
उस्मानाबाद जिल्हयातील तालुके – Osmanabad District Taluka
- उस्मानाबाद
- तुळजापुर
- उमरगा
- लोहारा
- कळंब
- भुम
- परांडा
- वाशी
उस्मानाबाद जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Osmanabad Jilha Mahiti
- क्षेत्रफळ 7569 वर्ग कि.मी.
- राष्ट्रीय महामार्ग क्र. 9 आणि क्र. 211 हे या जिल्हयातुन गेले आहेत.
- या जिल्हयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सब कॅम्पस आहे
- पुर्वी या ठिकाणी मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट आणि यादवांचे राज्य होते त्यानंतर बहामणी आणि विजापुर संस्थानात आले आणि 1948 पर्यंत उस्मानाबाद हैदराबाद संस्थानात आले.
- शहरातील धारासुर मर्दिनीचे मंदिर आणि शमशोद्दीन गाझी यांची दर्गा प्रसिध्द आहे.
- उस्मानाबादचे गुलाबजाम फार प्रसीध्द आहेत आणि मांसाहारी पदार्थ आवडीने खाणा.यांकरता उस्मानाबादी शेळीचे चवदार मटन देखील प्रसीध्द आहे.
- उस्मानाबाद ची शेळी प्रसीध्द आहे.
- उस्मानाबाद रेल्वेसेवा आणि बससेवेने सगळया महत्वांच्या शहरांशी जोडला गेला आहे.
- या शहराच्या मध्यातुन भोगावती नदी वाहाते.
सोनारी (Sonari)
महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ. हे ठिकाण उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ८७ किमी., तर परांडा या तालुक्याच्या ठिकाणापासून १५ किमी. अंतरावर सीना नदीजवळ वसलेले आहे.

‘सोनारी’ या नावाविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यानुसार काळभैरवनाथांनी भद्रकाली देवीच्या सहकार्याने सुवर्णासुर नावाच्या राक्षसाचा या ठिकाणी वध केला होता. त्यामुळे या ठिकाणाचे नाव ‘सुवर्णपूर’ पडले. पुढे सुवर्णपूर या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचे नाव ‘सोनारी’ झाल्याची आख्यायिका भैरवनाथ माहात्म्यात दिलेली आहे. संत रामदासस्वामींचे शिष्य कल्याणस्वामींनी भैरवनाथ माहात्म्य लिहिल्याचे म्हटले जाते. कल्याणस्वामींचे वास्तव्य सोनारीपासून ४.२ किमी. वर असणाऱ्या डोमगाव येथे होते. तेथे त्यांची समाधी आहे. अनेक भाविक सोनारी या तीर्थक्षेत्रास ‘सोनारसिद्ध’ या नावानेही ओळखतात.
सोनारी येथे काळभैरवनाथ मंदिराबरोबरच नाथ संप्रदायाचा एक भैरवनाथ मठही आहे. या मठाची स्थापना चौदाव्या शतकात झाली असावी. या मठाला मध्ययुगात अनेक इनामे दिली गेली. काळभैरवनाथ मंदिर व सोनारी या स्थानाशी नाथ संप्रदायाचा असणारा कागदोपत्री संबंध पंधराव्या शतकापर्यंत मागे नेता येतो. याबाबत १७९४ मधील महादजी शिंदे यांचे निवाडापत्र, तसेच १७९५ सालचे सवाई माधवरावांचे आज्ञापत्र उपलब्ध आहे. महादजी शिंदे यांनी दिलेल्या निवाडापत्रात या स्थानाची माहिती भैरवनाथ मठाच्या अनुषंगाने आलेली आहे. सदर निवाडापत्रानुसार येथील भैरवनाथ मठातील चौक, पूजा, पातर इ. पुजाविधींचे अधिकार मिळविण्यासाठी नाथ संप्रदायातील मलिक जोगी (राऊळ) शाखेचे नाथ-योगी व डवरी कानफाटे गोसावी यांच्यामध्ये वाद-विवाद होते. या वाद-विवादांची मालिका १४७५ पासून १७९४ पर्यंत चालू राहिली. यातील दोन्ही पक्षकारांनी यावेळी आपल्याकडील पुराव्यांची जंत्रीच सादर केली होती. प्रारंभी १४७५ साली बहमनी राजवटीत नाथ संप्रदायातील रावळ शाखेतील एका परिवारात अवधूतनाथ व निंबनाथ यांच्यामध्ये पूजाविधीसाठी वरिष्ठ व कनिष्ठ पदावरून वादाची ठिणगी पडली. दोन्ही पक्षकार स्थानीय पंचायतीत गेले. त्यानंतर तेथे समाधान न झाल्याने हा वाद अंबाजोगाई येथील जात पंचायतीत (पंढरी) मिटविण्यात आला.

इ. स. १६६८ मध्ये पुन्हा हा वाद उफाळून आला. यावेळी भैरवनाथ मठाचे व्यवस्थापन रावळ शाखेचे तुकनाथ यांच्याकडे होते. काही कारणास्तव त्यांना मठ व्यवस्थापनेपासून दूर राहावे लागले. त्यांच्या अनुपस्थितीत दोन कानफाटे जोगी बरावनाथ व बुधनाथ सोनारीला आले व पूजापाठ विधी करू लागले. त्यांनी क्रमशः बहिराई व मंगलाई यांच्याशी विवाह केला. या दोघींनी स्वतःचे कर्ण संस्कार करवून घेऊन मठातील पूजा विधी करण्यास सुरुवात केली. या दरम्यान तुकनाथ वापस आले व त्यांनी आपल्या वतनाची मागणी केली. न्यायालयात निकाल त्यांच्याकडून लागला. १७५६ साली या संबंधीचे एक थालपत्र पैठणकरांनी राऊळ मलिक जोगींच्या नावे करून दिले होते. पुढे जानोजी जसवंत निंबाळकरांनी यासंबंधी कौल दिला होता. परंतु परिस्थिती अधिकच चिघळत चालल्याने पुण्यातील पेशव्यांना या प्रकरणात भाग घ्यावा लागला. अखेर १७९४ साली राऊळांची बाजू ग्राह्य धरून महादजी शिंदे यांनी निवाडापत्र जारी केले.
महादजी शिंदे यांचे हे निवाडापत्र ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सदर पत्रात ‘पातर’ पूजेचा उल्लेख आलेला आहे. ही पातर पूजा म्हणजेच आज नाथ संप्रदायात प्रचलित असलेली ‘पात्र पूजा’ असावी. नाशिक-त्रिंबकेश्वर येथील कुंभमेळ्यानंतर नागपंचमीच्या दिवशी त्रिंबकेश्वर येथून हजारो नाथ-योगी पात्रदेवतेसोबत कर्नाटकातील कदरीपर्यंत पदयात्रा करतात. यावेळी नाथ संप्रदायाच्या विभिन्न मठातील महंतांची नव्याने नेमणूक केली जाते. ही नेमणूक १२ वर्षे म्हणजेच नाशिक येथील पुढच्या कुंभमेळ्यापर्यंत वैध असते. याच नवनाथ झुंडी यात्रे दरम्यान झुंडीतील काही नाथ-योगी सोनारी येथे येऊन भैरवनाथ मठाच्या नवीन महंताची नेमणूक करतात. ही परंपरा काही शतके जुनी मानली जाते. त्यामुळे महादजी शिंदे याच्या निवाडापत्रावरून नवनाथ झुंडीची परंपरा कमीतकमी पंधराव्या शतकापासून तरी प्रचलित असावी, असे दिसते.
