Leh Ladakh with veena world
Leh ladakh trip with veena world

Leh ladakh trip

Please Subscribe for Super easy & Healthy Recipes

Leh ladakh trip- मती गुंग करून टाकणारं निसर्गाचं आक्रमक रूप फक्त आणि फक्त लेह लदाख मधेच बघायला मिळतं. हे अनुभवलं की माणूस निसर्गापुढे किती क्षुद्र आहे हे कळत! इथल्या निसर्गामध्ये अप्रतिम सौंदर्य आहेच पण एक थरारही आहे जो तुम्ही प्रत्यक्ष अनुभवायलाच हवा.शुभ्र म्हणजे इथला पांढरा शुभ्र बर्फ अशा अर्थाने घ्यायला पाहिजे. शुभ्र काही जीवघेणे ! माझी लेह लदाख ट्रिपची गोष्ट!

शुभ्र काही जीवघेणे हे वाक्य मी कुठेतरी वाचलं होतं आणि ह्याचा खरा खरा अनुभव मला माझ्या लेह लडाख च्या ट्रिपमध्ये आला. माझ्या या ट्रिपची गोष्ट सुरू झाली ती माझ्या नवऱ्याने आणि मुलीने एक दिवस मला वाढदिवसाचे सरप्राईज म्हणून माझ्या नकळत ही लेह लडाख ची ट्रिप बुक केली. ही वुमन्स स्पेशल ट्रिप होती. आणि

यांची स्पेशालिटी ट्रिप होती.

ट्रिपच्या डेट च्या आठ दिवस आधी मला माझ्या नवऱ्याने सांगितलं की तुझ्यासाठी ही ट्रिप बुक केली आहे. मी खूप खुश झाले पण आता माझी पॅकिंगची गडबड सुरू झाली. लेह-लडाख या डेस्टिनेशन विषयी कधीतरी ऐकलं होतं. पण फार विशेष माहिती नव्हती आणि या ट्रिपची डिफिकल्टी लेव्हल सुद्धा मला माहिती नव्हती. जेव्हा पॅकिंग करायची वेळ आली तेंव्हा वीणा वर्ल्ड वाल्यांनी दिलेल्या लिस्ट नुसार सगळी पॅकिंग झाली

माझ्या ट्रिपची डेट 29 मे होती आणि त्यावेळी पुण्यामध्ये प्रचंड उकाडा होता आणि अशा उकाड्यात थंडीचे कपडे घेताना मला असे वाटत होते की तिकडे एवढी थंडी नसेल पण नवऱ्याने बळजबरीने माकड टोपी वूलनचे हॅन्ड ग्लोज, वुलनचा स्कार्फ, फुल जर्किन, सॉक्स चे चार पाच पेयर, बोडी वॉर्मर हे सगळं घ्यायला लावलं आणि आईशप्पथ तिथे गेल्यावर या सगळ्या सगळ्या गोष्टींचा मला अतिशय उपयोग झाला.तिथे काय लेव्हलची थंडी आहे याची कल्पना इथे बसून आपण करूच शकत नाही

अशा ठिकाणी कापूर, चार-पाच लेअर्स चे लोकरीचे कपडे सगळ उपयोगी पडतं. तुम्हाला उघड्या डोळ्यांनी बघताच येणार नाही असा शुभ्र बर्फ आणि स्कार्फ काढला कि स्किन भाजेल एवढी थंडी असते. हाय अल्टीट्यूड सिकनेस चा त्रास होतो म्हणजेच डोके गरगरणे धाप लागणे पोट बिघडणे नाकातून रक्त येणे असे प्रकार होतात म्हणूनच आपले टूर गाईड जे जे काही सोबत घ्यायला सांगतात त्या लिस्ट प्रमाणे सगळ्या गोष्टी घ्यायलाच पाहिजे. हाय अल्टीट्यूड सिकनेस साठी डायमॉक्स नावाची गोळी घ्यावी असं डॉक्टर सजेस्ट करतात. माझ्यासोबत माझ्या गाडीत प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर माधुरीताई होत्या त्यांनी आम्हाला श्वासामृत नावाचं औषध दिलं त्या औषधाने आम्हाला खूप बरं वाटलं..

