http://ekpravas.blogspot.com/2011/11/sindhkhed-raja.html
Sindhkhed Raja
Unknown
Marthwada-Vidharbha Circuit- 8 days, 1750 Kms
Pune-Ahmednagar-Parbhani-Navagarh-Jintur (480 Kms)
Jintur-Lonar-Mehekar-Karanja (216 Kms)
Karnja-Amravati-Chikhaldara (153 Kms)
Chikhaldara-Semadoh-Chikhaldara (50Kms)
Chikhaldara-Partwada-Muktagiri (44Kms)
Muktagiri-Achalpur-Akot-Shegaon (120 Kms)
Shegaon-Mehekar-SindkhedRaja-Jalna-Aurangabad- (265 Kms)
Aurangabad-Nagar-Pune (236 Kms)
Type: Lakhujirao Jadhav Palace-Land Fort, Samdhi and other buildings
Base town: SindhKhed Raja
Where: Near Jalna
Route taken: Shegaon-Balapur-Jalna
Time to see around: 1 Hour
Time visited: October 2011
My Meter reading from Pune: ? Kms
Raje Lakhujirao Jadhav Wada

Lakhujirao Jadhav
Wada
Sindkhed Raja is famous for the birth place of Jijabai (Shivaji Maharaj's
mother).

One has to pay 2Rs to get a ticket to visit the Wada. There is a beautiful entrance door. Inside there are many
artifacts , statues, carvings stored by Archaeology Department.

The Durbar room is being recreated.
Some structure where other occupants used to stay and underground
storage rooms can be seen.


The Kala Kot or the
Kala Killa (Black Fort)
Close by the palace is Kala kot fort built by the Jadhav but was probably left halfway through.
Only the bastions and outer walls are present, nothing inside.
Rang Mahal

Close by the palace is Building of Rang Mahal. This where Shahaji Raje first time saw Jijabai playing Holi before their
marriage. This remains closed and hence was not able to see this structure from
inside.
Samadhi of Raja Lakhuji Jadhav
Raja Lakhuji Jadhav was killed by treason by the Nizam at Devgiri fort in
Aurangabad with 2 of his sons. There is a samadhi built in his memory in
Sindkhed Raja. which is worth visiting
The entrance Door to Samadi.
The inscriptions on the door.

A temple in the surroundings. This is historic temple where Jijabai used to come often.

After visiting Sindhkhed Raja we proceeded to our next destination- Aurangabad.
Anand Sagar- Shegaon
Unknown
Marthwada-Vidharbha Circuit- 8 days, 1750 Kms
Pune-Ahmednagar-Parbhani-Navagarh-Jintur (480 Kms)
Jintur-Lonar-Mehekar-Karanja (216 Kms)
Karnja-Amravati-Chikhaldara (153 Kms)
Chikhaldara-Partwada-Muktagiri (44Kms)
Chikhaldara-Semadoh-Chikhaldara (50Kms)
Muktagiri-Achalpur-Akot-Shegaon (120 Kms)
Shegaon-Mehekar-SindkhedRaja-Jalna-Aurangabad- (265 Kms)
Aurangabad-Nagar-Pune (236 Kms)
Type: Historical Temple and Garden
Base town: Shegaon
Where:
Route taken: Muktagiri-Achalpur-Akot-Shegaon
Time visited: October 2011
My Meter reading from Pune: 1034 KmsAfter visiting Narlana fort we reached Shegaon in the
afternoon. We booked a hotel and I think we made a mistake. After going to
Anand Park we realized what awesome facilities they had. The boarding
facilities they offered were extremely impressive and very cheap.
Around 4 PM we went to visit Anand Sagar. It’s around 2 Kms
away from the city. There a huge parking on the opposite, extremely well
managed by the staff.
Built by the Gajanan Maharaj Sansthan, Anand Sagar is a
garden project spread over 325 acres of land in Shegaon. Thousands of
trees have been planted to make it lush green and the place is operated
with minimum amount of charges.
They have huge well managed parking facilities right in front
of the park. The donation pass/ticket is available for just Rs25/. The
grand entrance welcomes you very warmly.


All the inside pathways are huge cement roads dotted with
lamps and beautiful trees. AT the far end is the Ganesh temple.

The gardens are very creative and have huge lawns for
children to play around.

It has a huge water reservoir and spread over 55 acres of
Land.

There is small walkway constructed to reach one of the
islands. On the way is beautiful antique looking bridge of English
architecture.

The island has small outlets offering variety juices, milkshakes
and scented milk at extremely cheap prices. The view from the island is
amazing.

Another artificial Island is created in the center of the
Pond. A replica of Swami Vivekanand Center at KanyaKumari is created on the
Island. There is meditation center at the top and grand balcony on the top.


It simply looks stunning at the time when sun sets on the
left and lights are lit all over.

