लदाख सायकल ने : दिल्ली वरून सुरुवात (भाग १)
हा प्रवास माझे मित्र नीरज
यांनी सायकल वरून केला आहे. हे प्रवास वर्णन जास्तीत जास्त लोकांपर्यंत
पोहोचावे असा आमचा दोघांचा उद्देश आहे. म्हणून हे प्रवास वर्णन त्यांच्या
संमतीने भाषांतर करून देत आहे. तर मग करू या सुरुवात प्रवासाला...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रसंग एक : ‘‘हेलो, यू आर फ्रॉम?” “दिल्ली।” “व्हेयर आर यू गोइंग?” “लद्दाख।” “ओ माई गॉड! बाइ साइकिल?”
"मी फार चांगले हिंदी बोलू शकतो. आपण देखील हिंदी मध्ये बोलू शकत असाल तर
कृपया हिंदी मध्ये बोला. आपण जर हिंदी बोलू शकत नसाल तर मला माफ करा. मी
आपली भाषा समजू शकत नाही. "
रोहतांगला फिरायला जाणाऱ्या एका पर्यटकाशी बोलत असताना, हा संवाद झाला.
* * * * * * प्रसंग दोन:
"भाऊ, थांबा थांबा. आम्हाला तहान लागलेली आहे. बर्फ खूप, पण पाणी नाही.
स्वताच्या समस्या पाहिले पण मुलांच्या समस्या नाही पाहू शकत. कृपया करून
पाणी द्या. फक्त एकाच घोट द्या.. संपूर्ण पिणार नाही."
" होय, माझ्याकडे एक पाण्याची बाटली आहे. आपण संपूर्ण बाटली रिकामी करू
शकता, एका घोटाचा प्रश्नच नाही. मी आता खाली उतरत आहे. खाली गेल्यावर खूप
पाणी मिळेल. दहा मिनिटा नंतर माझ्याकडे पाणी असेल. "
रोहतांग येथे बर्फाची मजा घेत असलेल्या एक मोठ्या कुटुंबाचा आणि माझा संभाषणाचा हा एक भाग.
* * * * * * प्रसंग तीन: होय सर " भाऊ, येथे या गावात रात्री राहण्यासाठी एक खोली मिळेल ",
"हो पण येथे शौचालय बाहेर जावे लागते"
"किती?"
"आपण आधी खोली पाहून घ्या.. नंतर पैश्याचे बोलेन."
" नाही, खोली नंतर बघेन. मग ती कशी का असेना...आपण आधी पैसे सांगा."
" पन्नास रुपये. पण आपण फार दुरून आले आहेत, आम्ही चांगली सेवा-सुविधा देऊ
शकत नाही. पुढे जीस्पा आहे तिथे तुम्हाला खूप खोल्या मिळतील."
" नाही, मी जाणार नाही. मला इथेच थांबायचे आहे. "
गेमुर गावात रात्री आठ वाजता झालेल्या संभाषणाचा हा भाग.
* * * * * * प्रसंग चार: " हॅलो, सर, कृपया पासपोर्ट दाखवा"
"भाऊ...आमचा पासपोर्ट होत नसतो कधी "
दारच्या चेक पोस्ट वरील संभाषणाचा भाग.
* * * * * * प्रसंग पाच: "भाऊ, येथे जेवणाची व्यवस्था कुठे आहे?
"येथे नाही. इथून पुढे सहा किलोमीटर आहे."
" अरे बापरे!! जिंगजिंगबार तर हेच आहे. मग धोखा कशाला? माझे स्थिती गेल्या
सहा किलोमीटर पासून खालावली आहे. कसा तरी मी सायकल ढकलत, पायांनी चालत ,
विचार करत इथ पर्यंत आलो आहे कि. जिंगजिंगबार ला आराम करील...चहा घेईन...हे
खाईल...ते खाईल... आता परत सहा किलोमीटर? "
" नका विचार करू. आमचा ट्रक तिकडेच चालला आहे. सायकल ट्रक वर ठेवा."
" ठीक आहे ठेवा. भाऊ! तुम्हीच ठेवा. मी सायकल नाही ठेवू शकत. माझ्यात तेवढी शक्ती शिल्लक राहिली नाही."
" काही हरकत नाही, आम्हीच ठेवतो. "
हे जिंगजिंगबार मध्ये बीआरओ मध्ये काम करणारे कामगार आणि माझ्या मधला सवांद आहे.
* * * * * * प्रसंग सहा:
"मित्रा, आज दुसरा घाट पार केला आहे आणि या बारालाचा ने तर माझा जीव
घेतलाय. कधी कधी असा विचार मनात येतो कि दिल्ली ची बस पकडून घरी जावे."
" नाही, असा काही करू नकोस. अशा खेपा नेहमी आणि सगळ्यांनाच येऊ शकत नाही.
आपण यशस्वीरित्या प्रवास पूर्ण करू शकता, जेव्हा नंतर आपण विस्तृत माहिती
किवा आपले अनुभव..आपल्या मित्रांना बोलसाल तेव्हा आपली छाती आनंदाने फुलून
जाईल "
हा भरतपूर मधील एका दुकानदाराशी केलेला संवादाचा भाग आहे.
* * * * * * प्रसंग सात:
"भाऊ, तुम्ही आमच्या घरी जा. आमचे घर चोगलमसर मध्ये आहे. तुम्ही दिल्लीत
एक मोठे अधिकारी आहात, मुलान आपणास भेटून खूप आनंद होईल. माझे नाव सेन्दुप
सेरिंग आहे आणि घरचा फोन नंबर हा आहे. आपण फक्त सेरिंगला भेटले होते असे
सांगा. "
वरील संभाषण हे व्हिस्की झरा पाशी एका लद्दाखी दुकानदारा बरोबरचे आहे.
* * * * * * प्रसंग आठ: "अहो, येथे आज रात्री राहू शकतो का? "
"हो, हो, राहा ना!. माझ्या झोपायच्या पिशवी मध्ये झोपा. मोठ्या पिशव्या आहेत, दोन्ही माणसे बरोबर मावतील. "
" धन्यवाद भाऊ!! मी झोपायची पिशवी आणलेली आहे. फक्त थोडी जागा आवश्यक आहे."...
" तुम्ही खूप मूर्ख आहात. एवढ्या मोठ्या बर्फाच्या वादळात बाहेर पडायलाच नको होते."
"होय, तुम्ही योग्य बोलत आहात. आजच तंगलंग-ला पार करायची मस्ती माझ्या अंगात आली होती. पण आता त्याची मला खूप खंत वाटत आहे. "
हे झारखंडी बीआरओ मजदूर बरोबर तंगलंग-ला जवळ तंबू मध्ये प्रवेश केला असताना संभाषणाचा भाग आहे.
* * * * * * प्रसंग नऊ: "भाऊ, तुम्हाला इथेच खोली मध्ये जेवण आणू का?... का आत येउन स्वयपाक घरात जेवणार आहात?"
"येथेच आणा"
"नाही, नाही भाऊ, एक काम करा स्वयपाक घरातच या... इथे मला खूप सामान घेऊन यावे लागेल.".
हे संभाषण ससपोल मधील एका गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या मुली सोबतचे आहे.
* * * * * * प्रसंग दहा: "थांब.. भावा.. थांब !! कुठून आलास ? "
" मी मनाली वरून आलो आहे आणि श्रीनगर ला जात आहे. "
"बापरे!! मोटारसायकल वरून आमची हि अवस्था झाली आहे आणि आपण हे सर्व पर्वत ओलांडून सायकलिंग करत आहात. "
" अजून तरी तुमची अवस्था खूप चांगली आहे. जेव्हा तुम्ही लेह च्या पुढे जासाल तेव्हा तुम्हाला खरी परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. "
हे फोतू-ला ला पार केल्यानंतर मोटारसायकल वाल्यान बरोबर झालेला संवाद.
* * * * * * प्रसंग अकरा: "थांब भावा... तू कोठे चाललास? "
" श्रीनगर. "
" आता खूप रात्र होणार आहे. चल आमच्या घरी."
"तुझे घर? किती लांब आहे? "
" वर फक्त थोडे."
"आपण किती पैसे घेणार?"
"हि हि हि हि , पैसे नाही घेणार ."
"कोण.. कोण आहे घरात?"
"आई वडील आणि लहान भाऊबहिण."
"ते तुला ओरडणार तर नाही ना? "
" नाही, अजिबात नाही."
" अरे खूपच वरती आहे तुझे घर. आणि रस्ता पण खूप छोटा आहे. एकदम गल्ली सारखा "
" काही हरकत नाही, सायकल वरची पिशवी काढ. ती मी खांद्यावर घेतो आणि सायकल ला मागून ढकलतो मग बरोबर वर जाईल. "
"चल..ठीक आहे "
हा शम्शा मध्ये संध्याकाळी ७ वाजता अहमद नावाच्या मुला बरोबर झालेला संवाद.
* * * * * * प्रसंग बारा: "कुठे जाणार ?"
"श्रीनगर"
"मित्रा अजून खूप मोठी चढाई आहे. आणि जोजिला पण खूप लांब आहे. थकून जाशील"
"पण हा शेवटचा घाट आहे. मी मनाली पासून अद्याप सात घाट पार केले आहेत. हा पण पार करील."
" हं,आपण पुढे जा. मी ट्रक मागून घेऊन येत आहे. तुला बसवून आजच सोनमर्ग ला सोडेल. "
एका धाब्या वरती ट्रक वाल्या बरोबर झालेलं संभाषण.
* * * * * * प्रसंग तेरा: "सर, थांबा थांबा!!. आज तुम्ही आमचाच गावात मुक्काम करा. आपण आपल्या शेतात तंबू लावू या. मी तुम्हाला लावायला मदत करेल. "
हे मटायन मध्ये लहान मुलां बरोबरचा संवाद.
* * * * * *
हे होते सायकल प्रवास मधील छोटे मोठे काही प्रसंग. अश्याच किती तरी
प्रसंगाशी मला सामना करावा लागला. निसर्गानी तर साथ दिलीच पण माणसांनी पण
कोणतीच कसर सोडली नाही.
मग ती माणसे स्थाईक असो कि फिरायला आलेले पर्यटक.
सायकल प्रवास हा काही सोपा नसतोच. आणि त्यात रस्ता जर जगातील उंच रस्त्या पैकी असेल म्हणजेच मनाली ते लेह.. मग खूपच कठीण होऊन बसतो.
फक्त चढत राहा..चढत राहा....चढत राहा ...मग श्वास फुलून येईल, दम लागेल, थंड हवा लागेल..काही पण होऊ दे.. फक्त एकच काम चढत राहा.
तसा पाहील गेले तर जेवढा घाट हा चढल्या नंतर.. तेवढाच घाट उतरणे आलेच. जर
जीव तोडून एखादा घाट चढायला तीन दिवस लागत असेल तर कष्ट न करता एक दिवस
उतरायला लागतो.
एखादा घाट तीन दिवस घाम गाळून चढल्या नंतर जेव्हा तुम्हाला उतार दिसतो
तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. कारण परत पुढच्या घाटा साठी
तुम्हाला तयारी ठेवावी लागते.
मनाली ते लेह रस्त्या वरती असे पाच घाट आहेत.
सगळ्यात चांगली गोष्ट अशी कि सायकल मला चांगली साथ दिली. एकदा पण पंक्चर
झली नाही. बिचारीला चांगल्या रस्त्या पासून ते अतिशय बेकार रस्त्यावरून
चालवली. कितीतरी ओढे पार केले..नद्या पार केल्या..चिखलातून पण
चालवली...बर्फाचा पण मुकाबला केला तरी पण कोणताच बिकट प्रसंग आला नाही.
अश्या या माझ्या साथी ला वाकून मुजरा !!
तसेच तंबू आणि झोपायच्य पिशवीला पण सलाम!! दिवस भर सायकल चालवून खूप दमायचो
कि संध्याकाळी तंबू लावायचा विचार पण मनात यायचा नाही. जिथे पण
राहण्यासाठी सुविधा मिळाली तिथे पैसे देऊन राहिलो. कोणत्या हि परिस्थिथि
मध्ये तंबू लावायचो टाळत आलो. तरी पण पाच वेळा अशी परिस्थिती आली कि मला
तंबू लावायलाच लागला. तंबू ची किमत तर वसूल केलीच पण हे माहित पडले कि
प्रवासा मध्ये तंबू आणि झोपायच्या पिशव्या किती महत्वाच्या आहेत.
सायकल वरूनच जायचे ठरविले होते. सुरुवातीला श्रीनगर मार्गे जाण्याची
इच्छा होती आणि मनाली मार्ग परत येण्याची कल्पना होती. सर्व तयारी
श्रीनगर नुसार केली जात होती . सगळे ठरवले होते ..कुठे कुठे
थांबायचे..कुठे कुठे किती वेळात पोहोचायचे. हिमालय क्षेत्रांमध्ये आणि
हिमालयाला ओलांडून पुढे उच्च सायकलिंगचा अनुभव नव्हता, त्यामुळे या योजनेला
काही महत्व नव्हते. उदाहरणच घ्यायचे झाले तर याच मार्गाने श्रीनगर पासून
सोनमर्ग पर्यंत 85km अंतर आहे आणि पूर्णपने चढाई आहे. त्यामुळे मी ठामपणे
सांगू शक्य नव्हतो कि हे अंतर सायकल ने ठराविक वेळेत पार करेल. तरी पण मी
हि योजना बनवली.
दिल्ली वरून दुपारी एक वाजता श्रीनगरला जायला बस धावतात. हीच बस दुसर्या
दिवशी दुपारी २ वाजता श्रीनगरला पोहचते. या बसच्या छतावर लोखंडाच्या जाळ्या
(रेलिंग) नसतात. त्यामुळे पूर्ण सायकल उलगडून ती एका पोत्या मध्ये भरून
जायचे ठरले.
दुसरी योजना अशी होती कि दिल्ली वरून जम्मू पर्यंत रेल्वे ने जायचे.
तिथून पुढे जीप किवा बसने श्रीनगर पर्यंत. दिल्ली वरून सकाळी जम्मू ला
जायला मालवा एक्प्रेस निघते. तिची वेळ दिल्ली वरून सकाळी साडे पाच आहे. कधी
कधी ती उशिरा पण निघते. बस पेक्षा रेल्वे ने प्रवास खूप चांगला आहे
त्यामुळे माझे मन रेल्वेने जायचे होते. या सायकल प्रवासाची तयारी मी खूपच
आधी पासून केली होती. पण हि आळसी माणसे कशी तयारी करतात हे तुम्हाला
माहिती आहेच. त्याचा परिणाम असा झाला कि तीन तारखेला संध्याकाळ पर्यंत
काहीच तयारी झाली नाही. मी कामावरती निघून गेलो रात्रपाळीला. सकाळी पहाटे
लवकर आलो आणि तसाच झोपी गेलो. तोपर्यंत मालवा एक्प्रेस निघून गेली होती.
सकाळी ११ ला उठलो.
आता मनाली वरून प्रवास सुरु करायचा मनात विचार घोंगावू लागला. हिमाचल
प्रदेशची बस चे वेळापत्रक ऑनलाइन उपलब्ध असते. संध्याकाळची चार चाळीस ची
बस पसंद आली.
मग काय बैगा भरायचे काम युद्धपातळीवर शुरू झाले. कपड्याचे दोन दोन जोड
बैगेत भरले. एक जोड अंगावरती. शून्यापेक्षा कमी तापमानाला मुकाबला करावा
लागणार म्हणून गरमीचे कपडे सोबत घेतले. कपड्यानीच पूर्ण बैग भरून गेली.
तसेच टॉवेल, माकड टोपी, हातमौजे, पायमौजे पण घेतले. अश्या प्रवास मध्ये मी
काजू , बदाम आणि मनुके जवळ ठेवतो...ते पण घेतले. मोबाइल, कैमेरा व त्यांचे
चार्जर, मेमोरी कार्ड, मोबाइल साठी अतिरिक्त बैटरी पण घेतली. मी औषधे कधी
हि जवळ ठेवत नाही. आणि घेत हि नाही. पण ती घ्यायला पाहिजेत.
संध्याकाळी सव्वा चार वाजता शास्त्री पार्क मधून बाहेर पडलो. लोखंडाच्या
पुलावरून मी काश्मिरी फाटका पाशी आलो. मनाली ला जाणारी बस तयार होती. साडे
पाचशेचे माझे तिकीट आणि पावणे तीनशे चे माझ्या सायकल चे तिकीट. बस च्या
छतावर सायकल बांधून टाकली.
तिथे काही मुले भेटली ती युथ होस्टेल जवळ सारपास पाशी ट्रेक साठी जाणार
होती. त्यांच्या मधला एक मुलगा युथ होस्टेल च्या मार्फत तिर्थन घाटी मध्ये
जलोडी जोत पर्यंत सायकलिंग करणार होता. आणि महत्वाची गोष्ट अशी कि या युथ
होस्टेल मार्फत जाणारे बहुतेक नवशिखे असतात. सायकल छतावर ठेवतानीच त्यांनी
विचारपूस करायला सुरुवात केली. रूपकुंड चे नाव ऐकताक्षणिक त्यांनी ओळखले कि
मी कोणत्या मातीत बनलो आहे.
बस मध्ये अजिबात बोर झाले नाही कि त्रास झाला नाही. त्याचे कारण होते ते
शेजारील मोकळी बैठक आणि समोरील जागे मधले लांब अंतर. त्यामुळे पाय लांबून
बसता आले. मात्र चंडीगडला पूर्ण बस भरून गेली. चंडीगड वरून रात्री ११ ला
आम्ही निघालो.
सायकलची पंक्चर काढायचा अभ्यास

महायात्रेला सुरुवात
(क्रमश:)
https://www.misalpav.com/node/34695
लदाख सायकल ने : मनाली ते गुलाबा (भाग २)
रूपकुंड चे नाव ऐकताक्षणिक त्यांनी ओळखले कि मी कोणत्या मातीत बनलो आहे.
बस मध्ये अजिबात बोर झाले नाही कि त्रास झाला नाही. त्याचे कारण होते ते
शेजारील मोकळी बैठक आणि समोरील जागे मधले लांब अंतर. त्यामुळे पाय लांबून
बसता आले. मात्र चंडीगडला पूर्ण बस भरून गेली. चंडीगड वरून रात्री ११ ला
आम्ही निघालो.
सकाळी ५ वाजता मंडी मध्ये गाडी चे आगमन झाले. जास्त वेळ न थांबता गाडी
पुढच्या प्रवासाला निघाली. औट पाशी जलोडी जोतला जाणारा सायकलस्वार उतरला.
पुढे भून्तर ला सारपास ला जाणारे पण उतरले. सारपास चा ट्रेक कसोल पासून
सुरु होतो.
जो जातो कुल्लू ला तो बनतो उल्लू !! कंडक्टर नि सगळ्यांना खाली उतरवले.
आणि म्हणाला कि हि बस आता पुढे जाणार नाही. दुसर्या बस मध्ये बसा. मला काही
प्रोब्लेम नव्हता. पण सायकल उतरवून दुसर्या बस मध्ये टाकावी लागणार होती.
आठ वाजता मनाली मध्ये पोहोचलो. मौसम खूपचं छान होता. निखळ उन पडले होते.
पर्यटकांची गडबड चालू होती. हॉटेल वाल्याची पण चांगलीच गर्दी होती. बस मधून
उतरल्या उतरल्या हॉटेल वाल्यांनी मला घेरले.
मी सायकल चे पहिले निरीक्षण केले. मग सगळे सामान सायकलला बांधले.
बांधण्यासाठी घरूनच सुतळी आणली होती. मागच्या कॅईरेजला बैग, तंबू आणि
झोपायची पिशवी बांधून घेतली. हे काम खूप गुंतागुंतीचे असते. एकदा सामान
बांधले कि परत काढणे अशक्य. त्यामुळे नुकसान पण सोसावे लागते. घालायची
धुतलेली कपडे बैग मधून काढायची तसीच राहून गेली. दिल्ली वरून घालून आलो
होतो हाफ पैंत आणि टी शर्ट त्याच्या वरतीच राहावे लागले.
मनाली हि समुद्रसपाटी पासून २००० मीटर उंचीवर आहे. चांगले उन पडल्यामुले
थंडीचे तर नामोनिशान नव्हते. परवा दिवशी सायकलच्या चाकामध्ये तेल टाकले
होते. त्यामुळे ते सगळे तेल बाहेर येउन डिस्क ब्रेक वर येउन सांडले होते.
असे दोन्ही चाकांना झाले होते. त्यामुळे ब्रेक लागणे बंद.
मग डिस्क ब्रेक ची साफ सफाई केली. तेव्हा कुठे थोडे थोडे लागू लागले. आज
चढाई चा रस्ता होता. उद्या मी रोहतांग पार करणार होतो तेव्हा मात्र ब्रेक
ची जास्त गरज पडणार होती. म्हणून बारीक पणे साफ सफाई करणे गरजेचे होते.
ब्यास नदी पार केली. आता कुठे या यात्रे ची सुरुवात झाली होती. चार
किलोमीटर गेल्या नंतर खूप भूक लागली होती. म्हणून चहा आम्लेट चा नाश्ता
करून घेतला.
९ किलोमीटर वरती पलचान आहे. बरोबर १२ वाजता पलचान ला पोहोचलो. म्हणजे
ताशी ३ किलोमीटरच्या स्पीड ने. आज मढी पर्यंत जाऊन थांबण्याचा संकल्प होता.
मढी मनाली पासून ३४ किलोमीटर दूर आहे. म्हणजे मी जर याच स्पीड ने पुढे
जात राहिलो तर मला 11 तास लागतील. म्हणजे रात्री ८ ला मी मढी मध्ये असेल.
रात्री तर मला सायकल चालवायची इच्छा नव्हती. त्यामुळे मढी मला अशक्य वाटू
लागले. तरुण गोयल बरोबर माझे बोलणे झाले. हिमालयाची त्यांना खूप माहिती
आहे. त्यांनी सांगितले कि मढी मध्ये जेवणास मिळणार नाही. पहिले मिळत होते
पण उच्च न्यायालयच्या आदेशानुसार आता मिळत नाही. माझ्या साठी हि खूप खराब
बातमी होती.
पलचान मध्ये चाउमीन खाल्ली. इथे आल्यावर कळाले कि गोयल साहेब बरोबर म्हणत होते.
एक चांगली गोष्ट कळली कि मढी मध्ये फक्य ५ पर्यंतच जेवण मिळणार होते
त्यानंतर नाही. पण मी ५ पर्यंत पोहचू शकणार नव्हतो त्यामुळे हि चांगली
गोष्ट पण माझ्यासाठी वाईटच ठरली.
पलचान पासून एक रस्ता सोलांग ला पण जातो. रोहतांग नंतर सोलांग हे गर्दीचे ठिकाण आहे. त्यामुळे या चौकात खूप वाहनाची गर्दी होते.
पलचान पासून ४ किमी अंतरावर कोठी आहे. 2 वाजता कोठी ला पोहोचलो. एवढे नक्की
होते कि कोठीच्या पुढे गेल्यावर काही खायला मिळणार नाही. आलूचे पराठे मग
पैक करून घेतले. पावणे तीन ला तेथून निघालो. ८ पर्यंत मढीला पोहोचण्याचा
निचय केला. ह्या वेळेला रोहतांग वरून गाढ्या वापस मनाली कडे येत होत्या.
त्यामुळे खूप गर्दी होती रस्त्याने. सायकल खूप हळू चालत होती. त्यात रस्ता
चढ-उताराचा होता. कैरियर ला जे सामान बांधले होते ते एका साईटला झाले.
एकदा तर गाड्यामुळे मला रस्त्यावरून खाली उतरावे लागले. खालचा रस्ता खूप
ओबडधाबड होता. आणि त्यात चढाई..त्यामुळे पुढचे चाक सारखे वर व्हायचे.
कैरियर वर जवळ जवळ २० किलोचे सामान असेल. मनात विचार आला कि काहीतरी केले
पाहिजे जुगाड. पुढच्या चाकावर थोडा भार टाकावा तर पुढच्या चाकाला मरगार्ड
नव्हते.
हिमालयाची एक सर्वात खराब सवय आहे. दुपारी ३ नंतर हवामान खूप खराब होते.
दुपारी काळे ढग येतात आणि संध्याकाळी पाऊस पडतो. साडे चार वाजले होते
वरती तोंड करून बघितले तर काळे ढग जमा झाले होते. असे वाटत होते कि खूप
पाऊस पडणार आहे. संध्याकाळी ५ ला गुलाबा ला पोहोचलो. मढी अजूनही १३ किमी
दूर होती. खराब हवामान बघून इथेच राहण्याचा विचार केला. सीमा सडक संघटना
म्हणजेच बी.आर.ओ चे ठिकाण मला दिसले. बी.आर.ओ वाल्यान बरोबर थांबण्यासाठी
मी बोलणी सुरु केली. त्यांनी सरळ नाही म्हणून सांगितले. तिथेच मी तंबू
टाकायचा विचार केला. तेवड्यात पाऊस सुरु झाला. बी.आर.ओ वाल्यांना दया आली.
पाऊस थांबे पर्यंत थांबू दिले. गुलाबा मध्ये सुद्धा खाण्याची व्यवस्था होती
पण उच्च न्यायालया नुसार सगळे बंद झाले.
तितक्यात तिघे जण भिजत भिजत आले. बी.आर.ओ वाल्यांनी आमच्या साठी चहा
केला. हे तिघे जण मोटारसायकल वरती रोहतांग वरून आले होते. पाऊस आला म्हणून
इथे येउन थांबले. पाऊस कमी झाला तसे ते निघून गेले. जातानि मात्र माझी टोपी
घेऊन गेले. मी हेल्मेट पण आणले होते. पण बैग मधून काढले नव्हते. टोपी वरच
काम भागवत होतो. त्यात एकाने मला टोपी मागितली मी म्हटले जा घेऊन.
त्यांच्या कडे हेल्मेट पण नवते.
बी.आर.ओ वाल्यांना मी खूप प्रार्थना केली कि मी खायला प्यायला पण मागणार
नाही, अंगावरती चादर ,ब्लंकेत पण मागणार नाही. फक्त थोडीशी जागा द्या. तर
ते म्हणाले कि आम्ही आमच्या साहेबांच्या आदेशा शिवाय काहीही करू शकत नाही.
मी म्हणालो कि मग साहेब कुठे गेलेत त्यांना विचारा मग. तर ते म्हणाले कि
खाली गेलेत माहित नाही कधी येतील ते. मागे कामगार राहत होते. मी म्हणालो
तिकडे जागा द्या. ते मला तिथे घेऊन गेले. ते झारखंडी होते. त्यांनी पण मला
राहण्यास नकार दिला. आता तंबू लावण्या शिवाय मला पर्याय नव्हता. मग काय
थोडा वरच्या साईट ला गेलो आणि तंबू लावायला सुरुवात केली. पाऊस पण उघडला
होता.
मी तंबू लावायला सुरुवात केली लगेच एक कामगार तिथे आला. त्याने मला
सावध केले कि वरती जंगल आहे. तिकडे जाऊ नकोस. कालच एका जंगली कुत्रानी
लहान बाळाला नेले आणि त्याला खात बसला होता. मी म्हणालो कुणाचे होते बाळ.
एका कामगाराचे. ऐकून खूप वाईट वाटले. मी असे ऐकले होते कि जंगली अस्वल असे
करते. इथे तर जंगली कुत्रे. आता तर मला खूप भीती वाटू लागली. थोड्या वेळाने
अंधार पसरला. खालच्या साईटला असलेले कामगार त्यांचा आवाज पण कमी होऊ
लागला. तसी मला अजून भीती वाटू लागली. तेवड्यात तंबूच्या बाहेर कसला तरी
आवाज होऊ लागला. सर सर सर असा. नक्कीच कुणीतरी जनावर असणार..त्यांनी वास पण
घेतला आणि आपले अंग पण रगडले. मी खूप घाबरलो. म्हटले नक्कीच तो जंगली
कुत्रा असणार. आता हा आपला तंबू फाडून टाकणार!! माझी तंबूतून बाहेर
डोकवायची इच्छा पण झाली नाही.
काही वेळाने एखादी वस्तू घासल्याचा आवाज आला. आवाज थोडा ओळखीचा वाटू
लागला. हा तर बैलाच्या पायाचा आवाज आहे. थोडी भीती दूर झाली. मग मी तंबू ची
चैन उघडून बघितले. बाहेर कोणीतरी दिसत होते. नक्की काय आहे हे बघण्यासाठी
टोर्च मारला. तर सगळी भीती गायब!! पाच गाय होत्या. त्यानंतर त्यांनी तंबू
भोवती खूप चक्कर मारल्या. गवत खाल्ले, माझ्या सायकल वर पण चढल्या. मग मी
निवांत झोपून गेलो.
आज मी २१ किलोमीटर सायकल चालवली. मी आज एक चूक केली कि आजच दिल्ली वरून
आलो होतो. मनाली मध्ये एक दिवस थांबायला पाहिजे होते. शरीर अनुकूल
होण्यासाठी.
मनाली चे सौंदर्य