काळभैरवनाथ मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्वेकडील एका विशाल प्रवेशद्वारातून जावे लागते. येथे नगारखाना आहे. प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर बाजूलाच एक लाकडी सुंदर रथ दिसतो. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक विशाल ‘पुष्करणी’ (बारव) आहे. त्यात उतरण्यासाठी दोन मार्ग असून चारीबाजूंनी देवकोष्ट बनविली आहेत. ही बारव ‘सुवर्णतीर्थ’ या नावानेही ओळखली जाते. याच्या स्थापत्य रचनेनुसार ही बारव १५-१६व्या शतकातील वाटते. बारव पार करून गेल्यानंतर समोर दोन उंच दीपमाळ लागतात. दीपमाळांसमोर काळभैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिराच्या सभामंडपाच्या तुलनेने अंतराळ, गर्भगृह व मंदिराचे शिखर थोडे जुन्या धाटणीचे दिसते. पूर्वी सभामंडपातील स्तंभ लाकडी होते. गर्भगृहात एका उंचवट्यावर काळभैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या उत्तर मध्ययुगीन दगडी प्रतिमा ठेवल्या आहेत. मूळ प्राचीन प्रतिमा खंडित झाल्याने त्या मंदिरात एका बाजूला ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या चारी बाजूंनी बंदिस्त कुंपण असून पश्चिमेला एक अन्य प्रवेशद्वारही आहे. चैत्र व कार्तिक महिन्यात येथे जत्रा भरते. यावेळी येथील रथातून काळभैरवनाथाची मिरवणूक काढून मंदिरात गुलालाची उधळण केली जाते.
काळभैरवनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला भैरवनाथ मठ आहे. मठात भद्रकाली देवीची गुफा, धूना, नाथ-योगींच्या समाधी, हिंगलजा मातेचा तांदळा इ. वास्तू व अवशेष दिसतात. या मठात मंदिराच्या उदुंबराचे (उंबरठा) अवशेष येथील एका भिंतीत लावलेले आहेत. त्याच्या मंदारकावर दोन्ही बाजूला दोन कीर्तिमुखे कोरलेली आहेत. बहुधा हे अवशेष मूळ काळभैरवनाथ मंदिराचे असावेत. सध्या या मठाची व्यवस्था ‘अखिल भारतवर्ष नवनाथ झुंड ट्रस्ट’ मार्फत चालते. या मठास स्वतःची दान मिळालेली शेतजमीनही आहे.
विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील ‘मढी’ या तीर्थक्षेत्राप्रमाणे सोनारी येथेही डवरी गोसाव्यांची जात पंचायत भरत असे. सोनारी येथे लोहतीर्थ (लोहाबाई), नागनिर्झरी तीर्थ, बगनाथ मंदिर, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, गढीचे अवशेष, वीरगळ, नाथ-योगींच्या समाधी पाहावयास मिळतात. काळभैरवनाथ अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे.
संदर्भ :
- Briggs, G. W. Gorakhnāth and the Kānphaṭā Yogīs, Delhi, 2007.
- Chitnis, K. N. Socio-Economic History of Medieval India, New Delhi, 2002.
- Maharashtra State Gazetteers, Osmanabad District, Bombay, 1972.
- Sarde, Vijay, Archaeological Investigations of the Natha Sampradaya in Maharashtra (C.12th to 15th century CE), Unpublished thesis submitted to the Deccan College, Pune, 2019.
धाराशिव लेणी
|
समाधी मंदिर
|
समाधी मंदिर
|
हातलादेवी मंदिर:-
वडगाव सिध्देश्वर:-
तुळजापूर:-
तुळजापुर ची भवानी – Tulja Bhavani Temple
बालेघाटातील दृष्य
|
घाटशीळ
|
कोलिन मॅकेन्झी काढलेले चित्र
|
तुळजापूर बाजारपेठ
|
राजे शहाजी आणि राजमाता जिजाऊ महाद्वार
|
प्रवेशद्वाराच्या उजवीकडे मंदिर संस्थानचे भक्तनिवास
|
कल्लोळ तीर्थ
|
गायमुख तीर्थ
|
दत्त मंदिर
|
सिद्धीविनायक
|
नारदमुनी, गणपती, विठ्ठल रखुमाई, मारुती शिव
|
सरदार निंबाळकर द्वार
|
सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून प्रवेश करत, आपण काही पायऱ्या उतरून मंदिर प्रांगणात येतो. हे प्रवेशद्वार निजामाचा सरदार रावरंभ निबाळकरांनी बांधले आहे. मंदिराच्या चहुबाजूने भिंतीत ओवऱ्या आहेत. या ओवऱ्याही रावरंभ निंबाळकरांनीच बांधून दिल्या आहेत. निंबाळकर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मार्कंडेय ऋषींचे छोटे मंदिर आहे. हे ऋषी देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांचा आश्रम यमुनाचल म्हणजेच आताच्या तुळजापूरात कृतयुगात होता. असा उल्लेख अढळतो उजव्या बाजूस देवीचा नगारखाना आहे. तसेच भक्तांना बसण्यासाठी सज्जा आहे. मुख्य मंदिर पुर्वाभिमुख आहे. मंदिरासमोरच प्रथम होमकुंड दिसते.
होमकुंड
|
होमकुंडावरील पगडी धारण केलेला गणपती
|
होमकुंडाच्या डाव्या बाजूस मोठे पिंपळाचे झाड असलेला पार आणि उजव्या बाजूस कडूलिंबाचे झाड असलेला पार आहे. हे दोन्ही अनुक्रमे सीमोल्लंघनाचा आणि गोंधळाचे पार आहेत.
गोंधळाचा पार
|
तुळजाभवानी मंदिराचे शिखर
|
या मंदिराचा काळ ठरवताना पहिला लिखित संदर्भ सावरगाव च्या शिलालेखात मिळतो.
ओम श्री सुलतान फेरोजशहा बहमनी याच्या कल्पकोडी(म्हणजे कोटी कल्प चालणाऱ्या) राज्यात श्री शक १३२० या वर्षी बहुधान्य संवत्सरात मार्गशीर्ष शुद्ध ५ शुक्रवार या दिवशी परशुरामजी गोसावी श्री तुळजा मातेच्या यात्रेस आले असताना त्या समयी काटी येथील चावडी (धर्मशाळेच्या) प्राकाराच्या किंवा तटाच्या कमासाठी सिंगऊ वसाराम यांच्या चौथाऱ्याची घरव्रूत्ती व श्रीदेवीची मुर्ती परशुरामजीने दिली ब्राम्हणांनी सुप्रतिष्ठापणा केली या महाप्रकाराच्या कामास महापुरीचा श्रीदामोदर ठाकूर, ऋषीदेव, हनुमंत ईश्वरदेव, विठ्ठलपुत्र भोगनाथ शुकदेव, केशीदेव, मल्लीनाथ गोविंद, कान्हा महादेव,लक्ष्मीदेव एतत्प्रमुख साक्षी होत
काटी शिलालेख
|
देवीची मूळ मुर्ती
|
देवीची मुर्ती काळ्या गंडकी शीळेतून घडवलेली असून अत्यंत तेजस्वी आहे. मुर्ती तीन फुट उंच असून अष्टभुजा महिषासुरमर्दीनी आहे. देवीच्या मस्तकी सायनेलिंग आहे. मस्तकावरील मुकूटातून बटा बाहेर आलेल्या आहेत. देवीच्या आठ हातात अनुक्रमे त्रिशुळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र, राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणांचा भाता असून, उजव्या आणि डाव्या बाजूस चंद्र आणि सुर्य आहेत. देवीचा उजवा पाय महिषासुरावर असून दोन्ही पायामध्ये महिषासूराचे मस्तक पडलेले आहे. देवीच्या उजव्या बाजूस तीचे वाहन सिंह आहे. तसेच मार्कंडेय ऋषी बसलेले आहेत. तर डाव्या बाजूस कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती आहे देवीच्या मुर्तीवर चक्राकार कुंडले, केयूर, अंगद, काकणे, कंठा, माला, मेखला, सारूळ्या इत्यादी अलंकार कोरलेले आहेत. तज्ञांच्या मते आताची देवीची मुर्ती ही सोळाव्या शतकातली असावी.
