इंडोनेशियाचा (मला जमेल तसा लिखित) इतिहास
रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया (इंग्रजी: Republic of Indonesia )हा हिंदी महासागरातील १७५०८ बेटांचा समुह आहे. याची लोक संख्या दोन कोटी चौतीस लाख आहे.
या देशाचे इस्ट तिमोर, मलेशिया व पापुआ न्युगिनी हे शेजारी देश आहेत. तसेच भारत(अंदमान निकोबार बेटे) , फिलिपाइंस, ऑस्ट्रेलिया व सिंगापूर हे ही शेजारी देश आहेत.
हा देश साडेतिनशे वर्षे डच अधिपत्या खाली होता. मात्र दुसर्या महायुद्धा नंतर इंडोनेशिया स्वतंत्र झाला.
जकार्ता ही देशाची राजधानी आहे. येथील मुख्य भाषा भाषा इंडोनेशिया आहे. या शिवायही येथे अनेक बोली भाषा आहेत जसे भाषा जावा, भाषा बाली, भाषा सुंडा, भाषा मदुरा. येथे कावि नावाची एक प्राचीन भाषा आहे. येथील प्रमुख साहित्यिक ग्रंथ याच भाषेत आहेत. कावि भाषेतील भिन्नेक तुंग्गल इक - विभिन्नतेत एकता - हे या देशाचे घोषवाक्य आहे.
यातील जावा हे बेट सर्वात मोठे असून त्या बेटावरील लोकांचे देशावर प्रभुत्व आहे. इंडोनेशिया मध्ये जगातली एक सर्वात मोठी जैवीक विवीधता आहे.
इतिहास
जीवाष्म अवषेशां वरून काढलेल्या निष्कर्शां नुसार पहिला आदिमानव येथे पाच लाख वर्षांपुवीचा सापडतो. याला जावा (इंग्रजी: जावामॅन) पुरुष म्हणून ओळखले जाते.
असे मानणारा एक प्रवाह आहे की, सुमारे २००० वर्षांपुर्वी येथे पुर्वेकडील देशां मधून म्हणजे तैवान मधून लोक आले व त्यांनी या भागाला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी भातशेती व इतर कला कौशल्य मिळवले. भारत व चीन या दोन्ही देशांशी असलेल्या व्यापाराने या देशाची संस्कृतीला आकार दिला. सातव्या शतकात श्रीविजय या नाविक प्रबळ असलेल्या राजाने हिंदु तसेच बौद्ध धर्म यांना स्थान दिले.
त्या नंतर शैलेंद्र व मातारम यांनी अनुक्रमे बोरोबदूर (आठवा अर्निको हा येथे पुर्वी आलेला लेख!) व प्रंभनन हे धारमीक शहरे वसवली. मजापहीत हे हिंदु राज घराणे तेराव्या शतकात जावा बेटावर सत्तेत आले. हा काळ इंडोनेशियाच्या इतिहासातले सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो.
प्राचीन राजे, वंश व साम्राज्य
- श्रीविजय राजवंश
- शैलेन्द्र राजवंश
- सञ्जय राजवंश
- माताराम राजवंश
- केदिरि राजवंश
- सिंहश्री
- मजापहित साम्राज्य
मात्र त्या नंतर मुसलमान व्यापारी व्यापाराच्या उद्देशाने येथे आले हळू हळू जम बसवत त्यांनी सुमात्र बेटावर ठाणे वसवले. येथून इंडोनेशियाच्या मुसलमानीकरणाला सुरवात झाली. सोळाव्या शतका पर्यंत बहुतेक भाग मुसलमान झाले होते.
इ.स. १५२१ मध्ये येथे पहिल्यांदा युरोप खंडातून पोर्तुगीज लोक आले. त्यांना येथील मसाल्याचे पदार्थ हवे होते. त्य नंतर ब्रिटिश व डच आले. डच लोकांनी डच इस्ट इंडिया कंपनी स्थापन करून येथे अंमल बसवला. इ.स. १८०० मध्ये त्यांनी इंडोनेशियाला आपली वसाहत म्हणून घोषीत केले.
