हा आहे वैभवशाली जळगावचा गौरवशाली इतिहास…

महाराष्ट्रात असे अनेक जिल्हे आहेत जिथला इतिहास मोठ्या प्रमाणात प्रकाशात आलेला नाही. अर्थात आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा आणि गावांचा इतिहास वाचणं ही आपली जबाबदारी असते.
या जिल्ह्यांमध्ये जळगाव असाच एक जिल्हा आहे जिथे थोरामोठ्यांचा जन्म झाला. जिथे इतिहास घडला पण आपण तो विस्मृतीत गेला.
आजच्या लेखातून ह्याच जळगाव मधील इतिहासाची आपण उजळणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकं इथे काय घडलं? इथे कोणाचे राज्य होते? इथे किल्ले किती? मंदिरं कोणती होती? इथे कोणती घराणी नांदत होती? वाडे कसे होते? हे सर्व पाहुयात आजच्या लेखात.
१) खानदेश नावाचा इतिहास :
जळगावला महाराष्ट्रात पूर्व खानदेश देखील म्हणतात. खानदेश हे नाव कसे पडले? ह्यावर मतमतांतरे आहे. काही इतिहासकारांच्या मते इथे मुसलमानी राजवट असताना खान ह्या पदवीमुळे ह्या प्रांताला खानदेश म्हणतात. तर महाभारतात असलेल्या उल्लेखाप्रमाणे खांडववन हा प्रांत होता ज्याचा अपभ्रंश खानदेश झाला.
ह्या नावामागे अजून एक कथा अशी आहे की भगवान कृष्णाच्या नावामुळे ह्याला खानदेश म्हणतात. अर्थात कृष्णाला कान्हा म्हणतात म्हणून कान्हादेश आणि त्याचाच अपभ्रंश खानदेश आहे. कथा वेगवेगळ्या असल्या तरी जळगाव मधील लोक अभिमानाने जय खानदेश म्हणायला विसरत नाही.
२) जळगावच्या इतिहासात कोणत्या घराण्यांनी राज्य केले? :
जळगाव अत्यंत समृद्ध असल्याने इथे अनेकांनी राज्य केले. पहिल्या तीन शतकांमध्ये तर इथे बौद्ध धर्मियांचे राज्य होते. नंतर इथे सातवाहनांनी राज्य केले.
हे सातवाहन अत्यंत पराक्रमी होते. ह्यांच्या नंतर चालुक्य आणि मग यादव अशी घराणी इथे राज्य करू लागली. अल्लाउद्दीन खिलजीने देखील हा प्रांत काबीज केला होता.
आणि तेव्हा पासून मुसलमानी आक्रमणे जळगाववर होत गेली. नंतर हा प्रांत निजामाच्या हाती होता त्यानंतर मात्र मराठ्यांचे राज्य आले व जळगाव मराठ्यांकडे गेले.
छत्रपती शाहू महाराजांनी दुर्गाजीराव भोईटेंना जळगाव प्रांत दिल्यानंतर भोईटे घराण्यानेच जळगाव शहर वसवले. त्यांचे वंशज तुळाजीराव भोईटे यांनी जळगावची भरभराट केली.
३) जळगाव जिल्ह्यातील मंदिरे :
जळगाव जिल्ह्यातील प्राचीन मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहेत. ह्यात पद्मालय मंदिर अत्यंत सुंदर आहे. पद्म अर्थात कमळ आणि आलय म्हणजे निवास किंवा जागा.
ह्या मंदिराच्या बाहेर एक कुंड आहे त्यात मोठ्या प्रमाणात कमळाची फुलं फुलतात. ह्या फुलांमुळे मंदिराला वेगळीच शोभा येते.
असे म्हणतात की, हे मंदिर पांडवांच्या काळात बांधले गेले होते. नंतर अनेकदा ह्याचा जीर्णोद्धार झाला. ह्याविषयी एक पौराणिक कथा सांगण्यात येते. एकदा भीमाने बकासुराला मारल्यानंतर तहान लागली म्हणून एक तळे खोदले.
तेच तळे आज भीम कुंड म्हणून ओळखले जाते. उनपदेव म्हणून एका स्थळी गोमुखातून गरम पाणी येते. इथे गरम पाण्याचे झरे आहेत, हे आश्चर्य असले तरी इतिहासात ह्याचे उल्लेख सापडतात.
ह्याच प्रमाणे सुनपदेव आणि निझारदेवला देखील गरम पाण्याचे झरे आहेत. संत मुक्ताबाई आणि मनू देवीचे जळगावमध्ये मोठे मंदिर आहे. असा मंदिरांचा इतिहास जळगावने चांगला जपला आहे.
४) जळगाव मधील किल्ले :
अमळनेरचा किल्ला इथे प्रसिद्ध आहे. जवळच तटबंदी व बुरुज आहेत. आताच्या काळात शहरीकरण झाल्याने किल्ल्याचे ऐतिहासिक दृश्य नजरेस पडत नाही.
चौगावचा किल्ला अत्यंत चांगल्या स्थितीत बघायला मिळतो. किल्ल्यावरचे द्वार, बालेकिल्ला, तळे, तट बुरुज चांगल्या अवस्थेत आहेत. कन्हेरगड, बहादरगड, पारोळा असे विविध किल्ले जळगाव जिल्ह्यात आहेत.
५) जळगाव मधील वाडे आणि गढ्या :
छत्रपती शाहू महाराजांनी भोईटे घराण्याला जळगाव प्रांत दिल्यानंतर त्यांच्यातील तुळाजीराव भोईटेंनी जळगाव शहर वसवले. इथे भोईटेंची गादी होती.
आज देखील भोईटे गढीमध्ये एक मोठा आणि प्रशस्त वाडा आहे. ह्यालाच भोईटेंची गादी म्हणतात. जळगावमध्ये ह्याच प्रमाणे पवारांची गढी देखील आहे. नगरदेवळामध्ये नगरदुर्ग म्हणून ह्या पवारांची गढी आहे.
जिथे साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी, प्रतिभाताई पाटील, उज्वल निकम ह्यांच्या सारखे महानतम लोकांचा जन्म झाला त्या जळगावच्या भूमीचा इतिहास खरंच थोर आहे.
हा इतिहास जतन करून ठेवला तरच आपली संस्कृती अबाधित राहील. तुम्हाला जळगाव विषयी आणखी काही माहिती आहे का? तुम्हाला आणखी कोणत्या राज्याविषयी वाचायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा.
निरक्षर असुनही जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा असलेली खानदेश कन्या.
अहिराणी (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान
सांगणारी एक साधी शेतकरी महिला.
तसेच ना धो महानोर शेती, माती, पाणी, पीक आणि निसर्गाशी नाते जपणारे कवी
अशा मातीशी जोडलेली, निसर्गाशी जोडलेली, रोजचे जीवन काव्य रूपात आपल्या
समोर उभे करणारे खानदेशचे हीरे.
या अशा माझ्या खानदेशची मला जमेल तशी सफर सगळ्यांना घडवने कधी पासून मनात होते. तर मंडळी जसे शक्य होईल तशी माझ्यापरीने सुरवात करते.
दख्खन पठाराच्या उत्तरेला विविध वैशिष्ट्यांनी नटलेला व गिरणा, तापी,
वाघूर या नद्यांनी समृद्ध असलेला भूप्रदेश म्हणजे खानदेश. अगदी प्राचीन
काळापासून तर आतापर्यंत खांडववन, सेऊणदेश, ऋषिक, दानदेश, स्कंददेश,
कान्हदेश (खान्देश) अशा वेगवेगळ्या नावांनी हा भूप्रदेश ओळखला गेला आहे.
'कान्ह देश'पासून खान्देश शब्दाची उत्पत्ती झाली आहे. आता जळगाव, धुळे आणि
नंदुरबार हे तीन जिल्हे खान्देश म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील अन्य
भागांच्या तुलनेने या जिल्ह्यांची सांस्कृतिक, सामाजिक अशी स्वतंत्र ओळख
आहे. या भागाची कृषी संस्कृती खाद्य संस्कृती वेगळी आहे. येथे प्राचीन
परंपरा आहे.
अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी बरोबरच जळगाव जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेली
पाटणादेवी, मुक्ताईनगर, चांगदेव, कोथळी, मनुदेवी, उनपदेव, रामेश्वर अशी
अनेक तीर्थस्थळे, पर्यटन स्थळे आहेत. या स्थळांची बर्याच लोकांना माहिती
नाही.
गहू हे मुख्य अन्न असलेली उत्तरेकडचा भाग तसेच तांदूळ हाच मुख्य अन्न घटक
असलेला दक्षिण भाग यांच्या मधोमध असलेल्या आपल्या महाराष्ट्रात चौरस
खाद्यसंस्कृती आहे. आणि ही खाद्यसंस्कृती ही आपल्या रोजच्या जेवणात आपण
आंगीकरली आहे.
सुपीक जमीन, अनुकूल हवामान यामुळे महाराष्ट्र अन्न धान्याच्या बाबतीत इतर
राज्यांपेक्षा अधिक संपन्न आहे. सगळ्याप्रकारची फळं, धान्य, कडधान्य,
तेलबिया यांचे उत्पादन घेणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. या सार्या
अनुकूलतेमुळे महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती विविधांगाने नटलेली आहे.
पोळा आणि अक्षयतृतीय हे दिवाळी इतकेच महत्वाचे सण प्रत्येक खानदेशी
माणसाच्या जिवाहळ्याचे. पोळा हा पोळा हा सर्वच खानदेशी शेतकरी बांधवांचा
सण. तर अक्षयतृतीयेला जावयाचा मान. ह्या सर्वच सण उत्सवांसाठी आणि एरवी
कोणीही पाहुणे आले तरी पुरणपोळी किंवा खापरावरची पोळी खीर, आंब्याचा रस,
हरभर्याच्या डाळीची रस्सी म्हणजे मसालेदार आमटी, भात, नागलीचे पापड,
कुरडय़ा कांद्याची भजी असा भरगच्च बेत ठरलेला असतो.
मातीचे खापर चुलीवर ठेवून पुरणाचे सारण भरून तळहातावर रूमाली रोटीसारखी
केलेली पोळी म्हणजे पुरणपोळी किवा मांडे. अक्षयतृतीयेला जावयाला याच
मांड्यांचा पाहुणचार असतो. आम्हा खान्देशी मंडळींना तिखटाचे वावडे नाहीच.
अगदी भाकरी किंवा पोळीवरही आम्ही तेल, तिखट व मिठ घालून खातो.
तसाच अजून एक पदार्थ – दाळ बट्टी/ बाटी. ज्या प्रमाणे भरीत पार्टी होते
तशीच खानदेशात बट्टी चे जेवण ही कोणी टाळत नाहीत. मस्त शेतात एक मोठा खड्डा
करून त्यात गोवार्यांवर भाजलेल्या खरपुस बट्ट्या एका कापडाने पुसून गवराण
तुपात बुडवून मग डाळीबरोबर खाणे म्हणजे स्वर्गसुखच. यालाच काहीजन रोडगा
असे म्हणतात.
ठसकेबाज शब्दसंपदा असलेली आणि ऐकायला गोड अशी अहिराणी भाषा, कष्टमय
जीवनशैली आणि तितकीच अस्सल गावरान व झणझणीत शेवभाजी व वांग्याचं भरीत, ही
खानदेशची खाद्यसंस्कृती. हिरव्या वांग्याच भरीत हे सुद्धा आमचे जीव की
प्राण.
रोजच्या जेवणात मसालेदार, तिखट व चमचमीत पदार्थांचा समावेश असतो.
"वांग्याचं भरीत आणि शेवभाजी म्हणजे खानदेश' असं समीकरणच आहे .नोव्हेंबर ते
जानेवारी या काळात जळगाव जिल्ह्यातील बामणोद, भालोद, ममुराबाद, असोदा,
भादली येथे या वांग्यांचे उत्पादन घेतले जाते. या परिसरांतील माती व
वातावरण भरताच्या या विशिष्ट वांग्यासाठी पूरक आहे. तूर व कपाशीच्या
काड्यांवर खरपूस भाजलेली वांगी, कांद्याची हिरवीकंच पात, लसूण, लवंगी
मिरच्यांचा हिरवा ठेचा आणि तेलाचा सुयोग्य वापर करून तयार केलेलं चटकदार
भरीत केळीच्या हिरव्या पानावर पाहताच भूक नसणाऱ्यालाही सपाटून भूक लागते.
मला अजुनही आठवते लहान असताना हट्टाने सुकलेल्या काड्या कोलोनीत कुठे
मिळतात का हे शोधायला जात असे नाही मिळाल्या की कामाला असलेल्या आजीची
रवानगी काड्या शोधायला पाठवत असे. वडिलांची बदली काही वर्ष सवखेडा नांदेड
या गावी झाली होती तेव्हा बँक बंद होण्याआधी काही वेळ तिथले स्नेही
काड्यांवर भाजलेले वांगे पाठवत असत कारण कितीही झाले तरी कड्यांची चव गॅसवर
येत नसे.
जिभेला आलेला तिखटपणा कमी करण्यासाठी देशी साजूक तुपात तयार केलेला रव्याचा
दराबा आणि गुळापासून बनवलेली गोडीशेव हा रास्त उतारा.. या दिवसात शेवभाजी व
भरताच्या या खानदेशी मेनूचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकर-पुणेकर जळगावच्या
नातेवाइकांकडं हक्कानं येतात; तर मुंबई-पुण्याकडे असलेल्या आप्तांकडं
जळगावकरांच्या वाऱ्या वाढतात. या प्रत्येक वारीत जर त्यांच्याबरोबरच्या
सामानाची तपासणी केली तर त्यात भरताची वांगी, कांद्याची हिरवीकंच ताजी पात,
शेवभाजीसाठी लागणारी जाड तिखट शेव आणि या दोन्हींना लज्जत आणणारा खास
मसाला नक्की सापडेल.
होळीला खांदेशात बहुताश घरातून फुणके, कैरीचे पन्हे आणि लाडवे असतात.
फुणके- म्हणजे मिश्र डाळींचे मुटके.
लाडवे- हे गव्हाच्या पीठाचे छोटे छोटे शेंगोळ्या वळून खडखडीत वाळवून
गुळाच्या पाकात शिजवलेला पदार्थ.(याचा फोटो होळीच्या वेळा देईन).
त्याच प्रमाणे हिवाळ्यात हिरव्या मिरच्यांची दाणे कूट घालून पातळ भाजी केली जाते.
हिवाळ्यातील अजुन एक आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे कळण्याची भाकरी.
ज्वारी किवा बाजारी+ अकखे उडीद समप्रमाणात घेवुन केलेली भाकरी त्याबरोबर
मिरचीचा झणझणीत ठेचा.
तसेच काळ्या उडीद डाळीची पातळ भाजी हे सर्व हिवाळा स्पेशल खानदेशी पदार्थ आहेत.
पातोड्याची भाजी
मसला मोदक भाजी
क्रमश:
निसर्गरम्य ऐतिहासिक पाटणादेवी
मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य आणि मनमोहक अशा निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. तिन्ही बाजूने अर्धचंद्रकार सह्याद्री पर्वताचे उंच कडे, विविध वृक्ष, डोंगरातून खळखळ वाहणारे ओढे यामुळे मन मोहून जाते.
विशेषत: पावसाळ्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये येथील वातावरण मनाला प्रसन्न करणारे शांत व आल्हाददायक असते. या दिवसात मंदिराच्या चौथऱ्यावरून मंदिराचा भोवतालचा परिसर म्हणजे वनराईने नटलेले पर्वताचे उंच कडे, रंगबिरंगी फुलाफळांनी बहरलेले वृक्ष, खळखळ वाहणारेओढे हेसर्व निसर्गरम्य दृश्य पाहताना मन निसर्गाशी एकरूप होवून जाते. अशा रमणीय ठिकाणाचा पूर्व इतिहास तितकाच ऐतिहासिक व महत्वाचा आहे. मंदिरात दोन गाभारे असून एका गाभाऱ्यात देवीची मुर्ती व दुसऱ्या गाभाऱ्यात शिवपार्वतीची मुर्ती आहे. या दोन गाभाऱ्यांमधील कक्षेत विष्णूची मुर्ती आहे. या परिसरात सापडलेल्या असंख्य मुर्ती व शिल्प हे येथे एका खोलीत ठेवण्यात आले आहे.
