सोलापुरात राहुन सगळी ठीकाणे फीरणे सोयीस्कर पडते, जर सोलापुरात राहणार असाल आणि आधी बुकींग करुन ठेवले असेल तर सिद्धेश्वर ट्रेन ने जा, ७ वाजता सोलापुरात पोहोचते, त्याच दिवशॉ गाणगापुर अक्कलकोट करणार असाल तर घाई होईल कारण ९.३० ला चेन्नई मेल सोलापुरात पोहोचते (थोडाफार उशीर होतो) आणि ११ ते ११-३० च्या दरम्यान गाणगापुर स्टेशनला पोहोचते. डायरेक्ट गाणगापुर ला जात असाल तर सी.एस.टी. चेन्नई मेल सोयीस्कर , कदाचित तीच एक ट्रेन आहे जी मुंबई हुन अक्कलकोट रोड मार्गे गाणगापुरला जाते. सोलापुर सोडल्या नंतर दुसरे स्टेशन होदगी (नाव नीट आठवत नाही) स्टेशन गेल्यावर महाराष्ट्र बॉर्डर संपते आणि कर्नाटक बॉर्डर लागते आणि फोनला रोमिंग सुरु होतं अक्कलकोट आणि गाणगापुर दोन्ही ठीकाणी रोमिंग लागलं होतं . गाणगापुर स्टेशन एकदम शांत आणि साधं आहे, अगदी सिनेमात दाखवल्या प्रमाणे ३-४ तासाने एखादी ट्रेन पास होते, स्टेशन वर ब्रिज ही नाहीये. स्टेशन्च्या प्लॅटफॉर्म वरुनच सरळ चालत चला टुवर्ड्स कर्नाटका प्लॅटफॉर्म जिथे संपतो तिथुन वेस्टलाच बाहेर पडा (त्याच प्लॅटफॉर्मला चेन्नी मेल थांबते म्हणजे ईस्ट वेस्ट गोंधळ होत नाही) , तिथेच रेल्वे फाटक आहे आणि ३-४ छोट्या रिक्षा (मधे ४ जण आणि मागे ३-४ बसण्याची सोय असलेल्या रिक्षा) असतात गाणगापुर मंदीरासाठी. माणशी ३० रु होते गेल्यावर्षी ., शेअरींग किंवा स्पेशल दोन्ही नेउ शकता. १ तास तर लागतोच, मधे तेव्हा थोडा रस्ता खराब होता पण रिक्शावाला आणि रिक्षेतले बाकी पॅसेंजर म्हणाले सोलापुर ते गाणगापुर रस्ता याहुन जास्त खराब आहे. दत्तमंदीरा आधी काही जणे संगमावर जाउन येतात, आम्ही ही गेलो , तीच रिक्षा पुढे ४ की, मी. गेली होती. जाताना मनाची तयारी करुन जा, दुर्गंधी , बकालपणा सगळीकडे पाहायला मिळतो, मी माझ्या डोळ्याने पाहुन आले, आम्ही मंदीरात पोहोचलो तेव्हा आरती सुरु झाली होती आणि गर्दी दिसत होती आम्हाला परतायचं ही टेंशन होतच पण गेल्या गेल्या समोर रांग दिसली , २० -२० रु जमा करत होते, नंतर कळालं ते वि.आय.पी. दर्शन होते. नाहीतर बाकी कुठुन तरी पायर्यांवरुन चढुन रागेत उभे होत होते, मंदीर अगदी छोटे आहे, आजु बाजुचा परीसर गलिच्छ आहे , राहायची सोय आहे पण परीसर पाहील्यावर राहायची ईच्छाच होणार नाही., इथनं जाताना एका सोलापुरकरला माहीती विचारताना गाणगापुरला राहायची सोय विचारल्यावर त्याने तिथे राहुच नका तुम्हाला आवडणार नाही हे का सांगितले होते ते तिथे गेल्यावर पटले. नंतर परतताना ट्रेन मधे एका माणसाने सांगितले की तिथे राहायचे असेल तर मंदीरातल्या पुजार्यांकडे सोय होते , ते सोवळ्यातच असल्याने राहण्याची जागा स्वच्छ असते. परतताना बहुतकरुन गाणगापुर अक्कलकोट अशा शेअरींग मधे जीप, ओम्नी कींवा रीक्षा असतात, पण १ तासाहुन जास्त प्रवास जर चारचाकी वाहनाने केला तर मला गाडी लागते त्यामुळे आम्ही रिक्षेचा आणि बसचाच ऑप्शन ठेवला. आम्हाला परत येताना रिक्षा मिळत नव्हती तर स्पेशल रीक्षा केली येताना २५०/- दिले त्याला तो तयार झाला, येताना मागच्या साईडला त्याने पब्लिक भरुन घेतली , मधे मात्र त्यानेच कुणाला बसु दिले नाही. स्टेशनवर पोहोचलो, आणि ट्रेन थोडीफार लेट असतेच , ५.३० नंतर अक्कलकोट रोडला पोहोचलो, ते स्टेशनही साधेच आणि वेस्टला बाहेर निघाल्यावर २-३ छोट्या रीक्षा उभ्या होत्या आणि बसही जाते असे ऐकले होते पण बाकीचे उभे असलेले म्हणाले की रिक्शेने लवकर पोहोचाल अर्ध्या तासात, तसे पोहोचलो ही. तो परीसर चांगला आहे , आम्ही साधारण ६-१५ ला मठात पोहोचलो, सगळीकडे वटवृक्षनिवासी महाराज संस्थान असे बोर्ड होते म्हणुन आम्ही सर्वांना अक्कलकोट महाराजांचा मठ कुठे आहे असेच विचारत होतो आणि सगळे तेच रस्ता दाखवत होते, शेवटी मठ जवळ आला आणि तिथे ही तेच नाव दिसले तेव्हा कुठे माहीत पडले महाराजांचे मुळ नाव वटवृक्षवासी स्वामी असेच आहे. जागा लहान असली तरी पुणा मुंबईची माणसे जास्त असतात राहणीमानावरुन पटकन ओळखु ही येतात. मठाच्या आवारात जास्त माणसे दिसली नाहीत तरी मठातुन बसस्टॉपवर गेल्या वर कळाले गर्दी काय असते, जरी १५-१५ मि. नी सोलापुरला बस असली तरीही अतिशय गर्दी होती , नंतर कळाले बसस्टॉप वर एक काउंटर आहे तिथुन काही बसेस चे तिकिट मिळते आणि जितक्या सीटस असतात तितकीच तिकीटे देत असल्याने गर्दी नसते. पण आम्हाला माहीत नसल्याने आम्ही त्या बसमधे जाउ शकलो नाही, बसमधे बसल्यावर तिकीट काढु हा ऑप्शनही नव्हता कारण बसमधे कंडक्टर नसतो असे एकाने सांगितले. बरं बसला लावलेला बोर्ड हा कर्नाटकी भाषेत असतो
गाणगापुरला मंदीरातच पिठले - भाकरी असा प्रसाद मिळाला होता, आणि मंदीरात बर्याच जणांच्या अंगात संचारलेले असते म्हणुन जरा आजुबाजुला लक्ष ठेवा, एकीने मला पाठी मागुन जोरात ओरडुन घाबरवायचा प्रयत्न केला होता पण मला काही फरक पडला नाही तिच्या आविर्भावावरुन तरी ते मानसिक मानणं असावं असच वाटत होतं. किंवा अंगात भुत किंवा देव देवी संचारणं यावर माझा विश्वास नसल्याने असेल.
दुसर्या दिवशी आम्ही पंढरपुर जायचे ठरवले होते , सकाळी लवकर उठुन सोलापुर बस स्टॉपला जाउन ७.१५ ची पंढरपुर बस पकडली (थोड्याफार उशीरानेच सुटतात) , सोलापुर हुन सुटत असल्याने बस मधे आरामात जागा मिळाली, साधारण ५० रु. ते ५७ रु माणशी असे तिकीट होते, १.३० ते २.०० तासात पोहोचलो पंढरपुरला. बालमैत्रीणीचे सासर पंढरपुर असल्याने तिने सक्त ताकीद दिली होती की दोघीच आहात तर सासरचं कुणी पाठवते बरोबर एकट्या फीरु नका, दुष्काळी भाग आहे, खुप चोर्या आणि खुन ही होतात (आमच्या हुन जास्त तिलाच टेंशन आले होते) तिने तिच्या नणंदेच्या मुलाला सांगितले होते की आम्हाला मंदीर वगैरे फीरवुन सोलापुर बस मधे बसे पर्यंत घरी जाउ नकोस, तो बरोबर ९ च्या दरम्यान आम्हाला पंढरपुर बस स्टॉप ला घ्यायला आला होता. मंदीराजवळ आलो आणि सगळीकडे अस्वच्छता जाणवु लागली. वारी २-३ दिवसावर येउन ठेपली होती असे माहीत पडले, मंदीराच्या एकदम जवळ एक उजव्या हाताला एक चांगले हॉटेल सापडले नाश्ता छान झाला, नाव आठवत नाहीये पण लाकडी वाडा जसा असतो तसे त्याचे इंटीरीयर होते, नंतर मैत्रीणीच्या भाच्याने सांगितले सुरुवात चंद्र्भागा नदीपासुन आणि पुंडलिकाच्या मंदीरापासुन करुया, नदीला पाणी नाही पात्र आणि आजुबाजुच्या परीसराची अतिशय बकाल अवस्था , दुर्गंधी . मंदीरात तर जिथे तिथे बाजार, भट सतत कुणी पाया पडायला आले तर नाव विचारुन देवाला स्वतःच सांगतात "देवा -- - माणसाकडुन ५१ रु आले, आणि माणसे धडाधड काढुन देत होती, छोटसं मंदीर पण २-३ ठीकाणी पैसे मागणे सुरु होते, मी कुठल्याही मंदीरात गेले तरी पैसे आणि हार वाहत नाही त्यामुळे त्याने माझे नाव पुकारले तरी मी काही पैसे घातले नाही आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसुन तो पहातच राहीला, ५ पावले पुढे आलो तर तीथे कसलस तिर्थ की काय मिळत होते, पैसे टाकल्याशिवाय देत नव्हते नाही घेतले, तसही आजुबाजुची बकालवस्ती पाहता तिर्थ घेउच नये असे वाटते, त्यानंतर मंदीरात आलो, मैत्रीणीच्या नातेवाईकांचे मंदीराला लागुन फुले विकण्याचे दुकान असल्याने जवळचे सामान आणि चपला तिथे ठेवता आल्या, मंदीरात महीलांना वीतभर आकाराची पर्स नेण्यास परवानगी आहे त्यामुळे आम्ही तेवढी पर्स हातात घेतली होती आणि लेडीज पोलिस नसल्याने महीलांची चेकींग होत नव्हती त्यामु़ळे त्यात छोटा बेसिक फोन ही नेता आला, मंदीराची दुरावस्था पाहुन धक्का बसला, मंदीरात जवळपास १-२ महीने झाडले नसेल इतकी धुळ होती , खुप गर्दी , आणि टॉयलेट्स नुसते नावाला , ज्यांच्या कडे लहान मुले होती ती तर रांगेतच धक्क्यावर लघुशंका उरकत होते, पश्चात्ताप वाटला इथे आल्याचा, २.३० ते तीन तास रांगेत होतो. आमच्य पुढची एक व्यक्ति मात्र पांडुरंगाच्या भजनात तल्लीन होती, त्यांना बाहेरच्या जगाचा अगदी विसर पडला होता ते तीन तास ते अखंड भजन गात होते, मंदीर पाहुनच माझा जीव अक्षरशः कावला होता शेवटी अगदी जवळ आलो , जेव्हा विठ्ठ्लाची मुर्ती समोर आली तेव्हा मनाला इतकी शांतता मिळाली की त्या तीन तासांचे त्रास विसरुन गेलो (एक साईबाबांचे दर्शन सोडले तर बाकी ठीकाणी दर्शन घेताना असे आंतरीक समाधान मिळणे माझ्या बाबतीत खुप कमी होते). बाहेर आलो. पंढरपुरला शेगावच्या गजानन महाराजांचा मठ आहे, राहायची सोय ही उत्तम आहे, वॉशरुम ला जायला बाहेरचे ही लोक जाउ शकतात, मैत्रीणीच्या भाच्याने सांगितले की पुर्ण पंढरपुर मधे हे असे एकच ठीकाण आहे जिथे स्वच्छता आहे. आम्ही तिथेच जेवण ही केले आणि पंढरपुर बस स्टॉप वरुन बस पकडुन ३.३० वाजेच्या दरम्यान सोलापुरात परत आलो. आल्यावर मोगले गाठले, इरकल साड्यांची खरेदी केली आणि पुलगम मधे गेलो, तिथे खरेदी करुन ८ वाजे पर्यंत आमच्या राहायच्या ठीकाणी आसरा एरीयात आलो, मग तिथे स्मोकीज पिझ्झा इथे जाउन मस्त चिकन पिझ्झा हाणला. आणि खुप थकल्याने झोपी गेलो, आम्ही ज्या कलिगच्या बहीणी कडे राहत होतो तिच्या नवर्याला तातडीने हॉस्पीटलाईज करावे लागले होते आणि ते आय.सी.यु. मधे होते, त्यामुळे त्यांच्या घरात आम्ही दोघीच होतो , आम्ही हॉटेल मधे शिफ्ट होण्याचा विचार केला पण त्या ताई म्हणाल्या मला खुपच वाईट वाटेल जर तुम्ही गेलात तर मी काहीच करु शकले नाही , मी नसले तरीही तुम्ही प्लीज इथेच राहा शेवटी त्यांच्यासाठी आम्ही तिथेच राहीलो.
