काय आहे रे गोव्यात बिकनी, बिच आणि बीयर? हे वाक्य अनेकदा ऐकले होते. तसे बघायला गेले तर हे काही खोटे नव्हते. मी याआधी जेंव्हाही गोव्याला गेलो ते फक्त उत्तर गोवा, दक्षिण गोवा मधले समुद्र किनारे, दोन मोठी चर्च, शांता दुर्गा मंदिर आणि मंगेशीचे मंदिर येवढेच केले होते. या व्यतिरीक्त गोव्यात खरच काही आहे का हा प्रश्न मलाही पडला होता. मी तसा फार पूर्वी काही कामानिमित्त सांकलीच्या भागात गेलो होतो पण तेंव्हा सुद्धा मी काम झाल्यावर उत्तर गोवा दक्षिण गोवा असाच फिरलो होतो. त्यावेळी म्हापशाच्या मासेबाजारात मारलेला फेरफटका मात्र कायम लक्षात राहिला.

(दिवार )
गोव्यात बीच शिवाय काय आहे असा विचार करणारे एका महत्वाच्या मुद्दयाकडे दुर्लक्ष करतात तो म्हणजे गोवा हा त्याच सह्याद्रिचा किंवा पश्चिम घाटाचा भाग आहे जो भाग जगात त्याच्या जीवसृष्टीसाठी प्रसिद्ध आहे. पश्चिम घाट जो त्याच्या विपुल Flora and Fauna साठी जगभरात प्रसिद्ध आहे ते गोव्यात देखील आहे. घाट म्हटला की धबधबे आले परंतु एक दूधसागर धबधबा सोडला तर इतर धबधब्यांची फारशी कुणाला माहिती नसते. दूधसागरला जाण्यात दिवस मोडतो म्हणून मंडळी तिथे जाण्याचे टाळतात आणि फक्त समुद्रकिनारे फिरुन परतात. त्याचमुळे जेंव्हा मी गोवा सायकलींग टूर विषयी वाचले तेंव्हा ठरविले हा वेगळा गोवा सायकल चालवित शांतपणे अनुभवायचा. टूर दिवार द्विपपासून सुरु होणार होता. बऱ्याचदा दक्षिण गोव्यात जाताना दिवार दुरुन बघितले होते, जुआरी नदीच्या पलीकडे दिसनाऱ्या त्या हिरव्या दाट झाडीच्या आड मानववस्ती आहे याचेच पूर्वी नवल वाटत होते. तेंव्हा तिकडे जाण्याचे सुद्धा आकर्षण होतेच.

मार्ग

गोवा या राज्यात पाच वन्यप्राणी अभयारण्य (Wildlife Sanctuary) आहेत. बोंडला, म्हादेई, भगवाण महावीर अभयारण्य किंवा मोलेम नॅशनल पार्क, नेत्रावली आणि कोटिगाव असे पाच अभयारण्य गोव्यात आहेत. यात बोंडला हा भाग फारच छोटा आहे, इथेल प्राणीसंग्रहालय बघायलाच पब्लीक जातात. नेत्रावली मधे ब्लॅक पँथर हि दुर्मिळ प्रजाती आढळते असे वाचले होते. अर्थात आम्हाला दौऱ्यात कोणत्याही प्राण्याचे दर्शन झाले नाही फक्त जागोजागी ब्लॅक पँथर आणि बिबट्याचे फोटो होते. सायकल दौऱ्याचा मार्गाची आखणी आयोजकांनी ट्रॅफिक आणि पर्यटकांची गर्दी टाळणे हा मुख्य उद्देश समोर ठेवून केली होती. सायकल चालविताना याची सतत जाणीव होत होती. दौऱ्याचा मार्ग भगवान महावीर अभायरण्य़, नेत्रावली अभियारण्या मधून जाणारा होता तर कोटिगाव अभयारण्याच्या जवळून जाणारा होता. तीन दिवस घनदाट जंगलातून जाणारा निसर्गरम्य मार्ग होता तर शेवटल्या दिवशी पूर्वी कदंबांची राजधानी असनाऱ्या चांदोर या शहरातून जाणारा होता.

(दिवार वरुन निघताना फेरीत सायकील टाकल्या आणि निघालो)
दिवार द्विपावरुन फेरीमधे आमच्या सायकली टाकल्या आणि तेथून बिचोलीला आलो. तिथून बिचोली, सांकली या मार्गाने खाली दक्षिण गोव्याच्या दिशेने निघालो. काही अंतरातच होंडाच्या पुढे आम्ही मुख्य रस्ता सोडून आतल्या रस्त्याने मॉलेमच्या दिशेने निघालो. रस्ता सरळ नव्हता मधे बऱीच वळणे होती. जीपीएस आणि आयोजक या दोघांच्या मदतीने आम्ही चाललो होता. मागे भगवाण महावीर अभयारण्याविषयी भाटुपाचा एक विडियो बघितला होता. त्या विडियोत बघितलेले नेचर नेस्ट रिसोर्ट आले तेंव्हा आपण आता मोलेमच्या जंगलात आलो आहोत याचा अंदाज आला. पुढे कुळे हे रेल्वे स्थानक लागले. दूधसागर धबधबा बघायला जायचे असेल तर इथेच टॅक्सी सोडून फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या गाडीने किंवा रेल्वे मार्गाने ट्रेक करीत जावे लागते. असेच जंगलातून जात असताना कधी आम्ही भगवाण महावीर अभायरण्य सोडले आणि नेत्रावलीत प्रवेश केला ते कळले नाही. पहिल्या दिवशीचा मुक्काम नेत्रावली अभयारण्याच्या जवळच होता.

(सावरी धबधबा)
दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला नेत्रावली ते पालोलीम, पालोलीम ते नेत्रावली आणि परत पालोलीम ते नेत्रावली असेच करायचे होते फक्त दुसरे दिवशी पालोलीमला पोहचण्याचा रस्ता वेगळा होता. सुरवातीला दहा किमी जंगलातून गेल्यावर आम्ही बाहेर आलो आणि सरळ शहरी सपाट रस्त्यांवरुन आमचा प्रवास सुरु झाला. नंतर मधेच शहरी रस्ता सोडून आम्ही परत टेकड्यांकडे वळलो आणि मग पुढे कोला, अगोंडा करीत आम्ही पालोलीम बिचला पोहचलो. तिसरे दिवशी आम्हाला नेत्रावलीत सावरी धबधबा किंवा नेत्रावली धबधबा बघायला जायचे होते पण आजचा रस्ता कालच्यापेक्षा वेगळा होता. आजचा रस्ता अंबेघाटातून जाणारा होता. असे म्हणतात की हे जंगल इतके घनदाट आहे की जमीनीवर सूर्यकिरणे पोहचत नाही. इतके नाही परंतु जंगले बऱ्यापैकी घनदाट होते. जागोजागी वन्यप्राण्यांविषयी बोर्ड होते, शिखरावर फॉरेस्टची चौकी होती. काणकोणवरुन पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला वळलो की अंबेघाटाचा रस्ता लागतो. वाटेत Bamanbudo waterfall लागला. नेत्रावली अभयारण्याच्या प्रवेश द्वारापासून ते सावरी धबधब्यापर्यंतचा रस्ता संपूर्ण दोऱ्यातला सर्वात सुंदर रस्ता होता. या रस्त्याला वेरळे चढ असेही म्हणतात. मधे सायकली ठेवून धबधब्यासाठी खाली उतरावे लागते. साधारण पंधरा मिनिटे उतरायला आणि पंचवीस मिनिटे चढायला लागतात. धबधबा बघितल्यावर वाटते की सारी मेहनत खरच कामास आली. आत कुठेतरी दडवून ठेवलेल्या हिऱ्यासारखा हा धबधबा आहे. वर रस्त्यावर धबधब्याचा आवाज देखील येत नाही. आम्ही गेलो नाही परंतु वाटेत मैनापी धबधबा देखील आहे. त्यासाठी जास्त चालत जावे लागते असे समजले. हा परिसर खूप सुंदर आहे आणि एकदा तरी बघायलाच हवा.

(पालोलीम चा समुद्रकिनारा)
शेवटल्या दिवशी चोवीस किमी दुसऱ्या दिवशी ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने परत जायचे होते. मधेच वेगळे वळण घेतले आणि रस्ता पूर्ण वेगळा झाला. मार्गात इतकी वळणे होती की जरा जरी जीपीएसवरुन नजर हटली तर तुम्ही चुकलाच म्हणून समजा. आम्ही चांदोरला आलो तिथे ब्रेगेंझा हाऊस ही सोळाव्या शतकातील पोर्तुगीझ पद्धतीने बांधलेली भव्य वास्तू बघितली. त्या वास्तूचा डायनिंग हॉल हा एखाद्या 2BHK प्लॅटपेक्षाही मोठा असेल. तिथल्या सोफ्याची कल्पना भयंकर आवडली. लायब्ररी सुद्धा भव्य होती. गोव्यातली पहिली प्रायव्हेट लायब्ररी होती असे म्हणतात. तिथून पुढे मडगावकडे न वळता आतल्या रस्त्याने जमेल तितका हायवे टाळून आम्ही माजोर्डाकडे निघालो. वाटेत Our Lady of Snows Rachol हे चर्च बघितले. शेवटी बेतालबाटीम बीचजवळ Beleza by beach या रिसॉर्टवर आमचा सायकल दौरा संपला.



