्षा ठरवून जाऊ शकता.
दुसरा पर्याय आहे तो म्हणजे मुंबई - बिदर ह्या रेल्वे गाडीने आरामात जाणे, हि गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून रात्री ९:००. ला सुटते. ह्या गाडीने जाऊन उदगीर येथे उताराने आणि मग उदगीर वरून होट्टल ला जाणे. उदगीर वरून होट्टल ५५ कि. मी. आहे. उदगीरवरून जाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे उदगीर चा किल्ला, तोही या भेटीत बघता येईल. राहण्याची आणि खाण्याची सोय पण उदगीर मध्ये चांगली होऊ शकते, बरेच ए.सी / नॉन ए.सी लॉजेस तसेच चांगले हॉटेल्स आहेत उदगीर मध्ये. उदगीर वरून तुम्ही गाडी ठरवून जाऊ शकता किंवा मग एसटी ने जाऊ शकता.
आता मंदिर विषयी इतक्या आडगावात एवढी सुंदर मंदिरे असतील हे प्रथम खरेच वाटत नव्हते, कल्याणी-चालुक्य राजवटीने बांधलेली हि मंदिरे मूर्तिभंजकांनी विध्वंस केल्या नंतर तशीच पडून होती पण पुरातत्व खात्याने केलेल्या अप्रतिम कामामुळे आज पुन्हा दिमाखात उभी आहेत.
४ ते ५ फुटांच्या गणेश, विष्णू आणि लावण्यकन्या (प्रचेतस यांनी त्याच्यातील भेद विस्तृत करून सांगितले तर आमच्या पण ज्ञानात भर पडेल) यांच्या सुंदर शिल्पांची मंदिराचा बाह्य भाग अलंकृत केला आहे.
गर्भगृहाच्या चौपाटीवरील नक्षीकाम
होट्टल मधील आणखी एक भग्न मंदिर
सुरसुंदरी
|
सुरसुंदरी
|
धेनुगळ, तडखेड
|
शिलालेख , तडखेड
|
गोळे गावातली गढी:-
मध्ययुगापासून मराठवाड्यात अनेक वर्ष अस्थिर राजकीय परिस्थिती होती. त्यामुळे परकीय सैन्य , दरोडेखोर यांच्या पासून संरक्षण होण्यासाठी गावच्या पाटलांनी , इनामदारानी गढ्या बांधलेल्या पाहायला मिळतात. ही गढी बामणाची म्हणजेच ब्राम्हण कुटुंबाची होती . ते सध्या इथे राहात नाहीत . गढीच्या बाजूला असलेला चौसोपी वाडा पाहीला. वाड्याच्या मालकाने चांगल्या प्रकारे ठेवला होता .
गोळे गावातली गढी
|
चौसोपी वाडा
|
पैनगंगा अभयारण्य
- नांदेड किनवट रस्त्यावर किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा.
- किनवटपासून ३५-४० कि.मी. अंतरावर उनकेश्वर येथील प्रसिद्ध गरम पाण्याचे झरे.
- उनकेश्वरहून जवळच देवीच्या साडेतीन पीठांपकी एक असलेले रेणुका मातेचे मंदिर.
- किनवटपासून १८ किमी अंतरावर पेंदा नागढव येथे शिवमंदिर आहे. पेंदा नागढव येथे जाण्यासाठी किनवटवरून रिक्षा उपलब्ध आहेत.
Nanded
Marathwada Circuit- 1200 Kms, 7 forts, 2 Caves
Day 1: Pune-Madha-Paranda-Tuljapur (360 Kms)
Day 2: Dharshiv Caves
Day 3: Tuljapur-Ausa-Kharosa-Udgir-Nanded (280 Kms)
Day 4: Nanded-Kandhar-Dharur-Kunthaligiri (290 Kms)
Day 5: Kunthaligiri-Kharda-Bhadurgad AKA Dharmaveergad-Pune (265 Kms)
Where: 450 Kms Approx from Pune via Nagar
Route: Tuljapur-Ausa-Nilanga-Udgir-Nanded
Time visited: August 2011
Meter reading from Pune: 635 Kms
Nanded
city is famous for Gurudwara. Guru Gobind Singh, the guru of the Sikhs
attained martyrdom in Nanded hence a Gurudwara was built here.
