कोणीही न्यूयॉर्क ला आले कि त्यांची फिरण्याची ठिकाणे तशी ठरलेली असतात. न्यूयॉर्क शहरामधली ठिकाणे, उत्तरेला बॉस्टन, नायगारा धबधबा, थाउजंड आयलंड, तर दक्षिणेला फिलाडेल्फिया, वॉशिंगटन डी सी इत्यादी. त्यातल्या नायगारा ला मात्र माझे बर्याच वेळेला जाणे झाले. अगदी मोजायचे झाले तर ११ वेळा. मला स्वतःला फिरायची भारी आवड. ज्या नवीन ठिकाणी जाईन तेथिल आजूबाजूची ठिकाणे मी आवर्जून पाहायला जातो. शिक्षण आणि नोकरी निमित्ताने बर्यापैकी फिरणे झालंय. पण अजून काही हा छंद पुरा झालेला नाही.
आता न्यू यॉर्क मध्ये तशी बरीच मंडळी येउन फिरून गेली असणार. त्यांनी नायगारा बद्दल लिहिलेच असेल त्यामुळे आपण कशाला लिहायचे असा विचार करून आळसात लिहिणे टाळले. पण एकदा सहज म्हटले शोधून बघावे तर हा धागा सापडला.
परंतु यातले फोटो काही दिसले नाही. कुठेतरी वाचलेलं आठवलं कि गुगल वर फोटो अपलोड न करता मिसळपाव वरच टाकले कि ते आता दिसत नाहीत म्हणून. म्हटले ठीक आहे आता पहिले गुगलबाबा वर टाकावेत म्हणजे सर्वांना दिसतील.
असो. सुरुवात फारच लांबलचक झालीये उगाच.
तर मी राहतो तिथून नायगारा साधारण साडे चारशे मैल आहे. ८ तास ड्राईव्ह गाडीतला जी पी एस कोकलून सांगत होता. मध्ये विश्रांती घेत घेत साधारण ९ तास लागणार तर. बरोबर बायको आई बाबा भाचा एवढी मंडळी होती. सुट्टी काढणार नसल्याने शुक्रवार संध्याकाळी - रात्री प्रवास, शनिवारी धबधबा आणि रविवारी परत असा बेत ठरवला. मध्ये रॉचेस्टरला मित्र राहत असल्याने त्याच्याकडे उतरण्याचे ठरवले. रोणकोणकोमा - न्यू योर्क - स्क्रेंटन - बिंगहँमटन - सिराकुस - रॉचेस्टर आणि मग नायगारा असा प्रवास होता.

मे महिन्यातला शेवटचा शुक्रवार असल्याने नेमका ऑफिस मध्ये पिझ्झा डे होता. तो मोह न आवरल्यामुळे डबा तसाच ठेऊन पोटोबा पिझ्झाने तृप्त झाले. संध्याकाळी लवकर ५.३० ला घरी आलो. आईने आणि बायकोने सगळे सामान भरूनच ठेवलेले असल्याने चहा पिउन निघायला फारसा उशीर होणार नव्हता. तेवढ्यात बायकोच्या नजरेस भरलेला डबा पडला.
"डबा परत आणला?"
"अगं हो! आज ना . . ऑफिस मध्ये ना . . " घाबरत घाबरत स्पष्टीकरण द्यायला सुरुवात करणार तेवढ्यात तिने ओळखलेच..
"पिझ्झा खाल्ला असणार ऑफिसात! सांगून सांगून थकले आता. जरा त्या ढेरीकडे बघा! काही फायदा नाही त्या जिम चा. जातोच कुठे म्हणा आम्ही? आम्ही मेलीनं सकाळी सकाळी मर मर कामं करत तुम्हाला डबा करून द्यायचा आणि तुम्ही तिकडे पिझ्झे हाणायचे . . . " आणि मग पुढे जे सर्वांच्या घरी होते ते सर्व डायलॉग सुरु झाले. विशेष म्हणजे आज त्यात मातोश्रींनी हि भाग घेतला आणि आमच्यावर तोंडसुख घेतले. आम्ही त्या ऑफिस मधल्या पिझ्झाला आणि तो पिझ्झा आणणाऱ्या टीम ला खडे फोडत चहा संपवला. शेवटी तो परत आणलेला डबा गाडीत मी रात्रीचे जेवण म्हणून खायचा असा निर्णय सर्वानुमते घेऊन आम्ही प्रवासाचा श्री गणेशा केला आणि गाडी रस्त्याला लागली.