मनाली पासून अंतर

मनाली पासून १ किमी पुढे गेल्यावर


माझा साथी

सोलांग चौकात वाहनाची गर्दी

एक रस्ता सोलांग कडे आणि एक रोहतांग कडे

रोहतांग कडे

कोठी

बी.आर.ओ वाल्यांच्या घोषणा खूप महत्वाच्या आहेत



हेल्मेट तर खूप महत्वाचे आहे. सायकल असू दे कि मोटारसायकल


गुलाबा मध्ये आपला तंबू
(क्रमशः)
सकाळी ५ वाजता अलार्म वाजला. मी उठलो ७ वाजता. तंबूच्या बाहेर येउन
पाहिले तर एक गाय तंबूला चिकटूनच बसली होती. तंबू वरती शेन पण टाकले होते.
मग मी ते धुवून घेतले. सामान बांधायला आणि ते सायकल वर चढवायला साडे आठ
वाजले. नऊला तेथून निघालो.
आज सामान बांधतानी एक गोष्ट वेगळी केली. तंबूला पुढे हैन्दलबारला घट्ट
बांधून घेतले. त्यामुळे मागच्या चाकावरचे वजन कमी होऊन ते पुढच्या चाकावर
आले. एकप्रकारे संतुलन साधलं गेलं. कैरियरला बैग आणि झोपायची पिशवी
लटकावली. त्यावरती हवा भरायचा पंप. काल खूप त्रास झाला होता. सर्व सामान
सारखे एका बाजूला येत होते. आज पुढे गेल्यावरच कळेल कि सामान व्यवस्थित
बांधले गेले आहे का ते.
काल माझे लक्ष्य होत मढी. पण 13 किमी आधीच थांबावे लागले. त्यामुळे
स्वतालाच स्वताची लायकी कळली कि चढाला किती वेगाने सायकल चालवू शकतो ते. आज
पण रोहतांग पर्यंत चढचं आहे. ते पण ३० किमी. वेळ लागणार १० तास. पण
कालच्या पेक्षा आज मी ठनठणीत आहे म्हणून हे अंतर १० तास नाही तर ८ तासात
पार करू शकतो. मी नऊ ला निघालो होतो. रोहतांग पर्यंत पोहोचायला पाच
वाजतील. तिथून पुढे उतारच आहे. आणि रोहतांगच्या पुढे गाड्यांची गर्दी पण
राहणार नाही. त्यामुळे कोकसर पर्यंत चे 22 किमी चे अंतर सहज पार करू शकतो.
काल सायकल चालवतानी, रोहतांग वरून लोकं येत होती. आज रोहतांगला जातानी
दिसत होती. पण शेवटी तोच खेळखंडोबा. मी सायकल कधी रस्त्यावरून चालवायचो तर
कधी गाडी आली कि रस्त्याच्या खाली घालायला लागायची. ओबड धोबड रस्त्यावरून
चालवायला दम लागायचा.
चार किलोमीटर पुढे गेल्या वर एका चहाच्या टपरी वर थांबलो. गरमागरम चहा
घेतला. इथे कोणी दुकान नाही टाकू शकत. म्हणून हे लोकं जीप ने सामान आणतात.
टपरी लावतात आणि संध्याकाळ झाली कि परत सगळे सामान घेऊन घरी.
सायकल वरून चढाई करणे खूप अवघड असते. प्रत्येक पैडल मारतानी जीव जातो. पण अंतर सुद्धा कमी होते.
गुलाबा सोडल्या नंतर.. पुढे ९ किलोमीटर आल्यावर जरा आराम करायला थांबलो.
वरती बघितले तर गाड्यांची लाइन लागली होती. पूर्ण रस्ता चक्काजाम झाला
होता. अजून सुद्धा मढी ४ किलोमीटर दूर होते. हा चक्काजाम मढी पर्यंत तरी
असणार हे नक्की होते.
मला सायकल चालवताना बघून लहानसहान पोर मोठ्यांनी ओरडायची. "अरे देखो साइकिल"
दम घ्यायला थांबलो तर लोकं मला घेरायची. आणि विचारपूस करायची.
कहां से आये हो? कहां जाओगे?
लद्दाख।
हे भगवान! कितने दिन में?
आठ दिन में।
हे भगवान! कितने जने हो?
अकेला। हे भगवान!
तेवढ्यात एक कार माझ्याजवळ येउन थांबली. मग काय त्याच्या बरोबर माझे बोलणे सुरु झाले.
‘‘हेलो, यू आर फ्रॉम?”
“दिल्ली।”
“व्हेयर आर यू गोइंग?”
“लद्दाख।”
“ओ माई गॉड! बाइ साइकिल?”
“मैं बहुत अच्छी हिन्दी बोल सकता हूं। अगर आप भी हिन्दी में बोल सकते हैं
तो मुझसे हिन्दी में बात कीजिये। अगर आप हिन्दी नहीं बोल सकते तो क्षमा
कीजिये, मैं आपकी भाषा नहीं समझ सकता।”
त्यांनी ओके ओके म्हणत बोलणे थांबवले.
ब्यास नदी च्या कडेला तर गाड्यांची तर जत्राचं भरली होती. वरती मढी पासून
मोठी रांग होती. गाड्या ची रांग पुढे सरकत नाही म्हणून पर्यटकांनी तिथेच
मस्ती करायला सुरुवात केली होती. जे पर्यटक सकाळी ६ वाजता मनाली तून
निघाले होते रोहतांग कडे, ते इथेच अडकून पडले होते. त्यांची रोहतांग ला
पोहोचण्याची शक्यता हि कमी होती.
इथेच जेवून घेतले. तितक्यात अजून एक सायकलवाला भेटला. सचिन !! मुंबई वरून आला होता.
लेह ला चालला होता. त्याच्या बरोबर माझे बोलणे झाले. तो कलाकार आहे. पुतळे
बनवतो. तसेच सिनेमासाठी सेट पण डिझाईन करतो. तो पण व्यास पुलावर थांबला
होता मग पुढे गेला.
छोट्या गाड्यांचे तर खूपच हाल होत होते आणि मोठ्या गाड्यांचे त्याहून
जास्त. हिमाचल परिवहन मंडळाची उदयपुर हून कुल्लू ला जाणारी बस पूर्ण पणे
अडकली होती. तिच्या पुढे एक हि गाडी नव्हती. पण तिच्या मागे गाड्यांची
लाइन लागली होती. माझ्याकडे सायकल असतानी सुद्धा अर्धा तास लागला बाहेर
पडायला.
एक वाजता मढी ला पोहोचलो. सगळी दुकाने बंद होती. शेवटी एक दुकान उघडी
मिळाली ती पण हिमाचल पर्यटनाची. इथे फक्त चहा,आम्लेट आणि सैंडविच मिळत
होते. खूप गर्दी होती. मग २ सैंडविच बांधून घेतले. इथे पहीले सगळे मिळायचे.
खाण्यापासून तर ते झोपण्याच्या खोली पर्यंत.
असे म्हणतात कि इथे एकदा जज साहेब आले. त्यांच्या बाबतीत काहीतरी वाईट
झाले. मग काय त्यांनी कायद्याचे डावपेच खेळले आणि आता असे हाल झालेत. आनन
फानन मध्ये हिमाचल पर्यटन मंडळाने तंबू ठोकून खाण्याची व्यवस्था केली.
त्यांचे रेस्ट हाउस पण आहेत. पण ते सगळे फुल असतात. जाऊ दे... पुढल्या
वर्षी तरी काहीतरी सुधार होईल.
रोहतांग कडे वरती तोंड करून पाहिले तर ढग जमा झाले होते. इथून रोहतांग 16
किलोमीटर होते. मला ५ तास तरी लागणार. आता २ वाजले होते. त्यामुळे पुढे
जाऊन काही फायदा नाही. आज इथेच थांबावे. तितक्यात मुंबई चा सायकलस्वार सचिन
पण तिथे आला. त्याला पण आज इथेच थांबायचे होते. झोपायला खोली भेटली नाही
म्हणून आपला तंबू लावायला सुरुवात केली. सचिन कडे तंबू नव्हता पण झोपायची
पिशवी होती.
असल्या सायकलींना कैरियर नसते. पण मी ते लाऊन घेतले होते. सचिन ने पण
लावले होते. पण माझे कैरियर लावायची पद्धत वेगळी होती. मी मागच्या
चिमत्याला होल पाडून त्यात कैरियर बसवले होते. तर सचिन ने मागच्या
चाकाच्या एक्सलं वरतीच कैरियर फिट केले होते. त्यामुळे झाले काय तर
मागच्या चाकाच्या डिस्क ब्रेक ची वायर वाकडी होऊन कैरियर च्या खाली आली
होती. त्यामुळे ब्रेक लागणे अशक्य होते. मैक्यानिक चे लक्ष्य फक्त कैरियर
कडे होते आणि असेच चालू कैरियर बसवून सचिन ला चालते केले होते. ह्या गोष्टी
मुले सचिन पण चिंतेत होता. कारण रोहतांग सोडल्या नंतर ब्रेक ची खूप
आवश्यता होती.
मग मी सचिन ला सांगितले कि आपण कैरियर काढून तार सरळ करू. परत कैरियर बसू
मग ब्रेक चालू होईल. तुला पुढच्या ब्रेक वर अवलंबून रहायची आवश्यकता भासणार
नाही. मग काय पंधरा मिनिटात त्याला ब्रेक ठीक करून दिला. सचिन म्हणाला तू
नक्कीच इंजिनीअर आहेस. पण कोणता?
मी म्हणालो एवढा ब्रेक ठीक करून दिला. आता मला नाही वाटत कि मला काय
सांगायची गरज आहे ते. तरी सांगतो रेल्वे मध्ये मैक्यनिकल इंजिनिअर म्हणून
कार्यरत आहे.
गुलाबा मध्ये तंबू


रोहतांग च्या रस्त्याला खायची प्यायची व्यवस्था



इथून मढी ४ किलोमीटर दूर आहे.