मंदिराच्या पूर्व दिशेला दोन कि.मी. डोंगर चढून गेल्यावर सुप्रसिद्ध पितळखोरे लेणी आहे. अजिंठा लेण्याच्या समकालीन ही लेणी असून अतिशय भव्य अशी आहे. या लेण्याजवळून वाहणारा पाण्याचा प्रवाह उंच कड्यावरून खाली कोसळतो. यामुळे देवी मंदिराच्या पूर्वेस उजव्या बाजूला मोठा धबधबा तयार होतो. त्याला धावलतीर्थ किंवा धारातीर्थ म्हणतात.
उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली खडकात तयार झालेल्या खोलगट भांड्यासारख्या डोहातून पाण्याचे फवारे दूरवर उडतात आणि पर्यटकांना आल्हाददायक आनंद देऊन जातात. पाटणादेवी मंदिरापासून एक कि.मी. अंतरावर जुन्या पाटणा गावाचे अवशेष आहेत. हा परिसर पुराणवास्तू शास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून अतिप्राचीन सामुहिक ग्राम रचनेचे पुरावे याठिकाणी पहावयास मिळतात. याच परिसरातून आणखी एक वास्तुशिल्पीदृष्ट्या चांगले मंदीर आहे. त्याला हेमाडपंथी माहेश्वर मंदीर असे म्हणतात.
मंदिराचा गाभारा, अंतराळ, उघडा मंडप, मुख मंडप इ. भाग आहे. मंदिरातील मंडपात मोठा नंदी लक्ष वेधून घेतो. या मंदिराच्या मागील बाजूस जुन्या पाटणे गावाच्या दक्षिणेस एक पडका किल्ला आहे, त्यास बिज्जलगड असे म्हणतात. या गडाच्या उत्तर-पश्चिम बाजूस शृंगारचावडी नावाचे अतिप्राचीन दुर्मिळ असे लेणे आहे. त्यातील बहुतेक प्रतिमा शृंगारिक असून त्या खाली नक्षी पट्ट्या आहेत. शृंगारचावडी लेण्यांच्या शेजारी महेश्वर मंदिराकडे उतरताना सीता न्हाणी व नागार्जुन अशी दोन लेणी आहेत. या उंच प्रदेशातून उत्तरेकडे पसरलेल्या वनराजीचे दृश्य अतिशय विहंगम वाटते. निसर्ग सौंदर्याबरोबरच पुराण वास्तुशिल्पे, शून्याचा वेध घेणारे गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांचे गणितीपीठ बघताना पर्यटक वेळ-काळाचे भान विसरुन जातात.
आज मंदीर भारतीय पुरातन विभागाच्या निगराणीत आहे. येणाऱ्या भाविक, पर्यटक, अभ्यासकांसाठी वनखात्यामार्फत विश्रामगृहे व निसर्गवाचन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. तर चला जाऊया पाटणादेवीला…
-निलेश परदेशी,
चाळीसगाव, जि.जळगाव. (मो.नं.7588646750)
दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 20 रसलपूर
भाग 20
रसलपूर
प्रकार -
सराई
उंची -
जवळचे गाव -
रसलपूर
रांग -
मार्ग -
जळगाव-भुसावळ-रावेर-रसलपूर
ऐतिहासिक माहिती
जळगाव-बुऱ्हाणपूर मार्गावर रावेर हे तालुक्याचे गाव आहे. रावेरपासून ५ कि.मी. अंतरावर रसलपूर आहे. रसलपूरमध्ये सराई आहे. स्थानिक लोक या सराईला किल्ला म्हणतात. सराईला दोन दरवाजे आहेत. पैकी एक घरांमुळे बंद केलेला आहे. सराईच्या बाहेर खंदक आहे. खंदक दोन बाजूंना बऱ्यापैकी असून बाकी बुजलेला आहे. तटबंदीची उंची कमी असून कमी उंचीचेच बुरुज आहेत. तटबंदीच्या आतून लहान-लहान खोल्या असून सध्या यांच्यामध्ये बरीच कुटुंबे राहतात.
स्थलदुर्गउंची -
जवळचे गाव -
पारोळा
रांग -
मार्ग -
जळगाव-पारोळ
दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 22 लासूर
भाग 22
लासूर
गढी
उंची -
जवळचे गाव -
लासूर
रांग -
मार्ग -
जळगाव-चोपडा-लासूर
भाग 23
कण्हेरगड
गिरिदुर्ग
उंची -
६६०मी समुद्रसपाटीपासूनजवळचे गाव -
पाटणाखोरे
रांग -
मार्ग -
चाळीसगाव-पाटणाखोरे
अजिंठा-सातमाळ रांगेतील एका उत्रेकडे घुसलेल्या टोकावर क्न्हेर्गड आहे. कन्हेरगडाच्या पायथ्याला पाटणादेवी आहे. चाळीसगावावरून येथपर्यंत गाडीमार्ग आहे. राज्य परिवहनाच्या बसेस येतात. महादेव मंदिरापासून गडावर जाणारी पायवाट आहे. वाटेवर लेणी आहेत. शृंगारचौरी लेणी म्हणून यांस ओळखतात. गडाचा दरवाजा व भग्न तटबंदी आहे. माथ्यावर पानाची टाकी व इतर अवशेष आढळतात. गडावरून पितळखोऱ्याचे दृश्य चांगले दिसते, पेडका किल्ला दिसतो.
दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १९ चौगाव
भाग १९
चौगाव
सध्याची स्थिती
मार्ग
वनदुर्ग
उंची -
६६०मी समुद्रसपाटीपासून
जवळचे गाव -
चौगाव
रांग -
सातपुडा रांग
मार्ग -
जळगाव-चोपडा-चौगाव
दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १८ अमळनेर
भाग १८
सध्याची स्थिती
मार्ग
दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १७ पालचा किल्ला
भाग १७
सध्याची स्थिती
मार्ग
गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध उनपदेव
विविध प्रकारच्या दुर्मिळ वनौषधी वनस्पतींनी हा परिसर व्यापला आहे. या परिसरात सर्प, हरिण, मोरल, तडस, निलगाय, लानडोर आदि वन्य प्राणी पर्यटकांमध्ये लक्ष वेधून घेतात. पौराणिक महत्त्व असलेले हे तिर्थक्षेत्र प्रभू हरिश्चंद्र व श्री शरभंग ऋषिंच्या पदस्पर्शाने पुनीत झाले असून ह्याचा उल्लेख महर्षी वाल्मीकींनी मूळ रामायणात शरभंगस्थ सदेह स्वर्ग गमन असा केला आहे. गोमुखातून वाहणारे गरम पाणी सतत कसे वाहाते? पाण्याची उष्णता कमी अधिक का होत नाही ? असे कुतुहल निर्माण करणारे प्रश्न भेट देणाऱ्या पर्यटकांच्या मनात निर्माण होतात.
14 वर्षे वनवास भोगत असतांना प्रभू रामचंद्र येथे आले असता त्वचा रोगाने पीडित शरभंग ऋषिसाठी बाण मारून श्रीरामांनी या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती केली असल्याची अख्यायिका आहे. या गरम पाण्यांनी अंघोळ करून शरभंग ऋषिंनी पूर्ववत दिव्य शरीररूप प्राप्त झाल्याची माहीती तेथील ग्रामस्थ देतात. तर सातपुड्याच्या पर्वतरांगातील गंधकाच्या साठ्यातून या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती झाली आहे म्हणून अव्याहतपणे वाहणारे पाणी उष्ण असते. तर गंधक हे त्वचा रोगावरील उपचारांस उपयुक्त असल्याने त्वचारोग दुरूस्ती करण्यासाठी नागरीक हे पाणी घेऊन जातात. असे शास्त्रज्ञांचे मत आहे. संपूर्ण पौष महिनाभर या तिर्थक्षेत्राच्या परिसरात यात्रा भरते महाराष्ट्र सह मध्यप्रदेश, गुजरात येथील भाविक यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतात त्यामुळे यात्रा उत्सव काळात स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो.