As sun starte to descends, the lights start litting all over
the place.It looks stunning and seems as if beautiful sparkling jewels
sprinkled all over...

Don’t miss the musical fountain show at 7pm.

This amazing place shouldn’t be really missed.
After a good night
sleep we went early for the breakfast again at Bohjnalaya near AnandPark. Had
yummy Idlis, Poha and Khichadi and wonderful Avala and Kokan shorbet. With
heavy stomach and heart we left for next destination- Balapur Fort.
https://kunalstrek.blogspot.com/2021/12/bhokardhans-tukai-caves-chakrdhar-swami.html
भाग १
भोकरदन तुकाई लेणी व चक्रधर स्वामी मंदिर, चांडोळ मधील मंदिर, साकेगावच शिव मंदिर
सध्या बिनकामाचा असल्यामुळे कुठे तरी आठवडाभर जाऊन
येण्याचा विचार आला. म्हणून मग सागर सोबत बोललो आणि त्यांनी बुलढाणा, जालना
जिल्ह्यातील प्राचीन मंदिर, मूर्ती, गडी आणि बारवची योजना केली. सगळी
त्याचीच योजना मी फक्त जायचा काम केलं. दिवाळीनंतर १७ ते २१ नोव्हेंबर
तारीख ठरवली.
त्याप्रमाणे
येण्याजाण्याची ट्रेनची तिकीट काढली. पण एसटीचा संप मिटला नव्हता मग काय
करायचं. म्हणून मग सागरने औरंगाबाद मध्ये भाड्याने दुचाकी भेटतात त्याचा
नंबर काढला, आणि आम्ही ५ दिवसासाठी औरंगाबाद ते औरंगाबाद असे २००० रुपये देऊन दिवसाला 120 कि.मीचा
हिशोबाने दुचाकी (बाईक) घेतली. पण पहिल्याच दिवशी
दुचाकीच्या बॅटरीला आलेल्या खराबी मुळे त्याचं धंद्याच नाव खराब होऊ नये
म्हणून त्यांनी आमच्या सांगण्या नुसार जालनाल्या येऊन त्याची दुचाकी
घेतली.
आम्ही जाते वेळी
औरंगाबाद आणि येते वेळी जालना वरुन तिकीट काढली होती. आमचा प्रवास मध्ये
पहिल्या दिवशी भोकरदन मधील तुलाई लेणी, श्रीचक्रधर स्वामी मंदिर, चांडोळ मधील नृसिंह आणि खोल महादेव, तसेच साकेगाव येथील शिवमंदिर.
दुसर्या दिवशी चिखली
जवळील सतगाव-भुसरी येथील शिव मंदिर, तेथून धोत्रानंदाई येथील ३
प्राचीन मंदिर आणि बारव, आणि बीबी येथील गडी पाहून लोणार येथे मुक्काम.
तिसर्या दिवशी मेहकर येथील बालाजी, नृसिंह स्वामी मंदिर, नृसिंह मूर्ती
भेटली ती गुहा आणि इतर दोन प्राचीन मुर्ती. पुन्हा लोणारला येऊन परडा येथील
मल्लिकार्जुन शिव मंदिर आणि उसवद येथील व्यंकेश्वर महादेव मंदिर करुन
पुन्हा लोणार मुक्कामी.
चौथ्या दिवशी लोणार सरोवर
आणि तेथील मंदिर, बारव पाहून सिंदखेडराजा मुक्कामी.
पाचव्या दिवशी
देऊळगावराजा येथील बारव, गडी आणि सिंदखेडराजा येथील अवशेष पाहून दुपारी
जालना साठी रवाना होऊन. जालना मधील दोन दरवाजे, मस्तगड, आणि एका मंदिरातील
प्राचीन मुर्ती पाहून संध्याकाळी मुंबई साठी ट्रेन पकडली. अशी योजना सागर
ने आखली होती.
१६
नोव्हेंबरला आम्ही रात्री ९.३० ची मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस
पकडली, सकाळी ४.१५ ला आम्ही औरंगाबादला पोहचलो. आम्हाला साडे पाच वाजता सिडको चौकातुन
बाइक घ्यायची होती. मग तोवर आम्ही स्थानकात थांबून चहा-नाश्ता करुन, सिडकोला शेअर रिक्षाने ६० रुपयात पोहचलो. बाइक वाल्याचे पेपर