भवानी शंकर
|
देवीच्या गाभाऱ्यासमोरच श्री भवानी शंकर आहे. शिवलिंग मागे नंदी आणि नंदीच्यापाठीवर नागफणाधर शिवाचा मुखवटा अशा थाटात भवानीशंकर अगदी जगदंबेसमोर बसले आहेत. जणू आपल्या अर्धांगिनीचे भक्तांच्या प्रेमाने सजलेले रुप पाहत आहेत. कडी दरवाजा पुढे समोरच सोळा खांबांवर तोलेला सभामंडप आहे याला घाटी मंडपही म्हणतात. याचे कारण म्हणजे इथे लटकवलेल्या दोन जुन्या घंटा (घाट) यातली एक पोर्तुगीज धाटणीची, तर दुसरी उद्धव यादवराव असे नाव असलेली घंटा आहे. गाभाऱ्याजवळ एक कडीचा खांब आहे. या खांबाची कडी आपल्या अंगावरून फिरवल्यास अनेक व्याधी बऱ्या होतात असा भक्तांचा विश्वास आहे.
महावस्त्र प्रसाद कार्यालय
|
खंडोबा, यमाई, लक्ष्मी नरसिंह आणि दत्त मंदिर
|
देवीची वाहने
|
चिंतामणी
|
छत्रपती शिवाजी राजद्वार
|
देवीचा सारीपाट भारतीबुवा मठ
|
देवीस नैवेद्य दाखवताना
|
शिवछत्रपतींंनी देवीस अर्पण केलेला दागिना
|
अलंकार पूजा
|
ग्रहणकाळात देवीचे सोवळे
|
देवीचा छबिना
|
शेजघरातील पलंग सफाई आणि गादीसाठी कापूस साफ करताना
|
देवीचा निद्राकाल
|
आराधी
|
माळ परडी आणि पोत
|
गोंधळाचा पार
|
गोंधळी
|
कळसावरील गुढी
|
देवीस साखरेचा हार अर्पण
|
राम मंदिरातील मुर्ती
|
देवीचा ,त्रिशूळाचा,मातंगीचा घट
|
घटाची मिरवणूक
|
मंदिरातील घटस्थापना
|
रथ अलंकार महापुजा
|
मुरली अलंकार महापुजा
|
शेषशय्या अलंकार महापुजा
|
भवानी तलवार अलंकार महापुजा
|
भवानी अलंकार महापुजा
|
अष्टमीचा होम होमकुंड
|
अजाबली विधी होमकुंड
|
पानघर पूजा
|
देवीची पालखी
|
देवीच्या पलंगाच्या अहमदनगर ते तुळजापूर प्रवास
|
शुक्रवार पेठेतील पलंग विसाव्याचा कट्टा
|
माय मोहर्ताब मुखवटा आणि मानकरी क्षिरसागर
|
श्रीदेवीस १०८ सुती साड्यांचे दिंड
|
श्रीचा पालखी सोहळा
|
कोजागरीची फुलांची सजावट
|
कोजागिरी निमित्त देवीच्या गाभाऱ्याची सजावट
|
सोलापूरच्या शिवलाड काठ्या
|
दिपावली
|
काळभैरव
|
भेंडोळी
|
भेंडोळीची ज्वालायात्रा
|
त्रिपुरी पौर्णिमा मंदिरातील दिपोत्सव
|
गणेश ओवरीतील शाकंभरी नवरात्र घट
|
शाकंभरी देवीची रथातील मुर्ती
|
पापनाश तीर्थ जलपूजा आणि कलशपूजा
|
जलयात्रा
|
होमातील पुर्णाहुती, कोहळा अर्पण
|
होळीचे पूजन
|
श्रींच्या मूर्तीवर रंगांची उधळण
|
बैलपोळा- देवी मंदिरात बैलजोडीची पूजा
|
सातारा जिल्ह्यातील शिरवळवरून तुळजापूरला जाणारी सासनकाठी
|
छबिन्यातील वाहनांची क्षणचित्रे
|
गरीबनाथ मठ
|
गरीबनाथ समाधी
|
हिगळाज माता
|
आरण्यबुवा मठ
|
वाकोजीबुवा मठ
|
अन्नपूर्णा
|
भारतीबुवा मठ
|
समाधी मंदिर
|
मठातील देवीची मूर्ती
|
सारीपाट
|
काशीकुंड
|
बारालिंग मठ
|
बारा लिंग
|
मातंगी देवी
|
काळभैरव मंदिर
|
काळभैरव आणि बालभैरव
|
वैशिष्ट्यपूर्ण दिपमाळ
|
टोळभैरव मंदिर
|
टोळ भैरव
|
गजशृंखला
|
मुद्गलेश्वर मंदिर
|
मुद्गलेश्वर शिवलिंग
|
डुल्या मारूती मंदिर
|
मारूती
|
मंदिरासमोरील गद्धेगाळ
|
अहिल्याबाई होळकर विहीर आणि शिलालेख
|
धाकटे तुळजापूर मंदिर
|
देवीची मुर्ती शेतात जिथे सापडली ती जागा सध्या तिथे छोटे मंदिर आहे.
|
देवीची मुर्ती
|
मुर्ती पादपीठावरील शिलालेख
|
खंडोबा मंदिर
|
१) गोमाजी वाडा-रेणुका २) रामवरदायिनी देवी
३)व्यास वाड्यातला आडातला गणपता
|
पापनाश तीर्थ
|
रामवरदायिनी
|
परंडा किल्ला :-
परांडा
|
किल्ल्याबाहेरील खंदक
|
राजहंसाची नक्षी असलेला दगड
|
मारगिरीच्या छिद्रातून डोकावणारी तोफ
|
तटबंदीतुन चालताना संरक्षक पाकळी भिंती व त्यातून मारगिरीची छिद्रे
|
पंचधातूची तोफ
|
खंदक व आतील संरक्षक अभेद्य बुरुज
|
फांजी व त्याखाली असलेल्या सैनिकांच्या देवड्या
|
सैनिकांच्या देवड्या
|
तोफेवर असलेल्या सिंहाचे शीर पळवून नेल आहे
|
ढालकाठी बुरुजावरील तोफ
|
विरगळीचे दगडाचा वापर तटबंदीत केलेला दिसतो
|
पुरातत्व खात्याची सुरू असलेली काम
|
|
डागडुजी केलेली तटबंदी व सावलीत निवांत बसलेले कामगार
|
महादेव मंदिर
|
माणकेश्वर हेमांडपंथी देवालय :-
• देवळाली ते माणकेश्वराचे शिवमंदिर यांच्या दरम्यान एक भुयार आहे. देवळाली येथील ग्रामस्थ आबा शंख हे यवनकाळात त्या भुयारी मार्गाचे तीन किलोमीटर अंतर रोज चालत येऊन महादेव मंदिरात तेलाचा दिवा लावत असत.
• महादेव मंदिराजवळच दातकोरणीचे झाड आहे. त्या झाडाला लागणाऱ्या फळांच्या बियांना महादेवाच्या पिंडीचा आकार निसर्गत: प्राप्त झाला आहे. झाडाचा पाला अनेक रोगांवर गुणकारी समजला जातो.
• चालुक्य काळातील राजा दक्ष याने माणिक लिंगाची स्थापना केली होती. म्हणून त्या गावास माणकेश्वर असे नाव पडले.
येरमाळयाची येडाई:
येरमाळा हे गाव उस्मानाबाद पासून ५० कि. मी. अंतरावर आहे. प्रभुरामचंद्राना वनवासाला जाताना प्रलोभन दाखवण्यासाठी देवी पार्वतीने सतीचे रुप घेउन भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला येडी आहेस. असे म्हंणटले. तेव्हापासून हि देवी इथे राहिली व तिचे नाव येडाई उर्फ येडेश्वरी झाले. या आख्यायिकेचा उल्लेख रेणुका स्त्रोत्रात असल्याचे पुजारी सांगतात. येरमाळा हे सोलापूर – औरंगाबाद रस्त्यावर आहे.