जाताना न्यू यॉर्क मधून जायचे असल्याने गर्दीत अडकणार याची खात्री होती. आणि जी पी एस ने दाखवलेला ८ तासामध्ये अजून २ -१ तासांची सहज भर पडणार याचीही कल्पना होती आणि तसेच झाले. वॉशिंगटन पूल आणि फोर्ट ली येथून जाताना किमान १:३० तास जेमतेम ५ मैल चे अंतर पार करण्यात गेला.
मात्र एकदा मुख्य रस्त्याला लागल्यावर फारसे कोणी मध्ये आले नाही.
अपवाद टोल नाक्यांचा होता. न्यू यॉर्क मध्ये टोल फार महाग आहेत. अगदी $७.५ पासून ते $१३. ०० पर्यंत लुटायला कमी करत नाहीत. शहराबाहेर मग अगदीच २ ते ३ डॉलर चे टोल नाके आहेत. हे सर्व टोल भरून आम्ही पुढे निघालो.
दर ३ तासांनी विश्रांती साठी थांबायचे असा माझाच स्वतःला घातलेला दंडक असल्याने आम्ही २ थांबे घेतले आणि साधारण रात्री २ च्या सुमारास रॉचेस्टर ला मुक्कामी पोहोचलो. चांगलाच थकलेलो असल्याने मी ताबडतोब घोरायला सुरुवात केली. माझ्या शेजारी झोपलेला मित्र बिचारा रात्री बराचवेळ माझ्या घोरण्याने जागा होता. सकाळी उठल्यावर बायकोने फटकारले - "किती घोरत पडला होतात हो तुम्ही! आम्हाला अगदी आत पर्यंत ऐकू येत होते. त्या किरणची झोप झाली नाहीये बघा." आम्ही काय बोलणार? शांतपणे "चहा?" एवढाच प्रश्न विचारून ब्रश करायला पळालो.
नाष्टा झाल्यावर घराबाहेर येउन मस्त एक छान चक्कर मारून आलो. मित्राचे घर खरंच फार सुंदर होते. अगदी आपण चित्रातली घरे जशी काढून रंगवतो तसेच दिसत होते.
सगळ्यांचे आवरून झाल्यावर सकाळी १० ला नाश्ता करून निघालो ते दिड तासात नायगारा गाठले. पार्किंगसाठी $५ देऊन आम्ही सर्व ऑब्शर्वेशन टॉवरच्या दिशेने चालू लागलो. जाताना एका सुंदर बगीच्यातून जायचा रस्ता आहे.
इतक्यावेळा पाहूनसुद्धा त्या पांढर्या पाण्याच्या दर्शनाने मन कसे प्रफुल्लीत होऊन गेले आणि प्रवासाचा सगळा शीण एका क्षणात नाहीसा झाला.

तिकिटे घेऊन आम्ही ऑब्शर्वेशन टॉवर वर जायला सुरुवात केली. उजवीकडे अमेरिका आणि कॅनडा यांना जोडणारा पूल दिसत होता आणि डावीकडे नायगारा धबधबा.