वाचून आणि सही करून पेट्रोल भरून आम्ही ६.३० वाजता भोकरदन साठी प्रवास सुरू
केला.
पहिला दिवस
भोकरदन लेणी आणि चक्रधर स्वामी मंदिर
आम्ही
औरंगाबाद वरुन सिलोड मार्गे भोकरदनला पोहचलो. साधारणपणे ८० कि.मी चा
मार्ग आम्ही अडीच तासात थोडे थांबत चहा नाश्ता करत पोहचलो. भोकरदनच्या
मुख्य रस्त्यापासून तुकाई लेणी/ गुहा २ कि.मी आत गावात आहे. लेणी नदीच्या
शेजारी आहे आणि थोडी गावाचा बाहेरच आहे. लेणी मंदिराच्या पाठी मागेच आहे.
आम्ही पहिला लेणी पहायला गेलो.
भोकरदन / तुकाई लेणी
यावेळी पाऊस जास्त
दिवस होता, त्यामुळे गुहेतील पाणी पुर्णपणे उतरले नव्हते. आम्ही पायर्या
उतरून खाली गेलो. आमच्या पायाचे तळवे पूर्ण बुडलेले होते, त्यात शेवाळ ही
झाले होते. त्यामुळे जपून पाय ठेवत आम्ही आत गेलो.
लेण्यांमध्ये मुख्य ७कक्षा आहेत. कक्षेच्या आत काही शिल्प दिसत नव्हती पण त्याचा बाहेरील
आजूबाजूच्या कातळावर सुंदर शिल्प कोरलेले आहेत. प्रत्येक कक्षेच्या दारावर
द्वारपाल सारखे, भंग झालेले शिल्प दिसतात.
पण बहुतेक शिल्पांची झिज झाली आहेत, तर काही तुटली आहेत. त्यामुळे बरेच शिल्प ओळखता
येत नाहीत. पण एक मोठा शेषशाहीचा विष्णूचा भंगलेला शिल्प ओळखता येते.पण
त्या समोरील भिंतीवरील तीन मोठे कातळ शिल्प आम्हाला नीट ओळखता नाही आले. लेणी/
गुहेची आणि मंदिराच्या फोटो शेवटी ठेवले आहे.
चक्रधर स्वामी मंदिर
लेणी बघून आम्ही चक्रधर स्वामी मंदिर
बघायला गेलो. मंदिराचा अर्धा/पायथाचा भाग प्राचीन दिसतो, त्याचावर नवीन
बांधकाम
केलेले दिसते. मंदिराच्या आतील गाभाऱ्याचे खांब प्राचीन आहेत त्यावर
रामायणाचे, भीमाच, महिषारसुर्मार्दिनीचे आणि काही युद्धाची शिल्प आहेत.
मंदिराच्या मुख्य मूर्ती जागी चक्रधर स्वामी पंतांच्या लोकांची शीला रुपी
मूर्ती आहेत. नेहमी सारखे मंदिर बाहेर
खांबाचे आणि इतर मंदिराचे अवशेष दिसले. मंदिर बघून आम्ही चांडोळ साठी
निघालो.
भाग दुसरा , दिवस दुसरा
सतगाव- भुसरी मधील प्राचीन विष्णू-शिव मंदिर, धोत्रानंदाई मधील मंदिर आणि बारव, बीबीची गडी
सतगाव- भुसरी मधील प्राचीन विष्णू-शिव मंदिर,
आम्ही
सकाळी ७.३० वाजता नाश्ता करुन सतगाव- भुसरी मधील प्राचीन विष्णू-शिव मंदिर
पहायला गेलो. चिखली पासून फक्त १० कि.मी वर असल्यामुळे आम्ही १५ मिनटात
पोहचलो. चिखलीवरुन बुलढाणा महामार्गावरील हातनी गावातून आत २ कि.मी वर
सतगाव-भुसरी गाव आहे. मंदिर रस्त्यावरुन डाव्या बाजूला थोडं खाली दिसते.
त्यामुळे बाइक वर रस्त्यालाच
लाऊन मंदिरात गेलो.
मंदिर
१२\१३व्या शतकातील असावीत. मुख्य मंदिर विष्णुचा आहे, त्याचा बाजूलाच/पाठी
शिवाच मंदिर आहे. त्या व्यतिरिक्त अजुन एक लहान मंदिर आहे. पण आम्ही पूर्ण
मंदिर परिसर फिरून पहिला, आम्हाला त्या बागे मध्ये अजून तीन चौथर्याचे
अवशेष दिसले. आणि त्या मंदिर परिसराच्या कुंपणाच्या बाहेर एक गणपतीच लहान
मंदिर, हे मंदिर नवीन वाटते पण त्याची दरवाजाची लहान चौकट प्राचीन दिसते.
असे मिळून एकूण सात मंदिर त्यावेळी असावेत.
मुख्य
मंदिरातील मूर्ती विष्णूची होती हे त्याचा वाहन गरुड वरुन कळते. मुख्य
मूर्तीचे फक्त पायाचे तळवे बाकी आहेत बाकी पूर्ण मुर्ती खंड होऊन नाहीशी
झाली