सोलापूर मधील काही न चुकावावेत असे खाद्य पदार्थ:
१} भाग्यश्रीचा बटाटे वडा
२} पार्क किंवा सात रस्ता येथील डिस्को भजी
३} सुधा ची इडली / गणेश चा उत्तपा आणि डोसा
४} पार्क येथील भैयाची भेळ
५} सराफ कट्ट्याजवळ मनोज भेळ
६} कन्दले किंवा पुणेकर कामठे उसाचा रस
बाकी हॉटेल्स पुष्कळ आहेत आणि तिथे सगळ मिळते
पद्मशाली चौकात मिळणारी पाणी पुरी ट्राय करू शकता मंगळवार पेठेतील डोसा विविध प्रकारात मिळतो.सेट डोसा,कट डोसा,दावणगिरी डोसा इत्यादी.खान्याच्या बाबतीत सोलापूर एक नंबर आणि इतर ठिकानंपेक्षा स्वस्त आहे.
नॉन व्हेज वाल्यासाठी शीग मटन. चकोले मटन भाजनालयातले (भोजनालयातले नव्हे).
शाकाहारीसाठी कडक भाकरी, शेंगा भाजी, घट्ट दही, मटकी फ्राय, पेंडपाला, हुग्गी, शेंगा पोळी, खवा पोळी हे सर्व हॉटेलात मिळतात.
ब्राह्मणी जेवणासाठी (तसा बोर्ड आहे) अनादी च्या दोन शाखा.
पूर्व भागात आंध्रा लोणचे, रायचूर (आंध्रा) भजी, चारु बोवा, हिरवे मटण, दालचा हे पण मिळते.
नाश्त्याला अगदी ५ रु डिशपासून ८० रु. पर्यंत ईडलीच्या व्हरायटी डिशेस मिळतात.
पुरी भाजी ही वेगवेगळ्या ४-५ प्रकारात मिळते.
सोलापुरात सात रस्त्याजवळ डॉमिनोज आहे. भागवत पाशी अॅडलॅब आहे. मॅक्डी अन केएफसी तिथेच होतेय. बिगबाझार अन तळवलकर जवळ जवळ आहेत. चोकोलेड लै ठिकाणी आहे. ली रँग्लर लिनन क्लब वूडलँड पीएनजी अन लीवाईस एका लैनीत व्हीयापी रोडवर आहेत. वोल्व्होच्या लोफ्लोअर सिटीबस आहेत.
खाण्यासाठी अजुन एक ठिकाण म्हणजे कन्ना चौकातील पाणी पुरी..पवार बंधू यांचे साड्यांचे दुकान मोठे आहे. तसेच सोलापूर महापालिका कार्यालय इंद्र भुवन पाहणे पण चुकवू नका. बाकी अजून काही मदत हवी असल्यास सांगा.
या सोलापुरला जरुर या, स्वागत आहे. पुर्वीपासुनच सोलापुर हे एक तुम्ही लिहिलेल्या धार्मिक ठिकाणांचं केंद्र म्हणुन सोयीचं आहे. सोलापुरात येताय तर खाणंपिणं मजेत करा..
जमल्यास, दातेंच्या गणपतीचं दर्शन घेउन या, देवळाच्या बाहेरुन देखील दर्शनाची सोय आहे, आणि त्यांचं ऑफिस तिथं मागंच आहे, विनंती केल्यास ते देऊळ उघडुन दर्शन घेउ देतात.
पुर्वभागातलं, म्हणजे अक्कलकोटलनाक्याच्या अलीकडं बालाजीचं मंदिर आहे, तिथं जाउन या.
बा़ळीवेशीतलं मल्लिकार्जुन मंदिर आणि माणिकचॉकाजवळ्चं जैनमंदिर ही जस्ट ५-१० मिनिट जाउन यायची ठिकाणं आहेत. सिद्धेश्वर तलावाच्या बाजुचा घाटावरचा गणपती देखील असाच आहे. अजुन ह.दे.प्रशाला बघा, आजकालचे शिक्षणसम्राट तेवढ्या जागेत १२-१४ संस्था उभ्या करतील
खाण्यापिण्याचं म्हणाल तर खरंच सोलापुरसारखी ओरिजनल जागा नाही...
सातरस्त्याजव़ळ राजमहाल मध्ये इडली खायला जा, तिथं तेलमसाला वेगळा मिळ्तो चटणीवर घालुन खायला, तिथुन रंगभवनकडं येताना इंडिया टि हाउस आहे, फक्त चहा घेउन जरा लांब जावं लागतं. पुढं विजापुर वेशीत २-३ पायनापल कोल्डिंकची दुकानं आहेत ती ट्राय करा.
सावरकर मैदानावर पैलवान कडचं आइस्क्रिम खा, तिथुन पुढं बागेच्या गेटसमोर सिद्धेश्वरमध्ये चहा प्या इथं केटी घ्या, नुसता चहा नको.
वर सांगितलेली भैयाची भेळ हा आमच्या शाळेच ऑफिशियल पाणीपुरी वाला होता, अगदी शाळेच्या कॅम्पसमध्ये होता तो. डिस्कोभजी हा प्रकार ओरिजनल साखर पेठ आणि भवानी पेठेत मिळेल्,पार्कवर ठिक आहे.
चादरी बद्दल सगळ्यांनी सांगुन झालंय, पुर्वभाग राम मंदिराच्या जवळ चाटलांच शोरुम् आहे तिथं जाउन या.
व्हेज जेवणासाठी स्टेशनच्या थोडंसं पुढं सुगरण आहे, सोलापुरी शेंगाच्या पोळ्या आणि खवाच्या पोळ्या खाउन या तिथं. नाश्ट्याला, मधला मारुतीच्या जवळ अप्पा हलवाई कंडं एक पुरी भाजी आणि एक प्लेट कुंदा खाउन या.
स्वताचया गाडीनं जाणार असाल तर, सोलापुरच्या अलीकडं लांबोटीला चिवडा, कुंदा आणि बाकरवड्या घेउन या. फक्त दुधातला चहा ही तिथली स्पेशलिटि आहे.
सोलापूर म्हंजे मजाच मजा. भरपूर खाणं आणि चित्रपट बघणं. जर का सुभाष चौकातल्या कुठल्या हॉटेलात राहिलात तर बर्याच गोष्टी पायी फिरून बघता येतील. किल्ला समोरच आहे. बाजारपेठा, पार्क मैदान, सिद्धेश्वर देऊळ, ह्दे प्रशाला, संगमेश्वर कॉलेज, वारद बंगला अर्थात ईंद्रभुवन अर्थात सोलापूर (म्?)न.पा.कार्यालय, आणि भरपूर टॉकिजेस.
सोलापूर म्हंजे खायला पर्वणी. सुप्रजा, स्वाद,नट्स चाट चा ठेला पण मस्त. त्याच्यानंतर दत्ताच्या देवळाजवळ आलं की आनंदाश्रम होतं. तिथला डोसा उर्फ दोसाई अफलातून होता.किल्ल्यासमोर रस्त्यावर्च्या गाड्यांवर चटणी सँडवीच प्रचंड भारी!!! आता मिळतं का कल्पना नाही. पूर्वी हाटेलातली जेवणं पण मस्त होती, अजूनही बर्यापैकी घरगुती चव टिकून आहे. अर्थात मागच्या ३ वर्षातले बदल माहीत नाहीत. पार्क मैदानाजवळ दूध पंढरीचे पेढे आणि फ्लेवर्ड दूध जरूर प्या.बाजारपेठेत दाणे खात खात भटका. लक्ष्मी मंडईत जा. माणिक चौक, सहकार पेठपर्यंत पायी फिरा.
पूर्वी मी लकी (बंद झालं),गदग ग्रँड (मजा गेली आता), मुक्ताई मिठाई इ. ठीकाणी मनमुराद खाल्ले आहे. तेंव्हा सकाळी सकाळी गरम गरम ईडली, द्वाशी आणि वडा सांबार देणारी एक गाडी लागायची. तूफान मजा यायची सकाळी सकाळी ते खाताना.
मस्त शहर आहे आणि मस्त लोकं आहेत.
ह्या चादरी (जेकार्ड म्हणतात) पेटंटेड सोलापूर चादरी म्हणून्च आहेत. सोलापुरातच बनतात. कॉटन असते. वापरायला अन धुवायला सोप्या असतात. उबदार असतात. तुलनेने स्वस्त असतात. सुंदर डिझाइन्स असतात. वेगवेगळ्या आकारात अन जाडीत मिळतात. मुख्य म्हणजे खूप कारागीरांना रोजगार मिळतो. हुश्श्श्श. झाले मार्केटिंग.
आता सल्ला. सोलापूर चादरी या नावाने दुसरीकडे ही तयार होतात. तो दर्जा नसतो. सोलापुरातील ४-५ मिल्स चे आउटलेट पुण्यामुंबईत आहेत. बरेच जण येथून नेऊन तिथे विकतात. व्हरायटी सोलापुरातच पहायला मिळते. अस्सल दर इथे कळेल, सोबत बेडशीट्स, वॉल हँगिंग, टॉवेल, नॅप्कीन्स, कुशन कव्हर पण असतात. तुम्हीच ठरवा काय करायचे ते.
सोलापुरात पुलगम चे मार्केटींग जोरात आहे पण अस्सल चादरी चिल्का, क्षीरसागर, गांगजी हे तयार करतात. एमेच १२ - १४ गाड्या दिसल्या की रेटमध्ये फरक पडणार. ;) रिक्शाने जावा. जमत असेल तर सातारी बोलीत बोला. फरक पडेल.
http://www.misalpav.com/node/31913
प्रस्तावना :
जुलै २०११ मध्ये पंढरपूर आणि गोंदवले येथे गेलो होतो. त्या सहलीचे वर्णन या अधिक महिन्याच्या निमित्ताने देत आहे ..( या अगोदर वर्डप्रेसमध्ये आणि इतर ठिकाणी प्रकाशित केले आहे.) त्यावेळेस फोटो काढले नव्हते परंतू वर्णनातून ती कमतरता भरून निघेल अशी आशा करतो. पंढरपूर - गोंदवले रेल्वेने पर्यटन: -दोन रात्री एक दिवस. -:
गाभा :-
पंढरपूर ठिकाणे : सर्वसाधारण नकाशा.