दुसर्या महायुद्धात जपानी आक्रमण पाहिल्या नंतर स्वातंत्र्याच्या भावनेने येथे मूळ धरले. जपानच्या शरणागती नंतर इ.स. १९४५ मध्ये सुकार्नो यांनी अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. पण नेदलँडने आपला अंमल बसवण्याची धडपड सोदली नाही. शेवटी डिसेंबर इ.स. १९४९
मध्य इंडोनेशियाने स्वातंत्र्य मिळवले.
भारताचा संबंध
या देशाचा भारताशी पुरातन संबंध आहे.
भारतातल्या पुराणांमध्ये याचा उल्लेख दीपांतर भारत म्हणजेच समुद्रापारचा भारत असा आढळतो. दीपांतर हे नाव इंडोनेशिया मध्ये अजूनही प्रचलित आहे.
सुमारे पाचशे वर्षांपुर्वी हा देश एक हिंदु देश होता. परंतु नंतर त्यातले बहुसंख्य लोक बाटवून मुसलमान करण्यात आले. व हा देश मुसलमान गणला जायला लागला. जाही इंडोनेशियाच्या बाली नावाच्या बेटावर सुमारे ९०% लोक हिंदु आहेत. हिंदु धर्माला येथे आगम हिन्दु धर्म या नावाने ओळखतात. येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत या मंदिरांना चंडी नावाने ओलखले जाते. कारण यातले बहुतेक मंदिरे चंडी देवीच्या उपासनेसाठी स्थापन करण्यात आली होती.
सद्य स्थिती
इ.स. २००४ मध्ये आलेल्या सुनामी लाटा या देशाचा मोठ्या प्रमाणात विध्वंस करून गेल्या. येथील आचे नावाचे राज्यात किमान दिड लाख लोक मृत्युमुखी पडले होते.
इंडिया व आशिया यांचा संगम येथे होतो म्हणून इंडोनेशिया यास पुर्वी इंडोचायना असेही म्हणत.
फुटीरतावादी शक्ती येथे कार्यरत आहेत. आचे बंडा हा मुस्लीम भाग स्वतंत्र होण्यासाठी मागणी करतो आहे.
इ.स.१९९८ मधील आर्थीक धक्क्यातून हा देश सावरण्याचा प्रयत्न करतो आहे. या मंदी मध्ये जागतिक बँक यांचा सल्ला घेणे अडचणीचे ठरले होते. मात्र सुनामी लाटा व भुकंपप्रवण क्षेत्र असल्याने अर्थव्यवस्थेवर नैसर्गिक आपत्तींचा ताण आहे.
पुढिल आठवणींचा संदर्भ "पूर्वरंग"...पण पुस्तक समोर नसल्याने चु भु द्या घ्या
१) इंडोनेशियन भाषेत पश्चिम दिशेलाच "बारत" म्हणतात
२) इथेही स्त्री ला वनिता म्हटलं जातं
३) मुसलमान देश असला तरी नोटेवर गणपती आहे, शिवाय अगदी मुसलमान घरांच्या दारावरही गणेश कोरलेला आढळतो. मुलांना 'ग्' गणेशाचा शिकवला जातो. (इथे पु.लंचे वाक्य आठवले... 'आपण मात्र धर्मनिरपेक्षतेच्या "भितीने" ग गद्द्याचा करून घेतला आहे :)) " )
४) प्रसिद्ध राजा सुकार्नो (सुकर्ण?) हे नावही तसे संस्कृतोत्भव वाटते. त्यांचीपुत्री मेगावती (मेघावती?) यांचे सध्या शासन आहे (परत चु भु दे घे)
इंडोनेशियन "बहासा " (बहासा हे भाषा???) भाषेत दिशा
पश्चिम = बारात
उत्तर = उतारा
दक्षीण = सलातान
पूर्व = तिमोर
आठवणीतले इंडोनेशियन संस्कृतोद्भव शब्द --
उत्तरा = उत्तर दिशा
बूमी = भूमी
बहासा = भाषा
राजा = राजा
इंडोनेशियन (बहासा इंडोनेशियन) ही इंडोनेशियाची अधिकृत भाषा आहे. खरंतर ही मलाय भाषेची एक बोली आहे जिला इंडोनेशियन भाषा म्हणून सन १९४५ मध्ये स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात अधिकृतरीत्या स्वीकारले गेले. त्याआधीही १९२८ पासून "इंडोनेशियन युवक प्रतिष्ठान"नुसार त्यास अधिकृत भाषेचा दर्जा दिला होता.