आहे. मंदिराचा आतील खांबावर, कळसावर सुंदर शिल्प दिसतात. मंदिरात अजून
काही शिल्प अशीच खाली उभी करून ठेवलेली दिसतात. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर
नृत्य आणि काही काम शिल्प ही दिसतात.
विष्णु
मंदिर पाहून आम्ही त्याचा पाठी किंवा बाजूलाच असलेले शिव मंदिर पाहिले.
शिव मंदिरात शिवाची पिंड आहे. गावातील काही लोकं नित्य नेहमी पूजा करत
असावी, कारण आम्ही गेलो तेव्हा फुल आणि अगरबत्ती लावून पूजा केलेली दिसत
होती. मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीच्या ललाटीवर सप्त/अष्ट मातृका पट
दिसतो.
मंदिराच्या बाहेरील भिंती किंवा आत अजून काही
शिल्प दिसत नाही. एके ठिकाणी मंदिराच्या चौथरा (जागृती) ला एक शिल्पाचा पट
लावलेला दिसतो.
शिव
मंदिर बघून आम्ही विष्णु मंदिरच्या बाजूला असलेले लहान मंदिर पाहिले. ह्या
मंदिरात काही शिल्प गोळा करून ठेवली होती. ह्या मंदिराचे पुढील खांब आणि
दरवाजाची चौकट असा पुढील भाग व्यवस्थित होता. पण बाकी मंदिराचा भाग आणि
छप्पर नव्याने दगड रचून आणि (छप्पर) सीमेंट ने केलेला दिसतो.
मंदिराच्या
आवारात एक घोडेस्वार वध करताना मुर्ती आहे. तसेच अजून दोन खंड पावलेल्या
मुर्ती दिसतात पण फक्त पायाचा भाग असल्यामुळे नीट ओळखता येत नाही. बाकी
मंदिर परिसरात मंदिराच्या कळसाचे, खांबाचे असे बरेच अवशेष दिसतात.
तसेच वर सांगितल्याप्रमाणे, मंदिराच्या कुंपणाच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर डावीकडे गणपतीचा छोट मंदिर आहे.
धोत्रानंदाई मधील तीन मंदिर आणि बारव
मंदिर
बघून आम्ही पुन्हा चिखलीला आमच्या लॉज मधून सामान घेऊन धोत्रानंदाई साठी
निघालो. चिखली ते धोत्रानंदाई अंतर ३४ कि.मी आहे. महामार्गावरून गाव आत दीड
ते दोन कि.मी आत आहे.
इथे आम्हाला तीन प्राचीन शिव मंदिर आणि एक बाराव पहायची होती.
गावात
पोहोचल्यावर मारुती मंदिरा कडून एक रस्ता सरळ जातो आणि एक उजवीकडे. मारुती
मंदिराच्या थोडं पुढे/बाजूस सरळ रस्त्याला प्राचीन शिव मंदिर आहे. (आम्ही
हे मंदिर शेवटी पाहिलं म्हणून मी ह्याला तिसरे मंदीर म्हणालो आहे.). आम्ही
उजवीकडच्या रस्त्याला वळलो आणि पहिला तिकडचा शिव मंदिर बघून घेतलं.
उजवीकडे वळल्यावर लगेच २ मिनटात आम्ही मंदिराजवळ पोहचलो.
मंदिर
परिसराला कुंपण केला आहे. मंदिराच्या आत आणि बाहेरील भिंतीवर कुठेही शिल्प
दिसत नाही. मंदिराचा गर्भ गाभाऱ्याला फक्त छप्पर आहे. ते ही सीमेंट चे
केलेले आहे. बाकी मंदिराचे फक्त खांबच दिसतात.
मंदिराच्या
उजव्या बाजूला एक मोठा सुकलेल कुंड सारखी जागा दिसते. त्याकाळी बहुतेक
पाणी साठवत असावे किंवा काही वेगळा असावे. तेथेच एक दगडाच राजन ही आहे.
मंदिर बघून आम्ही तिसरा मंदिर आणि बारव
आधी बघायाला गेलो. तिसरं मंदिर जरा गावाच्या बाहेरच आहे. अंदाजे अर्धा
किलोमीटर. बाइकमुळे आम्ही लगेच पोहचलो. मंदिर शेत जमिनीत आहे पण रस्त्याचा
बाजूलाच आहे.त्यामुळे लगेच दिसते. मंदिराच्या सुरक्षेसाठी कुंपण केला आहे.
मंदिरात शिवाची पिंड आहे. मंदिराच्या आत बाहेर शिल्प दिसत नाही. पण
मंदिरावरील नक्षी सुंदर आहेत.
बारव: मंदिराच्या
थोडं पुढे रस्त्याने २ ते ४ मिनिटे चालत गेल्यावर डावीकडे बारव आहे. ही