११ जुलैला (२०११)आषाढी एकादशी होती. वारीच्या बातम्या पेपरात जूनपासून येत होत्या. आपण दुसय्रा राज्यांत जाऊन देवळे पाहात फिरतो आणि आपले पंढरपूरच पाहात नाही असा एक विचार मनात आला. हजार वर्षांपेक्षा अधिक याचे ऐतिहासीक उल्लेख आहेत. आम्ही काही चालत आळंदीच्या पालखीत अथवा आमच्या डोंबिवलीच्या वारीत जाणार नव्हतो. बस अथवा रेल्वेनेच जाणार होतो. पंढरपुरात दर्शनासाठी बराच वेळ लागतो हे ऐकून होतो.येथे धर्मशाळेत राहाणे जमेल का हापण एक प्रश्न होता .त्याप्रमाणे आयोजन करणे गरजेचे होते. सातारा,पुणे आणि सोलापूर या तिन्ही ठिकाणाची चाचपणी केली. वाचनालयातून काही पुस्तके आणली. ( माहितीस्रोत : "सचित्र पंढरपूर"- यशवंत रामकृष्ण ,१९६८.) वेळापत्रक आणि गाड्यांचे आरक्षण तपासले. जवळची ठिकाणे कोणती करता येतील याचा अंदाज घेतला.पंढरपूर थेट गाडीचे (५१०२७)आरक्षण संपले होते ,विजापुर गाडीचे (५१०२९)कुर्डुवाडीचे मिळाले.येताना गोंदवले मार्गे साताय्राला येऊन तिसय्रा दिवशी कोयना गाडी(११०३०) मिळणार होती.
.
आताचे २०१५चे कुर्डुवाडी ते पंढरपूर रेलवे टाइमटेबल-

.
पंढरपूर थेट गाडीचे वेळापत्रक-

.
कुर्डुवाडीस सकाळी जाणाय्रा गाड्या-

.
दर्शनाला वेळ लागला तर गोंदवले न करता साताय्राहून परत असं ठरलं. पत्नी आणि मी असे दोघेच जाणार होतो. २७जून २०११(ज्येष्ठ कृ एकादशी) रात्री पावणे बाराला कल्याणला गाडीत बसलो. ही जोडगाडी आहे. पुढचे बारा डबे विजापूर/पंढरपूर ५१०२९/५१०२७ चार /तीन दिवस जाणाऱ्या गाडीलाच मागचे सहा डबे शिर्डी ५१०३३ रोज जाण्यासाठी जोडलेले असतात. दौंडला गाड्या वेगळ्या करतात.त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ ठरलेलाच.
कुर्डुवाडीला गाडी दोन तास उशीरा पोहोचली.८.५०ची सोलापूर-कोल्हापूर इक्स०निघून गेली होती.पावणे दहा वाजले होते.बाहेर पडून पंधरा मिनीटे चालत डेपो गाठला. सवा दहाला पंढरपूर बस मिळाली आणि सवा अकराला उतरलो. पंढरपुरचा हा नवा डेपो छान आणि प्रशस्त आहे.सुलभची सोय आहे.प्रभु अण्णांच्या हॉटेलात भरपूर खाऊन घेतले. पोटोबा झाला आता विठोबा करायला निघालो. देऊळ येथून पंधरा वीस मिनीटांवर आहे असे कळले.बॅगज घेऊन चालत निघालो.सावरकर चौकाजवळून धर्मशाळा बघत चाललो. एकदा सामान आणि मोबाईल ठेवले की देवळात जाणे सोपे होणार होते.कैकाडी महाराज मठातले पुतळे आम्हाला पाहायचे नव्हते.एका धर्मशाळेत गेलो.बय्राच खोल्या दिसल्या दारापाशी चारपाच जण रांग पकडू न बसले होते.खोल्या एक तारखेपासून प्रतिपदेपासून देणार होते! ती रांग त्यासाठी होती! मग दुसय्रा एका ठिकाणी हेच उत्तर मिळाले.विचार केला अजून एका ठिकाणी पाहू. तिसय्रा ठिकाणी ‘शंकर महाराज वंजारी धर्मशाळे’त मात्र अगोदरच आम्हाला बॅगा ठेवायच्या आहेत खोली नकोय हे सांगितले.तिथल्या बाईंनी लगेच एक भिंतीतले कपाट उघडून दिले आणि वीस रुपयांची पावतीपण दिली.बॅगा, पर्स मोबाईलसकट ठेऊन त्याला आमच्याकडचे कुलूप लावल्यावर आम्ही मोकळे झालो. तिकडे सर्व धर्मशाळांची यात्रेच्या काळात खोल्या देण्याची तारीख ठरलेली असते. येथून चालत पश्चिमेकडून पूर्व दरवाजावरून येथे प्रवेश आहे. (प्रथम देवळात न जाता )समोरच्या चंद्रभागेच्या महाद्वार घाटावर आलो. जर तुम्ही बस डेपोकडून रिक्षाने आलात तर तुम्हाला येथे घाटाकडे जाणाय्रा चौकात (चार रस्ता,कमान) सोडतात.’येथे प्रथम चंद्रभागेत पाय धुवून पुंडलिकाचे समाधि दर्शन घ्या नंतर देवळात जा ‘ सांगेल.आम्ही तिकडेच निघालो.चौकातून उताराने पुढे गेले की चंद्रभागा नदी आणि थोडे पाण्यातच पुंडलिकाचे मंदिर,शंकराचे मंदिर आहे.बाजूला एक दगडी होडी आहे तिथे समाधि आहे. बस मधून येताना चंद्रभागेच्या पुलावरून नदीत भरपूर पाणी दिसते कारण तिकडे एक बंधारा बांधून पाणी अडवून ठेवले आहे.यात्रेच्यावेळी घाण झाली की पाणी सोडतात. हल्ली रोज दोन हजार,एकादशीला दहा हजार आणि आषाढीला आठ लाखतरी भाविक येतात.गावाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छतेवर ताण पडतो.त्यामुळे या दृष्टीने आणि निव्वळ भक्तीनेच नदीकडे,गावाकडे पाहाण्याचे ठरवले.वाळवंटातला एक कुत्रा भाकरी घेऊन पळतोय आणि नामदेव लोण्याची वाटी घेऊन त्याच्यामागे धावतांना दिसले. पुंडलिक आईवडिलांची सेवा करताहेत,पैलतिरावर रुक्मिणीचा रुसवा काढायला निघालेले देव पुंडलिकाच्या दारात फेकलेल्या विटेवर कमरेवर हात ठेऊन वाट पाहात थांबले आहेत हे चित्रही डोळयासमोर आणायचा प्रयत्न केला. आता मात्र नाकाला दुर्गंधि जाणवू लागली होती. दर्शनाला किती वेळ लागणार याची चिंता वाटू लागली.
एकादशीला अजून सतरा दिवस होते आणि गर्दी अजिबात नव्हती. आपण जे आता पुंडलिक मंदिरा पलिकडच्या तीरावर गाव पाहातो ते जुने पंढरपूर गाव.तिथेच पूर्वीचे मिटरगेज रे० स्टेशन होते. भाविक तिकडे उतरून नावेने इकडे यायचे.नावेचा धंधा महादेव कोळयांकडे होता.पुंडलिक त्यापैकी एक. पुढे शेठ हिराचंद यांनी १९२६ मध्ये नदीवर पुल बांधल्यावर नावाड्यांचा धंधा बुडाला. सात आठ वर्षांपूर्वी मिरज-कुर्डुवाडी ब्रॉडगेज रेल्वे आणि नवीन जागी स्टेशन झाले. भीमा नदी उगम पावते भीमाशंकराच्या डोंगरात पुणे जिल्हयात. पुढे तिला भामा,इंद्रायणी,कुकडी,मुळा मुठा,घोड आणि नीरा नद्या भेटतात तीच ही पंढरपूराची चंद्रभागा. येथे एकूण चौदा घाट आहेत.
१)लखुबाई
२)दिवटे
३)खिस्ते
४)कबीर
५)उध्दव
६)दत्त
७)कुंभार
८)अमळनेर
९)अहिल्याबाई
१०) महाद्वार येथे पुंडलिक मंदिर आहे
११)कासार
१२)चंद्रभागा
१३)मढे आणि
१४)खाका पुंडलिक मंदिर पाहून आता चौकाकडे चढून जातांना उजवीकडे अहिल्याबाईनी बांधलेला वाडा आणि आत राम मंदिर आहे ते पाहिले. समोरच एक द्वारकाधिश मंदिर आहे. हे बांधले शिंदेसरदारांनी. तिथून चौकात आलो. समोर गेलो तर देऊळ,डावीकडचा रस्ता जातो जुन्या वस्तीत आणि पुढे जनाबाईच्या गोपाळपूरला. इकडे नंतर जाणार होतो.या रस्त्यावर दुसय्रा बोळात(बारीक रस्ता)लाड पेढेवाल्यानंतर आहे संत नामदेव मंदिर. पुढच्या धर्मशाळेमुळे झाकले गेले आहे.मंदिर खरेतर केशवराजाचे आहे. याठिकाणची व्यवस्था नामदेव समाज पाहातो. नामदेवाचे मूळ घर गावात दुसरीकडे आहे. पंढरपूरच्या विठठलाचे महत्व वाढले ते त्याची भक्ती करणाय्रा संतांमुळे. हा देव आहे भावाचा भुकेला. त्याला भक्ताचे मन मोडवत नाही.रुक्मिणीची समजूत काढायला जातांना वाटेत पुंडलिकासाठी तिकडेच थांबला. पुंडलिक,नामदेव,ज्ञानेश्वर, एकनाथ,तुकाराम,जनाबाई,चोखामेळा,सावतामाळी, दामाजी आणि पुरंदरदास या सर्व संतांचे विठठलाशी नाते आहे.कुणासाठी माऊली,तर कुणासाठी मायबाप, बा ईट्टल,पाडुरंग, पुंडरिक,भगवंत ,श्रीहरी झाला आहे.