चक्काजाम

सरदारजी खूप खुश झाला..सायकलवर लडाखला जाणाऱ्या बरोबर फोटो काढून

व्यास नदी


मढी

मढी पासून दिसणारी गाड्यांची लाइन

मढी मध्ये लावलेला तंबू आणि मी
(क्रमशः)
पाच वाजता डोळे उघडले. काल दिवसभरात फक्त चौदाच किलोमीटर सायकल चालवली.
आज कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकर निघायचं होतं. कारण नंतर रोहतांगला
जाणाऱ्या गाड्यांचा तांडा अडचणी आणू शकतो. तरी पण निघता निघता सहा वाजले.
रात्री सचिन माझ्या सोबतच होता. त्यामुळे रात्री गप्पा चांगल्या रंगल्या
होत्या. झोप किती वाजता लागली ते कळलेच नाही. असो.. तर सहा वाजता आम्ही
दोघे बाहेर पडलो. सचिन ला सायकलचा चांगला अभ्यास होता. तो भुर्रकन पुढे
निघून गेला.
थोडे पुढे गेल्यावर खराब रस्ता सुरु झाला. रस्त्यावर चिखलच चिखल होता.
जेवढं मला जमलं तोपर्यंत मी सायकलवर बसून गेलो नंतर तर पायांनीच जावं
लागलं. मागून तर गाड्यांचा तांडा जोरानीच जात होता. जसं काय रोहतांग पळून
जाणार आहे. चिखलात तर माझे पाय आणि माझी सायकल पुरती खराब झाली.
मढी समुद्र सपाटी पासून ३३०० मीटर उंचीवर आहे आणि रोहतांग ३९०० मीटर
वरती. आणि दोघा मधले अंतर आहे १६ किलोमीटर. सुरुवाती पासूनच हा रस्ता
नागमोडी वळणे घेत जातो. पुढे सरचू पाशी जसं "गाटा लूप" लूप आहे. तसच याचं
काहीतरी नाव असायला पाहिजे होतं. चला तर ..मीच याला नाव देऊन टाकतो. "मढी
लूप".
साडे आठला चाहाची टपरी दिसली. तिथे चहा घेतला. रस्ता अरुंद असल्यानं खूपच
वाहनांची गर्दी झाली होती. पंधरा मिनिट थांबल्यानंतर तिथून निघालो. कैरियर
वरची बैग एका बाजूला झाली होती. तिला सरळ करण्यासाठी वळणावर सायकल थांबवली.
मोठ्या दगडाचा आधार घेऊन सायकल उभी केली. दोरी काढून बैग सरळ करत होतो.
तितक्यात एक स्कॉर्पियो वाला जवळ येउन थांबला. सगळयांना एक नंबरला लागली
होती. एक माणूस गाडीतून उतरून माझ्याजवळ आला. मला बोलला हो बाजूला.
स्रियांना बाथरूमला जायचं आहे. तो अश्या भाषेत बोलला कि आम्ही गाडीवाले
आहोत आणि तू सायकलवाला...! त्याचं हे बोलणं मला आवडलं नाही. मी म्हटलं,नाही
होणार बाजूला. इथं पहिले मी आलोय. गाडी चालवताना जर मी दिसलो असेल, तर
गाडी येथे थांबवायलाच नको पाहिजे होती.
"बऱ ठीक आहे. तू तुझे तोंड तिकडे वळव."
"मी म्हटले, नाही वळवणार. तुम्ही मला त्रास देऊ नका. तुम्हाला कुठे करायची
तिथे करा. माझे काम मला करू द्या. तुमच्या म्हणण्यानुसार मी इथून हटणार
नाही आणि तोंड हि वळवणार नाही. तुम्ही दुसर्या ठिकाणी गाडी थांबवायला
पाहिजे होती."
मग काय , ज्या कामासाठी गाडी थांबवली होती ते उरकून घेतले. महिलांनी मी
ज्या दगडाला सायकल टेकून उभा होतो त्याच्या मागे गेल्या. आणि पुरुष
मंडळी... त्यांच्या साठी तर सगळ्या दिशा आपल्याच आहेत.
रोहतांग समुद्र सपाटी पासून ३९०० मीटर उंच आहे. एवढ्या उंचीवर मला श्वास
घ्यायला त्रास होऊ लागला. यालाच उंच पर्वतीय आजार म्हणतात. दम पण खूप लागत
होता. त्यात पाणी पण नव्हते. पूर्ण बाटली रिकामी झाली होती. एका कार
वाल्याकडून पाणी मागितलं. ते पण संपलं. आता परत कुणाकडे पाणी मागायची
हिम्मत होईना. शरीर खूप थकल होतं. आराम कर..आराम कर अशी मागणी करत होतं.
भूक पण जोराची लागली होती. सकाळी फक्त ब्रेड आमलेट खाल्ले होते आणि चहाच्या
टपरी वर बिस्कीट एवढंच. शरीरातून उर्जा भरपूर जात होती पण भरपाई मात्र
शुन्य. अश्या वेळेस सुखा मेवा कामास येतो. पुढे जाऊन एका पुला पाशी थांबलो
आणि घरून आणलेला सुखा मेवा खाल्ला. जेणेकरून उर्जा तरी मिळेल. अर्धा तास
थांबल्या नंतर पुढे निघालो. तरी पण शरीराला आराम मिळाला नाही. पुढे
गेल्यावर पाणी मिळालं. मनसोक्त पाणी पिल्यानंतर म्हटलं, चला आता रोहतांग
पार करू या !!
रोहतांग घाट त्यालाच हिंदी मध्ये रोहतांग दर्रा असे म्हणतात.
पर्यटकासाठी जणू बर्फाचा ढीग. त्यांच्या साठी मौज मजा शिवाय इथे दुसरे
काहीच नाही. पण जो हिंडफिरा आहे, तो इथे आल्यावर भावनिक होतो. त्याच्या
साठी हे स्वर्गाचे दार आहे, अलिबाबाची गुहा आहे. इथूनच खरा त्याचा प्रवास
सुरु होतो. जे हिंडफिरे असतात ते आतापर्यंत फक्त पर्यटकाच्या जागे मध्ये
फिरत होते, आता इथून पुढे ते स्वताच्या जागे मध्ये फिरणार आहेत. मी असं
ऐकलं होतं कि रोहतांगच्या पुढे एक वेगळीच दुनिया आहे. आता ती दुनिया
माझ्या पासून जास्त दूर राहिली नाहीये.
रोहतांग वरती तर जत्राच भरली होती. इथे मौज मजा करण्यासाठी वेगवेगळी
साधने उपलब्ध आहे. अर्धा तास इथे बसून राहिलो. बसल्या बसल्या दोन कप चहा
गडप केला. रोहतांग च्या पुढे दोन कुटुंब भेटलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला
बर्फ पडला होता. तिथे ते सगळे खेळत होते. त्यांनी मला थांबवलं आणि पाणी
मागितलं.
ते म्हणायला लागले कि, "इथे बर्फ भरपूर आहे. पण पाणी नाही. गळा एकदम सुकून
चाललाय. एकवेळ आपल्याला त्रास झालेला चालेल पण मुलांना झालेला त्रास नाही
बघवत."
मी पाण्याची बाटली काढून त्यांना प्यायला दिली. पाण्याची बाटली भरलेली होती
तर मुले होती सहा. मोठ्यांनी सांगितले कि एका घोटा शिवाय कुणाला जास्त
पाणी द्यायचे नाही. मी म्हटले असे करू नका. पिऊ द्या त्यांना, किती प्यायचे
ते. हे सगळ पाणी तुमचं आहे मला फक्त खाली बाटली द्या. तसे पण माझ्या
पेक्षा तुम्हाला गरज आहे पाण्याची. आता मला खाली उतरायचे आहे. त्यामुळे
खाली गेल्यावर पाणी भेटेल. शेवटी मला खूप सारे धन्यवाद भेटले आणि खाली
बाटली पण !!
रोहतांग सोडल्या नंतर उतार लागला. रस्त्यावर खप पाणी होतं. रोहतांग वरून
बर्फाचे पाणी वितळून खाली वाहत होतं. आणि खूप थंड हि होतं. बिन पैन्दल
मारता सायकल सुसाट चालली होती. तीन दिवसानंतर अशी संधी मला मिळाली होती.
बर्फाचे थंड पाणी माझ्या पायावर उडत होते. वारा पण जास्त होता. त्याने
पायाला खूप थंडी वाजत होती. तीन चार किलोमीटर मजेत गेल्यानंतर खराब रस्ता
सुरु झाला. जो पुढे 17 ते १८ किलोमीटर कोकसर पर्यंत गेल्यानंतर ठीक झाला.
या खराब रस्त्यावर चिखल पण पाहायला मिळतो. त्यामुळे सायकल वरून उतरून
चालावे लागते. सायकल वरून चढ चढताना पाय दुखतात, पैन्दल मारुन तर उतरताना
हाथ दुखतात, ब्रेक मारुन. आणि सगळा भार हा हातावर येत असतो. आता पर्यटकांचा
तांडा कमी झाला होता. रस्त्यावर तर शुकशुकाट होता. केव्हातरी एखादी गाडी
जायची.
सव्वा दोन वाजता ग्रामफू ला पोहोचलो. इथून एक रस्ता स्पीति नदी कडे गेला
आहे. हा रस्ता प्रथम चन्द्रा नदीच्या बरोबरीने जातो. नंतर कुंजम घाट पार
केल्यानंतर स्पीति नदीच्याच बरोबरीने जातो. नंतर माहिती पडले कि तो रस्ता
खूपच खराब झाला आहे. कुंजम घाट पण वाहतुकीसाठी उघडला नाही.
तीन वाजता कोकसर ला पोहोचलो. तिथे सचिन भेटला. त्यांनी सांगितले कि, मी
तुझ्या साठी दीड तास थांबलोय. त्याला समजून सांगितले कि, आपण एकटे हिंडफिरे
आहोत. वाट बघायची नसते.
भुकेला होतो. राजमा आणि भातावरती ताव मारला. तिथून तीन वाजता निघालो. पुढे
गेल्यावर चांगला रस्ता मिळाला. मग काय चंद्रा नदी पार केली आता लक्ष्य होते
टाण्डी!! चंद्रा नदीच्या बरोबरीने जाताना सगळे भान मी विसरून गेलो.
अहाहा..एका पेक्षा एक नजारे दिसत होते. रस्त्यामधेच एक ओढा आला. उतरून पार
करावा लागला. इथेच एक झलक बघायला मिळाली कि पुढे पण एका पेक्षा एक ओढे
बघायला भेटतील.
पाच वाजता सिस्सू ला पोहोचलो. इथे एक छोटासा तलाव पण आहे. ज्याच्या
मध्ये चंद्रा चे पाणी येते. याच पाण्याचा उपयोग करून इथल्या लोकांनी झाडे
लावली आहेत आणि हिरवीगार शेती पण केली आहे. पुढे गेल्यावर उतार संपला. आता
समान सरळ रस्ता सुरु झाला. साडे सहा वाजता गोंदला पासून सहा किलोमीटर मागे
होतो. तेव्हाच विचार येऊ लागले कि आता तथेच थांबले पाहिजे. तरुण गोयल नि
त्यांचा मित्र डॉ. विशाल याचा नंबर दिला होता. विशाल इथेच गोंदला ला राहतो.
सात वाजता गोंदला ला पोहोचलो. ओढा पार करून एका मंदिरापाशी विशाल आणि माझे
बोलणे झाले. तर विशाल नि मला खालच्या रेस्त हाउस पाशी यायला सांगितले.
विशाल येथे डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. इथेच जवळ हॉस्पिटल आहे तेथे ते काम
करतात. मग आमची रवानगी रेस्ट हाउस मध्ये केली. तिथे गिजर पण होता. बरेच
दिवस अंघोळ झाली नाही तर चला अंघोळ करून घेऊया.
सचिन नि उद्याचा कार्यक्रम विचारला. मी म्हटले मागच्या पाच रात्री पासून
झोपलो नाही व्यवस्थित त्यामुळे आज मस्त पैकी ताणून देणार आहे. उद्याचे
उद्या बघू. आणि आज झोपेला चांगली संधी मिळाली आहे. त्यामुळे आज झोपेवर मी
अत्याचार करणार नाही. उद्या जेव्हा डोळे उघडतील तेव्हाच उठणार मग दुपारचे
बारा वाजले तरी चालतील. सचिन म्हणाला नाही सकाळी लवकर उठून लवकर निघू. कारण
उद्या कमीत कमी दारचा पर्यंत पोहोचले पाहिजे. मी त्याला सरळ नाही
सांगितले. मी म्हटलं, आपण दोघे एक एकटे हिंडफिरे आहोत. तू तुझे बघ मी माझे
बघतो. तू तुझा उद्याचा कार्यक्रम तयार कर, मी माझा बनवतो. जर दोघांचे
कर्यक्रम एक सारखे निघाले तर मग आपण एकत्र राहू. नाहीतर मग तू तुझ्या
रस्त्याला मी माझ्या. या गोष्टीवर दोघांची संमती झाली.
तीन दिवस हाफ पैन्त घातल्या मुले गुड्घ्यापाशी पाय जळाले. खूप आग होत होती. आता उद्या पासून फुल पैन्त घालावी लागणार.
आज दिवसभरात ६४ किलोमीटर सायकल चालवली.
 |
| मढी वरुन दिसनारा रोहतांग घाट |
 |
| हिच ती चिखलाची जागा |
 |
| बीआरओ जिन्दाबाद |
 |
| गाड्यांची लाइन |
 |
| हिमालयातील रस्त्यांचे डॉक्टर |
 |
| बर्फ कापून बनवलेला रस्ता |
 |
| मुख्य रस्ता सोडून शॉर्ट कट मारायचा प्रयत्न केला म्हणून त्याचे परिणाम!! |
 |
| इथून रोहतांग जास्त लांब नाही. |
 |
| रोहतांग वरती थांबलेल्या गाड्या |
 |
| बर्फा वरती चालणारी गाडी |
 |
| रोहतांग वरती मौज मस्ती |
 |
| रोहतांग वरती अंधार व्हायची वाट बघताना ट्रक. पर्यटक गेल्यावर मग हे जाणार. |
 |
| हेच कुटुंब होते ज्यांनी मला एक घोट पाणी मागितले होते. |
 |
| रोहतांग घाट: आता चढ संपला आणि उतार सुरु |
 |
| रस्त्यावर सांडलेले बर्फाचे पाणी |
 |
| खराब रस्ता आणि बर्फाचे पाणी |
 |
| हे लाहौल आहे . इथे डोंगरावरती झाडे नसतात. रोहतांग सोडल्यानंतर पहिला वेगळेपणा. |
 |
| कोकसर मध्ये जेवण |
 |
| कोकसर |
 |
| चन्द्रा नदी |
 |
| हा पहिला ओढा |
 |
| सिस्सू |
 |
| गोंदला जवळ ओढा |
(क्रमश:)
दिवस पाचवा
साडे आठला डोळे उघडले. असे तसे नाही उघडले. सचिन न हलवून हलवून उठवलं.
सचिन तर हेल्मेट घालून जाण्याच्या तयारीत होता. त्याला मी कालच बजावलं होतं
कि लवकर उठवू नकोस. म्हणून त्यानी नाही उठवलं. त्यानी मला आजचा कार्यक्रम
विचारला. आता मी काय डोम्बाल्याचा कार्यक्रम बनवणार? काल कार्यक्रम बनवला
होतं कि भरपूर झोपणार पण तो पण अजून पूर्ण झाला नाही. त्याला म्हटले तू जा
पुढे निघून. मी येतो मागून सावकाश. सचिन आज जिस्पा किंवा दारचा मध्ये
थांबून उद्याची रात्र जिंगजिंगबार मध्ये काढेल. मी आज केलांग किवा जिस्पा
मध्ये राहून उद्या जिंगजिंगबार ला मुक्काम असेल. जिंगजिंगबार हे
बारालाचा-ला जवळचे जास्त लोकसंख्या असलेले स्थान आहे. मला तो आज जरी भेटला
नाही तरी उद्या जिंगजिंगबार नक्कीच भेटणार.
तो गेल्यानंतर मी परत झोपून गेलो. बरोबर अकरा वाजता जाग आली. मागच्या
दोन रात्री झोपायच्या पिशवी मध्ये काढल्या होत्या. त्या आधीची रात्र दिल्ली
ते मनाली च्या बस मध्ये आणि त्याच्या मागच्या चार रात्री ह्या कामामध्ये
रात्र पाळीत. त्यामुळे मागचा संपूर्ण हफ्ता बरोबर झोपू शकलो नव्हतो. त्याची
कसर आज भरून काढली.
पहिली अंघोळ करून घेतली. गिजर होतं म्हणून गरम पाण्याचा काही प्रोब्लेम
नव्हता. चार दिवसापूर्वी दिल्ली मध्ये अंघोळ केली होती. आता इथून पुढे सहा
दिवस तरी अंघोळ मिळणार नाही. पहिल्या दिवशी हाफ टी-शर्ट आणि हाफ पैन्त
घालून निघालो होतो. दुसर्या दिवशी पण तेच कपडे. परिणाम झाला
काय...उन्हामुळे कोपऱ्या पर्यत हाथ जळाले. जास्त उंचीवर गेल्यावर सूर्याची
किरणे पण जास्त तीक्ष्ण होतात. चश्मा न घातल्यामुळे डोळ्याला पण त्रास झाला
होता. त्यामुळे आज पूर्ण कपडे घातली. चश्मा पुढे गेल्यावर केलांग मध्ये
विकत घ्यायचं ठरवलं.
चश्मा घालायची मला अजिबात सवय नाही. त्यामुळे विकत घेतला तरी घालायची आठवण
राहत नाही. मनाली मधेच २०० रुपयाचा चश्मा घासाघीस करून 50 रुपयाला घेतला
होता. ५० मीटर पुढे गेलो नाहीतर हरवला. नंतर कोठी मधून परत दुकानदाराकडून
५० ला घेतला तो पण हरवला. बैग मध्ये ठेवला होता. पूर्ण बैग चाचपडली तरी
सापडला नाही.
गोंदला गाव चंद्रा नदीच्या कडेला आहे. नदीच्या पडयाल पण एक गाव आहे.
त्या गावाच्या वरती ग्लेशियर आहे. हजारो वर्ष्यानुवर्ष्य एकावर एक बर्फ
पडून. एकदम ठोस कठीण बर्फ झालेला असतो त्यालाच ग्लेशियर म्हणतात. तो
ग्लेशियर खूप भयंकर दिसत होता. गोंदला मधेच रेस्ट हाउस च्या बाजूला एक
किल्ला आहे. एकदम छोटासा आहे. त्याला आपण वाच टावर म्हटले तरी काय हरकत
नाही.
बारा वाजून चाळीस मिनिटांनी रेस्ट हाउस मधून बाहेर पडलो. इथून मुख्य रस्ता सरळ वरती जातो.
तो रस्ता चढायला २० मिनिटे लागले. नंतर पूर्ण रस्ता उताराचा होता तितकाच
खराब पण. आता पुढचे लक्ष्य तांडी होते. सायकल सुसाट तांडी च्या दिशेने
निघाली. दहा किलोमीटर चे अंतर एका तासात पूर्ण केले. तांडी मध्ये हिमाचल
प्रदेश चा शेवटचा पेट्रोल पंप आहे. इथे एक सूचना लिहिली होती कि, पुढचा
पेट्रोल पंप ३६५ किलोमीटर आहे.
टांडी मध्ये चंद्रा नदी आणि भागा नदीचा संगम होतो. दोन्ही नद्या मिळून
एक नदी तयार होते. तिलाच चन्द्रभागा नदी म्हणतात. ती पुढे जाऊन जम्मू
काश्मीर मध्ये प्रवेश करते. तिथे ती चेनाब नदी म्हणून ओळखली जाते. इथे बघा!
एकच नदी.. पण तिला पण दोन धर्म स्वीकारावे लागतात. एक हिंदू आणि एक
मुस्लिम. चन्द्रभागा आणि चेनाब !!
भागा नदी बारालाचा-ला पासून येते. इथून पुढचा रस्ता भागा नदीच्या
कडे-कडेनेच आहे. त्यामुळे पूर्ण रस्ता चढाचा आहे. टांडी मध्ये जेऊन घेतलं.
आणि पुढे मार्गस्थ झालो. सुर्य चांगलाच कमरेच्या वरती आला होता. माझ्या
कमरे वरती प्रखर सूर्याची किरणे पडत होती. त्यामुळे सारखी कमर खाजवायला
लागायची. बाटली मधलं पाणी पण गर्मी मुले गरम झालं होतं. ३००० मीटर वरती
एवढ्या गर्मी ची अपेक्षाच नव्हती. सावलीत गेलं कि गार लागायचं आणि उन्हात
खूप गरम व्हायचं.
टांडी सोडल्यानंतर रस्ता खूपच खराब होता. पूर्णपणे तुटलेला होता. आणि
चढाई पण सुरु झाली. टांडी नंतर एका तासामध्ये फक्त चारच किलोमीटर अंतर पार
केले. टांडी पासून केलांग सात किलोमीटर आहे. शेवट २ किलोमीटरचा,चांगला
रस्ता आहे. साडे चार वाजल्या पासून ते साडे पाच पर्यंत मी केलांग मधेच
थांबलो. तीन दिवसा नंतर एयरटेल ला नेटवर्क मिळालं होतं. घरी सगळ्यांना
सुखरूप आहे म्हणून खबर दिली. त्याच बरोबर यार दोस्तांबरोबर सुद्धा बोलून
घेतलं. मनदीप त्याच्या परिवार बरोबर केलांग ला फिरण्याची योजना बनवत होता.
त्याला रस्त्यांची माहिती दिली आणि परिवारा सोबत येऊ नकोस, असे सांगितले.
केलांग हे लाहौल स्पीति जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याचे दोन भाग
आहेत. लाहौल आणि स्पीति. कुंजम घाट या दोन्ही जिल्ह्यांना वेगळे करतो.
कुंजम घाट अजून सुधा वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे केलांग मुख्यालयाचा
स्पीति जिल्ह्याशी संपर्क तुटलेला आहे. तरी पण स्पिति ला जायचे असेल तर
अजून एक मार्ग आहे, किन्नौर होऊन जावे लागेल. किन्नौर वरून स्पीति ला
जाणारा रस्ता हा बारा महिने उघडा असतो. मग स्पीति जिल्ह्याला का नाही
किन्नौर जिल्ह्याशी जोडत? अशीच परिस्थिति पांगी ची आहे. पांगी हे चम्बा
जिल्ह्यात पडते. पण जास्त काळ, चम्बा जिल्ह्यापासून त्याचा संपर्क
तुटलेला असतो. म्हणून पांगी ला लाहौल जिल्ह्याला जोडायला पाहिजे.
केलांग पासून स्टिंगरी ६ किलोमीटर वरती आहे आणि जिस्पा २५ किलोमीटर
वरती. रस्ता सगळा चढायचा आहे. रात्री १० च्या आत मध्ये जिस्पाला पोहचू शकत
नाही. मग का नाही स्टिंगरी लाच थांबावे. असा विचार मनात सुरु झाला.
केलांग पार केल्या नंतर एक ओढा लागला. त्यानी तर ठणकावूनच सांगितलं, मी तर
काहीच नाही. माझ्या पेक्ष्या मोठ मोठे ओढे पुढे आहेत. ज्यांच्या मध्ये मोठ
मोठे ट्रक वाहून नेण्याची क्षमता आहे. ह्या ओढ्या मध्ये गुडघ्या इतकं पाणी
होतं. पाण्याला पण धार होती. सायकल पण वाहता वाहता वाचली. साडे सहा वाजता
स्टिंगरी ला पोहचलो. इथे मिलिटरीचा ठिकाणा आहे. तिथे एक फौजी भेटला. बंगाल
चा होता. त्याने प्रयत्न केले कि मला कुठे झोपायला जागा मिळेल म्हणून. पण
व्यर्थ!! मी सिविलियन होतो त्यामुळे इथे थांबू दिले नाही. तसाच पुढे गेलो.
जिस्पा इथून १९ किलोमीटर लांब आहे. माहिती काढली कि, इथून पुढे १४
किलोमीटर वरती गेमूर आहे. तिथे राहण्याची व्यवस्था होईल. १४ किलोमीटर
म्हणजे तीन तास सायकल चालवायची होती. म्हणजे रात्री साडे नऊ पर्यंत तिथे
पोहोचणार होतो. रस्ता चांगला होता पण चढाई चा होता. एका तासा मध्ये पाच
किलोमीटर सायकल चालवली. नंतर खराब रस्ता सुरु झाला. पावणे आठ ला इतर
वाहनांनी लाईट सुरु केल्या तेव्हा लगेच मी पण माझ्या हेल्मेट ची लाईट सुरु
केली. आम्हाला कामावरती जास्त उंची वरती काम करावे लागते. त्यामुळे असे
हेल्मेट आम्हाला दिले आहेत. ज्याला एलईडी लाइट लावलेल्या आहेत. ह्या
हेल्मेट च्या मागे लाल कलर ची लाईट जळत असते. त्यामुळे मागून येणाऱ्या
वाहनाला संकेत मिळतो.
पुढे गेल्यावर जास्त चढाईची रस्ता लागला आणि वळणदार पण होता. म्हणजे
अजून वेळ जाणार. मन थोडे साशंक झाले. एकतर रात्रीची वेळ..वळणदार रस्ता
म्हणजे छोटा मोठा घाट असण्याची शक्यता होती. तितक्यात समोरून एक ट्रक
येताना दिसला. मनाली लेह रस्त्यावरती ट्रक सारखे येत जात असतात. त्यानंतर
दोन बुलेट वाले निघून गेले. ते पण पुढे वळणदार रस्त्यावरती चढताना दिसले.
आता मी समजून चुकलो होतो कि, मला पण त्याच रस्त्यांनी जावे लागणार. नंतर
पंजाब च्या दोन गाड्या माझ्या शेजारून गेल्या. पण त्या वळणदार रस्त्यांनी
चढताना दिसल्या नाहीत. त्या खालीच थांबल्या होत्या. मी ओळखून चुकलो कि,
तिथे फाटा फुटला आहे. मी पुढे गेलो तर खरंच तिथे फाटा फुटला होता. एक
रस्ता खालून जात होता तर एक रस्ता वरून. तिथे कोणतीच सूचना पाटी नव्हती.
पुढे चार बाया येताना दिसल्या. खाली नदीकडून लाकडाच्या मोळ्या घेऊन येत
होत्या. त्यानी सांगितले कि, वरती जाणारा रस्ता कोलोंग गावात जातो.
त्यातल्या एका बाइनि चाकलेट मागितलं. मी म्हटलं माझ्याकडं टॉफी आहेत.
पन्नास पैश्यावाली!! ती म्हटली ठीक आहे. टॉफी दे. मी खिश्यात हाथ टाकला आणि
पाच टॉफी काढल्या. त्या बाई च्या हातात दिल्या. ती म्हटली कि, आम्ही चार
आहोत अजून तीन दे म्हणजे सगळ्यांना दोन दोन मिळतील. मी म्हटलं बरोबर आहे.
तुम्ही एक एक घ्या राहिलेली एक, मला नको का? मी कुठे जाणार. त्या म्हटल्या
किती चिंगूस आहेस रे !!
शेवटचे पाच किलोमीटर उताराचे होते. सायकल चांगली पळत होती. साडे आठ
वाजताच गेमुर ला पोहोचलो. एक दुकान उघडं होतं. मी राहण्यासाठी बोलणी केली.
तो म्हणाला कि खोली भेटेल. पण शौचालय नाहीय. मला तर नुसती खोली म्हटले तरी
तोंडाला पाणी येते. नाहीतर अजून पाच किलोमीटर जिस्प्पाला जावे लागले असते.
खोली आणि दोन बिस्तर ..फक्त पन्नास रुपये.
३३०० मीटर उंचा वरती असलो तरी रात्री थंडी वाजली नाही. हिवाळ्यात इथे खूप
बर्फ पडतो. टीवी वरती क्रिकेट मैच चालू होती. चैम्पियन्स ट्रॉफी!!
इंग्लैण्ड व आस्ट्रेलिया ची मैच होती. मला क्रिकेट जास्त आवडत नाही तरी
सिद्धू चा आवाज कानावर पडला.
“इंसान अपना मुकद्दर खुद बनाता है, बाद में उसे होनी का नाम दे देता है।“
दिवस सहावा
गेमुर मनाली पासून १३३ किमी दूर आहे. सात वाजता उठलो. गावाच्या मधोमध
ओढा आहे. पाण्याला धार पण चांगली होती. खालच्या बाजूला सार्वजनिक शौचालय
आहे. ओढ्याचे पाणी सार्वजनिक शोउचलया पर्यंत गेले आहे. त्यामुळे मी सावकाश
पणे गेलो. तरी पण बर्फाच्या थंड पाण्याने पाय भिजलेच. सायकल धुळीने पूर्णतः
खराब झाली होती. मग काय ओढ्याचा पूर्णपणे फायदा उठवला. दहा मिनिटात
चकाचक!!
इथेच नाश्ता केला. नऊ वाजता निघालो. आजच लक्ष्य होतं. ३६ किलोमीटर लांब
जिंगजिंगबार. सचिन माहित नाही रात्री कुठे राहिला होता. पण आज तो
जिंगजिंगबार मध्ये नक्कीच भेटणार.
गेमुर पासून जिस्पा ५ किमी दूर आहे. रस्ता चांगला आहे. उतार पण होता.
पावून तास लागला. जिस्पा मध्ये हॉटेलांची काही कमी नाही. काल जर गेमुर ला
राहण्याचे ठिकाण मिळाले नसते तर मला इथेच यावे लागले असते. जिस्पा वरून ६
किमी वरती दारचा आहे. रस्ता चढाई आणि उतराई चा आहे. साडे दहा ला दारचा
मध्ये पोहोचलो. दारचा मध्ये भरपूर नद्यांचा संगम होतो. अशीच एक नदी पुल
पाशी चेकपोस्ट जवळ आहे. प्रत्येक गाडी आणि यात्रेकारुचे नाव इथं नोंदल
जातं. मला वाटले सायकल ला इथून सूट असेल. मी बैरियर पार करून पुढे जाताच
मागून आवाज आला, हेलो सर, एण्ट्री प्लीज. मी त्यांच्या जवळ जाताच,एकाने
म्हटले, सर, पासपोर्ट प्लीज?
मी विदेशी असल्याची त्याची समजूत झाली होती.
मी मोठ्या आवाजातच सांगितले, "भाई, देसी हूं। हम पासपोर्ट ना दिखाया करते."
असो मग त्याने एका रजिस्टर मध्ये नाव पत्ता लिहून घेतले. इथे भरपूर जेवलो.
अकरा वाजून वीस मिनिटांनी निघालो. कडक उन होतं. दारचा सोडले कि बारालाचा-ला
ची चढाई सुरु होते. दारचा ३४६० मीटर उंची वर आहे तर बारालाचा-ला ४९०० मीटर
वर. दोघा मधले अंतर ४५ किलोमीटर. दारचा च्या पुढे २३ किलोमीटर वरती
जिंगजिंगबार आहे. आज रात्री मला तिथेच राहायचं होतं. रस्ता एकदम भंगार. २
किलोमीटर वरती एक फाटा दिसला. मुख्य रस्त्याला जोडून तो रस्ता पुढे छिया
गावात जातो. नाव आता मी विसरलो छिया होते कि जिया काय माहित. हा तोच रस्ता
आहे जो मी जानेवारीत बघितला होता निम्मू ते चिलिंग ला जाणारा. हा
निम्मू-पदुम-दारचा रस्ता निर्माण योजनाचा भाग आहे. निम्मू पासून ५० ते ६०
किलोमीटर पर्यंत बनलेला आहे. पदुम च्या दोन्ही बाजूला पण बनलेला आहे. इथे
दारचा मध्ये पण थोडा रस्ता बनलेला आहे. रस्त्या वरचे दगड नवीनच सांगत होते
कि, पतसेव दारचा पासून १६ किलोमीटर.
पुढे गेल्यावर चांगला रस्ता सुरु झाला. पण चढाई बारालाचा-ला पार
केल्याशिवाय संपणारी नवती. एक ओढा भेटला. त्यावरती पूल नव्हता. पाणी पण
जोरात वाहत होते. बर्फ वितळून पाणी खाली येत होते. पाणी किती थंड असेल
त्याचा विचारच करू नका. कसा तरी ओढा पार केला. मागून एक मोटारसायकल वाला
आला. ओढा पार करताना त्याच्या दोन्ही बुटात पाणी गेलं. मग ओळख झाली हाल चाल
विचारले. ते इंदोर चे पंकज जैन होते. मोटारसायकल वरून लदाख ला चालले होते.
इथून एक किलोमीटर पुढे गेलो नाही तर परत मोठा ओढा लागला. दोन्ही बाजूला
वाहनाची लाइन लागली होती. एक बुलडोजर ओढ्या मधले दगड काढत होता. काही
छोट्या गाड्या पण इथे अडकल्या होत्या. एका कामगाराने बिडी पाजायाच्य अटी
वरती सायकल ओढा पार करून देतो असं सांगितलं. मी म्हटलं माझ्यात तेवढा दम
आहे. मी स्वत सायकल ओड्याच्या पार केली.
पावणे चार वाजता पतसेव ला पोहोचलो. भूख लागली होती. पराठे खाल्ले. आज खूप
थकलो होतो. उंचीमुळे आणि चढाई मुळे. आणि ताईत पैन्त मुळे अजूनच पाय दुखत
होते.
पतसेव पासून जिंगजिंगबार नऊ किलोमीटर वर आहे. यातले ३ किलोमीटर सायकल वर
बसून गेलो. बाकीचे सहा किलोमीटर पायाने. इथे पण एक ओढा पार करावा लागला.
बुलडोजर रस्ता साफ करत होता. दोन्ही बाजूना गाड्यांची रीघ होती. पण सायकल
ला कोणी थांबू शकत नाही.
साडे सहा वाजता जिंगजिंगबार च्या एक किलोमीटर मागेच होतो. म्हणून सायकल
ची गती कमी केली. जेव्हा जिंगजिंगबार ला पोहोचलो तर धक्काच बसला.
राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था इथून पुढे ६ किलोमीटर वरती आहे. बरे झाले
बीआरओ चा ट्रक तिकडेच चालला होता. सायकल ट्रक वर कामगारानीच टाकली. माझी
हालत खूपच खराब झाली होती. सकाळी ३३०० मीटर वर होतो आणि आता ४३०० मीटर वर.
त्यात मला जिंगजिंगबार नि धोखा दिला होता. इथे ६० ते ७० कामगार राहतात. इथे
चार पाच तंबू होते. हिंडफिर्यांसाठी राहण्याची आणि खाण्याची चांगली
व्यवस्था होती. इथे एका तंबू मध्ये मी शिरलो. चादर घेऊन झोपून गेलो. खूपच
थकलो होतो. चांगली झोप लागली. संध्याकाळी नऊ वाजता मुलांचा आवाज ऐकून जाग
आली. इथे अजून काही वाटसरू होते. मेरठ वरून आले होते. आमच्याच शेजारचे. आजू
बाजूच्या तंबू मध्ये सचिन ला शोधले. पण नाही दिसला. बहुतेक त्याने
बारालाचा पार केला असेल. माझ्या पेक्ष्या तो अनुभवी पण आहे आणि शरीराने
मजबूत. मी आपला हळू हळू कसा तरी इथे आलो. तो नक्कीच माझ्या पुढे गेला
असेल.....
 |
| गोंडला पासून दिसणारा चंद्रा च्या पलीकडचा नजारा |
 |
| गोंडला चा किल्ला |
 |
| लांबून दिसणारं गोंडला गाव |
 |
| गोंदला पासून टाण्डीला जाणारा रस्ता |
 |
| पुढचा पेट्रोल पंप ३६५ किलोमीटर वरती |
 |
| टाण्डी पुल हा भागा नदी वर बांधलेला आहे. |
 |
| टाण्डी पुलावरून घेतलेला फोटो. समोर चंद्रा भागेचा संगम. |
 |
| टाण्डी पासूनचे अंतर |
 |
| केलांग ला पोहोचणार आहे. |
 |
| टाण्डी पासून ५ किमी पुढे |
 |
| केलांग मध्ये आपले स्वागत आहे. |
 |
| गेमुर गाव |
 |
| जिस्पा |
 |
| दारचा कडे |
 |
| दारचा |
 |
| दारचा च्या पुढे |
 |
| इथे फाटा फुटला आहे . एक रस्ता पदुम ला जातो. |
 |
| बारालाचा-ला कडे |
 |
| दारचा पासून तीन किलोमीटर पुढे. |
 |
| जोरात पाण्याचा प्रवाह असलेला ओढा |
 |
| हा ओढा पहिल्या ओढ्या पेक्षा जास्त खतरनाक होता. गाड्यांची लाइन लागली होती. |
 |
| पाण्याच्या जास्त प्रवाह मुळे मोटारसायकल वाल्याचा तोल गेला. |
 |
| पतसेव पाशी एक तलाव |
 |
| पतसेव- मनाली पासून १६० किलोमीटर पुढे |
 |
| जिंगजिंगबार च्या चार किमी अलीकडे एक ओढा. वाहून आणलेल्या दगडामुळे रस्ता पूर्ण पणे झाकून जातो. |
 |
| बारालाचा-ला वरून येणारी भागा नदी |
 |
| जिंगजिंगबार पासून पुढे ६ किमी - हाच ट्रक होतं ज्यात मी माझी सायकल टाकून नेली.
|
(क्रमशः)
दिवस सातवा
सकाळी साडे पांच वाजता उठलो. शेजारच्या तंबू मध्ये मेरठ वरून आलेले
शेजारी आज जायच्या तयारीत होते. त्यामुळे खूप गोंधळ चालू होता. त्यांच्या
गोंधळाने मला पण जाग आली. तंबू च्या बाहेर येउन बघितले तर समोर सचिन उभा
होता. माहिती पडले कि, तो पण खूप थकला होता. काल तो जिस्पा मध्ये थांबला
होता. गेमूर पासून ५ ते ६ किमी पुढे. एका दिवसात १००० मीटर वर चढल्यामुळे
त्याची हालत पण खराब झाली होती.