माझ्या मनामधे एक वेगळीच हुरहुर दाटून आली होती कारण माझी ही ट्रिपसहा दिवसांची होती म्हणजे माझ्या मुलांना सोडून सहा दिवस मला एकटीने राहायची होते. एवढे दिवस मुलांना सोडून एकटीने बाहेर जायची खूप वर्षांनी ही पहिलीच वेळ होती एक भावनांचा कल्लोळ मनात होता! ट्रिपची एक्साइटमेंट, मुलांना सोडून जायची भीती. पण माझ्या घरच्यांनी मला धीर दिला आणि 29 मे ला मी या ट्रिप साठी निघाले.

पुण्याहून मध्यरात्री दीड वाजता दिल्लीला जाण्यासाठी आमचे विमान होते. आणि तिथून लेहला आम्ही सकाळी साडेपाच सहाच्या
बेताला पोहचलो

आमचं विमान जेव्हा लेहमध्ये पोहोचत आलं त्यावेळी विमानातून दिसणारा View बघून मला अगदी स्वप्नात असल्यासारखं वाटलं तो view अवर्णनीय आहे; मी तो येथे शब्दात मांडूच शकत नाही तुम्हाला तो एक्सपिरीयन्सच करावा लागेल.
लेह लदाख हाय अल्टीट्यूड ला असल्यामुळे आपल्या बॉडी ला तिथल्या वातावरणाची सवय नसते. खूप बोचणारी थंडी आणि श्वास घ्यायला त्रास होणे असे प्रकार होतात म्हणून आणि रात्रभर विमानाचा प्रवास झालेला असल्यामुळे तिथे गेल्यावर पहिल्या दिवशी रेस्ट असते. आपल्याला काहीही करण्यासारखे नसते.


तिथे एअरपोर्टवर उतरल्यावर आम्हाला चार च्या ग्रुपमध्ये डीव्हाइड केलं आणि मग झायलो आणि इनोव्हा गाड्यांमधून आमच्या ठरलेल्या हॉटेलवर घेऊन गेले.

  • Snow covered mountains every where
    Snow covered mountains every where

Day wise Itinerary – दिवसनिहाय कार्यक्रम

पहिला दिवस -(Day One)

  • आम्ही पोहोचलो त्या दिवशी तिथलं टेंपरेचर -6°C होते. तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी संपूर्ण दिवस रेस्ट घ्यायची होती.( Leh ladakh trip)

दुसरा दिवस – (Day Two)

आज आम्ही

*शे पॅलेस

* हेमिस गोंपा मॉनेस्ट्री,

* रांचो स्कूल

बघणार आहोत आणि संध्याकाळी कल्चरल प्रोग्रॅम एन्जॉय करणार आहोत.

  • शे पॅलेस – (

लेह मधील हे पॅलेस एकेकाळी राजा महाराजांचं उन्हाळ्यामध्ये रेस्ट करायचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतं. इथे बुद्धाची एक भव्य मूर्ती पण आहे. याचा आजूबाजूचा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे.

  • Shey Palace
  • Shey Palace
    Shey Palace
  • हेमिस गोंपा मॉनेस्ट्री

हा एक प्रकारचा बुद्ध लोकांसाठी चा मठ असं आपण म्हणू शकतो. अतिशय सुंदर आणि शांत परिसर, रंगीबेरंगी पताका लावलेल्या होत्या ही लदाख मधील सगळ्यात मोठी मॉनेस्ट्री आहे. या मठाच्या आजुबाजूला सुंदर डोंगराच्या रांगा आहेत इथेच प्रत्येक वर्षी नरोपा फेस्टिवल असते फेस्टिवल बघण्यासारखं असतं अस आमच्या गाईडने सांगितलं

  • Hemis Gompa monastery
  • Hemis Gompa monastery
  • Hemis Gompa monastery
    Hemis Gompa monastery -Naropa Festival
  • रँचोज स्कूल –

या स्कूल च खरं नाव “Druk White Lotus School”असं आहे पण थ्री इडीयट्स मूवी नंतर या स्कूल ला सगळेजण रँचोज स्कूल म्हणूनच ओळखतात. इथे शूटिंग साठी तयार केलेली वॉल पण आहे आणि आपण रिअल स्कूल आणि स्टुडंट्स ही बघू शकतो. ते बघितल्यावर असं वाटलं की अशा ठिकाणी माझी शाळा जर असली असती तर मी खूप आनंदात शिकले असते. अप्रतिम आणि सुंदर परिसर आहे त्या शाळेचा. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता चारी बाजूंनी बर्फाच्छादित डोंगरांच्या रांगा आणि स्वच्छ सुंदर हवा.