सातपुड्याच्या पायथ्याशी हिरव्यागार सौंदर्याने नटलेल्या या तिर्थक्षेत्रास शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. शासनाच्या माध्यमातून येथे मनमोहक पॅगोडे, बगीचा, चिमुकल्यांसाठी मिनी ट्रेन, सभागृह, आर्कषक प्रवेशद्वार पर्यटकांसाठी आकर्षक ठरतात. तीर्थक्षेत्राच्या स्नान कुंडाच्या वरील बाजूस असलेले शरभंग ऋषिंची पुरातन गुंफा, श्रीमहादेव, गणपती, राम, लक्ष्मण, सितामाई, हनुमान यांचे मंदिर तसेच गोविंद महाराजांची समाधी म्हणून ओळख असणारी या उनपदेव या तिर्थक्षेत्रास भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. शासनाच्या विविध विभागाच्या योजनेतून या तिर्थक्षेत्रात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध कामे सुरू आहेत. एक दिवशीय पर्यटन स्थळ म्हणून उनपदेव हे नावारूपास आले असून या पर्यटनस्थळाला पर्यटक पसंती देत आहेत. वाढत्या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार मिळत असून त्यांच्या धनसंचयातही वाढ होत आहे.
पाटणा देवी - एक निसर्गरम्य वातावरण!
भटकंतीचा आनंद घेण्यासाठी प्रत्येकवेळी महाबळेश्वर, माथेरान, कोकण अशाच ठिकाणी जायला हवं असं नाही. महाराष्ट्रात सर्वदूर अशी बरीच ठिकाणं आपली वाट बघत आहेत. खान्देशच्या उंबरठ्यावर असलेला गौताळा अभयारण्य परिसर हे त्यातलेच एक.
भटकंतीचा आनंद
घेण्यासाठी प्रत्येकवेळी महाबळेश्वर, माथेरान, कोकण अशाच ठिकाणी जायला हवं
असं नाही. महाराष्ट्रात सर्वदूर अशी बरीच ठिकाणं आपली वाट बघत आहेत.
खान्देशच्या उंबरठ्यावर असलेला गौताळा अभयारण्य परिसर हे त्यातलेच एक.
औरंगाबाद पासून वेरूळ-कन्नड मार्गे ११० कि.मी. तर चाळीसगावपासून जेमतेम २०
कि.मी. वर असणारा हा सगळा प्रदेश. सातमाळा अजिंठा डोंगररांगांच्यामध्ये
वसलेले हे अभयारण्य खूपच रमणीय आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेले आहे.
श्रद्धाळू, पर्यटक, ट्रेकर्स, पक्षी निरीक्षक आणि पुरातत्व अभ्यासक या
सगळ्या लोकांच्या जिव्हाळ्याची ठिकाणे याठिकाणी उपलब्ध आहेत.
कन्नडच्या पुढे गेल्यावर एक रस्ता पितळखोरा लेणीकडे जातो. या लेणीच्या समोरून जाणारा कच्चा रस्ता सरळ डोंगराच्या खाली धवलतीर्थापाशी असलेल्या पाटणादेवी मंदिरापाशी उतरतो. जवळजवळ एक ते दीड तासांची ही डोंगरातली मस्त भटकंती आहे. इथे दुसऱ्या बाजूने पण जाता येते. पितळखोऱ्याकडे न जाता सरळ जाऊन औट्रम घाट उतरून पाटणे गावामार्गे आपण पाटणादेवीला जाऊ शकतो. या सगळ्या प्रदेशाला गौताळा-औट्रम घाट अभयारण्य असे नाव आहे. पाटणे गावाच्यापुढे ३ कि.मी. वर पाटणादेवी मंदिर आहे. पितळखोऱ्याच्या बाजूने असो किंवा पाटणे गावाकडून असो अभयारण्यात जाताना चेकपोस्ट लागते आणि तिथे नाममात्र शुल्क आकारले जाते. अभयारण्यात मुक्कामासाठी वनखात्याचे विश्रामगृह असून त्याचे आरक्षण औरंगाबाद इथे होते. शिवाय पाटणे गावात पाटणादेवी मंदिर ट्रस्टचे भक्तनिवास आहे. तिथेसुद्धा राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय होते.
हा परिसर फिरायचा तर किमान दोन दिवसांचा मुक्काम तरी करायला हवा. पाटणादेवी हे ठिकाण थोर गणिती भास्कराचार्य यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या चंडिका मंदिरात देवीची भव्य मूर्ती असून मंदिराच्या बाहेर दोन मोठ्या दीपमाळा आहेत. मंदिरात एक २४ श्लोकांचा देवनागरी लिपीतील शिलालेख असून तो भास्कराचार्यांचा नातू चंगदेव याने इ.स. १२०६ मधे कोरलेला आहे. त्यात तो भास्कराचार्यांची वंशावळ तसेच त्यांचे कार्य, त्याचसोबत यादव आणि निकुंभ राजघराण्याबद्दल माहिती देतो. याशिवाय सन १२०६ ला प्रभवनाम संवत्सर असताना श्रावण पौर्णिमेला चंद्रग्रहण होते त्यावेळी श्री सोन्हदेवाने आपल्या गुरूने स्थापिलेल्या मठाला दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. मठाला मंदिर दान दिलेली आहेच शिवाय पाटणे बाजारात जो व्यापार होई त्यावर काही कर बसवून तो मठाला दिल्याचा उल्लेखही इथे केलेला आहे. मंदिराच्या पाठीमागे उंचचउंच डोंगर उभे दिसतात. इथून एक रस्ता केदारकुंड या ठिकाणी जातो. अंदाजे २ कि.मी. ची जंगलातली पायपीट केली की तो रस्ता तीनही बाजूंनी असलेल्या डोंगरांनी बंद झालेला आहे. समोरच्या डोंगरावरून पावसाळ्यात धबधबा कोसळत असोत आणि त्याच्या पाण्यामुळे खाली मोठे कुंड तयार झाले आहे. ऐन जंगलात असलेले हे ठिकाण नितांत सुंदर असे आहे.
पाटणे गावातून देवीच्या मंदिराकडे जाताना वाटेत उजवीकडे रस्त्याचा फाटा एका महादेव मंदिराकडे जातो. इ.स. १२ व्या शतकात बांधलेले हे मंदिर कण्हेरगडाच्या मांडीवर वसलेले आहे. १० फूट उंचीच्या जोत्यावर असलेले हे मंदिर शिल्पसमृद्ध आहे. या मंदिराचे स्तंभ आणि बाह्यभागावर असलेली शिल्पकला केवळ सुंदर. या मंदिरातही एक २४ ओळींचा शिलालेख असून त्यात निकुंभ वंशातील राजांची वंशावळ दिलेली आहे. निकुंभ राजा इंद्रदेव याने हे मंदिर बांधायला सुरुवात केली आणि त्याचा पुत्र गोवन तिसरा याने ११५३ साली हे मंदिर पूर्ण केले असा स्पष्ट उल्लेख आहे.
मंदिराच्या शेजारून एक पायवाट कण्हेरगडाच्या डोंगराकडे जाते. पुढे ही पायवाट डोंगरावर चढते. चाळीसगाव इथल्या सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने जागोजागी फलक लावलेले आहेत. तसेच डोंगराचा चढावाचा भाग पायऱ्या खोदून सोपा केलेला आहे. इथे डोंगराच्या पोटात दोन लेणी खोदलेली आहेत. पाहिले आहेत ते नागार्जुन लेणे. हे जैन लेणे असून आत तीर्थंकरांची सुंदर मूर्ती, त्यांच्या बाजूला सेवक तसेच पुढे एका बाजूला सर्वानुभूती यक्ष तर दुसऱ्या बाजूला अंबिका यक्षी यांच्या सुंदर मूर्ती दिसतात. इथून आजूबाजूचा परिसर फार सुंदर दिसतो. या लेणीच्या काहीसे पुढे गेल्यावर सीतेची न्हाणी नावाचे अजून एक लेणे दिसते मात्र या लेणीत काहीही नाही. हीच पायवाट पुढे कण्हेरगड या किल्ल्यावर जाते. किल्ल्यावर तटबंदी आणि पाण्याचे एक टाके आहे. इथूनच समोर असलेला पितळखोरा लेणीचा डोंगर आणि त्याच्या माथ्यावर केलेले बांधकाम दिसते.