(हेच ते ब्रेगेंझा हाऊस)
क्रमशः
(गोव्यात सायकलवर केलेली भ्रमंती दोन भागात लिहिण्याचा प्रयत्न करतोय.
त्यातला हा पहिला भाग. तसेच मार्ग, सायकलींग, निवास अशा प्रकारे लिहिण्याचा
प्रयत्न केला आहे.)
मित्रहो
http://mitraho.wordpress.com/
गोंय (गोवा) - पाटणें बीच - १
गोवा! हा शब्द जरी नुसता ऐकला तरी माझ्या अंगात एक चैतन्याची लहर फिरून जाते; इतका गोवा मला आवडतो. स्पेसिफिक कारण असे कोणतेही नाही. आता अगदी जरी जोर लावून विचारलेच कोणी तरीही कदाचित नक्की कारण सांगता येणार नाही पण प्रयत्न करतो, गोवा म्हणजे झिंग, गोवा म्हणजे कैफ!
पहिल्यांदा गोव्याची सफर घडली १५ वर्षांपूर्वी माझ्या मित्रांबरोबर आणि त्यावेळी, त्या वयानुसार, मला गोवा भेटला आणि भावला तो बांद्याच्या चेकपोस्टवर. बांद्याची चेकपोस्ट पार करून गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला आणि नजरेला पडलेला नजारा म्हणजे रस्त्याच्या बाजूला ओळीने असलेले बियर बार्स आणि वाइन शॉप्स. त्यावेळी तिथूनच गोव्याचा आनंद घेणे चालू झाले होते. त्यावेळच्या भेटीत नुसते बीच बघत सुटणे झाले होते. तशीही पहिलीच ट्रीप असल्याने गोवा नेमकी काय चीज आहे ते कळायचे होते. कळंगुट, अंजुना, दोना पावला, मिरामार असे उत्तर गोव्यातले बीच एका मागोमाग एक फिरत बसलो होतो. त्यामुळे त्यावेळी गोवा बघितला पण अनुभवला नाही. त्यानंतरही बर्याच वेळा गोव्याला गेलो पण तेव्हाही गोवा बघितला, अनुभवला नाहीच. काही वर्षांपूर्वी काही मित्र सहकुटुंब गोव्याला गेलो होतो त्यावेळी पूर्ण वेळ कांदोळी बीचजवळ (Candolim beach) राहिलो होतो. त्यावेळी खर्या अर्थाने गोवा अनुभवला आणि खर्या अर्थाने गोवा कळला...
भन्नाट निसर्गसौंदर्य, सहज जाणवणारा आणि दिसणारा, तिथल्या वातावरणात भरून राहिलेला सुस्तावा, तिथल्या वास्तव्यात गात्रागात्रात भरून राहणारा आणि सुशेगात करणारा तोच सुस्तावा, पांढर्या वाळूचे शांत आणि निरतिशय सुंदर समुद्रकिनारे, कानात भरून राहणारा आणि आव्हानं देणारा लाटांचा सांद्र सूरात्मक गुंजारव, अंगाला झोंबणारा, केसांशी लडिवाळ करणारा आणि नाकात भरून राहणारा समुद्राचा खारा वारा, समुद्रकिनार्यावर आपल्याच कैफात आणि मस्तीत फिरणारे, रंगीबेरंगी कपडे घातलेले, देशी विदेशी माणसांचे जथ्थे, एक मादक नाद असलेली कोंकणी भाषा बोलणारे गोंयकर आणि ह्या सर्वाच्या जोडीला अफलातून आणि अवीट चवीची काजू फेणी, बियर आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे, ह्या सगळ्यांचा मेंदूवर, एकत्रित आणि टीपकागदावर शाई पसरावी तसा हळुवार पसरत जाणारा अंमल म्हणजे गोंय, मला आवडणारा गोवा!
ह्या गाठीशी बांधलेल्या अनुभवाच्या पार्श्वमूमीवर, ह्या दिवाळीला गोव्याला जायचा प्लान करत होतो तेव्हा लक्षात आले की आतापर्यंत गोवा फक्त उत्तर गोवा आणि ओल्ड गोवा एवढाच बघितला होता. त्यामुळे आता दक्षिण गोव्यातले, माझ्या आवडत्या गोंयचे, एक वेगळे रूप अनुभवायचे ठरवले. त्यानुसार मग अनवट बीचचा शोध चालू केला. अनवट अशासाठी की बीच जेवढा लोकप्रिय तेवढा गर्दीने भरलेला हे समीकरण इतक्या वेळच्या गोवा भेटीमुळे उलगडले होते. त्या शोधा-शोधी मध्ये मिळाला पाटणें बीच (Patnem beach). हा बीच इतका की दक्षिणेला आहे तिथून कारवार फक्त ३५-४० कि.मी. वर आहे. गोव्याच्या, दक्षिण गोवा ह्या जिल्ह्यातील काणकोण (Canacona) नावाच्या तालुक्यातल्या प्रसिद्ध पाळोळें बीचजवळ (Palolem beach) असलेला हा पाटणें बीच एक नितांत सुंदर आणि अतिशय शांत बीच.
गूगलवर ह्या बीचचे फोटो बघितल्यावर, ट्रीपऍडवायझर.कॉम वर ह्या बीच जवळची हॉटेल्स शोधायला सुरुवात केली. त्यावेळी बर्याच हॉटेल्सच्या जोडीने ह्या बीचबद्दल ही देशी – विदेशी लोकांची मते आणि अनुभव (Reviews) वाचायला मिळून ह्या बीचची केलेली निवड किती सार्थ आहे ह्याची खात्री पटली. शेवटी शोध पूर्ण झाल्यावर समुद्र किनार्यापासून २०० - २५० मीटर अंतरावर असणारे ‘सी व्ह्यू रिसॉर्ट’ राहण्यासाठी नक्की केले आणि बुकिंग करून टाकले.
आता जायचे कुठल्या मार्गाने हा प्रश्न आला. कारण ह्यापूर्वी गोव्याला जेव्हा जेव्हा जाणे झाले होते ते मुंबईवरून, पनवेल मार्गे कोंकणातून झाले होते. पुण्यावरून जायची ही पहिलीच वेळ. कोल्हापूर वरून बेळगाव मार्गे किंवा गडहिंग्लज – आजरा – आंबोली मार्गे असे दोन मार्ग होते. बरीच फोना-फोनी करून चौकशी केल्यावर कळले की बेळगाव गोवा मार्गावरचा रस्ता ठीक नाहीयेय. गडहिंग्लज – आजरा – आंबोली मध्ये काही काही पॅच खराब आहेत असेही कळले. बरेच कन्फ्युजन झाले की काय करायचे? नेमका निर्णय न झाल्याने किंवा करता न आल्याने शेवटी कोल्हापुराला पोहोचल्यावर बघू काय करायचे ते असे ठरवले.
शुक्रवारी दुपारी पुण्याहून कोल्हापुराला कूच केले. प्रत्येक टोल नाक्यावर राजसाहेबांची आठवण काढत, टोलच्या दिडक्या मोजत मोजत, कोल्हापुराला पोहोचलो. पोहोचे पर्यंत रात्र झाली होती आणि थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली. रंकाळ्यापासून गगनबावड्याच्या दिशेनं साधारण ३-४ किमी वर असलेल्या राहुल डिलक्स नावाच्या एका हॉटेलात जाऊन गरमागरम तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा पोटभर ओरपून थंडीला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला.
सकाळी लवकर उठून महालक्ष्मी देवळात जाऊन दर्शन घ्यायचे असा बायकोचा फतवा निघाला. देवळात जाताना चिरंजीवांनी विकेटच घेतली, “ओ माय गॉड बघितल्यावर ‘कित्ती भारी पिक्चर’ असे किमान पन्नास वेळा तरी म्हणाला होतात; मग आता काय झाले?” त्यावर त्याला, रांगेत उभे राहायचे नाही मागच्या बाजूने मुखदर्शन घेऊन निघायचे आणि आई देव म्हणून दर्शन घेईल, आपण देवळाची शिल्पकला आणि देवीचे शिल्प यांचे दर्शन घेऊ! असे सांगितल्यावर त्याचे समाधान झाले (आजच्या ह्या पिढीतील मुलांचे समाधान करता करता नाकी नऊ येतात हो!) आणि दर्शनाला निघालो. मुखदर्शन घेऊन झाल्यावर, आता कोणत्या मार्गाने जायचे हा प्रश्न पुन्हा उभा ठाकला.
कोल्हापूर गोवा अंतर साधारण २४० किमी आहे असे गुंगाला मॅप दाखवत होता आणि कोल्हापूर बेळगाव हे अंतर ११० किमी. एक्सप्रेस हायवेने बेळगाव पर्यंतचे अंतर सव्वा तासात कापता येणार होते. त्यापुढे १३० साध्या रस्त्याने म्हणजे साधारण ३ तास असा हिशोब करून बेळगाव मार्गे जायचे ठरवले. पण आपण जेव्हा काही ठरवत असतो तेव्हा त्याच वेळेस नियतीही काहीतरी ठरवत असते आणि आपल्याला त्याची जाणीव नसते. जेव्हा ती होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते...
बेळगावाला जायचा एक्सप्रेस हायवे, चतुष्कोण योजनेतला एक हायवे, एकदम भन्नाट आहे. भन्नाट म्हणजे एकदम आऊट ऑफ द वर्ल्ड! आजूबाजूला दुतर्फा पसरलेली शेते, हिरवागार निसर्ग आणि त्यांच्या मधोमध पसरलेला भव्य एक्सप्रेस हायवे, बोले तो एकदम झक्कास! महाराष्ट्र सोडून कर्नाटकात शिरलो आहोत ही जाणीव फक्त कन्नड भाषेतल्या पाट्या आणि मैलाचे दगड यांच्यावरूचच होत होती. प्लान केल्या प्रमाणे सव्वा तासाच्या आतच बेळगावाला पोहोचलो. बेळगावाला पोहोचलो आणि तिथून पुढे नियतीने काय ठरवले त्याची कल्पना यायला सुरुवात झाली. बेळगावातून गोव्याच्या राज्य महामार्गावर पोहोचे पर्यंत रस्ता एकदम गल्लीबोळातून जाणारा. ठीक आहे, हा गावातला रस्ता (पुणेरी माज हो, दुसरे काही नाही) आहे असे म्हणून मन शांत केले आणि मागच्या एका तासाचा भन्नाट ड्रायव्हिंगचा जोष कायम ठेवला. पुढे महामार्गावर लागल्यावर जे काही हाल झाले ते विचारु नका. कर्नाटक सरकाराने बहुतेक ठरवले असावे की कोणीही कन्नड माणसाने गोव्याला जायची हिंमत करू नये. अतिशय भंगार रस्ता. ठिकठिकाणी इथे रस्ता आहे का? असा प्रश्न पडावा अशी अवस्था.


पण गंमत म्हणजे ‘गोवा आपले स्वागत करत आहे’ अशा आशयाची पाटी गोव्याच्या सरहद्दीवर दिसली आणि तिथून रस्ता एकदम चांगला, चकाचक, आपली पैसातै म्हणते तस्सा, हेमामालिनीचे गाल. पुढे फोंड्यामार्गे काणकोणला पोहोचायचे होते. फोंड्यापासून पुढे काणकोणला कसे जायचे तो रस्ता माहिती नव्हता. फोंड्यापर्यंत पोहोचायला लागलेल्या उशीरामुळे मोबाइलच्या बॅटरीने नेमकी तेव्हाच मान टाकली आणि गूगल मॅप्स बंद झाले. मग GPS ऐवजी आपले भारतीय ‘JVS – जनता विचारपूस सिस्टिम’ उपयोगात आणून विचारत विचारत मार्गक्रमण सुरू केले. तिथे गोंयकरांचे कोंकणी उच्चार आणि माझे स्पेलिंगप्रमाणे केलेले उच्चार यांची एक जबरदस्त जुगलबंदी होऊन कोंकणी भाषेशी आणखीनं जवळीक निर्माण झाली. एका चौकात आता पुढे कसे जायचे हा प्रश्न आ वासून उभा राहिला असता एक इंग्रजी बोलणारे किरिस्ताव काका देवासारखे धावून आले आणि त्यांच्या गाडीची पाठ धरून मुंबई-गोवा महामार्गाला लागलो. तिथून पुढे काणकोणचा रस्ता सरळ होता. संध्याकाळी, मावळत्या सूर्याच्या साक्षीने पाटणें गावात सी व्ह्यू रिसॉर्ट मध्ये प्रवेश केला. चेक इन चे सोपस्कार पार पाडून त्या रिसॉर्टमध्ये असलेल्या हॉटेलात खादाडी केली, कोल्हापुराला चापलेल्या मिसळीनंतर जेवण केलेच नव्हते.

रूममध्ये सामान ठेवून झाल्या झाल्या लगेच बीचकडे धाव घेतली. पाटणें समुद्रकिनार्याचे हे विलोभनीय दृश्य नजरेला पडले आणि 6-7 तासांच्या भयाण प्रवासाचा शीण कुठच्या कुठे पळून गेला.

चपला बूट काढून थंड होत चाललेल्या पांढर्या शुभ्र वाळूमध्ये अनवाणी पायाने चालण्यातला आनंद घेत, समुद्राचा खारा वारा नाकात भरून घेत, समुद्राच्या लाटांचा धीरगंभीर आवाज कानात साठवत, जवळ जवळ निर्मनुष्य असलेल्या किनार्यावर रपेट मारत मारत काळोख पडू दिला. मग थंड वार्याला कवेत घेऊन, एका शॅक समोर टाकलेल्या खुर्च्यांवर बसून पोटाला एका थंडगार बियरचे अर्ध्य देऊन, “लाडक्या गोंया, मी आलो आहे! इथून पुढच्या तीन रात्री तुझ्या सोबत असणार आहे”, असे हितगुज मी गोव्याबरोबर करत अजून एका बियरचा फडशा पाडला आणि जड पोटाने रिसॉर्टवर जायला निघालो.





(क्रमशः)
सुरुवातीची काही छायाचित्रे आंतरजालाहून साभार
गोवा म्हणजे झिंग, गोवा म्हणजे कैफ! .......
दुसर्या दिवशी सकाळी लवकर जाग आली ती रिसोर्टमधील झाडांवर गुंजारव करणार्या पक्षांच्या किलबिलाटाने. त्या दिवशी धाकट्याचा वाढदिवस होता. मग तो झोपलेला असतानाच त्याच्यासाठी केक आणायला मोठ्या मुलाला घेऊन बाहेर पडलो. रिसेप्शनवर केक कुठे मिळेल त्याची चौकशी केली आणि २-३ किमीवर असलेल्या एका गावात मॉंजिनीज आहे असे कळले. आनंदाने तिकडे निघालो. त्या गावात पोहोचल्यावर त्या गावाचे नाव कळले आणि आनंद द्विगुणित झाला. त्या गावाचे नाव होते चावडी. मुलाने त्या गावाचे नाव असलेला रिक्षा स्टॅंड आणि त्याच्याजवळचा झाडाचा पार बघितला आणि तोही अनपेक्षित आनंदाने ओरडला, “बाबा तुमच्या सोकाजीनानांची चावडी! बघा सोकाजीनाना कुठे दिसताहेत का ते!!”. मीही मिशीतल्या मिशीत हसत त्याच्याकडे बघितले कारण त्याच्या त्या आनंदी उद्गारांनी मलाही खूप आनंद झाला होता.
केक घेऊन घरी आलो. मुलगा झोपलेलाच होता. बायकोने त्याच्यासाठी आणलेली गिफ्ट्स त्याच्या डोक्याशी ठेवली होती. त्याला उठवल्यावर, त्याने ती गिफ्ट्स बघितली आणि त्याच्या चेहेर्या वरचा त्या वेळेचा आनंद अमूल्य होता. त्याची तयारी झाल्यावर केक कापून कपडे घेऊन किनार्याकडे कूच केले.