मेड ऑफ द मिस्ट
हे बोटीच्या फेरीचे नाव आहे. १८४६ मध्ये नायगारा नदीवरून उतारूंची वाहतूक करण्यासाठी छोट्या वल्ह्वणार्या बोटी होत्या. तेव्हा मोठ्या आकाराची हि बोट व्यावसायिकरीत्या चालवणे फायद्याचे ठरेल हे तिथल्या व्यावसायिकांना जाणवले आणि त्यांनी हि बोट सुरु केली. यामधून उतारू, टपाल, मध्यम आकाराचे मालाचे गठ्ठे हि वाहतूक चाले. १८४८ मध्ये नदीवर पुलाचे काम सुरु झाले आणि या धंद्याला उतरती कळा आली. पण हार न मानता या बोटीचे नवीन ब्रान्डिंग करून पर्यटनासाठी हिच वापर सुरु केला तो आजतागायत.
हा पुलवरुन घेतलेला फोटो.
बोटीत जायला तिथे असा धक्का तयार केला होता. पुलावरून उतरून खाली आले कि या रस्त्यावरून गोल चक्कर मारून त्या डावीकडच्या छोट्या घरात जायचे आणि तेथूनच बोटीमध्ये.
बोटीत चढायच्या अगोदर आम्हाला निळे निळे रेनकोट घालायला दिले. सगळ्यांना ते घालताना खूप मजा आली. कितीतरी दिवसांनी मला स्वतःला रेनकोट घालायला मिळत होता. अगदी शाळेची आठवण आली.
धक्क्यावरून जाताना .. त्या समोरच्या तंबूत रेनकोट वाटप चालू होते. छोटा धनु तर बोट बघून उद्याच मारू लागला. बोटीत बसून धबधब्याजवळ जायचे हि कल्पनाच त्याला पचनी पडत नव्हती.
हा तो ऑब्शर्वेशन टॉवर. या टॉवरवरून खाली यायला लिफ्ट आहे. काही सेकंदात आपण तळाशी पोचलेलो असतो.

आता आम्हाला धबधब्याचे वेध लागले.
तेथे पोहोचताना पाण्याचे एवढे तुषार उडत होते कि बहुतेकांनी कॅमेरा खिशात ठेऊन दिला. मी आपला लेन्स वरती हात ठेऊन जेवढे जमेल तेवढे फोटो काढत होतो. शेवटी हॉर्स शु च्या म्हणजे मुख्य धबधब्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर एक वेळ अशी आली कि सगळीकडे नुसते पाण्याचे तुषारच होते. मग तिथे एक व्हिडीओ घेतला. (व्हिडीओ इथे दिसत नसेल तर हि लिंक असू द्यात. http://youtu.be/4y1VGkQeZeY )
बोटीतून बाहेर पडल्यावर मग प्रचंड भूक लागलेली होती. आम्ही नायगारा बागेतून बाहेर पडलो आणि समोरच असलेल्या भल्या मोठ्या इमारतीच्या दिशेने चालू लागलो. ते एक मोठे हॉटेल होते. आणि तळमजल्यावर कॉन्टीनेन्टल जेवणाचे छोटे ठेले. ठेलेच म्हणायचे फक्त आतमध्ये होते. हे फक्त रोख पैसा घेतात. इथे क्रेडीट कार्ड चालत नाही. इथे जेवणाचे तसे बरेच पर्याय उपलब्ध आहेत इंडिअन चायनीज थाई वगैरे. आणि किंमत पण बर्यापैकी स्वस्त. $८ मध्ये भारतीय थाळी. त्यात भाजी दोन रोटी आणि वरण भात. दुपारच्या जेवणाला अगदी पोट भरून पुरले.
तेथून मग आम्ही मुख्य हॉर्स शु धबधब्याकडे जायला लागलो. गोट बेटावर जाण्याचा रस्ता या पुलावरून जातो. या बेटावर गाड्याही जाऊ शकतात.

एकंदरीत जागेचा अंदाज यावा म्हणून खालील चित्र जालावरून साभार. पुलावरून आम्ही 'गोट आयलंड' वर जाऊ लागलो. या छोट्याश्या बेटामुळेच नायगारा नदीचे दोन भाग आणि पर्यायी दोन धबधबे होतात. १) अमेरिकन फॉल्स २) हॉर्स शु फॉल्स. हॉर्स शु फॉल्स हा मुख्य धबधबा. येथेच वरील व्हिडीओ शूट केला आहे.