बारव नर्सरी बाजूला आहे. बारवच्या बाजूला काही बांधकाम केलेलं आहे. बारव
मध्ये थोडं पाणी होतं पण अस्वच्छ होतं.
बारव मोडकळीस
आलेली आहे. बारवच्या एका बाजूच्या पायर्यांवर काही तांदळा स्वरूपातील
शेंदूर लावलेले देव आहेत. बहुतेक गावातील लोक त्याला देवी मानतात.
बारव बघून आम्ही तिसरा मंदिर बघायाला पुन्हा गावात
गेलो.
तिसर मंदिर:
हि सुंदर आहे, ह्या मंदिराच्या बाहेरील भिंतीवर शिल्प नाहीत. तसेच मंदिरात
आत हि कुठे शिल्प दिसत नाही. पण विशेष करुन मंदिराच्या गर्भ गृहाच्या
दरवाजाच्या चौकटीच्या ललाटवर (माथ्यावर) नऊ चेहरे आहेत. ते पाहून खुप नवल
वाटल, त्याचा अर्थ नक्की काय कळलं नाही. मंदिर परिसरात काही अवशेष दिसतात.
एके ठिकाणी बहुतेक तुटलेल्या खांबाचा
अवशेष आहे, त्यावर कुबेर आणि स्त्रियांचे शिल्प आहे.
मंदिराच्या
बाजुला मारुतीच्या मंदिराच्या बाहेर खाली ७ मुर्ती ठेवलेल्या आहेत.
बर्यापैकी मूर्तीं खंडित आणि झिज झाली आहे. निट जपवणूक नाही केल्या तर
कदाचित काही वर्षात नष्ट होतील किंवा पूर्णपणे झिज होऊन ओळखता हि येणार
नाही. कारण आताच मुर्ती ओळखता येत नाही आहेत. त्यात काली माता, उमामहेश,
कालभैरव मुर्ती खंड होऊन सुद्धा ओळखता येतात. पण बाकी मुर्ती ओळखता येत
नाही.
बीबीची गडी
मंदिर पाहून आम्ही बीबी ची गडी पाहण्यासाठी निघालो. धोत्रानंदाई ते बीबी अंतर ३० कि.मी आहे. साधारण आम्हाला १ तास लागला.
आम्ही दुपारी पोहचलो.
बाइक
असल्यामुळे आम्ही गल्लीतून थेट गडीच्या दरवाजा जवळ पोहचलो. आम्ही ज्या
गल्लीतून रस्त्याने आलो त्या बाजूनेच फक्त २ बुरुज आणि गडीची तटबंदी मजबूत
दिसली. ह्या तटबंदी आणि बुरुजाच्या बाजूला थोडं मध्य भागी घराची वास्तू
आहे. इतर बाजूने तटबंदी दिसत नाही. गडीचा दरवाजा वैगेरे काही दिसत नाही.
पायर्या हि तुटलेल्या आहेत. पण पायर्याने चढते वेळी नीट पाहिले असता, एके
ठिकाणी दरवाजाच्या चौकटीचा /सारखा पायथ्याच्या भाग दिसतो. त्यावरून अंदाज
लावता येतो.
पायर्या चढून वर गेलो असता, समोर
आपल्याला घर दिसतो. घराचा चौथरा दगडाचा आणि त्यावर जुन्या बारीक विटांच काम
आहे. त्या घरात एक व्यक्ति राहतात. त्यांना विचारले असता ते बाजूच्या खोली
मधील भुयार दाखवतात. हा भुयार सिंदखेडराजाला निघतो असा आम्हाला गावाची
मुले सांगत होती. पण त्या घरातील व्यक्तीं ने सांगितले, खाली फक्त खोली
आहे.
त्यांचा घराची खोली
सोडली असता बाकी डावीकडच्या दोन्ही खोल्या बिना छत असल्यामुळे आत मध्ये गवत
झाले होते. त्या दोन खोली मध्ये एक दरवाजा आहे, त्या दरवाजा जवळ भुयार
आहे. पण आम्ही गेलो होतो तेव्हा गवत खूप होतं आणि त्यांनी भुयार साफ केला
नव्हते. त्यामुळे त्यांनी आम्हाला दाखवले नाही त्यात त्यांची तब्येत पण
खराब असल्यामुळे खाटे वर पडूनच बोलत होते.
मग
आम्ही त्या घराच्या आजूबाजूस फिरलो. बाकी काही अवशेष दिसले नाही. गडीच्या
आजूबाजूला दाट वस्ती झाली आहे. त्यामुळे अजून काही अवशेष असतील तर कदाचित
नष्ट झाले असावेत. पण ती गडी तेवढीच लहान असावी. कारण मघाशी
सांगितल्याप्रमाणे फक्त एका बाजूचे बुरुज आणि तटबंदी व्यवस्थित दिसत होती,
