Thursday, December 9, 2021

आकाशदर्शनाची किमया असलेले बाराखांबी मंदिर

 मराठवाडय़ात हेमांडपंथी देवळाची त्या त्या भागात वेगवेगळी वैशिष्टय़े मंदिर उभारणीच्या वेळेला तत्कालीन शिल्पकार आणि वास्तूस्थापत्य तज्ज्ञांनी केली आह़े अंबाजोगाईच्या बाराखांबी मंदिरातही अशाच काही खूबी आहेत़ या मंदिराला एकूण बारा खांब आहेत़ पण कोणत्याही बाजूने मोजा ते अकराच होतात़ दुसरे वैशिष्टय़ म्हणजे छताला चौकानी आकाराचे गवाक्ष असून त्यातून आकाशदर्शन होत़े आकाशदर्शन ही त्या काळातील एक साधना होती़

येथील सकलेश्वर बाराखांबी मंदिर हे तर प्राचीन काळातील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आजही महाराष्ट्रातील र्पयटक या बाराखांबावर उभ्या असलेल्या या मंदिराला भेट देऊन या प्राचीन वास्तुशााचा आदर्श म्हणून या मंदिराकडे पाहतात
रेणुकामाता मंदिराच्या उत्तरेस दोन फर्लागाच्या अंतरावर सकलेश्वर मंदिर आहे. यादवकालिन शिलालेखात वर्णन केलेले सकलेश मंदिर म्हणजे प्राचीन काळच्या शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरात शके 115क् मधील एक शिलालेख होता तो तेथून दुसरीकडे नेला आहे. मंदिराची खूपच पडझड झालेली आहे. रानझुडपांनी मंदिराभोवती गराडा घातला असल्यामुळे आत जाण्यासाठी नीटसा रस्ता सुद्धा राहिलेला नाही. ढासळलेल्या भागांचे अवशेष मंदिराच्या परिसरात अस्ताव्यस्त पडलेले आहेत.
सभामंडपाचा छतही ढासळण्याच्या मार्गास लागला आहे. सभामंडपाच्या मध्यभागी असलेला मंडप एका वतरुळाकृती फरशीच्या भोवताली आठ खांबावर आधारलेला आहे. भोवतालच्या सभामंडपास बारा खांब आहेत. मंदिराचे छत बारा खांबावर आधारलेले असल्यामुळे स्थानिक लोक या मंदिराला बाराखांबी म्हणतात. हे खरे असले तरी मंदिराच्या रचनेतच बाराखांबांना शिल्पकारांनी दुस:या अर्थाने महत्त्व दिलेले दिसून येते. आठ दिशांपैकी कोणत्याही एका दिशेकडून नंदीमंडपामधून विरुद्ध दिशेकडे चालत गेले तर उजव्या डाव्या बाजूस मिळून एकंदर बारा खांब लागतात. आणि ह्या अर्थानेच बाराखांबी हा शब्दप्रयोग पडला असावा असे वाटत़े मंदिरातील शिल्पकौशल्याचे नमुने पाहण्यासारखे आहेत

डोक्यावर दीप धारण केलेल्या ठसठशीत बांध्याच्या सप्तमातृका सभामंडपात कोरलेल्या आहेत. मूर्तीभंजकांनी शिल्पकलेची नासाडी केलेली आह़े नंदीमंडपांतील काळ्याभोर पाषाणाच्या गुळगुळीत गोल कंगोरेदार फरशीचा घनाच्या घावांनी विध्वंस करण्यात आला. अलंकारयुक्त कलाकुसरीने घडलेला नंदी मूर्तिभंजकांनी फोडून टाकल्यामुळे तो मस्तकविहीन अवस्थेत डोंगरी झाडाझुडपात महाद्वारांशी पडलेला आहे. इतरही कित्येक भग्न  मूर्ति मंदिराच्या परिसरात उघडय़ावर पडून आहेत.

https://durgvihartrek.blogspot.com/2012/05/blog-post.html

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...