वरील चित्रामध्ये अमेरिकन फॉल्स च्या उजवीकडे जे पिवळ्या रंगात पट्ट्या दिसताहेत त्या म्हणजे 'केव्ह ऑफ द विंड्स' चा बोर्डवॉक. मुख्य बेटापासून खाली त्या पिवळ्या शिड्यांपर्यंत यायला त्यांनी एक बोगदा इंग्रजी एल (L) आकारासारखा खोदला आहे. ३ मजूर तो बोगदा हाताने १ वर्ष खोदत होते. अर्थात आपल्या मनात पहिला प्रश्न येणारच कि हाताने का? तर त्याचे उत्तर म्हणजे त्यांनी सुरुंग वापरला असता तर आजूबाजूच्या मातीच्या थरांना देखील धक्का पोहोचण्याची शक्यता होती. त्यातून नायगारा हे राष्ट्रीय पर्यटन स्थळ.
'केव्ह ऑफ द विंड्स' मध्ये जायचे म्हणजे आपल्या मुळशीच्या धबधब्याखाली जाऊन भिजायचा आनंद लुटण्यासाराखेच. इथे तुम्ही अमेरिकन धबधब्याच्या अगदी जवळ जाता. त्यांनी पिवळ्या रंगाचे रेनकोट दिलेले असतात पण त्यांचा काही एक उपयोग होत नाही. पाण्याचे तुषार सगळीकडे असल्याने इंद्रधनुष्याचे मात्र विलोभनीय दर्शन घडत होते.

--

जाताना आम्हाला सीगल पक्ष्यांची बरीच घरटी दिसली. पक्ष्यांनाहि माणसांचे फारसे काही वाटत नव्हते.
त्यातल्या बर्याच अंड्यांमधून पिल्ले पण बाहेर आली होती.
भरपूर भिजून झाल्यावर मग आम्ही टेरापिन पॉईन्टकडे मोर्चा वळवला. हा पॉईन्ट हॉर्स शु फॉल्सला अगदी लागून आहे. येथे फिरायला भरपूर मोठी जागा आहे. समोरच कॅनडा दिसतो.

रात्री नायगारा वरील रंगीत दिव्यांची उधळण बघायला यायला बहुतेक जाणकारांनी सांगितले होते त्यासाठी परत यायचे ठरवले. सुरुवातीला मला वाटले कि काय फक्त एखादा पांढरा फोकस टाकतील त्या सो कॉल्ड नाचणाऱ्या कारांज्यांसारखे. पण रात्री एक वेगळेच दृश्य आमची वाट बघत होते. ऑब्झर्वेशन टॉवर वर येउन आम्ही बघितले तर अगदी रंगांची मुक्त उधळण ज्याला म्हणणार तो प्रकार चालू होता. कॅनडाच्या बाजूने तीनही धबधब्यांवर रंगीत प्रकाशझोत सोडले होते आणि ते सारखे रंग बदलत होते.


हे समोरील कॅनडाचे दृश्य.

हे रंगीत पाण्याचे एवढे भव्य दृश्य पाहून डोळ्याचे पारणे फिटले. आणि त्या तृप्तीतच आम्ही परत फिरलो. मी मनोमन निश्चय केला १२ व्या फेरीच्या वेळेस रात्रीचा नायगारा कधी चुकवायचा नाही.