बीचवरच्या शॅकची कापडी छत्री असलेल्या दोन खुर्च्या पकडून सामान ठेवले. बियरची ऑर्डर सोडली, तोपर्यंत मुलांनी कपडे काढून समुद्राच्या पाण्याकडे धूम ठोकली होती. मीही मग त्यांच्या बाललीला बघत बियरचे घोट घेत घेत, कपडे काढून समुद्राला आलिंगन द्यायला निघालो. रविवार असूनही समुद्रकिनारा बराचसा निर्मनुष्य होता. अगदी मोजकीच माणसे आजूबाजूला होती. अगदी मनसोक्त, कंटाळा येईपर्यंत समुद्राच्या लाटांबरोबर दंगामस्ती केली. मध्येच थोड्या-थोड्या वेळाने खुर्च्यांकडे जाऊन बियरचे सीप घेत उन्हात पडायचे, अंग तापले (उन्हाने) की परत थंडगार आणि निळ्याशार पाण्यात जाऊन डुंबायचे हा क्रम थकवा येईपर्यंत आणि पोटात कावळे ओरडायला लागे पर्यंत चालू होता. मुलांना तर पाण्यातून बाहेरच पडायचे नव्हते. शेवटी त्यांना भुकेची जाणीव होईपर्यंत आणि माझ्या जाणिवा बधिर होईपर्यंत बियर ढोसत, छत्रीखालच्या खुर्चीत आरामात पायावर पाय टाकून, गोव्याचा सगळा सुस्तावा अंगात भरून घेत, बायकोशी गप्पा मारत बसलो. स्वर्गीय सुख म्हणतात ना ते हेच असावे किंबहुना माझी त्या स्वर्गीय सुखाची हीच व्याख्या आहे असे म्हणा ना!



मुलांचे खेळून झाल्यावर त्या शॅकच्या बाथरूममध्ये जाऊन शॉवर घेऊन फ्रेश होऊन जेवणाची ऑर्डर द्यायचे बघायला लागलो. त्या शॅकवर ओपन किचन होते आणि समोर मासे ठेवलेले होते. मासा सिलेक्ट करायचा, रेसिपी सांगायची की समोरचा बल्लवाचार्य ती डिश आपल्या टेबलावर हजर करणार असला मामला होता. कसला राजेशाही थाट! बल्लवाचार्याला जेवणाची ऑर्डर दिली आणि वेटरला, थांब म्हणेपर्यंत नॉन-स्टॉप बियर आणत राहायची ऑर्डर दिली (इथून पुढे, परत जाईपर्यंत, बियरची मोजदाद करायचे सोडून दिले). मस्त फिश फ्राय आणि बरेच काही पदार्थ पुढ्यात आले आणि पोटाला तड लागेपर्यंत हादडणी सुरू होती. जेवण झाल्यावर मुले वाळूत खेळायला निघून गेली. शॅकमधली सर्व माणसे जेवून निघून गेली होती; काही सूर्यस्नान करत समोरच्या वाळून पडून होती. शॅकमध्ये मी आणि माझी बायकोच उरलो होतो, अर्थात बियर होतीच साथीला. मग त्या एकांताचा फायदा उठवून (चावट! कसलेही भलते विचार मनात आणू नका) बायकोचा हात हातात घेऊन गुजगोष्टी करत बसलो. बियरने चित्तवृत्ती प्रफुल्ल आणि तरल झाल्या होत्या. बर्याच गोष्टी ज्या जनरली आपण बोलत नाही त्या बोलायला त्याने मजा येत होती, एकदम उन्मुक्त होऊन. हीच ती सुरुवातीला म्हटलेली गोव्याची झिंग आणि कैफ.




साधारण 3-4 वाजता रिसॉर्टवर जाऊन सामान ठेवून, थोडा आराम करून परत सूर्यास्ताच्यावेळी बीच वर गेलो. अनवाणी पायांनी, मावळत्या सूर्याच्या साक्षीने, बायकोच्या हातात हात गुंफून संपूर्ण किनार्याचा फेरफटका मारायला सुरुवात केली. एक दोन तास त्या फिरण्यात कसे गेले ते कळलेच नाही. मुलं समजूतदारपणे, शॅकजवळ वाळूत किल्ले आणि त्याच्या भोवताली तटबंदी करण्यात मशगुल होऊन गेली होती. मग गाडी काढली आणि पाळोळें बीच बघायला निघालो.
ह्या बीचवर बर्यापैकी गर्दी होती. दुकानांची गर्दीही जास्त होती. तिथल्या बाजारात फेरफटका मारला. मुलांनी काहीबाही खरेदी केली. पाळोळेंचा समुद्रकिनाराही छानच होता पण त्याला पाटणेंची सर नव्हती. कदाचित फार गर्दी असल्यामुळे असेल. अंधार दाटून यायला लागला तसा परत रिसॉर्टवर परत आलो. रात्री रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमधले कॉंटिनेंटल जेवण हादडायचे हे मुलांनी ठरवून ठेवले होते. त्यानुसार ते जेवण मी बियरच्या साथीने आणि मुलांनी व बायकोने मॉकटेल्सच्या साथीनं रिचवून एका आनंदाने आणि तृप्तीने भरलेल्या दिवसाची अखेर केली.
दुसर्या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत तोच कार्यक्रम रिपीट केला. त्याच कैफात आणि मस्तीत. आपल्या गोवाप्रेमी गविंनी, कोळवा बीचजवळ ‘फिशरमन्स वार्फ’ नावाचे एक भन्नाट हॉटेल आहे आणि ते 'मस्ट गो' आहे असे सांगितले होते. त्यामुळे तिकडे जाण्यासाठी दुपारी थोडा आराम करून कोळवा (Colva Beach) बीचकडे प्रयाण केले. कोळवा बीचला पोहोचल्या पोहोचल्या भ्रमनिरास झाला. भयंकर गर्दी आणि अतिशय बकाल बीच. त्यात कुठल्यातरी समाजाचे लोक, कसली तरी सार्वजनिक समुद्र पूजा करण्यासाठी तिथे त्या दिवशी आले होते. त्यामुळे गर्दी आणखीनंच जास्त होती. ह्या बीचवर वॉटरस्पोर्ट्सची रेलचेल असल्याने सगळी गर्दी तिकडे एकवटली होती. माझी मुलं ती गर्दी आणि त्या बीचवरचा पसारा बघून लगेच कंटाळली आणि ‘आपल्या बीच’वर परत जाऊया असा लकडा माझ्यामागे लावला. आपला बीच? जसा काही तो बीच त्यांच्या तीर्थरूपांच्या मालकीचाच होता.





पण मीही वैतागलो होतो आणि फिशरमन्स वार्फ १७-१८ किमी लांब असल्याचे चौकशीअंती कळले होते. त्यामुळे तिथे वेळेत पोहोचण्यासाठी निघावेच लागणार होते. कोळवा बीचवर सूर्यास्त बघून, वार्का मार्गे मोबोर बीचवर असलेल्या फिशरमन्स वार्फकडे निघालो. तिथे जेवून परत पाटणेंकडे प्रयाण केले. (तिथला अनुभव(?) हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे, लिहितो नंतर त्याविषयी)

