इतिहास
धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्हा नव्याने निर्माण झाला आहे. १ जुलै १९९८ पासून हे अस्तित्वात आले. या जिल्ह्याचे मुख्यालय नंदुरबार आहे. या प्रदेशाचे प्राचीन नाव रसिका होते. नंतर यादवांच्या साम्राज्यावर राजानं राजा सेनचंद्र यांच्यावर राज्य केलं. मुस्लिमांच्या आगमनासह, फारुकी राजा यांना देण्यात आलेली खिताब खान म्हणून खानदेश नाव बदलण्यात आले होते. खानदेश संपूर्ण क्षेत्र धुळे आणि जळगाव दोन जिल्हे समावेश आहे आणि धुळे येथे मुख्यालय एक जिल्हा म्हणून पाहिली होती. तथापि १९०६ मध्ये प्रशासनिक कारणांसाठी खानदेशला पश्चिम खानदेश आणि पूर्व खानदेश असे दोन जिल्हे विभागण्यात आले. १९५० मध्ये नवीन तहसील अक्कलकुवा तयार करण्यात आला आणि १९५६ मध्ये राज्यांच्या पुनर्रचनेसह हे क्षेत्र मुंबई राज्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आणि त्यानंतर १९६० मध्ये ते महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनले. असे करताना, नंदुरबार आणि नवापुर तहसीलमधील प्रत्येकी ३८ गावे, तळोदा मधील ४३ गावे आणि अक्कलकुवा तहसीलमधील ३७ गावे गुजरात राज्यामध्ये हस्तांतरीत करण्यात आली. १९७१ च्या जनगणनेत, अक्रानी महलची अक्रानी तहसील म्हणून सुधारीत करण्यात आली. १९६१ मध्ये जिल्ह्याचे नाव पश्चिम खानदेश ते धुली व त्यानंतर धुळे जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून बदलले गेले. जुलै, १९९८ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील निर्माण केल्यानंतर, ९३३ गावे ६ तालुक्याच्या समावेश नंदुरबार जिल्ह्यातील हस्तांतरित करण्यात आले होते. सहा तहसील अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापुर १९९१ च्या जनगणनेनुसार ९३३ गावे होते, जे २००१ च्या जनगणनेनुसार १७ नवीन गावांसह ९५० झाले. २०११ च्या जनगणनेनुसार, गावांची संख्या ९४३ झाली.
प्रशासकीय इतिहास
नंदुरबार हे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर प्रदेशातील (खानदेश प्रदेश) एक प्रशासकीय जिल्हा आहे. 1 जुलै 1 99 8 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन झाले ज्याला आता धुळे आणि नंदुरबार असे म्हटले जाते. जिल्हा मुख्यालय नंदुरबार शहरात स्थित आहे. जिल्ह्यात 5034 वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचे क्षेत्र आहे आणि त्याची लोकसंख्या 1,311,70 9 आहे, ज्यामधील 15.45% शहरी आहे (2001 प्रमाणे). नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्याने दक्षिण व दक्षिण-पूर्वेस पश्चिमेस आहे आणि उत्तरेकडे गुजरातचा राज्य आहे, उत्तर आणि उत्तर-पूर्वेला मध्य प्रदेश राज्य आहे. जिल्ह्याच्या उत्तर सीमारेषाची व्याख्या महान नर्मदा नदीने केली आहे.
सातपुड्याच्या कुशीतलं, आदिवासींच्या भूमीतलं - नंदुरबार
महाराष्ट्राच्या उत्तरेकडील खानदेशातील नंदुरबार हा जिल्हा धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन अस्तित्वात आला. सातपुड्याच्या डोंगरद-यांत आणि जंगलाच्या सान्निध्यात राहणारे आदिवासी आणि अठरापगड जातींचे व नाना धर्मांचे लोक अशी वस्तीची सरमिसळ तेथे आहे. आदिवासींच्या बोली वेगवेगळ्या आहेत, तशीच त्यांची जीवनशैली वैविध्यपूर्ण आहे. लोकांची गुजराण शेती व जंगलसंपत्ती यांवर होते. औद्योगिक विकासाचे वारे तिकडे शिरलेले नसले, तरी आधुनिक जीवनशैलीने शिरकाव केला आहे. त्यामुळे तेथील आदिवासींच्या जगण्याची कुसही बदलत आहे.
नंदुरबार गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या चिमट्यात अडकलेला आहे. तो जिल्हा म्हणून 2000 च्या दशकात अस्तित्वात आला. जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर, तळोदा, शहादा, अक्कलकुँवा आणि अक्राणी (धडगाव) असे सहा तालुके आहेत. ब्रिटिशकाळात निजाम स्टेटच्या पश्चिमेला, सह्याद्रीच्या रांगांपर्यंत पसरलेला भूभाग खानदेश म्हणून ओळखला जाई. प्रादेशिक वेगळेपण आणि कारभाराची सोय या करता खानदेशचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन विभाग केले गेले. पूर्व खानदेश (जळगाव, भुसावळ) हा काळ्या सुपीक मातीचा, तापीच्या खो-याचा भाग. कापूस-केळी यांकरता नावाजलेला. मुंबईला दूधपुरवठा करणारा. तो पश्चिम खानदेशच्या तुलनेत संपन्न, विकसित व पुढारलेला.
पश्चिम खानदेश (धुळे, नंदुरबार) क्षेत्रातील तापी नदीच्या खो-याचा भाग सोडला तर सारा भाग डोंगराळ आणि मध्यम प्रतीच्या मातीचा. सातपुड्याचा भाग वगळला तर पावसाचे प्रमाण अल्प. आदिवासींचे बाहुल्य. गुजर पाटील, कुणबी पाटील, रजपूत, परदेशी, धनगर अशा अठरापगड जाती वेगवेगळ्या भागांत विखुरलेल्या आहेत.
कोकण आणि देश यांना वेगवेगळे करणारा आणि दक्षिण भारताच्या हवामानाला वेगळा आयाम देणारा, कन्याकुमारीपर्यंत पसरलेला सह्याद्री, त्याचा पसारा उत्तरेला नंदुरबार जिल्ह्यात, आडव्या आलेल्या तापी नदीच्या दक्षिण तटाशी आवरता घेतो. तापी पूर्व-पश्चिम वाहते. तिच्या उत्तरेकडे नदीला समांतर सातपुड्याचा पर्वत. पलीकडे, महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांची सीमारेषा नर्मदा नदी निश्चित करते. तापी नदीच्या दोन्ही बाजूंनी जिल्ह्याच्या मध्यावर पाचरीसारखा आत घुसला आहे गुजरातचा भूभाग. महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या सीमारेषेवर असणा-या तापीवरील उकाई धरणाचा जलाशय गुजरातच्या प्रदेशात आहे. उकाई धरणामुळे गुजरातमधील बलसाड व सुरत या दोन जिल्ह्यांत हजारो एकरांचा संपन्न ‘शुगर बेल्ट’ अस्तित्वात आला. नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नवापूर, तळोदा, नंदुरबार या क्षेत्रातील आदिवासी मजुर दरसाल गुजरातमध्ये ‘जगायला’ स्थलांतरित होतात. सरदार सरोवर धरणाची निर्मितीही महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमेवर आहे. सातपुड्याच्या कठीण प्रस्तरातून वाहणारी नर्मदा एका जागी इतकी अरुंद आणि खोल झाली आहे, की हरणे नदीच्या खाईवरून उडी मारून पलीकडे जात. सरदार सरोवराच्या जलाशय क्षेत्रातूनही हजारो आदिवासींना विस्थापित व्हावे लागले आहे.
जिल्ह्यातील प्रमुख शहर नंदुरबार हे मात्र सपाटीवर आहे. अर्थात सातपुड्याच्या व सह्याद्रीच्या डोंगरटेकड्या जिल्हाभर पसरल्या आहेत, तशा त्या शहराभोवती आहेत. पूर्वी ते शहर भोवतालच्या टेकड्या मजबूत भिंतींनी जोडून किल्ल्यासारखे कोटाने सुरक्षित केलेले होते. नंदुरबार शहर मध्यप्रदेशमधून येऊन नाशिककडे जाणा-या उत्तर-दक्षिण मार्गावर आणि सुरतकडून निजाम स्टेटकडे जाणा-याय पश्चिम-पूर्व मार्गावर येते. त्यामुळे व्यापाराचे ते मुख्य केंद्र होते. ब्रिटिश सत्ता स्थिरावल्यावर दक्षिण गुजरातमधील सुरत आणि पूर्व खानदेशातील मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन भुसावळ यांना जोडणारी रेल्वेलाइन टाकली गेली. त्या तापी व्हॅली लाइनवरील नंदुरबार हे महत्त्वाचे स्टेशन. बलसाड, वापी, नवापूर, नंदुरबार ही खानदेशातील प्रमुख गावे त्या रेल्वेलाइनला येतात. सुरत परिसरातील पारशी व्यापारी मंडळी जशी मुंबईच्या दिशेने डहाणूकडे सरकली, तशीच ती तिकडेही आली. त्या लोकांनी ताडी, दारू, लाकूड इत्यादींच्या व्यापाराबरोबरे रेल्वे इंजिनात जळालेला कोळसा लिलावाने घेण्याचे पिढीजात अधिकार सांभाळले. त्यांच्यासोबत गुजराती मंडळीही खानदेशात पसरली. त्याचा खानदेशच्या संस्कृतीवर खोल परिणाम झाला आहे. धेडगुजरी हा शब्द खानदेशमधील भाषेवरून तयार झाला. त्यामुळे धेडगुजरी म्हणजे धेडाची भाषा मराठी आणि गुजराथी मंडळींची भाषा गुजरी. वास्तवात मात्र नंदुरबारच्या स्थानिक भाषेत अहिराणी, भिली, मराठी व गुजराथी आणि मध्यप्रदेशच्या सामीप्यामुळे हिंदी या सर्व भाषांचा सहभाग आहे. आदिवासींच्या भिलोरी भाषेप्रमाणेच अहिराणी भाषेलाही वेगळी लिपी नाही, परंतु अहिराणी भाषा मृदू आहे. मराठी वा संस्कृत भाषांतील उच्चाराला कठीण असलेल्या र, स, श यांसारख्या अक्षरांचे अहिराणी, भिलोरीत अपभ्रंशित मृदू रूप वापरले जाते. त्याचबरोबर त्या भाषांत बोलताना आवाजात चढउतार असणारी एक लय असते. त्यामुळे त्या भाषेला उपजत गोडवा लाभतो. ते वैशिष्ट्य भिलोरी भाषेत तर विशेष जाणवते. आदिवासींच्या भिलोरी भाषेतही पोटभाषा आहेत. सातपुड्यात डोगरी भिली, तर नवापूर परिसरातील मावची, पावरा भिलांची पावरी इत्यादी बोलीभाषा आहेत. वानगीदाखल एकच वाक्य तीन बोलीभाषांत येथे दिले आहे :
१. कोठली : तुमनी बगिचामा एक बारी फुल फुललो सो. ताय मला देसा का?
२. पावरी : तुमरा बगिसामाय एक हाजलो फुल सेतह छो. मेह आपहात के?
३. डोगरी : तुमा बगिसामे एक हाजलो फुल फुल्याहं. तो माहू आपाहा के?
ह्या वाक्यास आणखी एक सांस्कृतिक संदर्भ आहे. आदिवासी समाजात पूर्वी मुलाचा बाप मुलीला मागणी घालायला जायचा तेव्हा अशा अर्थाचे वाक्य वापरून येण्याचा हेतू तो सुचवत असे.
नंदुरबार जिल्ह्यात आणि पूर्वीच्या धुळे जिल्ह्यातही कोणा एकाच जातीचे वर्चस्व नव्हते आणि त्यातही उच्च मानल्या जाणाऱ्या जातींचे संख्याबळ कमीच होते. त्यामुळे अठरापगड जाती त्यांच्या त्यांच्या जाती, पोटजातींची भाषा, संस्कृती टिकवून गुण्यागोविंदाने नांदल्या. जाती-जातींमध्ये समानता होती असे म्हणता येणार नाही, पण शत्रुत्वाचा अभाव होता. नंदुरबार क्षेत्रात वेगवेगळ्या धर्मांचा प्रभावही जाणवतो. हिंदू, मुस्लिम, जैन, महानुभावी, कबीरपंथी अशा विविध धर्मनिष्ठा असणारे समाजगट तेथे सहिष्णु वृत्तीने जगतात. तसेच, नाते हिंदू-मुस्लिम समाजगटांतही होते. नंदुरबार शहरात काही वर्षांपूर्वी एकच माध्यमिक शाळा होती आणि ती होती नगरपालिकेची. नंदुरबारच्या प्रसिद्ध दर्ग्याजवळ ती शाळा होती. शाळेमध्ये गुजराथी, मराठी आणि उर्दू या तिन्ही माध्यम भाषांचे विद्यार्थी होते. ते एकाच शाळेत एकमेकांचे वेगवेगळेपण गृहीत धरून एकत्र शिकत होते. आठवड्यातून एक दिवस शेवटच्या पीरियडला सुट्टी असायची. घंटा झाल्याबरोबर सर्व मुले (अठरापगड जातींची आणि जैन, मुस्लिम, हिंदू धर्माची) टेकडीवरील दर्ग्याकडे पळत सुटायची. मध्ये आडव्या येणा-याज नदीवरील बांधावरून पोरे जीव खाऊन धावायची. एक शिक्षक साखरफुटाणे घेऊन अगोदरच टेकडीवरील दर्ग्याशी पहिल्या येणा-याे पोरांचे स्वागत करण्यास तयार असायचे. पहिल्या काही मुलांना ओंजळीने आणि मागून येणा-याा पोरांना मुठीमुठीने साखरफुटाणे दिले जायचे. नंदुरबार गावाची प्रथाही तीच होती. दर्ग्याच्या दरसाल होणा-या जत्रेला जाणा-यांत हिंदूंचा भरणा मोठा असायचा. तर गणपती उत्सवात हजेरी लावण्याला आणि मिरवणुकीसमोर लेझीम खेळण्याला मुस्लिम वस्तादांच्या तालमीतील पठ्ठेही हजर होत असत. गेल्या दोन-तीन दशकांत मात्र त्यांच्या त्यांच्या धर्मनिष्ठा असलेल्या समाजगटांत एकमेकांबद्दल द्वेष, अविश्वास आणि दूरत्व वाढत गेले आहे; परंतु तरीही तेथील धर्मनिष्ठेला कडवेपणाचा, तिरस्काराचा गडद रंग नाही.
शिक्षण घेणा-यां ची संख्या वाढू लागल्यावर गुजराती लोकांचे श्रॉफ हायस्कूल आणि ब्राह्मण व सवर्ण जातींचे डी.आर. हायस्कूल, मुस्लिमांसाठी उर्दू अँग्लो हायस्कूल सुरू झाले. आदिवासी पोरांना शिक्षण देण्यासाठी आदिवासी समाज कार्यकर्ते नटावदकर, जनार्दन वळवी यांनीही शाळा व आश्रमशाळा सुरू केल्या. त्यांचे मोठ्या शिक्षणसंस्थांत रूपांतर झालेले आहे. एका शिक्षणसंस्थेचा येथे उल्लेख करणे आवश्यक आहे. अक्कलकुँवा येथे ‘जामिया इस्लामिया ईशातूल उल्म’ या संस्थेने तीस वर्षांपूर्वी धार्मिक शिक्षण देण्यासाठी मदरसा सुरू केला. त्या संस्थेच्या विशाल परिसरात पंधरा हजारांवर तरुण-तरुणी आर्ट्स, सायन्स, आयटीआय, आयटी, युनानी मेडिकल, बीएड, डीएड अशा शिक्षणशाखांतील उच्च पदवीशिक्षण घेत आहेत. सर्वांना होस्टेल्सची उत्तम सोय आहे. शिक्षणाचे मिडियम उर्दू आणि मराठी आहे. संस्थेत मुस्लिम समाजातील विद्यार्थी जास्त असले तरी आदिवासी व इतर समाजगटांचे विद्यार्थी-विद्यार्थीही तेथे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी पोळ्या करण्याचे यंत्र संस्थेने आणले आहे. अगदी अल्प काळात ते यंत्र पंचवीस हजार पोळ्या तयार करते. त्यावरून संस्थेच्या पसा-याची कल्पना येईल.