Corning Glass Museum कॉर्निंग ग्लास म्युझियम Offbeat USA
| Fern Tower |
कॉर्निंग गावात शिरल्यावर मोठा पार्कींग तळ आहे. त्याच्या बाजुला असलेल्या बस स्टॉपवरुन कॉर्निन ग्लास म्युझियमसाठी मोफत एसी बस सेवा आहे. मोजुन दुसर्या मिनिटाला म्युझियमच्या दारात पोहोचलो. म्युझियम मधे शिरताच समोरच काचेचा सुंदर "फ़र्न ग्रीन टॉवर" आपल लक्ष वेधुन घेतो. कोवळ्या पोपटी रंगात बनवलेल हे काच शिल्प साडे पंधरा फ़ूट उंचीच आहे. काचेला गरम करून, फ़ूंक नळीतून फ़ूंकर मारुन, विविध प्रकारे वाकवून, वळवून वेलीला फुटलेल्या धुमार्यांसारखे ७१२ विविध आकार बनवून हे काच शिल्प, डाले चिहुली या कलाकाराने तयार केलेल आहे. दिवसाच्या विविध वेळी त्यावर पडणारा प्रकाश आणि रात्रीच्या वेळी त्यावर टाकला जाणारा कृत्रिम प्रकाश यामुळे हे शिल्प प्रत्येक वेळी वेगळच भासत. नंतर म्युझियम मधे काच तापवुन त्यात फुंकर मारुन विविध आकार निर्माण करण्याच प्रात्यक्षिक पाहिल तेंव्हा हे काम किती कठीण आहे आणि उच्च दर्जाच आहे याची जाणीव झाली.
कॉर्निंग म्युझियम आठवड्याचे सातही दिवस चालू असत.एकदा काढलेल तिकीट दोन दिवसासाठी चालत आणि १९ वर्षाखालील मुलांना मोफ़त प्रवेश आहे. अमेरीकेतील जवळपासच्या शहरापासुन कॉर्निंगचे अंतर पाहाता तिथे पोहोचायला दुपार होतेच. त्यानंतर २ - ३ तासात म्युझियम बघुन होत नाही म्हणुन ही सोय केलीय. तिकीट काढुन आत शिरल्यावर समोरच एक अवाढव्य काच लावलीय. त्यावर काचे संबधी जागतिक साहित्यात आलेली अनेक वचन उधृत केलेली आहेत. त्यातील "Don't throw stones at your neighboures if your own windows are Glass" हे बेंजामिन फ़्रॅंकलिनने १७७४ साली लिहिलेल वचन वाचुन तर मी चाटच पडलो. हे वाक्य म्हणजे आपल्या हमराज चित्रपटातला राजकुमारचा प्रसिध्द डॉयलॉग "जिनके घर शिशे के होते है वो दुसरोंपर पत्थर नही फेका करते." हिंदी सिनेमाच्या उचलेगिरीला सलाम करुन पुढे पाहायला सुरुवात केली.
काचेचे विविध प्रकार, त्यात होत गेलेला बदल आणि त्याचे दैनंदिन जीवनात होणारे उपयोग यावर प्रकाशझोत टाकणारे प्रदर्शन तेथे मांडलेले आहे. ते नीट समजावे म्हणुन त्याच्या बाजुला स्क्रीन लाउन त्यावर त्यासंबंधीची माहिती रंजक पध्दतीने सतत दाखवली जात होती. तिथे लावलेल्या पेरीस्कोप मधून कॉर्निंग गावातील विविध ठिकाण पाहाता येतात. या प्रदर्शनात एक काचेचा डोम बनवलेला आहे त्याच्या दोन टोकाला दोन जणानी उभ राहुन कुजबुज केली तरी एकमेकाच्या कानात बोलल्या सारखा स्पष्ट आवाज येतो. या मागिल शास्त्रही येथे उलगडुन दाखवलेले आहे. अशाच एका डिस्प्ले मधे दोन आरसे/भिंग बसवलेले आहेत. त्या आरशांच्या मधोमध आपण उभ राहुन पुढे पुढे चालत गेल्यावर आपली प्रतिमा मोठी मोठी होत जाते आणि एका बिंदुपाशी आपली प्रतिमा चक्क उलटी दिसायला लागते. अशा प्रकारचे अनेक प्रयोग मांडुन त्याव्दारे पाहाणार्यांची उत्कंठा वाढवुन त्याला त्यामागच शास्त्र जाणून घ्यायची इच्छा व्हावी अस वातावरण इथे निर्माण करण्यात आल आहे.