ह्या सगळ्या परिसरात असंख्य पक्षी आढळतात. मोर, सातभाई, कोतवाल, तांबट, हळद्या, खंड्या, धनेश, वेडा राघू, वटवट्या, बुलबुल अशा अनेक पक्षांचा कलकलाट सतत कानावर पडत असतो. ऐन थंडीत या ठिकाणी जाऊन एक वेगळेच विश्व अनुभवावे असे आहे. आपला आवाज बंद ठेवला तर जंगलाचा आवाज ऐकण्याची पर्वणी इथे अनुभवता येते. इथल्या अभयारण्यात बिबटे, तरस, डुकरे, लांडगे, ससा, माकड असे विविध पक्षी वसतीला आहेत. सातमाळा-अजिंठा डोंगराच्या कुशीत वसलेले हे गौताळा अभयारण्य आणि इथला परिसर हा आपला अनमोल ठेवा आहे. इथले वातावर गढूळ न करता आपण या वनसंपदेचा मनमुराद आस्वाद घ्यावा.
टीप: सदर माहिती ही लेखक आशुतोष बापट यांच्या fb आकाउंट वरुन घेतली आहे
पितळखोरे लेणी
पितळखोरे लेणी
शीर्षक गती गरज, या डॅनिश औरंगाबाद जिल्हा, तोफ म्हटले आहे. या Denise च्या साठी लोकप्रिय आहे.
शीर्षक लेणी, भारत एक प्राचीन लेणी आहे असे मानले जाते. या गुहा, सुमारे करून दुसऱ्या शतकात म्हणजे अजिंठा आणि वेरूळ लेणी leanca प्राचीन असल्याचे मानले जाते. या नवीन स्वच्छ, एक तपशीलवार अभ्यास बाहुली. For me.नाही. त्यांच्या गेल्या करण्यात आली आहे.
1. रचना. (Design)
या गेल्या काही गुहेत दुसरी गोष्ट आणि वर जा झाल्यास, huarun पावले खोदणे अप आहेत की एक. मुख्य गुहा मोठ्या बांधले. मध्यम भाग 35 स्तंभ नंतर पांढरा, काळा, रक्त, आणि एक तपकिरी किंवा टॅन रंग रंगविलेली सोनेरी बौद्ध संन्यासी कोण चित्रे घेऊन, तेथे आहेत. प्रतिभा आहे मध्ये छप्पर seanhannity आणि वरच्या छत्री, बुद्ध मूर्ती, तो शीर्षक करू इच्छित आहे. मुंडण केले मुले, आणि पुस्तके मूर्ती माणूस वर टेकून नमन करताना दिसतात. पुरुष आकृती दिसू लागले येथे कार्यालय. हे चित्र काल, अतिथी erwachen दिसते. मध्ये बांधले उशीरा कारवाई.3 विहार लेन नाही. 4 पाहण्याजोगे भागात गांधी शकते दुरुस्ती, आणि भाग जुळणे यांनी केले आहे. विहार लेन नाही. 4 हस्ते प्राचीन भारतीय वास्तु शिल्पा याची खात्री शो प्रेम करण्यासाठी प्रथम आहे. हे हत्ती अलंकार युक्ती बाहेर दोन्ही बाजूंना बेल लोंबता आणि करताना दिसते of the body. या नवीन प्रवेश धाडस पोर्टर, लक्षणीय आहेत. या शेवटच्या देखील एक उत्तम शिल्पे म्हणजे राजा-राणी गुहेत होता. या Rajantie, भारतीय शिल्पकला, क्षेत्रात आगळीक-from महत्त्व प्राप्त आहे.
भटकंती – अजिंठा डोंगराच्या कुशीतील गौताळा

>> आशुतोष बापट
सातमाळा-अजिंठा डोंगराच्या कुशीत वसलेले हे गौताळा अभयारण्य आणि इथला परिसर हा आपला अनमोल ठेवा आहे. इथले वातावर गढूळ न करता आपण या वनसंपदेचा मनमुराद आस्वाद घ्यावा.
भटकंतीचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक वेळी महाबळेश्वर, माथेरान, कोकण अशाच ठिकाणी जायला हवे असे नाही. महाराष्ट्रात सर्वदूर अशी बरीच ठिकाणे आपली वाट बघत आहेत. खान्देशच्या उंबरठय़ावर असलेला गौताळा अभयारण्य परिसर हे त्यातलेच एक. संभाजीनगरपासून वेरूळ-कन्नडमार्गे 110 कि.मी. तर चाळीसगावपासून जेमतेम 20 कि.मी.वर असणारा हा सगळा प्रदेश. सातमाळा अजिंठा डोंगर रांगांच्यामध्ये वसलेले हे अभयारण्य खूपच रमणीय आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेले आहे. श्रद्धाळू, पर्यटक, ट्रेकर्स, पक्षी निरीक्षक आणि पुरातत्व अभ्यासक या सगळ्या लोकांच्या जिव्हाळ्याची ठिकाणे येथे उपलब्ध आहेत.
कन्नडच्या पुढे गेल्यावर एक रस्ता पितळखोरा लेणीकडे जातो. या लेणीच्या समोरून जाणारा कच्चा रस्ता सरळ डोंगराच्या खाली धवलतीर्थापाशी असलेल्या पाटणादेवी मंदिरापाशी उतरतो. जवळजवळ एक ते दीड तासांची ही डोंगरातली मस्त भटकंती आहे. इथे दुसऱया बाजूने पण जाता येते. पितळखोऱयाकडे न जाता सरळ जाऊन औट्रम घाट उतरून पाटणे गावामार्गे आपण पाटणादेवीला जाऊ शकतो. या सगळ्या प्रदेशाला गौताळा-औट्रम घाट अभयारण्य असे नाव आहे.
हा परिसर फिरायचा तर किमान दोन दिवसांचा मुक्काम तरी करायला हवा. पाटणादेवी हे ठिकाण थोर गणिती भास्कराचार्य यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या चंडिका मंदिरात देवीची भव्य मूर्ती असून मंदिराच्या बाहेर दोन मोठय़ा दीपमाळा आहेत. मंदिरात एक 24 श्लोकांचा देवनागरी लिपीतील शिलालेख असून तो भास्कराचार्यांचा नातू चंगदेव याने इ.स. 1206 मध्ये कोरलेला आहे. त्यात तो भास्कराचार्यांची वंशावळ तसेच त्यांचे कार्य, त्याचसोबत यादव आणि निकुंभ राजघराण्याबद्दल माहिती देतो. याशिवाय सन 1206 ला प्रभवनाम संवत्सर असताना श्रावण पौर्णिमेला चंद्रग्रहण होते त्या वेळी श्री सोन्हदेवाने आपल्या गुरूने स्थापिलेल्या मठाला दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. मठाला मंदिर दान दिलेली आहेच, शिवाय पाटणे बाजारात जो व्यापार होई त्यावर काही कर बसवून तो मठाला दिल्याचा उल्लेखही येथे केलेला आहे. मंदिराच्या पाठीमागे उंचच उंच डोंगर उभे दिसतात. इथून एक रस्ता केदारकुंड या ठिकाणी जातो. अंदाजे 2 कि.मी.ची जंगलातली पायपीट केली की तो रस्ता तिन्ही बाजूंनी असलेल्या डोंगरांनी बंद झालेला आहे. समोरच्या डोंगरावरून धबधबा कोसळतो आणि त्याच्या पाण्यामुळे खाली मोठे कुंड तयार झाले आहे.