  • The wall in last scene
  • All is Well

तिसरा दिवस (Day 3)

*खारदुंगला पास

*नुब्रा व्हॅली

*फ्युचर बुद्धा स्टॅच्यू

*कोल्ड डेझर्ट

  • खारदुंगला पास

तिसऱ्या दिवशी लेह हुन आम्ही नुब्रा व्हॅली साठी निघालो जाताना आम्ही खारदुंगला पास क्रॉस केला तुम्हाला लय होऊन नुब्रा व्हॅली ला जाण्यासाठी या पासवरूनच जावे लागते. खारदुंगला पास हा वन ऑफ दि वर्ल्डस हायेस्ट मोटर एबल रोड आहे. लेह समुद्रसपाटीपासून 11500 फुटांवर आहे तर खारदुंगला पास 17900 फुटांवर आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ची कमालच आहे त्यांनी हा रस्ता अतिशय चांगला मेंटेन केला आहे या अशा उंचीवर चार पावलं चालणं सोपं नाही. आम्हाला कठीण होतं ऑक्सिजन कमी असल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत होता

पण या थरारातच एक मजा असते हे जाऊन आल्यावरच कळते अविस्मरणीय अनुभव ! म्हणून अशा ठिकाणी कापूर, चार-पाच लेअर्स चे लोकरीचे कपडे, सगळ उपयोगी पडतं तुम्हाला उघड्या डोळ्यांनी बघताच येणार नाही असा शुभ्र बर्फ आणि स्कार्फ काढला कि स्किन भाजेल एवढी थंडी असते. हाय अल्टीट्यूड सिकनेस चा त्रास होतो म्हणजेच डोके गरगरणे, धाप लागणे ,पोट बिघडणे, नाकातून रक्त येणे असे प्रकार होतात म्हणूनच आपले टूर गाईड जे जे काही सोबत घ्यायला सांगतात त्या लिस्ट प्रमाणे सगळ्या गोष्टी घ्यायलाच पाहिजे. हाय अल्टीट्यूड सिकनेस साठी डायमॉक्स नावाची गोळी घ्यावी असं डॉक्टर सजेस्ट करतात. माझ्यासोबत माझ्या गाडीत प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर माधुरीताई होत्या त्यांनी आम्हाला श्वासामृत नावाचं औषध दिलं त्या औषधाने आम्हाला खूप बरं वाटलं..

खारदुंगला पास क्रॉस करून आम्ही नुब्रा व्हॅली कडे जाता जाता एक ठिकाण बघितलं जिथे भाग मिल्खा भाग या मुव्ही च शूटिंग झालेलं आहे.तिथे आजूबाजूला सगळ्या डोंगरान वरती मोठ्या अक्षरांमध्ये सियाचीन वॉरियर्स असं लिहिलेलं होतं जे बघून अभिमानाने ऊर भरून येतो व आपल्या इंडियन आर्मी चे कौतुक वाटतं

  • Khardungla Pass
    Khardungla Pass
  • Khardungla Pass
  • फ्युचर बुद्धा स्टॅच्यू

नंतर आम्ही फ्युचर बुद्धा स्टॅच्यू बघितला‌ अतिशय सुंदर रंगीबेरंगी भव्य मूर्ती दिसते.

Future Buddha Statue
Future Buddha Statue
  • नुब्रा व्हॅली

नंतर आम्ही नुब्रा व्हॅली मध्ये आमच्यासाठी बुक करून ठेवलेले टेंट मध्ये गेलो. हे बेसिकच कापडी टेंट होते. जेवण खूप मस्त होतं .टेन्टमध्ये सगळ्या सोयी होत्या.