इंडोनेशिया हा जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने ४था मोठा देश आहे. आणि या देशातील एकूण लोकसंख्येपैकी सहज बहासा बोलणारी जनता जवळ जवळ १००% आहे. त्यामुळे "बहासा इंडोनेशियन" ही जगातील सर्वात जास्त बोलल्या जाणार्या भाषांपैकी एक गणली जाते. बरीचशी इंडोनेशियन जनता बहासा इंडोनेशियन बरोबरच इतर स्थानिक बोलीभाषेतही पारंगत असते. मात्र सगळे दस्तऐवज, शिक्षण, पत्रकारिता आणि अधिकृत संभाषणाच्या इतर माध्यमात बहासा इंडोनेशियन हीच भाषा कटाक्षाने वापरण्यात येते. ईस्ट तिमोर या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशातही इंडोनेशियन भाषा ही इंग्रजीबरोबरच दुसरी राष्ट्रभाषा आहे. बर्याच जुन्या इंग्रजी दस्तऐवजांमध्ये अजूनही ह्या भाषेचा उल्लेख केवळ "बहासा" असा केलेला आढळेल.
टिपः वरील परिच्छेद विकीवरही चढवले आहे ;)
बरीचशी इंडोनेशियन जनता बहासा इंडोनेशियन बरोबरच इतर स्थानिक बोलीभाषेतही पारंगत असते. मात्र सगळे दस्तऐवज, शिक्षण, पत्रकारिता आणि अधिकृत संभाषणाच्या इतर माध्यमात बहासा इंडोनेशियन हीच भाषा कटाक्षाने वापरण्यात येते.
नाहीतर आपल्याकडे केवळ दुकानाच्या पाट्यांवर मराठी दिसलं पाहिजे म्हटलं तर केवढा आकांडतांडव
इंडोनेशिया मध्ये कवी नावाची भाषाही होती.
काय पण नाव आहे... पण मेली बिचारी भाषा... सरकारने तीची लिपीच लंपास केल्यावर काय होणार?
तशी ही इंडोनेशियातली खरी प्राचीन भाषा असावी.
या देशातले काव्य याच भाषेत लिहिले गेले म्हणे. नावावरून तरी कवी व संस्कृत भाषेचा जवळचा संबंध आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या भाषेची आपली लिपी होती. ही लिपी पल्लव या भाषेवरून तयार झाली होती.
या पल्लव भाषे विषयी कुणाला काही माहीती आहे का हो? शिवाय पल्लाव नि संस्कृतचे काय संबंध होते?
वर आलेल्या (लेख आणि प्रतिसादातील) माहीती व्यतिरीक्त अजून काही:
- मुसलमान धर्म आणि हिंदू संस्कृती या एकाचवेळी आत्मसात करून नांदू शकणारा एक देश - कदाचीत सुडोसेक्युलर्स आणि बरखा दत्त सारख्या रीपोर्टर्सना अजून तेथे "फंडींग" मिळत नसावे :)
- गरूड हे विमानसेवेचे नाव
- सुकर्णो ह्या नावाचा इतिहासः त्यांच्या वडीलांना (त्यांचे नावपण हिंदूच आहे, पण आत्ता लक्षात नाही) महाभारतातील कर्ण आवडायचा पण त्यातील दुर्गुण आवडत नसत - त्या मुळे त्यांनी नाव सुकर्णो ठेवले - त्यांच्या मुलीचे नाव "सुकर्णोपुत्री"
- देशाचा "नॅशनल हिरो" : - राम (ऐकीव माहीतीप्रमाणे, चुक असल्यास कृपया सांगावे).