म्युझियम मधला हा माहितीपुर्ण विभाग पाहुन झाल्यावर पुढच्या भागात देशोदेशीच्या काचेच्या वस्तुंचा संग्रह केलेला आहे. त्यात लाव्हा रस थंड होताना नैसर्गिकरीत्या तयार झालेली काच, निसर्गात विविध स्वरुपात सापडणारी काच सुरुवातीला ठेवली आहे. काच बनविण्याच्या पारंपारीक पध्दतींची मातीची मॉडेल्स बनवलेली आहेत. त्यात कॉर्निंग कंपनीचे सुरवातीच्या काळातले मॉडेल पण आहे. याशिवाय रोमन, इस्लामिक काळातील काचेच्या विविध वापरातल्या वस्तू ते आजच्या कलावंतानी बनवलेल्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. या संग्रहात एक काचेची सुंदर बोट ठेवलेली आहे. तशीच दुसरी बोट राजस्थान मधल्या बिकानेरच्या लालगढ पॅलेस मधे ठेवलेली आहे. याशिवाय काचेचे कपडे, काचेच पिस्तुलही पाहाण्यासारखे आहे .
म्युझियम पाहून झाल्यावर बाहेर पडण्या अगोदर डिझाईन आणि सजेशन रुम आहे. येथे कागद, विविध रंग, कॉम्प्युटर्स ठेवलेले आहे. म्युझियम पाहून जर एखाद्याला काही कल्पना सुचली तर त्याने ती येथील कागदावर/कॉम्प्युटर्स वर उतरवावी अस आवाहन तिथे केल जात. तसेच " Make your own Glass" या कार्यशाळेत भाग घेऊन आपण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काचेची वस्तू बनवून घरी नेऊ शकतो. म्युझियम मधील शेवटच दालन हे विक्रीच दालन आहे. यात एक डॉलर पासुन लाखभर डॉलर्सच्या काचेच्या वस्तु ठेवलेल्या आहेत. त्यातील वस्तुंच वैविध्य पाहिल की पुन्हा एकदा जाणिव होते की काचेने आपल जीवन कस व्यापुन टाकलय.
जाण्यासाठी :- कॉर्निंग ग्लास म्युझियम, न्युयॉर्क पासून २५० किमीवर (४ तासांवर) आणि नायगरा पासून १५० किमीवर (४ तासांवर) आहे. कॉर्निंगमधे राहाण्यासाठी हॉटेल्स आहेत. जेवणासाठी चक्क एक भारतीय रेस्टॉरंट सुध्दा आहे.
Edison National Historical Park (एडीसन नॅशनल हिस्टॉरीकल पार्क) Offbeat USA
| Edison's Home |
न्युयॉर्कहुन १० मैलावर अमेरीकेच्या न्युजर्सी प्रांततला वेस्ट ऑरेंज शहर आहे. याच शहरात थॉमस एडीसन नॅशनल हिस्टॉरीकल पार्क हे सर्वात मोठ म्युझियम आहे. या म्युझियम मधे एडीसनने बनवलेल्या ४ लाख वस्तू (artifacts) आहेत. त्यात नमुन्या दाखल बनवलेल्या वस्तू (Proto type), अर्धवट राहीलेले प्रयोग, बाजारात विकण्यासाठी बनवलेल्या वस्तू (finished commercial products). या वस्तू बनवण्यासाठी लागणारी फ़ॅक्टरी, प्रयोगशाळा, एडीसनच्या रोजच्या वापरातल्या वस्तू. याशिवाय ४८ हजार ध्वनी मुद्रीका (Sound Recordings), एडीसनच १० हजार दुर्मिळ पुस्तकांच वाचनालय आणि एडीसनची ६० हजार फ़ोटो आणि चित्रफ़िती यांचा अंतर्भाव आहे.