पाटणे गावातून देवीच्या मंदिराकडे जाताना वाटेत उजवीकडे रस्त्याचा फाटा एका महादेव मंदिराकडे जातो. इ.स. 12 व्या शतकात बांधलेले हे मंदिर कण्हेरगडाच्या मांडीवर वसलेले आहे. 10 फूट उंचीच्या जोत्यावर असलेले हे मंदिर शिल्पसमृद्ध आहे. या मंदिराचे स्तंभ आणि बाह्यभागावर असलेली शिल्पकला केवळ सुंदर. या मंदिरातही एक 24 ओळींचा शिलालेख असून त्यात निकुंभ वंशातील राजांची वंशावळ दिलेली आहे. निकुंभ राजा इंद्रदेव याने हे मंदिर बांधायला सुरुवात केली आणि त्याचा पुत्र गोवन तिसरा याने 1153 साली हे मंदिर पूर्ण केले असा स्पष्ट उल्लेख आहे.
मंदिराच्या शेजारून एक पायवाट कण्हेरगडाच्या डोंगराकडे जाते. पुढे ही पायवाट डोंगरावर चढते. चाळीसगाव इथल्या सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने जागोजागी फलक लावलेले आहेत. तसेच डोंगराचा चढावाचा भाग पायऱया खोदून सोपा केलेला आहे. येथे डोंगराच्या पोटात दोन लेणी खोदलेली आहेत. पहिले आहे ते नागार्जुन लेणे. हे जैन लेणे असून आत तीर्थंकरांची सुंदर मूर्ती, त्याच्या बाजूला सेवक तसेच पुढे एका बाजूला सर्वानुभूती यक्ष तर दुसऱया बाजूला अंबिका यक्षी यांच्या सुंदर मूर्ती दिसतात. इथून आजूबाजूचा परिसर फार सुंदर दिसतो. या लेणीच्या काहीसे पुढे गेल्यावर सीतेची न्हाणी नावाचे अजून एक लेणे दिसते, मात्र या लेणीत काहीही नाही. हीच पायवाट पुढे कण्हेरगड या किल्ल्यावर जाते. किल्ल्यावर तटबंदी आणि पाण्याचे एक टाके आहे. इथूनच समोर असलेला पितळखोरा लेणीचा डोंगर आणि त्याच्या माथ्यावर केलेले बांधकाम दिसते.
या सगळ्या परिसरात असंख्य पक्षी आढळतात. मोर, सातभाई, कोतवाल, तांबट, हळद्या, खंडय़ा, धनेश, वेडा राघू, वटवटय़ा, बुलबुल अशा अनेक पक्ष्यांचा कलकलाट सतत कानावर पडत असतो. ऐन थंडीत या ठिकाणी जाऊन एक वेगळेच विश्व अनुभवावे असे आहे. आपला आवाज बंद ठेवला तर जंगलाचा आवाज ऐकण्याची पर्वणी येथे अनुभवता येते. इथल्या अभयारण्यात बिबटे, तरस, डुकरे, लांडगे, ससा, माकड असे विविध पक्षी वसतीला आहेत. सातमाळा-अजिंठा डोंगराच्या कुशीत वसलेले हे गौताळा अभयारण्य आणि इथला परिसर हा आपला अनमोल ठेवा आहे. इथले वातावर गढूळ न करता आपण या वनसंपदेचा मनमुराद आस्वाद घ्यावा.
– ashutosh.treks@gmail.com
चोपड्यापासून अवघ्या २५ किमीवर उनपदेव हे ठिकाण करता येईल. येथे गरम पाण्याचे कुंड आहे. गोमुखातून कुंडात पाणी पडत राहते. या भागात पाण्याची पातळी खूपच खाली गेली आहे त्यामुळे कूप मालिकेतील पाणी पंपाद्वारे गोमुखात सोडले जाते असे कळले.
खूप छान विकास केला आहे जागेचा.
मनुदेवी हे चपाड्यापासून तासाभराच्या अंतरावरचे अजून एक मस्त ठिकाण. पावसाळ्यात येथे जायला खूप मजा येते. छानसा धबधबा आहे. याच्या डोहात डुंबताही येते. यावर्षी पाऊस कमी असल्याने येथे गेलो नाही पण गेल्या दोन दिवसात या भागात चांगला पाऊस झाल्याचे कळते. चौकशी करून जाऊ शकता.
शक्य असल्यास कुटुंब/मित्र मंडळींसोबत या दोन्ही ठिकाणी वन भोजनाला जा.
(काही मदत हवी असल्यास सांगा . मेहुणे चोपड्यातच आहेत "सुनील मेडिकल")
माझ्या याच फेरीतील उनपदेवचे काही फोटो
साने गुरुजी, विप्रो आणि अमळनेर
आता या घटनेला सुमारे ५५ वर्षं झाली. अभियांत्रिकी शाखेचं शिक्षण घेणारा तो तरुण स्टॅनफोर्ड विद्यापीठात परीक्षेची कसून तयारी करत होता. १९६६ मध्ये ११ ऑगस्टला या तरुणाला भारतातून आपल्या आईचा, गुलबानू यांचा अत्यंत दुःखी आवाजात फोन आला, वडिलांचं - मोहम्मद हुसेन यांचं निधन झाल्याचा. परीक्षेची जोरदार तयारी अर्धवट सोडून आणि वडिलांच्या निधनाने आलेली व्याकुळता घेऊनच तो तरुण काही कालावधीनंतर स्टॅनफोर्डला परतण्याचं ठरवून भारतात आला. सगळ्या कुटुंबावरच दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यातून सावरत असतानाच वयाच्या २१ व्या वर्षी या तरुणाच्या खांद्यावर कोणताही पूर्वानुभव नसताना वडिलांच्या उद्योग-व्यवसायाची अवचित जबाबदारी पडली. पण, या तरुणानेही माघार घेतली नाही. खंबीरपणे पाय रोवून येईल त्या परिस्थितीशी तोंड देत हा तरुण भारतातच राहिला. वडिलांनी स्थापन केलेल्या उद्योगाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी अगदी खानदेशातल्या भाजून काढणाऱ्या उन्हाळ्यात तीन महिने तो कामगारांसमवेत राहिला. जगद्विख्यात ‘विप्रो’ उद्योगसमूहाची बीजं अशी अमळनेरमध्ये रुजत होती... अन् तो तरुण, म्हणजे आजचे जगातील मोजक्या सर्वाधिक श्रीमंतांमध्ये गणले जाणारे विप्रो उद्योगसमूहाचे प्रमुख अजीम मोहम्मद हुसैन हशम प्रेमजी!
शिया मुस्लिम समाजातील प्रेमजी कुटुंब हे मूळचं बर्माचं. पुढे गुजरातमध्ये स्थायिक झालं. इंग्रजांच्या काही अटींमुळे तांदळाचा प्रमुख व्यापार सोडावा लागल्याने या कुटुंबातील मोहम्मद हुसैन प्रेमजींनी बराच शोध घेऊन मुंबईपासून सुमारे चारशे किलोमीटरवर असलेलं अमळनेर हे गाव आपल्या उद्योग-व्यवसायासाठी निवडलं. १९४५ मध्ये त्यासाठी त्यांनी Western India Vegetable Products Limited ही कंपनी स्थापन केली. वनस्पती तेलाचे किसान, सनफ्लॉवर, कॅमल हे ब्रॅण्ड; साबणाची उत्पादनं त्यांनी या अमळनेरच्या कारखान्यातून सुरू केली. वीस वर्षांत तीनशेच्यावर कामगार आणि ७ कोटींची उलाढाल झाली. भारताची फाळणी झाल्यावर मोहम्मद अली जिना यांनी स्वतः मोहम्मद हुसैन प्रेमजींना पाकिस्तानात आमंत्रित करून अर्थमंत्री करणार असल्याचं सांगितलं होतं; पण भारत हेच आपलं घर असल्याचं सांगून त्यांनी जिनांचा प्रस्ताव नाकारला. त्यांच्याच चिरंजीवांनी आपल्या कंपनीच्या नावातील काही अक्षरं घेऊन, भारतातच राहून ‘विप्रो’ हा ब्रॅंड विकसित केला. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी, दीड लाखापेक्षा अधिक कर्मचारी, हजारो कोटींचा नफा, जगातील १७५ शहरांत व्यवसाय आणि स्वतःची ५३ हजार कोटींची संपत्ती दान करून स्वतंत्र विश्वस्त संस्थेद्वारे शैक्षणिक, सामाजिक कार्यात मोलाचं योगदान देणाऱ्या अजीम प्रेमजी आणि ख्यातनाम ‘विप्रो’ कंपनीचं बीज अमळनेरमध्ये आहे, ही केवढी विलक्षण गोष्ट आहे!