इथून सूरजताल १३ किलोमीटर आणि बारालाचा १६ किमी आहे. म्हणजे अजून १६ किमी
वर चढायचे आहे. नाश्ता करून साडे सात वाजता बाहेर पडलो. आज ४७ किमी लांब
सरचूला पोहोचायचे आहे. इथून निघतो नाही तोच चढाई सुरु झाली. रस्ता चांगला
होता. पुढे गेल्यावर एक ओढा पार करावा लागला. ओढ्याला पाणी खूप होते. पण
ओढा पसरट असल्याने पाण्याला धार नव्हती. पण पाणी इतके थंड होते कि आईच
आठवली. थोडावेळ तर आपले पाय कुठाय ते शोधत होतो. इथे ट्रेकिंग करणारे
ओढ्याबरोबर वर चढत होते. मला कळून चुकले कि ते चन्द्रताल ला चाललेत. तिथे
पोहोचायला अजून भरपूर दिवस लागतील. रस्त्या मध्ये बर्फ तर इथूनच सुरु
झालाय. चन्द्रताल पर्यंत तर बर्फातच चालायला लागणार.
थोडे पुढे गेल्यावर गाड्यांची रांग लागली होती. या प्रवासात एवढे कळून
चुकले होते कि, गाड्यांची रांग याचा अर्थ जास्त प्रवाहाचा ओढा. पुढे जाऊन
बघितले तर जोरात पाणी वाहत होतं. शेजारीच एका पुलाचे काम चालू होते.
तासाभरात काम पूर्ण होईल असे वाटत होते. याच भरवश्यावर बाकीच्या गाड्या
थांबल्या होत्या. कोणीही त्या ओढ्या तून जायची हिम्मत करत नव्हतं.
आमच्या सारख्या सायकलवाल्यांच तर नेहमी कौतुक होतं. संधी मिळताच लोक
आमच्याशी बोलू लागतात, फोटो काढून घेतात. इथे पण असंच झालं. गुजराती
कुटुंबांनी मला घेरलं. माझ्या सोबत फोटो काढून घेतले. माझी सायकल
चालवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मी पण त्यांना सायकल चालवू दिली. ते
जो पर्यंत सायकलचे मजे घेत होते. तो पर्यंत पुलाचे काम अर्धे झाले होते.
आता इथून आपल्याला जाता येऊ शकते असा अंदाज आला. मग मी सायकल घेऊन पुलावर
चढलो. माझ्या आधीच माझी सायकल पडयाल गेली होती. कामगारांनी आपले काम केले
होते. सचिन चे पण तसेच झाले. पुढे गेल्यानंतर मी मागे वळून बघितले तर एक
गाडी पाण्यामध्ये फसली होती. गाडीवाल्याचा आघाव पणा त्यालाच नडला होता.
आम्ही खूप पुढे निघून गेलो तरी ती गाडी अजूनही तिथेच दिसत होती.
सचिन एक चांगला सायकलस्वार आहे. त्याने मुंबई ते गोआ , तसेच मुंबई ते
औरंगाबाद सायकल चालवली आहे. डोंगर दऱ्यातून सायकल चालवायचा त्याला खूप
अनुभव आहे. मी मात्र नीलकण्ठ ची एकदिनी यात्रा शिवाय कुठेच सायकल चालवली
नाही. त्यामुळे तो माझ्या पुढेच राहिला.
बारालाचा च्या आधी ६ किमी पासून बर्फाच जंगल सुरु होतं. मग बर्फ हटवून तिथे
रस्ता बनवला जातो. मग चढाई असली तरी सायकल चालवायला मजा येते. इथे थांबून
काही फोटो काढून घेतले.
सव्वा अकरा वाजता सूरज ताल ला पोहचलो. समुद्र सपाटी पासून 4770 मीटर
उंच. म्हणजेच आम्ही १५६४९ फुट उंचीवर होतो. इथून बारालाचा ३ किमी आहे. एका
छोट्या तलावाच्या चार हि बाजूने बर्फाचे डोंगर होते. तलावामध्ये पाण्याचं
बर्फ झालं होतं. जर बर्फा ऐवजी पाणी असते तर तो तलाव खूपचं छान दिसला असता.
आपल्या चार हि बाजूने बर्फच बर्फ असेल आणि त्यात कडक उन असेल तर कुणाची
हिम्मत कि बिना चष्म्याचा डोळे उघडे ठेऊ शकेल. फोटो काढण्यासाठी चष्मा
काढणे आवश्यक होते. पण काढू नाही शकलो. अंदाजाने फोटो काढले. तरी फोटो
चांगले आले. मला मैनुअल फोटोग्राफी येत नाही. आपलं कॅमेरा ऑटो मोड ठेऊन
दणादण क्लिक करत राहायचे.
थोड्या अंतरावर एक पत्र्याचे शेड दिसत होतं. मनात म्हटलं हेच बारालाचा-ला
आहे. तिथे गेल्यावर खरे खोटे कळाले. बारालाचा-ला तर अजून लांब आहे.
बारालाचा ४९०० मीटर (१६०७६ फुट) उंचीवर आहे. मी आता ४८५० मीटर उंचीवर
होतो. ह्या प्रवासात अजून पर्यंत मी एवढ्या उंचीवर आलो नव्हतो. खूप दम
लागला होता. उंच पर्वतीय आजार झाला होता. शरीर खूपच कमजोर झालं होतं. भूख
पण लागली होती. मी तिथेच बसलो. काजू, बदाम आणि मनुके खाल्ले. अर्धा
तासानंतर तिथून पुढे सरकलो. पावणे एक वाजता बारालाचा-ला पोहचलो. बारालाचा
रोहतांग पेक्षा १००० मीटर उंच आहे. त्यामुळे बर्फ असणार यात काही वादच
नाही. असे असले तरी उंची आणि बर्फ याचा काही संबंध नाही. लदाख मध्ये उंची
आहे पण जास्त बर्फ बघायला मिळत नाही.
बारालाचा-ला नंतर रस्ता जाम खराब आहे. बर्फा मुळे रस्त्या वरती पाणीच
पाणी होतं. दीड वाजता भरतपुर (४७०० मीटर) ला पोहोचलो. इथे पण रहायची आणि
खायची व्यवस्था चांगली आहे. बुलडोजर रस्त्यावरचा बर्फ काढत होता. तिथेच
सचिन भेटला. तो खाऊन पिउन निघायच्या तयारीत होता. मी दुकानदाराला डाळ आणि
भात सांगितला. पण भात तयार नव्हता. म्हणून ब्रेड आणि आम्लेट खाल्ले. खूप
थकलो होतो. म्हणून अर्धा एक तास आराम करावा या हिशोबाने तिथे पडलो. सचिन ला
सांगितले कि, तू जा आपण सरचू मध्ये भेटू. सचिन मग सरचू ला गेला. सरचू इथून
25 किमी आहे.
अर्ध्या तासान उठलो. खूप फ्रेश वाटत होतं. आता इथून सरचू पर्यंत पूर्ण
पणे उतार होता. पण खराब रस्त्यामुळे त्या उताराचा पण काही फायदा झाला
नाही. सारखे ब्रेक दाबून दाबून सायकल ला झटके बसत होते. भीती वाटत होती
कि, एखादा नट बोल्ट तुटून बाहेर पडतो कि काय!! सर्व भर हातावरच होता.
हाताला पण चांगले झटके बसत होते.
भरतपूर पासून सहा किलोमीटर वरती किलिंग सराय आहे. नावच खूप भयानक आहे.
का ते माहित नाही. किलिंग सराय म्हणजेच हत्यारी सराय. हे एका मोठ्या
मैदानापाशी आहे. बीआरओ चे मुख्य ठिकाण आहे. राहण्याची आणि खाण्याची चांगली
सुविधा आहे. भरतपुर मध्ये जेवल्यामुळे इथे थांबलो नाही. किलिंग सराय पासून
सरचू १९ किलोमीटर आहे. रस्ता चांगला आहे. मधेच १ ते २ किमी खराब आहे.
कामगार जिथे रस्ता खराब आहे तिथे नीट करण्यासाठी रखडत होते. ह्याच
रस्त्यावरती सचिन भेटला. पंक्चर काढीत बसला होता. त्यांनी सांगितले कि,
मागच्या ब्रेक मध्ये प्रोब्लेम आहे. ब्रेक लागत नाही नीट. मी व्यवस्थित
बघितले तर, कैरियर बैग ब्रेक वरतीच आधांतरित होती. त्यामुळे ते ब्रेक ला
आपले काम करू देत नव्हते. त्याला म्हटले आता आपण काही करू शकत नाही. पुढे
सरचू ला गेल्यावर बघू. काय करायचे ते.
पुढे गेल्यावर मग अजिबात वळणे नाही. एकदम सरळ रस्ता. त्यात उतार..अजून काय पाहिजे.
जवळ जवळ १५ किलोमीटर सरचू पर्यंत असंच होतं. बराबरीन एक नदी वाहत होती.
किनाऱ्याला साचलेल्या माती मुळे ती अजूनच खोल वाटत होती. तिचे दोन्ही
किनारे मातीमुळे उभे राहिले होते. त्याच्या वरची वेग वेगळ्या आकृत्या तयार
झाल्या होत्या. खूपच वेगळ्या वाटत होत्या.
रस्ता सरळ का होतं तर ते एक मोठे मैदान होते. डोंगर हे लांब लांब होते.
त्यामुळे या मैदानावर्ती लोकांनी तंबू ठोकले होते आणि घरे बनवली होती
राहण्यासाठी. ७ वाजता सरचू ला पोहोचण्याचे ठरवले होते पण या मैदाना मुळे ६
लाच पोहोचलो.
इथे पण सचिन माझ्या पुढेच राहिला. सरचू च्या १ किलोमीटर अलीकडे भेटला.
म्हटला कि, खूप महाग आहे सरचू. इथे ५०० रुपयाला एक बिस्तर. इथे एकाच दुकान
होतं. मी म्हटलं हे सरचू नाहीच आहे. ह्या वळणामुळे आपण फसलो असेल. सरचू
पुढे आहे. कारण सरचू तर ह्या रस्त्यावरील महत्वाचा थांबा आहे. जसं आम्ही
पुढे गेलो तस आम्हाला खूप हॉटेल आणि दुकाने दिसली.
सरचू मानली पासून २२२ किमी दूर आहे. आणि इथून लेह २५२ किमी दूर. सरचू ला
मनाली ते लेह मार्गाचं मध्यबिंदू म्हणतात. ट्रकवाले, बसवाले इथे एक रात्र
थांबतात. एका हॉटेल मध्ये गेलो. २०० रुपये एका बिस्तर चे. खूप महाग वाटले.
पुढे गेल्यावर एका नेपाल्याच्या इथे १०० रुपयाला बिस्तर भेटले. तिथे जेवण
इतके खास होते कि, असे मी कुठे खाल्ले नव्हते. जिरा बटाटा, डाळ आणि लोणी
लावलेल्या रोट्या. सरचू समुद्र सपाटी पासून ४३०० मीटर उंची वरती आहे. तरी
पण गरम होत होते.
अंगावर चादर घेऊन झोपलो. पण झोप काही लागेना बाहेर तोंड काढले कि नाकाला
गार हवा लागायची. उंची वरती नाक कोरडे पडते. आणि चादर च्या आत डोके घेतले
तर कमी हवे मुळे श्वास कोंडायाचा.
रात्री ११ वाजता एक बस आली. रस्त्यामध्ये ती खराब झाली होती. म्हणून तिला
उशीर झाला. हॉटेल वाल्याने डाळ भात द्यायला मनाई केली. मग म्हस्का पाणी
लावल्यावर तो तयार झाला. वीस लोकांचे जेवण बनवलं. नंतर काही दुसरी कडे
झोपायला गेले. काही इथेच तंबू च्या बाहेर पडले. ज्याला जिथे जागा मिळेल
तो तिथे झोपला. त्यांच्यात एक जपानी पण होता. त्याने तिथेच बाहेरच्या बाहेर
जागा बनवली आणि चादर घेऊन झोपला. अश्या तऱ्हेने प्रवास मधला अजून एक दिवस
संपला.
 |
|
 |
| जिंगजिंगबार |
 |
| ह्या ओढ्याची रुंदी खूप मोठी होती. फोटो सचिन न काढला. |
 |
| खूप वेळ लागला हा ओढा पार करायला. |
 |
| ओढा पार केल्यानंतर पायाची मालिश. मागे काहीजण जण वरती चालले आहेत. ते आता चन्द्रताल ला जातील. |
 |
| ओढ्या मध्ये फसलेली गाडी |
 |
| बारालाचा-ला कडे |
 |
| मागे वळून बघितल्यावर |
 |
| बारालाचा च्या खूपच आधी पासून बर्फ सुरु झाला. |
 |
| मागे वळून बघितल्यावर |
 |
| एवढ्या अवघड ठिकाणी सायकल? लोक गाडी तून उतरून फोटो काढून घेत होती. |
 |
| मागे वळून बघितल्यावर |
 |
| सूरजताल चे पहिले दर्शन |
 |
| सूरजताल - इथून बारालाचा ३ किमी आहे. |
 |
| सूरजतालच्या बरोबरीन जाणारा रस्ता |
 |
| तुटलेले शेड |
 |
| लोकांचा फालतूपणा |
 |
| बारालाचा-ला |
 |
| बारालाचा नंतर भरतपूर पर्यंत असाच रस्ता आहे. |
 |
| भरतपुर जवळ एक तलाव |
 |
| सचिन पंक्चर काढताना |
 |
| सरळ धोपट उताराचा रस्ता |
 |
| ह्या अश्याच रस्त्यामुळे, एक तास आधी आम्ही सरचू ला पोहोचलो. |
 |
| ‘सरचू’ नदी |
 |
| नदी च्या कडेने अश्या आकृत्या बनल्या आहेत. |
 |
| रस्त्याच्या कडेने अश्या तंबूच्या खोल्या बनवल्या आहेत. खूप खर्चाचे आहे हे. |
 |
| सरचू च्या ६ किमी आधी. |
 |
| सरचू |
 |
| सरचू मध्ये सूर्यास्थ |
(क्रमशः)
दिवस आठवा
साडे आठला डोळे उघडले. सचिन माझ्या आधीच उठला होता. आज खूप मोठं अंतर
पार करायचं होतं. निदान पांग पर्यंत तरी पोहोचायचं होतं. पांग इथून ७८ किमी
दूर आहे. सरचू आणि पांग च्या मध्ये कुठेही खाण्याची आणि रहायची व्यवस्था
नाही. त्यातच दोन मोठे घाट पण पार करावे लागतात. जास्तकरून रस्ता हा चढाई
चा आहे. समझा जर मी आज ७८ किमी सायकल चालवू शकलो नाही, तर काय करायचं?
ह्या प्रश्नानि तर माझं डोकं खाल्लं. मग आजू बाजूला चौकशी केल्यावर कळलं
कि, व्हिस्की ओढ्या वरती राहायला भेटू शकत. व्हिस्की ओढा इथून ५२ किमी दूर
आहे. मला आज तर व्हिस्की ओढ्या पाशी पोहचण सुद्धा अशक्य वाटू लागलं.
त्यामुळे इथंच भरपूर खाऊन घेतलं तसेच सोबत ६ आलू पराठे बांधून घेतले.
दहा वाजता इथून निघालो. काल विचार केला होता कि, आपण सरचू मध्ये खूप
आराम करायचा. म्हणून आज उठायला उशीर केला. सरचू हे हिमाचल प्रदेश मध्ये
आहे. थोडे पुढे गेल्यावर जम्मू काश्मीर ची हद्द सुरु झाली. बघा आता !जम्मू
काश्मीर मध्ये पण लदाख!..
तसं भौगोलिक दृष्टीनं लदाख हे, बारलाचा पार केल्यानंतर सुरु होतं. पण
नकाश्यात इथून सुरु होतं. खर म्हणजे सरचू पासून सात ते आठ किमी पुढे एक पूल
आहे. ट्विंग ट्विंग पुल !! तीच हिमाचल आणि लदाख ची सीमा आहे. इथे लदाख
किवा जम्मू काश्मीरची स्वागत पाटी दिसली नाही. सरचू मनाली पासून २२२ किमी
दूर आहे. आणि लेह पासून २५२ किमी. तरी पण सरचू या रस्त्या वरचा मध्य बिंदू
आहे. त्यामुळे सरचू ला पोहोचलो कि, आपण अर्धे अंतर पार केलं असं समझायचं.
सरचू ज्या नदीच्या किनारी आहे त्याच्या दुसर्या बाजूला एक गाव वसलेले
आहे. बौद्ध लोक राहतात तिथे. गावाचे नाव मला आठवत नाही. खूप अडचणीच्या
ठिकाणी वसलेले आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय मेंढी पालनच आहे. पण त्या
गावाच्या आजूबाजूला १००-१०० किमी पर्यंत कोणतेच गाव नाही. त्यामुळे त्यांना
कोणी शेजारीच नाही. नदी वर पण पूल पण नाही. मग कसे ते, लोक नदी पार करत
असतील. लाईट आणि टेलिफोन चे तर विचारूच नका. ते गाव ट्विंग ट्विंग नदीच्या
बरोबर समोर आहे. म्हणून ते हिमाचल मध्ये आहे कि लदाख मध्ये सांगू शकत
नाही.
गाटा लूप सरचू पासून २४ किमी पुढे आहे तसेच २०० मीटर खाली. त्यामुळे
उतार होता. तरी पण पावणे तीन तास लागले तिथे पोहोचायला. त्याच वेळेस दिल्ली
हून लेह ला जाणारी बस पण निघाली होती. रस्त्यांनी इतके सुंदर नजारे
पाहायला मिळत होते कि सारखे थांबायला लागायचे, फोटो काढण्यासाठी. तसं
पाहायला गेलं तर पांग मध्ये पोहोचायला पाहिजे होतं. पण पोहोचू शकणार
नव्हतो. त्यामुळे मध्येच तंबू ठोकायला लागणार हे पक्के होते. पांग मध्ये
पोहोचणारच नाही तर घाई कशाला!! म्हणून मजेत रमत गमत निसर्गाने केलेली
सौंदर्याची उधळण बघत चाललो होतो.
रस्त्यात दोन ओढे भेटले. दोघान वरती पूल होते. ब्राण्डी ओढा आणि
व्हिस्की ओढा !! जेव्हा व्हिस्की पूल आला तेव्हा मनामध्ये प्रश्न येणं
स्वाभाविक होतं कारण हा ओढा नकी-ला च्या पुढे आहे. मग इथ कसा काय? पण याच
उत्तर कोण देणार. ते तर आपल्यालाच शोधायचं होतं.
पावणे एक वाजता तिथ पोहोचलो जिथ गाटा लूप सुरु होतो. लूप म्हणजे वळणा
वळणाचा रस्ता. सचिन पण तिथे होता. त्याने मला बघितल्या बघितल्या कौतुक केलं
कि, आज तर तू खूप जोरात आहेस. मी म्हटलं,"भाऊ हा तर उतार होता म्हणून.
इथून पुढे बघ किती जोरात जातो ते."
आता गाटा लूप ची चढाई सुरु होणार आहे. जवळ जवळ २१ वळणे आहेत. आणि अंतर १०
किमी. पहिल वळण ४२०१ मीटर वर आणि शेवटचे वळण ४६६७ मीटर वर. गाटा लूप ची
चढाई नकीला-ला पार करण्यासाठी करणार होतो.
जेव्हा आम्ही गाटा लूप ची चढाई सुरु केली तेव्हा चारी बाजूनी ढग होते. उन
अजिबात नव्हते. थंड गार हवा सुटली होती. कधी कधी पावसाचे दोन चार थेंब पण
अंगावर पडायचे. वरती पहिले तर नकी-ला जवळ काळ्या ढंगाची गर्दी होती. वाटले
वरती नक्कीच बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
पोटामध्ये दबाव वाढला होता. आजूबाजूला कुठेच पाणी नव्हते. विचार केला कि
पुढे पाणी भेटल्यावर दबाव सैल करू. पण कसले काय ! पुढे गेल्यावर पोट खूप
दुखू लागले. मग बिना पाण्याचेच हलके व्हावे लागले. असल्या प्रवासात शुद्ध
व अशुद्ध चा फरक करायचा नसतो.
इथे पण गाड्या वाल्यांनी शौर्त कट मारले होते. अश्याच एका छोट्या
रस्त्यातून सुमो उतरताना दिसली. आम्ही पण त्याच रस्त्यांनी जायचे ठरवले. पण
नंतर कळले कि नको रे बाबा तो शॉर्ट कट.
गाटा लूप वर चढाई च चढाई आहे. अश्याच एका ठिकाणी आम्ही दगडाला टेकून आराम करत होतो.
तितक्यात एक कार समोर येउन थांबली. कारच्या खिडकीतून एका म्हताराने तोंड
बाहेर काढले. आणि डोळ्याला कॅमेरा लावून म्हटला कि, "अरे ओये, जरा सामने
आना."
चढाई मुळे डोकं गरम झालं होतं. त्यात ह्याची गुर्मी ची भाषा ऐकून अजून गरम
झालं. तरी म्हंटल म्हातार्याची इज्जत करावी. म्हणून मी त्याच्या समोर गेलो.
मोठ्या आवाजात म्हणाला, "तुम्हारा क्या करूंगा मैं? साइकिल लेकर आओ."
त्याची हि भाषा ऐकून इतका राग आला कि, खालचा दगड घेऊन ह्याच्या डोक्यात
घालावा. पण तेवढी शक्ती पण अंगात नव्हती. मी आपला परत आहे त्याच जागेवर
येउन बसलो.
परत म्हटला, "अरे, तुम्हें सुनता नहीं क्या?"
मी म्हटले, " बाबा, पहिली गाडी बाजूला लावा. खाली उतरून माझ्या जवळ या. हाथ
मिळवा. विचारपूस करा. मग फोटो काढायची परवानगी मागा. तुझ्या फोटो मध्ये
येण्यासाठी आम्ही कष्ट करत नाहीत."
खाली उतरून माझ्याजवळ यायची त्याची ताकत नव्हती. थंडगार वारा सुटला होता. त्याने तोंडातच बडबड करत काच वर घेतली.
पावणे दोन वाजता बाराव्या वळणावर जेवण करायला थाबलो. उंची होती ४३६८
मीटर . मोकळी जागा होती. बसायची पण व्यवस्था होती. दोघांनी एक एक पराठा
खाल्ला. आता उन पडले होते. दोघे जन तिथेच झोपलो. नंतर ढगांचा गडगडाताने जाग
आली. वरती पर्वतावरती पाउस पडत होता. पावणे तीन वाजता निघालो.
गाटा लूप ला चार वाजे पर्यंत पार केलं. वळणे जरी संपली असली तरी चढाई
अजून बाकी होती. जसा आम्ही नकी-ला च्या दिशेन चाललो होतो तसे ढग पण गडद होऊ
लागले. पाउस पडण्याची शक्यता जास्त होती. रस्त्यात एक शेड दिसलं. पण
त्याचा काही उपयोग नव्हता. उन पावसापासून संरक्षण देणार नव्हत.
आम्ही आता तंबू लावण्यासाठी जागा शोधू लागलो. समोरून इतकी जोरात हवा येत
होती कि सायकल चालवणे पण कठीण झाले होते. आम्हाला अशी जागा पाहिजे होती कि
जिथे हवा कमी लागेल आणि पाउस लागणार नाही.
शेवटी अशी जागा मिळाली पण मन तयार होत नव्हते. म्हटलं पुढे जाऊन बघू या
रस्ता कसा आहे ते. पुढच्या वळणावर गेल्यावर पाहिले तर अजून चढाईची रस्ता
होता. परत आम्ही मागे आलो. मग रस्त्याच्या खाली उतरलो तर तिथे आधीच्या तंबू
लावलेल्या खुणा होत्या. विझलेली चूल आणि दारूच्या बाटल्या होत्या.
व्हिस्की पूल संपल्यानंतर आम्हाला पाणी भेटले नव्हते. बाटली मधला शेवटचा
घोट पण संपला होता. अश्या वेळेस पाणी मिळवायची कल्पना मला माहिती आहे. एक
गाडी थांबवली आणि एक बाटली पाणी घेतले. आता रात्रभर काळजी नव्हती. जसा
तंबू लावला सामानासहित आम्ही त्यात घुसलो.
बाहेर पाउस पडू लागला. चार पराठे अजून शिल्लक होते. दोन खाल्ले दोन सकाळी
ठेवले. आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या उंचीवर झोपत होतो. ४७०० मीटर (१५४१९
फुट) वर. एवढ्या उंचीवर अश्या हवामानात आणि अश्या रात्री भीती तर खूप वाटत
होती. सचिन सोबत होता म्हणून काही वाटलं नाही.
"रात्र ती वै-याची होती......
ये- जा करणार्यांची ती वाट
आज जणू ओसाड होती..
नव्हती होत हिम्मत कोणाची
ती रात्र वै-याची होती....."
दिवस नववा
सकाळी आठ ला उठलो. बाहेर कसला तरी आवाज येत होता. दोन मोटारसायकली आणि
दोन कार थांबल्या होत्या. आणि पर्यटक आमच्या तंबू पाशी येउन फोटो काढत
होते. काल संकटाच्या परिस्थिती मध्ये तंबू इथे लावावा लागला होता. मागे ३४
किलोमीटर सरचू आणि पुढे ११ किलोमीटर व्हिस्की ओढा इथेच लोकांची वस्ती आहे.
अश्या सुमसाम जागे मध्ये, आमचा तंबू म्हणजे एक आकर्षण केंद्र होतं. हि लोक
रोहतक ची होती.
मी निघायच्या आधी गुगल मैप वरून रस्त्या मधले अंतर आणि उंची लिहून ठेवलं
होतं. नकी-ला चे अंतर आणि उंची लिहून ठेवायचे राहून गेले होते. मी लिहून
ठेवलं कि, गाटा लूप (४७००) आणि त्या पुढे २ किमी (४७४०) मीटर वर नकी-ला
आहे. त्यानंतर पुढे लिहून ठेवलं कि, नकी-ला च्या 19 किलोमीटर च्या पुढे
५०६० मीटर उंचीवर लाचुलुंग-ला आहे. या माहितीच्या आधारे नकी-ला पार केल्या
नंतर थोडा उतार आहे का सरळ लाचुलुंग-ला पर्यंत चढाई आहे.
काल जेव्हा आम्ही गाटा लूप पार केल्यानंतर, ३ किमी पुढे आलो तेव्हा आम्हाला
नकी-ला दिसलेच नाही. आम्हाला वाटलं कि, नकी-ला मागं गेलं आहे आणि
लाचुलुंग-ला ची चढाई सुरु झाली आहे. पण तसं नव्हतं. प्रत्यक्षात नकी-ला
अजून आलाच नव्हता. मी चुकीची माहिती लिहून ठेवली होती.
पावणे दहा वाजता आम्ही येथून निघालो. सर्व सामान सायकल वर बाधण्यासाठी
आणि सायकल रस्त्यावर चढवण्यासाठी आमचा पार जीव गेला. हा एक उच्च पर्वतीय
आजार आहे. थोडा काम केलं तरी दम लागतो. सचिनची पण हीच अवस्था होती.
नेहमी सारखंच सचिन आमच्या पुढे निघून गेला. चढ हा हळू हळू वरच्या बाजूने
वाढत चालला होता. मला सायकल चालवायला त्रास होत होता. तरी रस्ता चांगला
बनविलेला होता. चढ पण फारसा काही तीव्र नव्हता. तरी पण चार पैन्दल मारले
कि, गुड्खे दुखायचे. पाणी पण संपलं होतं. रस्त्या च्या दोन्ही बाजूनी
गाड्या चालल्या होत्या पण कुणाला मागायची हिम्मत झाली नाही.
जेव्हा ४८०० मीटर पार केलं. तेव्हा वाटलं होतं कि, नकी-ला मागे गेलं
आहे. आणि आता लाचुलुंग-ला (५०६०) पार करायचे आहे. पण माझे सगळे आकडे खोटे
ठरले होते. कारण नकी-ला आजून यायचे आहे.
सायकल पुढे चालवता येईना म्हणून खाली उतरून पायाने चालू लागलो. पैन्दल
मारण्यापेक्षा सायकल ढकलीत चालण्यातच मजा वाटत होती. काल रात्री पाउस झाला
तेव्हा वाटले कि, असं होत असेल कारण हिमालयात दुपारी ३ नंतर हवामान खराब
होतं. त्यामुळेच पाउस पडला असेल. पण सकाळी असच हवामान बघितलं,तेव्हा मनात
शंखेची पाल चूक चुकली. हि हिमालयाच्या पुढची जमीन आहे. पण का माहित हे एवढे
ढग चुकून कसे इकडे आले. आणि आता जायचे तर नावच घेत नाही. ढग नुसते जमून
आले होते पण पाउस जास्त पडत नव्हता. पण जोरात थंड वाऱ्याने नाकी नऊ आणले
होते. दोन दिवसापूर्वी उन्हाने त्रास दिला होतं. तेव्हा देव जवळ पार्थना
केली कि उन जाऊदे. देवाने माझे ऐकले. उन गायब. मला आधीच कळाले असते कि,
देवा जवळ उन्हा साठी पर्याय फक्त थंड वारा आहे. तर मी प्रार्थना केलीच
नसती. ढग किती पण पाठवून दे पण जोराचा थंड वारा नको.
एक छोटा झरा भेटला. खूप पाणी प्यायलो. नमकीन खाल्लं. अर्धा तास तिथेच
थांबलो. बारा वाजता उठून निघालो तर श्वास घ्यायचा त्रास सुरु झाला. आराम
केल्यानंतर पायांनीच निघालो. नकी-ला ची उंची ४९३० मीटर आहे. इथून पुढे लांब
पर्यंत रस्ता दिसत होता. रस्ता पुढे जाऊन एका ओढ्या पाशी उतरत होता. आणि
नंतर वरती चढून एका घाटात गायब झाला होता. मी ओळखून चुकलो कि पुढे
लाचुलुंग-ला आहे. मग ओढा पार केल्यानंतर काही तंबू दिसले. हा ओढा म्हणजे
व्हिस्की ओढा आहे. काल पण आम्ही हाच व्हिस्की ओढा पार केला होता.
खर म्हणजे लाचुलुंग-ला मधून व्हिस्की ओढा सुरु होतो. आणि पुढे जाऊन सरचू
नदी मध्ये मिसळतो. लाचुलुंग-ला पार करून पांग ला जाऊ शकतो त्यासाठी रस्ता
व्हिस्की ओढा बरोबरीने वरती गेला पाहिजे होता. पण व्हिस्की ओढा हा खूप
खड्या मध्ये आहे. त्याच्या बरोबरीने रस्ता बनवणे अवघड आहे. म्हणून दोन वेळा
पूल बनवून त्यांनी सोपी पद्धत वापरली.
जिथे गाटा लूप आहे तिथे डोंगर जास्त सरळ उंच नाही. थोडासा पसरट आहे.
त्यामुळे एकावर एक असे २१ लूप (वळण) बनवले आहेत. जेवढे वरती गेलो तेवढं
उतार पण कमी होत गेला. गाटा लूप चा चमत्कार असा आहे कि, रस्ता मात्र खूप
उंच होत गेला. मात्र व्हिस्की ओढा खड्यातच वाहत राहिला. गाटा लूप नंतर
रस्ता उंच होत गेला. व्हिस्की ओढा खालीच राहिला. नकी-ला नंतर रस्ता खाली
उतरला आणि चार पांच किलोमीटर नंतर व्हिस्की ओढा आणि रस्ता परत मिळाला.
खर तर नकी-ला हा खरच नकली आहे. आहे तर घाट. पण घाटाची ओळख काय असते तर
दोन्ही बाजूला असणारा त्याचा उतार. पण कधी कधी ह्याला अपवाद पण असतात. घाट
ओळखायची सोपी खुण अशी आहे कि त्याच्या दोन्ही किनाऱ्या वरून वेग वेगळे ओढे
निघतात. हे ओढे पुढे जाऊन कोणत्या तरी, नदीला जाऊन मिळतात किवा स्वतः नदी
बनतात. पण नकी-ला पासून कोणताच ओढा निघत नाही. तुम्ही खाली जाऊन वाकून
पहिले तर व्हिस्की ओढा हा नकी-ला च्या दोन्ही बाजूनी आहे. फक्त रस्ता वरती
गेलाय आणि खाली उतरलाय. जर थोडे डोकं वापरला असता तर खाली उतरायची गरजच
पडली नसती. आणि हो..चढाई नंतर जर उतार आला तर अश्या प्रत्येक घाटाला घाट
म्हणत नाहीत. नकी-ला घाट हा खरच नकली घाट आहे.
हा रस्ता कधी बनला ते माहित नाही पण भारताला स्वतंत्रता मिळाल्या नंतर
बनला आहे हे निश्चित. त्याच्या आधी पासून इथे ये जा असायची. व्यापार पण
व्हायचा. तेव्हा पायवाट होती. ती अजूनही इथे दिसते. जेव्हा तुम्ही गाटा लूप
वरती असता तेव्हा व्हिस्की ओढ्याच्या दुसर्या बाजूने एक पायवाटे ची रेषा
बरोबरीन वरती चढताना दिसते. ती रेषा लाचुलुंग-ला पर्यंत जाताना दिसते.
त्यामुळे त्या जमान्यात गाटा लूप चे काही अस्तित्व नव्हते. नाही नकी-ला चे
!! रस्ता बनल्या मुळे पायवाटेच आस्तित्व संपलं. पण कमी पावसामुळे पायवाट
पुसली नाही. कधी दरड कोसळल्याने किवा कधी माती पडल्याने तिचे आस्तित्व
काही ठिकाणी गायब झाले असले तरी अजून सुद्धा, त्या पायवाटेच्या खुणा तिथे
आहेत.
नकी-ला नंतर रस्ता खराब होत जातो. वरून पावसाचे थेंब पण पडत होते. अश्या
हवामानात साडे चार किलोमीटर खालच्या तंबू पर्यंत सायकल चालवावी लागली.
सचिन तिथेच भेटला. तंबू चा मालक लद्दाखी होता. त्याचे नाव सेरिंग सेन्दुप.
त्याने एका छोट्या तंबू मध्ये सायकल लावली. त्यामुळे सामान भिजल्या पासून
वाचले. मी इथे पावणे एक ला पोहोचलो होतो. अर्ध्या तासानंतर पाउस पडायचा
थांबेल असे वाटले होते. सचिन ने तर ठरवलं होत कि हवामान कसे हि असू, इथून
दोन वाजता निघणार म्हणजे निघणार. पण मी तयार नव्हतो. याचं कारण इथून पुढे ६
किमी वरती लाचुलुंग-ला आहे. ज्याची उंची ५०६० मीटर उंच आहे. नकी-ला पार
करायलाच जीव गेला आणि आता अजून पुढे वरती चढायचे आहे. नको रे बाबा !! आणि
दुसरं कारण म्हणजे हवामान. पाउस पडायचा भले हि थांबला असेल पण आकाशात
काळ्या ढगांनी गर्दी केली होती. त्यातच जोराचा थंड वारा वाहत होता. परत कधी
पण पाउस पडायची शक्यता होती. आणि ५००० मीटर उंचीवर भिजायचे परिणाम मला
चांगले ठाऊक आहेत. मी बरोबर कधी हि औषधे ठेवत नाही. मग मी मुद्दामून असं
काम का करू कि, मला औषधे घ्यावी लागतील. म्हणून मी आज इथेच थांबणार!! उद्या
पांग ला जाणार. आज फक्त ११ किलोमिटरच सायकल चालवली. पण त्याचे काही मला
दुख नव्हते.
सचिन आज पांग ला पोहोचेल. मी जेव्हा उद्या पांग ला पोहोचेल तेव्हा सचिन
डेबरिंग ला पोहोचलेला असेल. त्यामुळे एक दिवसांनी तो माझ्या पुढे होईल.
आमची भेट आता लेह मधेच होईल. व्हिस्की ओढ्या वरती मी एकटाच यात्रेकरू आहे.
सेरिंग नि सांगितलं कि काल पूर्ण तंबू भरला होता. एकटा यात्री असलं कि, खूप
मज्जा असते. आपण फक्त आदेश सोडायचे, बाकीच्यांनी त्याचे पालन करायचे.
तुम्ही किचन ओट्यावरती पण मांडी खालून बसू शकता. स्वतः तव्यावर्ती रोट्या
भाजू शकता. आपल्या हातानी कुकर मधला डाळ भात घेऊ शकता. मुख्य म्हणजे आपल्या
शेजारी लद्दाखी बसला आहे, त्याच्याशी घर कुटुंबाची , लाख-दुनियाची गोष्टी
करू शकता आणि शेवटी शुभरात्रि म्हणून गाड्यांच्या ढिगा वरती चादर घेऊन
झोपू शकता.
काल ३७ आणि आज फक्त ११ च किमी सायकल चालवली.
 |
|
 |
|
 |
|
आठव्या दिवसाची क्षणचित्रे
 |
| सरचू वरून निघाल्यावर.. |
 |
| हा ट्विंग ट्विंग ओढा आहे. हिमाचल आणि लढाख ची सीमारेषा |
 |
| सरचू नदीच्या पडयाल चे गाव |
 |
| लढाख ची जीवनरेषा !! हजारो ट्रक दिवसभरात ये जा करतात. |
 |
| ब्राण्डी ओढ्यावरती बांधलेला पूल. |
 |
| व्हिस्की पुल |
 |
| असा नजारा तर.. लढाख ची खरी ओळख आहे. |
 |
| रस्ता तयार करणारे कामगार जेवण करताना. |
 |
| मातीने बनलेली वेगळी आकृती. हिचा दुसर्या बाजूने घेतलेला फोटो खाली आहे. |
 |
| हीच आकृती जी वर दाखवली होती. |
 |
| दिल्लीवरून लेह ला जाणारी बस. |
 |
| इथून गाटा लूप सुरु होतो. |
 |
| सरचू नदीचं शेवटच दर्शन. पुढे जाऊन हि जांस्कर नदीला मिळते. |
 |
| गाटा लूप |
 |
ओळखलत का सर मला? - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. |
 |
| वातावरण खरब होत चाललय. |
 |
| गाटा लूप(वळण) च विसाव्व वळण |
 |
| हवेमुळे डोंगराची झालेली झीज, याचे हे एक उत्तम उदाहरण. |
 |
| ठोकला इथे तंबू !! |
 |