थॉमस एडीसन नॅशनल हिस्टॉरीकल पार्क मधे असलेली एडीसनची लॅब (फॅक्टरी) आणि त्याच घर अशी दोन ठिकाण एकाच तिकीटात पाहाता येतात. अमेरीकन पध्दतीप्रमाणे माहिती कक्षात अनेक सोविनीयर ठेवलेली होती. माहिती कक्षाच्या मागिल दालनात एडीसनवर माहितीपट चालु होता. एडिसनच्या चित्रफ़िती व फ़ोटो यांचा वापर करुन बनवलेल्या माहितीपटामुळे त्याच चरीत्र आपल्या समोर उलगडत जात.
.
| Chemical Lab |
| "Black Maria" |
**
गोट बेटावर निकोल टेस्ला यान्चा पुतळा
**
हायड्रो-एलेक्ट्रिक पावर
**
नायगारा परिसर , आणी रेनबो ब्रिज
**
बोटीवरुन आणी जवळुन हाॅर्स शू फॉल्स
**
मेड ओफ द मिस्ट आणी मेड ओफ द मिस्ट थ्री सीस्टर्स बेटावरुन
**
व्हर्लपूल आणी फॉल्स टुगेदर. मेड ओफ द मिस्ट +हाॅर्स शू फॉल्स
**
हाॅर्स शू फॉल्स वेग वेगळ्या दिशेने
धबधबा रात्रीच्या प्रकाशात
**
**
**
आमेरीक आणी कनेडा निरीक्श्ण टावर
**
काय पाहल
**
भारतीय होटल्स
**
देशी विदेशी जेवण्यची सोय आणी सिनेमा आणी सन्ग्राहालय
म्हणतात की ऋषीचे कुळ आणी नदीचे मुळ कधी शोधायला जाऊ नये पण ही गोष्ट अमेरिकेतील नायगारा नदीच्या बाबतीत खोटी ठरते.नदीचा उगमापासून ते मिलना पर्यतंचा सर्व प्रवास अगदी सुर्यप्रकाशा सारखा स्वच्छ दिसतो.या वर्षी पुन्हा अमेरिकेला जायचा योग आला आणी तेव्हांच ठरवले की प्रसिद्ध, प्रेक्षणीय, प्रवासी यादीतील "नायगारा फॉल्सला" जरूर भेट द्यायची.
**
मानचित्र -नदीचे मुळ बफेलो शहर
विकांता मधे न जाता आठवड्यात सोईस्कर दिवस बघून जायचे म्हणजे गर्दी कमी असेल आसे ठरले. राहात्या घरापासून साडे सहा-सात तासांचा प्रवास. गुगल मानचित्रावरून जाण्याचा रस्ता निश्चीत केला. दोन रस्ते उपलब्ध होते,एक कॅनडा मधून अडिच-तीन तासाचा व दुसरा अमेरिके मधून साडे सहा-सात तासाचा.चौकशी अंती आसे कळाले की कॅनडा मधून जायचे असेल तर तिकडचा प्रवासी व्हिसा पाहिजे.
अंदांज घेतला,केंव्हा निघायचे,केंव्हा पोहचणार,किती दिवस रहायचे, तेथील पर्यटन स्थळे इ.माहिती अंतरजालावर बघून झाल्या नंतर प्रश्न पुढे आला रहायचं कुठे ?
रहायचं कुठे ?
**
**
**
हवा बिस्तर आणी नाष्टा (Airbnb)
न्यूयॉर्कमधील नायगारा फॉल्स जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आसल्याने मोठी मोठी हाॅटेल्स तर आहेतच पण खुपच महागडी.शेवटी, तुम्हाला झोपायला जागा हवी आहे.
लेक ओंटारियो वर घर भाड्याने घेऊन राहू शकता.
नायगारा फॉल्स न्यूयॉर्कमध्ये राहण्यासाठी सर्वोत्तम अतिपरिचित क्षेत्र हे डाउनटाउन क्षेत्र आहे कारण ते बहुतेक आकर्षणांच्या अंतरावर आहे. तथापि, जर तुम्ही कमी गर्दीचे क्षेत्र शोधत असाल, तर तुम्ही उपनगरीय प्रदेशात सहज राहू शकता जे मुख्य आकर्षणांपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहेत आणि खूप कमी खर्चिक आहेत.
