Thursday, December 9, 2021

लोणारचे दैत्यसुदन मंदिर

 

 लोणारचे दैत्यसुदन मंदिर हे पश्र्चिम विदर्भातील सर्वात मोठे व सर्वात सुंदर मंदिर समजले जाते. त्यावर अभंग, एकभंग, द्विभंग व चतुर्भुंग मूर्तीही आहेत. हे मंदीर 105 फूट लांब व 95 फूट रुंद आहे. मंदिरासभोवती प्रशस्त असे फरसबंद आवार असून त्यात उत्सव मंडप असल्याचे संकेत आहेत. हे मंदिर उत्तर चालुक्य राजा विजयादित्य अर्थात विक"मादित्य सहावा याने त्याची पत्नी पूर्णादेवी हिच्या आग"हास्तव, त्रिभुवनकिर्ती नावाच्या शिल्पीच्या मार्गदर्शनानुसार 11 व्या शतकात नवरात्र तांत्रिक पद्धतीने बांधले आहे. हे मंदिर पूर्णपणे उखडून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जसे आहे तसे उभे करता येते. याचे मु"य प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून, सध्या ते दुर्दैवाने नगरपालिकेच्या वाचनायलयाच्या मागे झाकले गेले आहे. याची रचना त्रिदालन पद्धतीची आहे. समोर मु"य मंडप, दोन्ही बाजूला उपमंडप आहेत. हे मंदिर सप्तस्तराच्या व्हरांड्यावर आहे. याच्या विमानावर (भिंतीवर) अतिशय दुर्मिळ शिल्पे आहेत.

1) आदित्यनारायण 2) मल्हारी 3) विष्णू धनुष्य व परशुधारक परशुराम 4) अंधासुराचा वध करणारा शंकर 5) विषकन्या 6) इराणचा सूर्य 7) बलराम दोनपत्नींसह सर्परूपात. या शिल्पात कृष्णाची जन्मकथा वेगळीच आहे. पहारेकऱ्यांनीच वसुदेवाच्या ताब्यात जन्मत: कृष्णाला दिला व त्याला सकाळ होण्यापूर्वीच परत येण्याची विनंती केली. मंदिराच्या अंतराळात छतावर लवणासुर वध व गंगावतरण शिल्प प्रेक्षणीय आहेत व त्यावरून धार ही हिंदूंची आहे, असा निकाल 1944 साली दिला गेला. सध्याची मूर्ती नागपूरकर भोसले यांनी पाठवली आहे.
हे महानुभाव पंथियांचे महत्त्वाचे स्थान आहे. येथे श्री चक"धर स्वामी राहत होते. देवगिरीचे राजे कृष्ण देव स्वामी यांची येथे भेट झाली होती. त्यासंबंधी या मंदिर परिसरात दोन शिलालेख आहेत.
विवराच्या आत अष्टतीर्थ आहेत. त्यात पद्मावती म्हणजे कमळजा देवीचे मंदिर आहे. हे स्थान मराठवाडा, विदर्भ व खानदेशच्या बऱ्याच लोकांची कुलदेवता आहे.त्या मंदिरासमोर सासू-सुनेची विहीर आहे. यात सरोवराकडील पाणी खारे व मंदिराकडील पाणी गोड आहे. यात शुक"ाचार्यांची वेधशाळा आहेत. तिच्या सभामंडपात अष्टदिक्‌पाल आहे. पापहरेश्र्वराच्या मंदिरासमोरील नंदी मंदिराच्या पायऱ्यांवर होयसाळ राजाचे राजचिन्ह आहे. सितान्हाणीसमोर राष्ट्रकुटकालीन कुमारेश्वर मंदिर आहे. धार परिसरात शिवमंदिरे आहेत. धारेच्या उत्तरेकडे निद्रा योगातील हनुमंत आहे. ही मूर्ती चुंबकीय आहे. त्याच्याजवळच अशनीपाताने तयार झालेले अंबर सरोवर आहे. अशा रितीने लोणार हे शिल्पांचे माहेरघर आहे.






                         
                                      झोपलेला मारुती

                                                       मंदिरावर कोरलेली गणेशाची मूर्ती



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...