दुसर्या दिवशी सकाळी उठून परत चावडी गावात गेलो, खरेदीसाठी. ह्यावेळेची माझी महत्वाची खरेदी फक्त फेणीची होती. खरेदी करून, सामान आवरून परत बीचवर गेलो आणि एक शेवटची बियर समुद्राच्या साक्षीने पोटार्पण केली, पाटणेंचा समुद्रकिनारा डोळेभरून पाहून घेतला आणि भरल्या मनाने तिथून त्याचा निरोप घेतला. परतीचा प्रवास काणकोण – मडगाव – पणजी – आंबोली – गडहिंग्लज – आजरा – कोल्हापूर – पुणे असा केला, जडवलेल्या मनानेच. हा रस्ता बेळगाव – गोवा रस्त्यापेक्षा फारच चांगला होता.
पणजीतून बाहेत पडताना मन अगदी भरून आले होते. पण मागच्या ३-४ दिवसात जो आनंद गोव्याने दिला होता तो उराशी बाळगून, आता पुढच्या गोवा भेटीत अरंबोळ ह्या बीचवर सुट्टी घालवायची अशी खूणगाठ बांधून परत आलो आहे.
गोंया, हांव बेगिन परत येतलो!
गोवा.
सुमारे साडे चारशे वर्षे पोर्तुगिज अंमलाखाली राहीलेले आणि १९६१ साली
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३० मे १९८७ रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा
मिळालेले भारताच्या नकाशावरील एक छोटेसे राज्य.
निसर्गाचा प्रचंड वरदहस्त आणि थोडासा वेगळाच सांस्कृतीक वारसा लाभलेल्या ह्या चिमुकल्या राज्यात देशी-विदेशी पर्यटकांचा कायम राबता असतो त्यामुळे राज्याच्या महसुलात पर्यटन व्यवसायाचा वाटा फार मोठा आहे.
गोव्याला भेट देणाऱ्या मंडळींपैकी कुणाला तिथले निसर्ग सौंदर्य, सुंदर समुद्रकिनारे, पोर्तुगिज स्थापत्यशैलीतल्या पुरातन वास्तु बघण्यात रस असतो तर कुणाला तिथे स्वस्त दरात मिळणारे मद्य किंवा मत्स्याहार आकर्षित करत असतो. काहीजण फक्त आराम करायला येतात तर काहीजण निव्वळ कुठेतरी फिरायला जायचंय, तर गोव्याला जाऊ अशा विचाराने येतात.
प्रत्येक नावाजलेल्या पर्यटनस्थळाच्या काही काळ्या बाजु असतात त्याला गोवाही अपवाद नाही. पर्यटनाव्यतिरीक्त तिथला वेश्याव्यवसाय, अंमलीपदार्थांची तुलनात्मकरित्या सहज उपलब्धता आणि जुगाराला अधिकृत मान्यता प्राप्त असलेले कॅसिनो ह्या गोष्टीही मोठ्या प्रमाणावर पाहुण्यांना वारंवार गोव्याला येण्यास आकर्षित करतात.
नव्या सहस्त्रकाच्या सुरुवातीपर्यंत गोव्यातील वास्को-द-गामा (वास्को)
शहराजवळचा ‘बायना बीच’ वेश्याव्यवसायाचे केंद्र म्हणून (कु)प्रसिद्ध होता.
खरंतर किनाऱ्यावरच्या एखाद्या शॅक मधुन बिअरच्या बाटल्या घेउन आम्हा
कॉलेजकुमार मित्रमंडळींना वाळुवर निवांतपणे बसुन बियरचे घुटके घेत, गप्पा
गोष्टी करत समोर पसरलेला समुद्र न्याहाळत बसण्यासाठी हे ठिकाण त्यावेळी फार
मस्त वाटायचे, पण टपरीवजा बार काउंटर्सच्या सोभोवती डिजे साउंड सिस्टिमवर
जोरदार संगीत वाजत असलेल्या ह्या समुद्रकिनाऱ्याचा वापर प्रामुख्याने ओपन
एअर पिकअप जॅाईंट म्हणुन होत असल्याने इथे स्थानिक मंडळी आणि
कुटुंबीयांसोबत आलेले पर्यटक मात्र फारसे फिरकत नसत.
पुढे तिथे अंमली पदार्थांचा व्यापार, लुटमार, परदेशी महिला पर्यटकांचा
विनयभंग, हत्या वगैरेंसारख्या गंभीर गुन्ह्यांचा आकडा वाढु लागल्यावर
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेउन सरकारने वेश्याव्यवसायाचे हे केंद्र
उध्वस्त केले.
आता तिथे वॅाटर स्पोर्ट्स, आयुर्वेदीक मसाज वगैरेंसाठी बऱ्यापैकी पर्यटक
सहकुटुंब येत असले तरी पुर्वीची मजा राहिली नाही त्यामुळे ह्या ठिकाणाचे
चैतन्य हरवल्यासारखे वाटते 😀
माहीती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इतर व्यवसायांप्रमाणे ह्या व्यवसायाचे
स्वरूपही बदलले असल्याने आता अशा विशिष्ट ठिकाणच्या ‘बाजारा’ ची गरजही उरली
नाहीये त्यामुळे विकेंद्रीकरण झाले असले तरी केवळ ‘ह्या’ कारणासाठी
गोव्याला भेट देणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही.
साठच्या दशकात अमेरीकेत उदयाला येउन सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत जगभर पोचलेली हिप्पी संस्कृती गोव्यात रूजली, फोफावली नसती तरच नवल!
उत्तर गोव्याच्या बारदेश तालुक्यातील हणजुणे (अंजुना) गांव तर त्यावेळी हिप्पी लोकांचे हक्काचे ठिकाण बनले होते.
स्थानिक लोकजीवनावरील पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आणि नव्याने स्वतंत्र
झालेल्या ह्या प्रदेशाला सत्याऐंशी साली स्वतंत्र राज्याचा दर्जा
मिळेपर्यंत असलेली अकार्यक्षम पोलीस यंत्रणा व अंमलीपदार्थविरोधी
कायद्यांचा अभाव अशी हिप्पी जीवनशैलीसाठी पोषक परिस्थिती असल्याने गोवा
अमेरिका आणि युरोपातल्या हिप्पींना आकर्षित करत होता. ‘हिप्पी ट्रेल’
(Hippy Trail) अंतर्गत युरोप ते आशिया ६००० मैलांचा प्रवास जमीनीवरून करत
फार मोठ्या प्रमाणावर ही मंडळी गोव्यात येत असत.
एकाच ठिकाणी दिर्घकाळ वास्तव्य करणे त्यांच्या विचारधारेत बसत नसले तरी त्यांच्यापैकी कित्येकजण गोव्यत कायमचे स्थाईक झाले आहेत.
ऐंशीच्या दशकात बदललेल्या भूराजकीय परिस्थितीमुळे हिप्पी ट्रेलचे इराण, अफगाणिस्तान व पाकिस्तानातुन जाणारे प्रवासाचे मार्ग बंद झाल्याने आणि युरोप, अमेरिकेत हिप्पी चळवळीला उतरती कळा लागल्यावर पाश्चात्य देशांतुन येणाऱ्या हिप्पींचे प्रमाण घटत जात आज ते अत्यल्प झाले असले तरी गोव्याला जागतीक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यात हिप्पी लोकांनी दिलेले योगदान नाकारता येत नाही, त्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे.
आता हिप्पी गेले असले तरी त्यांच्या संस्कृती/जीवनशैलीचा प्रभाव इथे अजुनही दिसुन येतो. आपल्या परतीच्या प्रवासासाठी किंवा वास्तव्य कालावधी वाढणार असल्यास पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी आपल्या बरोबर आणलेले परदेशी सामान/वस्तु विकण्यासाठी सत्तरच्या दशकात अंजुना बीचवर सुरू केलेले ‘Flea Market’ त्या परिसरात अजुनही टिकुन आहे. नोव्हेंबर ते एप्रिल ह्या कालावधीत दर बुधवारी भरणाऱ्या ह्या बाजाराचे स्वरूप आता बदलले आहे. हिप्पी विक्रेत्यांची जागा तिबेटी, नेपाळी, काश्मिरी, उत्तर आणि दक्षिण भारतीय तसेच स्थानिकांनी घेतली आहे. (कोविड निर्बंधांमुळे हा बाजार आमच्या ह्या गोवा भेटीच्यावेळी बंद होता.)
हिप्पी पर्वात अंजुना आणि आसपासच्या बागा, कळंगुट, हरमल (आरंबोल) अशा
समुद्रकिनाऱ्यांवर विविध अंमली पदार्थांच्या नशेत पंग होऊन ट्रान्स
मुझिकच्या तालावर रात्रभर रेव्ह पार्ट्या चालत.
आजही अशा पार्ट्या चालू आहेत फक्त ठिकाणे बदलली आहेत आणि पाश्चात्य देशांतून आलेल्या हिप्पींची जागा भारतीय नव-हिप्पींनी घेतली आहे.
Low-to-Medium BPM सायकॅडेलीक ट्रान्स संगीत आवडत असल्याने 2015 मध्ये पुण्यातल्या ‘ब्लु फ्रॅाग’ येथील पार्टीमुळे माहिती झालेल्या ‘गोवा गिल’ ह्या वयोवृद्ध डिजेच्या पुढे गोव्याला वॅगॅटोर येथील Origen Jungle Club मध्ये झालेल्या, तर ‘राजा राम’ ह्या डिजेच्या Hill Top Goa अशा दोन ओपन एअर क्लब्ज मध्ये रात्रभर चालणाऱ्या रेव्ह पार्टीजना आवर्जुन उपस्थितीही लावली आहे. गंमत म्हणजे ‘गोवा गील’ आणि ‘राजा राम’ ही नावे भारतीय वाटत असली तरी हे दोघे मुळचे अनुक्रमे अमेरिकन आणि ॲास्ट्रेलियन डिजे आहेत!
देशी- विदेशी डिजेंच्या अशा पार्टीजचे पास बुक माय शो आणि ॲानलाईन तिकीट विक्री करणाऱ्या तत्सम वेबसाईट्स, फेसबुक पेजेसवर राजरोसपणे उपलब्ध होत असल्याने मुंबई, पुणे, बंगरूळु, हैदराबाद ही महानगरे आघाडीवर असली तरी भारतातल्या जवळपास सर्व शहरांतुन अशा पार्टीजना तरूणाईचा भरघोस प्रतिसाद मिळतो तसेच विदेशी पर्यटकांची उपस्थितीही लक्षणीय असते.
व्यक्तिगत आयुष्यात अशाप्रसंगी "been there... done that..." असा दृष्टिकोन सदैव बाळगूनही का कोणास ठाऊक पण, गांजा पासुन कोकेन पर्यंत नानाविध प्रकारच्या नशा करून भोवताली सायकॅडेलीक संगीतावर थिरकणारी कोवळ्या वयातली कॉलेजवयीन मुलं-मुलीं, तरूण-तरूणी पाहुन येणारी खिन्नता व त्यांना जाणते-अजाणतेपणी हे अमर्याद स्वातंत्र्य आणि पैसा पुरवणाऱ्या त्यांच्या पालकांविषयी मनात उफाळून येणारा लाक्षणिक राग अशा भावना दूर सारून ह्या पार्टीज एंजॅाय करणे सुरूवातीला थोडेसे कठीण गेले असले तरी, 'शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न असुन आपल्याला कोणाच्या खाजगी/वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा वा ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही' ह्याची खूणगाठ मनाशी पक्की केल्यावर ते जमु लागले!
वेगवेगळ्या कारणांसाठी गोव्याला अनेकदा भेट दिलेली असल्याने तिथल्या काही स्मृती ह्या लेखाच्या निमित्ताने डोके वर काढत आहेत त्यामुळे बरंच अवांतर झाले आहे तेव्हा आता मालिकेतील ह्या भागाचा मुख्य विषय, म्हणजे कॅसिनोकडे वळतो 😀
"नऊच्या सुमारास आम्हाला मांडवी नदीच्या किनाऱ्यावरच्या ‘कॅसिनो प्राईड’ च्या तिकीट काउंटरपाशी सोडुन बहिण घरी निघुन गेली आणि आम्ही प्रवेशाची तिकीटे घेऊन मांडवी नदीत नांगरून ठेवलेल्या बोटीवर असलेल्या कॅसिनो पर्यंत पोचवणाऱ्या लॅांचची वाट बघत जेट्टीवरच्या खुल्या प्रतिक्षालयात जाऊन बसलो…"
तिथे दहा-बारा मिनिटे वाट बघितल्यावर लॉंच आली आणि पुढच्या काही मिनिटांत आम्ही ‘कॅसिनो प्राईड’ मध्ये पोचलो!
.
कित्येक हॅालिवुड चित्रपटांतुन विशेषत: बॅांड पटांतुन आपल्याला कॅसिनोंचे दर्शन घडत असते. त्यांतून कॅसिनोंची आकर्षक सजावट, तिथला ग्लॅमरस / स्टाईलीश स्री / पुरूषांचा सहज-बिनधास्त वावर, मद्यपान, वेगवेगळ्या प्रकारच्या जुगारी खेळांत होणारी खेळाडूंची हार-जीत अशी दृष्ये आपल्या परिचयाची झालेली असतात.