अमळनेर हे खानदेशातील एक मोठं इतिहासप्रसिद्ध शहर. जळगाव जिल्ह्यात असलं तरी धुळ्याहून चोपड्याला जाताना वाटेत लागतं. साने गुरुजी आणि प्रख्यात प्रताप तत्त्वज्ञान मंदिराचे संस्थापक प्रतापशेटजी आणि प्रेमजींची ही कर्मभूमी. कला, साहित्य, उद्योग, व्यापार, आयुर्वेद, कुस्ती, अध्यात्म अशा सर्वच क्षेत्रांत ख्याती पावलेली, सखाराम महाराज अन् मनोहर महाराजांची ही भूमी.
महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात वसलेलं अमळनेर हे इतिहासकाळापासून प्रसिद्ध आहे. भिल्ल आणि गोंड राजे, पुढं यादवांची राजवट, त्यानंतर इथे फारूखी राजवट आली. इ.स. १६०० च्या सुमारास अकबराची, पुढील शतकात मराठ्यांची, त्यानंतर ब्रिटिशांची राजवट या परिसराने अनुभवली. पेशवाईच्या उत्तरार्धात मालेगावकर राजेबहाद्दूरांची अमळनेरवर सत्ता होती. शिवकाळात अमळनेरचा भुईकोट म्हणजे प्रमुख लष्करी ठाणं होतं. इथला खंदक आणि बुरुज आज काहीसं अस्तित्व टिकवून आहेत. पुढं १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या दरम्यान काही क्रांतिवीर साधू-फकिरांच्या वेशात इथल्या किल्ल्यात येऊन राहिल्याच्या नोंदी असल्याचं अभ्यासक केदार ब्रह्मे यांनी आपल्या अमळनेरवरील पुस्तकात म्हटलं आहे. बोरी नदीकाठी वसलेल्या या उद्योगभूमीमध्ये पूर्वीपासूनच लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत होती. अमळनेरची गेल्या शतकापूर्वीपासूनची ही वाटचाल खूपच रोमहर्षक आहे.
याच वाटचालीतलं प्रमुख नाव म्हणजे प्रतापशेठ. राजस्थानमध्ये जन्मलेल्या ‘प्रताप’ला चोपडा येथील श्रीमंत व्यापारी शेठ माणकचंद अग्रवाल यांनी दत्तक घेतलं. त्यांचं खरं नाव मोतीलाल माणकचंद; पण ते प्रतापशेठ म्हणून सर्वपरिचित. वडिलांच्या निधनानंतर व्यवसायाची, पेढीची जबाबदारी प्रतापशेठवर आली. पेढीचे जुने मुनीम असलेले सावळाराम नाईक मास्तर शेठजींना सतार शिकवण्यासाठी येत. एकदा उनपदेव या गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी हे गुरुशिष्य गेले असता, त्या वेळी झालेल्या चर्चेत प्रतापशेठ या आपल्या विद्यार्थ्याचा कल तत्त्वज्ञान या विषयाकडे अधिक असल्याचं नाईक मास्तरांना जाणवलं. शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या अभ्यास आणि प्रचारासाठी एखादी संस्था काढावी, असा मनोदय प्रतापशेठनी मास्तरांना बोलून दाखवला.
लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली देशभर ‘स्वदेशी’ची चळवळ गाजत होती. याच दरम्यान १९०४-०५ च्या सुमारास चोपड्यात प्रतापशेठनी स्वदेशी कपड्यांचं दुकान सुरू केलं. चोपडा आणि अमळनेर हे जवळच्याच अंतरावरील दोन तालुके. येवला येथील गंगाराम छबीलदास या प्रसिद्ध पेढीचे मालक वल्लभदासशेठनी, ‘‘एवढ्या किरकोळ कपडेविक्रीनं काय होणार; स्वतःची मिल काढा.’’ असा निरोप प्रतापशेठना दिला. त्यांनीही हा निरोप मनावर घेतला आणि १९०६ मध्ये अमळनेरला प्रताप कापड गिरणीची स्थापना केली. १९०८ मध्ये ती सुरू झाली. ५६ एकरांपेक्षा अधिक जागेतील ही कापड गिरणी म्हणजे अमळनेरच्या आर्थिक बदलाची नांदी ठरली. इतकंच नाही, तर प्रतापशेठनी याच दरम्यान तत्त्वज्ञान केंद्राचीही स्थापना केली.
आपले नाईक मास्तर अमळनेरलाच रहावेत म्हणून ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी’ (आजचं प्रताप तत्त्वज्ञान केंद्र) ही प्रतापशेठजींनी स्थापन केलेली संस्था या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेली आहे. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी जागतिक ख्यातीचे विचारवंत इथे येऊ लागले. या परिसरात गेल्यावर शांतिनिकेतनचीच आठवण यावी. १९२५ मध्ये भारतीय भाषांसह फ्रेंच आणि जर्मन शिक्षणाची सुविधाही या केंद्रात होती. गुरुदेव रानडे, प्रो. जी. आर. मलकानी, एस. के. मैत्रा, डी. डी. वाडेकर, आत्मारामशास्त्री जेरे, डॉ. सुलभा पाणंदीकर, डॉ. सुरेंद्र बारलिंगे या दिग्गजांमुळे ही संस्था नावारूपास आली. ‘फिलॉसॉफिकल क्वार्टली’ हे इंग्रजी त्रैमासिक आणि ‘परामर्ष’ अशी हिंदी-मराठी नियतकालिकं ही तत्त्वज्ञानविषयक गाजलेली अभ्याससाधनं म्हणावी लागतील. १९२३ मध्ये या संस्थेत साने गुरुजी फेलो म्हणून दाखल झाले. पुढे प्रतापशेठनीच स्थापन केलेल्या खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या प्रताप हायस्कूलमध्ये १७ जून १९२४ ला शिक्षक म्हणून साने गुरुजींनी प्रवेश केला. त्यानंतर १९४२ पर्यंत म्हणजे तब्बल १८ वर्षं गुरुजी अमळनेरमध्ये होते. राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या या संस्थेचं तिथे महाविद्यालयदेखील आहे.

साने गुरुजींची बहुतांशी साहित्यसंपदा इथलीच. इथल्या विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक म्हणून ते ज्या खोलीत राहात, ती खोली आजही जतन करण्यात आली आहे. तिथे आपण गेलो की, ‘श्याम ते साने गुरुजी’ हा पांडुरंग सदाशिव साने या गुरुजींचा जीवनप्रवास आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. ‘विद्यार्थी’ हे मासिक आणि ‘काँग्रेस’ हे साप्ताहिक गुरुजींनी इथेच सुरू केलं. याशिवाय रोज ते स्वतःच्या हस्ताक्षरांत ‘छात्रालय’ दैनिकही प्रकाशित करत असत. १७ मे १९३० रोजी ब्रिटिशांनी साने गुरुजींना अटक केली ते अमळनेरमध्येच. साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून अमळनेरचं महत्त्व खूपच आहे. १८७२ मध्ये ब्रिटिशांच्या काळात स्थापन झालेल्या व्हिक्टोरिया नेटिव्ह जनरल लायब्ररीचं १९७२ मध्ये ‘साने गुरुजी ग्रंथालय’ असं नामकरण करून अमळेनरकरांनी त्यांची स्मृती कायमस्वरूपी जतन करून ठेवली आहे.
