पाऊस पडायला लागला की सर्वांना मस्त पाण्यात डुंबायला, भिजायला आवडते. मग सुरु होते पावसाळी सहलीची लगबग, कुठे जायचे कसे जायचे याची चर्चा. म्हणुनच आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मुंबईजवळील बारवी नदीवर बांधलेल्या बारवी धरणाच्या परिसराची माहिती.
तर बारवी धरणाला भेट देण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक आहेत ती मध्य रेल्वेवरील अंबरनाथ आणि बदलापूर स्थानके. त्यामुळे लोकल ने जायचे झाल्यास सकाळी लवकरच प्रवास केलेला बरा. नाहीतर स्वत:चे वाहन असल्यास सकाळी लवकर रस्तेमार्गे जाणे योग्य कारण उशीरा निघाल्यास रस्तेमार्गे जाताना वाहतुकीत वेळेचा खोळंबा होण्याची शक्यता असते.
अंबरनाथ किंवा बदलापूरवरून बारवी धरणाकडे दोन्ही बाजूने हिरवीगार झाडीतून जाणारा नागमोडी रस्ता पार करीत जेव्हा धरणाजवळ पोहोचतो त्यावेळी बारवी धरणाचा काठोकाठ भरलेला जलाशय आणि तिथले नयनरम्य निसर्ग पाहिल्यावर प्रवासात जाणवलेला थकवा कुठल्याकुठे पळून जाईल व एकदम मोकळ्या हवेत ताजेतवाने झाल्यासारखे वाटेल.
हा परिसर जंगलाने वेठलेला असल्यामुळे रस्त्याने येताना काही जंगली पशुपक्षी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका व घाबरुन त्यांना कोणती ईजा करू नका, कारण आपण त्यांच्या निवासस्थानात आलो आहोत याचे भान ठेवून वागले पाहिजे.
धरणाच्या परिसरात तुम्ही पक्षी निरिक्षणही करु शकता. आणि शक्यतो धरणाच्या पाण्यात मजा मस्ती करताना थोडी सावधानता बाळगा कारण धरणाच्या पाण्यात असंख्य भवरे आहेत त्यामुळे जीवाशी खेळ होईल असे कृत्य करू नये. येथे येताना खाण्यासाठी घरुनच खाण्यासाठी डबा आणलेला बरा. कारण येथे लोकवस्ती नसल्यामुळे आपल्या पोटोबाची सोय आपणच केलेली बरी. अन्यथा परतीच्या वाटेवर काही उपहार गृहे आहेत तेथे तुम्ही जेवण करू शकता.
धरणाचा परीसर पाहून आणि पाण्यात मजा मस्ती करून झाल्यानंतर तुम्ही इतक्या जवळ आलाच आहात तर अंबरनाथचे प्रसिद्ध प्राचिन शिवमंदिर पाहून घरची वाट धरु शकता.
अशाप्रकारे एक पावसाळी सहल सहज करु शकाल.
*विषेश सुचना धरण तसेच जंगल परिसरात आपल्यामुळे कुठेही कचरा होणार नाही याची काळजी घ्या.
तुम्हाला माहीती कशी वाटली ते आवर्जून कमेंट्स करून आम्हाला कळवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास सामायिक (शेअर) करा आणि सभासद व्हा (सबस्क्राईब करा).
जवळील ठिकाण : अंबरनाथचे प्रसिद्ध प्राचिन शिवमंदिर.
कधी जायचे : साधारण ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात.
कसे जायचे : मुंबईमधून जायचे झालेतर मध्य रेल्वेच्या अंबरनाथ किंवा बदलापूर लोकलने उतरून जाता येते.
स्वत:चे वाहन असल्यास उत्तम.
जिल्हा : ठाणे
राज्य : महाराष्ट्र
Badlapur Step Well - a rare historical site
I came to know of a rare historical site not too far away from Mumbai – in a town called Badlapur. I got this information from a fellow wanderer and avid history buff – Amar Reddy.
Having seen his photographs of the well, I was keen to cycle to Badlapur and locate the well. I got the approximate location and directions from Amar, and went on an exploratory cycling ride to Badlapur.