| वीराने में लगा अपना आशियाना। |
नवव्या दिवसाची क्षणचित्रे
 |
| तंबू मध्ये सचिन!! |
 |
| नकी-ला कडे |
 |
| नकी-ला ला मी नकलीच म्हणतो. |
 |
| हा जो रस्ता
हा लांबवर दिसतोय, तो रस्ता पुढे व्हिस्की ओढ्या पाशी उतरून पुढे वरती
डोंगरावर चढून लाचुलुंग-ला घाटात गायब झालाय. |
 |
| इथून व्हिस्की ओढा, त्याच्या बरोबरीने तंबू आणि जो रस्ता वरती जात आहे तिकडे लाचुलुंग-ला आहे. ५०६० मीटर वर. |
 |
| व्हिस्की ओढ्यावर |
 |
| सचिन आकाश्या कडे बघताना कि, पुढे जाऊ कि नको. |
(क्रमशः)
दिवस दहावा
व्हिस्की ओढा आणि ब्राण्डी ओढा. यांची नावे ऐकून मला उत्सुकता लागली
कि, ह्यांची नावे अशी का बर पडली असावीत. चौकशी केल्यावर कळले कि, या
ठिकाणी व्हिस्की व ब्राण्डी चे ट्रक पलटी झाले होते. म्हणून यांना हि नावे
पडली. हा रस्ता २० ते २५ वर्ष्यापासून अस्तित्वात आहे. त्या आधी पायवाट
होती. म्हणजे ट्रक २० ते २५ वर्ष्या पासून जात असतील. आता हा शोध लावायला
पाहिजे कि . पायवाटेच्या जमान्यात पण व्हिस्की ओढ्याला काय व्हिस्की ओढाच
म्हणत होते.
झोपायची कोणतीच पर्वा केली नाही. जेव्हा शरीर म्हणायचं , ये उठ हिंडफिऱ्या. तेव्हा लगेच उठायचो.
कोणतीच जबरदस्ति नाही. साडे आठ वाजता डोळे उघडले. बाहेर येउन पाहिले तर ढग
होते आणि हवा पण. कसला पावसाला आलाय? जेव्हा मी ४ जून ला दिल्लीवरून
निघालो तेव्हा पाउस केरल ला येउन धडकला होता. एवढ्या आठ ते नऊ दिवसात
त्यांनी हिमालय पार केला? कठीण आहे बाबा. पाच दिवसापूर्वी जेव्हा मी केलांग
मध्ये होतो तेव्हा घरच्या बरोबर बोललो होतो. तेव्हा पावसाला उत्तर भारतात
अजून आला नव्हता. पाच दिवसात मान्सून उत्तर भारत व्यापून टाकण, त्याच
हिमालयात येणं आणि हिमालय पार करण. अशक्य !! हे दुसरंच काहीतरी आहे.
जेव्हा 10 वाजता इथून निघालो होतो तेव्हा सेरिंग साहेबांनी चोगलमसर इथे
असणाऱ्या घराचा पत्ता आणि फोन नंबर दिला होता. मी दिल्लीत अधिकारी. त्यांना
पण, त्यांच्या आठवीत शिकणाऱ्या मुलाला माझ्यासारखे बनवायचे होते. त्यामुळे
ते त्यांच्या घरी मला बोलावत होते. त्यावेळी ते त्यांचा घरी नसतील पण
घरातील सदस्य असतील. अश्या वेळेस त्यांच्या घरी जाणे बरोबर वाटत नाहीय. मी
तर जाणारच नाही.
व्हिस्की ओढा पार करण्या साठी एक छोटासा पूल बनवलेला आहे. पुलावरून
पाणी वाहत होतं. पण काही वाटले नाही. आरामशीर ओढा पार केला. आता पर्यंत
किती तरी ओढे पार केले पण काही जाणवले नाही. व्हिस्की ओढयापाशी होतो तेव्हा
असा ऐकलं होतं कि, पांग च्या आधी एक जोरात वाहणारा ओढा लागतो. जेव्हा मी
सारचू मध्ये होतो तेव्हा एक गाडी रात्री उशिरा आली, ते पण याच ओढ्या मध्ये
फसल्याने त्यांना उशीर झाला होता. हे ऐकून तर मला घामच फुटला. आता त्या
ओढ्याची भेट लवकरच होणार आहे.
व्हिस्की ओढ्याचा पूल ४७३७ मीटर उंचीवर आहे. इथून ६ किमी वरती
लाचुलुंग-ला आहे. ५०६० मीटर वरती. ४७३७ मीटर वरती झोपल्या मुळे हा फायदा
झाला कि, न थकता, न पायाने चालता लाचुलुंग-ला पोहोचलो. रस्त्यात प्रत्येक
ठिकाणी झारखण्डी लोक भेटली. झारखण्डी असून सुद्धा जुले म्हणून अभिनंदन करत
होती. लाचुलुंग-ला हा मनाली लेह रस्त्यावरच्या पाच घाटा पैकी २ नंबरचा उंच
घाट आहे. माझ्या मोबाईल मध्ये याची उंची ५०४७ मीटर उंच. आयुष्यात
दुसर्यांदा ५००० मीटर वरच्या उंची वर चढलो. ह्या आधी श्रीखण्ड महादेव ला
गेलो होतो तेव्हा ५२०० मीटर वर चढलो होतो. आता हे रेकॉर्ड पण तुटणार आहे
कारण ह्याच रस्त्यावरती तंगलंग-ला ५३०० मीटर उंच आहे.
घाट हे नेहमीच देवाचे स्थान राहिले आहे. इथले स्थानिक लोक तसेच
व्यापारी कित्तेक वर्ष्या पासून पार करत आलेत. त्यांचा असा विश्वास आहे
कि, इथे एक देव बसलेला असतो. तो यात्रेकरूना सुरक्षित स्थळी पोहचवतो.
त्यामुळे घाटावरती छोटे छोटे मंदिर,झेंडे आणि पताका असतात. इथे पण एक छोटे
देवाचे मंदिर होते. चारी बाजूनी प्रार्थना लिहिलेले झेंडेच झेंडे होते. आत
जाऊन पाया पडायला गेलो तर कळले कि, ते महादेवाचे मंदिर होते.
बारा वाजता इथून निघालो. २२ किमी पांग पर्यंत उताराच आहे. पण रस्ता खूप
खराब. लाचुलुंग-ला वरून खाली आलो तर जोराचा पाउस सुरु झाला. मी लगेच रेनकोट
काढला आणि सामानाला पण कवर घातला. एक परदेशी पण मोटारसायकल वरून पांग ला
चालला होता. मला बघून म्हणाला कि, आर यू ओके? मी म्हटला, या या, ओके। बहुत
बढिया। थैंक्यू।
दोन वाजता कंगलाजल ला पोहोचलो. ते ४६९४ मीटर उंच आहे. इथे लाचुलुंग-ला
वरून येणार ओढा पार करावा लागतो. एकदम निमुळत्या जागेतून वाहत येतो.
ह्याच्या दोन्ही बाजूला मोठ मोठे पर्वत आहेत आणि ओढ्यावरती पूल पण नाही.
झारखण्डी कामगार इथे काम करत होते. हाच तो ओढा आहे. त्याच्या बद्दल मी सरचू
मध्ये ऐकले होते. पण आज पाणी खूप कमी होतं. मी सायकल वरून न उतरताच ओढा
पार केला. जेव्हा दिवसा खूप उन पडतं. तेव्हा बर्फ वितळून ओढ्याला खूप पाणी
येत. आज उन नव्हतेच, त्यामुळे बर्फ वितळला नाही. पावसाळ्यात जेव्हा जोराचा
पाउस पडतो. तेव्हा हेच ओढे रुद्ररूप धारण करतात. त्यांच्यात ट्रक वाहून
नेण्याची पण क्षमता असते.
कंगला जल च्या जवळ सरळ उभे पर्वत आहेत. रस्ता त्यांच्या बरोबरीनच पुढे जातो. सारखे मागे वळून बघतो तेव्हा खूप भयानक दिसतात ते पर्वत.
तीन वाजता पांग मध्ये पोहोचलो. सरचू नंतर हेच मोठे ठिकाण आहे. इथे भरपूर
होटल आहेत. जास्त करून महिलाच चालवतात. जसं मी पुढे चाललो तसा एका महिलेन
आवाज मारला, "सर, यहां आ जाओ"
शेवटी मला इथे थांबयाचेच होते म्हणून थांबलो. संघ्याकाळ होत नाही तोपर्यंत
अजून दोघेजण आले. ते मनाली चे टूर संचालक होते. २५००० रुपये घेऊन
मोटारसायकल वरून लेह फिरून आणतात.
नंतर दोन तीर्थ यात्रेकरू आले. ते स्पीति मधले शगनाम गाव चे रहिवाशी होते.
लेह ला चालले होते. हॉटेल च्या मालकिणीन मग दारू आणली. बौद्ध भिक्षु लोक
दारू ला हाथ सुद्धा लावत नाही. इथे मात्र जोरात चालू होते. पूर्ण हिमालयात
दारू म्हणजे साधी गोष्ट आहे. शेती जास्त प्रमाणात होत नाही म्हणून मांस
जास्त खातात. लद्दाख सारख्या ठिकाणी तर हे गरजेचं आहे. ते तिघे यात्रेकरू
होते. तिसरा शेजारच्या तंबू मध्ये खात पीत होता. त्यानंतर नाच गाणी सुरु
झाली. एक गोलाकार चक्कर मारून नाच सुरु झाला. ती बाई इतके हळू हळू पाय
उचलीत होती कि जशी काय झोपली नाचता नाचता. मी पण एक तास कार्यक्रम पाहिला
आणि झोपायला गेलो.
आज २८ किमी सायकल चालवली.
 |
|
 |
| व्हिस्की नाला |
 |
| लाचुलुंग-ला ला आता पोहोचणार आहे. |
 |
| लाचुलुंग-ला |
 |
| लाचुलुंग-ला च्या पुढे पांग कडे जाताना |
 |
| कंगला जल |
 |
| बी,आर,ओ चे कामगार |
 |
| लाचुलुंग-ला नंतर पांग पर्यंत उतार आहे. पण रस्ता खूप खराब आहे. |
 |
| जमिनी मधला बदल. |
 |
| जगा वेगळ्या आकृत्या. |
 |
| अश्या आकृत्या बनण्यासाठी पाण्या बरोबरच हवेचा खूप मोठा हाथ असतो. |
 |
| पांग |
(क्रमशः)
दिवस अकरावा
सकाळी साडे सातला डोळे उघडले. हॉटेल च्या मालकिणीने "जुले जुले" म्हणून
आमचा स्वागत केलं. आता मी "जुले जुले" च्या धरतीत प्रवेश केलाय त्यामुळे
मला पण हीच परंपरा शिकावी लागणार आहे.
सायकल वरती सामान बांधत होतो तितक्यात स्पीति वाले तीर्थ यात्री आले.
त्यातील एकाचं नाव रणजीत सिंह होतं. बौद्ध नाव दुसरेच आहे. त्यांचे वडील
पंजाबी होते म्हणून रणजीत हे नाव ठेवलं. पिन घाटी मध्ये शगनम या आपल्या
गावी ते ट्रैकिंग करतात. त्यांनी आमंत्रण दिला कि, पिन-पार्वती पास किवां
भाभा पास पासी, जर ट्रैकिंग करायची असेल, तर या आमच्या घरी. आता मी खालच्या
भागात राहणारा माणूस पिन-पार्वती किंवा भाभा पास ला ट्रैकिंग करायला शगनम
कशाला जाईल? सगळे लोक मणिकर्ण या किन्नौर वरून ट्रैक सुरु करतात आणि मुद
मध्ये संपवतात. असं उलट डोकं कुणी सांगितलंय चालवायला?
नौ वाजता पांग मधून बाहेर पडलो. पांग 4486 मीटर उंचावर आहे. आज चा
लक्ष्य 52 किलोमीटर लांब 4800 मीटर वरील डेबरिंग.. कारण उद्या तंगलंग-ला
पार करायचे होते. पांग वरून निघताक्षणिक चढाई चा सामना करावा लागला. गूगल
मैप वर बघितलं तर कळलं कि थोडी सी चढाई आहे. त्यानंतर मोरे चं सपाट मैदान
येणार आहे. हीच थोडी सी चढाई पांच किलोमीटर पर्यंत ताणली गेली. बरोबर दीड
तासात खूप ऊर्जा पण गेऊन गेली. ह्यावर चढून जेव्हा 4745 मीटर वर पोहोचलो
तर समोर पाहिले तर मोठ्ठं मैदान आणि सरळ रस्ता दिसत होता. आता पाय पैडल
मारायला आणि हाथ गियर टाकायला पुढे सरसावले.
मोरे मैदान ची रुंदी जास्त नाही पण लांबीला 60 किलोमीटर लांब तंगलंग-ला
च्या खालपर्यंत पसरलेलं आहे. डेबरिंग ला जाणारा रस्ता ह्याच मैदानं मधून
जातो. त्यानंतर रस्ता तंगलंग-ला पार करण्यासाठी वरती चढतो आणि मैदान खाली
राहत. ह्याच मैदानाच्या एका बाजूला पांग आहे तर दूसरी बाजूला तंगलंग-ला.
पांग 4486 मीटरच्या ऊंचाई वरती आहे तर तंगलंग-ला 5300 मीटर वर. साहजिकच,
मैदानाचा उतार हा पांग च्या बाजूला पाहिजे. पण तसा नाहीय तंगलंग-ला च्या
बाजूला आहे. हा उतार शो-कार मोड पर्यंतच राहतो मग हेच मैदान चढाई सारखा
होता.
खरं म्हणजे मोरे मैदान हे एक २ किमी रुंदी असलेलं नदीपात्र आहे. लद्दाख
मध्ये पाउस जास्त पडत नसल्याने ते कोरडेच आहे. पूर्ण रस्ता हा ह्याच
मैदानाच्या उजव्या बाजूने जात राहतो. हा रस्ता पांग च्या वरच्या बाजूने
सुरु होतो तिथे ह्याची ऊंचाई 4745 मीटर आहे. नंतर 36 किलोमीटर लांब शो-कार
मोड वर ह्याच रस्त्याची उंची 4627 मीटर आहे त्यानंतर थोडीसी चढाई सुरु
होते. नंतर 8 किलोमीटर वरती डेबरिंग आहे तिथे ह्या रस्त्याची उंची 4800
मीटर आहे. मग तंगलंग-ला. नंतर मी शो-कार पण गेलो होतो.तो 4530 मीटर वर आहे
शो-कार (Tso Kar) एक तलाव आहे. जो मनाली-लेह रस्त्यापासून बाजूला 20
किलोमीटर वरती आहे. ह्या गोष्टीवरून एक स्पष्ट होतं कि नदी पांग च्या
बाजूने येते. दूसरी तंगलंग-ला च्या बाजूने. शो-कार मोड वरती दोन्ही नद्या
भेटतात व नंतर शो-कार तलाव मध्ये जाऊन मिळतात. हां, ती गोष्ट वेगळी आहे
कि, या नद्या पावसाळी आहेत आणि इथे पाउस हा दुर्मिळ आहे. पाणी नसल्याने
नद्या आटल्यात त्यामुळे मैदानंसारख्या दिसतात. उतार असेन आणि त्यात रस्ता
शानदार बनलेला असेल तर सायकल चं वेग हा काय विचारायलाच नको. मध्ये मध्ये
पूल येतात त्याने एकरूपता भंग पाऊन ब्रेक मारावे लागत होते.
शो-कार च्या 15 किलोमीटर अलीकडेच खराब रस्ता सुरु होतो. एवढा पण खराब
नाहीय, पण रस्त्या मध्ये बारीक खडे खूप आहेत. अश्या रस्त्या मधून जोरात
सायकल चालवताना,सायकल पंक्चर होण्याची भीती असते.
एक ब्रिटिश सायकल वाला भेटला. त्याने म्हटलं, - हाय! हाऊ आर यू? मला कोणी
असे "हाऊ आर यू" विचारले तर माझ्या तोंडातून एकच शब्द निघतो. - मस्त.
इथे पण तेच सांगितलं - मस्त. त्याने अजून काही भरपूर विचारलं पण ते सगळं
माझ्या डोक्यावरून गेलं. कारण तो ब्रिटिश होता. त्याचं इंग्लिश मी तेव्हा
समजेल जेव्हा मला भारतीय इंग्लिश येईल. असो तो माझ्या पुढे निघून गेला.
पुढे गेलो तर त्याची सायकल रस्त्याच्या कडेला पडली होती. आणि तो गायब.
हि शो-कार मोड च्या अलीकडची गोष्ट आहे. हे खूप मोठे मैदान आहे. रस्ता
वरच्या बाजूने आहे. महाराज नक्कीच खालच्या पाण्याच्या बाजूला गेले असतील.
आता कश्याला गेला हे वेगळे सांगायची गरज नाही.
हरियाणा ची एक कार उभी होती. बोनट उगडलेला होतं. माहिती पडले कि कार गरम
झाली आहे. ते चौघे जण होते. हिसार चे. माझे आणि त्यांचे बोलणे सुरु झाले.
तितक्यात मागून तो अंग्रेज आला. माझी एल्ग्लिश किती भारी आहे एव्हाना
त्याला माहिती पडले असेलच. ह्या वेळेस त्यानी कार वाल्यान बरोबर संवाद
साधायला सुरुवात केली. - हे, हाऊ आर यू? कार च्या आतमध्ये तिघे जण बसले
होते आणि एक जण बाहेर उभा होता. ‘हाऊ आर यू’ हे वाक्य बाहेरच्याला विचारलं
होतं. ते ऐकून त्याने मला विचारलं. - भाई, यो के कह रया सै?
मी म्हटलं- न्यू कहदे बेरा ना।
त्याने पण ‘बेरा ना’ च म्हटलं.
त्यानंतर बोनट उघडं बघून त्या अंग्रेजानी कार विषयी विचारपूस सुरु केली.
मी त्याला परत ‘बेरा ना’ चं इशारा केला.
त्यावर तो हरियानवी बोलला, " भाई, ना बेरा हमनै। अंगरेजी जाणते तो यहां बोनट खोलकै खडे होत्ते?"
सव्वा दोन वाजता शो-कार मोड वरती पोहचलो. तिथे दोन तंबू दिसले. मला इथे
तंबू भेटण्याची अपेक्षाच नव्हती. पांग वरून येताना आलूचे दोन परांठे पैक
करून आणले होते. कोल्ड ड्रिंक बरोबर परांठे खाल्ले. विचार केला आठ किलोमीटर
वरती डेबरिंग है, एका तासात पोहोचू शकतो. त्या पुढे जाणार नाही मग चला तर
शो-कार बघून येऊया.
सगळं सामान उतरवून इथेचं ठेवलं. पाण्याची बोतल, रेनकोट व सायकलचे पंक्चर
काढायचे सामान बरोबर घेऊन मी चार वाजता तलाव बघयला निघालो. परत येउन इथेच
थांबणार होतो.
एक मिनी बस उभी होती. यात्री चहा पीत होते. लेह ला चालले होते. बस मधल्या
एका यात्रेकारुनी मला विचारलं. - बेटे, तुम यहीं के रहने वाले हो क्या?
मी म्हटलं- नहीं, आपकी ही तरह हूं।
म्हटले - पहले कभी लद्दाख आये हो?
- हां, आया हूं।
- "तो यह बताओ कि आगे पेड कहां मिलेंगे? ऑक्सीजन की बडी समस्या है। खुद तो देखा जाये, लेकिन बच्चों की समस्या नहीं देखी जाती."
मी म्हटलं, "हवा की कमी पेड न होने की वजह से नहीं है। यह अत्यधिक ऊंचाई की
वजह से है। आप अभी 4700 मीटर पर हो। यहां से आगे चढाई शुरू हो जायेगी।
5300 मीटर ऊंचे तंगलंग-ला को पार करके आप नीचे उतरना शुरू हो जाओगे व 3400
मीटर पर लेह पहुंचोगे। लेह पहुंचने पर आपको सांस लेने में बहुत आसानी
रहेगी। और हां, लेह में थोडी बहुत हरियाली भी मिल जायेगी।"
संध्याकाळी चार वाजता शो-कार बघायला तेथून बाहेर पडलो.पहिल्यांदा थोडीसी
चढाई आहे. त्यानंतर थोडा स उतार. 16 किलोमीटर पर्यंत हाच उतार पैन्दल
मारून देत नाही. एकेरी रस्ता आहे वाहतूक अजिबात नाही. तलाव हा लांबूनच
पहावयास मिळतो. शेजारी लोकवस्तीचे ठिकाण "थुक्जे गोम्पा" 16 किलोमीटर लांब
आहे. इथून जवळ जवळ ४ किमी पुढे, पायाने चालत तलावापाशी जावे लागते.
मी जेव्हा थुक्जे पासून ७-८ किलोमीटर लांब होतो तेव्हा समोरून चार
मोटरसाइकिल वाले येत होते. रस्त्यावरती उतार अवश्य होता पण हा पहाडी रस्ता
नव्हता. तलावाचे क्षेत्र खूप मोठे आहे. पानी तर एकाचं कोपऱ्यात आहे बाकीचे
सुखं मैदान आहे . 7-8 किलोमीटर लांबूनच थुक्जे गाव दिसत होतं
समोरून मोटारसायकल वाले येत होते. त्यांच्या पासून 100 मीटर अंतरावर
रस्ता सोडून, चार-पांच जनावरं पण जोरात पळत येत होती. अंतर लांब असल्या
कारणान जनावरं ओळखू येत नव्हती. ती मोटर सायकल बरोबर पळत होती. साहजिकच ती
माझ्या कडे येत होती. मला वाटलं ते लद्दाखी कुत्रे आहेत. लद्दाखी कुत्रे पण
मोठे असतात. मी खूप घाबरलो.
जशी अजून जवळ आली तर कळले कि , ती गाढवं होती. लद्दाखी रानटी गाढवं
म्हणजेच त्याला "क्यांग" असे म्हणतात. इथे पाणी पण आहे तसेच पाण्यामुळे
थोडेसे गवत पण आहे. त्यामुळे त्यानी इथेच आपला अड्डा बनवला होता. हि गाढवं
मोटार सायकल मुळे घाबरली होती. त्यांना काय करावे हे समझत नव्हते. म्हणून
गाडीच्या पुढे पुढेच पळत होती.
सव्वा तासात थुक्जे ला पोहोचलो. वरती डोंगरावरी गोम्पा आहे. गांव एकदम
ओसाड आणि घाणेरडे आहे. घरांच्या छतावरती बकऱ्यांची कातडी वाळायला
ठेव्ल्याली असतात. गाव पार केल्यानंतर दोन मोठे तंबू पाहायला मिळाले.
तंबू च्या समोरच चार पाच लोक बसली होती. मी तिथे गेल्यावर चहाची ऑर्डर
दिली.
मनाली-लेह रस्ता हा एक नुसता रस्ता नाहीय एक सीमारेषा पण आहे. लद्दाख
क्षेत्र मध्ये आपण स्वताच्या मनाने कुठे हि फिरू शकत नाही, लाधाख मधून
पूर्वेच्या बाजूला भरपूर रस्ते गेले आहेत.
लेह मध्ये खारदूंग-ला च्या बाजूला नुब्रा रोड, कारू मध्ये चांग-ला च्या
बाजूला पेंगोंग रोड, उप्शी मध्ये चांगथांग रोड आणि हि शो-कार वाली रोड; ये
चार रस्ते मुख्य आहेत. ह्या चारही रस्त्यांनी फिरण्यासाठी लेह वरून परमिट
घेणे आवश्यक आहे. शो-कार ला जाणाऱ्या रस्त्याचा चेकपोस्ट इथेच आहे. म्हणजे
आपण 16 किमी पर्यंत विना परमिट जाऊ शकतो. पुढे हा रस्ता चांगथांग व
शो-मोरीरी ला जातो. पण आपल्याला फक्त शो-कारच बघायची असेल तर तीन-चार
किलोमीटर पुढे विना परमिट चे जाऊ शकता. मला फक्त हाच तलाव बघायचा होता
म्हणून मला पुढे जाऊ दिलं.
गाव पासून चार किलोमीटर पुढे आलो. तलाव हा खूप छोटा आहे पण खाऱ्या
पाण्याचा आहे. जसं गाव सोडल्या पासून आपण तलावाच्या दिशेने जाऊ लागतो तशी
आपल्याला पांढरी माती बघायला मिळते. हि माती म्हणजे मीठ आहे. तिथे काही
पक्षी पण होते. किलबिल करत होते. बऱ्याच दिवसांनी कोणत्या तरी प्राण्याचा
आवाज ऐकायला मिळाला.
आता माझ्यासाठी चांगथांगच खूप मोठा भाग मोकळा होता आणि मी चेकपोस्ट पण पार
केलं होतं. पण विना परमिट चे फिरणे बरोबर नाही. चीन ची सीमा रेषा पण इथून
जास्त लांब नाही. त्यामुळे परमिट घ्यावेच लागतं.
१५ ते २० मिनिट थांबून परत निघालो. येताना थोडासा उतार होता पण जाताना तोच
थोडासा उतार थोडासा चढ झाला. रस्त्या मधेच गाढवांची झुंड पाहायला मिळाली.
मी आल्यावर जोरात पळाले. आकाश्यात ढग होते. त्यामुळे खूप थंडी होती. साढे
सात वाजता जेव्हा मी आपल्या ठीकाण्यावर पोहोचलो तर थंडीनं कापत होतो. जेवण
करून गोधडीत घुसलो, तरी पण कापत होतो. इथली उंची ४६३० मीटर आहे. ह्याच्या
पेक्षा जास्त उंचीवर झोपलो होतो तेव्हा थंडी वाजत नव्हती, आज काय झाले
कुणास ठाऊक?
आज पांग ते शो-कार मोड ते शो-कार परत शो-कार मोड अशी तब्बल ८८ किमी सायकल चालवली.
 |
|
 |
| पांग च्या पुढे चढाई आहे. |
 |
| डोंगरावरून दिसणारं पांग |
 |
| सोनेरी छटा मध्ये उजळून निघालेलं लढाख |
 |
| उन पडल्यावरती लढाख चे डोंगर सोनेरी होतात. |
 |
| मोरे मैदान |
 |
| हा फोटो माझ्या लैपटॉपचा स्क्रीन सेवर आहे. |
 |
| मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळ वाल्यांच ठिकाण |
 |
| १५ किमी अश्याच रस्त्यांनी जावे लागले. खूप खडे होते |
 |
| शो-कार मोड |
 |
| शो-कार मोडला जानारा रस्ता |
 |
| पाणी आणि गवत असल्याने मेंढ्यांची मज्जा |
 |
| शो-कार एक छोटासा तलाव आहे. लांबूनच दिसू लागतो. |
 |
| पुर्थ्वी च्या
भोवती वातावरण सारख्याच उंचीवर आहे. पण जमीन खाली-वर आहे. लढाख मध्ये
ढगांची सावली डोंगरावर पडते. काळा डाग म्हणजे ढगाची सावली आहे.
|
 |
| लढाखी गाढव त्यालाच क्यांग म्हणतात. |
 |
| शो-कार च्या शेजारी वसलेलं गाव |
 |
| वरती दिसणारं गोम्पा आणि खाली वसलेलं गाव |
 |
| राहण्यासाठी आणि खाण्यासाठी स्थानिक लोकांनी लावलेलं तंबू. |
 |
| गाढवांचा (क्यांग) कळप |
(क्रमशः
दिवस बारावा
साडे सात ला उठलो. वरती बघितले तर तंबू गळत होता. माझ्या अंथरुणात पण
पाणी पडले होते. तंबू ला जर रेन कोट लावला नाही तर असच होणार. बाहेर येउन
बघितले तर पाउस नाही, बर्फ पडत होता. आज मला तंगलंग-ला पार करायचं होतं.
इथेच 4630 मीटर वर बर्फवृष्टी होत आहे तर तिकडे 5300 मीटर वर तंगलंग-ला ला
काय होत असेल,याचा विचारच नको करायला.
अश्या बर्फवृष्टीत जाऊ कि नको हाच प्रश्न पडला होता. नंतर विचार केला कि
नकोच जायला. पुढे ८ किमी वरती डेबरिंग आहे तिथे थांबूया आणि तंगलंग-ला
उद्या पार करूया. तो पर्यंत बर्फवृष्टी पण थांबेल. बर्फवृष्टीत बाहेर पडणं
बरोबर नाही. मग तिथेच थांबलो. चहा घेतला.
परत मनामध्ये कुजबुज सुरु झाली. मी द्विधा मनस्थिति मध्ये होतो. एक मन
म्हणत होते कि नको जाऊ. तर दुसरे मन म्हणत होते कि, "लवकर निघ येथून."
का जाऊ?
"अरे, बर्फ एवढा पण पडला नाही कि, तुला चालता येणार नाही. खाली जमिनी कडे
बघ !! बर्फाचे तर नामोनिशान पण नाही. तुरळक बर्फ पडला आहे. त्यात थंड हवा
पण नाही. असं हवामान किती दिवस राहणार ते पण सांगू शकत नाही. असच जर हवामान
दोन ते तीन दिवस राहिले तर तंगलंग-ला पण बंद होऊन जाइल. म्हणून लवकरात
लवकर तंगलंग-ला पार कर."
मी दुसऱ्या मनाचे ऐकले. कारण आधीच मला तंगलंग-ला ची भीती होती. त्यात जर
मी इथे थांबलो तर तंगलंग-ला हा माझ्यावरच भारी होईल. उद्या जायला ताकत पण
रहायची नाही. आता पर्यंत चार घाट पार केलेत हा पण पार करेल.
गरम कपडे अंगावर चढवली. त्यावरती रेनकोट घातला आणि पावणे दहा वाजता येथून
निघालो. रस्ता तर खराब होताच. पण उतार असल्यानं सायकल वेगाने जात होती.
इथून तंगलंग-ला २५ किमी दूर होतं. थोडे पुढे गेल्यावर एक कुत्रं तंबू मधून
भुकत आलं. मी सायकल तिथेच थांबवली. मग तो पण थांबला. मी परत पुढे जायचा
प्रयत्न केला. तो पण भुकत भुकत पुढे आला. बरं झालं त्याच्या आवाजाने अजून
कुत्री जमा झाली नाही. मग तंबू मधून एक बाई आली आणि तिने त्याला हुसकून
लावलं.
मोरे मैदान हे गुरे चरण्यासाठी चागली जागा पण आहे. इथे कोणते गाव नाही
पण बक्रीवले आणि याक वाले इथे येउन ठाण मांडून बसतात. यांची घर म्हणजे
तंबुच असतात. त्यांची सुरक्षा हि कुत्र्या वरच अवलंबून असते. हे लद्दाखी
कुत्रे बिबट्या बरोबर सुद्धा भिडतात. हे माणसाना काहीही करत नाही. रस्ता २४
तास चालू असतो. ह्यांना त्याच्याशी काहीही देणे घेणे नसते. आज बर्फ पडत
होता. बकऱ्या आणि याक हे तंबू मधेच बंद होते. चरण्यासाठी बाहेर पडलेच
नाही. त्यामुळे हा कुत्रा बोर झाला असेल. सकाळ पासून भूकलो नाही चला तर
ह्याच्यावरच भूकुया.
डोक्यावरती जो रेनकवर होता, तो इतका नालायक होता कि, डोकं जरी हलवले तरी
तो हलायचा नाही. त्यामुळे इकडे तिकडे बघण्यासाठी सायकल थांबवायला लागायची.
तेव्हा कुठे तरी इकडचे तिकडचे दृश पाहायला मिळायचे. याचा परिणाम असा झाला
कि, डेबरिंग कधी निघून गेले ते कळालेच नाही. दूसरा कारण असं होतं कि,
डेबरिंग मध्ये मला तंबू दिसलेच नाहीत, जे दिसले त्यांना बकरीवाल्यांच समजून
बसलो असेल.
डेबरिंग माझ्या साठी खूप महत्वाचं होतं कारण सकाळी दोनच परांठे खाऊन
निघालो होतो. अंतर ८ किमीचे अंतर दीड तासात पूर्ण करून डेबरिंग ला पोहोचलो
असतो. मग हवामान बघून ठरवले असते कि, थांबायचे कि जायचे. जायचे असते तर
सोबत पराठे पैक करून घेतले असते. पण डेबरिंग कधी गेले ते कळालेच नाही.
जेव्हा कळले तेव्हा खूप उशीर झाला होता. बीआरओ च्या एका कामगाराला विचारलं
होतं कि, डेबरिंग किती लांब आहे. पण त्याच्या चेहऱ्यावर कसलाच भाव नाही. ना
डोळ्यात चमक, ना चेहऱ्यावर हास्य, ना आनंद ना कोणतंच दुख!! एकदम भाव
विरहित. मी तर अश्या लोकांना लाशच म्हणतो. शेवटी परत दोनदा विचारल्यावर
त्याने उत्तर दिलं कि, डेबरिंग तर माग राहिलं. बोला आता. !!
तंगलंग-ला ची चढाई सुरु झाली होती. एक वेळ अशी आली कि पैडल मारायचे पण
मुश्किल झाले होते. मग सायकल ओढत चालू लागलो. हा उंच पर्वतीय आजार होता.
आता हवा पण जोरात सुटायला लागली होती. हवेबरोबर कापसा सारखा बर्फ पण उडत
होता. हाताची बोटे पण थंडीन आकडली होती. पायात मी बूट घातले नव्हते म्हणून
चप्पल च्या आतून मौजे घातले.
दोन वाजले होते. जास्तच बर्फ पडायला लागला म्हणून बीआरओ च्या तम्बू
मध्ये घुसलो. एक तर काळा तम्बू, त्यात अंधार, काळ्याच झोपायच्या पिशव्या
आणि त्यात काळे कामगार!! सुरुवातीला वाटले कि, मी फक्त अंधाऱ्या मोकळ्या
तंबू मध्ये घुसलोय. जेव्हा हळू हळू डोळे स्थिरावले. तेव्हा बघितलं तर,
स्लीपिंग बैग मध्ये कामगार घुसून पडल्यात. मग विचारपूस सुरु झाली. काही जण
पत्ते खेळत होते. मी त्यांना म्हटले थोडा वेळ आराम करतो मग पुढे जातो.
जोराची भूख लागली होती. सकाळी फक्त दोन पराठे खाऊन निघालो होतो. तसं बैग
मध्ये सुखा मेवा आणि फरसाण ठेवलेल होतं पण या कामगाराच्या समोर बसून कसं
खाणार?
तिथून निघताना त्यांना विचारलं कि तंगलंग-ला अजून किती लांब आहे. म्हटले
खूप दूर आहे. मी म्हटलं, तरी पण ? पंचवीस ते तीस किलोमीटर. हे ऐकून तर
मला हसायला यायला लागली. गेल्या चार तासापासून चालतोय. त्यावेळेसच पंचवीस
किलोमीटर नक्कीच असणार. दहा किलोमीटर तर नक्कीच चाललो असेन. आता दहा
किलोमीटर पेक्षा जास्त नसणारच हे नक्की. परत अश्या हवामानात बाहेर पडलो.
माहिती मिळाली कि, पुढे पण बीआरओ चे तम्बू लावलेले आहेत. विचार केला कि,
पुढे जायला कठीण झालं तर या तंबू मधेच रात्र काढायची.
समोरून एक गाडी येउन थांबली. ड्राइवर एकटाच होता. मला तो दम भरू लागला.
अश्या हवामानात तू जास्त हिम्मत करू नकोस. कोणत्यातरी ट्रक वरती सायकल टाक
आणि तंगलंग-ला पार कर. आणि हे पण सांगितले कि, इथेच इतकी जोराची हवा आहे मग
तंगलंग-ला किती जोरात असेल. उडून जाशील.
तो गेल्यानंतर मी पण विचार केला कि तो बरोबर म्हणत होता. मी खूप थकलो होतो.
चालवतच नव्हतं. हवेची कमी पण जाणवत होती. आणि का नाही? 5000 मीटर
उंचावरती होतो. चार पावलं पुढे चाललं कि थांबायचो. त्यात वरून बर्फाची थंड
हवा. हाथ मौजे घालून सुद्धा बोटे सुन्न पडली होती. एका अश्या ठिकाणी
थांबलो कि जिथं हवा कमी लागत होती. कोणत्या तरी ट्रक मध्ये सायकल टाकतो आणि
तंगलंग-ला पार करून रूमसे ला पोहोचतो. अडीच वाजले होते. ट्रक वाल्याला
जास्त वेळ थांबायला लागू नये म्हणून सायकल वरचं सामान काढून ठेवलं. आणि
दुसरा म्हंजे सायकल वर चढवायला पण कष्ट कमी लागतील.
पहिल्यांदा मिलिटरीचा ट्रक आला. मी हात केला तर थांबवला. मी त्याला माझी
समस्या सांगितली. त्याने म्हटले कि मागून भरपूर ट्रक येतायेत. त्याच्यात
ठेव आणि पुढे जा. माझा पहिला प्रयत्न वाया गेला. आणि हे मिलिटरीवाले आपल्या
सारख्या ‘सिविलियन’ ची मदत कश्याला करतील? ते देशाचे रक्षक, सीमारेषे वरती
लढणारे ... मग एका सिविलियन बरोबर कशाला बरोबरी करतील? सिविलियन ची मदत ते
तेव्हाच करतात जेव्हा त्यांना वरून आदेश येतो. भूकंप असू किंवा पूर असू.
अश्याच प्रकारे एका मिलिटरी वाल्यांनी ऊधमपुर स्टेशन वरती धिंगाणा घातला
होता. झाले काय तर, तिकीट खिडकी वरती मोठी लाइन होती. मिलिटरीवाल्याला पण
तिकीट घ्यायचे होते. एकच खिडकी. पण तो सिविलियन बरोबर कसं लाइनला
थांबेल.? सरळ खिडकी पाशी गेला. वर्दी मध्ये होता. क्लर्क ने तिकीट द्यायला
मनाई केली. सांगितलं कि लाइनला थांब. बस, मग काय हाल्ल ना बाबाच
डोकं.....शिव्या गाळ्या सुरु. "मैं फौजी हूं, साला हम बॉर्डर पर जाकर
दुश्मन से लडें, गोलियां खायें और यहां सिविलियनों के साथ लाइन में खडे
हों।" खूप धिंगाणा घातला त्याने. क्लर्कला तर, अशी लोकं दररोज भेटतात.
शेवटी तिकीट नाही दिलं.
त्यानंतर दोन ट्रक आले. हात केला तर थांबले. नाही म्हणून सांगितलं.
म्हणाले कि,जागा नाही ट्रक मध्ये. मी म्हटलं, छत खाली आहे आणि रेलिंग पण
लावली आहे बाजूनी. म्हटले चढव मग. मी म्हटलं मी एकटा नाही चढवू शकत. तुमची
गरज लागेल. म्हणाले कि अश्या बर्फाच्या तुफानात मदत? ते पण निघून गेले.