इतिहासपूर्वकालीन आदिवासी माणसांचे अस्तित्व या प्रदेशात होते असे दाखवणारे पुरावे प्रकाशा येथे उत्खननात सापडले आहेत. आदिवासी ते राजस्थानकडून आल्याचे सांगतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत भाट समाजाची माणसे त्या भागात राजस्थानातून दरसाल येत असत. आदिवासींचे पूर्वज त्या भागात कसे आले याबद्दल ते कथा सांगत. एका मोठ्या परातीत पाणी टाकून, त्यात धातूची तार ताणून तयार केलेल्या वाद्याला उभे करून त्याच्या घूं घूं ध्वनीच्या तालात भाट आदिवासींच्या पूर्वजांच्या कहाण्या सुरामध्ये गाऊन सांगत. भिल आदिवासींना पूज्य असलेल्या देवी मोगरा मातेचे स्थान गुजरातच्या सीमेवर आहे. देवीच्या दरसाल चैत्रात भरणा-या यात्रेला हजारो आदिवासी, बिगरआदिवासी कुटुंबे जातात. दोन-दोन दिवस लाइन लावून दर्शन घेतात. यात्रा अमावस्येला असल्याने पूर्वी मंदिराभोवतालच्या टेकड्यांमध्ये असंख्य चुली पेटत असत, तेव्हा भोवतालच्या जंगलावर असंख्य काजवे चमचमत असल्याचा भास होत असे. ब्रिटिश काळात आदिवासी राजा असलेल्या काठी गावाची होळी लोकांना आकर्षित करते. पूर्वापार चालत आलेली त्यांची वेषभूषा करून आलेले स्त्री-पुरुष विविध रंगांची बहार आणतात. भोंग-यार बाजार हे त्या भागाचे वैशिष्ट्य आहे. आदिवासी कुटुंबे यात्रांना बैलगाड्यांनी येऊन दोन-दोन दिवस मुक्काम करत. एकमेकांवर फिदा झालेल्या जोड्या यात्रेचा लाभ घेऊन पळून जात. कोणा तरी ओळखीच्या वा नातेवाइकांच्या घरात लपून राहत. पुरेसा अवधी सोबत काढून अशी जोडी घराकडे आली की दोन्हीकडचे नातेवाईक पंचमंडळींच्या साक्षीने, आपसात भांडण्याची हौस पुरी झाल्यावर दोघांचे लग्न लावून देत असत. त्या प्रथेला ‘झगडा मोडणं’ असे म्हटले जाई. आदिवासींच्या लग्नात आमंत्रणे देण्याची पद्धत नव्हती. ढोल वाजू लागला, की कोणीही यावे, नाचात सामील व्हावे, लग्नघर सधन असेल तर मध्येच बाजूला जाऊन पानाच्या द्रोणातून दोन घोट मोहाची होरो पोटात रिचवावी, परत नाचात सामील व्हावे.
आदिवासी ज्याला दिवाळी म्हणतात ते गावाच्या सोयीने होणारे, पंचांच्या निर्णयाने होणारे सामूहिक हॅपनिंग असते. ज्या गावात बहुसंख्य आदिवासी वस्ती आहे अशा गावात तो दिवस सामुहिक रीत्या साजरा केला जातो. त्या दिवशी बकरे कापून गावातील कुटुंबांना वाटे दिले जातात. गावात दिवाळी आहे असे समजल्यावर आठवडी बाजारात दुकाने मांडणारे विक्रेते गावात हजर होतात. गावात यात्राच भरते! जुगारवाली मंडळी अड्डे आडोशाला जमवतात. संध्याकाळी आदिवासी सोंगाड्या पार्टी येते आणि धेडगुजरी भाषेत करमणुकीचा कार्यक्रम सुरू होतो. स्त्री पार्ट कोवळे, मिसरूड न फुटलेले पोरगेच करते. आदिवासींत रोडाल्या नावाचा नाचत नाचत प्रेमगीते गाण्याचा किंवा गात गात नाचण्याचा प्रकार आहे. दोन सोंगाडे (स्त्री व पुरुष) एकमेकांसमोर, मधे काही अंतर सोडून उभे राहतात आणि आळीपाळीने प्रेमगीताचे एकेक कडवे म्हणतात. ध्रृवपदाला दोघे जवळ येऊन अत्यंत गतीने नाचतात. गावदिवाळीत केल्या जाणा-या सोंगाड्या पार्टीच्या कलापथकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांमध्ये पुढे बसण्याचा मान स्त्रियांना दिला जातो. पुरुष मंडळी मागच्या बाजूला बसतात. उत्तररात्रीनंतर, स्त्रिया-मुले निघून गेल्यानंतर पुरुष जरा जास्त रसिक होतात. संवादांत आणि गाण्यांत चावटपणाचे प्रमाण वाढते. परंतु सर्वसाधारणपणे, गावदिवाळीचा तो कार्यक्रम लहानमोठ्या स्त्री-पुरुषांनी एकत्रितपणे सर्व दिवस मजा घेण्याचा असतो.
दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेली आणखी एक यात्रा म्हणजे सारंगखेड्याची दत्तात्रयाची यात्रा. त्या यात्रेला गुजरात, राजस्थान, पंजाब अशा वेगवेगळ्या प्रदेशांतून उत्तमोत्तम घोडे विकण्यास येतात. लाखाच्या वर किंमत देऊन घोडे विकत घेणारी गि-हाइकेही तेथे येतात. यात्रा दोन आठवडे चालते. मुंबई-पुण्याकडील लोकांचेही ते आकर्षण होत आहे. तापीच्या काठाचे श्रीप्रकाशा तीर्थस्थान हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. गुजरातच्या सीमेवरील उकाई धरणाचे बॅकवॉटर कवेत घेतलेल्या गुजरातची सीमा प्रकाशापासून दोन-तीन किलोमीटरवर पोचली आहे. नाशिकला जाणे जमले नाही तर त्या भागातील हिंदू मंडळी अस्थिविसर्जन करण्याला प्रकाशाला येतात.
आदिवासींच्या परंपरेत मात्र त्या स्थानाला विशेष महत्त्व नाही. आदिवासींच्या दृष्टीने मोगरामातेनंतर दुसरे पवित्र स्थान म्हणजे अस्तंभ्याचा डोंगर- ते सातपुड्यातील उंच शिखर. महाभारतातील चिरंजीवपद प्राप्त झालेला अश्वत्थामा त्या डोंगराच्या आसपास भटकत असतो आणि त्या दुर्गम अशा गडावर यात्रेसाठी आलेल्या, रस्ता चुकलेल्या वा भलत्याच वाटेला गेलेल्या यात्रेकरूंना तो सुरक्षित रस्ता दाखवतो, अशा आख्यायिका सांगितल्या जातात. वणीच्या देवीला तेथून चालत जाणा-यांची संख्याही गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे.
लग्नाच्या वेळी लाऊडस्पीकर लावून सभोवताल दणाणून सोडण्याची आधुनिक पद्धत तेथेही पोचली आहे. लग्नाची घटिका मारुतीचे दर्शन घेऊन परतणारी नाचणारी पोरेपोरी ठरवतात. लग्नसमारंभात नाचणे हा अटळ असा कार्यक्रम असतो. त्यात स्थानिक वैशिष्ट्य आहे. हिंदी, गुजराथी वा मराठी पॉप्युलर गाणी स्पीकरवर लावली जातात, पण कॅसेट्सचा वा सीडीचा वापर करून नाही. बहुधा कोणातरी व्यावसायिक व सुमार आवाजाच्या स्थानिक गायकाला त्याच्या वाद्यवृंदासह कार्यक्रमाला आणले जाते. गायक पॉप्युलर हिंदी व गरब्याची गुजराथी गाणी म्हणतात. गाण्यामध्ये स्त्रीच्या आवाजातील ओळी गाण्यासाठी गायिका नसते. कोवळ्या आवाजाचा मर्दच बाईच्या आवाजात तशी गाणी म्हणतो. स्पीकर सिस्टिमवर सीडी लावण्यापेक्षा हा प्रकार महागडा आहे. पण एकूणच, लोक अजून लाइव्ह प्रोग्रॅम ऐकण्याला प्रेफरन्स देतात! लग्नाची गाणी परंपरागत चालत आलेली असतात हे खरे, परंतु ती गाणी पाठ केलेली नसतात आणि उत्स्फूर्त काव्यरचनाही नसते. असे म्हणता येईल, की परंपरेने चालत आलेल्या गाण्याच्या टेम्प्लेट्स असतात. लहान मुलांना रंगवण्याकरता पुस्तके असतात, त्यांतील रेखाचित्रांप्रमाणे गाण्यांचे ढाचे तयार असतात. गाणारी बाई त्यात वर्तमान वास्तवाचे रंग भरत जाते. मग ओळखीच्या, नात्यातील व्यक्तींना टोमणे मारणे, जुन्या घडलेल्या घटनांच्या आधारे टिंगल-टवाळी करणे असे तपशील त्यात भरले जातात. मैफल रात्रीच्या निवांत वेळी तासन् तास चालू राहते. आदिवासींमध्ये तर स्त्रियांना सामुहिक रीत्या गाणी म्हणण्याची उपजत आवड असते. चार बाया एकत्र आल्या, की त्यांचे दोन गट तयार होतात. प्रौढ बायांपैकी कोणी तरी गाणे म्हणण्याला सुरुवात करते. एका गटाने एक ओळ गायली की दुस-या गटाने तीच ओळ परत गायची. जोपर्यंत ती बाई गाण्याची पुढची लड सोडत नाही तोपर्यंत दोन्ही गटांत गायलेल्या ओळींचे आवर्तन सुरू राहते. एकच ओळ घोटून घोटून म्हटल्यामुळे लहान व तरुण वयांतील मुलींना ती गाणी आपोआप पाठ होतात.
आदिवासींच्या नाचात वापरले जाणारे ढोल वजनदार आणि मोठ्या आकाराचे असतात. ते ओझे गळ्यात घेऊन, एक चाळ वाजवत ढोलवाला सतत पावले टाकत असतो. ढोलाचा आवाज आला, की पोरेपोरी हळुहळू भोवती जमा होतात. पोरे, गडीमाणसे आधी नाचू लागतात, मग तारुण्याच्या सीमेवर असलेल्या मुली हळूच एकमेकांच्या पंजांत पंजे अडकावतात, खांद्याला खांदा भिडवून पावले टाकू लागतात. मग प्रौढ स्त्रियाही पुढे होतात. ढोलवाला, बासरीवाला, झांजवाला हा वाद्यवृंद मध्ये आणि भोवती पुढेमागे व रिंगणात गोलाकारात सरकणारे पोरापोरींचे लहान लहान गट. नवरात्रीचे नऊ दिवस गल्लोगल्लीत गरबा नाचणा-यांचा उत्साह दृश्य व श्रवणीय रूपांत जाणवतो. पुण्यामुंबईसारखे नाचांना धंदेवाईक रूप अजून तरी आलेले नाही, पण त्या बाबतीतही गुजरातचे अनुकरण होणार यात शंकेला जागा नाही. गरब्याप्रमाणे संक्रातीला पतंग उडवण्याचे वेड गुजरातमधून तेथे पोचलेलेच आहे.
जिल्ह्यातील लोकांच्या रोजच्या जेवणात मुख्य पदार्थ म्हणजे ज्वारीची भाकर आणि भरपूर शेंगदाणा वापरलेली चटणी. चटणी बनवण्याच्या पद्धतीत भरपूर तेल आणि मुबलक तिखट यांचा वापर. मात्र जात कोठलीही असो, पाहुणे-रावळे आले की खिचडी पाहिजेच. सोबत पापड, कुरडया, सांडगे यांसारखे तळणाचे पदार्थही असायला हवेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला गल्लोगल्लीत उन्हात खाटली तिरकी ठेवून त्यावर शेवया बनवणा-या स्त्रिया नजरेत येतात. सणासुदीला पुरणपोळ्या, मांडे असणारच. मुस्लिमांमध्येही मटणाच्या रश्शाबरोबर मांडे खाण्याची पद्धत आहे. गुजरात जवळ असल्यामुळे आणि स्थानिक पातळीवर तूर, मूग, हरभरा यांचे उत्पादन असल्याने स्वयंपाकात बेसनाचा उपयोग भरपूर प्रमाणात केला जातो. तेथील हॉटेलांत सकाळच्या नाश्त्याला लोक शेव-खमणी (खमण ढोकळा) खातात. त्याशिवाय तेथील खास पदार्थ म्हणजे भजीपात्रा. पात्रा म्हणजे अळूची पाने वा अळूच्या वड्या. मात्र खानदेशातील अळूच्या वड्या कडक तळलेल्या असतात, त्यामुळे त्या भरपूर टिकतात. सामिष खाणारे लोक बकरे वा बोकड खाण्याऐवजी कोंबडी खाणे पसंत करतात. लोकांनी कोंबड्या खाणे चिकनगुनियाच्या भीतीमुळे काही महिने बंद केले होते, पण नंतर परत सर्व व्यवस्थित सुरू झाले.
आदिवासींच्या सणासुदींत मोहाच्या दारूला खास महत्त्व असते. तशी दारू खास भट्टी लावून नवसागर वा किक आणणारी इतर केमिकल्स न वापरता बनवून घेतली जाते. एकूणच, तेथील लोकांमध्ये, आदिवासींच्या सहवासामुळे म्हणा हवे तर, पिण्याचा शौक जास्त दिसतो. कदाचित प्रमाण जास्त नसेल; पण निदान दारू पिणे हे फारसे निषेधार्ह मानले जात नाही.
आदिवासींमध्ये पुरुषांचे वेष खास वेगळे नाहीत, मात्र पुरुषांनी दागिने घालणे हे समाजमान्य आहे. भिल समाजातील स्त्रिया साडीचे दोन तुकडे करून कमरेच्या खाली एक आणि वर डोके व छाती झाकण्याकरता एक अशी वेगवेगळ्या रंगांची वस्त्रे वापरतात. पावरा स्त्रियांच्या पायांत, कानांत, गळ्यात वापरले जाणारे दागिने बहुधा चांदीचे असतात. बाकी ठाण्यातील वारली जमातीतील स्त्रियांना केसांची खास निगा राखून फुले माळण्याची हौस दिसते, तशी भिलांमध्ये नाही. खेड्यावर राहणा-या आदिवासीच्या घरामागे वाडी (किचन गार्डन) सर्रास पाहण्यास मिळते. तेथे मका, लिंबू यांसारखी झुडपे आणि वेगवेगळ्या शेंगांचे वेल लावले जातात, परंतु फुलांची झाडे क्वचित दिसतात. ठाण्यातील आदिवासी त्यांच्या घराच्या भिंती चित्रे काढून सुशोभित करतात, तीही परंपरा नंदुरबारात आढळत नाही. आदिवासींत स्त्री-पुरुषांतील नाते सवर्ण जातीतील नात्यापेक्षा अधिक समान आहे. गुजर समाजातही कुटुंबात स्त्रीला खास अधिकार परंपरेने दिले आहेत. शेतातील धान्य एकदा खळ्यातून घरी आले, की त्याची कशी विल्हेवाट लावायची यावर घरातील प्रमुख स्त्रीचा अधिकार असतो. घरातील प्रमुख स्त्री तिच्या लग्न झालेल्या मुलीकडे तिच्या मुलांपेक्षा जास्त झुकते माप देते, अशी तक्रार गुजर पुरुषमंडळींकडून ऐकू येते. मात्र तेथे गोचीदार परंपराही आहे. सासूनंतर घरातील मोठी सून तिच्या धाकट्या जावांवर अधिकार गाजवते. त्यामुळे कुटुंबातील धाकट्या भावाला मुलगी मिळणे कठीण होते. पण एकूणच, मध्यम व अठरा-पगड जातींत स्त्रियांना पुरेसे महत्त्व आणि अधिकार परंपरेने दिलेले असतात असे दिसते. हे सांस्कृतिक वास्तव व वेगळी जीवनशैली झपाट्याने बदलत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील लोकवस्ती मुख्यत: डोंगरद-यांतील गावपाड्यांत पसरलेली आहे. लोकवस्तीच्या केवळ अठरा-एकोणीस टक्के लोक शहरांत राहतात. त्यातही शहरांत राहणा-या आदिवासींचे प्रमाण अगदीच अल्प आहे. मात्र आदिवासींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळा काढण्याचा कार्यक्रम शासन अनेक वर्षांपासून यशस्वीपणे राबवत आहे आणि त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत बदल होत आहे. जिल्ह्यातील शिक्षितांचे प्रमाण आहे लोकसंख्येच्या सेहेचाळीस टक्के. आदिवासींमधील सुशिक्षितांचे प्रमाणही कमी नाही. सुशिक्षित आदिवासी स्तर आदिवासी संस्कृतीपासूनही अलग पडत चालला आहे. इतकेच नव्हे, तर मुलांपेक्षा मुली जास्त प्रमाणात शिक्षण घेत असल्याने पदवीधर आणि नोकरी करणा-याच मुलींना योग्य वर न मिळण्याची समस्या भेडसावू लागली आहे.