इतर बाजूचे फक्त ढासळलेली तटबंदी दिसत होती. जी तटबंदी आणि बुरुज व्यवस्थित
होती, त्याचा वरती बहुतेक वीट किंवा चिखलाची भिंत असावी. ती नष्ट होऊन
पूर्ण माती चा ढीग झाला होता. त्यात गवतामुळे निट दिसत नव्हती.
बाकी
गावात गडी व्यतिरिक्त काही विशेष नाही वाटले. मुलानी आम्हाला गावातील
मस्जिद बघायाला सांगितले. पण आम्ही त्यांना विचारलं अशीच जुनी आहे का?.
फक्त जुनी आहे बोलले, म्हणून आम्ही तिथे न जाता लोणारला
मुक्कामी गेलो.
तासाभरात आम्ही लोणारला पोहचलो.
लोणारला
आम्हाला लॉज शोधायला बराच वेळ गेला. एवढ प्रसिद्ध ठिकाण आहे, पण मोजून ५\६
हॉटेल असतील. त्यात एक विक्रांत हॉटेल ४\५ स्टार होतं. बाकी म्हणजे २
स्टार पण नव्हते.
आमचे दोन तास तर त्यातच गेले. मग शेवटी श्रीकृष्णा लॉज मध्ये दिवसाला ५०० रुपये भाड्याने रूम घेतली.
हॉटेल तसं ठीक ठाक होत. त्यात ८०० रुपये वाली खोली चांगल्या होत्या. पण आम्ही जरा स्वस्त वालीच घेतली.
आम्ही
लोणारला दोन दिवस मुक्काम केला. पहिल्या दिवशी मेहकर, परड आणि उस्वाद केला
आणि दुसर्या दिवशी लोणार पाहून संध्याकाळी सिंदखेडराजा मुक्कामी गेलो.
ह्या बद्दल मी तिसर्या दिवशीच्या, तिसऱ्या भागात लिहले आहे.
 |
| सतगाव भुसरी येथील शिव आणि विष्णू मंदिर समूह येथील विष्णू मंदिर |
 |
| सतगाव भुसरी येथील शिव आणि विष्णू मंदिर समूह |
 |
| सतगाव भुसरी येथील शिव आणि विष्णू मंदिर समूह येथील समूहाच्या बाहेर असलेलं गणपतीचे मंदिर |
 |
| सतगाव भुसरी येथील शिव आणि विष्णू मंदिर समूह |
 |
| सतगाव भुसरी येथील शिव आणि विष्णू मंदिर समूह येथील शिवाचे मंदिर (विष्णू ,मंदिराच्या बाजूला अथवा पाठीच लागून आहे.) |
 |
| धोत्रे नंदाई येथील मारुतीच्या मंदिरा बाजूला असलेले शिव मंदिर |
 |
शिव मंदिर
|
 |
| धोत्रे नंदाई येथील गावाच्या थोडे बाहेर शेतात असलेलं मंदिर, ह्याचा पुढे २/ ४ मिनटं चालत गेल्यावर बारव आहे. |
 |
| धोत्रे नंदाई येथील गावाच्या थोडे बाहेर शेतात असलेलं मंदिर |
 |
| धोत्रे नंदाई येथील बारव |
 |
| धोत्रे नंदाई येथे मारुतीच्या मंदिराच्या बाहेर पायऱ्यांचा बाजूला ह्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. |
 |
| धोत्रे नंदाई येथील शिवाचे अजून एक मंदिर, आम्ही पहिले हे मंदिर पाहिले. |
 |
| बीबीची गडी |
 |
| बीबीची गडी |
 |
| बीबीची गडीच्या पायऱ्या |
 |
| बीबीची गडी ची बाहेरून दिसणारा बुरुज आणि तटबंदी. |
 |
| बीबीची गडीच्या बाजूला फिरले असता, अशी जुनी वास्तू दिसतात. |
 |
| बीबीची गडी |
 |
| बीबीची गडी बुरुज |
चांडोळचा नृसिंह मंदिर आणि खोल महादेव
भोकरदन ते
चांडोल, म्हसळा मार्गे ३५ कि.मी आहे. आम्ही एका तासात पोहचलो. आमची दुचाकी
खराब झाल्यामुळे आमचा १ तास भोकरदनलाच वाया गेला. त्यामुळे चांडोलला
पोहोचायला आम्हाला दुपार झाली.
चांडोलला
नृसिंह मंदिर आणि खोल महादेव हि दोन मुख्य प्राचीन मंदिर आजूबाजूलाच
आहेत.त्यामुळे गावाने त्या पूर्ण परिसराला भिंतीचा कुंपण केला आहे.
त्याव्यतिरिक्त अजून एक छोट महादेवाचे मंदिर हि गावात आहे. आम्ही गावात विचारत विचारत नृसिंह मंदिर/खोल महादेव मंदिराजवळ पोहचलो.
नृसिंह मंदिर