नंतर तीन टैंकर आले. त्यांना रेलिंग पण होती आणि वरती चढण्यासाठी शिड्या. मी हाथ केला तर नाही म्हणून निघून गेले.
त्यानंतर परत ट्रक आले. त्यांच्यात चांगली माणसे पण असू शकतात. पण माझी
सहनशीलता आता संपली होती. परत सामान बांधले आणि निघालो. आणि ह्या सगळ्या
ट्रक वाल्यांना शाप पण दिला कि, पुढे जाऊन पंक्चर होऊ दे. माहित नाही कि,
माझा शाप खरा ठरला कि खोटा. बर्फ जास्त नव्हता पण त्यामुळे सगळा चिखल झाला
होता. त्यात पायात मौजे घालून चप्पल घातली होती म्हणून चालता येत नव्हते.
शेवटी कामगारांचे तंबू भेटले. जीवात जीव आला. उंची ५१३० मीटर होती.
म्हणजे तंगलंग-ला इथून चार किलोमीटर पेक्षा जास्त दूर नसेल. जर मला आज जेवण
भेटला असतं तर मी कधीच पार केलं असतं. भूख, उंची, चढ, तूफान या सगळ्या
कारणाने माझे शरीर शक्तिहीन झाला होतं. विचार केला कि इथेच थांबावे. एका
तम्बू मध्ये घुसलो. सगळे झारखण्डी कामगार. आत जाउन बघितले तर, माझे डोळेच
बाहेर आले. पाय ठेवायला पण जागा नव्हती. सगळे साले स्लीपिंग बैग मध्ये
घुसून पडले होते. तरी त्यांनी म्हटले सामान घेऊन ये. जागा होईल. मी म्हटलं
कोणाचं स्लीपिंग बैग शिल्लक आहे का? म्हणाले नाही. एक जण म्हणाला माझ्या
बैग मध्ये ये. मी सामान घेऊन आलो. टैण्ट बाहेर सायकलला तसाच ठेवला.
स्लीपिंग बैग होती माझ्याकडे, त्यांच्या कडे असती तर तेवढीच बाहेर काढायची
वाचली असती. सगळे कामगार इकडे तिकडे हलले आणि मला जागा झाली. मी माझी
स्लीपिंग बैग काढली तर हसायला लागले. इतका नाजुक, एकदम छोट्या पैकेट मध्ये
येऊ शकणारं मग हि बैग कशी काय थंडी पासून संरक्षण करेल.? त्यांच्या बैगा
ह्या मिलिटरी च्या कापसानी बनलेल्या. त्या बैगाना जागा पण जास्त लागते.
त्यांनी मला सल्ला दिला कि दुसऱ्याच्या बैग मध्ये झोप. यात थंडी निघणार
नाही. मी म्हटलं., माझी बैग दिसायला छोटी असली तरी त्यात गर्मी खूप आहे.
वाटलं तर बैग अदला बदली करून आजमावून बघा.
मी खूप भुकेलो होतो. इथे जेवायला पण मिळाले असते. पण मी नाही जेवलो.
कारण खायचे पैसे ह्यांच्या पगारातून कट होतात. इथे जेवण खूप महाग आहे.
त्यामुळे जास्त पैसे कट होतात. झोपायला जागा मिळाली तेवढेच भरपूर आहे.
मी खाण्यासाठी काजू, मनुके आणि फरसाण काढले. माझ्या स्लीपिंग बैग मध्ये
जागा कमी म्हणून शेजारच्याच्या स्लीपिंग बैग च्या वर ठेवलं. अर्धा पैकेट
काजू होतं. मी म्हटलं सगळ्यांनी वाटून घ्या. सगळ्यान मध्ये वाटलं. नंतर मी
फरसाण खाऊ लागलो आणि पाणी पिऊ लागलो. तेवढ्यात शेजारच्यानी मनुक्याच पैकेट
उचलून आपल्या बैग च्या आत मध्ये ठेवलं. मी फरसाण खाऊन पैकेट मागितलं तर
म्हणाला कसलं पैकेट? मी म्हटलं, मनुक्याच!! म्हणाला कि ते वाटून घेतलं. मी
म्हटलं, तू मला येडा बनू नको. काढ चल आतून. तेव्हा त्यांनी बैग च्या आतून
काढलं.
इथे सगळ्यात मोठी भीती चोरी ची होती. सगळेच चोर होते साले.. मैदानाकडून
आले होते. माझ्या जवळ थोडेच सामान होते. ह्यातील एक पण गोष्ट चोरी झाली तर
याचा परिणाम पुढच्या यात्रे वर पडणार होता. मोबाइल आणि कैमरा मी आपल्या
स्लीपिंग बैग मध्ये ठेवला. बाकी सगळे डोक्याखाली घेतले. बाहेर सायकल आणि
टैण्ट होता. सगळ्यांनी सल्ला दिला कि, ते पण आत मध्ये घे. लद्दाखी गुराखी
ते पण घेऊन जातील. मी नको म्हटले. मनात म्हटले कि, साले तुम्हीच चोर आहात
आणि दुसऱ्याच सांगता. ते तर डोंगर भागातले आहेत. त्यांना चोरी करता येत
नाही.
आयुष्यात पहिल्यांदाच ५१३० मीटर उंचा वरती झोपत होतो. तुमच्या पैकी तर ९०%
लोक एवढ्या उंचावर गेले पण नसतील. ह्या भागात फोटो कमी आहेत. कारण हि तसेच
आहे सकाळ पासून जितका चाललोय तेवड्या बर्फाच्या थंड हवेतच चाललोय. हाथ
मौजे काढून,कैमेरा चालू करण्याचा प्रश्नच नाही.
आज फक्त १९ किमी सायकल चालवली.
(क्रमशः)
तंगलंग-ला ते उप्शी (भाग ११)
दिवस तेरावा
सकाळी ७ ला आवाज ऐकून जाग आली. बाहेर बघितलं तर बर्फ होता. म्हणजे
रात्री बर्फवृष्टी झाली होती. कामगारांनी तर अजून वाढून सांगितलं कि, खूप
बर्फ पडलाय. मी बाहेर येउन बघितलं तर दोन इंच पेक्षा जास्त नव्हता.
तंगलंग-ला इथून जास्त दूर नाही त्यामुळे तिथे पण जास्त बर्फाची शक्यता
नव्हती. जुन्या झालेल्या बर्फावरती चालायला अवघड असतं. पण नुकत्याच
पडलेल्या बर्फावरती नाही. इय्हे फक्त २ इंचचं बर्फ पडला होता आणि
रस्त्यावरती अजिबात नव्हता. जो थोडाफार होता तो गाड्यांच्या टायर खाली येउन
संपला होता. माझ्यासाठी हि चांगली गोष्ट होती.
सायकलवर थोडा बर्फ पडला होता. हातानी तो झटकला. सामान सायकल वर टाकले.
सव्वा आठला तिथून बाहेर पडलो. नाश्ता पाणी तर विचारूच नका. पाण्याची बाटली
मात्र आठवण करून भरून घेतली. माझी प्रत्येक गोष्ट कामगारा साठी एक तमाशाच
होता. उठल्या पासून तर निघे पर्यंत कुणी कौतुक केलं नाही कि, मला निरोप पण
दिला नाही. असो. माझी सायकल यात्रा त्यांच्या साठी एक फुकटचा टाईमपास
असेल.
रस्त्यावर चिखल झाला होता. पाणी पण जमले होते. जास्त वेळ सायकल नाही
चालू शकलो. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ५१३० मीटर वर संपूर्ण रात्र
काढून सुद्धा शरीर अनुकूल झालं नव्हतं. त्यात भूख पण लागली होती. मला जेवण
करून २४ तास झाले होते. सायकल वरून उतरलो आणि पायाने चालू लागलो. चप्पल व
मोजे किती वेळ पायाचे रक्षण करतील. मौजे पाण्याने भिजले. त्यामुळे पायाची
बोटे सुन्न झाली. रस्त्यावरून चालताना दोनच विकल्प होते. एकतर चिखलातून चला
किंवा बर्फातून. मी दुसरा विकल्प निवडला.
बर्फामुळे डोंगर झाकून गेले होते. बर्फ फक्त वरतीच पडला होता. खाली अजून
आला नव्हता. मी आता इतल्या उंचा वर आलो होतो कि, ५० किमी लांब पसलेले मोरे
मैदान शेवट पर्यंत बघू शकत होतो. बकरी चारणारे मेंढपाळ तर लांबून ठिपक्या
सारखे दिसत होते.
लांब मागे एक जनावर येताना दिसले. शरीर तर कुत्र्यासारखा दिसत होतं पण
लद्दाखी कुत्रे हे तंदुरुस्थ असतात. हा तर हाडांचा सापळा दिसत होता. वेगाने
माझ्याकडे येत होता. शेपटी लांब होती. नंतर वाटले कि नक्कीच लांडगा असेल.
लढाख मध्ये लांडगे पण असतात. माझी बोटे सुन्न झाली होती तरी पण हातात दगड
घेऊन त्याची जवळ यायची वाट बघू लागलो. पण माझ्या ‘फायरिंग रेंज’ मध्ये
यायच्या आत मधेच डोंगराच्या बाजूला पळाला. डोंगरावरती झाडे झुडपे नसल्याने
खूप लांबवर जात पर्यंत दिसत होता. तेव्हा कुठे हायसे वाटले.
दोन ट्रक उभे होते. एकाला स्टार्ट करण्यासाठी धक्का मारण्याची आवश्यकता
होती. मला बघितल्यावर एक जण बोलला," भाई, जरा धक्का लगवा देना." मग आम्ही
चार पाच मिळून धक्का मारू लागलो. ट्रक रिकामा होता. तरी पण तो थोडा सुद्धा
हलत नव्हता. धक्का मारताना दम लागायचा. तीन चार वेळा सगळ्यांनी मिळून जोर
लावला पण काहीच उपयोग झाला नाही. सगळे तिथून हटले. मी मोबाइल वर जीपीएस ने
उंची मोजली तर ती होती.- 5250 मीटर. आहा! मी माझंच 5200 मीटर पर्यंत
चढायचं रिकार्ड मोडलं होतं. आता थोड्या वेळात तंगलंग-ला पोहोचेन तेव्हा
नवीन रिकार्ड होईल.
तंगलंग-ला -१७५८२ फुट म्हणजेच ५३५९ मीटर. त्या पाटीच्या खाली लिहिलं आहे
५३२८ मीटर पण माझं जीपीएस सांगतंय कि ५३११ मीटर. आता यातलं खर कुणाचं
मानायचं. मी तर माझ्या जीपीएस वरतीच भरोसा ठेवणार. - ५३११ मीटर. आता बघूया
हेच रिकार्ड कधी तुटणार ते. इथ एक मंदिर आहे. तसे प्रत्येक घाटावरती असतात.
पण इथले मंदिर खूप मोठे आहे. पक्कं बांधलेले आहे. पण छप्पर बरोबर नाही.
काल जो बर्फ पडलेला होता. तो मंदिराच्या आत मध्ये पण भेटला. हे सर्व धर्म
मंदिर आहे. सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत. इथे मक्का मदीना पासून ईसा मसीह,
बौद्ध, जैन, नानक, गोविन्द सिंह सर्व आहेत. ३३ करोड मधले पण काही देव आहेत.
पण सगळया मध्ये वर्चस्व आहे ते महादेवाचे.इथे भरपूर वेळ बसण्याची इच्छा
होती. खूप थकलो होतो जसे मंदिराच्या पायरी वर बसलो तसे कळले कि पायऱ्या
खूपच थंड आहेत. इथे जास्त वेळ बसू नाही शकत. तितक्यात एक लद्दाखी आला.
जुले जुले झालं. त्याने तिथं पडलेला एक झाडू उचलला आणि पायऱ्यावर पडलेला
बर्फ झाडू लागला.
आता सायकल वर बसायची पाळी होती. इथपर्यंत तर पायांनीच आलो होतो. जसा
सायकल वर बसलो पैडल वर पाय ठेवला. सायकल पुढे गेलीच नाय. पैडल कुठे तरी
अटकला होता. खाली उतरून पहिले तर चेन वरती बर्फ साचला होता. हा कच्चा बर्फ
नव्हता. कठीण बर्फ होता. दोन्ही पैडल च्या मध्ये साचला होता. मी चिखलातून
सायकल चालवीत आणली होती तेव्हा चैन वरती पाणी पडले आणि त्याचा बर्फ झाला.
एक दगड घेऊन बर्फ फोडला तेव्हा कुठे चैन फिरू लागली.
तंगलंग-ला च्या पुढे तीन किलोमीटर पर्यंत रस्ता खूप खराब आहे. नंतर
चांगला रस्ता सुरु होतो. तंगलंग-ला पासून रूमसे ३२ किलोमीटर आहे. पूर्ण
रस्ता उताराचा आहे. इथ पर्यंत येईस्तोवर न भूख लागली न तहान. रूमसे ला
यायला दोन तास लागले. रूमसे ४२०० मीटर वर आहे. आता गरम व्हायला लागले होते.
अंगावरचे काही कपडे मी काढून ठेवले. इथे भरपूर जेवलो. काल पासून भुकेला
होतो.
रूमसे च्या मागे 250 किलोमीटर वरती दारचा आहे. दारचा आणि रूमसे च्या
मधी कोणतेच गांव नाही. हां, सरचू नदी च्या दूसर्या बाजूला मात्र गांव आहे.
ते बौद्ध गांव आहे. छोटासा गोम्पा पण पाहायला मिळतो. किती ओसाड आणि
निर्मनुष्य भाग आहे हा. चार मोठ मोठे घाट आहेत. रस्ता उघडला कि हे हिमाचली,
लद्दाखी आणि नेपाली लोक इथे ठीक ठिकाणी तात्पुरते तम्बू लावतात. नाहीतर
इथून प्रवास करायचा, मुश्किल झाला असता. सरचू आणि पांग मध्ये तात्पुरत्या
स्वरूपाच्या तम्बू कोलेनि आहेत.
तंगलंग-ला वरून येणाऱ्या नदी बरोबर रस्ता पुढे जातो. रस्त्या मध्ये
ग्या, लातो, मीरु अशी गांव येतात. इथ पण सरळ उंच उभे असलेल्या पर्वतातून
जातांना अंगावर काटा उभा राहतो. लेह वरून रूमसे ला लाईट च्या तारा गेल्या
आहेत. त्या बघायला पण वेगळीच मजा येते. ते बघू वाटत राहते कि जगात कोणतीच
गोष्ट अशक्य नाही.
साढे चार वाजता उप्शीला पोहोचलो. वातावरण पण खूप खराब झालं होतं. आजच कारु
पर्यंत जायची इच्छा होती. जे इथून 14 किलोमीटर पुढे आहे. पण नाही जाऊ
शकलो. कारु मध्ये एयरटेलचं नेटवर्क चांगल काम करतं. आठ दिवस झाले शेवटचं
नेटवर्क केलांग मध्ये आलं होतं. घरच्यान बरोबर बोलायची खूप इच्छा झाली
होती. पण आज उप्शी मध्ये थांबावे लागणार होते. त्यामुळे हा उतावळे पणा अजून
एक दिवस पुढे लांबणार होता.
उप्शी सिन्धु नदीच्या किनारी आहे. एक रस्ता सिन्धु nadi बरोबर वरती
जातो. तर दुसरा रस्ता २०० किमी पुढे जाउन चीन सीमारेषे वरती हनले गावात
जाऊन मिळतो. तिथे आपला एक मित्र मिलिट्री मध्ये आहे. त्याला मी सांगितले
होते कि, मी तुला भेटायला येणार आहे. पण हि प्रवासाला निघण्याच्या आधीची
गोष्ट आहे. आता ५ घाट पार करून इतका जीव गेला कि अजून २०० किमी नाही जाऊ
शकत. आणि ह्या रस्त्या वरून जाण्यासाठी लेह मधून परमिट घेणं आवश्यक आहे.
उप्शी मध्ये १०० रुपयाला एक बिस्तर मिळालं. त्याच बरोबर मोबाइल व कैमरे चे चार्जिंग पण फुल झाले.
आज मी ६५ किलोमीटर सायकल चालवली.
 |
| सायकलवर थोडा बर्फ पडला होता. हातानी तो झटकला. |
 |
| मागे वळून बघितल्यावर |
 |
| तंगलंग-ला कडे |
 |
| हाच तो लांडगा माझ्या कडे येत होता. मी दगड घेतल्यावर पळाला. |
 |
| तंगलंग-ला वरून दिसणारं मोरे मैदान . डाव्या बाजूला वरती जो रस्ता दिसतोय,त्याच रस्त्याने मी आलोय. |
 |
| तंगलंगला |
 |
| तंगलंग-ला हा जगामाधला दोन नंबरचा सर्वात उंच मोटोरेबेल घाट आहे. |
 |
| तंगलंगला वर मन्दिर |
 |
| तंगलंगलाच्या दुसर्या बाजुचा रस्ता आनि खालि जानारा रस्ता |
 |
| रूमसे गांव |
 |
| रुम्से वरुन उप्शी पर्यन्त सगला रस्ता असाच द्रुश्यानि भरला आहे |
 |
| जिथे लोकवस्थि आहे तिथे हिरवल पाहायला मिलते |
 |
| उप्शी मधे सिन्धु चे पहिले दरशन होते |
(क्रमशः)
उप्शी ते लेह (भाग १२)
दिवस चौदावा
सात वाजता उठून बगितलं तर माझ्या रूम मध्ये अजून काही लोकं झोपली होती.
माहिती पडले कि,ते मनालीला चाललेत. रात्री ते उप्शी वरून चालले होते,
तेव्हा पुलिसानी अडवले. आणि सांगितले कि पुढे रस्ता बंद आहे. मजबुरीमुळे
रात्रभर इथेच राहावे लागले. बाहेर बघितला तर बैरियर लावलं होतं आणि
गाड्यांची लाइन पण होती. लेह वरून दिल्लीला जाणारी बस पण इथेच उभी होती.
तंगलंग-ला वरती दोन दिवसापासून बर्फवृष्टी होत आहे. मी पण बर्फातच पार केलं
होतं. आज मौसम अजूनच बिघडलं,म्हणून रस्ता बंद केला. आता असे म्हणतात कि,
तंगलंग-ला वरून दुसरी गाडी आली तर इथून तिकडे जायला गाड्या सोडणार. आणि मला
एक भीती पण आहे कि, इथून रूमसे पर्यंत चा रस्ता खूप खतरनाक आहे. रस्ता
उंच उंच पर्वतामधून जातो. जर रात्री पाउस पडला असेल तर नक्कीच कुठेतरी दरड
पडली असेल. त्यामुळेच उप्शी पर्यंत गाड्या थांबवल्यात. माहिती नाही
तंगलंग-ला कधी उघडणार आणि उघडला तरी २ तासाने इथे गाडी पोहोचणार. तेव्हाच
उप्शी वरून गाड्या पुढे हलतील.
सव्वा दहा वाजता उप्शी वरून निघालो. रस्ता सिन्धु च्या उजव्या
किनाऱ्याच्या बरोबरीने जातो. कारु इथून 14 किलोमीटर आहे. आणि मला माझे
एयरटेल चे नेटवर्क पण भेटणार आहे. घरच्यांना कुणालाच माहित नाही कि, मी
कुठे आहे , कसा आहे आणि मला पण माहित नाही कि, दुनिया मध्ये काय चाललंय.
कारू मध्ये माहिती पडेल.
पांच कैनाडा चे सायकलवाले भेटले. मनाली वरून येत होते आणि लेह ला चालले
होते. त्यांच्या घातलेल्या कपड्यावरून ओळखले कि, हे परफेक्ट साइकिलिस्ट
आहेत. रात्री लातो मध्ये थांबले होते.
कारु मध्ये मोठा सैनिकांचा अड्डा पण आहे. रस्ता एकदम उताराचा होतं. त्यामुळे कुठे थांबायची गरजच पडली नाही.
कारु मध्ये प्रवेश करायच्या आधी एक रस्ता सिन्धु नदी पार करून हेमिस ला
जातो. हेमिस मध्ये लद्दाख भागातील सर्वात मोठा गोम्पा आहे. मला वाटले कि,
तिकडे जावे. पण बघितलं कि, हेमिस ला जाण्यासाठी सिंधू पार करून पहिले चढ
चढावा लागतो. म्हणून तिकडे जाण्याचे टाळले.
बारा वाजता कारूला पोहोचलो. इथून पेंगोंग तलावाला जाण्यासाठी रस्ता
फुटतो. मोटारसायकल वाल्यांची गर्दी झाली होती. चांग-ला बन्द आहे, म्हणून
सगळ्यांना इथे थांबून धरले होते.
नेटवर्क मिळाले. मग पहिल्यांदा घरच्यान बरोबर बोलून घेतलं. माहिती पडले
कि, उत्तराखण्ड मध्ये जोराचा पाउस आहे. ढगफुटी पण झालीय. केदारनाथ आणि
गंगोत्री मध्ये खूप मोठं नुकसान झालंय. घरचे पण चिंतीत होते कि, तिकडे पण
असेच झाले काय. मी म्हटले कि, नाही. लदाख मध्ये जास्तीच जास्त बर्फ पडेल ते
पण उंच घाटावरती. ह्याच्या पुढे काहीही व्हायची अपेक्षा नाही. माझ्या
बरोबर बोलून त्यांना हायसे वाटले. मला भीती होती ती, परतीच्या प्रवासाची.
हिमालयाच्या पडयालचा तर, मला भरोसा आहे. व्यवस्थित पर्यंत जोजीला पर्यंत
जाऊ शकतो. त्यानंतर हिमालय सुरु होतो. मान्सून पावसाने उत्तर भारतावरती पण
कब्जा केला आहेच. मला पण तो त्रास देऊ शकतो. श्रीनगर ते जम्मू. 300
किलोमीटर चे अंतर मला बस ने करायचे आहे. जर तिथे पण पाउस असेल तर तो पण
रस्ता बंद होऊ शकतो.
मी जेव्हा प्रवासा वरती असतो, तेव्हा खाण्या बरोबरच कोल्ड ड्रिंक
घ्यायचं पण पसंद करतो. आत्ता पर्यंत मला १० रुपये जास्त भावाने घ्यावे
लागत होते. आता एक रुपया पण फालतू नाही. तीस रुपये म्हणजे तीस रुपये।
मनाली मध्ये पस्तीस ला मिळाली होती. मी विचारले तर म्हणाला, "भाई पहाड है,
महंगी हो ही जाती है आते आते." मग कारू पर्यंत तर १०० ची व्हायला पाहिजे
होती. लद्दाख मध्ये बनलेली नव्हती ती. खालीच बनलेली होती.
साडे बारा वाजता कारू वरून निघालो. लेह अजून सुद्धा ३५ किलोमीटर आहे.
आजच लेह ला पोहोचायचे आहे. स्टैक्ना दस किलोमीटर वर आहे. किलोमीटर च्या
दगडा वरती जास्त करून इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. कधी कधी हिन्दी मध्ये पण
बघायला मिळते. स्टैक्ना (Stakna) ला सटकना लिहेलल बघून हसायलाच आलं.
स्टैक्ना मध्ये गोम्पा पण आहे. मला तर अजिबात इच्छा राहिली नाही बघायची.
फक्त लेह ला पोहोचायचे आहे बस!! प्रवासाचा एक भाग संपवायचा आहे.
दीड वाजता स्टैक्ना पार केले. इथून ३ किमी पुढे रणबीरपुर आहे. बौद्ध चा
देश असून सुद्धा हिन्दू नाव ऐकून आश्चर्य वाटलं. मग आठवलं कि, १९३३ कि
राहुल सांकृत्यायन नि पण आपल्या लद्दाख यात्रे मध्ये या ठिकाणाचा उल्लेख
केला होता. रणबीरपुर मध्ये मुसलमान सुद्धा पाहायला मिळाले.
रणबीरपुर च्या तीन किलोमीटर पुढे ठिक्से आहे. ठिक्से पण आपल्या गोम्पा मुळे
प्रसिद्ध आहे. दोन वाजता ठिक्से ला पोहोचलो तेव्हा इच्छाच नव्हती सायकल
वरून उतरण्याची. बसूनच गोम्पा चा एक फोटो काढला आणि पुढे निघालो.
जानेवारी महिन्या मध्ये जेव्हा लद्दाख ला आलो होतो तेव्हा ठिक्से ला
यायची खूप इच्छा होती. शे पर्यंत आलो होतो पण बस नाही भेटल्याने त्याच्या
चार किलोमीटर पुढे ठिक्से पर्यंत येत आले नाही. आज आलो पण होतो. गोम्पा
ला बघण्यासाठी वेळ पण होता. पण मनच करत नव्हतं सायकल वरून उतरण्याचे.
कारू नंतर सारखी लोकं वस्ठी पाहायला मिळते. छोटे मोठे गांव पण रस्त्या
मध्ये येतात. सिन्धु नदीच्या पाण्याचा उपयोग करून हा भाग चांगला हिरवेगार
केला आहे. चारी bajuni ओसाड जमीन आणि मधेच हिरवळ पाहून मन प्रसन्न होते.
जानेवारीत आलो होतो तेव्हा झाडांची पाने झडून गेली होती. झाडे हाडांच्या
सापळ्या सारखी दिसत होती.
शे मध्ये प्रवेश केल्यानंतर ते ठिकाण पाहायला मिळाले, जिथे जानेवारीत
पूजा चालली होती. त्यानंतर शे पैलेस तेव्हा खाली होते आणि आता पर्यटकांनी
भरून गेले होते. शे पैलेस समोर भरपूर गाड्या उभ्या होत्या तसेच काही
दुकानें पण होती. मी बाहेरूनच एक फोटो काढला आणि आपल्या मार्गाला निघालो.
सिन्धु घाटावरती धूळच धूळ होती. नवीनीकरनाचे काम चालू होते. दोन दिवस
आधी इच्छा होती कि सिन्धु घाता वरती काही वेळ काढू, पण आता खूप घाई झाली
होती लेह ला पोचायला.
चोगलमसर मध्ये ट्राफिक तुंबला होतं. जानेवारी महिन्या मध्ये पण इथे गर्दी
होती आणि आता पण होती. व्हिस्की ओढ्या वरचे सेरिंग साहेब आठवले. ते इथलेच
राहणारे होते. त्यांनी घरी येण्याचे निमंत्रण दिलं होतं. फोन नम्बर पण दिलं
होता. त्या वेळेसच ठरवलं होतं कि नाही जाणार म्हणून. शेवटी नाही गेलो.
जेल च्या समोर काही वेळ थांबलो. मी जानेवारी महिन्यामध्ये भरपूर दिवस
काढले होते. माझा भाऊ विकास हा सीआरपीएफ मध्ये आहे. आणि त्याची त्यावेळेस
पोस्टिंग इथेच होती. आता इथे नाही तो. त्यामुळे हि जागा पण माझ्या काही
कामाची नव्हती. जेल च्या पुढे गेल्यावर थोड चढ लागला. मी तंगलंग-ला पार
केल्यावर खालीच चाललो होतो. विसरून गेलो होतो कि चढ काय असतो ते. ह्या दोन
ते तीन किलोमीटर च्या चढाई मुळे खूपच त्रास झाला. ह्याच चढाई वरती मागे
वळून पहिले तर खूपच सुंदर दृश्य पाहिला मिळते. पण ह्या वेळेस सगळा सुखल
होतं. जानेवारी महिन्या मध्ये कोपर्य कोपर्य मध्ये बर्फ होता. त्यामुळे हाच
नजारा बघायला मजा यायची. आता तेवढी मजा नाही आली. हा. दोन दिवसापासून उंच
पर्वतावर्ती बर्फ अवश्य पडलाय.
चार वाजता लेह च्या मुख्य चौकात येउन पोहोचलो. इथून उजव्या बाजूने एक
रस्ता श्रीनगर ला जातो. मला माहित होते कि, लेह मध्ये घुसल्यावर परत चढ
लागणार आहे. त्यामुळे विचार केला कि, विमानतळाच्या बाजूला वळू. तिथेच
रस्त्या मध्ये एखादे होटल बघून थांबूया. परत मनात विचार आलाकी, नको. आज
लेह्लाच थांबूया. प्रवासाचा पाहिला टप्पा तर संपत आलाय. मग का नाही लेह ला
थांबून पार्टी करूया. उद्या परत दुसरा हिस्सा सुरु होणार आहे. लेह ते
श्रीनगर चा. मग मी सायकल लेह शहराकडे वळवली. चढ आहे. हॉस्पिटल पर्यंत, मी
सायकल चालवली. पुढे नाही चालवू शकलो. खूपच चढ आहे. पायाने चालत गेलो. लेह
च्या आतील रस्त्या बद्दल मला खूप माहिती आहे. टैक्सी स्टैण्ड पासून हा
रस्ता तीन हिस्या मध्ये वाटला गेलाय. उजव्या हाताचा रस्ता मुख्य बाजार कडे
जातो. तसाच पुढे सरळ शान्ति स्तूपा कडे जातो. दुसरा थोडा उजव्या बाजूला
डीसी ऑफिस कडे आणि तिसरा खारदूंग-ला ला.
मी टैक्सी स्टैण्ड च्या जवळ एका होटल मध्ये खोली बघितली. गीजर ची खूप
गरज होती. त्यांनी सांगितले उद्या दुपारीच पाणी येणार. भाडे सातशे रुपये.
मला गीजर पाहिजे होता. सातशे रुपये देऊन सुद्धा गिजर मिळत नसेल तर काय
फायदा. ती खोली सोडून दिली. त्यानंतर मी मुख्य बाजारा कडे गेलो. बाजार पार
केल्यानंतर एक छोटी बोळ लागली. तिथे आकर्षक गेस्ट हाउस च्या जाहिराती
पाहायला मिळाल्या. सहाशे रुपयात एक खोली भेटली. गीजर इथे पण नाही भेटला पण
म्हणाले कि, सकाळी सात ते अकरा वाजता गरम पाणी मिळेल. त्यांनी सांगितले
कि,लेह मध्ये कुठेच गीजर नाहीं. त्याच्या जागी लाकडापासून पाणी गरम करायची
सिस्टीम आहे. तुमच्या बाथरूम मध्ये स्वतः ते पाणी येत राहील. मी इथेच
थांबलो.
किती तरी दिवसानंतर आरसा पाहायला मिळाला. मी आरश्यात बघितलं. म्हटलं, हा
कोण आहे? माकड पण ह्याच्या पेक्षा चांगले दिसतात. दाढी खूप वाढली होती.
म्हटला चला.. न्हाव्या कडे जाउन सपाट करून येऊ. मग न्हाव्या कडे जाउन सपाट
करून आलो. चेहरा कला पडला होतं. हीच तर लदाख ची निशाणी आहे. आता इथून
पुढच्या प्रवासात झाकून ठेवणार आणि काळजी घेणार. दिल्ली ला गेल्यावर वाटले
पाहिजे कि, जास्त नाही बिघडला. सगळ्यात जास्त नुकसान, नाकाचे झाले होते.
जळून कातडं निघालं होतं.
मी लेहला तीन दिवस उशिराने पोहोचलो होतो. एक दिवस तर रोहतांग च्या आधीच
खराब गेला होत. त्या दिवशी तर, दिवसभर गुलाबा ते मढी १३च किलोमीटर सायकल
चालवली होती. दूसरा दिवस व्हिस्की ओढ्या वरती खराब हवामाना मुळे वाया गेला.
जास्त उंची मुळे 11 किमी च्या पुढे जाऊ शकलो नाही. आणि तीसरा दिवस
तंगलंग-ला वरती वाया गेला. दहा दिवसात लेहला पोहोचायचे होते पण लागले 13
दिवस.
खारदूंग-ला म्हणजे जगमाधला सगळ्यात उंचीवर असणारा रस्ता. तिथे जायची खूप
इच्छा होती. पण मी आता आहे 3400 मीटर उंचीवर. खारदूंग-ला इथून 40
किलोमीटर पुढे आहे. लेह पासून 2000 मीटर उंच. म्हणजे 40 किलोमीटर मध्ये
2000 मीटर वरती चढायचे होते. हि काय सोपी गोष्ट नाही. नको जायला खारदूंग-ला
ला. त्यात हवामान पण खराब झाला होतं. आणि आता खारदूंग-ला पण बंद असेल.
होटल वाला माझ्या ह्या प्रवासा बद्दल विचारपूस करत होता. मी त्याला
विचारले कि, अजून पर्यंत मला रस्ता खूपच खराब मिळालाय. इथून पुढे कसा आहे?
म्हंटला खूपच चांगला. रस्त्या मध्ये तुम्हाला गाव पण भेटतील. उद्या आरामशीर
कारगिल पर्यंत जासाल. मी म्हंटला, "नहीं भाई, साइकिल है, मोटरसाइकिल नहीं.
तीन दिन लगेंगे कारगिल पहुंचने में. शायद चार दिन भी लग जायें."
त्याने असं माझ्या तोंड कडे पाहिला कि, हा असा कसला सायकलवाला. म्हणे चार दिवस लागतील कारगिल ला.
लेह शहरामध्ये फिरण्याची इच्छा नव्हती. जानेवारी मधेच फिरलो होतो.
त्यावेळेस गल्ली बोलात बर्फ होता. चालायला पण भीती वाटायची. कधी घसरून
पडतोय. ती भीती आता नव्हती. लेह ला एक हि फोटो काढला नाही. माझ्या जेव्हा
मनात येईल तेव्हाच काढतो. नाही आले तर नाही काढत. खोली मध्ये तव लावलं
होता. केदारनाथ च्या बातम्या दाखवत होते.
पहिल्या टप्प्या मध्ये ४७४ किलोमीटर चे अंतर मी पार केले. त्याच बरोबर
पाच घाट पण पार केले. चांगला रस्ता थोड्याच ठिकाणी भेटला. जास्त करून खराबच
मिळाला. लांब लांब पर्यंत गावच भेटले नाही. तरी पण जास्त काही अडचण न
येता, हे अंतर पार केले. हे माझे मोठं यश आहे. म्हणून मी माझा, माझ्यावरच
गर्व करतोय.
आज ४९ किमि सायकल चालवली
 |
| उप्शी मध्ये लावलेला बैरियर आणि गाड्यांच्या लाईनि |
 |
| उप्शी मध्ये हिमाचल परिवहन ची लेहवरून दिल्लीला जाणारी बस. |
 |
| उप्शी च्या जवळ पेट्रोल पम्प |
 |
| सिन्धु नदीच्या बरोबरीने लेह कडे |
 |
| हे लाईट चे खांब बघून मला मजा वाटत होती |
 |
| कनाडा सायकलवाला लेह कडे |
 |
| कारु पाशी लावलेला एक दगड |
 |
| कारू |
 |
| स्टैक्ना गोम्पा |
 |
| मनाली पासून ४५० किमी लांब |
 |
| हिरवळ बघून वाटत नाही कि हे लदाख आहे. |
 |
| ठिक्से गोम्पा |
 |
| चोगलमसर |
 |
| लेह मध्ये आपले स्वागत आहे. |
 |
| लेह चा मुख्य चौक |
 |
| लेह शहराचं प्रवेशद्वार |
(क्रमशः)
दिवस पंधरावा
नऊ वाजता उठलो. उठायला कोणतीच घाई केली नाही. रात्री चांगली झोप लागली.
जानेवारी महिन्यात लेह फिरून झाले होते,त्यामुळे आता काही फिरण्याची
आवश्यकता नाही. खारदूंगला ला जायची खूप इच्छा होती पण हवामान खराब असल्याने
परमिट देत नव्हते. सारख्या बातम्या येत होत्या कि, हिमाचल आणि उत्तराखण्ड
मध्ये पावसाने थैमान घातले आहे. लद्दाख मध्ये त्याची काही भीती नव्हती. हा
पण जोजीला नंतर जम्मू पर्यंत नक्कीच त्रास देऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर
दिल्ली ला जाउन हा प्रवास संपवायचा होता.
लेह पासून श्रीनगर पर्यंत तीन घाट पडतात - फोतू-ला, नामिक-ला और
जोजी-ला. ह्या मध्ये फोतू-ला सगळ्यात उंच आहे - 4100 मीटर. सगळ्या गोष्टी
पकडून म्हणजे येणारे चढ उतार, राहण्यासाठी जागा आणि इतर . श्रीनगरला
पोहोचण्यासाठी सात दिवसाचा कार्यक्रम बनवला. तो पुढीलप्रमाणे - लेह ते
ससपोल, ससपोल ते लामायुरू, लामायुरू ते मुलबेक, मुलबेक ते कारगिल किंवा
खारबू, कारगिल किंवा खारबू ते द्रास, द्रास ते सोनमार्ग आणि सोनमार्ग ते
श्रीनगर।
गरम पाणी आले होते. दहा दिवसा आधी ८ जूनला गोंदला मध्ये अंघोळ केली
होती. तेव्हा पासून नुसता घाम गाळतोय. शरीराला कुठेहि हाथ लावला तरी मळ
निघतोय. नाक खूप जळाले होते. साबण लावला तर आग होत होती. मग ठरवले कि,
श्रीनगर पर्यंत अजिबात तोंड उघडे ठेवायचे नाही. श्रीनगर इथून ४३४ किलोमीटर
वर आहे.
अंघोळ झाली पण आता प्रश्न पडला कपड्याचा. दहा दिवस झाले, एकच जोडी घालत
होतो. मी तसे कपडे आणले होते. पण माझी बुद्धी कुठे चरायला गेली होतो कुणास
ठाऊक!! पैकिंग करताना दोन जोडी हाफ पैंट आणि हाफ टी-शर्ट भरलं. लद्दाख
मध्ये शरीराचा कोणताही भाग उघडा ठेऊन चालत नाही. खूप खतरनाक असतं. पैण्ट
पण घालू शकत नव्हतो. कारण दिवसभर सायकल चालवून पायाचे गुडघे दुखले असते.
आता राहिले फक्त लोवर. जे मी मागच्या दहा दिवसापासून घालत आलोय. मग मी लोवर
च्या वरती हाफ पैण्ट घातली. मग माझा लूकच चेंज झाला.
लद्दाख मध्ये, थंडी पेक्षा उन खूप खतरनाक असतं. सायकल चालवताना समोरचे
हाताचे पंजे,हे सारखे सूर्या समोर असतात. सुरुवातीला न हाथमौजे घातले न
क्रीम लावली. दोन्ही जळाले. जेव्हा जळून कातड निघालं तेव्हा तेव्हा कुठे
क्रीम लावायला सुरुवात केली. आता ठरवलं कि हाथमौजे घालूनच इथून पुढचा