अशा झकपक,चैतन्यमयी वातावरणाची आवड असल्यास किंवा ते अनुभवायची इच्छा असल्यास त्यासाठी अमेरिकेतील ‘लास वेगास’ (Las Vegas), चीनचा एक प्रांत असलेल्या मकाउ (Macau) अशा कॅसिनोंची पंढरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या ठिकाणी किंवा अन्य कुठल्या देशात जाण्याची गरज नाही, तो अनुभव आपल्याला गोव्यात अगदी सहज घेता येतो.
ग्लॅमरस माहौल, खाणे-पिणे, मनोरंजन, नाईट लाईफ, मौज-मस्तीची आवड/आकर्षण तसेच स्वत:च्या आणि इतरांच्या जीवनशैलीविषयी खुला दृष्टीकोन बाळगणाऱ्यांनी आपल्या गोवा भेटीत एखाद्या कॅसिनोला आवर्जुन भेट द्यावी, त्यांच्यासाठी २४/७ सुरू असणाऱ्या ह्या ठिकाणी घालवलेले दिवसातले काही तास असोत की संपुर्ण रात्र असो, तो चांगल्या आठवणींच्या कप्प्यात जपला जाण्यासारखा एक यादगार अनुभव असेल हे नक्की! पण जर 'जुगार', 'मद्यपान', 'मौजमजा', 'छानछौकी', 'विलासीवृत्ती' विषयी घृणा, तिरस्कार, नावड अशा कुठल्या विशिष्ट किंवा नकारात्मक भावना मनांत असतील तर अशा व्यक्तींनी मात्र (विकतचा) मनस्ताप टाळण्यासाठी चुकुनही तिकडे फिरकू नये!
असो... भारताच्या भुमीवर जुगाराला कायदेशीर मान्यता नसल्याने कायद्यातल्या पळवाटा शोधून गोवा सरकारने मांडवी नदीत नांगरून ठेवलेल्या बोटींवर ‘तरंगत्या’ कॅसिनोंसाठी परवानगी दिल्यावर १९९९ साली पहिला कॅसिनो सुरू झाला आणि आजघडीला गोव्यातल्या कॅसिनोंची संख्या पंधरा-सोळाच्या घरात पोचली आहे. त्यातले बरेचसे आकारमानाने भव्य असे कॅसिनो हे मांडवी नदित नांगरून ठेवलेल्या जहाजे/बोटी/यॅाट्सवर तरंगत्या स्वरूपात असले तरी नंतर कायदे आणखीन वाकवत / त्यातल्या आणखीन पळवाटा शोधत जमीनीवरच्या काही पंचतारांकीत हॅाटेल्स व रिसॅार्ट्स मध्येही लहान-मोठे कॅसिनो सुरू करण्यास परवानगी देण्यात आली व ते यथावकाश सुरूही झाले. पण अशा जमीनीवरील कॅसिनोजमध्ये ‘लाईव्ह टेबल्स’ ना परवानगी नाही, तेथे फक्त ईलेक्ट्रॅानीक/संगणकाधारीत मशिन्सवर जुगार खेळवला जातो आणि प्रवेश शूल्कही तरंगत्या कॅसिनोजपेक्षा कमी असल्याने त्याला पर्यटकांपेक्षा स्थानिकांकडुन मोठा प्रतिसाद मिळु लागला.
"मध्यंतरी स्थानीक कुटुंबातील कमावत्या व्यक्तींनी कॅसिनोत चालणाऱ्या जुगाराच्या नादाला लागुन आपले संसार उध्वस्त केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आणि त्यातुन लोकांमध्ये गोवा सरकारविषयी असंतोष निर्माण झाल्यावर स्थानीकांना अशा जमीनीवरील कॅसिनोजमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली होती."
आजघडीला गोवा सरकारच्या महसुलात कॅसिनोंपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा प्रचंड मोठा आहे. गोव्यातील खाण उद्योगावर प्रतिबंध आल्यानंतर महसुलात झालेली मोठी घट भरून काढण्यास ह्या कॅसिनोंनी सर्वात जास्त हातभार लावला आहे. कॅसिनोंमुळे स्थानिकांतही जुगारी वृत्ती वाढून कित्येक संसार उध्वस्त झाल्यामुळे बहुतांश स्थानिकांची मानसिकता कॅसिनोविरोधी असली आणि वेळोवेळी त्याविरोधात आवाज उठवला जात असला तरी दुर्दैवाने ते बंद करण्याची हिंम्मत कुठलाही राजकीय पक्ष वा नेता दाखवू शकलेला नाही हि वस्तुस्थिती आहे. विरोधात असताना कॅसिनो बंद करण्याच्या घोषणा/आश्वासने सर्वच राजकीय पक्ष/नेते नेहमी देत असतात, पण सत्तेवर आल्यावर मात्र त्यांची भाषा बदलते. ह्याला आपल्या स्वच्छ चारित्र्य आणि साध्या रहाणीसाठी कित्येकांच्या मनात आदराचे स्थान मिळवणारे गोव्याचे माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर हे देखील अपवाद नाहीत. त्यांनीही विरोधात असताना कॅसिनो वरून बरीच आग पाखड केली होती पण सत्तेत आल्यावर महसुलाचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या विरोधात कारवाई करणे कसे अशक्य आहे वगैरे वगैरे असा सूर लावला होता. अर्थात ह्यात त्यांचा काही दोष आहे असेही नाही पण सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांची आगतिकता त्यातून स्पष्ट होते. थोडक्यात सांगायचे तर कॅसिनो बंद केल्यास गोव्याची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघेल अशी परिस्थिती आज आहे!
असो,
कॅसिनो म्हणजे ‘जुगारी अड्डा’ हे एक पक्के समीकरण आहे, किंबहुना जुगार हाच
कुठल्याही कॅसिनोचा मुख्य व्यवसाय /उद्दिष्ट असले तरी त्याकडे सोयीस्करपणे
दुर्लक्ष करूनही पर्यटकांना सहकुटुंब ह्याठिकाणी आपला वेळ मजेत घालवतां
येतो.
जुगार खेळण्यासाठी असलेल्या गॅम्बलींग एरीया व्यतिरीक्त खान-पान आणि
करमणुकीसाठी चांगले उपहारगृह, बार, बुफे लंच / डिनरसाठी डायनिंग एरिया,
नाच-गाण्याचे व अन्य मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांसाठी विशेष विभाग,
सेल्फी पॉईंट, निवांत बसण्यासाठी (आकारमानानूसार बोट/जहाज/यॅाट ज्यावर
कॅसिनो असेल त्याचा) ‘डेक’ अशा अनेक गोष्टी ह्या ठिकाणी उपलब्ध असतात
त्यामुळे एका नव्या पैशाचाही जुगार न खेळता गॅम्बलींग एरीया पासुन ते
कॅसिनोचे अन्य मजल्यांवरील इतर सर्व विभाग पहात फिरत, खाण्या-पिण्याचा
आस्वाद घेत नाच-गाणे बघण्यात चार-पाच तास किंवा संपुर्ण रात्र कशी पसार
होते त्याचा पत्ताही लागत नाही!
मांडवी नदीतल्या तरंगत्या कॅसिनोंसाठीचे प्रवेश शुल्क हे प्रत्येक कॅसिनोगणिक वेगवेगळे असते. सर्वसाधारणपणे किमान प्रवेश शुल्क सोमवार ते शुक्रवार प्रतिव्यक्ती १५०० रुपये तर शनिवार आणि रविवार साठी प्रतिव्यक्ती २००० रुपये एवढे असते. तिथे भेट देण्याआधी आपण प्रत्येक कॅसिनोचे प्रवेश शुल्क, उपलब्ध सेवा/सुविधा, नियमावली, ड्रेसकोड, त्या दिवसासाठीच्या विशेष ऑफर्स / पॅकेजेस विषयींची माहिती त्यांच्या वेबसाईटवर बघून, त्यांची तुलना करून आपल्यासाठी योग्य कॅसिनोची निवड करू शकतो. वर उल्लेख केलेल्या बुफे लंच / डिनर अशा खान-पान आणि करमणूकीसाठीच्या बहुतांश गोष्टी कॅसिनोच्या प्रवेश शुल्कात समाविष्ट असतात आणि तिथले उपहारगृह आणि बार त्याला अपवाद असले तरी गॅम्बलिंग एरियामध्ये टेबलवर विनामूल्य अमर्याद 'ड्रिंक्स' आणि 'स्नॅक्स' पुरवले जातात (त्यासाठी खेळण्याची सक्ती नाही, फक्त गॅम्बलिंग टेबलजवळ बसणे वा उभे राहणे आवश्यक असते.)
काही कॅसिनोजमध्ये सहसा (किंवा शनिवार/रविवार असल्यास) प्रवेश
तिकिटासोबतच तर काहींमध्ये थोडेफार अधिकचे पैसे भरून खेळण्यासाठी ठराविक
रकमेच्या OTP (one time play) चिप्स दिल्या जातात. कॅसिनोत 'जुगार'
खेळण्यासाठी देण्यात आलेल्या अशा 'प्रोत्साहनात्मक' ओटीपी चिप्स रुपी कागदी
कूपन्सचा उपयोग खरंतर अतिशय मर्यादित स्वरूपात करता येतो आणि त्या थेट
'एनकॅश'करता येत नाहीत. रुलेट (Roulette) आणि स्पिन व्हील (Spin Wheel /
Wheel of fortune) अशाप्रकारच्या खेळांत आणि त्यातही फक्त 'एकास एक' चा
(१:१) भाव देणाऱ्या 'बेट्स' खेळण्यासाठी काही निवडक टेबल्सवर त्यांचा वापर
करता येतो. असे असले तरी संयम राखत 'टुकू टुकू' खेळून नशिबाची साथ
मिळाल्यास आपण प्रवेश शुल्कासाठी भरलेली रक्कम वसूल करण्यात तरी यशस्वी होऊ
शकतो, फक्त एक पथ्य मात्र पाळायचे, 'आपण इथे जुगार खेळण्यासाठी आलो नसून
केवळ एक छानसा अनुभव घ्यायला आलेलो आहोत' हे कदापि विसरायचे नाही, आणि
आपल्याला मिळालेल्या 'प्रोत्साहनात्मक' ओटीपी चिप्स जरी आपण गमावल्या तरी
अधिकचे पैसे खर्च करून चुकूनही नवीन चिप्सची खरेदी करायची नाही. अगदी
टेबलवर अन्य कोणी कितीही जिंकत असताना दिसत असले तरीही!
---
असो, तर ‘कॅसिनो प्राईड’ मध्ये पोचल्यावर आम्ही गॅम्बलींग एरीयामध्ये
प्रवेशकर्ते झालो. दोघांना मिळालेल्या एकूण १००० रुपये दर्शनीमूल्याच्या
ओटीपी चिप्स वापरून तिथे 'रुलेट' खेळत असताना माझे व्हिस्कीचे दोन पेग्स
आणि भावाची दोन ग्लास बियर रिचवून झाली आणि मिळालेल्यापैकी ओटीपी 'पेपर
कूपन्सना' सहाशे रुपये मूल्याच्या 'कॅश' करता येण्यायोग्य 'प्लास्टिक'
प्लेयिंग चिप्स मध्ये परावर्तित करण्यात यश मिळवून आम्ही साडे दहा-पावणे
अकराच्या सुमारास बुफे डिनरचा आस्वाद घेण्यासाठी लिफ्टने वरच्या मजल्यावरील
डायनिंग हॉलकडे मोर्चा वळवला.
.
अगदी 'आहाहा' म्हणावे अशाप्रकारचे नसले तरी बऱ्यापैकी चांगल्या खाद्यपदार्थांचा समावेश असलेले जेवण झाल्यावर मनोरंजन कक्षात कोकणी भाषेतील गाण्यांवर झालेला समूहनृत्याचा कार्यक्रम बघून पुन्हा आम्ही गॅम्बलींग एरीयामध्ये आलो.
'बिगिनर्स लक' (Beginner's luck) म्हणतात त्याप्रमाणे आमच्या बंधुराजांचे नशीब जोरावर होते आणि आता जास्त परतावा देणाऱ्या बेट्स खेळण्यासाठी हातात प्लास्टिक चिप्सही होत्या. ह्या भांडवलाच्या जीवावर त्याने रुलेट मध्ये दीड-दोन तासात बऱ्यापैकी माया जमवल्यावर मग आम्ही 'Spin Wheel', 'Baccarat', 'Black Jack', अंदर बाहर, इंडियन फ्लश आणि स्लॉट मशिन अशा वेगवेगळ्या देशी-विदेशी जुगारी खेळांमध्ये नशीब आजमावत पहाटे चार पर्यंत टाईमपास केल्यावर मग 'कॅसिनो प्राईड २' ह्या त्याच ऑपरेटरच्या मांडवी नदीतील आकाराने थोड्या लहान असलेल्या दुसऱ्या कॅसिनोमध्ये जायला निघालो.
.
.
मी आतापर्यंत गोव्यातल्या पाच वेगवेगळ्या कॅसिनोंना भेट दिली आहे पण त्यातले 'कॅसिनो प्राईड' (Casino Pride), 'डेल्टीन रोयाल' (Deltin Royale) आणि 'डेल्टीन जॅक' (Deltin Jaqk) हे तीन माझ्या विशेष आवडीचे आहेत. ह्या तिघांची आपापली काही वैशिष्ट्ये आहेत. 'कॅसिनो प्राईड' मला आवडतो कारण त्याचे भव्य स्वरूप आणि सर्व आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज असूनही ह्याचे प्रवेश शुल्क तुलनेने सर्वात किफायतशीर आहे आणि विशेष म्हणजे एकाच तिकिटात आपण ह्याच कंपनीच्या इथे असलेल्या दोन कॅसिनोंना भेट देऊ शकतो! 'कॅसिनो प्राईड' वर कंटाळा आला तर 'कॅसिनो प्राईड २' वर जायचे, तिथे कंटाळा आला तर पुन्हा 'कॅसिनो प्राईड' वर परत यायचे, त्यासाठी दोन्ही ठिकाणी विशेष लॉन्च सेवा विनामूल्य उपलब्ध आहे.