नंदुरबार स्वतंत्र जिल्हा घोषित झाल्यापासून नंदुरबार शहर व जिल्हा यांचे रूप बदलत आहे. सिव्हिल हॉस्पिटल, कलेक्टर ऑफिस, तहसिलदार ऑफिस, पोलिस कार्यालय यांच्या नवनव्या इमारती तेथे उभ्या राहिल्या आहेत. नंदुरबारमध्ये नवे शानदार नाट्यगृहही उभे राहिले आहे. रस्ते रुंदावले आहेत; चौकांत पुतळे उभे करून सुशोभित केले गेले आहेत. एकीकडे असे भौतिक बदल होत असताना वाढत्या लोकसंख्येमुळे, आधुनिक जीवनप्रणालीच्या प्रसारामुळे निर्माण होत असलेल्या वाढत्या गरजा पु-या करण्यासाठी नोक-यांच्या अभावामुळे स्पर्धा व ताणतणाव निर्माण होऊ लागले आहेत. गावागावांत पोचलेल्या टीव्ही-व्हिडिओमुळे तरुण-तरुणींच्या भोवतालचे वास्तव बदललेले नाही, मात्र त्यांची स्वप्ने शहरी व सधन वर्गाची झाली आहेत; वाढत्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा आणि स्पर्धा यांच्या दबावामुळे वाढते नैराश्य आणि आत्महत्यांचे वाढते प्रमाण ही भयावह समस्या समाजाला भेडसावू लागली आहे. तेथील आदिवासी मात्र यापासून दूर आहेत. त्याचे कारण त्यांची अल्पसंतुष्टता असावी.
आदिवासींच्या अल्पसंतुष्टतेतून ते आळशी असल्याचा सर्वमान्य भ्रम पसरला. त्यामुळेच 'घरात दाणा तर भील उताणा' अशा म्हणी अस्तित्वात आल्या. नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुके आणि धुळे जिल्ह्यातील दोन तालुके धरून लोकसभेचा मतदारसंघ होतो. विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. ते सर्व मतदारसंघ आदिवासींकरता राखीव आहेत. महाराष्ट्रातील एकूण आदिवासींचे नेतृत्व करणे तर वगळाच, पण त्या जिल्ह्यातील भिल, पावरा, कोकणी इत्यादी आदिवासींचे नेतृत्व करणारा कर्तबगार आदिवासी नेता लोकप्रतिनिधी झालेला नाही. वस्तुत: आदिवासी समाजात गावपातळीवर असलेल्या पंच पद्धतीतून लोकशाहीची बीजे रुजलेली आहेत; मात्र आदिवासीबाहुल्य असूनही पंचमंडळीशी नाते राखून त्यांचे स्वत:चे नेतृत्व टिकवण्याचे कसब आदिवासी नेत्यांनी अवगत केलेले नाही. जिल्ह्यातील आदिवासी नेते कोणा बिगरआदिवासी नेत्याचे बोट धरून चालणे पसंत करतात, असा गेल्या पाच-सहा दशकांचा दाखला आहे. गेल्या पाच-दहा वर्षांत ही परिस्थिती बदलत आहे.
सातपुड्यात सागाचे लाकूड प्रचंड प्रमाणात उपलब्ध होत होते. आंबा, मोह, चिंच, चारोळी यासारख्या वृक्षांच्या कंदमुळांपासून आदिवासींची अन्नाची गरज पूर्ण होत होतीच, पण शरीरास आवश्यक सर्व प्रकारची व्हिटॅमिन्स मिळत असत. सध्या पहाडपट्टीत कुपोषित बालकांची समस्या भयावह रूपात सतावत आहे. आदिवासी समाजात शारीरिक व मानसिक रोगांवर उपचार करणारे भगत व वैदू असतात. वैदूंना जंगलातील वनस्पतींचा वडिलोपार्जित ज्ञानसाठा उपलब्ध आहे. ज्यांनी जगण्याचे साधन म्हणून वनखात्याची नोकरी पत्करली आहे अशा सरकारी कर्मचा-यांनी स्थानिक वनस्पती व पशुपक्षी यांचे परंपरागत ज्ञान असलेल्या स्थानिक लोकांचे सहकार्य घेतले, तर स्थानिक जनसमूह श्रीमंतीचे नाही पण सुखी सुरक्षित जीवन जगू शकतील. आदिवासी कुटुंबांना खासगी मालकीने जंगल राखण्याच्या अटीवर जंगल उत्पादने घेण्याची परवानगी दिली तर वनविकास होणे अवघड नाही. परंतु जंगलविकास करण्यात वनखात्यांच्या कर्मचा-यांना रस नसतो.
शहादा तालुक्यात नुकतीच अशी घटना झाली. डोंगर-टेकड्यांवर जंगलतोड झाली तरी ती झाडे मुळातून नष्ट होत नाहीत. त्यामुळे एक-दोन वर्षें त्या जंगलजमिनींना संरक्षण दिले, की जंगल नव्याने वाढू लागते. दरा विरपूर या गावातील रहिवाशांनी अशाच प्रकारे जंगल राखले होते, गेल्या सहा वर्षांपासून. तेथून कित्येक मैल दूर असलेल्या धडगाव भागातील पावरा आदिवासींनी राखलेल्या त्या जंगलाची तोड मोठ्या प्रमाणात केली. माहीतगार असे सांगतात, की यामागे वनकर्मचा-यांचीच प्रेरणा होती. पूर्वी आदिवासी गावांत एकोपा होता; निवडणुकीतील स्पर्धेच्या राजकारणाने, गटबाजीने, धर्मपंथद्वेषाने गावाचे वातावरण दूषित झाले नव्हते. आता मात्र असे घडते. आदिवासी गावांमधला एकोपा कमी होतोय. हितसंबंधी लोक त्याचा फायदा घेत आहेत. परंतु एक आहे, निसर्गाबद्दल आपलेपणा अजूनही आदिवासी स्त्रीपुरुषांत टिकून आहे. वनखात्याच्या मालकीत असलेली सर्व जमीन आदिवासींना केवळ वर्षात एक पावसाळी पीक काढण्यासाठी नाही, तर मोह, चारोळी, चिंच, हिरडा यासारखे मोठे वृक्ष, औषधी गुण असलेली झुडपं आणि पावसाळी एकपिकी शेती अशा प्रकारची मिश्र शेती करण्यासाठी दिली गेली तर सातपुडा काही वर्षांतच हिरवागार दिसू लागेल.
आदिवासींनी त्यांची आदिम संस्कृती टिकवून ठेवावी असे काही जणांना मनापासून वाटते. ते केवळ रोमॅन्टिसिझममधून होते असे वाटत नाही. आदिम संस्कृती विकसित झाली माणसामाणसांतील परस्परावलंबी आणि निसर्गावलंबी सहज संबंधांतून. समुहामध्ये प्रत्येकजण प्रामुख्याने आणि प्राथमिकतेने होता माणूस. तेथे राजा आणि प्रजा, उत्पादक आणि गि-हाईक, मालक आणि मजूर अशा वर्चस्ववादी नात्यांतून आलेले संबंध अस्तित्वातच नव्हते. आदिम संस्कृतीचे आकर्षण आकारते ते माणूस म्हणून. आपण जे हरवले आहे ते त्याच्या धूसर स्मृतीतून. पण संस्कृतीचा संबंध असतो जीवनशैलीशी. जीवनशैली आकारते भोवतालाशी घडणा-या जिवंत संबंधातून. आदिवासीचे भोवताल बदलत आहे, जीवनशैली बदलत आहे. मग आदिम संस्कृती टिकून राहणार कशी?
या काळात एवढेच म्हणता येईल, एका स्थानावरून दुस-या स्थानी स्थलांतरित होणारे विस्थापित आणि एका संस्कृतीतून दुस-या संस्कृतीत स्थित्यंतरित होणारे विस्थापित, दोघांचीही पीडा एकाच प्रकारची आहे. ती पीडा केवळ आदिवासी जमाती नव्हे तर भारतीय संस्कृतीच्या परिघावरील सर्वच जाती-जमाती अनुभवत आहेत. नंदुरबार जिल्हा अशा अनेकांतील एक आहे. या दगडाधोंड्यांच्या महाराष्ट्रात सह्याद्री, सातपुडा, विंध्य अशा पर्वतरांगांशी नाते सांगणा-या डोंगरद-यांंतील अनेक क्षेत्रांतील लोकसमूहांचीही हीच पीडा आहे.
- राजू लक्ष्मण ठोकळ
दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १६ नंदुरबार जिल्हातील तळोदा तालुक्यातील जहागीरदार बारगळांची गढी --२
भाग १६
नंदुरबार जिल्हातील तळोदा तालुक्यातील जहागीरदार बारगळांची गढी
सांभार : http://sudhaspari.blogspot.in
सारंगखेडा यात्रा अश्वप्रेमीसाठी एक पर्वणी
ही यात्रा घोडे बाजारासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या समोरच्या परिसरात हा घोडाबाजार भरतो. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रावल यांच्या 20 एकर जागेवर हा घोडे बाजार भरला जातो. कृषी बाजार समिती व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यात्रोत्सवासाठी झटतात. घोड्यांच्या देखरेखीसाठी जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाचे कर्मचारी उपस्थित असतात. देशभरातून जवळपास 2000 ते 3000 घोडे विक्रीसाठी दरवर्षी यात्रेत विक्रीसाठी येतात. साधारणत: 40 हजारपासून घोडे खरेदीला बोली लावली जाते. अनेक अश्वप्रेमी ह्या घोडे बाजारासाठी बोली लावतात. आतापर्यंत 75 लाख रूपयांपर्यंत एका घोड्याची बोली लागली गेली आहे. यावरुन या यात्रेत होणारी उलाढाल व अश्वप्रेमीच्या आवडीची प्रचिती नक्कीच येते.
सारंगखेड यात्रेतील घोड्यांमध्ये देवमान, कंठळ, जयमंगल, शामकर्ण, काळा, पाच कल्याणी हे गुणवान घोडे सर्वात मोठ्या प्रमाणावर अश्वप्रेमी खरेदी करतात. तर घोड्याच्या नाकावर पांढरे चट्टे, दोन भवरी असलेले, पोटाखाली भवरा असलेले, गळ्यावर भोवरा असलेले घोडे अश्वप्रेमी नाकारतात. या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान या भागातून घोडे विक्रीसाठी येतात. पंधरा दिवसाच्या या यात्रोत्सवात करोडो रूपयांची उलाढाल होते.
यात्रोत्सवाच्या निमित्ताने भरलेल्या घोडे बाजारात घेाडे खरेदीसाठी व आनंद लुटण्यासाठी अनेक सिने कलावंतही सहभागी होतात. अनेक राजकीय पक्षांचे नेतेही हजेरी लावतात. संपूर्ण भारतात घोडे बाजारासाठी या यात्रेची ओळख निर्माण झाली आहे.
- निलेश परदेशी, चाळीसगाव
अस्थबा, नंदुरबार
अष्टमबा हे नंदुरबार क्षेत्राचे धार्मिक स्थळ आहे आणि ते अक्रानी
तहसीलमध्ये स्थित आहे. येथे अष्टभैया उत्सव दक्षिण गुजरात आणि उत्तर-पश्चिम
महाराष्ट्र येथील आदिवासींचे सर्वात प्रमुख मेळाचे एक समजले जाते.
दिवाळीच्या उत्सवाच्या दरम्यान, मेळा 10 ते 15 दिवस चालतो.
अष्टमबा हिंदू महाकाव्य महाभारत मधील पौराणिक पात्रांपैकी एक समजला जातो.
आदिवासींच्या मते, त्यांना अश्वस्थमा नावाचे पुरुष चरित्र आणि गुरु
द्रोणाचार्य यांचा मुलगा असे नाव आहे.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल? :
विमानाने
औरंगाबाद आणि सूरत हे सर्वात जवळचे विमानतळ आहेत आणि औरंगाबाद हे, राज्य परिवहन आणि खाजगी बसने अस्तम्बापर्यंत पोहोचण्यासाठी टॅक्सी सहज उपलब्ध आहेत. औरंगाबाद देशाच्या बहुतेक प्रमुख शहरांना जोडलेले आहे.
रेल्वेने
अस्तम्बा या धार्मिक स्थळाजवळ चे रेल्वे स्थानक हे नंदुरबार रेल्वे स्थानक हे जवळपास 71 KM आहे.
रस्त्याने
अस्तम्बा हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्रानी तहसील अंतर्गत येते. येथून जवळ असलेले नंदुरबार शहराचे अंतर साधारण 71 KM येते तर अक्रानी चे अंतर 35 km आहे
उनपदेव, गरमपाण्याचा झरा
उनपदेव हे गरम पाण्याचे झरे अडावाद या गावपासुन 6 KM अंतरावर शहादा तालुक्यात ,नंदुरबार जिल्हा, महाराष्ट्रात स्थित आहे. या मंदिराचा प्रमुख झरा हा गरम पाण्याचा झरा आहे. गोड पाणी वर्षभर वाहणारे गाईच्या तोंडून वाहते असे दिसत आहे, येथे जवळचे रेल्वे स्थानक हे नंदुरबार आणि दोंडाईचा हे आहेत
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल? :
विमानाने
उनपदेवपर्यंत पोहोचण्यासाठी औरंगाबाद आणि सूरत हे जवळचे विमानतळ आहेत.
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्थानक हे नंदुरबार आणि दोंडाईचा हे आहेत.
रस्त्याने
उनपदेव शहाद्यापासून २५किमी आहे. तेथे जाण्यासाठी बस उपलब्ध आहे
तोरणमाळ (महाराष्ट्रातील क्र.२ थंड हवेचे चे निसर्गरम्य ठिकाण)
एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण, यशवंत तलाव, सीता-खायी दरी, अतिशय हिरवेगार नैसर्गिक सोंदर्य, डोंगर, दऱ्या-खोऱ्या, धबधबे अशे अनेक वसुंधरेचे नटलेले तोरणमाळ.
छायाचित्र दालन
सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेले तोरणमाळ हे एक निसर्गरम्य ठिकाण. नंदुरबार जिल्ह्यातील हे ठिकाण महाराष्ट्रातील दोन नंबरचे व खान्देशातील सर्वात उंचावरचे थंड हवेचे ठिकाण आहे. याची उंची संद्रसपाटीपासून सरासरी ३३३६ फूट इतकी आहे. याच्या जवळपास मोठी शहरे नसल्याने पर्यटक कमी असतात व त्यामुळेच इथले निसर्ग सौंदर्य अजूनही टिकून आहे.
सकाळी सातला चोपड्याहून (जळगांव) निघालो. साधारण ६०किमीवर शिरपूर नाक्याला नाश्त्यासाठी थांबलो. जास्त वेळ घालवायचा नव्हता म्हणून पटकन मिळणारे पदार्थाच मागवायचे ठरले.
गरमागरम रस्सा वडा किंवा गिला वडा , भजी , कचोरी .