प्रवास करायचा.
दहा वाजून चाळीस मिनिटांनी ह्या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात
केली. पहिल्या टप्प्या पेक्षा हा टप्पा सोपा आहे. रस्त्याने लोक वस्ती
पाहायला मिळेल आणि रस्ता पण चांगला मिळेल आणि जास्त करून खाली उतरायचे आहे
त्यामुळे उतार पण मिळेल. मुख्य बाजार मध्ये एक दुकान आहे. तिथे मैदानी
भागासारखे जेवण मिळते. जनेवरी महिन्यामध्ये पण हे दुकान उघडे होते. तिथे
चहा आणि सामोसे खाल्ले.
मुख्य चौकापासून तीन किलोमीटर लांब उतार आहे. इथून उजव्या हाताला एक
रस्ता मनालीला गेला आहे आणि एक पुढे सरळ श्रीनगरला. उतार होता. पहिले थेंब
थेब पडत होते. आता जोरात पाउस येऊ लागला. थोडा वेळ थांबलो. रेनकोट घातला
आणि पुढे निघालो.
इथून दूर दूर पर्यंत मिलिटरीवाल्यांचे ठिकाणे आहेत. अश्या ठिकाणी, फोटो
काढू नाही शकत. पिटुक गोनपा पहिला बघितला होता. त्यामुळे उताराने सरळ पुढे
गेलो. रस्त्यामध्ये ईण्डेनची गैस एलपीजी बोटलिंग कंपनी दिसली. तिथ लिहिलं
होतं. जगातील एकमेव अधिक उंचावरील बोटलिंग कंपनी, उंची ११८०० फुट.
लेह ३४०० मीटर उंचावर आहे. त्यानंतर उतार सुरु होतो. उताराने खाली
आल्यावर तिथे उंची ३२०० मीटर पर्यंत खाली येते. त्यानंतर दहा किलोमीटर
पर्यंत परत चढाई आहे. हि चढाई सर्पाकार नाही तर उलट सरळ आहे. पत्थर साहिब
च्या दो किलोमीटर अलीकडे तसीच राहते आणि आपण ३५३५ मीटर पर्यंत जाउन
पोहोचतो. इथून सिन्धु नदी लांब जाते आणि नंतर दिसत पण नाही. हे चढाईचे, १०
किमी अंतर पार करण्यासाठी दोन तास लागले.
गुरुद्वारा पत्थर साहिब लेह पासून पंचीवीस किलोमीटर लांब आणि
समुद्रसपाटी पासून ३४७३ मीटर उंच आहे. म्हणतात कि, गुरू नानक देव इथे सन
१५१७ मध्ये आले होते. इथले लोक एका राक्षसाच्या त्रासामुळे चिंतीत होते.
त्यांना चिंतामुक्त करण्याचे काम नानकदेवजीनि केलं होतं. राक्षस ज्या
डोंगरावरती राहत होता. त्या डोंगरा खालीच बसले. राक्षस हैराण झाला. त्याने
एक मोठा दगड, वरून गुरुजींच्या अंगावर फेकला. पण गुरूजीना काहीच झाले नाही
उलट गुरुजींची शरीराची आकृती त्या दगडावरी उमटली. ती आकृति अजून सुद्धा
त्या दगडावरती आहे. तोच दगड तिथे आहे बाकी काही नाही.
गुरू नानक पण खूप हिंडफिरे होते. ज्या वेळेस भारतामध्ये मुसलमानाचे
राज्य होते त्या वेळेस त्यांचा जन्म झाला. मक्का मदीना पासून तिब्बत
पर्यंत तसेच यारकन्द पासून श्रीलंका पर्यंत फिरले. गुरूद्वारा खूपचं छान
आहे. एक छोटा लंगर भेटला.चहा आणि हलव्याचा. त्यावेळेस आकाश्या मध्ये काळे
ढग होते. जोराची हवा होती आणि पावसाचे थेंब पडत होते. अश्या वेळेस लद्दाखचं
तापमान खूप खाली जातं. गुरूद्वारे मध्ये टाकलेल्या मोठ मोठ्या
गाद्यांमुळे चालायला आनंद वाटत होता.
अर्ध्या तासानंतर तिथून निघालो. उतार होता रस्ता पण छान. काही
दिवसापासून अश्या रस्त्या साठी मी तरसत होतो. त्यामुळे सायकलच्या ब्रेक
वरून हात काढला आणि सायकल जोरात दामटली. एका ट्रक ला मागे टाकून कारच्या
मागे लागलो. कार मध्ये बसलेले पर्यटक, मागे वेगात पाठलाग करणारी सायकल बघून
हैरान झाले. मैग्नेटिक हिल वरती कार थांबली आणि मी पुढे गेलो. एकतर मौसम
खराब होत चाललं होत, त्यात उतार. म्हणून मैग्नेटिक हिल वरती थांबलो नाही.
निम्मू च्या तीन किलोमीटर आधी सिन्धु-जांस्कर चा संगम पाहायला मिळतो.
जानेवारी मध्ये जांस्कर नदी पूर्ण गोठलेली असते. आता तिथे खूप पर्यटक मस्ती
करत होते. इथून निम्मू पर्यंत नदी शान्त होऊन वाहते. त्यामुळे राफ्टिंग पण
करता येते. भूक लागली होती. निम्मू मध्ये खायचा होतं. गांव पार करून
उजव्या हाताला एक गेस्ट हाउस दिसलं. तिथे जेवायला पण मिळते. दोन परांठे व
चहा ची ऑर्डर दिली. लद्दाख मध्ये गेस्ट हाउस ची परम्परा, मला खूप आवडली.
माझ्या सारख्या लोकांसाठी ते महाग असतात पण पैसे पूर्णपणे वसूल होऊन जातात.
एकदम लद्दाखी घरासारखे राहण्याची सोय असते, शेती असते, बाग बगीचे असतात.
मला इथे थांबायचे नव्हते पण जेवण ह्या वातावरणात केलं. खूप मस्त वाटले.
अर्ध्या तासानंतर म्हणजे बरोबर पौने चार वाजता इथून निघालो. निम्मू
समुद्र सपाटी पासून ३१३० मीटर उंच आहे. सिन्धु नदीच्या किनाऱ्या वरती.
दुसऱ्या गावासारखेच इथे पण सिन्धु नदीचा चांगला उपयोग करून झाडे झुडपे
लावली आहेत. जी आपल्या डोळ्याला थंडक देतात. आणि म्हणतात न चांगले दिवस
जास्त वेळ राहत नाही. वाईट दिवस खूप लांबले जातात. तसच इथे झालं. निम्मू
नंतर चढाई सुरु झाली आणि बासगो नंतर तर अजूनच चांगली चढाई आहे. वाटलं होतं
कि, रस्ता सिन्धु नदीच्या बरोबरीने आहे तर उतारच मिळेल. पण प्रत्याक्ष्यात
तसे नाही. बासगो नंतर सिन्धु नदी दक्षिने कडे वाहते. नंतर परत वळून उत्तर
पश्चिम होते आणि ससपोल पर्यंत उत्तरपश्चिमीच राहते. जर तुम्ही बासगो ते
ससपोल चा नकाशा बघितला तर सिन्धु नदी ‘यू’ आकारात दिसते. म्हणून हे अंतर
कमी करण्यासाठी बासगो वरून सरळ ससपोल पर्यंत रस्ता बनवलेला आहे. त्यामुळे
झाले काय कि, रस्ता हा पहिल्यांदा वरती चढतो मग खाली उतरतो. बासगो मध्ये
सिन्धु नदी दिसते. नंतर परत ससपोल मध्ये दिसते. बाकी मधी रस्त्यात कुठेच
दिसत नाही.
बासगो जवळजवळ ३२०० मीटर उंचीवरती आहे. त्यानंतर चढ सुरु होतो. तीन चार
वळण घेतल्या नंतर एक मोठे मैदान पाहायला मिळते. आणि त्यातून मधून सरळ
जाणारा रस्ता पाहायला मिळतो. जर तुम्ही गाडी वरून गेलात तर एक सारखे मैदान
दिसेल पण जर सायकल वरून गेला तर चढ वाटेल. बासगो वरून १० किलोमीटर पर्यंत
चढाई आहे नंतर उतार सुरु होतो. जो ससपोल पर्यंत जाउन संपतो. बरोबर चढाच्या
मध्यभागी उंची ३५२० मीटर आहे आणि ससपोल ला ३०९० मीटर.
हे मैदान एकदम ओसाड निर्मनुष्य आहे. कोणतेच गांव नाही, कोणतीच लोकवस्ती
नाही. हां, आकाशवाणी चा एक टावर अवश्य आहे. इथून एक दुसरा रस्ता आहे जो
ना-ला घातला पार करून हुण्डुर पर्यंत जातो. रस्त्याचे काम चालू आहे. हा
रस्ता पूर्ण झाला तर कश्मीर वरून नुब्रा घाटी ला जाण्या साठी लेह ला जायची
गरज राहणार नाही. अंतर पण खूप कमी होईल. ना-ला घाट जवळ जवळ ५५०० मीटर उंच
आहे.
बासगो नंतर पानी कुठेच भेटले नाही. चढाई वरती पाण्याची खूप गरज असते.
बाटली खाली झाली होती. मैदानं मध्ये रस्त्याच्या कडेला एक टैंकर उभा होता.
सरदारजी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभा राहून सुर्यास्थाचा आनंद घेत होता.
इथे टैंकर उभा राहिला याचा अर्थ एकच आहे कि, नक्की खराब झाला असणार. मी
पाणी मागितलं. सरदारजीने पंजाबी ग्लासा मध्ये ठण्ड पानी भरून आणलं आणि
बाटली भरून दिली. त्यांनी सांगितलं कि तीन दिवसापासून गाडी खराब आहे. उद्या
ठीक व्हायची आशा आहे. त्यांच्या बरोबर सोळा सतरा वर्ष्याचा मुलगा पण होता.
त्यांनी सांगितलं कि, सुट्या पडल्यात. चल म्हटले ट्रक वरती लद्दाख ची
चक्कर मारून येऊ. मी म्हटलं खूप चांगला काम केलं तुम्ही. या भारतात लदाख
पेक्षा दुसरी कोणती जागाच नाही फिरण्यासाठी. त्यांनी थांब आणि जेऊन जा
म्हणून सांगितले. पण मी धन्यवाद देऊन तसाच पुढे निघालो.
पांच वाजून बावन मिनिटाला बासगो आणि ससपोल चा सर्वोच्च उंचीचा बिन्दु पण
पार केला. इथून पुढे १३ किलोमीटर लांब ससपोल ला पोहोचण्यासाठी ४८ मिनट
लागले आणि ह्याच वेळेत मी खूप सारे फोटो पण काढले. रस्ता चांगला होता.
स्पीड पण मिळाला होता. एक फाटा मिळाला. तिसरा रस्ता लिकिर गोम्पाला जात
होता. हा गोम्पा लद्दाख मधला मोठ्या गोम्पा मधला एक आहे. वेळ नव्हता म्हणून
गेलो नाही.
जेव्हा ससपोलला पोहोचलो तेव्हा मी ६२ किलोमीटर सायकल चालवली होती. खूप
थकलो होतो. टैण्ट लावायचे अजिबात मन नव्हते. ससपोल मध्ये घुसल्यावर एक
गेस्ट हाउस दिसलं. भाडे पांचशे रुपये. मी मोलभाव केलं तर शंभर रुपये खाली
आला. चारशे रुपये. घरात दोनच व्यक्ती होत्या. दोन्ही पण महिला. एक आई आणि
तिची मुलगी. मी जेवणाचे विचारले तर त्यांच्या बरोबरच माझे जेवण बनवले. भात
आणि भाजी.
ससपोल सिन्धु नदीच्या किनारी आहे आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध
गोम्पा अल्ची आहे. इथून अल्ची गोम्पा दिसतो. पण गेस्ट हाउस मधून दिसत
नव्हता. अल्ची ला जायची माझी इच्छा पण नाही.
 |
| लेहचा मुख्य चौक. डाव्या बाजुला मनाली, सरळ श्रीनगर |
 |
| जगात सर्वात ऊंच बोटलिंग प्लांट |
 |
| गुरुद्वारा पत्थर साहिब |
 |
| पत्थर साहिब वरुन निम्मु चा नजारा |
 |
| हाच तो दगड. दगडावरिल आक्रुति गुरुजिन्चि आहे. |
 |
| मन्दिराच्या आत मधे |
 |
| गुरुजी कुथे कुथे फिरले त्याचा नकाश्या |
 |
| माझी सायकल पण भारी आहे. |
 |
| सिन्धु नदी |
 |
| सिन्धु आणि जांस्करचा संगम. डाव्या बाजुला सिन्धु, समोर जांस्कर. |
 |
| निम्मू |
 |
| बासगो च्या नन्तर चढाई |
 |
| आता हा राजमार्ग १ आहे. पहिला १D होता |
 |
| लद्दाखी भाशेमधे लिहिले आहे. ससपोल 12 किलोमीटर |
 |
| ससपोल मधे गेस्ट हाउस |
 |
| माझ्या खोलीच्या खिडकीमधुन |
पुढच्या भागात काय.....???
मूनलैण्ड चे जबरदस्त फोटो ....त्यातला एक फोटो.
(क्रमशः)
दिवस सोळावा
सात वाजता उठलो. गेस्ट हाउस हे घरासारखेच असते. हे गेस्ट हाउस पण खूप
मोठ होतं. पूर्ण घर पालथे घातलं कोणीच दिसलं नाही. आतल्या खोलीत जाउन
बघितले. तसे मी कुणाच्या घरी आत पर्यंत जात नाही. पण मला लवकर निघायचे
होते. काही वेळाने मुलगी दिसली माहित पडले कि, तिची आई लामायुरू ला गेली
आहे. तिथे पूजा आहे कसली. घरात ती एकटीच होती. तिने नाश्त्यासाठी विचारलं.
मी लगेच हो म्हणून सांगितलं. म्हणायला लागली कि, तुम्हाला इथे आणू खोली
मध्ये का, स्वयपाकघरात येता. माझी इच्छा होती कि, लद्दाखी घर आतून
पाहण्याची, पण मुलगी एकटी पाहून बरोबर नाही वाटले, आत जायला. मी म्हटले,
खोली मधेच आन. ठीक आहे. तुमच्या मनाप्रमाणे असं म्हणून ती आत गेली.
अचानक परत आली. म्हटली, "नहीं भैया, आप अन्दर ही चलो, कोई परेशानी नहीं है. मुझे काफी सारा सामान उठाकर लाना पडेगा."
मी तुरु तुरु लगेच तिच्या मागे गेलो.
मी जेव्हा जानेवारीत आलो होतो तेव्हा असच चिलिंग मध्ये एका लद्दाखी घरात
थांबलो होतो. तिथल्या घरा प्रमाणेच हे घर होते. मोठ मोठ्या मऊ गाद्या,
बसायला लांब आयताकृती चटया, वाटला तर त्यावर झोपू पण शकता आणि समोर भगवान
बुद्ध. भिंती वरती रैक बनवून भांड्यांची केलेली सजावट आणि जबरदस्त साफ
सुतरेपणा.
त्या मुलीचे नाव आता आठवत नाही. बारावी मध्ये शिकत होती. तिने गरमागरम
लद्दाखी रोट्या वाढल्या. ह्या रोट्या खूप मोठ्या असतात. विस्तवावरती
शेकतात. जैम आणि चहा बरोबर खातात. तिने वेगवेगळ्या प्रकारचे जैम चे डब्बे
माझ्यासमोर आणून ठेवले. छोटे तोंड असलेला चहाचा थर्मास पण आणून ठेवला. तसं
हे सगळे जैम, या जाड्या रोट्यान बरोबर खायची पद्धत नेमकी बरोबर कोणती, हे
मला माहित नाही. पण चिलिंग मध्ये असताना जी पद्धत वापरली होती तीच इथे
वापरली. चाकुनी डब्या मधून जैम बाहेर काढलं आणि रोट्याना थाप थाप थापल. मग
एक घास खाल्ला कि एक कप चहाचा घोट!! त्या मुली नि पण मधी काही टोकल
नाही,म्हटलं हेच बरोबर आहे.
नऊ वाजता तेथून निघालो. आजच लक्ष्य होतं. 61 किलोमीटर लांब लामायुरू.
इथून खालसी पर्यंत रस्ता सिन्धु च्या बरोबरीने जातो. पुढे रस्ता सिन्धु
पासून दूर होऊन फोतूला ची चढाई सुरु होते.
ससपोल वरून निघाल्यावर डाव्या हाताला सिन्धु पार करून एक रस्ता प्रसिद्ध
गोम्पा अल्ची ला जातो. मला अल्चीला जायचे नाही म्हणून मी सरळ पुढे गेलो.
दोन्ही बाजूला वाळू आणि दगडाचे पर्वत आणि मधी सिन्धु. खूपच छान नजारा होता.
सिन्धु चांगला मोठ्या पात्रा तून वाहते. तिचा प्रवाह पण जोरात आहे. थांबून
बघायला मजा वाटे.
ससपोल पासून २३ किलोमीटर पुढे नुरला आहे. साडे अकरा वाजता नुरला पार
केले. नुरला ३००० मीटर उंचावर आहे. छोटंसं गाव आणि राहायला,खायला काही
नाही. नुरला च्या पुढे 12 किलोमीटर वरती खालसी आहे. खालसी २९७८ मीटर
उंचावर आहे. साहजिकच रस्ता मध्ये उतार आहे. पण एवढा पण नाय जेवढी मला
अपेक्षा होती. एक वाजता खालसीला पोहोचलो.
खालसी मध्ये ढाबे, होटल व गेस्ट हाउस आहेत. धुळीमधेच गाडया उभ्या
होत्या. लोक खाण्यासाठी थांबली होती. मी पण एका पंजाबी ढाब्या मध्ये
जेवायला थांबलो आणि मस्त पैकी डाळ भाताचा आनंद घेतला. नऊ वाजता ससपोल वरून
निघून एक वाजता ३५ किलोमीटर लांब खालसी मध्ये पोहोचलो होतो. जास्त उतार
नव्हता आणि उन खूप होते म्हणून थकलो होतो. मागच्या १५ दिवसात आज
पहिल्यांदाच ३००० मीटर च्या खाली आलो होतो. त्यामुळे गरम पण खूप होत होते.
शरीर पण मी पूर्ण झाकून घेतले होते. सगळी समीकरणे माझ्या उलट होती.
दोन वाजता इथून निघालो. चांगला रस्ता मिळाला आणि उतार पण. दहा मिनिटात
तीन किमी अंतर पार केलं. खालसी च्या तीन किलोमीटर पुढे एक फाटा फुटतो. तो
रस्ता सरळ बटालिकला जातो. बटालिकला जाण्यासाठी परमिट घ्यावे लागते. त्याच
रस्त्या वरती लद्दाख क्षेत्र मधील प्रसिद्ध गाव धा आणि हनु आहे. म्हणतात
कि ते शुद्ध आर्य होते. तसे तिथे अजून बरीच सारी गाव आहेत पण या दोनच गावात
जायला परवानगी आहे.
इथे एक चेकपोस्ट भेटला. कोण येत जात त्याची नोंद करावी लागते. मी पूर्ण
झाकलेलो होतो. हवालदाराला सायकल वरून वाटले कि, मी विदेशी आहे. इंग्लिश
मध्ये काही तरी बोलत विदेशी लोकांचं रजिस्टर माझ्या पुढे ठेवलं. मी अश्या
लोकांची खूप मजा घेतो.
मी त्याला एकदम सरळ भाषेत सांगितले. - भाई, देस्सी रजिस्टर कित सै?
मग त्याचा चेहरा बघण्यासारखा झालता.
बटालिक वाला रस्ता सिन्धु च्या बरोबर उजव्या हाताला निघून जातो आणि आपला
कारगिल वाला रस्ता सिन्धु पार करून जातो. मुख्य रस्त्या पासून खालसी ते
कारगिल १३३ किलोमीटर आहे, तसेच बटालिक च्या रस्त्याने १५० किलोमीटर. मुख्य
रस्त्यांनी दोन घाट लागतात. एक ४१०० मीटर व दुसरा ३८०० मीटर ऊंच. तसेच
बटालिक च्या रस्त्यांनी एकच ४००० मीटर उंचीचा घाट लागतो. सगळी समीकरणे
बटालिक च्या बाजूनी आहेत पण इथून पाकिस्तान ची सीमारेषा जवळ आहे. त्यामुळे
कारगिल व श्रीनगर ला जाण्यासठी या रस्त्याकडे दुर्लक्ष्य केले आहे. बटालिक
ला जाण्यासाठी परमिट ची आवश्यकता लागते.
सिन्धु पार केल्यानंतर एक किलोमीटर पर्यंत रस्ता सिन्धुच्या बरोबरीने
जातो. परत डाव्या हाताला वळतो. नदीच्या बरोबरीनेच जातो पण जमिनी मध्ये फरक
दिसून येतो. आतापर्यंत मोठ्या रुंदीच्या घाटी मधून चाललो होतो. आता छोट्या
रुंदीची घाटी सुरु होते. नदी च्या दोन्ही बाजूला उंच्या उंच पर्वत.
त्याच्या बरोबर खाली रस्ता. कोणता दगड जरी पडला तरी सरळ रस्त्यावर. ह्याच
दगडा मुळे काही ठिकाणी रस्ता उखडला होता. पाउस असता तर ह्याच रस्त्यांनी
जायला भीती वाटली असती. आता काहीच भीती नव्हती. उलट आनंद होत होता.
प्रत्येक नव्या वळणावर नवीन दृश्य.
माझ्या पुढे जाउन एक गाडी थांबली. त्यातून चार लोक बाहेर पडले. आणि फोटो
काढू लागले मझे पण फोटो काढले. त्यांच्या जवळ गेलो तर मला थांबावेच लागले.
पूर्ण कपडे अंगावर असल्या कारणाने त्यांनी मला विदेशी समझले. इंग्लिश
मध्ये बोलायला सुरुवात केली. लवकरच समझले कि, भारतातील लोक सुद्धा असे करू
शकतात. ते काही दिवस पूर्वी श्रीनगर वरून लेह ला गेले होते. आता परत येत
आहेत. त्यांची तक्रार होती कि रस्ता खराब आहे. मी म्हंटले, मनालीच्या
रस्त्यांनी आले असते तर, ह्याच रस्त्याला तुम्ही स्वर्ग म्हटलं असतं. असो
..खूप कौतुक केलं माझं.
रस्ता चढाईची होता. खूप थकलो होतो. घामाच्या धारा वाहत होत्या.
त्यांच्या कडूनच पाणी घेतले. बाटली पण भरून घेतली. याच नदीच्या कडे कडेने
जात असताना ६ किमी पुढे एक फाटा मिळाला. इथून मला नदीची सोबत सोडायची होती.
फोतूला ची चढाई आता सुरु होणार होती. दुसरा रस्ता नदीच्या कडे कडेने गेला
आहे. एक सूचना पाटी पण दिसली त्यावर लिहिले होते कि, वांगला- फोतोकसर-नेरक
रोड. नेरक बघून मी ओळखले कि, हा रस्ता अजून बनत आहे. नेरक जांस्कर नदी
च्या किनाऱ्यावर आहे. त्यामुळे अजून कोणताच रस्ता ह्या रस्त्याला मिळाला
नाहीये.
इथून जी चढाई सुरु झाली. तिनी तर माझा जीवच काढला. दोन-तीन वळणे पण
आहेत. थोड चालायचो ,थोडा थांबायचो. आता चार वाजले होते आणि लामायुरू पण
जास्त लांब नव्हते. त्यामुळे उशीर झाला असता तरी चालले असते. रस्त्या मधेच
‘मूनलैण्ड’ लागलं. लामायुरू च्या आधी पर्वतांच्या आकृत्या एकदम वेगळ्या
आहेत. असं म्हणतात कि, ह्या आकृत्या चंद्रावरच्या जमिनी सारख्या आहेत. ह्या
पर्वता मध्ये मातीचे प्रमाण जास्त आहे तसेच हवेच्या आणि पाण्याच्या
प्रवाहाने अश्या आकृत्या बनल्यात. त्या आकृत्या बघून माणूस आश्चर्य चकित
होतो. परग्रहा वरती आल्या सारखे वाटते. आज अष्टमी होती. आणि योगायोगाने
वरती चंद्र उगवला होता. त्यामुळे मूनलैण्ड वरती चंद्र पाहायला मिळाला. हे
योगायोग समझा कि माझे नसीब!!
साढे पांच वाजता लामायुरू मध्ये प्रवेश केला. हे एक बौद्ध गांव आहे. आणि
एक गोम्पा पण आहे. गोम्पा मध्ये पूजा होती. त्यामुळे लांबून लांबून
श्रद्धालु आले होते. संध्याकाळ झाल्यानंतर परत परतीच्या प्रवासाला निघाले
होते. गाडया आणि बस भर भरून लोक लामायुरू मधून परत येत होती. पूजा उद्या
पण राहणार आहे. खूप गर्दी होती.
मला आज इथेच थांबायचे होते. आज ६१ किलोमीटर सायकल चालवली होती. जास्त
करून चढाईच होती. लामायुरू ३४०० मीटर उंचावर आहे. पुढे फोतूला आहे. माझ्या
जवळ लेह-श्रीनगर रस्त्याची कोणतीच माहिती नव्हती. त्यामुळे मला माहित
नव्हते कि, फोतूला किती उंचावर आहे आणि इथून किती दूर आहे. एकाला विचारले
तर, त्याने दहा किमी सांगितले. मग विचर केलं कि, आजच फोतूला पार करतो. मग
उतार मिळेलच. खारबू ला जाऊन रात्री थांबतो. परत विचार केला कि,फोतूला दहा
किलोमीटर आहे. मला तीन तास लागतील पार करायला. आता साढे पांच वाजलेत.
फोतूला ला पार करायला रात्र होईल. नाही, आज लामायुरू मधेच थांबतो.
एका गेस्ट हाउस मध्ये गेलो. एक खोली पंधराशे रुपयाला. दुसरी कडे गेलो तर
बाराशे ला. माझी तर झोपच उडाली. पूजा असल्याने आज लामायुरू इतकं महाग
होतं. खायला पण काही नाही भेटलं. पुढे जाण्याशिवाय काही पर्याय नाही. पुढे
गेलो. इथून पुढे चढाई तर आहे. पण वळण नाही. आता मन पण तयार झाले होते. पुढे
जायला. दहा मिनिटात एक किलोमीटर पुढे जाऊ लागलो.
चार किलोमीटर पुढे गेल्यावरती मोटरसायकल वाले भेटले. मी एकाला विचारल,
फोतूला किती लांब आहे. तो म्हणाला कि, फक्त चार किलोमीटर. मी खूप खुश झालो.
आजच फोतुला पार करणार. जास्तीच जास्त एका तासात फोतुला पार होऊन जाइल.
एकदम जोश मध्ये पैन्दल मारू लागलो.
चार किलोमीटर पुढे गेल्यानंतर बघितले कि, रस्ता पुढे जाउन वळतो आणि लगेच
गायब होतो. आशा होती कि, तिथेच फोतुला असणार. मनात म्हटलं, " बेटा फोतूला,
आज तुझे फतह करने की उम्मीद नहीं थी. आज तो मैं लामायुरू में रुकने वाला
था. तू लेह-श्रीनगर रोड पर सबसे ऊंचा दर्रा है. देख, लेह से चलने के दो दिन
बाद ही तुझे पार करने वाला हूं." नंतर सायकल पुढे दामटली.
पण त्या वळणावर गेल्यावर मी हैरान झालो. फोतूला वोतूला काहीच नव्हतं
तिथे. लांब कमीत कमी सात ते आठ किलोमीटर रस्ता दिसत होता. ते पण एकावर एक
वळण घेत. मी ह्याच वळनांना फोतुला समजून बसलो होतो. वळणे तर पुढे आहे. जी
माझी यायची वाट बघत आहेत. मी त्या मोटारसायकल वाल्यांना पक्या शिव्या
घातल्या. ज्यांनी सांगितलं होतं कि फोतुला फक्त ४ किमी आहे.
शरीर पण गळून गेलं होतं. पुढे जाऊ नको म्हणून सांगत होतं. लामायुरू
पासून बरोबर नऊ किलोमीटर वरती एक ओढा आहे. ह्याच्याच किनार्यावरती
बीआरओच्या काही मशिनी आहेत. त्यांच्या निगराणी साठी एक लद्दाखी उभा केला
होता. त्याच्या साठीच एक छोटंसं शेड होतं. मी त्याच्याच जवळ टैण्ट लावायचा
निर्णय घेतला. तो लामायुरू चा गाववाला होता. टैण्ट लावण्यासाठी त्यांनी
मला साथ दिली. टैण्ट लावल्यानंतर तो त्याच्या घरी निघून गेला. सकाळी माहित
पडले कि, पूर्ण रात्र त्याची चौकीदारीची ड्यूटी होती. बघा आता !! पण
त्याच्या जाण्यामुळे माझं एक नुकसान झालं. पूर्ण रात्र त्या सन्नाटेच्या
काळोखात एकट्यालाच काढावी लागली. तिथे या साठी थांबलो कि, हा पण माझ्या
सोबत असेल. पण तंबू लावून बाबा पळाला कि. या आधी गुलाबा मध्ये थांबलो
तेव्हा शेजारीच बीआरओ वाले होते. त्यानंतर नकीला च्या जवळ तंबू लावला
तेव्हा सचिन होता. इथे मात्र मी एकटाच.
मला अश्या ठिकाणी भूतांची भीती वाटते. काळोखात बाहेर येउन बघितलं तर
लांब लांब पर्यंत कोणीच नव्हते. अश्या वेळेस तर मला चारी बाजूनी भूतेच दिसू
लागतात. मनाला माहिती आहे कि, भूत भीत काही नसतं. पण अशी वेळ आली कि
चांगलीच फाटते. दिवसा मी सिद्ध करू शकतो कि, भूत भीत काही नसते. पण अश्या
शांत रात्री एकटे असताना.... सिद्ध करायचे तर बाजूलाच राहिले. विचार करूनच
भीती वाटते. तंबू लावल्या नंतर जे मी स्लीपिंग बैग मध्ये घुसलो. सकाळ होई
पर्यंत डोळे उघडलेच नाही.
आज 70 किलोमीटर सायकल चालवली.
 |
| ससपोल गांव |
 |
| ससपोल च्या जवळ सिन्धु |
 |
| सिन्धु च्या बरोबरीने राजमार्ग-1 |
 |
| खालसी मधे एक पुल |
 |
| खालसी मधेच पुला वरती पुल |
 |
| खालसी च्या तीन किलोमीटर पुधे फाटा. |
 |
| सिंधू नदी सोडल्या नंतर आपण या छोट्या घाटात प्रवेश करतो. |
 |
| नदी पार करण्याची कसरत !! |
 |
| हा बघा विदेशी!! |
 |
| लामायुरु कडे |
 |
| खालुनच वरती आलोय. ह्या चधाईनी तर जीव घेतला. |
 |
| लामायुरू च्या आधी ‘मूनलैण्ड’ आहे. |
 |
| मूनलैण्ड |
 |
| आज अष्टमी होती. वरती चंद्र उगवला होता. त्यामुळे मूनलैण्ड वरती चंद्र पाहायला मिळाला. हे योगायोग समझा किवा माझे नसीब!! |
 |
| मूनलैण्ड चे जबरदस्त फोटो |
 |
| हे चित्र मला स्वप्नातल्या एका नगरी सारखे वाटते. |
 |
| लामायुरू मधे आपल स्वागत आहे. |
 |
| लामायुरू मधे जत्रा |
 |
| बाय बाय !! लामायुरू .. परत भेटुया !! |
 |
| लामायुरू च्या पुधे |
(क्रमशः)
दिवस सतरावा
इथे कोणतेच झाड नव्हते. सुर्य आग ओतत होता. या आगीच्या झळा तंबूच्या आत
पर्यंत लागत होत्या. तंबूच्या बाहेर पडलो तर थंड हवेने माझे स्वागत केले.
पटापट तंबू काढला. साडे आठ वाजले होते. बाहेर खूप सारे कामगार आले होते. पण
तो लद्दाखी चौकीदार दिसत नव्हता. मी कामगारांना त्याच्या बद्दल विचारले
तर, म्हणाले ,"यहां चौकीदारी की रात की ही ड्यूटी होती है, दिन में वो अपने
घर चला जाता है." पण खरी परिस्थिती त्यांना माहित नव्हती. मला माहित होते
कि, हा संपूर्ण रात्र आपल्या घरीच होता.
सव्वा नऊ वाजता तेथून निघालो. फोतूला अजून पण आठ किलोमीटर आहे. चढाई तर
आहेच आणि त्यात वळणे पण आहेत. फोतूलाच्या चार किलोमीटर आधी पासूनच खराब
रस्ता सुरु होतो. रस्त्याचे डागदुजीचे काम चालू असल्याने धूळ पण उडत होती.
त्याने सायकल चालवायला अजूनच त्रास पडत होता. तहान लागली होती. जवळ पाणी पण
नव्हते. एका ठिकाणी कार उभी दिसली. मी त्यांच्या पाशी जाउन उभा राहिलो.
त्यांनी मग विचारपूस केली. तिथेच पाण्याची बाटली पण भरून मिळाली.
अकरा वाजता ४०८८ मीटर ऊंच फोतूला वर पोहोचलो. हा लेह-श्रीनगर रोड वरील
सगळ्या घाटा पेक्षा सर्वात उंच घाट आहे. हा घाट पार करून आनंद झाला कारण
इथून पुढे जे घाट मिळतील ते ह्याच्या पेक्षा लहानच असणार. इथे दूरदर्शनच
प्रसारण केन्द्र पण आहे.
फोतूला पासून १२ किलोमीटर पुढे हानिसकोट गांव आहे. रस्ता उताराचा आहे.
खाली उतरत होतो तर रस्त्यात काही मोटारसायकल वाले भेटले. लेह आणि पुढे
मनालीला जाणारे होते. माझा चेहरा पूर्ण झाकलेला असल्याने, त्यांनी ओळखलं
नाही कि मी भारतीय आहे कि विदेशी. मी जेव्हा जोरात खाली उतरत होतो तर
त्यातील एकाने दुसऱ्याला आवाज दिला कि,"ओये, इसे रोक, साइकिल वाले को.
विदेशी है. बातचीत करेंगे." आपल्या भारतीय लोकांची सवय आहे कि, त्यांना
विदेशी लोकां बरोबर बोलायची, त्यांच्या विषयी जाणून घ्यायची इच्छा असते.
इथे त्यांच्या साठी मी विदेशी होतो. त्यांचे बोलणे ऐकून मीच थांबलो. मी
थांबताच सगळे माझ्या जवळ आले आणि विचारायला लागले, "सर, यू आर फ्रोम?
मी म्हंटले, "भाई, दिल्ली."
सगळी कडे हशाच पिकला आणि म्हणायला लागले,"भाई ,धीरे का झटका जोर से लगा."
ते दिल्ली चे होते. त्यांच्या कडे भारीतल्या मोटार सायकली होत्या. तरी पण
म्हणायला लागले कि, "हमारी हालत खराब हुई जा रही है. चढाई पर मोटरसाइकिलें
बहुत तंग करती हैं. चढती ही नहीं हैं, पता नहीं तुम कैसे साइकिल चढा लेते
हो?
सगळ्यांनी माझे आणि सायकलीचे फोटो काढले.
हानिसकोट पासून ९ किलोमीटर पुढे बौद्ध खारबू आहे. हि जागा कारगिल जिल्ह्या
मध्ये येते. लद्दाख मध्ये दोन जिल्हे आहेत. लेह आणि कारगिल. लेह जिथे
बौद्ध लोक वस्तीचे आहे तर कारगिल हे मुस्लिम लोक वस्ती चे आहे. आता डोके
झाकलेल्या मुसलमान मुली पण दिसू लागल्या होत्या. लहान लहान मुली पण डोके
झाकून होत्या. कारगिल जिल्ह्यात खारबू नावाचे दोन गांव आहेत. हे बौद्ध
खारबू आहे. दुसरे खारबू हे मुस्लिम लोक वस्ती चे आहे आणि कारगिल-द्रासच्य
मधी आहे. मी उद्या तिथूनच जाणार आहे.
बौद्ध खारबू हे ३५०० मीटर उंचा वरती आहे. गावा मध्ये हिरवळ आहे. पण आजू
बाजूचे डोंगर लद्दाखी आहेत म्हणजेच सूखे आहेत. खूप उन होतं. आकाशात ढंगाचे
नामोनिशान नव्हते. पावणे एक वाजता तिथे पोहोचलो तर गरम होत होते. सव्वा
तास ढाब्या मध्ये थांबलो. जेवण आणि थोडी झोप घेतली.
बौद्ध खारबूच्या मधून एक नदी वाहते जी पुढे जाउन सिन्धुला मिळते. एक रस्ता
पण सिन्धु च्या बाजूला गेला आहे. आणि त्याच खालसी-बटालिक रस्त्याला जाउन
मिळतो. जे मी काल बघितले होते. आपण जर ह्याच नदीच्या कडे कडेने गेलो तर
त्या बटालिक च्या रस्त्यावर पोहोचतो. पण तिथे जायला परमिट घ्यावे लागते.
त्यामुळे कारगिल ला जाण्यासाठी अजून एक घाट पार करावा लागणार आहे. त्याचा
नाव आहे - नामिकला.
बौद्ध खारबू पासून ७ किलोमीटर पुढे खंगराल आहे. रस्ता हा इथून उताराचा
आहे. तसेच नदी बरोबरीने जात आहे. खंगराल पासुन ११ किलोमीटर पुढे नामिकला
आहे. आणि तिथून रस्ता चढाई चा आहे. रस्ता चांगला बनवला आहे. मी याच रस्त्या
वरून हळू हळू चाललो होतो. तितक्यात एक मारुति आली. मी चार च्या वेगाने
चाललो असेल तर मारुती ५ च्या वेगाने चालली होती. त्यामुळे पुढे गेली. काही
तरी गडबड होती त्यामध्ये. पूर्ण कुटुंब बसलेलं होतं त्यामध्ये. पुढे ती
मारुती पुढच्या वळणावर माझ्या नजरेतून गायब झाली. मी त्याच वळणावर जेव्हा
आलो तेव्हा ती बिचारी तिथे उभी होती. त्यातली लोक बाहेर येउन फिरत होते. मी
पुढे निघून गेलो. परत एक किलोमीटर नंतर तसे झाले. त्या मारुति ने मला परत