हे मंदिर गावच्या दक्षिण बाजूस ३०० ते ४०० फूट बालाघाटाच्या पर्वतीय रांगेत डोंगर माथ्यावर असून या मंदिरात जाण्यासाठी भक्तमंडळींना ४०० ते ४५० पाय-या चढून वर गेल्यानंतरच पुरातन कालीन हेमाडपंथी बांधकाम करण्यात आलेल्या मंदिराच्या आतमध्ये तीन-चार फूट व्यास असलेली यावर शेंदूर लेपून केलेल्या आणि डोक्यावर मुकूट, नाकात नथ, गळ्यात माळ अशा अलंकाराने नटविलेल्या श्री देवी येडेश्वरी तांदळ्याचे भाविकांना दर्शन होते.
देवीसमोर पुत्र परशुरामाची चांदीची मूर्ती आहे. मदिराच्या बाहेरील आवारात देवी मातंगी, हवन होम, श्री गणेश, श्री दत्त, महादेव आणि काळभैरवनाथांचे छोटी मंदिरे आहेत. मंदिरात पाच डिकमल आणि मंदिराच्या मागील डोंगरावर तुळजाभवानी मातेचे मंदिर व एक डिकमल आहे.
या ठिकणी देवीचे स्नानगृह असून देवी येडेश्वरी पार्वतीचे रुप असून रेणुका, अंबा, जगदंबा, तुकाई अशा अनेक नावाने प्रसिध्द असलेल्या असंख्य भक्तांचे देवस्थान म्हणजेच ग्रामीण भागातील येडाई होय. परंतु या देवीच्या कोनाशिला स्थापनेबाबत पुरातत्त्व खात्याकडे कोणतीही नोंद नाही. या देवीबाबात अख्यायिका सांगितली जाते.
एकदा प्रभू राम सितेच्या शोधात या भागात भटकंती करीत असताना देवी पार्वतीने विश्रांतीसाठी थांबलेल्या रामाची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप धारण करुन येताच रामाने ‘तुकाई तू तर माझी सीता नसून माझी व्याकुळता पाहून सितेचे रुप धारण केलेली तू तू माझी वेडी आई (वेडाई) आहेस’ असे म्हटले. यामुळे देवीस वेडाई या नावाने ओळखले जाते.
आबाजी पाटलांचे कुलदैवत माहूर गडची रेणुका देवी असल्याने त्यांना त्याठिकाणी देवीला वारंवार जाणे शक्य होत नसल्यामुळे त्यांनी येरमाळा येथे डोंगरावरच माहूरगडाप्रमाणे देवीचे हुबेहुब मंदिर बांधले. श्री येडेश्वरी देवीच्या तांदळा माहूरच्या रेणुका देवी प्रमाणेच असून येथील एकमुखी दत्तमंदिर आणि कल्लोळ याचे पुरावे म्हणून भक्तांना पाहवयास मिळतात. चालत आलेल्या परंपरेनुसार आजही नवरात्रामध्ये देवीला भल्यापहाटे पाच दिवस भक्तगण खेटे प्रदक्षिणा पाठीमागे न पाहता घालतात. आजही खेटे घालताना थुंकणे, पाठीमागे पाहणे अनिवार्य मानले जाते. यावेळीच भाविक पांढरा दोरा वाहून डोंगराभोवताली देवीच्या पायथ्यापासून नवसाचे साकडे घालतात. नवमीच्या दिवशी देवीला पहाटे अजाबळी देण्याची प्रथा रुढ झाली असून नवमीच्या पहाटे होमहवन तर अश्विन शुध्द दशमीस सिमोल्लंघन केले जाते. येथील देवी राज्यासह इतर राज्यातही प्रसिध्द असून भाविक, लोकप्रतिनधी यांच्या निधीतून सभामंडप, पाय-या कठडे आदी उभे करण्यात आले असून श्री देवी येडेश्वरी देवथान ट्रस्ट येरमाळ (ता. कळंब) यांच्या माध्यमातून भक्तांच्या सोयीसुविधांसाठी आणि त्यांना रांगेतच उभे राहवे लागते यासाठी उड्डाण पुलाची व्यवस्था आणि त्यावरील निवारा करण्यात आला आाहे. मलाकूर येथील पाझर तलावातून पाईपलाईन करून ती उपळाई येथील शेतक-यांच्या विहिरीत पाण्याची साठवण करून मंदिरात आणि मंदिर परिसरात कामयस्वरूपी पाणीपुरवठा करण्यात आला आहे. भाविकांसाठी शौचालय व्यवस्था, मंदिरासह परिसरात प्रकाश व्यवस्थाही केली आहे.
ट्रस्टच्यावतीने प्रसाद केंद्र चालविले जात असून, तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासठी जाण्यासाठी देवी ट्रस्टच्या माध्यमातून सिमेंट रस्ता व प्रकाश योजना राबविण्यात आली आहे.
परंडयाच्या उत्तरेस ७ कि.मी. अंतरावरील सोनारी या गावी श्री. कालभैरवनाथ मंदिर आहे. स्कंद पुराणात याचा उल्लेख आढळतो. चंड नावाच्या दैत्याचा मुलगा प्रचंड हा गोदावरीच्या दक्षिण भागात दंडकारण्यात (हल्लीचे परंडा) राहत होता. त्याच्या त्रासाने सर्व पीडित शंकराला शरण गेले. शंकराने काशी क्षेत्राच्या रक्षणासाठी जे ८ भैरव आपल्या नेत्रातून निर्माण केले होते. त्यापैकी कालभैरव याने या प्रचंड दैत्याचा तसेच सुवर्णसूर, भैमकासुराचा वध केला. त्यानंतर शंकराने त्याचा सुवर्णपुरी उर्फ सोनारीत राहण्याची आज्ञा केली. त्यामुळे कालभैरव सोनारीत वास्तव्य करू लागले. अशी आख्यायिका सांगितली जाते.
कल्याण स्वामीचा मठ:
महापुरुषांच्या वास्तव्याचे एक ठिकाण परंडा तालुक्यात डोमगाव येथे आहे. एका आड वाटेला, सोनारी जवळ असलेल्या या गावात समर्थ रामदासाचे पट्टशिष्य पूज्य कल्याणस्वामीचा यांचा मठ आहे. या कल्याणस्वामीच्या हस्ताक्षरातील दासबोधाची सुरेख अक्षरातील प्रत व खुद्द रामदासांनी त्यात केलेल्या दुरुस्त्या या स्थानाला आगळे महत्व आहे.
काटीची मशिद:-
katichi Masjid, kati, Osmanabad dist
|
Entrance gate of Kati Masjid
|
Minar, Kati
|
Beautiful steps, Kati
|
पाणी मारल्यावर दिसणारी अक्षरे
|
काळेश्वर मंदिर
|
उत्तरेश्वर मंदिर
|
उत्तरेश्वर मंदिर
|
त्रिविक्रम मंदिर
|
त्रिविक्रम मंदिर
|
जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र:
भारतात जैन धर्मीयांची अनेक तीर्थक्षेत्र (धर्मीकस्थाने) आहेत. या तीर्थक्षेत्रचे सिद्धक्षेत्र,(निर्माणभूमी) कल्याणक्षेत्र व अतिशय क्षेत्र असे तीन प्रकार समजतात. ज्या तीर्थक्षेत्रावर चोवीस तीर्थकर किंवा मुनी यापैकी कानोनितरी मोक्षाला गेलेले असतात.त्याला सिद्धक्षेत्र म्हणतात. दक्षिण भारतातील एकमेव दिगंबर जैन सिद्धक्षेत्र म्हणजे कुंथलगिरी उसमानाबाद – औरंगाबाद रस्त्यावर ६० कि.मी. व सरमकुंडी फाट्यापासून डावीकडे २ कि.मी. अंतरावर पहाडावर हे तीर्थक्षेत्र आहे.