म्हणून संतांच्या दर्शनानंतर आता विठ्ठलाला भेटायचे. चौकातून परत देवळाच्या पूर्व प्रवेशाकडे निघालो.रस्त्याच्या दोन्ही बाजूस पेढे ,लाह्या,फुले,तुळशीमाळेची दुकाने आहेत.दुकानदारांनी सांगितले की फक्त तुळशीचा हार आत नेऊ देतात बाकी आल्यावर घ्या.यात्रेवेळी पाच लाखांवर भाविक कसे काय इथे मावतात?बरेच दुरून केवळ कळस पाहून माघारी जातात. आता देवळापाशी आलो.डावीकडे एक चार मजली नवीन उंच इमारत आहे.तिचे खालचे फाटक बंद होते! गर्दी झाली की यातूनच फिरत फिरत जावे लागते ते थेट चौखांबी मंडपातून चरणस्पर्श करता येतो.दोन अडीच तासांची निश्चिती.अथवा तुम्हाला मुख्य दारातूनही ‘मुखदर्शना’साठी दहा मिनीटांत फक्त सोळाखांबी मंडपापर्यंतच जाता येते, मूर्तीचे मुख लांबूनच पाहाता येते.आज अनपेक्षित धक्का होता मुख्य दारातूनच चरणस्पर्शला आत जायला सांगितले.संतांची कृपा.काल एकादशीला खूप गर्दी होती असे कळले. पहिली पायरी नामदेवाची.नामदेवाची इच्छा होती की समाधी नंतर त्याची पायरी बनवावी म्हणजे भक्तांचे पाय लागतील. नामदेवाबरोबरच चौदा जणांनी समाधी घेतली. चौदा पायय्रा आहेत .नामदेवाची इच्छा अपूरीच ठेवण्याची पूर्ण काळजी घेतली आहे -पायरीला पाय लावू देत नाहीत.बाजूने वर चढलो. दोन महिला पोलीसांनी पत्नीचे स्वागत केले ‘माउली इकडे या’, पुरुष पोलीसांनी मला ‘मामा इकडे या’. आम्ही अगोदरच मोबाईल,पर्स बैगा ठेवून आलो होतो.तपासणी करून आत सोडले. खरं म्हणजे हे देऊळ नवव्या शतकात पांडुरंगपल्ली नावाचे शंकराचे होते.त्याच्या खुणा आजही जोत्यावर दिसतात.अकराव्या शतकात मुसलमानी सुलतानांचे हल्ले देवळांतील मूर्तींवर होऊ लागले त्यावेळी मूर्ती लपवून ठेवायचे अथवा दुसरीकडे पाठवायचे.इथेही हेच झाले.शंकराचे देऊळ झाले विठ्ठलाचे.आताच्या मूर्तीच्या जागी दुसरी होती.असो. रांगेत कानडी भक्त बरेच होते.पाउण वाजला होता.रांग भराभर सरकली.मुक्ती मंडप,मोठा चौक पार करून सोळाखांबी मंडपात आलो.आजुबाजूची चित्रे रांगेतूनच पाहून समाधान मानले. चौकात गरूड आणि मारूती आहेत. एक खांब चांदीने मढवला आहे याला गरूड खांब म्हणतात. कर्नाटकातल्या हम्पिची विठ्ठलमंदिरातली मूर्ती सोळाव्या शतकांत मुसलमानांच्या आक्रमणाच्या वेळी इथे आणल्यावर तिकडचा एक भक्त आणि संतकवी पुरंदरदास इथे आला आणि याच गरूड खांबाला टेकून बसायचा.या मंडपातून आतल्या मंडपात जाण्याच्या दारावरच्या पितळी पट्टीवर एक लेख आहे. आतमध्ये चौखांबी मंडपात कर कटावरी ठेवूनिया विठ्ठल उभा दिसला.एका आडव्या पितळी मढवलेल्या लाकडी तुळईखालून वाकून पुढे जावे लागते (सर्व विठ्ठल मंदिरात असतेच). भक्तांनी मूर्तीकडे पाहात फार वेळ घालवू नये म्हणून एक महिला पोलीस प्रत्येक ‘माउली’चे आणि पुरूष पोलीस ‘मामा’चे डोके श्रीचरणावर लगेच टेकायला लावतात. तिथे जागापण चिंचोळी पाच सात फुटांचीच आहे.त्यामुळे पुढे सरकावे लागले.मला मूर्ती नीट पाहायची होती,कवचकुंडले आणि वीट. दहा सेकंदात काही शक्य नव्हते.शीरावर मुकुट असला तरी टिव्हिवर महापुजा दाखवतात त्यावेळी पाहिले होते की गुराखी अथवा गवळी कापडी टोपडे घालतात तशी आहे.कृष्णावतारात देव गुराखी झाला होता नं. बाहेर उजवीकडे जाताना रुक्मिणीचे देऊळ आहे. इथे जरा सावकाश दर्शन करता येते. पौराणिक कथेप्रमाणे रुक्मिणी पैलतिरावरच्या ‘दिँडिकारण्या’तच रुसलेली आहे तिकडे खरंच एक मूर्ती आहे म्हणतात.इकडची कृत्रिम आणि देवळाला न साजेशी आहे.रुक्मिणीच्या मंडपाशेजारी दोन देवघरे आहेत सत्यभामा आणि राही (?)चे आणि एक शेजघर देवीचे आहे.विठ्ठलाला आणि रुक्मिणीला सरदारांनी खूप दागिने दान केले आहेत. हे रोज बदलून मूर्तीवर घालतात.[हे सर्व दागिने २०११साली आषाढी एकादशीच्या अगोदर स्टार माझावर दाखवण्यात आले होते,यावर्षी २०१३ जूनमध्ये देवस्थान समितीनी सांगितले की सर्व चोरीला गेले आहेत ??!!] रुक्मिणी मंदिरातून घाईने बाहेर पडलो पण नंतर आठवले की तिथल्या काही गोष्टी पाहायच्या राहून गेल्या.त्यागोष्टी म्हणजे ‘चौऱ्यांशी’चा शिलालेख,नवग्रहांची शिळा, आणि कान्होपात्रा गुप्त होऊन तिचे झाड झाले ते दगडातील झाड.रुक्मिणीचा थाट नवरात्रांत अश्विन महिन्यात आणि कार्तिकात असतो.हिचे पुजेचे हक्कदार अथवा वहिवाटदार ‘उत्पात’ तर विठ्ठलाचे ‘बडवे’ आहेत . .
पंढरपूर हे एक नवीन क्षेत्र आहे.पुराणांत सप्त पुय्रांचा आणि काही नगरे,तलाव,कुंडांचा उल्लेख आहे त्यात पंढरपूर नाही.अकराव्या शतकात केव्हातरी विठ्ठलाची मूर्ती आल्यावर गावाचे महत्व वाढू लागले असावे.वैकुंठ,दक्षिण काशी आणि पुढे ज्ञानोबांच्या नंतर संतांचे माहेर झाले. आंध्रचे लोक पंडरिपुर म्हणतात. इकडे चार मोठया वाय्राअथवा यात्रा होतात आषाढी,कार्तिकी,माघी आणि चैत्री.शिवाय इतर सणावारीही भाविक श्रीमुख पाहाण्यास गर्दी करतात .इतर देवळांप्रमाणेच इथेपण हरिजनांना प्रवेश नव्हता. साने गुरुजींनी हे बदलायला लावले.देवळाला उत्पन्न रोख आणि वस्तु रुपाने बरेच येते.रोख रोज मोजून घेण्याऐवजी बडवे आदल्या दिवशी संध्याकाळी दुसय्रा दिवसाची बोली लावून तेवढी रक्कम जमा करतात.
दीड वाजला होता.पटकन चौकातून नामदेवमंदिरापाशी आलो.ऑटोरिक्षा करून(तीस रु)गोपाळपूरला आलो.हे गाव चंद्रभागेकाठीच तीन किमीवर मंगळवेढा रस्त्यावर आहे.वाटेत जातांना यात्रेसाठी रांगेकरता बांबूचे कुंपण बांधतांना दिसले.दर्शनरांग चार पाच किमी लांबते असे रिक्षावालाने सांगितले. मंगळवेढा(वीस किमि) संत दामाजीमुळे (आणि माडगुळकर बंधु)तर गोपाळपूर संत जनाबाईचे स्थान म्हणून प्रसिध्द झाले.ही एक किल्लेवजा जरा उंच अशी गढी आहे.येथे जनाबाईचे दगडी जाते(?),रांजण,रवी या वस्तु आहेत.एक कृष्णाचे देऊळ आहे.शुकशुकाट होता.मंगळवेढ्याकडून येणाय्रा एका बसने परत आलो .हा रस्ता विठठलमंदिराच्या मागून सावरकरचौकाकडे जातो .बरीच नर्सींग होम्स,हॉस्पिटल्स इकडे दिसली.हवीच ना एवढे यात्रेकरू येणार तर.कंडक्टरने आम्हाला धर्मशाळेच्या मागच्या बाजूस जवळ उतरवले.आमचे लॉकरमधले सामान ताब्यात घेतले आणि लगेच बस डेपो गाठला.
तीन वाजलेले.चहा वडा खाऊन गोंदवले बसची वाट पाहात थांबलो. साडेतीनला बस सुटली.म्हसवडमार्गे ८०किमी आहे. वाटेत दोन तीनच गावे लागली.वाहने,रहदारी फार नाही.मोकळा माळरानाचा मैदानी फार झाडी नसलेला ओसाड भाग आहे.थोडा पाऊस झालेला असल्यामुळे प्रवास जाणवला नाही.सवापाचला गोंदवले आले. गोंदवले मोठे गाव आहे.रस्त्याच्या उजवीकडे एक कमान दिसते.’ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज संस्थान’येथून आत गेल्यावर मोठ्या आवारात रामाचे देऊळ,कार्यालय आणि लहान मोठे भक्त निवास आहेत. प्रथम कार्यालयात खोलीसाठी नोंदणी केली.नि:शुल्क आहे .”इथले नियम काय आहेत?” “काही नाहीत फक्त रामनाम घ्या. रामाच्या देवळातला नित्य कार्यक्रम फलकावर आहे .चहा,नाश्ता,भोजनाच्या वेळा लक्षात ठेवा.” खोलीत सामान टाकून आंघोळ करून तयार झालो.खोली साधी पण नीटनेटकी होती.शांत वातावरण.रामाच्या देवळात गेलो.छान देऊळ.काही भजन वगैरे होते.दर्शन घेऊन बाहेर आलो.
चहाची वेळ निघून गेल्यामुळे रस्ता ओलांडून समोरच्या एका हॉटेलात गेलो.मालक फार बोलका आणि अगत्यशील होता.लगबगीने भजी चहा आणला.डबल चहा पोटात गेल्यावर जरा बरं वाटलं. नाक्यावर आलो आणि तिथे लावलेला नकाशा पाहिला. जून महिना असल्यामुळे सात वाजले तरी अंधार झाला नव्हता.नकाशात दाखवल्याप्रमाणे दहिवडीच्या रस्त्याने पुढे उजवीकडे एक रस्ता गावात जातो तिकडे गेलो.चार दोन घरांनंतर एक देऊळ आले. ते पाहून पुढे काही दिसेना म्हणून मागे फिरलो तर एका घरातून आवाज आला ‘दादा मागे कशाला फिरताय? असेच पुढे जा आणि गोल वळसा घेऊन तिकडेच मोठ्या रस्त्याला लागाल. भाऊंचे आभार मानून पुढे निघालो.बैठी घरे आहेत आणि छान गावचे वातावरण आहे.कडुनिंबाची झाडे आहेत.गोंदवले महाराज संसारी संत होते.त्यांचे सर्व आयुष्य या गावात गेले.त्यांचे कुटुंब थोडे सधन होते.तरुणपणी त्यांना घरातल्या जिन्यावर रामाचे दर्शन झाले असे म्हणतात.रामनाम,भक्ती आणि सोपी प्रवचने यामार्गे ते भक्तांच्या स्मरणात राहिले आहेत.त्यानी चमत्कारांनी लोकांना देवाचे महत्व पटवले नाही. पुढे धाकटे राम मंदिर,मठ,मारुती,थोरले राम मंदिर,महाराजांचे घर आणि संग्रहालय पाहून परत आलो.छान ठेवले आहे.इथल्या सर्व गोष्टी त्याच्या जीवनाशी निगडीत आहेत. आज पंढरपुरातल्या भक्तिमय गजबजलेल्या वातावरणातून आता गोंदवल्याच्या शांत, रामनाम भरलेल्या परिसरांत आलो होतो. इथे वर्षभर सतत भक्तगण येत असतात. आवारातले भक्तनिवास, स्वच्छता आपल्या मनावर परिणाम केल्याशिवाय राहत नाही. महाराजांनी व्यक्तिपुजा, मठ याचे स्तोम वाढवले नाही. आपण येथे येतो रामाच्या मंदिरात. हे फारच आवडले. रात्री साडे आठला भोजनशाळेत गेलो. उत्कृष्ट व्यवस्था, सुग्रास भोजन, सेवेकऱ्यांचा नम्रपणा इथे लगेच जाणवतो. राहाणे, खाणे, पाणी, वीज सर्व खर्च संस्थानाकडून आणि देणगीदारांच्या अव्याहत पाठिंब्याने होतो. जरा कुठे अहंपणाचा लवलेश असेल तर तो इथे आल्यावर राहाणारच नाही. दिवसभर फिरल्यामुळे रात्री छान झोप लागली .
पहाटे उठून तयार होऊन (प्रत्येक मजल्यावर गरम पाण्याचे नळ आहेत) रामाच्या मंदिरात जाऊन आलो. आज आमचे सातारा स्टेचे कोयना एक्सप्रेस (११०३०)चे रेझ0न होते त्यामुळे निघणे गरजेचे होते पटकन समोरच्या हॉटेलात चहा वडे खाऊन खोलीतले सामान काढले. एका सेवेकऱ्याने अडवले. “का निघालात? आता नाश्ता चहा तयार आहे तो नाही का घेणार ?” “आमचे कोयनाचे तिकीट आहे .” आणि निरोप घेतला . रस्त्यावर कालरात्री पासून एक मुक्कामी दादर बस उभी होती ती साडेआठला निघाली त्याने चार किमिवरच्या दहिवडीला उतरलो . ही बस इंदापूर फलटण पुणेमार्गे दादरला जाते . दहीवडी डेपोला फलटणमार्गे पुणे जाणाय्रा बस खूप आहेत .सातारा सटे जाणाय्रा ( निढळ मार्गे ६५किमी ) कमी आहेत . नऊला इंदापूर सातारा बस आली . त्याने निघालो .तिकीट स्टेशन (माहुली स्टॉपचे) मिळाले नाही ,साताय्राचे दिले . वाटेत एक छानसा किल्ला(?) दिसतो . साडेदहाला कोरेगाव आणि कोरेगाव सटे स्टॉप आला . अगदी जवळ स्टे येते. कोयना गाडी येथेही (११.४५)थांबते. अकरा वाजता रेल्वेपूल, नदीचापूल गेल्यावर माहुली स्टॉप(=क्षेत्र माहूली )ला उतरलो. डावीकडे सात आठ मिनीटावर सातारा स्टे आहे.उजवीकडे माहुली गाव आणि नदी आहे.