मागे टाकले. आणि पुढे जाउन थांबली. मी तसाच पुढे निघून गेलो. असे दोन तीन
वेळा झाले. चौथ्या वेळेस तर ते माझ्या कडे बघत हसत गेले. मी पण त्यांना
हसत मागे टाकले. जशी काय आमची स्पर्धा लागली होती. शेवटी कायमचीच ती मारुती
माझ्या नजरे आड झाली.
चार वाजता ३६०० मीटर ची उंची पार केली तेव्हा तेथून नामिकला सहा
किलोमीटर राहिले होते. सायकल चालवणे अवघड वाटू लागले होते. हा उंच पर्वतीय
आजार नव्हता. मी सारखं ४००० मीटर च्या वरती सायकल चालवत होतो. त्यात आज
फोतूला पण पार केले होते. आज सकाळ पासून जसी सायकल मारायला सुरुवात केलीय
तसे चढाई च होती. फक्त फोतूला पासून बौद्ध खारबू पर्यंतच उतार होता. जस जस
नामिकला जवळ येऊ लागलं. तस तस शरीर पण मनाई करू लागलं. शेवटी हालत इतकी
खराब झाली कि, २ किमी पायाने चालावे लागले.
पाच वाजता नामिकला पोहोचलो. याची उंची ३८२० मीटर आहे. इथल्या सूचना
पट्टी वर उंची १२१९८ फुट लिहिलेली आहे. म्हणजेच ३७१८ मीटर. माझं जीपीएस
३८२० मीटर सांगत होतं. मी माझ्याच मशीन वरती विश्वास ठेवणार!! इथे सुंदर
नजारा पाहायला मिळतो. एका दिशेला मोठ मोठे लांब वाळूचे डोंगर,त्या नंतर
दगडी पर्वत.
घाट पार केल्यानंतर उतार पाहायला मिळतो. पण नामिकला ह्याला अपवाद आहे.
जवळ जवळ दोन किलोमीटर नंतर उतार अजिबात नाही तर चढाई आहे. माझ्या मशीन ने
तर दोन किलोमीटर पुढे गेल्यावर ३८२३ मीटर उंची दाखवली. म्हणजे नामिकला
पेक्षा उंच. त्यानंतर जोराचा उतार लागतो. रस्ता चांगला आहे. सायकल
चालवायला मजा येत होती.
मुलबेक च्य तीन किलोमीटर अलीकडे वाखा आहे. मला इथे मुसलमान बघायला
मिळाले. अजून पर्यंत लेह मध्ये थोडे फार मुसलमान पाहायला मिळाले होते.
म्हणजे आता मुसलमानाची सुरुवात झाली आहे. तिकडे तीन किलोमीटर पुढे मुलबेक
आहे. जे बौद्धोंचे शेवटचे गांव आहे. वाखा-मुलबेक मुस्लिम-बौद्ध सीमारेषा
आहे. इथून कारगिल च्या तिकडे गेलो तर मुसलमान आणि लेह च्या बाजूला गेलो तर
बौद्ध.
३२५० मीटरच्या ऊंचाई वरती वसलेल्या मुलबेक मध्ये पावणे सात वाजता एक
गेस्ट हाउस मध्ये खोली घेतली. चारशे वरून कमी करून तीनशे ला खोली मिळाली.
इथे खूप सारे गेस्ट हाउस आहे. तिथे चारशे ते पाचशे पर्यंत रेट आहेत. या आधी
एका गेस्ट हाउस मध्ये गेलो होतो. त्याने पाचशे सांगितले. तो चारशे पर्यंत
आला होता. मी म्हटले तीनशे. तर तो म्हणाला कि, "मुलबेक से एक किलोमीटर नीचे
कई गेस्ट हाउस हैं. वहां अगर इससे कम में मिल जाये तो कहना. आखिरकार आपको
लौटकर मेरे पास ही आना पडेगा."
पण अशी वेळ नाही आली. इथेच तीनशे ला मिळाली.
मुलबेक मध्ये बुद्ध ची एक विशालकाय मूर्ति आहे जी मोठ्या दगडावर बनवली
आहे. नसीब धर्मांतराच्या वेळेस लद्दाखी मुसलमानांनी याला सोडून दिलं.
मुलबेक याच्यासाठीच प्रसिद्ध आहे. गेस्ट हाउसला जाताना माझ्याच रस्त्यावर
दिसली होती. विचार केला कि सकाळी निघताना बघू.
आज ५९ किलोमीटर सायकल चालवली ज्या मध्ये दोन घाट
फोतूला आणि नामिकला पण पार केले. दोघान मध्ये अंतर जास्त नव्हते. पण सायकल
वरून ४१०० मीटर आणि ३८०० चे दोन घाट पार करणे म्हणजे चेष्टा नाही.
 |
| फोतूला च्या तिथे लावलेला तम्बु |
 |
| फोतूला कडे |
 |
| फोतुला जास्त लाम्ब नाहि |
 |
| रस्त्यामधे भेटलेले मोटारसायकल वाले |
 |
| बौद्ध खारबू गांव |
 |
| नामिकला जानारा रस्ता |
 |
| समोर नामिकला आहे. |
 |
| आजच नामिकलापण पार केला. एका दिवसात दोन घाट |
 |
| मुलबेक मधे ह्याच गेस्ट हाउस मधे थाबलो होतो. |
 |
| माझी खोली |
 |
| लाइट गेली म्हणुन मेनबत्ती लावुन जेवन केले. कैण्डल लाइट डिनर!! |
(क्रमशः)
दिवस अठरावा
रोजच्या प्रमाणे आरामशीर उठलो. पण हा आराम खूप महागात पडणार होता कारण
कारगिल नंतर फक्त द्रास मधेच राहण्याची व्यवस्था होती. इथून कारगिल ४०
किलोमीटर आणि द्रास १०० किलोमीटर वर आहे. ह्या प्रवासात अजूनपर्यंत जास्तीत
जास्त ८८ किलोमीटर सायकल चालवली आहे. चढाई तर लांबच उताराला पण एवढ्या
लांब सायकल चालवली नाही. आज १०० किमी द्रास पर्यंत जाने गरजेचे होते. आज
उतार कुठेच नव्हता. कदाचित कारगिल पर्यंत थोडा फार मिळू शकतो पण त्यानंतर
जोजीला पर्यंत अजिबात नाही. आजच हिशोब सरळ होता कि, कारगिल ला चार तासात
जाऊ शकतो पण पुढे द्रास ला कोणत्याहि परिस्थितीत पोहोचणार नव्हतो. अंधारात
तर सायकल चालवू नाही शकत.
आज अजून एक अडचण होती कि, कारगिल आणि द्रास च्या मधी १५ किलोमीटर पर्यंत
चा रस्ता असा आहे. जो पाकिस्तानी सेनेच्या फायरिंग रेंज मध्ये येतो. हा
रस्ता चढाईचा आहे. मला कमीत कमी ४ तास लागतील पार करायला. मी ह्याच
विचाराने चिंतीत झालो होतो. कधी असं पण मनात येत होते कि, ह्या रस्त्या
मध्ये कोणत्या तरी ट्रकला हाथ करून, हा रस्ता पार करावा.
नाश्ता करून साडे नऊ वाजता इथून निघालो. सुरुवातीला रस्ता चांगला होता
नंतर खराब रस्ता सुरु झाला. काही काही ठिकाणी रस्त्याचे काम पण चालू होते.
त्यामुळे कडक उन्हात धुळीचा पण सामना करावा लागत होता. पूर्ण घाटी
लोकसंख्येची आहे. एका नंतर एक गाव येत गेले. भरपूर ठिकाणी हिरवळ पहावयास
मिळत होती. त्यामुळे हिरवळ दिसली कि, मी समजून जायचो कि इथे कोणते तरी गाव
आहे. मुलबेक नंतर बौद्ध लोक दिसेनासे झाले आणि मुसलमान दिसू लागले. बौद्ध
आणि मुसलमान यातील फरक आता स्पष्टपणे दिसू लागला होता. त्यांचे राहणी मान
आणि कपड्या मध्ये मागासलेलापणा स्पष्टपणे जाणवत होता.
आपण जर नदीच्या प्रवाहाबरोबर जात असेल तर तुम्हाला उतार हा नक्कीच
मिळणार. कधी तरी चुकून चढ लागतो. इथे पण असेच झाले. कारगिल पर्यंत रस्ता
नदी च्या बरोबरीने आहे. त्यामुळे उतार आहे. मुलबेक ३२५० मीटर उंचीवर आहे
तर कारगिल २६५० मीटर उंचीवर.
कारगिल च्या पांच किलोमीटर अलीकडे उंची २९०० मीटर आहे. आणि वाटत पण
नव्हतं कि, कारगिलला जाण्यासाठी एवढे खाली उतरावे लागेल. हे एक तऱ्हेने
चांगले होते कारण कारगिल नंतर परत चढाई चा सामना करावा लागणार होता. मी
ह्याच उताराने खाली उतरलो. आता इथून कारगिल घाटी ५ किलोमीटर लांब होती. आता
उंची २९०० वरून,ती सरळ २६५० पर्यंत आली. निसर्गाचा नियमच आहे. जेवढे खाली
उतरावे लागते. तेवढेच वरती चढावे लागते. त्यामुळे मी अजून चिंतीत झालो.
उताराने सायकल वेगाने जात होती.
एक वाजता कारगिल ला पोहोचलो. नदी पार केल्यानंतर एक रस्ता श्रीनगरला
जातो आणि दुसरा रस्ता पदुम. मी श्रीनगर च्या रस्त्याने निघालो. येथे
नेटवर्क मिळालं. मग घरच्यान बरोबर बोलून घेतले. आज जुम्मा होता. ह्या
वेळेला नमाज चालू होतं. मस्जिद मध्ये गर्दी होती. भाषण पण चालू होते.
कारगिलच्या बाजारा मध्ये पण गर्दी होती. इथे वेगळ्याच तोंडाची लोक पाहायला
मिळाली. त्यांना दार्द असे म्हणतात. ते सिन्धु नदीच्या बटालिक च्या बाजूला
राहतात. जास्त करून मुसलमान आहेत.
कोणतेच होटल नीट धडाचे नव्हते. असले तरी गर्दीमुळे दिसले नसेल. थोड्याच
वेळात कारगिल च्या पुढे निघून गेलो. परत ओसाड वाळवंट सुरु झाले. कारगिल
मध्ये खायला होते पण तरी भुकेलाच राहिलो. रस्ता एकदम खराब आणि चढाईचा होता.
पायाने चालत जावे लागले. एकेरी रस्ता असल्याने, सायकल रस्त्याच्या खालून
चालवावी लागत होती. कारगिल,ज्या नदीच्या किनारी वसलेल आहे. ती नदी पुढे
जाउन सिन्धुला मिळते. कारगिल च्या पुढे अजून एक नदी ह्या नदीला येउन मिळते.
रस्ता पण ह्या नदीच्याच किनारीने गेला आहे.
हा लेह-श्रीनगर रस्त्यावरील एकदम खराब रस्ता होता. कोणतेच गाव दिसत
नव्हते. लोक वस्ती नव्हती. मग प्रश्न पडला कि, जेवायला कुठे मिळणार? एका
पोलीस्वल्याला विचारले तर तो म्हणाला कि, ५ किलोमीटर पुढे मिळेल. ऐकून खूप
बरे वाटले.
थोडे पुढे गेल्यावर बीआरओ वाले दिसू लागले. एकरे रस्त्याला दुहेरी रस्ता
बनवण्याचे काम चालू होते. रस्त्या वरती वाळूचे ढीग पडले होते. सायकल
चालवता येत नव्हती. मग पायाने चालू लागलो. याच धुळी मध्ये एक धाबा दिसला
तेव्हा कुठे हायसे वाटले. पोटभरून राजमा-भात खाल्ला. एवढे चांगले बनवले
नव्हते. पण उपाशी राहण्या पेक्षा पोट भरून जेवलो.
पावणे तीन वाजता येथे आलो होतो. साडे तीन वाजता येथून निघालो. कारगिल
पासून २० किलोमीटर आलो होतो, द्रास अजून सुद्धा ४० किलोमीटर होते. पण जर
असाच रस्ता पुढे पण भेटला तर, उद्या पण द्रास ला पोहचू शकणार नाही.
जेवून निघाल्यानंतर दोन किलोमीटर पर्यंत चांगला रस्ता होता. एकदम नवीन
बनवला होता. एक पण खड्डा नाही आणि रुंदी ला मोठा पण. पुढे गेल्यानंतर अजून
एक नदी येउन ह्या नदीला मिळते. हि नदी जोजिला वरून येते. ह्या नदीला द्रास
नदी किंवा द्रास ओढा पण म्हणतात. जिथे ह्या दोन्ही नद्यांचा संगम होतो
तिथला नजारा बघण्यासारखा आहे. द्रास नदी वर एक छोटा पूल पण होता. मी कारगिल
पासून १५ किलोमीटर पुढे आलो होतो तरी पण पाकिस्तान च्या फायरिंग रेंज वाला
भाग अजून आला नव्हता. कुणाला विचरले पण नाही. नंतर माहित पडले कि, जिथे
त्या नद्यांचा संगम होतो तोच तो भाग आहे. द्रास नदी तर जोजीला वरून येते पण
दुसरी नदी पाकिस्तानचे नियन्त्रण असणाऱ्या भागातून येते आणि ती जास्त
लांब पण नाही. वरती डोंगरावर थोड्याच अंतरावर पाकिस्तानच नियन्त्रण कक्ष
आहे. त्यामुळे हा भाग त्यांच्या फायरिंग रेंज मध्ये येतो. पण रस्त्याच्या
कामामुळे तिथली सूचना पट्टी काढून टाकली होती. ज्यावर ती चेतावनी लिहिली
होती. जर तो सूचना देणारा बोर्ड मला दिसला असता तर माझा अजूनच जीव गेला
असता. उलट मी फायरिंग मधल्या भागात थांबून निसर्ग बघण्याचा आनंद घेऊ शकलो,
तसेच पाणी पण पिलो, फोटो पण काढले.
सव्वा पाच वाजता खारबू मध्ये पोहोचलो. हे २८०० मीटर उंच आहे. इथे मला
राहण्यासाठी मिळेल अशी आशा होती. मी तुम्हाला पहिलेच सांगितले आहे कि,
मुलबेक जसं मुसलमानाच भाग आहे तसं खारबू पण मुस्लिम आहे. छोटस गांव आहे.
एका म्हाताऱ्याला राहण्यासाठी विचारले तर त्यांनी नाही म्हणून सांगितले.
नाराज होऊन पुढे जाउन परत एका ठिकाणी थांबलो. घरासमोर एक माणूस आपल्या
छोट्या दोन मुलीना घेऊन बसला होता. मी त्याला राहण्या बाबत विचारले तर
त्यांनी पण नाही म्हणून सांगितले. तितक्यात त्या मुली माझ्याजवळ आल्या आणि
चॉकलेट मागू लागल्या. मग मी दोघांना दोन दोन चॉकलेट दिल्या.
आता शेवटचा विकल्प माझ्याकडे राहिला होता. तो म्हणजे तंबू लावणे.
रस्त्या मध्ये ठीक ठिकाणी बीआरओ वाल्यांचे तंबू दिसत असतात. असाच एक तंबू
बघून त्या शेजारी आपला तंबू लावणे. रस्ता चांगला होता पण चढाई होती.
संध्याकाळची वेळ होती. पश्चिमकडे जाणारा रस्ता. त्या बरोबरीने नदी.
निसर्गाचं असं सुंदर दृश होतं कि सगळी निराशाच निघून गेली.
खारबू पासून आठ किलोमीटर पुढे एक गाव दिसलं - शम्शा. लांबून येणाऱ्या
सायकली ला पाहून काही मुळे पळत माझ्याकडे आली आणि हेलो हेलो म्हणू लागली.
मला आता याची सवय झाली होती. जेव्हा चढ लागत असेल, घाम येत असेल अश्या
वेळेस हीच मुले मला शत्रू वाटतात. लांबूनच हसत हसत येतात, चॉकलेट मागतात
,हाथ मिळवून नाव विचारतात. असं प्रसंग जर एखाद वेळा आला तर काही वाटत नाही
पण सारखाच येऊ लागला तर मग मुलांकडे बघून खूप राग येतो. मी त्या मुलांकडे
लक्षच दिलं नाही. तसाच पुढे गेलो.
शम्शा च्या पुढे निघून आलो होतो. एकदम शांत सामसुम ठिकाणी दहा वर्ष्याचा
मुलगा उभा होता. त्याने मला थांबायला सांगितले. काय झाला काय माहित मी
चक्क थांबलो. दम पण लागला होता म्हणून थांबायचेच होते. त्याने विचारले
कि,"कहां जाओगे?
मी म्हटलं, "श्रीनगर."
म्हणाला कि, "आज कहां रुकोगे?"
मी म्हटलं, "आगे रुकूंगा बीआरओ के कैम्प के पास."
म्हणाला कि," वो तो पांच छह किलोमीटर आगे है, अन्धेरा हो जायेगा वहां पहुंचते पहुंचते.आप हमारे घर चलो."
हे ऐकून माझे कान तर उभे राहिले. ऐकलं होतं कि, डोंगराळ प्रदेशात सुमसाम
भागा मध्ये भूत असतात. जे दिवसा तर दिसत नाही पण रात्री दिसतात. मी लगेच
त्याच्या पाया कडे पाहिले. पाय तर ठीक होते.उलटे नव्हते आणि जमिनीवरच होते.
“कहां है तुम्हारा घर?”
“वहां ऊपर पहाडी पर...”
“घर में और कौन कौन हैं?”
“मां बाप और भाई बहन.”
“वे तेरी पिटाई तो नहीं करेंगे.”
“नहीं, बिल्कुल नहीं।”
“पहले भी तुम्हारे यहां कोई इस तरह आया है?”
“नहीं, लेकिन नीचे आये हैं. हमारा घर ऊपर है, तो कोई जाता नहीं.”
“पैसे कितने लोगे?”
“पैसे? आप हमारे यहां मेहमान बनकर चलोगे। मेहमानों से पैसे नहीं लिया करते।”
मी त्याला हा म्हटले. त्यानेच सायकल वरून मोठी बैग काढून कमरेवर अडकवली. मी
सायकल घेऊन वरती चढत होतो. त्याच्या कडे बैग असून सुद्धा सायकलला मागून
धक्का मारत होता. मला खूप त्याचे नवल वाटले. मग मी जाता जाता त्याच्या
बरोबर संवाद साधायला सुरुवात केली.
“क्या नाम है तुम्हारा?”
“मुश्ताक अहमद.”
“कितने भाई बहन हैं?”
“हम छह भाई बहन हैं. मैं दूसरे नम्बर का हूं.बडा भाई कारगिल में काम करता है.”
“पिताजी क्या करते हैं?”
“बाप? वो यहीं काम करता है खेतों पर. कुछ देर बाद आयेगा वो घर।”
खूप चांगल्या प्रकारे स्वागत झालं त्याच्या घरी. आतून घर चांगलं बनवलं
होतं. पण घर लहान आणि सहा भाऊ बहिण असल्याने त्याचा परिणाम घरावर साफ दिसत
होता. मी या सहा भावा-बहिणींचा विचार करत होतो. कारगिल जिला लद्दाख मध्ये
येतो. त्यामुळे चारी बाजूनी ओसाड वाळूचे डोंगर. फक्त गाव जवळच हिरवळ. शेती
हि फक्त नावालाच. हि मुलं मोठी झाल्यावर काय करणार? बापाने तर अल्लाहच्या
आदेशाच पालन केलं. अल्लाह ने तर संदेशच देऊन ठेवला आहे. किती हि मुलांना
जन्म द्या. त्याचे पालन पोषण तर मीच करणार. जगात कोटीच्या कोटी किड्या
मुंग्यांना मी सांभाळतोय. तर तुम्हाला पण सांभाळीन.
तिथे गेल्या गेल्या चहा आणि रोटी मिळाली. माहिती पडले कि, मुले इंग्लिश
मध्ये शिकतात पण उर्दू पण शिकावी लागते. पण लेह जिल्ह्यात असे नाही. लोक
उर्दू ऐवजी हिन्दी पसंद करतात.
रात्र झाल्या नंतर घराचा मालक पण घरी आला. थोडा चिंतीत होता. त्याला चिंता
ह्याची होती कि, पाव्हण्याला आज काय जेवायला घालावे. भात बनवला होता आणि
मटण केले होते. मी मटण खात नाही. त्यांनी विचारलं तर मी नाही म्हणून
सांगितलं. हेच त्यांच्या चिंतेचं कारण होतं. त्यांनी सांगितलं कि घरात
काहीच नाही. डाळ आणण्या साठी मुलाला खाली पाठवावे लागेल. मी म्हटलं मला
काही नको. दुपारीच मी भरपूर खाऊन आलो आहे आणि आता इथे रोटी पण खाल्ली आहे.
मला आता भूक नाही. पण ते पाव्हण्या ला भूके कसे ठेवणार. त्यामुळे आज मला
मांसाहार करावेच लागणार होते. मी जर काही खाल्ले नाही तर यांना वाईट वाटेल.
त्यानंतर मला एक युक्ति सुचली.
मी म्हटलं, "सकाळची काही भाजी शिल्लख आहे का?"
म्हणाले कि,"हां, घास सब्जी है. आधी कटोरी लेकिन मेहमान को हम बासी सब्जी नहीं देंगे."
मी म्हंटले द्या चालते मला. मग भाता मध्ये मिक्स करून खाऊन टाकले. आपल्याकडे कसे पालक,मेथी असते तसीच कोणती तरी पाले भाजी होती.
जमीन वरच गाद्या अंथरल्या आणि चादर घेऊन झोपलो. खूप गरम होत होते. आज
सायकल ने खूप त्रास दिला. गियर शिफ्टिंग मशीन मध्ये काहीतरी गडबड होती और
आणि गडबड पण चढाई च्या वेळेसच करायची. चढाला पहिल्या गियर ची आवश्यकता
पडायची त्यावेळेसच आपोआप दूसरा गियर पडायचा. कितीतरी वेळा असे झाले.
रस्त्यावरच्या धुळीने आणि मातीने असे झाले असेल.
मी आज ७१ किलोमीटर सायकल चालवली.
 |
| कारगिल कडे |
 |
| कारगिल शहर |
 |
| कारगिल |
 |
| कारगिल नन्तर |
 |
| हाच तो सन्गम आहे जो पाकिस्तानी सेने च्या फायरिंग रेंज मधे येतो. |
 |
| द्रास कडे |
 |
| सर्वात मोठा मुश्ताक अहमद. बाकी सगळे त्याचे भाऊ बहिण |
(क्रमशः)
दिवस एकोणिसावा
सकाळी उठलो तसं मुलांनी घेरलं. हातात पाण्याचा जग आणून दिला. इच्छा
नसताना सुद्धा जावं लागलं. शौचालय हे लद्दाखी लोकांसारखा होतं. दोन छोट
छोट्या खोल्या असतात. एकावर एक अश्या. वरच्या मध्ये लाकडाच्या फरशीला एक
छेद असतो. कारण घाण खाली पडत राहावी म्हणून. तसेच वरच्या मध्ये मातीचा ढींग
पण असतो. त्या ढिगातून थोडी थोडी माती पडत राहते. यामुळे ती घाण झाकून
जाते, वास पण येत नाही आणि मुख्य म्हणजे ओसाड जमिनी मध्ये याचा खत म्हणून
चांगला उपयोग होतो.
मोठ मोठ्या रोट्या मिळाल्या चहा बरोबर खाण्यासाठी. घराच्या मालकीनिन
आग्रह केला कि मी लद्दाखी चहा पिऊ. लद्दाखी चहा बनवण्यासाठी खूप मोठ्या
प्रक्रियेतून जावं लागतं. खरी गोष्ट अशी आहे कि, अजून पर्यंत मी लद्दाखी
चहा पिलाच नाही. तरी पण नाही म्हणून सांगितलं. नाही म्हणून सांगितल्यावर
डोक्यात आलं कि घ्यायला पाहिजे होता.
कशी तरी एकच रोटी खाल्ली. काय करणार! जवळ जवळ एक डझन डोळे माझ्याकडे बघत
होते. मी कसा खातो ते. त्यामुळे लाजत काजत एकच रोटी खाल्ली. पुढे ५ किमी
नंतर ढाबा आहे. तिथेच पराठे खाऊया. या विचाराने हाथ धुतला आणि उठलो.
काल पासून मी यांचा पाहुणा आहे. मुश्ताकनि किती आनंदानी मला थांबवल आणि घरी
घेऊन आला. माझा चांगल्या रीतीने पाहुणचार केला. हा.. काल त्याने पैशे
घ्यायला मनाई केली होती. म्हणून माझे पण कर्त्यव्य होतं कि त्याला काही तरी
द्यावं. त्याला दोनशे रुपये द्यावं असं ठरवलं. म्हणून मी पाकीट उघडून
बघितलं तर त्यात पाचशेची नोट होती आणि वरती दहाची. माझ्या कडे पैश्याची
कमतरता असल्याने त्याला पाचशे रुपये नव्हतो देऊ शकत. आणि दहा रुपये तरी
कोणत्या तोंडाने देणार. आणि पाचशे देऊन तीनशे रुपये तरी कसे मागणार.
आजूबाजूला दुकान पण नव्हते कि सुट्टे करून आणावे. मी मोठ्या धर्मसंकटा
मध्ये सापडलो होतो. शेवटी ठरवलं कि पैसे न देताच निघायचं.
नऊ वाजता तेथून निघालो. त्यातलि काही मुलं, मला सोडायला खाली
रस्त्यापर्यंत आली. खाली परत अजून दोन मुलं मिळाली. ती त्या गावातली होती.
त्यांनी सायकल चालवायची इच्छा आहे म्हणून सांगितले. मी पण त्यांना सायकल
चालवायला दिली. मग सामान बांधले आणि सव्वा नऊ ला निघालो.
जे ठिकाण मी पांच किलोमीटर पुढे आहे असं मनात होतो तेच बीआरओ चा कैम्प
एक किलोमीटर वरती मिळाल. अर्धा तास तेथे थांबलो. आलू चे दोन परांठे खाल्ले.
येथे दोन ट्रक वाले भेटले. ते श्रीनगरला चालले होते. त्यांनी जोजीला चे
नाव घेऊन भीती दाखवायचा प्रयत्न केला. त्यांनी आग्रह केला कि त्यांचा ट्रक
खाली चालला आहे. सायकल त्या मध्ये टाकू. मी त्यांना नाही म्हणून सांगितलं.
आता पर्यंत सात घाट पार केले आहेत. त्या मानाने जोजीला तर खूप छोटा आहे.
त्याला पण पार करेल. तरी त्यांनी सांगितले कि, आपण रस्त्या मध्ये भेटूच
तेव्हा जर सायकल चालवायला त्रास होत असेल तर सायकल ट्रक मध्ये टाक.
आता लद्दाखी दृश्य संपणार होतं. शेवटी जोजिला नंतर हिमालयीन दृश्य
दिसणार होतं. रोहतांग च्या पुढे गेल्यावर लाहौल मध्ये प्रवेश केला होतं.
त्याच्या सारखाच दृश्य इथे पाहायला मिळाल. आता वाळू संपली होती. दगडाचे आणि
थोडे फार हिरवे डोंगर दिसू लागले होते. हिरवळ असणारी मैदाने दिसू लागली
होती. अजून एक बदल पाहायला मिळाला कि, पाणी खूप दिसू लागलं. रस्ता चांगला
बनवलेला होता. एका ठिकाणी तीन चार लोक रस्त्याच्या कडेला काम करत होते.
कश्मीरी होते साहजिकच मुसलमान होते. मी त्यांना विचारलं कि, चश्मा अजून
किती लांब आहे. त्यांनी सांगितलं कि तीन किलोमीटर पुढे. चश्मा म्हणजे
पाण्याच स्रोत. मला खूप तहान लागली होती. बाटली पण खाली झाली होती.
त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलं कि, आमचा मुलगा वरती गेला आहे पाणी
आणायला. थोडावेळ थांबा. मी त्यांना बाटली दिली कि पाणी आणले कि भरा. तो
येइस पर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो. पंधरा मिनिटे झाली तरी तो आला नाही. मी
त्यांना बाटली परत मागितली कि, पुढे तीन किलोमीटर वरती चश्मा आहे तिथेच
भरेल म्हणून. बाटली परत देण्यास त्यांनी नकार दिला. म्हटले कि, पाणी न पिता
आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही म्हणून. मला घाई पण नव्हती आणि त्यांचे
प्रेम बघून थांबलो. काही वेळाने मुलगा आला. पोट भरून थंड पाणी पिलो. बाटली
पण भरून घेतली.
द्रास च्या सहा किलोमीटर आधी तोलोलिंग डोंगराच्या खाली एक युद्ध
संग्रहालय आहे. कारगिल युद्धाच्या स्मरणार्थ ते बनवले आहे. मला ते बघायचे
होते. बाहेर भरपूर गाड्या उभ्या होत्या. मी पण सायकल लावली आणि आत मध्ये
प्रवेश केला.
१९९९ च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसण्याचा
प्रयत्न केला. मश्कोह घाटी पूर्णपणे ताब्यात घेतली. तसेच मश्कोह नदी पार
करून उंच पर्वता वरती पण चढले. त्यामुळे श्रीनगर-लेह रस्ता पण त्यांच्या
ताब्यात आला. द्रास पण त्यांच्या ताब्यात येणार होतं. पण आपल्या सैनिकांनी
त्यांना साडे तोड उत्तर दिलं आणि मश्कोह घाटी मधून त्यांना हाकलून लावलं.
तसेच तोलोलिंग आणि टाइगर हिल सारखे भाग पण त्यांनी स्वतंत्र केले. त्याच
बरोबर बटालिक च्या बाजूने पण लडाई झाली. कारगिल मध्ये कोणतीच लडाई झाली
नाही. पण द्रास आणि बटालिक हे कारगिल जिल्ह्यात येत म्हणून याला कारगिल
युद्ध असे म्हणतात.
हि माहिती मला नंतर मटायन मध्ये एका वयस्कर माणसाने दिली होती. त्यांनी
सांगितलं कि, जोजीला पासून पुढे द्रास आणि बटालिक पर्यंत भारताची हद्द
त्यांच्या नियंत्रणात आली होती. आम्हाला पण घर जमीन सोडून इथून जावे लागले
होते. आम्ही श्रीनगर ला गेलो. युद्ध संपल्या नंतर जेव्हा आम्ही परत इथे आलो
तर नाही जमीन मिळाली नाही घर. जमिनी ह्या दारू गोळ्यांचे अड्डे बनले होते
आणि घर हे उध्वस्थ झाले होते. नंतर सैनिकांनी दारू गोळे हटवले आणि त्यांनीच
आम्हाला घरे बांधून दिली. शेती पण मिळाली.
मी म्हंटले, मश्कोह नदी वर तर कोणताच पुल नाही. आणि ती वाहते पण जोरात.
मश्कोह च्या ह्या बाजूचा बराच लांब पर्यंतचा भाग हा भारताचा आहे. मग तिथे
भारतीय सैनिक नव्हते का? एवडी सगळी हत्यारे त्यांनी मश्कोह नदी पार करून
कशी काय आणली? आणि टाइगर हिल सारख्या एवढ्या उंचावरती कसे काय घेऊन गेले?
त्यांनी सांगितलं कि हे एक रहस्यच आहे.
असो ...ह्या युद्धाच्या आठवणी म्हणून हे संग्रहालय बनवले आहे. वेगवेगळ्या
रेजीमेण्ट ची माहिती, वीर मरण आलेल्या सैनिकांची नावे, युद्धा मध्ये वापरली
गेलेली हत्यारे यांची माहिती दिली आहे. प्रवेश फी अजिबात नाही.
संग्रहालय पासून सहा किलोमीटर वरती द्रास आहे. द्रास नदी आणि मश्कोह
नदी शिवाय खूप सार्या नदीचा संगम येथे होतो. खूप मोठी घाटी आहे. मैदानी
भागामध्ये बकऱ्यावाले बकऱ्या चारत होते.
अडीच वाजता द्रासला पोहोचलो. एका हॉटेल मध्ये जेवण केला आणि साडे तीन ला
निघालो. लेह ला जेव्हा मी कार्यक्रम बनवला होता त्यानुसार आज इथेच थांबायचे
होते. पण वेळ होता आणि पुढे अजून गाव भेटणार होते. म्हणून मी पुढे निघालो.
इथून मटायन 21 किलोमीटर आहे. विचार केला आज तिथेच थांबूया.
द्रास नैसर्गिक दृष्ट्या खूप समृद्ध आहे. कश्मीर आणि सोनमर्गला येणारे
पर्यटक यांनी द्रास ला पण आले पाहिजे. पहिले ते असुरक्षित होतं, आता तसं
नाहीय. आज च्या घडीला द्रास हे कश्मीर पेक्षा खूप शान्त आहे. द्रास हे जागा
मधलं दोन नम्बरच लोक वस्तीचं थंड ठिकाण आहे. पहिला ठिकाण हे साइबेरिया
मध्ये आहे. ९ जानेवारी १९९५ रोजी वजा ६० डिग्री तापमान नोंदवलं गेलं. आजपण
थंडी मध्ये लेह ते कारगिल पर्यंत दोनशे किलोमीटर चा रस्ता हा खुला असतो. पण
द्रास हे अत्याधिक थंड आणि बर्फवृष्टीमुळे रस्त्यामध्ये बाधा येते. यात्रा
सुरु करताना मला पण भीती होती कि, द्रास मध्ये थंडी लागू शकते. पण असं
काही नव्हतं. चांगले उन पडले होते. आणि गरम होत होते.
मश्कोह घाटी हे द्रास चे मुख्य आकर्षण आहे. ट्रेकिंग साठी खूप प्रसिद्ध
आहे. ह्या घाटी मध्ये जाण्या साठी परमिट घ्यावे लागते जे द्रास मध्ये
मिळते. आपण जर मश्कोह नदी च्या बरोबरीने चालत गेलो तर एक घाट पार करून आपण
किशनगंगा नदी च्या घाटी मध्ये प्रवेश करतो. हीच किशनगंगा पुढे पाकिस्तान
मध्ये जाते. तिथे हिचे नाव वेगळे आहे. तिथे ती नीलम नदी व नीलम घाटी च्य
नावाने प्रसिद्ध आहे. श्रीनगर वरून एक घाट पार करून आपण किशनगंगा घाटी
मध्ये जाऊ शकतो. असं ऐकलय कि, आता द्रास हे किशनगंगा घाटी च्या रस्त्याला
जोडले आहे. परंतु हा रस्ता नकाश्यात दिसत नाही. पण जर असं असेल तर ह्या
हिंडफिऱ्यान साठी एका नवा भागच उपलब्ध होईल.
शम्शा २८६० मीटर च्या उंची वर आहे तर द्रास ३०८५ मीटर वर. द्रास नंतर
थोडीसी चढाई सुरु होते. आज मटायन मध्ये थांबायचे होते जे २१ किलोमीटर लांब
आहे. संग्रहालय मध्ये मटायन चे काही फोटो पहिले. त्यात मटायन हे एक मोठं
समांतर मैदान आहे. तिथे पण चांगलेच युद्ध झाले होते. मटायन पण
पाकिस्तानच्या नजरे मध्ये होतं.
पूर्ण रस्ता हा नदीच्या बरोबरीने आहे. नदी च पत्र पण मोठे आहे. त्यामुळे
मेंढपाळ पण आपले अड्डे बनवून तेथे थांबले होते. लद्दाख च्या सुख्या
डोंगरातून आलो होतो. त्यामुळे इथले हिरवे बघून डोळ्यांना बरे वाटले. पण
झाडे अजून आली नव्हती. जोजीला पार केल्यानंतरच झाडे दिसतील.
साडे सहा वाजता मटायन मध्ये पोहोचलो. छोटंसं गाव आहे. मुसलमान जास्त
असल्या कारणाने मस्जिद पण आहेत. रस्त्याच्या कडेलाच दोन दुकाने दिसली.
मुलांनी थांबवले. मला थांबायचेच होते. माहिती पडले कि, गावात कुठे
राहण्याची व्यवस्था नाहीय. मी मुलांना गावात विचारायला पाठवले कि, शम्शा
सारखेच राहण्याची व्यवस्था होईल का ते. पण सगळी कडून नकार आला. मग मी तंबू
लावायचा निर्णय घेतला. मुलांच्या सांगण्या नुसार रस्त्याच्या एका बाजूला
शेत मध्ये तंबू लावायचा निर्णय घेतला. तंबू लावायला मुलांनीच मदत केली.
त्या नंतर मी त्यांचे फोटो काढले खूप खुश झाले.
नंतर एका धाब्या वरती गेलो तर फक्त चहा आणि आम्लेट भेटेल म्हणून सांगितले.
रोटी भात भाजी नाही. माझ्या साठी एवडे पुष्कळ होते. चहा आणि आम्लेटनीच पोट
भरले.
आज ४६ किलोमीटर सायकल चालवली.
 |
| शम्शा मधे मुश्ताकच्या घरा पासुन खाली उतरताना |
 |
| रस्त्य मधे भेटलेले पंडरस नावाचे गाव |
 |
| ह्यानी मला थाबवले आणि फोटो काढायला लावले |
 |
| द्रास कडे |
 |
| हेच होते ते ज्यांनी माझी बाटली घेतली आणि पाणी येइस पर्यंत थांबायला सांगितले. |
 |
| मी मोकळी बाटली मागितली तर मुल्लाजी बाटली घेऊन लांब गेले. मुलगा आल्यावर पाणी पाजुनच जाउन देणार. |
 |
| द्रास कडे |
 |
| द्रास च्या सहा किलोमीटर अलीकडे युद्ध संग्रालय |
 |
| द्रास |
 |
| टायगर हिल च्या खाली वसलेलं द्रास |
 |
| द्रास |
 |
| मागे बकऱ्या आणि पुढे त्यांचे बोडीगार्ड |
 |
| मटायन गांव |
 |
| ह्याच मुलांनी तंबू लावून दिला |
 |
| हिमालयाच्या कुशीत माझा तंबू. |
(क्रमशः)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.