Temple of Lord Mahaveer is situated in this town. It is said that Samavsharan of Lord Mahaveer came here. This temple is about 800 or more years old. An ancient temple of Lord Parsvanath is also here, during reconstruction 20, ancient idols of Teerthankars were found. Idols of Lord Mahaveer and Lord Parsvanath are very well sculptured
Shri Digambar Jain Siddha Kshetra, Kunthalgiri, Maharashtra (Siddha Kshetra)
Tirth Location Details:
| A/P:- Kunthalgiri |
| Tal:- Bhoom |
| Dist:- Osmanabad |
| State:- Maharashtra |
| Pin Code:- 413503 |
Tirth Lodging Facilities:
| Rooms:- yes |
| Hall:- yes |
| Guest House:- yes |
| Ground For Tent:- |
| Mess:- yes |
Transportation Facilities:
| Railway Station:- Kurduwadi: 75km, Solapur:120km. |
| Bus Stand:- Kunthalgiri: 02km, Bhoom: 12km. |
| Straight Root:-Solapur: 120km, Aurangabad: 200km. |
| Nearest City:- Beed, Barshi, Osmanabad: 60km. |
Contact No:-02478-276860, 07721053995
बार्शीतील प्राचीन भगवंत मंदिर :-
भगवंत मंदिर
|
भगवंत मंदिर
|
मंदीरात असलेले नागशिल्प
|
एक राजा महादेवाची पूजाअर्चा करतानाचे शिल्प
|
गणपती बाप्पा
|
खांबावर असलेलं हत्तीचं कोरीव शिल्प
|
समोर दिसतेय ती भगवंताची मूर्ती व आरशात दिसणारी लक्ष्मी देवीची मूर्ती
|
मुरली वाजवणारा कृष्ण, घागर घेतलेली गवळण व गाई
|
मंदिराबाहेरील सुंदर नक्षीकाम
|
भगवान विष्णूची शेषशायी मूर्ती
|
मंदिराबाहेरून काढलेलं छायाचित्र
|
कोरिव नक्षीकाम केलेले दगडी खांब
|
नळदुर्गचा मुख्य दरवाजा (हुलमुख/हुरमुख)
|
आणि समोरील दोन्ही, उजव्या आणि डाव्या बाजूंची तटबंदी
|
![]() |
अनोख्या रचनेचा नरनारी धबधबा (छायाचित्र आंतरजालावरून साभार )
|
इथलं सौंदर्यीकरण : एक छोटंसं उदाहरण
|

( (आंतरजालावरून साभार ) नळदुर्ग येथील ऐतिहासिक ‘नर-मादी’ हा धबधबा पावसाळ्यामध्ये ठराविक काळातच असतो. पर्यटन विभागाकडून या धबधब्याच्या वरील बाजूस विद्युतनिर्मिती करून दिवसा धबधबा व रात्री ते पाणी पुन्हा धरणात टाकल्यास धबधबा कायमस्वरूपी सुरू राहण्यास मदत होईल. यासोबत मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात. पुरातत्व विभागानं आता या किल्ल्याची डागडुजी सुरू केली असुन अनेक सुसहय बदल करण्यात येत आहेत. किल्ल्याला भेट देण्याची वेळ सकाळी 9 ते 5 अशी आहे.
सोलापूर – हैद्राबाद राष्ट्रीय मार्गावर अणदूर हे गाव आहे. त्या काळात त्याचे आनंदवूर हे नाव होते. मनिमल्ल दैत्याचा संहार करण्यासाठी शंकराने मल्हारी मार्तंड भैरवनाचा अवतार धारण केला. त्यानंतर भक्त व मुनीच्या प्रर्थनेनुसार भैरवरुपी शंकर अरीमैलार येथे स्वयंभू लीन्गृपणे प्रगट झाले. हे मंदिर हेमाडपंथी असून आवारात अनेक दीपमाळा आहेत. अनदुरला मार्गशीष ६ ला इ मैलापुरला पौष शुद्ध १५ ला यात्रा भरते. इथे प्राण्यांचा नाही तर पुरणाचा नैवेद्य दिला जातो हे विशेष.
अणदूरच्या खंडोबाचा करार
मणी आणि मल्ल या दैत्यांचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी खंडोबाचा अवतार घेतला.या अवतारांतील खंडोबाच्या अनेक कथा प्रसिध्द आहेत.अणदूरच्या खंडोबाचीही अशीच अख्यायिका आहे.अणदूरपासून चार कि.मी.अंतरावर असलेल्या नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यात नळ - दमयंती राजा - राणी राहात होते.दमयंती राणी श्री खंडोबाची निस्सीम भक्त होती.ती दररोज पहाटे उठून स्नान केल्यानंतर श्री खंडोबाच्या दर्शनासाठी आदि - मैलार ( कर्नाटक राज्यातील बीदर या शहरापासून आठ कि.मी.अंतरावर हे ठिकाण आहे) येथे जात होती.तेथे जाण्यासाठी किल्ला परिसरात एक वडाचे झाड मदत करीत होते, त्या झाडाच्या पारंब्यावर बसल्यानंतर हे झाड उडत असे व ते आदि - मैलारपर्यंत जात असे व दर्शन झाल्यानंतर परत हे झाड नळदुर्गला येत असे. नित्यनियमाने एक वर्षे सेवा केल्यानंतर नळ राजाला पहाटे जाग आली तर जवळ दमयंती राणी नव्हती.तोपर्यंत राजाला ही खबर नव्हती.राजाला संशय आला.दुस-या दिवशी त्याने गुपचूप राणीच्या पाठीमागे जावून तोही दुस-या बाजूला पारंब्यावर बसून आदि - मैलारला गेला. तेथे गेल्यावर नळ राजाला सर्व उलघडा झाला व त्याने खंडोबाची माफी मागून नळदुर्गला प्रगट होण्याची विनंती केली, श्री खंडोबाने तथास्तू म्हटले व किल्ल्यातील एक जागा सांगून तेथे आपण प्रकट होणार असल्याचे सुचित केले.नळ राजाने दुस-या दिवशी काही मजूर लावून खंडोबाने दर्शविलेली जागा उकरण्यास सुरूवात केली. ( ती जागा म्हणजे नळदुर्ग किल्ल्यातील उपल्या बुरूजामागील पाठीमागील भाग ) पाच ते सहा फूट खड्डा घेतल्यानंतर रक्ताची चिळकांडी बाहेर पडली. नंतर पाहिले तर एक स्वयंभू तांदळा (दगडाचा अंडाकृती भाग ) निघाला. तो राजाने मोठया भक्तीभावाने पुजला. नंतर किल्ल्यापासून काही अंतरावर श्री खंडोबाचे मंदिर बांधण्यात आले व या ठिकाणी श्री खंडोबाची विधीवत प्रतिष्ठापणा करण्यात आली. दमयंतीच्या भक्तीसाठीच श्री खंडोबा आदि - मैलारहून नळदुर्ग या ठिकाणी प्रगट झाले. राजा - राणीच्या निधनानंतर हजारो वर्षानंतर श्री खंडोबा मंदिरात कोणत्या तरी समाज कंटकाने गाय कापली, त्यामुळे नळदुर्गचे मंदिर भ्रष्ट झाले.त्यामुळे श्री खंडोबा कोपला म्हणून त्या काळातील लोकांनी पाच कि.मी.अंतरावरील अंनंदऊर या ठिकाणी श्री खंडोबाचे मंदिर बांधले, व श्री खंडोबाचा तांदळा या ठिकाणी नेवून श्री खंडोबाची या ठिकाणी प्रतिष्ठापणा केली. त्याकाळचे अंनंदऊर म्हणजेच आजचे अणदूर होय.
अणदूरच्या श्री खंडोबा मंदिराच्या देखभालीसाठी कोल्हापरच्या शाहू महाराजांनी हजारो एकर जमिन दान केली आहे. तसेच अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरासमोर सभागृह बांधले.त्यामुळे अणदूरचे मंदिर तीन वेगवेगळया भागात बांधल्याचे दिसून येते.काही वर्षानंतर नळदुर्गच्या लोकांनी खंडोबा आमचा आहे, असा वाद सुरू केला.या वादावर श्री खंडोबा अणदूर येथे सव्वा दहा महिने व मैलारपूर ( नळदुर्ग ) येथे पावणेदोन महिने ठेवण्याच्या तोडगा निघाला.त्यानुसार मैलारपूर येथे जुन्या मंदिराच्या पाचशे फुटाच्या अलिकडे नविन मंदिर मंदिर बांधण्यात आले व तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली.अनेक वर्षे लोटून गेल्यानंतरही ही प्रथा गुण्या - गोविंदाने सुरू आहे.