अजून गाडीला तासभर अवकाश होता विचार केला नदीवर जाऊन येऊ. बॅगा घेऊन गावात घुसलो. “अहो तुम्हाला कुठे जायचे आहे?” “कुठे नाही, जरा वेळ आहे तर नदीवर जायचे आहे.” गावकय्रांनी रस्ता दाखवला. दहा मिनीटांत घाटावर आलो. दगडी पायय्रांचा सुरेख घाट, छानसे शंकराचे देऊळ होते. कोणीच नव्हते. पलीकडच्या तिरावरही एक मोठे शंकराचे देऊळ होते. थोडे दूरवरही नदीच्या वरच्या अंगाला एकसारखीच उंच कळस असलेली देवळे दिसत होती. पायय्रांवर बायका कपडे धूत होत्या.त्यांना माहूलीबद्दल विचारले. माहूली गाव साताय्रापासून दहा किमी आहे. हे ‘क्षेत्र माहूली’ आहे . इकडे कोणी फिरकत नाही. गावाचा थोडा भाग वर अगोदर आहे ते ‘संगम माहुली’. तिथे कृष्णा वेण्णा नद्यांचा संगम आहे. नंतर ती कृष्णा इथे येते. संगम ही खरी रम्य जागा असायला हवी पण तो घाट बनलाय मढं जाळायचा घाट. सातारा शहरात स्मशानच नाही. ते सर्व संगमावर जातात! क्षेत्र माहूली स्टेशन जवळआहे आणि चांगले आहे.भराभर पावले उचलून पावणेबाराला स्टेशनला आलो. बाराच्या कोयनाने सातला
दोन दिवस त्या भक्तिमय वातावरणातून वावरल्यावर आपल्याला पटतं की वारी करणारेनि का वारंवार जातात.आषाढ आला की दरवर्षी मनानेच तिथे पोहोचतो.
तपशीलवार आणि सहजसुंदर वर्णन.
खरं म्हणजे हे देऊळ नवव्या शतकात पांडुरंगपल्ली नावाचे शंकराचे होते
हे शंकराचेच कशावरुन? आणि तेथे शिवमंदिराच्या कुठल्या खुणा दिसतात?
शके ४३८ च्या एका ताम्रपटात पाण्डरंगपल्ली, जयदिठ्ठ व पंडराद्रिशेन असे काही शब्द डॉ. ग. ह. खरे यांनी निदर्शनास आणून दिले होते. शिवाय भागवदधर्म त्याही आधीपासून प्रचलित होताच. अर्थात तत्कालीन काळात विठ्ठलाची मूर्त भक्ती चालू होती का अमूर्त याबाबाबत नक्की सांगता येत नाही.
डॉ. शं गो. तुळपुळे यांना शके ११११ चा एक शिलालेख विठ्ठलाच्या पश्चिम द्वारासमोरील सार्वजनिक मुतारीच्या पायरीच्या दगडावर मिळाला. सध्या ह्या शिलालेखाची शिळा डायरेक्टर ऑफ अर्काइव्ह्ज यांच्या मुंबई येथील कचेरीत ठेवलेली आहे.
शिलालेखाचे वाचन असे.
सालवण सुरि ११११ सौ-
म्ये दिव | सुक्रे सम-
स्तचक्रवर्ति | मा -
हाजनिं | देवपरि -
वारे | मुद्रहस्तेहि अवघावें ला विठ -
लदेउनायकें || ए -
हि अवघावें लान
मडु ऐसा | कोठारीं
वाढसि जें | जा ती वी -
चंद्रु || हे क -
वणई न ठावें | स-
प्त | मुख्य संप्रति |
कवणु अतिसो देई तेआ-
सी विठलाची आण
ए काज जो फेडि
तो धात्रुद्रोहि |
--| कर्म |
आशय-
शालिवाहन सौर शक ११११ सौम्य संवत्सरी, शुक्रवारी समस्तचक्रवर्ति (पाचवा भिल्लम), महाजन, देवपरिवार, मुद्रहस्त विठ्ठलदेवनायक या सर्वांनी हे लहान असे देऊळ (लान मडु) स्पातिले. ते कोठारांतून वाढवावे. चंद्र जात विचारतो हे कोणासही ठाऊक नाही. (त्याप्रमाणे हे देऊळ लहान असले तरी त्याचा प्रतिपाळ सर्वांनी करावा. सांप्रत देवळाअचे मुख्य सात जण आहेत.. जो कोणी ह्या देवळास पिडा देईल (अतिसो) तो धात्रुद्रोही.
ह्याचा नंतरचा दुसरा शिलालेख येतो तो पंढरपूरचा प्रसिद्ध असा ८४ चा शिलालेख. हा शिलालेख शके ११९५ साली कोरला गेला जो ह्या मंदिराच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त होता म्हणूनच त्याचे नाव चौर्याऐंशीचा शिलालेख असे पडले. हा लेख रामदेवराव व त्याचा श्रीकरणाधिप हेमाद्रीपण्डित याने कोरविला. रामदेरायाने लान मडुची वाढ करुन मंदिराचा जीर्णोद्धार केला.
यादव राजवट संपुष्टात आल्यावर १३ व्या शतकात मलिक काफूरचा घाला इकडील मंदिरावर पडला व मंदिराचे स्वरूप नष्ट झाले. आज आपण जे मंदिर बघतो ते शिवकाळ व किंवा त्यानंतरचे आहे.
बरेच दिवस जायचं जायचं म्हणत ह्या महिन्यात अंबेजोगाईला जायचा योग आला. पुणे अंबेजोगाई प्रवासात नेहमीची वाट सोडून आडवाटेवरच ठिकाण म्हणून करमाळा बघायच ठरवल. पुण्याहून सोलापूर हायवेवर साधारण १०० किलोमीटर गेल्यावर भिगवणला फाटा लागतो तिथून ६० किलोमीटर वर करमाळा आहे. सोलापूर जिल्हातील एक तालुक्याचं ठिकाण असलेल करमाळा एक छोटस गाव आहे. सुरवातीच्या काळात बहामनी साम्राज्याचा भाग असलेले करमाळा नंतर नगरची निजामशाहिच्या अमलाखाली होते. निजामशाही सरदार रावरंभा निंबाळकरांची जहागीर असलेले करमाळा प्रसिद्ध आहे ते इथल्या कमला भवानी किंवा कमळजाइ मंदिरासाठी.

कमला भवानीच मंदिर गावाच्या बाहेरील ओसाड अश्या माळावर आहे. मंदिरच वैशिष्ट्य म्हणजे इथे चक्क दाक्षिणात्य शैलीशी मिळतीजुळती गोपुरे आपले मंदिर प्रांगणात स्वागत करतात. महाराष्ट्रातील खूप कमी मंदिरात अशी गोपुरे बघायला मिळतात. शैलीतील हा बदल खरतर पिढीतील बदलामुळे झालाय. मुख्य मंदिर बांधल (कदाचित जीर्णोद्धार केला) सरदार राजे रावरंभा ह्यांनी तर बाजूची तटबंदी आणि हि गोपुरे बांधली त्याच्या मुलानी म्हणजे राजे जनकोजीनि. जनकोजी दक्षिणेच्या स्वारीवर असताना तिकडची मंदिरे आणि भव्य गोपुरे पाहून प्रभावित झाला आणि त्यांनी तिकडचे कारागीर करमाळ्यात आणून सुंदर गोपूर बांधून घेतली.


मूळ मंदिर चारही बाजूनी भक्कम दगडी तटबंदीनी वेढलेले आहे. तटबंदीच्या आतील बाजूस सुंदर दगडी ओवऱ्या आहेत आणि पूर्ण अंगणाला दगडी फरसबंदी केली आहे. मंदिरा समोर होमकुंड आणि तीन गगनचुंबी दीपमाळा आहेत. मंदिराची शैली हेमाडपंथी आहे असा उल्लेख सगळीकडे असला तरी त्या शैलीची वैशिष्ट्ये ठळकपणे इथे पाहायला मिळत नाहीत जसे उंच जोते, मंदिराचा बाह्य आकार आणि त्यावरील नक्षीकाम इत्यादी ह्या मंदिरावर दिसत नाहीत. कदाचित हेमाडपंथी आणि इस्लामिक शैलीची सरमिसळ झाली असावी असे वाटते. दिपामालांचा प्रकार हि पारंपारिक मराठी नसून बराचसा इस्लामिक प्रभाव असलेला वाटतो. एक शक्यता अशी वाटते कि मुळ मंदिर हेमाडपंथी शैलीतील असावे आणि जीर्णोद्धार निजामशाही काळात झाला असल्याने हि शैलीतील सरमिसळ झाली असावी. अलीकडच्या काळातच सुंदर अशा दगडी मंदिराला ऑइल पेंट फासून त्याच्या सुंदरतेला दृष्ट लागणार नाही ह्याची काळजी देवस्थान trust नि घेतलेली दिसतीय.



मंदिराबद्दल आख्यायिका अशी सांगतात कि सरदार रावरंभा हा तुळजापूरच्या भवानी मातेचा निस्सीम भक्त होता वृद्धापकाळात त्याला तुळजापूरला दर्शनाला जाणे शक्य होईना म्हणून भवानीने त्याला दृष्टांत दिला कि मी तुझ्या मागे तुळजापुराहून करमाळ्याला येईन पण तू मागे वळून बघायचे नाही. रावरंभा गावाबाहेरील माळापर्यंत आला आणि त्याच्या मनात शंका आली. देवी खरच मागे येत आहे कि नाही हे पाहण्यासाठी त्याने मागे वळून पाहिले आणि देवी अंतर्धान पावली. त्याचठिकाणी हे मंदिर बांधले आहे. आता अशीच कथा मी मिरजेच्या अंबाबाई बद्दलहि ऐकली आहे, खरे खोटे ती भवानीच जाणे. कमला भवानी मातेची मूर्ती मात्र अतिसुंदर आहे.. काळ्याशार पाषाणातील हातात त्रिशूल आणि तलवार धारण केलेली अष्टभुजा मूर्ती डोळ्याचे पारणे फेडते. देवीच्या उजव्या डाव्या बाजूस शंकर व गणपतीची छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या अगदी समोरच एक शंकराचे अगदी छोटेसे पण सुंदर दगडी घुमटी सारखे देऊळ आहे आणि त्याच्या शेजारी कुणाची तरी समाधी. समाधीचा वापर सध्या गावकरी पत्त्यांचा फड लावण्यासाठी करतात. मंदिर परिसराच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ९६ पायऱ्यांची विहीर.


कातीव दगडात बांधलेल्या ह्या अष्टकोनी विहिरीत पाणी जवळपास ५० ते ६० फुट खोलवर असेल. पण पाण्यासाठी त्या खोलीपर्यंत बांधलेल्या एकसारख्या सुरेख ९६ पायऱ्या आहेत. पुरातन काळापासून पाणी पुरवठ्यासाठी बांधलेल्या अशा विहिरी (step wells) भारतभर पाहायला मिळतात. ह्या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे हि अगदी दक्षिण उत्तर अक्ष ठेऊन बांधली आहे. उत्तरेकडून पायर्या आणि दक्षिणेला विहीर. ह्या अक्षाचा फायदा म्हणजे सुर्यभ्रमण पूर्वेकडून पश्चिमेकडे होत असल्यामुळे, पाणी आणि पायऱ्या दिवसभर जास्तीजास्त वेळ सावलीत राहतात फक्त भरदुपारी १२ वाजण्याच्या आसपास पाण्यावर सूर्यकिरण पोहोचतात. त्यामुळे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते आणि सावलीतील पायऱ्या वापरणेही सोयीचे होऊन जाते. भारतभर जवळपास सगळ्याच अशा विहिरी (step Wells) ह्याच संकल्पनेवर बनलेल्या दिसतात हे विशेष. आपल्या पूर्वजांचे वातावरणाला अनुकूल करून घेणारे design बघून थक्क व्हायला होते. अर्थातच आपण जशी अनेक पुरातन पाणवठा ची जशी वाट लावली आहे तशीच ह्या विहारीची देखील लावली आहे. पाणी उपसा नसल्यामुळे आणि कचरा टाकल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. जवळपास सगळीकडे गवत पसरले आहे आणि ह्या ऐतिहासिक ठेव्याशेजारीच ग्रामपंचायतीने महिलांसाठी असलेले पण बंद असणारे स्वच्छतागृह बांधले आहे.