Badlapur is located to the north east of Mumbai city, and the best way to reach there is either the local train to Badlapur railway station, or by road to Bandlapur via the Shilphata – Kalyan road and take the diversion on pipeline road towards Ambernath. Badlapur is just ahead of Ambernath.
Dawn breaks as I climb the hill at Shilphata road
From Badlapur Village I go south along the northern banks of the Ulhas
river to reach Devaloli, a sleepy little village with just about a dozen
houses and a small school
The well is located in an open field beside a clump of houses behind the Hanuman Temple in Devaloli
The well has a narrow band of steps leading down to the water level
There are two compartments on either wall of the steps to hold lights
A panel of exquisitely carved figures adorns the top of the archway at the far end
At the centre of the panel is the image of Lord Ganesha, the favourite elephant-headed God in Maharashtra
To the right of Lord Ganesha is a figure that looks like a priest or a bramhin
To the left of Lord Ganesha, the second figure with sword and shield seems like a warrior
A flower motif on the archway. This resembles the yellow colored flower that grows wild in these areas
Another flower in this decorative carving on the arch
On both sides of the steps, there are two carved animals whose heads
have disintegrated but the tails indicate that they may have been
monkeys
The water level was still quite good considering this was in March
A small lion head carved on the arch
One self photo for the record!
I spent time chatting with Mr. Vishay over a cup of hot tea served by
his daughter in law. Their house is right next to the well
He said that the well has been here since at least 3 generations that
his family has lived here. He did not know about its origin
As I headed back, I noticed that the only sign in the village was this
school that was just a small little tiled roof hut that could barely
accommodate a few kids
I met one shepherd family that was tending to their sheep
He knew of the well, but could not shed any light on any additional info
His father, wearing an impressive “pagdi” was curious why I would cycle over 120 kms just to see a well
They showed off the latest addition to the herd – a baby goat!
As I reached Badlapur village, I noticed a pond full of bright red water lilies
It was already past noon when I reached Ghansoli from the climb up and
down Shilphata, and I had the pleasure of downing a few glasses of cool
Neera
https://bijoor.me/2016/06/25/badlapur-step-well-a-rare-historical-site/
अंबरनाथ

मध्य रेल्वेच्या मुंबई-कर्जत उपनगरीय मार्गावरील अंबरनाथ मात्र एक लोकल गाडय़ांचं टर्मिनस स्थानक म्हणून सर्वत्र ओळखलं जातं. त्याव्यतिरिक्त काडेपेटय़ांचा कारखाना आणि लष्करी दारूगोळा उत्पादन करणाऱ्या कारखान्याचे ठिकाण इतपतच लोकांना परिचित आहे, पण औद्योगिकीकरणात झपाटय़ाने बदलत्या या शहराला प्राचीन इतिहासापासून मानाचं स्थान आहे हे तेथील प्रख्यात शिवमंदिरामुळे. आज शहरीकरणाचा अंगरखा धारण करतानाही अंबरनाथ पूर्वेकडील या मंदिर परिसराचा सारा मोहल्ला आपल्या मूळच्या ग्रामीण खुणा जागोजागी दाखवतोय.. अंबरनाथ हे नाव बहुतेक अमरनाथ म्हणजेच शिवशंकर यावरुन पडले असावे. अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस सुमारे दीड कि.मी.वर हे एक हजार वर्षांचे पुरातन मंदिर पाहताक्षणीच एखाद्या परडीमध्ये ठेवलेल्या आकर्षक पुष्पगुच्छासारखे भासते. भारतातील प्रत्येक प्रांतामधील मंदिर स्थापत्य कला ही अजोड कलाकृती असल्याने त्यातील काही मंदिरांनी हजारो वर्षांपासून आपलं स्थान अबाधित ठेवलंय. त्यातील अंबरनाथच्या या शिवमंदिराला आता हजार वर्षांचा काळ लोटला आहे. हेमाडपंती वास्तुकला म्हणून या मंदिराचा लौकिक जनमानसात असला तरी स्थापत्यशास्त्रीय भाषेत ही ‘भूपिज’ शैली म्हणून ओळखली जाते.