अर्थात 'कॅसिनो प्राईड' ची शिफारस मी फक्त मित्रा-मित्रांचा ग्रुप जाणार असेल तरच करतो, पण जर बरोबर स्त्री/स्त्रिया असतील तर मात्र प्रवेश शुल्क बऱ्यापैकी जास्त असले तरी 'डेल्टीन रोयाल' किंवा 'डेल्टीन जॅक' अशा ठिकाणी जाण्याची आग्रही शिफारस करेन. बाकी गोष्टींत/सोयी-सुविधांमध्ये फारसा फरक नसला तरी ह्या दोन ठिकाणी येणारा क्राऊड तुलनेने 'क्लासी' असल्याने स्त्रियांना सहज/मोकळेपणी वावरण्यासाठी कॅसिनो प्राईडपेक्षा इथले वातावरण पोषक/अनुकूल असते. पण बरोबर जर सगळेच पुरुष असतील तर कॅसिनो प्राईड हे माझ्यामते 'बेस्ट' आणि एकदम 'पैसा वसूल' ठिकाण आहे.
असो, 'कॅसिनो प्राईड' वरून लॉंचने आम्ही पहाटे सव्वा चार-साडे चारच्या सुमारास 'कॅसिनो प्राईड २' वर पोचलो तेव्हा तिथली गर्दी बऱ्यापैकी ओसरली होती. चालू असलेल्या टेबल्सवर तुरळक खेळाडूंची उपस्थिती असल्याने ह्याठिकाणी निवांतपणे बसून, शेजारी लावलेल्या स्टूलवर पद्धतशीरपणे सर्व्ह केलेल्या मद्याचा आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत, अधून मधून बेट्स टाकत रुलेट खेळण्याची मजा घेता आली. काही बेट्स मध्ये हार तर काहींमध्ये जीत असा सिलसिला चालू होता. साडे सहाच्या सुमारास बहुतांश टेबल्स खेळाडूंअभावी बंद होऊ लागल्यावर आम्हीही तिथून काढता पाय घेतला आणि बहिणाबाईंना आम्हाला पिकअप करण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता काल आम्हाला सोडलेल्या ठिकाणीच परत यायला सांगितले असल्याने तो पर्यंतचा जवळपास दोन तासांचा वेळ घालवण्यासाठी पुन्हा 'कॅसिनो प्राईड' वर आलो.
आता इथलीही गर्दी ओसरल्याचे दिसले. गॅम्बलिंग एरियामध्ये तुरळक टेबल्स
चालू होती आणि उपस्थितांपैकी बहुतांशजण पेंगुळलेले दिसत होते तर जुगारात
बऱ्यापैकी पैसे हारलेले 'ग्रेट गॅम्बलर्स' झालेले नुकसान भरून काढण्यासाठी
केविलवाणे प्रयत्न करताना दिसत होते. एकंदरीत रात्री इथे असलेले उत्साही,
चैतन्यमयी, जोशपूर्ण वातावरण आता मात्र अगदीच निरुत्साही, ढेपाळलेले
वाटायला लागले होते. किनाऱ्यावर परतण्यासाठी पर्यटकांची लॉंचसाठीची रांगही
वाढत चालली होती. हाताशी अजून जवळपास तासाभराचा वेळ होता म्हणून आतल्या
उपहारगृहातून चहा खरेदी करून आम्ही बाहेर ओपन डेकवर टाईमपास करण्यासाठी
येऊन बसलो.
एकंदरीत रात्र मजेत गेली होती, खाऊन पिऊन प्रवेश शुल्कासाठी भरलेली रक्कम
वसूल होऊन बंधुराजांचे भाग्य बलवत्तर असल्याने २२०० रुपयांची अतिरिक्त
कमाईही झाली होती!
कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत, आल्हाददायक हवा खात थोडावेळ घालवल्यावर
लॉंचसाठीची गर्दी कमी झाल्याचे पाहून आम्ही तिथून निघालो आणि काही मिनिटांत
किनाऱ्यावर पोचलो. ठरलेल्या वेळी बहीणही तिथे आली आणि वीस-पंचवीस
मिनिटांचा प्रवास करून आम्ही तिच्या करमळीच्या घरी पोचलो. तिने तयार करून
ठेवलेला इडली सांबार भरपेट खाऊन रात्रभराच्या जागरणामुळे झोप अनावर
झाल्याने सरळ झोपून गेलो.
"कॅसिनोमध्ये फोटो काढण्यास मनाई असल्याने ह्या भागात फोटो खूपच कमी टाकले आहेत, हि कमतरता पुढील भागांतून, जे गोव्यातले किल्ले आणि समुद्रकिनारे ह्यावर असतील त्यातून भरून काढण्यात येणार आहे 😀 तसेच लेखात जे फोटो दिले आहेत ते 'कॅसिनो प्राईड'च्या वेबसाईटवरून साभार घेतले आहेत."
कॅसिनो मधे फोटोज् न काढू देणे ही स्त्रेटेजी आवडली आहे
ते लाख फोटो काढायला परवानगी देतील हो, पण तिथे नित्यनेमाने येणारी अट्टल जुगारी मंडळी त्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी आंदोलन करतील त्याचे काय 😀
मुंबई, दिल्ली, चंदीगड, पंजाब, गुजरात आणि राजस्थानातील असंख्य व्यावसायिक, व्यापारी आणि बडी धेंडं खास खेळण्यासाठी म्हणुन संध्यकाळी विमानाने येऊन सकाळी परत घरी जातात तर काही जण आठवडाभरासाठी तळ ठोकून लाखो रुपयांची हार-जीत करतात! बरं घरी बायको-पोरांना काय थापा मारून येत असतील तो वेगळाच विषय आहे, पण कॅसिनोत 'लकी चार्म' म्हणुन मिरवायला बरोबर आणलेल्या कुणा 'टिक-टॉक क्वीन', 'इन्स्टा गर्ल' बरोबर त्यांचा टिपलेला फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि चुकून त्यांच्या बायको-पोरांच्या पाहण्यात आला तर नसती आफतच ओढवायची की हो 😀 😀 😀
आता कॅसिनो आतून पहायची हुरहूर लागली आहे !
जरूर पाहून या... तुम्हाला नक्कीच मजा येईल!
पण कॅसिनोत 'लकी चार्म' म्हणुन मिरवायला बरोबर आणलेल्या कुणा...
यावरून गंमत आठवली
एकदा मी आणि मित्र असे आम्ही भटकंती करीत ऑस्ट्रेलयातील उत्तरेला गेलो
असताना एक जंगलातील अगदी नयनरम्य आणि विशेष म्हणजे उत्तम लाकडी कोरीव काम
असलेले ट्री टॉप रिसॉर्ट दिसले .. बघुयात कसे काय म्हणून बघत होतो आणि
त्यावेळी मीत्र विडिओ घेत होता .. थोडयावेळाने तेथिल मॅनेजर आला आणि
म्हणाला कि कृपया घेऊन नका विडिओ... मित्राने हो म्हणले आणि विडिओ घेणे
थांबवले .. पुढे तो मॅनेजर गप्पा मारता मारता म्हणाला काही नाही वाईट
वाटूनघेऊन नका पण काय आहे कि आमचे हे छोटेखानी हॉटेल फक्त "तो आणि ती" साठी
खास असले तरी प्रत्येक तो च्या बरोबर येणारी "ती" हि त्याची बायकोच असते
असे नाही >>>>>
असो हे ते ठिकाण https://www.booking.com/hotel/au/secrets-on-the-lake.html?activeTab=phot...
तांबडी सुरला मंदिराबाबत-
हे मंदिर यादवांचा श्रीकरणाधिप हेमाद्री पंडिताने बांधले असा सर्वसाधारण
समज असला तरी हे मंदिर कदंब शैलीत आहे जी कर्नाटक-द्रविड अशा मिश्र शैलीतून
निर्माण झालीय, मंदिराचे अधिष्ठान आणि शिखर फांसना शैलीत आहेत तर स्तंभ
द्रविड शैलीत आहेत.
हे हेमाद्रीने बांधले असा समज केवळ कुण्या कदंब वंशीय शिवचित हेमाडीमुळे झाले असावे. ह्या शिवचित हेमाडीचे एक नाणे उपलब्ध आहे, त्यावरील लेख पुढीलप्रमाणे-
श्रीसप्तकोटीश्वरलब्धवरशिवचित वीरहेमाडिवर मलवर मारि
ह्याच्या नावावरूनच गोव्यातील एका प्रांताला हेमाड बारशे असे नाव पडले होते.
वास्को द गामा बाबत-
युरोपातून समुद्रमार्गे येणारा पहिला युरोपीय प्रवासी म्हणजे वास्को द गामा
हे रूढार्थाने जरी मानत असले तरी त्याआधीही ग्रीक, अरब इकडे येतच होते.
सातवाहनांच्या आधीपासूनच जमिनीवरून आणि समुद्रमार्गेही ग्रीकांशी व्यापार
चालूच असे, हे ग्रीक काही प्रांतांचे शासकही होते. वास्को द गामा हा
आफ्रिका खंडाला वळसा घालून येणारा पहिला युरोपीय प्रवासी असे म्हणता यावे.
तांबडी सुरला मंदिराबाबतच्या अभ्यासपूर्ण माहितीसाठी अतीव आभार!
हे मंदिर यादवांचा श्रीकरणाधिप हेमाद्री पंडिताने बांधले असा सर्वसाधारण समज असला तरी हे मंदिर कदंब शैलीत आहे
कदंब राजवंशाचा शासनकाळ हा इ. स. ३४० ते ६१० च्या दरम्यान होता. हे मंदिर १२-१३ व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते. मंदिराची काहीशी बांधकाम शैली कदंब शैलीची/तिच्याशी मिळती जुळती असल्या सारखा त्रोटक/संदीग्ध उल्लेख मंदिराबाहेर लावलेल्या पुरातत्व विभागाच्या बोर्डवरसुद्धा आहे. पण मग असा प्रश्न पडतो कि कदंबांचा काळ सातव्या शतकाच्या सुरुवातीला संपला होता मग १२-१३व्या शतकात हे मंदिर त्या शैलीत नक्की बांधले तरी कोणी?
हे हेमाद्रीने बांधले असा समज केवळ कुण्या कदंब वंशीय शिवचित हेमाडीमुळे झाले असावे.
मला वाटतं हे असे चुकीचे समज / गैरसमज दूर करण्यात आपले पुरातत्व खाते
कुठेतरी कमी पडत असावे किंवा लिखित इतिहास/शिलालेख उपलब्ध नसल्याने
त्यांच्या संशोधनास मर्यादा येत असाव्यात.
इतिहासाची मोडतोड करण्याची कुप्रवृत्ती आपल्याकडे आजही दिसते आहेच पण ते असो...
वास्को द गामा बाबत-
ग्रीकांचा भारतात प्रवेश पंजाब प्रांतातून जमिनीवरून/खुश्किच्या
मार्गाने झाला झाला होता. तसेच त्यांचा समुद्रमार्गे होणारा व्यापार हा
(आताच्या) इराण/इराक पर्यंतच समुद्रमार्गे होत होता असे वाचनात आले होते
आणि अलेक्झांडरच्या तत्कालीन सम्राज्याचा नकाशा बघता तेच खरे असावे असे
वाटते. (माझा तुमच्याएवढा इतिहासाचा अभ्यास नक्कीच नाही, त्यामुळे कुठे
चुकत असेन तर निःसंकोचपणे अवश्य दुरुस्त करा)
त्यामुळे मी लेखात लिहिलेल्या
ह्या वाक्यात"1498 साली दर्यावर्दी 'वास्को-डी-गामा' आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या रूपाने समुद्रमार्गे येऊन भारताच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवणारे युरोपीयन लोकं देखील पोर्तुगीजच होते"
"1498 साली दर्यावर्दी 'वास्को-डी-गामा' आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या रूपाने युरोप मधून आफ्रिकेला वळसा घालून समुद्रमार्गे थेट भारताच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवणारे युरोपीयन लोकं देखील पोर्तुगीजच होते"
असा बदल करणे योग्य ठरेल, आणि ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्याबददल धन्यवाद
त्यांचा समुद्रमार्गे होणारा व्यापार हा (आताच्या) इराण/इराक पर्यंतच समुद्रमार्गे होत होता असे वाचनात आले होते
अर्थातच. तांबडा समुद्र, पर्शियाचे आखात इथून ग्रीक, रोमनांचा भडोच, कल्याण, सोपारा ह्यांच्याशी समुद्रमार्गे चालणाऱ्या व्यापाराचा उल्लेख पेरिप्लस ऑफ एरीथ्रियन सी या ग्रंथात उल्लेख आहे.
बापरे... म्हणजे 'मराठी विश्वकोश' ह्या सरकारी संकेतस्थळावर देखील चुकीची/अर्धवट माहिती दिली जाते. कठीण आहे मग
🤦♂️
वर लिंक दिलेल्या लेखात सुरुवातीला,
कदंब वंश : दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील उत्तर कानडा (कॅनरा) प्रदेशातील एक प्राचीन वंश. ह्या वंशातील राजांनी उत्तर कानडा,हानगल, गोवा व त्याच्या जवळपासच्या प्रदेशांवर ३४० ते ६१० च्या दरम्यान, जवळजवळ अडीचशे वर्षे राज्य केले. त्यांच्या लेखांवरून त्यांच्या वंशाची काहीशी कल्पना येते, मात्र त्यांच्या काळाविषयी निश्चित माहिती मिळत नाही.