इतक्या सुंदर मंदिर आणि परिसरात फिरल्यानंतर आम्ही निघालो अंबेजोगाई च्या दिशेने. रस्त्यातच आम्हाला मिळाला आणखी एक ऐतिहासिक ठेवा ज्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. किल्ले परांडा...
पण तो आता पुढच्या भागात....
मुख्य मंदिराच्या बांधकामाची शैली बरीचशी यादवकालीन / हेमाडपंथई असावी असा वाटते. वापरलेले स्तंभ आणि मुख्य म्हणजे structural system हि त्याप्रकाची म्हणजे खांब आणि तुळई ( trabeated system ) ह्यांचीच आहे. पण सगळीकडे मंदिर सरदार राव रंभा नि बांधले असाच उल्लेख आहे जो पटत नाही. म्हणूनच अस वाटत कि मूळ मंदिर यादवकालीन असावे आणि निजामशाही काळामध्ये त्याचा जीर्णोद्धार झाला असावा. नंतरच्या बांधकामावर जाणवण्या इतपत मुस्लीम स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतोय.
गुरसाळयाच्या गढीचा खरा इतिहास .. भाग ३
|| श्री ||पंढरपूरातील देवी दर्शन. . 1अंबाबाई पटांगणातली देवीपंढरपूरच्या ईशान्येला चंद्रभागेच्या काठावर हे देवीचे मंदिर आहे. मोठ्या विस्तीर्ण वृक्षांनी हे मंदिर वेढलेले आहे. मंदिरासमोरच्या एका वृक्षाच्या ढोलीत एक माणूस सहज बसू शकेल इतकी मोठी ढोली या वृक्षाला आहे या वरून या वृक्षाची जाडी आणि जुनेपण लक्षात यावे. मंदिर साधे सुबक आहे. मंदिरात देवीची सुबक मूर्ती आहे . तुळजापुरच्या देवीचीच हि प्रतिकृती असल्याचे म्हटले जाते . निसर्ग रम्य वातावरणात असलेल्या या मंदिरात पंढरपूरकर मोठ्या प्रमाणावर मंगळवार आणि शुक्रवारी गर्दी करतात . नवरात्रीत तर या मंदिराबाहेरील रांग संपता संपत नाही .पंढरपुरातील हे मुख्य देवी मंदिर आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही . पूर्वी या मंदिराच्या कडेने असणाऱ्या मैदानाला आंबाबाईचे पटांगण म्हटले जायचे . या मैदानात क्रिकेटचे सामने नेहमीच भरायचे .
...आम्ही जुन्या पेठेत राहायला आल्यावर त्यावेळी आमची परिस्थिती तशी वाईट होती . माझ्या घरच्यांनी या देवीच्या दर्शनाला जायला सुरुवात केली . योगायोगाने आमची परिस्थिती सुधारली . चांगले दिवस आले . समृद्धी आली . स्वतःचे घर खरेदी केले . या देवीवरची आमच्या घरच्यांची श्रद्धा वाढली .आणि मग हे देवीचे देऊळ नवरात्रीत रंगवण्याचा खर्च आमच्या घरच्यांनी देण्यास सुरुवात केली . देवळाच्या भिंतींवर पौराणिक प्रसंग वनारे पेंटर खूपच सुंदर पद्धतीने काढायचे . काही वर्षे ह्या उपक्रमात सातत्य राहिले मात्र काही कारणा वरून मंदिराच्या पुजाऱ्याशी तात्विक मतभेद झाल्याने आमच्या घरच्यांनी हा उपक्रम बंद केला आणि मग मंगळवेढा रोडला असणाऱ्या घाडग्यांच्या देवीला जायला आमच्या घरच्यांनी सुरुवात केली .. या घाडग्यांच्या देवी बद्दल मी सांगणार आहेच पण तो पर्यंत जगदंब . सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा ! .... श्याम सावजी ..पंढरपूर || श्री ||मंगळवेढा रोडची घाडग्यांची देवीपंढरपूरच्या अग्नेय दिशेला चंद्रभागेच्या काठावर हे मंदिर आहे यमाई तुकाई सोडली तर पंढरपुरच्या इतर चारही मुख्य देवी आग्नेय ,नैरुत्य ,वायव्य आणि ईशान्य या दिशांना आहेत . ( या पंढरपूरच्या सीमा रक्षक या उद्देशाने स्थापन केल्या गेल्या असाव्यात का ?) मंगळवेढ्याला जाणाऱ्या रोडवर एक लहानशी किल्ल्या सारखी किंवा गढी सारखी पडकी वास्तू आहे त्यात हे देवीचे मंदिर आहे . घाडगे नावाच्या सरदाराची हि गढी असल्याचं मी लहानपणी ऐकलं होतं . त्यामुळे आम्ही या देवीला घाडग्यांची देवी असं म्हणायचो . मला लहानपणी किल्ल्यात आल्याचं समाधान इथं आल्यावर व्हायचं .आत भरमसाठ वाढलेली झाडी आजही आहे . या देवीच्या मंदिराकडे तसं दुर्लक्षच झालं होतं तेंव्हा . पूर्वी एका लहानश्या पत्र्याच्या खोलीत देवीची मूर्ती होती. आता मोठं बांधकाम सुरु आहे . या नवरात्रात हे बांधकाम जवळ जवळ पूर्णत्वास आलेलं दिसलं .अंबाबाई पटांगणातील देवीच्या माझ्या तितक्याश्या आठवणी नाहीत कारण तेंव्हा मी पाळण्यात होतो मात्र या देवीच्या बाबतीत माझ्या आठवणी ताज्या आहेत .देवीच्या खोली बाहेर मोठ्ठा ओटा होता त्यावर मंदिराच्या पुजारीणबाई त्यांना आक्का बाई म्हणायचे त्या बसलेल्या असायच्या. वयस्कर होत्या आणि एकदम कडक . मंदिरातली शिस्त कोणी मोडली कि त्या रागवायच्या . याचा फटका मला पण बसला होता . त्यामुळे त्यांना मी खूप घाबरायचो . त्यांच्या कडेने आराधी , गोंधळी आणि भक्त महिलांचा गराडा असायचा . टांग्यातून पूजेचे साहित्य घेऊन आम्ही मंदिरात जायचो . माझ्या घरचे आक्का बाईशी गप्पा मारण्यात किंवा पूजेत गर्क झाल्यावर मी समोरच्या मैदानात खेळायला पळायचो . देवीच्या मूर्तीच्या समोर काही लहान लहान मंदिरे म्हणजे देवळ्या आहेत त्यात मरिआइ वगैरेंचे तांदळे आहेत . एक माकडाची मूर्ती आहे . या मूर्तीची कथा मी नंतर सांगेन . एक विटा आणि चुन्याची बनवलेली फारशी उंच नसलेली दीपमाळ आहे . ही दीपमाळ आणि ती छोटी छोटी मंदिरे एका रेषेत असल्याने मला ते सगळे रेल्वे गाडी प्रमाणे वाटायचे . ती दीपमाळ म्हणजे रेल्वेचे धुरांडे आणि मागची ओळीत असणारी देवळे म्हणजे तिचे डबे . दीपमाळ आणि इतर देवळे यांच्या मध्ये मोकळी जागा होती त्यात बसून मी ती र्रेल्वे चालवल्याचा अभिनय करायचो . हा... हा... हा... जणू काही ते देवीचे मंदिरच मी ओढून नेत होतो . या दीपमाळे जवळ एक छोटंसं चाफ्याचं झाड होतं . अगदी लहान उंचीचे पण बळकट . त्याच्यावर चढून त्याच्या फांद्या वरून उड्या मारायचाही उद्योग मी येथे आल्यावर करायचो ... लहानपणी या देवी बद्दल ब-याचश्या आख्यायिका ऐकायला मिळाल्या होत्या . त्यातील एका आख्यायिकेनुसार या गढी जवळच्या शेतात नांगरट करताना हि देवीची मूर्ती सापडली . दुसऱ्या आख्यायिकेनुसार घाडगे सरदारांना तुळजापूरला जायला वयोमानाने जमेना याची त्यांना खंत वाटू लागली . तेंव्हा एकदा स्वप्नात येउन देवीने आपण त्यांच्या गढीतील विहिरीत असल्याचे सांगितले . सकाळी सरदार घाडगे यांनी शोध घेतला असता विहिरीच्या एका कोनाड्यात त्यांना हि मूर्ती सापडली .. तीच हि आजची देवीची मुर्ती . सरदारांनी गढीतच तिचं छोटसं मंदिर बांधलं आणि तिथेच ते देवीची पूजा ,अर्चा ,सेवा करू लागले .आजही ती विहीर आणि त्या विहिरीतली मूर्ती सापडलेली देवळी तशीच आहे .लहानपणी विहिरींची भीती वाटत असल्याने मी मंदिरा मागे असणाऱ्या या विहिरीकडे जात नसे . गढीचे भग्न अवशेष घाडगे सरदारांच्या वैभवाची साक्ष आजही देतात . गढीचे काही बुरुज आणि तट अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत . मुख्य दरवाजा भव्य आणि देखणा आहे . त्या जुन्या काळाची आठवण करून देत दिमाखाने उभा आहे . गढीच्या परिसरात भूतेश्वर महादेवाचे मंदिर आहे . त्याच्या समोर राम मंदिर आहे . ही गढी आणि गढीचा परिसर हा माझ्या साठी आनंदाचे ठिकाण आहे . या मंदिराच्या परिसरात बसून मावळतीला जाणारा सुर्य बघणे हा माझा आवडता छंद .. जगदंब ! ...............................श्याम सावजी ..पंढरपूर हे दोन तांदळे म्हणजे पार्वती माता आणि त्यांचे सीता रूप आहेत आणि ये माई .. तू का आली ? चा अपभ्रंश झाला यमाई तुकाई ... येथून जवळच पद्मावतीचे तळे आहे . यमाई तुकाईला आल्या नंतर भाविक येथून जवळच असणाऱ्या भूवनेश्वरीच्या दर्शनाला जातात तर काही जण आणखी पुढे जात कासेगावाच्या प्रसिद्ध देवीचेही दर्शन घेतात . भुवनेश्वरी देवी कासेगाव शिवेवर आहे . ..... श्याम सावजी ..... पंढरपूर —
|| श्री || टेकडीवरची आई . पद्मावती माई पंढरपूरच्या नैरुत्त्य दिशेला छोट्याश्या डोंगरासारखी वाटणारी हि टेकडी होती . बाहेरून दगड मातीचा ढीग दिसत असला तरी आतल्या बाजूने विस्तीर्ण भव्य असे एखाद्या स्टेडीयम सारखे पाय-या पाय-या चे दगडी बांधकाम दिसायचे .याला पद्मावतीचे तळे असेही म्हणतात . यात आता पाणी नाही आजही हे विस्तृत भव्य चौरस बांधकाम तसेच आहे . आत नगरपालिकेने सुंदर बाग बनवली आहे मात्र बाहेरील बाजूने बनवलेल्या शॉपिंग सेंटर मुळे टेकडी मात्र नष्ट झाली . आमच्या भागात डोंगर वगैरे प्रकार कधी बघायला मिळत नसल्याने हि टेकडी हाच आमच्यासाठी मोठ्ठा डोंगर होता . डोंगरावर जायची लहर आली कि या टेकडीवर जायचे . या टेकडीच्या आतील बाजूस पद्मावती देवीचे मंदिर होते . म्हणजे अजूनही आहे . या चौरसाकार तळ्याच्या मध्यभागी पद्मावती देवीचे हे मंदिर आहे . या मंदिरा पर्यंत जाण्यासाठी लहानसा दगडी पूल आहे . मंदिरात पद्मावती देवीचा तांदळा आहे .