‘वालधुनी’ ऊर्फ ‘वढवाण’ नदीच्या एका उपनदीवर तथा ओढय़ावरील काठावर हे मंदिर उभारले आहे. सध्या सांडपाणी वाहून नेणारा हा ओढा मंदिराच्या अनोख्या सौंदर्याशी पूर्णत: विसंगत वाटतो, तसेच सभोवतालच्या गलिच्छपणाने मंदिर परिसराला एक ओंगळ स्वरूप आणून दिलंय. शिलाहारराजा छित्तराजने हे मूळ मंदिर बांधले असले तरी हे बांधकाम पूर्णत्वास नेऊन त्याचा जीर्णोद्धार छित्तराजपुत्र ‘मुम्मुणी’ ऊर्फ ‘ममवानी’ यांनी इ.स. १०६० मध्ये केल्याचा उल्लेख एका शिलालेखात आढळतो. आता मंदिराचा कळस अस्तित्वात नाही हे जरी खरं असलं तरी कळसाचे काही भग्नावशेष मिळवण्यात बर्जेस सारखे संशोधक यशस्वी झालेत.
मंदिर म्हणून गणले जाते.मंदिरातील गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग असून तिथपर्यंत जाण्यासाठी आठ फुटी खोलीच्या दगडी पायऱ्यांवरून जावे लागते. लोखंडी कठडा घालून त्याचे आगमन-निर्गमनासाठी दोन भाग करण्यात आले आहेत. येथील प्राचीन शिवलिंग काळ्या पाषाणाचे आहे. या गाभाऱ्याच्या चौफेर भिंती भक्कम असून त्याची उंची २१ मीटर आहे. गाभारा आणि मंदिराला जोडणारे जे दालन आहे. त्यातून आपण मंडपाकडे येतो याला दक्षिण पश्चिमोत्तर अशी तीन मजबूत प्रवेशद्वारे आहेत. मंडपावरील चार खांबावरील शिल्प-नक्षीकाम खूपच आकर्षक आहे, तर मंडपावरचे छतावरील नक्षीकाम देखणे आहे. लोनाड मंदिरातील छताप्रमाणेच अनेक वर्तुळांची गुंफण करून अप्रतिम शिल्पकलेतून सौंदर्य वाढवले आहे.
मूळच्या सुमारे १८ खांबांच्या भव्य मंडपात प्रवेश केल्यावर
सध्या त्यातील चारच खांब स्पष्टपणे दिसताहेत. उर्वरित खांबाचे अस्तित्व
फारसे जाणवत नाही. वेरूळच्या विश्वविख्यात शिल्पाकृतीप्रमाणे जराही जागा न
सोडता प्रत्येक खांब नक्षीकामांनी सुशोभित करून मंदिराचे सौंदर्य खुलवण्यात
येथील अज्ञात कलाकार यशस्वी झालेत. सभामंडपाचे छत आणि कळसाचा भाग यामधील
भाग पोकळ आहे. हा सभामंडप आणि गाभाऱ्याची बाह्य बाजू अनेक कोनांनी सुशोभित
करताना भूमितीशास्त्राचा उपयोग केल्याचे जाणवते. त्यामुळेच मंदिरात
दिवसभरात छाया -प्रकाशाचा खेळ अनुभवता येतो.मंदिराच्या बाहेरील भिंतींवर अनेक देव-देवतांच्या शिल्पांचे दर्शन घडते. हजारो वर्षांची नैसर्गिक स्थित्यंतरे आणि मानवनिर्मित प्रदूषणांनी यातील काही शिल्पांचे अस्पष्ट दर्शन घडते. या शिवमंदिराला अनेक हत्तींच्या कोरीव कामाची पाश्र्वभूमी आहे. जणू काही अनेक हत्तींच्या पाठीवरच या मंदिराचा डोलारा आहे.
मंदिर प्रदक्षिणा करताना मंदिराच्या भव्यपणासह बाह्य़ांगावरील अनोखी शिल्पाकृती आपलं लक्ष वेधून घेतात. यात उजव्या सोंडेची गणेशमूर्ती, त्रिशूलधारी शिवमूर्ती, लक्ष्मीमाता यांचे दर्शन घडते. विशेष म्हणजे प्रत्येक मूर्तीच्या कलाकृतीतून शिल्पकारांना मानवी जीवनाला आवश्यक असा संदेश द्यायचा आहे, असाच जणू त्यापाठीमागे गर्भित अर्थ आहे.