‘पुरुषोत्तमयोग, भगवद्गीतेची गुरुकिल्ली’ या ग्रंथांचे लेखक असलेल्या प्रतापशेठ यांचं उद्योग, शिक्षण, तत्त्वज्ञान, साहित्य, सामाजिक क्षेत्रांतील योगदान हे अभूतपूर्वच आहे. रविकिरण मंडळाचे संस्थापक कवी माधव ज्युलियन हेही काहीकाळ अमळनेरला होते. ‘संगमोत्सुक डोह’ ही त्यांची गाजलेली कविता त्यांना अमळनेरच्या रेल्वे पुलाजवळ नदीला मिळणाऱ्या एका ओढ्याच्या काठावर सुचली, अशी नोंद आहे.
पुण्यातील पेशव्यांशी संबंध असलेले सखाराम महाराज आणि नागपूरकर जानोजीराव भोसले घराण्याशी संबंध असलेले मनोहर महाराज हे दोघेही पंढरपूरची वारी पायी करत. संत सखाराम महाराज संस्थानतर्फे वैशाख शुद्ध एकादशीस मोठी मिरवणूक आणि रथयात्रा असते. खानदेशातील महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उत्सव म्हणून सर्व जाती-धर्मांचे लोक यात सहभागी असतात. रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान हा मुसलमान समाजाकडे देण्यात आला आहे. आद्य सखाराम महाराज, बाळकृष्ण महाराज आणि प्रल्हाद महाराजांच्या समाधीसह प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेरमध्ये विठ्ठल-रखुमाई मंदिरासह वीसपेक्षा अधिक मंदिरं, मशिदी, चर्च आणि जैन बांधवांची प्रार्थनामंदिरं आहेत. बोरी नदीच्या ऐलाड आणि पैलाड या नावाने ओळखला जाणारा हा अमळनेरचा समृद्ध ऐतिहासिक वारसा तपशिलाने समजावून घ्यावा असाच आहे.
भीम - बकासूर युध्द आणि विखुरलेले तांदूळ
![]() |
| भीमाच्या पाऊलाचा ठसा |
महाभारत काळात भीमाने बकासुराचा
वध केला ती एकचक्र नगरी म्हणजेच आताचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल हे गाव असे मानले जाते.
या एरंडोल पासून १० किलोमीटरवर आणि जळगाव
पासून ३१ किलोमीटर अंतरावर पद्मालाय
नावाचे गणपतीचे प्रसिद्ध देवस्थान आहे. मंदिराच्या प्रवेश्वदाराजवळ मोठं धान्य दळण्याचे
मोठ जातं आहे. मंदिराच्या बाजूला असलेल्या तलावात वर्षभर विविध रंगाची कमळ फुललेली
असतात म्हणून हे पद्मालंय. या पुरातन मंदिरात उजव्या आणि डाव्या सोंडेच्या गणपतीच्या
मूर्ती एकाच गर्भगृहात आहेत. याला अर्धपीठ म्हटले जाते. मंदिरात पितळेची मोठी घंटा
आहे.
![]() |
| पद्मालय |
मंदिराच्या मागाच्या बाजूस
मंदिरापासुन १.५ किलोमीटर अंतरावर एका ओढ्यात भीमकुंड आहे. दाट जंगलाची पार्श्वभूमी असलेल्या
एका ओढ्यात (भीमच्या) पायाच्या आकाराचे कुंड आहे. भीमकुंडा पर्यंत जाण्यासाठी पायऱ्या
आणि शेवटच्या टप्प्यात पाऊलवाट आहे. भीमाने बकासुरचा वध याच परिसरात केला होता असे
मानले जाते.
![]() |
| भीम कुंड |
त्याचा पुरावा म्हणून ओढ्यात
असलेला भीमच्या पायाचा ठसा (त्यामुळे तयार झालेले भीम कुंड ) दाखवतात, तसेच कातळात
असणारे "तांदूळ" दाखवतात. महाभारतातल्या कथेनुसार एकचक्र (एरंडोल ) गावाच्या
रहिवाश्यां ऐवजी अन्नाने भरलेला गाडा घेऊन भीम बकासुराला भेटायला गेला. त्यानंतर त्यांच्यात
झालेल्या युद्धात गाडा उलटला आणि गाड्यातले तांदूळ विखूरले. ते तांदुळ आजही कातळावर
दिसतात असे इथले लोक मानतात. भीमकुंडाकडे जातंना पायर्या संपल्यावर पाऊलवाट चालू होते
तेथून भीमकुंडापर्यंत हे स्फटीक असलेले दगड पाहायला मिळतात.
![]() |
| "मेगा पॉरफॅरी बेसॉल्ट" |
![]() |
| विखुरलेले तांदूळ (Mega porphyry Besalt) |
या ठिकाणी "मेगा पॉरफॅरी बेसॉल्ट" ( Mega porphyry Besalt) आहे. महाराष्ट्रात बेसॉल्ट हा अग्निजन्य खडक मोठ्या प्रमाणावर आढळतो. ज्वालामुखीच्या स्फोटानंतर लाव्हारस जमिनीच्या पोटातून बाहेर येऊन जमिनीवर पसरतो. त्या पासून बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. हा लाव्हारस हवेच्या किंवा पाण्याच्या संपर्कात येऊन लवकर थंड झाल्यास त्यातील खनिजांचे स्फटीक बनण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या बेसॉल्ट खडकामध्ये स्फटीक असले तरी ते मायक्रोस्कोप खाली बघावे लागतात. आपल्या डोळ्यांना मात्र काळा कातळच दिसतो.
लाव्हारस जमिनीतून बाहेर आल्यावर, त्यावर अजून
एखादा लाव्हारसाचा थर जमा झाला तर, खालचा लाव्हारस हळूहळू थंड
होतो. त्यामुळे खनिजांचे स्फटीक बनण्यास पुरेसा
वेळ मिळतो आणि ३ ते ४ सेंटीमीटर लांब आणि साधारणपणे १ सेंटीमीटर रुंद असे आयताकृती
खनिजांचे स्फटीक तयार होतात. अशा प्रकारच्या दगडाला "मेगा-पॉरफॅरिटीक बेसॉल्ट"
असे म्हटले जाते. कालांतराने हा दगड भूपृष्ठावर आल्यावर त्या दगडात पांढर्या रंगाचे
स्फटीकांचे तुकडे दिसायला लागतात.
![]() |
| Bheem Kund |
भीमकुंड परिसरात दिसणारे विखुरलेले
तांदुळ म्हणजेच हा "मेगा-पॉरफॅरिटीक बेसॉल्ट" आहे. कुठल्यातरी काळातल्या
चतूर माणसाने हा दगड पाहून याला महाभारतातल्या भीम - बकासूर युध्दाची कथा चिकटवली आणि
या दंतकथेचा जन्म झाला.
या प्रकारचा मेगा पॉरफॅरी बेसॉल्ट" ( Mega porphyry Besalt) खडक पुरंदर
किल्ल्यावर वरच्या टप्प्यातही आढळतो. तसेच महाराष्ट्रात बरेच ठिकाणी पाहायला मिळतो.
![]() |
| मेगा-पॉरफॅरिटीक बेसॉल्ट |
भीमकुंड परिसर सुंदर आहे. या परिसरात दाट जंगल आहे. वाहात्या ओढ्याच्या काठी थोडावेळ विश्रांती घेऊन पायर्या चढून पुन्हा पद्मालय परिसरात आलो. मंदिर परिसरात ताज्या माव्याचे अप्रतिम मोदक मिळतात. बकासूराचे स्मरण करत इथली इथली तिखट जाळ मिसळ आणि मोदक खाऊन जळगावच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला. जळगावला गेलात तर महाभारताच्या कथेत गुंफ़लेल्या या ठिकाणाला नक्की भेट द्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऎनारी गुहा (बकासूर वाडा) येथेही भीम आणि बकासुराचे युध्द झाले असे मानले जाते .
विशेष आभार :- बोरकर सर आणि अभिजीत घोरपडे सर


































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.