एक प्रश्नः (ज्याच्या उत्तरात असा चांगला विरोधाभास कसा असू शकला याचे उत्तर असावे):
इंडोनेशियात मुस्लीम धर्म हा व्यापारांमुळे आला - पण तो आपलासा करावा असे तेथील बहुसंख्यांना वाटले म्हणून तेथे वाढला की तलवारीच्या जोरावर?
मला मिळालेल्या माहितीनुसार बरेचदा 'इतर मुसलमान' इंडोनेशियन मुसलमानांना आपले समजत नाहीत. याचे कारण म्हणजे हे लोक मुर्ती पुजा करतात व सर्व आचार हिंदु धर्मा प्रमाणेच करतात. त्यामुळे मुस्लीम नावे असली तरी लोक तसे हिंदुच आहेत. सुमात्राच्या बाजूचे सुलतानाच्या जवळपासचे जरा मुस्लीम आहेत इतकेच. (ही एका इंडोनेशियन माणसाने दिलेली माहीती आहे.)
रामायणात किष्किंधाकांडात पूर्वेकडील यवद्विपाचा उल्लेख येतो. हेच जावा बेट असे सांगितले जाते.
यत्नवन्तो यव द्वीपम् सप्त राज्य उपशोभितम् ।
सुवर्ण रूप्यकम् द्वीपम् सुवर्ण आकर मण्डितम् ॥ ४-४०-३०
वर संस्कृतभाषेवर अन्याय झाला असल्यास क्षमस्व. तज्ज्ञांनी सुधारणा करावी.
श्लोकात यव आणि त्याच्या आसपासच्या सात राज्यांचा (बेटांचा) उल्लेख येतो. श्रीविजय या जुन्या राजघराण्याबद्दल मध्यंतरी वाचन केले होते... आता संदर्भ तपासायला हवेत. (थोडक्यात थोडा विसर पडला आहे. :))
बाली या बेटाचे मूळ नाव वालीद्विप असे होते, हे बालीतील काही कोरीव शिलालेखातून कळते.
असो. लेख आवडला.
इंडोनेशियातील काही मूळ नावे नंतर साफ बदलली गेली, एक उदा. जकार्ता
जकार्ताचे पूर्वीचे नाव सुंदकल्प, दुसर्या महायुद्धात जपान्यांनी बदलून जकार्ता केले.
लेखनाच्या जोडीला नकाशा पण हवा. गूगल -अर्थवरून केलेला इंडोनेशियाचा नकाशा देत आहे. यात भारताची आणि इतर देशांची भौगोलिक रचना दिसून येईल.
जगाबद्दलचं ज्ञान वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रवास करणं, असं सांगितलं जातं. सर्व काळातील काही जिज्ञासू लोक हे न दिसणारं पाहण्यासाठी आणि अज्ञात जाणून घेण्यासाठी जगभर प्रवास करत असत. इब्न बतूता (Ibn Battuta) याला सर्व काळातील महान प्रवासी मानलं जातं. चौदाव्या शतकातील इब्न बतूतानं वयाच्या विसाव्या वर्षी प्रवास सुरू केला व पुढं अफ्रिका, आशिया आणि दक्षिण पूर्व युरोपात बऱ्याच ठिकाणी गेला. १३३४ मध्ये इब्न भारतात आला आणि मुहम्मद बिन तुघलक यांच्या साम्राज्यात न्यायी भूमिका बजावण्यासाठी ८ वर्षं राहिला. जवळपास २९ वर्षांत त्यानं एक लाख २० हजार किलोमीटर्सचा प्रवास केला. इब्न बतूतासारखेच मार्को पोलो, वास्को द गामा, ख्रिस्तोफर कोलंबस, जेम्स कुक, चार्ल्स डार्विन इत्यादी अफलातून प्रवासी होऊन गेले. साधन नसताना ही जिज्ञासू माणसं न दिसणारं पाहण्यासाठी फिरायची, एक्सप्लोर करायची आणि जगासाठी काहीतरी नवीन शोधायची!
