Thursday, December 9, 2021

हेमांडपंथी भोंडा महादेव मंदिर, नागपुर

 

 

काही दिवसांपूर्वी नागपुरास जाऊन आले. १० दिवसांचा मुक्काम होता. बि.एडचे कॉलेज सुटले की अजुबाजुला फेरफटका मारणे, अभ्यास करणे आणि झोपणे या व्यतिरिक्त काही काम नव्हते..
काही वस्तू खरेदी करण्यासाठी बर्डीला जाणे झाले..’बर्डी’ नागपुरची मोठी बाजरपेठ.. आपल्या दादर सारखी..
या बाजारपेठेच्या एका टोकाला एक पुरातन मंदिर लांबून दृष्टीस पडले आणि माझ्यातली इतिहासाची अभ्यासिका जागी झाली… माहीत नाही या पुरातन मंदिरांना आणि डोंगरांना पाहून काय होते!!! पण कधी एकदा ती वास्तु पाहते असे होते..त्यांचं ते मोहक रूप डोळ्यांत भरून घ्यावेसे वाटते.
झालं तर मग, मी आणि माझा “निक्कु”…. (माझा Nikon कॅमेरा हो…) एक शनिवार पाहून निघलो…. पण या वेळी माझा “सहपाठी” नव्हता सोबत.. :(
बजाजनगरहून बर्डीचा प्रवास म्हणजे दिव्यच… school auto rikshaची आठवण झाली.. एक छोट्या रिक्षेत ८ जणं….जीव गुदमरायचा…असो…पण पर्याय नव्हता…
बर्डीला उतरून स्टेशनच्या दिशेने ५-७ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूला तारेच्या कुंपणाने वेष्टीत  छोटेखानी महादेवाचे मंदीर दिसते..तेच भोंडा महादेव मंदिर…
पूर्वभिमुख असलेले हे मंदिर ३०० वर्षांपूर्वीचे आहे. हेमाडपंथी असलेल्या या मंदिरला आकशात झेपावणारा सुंदर कळस आहे. मंदिर आकाराने फार लहान. पण त्यावरील कलाकुसर मन मोहुन टाकते.
मंदिरासमोर मोठे पटांगण आहे. समोरच एका ५ फुट उंच शिळेला शेंदुर लाऊन तिचे पुजन केलेले आहे.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारच्या खांबांवर कमळ आहे.वर गणेशाची सुबल मुर्ती कोरली आहे.
पायरी चढून वर गेलो की संगमरवरी नंदी दिसतो. गाभार्‍याच्या बाहेरील भिंतींवर द्वारपाल, श्रीकृष्ण, राधा, शेषशयनी व्यंकटेश, समुद्रमंथन इत्यादी कोरीवकाम आहे.
गर्भगृहात शंकराची संगमरवरी नवीन पिंड बसविली आहे. नित्यपूजनाने वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न वाटते.
मंदीराच्या बाहेरील भिंतींवरील कलाकुसर तर डोळ्याचे पारणे फेडते. विष्णूचे दशावतार , मुनी, गोपिका, वादक, नर्तिका, अनेक पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत.
तिथल्या एका भक्ताकडून कळले की हे मंदिर मिलेट्रीच्या आवारात येते, म्हणून मंदिराची देखभाल, सफसफाई वेळेवर आणि नीट होते.
तासभर बसून मंदीराचे सौंदर्य न्याहाळून पुन्हा हॉस्टेलला निघाले… पण अनोळखी शहरात एखादा ओळखीचा माणूस अचानक भेटावा आणि आपल्याला अत्यानंद व्हावा, तसा आनंद सोबत घेऊन हॉस्टेलला आले..

 https://durgvihartrek.blogspot.com/2016/12/blog-post_39.html

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...