येथून पुढे दीड तासावर शहादा (५४ किमी) व तेथून ५०किमी (दीड तास) तोरणमाळ. धुळ्याकडून येणाऱ्या प्रवाशांनाही शहाद्याहुनच पुढे जावे लागते. तोरणमाळच्या आधी साधारण चार किमीवर नागमोडी वळणांचा खूप सुंदर घाट सुरु होतो. दुतर्फा सागवान वृक्ष व बांबूचे वन दिसते. घाटाला सात नागमोडी वळणे आहेत यावरून याचे नाव सातपायरी घाट असे पडले आहे. सर्वात वरची पायरी चढून आलो की सातपायरी पॉइंटहून आपल्याला सगळ्या पायऱ्या दिसतात. वाढलेल्या वनराईमुळे मला मात्र चारच पायऱ्या नजरेस पडल्या .
तोरणमाळला अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच हॉटेल्स आहेत. त्यातही दोन तीनच चांगली. येथे MTDC चे एक अतिशय मोक्याच्या जागेवर एक रिसॉर्ट होते पण काही वादामुळे ते बंद पडले आहे. सुदैवाने एका चांगल्या हॉटलमध्ये संपूर्ण ग्रुपसाठी रूम मिळाल्या. ताजेतवाने होऊन तोरणमाळचे पॉंईंट बघायला बाहेर पडलो.
बंद पडलेल्या MTDC च्या जागेततून दिसणारा परिसर व तलाव. याच परिसरात काही शिल्पही नजरेस पडतात.