आता तर आपल्याकडं साधनं आहेत. फक्त गरज आहे ती जिज्ञासू होण्याची, हो की नाही? तर मित्रांनो, जरा विचारपूर्वक काही पावलं उचलायला सुरुवात करा. वय आणि वेळ या दोन्ही गोष्टींचा जास्त विचार करू नका. ठरवलं तर सगळं शक्य आहे!
आज पुन्हा एकदा आग्नेय आशियातील देशाबद्दल तुम्हाला सांगणार आहे. इंडोनेशिया हा देश द्वीपसमूहांनी बनलेला असून, तिथं सतरा हजार बेटं आहेत. इंडोनेशिया पूर्वी डच ईस्ट इंडीज (किंवा नेदरलँड्स ईस्ट इंडीज) म्हणून ओळखलं जात असे. द्वितीय विश्वयुद्धानंतर, इंडोनेशियानं १९४५ मध्ये नेदरलँड्सपासून आपलं स्वातंत्र्य घोषित केलं. तथापि, त्याचा स्वातंत्र्याचा संघर्ष १९४९ पर्यंत सुरू राहिला, जेव्हा डचने अधिकृतपणे इंडोनेशियन सार्वभौमत्वाला मान्यता दिली. सध्या या देशाची लोकसंख्या सत्तावीस करोड आहे, तर ‘इंडोनेशियन’ ही तेथील प्रमुख भाषा आहे. जकार्ता (Jakarta) ही इंडोनेशियाची राजधानी.
‘अद्भुत इंडोनेशिया’ असं तेथील सरकारचं पर्यटन घोषवाक्य आहे. इंडोनेशियातील उष्णकटिबंधीय जंगलं (Tropical Forest) ही ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची जंगलं आहेत आणि तितक्याच भयानक वेगानं तिथं वृक्षतोड केली जाते, ही दुर्दैवी गोष्ट आहे. तसंच, इंडोनेशियामध्ये शंभरहून अधिक सक्रिय ज्वालामुखी (Active Volcanoes) आहेत आणि शेकडो अधिक नामशेष मानले जातात. ते चंद्रकोराच्या आकाराच्या रेषेत देशाच्या बाहेरील बाजूने, सुमात्रा आणि जावा (Java) मार्गे फ्लोरेस (Flores) पर्यंत, नंतर उत्तरेला बांदा समुद्रातून (Banda Sea) उत्तरेकडील सेलेब्सच्या (Celebes) ज्वालामुखींच्या जंक्शनपर्यंत धावतात. जावामधील मेरापी पर्वत (Mount Merapi) व केलुड पर्वत (Mount Kelud) येथे वारंवार ज्वालामुखींचा उद्रेक होतो. अनेकदा रस्ते, शेतं आणि गावांचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो; परंतु मातीला नेहमीच मोठा फायदा होतो. परंतु काहीवेळा ते विशेषतः विनाशकारी असू शकतं, कारण त्याच्या मोठ्या तलावातील पाणी उद्रेकाच्या वेळी बाहेर फेकलं जातं, ज्यामुळे मोठा गाळ पसरतो, जो मैदानात घाईघाईने खाली येतो आणि त्यांच्या समोरील सर्व काही वाहून घेऊन जातो. मित्रांनो, जावामधील काही सक्रिय ज्वालामुखी पाहता येतात. तिथं मोठ्या प्रमाणात पर्यटन होतं आणि तो अनुभव फारच अफलातून असतो.
मे ते सप्टेंबर हे महिने इंडोनेशियात फिरायला जाण्यासाठी चांगले समजले जातात. तिथं बघण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत; जसं की, बोरोबुदुर (Borobudur) येथील बौद्ध स्तुपाची भौमितिक परिपूर्णता, योगकर्तामधील शॅडो कठपुतळी, बाटिक डाइंग आणि इतर प्राचीन कला आहेत. तसंच, ताना तोराजा (Tana Toraja) येथे मृत्यूचे विधी वेगळ्या पद्धतीनं होतात म्हणून तो कायम एक अभ्यासाचा आणि ते विधी पूर्वीपासून बघण्याचं आकर्षण राहिलं आहे. बाली येथील प्रेक्षणीय तांदळाचं टेरेस आणि बांधलेली मंदिरं. बालीजवळ गावंच्या गावं कलाकारी क्षेत्रात फार अप्रतिम कामं करतात. उबुड नावाचं गाव तर जगाच्या नकाशावर कलाकारीसाठी प्रसिद्ध आहे. तिथं विविध पेंटिग्ज् किंवा पुतळे कमी किमतीत मिळतात.