नृसिंह
मंदिर गाभाऱ्यात कोरीव आणि रेखीव शिल्प बघायला मिळत नाही. पण मंदिर
परिसरात आढळणाऱ्या खांबाच्या अवशेष वरून, कदाचित नृसिंह किंवा खोल
मंदिराच्या खांबाचे ते अवशेष असावे असे वाटते. नृसिंह मंदिरात प्रवेश
केल्यावर, आपल्याला समोर मुख्य गर्भगृहात नृसिंहची सध्याचा काळातील मूर्ती
दिसते. मध्य गाभाऱ्यात उभे राहिले असता उजवीकडे आणि डावीकडे पण गर्भगृह
आहेत. त्यात डावीकडील गर्भगृहात शिवाची पिंड होती तर उजवीकडील रिकामी होते.
मंदिराच्या मुख्य दाराच्या उजव्याबाजुला एका दगडावर विशेष करुन ९ आडव्या
आणि ५ उभ्या ओळीत वेग वेगळ देवाच्या मूर्त्या दिसतात, त्यातील पाचवी ओळ
मध्ये खाली १३ शिवाची पिंड दिसतात. पण गावकऱ्याने त्याला रंग मारल्यामुळे
त्यातील काही देवता ओळखता येत नव्हत्या. (त्याचे फोटो चांडोळ च्या फोटो मध्ये दिला
आहे.) आणि दरवाज्याचा डाव्याबाजूला एक देवाचं शिल्प दिसते, झीज झाल्यामुळे
स्पष्ट दिसत नव्हते.
बहुतेक शिवाचे असावे.
नृसिंह मंदिराला चिटकूनच बाजूला उजवीकडे विठ्ठल रखूमाईचा नवीन बांधलेले
मंदिर आहे. त्यात प्राचीन मुर्ती किंवा काही अवशेष आम्हाला दिसले नाही.
नृसिंह मंदिराचा समोर बाहेर झाडाखाली १ चांगली तर २ भंग अवस्थेत जैन
मूर्ती आहे. तसेच काही खांबचे अवशेष हि आहेत.
खोल महादेव मंदिर
तिथून
आम्ही बाजूचा खोल महादेव मंदिर बघायाला गेलो. खोल महादेव मंदिर लहान
आहे. मंदिरातील शिवाची पिंडाचे दर्शन घेण्यासाठी, आत खाली काही पायर्या
उतरून जायला लागते. बहुतेक म्हणुनच वाटत खोल महादेव मंदिर
बोलतात.मंदिराच्या वरील अर्ध काम विटांचे सध्याचा काळातील केलेले दिसते.
मंदिराच्या समोर प्राचीन भंग झालेला नंदी आणि समोरील परिसरात एका मंदिराचा
अवशेषावर २ कामशिल्प (हे दोन शिल्प बहुतेक मंदिराचा बाहेरील असलेल्या
अर्ध्या भिंतीवरील भाग वाटतो) आणि काही मंदिराचे अवशेष दिसतात. आम्हाला
तेथील तरुण गावकऱ्याने
सांगितले अजून एक असंच प्राचीन मंदिर गावातच आहे. म्हणून आम्ही ते बघायला
गेलो.
अजून एक प्राचीन शिव मंदिर (गडीच महादेव मंदिर)
बाईकमुळे
आम्ही गल्लीतून विचारत तेथे दोन मिनटात पोहचलो. तरी पण हे
मंदिर एका घराच्या पाठी होते, त्यामुळे आम्हाला एका गावकऱ्याने सोबत येऊन
दाखवले. मंदिर शिवाचं
होत. मंदिर पाषाण बांधणीतील दिसत होते. कळसाच काम नव्याने विटाने
बांधलेले आहे. मंदिराचा गर्भगृहाच्या दरवाजाची चौकट नेहमीच्या प्राचीन
मंदिरा सारखे सुरेख होती. मंदिराच्या बाहेर भंगलेली गणेश मूर्ती आणि नंदी,
आणि एक झीज झालेली मूर्ती होती. मंदिराच्या मुख्य बांधकाम व्यतिरिक
मंदिराच्या भोवती चिखली भिंतीचे मंडपाचे काम असावे, असे तिथे पाहता क्षणी
वाटते.
बाकी मंदिराच्या समोर मोकळ्या जागेत, एक छोट पत्र्याचा छपराचे मंदिर आहे.
त्यात एक रंग मारलेली वीरगळ आणि काही अन्य देव दिसतात. रंग मारल्यामुळे
वीरगळ प्राचीन आहे का नवीन कळत नव्हते. बाकी अजून काही अवशेष
दिसत नाही. मंदिर पाहून येताना गल्ली मध्ये त्याकाळातील दगडी घर दिसतात तर
काहींचे अवशेष दिसतात. तर काही आता त्यावर सुधारून नवीन बांधताना दिसतात.
अजून काही वर्षात बहुतेक नष्ट होतील.
साकेगावच शिव मंदिर
चांडोळ