माझी आदर्श प्राथमिक शाळा ही या पद्मावतीच्या टेकडी पासून हाकेच्या अंतरावर . त्यामुळे कधी या दिशेने शाळेत आलो किंवा घरी निघालो कि ही टेकडी दिसायची . शाळेच्या वयात मला डोंगर म्हणतात तो हाच असे वाटायचे . नंतरच्या आयुष्यात बरेच उंच डोंगर चढून गेलो पण पद्मावतीच्या या टेकडीचे थ्रिल काही औरच होते .
एकदा पहिली दुसरीत असताना शाळेत मी काही तरी खोडी केली आणि बाईंनी मला न्यायला आलेल्या माझ्या आज्जीला ते सांगितले . आज्जीचा पारा चढला " चल तुला त्या डोंगरावर सोडते " असे म्हणत तिने मला ओढत त्या टेकडीवर आणले . त्या वेळी माझ्या दृष्टीने आतली तळ्याची खोली खूपच होती त्यामुळे मी घाबरून गेलो त्यात पुन्हा या डोंगरावर देवी राहते असे मी ऐकले होते . आता देवी म्हणजे वाघ आलाच . ही आज्जी बया आपल्याला या डोंगरावर सोडून गेली आणि वाघोबा आले तर काय ? आणि नेमकी देवी त्याच्या वर नसली तर त्याला कोण कंट्रोल करणार ? या कल्पनेने मला घाम फुटला .मी आज्जीच्या पायावर लोळन घेत "पुन्हा असे करणार नाही . शाळेत नीट वागेन " अशी गयावया केली पण आज्जी ऐकेना . " तुला इथेच सोडून जाणार " म्हणाली . संध्याकाळची वेळ असल्याने अंधार पडत चाललेला होता .माझ्या नशिबाने नेमकी तळ्याच्या मैदानात काही तरुण मुले वौलीबॉल खेळत होती .त्यातला एक तरुण धावत आला आणि त्याने माझ्या आज्जीची समजूत घातली . देवीसमोर अंगात आलेल्या स्त्रीला आजूबाजूचे सगळे "शांत व्हा आई " अशी विनवणी करतात आणि मग ती स्त्री शांत होते तसा प्रकार झाला आणि आज्जी शांत झाली .
तो तरुण नंतर बरेचदा रस्त्यात भेटला कि ती आठवण करून द्यायचा आणि विचारायचा " आता नाही ना खोड्या करत शाळेत ? " .
पद्मावतीच्या त्या भागातून जाताना मला ही आठवण कधी आली की मी स्वतःशीच हसतो आणि मी एकटाच का हसतोय ? म्हणून लोक माझ्याकडे बघून हसतात . हसो बिचारे .... ......जगदंब !.........श्याम सावजी .........पंढरपूर || श्री ||कासेगाव शिवेवरची भुवनेश्वरी देवीपंढरपूरच्या दक्षिणेला यमाई तुकाई मंदिराच्या थोडे पुढे गेल्या नंतर मुख्य रस्ता सोडून आणखी एक कच्चा रस्ता कासेगावकडे जातो . या रस्त्याला बरोब्बर कासेगाव शिवेवर भुवनेश्वरी देवीचं मंदिर आहे. येथून पुढे कासेगाव हद्द सुरु होते . पंढरपूरच्या रक्षणार्थ हि देवी पंढरपूर शिवेवर उभी असल्याचं सांगितलं जातं. यादेवीबद्धल फारशी माहिती किंवा दंत कथा मिळू शकली नाही मात्र हि देवी पंढरपूरकर आणि कासेगावकर या दोन्ही मंडळींमध्ये लोकप्रिय आहे. अगदी मोकळ्या माळावर असल्याप्रमाणे हे देवीचे मंदिर आहे. अगदी तुरळक घरे आजूबाजूला उभी आहेत. मंदिरात देवीच्या मुर्तीसामोराची दगडी चौकट काहीशी लहान असल्याने मूर्तीचे थोडे दुरूनच दर्शन होते.
भुवनेश्वरीचे दर्शन करून भाविक पुढे कासेगावच्या देवीच्या दर्शनाला जातात. येथेच देवी मंदिरा समोर शिवेवरच्या मारुतीचे मोठे मंदिर आहे ... जगदंब....... ...................श्याम सावजी.. पंढरपूर || श्री ||जुन्या अकलूज रोडची दुर्गा देवीपद्मावती प्रमाणेच हि देवी सुद्धा टेकडीवर आहे . रानावनात , हिरव्यागार शेतीत हि टेकडी आहे . पंढरपूर सोडून दुसऱ्याचं कुठल्यातरी भागात आल्यासारखं या ठिकाणी आल्यावर वाटतं. अर्थात पंढरपूरपासून बरीच लांब जुन्या अकलूज रस्त्याला हे देवीचे मंदिर आहे.या देवी बद्दल मला काही माहिती न्हवती . एकदा माझ्या काही विद्यार्थ्यांनी मला या देवी बद्दल माहिती दिली आणि चला जायचं का ? असं विचारलं . नेमके ते नवरात्रीचे दिवस होते . मग त्यांच्या बरोबर पहिल्यांदा या देवीला आलो. पंढरपुरच्या वायव्य दिशेला हि देवी आहे . जुन्या अकलूज रोडला हे मंदिर लागतं . पंढरपूर पासून सुमारे ५ ते ६ किलोमीटर अंतर असल्याने नेहमी या देवीला जाणाऱ्या भक्तांची संख्या कमीच असेल पण नवरात्रीत हि टेकडी माणसांनी फुलून येते . आजूबाजूला हिरवीगार शेतं आणि गावापासून दूर असल्याने आपण एखाद्या पर्यटन स्थळी आल्याचा भास होतो . या टेकडीच्या पायथ्याला एक ओढा आहे . इतर वेळी हा कोरडा असतो पण पावसाळ्यात याला पाणी येतं आणि मग हा परिसर खूप रमणीय दिसतो . इथं येणारे शाळा , महाविद्यालयाचे विद्यार्थी सहलीला आल्याप्रमाणे बरोबर खाद्य पदार्थ वगैरे घेऊन येतात व या टेकडीवर त्यांचा आस्वाद घेतात .
एका जाणकार व्यक्तीने अपत्यप्राप्तीसाठी आम्हा उभयतांना ११ रविवारी राहू काळात दुर्गा देवीच्या दर्शनाला जाण्यास संगीतलं होतं. मला हि देवी आठवली .त्यानुसार आम्ही दर रविवारी राहू काळात या दुर्गा देवीच्या दर्शनाला जायचो . रविवारचा राहू काळ साडे चार ते सहा या वेळेत येतो . या काळात या मंदिरात देवीसमोर आम्ही दिवा लावायचो आणि अपत्यप्राप्तीची प्रार्थना करायचो. ११ रविवार झाल्यानंतर आम्ही या देवीला चांदीचा पाळणा अर्पण केला . आज दोन गोड मुलं आमच्या घरात रांगत आहेत. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. असो.
मावळतीला जाणारा सुर्य आणि त्याचे पसरलेले लालसर पिवळे ऊन यामुळे हि टेकडी आणि हा परिसर संध्याकाळच्या वेळी खूपच देखणा दिसतो . टेकडी आणि आजूबाजूची शेते या पिवळसर उन्हात न्हाऊन निघतात आणि निसर्गाची जादू आपल्या मनावर मोहिनी घालते . " संधीकाली या अश्या धुंदल्या दिशा दिशा " अशी मनाची अवस्था होते . ...............
.श्याम सावजी ..........पंढरपूर || श्री ||लखूबाई अर्थात दिंडीर वनातील रुक्मिणी आई पंढरपूरच्या पूर्वेला चंद्रभागेच्या काठावरच एका उंच चौथ-यावर हे लखुबाईचं मंदिर आहे . या भागाला पुराण काळात दिंडीर वन म्हणत होते असे सांगतात . लखुबाई हे माता रुक्मिणीचं लोक नाव . रुक्मिणी दिंडीर वनात कशी आली याची एक आख्यायिका येथे सांगितली जाते . माता रुक्मिणी आणि भगवान श्री कृष्ण एकांतात गप्पा मारत असताना राधेची हाक भगवंतांच्या कानावर आली . राधेच्या हाकेने भगवंत सैरभैर झाले . त्यांचं मन राधेकडे ओढ घेऊ लागलं. हे बघून रुक्मिणी मातेचा पारा चढला आणि ती रागारागाने तिथून निघाली . रुसलेली रुक्मिणी तडक दिंडीर वनात आली आणि तिथे लपून बसली . पाठोपाठ भगवान रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी दिंडीर वनात आले . येताना वाटेत त्यांची पुंडलीकाशी भेट झाली आणि पुंडलीकाने फेकलेल्या विटेवर भगवान उभे राहिले ते श्री विठ्ठल म्हणून लोकमान्य झाले .
एका उंच दगडी चौथर्यावर हे लखू बाईचं मंदिर आहे . चंद्रभागा नदी काठावरची जवळपास सगळीच मंदिरं अशी उंच चौथर्यावर आहेत . पुराच्या दृष्टीने हि खबरदारी असावी . वन म्हणावं असं आता या भागात काही नाही . ना झाडी ना झुडूप . मंदिराच्या आसपास एक दोन झाडे शिल्लक आहेत हीच काय ती वनाची खुण . लखूबाईची मूर्ती पूर्वाभिमुख आहे . लखूबाई च्या दर्शनाला महिलांची खूप गर्दी असते . लखुबाइच्या पूजेने पतीचे आयुष्य वाढते आणि घरात सुख शांती राहते असे बोलले जाते . देवी मंदिराच्या कडेने प्रदक्षिणेसाठी असणारा मार्ग हा अगदीच चिंचोळा असल्याने आणि चौथरा उंच असल्याने प्रदक्षिणा मारताना मी लहानपणी खूप घाबरायचो . कित्येकदा मी प्रदक्षिणा अर्ध्यातून सोडून दिली . आता ग्रीलचे कठडे बसवल्याने प्रदक्षिणा मारणं सुखकर झालं आहे ........ श्याम सावजी .......पंढरपूर — पळसनाथाचा अद्भुत कळस (PALASNATH TEMPLE)
कधी कधी बऱ्याच गोष्टी मनात असतात पण त्या पूर्ण करण्यासाठी नशिबाची सुद्धा साथ हवी असते. असंच एक ठिकाण बऱ्याच वर्षांपासून डोक्यात होतं ते म्हणजे भिगवण जवळचं पळसनाथाचं मंदिर. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे बाराही महिने उजनी धरणाच्या पोटी लुप्त झालेलं हे मंदिर. मंदिर जरी पाण्याखाली असलं तरी खूपच तीव्र दुष्काळ असला आणि त्यातच उन्हाळा तापू लागला तरच हे मंदिर पाण्याबाहेर येतं.म्हणुनच या मंदिराचं दर्शन होणं हि भाग्याची आणि योगायोगाची गोष्ट आहे. १९७५ साली जेव्हा उजनी धरण बांधून पूर्ण झालं तेव्हा त्यासाठी आजूबाजूची गावं पुनर्वसित करण्यात आली पण मंदिर कसं हलवणार?? म्हणून हे मंदिर तिथेच ठेवून आजूबाजूची गावं स्थलांतरित झाली. ११ व्या शतकात बांधलं गेलेलं हे मंदिर आजही त्याचं अस्तित्व टिकवून थाटात उभं आहे ते म्हणजे भिगवणचं "पळसनाथचं शिवमंदिर" पळसनाथचं शिवमंदिर
गेल्या ३ वर्षांपासून ठरवलं होतं जेव्हा कधी हे मंदिर पूर्ण बाहेर येईल तेव्हा बघायला जायचं. एकदा फेब्रुवारी महिन्यात बारामतीला जाऊन आलेलो तेव्हा मित्राला सांगितलं होतं मंदिर बाहेर आलं की सांग. तसंच अचानक माझा मित्र मुकेशचा मला फोन आला की "अरे मंदिर बाहेर आलंय" पण नुसतं मंदिर बाहेर येऊन उपयोग नाही तर मंदिरात प्रवेश करता यायला हवं हे उद्दिष्ट होतं म्हणून सोशल मीडियावरून तिथल्या स्थानिक मित्राचा नंबर घेतला व त्याला फोन करून विचारलं त्याचं नाव "विशाल काळे". तो मला म्हणाला मी तुला उद्या सकाळी बघून सांगतो. मी म्हंटलं ठीक. कारण इतक्या दूर जाऊन मला फक्त मंदिर बघण्यात अजिबात रस नव्हता. त्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी निरोप आला की थोडा गाळ आहे पण ३-४ दिवसात मोकळं होईल. पुढच्या रविवारी आलात तर उत्तम. पण माझे पाय काही घरात टिकत नव्हते आणि त्यात अजून १० दिवस वाट बघायची म्हणजे अजून जड. १० दिवसात ही बातमी सगळीकडे पसरली तर त्यात गर्दीची अजून भर म्हणजे ते शक्यच नव्हतं म्हणून मिळेल तसं शनिवारी रात्री निघायचं ठरवलं. रात्रीची पंढरपूर पॅसेंजर पकडून सकाळी बरोबर ८ वाजता भिगवण स्टेशनला उतरून रिक्षा पकडली व सर्वात आधी Highway गाठला कारण पळसनाथला जायला तिकडून गाड्या मिळतात असं कळलं. जास्त वाट न पाहता पहिली जी गाडी आली त्यात चढलो तो होता एक टेम्पो जो शेळ्यांना घेऊन चालला होता त्यातच गावकऱ्यांशी गप्पा मारता मारता पळसनाथ आलं. शेळ्यांसोबतचा प्रवास
सुमारे २० किमी असलेलं हे अंतर अर्ध्या तासात कापून ९ च्या सुमारास गावापाशी पोहोचलो. पळसनाथ मंदिर तिथून २ किमी दूर. हे अंतर मात्र चालतच जावं लागतं. इथे जाण्यास कोणतेही वाहन नाही. सकाळची वेळ असल्याकारणाने ही चाल सुद्धा मजेशीर वाटली नुकतेच पडलेलं ऊन गावात असलेली मंदिर, त्यात गुलमोहराच्या झाडांनी सजवलेला साज हे पाहून नेमकं गावात आल्याचा प्रत्यय येत होता.