Nubra valley tents
Nubra valley tents
  • कोल्ड डेझर्ट

इथून संध्याकाळी आम्ही जवळच असलेले कोल्ड डेझर्ट बघायला गेलो. आणि तिथे पाठीवर दोन हंप असलेल्या उंटावर राईड घेतली. हे सगळं करून दमून आल्यावर रात्री जेवणानंतर आमचा सगळ्यांचा मस्त शेकोटीच्या भोवती गप्पागोष्टी आणि गाण्यांचा कार्यक्रम झाला. येथे रात्री अकरा ते सकाळी सहापर्यंत इलेक्ट्रिसिटी स बंद करतात फॉर सेफ्टी रिझन.

  • Ride on Two Humped Camel
  • Cold Desert
    Cold Desert

चौथा दिवस (Day 4)

*चांगला पास

*पॅन्गाँग त्सो लेक

  • पॅन्गाँग त्सो लेक

सकाळी इथून निघताना आम्हाला ब्रेकफास्ट पॅक करून दिला होता .आणि आज आम्ही अख्या लेह लदाख ट्रिपच अट्रॅक्शन असलेलं पॅन्गाँग त्सो लेक बघणार होतो. आम्ही पॅन्गाँग त्सो लेक पोहोचलो आणि तिथला नजारा बघून आमचा सगळा शिणवटा गेला थ्री इडियट्स मूव्ही आणि त्यातलं ते गाणं जैसा फिल्म मे होता है हो रहा है रूबरू असच काहीसं फिलिंग आले हाच तो तलाव जिथे बर्‍याच वर्षानंतर करीना कपूर आमिर खानला भेटते

पिवळ्याधम्मक स्कूटरवरून गॉगल घालून आणि दुल्हन चा ड्रेस घालून आलेली करीना कपूर आणि तिच्या मागे असलेलं निळंशार पाणी आहाहा काय नजारा होता. तो सीन बघून काळजाचं पाणी पाणी झालं होतं स्वर्ग असाच असावा असं फीलिंग आलं होतं! समुद्रसपाटीपासून 14000 फूट उंचीवर असलेलं हे एकमेव खाऱ्या पाण्याचं तळं आहे 40 टक्के भारतात आणि 60 टक्के चायना मध्ये .आपल्या साईडचे 40% बघून डोळ्यांचं पारणं फिटलं ! या सुंदर निळ्या रंगाचे पाणी असतं हे मी इथेच बघितलं निळ्या हिरव्या पाचू सारख्या रंगाचे शेड्स आम्हाला बघायला मिळाले आणि आयुष्य धन्य झाल्यासारखं वाटलं. या लेक वर गेल्यावर आम्ही सगळ्याच करीना झालो होतो ,सगळ्याच सुंदर दिसत होतो ब्युटीफूल एक्सपिरीयन्स ऑफ माय लाईफ must must must विजिट प्लेस वन्स इन अ लाईफ टाईम

  • चांगला पास

ह्या छान मेमरीज घेऊन आम्ही परत लेहला जायला निघालो जाताना आम्हाला चांगला पास क्रॉस करायचा होता या पासचे मनामध्ये खूप भीती होती असं ऐकलं होतं की हा सर्वात कठीण रस्ता आहे. मी तुम्हाला घाबरवत नाही पण हा पास मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात पाहिलेला सर्वात भीतीदायक रस्ता आहे इतकी प्रचंड थंडी मी आत्तापर्यंत कधीच अनुभवली नव्हती मेंदू आणि शरीर बधिर करणारी थंडी म्हणजे काय असतं हे मी इथे अनुभवलं

संपूर्णपणे झाकलेलं शरीर देही लोकरीच्या गरम कपड्यांनी तरीही कमीच पडत होतो हा फारच अफाट अचाट असा अनुभव होता माझे ओठ काळेनिळे पडले होते आम्ही इथे वाशिम साठी उतरलो तर एक पाऊल टाकलं कठीण होतं आणि श्वास घ्यायला त्रास होत होता