असे लिहिले आहे तर शेवटी,
ऐहोळे येथील शिलालेखात कीर्तिवर्म्याला कदंब राजवंशाची काळरात्र असे म्हटले आहे. अजवर्म्याचा पुत्र भोगिवर्मा (सु. ६०६ – ६१०) ह्याने आपल्या वंशाचे स्वातंत्र्य टिकविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा बदामीच्या दुसऱ्या पुलकेशीने पराजय करून वनवासी ही राजधानी उद्ध्वस्त केली व कदंबांचे राज्य आपल्या राज्यात समाविष्ट केले. ह्या घटनेचा ऐहोळे येथील कोरीव लेखात उल्लेख आहे.
अशी माहिती दिली आहे.
म्हणजे अर्धवटच माहिती दिली आहे म्हणायची!
बापरे... म्हणजे 'मराठी विश्वकोश' ह्या सरकारी संकेतस्थळावर देखील चुकीची/अर्धवट माहिती दिली जाते.
ही माहिती चुकीची नसून अर्धवट आहे असे म्हणता येईल. विश्वकोषातील उल्लेख हा उत्तर कर्नाटकातील बनवासीच्या कदंबाबद्दल आहे. शिलाहारांप्रमाणेच हेही चालुक्य/राष्ट्रकूटांचे मांडलिक होते. जी सत्ता प्रबळ त्यांचे हे मांडलिक असत. प्रबळ राजसत्ता कमजोर झाली हे मांडलिकत्व झुगारून देऊन स्वतःला स्वतंत्र म्हणून घोषित करत. चालुक्यांनी बनवासी कदंबांचा पराभव केल्यानंतर कालांतराने १० व्या शतकात ह्यांची एक शाखा गोव्याची राज्यकर्ता झाली. शिलाहारांचे गोव्यातून उच्चाटन करून हे गोव्याचे सार्वभौम झाले मात्र मांडलिकत्व कायम राहीले ते द्वितीय जयकेशीपर्यन्त. दुर्दैवाने पोर्तुगीजांनी कदंबाचा समृद्धशाली वारसा समूळ नष्ट केला.
बिग डॅडी मध्ये साडेचार हजार किंवा जास्त चे तिकीट आहे तिथे पोल डान्स , बेली डान्स च्या शो ला एन्ट्री असते... डेक वरची एन्ट्री खूप महाग होती... सर्वात खाली एक कंपार्टमेंट होता ते नो लिमिट होता.. पण त्याची एन्ट्री काही सांगितली नाही..
बिग डॅडी मध्ये साडेचार हजार किंवा जास्त चे तिकीट आहे
हे त्यांचे पॅकेज आहे, प्रवेश शुल्क इतर दिवशी २०००/ २५०० आणि विकएंडला ३०००/३५०० च्या आसपास असते. प्रत्येक कॅसिनोचे प्रवेश शुल्क आणि अन्य पॅकेजेस वेगवेगळी आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेगवेगळे 'इव्हेंट्स' आयोजित केले जातात त्यामुळेही शुल्क बदलत असते. सर्वसमावेशक पॅकेजेस खूपच महाग असतात त्यासाठीच जाण्या आधी त्यांच्या वेबसाईट बघणे श्रेयस्कर!
सर्वात खाली एक कंपार्टमेंट होता ते नो लिमिट होता.. पण त्याची एन्ट्री काही सांगितली नाही..
पर्यटकां व्यतिरिक्त त्यांचा आपला आपला नेहमीचा ग्राहकवर्ग असतो. मोठ्या
स्टेक्स खेळणाऱ्या अशा VIP खेळाडूंसाठी/सभासदांसाठी अशी राखीव
कंपार्टमेंट्स/टेबल्स असतात.
'बिग डॅडी' चे प्रवेशशुल्क हे एकंदरीत तिथल्या सेवा-सुविधांच्या मानाने
'ओव्हर प्राईस्ड' वाटल्याने मला आवडलेल्या ३ कॅसिनोंच्या यादीत त्याचा
समावेश केला नाहीये.
चौकस साहेब काय समजता काय तुम्ही आमच्या भारताला 😀 ऑ?
राजमुंद्री (Rajahmundry/Rajamahendravaram) हे आंध्र
प्रदेशातील गोदावरी तिरावरचे एक शहर तिथल्या इस्कॉन मंदिर आणि
कोटिलिंगेश्वर ह्या प्राचीन मंदिरासाठी पर्यटक / भाविकांमध्ये प्रसिद्ध
असले तरी एकेकाळी चालुक्यांची राजधानी आणि'तेलगु' भाषेचे जन्मस्थान मानले
जाणाऱ्या ह्या शहरात काय काय गोष्टी चालतात हे समजले तर डोळे पांढरे
व्हायची वेळ येईल 😀
अर्थात सगळ्या ऍक्टिविटीज अनधिकृत असल्या तरी 'एका रात्रीसाठी' देशभरातून
तिथे येऊन जाणाऱ्यांच्या सोयीसाठी ४-५ लाख लोकसंख्येच्या ह्या शहरात
'एअरपोर्ट' सुद्धा आहे!
अर्थात राजमुंद्री हे फक्त नमुन्यादाखल एक उदाहरण झाले, अशी कितीतरी 'hidden secretes' विलासीवृत्तीच्या राजे, महाराजे, बादशहा, नवाबांचा इतिहास लाभलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यात दडलेली आहेत ज्यांची माहिती गुगल/विकीपीडियावर मिळणार नाही, ती शोधून अनुभवावी लागतात 😀 😀 😀
भारतात गोव्याबाहेर आजघडीला फक्त सिक्कीम मधील गंगटोक येथे 'Deltin Denzong' हा एकमेव कॅसिनो सुरु आहे. दमण येथे 'The Deltin' ह्या पंचतारंकित रिसॉर्टमध्ये तब्बल ६०००० चौ. फू. क्षेत्रफळावर आलिशान कॅसिनो बनवण्याचे काम चालू होते आणि तो २०१७ मध्ये सुरु होणार होता पण अजूनही लाल फितीत अडकल्याने कंपनीची शेकडो कोटींची गुंतवणूक अडकून पडली आहे.
http://www.misalpav.com/node/50541
पोर्तुगीज राजवटीत त्यांच्या आधीपत्या खालील प्रदेशातल्या हिंदू, मुसलमान धर्मियांवर बळजबरीने कर्मठ ख्रिस्ती धर्म लादण्यासाठी १५६०-१५६१ मध्ये सुरु झालेल्या 'द गोवा इन्क्वीजीशन' (The Goa Inquisition) अंतर्गत जे अनन्वित अत्याचार केले गेले त्यात १५६६ ते १५६८ ह्या काळात गोव्यातली जवळपास सर्व (७५० पेक्षा जास्त) प्राचीन मंदिरे उध्वस्त केली गेली.
'पोर्तुगीज अर्काईव्हज' (Portuguese Archives) मधल्या १५६९ सालच्या एका राजपत्रात भारतातल्या पोर्तुगीज वसाहतीतली सर्व हिंदू मंदिरे जाळली अथवा जमीनदोस्त करण्यात आली असल्याची नोंद आहे.
पण मुख्य वस्ती पासून दूर जंगलात (मोलेम अभयारण्याच्या परिसरात / Mollem National Park) असल्याने १२ व्या शतकात यादव राजा रामचंद्र ह्यांच्या मंत्र्याने बेसॉल्ट दगडांत बांधलेले आणि उत्तम शिल्पकलेने सजलेले हे प्राचीन मंदिर धर्मांध ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या आणि प्रशासकांच्या अत्याचारांपासून बचावले. आजघडीला हे मंदिर गोव्यातले सर्वात प्राचीन मंदिर म्हणुन ओळखले जाते.
अतिशय निसर्गरम्य परिसरात असलेले हे प्राचीन महादेव मंदिर 6-7
वर्षांपूर्वीच्या एका गोवा भेटीत पाहिले आहे, ते ह्या भेटीत पुन्हा पाहता
नाही आले. त्यामुळे त्याविषयी इथे जास्ती लिहीत नाही, पण गेल्यावर्षी
फेसबुक वर प्राचीन वास्तुकला/स्थापत्य/संस्कृती विषयक एका ग्रुपवर ह्या
मंदिराचा परिचय करून देण्यासाठी एक सचित्र लघुलेख लिहिला होता त्याची लिंक
इच्छुकांसाठी देतो.
Tambdi Surla Mahadev Temple - Goa
दक्षिण गोवा जिल्ह्यातल्या'काणकोण' (कॅनाकोना / Canacona) तालुक्यातील
'काबो-डी-रामा' (Cabo de Rama) ह्या संपूर्ण गोव्यातील सर्वात मोठ्या आणि
प्राचीन किल्यांपैकी एक असलेल्या दक्षिण गोव्यातील शेवटच्या किल्ल्याच्या
दिशेनी प्रवास सुरु झाला.
.
.
वास्तविक 'काबो-डी-रामा' हा भौगोलिकदृष्ट्या गोव्याच्या दक्षिणेकडचा शेवटचा
किल्ला नाही. त्यापुढेही 'अंजेदिवा' नावाचा एक फार प्राचीन (अवशेषरुपी)
किल्ला 'अंजदीप' नावाच्या बेटावर आहे पण आता त्या बेटावर भारतीय नौदलाचा तळ
असल्याने तिथे जाण्यास पर्यटकांना परवानगी नाही.
'अंजदीप' हे बेट गोव्याच्या मुख्यभूमीपासून लांबवर, कर्नाटकातील कारवारच्या किनारपट्टीच्या अगदी जवळ असले तरी त्यावर प्रशासन गोवा सरकारचे आहे. अशी गंमत गोव्याच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही टोकांना बघायला मिळते. उत्तरेकडे 'तेरेखोल' (Terekhol / Tiracol) किल्ल्याच्या बाबतीत तर दक्षिणेकडे अंजदीप बेट आणि त्यावरच्या 'अंजेदिवा' किल्ल्याच्या बाबतीत.
तेरेखोल हे गाव भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यात असले तरी तिथला 'तेरेखोल किल्ला' आणि त्याच्या आसपासचा थोडा प्रदेश मात्र गोवा सरकारच्या अखत्यारीत येतो. तर 1961 साली भारतीय सेनेने 'ऑपरेशन विजय' सुरु करून गोवा, दिव-दमण आणि अंजदीप (अंजेदिवा) बेट पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केल्यावर ते गोवा राज्याचा भाग बनले.
विशेष गोष्ट म्हणजे 1498 साली दर्यावर्दी 'वास्को-डी-गामा' आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या रूपाने समुद्रमार्गे येऊन भारताच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवणारे युरोपीयन लोकं देखील पोर्तुगीजच होते आणि 1961 साली 'ऑपरेशन विजय' नंतर भारत सोडून जाणारे सर्वात शेवटचे युरोपीयन शासकही पोर्तुगीजच होते!
असो, करमळी पासून 57 किमीचा प्रवास रमत गमत दोन तासात पार करून आम्ही दुपारी दीड वाजता 'काबो-डी-रामा' किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो.
.
तीन बाजूने पाणी आणि एका बाजूला जमीन अशी भौगोलिक स्थिती असणाऱ्या समुद्रात
शिरलेल्या जमिनीच्या टोकाला आपण भुशीर म्हणतो त्यालाच पोर्तुगीज भाषेत
'काबो' (Cabo) म्हणतात. साडे-चार ते पाच एकर क्षेत्रफळ व्यापणारा हा किल्ला
अशाच एका भुशीरावर बांधलेला आहे.
प्रभु श्री रामचंद्र आपल्या वनवासाच्या काळात सीतामाई आणि लक्षमाणसह कर्नाटकातून ह्याठिकाणी येऊन काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे ह्या भुशीराला 'राम भुशीर' किंवा 'रामाचे भुशीर' असे नाव पडल्याची दंतकथा आहे. पुढे ह्या रामाच्या भुशीराचे पोर्तुगीज राजवटीत 'काबो-डी-रामा' असे भाषांतर झाले.
अतिशय निसर्गरम्य परिसरात चिऱ्यांनी (जांभा दगडात) बांधलेल्या आणि पूर्वी खोलगड म्हणुन ओळखला जाणाऱ्या ह्या किल्ल्याचा ताबा इतिहासात अनेकवेळा मराठे, मुस्लिम राज्यकर्ते, आणि पोर्तुगीजांकडे फिरता राहिला. सोंधे संस्थानाकडून हैदरअली कडे मग पुन्हा सोंधे संस्थानाकडे जात शेवटी 1791 मध्ये ह्या किल्ल्याचा ताबा पूर्णपणे पोर्तुगीजांकडे आला तो थेट 1961 पर्यंत.
किल्ल्याच्या मध्यभागी आजही वापरात असलेला एक चर्च सोडला तर बाकी सर्व भाग्नावशेष उरले आहेत, पण अजूनही सुस्थितीत असलेल्या मजबूत तटबंदीवरून आपण बऱ्यापैकी लांब फेरफटका मारत आसपासचा नयनरम्य परिसर पाहू शकतो.
'काबो-डी-रामा' किल्ल्याचे आणि परिसराचे काही फोटोज -
.
प्रवेशद्वार ओलांडल्यावर समोर ठेवलेली तोफ.
.
किल्ल्याला जमिनिपासुन वेगळे करणारा खंदक.
.
बुरुजावरची तोफ.
.
दुसर्या बुरुजावरच्या दोन तोफा.
.
किल्ल्यावरच्या वास्तुंचे भग्नावषेश.
.
किल्ल्यावरच्या वास्तुंचे भग्नावषेश.
.
किल्ल्यावरच्या वास्तुंचे भग्नावषेश.