सोमवारी अणदूरच्या खंडोबाची यात्रा पार पडली, त्यावेळी श्री खंडोबाचा करार करण्यात आला, हा करार कशासाठी केला जातो, हे नव्या पिढीला सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच केला आहे.
दिवसभर यात्रा पार पडल्यानंतर रात्री श्रीचा वाजत- गाजत छबिना काढला जातो.पहाटे दोन वाजता नळदुर्गच्या मानक-यांचे अगमन होते, त्या अगोदरच अणदूरचे मानकरी व ग्रामस्थ जमलेले असतात.दोन्ही गावांच्या मानक-यांत गळाभेट झाल्यानंतर चहा-पान केला जातो.नंतर एका साध्या कागदावर लेखी करार करून तो श्री खंडोबा देवाजवळ एका ताटात ठेवला जातो.त्याच्यावर भंडार टाकून तो मोठ्याने वाचण्यात येतो.आम्ही श्री खंडोबाची मुर्ती पावणे दोन महिन्याच्या वास्तव्यासाठी नळदुर्ग येथे नेत असून तेथील यात्रा पार पडल्यानंतर परत अणदूरला आणून देवू , असा त्यात उल्लेख असतो.नंतर मुख्य मानक-यांचा फेटा बांधून सत्कार केला जातो तर अन्य मानक-यांचा नारळ प्रसाद व फुलांचा तुरा देवून सत्कार केला जातो.त्यानंतर श्री खंडोबाची मुख्य मुर्ती एका पालखीत घालून वाजत - गाजत नळदुर्गला नेली जाते व नळदुर्गची यात्रा संपल्यानंतर वाजत - गाजत अणदूरला परत आणली जाते. हा सोहळा अणदूर - नळदुर्गच्या लोकांचे ऐक्याचे प्रतिक असून, डोळ्याचे पारणे फेडणारा आहे.
'माणकेश्वरची शिव सटवाई' - डॉ. नवनाथ शिंदे. (पद्मगंधा प्रकाशन, पुणे.)
प्रा. रजनी जोशी व डॉ. माया पाटील या संशोधकांनी निरीक्षणातून नोंदवलेले निष्कर्ष
डॉ. नवनाथ शिंदे यांनी कुमार जोशी व सुरेश जगदाळे या माणकेश्वरस्थित पुजाऱ्यांची घेतलेली ध्वनिमुद्रित मुलाखत
येडशी रामलिंग मंदिर (Yedshi Ramling Temple)
बार्शी - लातूर प्रवासात 'येडशी' घाट लागतो. या अवर्षणप्रवण (कमी पाऊस) असलेल्या भागात हा घाट रस्त्याचा प्रवास मात्र खूप निसर्गरम्य आहे. शासनानं हा अभयारण्य विभाग जाहीर केला आहे. बार्शीहून सरासरी ४५ किमीवर याच अरण्यात 'बीड - उस्मानाबाद' हा आडवा महामार्ग लागतो. या महामार्गावर डावीकडं वळण घेतल्यास, इथं रामायण काळातील एक पुरातन महादेव मंदिर आहे. अगदी अभयारण्याच्या मधोमध, हिल स्टेशनवर आणि दरीच्या कोंदणात असलेलं हे मंदिर आणि परिसर निसर्गरम्य आहे. दरीत सरासरी १११ पायऱ्या उतरून मंदिरात जावं लागतं. त्यामुळं दुरून या मंदिराचा ठावठिकाणा लक्षात येत नाही.
![]() |
| दरीतील 'श्री रामलिंग' मंदिर |
![]() |
| मंदिराची प्रवेश बाजू |
'बालाघाट' डोंगररांगेतील हे थंड हवेचं ठिकाण असल्यानं बीड, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील निसर्गप्रेमींना हे पर्यटनाचं ठिकाण बनलं आहे. 'येडशी रामलिंग घाट अभयारण्य' नावानं ते प्रसिद्ध आहे.
सरासरी कमी पावसाची नोंद असल्यानं इथं आपटा, अर्जुन, अंजनी, बेहडा सारखी मध्यम आकाराची आणि विशेषतः करवंदीची झुडपं मोठ्या प्रमाणात दिसतात. या घाट प्रवासात रानमांजर, ससा, मुंगूस, मोर यासारखे वन्य जीव रस्त्यात दर्शन देतातच देतात.
![]() |
| जटायु समाधी |
![]() |
| मंदिराची मागील बाजू |
![]() |
| पुरातन शिवलिंग |
![]() |
| मंडपातील नंदी |
![]() |
| मंदिरामागील नितळ नदी |
![]() |
| धबधबा आणि गुहा |
देवळाला वळसा मारून शांत वाहणारी छोटी नदी, तिचं नितळ पाणी, बाजूलाच धबधबा आणि नदीचं पुढं जंगलात लुप्त होत जाणं खूपच छान आहे. परिसर शांत आणि निवांत आहे. बार्शीहून हा 'तेर'चा प्रवास पूर्ण या अभयरण्यातूनच झाला. आमचं 'तेर' हे पुढचं मुख्य नियोजन असल्यानं औटघटकेसाठी या मंदिराचीही भेट झाली.
![]() |
| मंदिराला वळसा मारणारी नदी |
![]() |
सूचना :- इथली माकडं मात्र उच्छादी आहेत.
ऑफबीट - धाराशीव (उस्मानाबाद) लेणी (Dharashiv Caves)
आजपर्यंत भेट दिलेली घारापुरी, अनेकदा भेट दिलेली कान्हेरी, वेरूळ, अजिंठा, भाजे लेणी, कार्ल्याची लेणी इत्यादि नजरेसमोर होतीच. मग इथंही भेट द्यायचं ठरलं.
![]() |
| मंदिरासमोरील समाध्या (Dharashiv Caves -Usmanabad) |
'तेर'हुन नैऋत्येला असलेलं २२ किमीचं उस्मानाबाद (आधीचं नांव 'धाराशिव') तासाभरात गाठलं. लेण्याकडं जाण्यासाठी उस्मानाबाद शहराच्या मध्यवर्ती भागातूनच जावं लागतं. गल्लीबोळातल्या या रस्त्यांचं काम त्यावेळी चालू होतं. आज सलग प्रवास आणि भटकंतीचा आमचा दूसरा दिवस होता. स्वतः ड्रायव्हिंग करणं, ही इथली शनिवारची ट्रॅफ़ीक मधली संध्याकाळ, रस्त्याची दुर्दशा आणि स्थानिक रिक्षावाले या सर्वांनी मेटाकुटीला आणलं. या सर्वांतून मिळणारा आराम हा तुळजापूर मुक्कामीच अपेक्षित होता. औटघटकेत इथेही जावून येऊ, या उमेदीनं अडचणींना तोंड देत होतो.
उस्मानाबादच्या वायव्येला ५ किमीवर असलेल्या लेण्यांकडे शहर सोडून पुढे पठारावरून उतार होत जाणारा रस्ता बऱ्यापैकी आहे. रस्ता संपतो तिथेच डावीकडं चेकपोस्ट आहे. तिथून खाली उतरणाऱ्या सिमेंटच्या पायऱ्या सुरू होतात. एखादं कुटुंब वगळता, आम्ही पोहाचेपर्यंत तिथून सर्वजण परतले होते. चेकपोस्टवर कोणी कर्मचारी किंवा पहारेकरी असावा वाटलं, पण तसं काहीच दिसलं नाही. पुढं आम्ही फक्त चौघेच उरलो.