कसेतरी आम्ही गाडी पर्यंत पोहोचलो मला माहित होतं की हे परत बघायला मिळणार नाही माझ्या मैत्रिणींनी इथे फोटोही काढले पण मी फोटो काढ पुरती सुद्धा तिथे थांबू शकले नाही त्या माझ्या मैत्रिणीचे फोटो मी शेअर करते आहे शुभ्र काही जीवघेणे असं कुठेतरी वाचलं होतं ते मला इथे आठवलं आणि मला तो बर्फ नकोसा झाला तुम्हाला जर ही ट्रीप करायची असेल तर आत्ताच तो क्षण आणि भीती वेळ थोडसं आटोक्यात असलेलं वजन आणि फिटनेस असेल तर नक्कीच करावी अशी ही ट्रिप आहे

Changla Pass

पाचवा दिवस (Day 5)

*शांती स्तुपा

*फॅशन शो

*शॉपिंग

पाचव्या दिवशी आम्ही सकाळी शांती स्तुपा नावाच्या जागेला भेट दिली दुपारी आम्ही शॉपिंगला गेलो तिथे काय काय शॉपिंग करायचं ते मी खाली टिप्स सेक्शनमध्ये देणार आहे संध्याकाळी आमचा मस्त फॅशन शो झाला या फॅशन शो साठी वीणा पाटील स्वतः हजर होत्या. फॅशन शोमध्ये सगळ्या बायकांचा उत्साह बघण्यासारखा होता सगळ्याजणी आपले वय, वजन, टेन्शन सगळं विसरून कॉन्फिडन्टली रॅम्पवॉक एन्जॉय करत होत्या. आम्ही सगळ्या मैत्रिणी खूप खूप मजा केली.

  • Shanti Stupa
  • Shopping at Leh
  • Shanti Stupa
    Shopping at Leh

सहावा दिवस (Day 6)

*झंस्कार आणि इंडस रिव्हर चा संगम

*गुरुद्वारा पठार साहेब

*मॅग्नेटिक हिल

*परत शॉपिंग

  • Sangam -Zanskar & Indus River
  • Magnetic Hill
  • Hall of Fame
  • Gurudwara Pathar Sahib
    Gurudwara Pathar Sahib

सहावा दिवस आज आम्ही झंस्कार आणि इंडस रिव्हर चा संगम बघितला तिथे दोन्ही नद्यांचा वेगळ्यावेगळ्या रंगाचं पाणी बघायला मिळतं नंतर आम्ही गुरुद्वारा पठार साहेब या जागेला भेट दिली तिथे आम्ही सेवा म्हणून भाज्या चीरायला मदत केली हे करताना खूप मज्जा आली. नंतर आम्ही मॅग्नेटिक हिल ला भेट दिली इथे एका डोंगरांमध्ये मॅग्नेटिक पावर आहे असं म्हणतात . तिथे त्यांनी आमची गाडी बंद करून रस्त्यावर उभी केल्यावर ती गाडी मॅग्नेटिक पॉवर असलेल्या डोंगराकडे ओढली जाते हे आम्हाला बघायला मिळालं नंतर आम्ही वॉल ऑफ फेम ला भेट दिली इथे आपल्या आर्मीतल्या सैनिकांचे बलिदान बघायला मिळते त्यांच्या खूप गोष्टी इथे जतन करून ठेवलेले आहेत. ते वापरत असलेल्या बंदुका थंडीत त्यांच्यासाठी खास तयार केलेले सूट , टेंट्स बघायला मिळतं आपल्या सैनिकांचं कर्तुत्व बघून ऊर भरून येतो. संध्याकाळी परत शॉपिंगसाठी वेळ मिळतो

अशीही माझी मेमोरेबल लेह लदाख ट्रीप संपली !

तुम्ही जर शॉपिंग करणार असाल तर इथे

1.थंडीसाठी लागणारे कपडे

2. शाल

3.स्टोल

4.एम्ब्रोईडरी केलेल्या पर्सेस.

5.केशर

6.ड्रायफ्रूट्स

असे गिफ्ट आयटम्स खरेदी करू शकता तसेच सगळ्या प्रकारची ड्रायफ्रूट्स तुम्ही खरेदी करू शकता.

Happy Journey !!!!!

  • It was tough to pack bags again
  • Time to say Good Bye