'यशवंत' तलाव
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांनी सन १९६९ मध्ये तोरणमाळला भेट दिली होती. त्यांच्या नावावरून या तलावास यशवंत तलाव असे नाव पडले. पूर्वीचे या तलावाचे नाव मात्र अज्ञात आहे. या तलावास पायी अथवा गाडीने संपूर्ण फेरी मारता येते.
या तलावात बोटिंगचीही सुविधा आहे पण सध्या मात्र बोटिंग बंद आहे. तलावाजवळच गुरु गोरक्षनाथांचे मंदिर आहे.



सीता खाई पॉईंट : येथून घनदाट झाडीने भरलेली व उंच खडकांमधील खोल दरी दिसते. येथील पठाराहून दरीत कोसळणारा एक सुंदर धबधबाही नजरेस पडतो. येथे लगताच इको पॉईंट, सनसेट पॉईंट , खडकी पॉईंट आहेत




वळणा वळणाचे रस्ते


झुक झुक गाडी. खूप दिवसांनी घराबाहेर पडलेल्या मुलांनी सहलीचा पुरेपूर आनंद लुटला.

परिसरात अनेक औषधी गुण असलेल्या वनस्पती आहेत.
जडीबुटी विकणारा एक वैदू.

वाटेतील एक शिव मंदिर व शिल्प


संपूर्ण एकच असलेला वटवृक्ष

येथील आणखी एक प्रसिद्ध तलाव म्हणजे "कमळ तलाव किंवा लोटस तलाव"
नावाप्रमाणेच असंख्य कमळ फुललेली पहिली.



एका कड्यावरून दिसणारे सातपुडा पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य

मच्छिन्द्रनाथ गुहा. या ठिकाणी थोडेसे अंतर चालल्यावर पायऱ्या उतरून आपल्याला गुहेपर्यंत पोहचता येते.




तोरणमाळचे क्षेत्रफळ खूपच कमी म्हणजे ४१ चौ.किमी आहे तसेच जवळपास सगळ्या पॉईंट पर्यंत गाडी जाते. यामुळे ३-४ तासात बहुतेक सर्व ठिकाणे पाहून होतात. आम्ही पहिल्या दिवशी पाहिलेली काही ठिकाणे दुसऱ्या दिवशी पहाटेच परत एकदा पहिली. अतिशय थंड वातावरणात धुक्याच्या चादरीत लपेटलेले तोरणमाळ बघताना एक वेगळाच अनुभव मिळतो.
समुद्रसपाटीपासून गावाची उंची २०१ मीटर तर हिल स्टेशनची ११५०मीटर आहे.
पालला शाळेत असतांना गेले आहे. आता परत केव्हा जाणे होईल तेव्हा निश्चितच फोटो देईन.