We reached in evening around 5PM. I was amazed to see well-built efficient 4 lane entry and exit points for Nanded. Within few minutes of crossing new bridge we were in the heart of the city. After checking in Ramakrishna hotel we relaxed for few hours.
We proceeded to Gurudwara which was close by around 2 kms from our hotel.
The whole place was amazingly lit in soft lights and looks magical in evenings. It was extremely clean and all the friendly security guard assisted visitors. Even though there were more that 3-4 thousand people at least there was absolutely no chaos.
Worth watching was gold painted interiors of Gurduwara.
The entrance door from inside looked astounding.
After quick darshan we had the Prasad we preceded for the laser show which was supposed to be in the garden just few minutes behind the Gurudwara. Unfortunately it was closed that day due to technical snag.
But the garden was very beautiful will colourful fountains and soft lighting. Very wll maintained and truly worth visit.
After a hearty dinner, we hit the bed by 10 after an eventful day! Next day after quick Toast and Coffe we headed for Kandhar. It seems Nanded has more than 30 Guridwaras. The ghat was just waking up and looked fresh and inviting from the bridge.
Kandhar Fort
Marathwada Circuit- 1200 Kms, 7 forts, 2 Caves
Day 1: Pune-Madha-Paranda-Tuljapur (360 Kms)
Day 2: Dharshiv Caves
Day 3: Tuljapur-Ausa-Kharosa-Udgir-Nanded (280 Kms)
Day 4: Nanded-Kandhar-Dharur-Kunthaligiri (290 Kms)
Day 5: Kunthaligiri-Kharda-Bhadurgad AKA Dharmaveergad-Pune (265 Kms)
Type: Land Fort
Base Village: Kandhar
Where:??Kms from Pune, 55 Kms from Nanded Approx
Route: Nanded-Loha-Kandhar
Time visited: August 2011
Time to see around: 2.5 hours
How to visit: Take a diversion from Loha to Kandhar. Its about 15 kms
from the junction. Pass the town and a long narrow lane with twists and
turns will lead leads to the fort.
Meter reading from Pune: 680 Kms
This
awesome that fort was built by Somesvara, ruler of Kandhar. Rashtrakuta
King Krishna III (AD 940-967) of Malkhed who styled himself as
Kandharpuradhi Swar added considerable buildings to the fort. It offers a
panoramic view of the surroundings.
The fort changed many hands. Inscriptions of Adil Shah are found at few places (AD 1578). Later it was under control of Nizam Shah (first) from whom Shahjhan had captured after a tough fight.
Spread over 25 acres of fortification with having 16 bastions to guard and double protection of trench filled with water.
The archaeology department has well maintained the place with proper board signs explaining the intricate details of each structure or carvings.
Some sculptures found nearby by are kept in the fort. Worth watching is huge Idol in lying down position. Although it is now all broken down, the magnitude can be easily gauged from the each part of the idol. There are some Jain thirthankar idols too like Parshwant and Mahavir bhagwan.
Lot of shilalekh or scripts are found at various places across the forts.
The two storied Shish Mahal was built during Adilshahi regime was complete with toilet and water system, cooling system, small garden and tank. All the small windows once had stained glasses.
The brickwork masonry of Daru Kothar is really amazing. Lot of cannon balls are still well preserved.
The Lal Mahal with fountain was probably built during Mughal period later modified and used as office by Nizam of hyederabad.
The huge cannon on the main buruj overlooking Kandhar city is worth watching. I forgot but this probably had lion head.
The prisoners cell, masjid, tehsil office and all other remains of the building are worth dekko.
One of the building had underground cellar had a wonderful ceiling with 'zaroka'. The brickwork was constructed in such a way that it seemed like shining star!
With wonderful memories we proceeded to our next destination- Dharur.






























































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.