पळसदेव गावातला प्रवेश
चालत चालत अर्ध्या तासात धरणाजवळ जाऊन पोहोचलो अर्धा किमी अगोदरच मंदिर दिसायला लागलं तेव्हा इतकं मस्त वाटलं त्याचं शब्दात रूपांतर नाही करू शकत. ज्या क्षणाची इतके वर्ष वाट पाहिली ते डोळ्यासमोर दिसत होतं. थोड्याच वेळात पाण्यापाशी जाऊन पोहोचलो बोट तयारच होती. जास्त कोणाला माहिती नसल्याने मी एकटाच होतो. ते सगळ्यात मोठं सुख होतं. बोटवाल्यासोबत गप्पा मारून तिथल्या भागाची माहिती घेऊन थेट मंदिराच्या जवळ जाऊन पोहोचलो.दुष्काळसदृश्य परिस्थिती
पळसदेव मंदिरापर्यंतचा उजनीतून केलेला प्रवास मंदिरात जाण्यापूर्वी इतिहासाची पाने चाळली तर मंदिराला भेट देताना अजून मजा येते. अभ्यासकांच्या मते जुन्या काळात पळसदेव हे गाव "रत्नपूर" म्ह्णून ओळखले जायचे बाजारपेठेचे मुख्य केंद्र असलेल्या ह्या गावात एकूण ५ मंदिर होती. भीमा नदी जिथे उत्तरवाहिनी आहे तिथे एक ओढा येऊन मिळतो त्या संगमावर शके १०७९ म्हणजे ई. स. ११५७ मध्ये चांगदेव ह्या दंडनायकाने येथे एका विष्णू मंदिराची उभारणी केली ह्या माहितीचा शिलालेख मंदिरातील एका खांबावर दिसून येतो. विष्णुमंदिर पश्चिमाभिमुख असून दोन्ही मंदिराची वास्तुरचना साधारणपणे सारखीच आहे सदर मंदिराचा कळस नष्ट झाला असून मंदिराच्या तिन्ही बाजूस विस्तृत प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजू ७ दगड आहेत ज्यावर दगड पटल्यास सप्तसुरांचा प्रत्यय येतो. काशीविश्वेश्वर मंदिर
मंदिराच्या आतील बाजूस असलेले खांब
मंदिरातील शिलालेख
बारमाही पाण्यात असलेले पळसनाथाचे हे मंदिर म्हणजे मानवनिर्मितीचा सुंदर अविष्कार म्हणायला हरकत नाही. पळसनाथाचे मंदिर हे २८ फुटी म्हणजे सर्वात उंच असल्याकारणाने त्याचा कळस आपणास भर पाण्यात दिसू शकतो. मंदिराचा कळस याआधी दगडी असावा नंतर तो विटांचा केला असावा. ह्या कळसाचे वैशिष्टय म्हणजे म्हणजे सदर कळसाच्या आत प्रवेश करण्यासाठी एक छोटंसं प्रवेशद्वार आहे. शिखरावरील कळसाचा आकारही लक्षवेधी आहे. शिखरावर सर्पाकृती शिल्प आहेत. पळसनाथचा कळस व त्याचे प्रवेशद्वार
कळसावरील शिल्प
पळसनाथ च्या कळसातील प्रवेश
शिखराकडे डोळे भरून पाहिलं कि मग मंदिरात प्रवेश करायचा. मंदिराचे प्रवेशद्वार पंचशाखीय असून मंदिराला तिन्ही बाजूस प्रवेशद्वार आहे. मंदिरातील खांबांवरील नक्षीकामही देखणं आहे. मंदिरातील नक्षीकाम हे बरेचसे शाबूत आहे इतके वर्ष पाण्यात राहूनसुद्धा बांधकाम असं राहू शकत ह्याचंच आपल्याला नवल वाटतं. नंतर आपण गर्भगृहात प्रवेश करतो. गर्भगृहात आधी शिवपिंड होती पण गाव पुनर्वसित होताना गावकऱ्यांनी ती शिवपिंड पुनर्वसित झालेल्या गावातील मंदिरात स्थापन केली आहे. सभामंडपावरील असलेले एक शिल्प आजही लक्षवेधून घेतं ज्याच्या चहूबाजूस हनुमानाची प्रतिकृती आहे.खांबावरील नक्षीकाम
गर्भगृहाचे प्रवेशद्वार
प्रवेशद्वारावरील शिल्पकौशल्य
प्रवेशद्वारावरील खांब
मंदिराबाहेरील शिल्प
सभामंडपावरील शिल्प
मंदिराच्या सभोवताली सुंदर तट असून आजूबाजूच्या परिसरात अनेक वीरगळी नंदी शिल्पपट पडलेले आहेत. तसेच अनेक कलाकुसर असलेले दगड अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. मंदिराच्या समोरच विटांमध्ये बांधलेली प्रशस्त धर्मशाळा आहे. ह्या धर्मशाळेची प्रवेशद्वार ही हिंदू-मुस्लिम पद्धतीची आहे त्याचा आकार पाहिल्यावर आपल्या ते लक्षात येते.
मंदिराबाहेरील विरगळ
आवारातील मंदिराचे अवशेष
मंदिराबाहेरील धर्मशाळा
धर्मशाळेच्या कमानी
पळसनाथ मंदिर व धर्मशाळा
मंदिराच्या मागील बाजूसच एक राम मंदिर आहे. ह्या मंदिरावरील अवशेष खूप दर्शनीय आहेत. ह्या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला धरणाच्या पात्रातून बाहेर यावं लागतं. बाहेरून किनाऱ्यावरून चालत गेलं तरी आपण सुमारे १५ मिनिटात देवळापाशी पोहोचतो. हेही मंदिर प्रचिन असून मंदिरावरील अप्रतिम शिल्प आपलं लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या बाहेरील बाजूस रामायणातील बरेचशे प्रसंग आपल्या समोरून जातात सेतू बांधताना वनरसेनेचे योगदान, राम लक्ष्मणाची धनुर्धारी कला. असे बरेचसे प्रसंग ह्या मंदिरात आपल्याला शिल्परुपी आढळतात. राम मंदिर
मंदिरावरील शिल्प
मंदिराबाहेर पडलेले काही अवशेष
आधी पळसनाथ मग काशी विश्वेश्वर आणि नंतर हे राममंदिर बघून खरंच स्वतः नशीबवान असल्यासारखं वाटलं. इतके वर्ष पाण्यातून तावून-सुलाखून निघालेलं हे मंदिर पाण्यात असूनही शाबूत राहतंच कसं आणि पाण्याच्या होणाऱ्या आघातांपासून वाचतच कसं ?? हा साधा प्रश्न कोणाच्याही डोक्यात येऊ शकतो. त्यामुळे मंदिराच्या ह्या वारशाला सुरक्षित राहण्यासाठी मनोमन प्रार्थना करून उजनीतून मी काढता पाय घेतला. जलसमाधी मिळालेलं पळसनाथ मंदिर
आभार मानायचे झाल्यास त्या सर्वांची मानेन ज्यांच्यामुळे मला ह्या मंदिराची माहिती मिळाली आणि ज्यांच्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकलो त्यात माझा मित्र मुकेश आणि विशाल काळे ह्यांचं नाव मी प्रामुख्याने घेईन. मुकेशमुळे माझ्या डोक्यात पळसदेवला जायची प्रथमदर्शनी तयारी झाली आणि पळसदेवचा स्थानिक मित्र विशाल काळे ह्यामुळे मला मंदिराचे DAILY UPDATE मिळत गेलं त्यामुळे मला मंदिराचे जे रूप पाहायचे होते ते पाहण्यास मला मदत झाली त्याबद्दल विशाल मित्रा मी तुझा आयुष्यभर ऋणी राहीन. धन्यवाद.
Google Location of Palasdev Temple.
टीप :
१) मंदिराला भेट देण्यास जाण्यापूर्वी आधी चौकशी करून जाणं गरजेचं आहे नाहीतर फेरी फुकट जाऊ शकते.
आणि
२) गावातून परतताना 'तुषार कोल्ड्रिंक "मधून लिंबू सरबताचा आस्वाद नक्की घ्या कारण ते अमृत आहे तशी चव तुम्हाला घरी बनवलेल्या लिंबू सरबतातही मिळणार नाही.
सोलापूर म्हंजे मजाच मजा. भरपूर खाणं आणि चित्रपट बघणं. जर का सुभाष चौकातल्या कुठल्या हॉटेलात राहिलात तर बर्याच गोष्टी पायी फिरून बघता येतील. किल्ला समोरच आहे. बाजारपेठा, पार्क मैदान, सिद्धेश्वर देऊळ, ह्दे प्रशाला, संगमेश्वर कॉलेज, वारद बंगला अर्थात ईंद्रभुवन अर्थात सोलापूर (म्?)न.पा.कार्यालय, आणि भरपूर टॉकिजेस.
सोलापूर म्हंजे खायला पर्वणी. सुप्रजा, स्वाद,नट्स चाट चा ठेला पण मस्त. त्याच्यानंतर दत्ताच्या देवळाजवळ आलं की आनंदाश्रम होतं. तिथला डोसा उर्फ दोसाई अफलातून होता.किल्ल्यासमोर रस्त्यावर्च्या गाड्यांवर चटणी सँडवीच प्रचंड भारी!!! आता मिळतं का कल्पना नाही. पूर्वी हाटेलातली जेवणं पण मस्त होती, अजूनही बर्यापैकी घरगुती चव टिकून आहे. अर्थात मागच्या ३ वर्षातले बदल माहीत नाहीत. पार्क मैदानाजवळ दूध पंढरीचे पेढे आणि फ्लेवर्ड दूध जरूर प्या.बाजारपेठेत दाणे खात खात भटका. लक्ष्मी मंडईत जा. माणिक चौक, सहकार पेठपर्यंत पायी फिरा.
पूर्वी मी लकी (बंद झालं),गदग ग्रँड (मजा गेली आता), मुक्ताई मिठाई इ. ठीकाणी मनमुराद खाल्ले आहे. तेंव्हा सकाळी सकाळी गरम गरम ईडली, द्वाशी आणि वडा सांबार देणारी एक गाडी लागायची. तूफान मजा यायची सकाळी सकाळी ते खाताना.
मस्त शहर आहे आणि मस्त लोकं आहेत.