परतीच्या प्रवासात शहाद्याजवळील सारंगखेडा येथील दत्त मंदिर पहिले. हे एकमुखी दत्त मंदिर आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला सारंगखेडा येथे मोठी यात्रा भरते. यात्रेला ४०० वर्ष जुनी परंपरा आहे. यात्रेनिमित्त येथे भरणारा घोडेबाजार खूपच प्रसिद्ध आहे. करोनाकाळात मंदिर सध्या बंदच आहे. मंदिराच्या आत गाभाऱ्यात नवीन घुमट बसविण्याचे काम सुरु होते. कामानिमित्त देवांच्या मूर्ती बाजूच्या घरात हलविल्या आहेत. दर्शन घेतले व परतीचा प्रवास सुरु केला.




सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेले तोरणमाळ हे एक निसर्गरम्य ठिकाण. नंदुरबार जिल्ह्यातील हे ठिकाण महाराष्ट्रातील दोन नंबरचे व खान्देशातील सर्वात उंचावरचे थंड हवेचे ठिकाण आहे. याची उंची संद्रसपाटीपासून सरासरी ३३३६ फूट इतकी आहे. याच्या जवळपास मोठी शहरे नसल्याने पर्यटक कमी असतात व त्यामुळेच इथले निसर्ग सौंदर्य अजूनही टिकून आहे.
सकाळी सातला चोपड्याहून (जळगांव) निघालो. साधारण ६०किमीवर शिरपूर नाक्याला नाश्त्यासाठी थांबलो. जास्त वेळ घालवायचा नव्हता म्हणून पटकन मिळणारे पदार्थाच मागवायचे ठरले.
गरमागरम रस्सा वडा किंवा गिला वडा , भजी , कचोरी .
येथून पुढे दीड तासावर शहादा (५४ किमी) व तेथून ५०किमी (दीड तास) तोरणमाळ. धुळ्याकडून येणाऱ्या प्रवाशांनाही शहाद्याहुनच पुढे जावे लागते. तोरणमाळच्या आधी साधारण चार किमीवर नागमोडी वळणांचा खूप सुंदर घाट सुरु होतो. दुतर्फा सागवान वृक्ष व बांबूचे वन दिसते. घाटाला सात नागमोडी वळणे आहेत यावरून याचे नाव सातपायरी घाट असे पडले आहे. सर्वात वरची पायरी चढून आलो की सातपायरी पॉइंटहून आपल्याला सगळ्या पायऱ्या दिसतात. वाढलेल्या वनराईमुळे मला मात्र चारच पायऱ्या नजरेस पडल्या .
तोरणमाळला अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच हॉटेल्स आहेत. त्यातही दोन तीनच चांगली. येथे MTDC चे एक अतिशय मोक्याच्या जागेवर एक रिसॉर्ट होते पण काही वादामुळे ते बंद पडले आहे. सुदैवाने एका चांगल्या हॉटलमध्ये संपूर्ण ग्रुपसाठी रूम मिळाल्या. ताजेतवाने होऊन तोरणमाळचे पॉंईंट बघायला बाहेर पडलो.
बंद पडलेल्या MTDC च्या जागेततून दिसणारा परिसर व तलाव. याच परिसरात काही शिल्पही नजरेस पडतात.
'यशवंत' तलाव
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांनी सन १९६९ मध्ये तोरणमाळला भेट दिली होती. त्यांच्या नावावरून या तलावास यशवंत तलाव असे नाव पडले. पूर्वीचे या तलावाचे नाव मात्र अज्ञात आहे. या तलावास पायी अथवा गाडीने संपूर्ण फेरी मारता येते.
या तलावात बोटिंगचीही सुविधा आहे पण सध्या मात्र बोटिंग बंद आहे. तलावाजवळच गुरु गोरक्षनाथांचे मंदिर आहे.
सीता खाई पॉईंट : येथून घनदाट झाडीने भरलेली व उंच खडकांमधील खोल दरी दिसते. येथील पठाराहून दरीत कोसळणारा एक सुंदर धबधबाही नजरेस पडतो. येथे लगताच इको पॉईंट, सनसेट पॉईंट , खडकी पॉईंट आहेत
वळणा वळणाचे रस्ते
झुक झुक गाडी. खूप दिवसांनी घराबाहेर पडलेल्या मुलांनी सहलीचा पुरेपूर आनंद लुटला.
परिसरात अनेक औषधी गुण असलेल्या वनस्पती आहेत.
जडीबुटी विकणारा एक वैदू.
वाटेतील एक शिव मंदिर व शिल्प
संपूर्ण एकच असलेला वटवृक्ष
येथील आणखी एक प्रसिद्ध तलाव म्हणजे "कमळ तलाव किंवा लोटस तलाव"
नावाप्रमाणेच असंख्य कमळ फुललेली पहिली.
एका कड्यावरून दिसणारे सातपुडा पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य
मच्छिन्द्रनाथ गुहा. या ठिकाणी थोडेसे अंतर चालल्यावर पायऱ्या उतरून आपल्याला गुहेपर्यंत पोहचता येते.
तोरणमाळचे क्षेत्रफळ खूपच कमी म्हणजे ४१ चौ.किमी आहे तसेच जवळपास सगळ्या पॉईंट पर्यंत गाडी जाते. यामुळे ३-४ तासात बहुतेक सर्व ठिकाणे पाहून होतात. आम्ही पहिल्या दिवशी पाहिलेली काही ठिकाणे दुसऱ्या दिवशी पहाटेच परत एकदा पहिली. अतिशय थंड वातावरणात धुक्याच्या चादरीत लपेटलेले तोरणमाळ बघताना एक वेगळाच अनुभव मिळतो.
समुद्रसपाटीपासून गावाची उंची २०१ मीटर तर हिल स्टेशनची ११५०मीटर आहे.
पालला शाळेत असतांना गेले आहे. आता परत केव्हा जाणे होईल तेव्हा निश्चितच फोटो देईन.
परतीच्या प्रवासात शहाद्याजवळील सारंगखेडा येथील दत्त मंदिर पहिले. हे एकमुखी दत्त मंदिर आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला सारंगखेडा येथे मोठी यात्रा भरते. यात्रेला ४०० वर्ष जुनी परंपरा आहे. यात्रेनिमित्त येथे भरणारा घोडेबाजार खूपच प्रसिद्ध आहे. करोनाकाळात मंदिर सध्या बंदच आहे. मंदिराच्या आत गाभाऱ्यात नवीन घुमट बसविण्याचे काम सुरु होते. कामानिमित्त देवांच्या मूर्ती बाजूच्या घरात हलविल्या आहेत. दर्शन घेतले व परतीचा प्रवास सुरु केला.
कसे पोहोचाल? :
विमानाने
औरंगाबाद हा सर्वात जवळचा विमानतळ आहे और औरंगाबाद, राज्य वाहतूक आणि खाजगी पर्यटनाची बस आणि टॅरिस तेरमांळपर्यंत पोहोचण्यासाठी सहज उपलब्ध आहेत. औरंगाबाद हे देशातील बहुतेक मोठ्या शहरांकडे चांगल्या प्रकारे जोडलेले आहे.
रेल्वेने
84 किमीच्या अंतरावर नंदुरबार सर्वात जवळचा रेल्वे स्थानक आहे आणि दोंडाईचा हे शहरापासून 75 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई धुळे (90 किमी) आणि चाळीसगाव (145 किमी) च्या प्रवासासाठी पर्यटक चांगले पर्याय आहेत. प्रेरणा एक्स्प्रेस, मालदा टाउन - सुरत साप्ताहिक एक्स्प्रेस, आणि चेन्नई जोधपूर एक्स्प्रेस असे काही रेल्वेगाड्या आहेत जे नंदुरबारमध्ये थांबतील.
रस्त्याने
तोरणमाल शहादा शहरापासून सुमारे 50 कि.मी. अंतरावर आहे जो सुरतपासून 258 किमी आणि नाशिकपासून 295 किमी अंतरावर आहे. धुळे, नंदुरबार आणि शहादा ते तोरणामाळपर्यंतची सरकारी बससेवा सुलभतेने उपलब्ध आहे.
प्रकाशा (दक्षिण काशी)
नंदुरबार जिल्हातील शहादा तालुक्यात तापी नदीचा काठावर वसलेलं प्रकाशा हे एक तीर्थ-क्षेत्र. यालाच आपण दक्षिण काशी म्हणून प्रख्यात आहे. जितके महत्व उत्तर कशी ला आहे, तितकेच महत्व दक्षिण-काशी ला देखील आहे.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल? :
विमानाने
औरंगाबाद आणि सूरत हे सर्वात जवळचे विमानतळ आहेत आणि औरंगाबाद देशाच्या बहुतेक प्रमुख शहरांना जोडलेले आहे.
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्थानक नंदुरबार आहे.
रस्त्याने
प्रकाशा हे शहादा पासून 13 km आणि नंदुरबार पासून 22 km अंतरावर वसलेले धार्मिक स्थळ आहे
संस्कृती आणि वारसा

प्रकाश येथील केदारेश्वर मंदिराचे छायाचित्र, 1880-90 च्या दशकात घेतलेले आहे. प्रकाश हे नंदुरबार जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्रातील लहान शहर आहे. हे दुहेरी-गुम्बज मंदिराचे मुख्य स्थान आहे ज्यात समोर एक गोल टॉवर आहे आणि याचे मुंबई लिस्टमध्ये वर्णन केले आहे. हे छायाचित्र पश्चिम भारताच्या दौर्याच्या भाग म्हणून घेतले गेले आहे. हे छायाचित्र 1880 आणि 1890 मध्ये वेस्टर्न इंडियाचे आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ द वेस्टर्न इंडिया दरम्यान एतिहसिक सम्बंध अंड संदर्भ म्हणून घेतले गेले आहे
नंदुरबार ची शान, बाल क्रांतीकारकांच शहीद स्मारक
1942 मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटीशांविरूद्ध भारत छोडो आंदोलन सुरू केले. शिरीषकुमार नंदुरबारमध्ये सरकारविरुद्ध आंदोलन करीत होते. मंगळ बाजार परिसरात पोलिसांनी बॅरीकेड उभारले होते. जसजशी मिरवणूक गाठली त्याप्रमाणे पोलीसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज लावला. शिरीषकुमारकडे तिरंगा, भारतीय राष्ट्रध्वज होता. त्यांच्या लाठीचा आरोप मिरवणूक थांबवू शकले नाही तेव्हा पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेत शिरीशकुमारची हत्या झाली. त्याचबरोबर धनसुखलाल वणी, घनश्याम दास, शशीधर केतकर आणि लालदास यांचाही याच जागेवर मृत्यू झाला.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल? :
विमानाने
औरंगाबाद हा सर्वात जवळचा विमानतळ आहे और औरंगाबाद, राज्य वाहतूक आणि खाजगी पर्यटनाची बस आणि टॅरिस तेरमांळपर्यंत पोहोचण्यासाठी सहज उपलब्ध आहेत. औरंगाबाद हे देशातील बहुतेक मोठ्या शहरांकडे चांगल्या प्रकारे जोडलेले आहे.
रेल्वेने
पर्यटकांसाठी नंदुरबार हे जवळचे रेल्वे स्थानक आहे.
रस्त्याने
नंदुरबार शहर हे नाशिक आणि सूरत या शहरांना जोडलेले आहे , सूरत पासून 174 km आणि नाशिक पासून 194 km अंतर आहे.
मेथी सिंदखेड धुळे मंदीर
मेथी ता. सिंदखेडा जि.धुळे या गावी मंदीराचा समुह आहे. यातील लक्ष्मी आणि नारायणाची मंदीरे आहेत. हि दोन्ही मंदीरे अनेक अर्थाने अद्वितीय आहेत. हि दोन्ही मंदीरे शेजारी असून १.८२ मीटर उंच जगतीवर उभी आहेत. मंदीरात प्रवेश करण्यासाठी दोन्ही मंदीरावर पायर्या आहेत. नारायण मंदीरासमोर गरुड असलेला मंडप होता हे दाखविण्यापुरते अवशेष शिल्लक आहेत. या मंदीरापैकी लक्ष्मी मंदीर काहीसे लहान असून त्याचा मंडपही जरा वेगळ्या प्रकारचा आहे.
या मंदीराच्या शैलीवरुन हे मंदीर इ.स. १२ व्या शतकात बांधले गेले असावे. धुळे शहरापासुन अवघ्या ४६ किलोमीटर वर मेथी हे गाव वसलेले असुन येथील अतिप्राचीन मंदिरांना अवश्य भेट द्या.
हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव | Discover Maharashtra

हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव –
खानदेशातील पाचोरा तालुक्यात अजिंठा पर्वत रांगेच्या पायथ्याशी वसलेले टुमदार गाव म्हणजे पिंपळगाव हरेश्वर. साधारणत: तीस हजार लोकवस्तीचे हे गाव व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. डोंगर पायथ्याची कसदार जमीन ,बऱ्यापैकी जलसाठा, पोषक वातावरण त्यामुळे फळबागा क्षेत्रात या गावाचा चांगलाच लौकिक आहे .बहुळा आणि डुब्बा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले असल्याने या गावाला विशेष धार्मिक, ऐतिहासिक तसेच पौराणिक महत्त्व पण आहे.(हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव)
पुराणात भस्मासुराची एक कथा सांगितली जाते.ती अशी की, दररोज चितेचे ताजे भस्म मिळावे म्हणून शिवशंकरांनी एका बालकाची नियुक्ती केली होती. एकदा भस्म न मिळाल्याने चितेतले निखारेच तो घेऊन आला .त्याचे हात पोळले. त्याच्या एकनिष्ठ पणावर शंकर प्रसन्न झाले व भस्म शोधण्यासाठी तुझी वणवण होणार नाही म्हणून तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचे भस्म होईल असा त्याला वर दिला. परंतु त्याचा दुरुपयोग करू नकोस असा सल्ला पण दिला.
काही दिवस सर्व व्यवस्थित सुरू असताना त्याच्या मनात अहंकार शिरला. त्याला त्याच्या शक्तीचा गर्व चढला आणि तो वाटेल त्याचे भस्म करू लागला. त्याच्या असुरी शक्ती जागृत झाल्या. तो भस्मासुर म्हणून कुख्यात झाला. त्याने भूतल त्राही त्राही करून सोडले. आपल्या शक्तीने आपण कुणालाही परास्त करू शकतो असा उन्मत्त भाव त्याच्या मनात जागृत झाला.
एके दिवशी तो शंकराच्या च्या पाठीमागे लागला. त्यांनी कैलास सोडला. भस्मासुराची व त्यांची दृष्ट भेट झाली ती पाचोरा येथील पाताळेश्वर परिसरात. शंकर तेथून उत्तरेकडे बहुळाच्या दिशेने निघाले .बहुळेच्या काठी त्यांनी भैरवांना वर दिला. खेड्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांना तिथेच थांबवले. ते स्थान वरखेडी म्हणून प्रसिद्ध झाले. सावखेड्याच्या पुढे गेल्यानंतर ते गुप्त झाले. ती जागा गुप्तेश्वर महादेव म्हणून ओळखली जाते.
येथील मंदिराचे वैशिष्ट्य असे की, येथे शिवपिंड नाही. पाषाणालाच शाळुंखेचा नैसर्गिक आकार असून त्यातून जिवंत पाण्याची धार सतत वाहत असते. पूर्वी ती झऱ्यासारखी वाहत असे. आता थोडाफार ओलावा दिसतो. भस्मासुर शंकराचा पिच्छा पुरवत तिथपर्यंत आला.
शंकर भोजे परिसरात रुद्रेश्वर येथे प्रकट झाले. येथील मंदिरात शंकराची भलीमोठी पिंड आहे. ही पूर्णपणे चिखल गाळात रुतलेली होती. मंदिर भग्न झालेले होते. गावकऱ्यांनी खोदकाम करून ती मोकळी केली व नवीन मंदिर निर्माण केले. या परिसरात प्राचीन शिवमंदिराचे अवशेष सापडतात.( येथील रुद्रेश्वर मंदिराविषयी एक स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.)
भस्मासुर रुद्रेश्वर स्थानापर्यंत पाठलाग करत आला. त्यामुळे शंकरांनी पूर्वेकडे बहुळेच्या काठाने बहुळा व डूबा या संगमावर विश्रांती घेतली. शंकरांचा पिच्छा पुरवत भस्मासुर तिथे जाऊन पोहोचला. शंकरांची अशी अवस्था पाहून विष्णूने मोहिनी रूप धारण केले व भस्मासुराला या संगमावर रोखून धरले .शंकर बहुळेच्या काठाने थेट अजिंठा पर्वत रांगेत तिच्या उगमापर्यंत जाऊन पोहोचले. तिथून त्यांनी मागे वळून पाहिले. म्हणून या जागेला मुरडेश्वर असे नाव प्राप्त झाले .
शंकरांनी मागे वळून पाहिले तर काय ,एक सुंदर ललना भस्मासुराला मोह पाशात अडकवण्याचा पूरेपूर प्रयत्न करत होती .मोहिनीने नृत्य प्रारंभ केले व आपल्या तालावर भस्मासुराला नाचायला भाग पडले. नृत्यात तल्लीन झालेल्या मोहिनीने आपला एक हात डोक्यावर ठेवला. तिचे अनुकरण करत भस्मासुराने देखील आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्या क्षणी तो धाडधाड पेटत जमिनीवर कोसळला. त्याचा अंत झाला. विष्णूने मोहिनी रूपाचा त्याग केला. ते आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाले. शंकरांनी हर्षातिरेकाने त्यांना मिठी मारली. दोघांची कडकडून गळाभेट झाली.
हा प्रसंग जेथे घडला ते स्थान म्हणजे हरिहरेश्वर मंदिर होय. आता या आख्यायिकेतील महत्त्वाचा भाग बघू .पाचोर्यातील पाताळेश्वर ते अजिंठा पर्वतरांगेतील मुर्डेश्वर असा शंकरांनी केलेला प्रवास हा मध्य काळापर्यंत व्यापारी मार्ग होता .मराठवाड्यातील व्यापारी घाटमाथ्यावरचा माल जोगेश्वरी मुर्डेश्वर येथील घाटातूनच खाली उतरवून खानदेशात प्रवेश करत असत. आजही सावखेडा येथील भैरवनाथ यात्रेत मराठवाड्यातील गुळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
येथील भैरवनाथाला सव्वाच्या पटीत गुळाचा नैवेद्य देण्याची परंपरा आहे. मुर्डेश्वर ,हरिहरेश्वर, रुद्रेश्वर या मंदिरांचे प्राचीनत्व व तेथील दगडी शिल्पे इतिहासात डोकवायला भाग पाडतात.
या आख्यायिकेतील अजून महत्त्वाचा भाग म्हणजे भस्मासुराचे मागे लागणे आणि शंकराचे पलायन ही प्रतीकात्मक रूपे आहेत. जीवनात अनावश्यक संकटे मागे लागली की प्रत्येकाला तोंड देत शक्ती विनाकारण वाया न घालवता त्यापासून माघार घ्यावी लागते .ही यशस्वी माघार असते. अनेक महापुरुषांनी अशी यशस्वी माघार घेतल्याचे दिसून येते.
कुवत नसताना प्रचंड शक्ती हाती आली की व्यक्ती किती पाशवी वर्तन करू शकते याचे उदाहरण म्हणजे भस्मासूर होय. व्यक्ती कितीही सामर्थ्यशाली असली तरी स्वतःचा विवेक गहाण ठेवून दुसऱ्या च्या तालावर नाचू लागली की त्याची फलनिष्पत्ती काय होते हे भस्मासुर कथेतून शिकायला मिळते.
अविवेकी अनिर्बंध वर्तनाला वेसण घालण्यासाठी शांत संयमी व विवेकशील बुद्धिने घेतलेला निर्णय म्हणजे विष्णूचे मोहनी रूप होय. मानवी वर्तनाच्या प्रत्येक निकषावर या कथा घासून पहिल्या तर त्यातील यथार्थता लक्षात येते. खुळचट आणि अनैतिहासिक म्हणून त्यांची हेटाळणी करण्यापेक्षा मानवी व्यवहाराचे ते एक निष्कर्ष आहे असे मानले तर या कथा त्रासदायक ठरत नाहीत. हरी आणि हर यांची भेट म्हणजे शैव आणि वैष्णव या संप्रदायांचे मनोमिलन आहे .त्यांच्यातील समन्वय सांस्कृतिक इतिहासाला मोठी कलाटणी देणारी घटना आहे .त्याचे प्रतिबिंब सांस्कृतिक भाव धारेत आढळून येते. हा समन्वय प्राचीन भारताच्या सांस्कृतिक इतिहासात खूपच मोलाचा ठरला .
पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वर मंदिर निर्मितीचा कालखंड पूर्व पेशवाई कालीन असावा याबाबत मते मतांतरे आहेत. मंदिराच्या पायऱ्या व घाट निर्मितीचा कालखंड शके1841 म्हणजे 1919 असा आहे. येथील पायरी लेख हा जगातील सर्वात लांबीचा शिलालेख आहे .
या शिलालेखाचे वाचन, हस्तलिखित संशोधन विभाग ,दख्खन पुरातत्त्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र भारत सरकारचे संचालक तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील गांधी संशोधन केंद्राचे समन्वयक श्री भुजंगराव बोबडे यांनी केले आहे. या शिलालेखाची लांबी 15 मीटर नऊ इंच रुंदी 9 इंच आहे. शिलालेखांची भाषा मराठी असून लिपी देवनागरी आहे. भुजंगराव बोबडे व शेंदुर्णी येथील प्राध्यापक डॉक्टर प्रशांत देशमुख यांनी या शिलालेखाचे वाचन केले आहे.
ते पुढील प्रमाणे ….।। ओम श्री हरिहरेश्वराय नमः या फरशी चे काम शके१८४१ मध्ये झाले. त्यात मेहनत व लक्ष घालणारे सद्गृहस्थ मे. मामलेदारसो. श्रीधर आर.टी. देव जहागीरदार सीताभ्रतार श्रीधर यांच्यातर्फे मुखत्यार रामभाऊ रामचंद्र जोशी यांनी जहागिरीचे उत्पन्नातून खर्च रुपये २५००शे केला. जमाखर्च लिहिण्याचे काम रा नथू कुंता पाटील यांनी केला. बाकी कामात लागणारी सर्व सिद्धता व देखरेक देवराज मरडाजी पाटील यांनी केली. कारागीर कुऱ्हाडकर रामभाऊ, दगडू शिंपी, व. द. पंचाळ, ब्राह्मण व मंडळी, दगड पाडणारे पांडू गोविंदा माळी व मंडळी ।। ।। देह त्यागिता किर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी ।। श्री समर्था चे म्हणण्यावरून पुढे रा —केल्या कामास कोणी आश्रय देतील अशी आशा आहे. रा. त्यांनी वाड्यातील— फरशी चे प्रमुख खर्चाने केला. लेखक केशव दगडू मिस्त्री पतर दिले.
हा शिलालेख पायरीच्या अनेक दगडांवर कोरून एकाच रांगेत बसवला आहे. त्यामुळे याला पायरी लेख असे नाव दिले गेले. पायर्या चढून वर आले की उजव्या बाजूला एक सात फूट उंचीचा अखंड पाषाण रोवलेला आहे. त्यावर एक आकृती आसन घालून बसलेल्या अवस्थेत कोरलेली दिसते. या पाषाणाला भस्मासुर म्हणतात. तिथून मंदिराचा बाह्य परकोट सुरू होतो. त्याची उंची साधारण 28 फूट आहे. परकोटा चे बांधकाम चारही बाजूंनी बंदिस्त आहे. आत जाण्यासाठी एकच मुख्य दरवाजा आहे. त्या समोर घाट पायरीवर भला मोठा नंदी लक्ष वेधून घेतो.
मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला सुंदर दगडी महिरपीत कोरलेल्या छत्र्या नजरेत भरतात. पाटणादेवी येथील भास्कराचार्य व त्यांची कन्या लीलावती यांच्या समाध्या पिंपळगाव येथील हरेश्वर मंदिरात पाहिल्याने आश्चर्य वाटले.( याविषयी एक स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.) पिंपळगाव हरेश्वर येथील भास्कराचार्यांची समाधी पाच बाय पाच फूट उंचीच्या चौथर्यावर उभारली आहे. त्याला आधार देण्यासाठी चार फूट उंचीचा चौकोनाकृती ओटा बांधला आहे. सुंदर कोरीव काम केलेल्या चार दगडी स्तंभावरील नक्षीकाम साधे असले तरी महिरप सुंदर आहे .त्यावर दगडी छत आकर्षक रित्या बसवले आहे .छतावरील घुमटाकार कळस अलीकडे बसवला असावा.
या संपूर्ण मंदिराला स्थानिक गावकऱ्यांनी रंगरंगोटी करण्यापूर्वी सिमेंट व नर्मदा रेतीचे लिंपण केले आहे .त्यामुळे मंदिर पेशवेकालीन वाटण्याऐवजी अलीकडच्या काळातच बांधले याचा भास होतो. पाषाणावरील कोरलेली शिल्पे किंवा पानाफुलांच्या आकृती सिमेंटच्या अतिरेकी माऱ्यात धाराशयी पडल्याचे स्पष्टपणे दिसते .जीर्णोद्धार कर्त्यांनी फक्त मजबूतीकडे लक्ष दिले. त्यात एक समृद्ध वारसा आपल्याकडून कायमचा पुसला जातो याचेही भान मंडळींना राहिले नाही.
भास्कराचार्य यांच्या बाजूला असलेली लीलावती यांची समाधी मात्र अलीकडच्या काळात बांधली गेल्याचे स्पष्टपणे दिसते. या समाधीच्या शेजारी नंदीमंडप असून स्वतंत्र नंदीची मुर्ती त्यात सुशोभित आहे. नंदीच्या गळ्यातील घंटांची माळ पाठीवरून शेपटीपर्यंत दर्शवली आहे. दोन बालिका आकृती नंदीच्या गळ्यातील घंटा वाजवताना चित्रित केल्या आहेत. नंदीमंडपाचे चारही खांब दगडी कोरीव कामाने सुशोभित केल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यावरील जोतरे व तुळया लक्ष वेधून घेतात. नंदी मंडपाला आधार देण्यासाठी अलीकडे सिमेंटचे बांधकाम करून मजबूत केल्याचे स्पष्टपणे जाणवते. येथे नंदीमंडप स्वतंत्रपणे उभारला आहे. मंदिराच्या सभागृहात प्रवेश करताना दोन दगडी स्तंभावरील कलश व पाने लक्ष वेधून घेतात. त्याच्या बाजूला अलीकडच्या काळात गणपती मंदिर बांधून त्यात सुबक श्री गणेशाची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठित केली आहे.
सभागृहात प्रवेश केल्यावर वितानाची उंची व गाभाऱ्याची भव्यता नजरेत भरते. अलीकडे केलेले सिमेंटचे काम व रंगकाम यामुळे आपण चित्रपटातील एखादा थर्माकोलचा सेट पाहतोय की काय असा भास होतो. सभागृहाच्या दोन्ही बाजूला देवकोष्ठके आहेत पण त्यातील मूर्ती मात्र नाहीशा झालेल्या आहेत. सभागृह व गर्भगृह यातील अंतरिक्ष आठ दगडी खांबांवर तोललेला आहे. सभागृहातून प्रवेश केल्यावर सुद्धा शिव पिंडी चे दर्शन होत नाही हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
महाद्वारा वरील नक्षीकाम पानाफुलांचे असले तरी पायथ्याला यक्ष किन्नर गंधर्व मूर्ती स्पष्टपणे दिसतात. अंतरिक्षाच्या उजव्या कोनाड्यात गणपती मूर्ती चटकन लक्षात येत नाही. ती फारच सुंदरआहे. महाद्वाराच्या उंबरठ्यावर आल्यावर गर्भगृहातील शिवपिंडीचे वरतून दर्शन होते. आठ ते नऊ पायऱ्या उतरून गर्भगृहात जावे लागते. येथील शिवपिंडी विलोभनीय आहे .संपूर्ण गर्भगृहाला आतून संगमरवरी बांधकाम केले असून पुरेशी विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे दर्शन व्यवस्थित घेता येते. येथील गर्भगृहाची खोली अन्य शिवमंदिरापेक्षा अधिक आहे. येथील शिवपिंडीवर नित्य पूजाअर्चा व नैवेद्याचा मान गुरव घराण्याकडे सोपवला आहे.
येथील पिंडी चे वैशिष्ट्य म्हणजे शाळुंखे वरील लिंगाचे दोन भाग स्पष्टपणे दिसतात .त्यापैकी अर्धा भाग विष्णू स्वरुप तर अर्धा शिव स्वरूप मानला जातो. विष्णू स्वरूपाला तुळस तर शिव स्वरूपाला बेलपत्र वाहण्याचा प्रघात आहे. एकाच पिंडीवर शिव आणि विष्णू यांची पूजा एकाच वेळी केली जाते. अशी ही खानदेशातील आगळीवेगळी परंपरा येथे पाहायला मिळते. कारण भस्मासुर वधानंतर याच ठिकाणी शिव आणि विष्णू यांची गळाभेट झाली होती. म्हणून शैव आणि वैष्णव परंपरांचा सुंदर मिलाफ येथे पाहायला मिळतो.
आषाढी व शिवरात्रीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते .चार वर्षांपूर्वी या पिंडीवर वज्रलेप चढवण्यात आला. गर्भगृहात रिकामे देव कोष्टक आहे. त्या वरील दगडी नक्षीकाम वाघळी येथील मुधाईदेवी मंदिरातील देव कोष्टकांत सारखेच आहे. गर्भगृहाचे वितान सुमारे पंचवीस फूट उंचीची असून त्यावर अप्रतिम नक्षीकाम केलेले आहे व पंख्यांची सोय केल्याने वायुविजनाची सोय झाली आहे.
बाहेरच्या बाजूला गणपती मंदिरा शेजारी एक गोलाकार दगडी बाणा बसवलेला दिसतो. शेगावचे संत श्री गजानन महाराज येथे दर्शनासाठी आल्यावर याच ठिकाणी ध्यान मुद्रित आसनस्थ होते असे सांगितले जाते. मंदिर गर्भगृहाचे बाह्य काम नागर शैलीतील आहे. त्यावर उडीसा मंदिर शैलीचा स्पष्टपणे प्रभाव जाणवतो. शिखरावरील कळस मात्र चौकोनी असून त्यावर गोलाकार घुमट चढवला आहे. त्याची रचना केदारनाथ मंदिर शिखर सदृश्य असल्याचा भास होतो. मंदिराच्या बाह्य भागावर तीनही बाजूंनी देवकोष्ठके आहेत परंतु त्यात मूर्ती मात्र नाहीत. कदाचित त्यांची झीज झाली असावी.
पाठीमागे नरसिंह प्रकट व हिरण्यकश्यपूचा वध अशी दोन स्वतंत्र शिल्पे आढळतात. त्यावर कीर्तिमुख कोरलेला आहे तर उजव्या बाजूला महिषासुरमर्दिनीची आकृती स्पष्टपणे दिसते. त्या खालील मूर्तीची पूर्णपणे झीज झाल्याने मूर्ती ओळखता येत नाही. मंदिर पाठीमागे सुंदर कमळ फुले मन वेधून घेतात. त्यासाठी खास पुष्करणी तयार केलेली आहे. त्यात गुलाबी, पांढरे ,गर्द निळे, जांभळे अशा विविधरंगी कमळ फुलांचा ताटवा डोळ्यांचे पारणे फेडतो.
पिंपळगाव गावापासून साधारणता दीड किलोमीटर अंतरावर असलेले हरिहरेश्वर मंदिर हे खानदेशातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे .त्याला पौराणिक तसेच ऐतिहासिक संदर्भ आहेत. संत गोविंद महाराज यांची समाधीदेखील याच गावात आहे.( त्यांचे विषयी स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.)
गावातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी अलीकडे स्वतंत्र सिमेंटचा रस्ता बनवल्यामुळे भाविक तसेच पर्यटकांना जाणे सुलभ झाले आहे. पावसाळ्यात हा परिसर फारच रम्य भासतो. लोकप्रतिनिधींनी व इतिहास अभ्यासकांनी या मंदिरातील सर्वात लांबीच्या शिलालेखाची गिनीज बुक मध्ये नोंद होईल यासाठी प्रयत्न करावेत ही कळकळीची विनंती.
श्री गोविंद महाराज यांच्या समाधी मंदिरापासून हरिहरेश्वर मंदिराकडे जातांना डाव्या बाजूला एक सुंदर गणपती मंदिर डोळ्यांचे पारणे फेडते. मराठा शैलीतील या मंदिराला कैची पाषणांचा वापर करून मजबुती दिली आहे. शिखरावर चुन्याचे अप्रतिम काम करून सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. त्या कदाचित अष्टसिद्धी असाव्यात असे वाटते. चारही बाजूला ऑइल पेंट ची रंगरंगोटी केल्याने त्या मूर्तीतील सूक्ष्म तरल भाव ओळखता येत नाहीत परंतु मंदिर फारच रेखीव सुबक आहे. पेशवेकालीन असलेल्या या मंदिराला आवर्जून भेट द्यावी असेच हे मंदिर आहे. मंदिरातील गणेश मूर्ती चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी, मुधाईदेवी, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळे येथील संगमेश्वर मंदिरातील गणेश मूर्तीची विलक्षण साधर्म्य दर्शवते त्यामुळे ही मूर्ती परिसरातील एखाद्या मंदिरातून येथे प्रतिष्ठापित केली असावी का असाही प्रश्न निर्माण होतो.
काही असो, हा संपूर्ण परिसर निसर्गाच्या सानिध्यात असल्याने एका दिवसाच्या सहलीसाठी फारच सुंदर आहे. येथून जवळच सह्याद्रीच्या अजिंठा पर्वत रांगेत मुर्डेश्वर आचे प्राचीन मंदिर आहे. पावसाळ्यात पर्यटनाची हौस असणाऱ्या गिरी प्रेमींनी आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. पर्यावरणप्रेमी, निसर्ग वेडे पक्षीप्रेमी चातक, धार्मिक आस्थावान व इतिहास अभ्यासक या सर्वांना हे स्थान निश्चितच भरपूर आनंद देईल असे आहे. दिवाळीच्या सुट्टीत एका दिवसाच्या सहलीसाठी अतिशय योग्य असे हे स्थान आहे.
संजीव बावसकर, नगरदेवळे, जळगाव
https://www.deshdoot.com/local-news/nasik/glory-of-malegaon-ancient-mahadev-temple
मालेगांव शहरातील ( Malegaon City ) काही वास्तू-स्थळांना ऐतिहासिक व प्राचीन वारसा लाभलेला आहे. त्यात मालेगांव भागाचे राजे श्रीमंत सरदार नारोशंकर राजेबहादूर यांच्या कतृत्वाने निर्मित मालेगांवचा भुईकोट किल्ला व त्यालगत असलेले श्री महादेव मंदिर, श्री किल्ला हनुमान मंदिर, वावीकरांचे श्री निळकंठेश्वर मंदिर, सटवाजी बुवा यांचे श्री विठ्ठल मंदिर, श्री रामसेतू हनुमान मंदिर, शिंपी समाजाचे शनीमंदिर लगतच श्री सत्यनारायण मंदिर असा हा धार्मिकदृष्ट्या समृद्ध परिसर आहे.
साधारणपणे किल्ला बांधताना मोसमनदी पात्रात मधोमध श्री महादेव मंदिर ( Shri Mahadev Mandir- Malegaon )निर्माण केले गेले आहे. सदर मंदिर काळ्या पाषाणातून साकारलेले आहे. भक्कम दगडी पाया व चिरेबंदी, त्यावर तिन फूट रुंदीच्या दगडी भिंती असे हेमाडपंती शैलीतील विटा व चुण्यात बांधलेले सुबक कळसयुक्त मंदिर बघताच नजरेत भरते. भव्यता आणि दिव्यतेमुळे आपोआपच भाविक नतमस्तक होतात.
संपूर्ण पंचक्रोशीत या मंदिराला तोड नाही. मंदिराचे स्वरूप म्हणजे मुख्य गाभारा, ज्यात भव्य अशी शंकराची पिंड आहे. गाभार्यात दुर्गादेवीची सिंहारुढ मूर्ती नंतर बसविण्यात आली आहे. दुसरे नंदी सभागृह आहे. तेथे श्री गणेशाची शेंदुर चर्चीत भव्य पाच फूट उंचीची दगडी मूर्ती भाविकांना आशीर्वाद देत असते.
काळ्या पाषाणातील भव्य नंदीची मूर्ती साधारणपणे शिवलिंगासमोर सरळ रेषेत असलेली! ध्यानमग्न अवस्तेतील मुद्रा असलेली नंदीचा मुर्ती, नागांचे स्वतंत्र छोटेखानी दगडी मंदिर तसेच कासव व द्वारपालांच्या दगडी मूर्ती, मंदिराबाहेर महाबली हनुमानाची गदाधारी शेंदूर चर्चीत वीरमुद्रा असलेली मूर्ती व मंदिर.
मंदिराच्या भोवतालचा परिसर हा घडीव दगडी बांधकामाचा असून मोसमनदी किनारी दगडी घाट व पायर्या बांधलेल्या आहेत. मंदिराबाहेर तुळशी वृंदावन व एक भुयार आहे. राजपरिवारासंबंधीत काही समाधीसुद्धा आहेत. शहरीकरणाच्या विस्तारापूर्वी सदर घाटावर भाविक व जनता पिण्याचे पाणी भरण्यासह अंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी येथेच येत असत.
मंदिर व्यवस्थापनासाठी गुरव परिवाराला पाचारण केलेले होते. त्यांना उदरनिर्वाहासाठी घरे व शेतजमीनी उपलब्ध करून दिलेल्या होत्या. येथे श्रावणी सोमवार, महाशिवरात्री, हरी-हरभेट इत्यादी उत्सवात भाविकांची मोठी मांदियाळी असे. सदर मंदिरात आतापर्यंत असंख्य रूद्रपूजा, अभिषेक, होमहवन व आरत्या होऊन शिवलींग अत्यंत पावन व जागृत झालेले आहे. येथे भाविकांची निस्सीम व अढळ श्रद्धा आहे. असे वैभवशाली परंपरा असलेले मंदिर व परिसर कालांतराने काही प्रासंगिक व नैसर्गिक कारणांमुळे दुर्लक्षित झाले. अनेक पूर तसेच 1979 चा महापूर सुद्धा मंदिराने सहन केला.
गेले पावणे तीनशे वर्ष ऊन, वारा, पावसाचे आघात झेलून मंदिर व परिसराची दुरावस्था झाली होती. मंदिराचे दगड सुद्धा तुटून चोरीला गेले होते. परिसराला अतिक्रमणांचा विळखा पडला होता. लोक परिसरात प्रात:विधी व गैरकृत्य करू लागल्यामुळे मंदिर बरीच वर्षे बंद राहू लागले. अधून-मधून उत्सवापुरते उघडले जात. मंदिराच्या वरच्या बाजूला शवविच्छेदनगृह होते. त्यामुळे भाविकांना परिसरात येण्याची भिती वाटे. काही वर्षांपूर्वी शहरातील व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत मंदिरात पुनश्च नित्य आरती, पूजापाठ सुरू केले. मंदिर व परिसराची देखभाल, पूजाअर्चा, उत्सव साजरे करून शहरातील भाविकांना मंदिराकडे आकृष्ट केले.
भाविकांनी एकत्र येऊन दैनंदिन पूजाअर्चा व उत्सव साजरे करण्यास हातभार लावत मंदिराची देखभाल, जीर्णोद्धार, उत्सव साजरे करणे व उदभवलेल्या समस्यांचे निस्तरीकरण आदी कार्य स्वखुषीने आपल्या खांद्यावर घेतले. नंतरच्या काळात पंकज रामेश्वर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली भाविकांची श्री महादेव सेवा समिती स्थापन झाली. त्यावेळी अनिल मोरे, सुनील मोराणकर, संजय जगताप, अनिल परदेशी, वसंत श्रीवास्तव, भिका साखरे, कैलास सोनवणे, मिलींद गवांदे, रमेश मंडाळे, सचिन जाधव, संतोष जाधव, नारायण गवळी, रणजीत भाटी, खेमचंद तलरेजा, राकेश पगारे, प्रसन्न शिनकार, गजानन शिरसाठ आदी अनेक कार्यकर्त्यांचे तन, मन, धनाने सहकार्य लाभले. सोबतच समितीच्या स्थापनेपुर्वीच्या ज्येष्ठ सदस्यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळत होते.
समितीने आत्तापर्यंत भाविकांच्या सहकार्याने मंदिराचा आतुन व बाहेरुन संपूर्ण जीर्णोद्धार केला असून मुळ रचनेला कुठलाही धक्का न लावता प्राचीन वास्तूकला जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.
महादेवाच्या पिंडीला सुद्धा वेळोवेळी डागडूजी करून आधी तांब्याचे कवच आणि सध्या पितळी कवच चढवण्यात आले आहे. बाहेरुन सुद्धा कळसाचे जीर्ण झालेले प्लास्टर काढून मुळ रचनेतच नवीन प्लॉस्टर व रंगरंगोटी झाली आहे. लोकप्रतिनिधी दीपक भोसले व अॅड. ज्योती भोसले, राजेश गंगावणे, ताराबाई शिरसाठ, चिंतामण पगारे, मच्छिंद्र अहिरे आदींनी नगरसेवक निधी देऊन परिसराला वॉल कंपाउंड व तार कंपाउंडने संरक्षित करण्यास सहकार्य केले. तरीही थोडे काम शिल्लक आहे. त्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन दिले असून नगरसेविका दीपाली विवेक वारुळे यांचे सुद्धा जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
मंत्री दादा भुसे यांनी शोभिवंत लाईट, स्ट्रीटलाईट उभारून दिले. तसेच नगरसेविका वारुळे यांनी प्रयत्न करून सभोवताली पेव्हरब्लॉक व मंदिराच्या पाठीमागे माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना पाठपुरावा करून काँक्रीटीकरण करून दिले आहे. इतर नगरसेवकानी इलेंट्रीक पोल, बाकडे इत्यादि देऊन सहकार्य केले आहे. माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांनी मंदिरासाठी बोअरवेल करून दिली आहे.
नदीविकास आराखड्यात संगमेश्वर ते महादेव मंदिर असा पादचारी पूल उभारण्यात आला आहे. उत्सव व विविध उपक्रमांसाठी मुळ मंदिराची जागा अपुरी पडत असल्यामुळे मंदिराचा चहूबाजूंनी विस्तार करण्याचे समितीने काम हाती घेतले आहे. मंदिरच्या समोर जोडूनच एकसंघ सभामंडप व इतर बाजूंनी वाढवून विस्तारीत कार्य स्ट्रक्चरवर छतापर्यंतची उभारणी लोकसहभागातून केली आहे. ंकृषीमंत्री भुसे यांच्याकडून सुद्धा सुशोभिकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
राजेबहादूर परिवाराकडून वेळोवेळी सहकार्य प्राप्त होत असते. सध्या वर्षभरात श्रीमहाशिवरात्री उत्सव, श्रावण महिना, श्री हरिहर भेट उत्सव आदी साजरे केले जातात. तसेच नित्य आरती, अनुषंगिक धार्मिक परंपरा जतन केल्या जातात. समिती स्थापण्यासोबतच जयशंकर भजनी मंडळाची देखील स्थापना केली गेली आहे. भजनी मंडळाद्वारे दरसोमवारी रात्री दोन तास भजन केले जाते. प्रसंगानुरूप विविध आमंत्रणावरून अनेक ठिकाणी भजनाचा कार्यक्रम केला जातो.
https://www.discovermh.com/sangameshwar-temple-nagardevale/
संगमेश्वर मंदिर नगरदेवळे | Discover Maharashtra