गावातील मंदिर बघून आम्ही चिखली साठी निघालो. चिखलीला जाताना वाटेत
आम्हाला साकेगाव मधील प्राचीन शिव मंदिर बघायचा होता. साकेगाव पासून चिखली
पुढे चार किमी आहे. त्यासाठी आम्ही चांडोळ वरून रुईखेड मार्गे चिखलीला
गेलो, साधारण ३१ किमी अंतर होते. तसेच चांडोळ ते रुईखेड रस्ता बऱ्यापैकी
कच्चा होता, पण आम्हाला गावातले म्हणाले हा रस्त्याने लवकर पोहचाल. म्हणून
आम्ही तिथून गेलो. अंदाजे साडे तीन वाजता, आम्ही चांडोळ वरुन निघालो.
साकेगाव मंदिरापर्यंत पोहचेपर्यंत आम्हाला साडे चार वाजले.
मंदिर
परिसरात गेलो ना गेलो तिथे देखभाल करणाऱ्या ताई घरी जाता जाता, आमच्या बॅग
बघून बोलल्या मोठ्या कॅमेर्या (dslr) ने फोटो काढू नका मोबाईलने काढा.
त्या ताई मंदिराच्या परिसरातून बाहेर जाताना, दृष्टी आड होई पर्यंत आम्ही
कॅमेरा काढतो का बघत होत्या. त्या काय परत आल्या नाही, पण मग आम्ही पण उगाच
बघितल तर चार शब्द ऐकायला नको म्हणून कॅमेरा काढला नाही. आधीच ऐकूनच हिरमोड
झाला होता. मग काय नुसता बॅग ठेवुन मंदिर बघत होतो.
मंदिर
सुस्थितीत दिसत होता. आत मध्ये काळोख होता. बहुतेक आत मध्ये वीज नव्हती.
मंदिर शिवाच आहे. गर्भ गाभाऱ्यात शिवलिंग होते, तिथे लावलेल्या दिव्या मुळे
थोडा काही प्रकाश होता.
मंदिराच्या गाभाऱ्यात एक
मूर्ती होती पण थोडी झीज झालेली दिसत होती. इतर मंदिरात काळोख असल्यामुळे
जास्त शिल्प दिसत नव्हती बहुतेक नव्हतीच. गाभाऱ्याच असलेल्या खांबाच्या
पायथ्यावर देवाची शिल्प दिसत होती. बाकी मंदिराच्या बाहेर समोर छोटा
शिलालेख असलेली एक गध्देगळ आहे. तिथेच एक सिंह ही ठेवला आहे.
मंदिराच्या
डाव्या बाजुला एक छोट दगडाच साध मंदिर आहे. मंदिर रिकामी होते.
मुख्य
मंदिराचा बाहेरील भिंती वर तसेच कळसावर उत्तम कलाकृती दिसतात. आपल्याला
नृत्य शंकर, महिषासुरमर्दिनी आणि कळसावरील भागा जवळ सुंदर शिल्प दिसतात.
जातेवेळी शेवटी एका कोपर्यातून पूर्ण मंदिराचा एक dslr ने फोटो काढला.
आणि मग आम्ही चिखली साठी मुक्कामाला निघालो.
मुक्काम
चिखली मध्ये ७०० रुपये मध्ये
एक चांगला लॉज (शारदा गेस्ट हाऊस) भेटला. तसे इथे खूपच कमी लॉज आहेत. तरी
त्यामानाने हा लॉज चांगला होता.
चिखली वरुन आमचा
दुसर्या दिवशी सकाळी सतगाव-भुसरी येथील प्राचीन शिव मंदिर आणि बारव. नंतर
तेथून धोत्रानंदाई येथील ३ प्राचीन मंदिर आणि बारव पाहून, बीबी येथील गडी
पाहून लोणार येथे मुक्काम होता.
त्याबद्दल मी सविस्तर दुसर्या भागात लिहलं आहे
भोकरदन /तुकाई लेणीचे फोटो, भोकरदन
 |
| चक्रधर स्वामी मंदिर, भोकरदन |
 |
नृसिंह मंदिर, चांडोळ
|
 |
खोल महादेव मंदिर, चांडोळ
|
 |
| चांडोळ
गावात अजून एक महादेवाचा मंदिर ह्याला (गडीच महादेव मंदिर बोलतात) आहे आणि
त्याचा समोर एक पत्र्याचं छोटं मंदिर आहे. त्यात एक विरगळ दिसते, पण तीला
रंग मारल्यामुळे ती प्राचीन आहे का नवीन कळत नव्हतं |
|
|
|
|
|
 |
| गावात अशी काही जुनी घर दिसतात. |
 |
| सकवार गावातील शिवमंदिर, उजवीकडे कोपऱ्यात लेख असलेली गद्धेगळ | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | |
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.