नायगारा फॉल्स, न्यूयॉर्कमध्ये राहण्याच्या अनेक ठिकाणांपैकी सर्वात प्रसिद्ध 26 मजली सेनेका नायगारा रिसॉर्ट आणि कॅसिनो आहे, हे काउंटीचे एकमेव AAA चार-डायमंड पुरस्कार विजेते हॉटेल आहे.
निवडण्यासाठी आणखी शेरटन, मॅरीएट,हॉलिडे ईन,रॅडिसन सारखी बरीच हॉटेल्स आहेत, तसेच द बटलर सारखी आरामदायक बेड्स आणि ब्रेकफास्ट्स आहेत.
"आश्रम मोटेल" ,सारखी शंभर डाॅलर्स पर डे दराची, (नावावरून भारतीय असावे ) राहाण्याची सोय आहे.
तुमच्याकडे कार असल्यास आणि डाउनटाउन क्षेत्रापासून थोडे दूर राहण्यास हरकत नसल्यास, पूल आणि अविश्वसनीय दृश्यांसह या सुंदर घर भाड्याने घेऊन शकतो.
हाॅटेल्स,हवाई बिस्तर आणी नाष्टा (Airbnb) किवां मनोरंजन गाडी (Recreational Vehicle) अश्या वेगवेगळ्या सोई उपलब्ध आहेत.
कुतूहलापोटी अंतरजालावर खंगाळू लागलो आणी अपसुकच डोक्यात तुलनात्मक विचारांनी गोंधळ/थैमान घालायला सुरुवात केली. खाण्या पिण्याच्या सवयी,बरोबर लहान नातू त्याच्या खाण्या पिण्याच्या वेळा सवयी व वारंवार उठणारी चहाची तल्लफ यामुळेच महागड्या हाॅटेल्सच्या तुलनेत दुसरा पर्याय हवा बिस्तर आणी नाष्टा (Airbnb) जास्त सोयीस्कर व खिशाला परवडणारा वाटला. आमच्याकडे गाडी आसल्याने थोडे दुरचे ठिकाण निवडले. रहाण्याचे ठिकाण निवडताना "Area compromised"( गुन्हेगारी जास्त आसलेला) तर नाही ना व होम सिक्युरिटीज काय व्यवस्था आहे हे जरूर बघावे. Airbnb चे रिव्ह्यू आणी रेटिंग जरूर बघावे.
इथे सर्वच व्यवहार अंकात्मक (digital) त्यामुळे अंतरजालावर पैसे भरून रहाण्याचे ठिकाण निश्चित केले. लगोलग सर्व सूचनांच्या बरोबर डिजीटल लाॅक कोड नंबर पण आला.हा पर्याय खुपच आवडला. सर्व मानव संपर्का विरहित. पुढे तेथील व्यवस्था व एका कुटुंबाला लागणाऱ्या गोष्टी याचा तपशीलवार आढावा घेऊन योजनाबद्ध सामान, टोस्टर,डिश वाॅशर,मीठ,मिर्ची ब्रेड, बटर, चिझ, अंडी,चहा,काॅफी,दुध ते कप बशा, काटे चमचे,नाईफ, टी ते सर्व्हिंग स्पून थोडक्यात काय सगळ्ळ काही उपलब्ध होते.सुदंर रंग संगती व प्रकाश योजना, आरामदायक बिछाने. सुसज्ज न्हाणी घरे. बारीक सारीक सुचना तर इतक्या की प्रत्येक शोभेच्या फुलांच्या कुंडीत " झाडाला पाणी घालू नये " आसा मुद्रित अक्षराचा झेंडा. या वरून आपल्याला कल्पना आलीच आसेल की कीती चांगली सोय आहे. दर दिवशीचे भाडे फक्त शंभर डाॅलर्स. तीन दिवसा करता घराचे जणू मालकच आणी हे सर्व अनुभवताना अमेरिका निवासी मुलगी,जावई यांचा निर्णय किती योग्य होता सारखे जाणवले.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.