संगमेश्वर मंदिर नगरदेवळे…
नगरदेवळे गावाच्या
वायव्येस तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे प्राचीन मंदिर ! तीन नद्यांच्या
पवित्र संगमावर एका उंच टेकडीवर या मंदिराचे निर्माण कार्य झाल्याने त्याला
संगमेश्वर महादेव म्हणतात.
संगमेश्वर मंदिर नगरदेवळे मंदिराचे नंदीगृह,
सभामंडप व गर्भगृह असे तीन भाग पडतात. तीनचार वर्षांपासून या मंदिराचे
जीर्णोद्धार कार्य भारतीय पुरातत्त्व खात्याने सुरू केले आहे. नंदीगृहाचे
पुनर्निर्माण नव्याने केले आहे. त्यात प्राचीन नंदीची मूर्ती आहे . त्याची
उंची तीन फूट लांबी चार फुटांपर्यंत आहे. गळ्यात घंट्यांची सुंदर साखळी माळ
आहे . नंदिसमोर भद्र कलशधारी अलगद कोरलेला असून तो नंदिसमोर बसलेला आहे
त्याचे तोंडमात्र शिवाकडे आहे अशा प्रकारचं नंदीशिल्प पाटणादेवी परिसरात पण
आहे. येथे नंदीची शिंगे व कानांची मात्र झीज झाली आहे. मंदिराच्या बाहेर
उजव्या हाताला एक वराह नंदी आहे .याचा आकार वराहासारखा असतो . त्यांना
यज्ञवराह असेही म्हणतात. मूर्तीशास्त्रानुसार त्याला भूवराह असेही म्हणतात .
आता आपण सभागृहात प्रवेश करतो . डाव्या हाताला भिंतीला उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती लक्ष वेधून घेते . मूर्तीची सोंड नंतर दुरुस्त केलेली असली तरी हात व पायांची ठेवण प्रमाणबद्ध आहे . प्रत्येक पायात दोन असे चारही पैंजणांचे कोरीव काम सुबक आहे .कंबरेचा नंदीपाश , यज्ञोपवीत , मूषक हातातील परशु , अंकुश, मोदक ठळकपणे दिसतात.वरदहस्त मात्र भग्न झाला आहे .
सभागृहात
उजव्या हाताला देवडीत तीन मुर्ती आहेत. पैकी एक डाव्या सोंडेची गणेशाची आहे
. उजवा व डावा असे दोन गणेश असा दुर्मिळ योग्य येथे पहावयास मिळतो . (
पद्मालय सोडल्यास )
गणपतीच्या बाजूला चंडिकेची अर्धमूर्ती पहावयास मिळते
. ही सप्तमातृकांमधील एक देवी म्हणून ओळखली जाते .ही देवी चालुक्यवंशाची
कुलदेवता आहे त्यामुळे हे मंदिर चालुक्य कालीन असावे का ? असाही प्रश्न
निर्माण होतो .
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पोट खपाटलेले असून पोटावर
विंचू कोरलेला आहे . तो भुकेचे प्रतीक आहे . तिला सहा हात असून ती
शस्त्रधारी आहे .उजव्या हातात बालक मूर्ती कोरलेली दिसते . कंबरेला मेखला
घंटाकर आहे .
चंडिकेच्या बाजूला पार्वतीचे शिल्प कोरलेले आहे .या
मूर्त्यांचे चेहरे अस्पष्ट असल्याने त्यांचे सौंदर्य दिसत नाही . त्याच्याच
बाजूला शंकर पार्वतीचे शिल्प आहे .
सभा मंडपाला प्रत्येक कोपऱ्यात
तीन असे बारा खांब आहेत . खांबावरील कोरीव काम वाखाणण्याजोगे आहे . सभा
मंडपाचे काम गोलाकार असून हवा व उजेड येण्यासाठी मोकळे ठेवले असावे .
आता
आपण गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो .गर्भगृहाचे मुख्य
प्रवेशद्वार अत्यंत सुंदर असून अप्रतिम सुबक कोरीवकाम त्यावर आढळून येते .
उंबरठ्याच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला किर्तीमुख कोरलेले आहे .विशेषतः
शिवमंदिराच्या पायऱ्यांवर व इतर मुर्तींच्या मागे किंवा डोक्यावर किर्तीमुख
कोरलेले असते . या ठिकाणी दोन शिंगे असलेली बटबटीत डोळ्यांची दोन
किर्तीमुखे आहेत .त्यांचा चेहरा सिंहाचा आहे .
पद्मपुराणाच्या एका दंतकथेनुसार या किर्तीमुखाचा संबंध शिवाशी येतो . राहू आणि शिव यांच्या वादात शंकराच्या क्रोधाग्नीतून किर्तीमुख हा भयंकर प्राणी जन्माला आला . परंतु राहूने क्षमायाचना केल्यावर शंकराने किर्तीमुखास थांबविले .पण किर्तीमुखास भयंकर भूख लागली . तो मांसाची याचना करू लागला .तेव्हा शंकराच्या आदेशाने तो स्वतःचेच मांस खायला लागला . शेवटी त्याचे मुखच शिल्लक राहिले . या आज्ञाधारक पणाबद्दल शंकर त्याची प्रशंसा करतात व त्याला थांबवतात .तेव्हापासून किर्तीमुख हा शिवाच्या पायाशीच असतो .
किर्तीमुखाच्या डाव्या व उजव्या बाजूला शिल्पमालेत असंख्य देवी देवतांच्या शिल्पाकृती आहेत . तसेच मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूस अनेक देवतांच्या मूर्ती आहेत . त्यांचा स्वतंत्र अभ्यास करता येईल . मध्यभागी गणेशाची आकृती असून त्यामागे गणसेना असावी .
सभामंडप व गर्भगृहाचे खांब तसेच भव्य तुळया
पाहिल्यावर थक्क व्हायला होते .साधारणतः 11 व्या शतकात या मंदिराचे बांधकाम
पाहता कुठलेही तंत्रज्ञान विकसित नव्हते असे म्हणणे धाडसाचेच होईल .आपल्या
पूर्वजांच्या तंत्रशुद्ध ज्ञानाबद्दल आपण विस्मित होतो .
मंदिराचा
बाह्यभाग अत्यंत सुंदर व प्रशस्त आहे. मंदिर बांधकाम करतांना कुठेही
चुन्याचा वापर करण्यात आला नाही . दगडी तुळया व खांब एकमेकांत साखळी
पध्दतीने गुंफलेले आहेत . मंदिराची लांबी 50 फुटांपेक्षा अधिक आहे . चारही
बाजूंनी मंदिर पाहतांना त्याची भव्यता जाणवते . एका नजरेत मंदिर पाहता येत
नाही .
मंदिर परिसरात अनेक दुर्मिळ शिल्पे आढळतात .पैकी शिवपार्वती
शिल्प अप्रतिम आहे . शिवाच्या डाव्या मांडीवर पार्वती बसलेली आहे .तिच्या
डोक्यावर नागाने फणा उभारला आहे . शिव हे नंदीवर पद्मासनात बसलेले आहेत .
मूर्तीच्या डाव्या बाजूस गणपती आहे .शिवपार्वतीच्या मागे दोन दंडधारी उभे
आहेत . ते वीरभद्र व कार्तिकेय असावेत असे वाटते .
शंकराची अजून एक
मूर्ती नंदीवर विराजमान आहे. स्थानिक लोकांनी शेंदूर चढविल्यामुळे
मूर्तींचे मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. उघडयावर असल्याने या मूर्तींची झीज
झाली आहे . पुरातत्व विभागाने मंदिर जीर्णोद्धारसोबत या शिल्पकृतींचे पण
संवर्धन करावे ही अपेक्षा !!!
संजीव बावसकर, नगरदेवळे

बडगुजर समाजाची देवस्थाने
काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७७८-१७९० मध्ये बांधले. येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत. मंदिरात नियमित पूजाअर्चा होत असते. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंडपात प्रवचने व कीर्तने होत असतात. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात. राममंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जेथे राममंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहात असत. काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती अंतरा-अंतरावर सापडल्या जेथे राममूर्ती सापडली ते रामकुंड, लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मणकुंड, सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड होय. या मूर्ती स्वंयभू म्हणून ओळखल्या जातात. गोदावरी नदीच्या घाटापासून याचे अंतर पायी चालत जाण्याइतके आहे.
बडगुजर समाजाची देवस्थाने:
- चामुंडा-चोटीला – जुनागड-गुजरात
- शेलू-मेथी-शिंदखेडा, धुळे जिल्हा
- चोपडा
- सुरत
- पिळोदे, ता. अमळनेर, जि. जळगांव
या मंदिर परिसरातील आपला ग्रुप फोटो तुम्ही पाठवू शकतात. निवडक फोटोंना या पेजवर प्रसिद्ध
करण्यात येईल .




















































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.