.
किल्ल्यावरुन दिसणारा देखावा १
.
किल्ल्यावरुन दिसणारा देखावा २
.
किल्ल्यावरुन दिसणारा देखावा ३
.
किल्ल्यावरुन दिसणारा देखावा ४
.
.
फारच प्रेक्षणीय परिसर असलेल्या ह्या किल्ल्यात सुमारे दीड तास व्यतीत करून आम्ही परतीच्या वाटेवरील पुढचे किल्ले बघायला निघालो.
किल्ल्यापासून दीड किलोमीटर पुढे गेल्यावर 'काबो-डी-रामा व्हयू पॉईंट' (Cabo De Rama Viewpoint) असे ठिकाण आहे तिथून लांब पर्यंत पसरलेल्या समुद्रकिनाऱ्याचे खूप सुंदर दृष्य बघायला मिळते. त्या ठिकाणी टिपलेले दोन फोटोज -
.
.
.
ह्याठिकाणी असलेल्या एका दुकानात 'खारा' लिंबू सोडा पिऊन तरतरीत झाल्यावर 10 किमी वर असलेल्या 'बेतुल' ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून बांधण्यात आलेल्या किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला..
गोव्यातील जेवणखाण
गोव्यातील जेवणखाण ही नेहमी आनंददायक घडामोड असते. सगळ्यांच्या रोजच्या जगण्यातला महत्त्वाचा भाग या घडामोडीभोवती रचलेला असतो. गोव्याच्या संमिश्र इतिहासामुळे त्याच्या खाण्यापिण्यात असंख्य तरहा निर्माण झालेल्या आहेत. गावठी भाज्यांपासून रानडुकरापर्यंत अनेक प्रकार तेथे प्रसिद्ध आहेत. आणि अन्य कोणत्याही भागाप्रमाणे तेथेही सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी हॉटेलवर अवलंबून राहता येत नाही. पण अनेक गोष्टी हॉटेलमध्येही उत्तम मिळतात. गोव्यात प्रवास करणे हे मात्र फार जिकिरीचे काम आहे. पुन्हा महागही. उदा. मुंबईहून गोव्याला तुम्ही अडीच-तीन हजार रुपयांत जाता. म्हणजे सहाशे किलोमीटर. पण तेथून पंधरा किलोमीटरच्या गावी जायला तुम्हाला आठशे रुपये खर्च करावे लागतात. तेच तुम्ही विमानतळावरून एका मिनिटांत मुख्य रस्त्यावर येऊ शकता आणि बसने तेवढय़ाच अंतरासाठी पंधरा रुपये पुरेसे असतात. अर्थात, तुम्ही सहा-सात वाजेपर्यंत पोचलात तर.
गोव्यात दिवसाची सुरुवात नाश्त्यापासून होत नसते, तर
दुपारच्या जेवणापासून होत असते. याचा अर्थ नाश्ता महत्त्वाचा नसतो अशातला
भाग नाही. पण गोवेकराचा दिवसाभरातला मोठा भर असतो, तो दुपारच्या जेवणावर.
बहुतेक ठिकाणी आठवडाभराचा मेनू ठरलेला असतो. पण गोवेकराचा दिवसाचा मेनू
त्याला बाजारात काय हाती लागेल यावर ठरत असतो. त्यासाठी तो त्याच्या
सोयीनुसार बाजारात फेरफटका टाकतो. आणि या सर्वाच्या सोयीसाठी सकाळी सहा
वाजल्यापासून दुपारी एक-दीड वाजेपर्यंत मासळी बाजार भरलेला असतो. सकाळी
लवकर कामावर जाणारी मंडळी एकतर सकाळी लौकर बाजार करून आणतात किंवा काम लवकर
आटोपून मध्ये अकरा बाराच्या दरम्यान वेळ काढून ही जबाबदारी पार पाडतात.
काही जणांची ही वेळ ठरलेली असते. दुकान नोकरावर सोपवून याच सुमारास मालक
मासळी बाजारात असतो. काही वेळा नेहमीची गिऱ्हाईके बाजारातच व्यवहार करतात.
म्हणजे दोघांचे काम होते आणि दोघांचाही वेळ वाचतो.पुरुषमंडळी घरी नसली तर मासे आणायची जबाबदारी बायकांवर येते. त्यांच्यासाठी सायकलला टोपली
बांधलेला मासेविक्रेता किंवा
डोक्यावरून टोपलीतून मासे घेऊन जाणारी मत्स्यगंधा या वरदान ठरतात. फक्त
एवढंच की त्यांना बाजारातल्या इतका चॉईस मिळत नाही. नियतीवर भरोसा हा याच
बाबतीत ठेवला जातो. गोव्यात माशांना खूप महत्त्व आहे. मासे रोज, आठवडा-दोन आठवडय़ातून एकदा चिकन आणि महिन्यातून एकदा मटण. भाजी अधूनमधून, एक्स्ट्रा ऐवजी नाही. बाजारात गेलात की काही ठळक प्रकारातले मासे उपलब्ध असतात. एकतर मोठे मासे. सुरमई, पालू, मोरी, रावस, तांबसो वगरे. मध्यम आकारात पापलेट, सोनयाळे, बांगडे आदी मासे. छोटय़ा आकारात तारले, मुडदोशी, वेल्ली आदी. आणि अगदी छोटे करबट. म्हणजे त्यात अनेक प्रकारचे बोटापेक्षा लहान आकाराचे मासे असतात. मग खेकडे, सुंगटा, कालवं, खुबे, माणकी आदी प्रकार.
मुंबईत वगरे मासे घेतले की मासे विकणारी ती साफ करून, कापून देते. कोळंबी घेतली तरी सगळ्या कोलंब्या सोलून मिळतात. पण गोव्यात असले लाड मच्छीवाली करत नाही. कारण मुळात ती मासे बाजारात आणून सगळ्यांवर जेवढे उपकार करते, त्याचीच परतफेड होणे शक्य नाही, तर आणखी काय करणार तीन हजार रुपये देउन एक मीटर लांबीचा मासा घेतला तरी ती जसे आहे, जेथे आहे तत्त्वावर ती तो मासा विकते. त्यामुळे अशा वेळी मोठे मासे विकणाऱ्यांच्या बाजूलाच फक्त मासे कापून देणारे असतात. ते विशिष्ट मोबदला घेऊन हे
काम करून
देतात. येथे प्राचीन बार्टर सिस्टीम अजून सुरू आहे. एकतर त्याची ठरलेली
रक्कम (ही माशाच्या आकारानुसार बदलत नाही) देउन किंवा माश्याचं डोकं देऊन
बाकीचा मासा कापून घेऊन जाऊ शकतात. मग हे लोक जमलेली डोकी स्वतंत्रपणे
विकतात. मासे विकणारीला किंमतीवरून खूप घासाघीस केलेली आवडत नाही. मुंबईत मासेवाली वाईट वाटून घेत नाही. पण घासाघीस केली की तो तिच्यापेक्षा माशांचा अपमान होतो. आणि मासा आपला सन्मान राखण्याच्या स्थितीत उरलेला नसतो. माशांचा सन्मान राखण्यासाठी ती मोफतमध्ये भांडते आणि माशाच्या अपमानाची परतफेड करते. तिचा मासा चांगला असेल तर तुम्ही घासाघीस करण्यासाठी मनातल्या मनात आकडा जुळवेपर्यंत एखादा जाणकार भाटकार तो मासा अलगद उचलतो. बाकीचे मासे घरी आहे तसे आणले जातात. मग मासे साफ करणे हे एक काम घरवालीवर येते. हे कसब आणि कौशल्याचे काम असते. खरा गोवेकर कधीच वाटण करून ठेव अमुक आणतो, असं कधीच सांगत नाही (आणि सांगू शकत नाही.) तो आधी आणतो आणि ते बघून घरवाली त्याचे वाटण ठरवते. गोड मासे वेगळ्या प्रकारे, बाकी मासे वेगळ्या प्रकारे, पुन्हा प्रत्येक मासा अनेक प्रकारे बनवता येतो. उदा. विसवण म्हणजे सुरमई किंवा पापलेट हे गोड प्रकारचे मासे मानले जातात. यांचा कांदा घालून रस्सा होतो तसेच ते तळायला उत्तम असतात. सुरमईचे
डोके
मोठे असते. त्याच्या तुकड्यांचा कोरडा रस्सा करतात. आल्याचा स्वाद देऊन हे
तुकडे भाडय़ाला लागून किंचित करपतील असे बघतात. गोव्यात गेलात आणि तिथल्या
कोणत्याही किनाऱ्यावर नाही गेलात याचा अर्थ तुम्ही अंथरुणाला खिळलेले आहात
असाच असू शकतो. धडधाकट असूनही जर तुम्ही गेला नाहीत तर मात्र तुम्ही चारधाम
यात्रेला निघालेल्या गाडीऐवजी चुकीच्या गाडीत बसून गोव्याला पोचलात असाच
अर्थ असू शकतो.गोव्याचे किनारे मात्र बिघडत चाललेत. इथे येण्यापेक्षा चारधाम यात्रा परवडली, असे नक्की वाटावे, अशी स्थिती आहे. इथला सर्वात प्रसिद्ध किनारा कळंगुट हा अत्यंत अस्वच्छ झालेला आहे. पाण्यात खूप कचरा आहे आणि मोटर बोटिंग प्रकारामुळे समुद्रात प्रचंड डिझेल मिसळलेले आहे. गोव्यातील हा किनारा सर्वाधिक हॅपिनग होता आणि आता मी तेथे स्वत: पुन्हा जाणार नाही आणि कुणाला जायची शिफारस करणार नाही. पुन्हा तेथे खास गोमंतकीय खाद्यपदार्थ मिळायची मारामार आहे. सगळे पदार्थ पंजाबी स्टाईलमध्ये किंवा उडपी पद्धतीने बनतात. एखादं चुकार छोटंसं बार अँड रेस्तरॉं सापडलं तरच गोव्याचा स्वाद हाती लागण्याची शक्यता असते. नाश्त्यासाठी एकही गोमंतकीय हॉटेल नाही. जेवणासाठीही नाही. श्ॉकवर चांगलं जेवण मिळतं पण किमती भरमसाट आणि त्यात ते गोमंतकीय असण्यापेक्षा फॉरेनरसाठी कॉन्टीनेंटल अधिक असतं.
अलीकडच्या काळात माझा आवडता किनारा आहे पाळोळे. दक्षिण गोव्यातील हा अर्धचंद्राकार आकाराचा किनारा अद्याप स्वच्छ आहे. खूप अस्ताव्यस्त वाढलेला नाही. खाण्यापिण्याच्या दृष्टीने अधिक चांगला आहे. अत्यंत शांत. त्यामुळे अलीकडे परदेशी आणि देशीही पर्यटक या किनाऱ्याकडे अधिक आकर्षति होतात. येथे
माशांपासून पोर्कपर्यंत सर्व प्रकारचे उत्तम जेवण
मिळते. येथे आम्हाला उत्कृष्ट बीफ आणि पोर्क मिळालं. आम्ही भरदुपारी एक
वाजता पाण्यात शिरलो आणि तीन वाजता पाण्यातून बाहेर आलो. कडाडून भूक
लागलेली. तेथे गरमागरम रोटय़ाही दुपारी साडेतीन वाजता मिळाल्या. व्वा.
गोव्यात मडगाव, पणजीकडे दुपारी चारनंतर भटकताना मुंबईत वडय़ाच्या गाडय़ा
लागतात त्याप्रमाणे रस्सा ऑमलेटच्या गाडय़ा लागतात. सोबत समोसे, मिर्ची भजी
आणि साधी भजी असा मेनू असतो. रस्सा ऑमलेट म्हणजे नेहमीसारखे कांदा, मिर्ची,
कोिथबीर, मीठ घातलेलं ऑमलेट असतं, आणि त्यावर गोमंतकीय चिकनचा जाडा रस्सा
टाकला जातो. तो दुपारी ताज्या बनवलेल्या पावांसोबत मिर्ची भजी, समोसा याचा
आस्वाद घेत खायचं असतं. किंवा नुसती मिर्ची भजी खाल्ली तरी चालतात. पण
रस्सा ऑमलेट म्हणजे खास अनुभव असतो.
काही ठिकाणी ही समुद्रअंडी मोठ्या आकारातही सापडतात. ती
नुसत्या गरम तव्याच्या स्पर्शाने भाजून निघतात. त्याची भाजीही उत्तम बनते.
छोटय़ा आकाराची कालवं असली की त्याचा रस्सा बनवतात. तसाच प्रकार तिसऱ्यांचा.
अत्यंत छोट्या आकारापासून म्हणजे एका सेंटीमीटरपेक्षा लहान आकारापासून दोन
इंचापर्यंतच्या आकारात िशपले सापडतात. त्याचे तळणे, रस्सा, डांगर आणि सुके
सगळं अप्रतीम असतं.हे सगळे प्रकार हॉटेलमध्ये मिळणे महाकठीण. उदा. करबटाचं (वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे मासे) हुमण खायचं असेल तर तिथल्या मित्रमत्रीणींकडे वशिला लावावा लागतो. करबटं साफ करणं महाकठीण काम. तसंच, अलीकडे स्वादापेक्षाही स्टेटस अधिक मोठा ठरतोय की काय असं वाटतं. बाजारात ओळखीचा माणूस भेटला आणि हे स्वस्त मासे घेताना बघून काय म्हणेल ही भीती अधिक दिसते. मात्र, अजून काही मासेवाल्या छोटे, स्वस्त आणि चविष्ट मासे विकत असतात. कुठल्या तरी चुली अजून या माशांची कढी उकळत असतात, एवढंच समाधान. आमची खाद्ययात्रा एका फेरीत पूर्ण होणे कठीण होतं. पण बरेच ठळक प्रकार खाऊन झाले. अजून प्रकार बाकी आहेत; ते तेथून नामशेष होण्याआधी जाऊन त्या चवीची ओळख करून देणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.