![]() |
| लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या |
![]() |
| समाधी मंदिर (Dharashiv) |
![]() |
| समोर समाधी मंदिर आणि उजवीकडे पहिली लेणी |
![]() |
| सभामंडपातील शिवपिंडी |
![]() |
| मंदिराच्या सभामंडपातून गाभारा |
![]() |
| समाधी मंदिरातील ओवऱ्या (Dharashiv) |
![]() |
| छतावरून दिसणारं दृश्य (Dharashiv) |
![]() |
| गाभाऱ्यातील मूळ शिवपिंडी |
![]() |
| पहिल्या लेण्यातील बुद्ध मूर्ती (Dharashiv Caves) |
![]() |
| पहिली लेणी (Dharashiv Caves) |
![]() |
| दुसरी लेणी (Dharashiv Caves) |
![]() |
| दुसरी लेणी |
![]() |
| तिसरी लेणी (Dharashiv Caves) |
![]() |
| तिसऱ्या लेण्याची प्रवेश कमान |
![]() |
| चौथी लेणी (Dharashiv Caves) |
![]() |
| तिसऱ्या लेण्यातील दुरुस्ती |
तर पुढची चौथी लेणी आकारानं लहान असून, तिचीही दुरुस्ती चालू असल्याचं दिसतं.
या चार लेण्यांपैकी पहिली लेणी वगळता, पुढची तीन लेणी कधीकाळी ढासळली असावीत. सध्या त्यांच्या दुरुस्तीचं काम घेतलेलं दिसतं. त्यांचं मूळ सौंदर्य नष्ट झाल्याचं जाणवतं. दुसरी आणि तिसरी लेणी भव्य आहेत. काळाच्या ओघात त्यांचीही पडझड झाली असून कोरीव काम नष्ट झालेलं दिसतं. एकंदर या लेण्यांकडे शासनाचं दूर्लक्ष झाल्याचं दिसतं. तरुण हौशी पर्यटकांनीही या लेण्यांच्या आणि मंदिराच्या भिंतींवर आपल्या कलाकारी भावना लिहून प्रताप दाखवलेले दिसतात.
ही पाचव्या शतकातील बौद्ध लेणी बाराव्या शतकात जैन लेण्यात परावर्तित झाली असावीत.
या लेण्यांबद्दल विस्तृत माहिती 'लोकसत्ता'च्या 'लोकभ्रमंती' सदरात 'श्री अमित सामंत 'यांनी लिहिलेला लेख ७ डिसेंबर २०१६ ला प्रसिद्ध झाला होता. डोंबिवलीचे श्री अमित सामंत यांचा विविध गड, किल्ले, प्राचीन मंदिरं, लेणी या बाबत गाढा अभ्यास असून, ट्रेकिंग क्षेत्रातील मी त्यांना दिपस्तंभ समजतो. 'डोंगरभाऊ' हा त्यांचा या क्षेत्रातील स्वतंत्र मराठी ब्लॉग असून, 'ट्रेकक्षितिज' या ट्रेकिंग क्षेत्रात आज अग्रगण्य असलेल्या संस्थेसाठी त्यांचं योगदान आहे. या ब्लॉग निमित्त इथं या इतिहास अभ्यासकाचा उल्लेख येणं हा बहुमान समजतो. धाराशीव आणि आजूबाजूच्या ऐतिहासिक ठिकाणांबद्दल https://samantfort.blogspot.com/2017/10/blog-post.html?m=1 या त्यांच्या लिंकवर अभ्यासपूर्ण माहिती मिळते.
आधी 'किल्ले परांडा' ब्लॉगमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे 'धाराशिव' हे दक्षिण आणि उत्तरेच्या प्राचीन व्यापारी मार्गावरील महत्वाचं ठिकाण होतं. तर आम्ही आता जिथून आलो ते 'तेर' म्हणजेच 'तगर' हे प्राचीन काळी व्यापार, संस्कृती आणि धर्म प्रचाराचे एक प्रमुख केंद्र असल्याचा उल्लेख, गोरोबा काकांच्या ब्लॉगमध्ये केला आहेच. त्यामुळं बाजूला संरक्षणासाठी भुईकोट 'किल्ले परांडा' आणि व्यापार प्रवासादरम्यान आरामासाठी ही 'धाराशिव लेणी' त्यावेळी वापरात आली असावीत.
वाढणारा अंधार आणि तुळजापूर मुक्काम वेळेत गाठण्यासाठी आम्ही पलीकडील तीन लेण्यांना भेट देवू शकलो नाही याची हुरहूर राहिलीच..
गोरोबा कुंभारांच 'तेर' - प्राचीन 'तगर' नगर (Ter - Goroba Kumbhar)
मराठवाड्याच्या भटकंतीत 'परांडा' किल्ल्यानंतर संत गोरोबा कुंभारांच्या 'तेर' (ढोकी) गावी गेलो. जाण्याचा उद्देश फक्त वारकरी संप्रदायाचे संत गोरोबा काकांच घर आणि त्यांनी वय वर्षे 49 व्या वर्षी घेतलेल्या समाधी मंदिराचं दर्शन घेणं इतकाच होता.
आजोबा आणि चुलते वारकरी संप्रदायाचे असल्यानं आणि वडीलही अधून मधून वारी करत असल्यानं भागवत धर्म आणि 'तेर' ला जाण्याबद्दल मनात एक अनामिक ओढ होतीच. मूळ गांव कोल्हापूर जिल्ह्यातील असल्यानं, पंढरपूर, देहू-आळंदी तशी त्यांना लांबच असायची. त्यानंतर पुढे गोरोबा काकांचं 'तेर' तर दूर कर्मकठीणच होतं. इथपर्यंत आलोच आहे तर वाडवडील नाही पण आपण तरी जाऊ., बघू., इतकाच उद्देश होता.
मागे औरंगाबादच्या भटकंतीत संत एकनाथांच्या पैठणला भेट झालीच होती. या वेळचा योग हे कदाचित पूर्वसंचित असावं..
उस्मानाबाद पासून 'तेर' उत्तर पूर्वेला २८ किलोमीटर आहे. स्वतःचं वाहन असल्यानं बार्शीहून पुढे ५७ किमीचं 'तेर' तासाभरातच गाठलं. आणि या प्राचीन गावचे धागेदोरे समजत गेले तसं अचंबित झालो. विचारपूस करत एस टी स्टँडच्या पुढे गावाबाहेर तेरणा नदीचा पूल ओलांडला की नदीकाठावरच्या घाटावरच डाव्या हाताला लाल रंगातील 'श्री कालेश्वर' महादेवाचं पुरातन मंदिर लक्ष वेधून घेतं. त्याच्याच बाजूला गोरोबा काकांचं समाधी मंदिर आहे.
![]() |
| श्री कालेश्वर महादेव मंदिर ( Kaleshwar Temple) |
![]() |
| तेरणा नदी (Terna River) |
![]() |
| गोरोबा काकांचं मंदिर(मागील बाजू) |
![]() |
| श्री कालेश्वर महादेव मंदिर |
![]() |
| गोरोबा काका मुखवटा (समाधी मंदिर) |
![]() |
| गोरोबा काकांचं समाधी मंदिर (आतील बाजू) |
![]() |
| निलकंठेश्वर मंदिर (Nilkantheshwar Temple) |
त्यानंतर आम्हाला उत्कंठा असलेलं काकांचं घर शोधत गावात गेलो. तिथं
मात्र भ्रमनिरास झाला. नवीन सिमेंटचं बांधकाम करून, घराला पुराण आभास
देण्याचं काम सध्या पुरातत्व विभागानं चालू केलं आहे. घरात छप्पर तोलून
धरण्यासाठी लाकडी खांब बसवले असून, त्यांना ऐतिहासिक स्वरूप आणण्याचा
प्रयत्न केला आहे. आत, पुढे डाव्या कोपऱ्यात चौथऱ्यावर विठ्ठल मूर्ती उभी
आहे. जिथं हा चौथरा आहे, तिथंच काकांचा मडकी बनवण्यासाठी चिखलाचा गारा
असायचा असं तिथल्या एका आजीबाईनं माहिती दिली.
![]() |
| घरातील चौथरा |
![]() |
| गोरोबा काकांचं घर |
कालपरत्वे ७०० वर्षांपूर्वीचं मातीचं घर टिकाव धरून राहणं अशक्यच आहे, पण गोरोबा काकांच्या नांदत्या घराची जागा बघून मात्र समाधान झालं.