हळेबीड-बेलूरची आठवण व्हावी असे एक महादेवाचं मंदिर इथे आहे. मंदिराचे प्रवेशदाराजवळ एक शिलालेख आढळते. रॉयल एशियाटीक सोसायटीच्या एका खंडात हा इ. स. १०६० चा शिलालेख छापला आहे. मंदिराच्या प्रवेशदारापाशी दोन नंदी आहेत. एका नंदीच्या गळयात शिवलिंग आहे. आत शिरल्यावर अठरा खांबांचा भव्य सभामंडप दिसतो त्यातले चारच खांब आता दिसतात ज्यावर सुरेख नक्षीकाम दिसते. बाकीचे खांब मात्र भिंतीत बुजले आहेत. मंडपाचे छत व कळस यामझे पोकळी आहे.कोनात जोडून असलेल्या गाभाऱ्यामुळे ऊनसावल्यांचा वेधक दृष्य पहायला मिळते. संपूर्ण मंदिर सव्वादोनशे कोरीव हत्तींच्या पाठीवर बांधलेले आहे. मंदिराच्या बाह्यांगाला चारी बाजूला विविध शिल्पे आहेत. त्यात त्रिशूल घेतलेली शिवमूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शिवपार्वती विवाह, हंसारुढ ब्रम्हदेव, वराहरुढ विष्णू ,ऊजव्या सोंडेचा गणपती, नृत्यांचे आविष्कार, शृगांरिक कामशिल्पे आढळतात. काळाच्या ओघात त्यात बरीच पडझड झालेली आहे.
मंदिराच्या उत्तरद्वारानजीक एक छोटेखानी कक्ष आहे. त्यात शिवलिंगासह पार्वतीची मूर्ती आहे. हे बांधकाम मूळच्या मंदिरानंतरचे असावे. मंदिरासहीत साऱ्या परिसराचे दगडी बांधकाम असल्याने स्वच्छतेसह वातावरणात गारवाही आहे. गाभाऱ्यातील अभिषेकजल प्रथम कुंडात आणि नंतर ओढय़ात सोडण्याची व्यवस्था या मंदिर बांधकामात आहे.
शिवाच्या जीवनाशी निगडीत असे ठळक प्रसंग या मंदिरातील कोरीव कामातून दिसतात. त्यात उत्पत्ती, स्थिती, आणि लय या शिवाच्या तीनही भावांचे दर्शन घडविणारी त्रिमूर्ती आहे. तर एका शिल्पात शिवपार्वती विवाह सोहळ्याचे दर्शनही घडते. याशिवाय आरसाधारी तरुण स्त्री, नृत्यांगना, द्वारपाल, विष्णू, महिशासूर मर्दिनी, गणपती यांच्या मूर्ती शिल्पकाराने रेखीवपणे निर्माण केल्या आहेत. या साऱ्या मूर्तीतून त्यांच्या सहजपणामुळे त्या सजीव वाटतात. आणि या मूर्तीशी संबंधित त्या काळची वस्त्र, आभूषणे आणि वेशभूषेचीही कल्पना येते. मंदिराच्या बाहेरील बाजूवर आपल्या दृष्टीक्षेपात येईल अशी एक पट्टी कोरलेली आहे. त्या लहानशा जागेतून अनेक शृंगारिक शिल्पाकृती आपल्या नजरेत भरतात.

सभामंडपातील कोरलेले खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच होय. सभामंडपाच्या मध्यभागावरील झुंबर त्याच्या भोवतालची वर्तुळे, घुमट, त्यावरचे नक्षीकाम फारच सुरेख आहे. गाभारा दिवसाउजेडी पाहिला तर आतील भागात योगी शिव कोरलेला दिसतो. सभामंडपापासून दहाबारा पाय-या उतरल्यावर गाभारा दिसतो. त्यात एक स्वयंभू काळया पाषाणाचे शिवलिंग व दुसरे घडीव गारगोटीचे शिवलिंग आहे. आंबा, चिंच यांची दाट राई इथे एकेकाळी असावी असं वाटतं. वढवाण नदीच्या ऐन काठावर हे मंदिर सहज लक्षात येत नसलं तरी प्रेक्षणीय नक्कीच आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.