भव्य गिली बेटांवर उष्णकटिबंधीय वातावरणाचा आनंद घेतला पाहिजे. बाली सर्फिंगचं पवित्र ग्रेल, उलुवातु येथे परिपूर्ण लहर पहा. संपूर्ण बेटांवर विखुरलेल्या डाइव्ह साइट्सवर रंगाच्या कॅलिडोस्कोपमध्ये रमून जा. कोमोडो नॅशनल पार्कमधील जगातील सर्वांत मोठ्या सरड्याला समोरासमोर बघण्याचा अनुभव घ्याल तर नक्कीच तो अविस्मरणीय असेल. पापुआच्या बालीम (Papua Baliem) व्हॅलीमधील दानी (Dani) गावाचा ट्रेक असेल किंवा देशभरात इतर बरेच ट्रेक्स करण्यासारखे आहेत. साहसी, जंगल, समुद्र, ज्वालामुखी, इत्यादी सर्वच पर्यटन अनुभवण्यासाठी इंडोनेशिया अतिशय भारी देश आहे.
बाली, मेडान, लेक टोबा, मानाडो, कोमोडो, योग्याकर्ता, गिली बेटं, जकार्ता इत्यादी ठिकाणांना भेटी दिल्या पाहिजेत. तसंच राजा अम्पट बेटं, फ्लोरेस बेटं, बुकिट लावंग, ब्रोमो टेंगर सेमेरू राष्ट्रीय उद्यान व लोंबोक या जागांना जगभरातील पर्यटक आवर्जून भेटी देतात. बालीला ‘Island of the Gods’ असंही म्हटलं जातं. तिथं जाण्यास फ्लाइट तिकीट महाग जातं; पण नीट बुक केलं तर स्वस्तही पडतं. इंडोनेशिया हा फार पसरलेला देश आहे; पण तिथं १००% बजेट ट्रॅव्हल होऊ शकतं. कंबोडिया आणि व्हिएतनाम नंतर आग्नेय आशियातील फिरण्यासाठी हा तसा स्वस्त देश आहे. आपण जर नीट बॅकपॅकिंग ट्रिप केली, तर दिवसाला ३५ ते ५० अमेरिकन डॉलर इतका खर्च येतो. २०२१ पर्यंत, इंडोनेशियामध्ये नऊ जागतिक वारसास्थळं आहेत, त्यांपैकी पाच सांस्कृतिक स्थळं आहेत आणि चार नैसर्गिक आहेत. यामुळं सर्वाधिक साइट्स असलेला दक्षिणपूर्व आशियाचा हा देश ठरतो. इंडोनेशिया हे एक विशाल राष्ट्र आहे, ज्यामध्ये स्थानिक प्रदेशातून निर्माण झालेल्या शेकडो संस्कृतींचा समावेश आहे, ज्यामुळं ते जगातील सर्वांत वैविध्यपूर्ण देशांपैकी एक बनलं आहे.
“Traveling—it leaves you speechless, then turns you into a storyteller,” असं इब्न बतूता म्हणायचा. प्रवास करताना आपण जर जिज्ञासू असाल तर भरपूर नवं पाहता येतं, अनुभवता येतं आणि मग ते जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करायचं. सर्वांना स्टोरिज् सांगायच्या, त्यांच्या ऐकायच्या आणि ही अशी पर्यटनाची देवाण-घेवाण वाढवायची. जग लई भारी आहे… थोर लोकांनी कुठल्या काळात कसा प्रवास केला असेल असा नुसता विचार जरी केला, तरी आपण आवाक् होऊन जाऊ. आपल्याकडं तर सारं आहे… वृत्ती मात्र एक्सप्लोर करण्याची पाहिजे. मग बघा, जिंदगी वसूल होते की नाही…!
प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.