चैत्र वद्य एकादशी ते आमावस्या कालावधीत तिथं मोठा उत्सव भरतो. आजूबाजूच्या पंचक्रोशीतून वारकरी सांप्रदायाच्या दिंड्या, पालख्या काकांच्या भेटीस येतात. भजन कीर्तन आणि पारायणं होतात. बाराव्या शतकातील गोरोबा काकांचे समकालीन व त्यानंतरही संतश्रेष्ठांचा येथे मेळा भरायचा. त्याकाळीही भागवत धर्माचं "तगर" म्हणजेच सध्याचं 'तेर' एक प्रमुख केंद्र होतं.
'तेर' गावच्या मध्यवर्ती वस्तीत एक विष्णुचं मंदिर असून, त्याचा आकार गजपृष्ठासारखा (हत्तीची पाठ) आहे. पहिल्या शतकातील 'तक्षीला' आणि 'सिरकप' शहराच्या स्थापत्य शास्त्राची प्रेरणा घेऊन तिसऱ्या शतकात ही वास्तू बांधली असावी.
![]() |
| त्रिविक्रम मंदिर (समोरून) Trivikram Temple |
![]() |
| त्रिविक्रम मंदिर (मागील बाजू) Trivikram Vishnu Temple |
![]() |
त्रिविक्रम विष्णु मूर्ती |
मंदिराच्या गर्भगृहासमोर पुर्णतः हलक्या विटांनी बांधलेला आणि मजबूत लाकडी खांबांनी आधार दिलेला, अंदाजे साडेतीन मीटर उंचीचा सभामंडप आहे. इथल्या लाकडी तुळया आणि खांबांचं काम बघण्यासारखं आहे. मंडपात गर्भगृहासमोरच यज्ञ वेदी (धुमी) असून जमीन सारवलेली पण ओबडधोबड आहे.
![]() |
| मंडप |
या मंडपात संत नामदेवांनी कीर्तन केल्याचा उल्लेख 'तेर' च्या इतिहासात आढळतो.
या मंदिराच्या प्राकारात प्रवेश करताच समोर पुरातत्व खात्याचा या मंदिराबद्दल माहितीचा फलक दिसतो. त्यावरील लेख ऊन पावसामुळं पूर्ण मिटला असून फक्त पत्रा शिल्लक राहिला आहे. या प्राचीन अमूल्य आणि दुर्मिळ ठेव्याचं रक्षण सध्या दैवावर हवाला ठेवून होत आहे. इथं येण्यापूर्वी परांडा किल्ल्यातील 'ढाल-काठी' बुरुजावरच्या भल्या मोठ्या, दुर्लभ, पंचधातूंच्या तोफेवर दोन सुंदर सिंह आहेत. त्यापैकी एका सिंहाचे मात्र तोंड मानेपासून कटर लावून कापून नेलं आहे. आशी घटना घडू नयेत हीच अपेक्षा.
मंदिरासमोर मंडपात गरुड मूर्ती हात जोडलेल्या मुद्रेत असून बाजूलाच उजवीकडं महदेवाचं छोटं पुरातन देवूळ आहे. त्यात शिवलिंगामागेच पार्वती, गणेश आणि नागमूर्ती आहेत.
![]() |
| गरुड मंडप |
![]() |
| महादेव देवुळ |

तसेच अनेक प्राचीन हस्तिदंती वस्तू, कंगवे, मातीच्या भांड्यांचे तुकडे, मणी, गळ्यातील हार, बाहुल्या, शंख शिंपले, जुन्या मोठाल्या विटा उत्खननात सापडल्या आहेत.
![]() |
| कै. रामलिंगप्पा लामतूरे |

Dharashiv Caves
Marathwada Circuit- 1200 Kms, 7 forts, 2 Caves
Day 1: Pune-Madha-Paranda-Tuljapur (360 Kms)
Day 2: Dharshiv Caves
Day 3: Tuljapur-Ausa-Kharosa-Udgir-Nanded (280 Kms)
Day 4: Nanded-Kandhar-Dharur-Kunthaligiri (290 Kms)
Day 5: Kunthaligiri-Kharda-Bhadurgad AKA Dharmaveergad-Pune (265 Kms)
Type: Caves
Base Village: Dharashiv
Where:270 KMs from Pune, 25Kms from Tuljapur
Route: Off Osmanbad
Time visited: somewhere in 2008, August 2011
Time to see around: 1 hour
How to visit: The Dharashiv caves are situated 6-7 km
away from Osmanabad city in Balaghat Mountains. A lonely tar road in dry
arid landscape goes right till caves. The place is all isolated and
late evenings should be avoided.
There are total 7 caves, carved probably in 9th or 10th century. The main area has 4 caves and Shiva temple .
A concrete staircase leads you directly to this. 2 of them have idols Jain thirthankars while the rest of them seem to be empty.
The 4th cave has beautiful statue of Parshwanath Bhagwan with a huge snake and carving on the top.
There are 3 caves on the left and a muddy trail leads to this.
One cave is slightly downwards and you have wade through grass to reach there. Unfortuantely I missed the last cave here which had some carving of krishna.
The main caves are all now painted white, which gives all our budding artist a plain canvas to scribble names and draw dirty pictures! Last time I visted there was a security guard posted, he was nowhere to be seem. Hopefully this is treasured for next generation too…
Paranda Fort
Marathwada Circuit- 1200 Kms, 7 forts, 2 Caves
Day 1: Pune-Madha-Paranda-Tuljapur (360 Kms)
Day 2: Dharshiv Caves
Day 3: Tuljapur-Ausa-Kharosa-Udgir-Nanded (280 Kms)
Day 4: Nanded-Kandhar-Dharur-Kunthaligiri (290 Kms)
Day 5: Kunthaligiri-Kharda-Bhadurgad AKA Dharmaveergad-Pune (265 Kms)
Type: Land Fort
Base Village: Paranda
Where:210 KMs from Pune
Route: Pune-Tembhurni-Kurduwadi-Parnda
Time visited: August 2011
Time to see around: 1 hour
How to visit: Take a left turn from Tembhurni off Pune-Solapur highway
towards Kurduwadi. From Kurduwadi take ‘Kurduwadi-Latur’ toll road. I
took the Parnada turn from where Paranda was around 25 Kms. But the road
was in horrible condition. Better enquire about this before you take a
turn. The alternative is to precede towards Barshi and then ‘Barshi-
Paranda’ road which in better condition.
Meter reading from Pune: 268
You have to traverse through a vegetable market to reach the entrance. The guard notes down your details and then allows you to visit the magnificent fort.
This 800 year old fort with 26 bastions is said to be built by Bahamani II is indeed a fine specimen of military Architecture and engineering. As per history available on internet after the disintegration of the Bahamani kingdom it became a part of the kingdom of Ahmednagar. After the capture of Ahmednagar by the Moghals in 1600, it became the capital of Ahmednagar for a short time. About 1628 or so, it was captured by Sahaji and remained with him for two to three years and was captured by the Bijapuris in 1630. In 1657 it was again captured by the Moghuls.
The entrance gates are in pretty good condition. The beautiful carvings on the buruj and windows are worth dekko
The fort is surrounded by trench from all the sides with all overgrown bushes and saturated water.

The fort has not faced any battle in its history
and used as storage depot for weapons and large number of cannon balls
are still lying there.

There is a well maintained beautiful mosque once you enter the main area.
There is a well built well on far right side.
There are two huge cannons on two watch towers/buruj.
It is said that the main cannon is 20 feet long.
You have to take traverse from left to reach the Shiva temple.
We proceeded to our next destination Tuljapur.
















































































































































































































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.