१०-१२ वर्षापूर्वी संरक्षण खात्याच्या हिम आणि हिमपात संशोधन संस्था (SNOW & AVALANCHE STUDY ESTT) मनाली येथे AVALANCHE PREDICTION SYSTEM म्हणजे हिमपात पूर्वसूचना प्रकल्पावर मला काम करण्याची संधी मिळाली.उत्तुंग हिमालयाचे ते माझे पहिले दर्शन! निसर्गाची भव्यता, क्षणोक्षणी बदलणारे त्याचे रूप,हिम्पाताच रौद्र स्वरूप सर्वच स्तिमित करणारे.तेव्हापासून ती हिमशिखरे मला साद घालत होती.आणि अनपेक्षितपणे योग जुळून आला.
MANGOWALE.COM ह्या माझा मुलगा अभिजीतच्या नाविण्यापुर्वक संकल्पनेच दुसर वर्ष. एप्रिल ते जूनचा पहिला आठवडा जवळजवळ ४० दिवस देशांतर्गत आणि युरोप अमेरिका इ. ठिकाणीआंबा विक्री करण्याच्या धामधुमीत कसे गेले ते समजलेच नाही.त्यानंतर अभिजितने श्रमपरिहारासाठी आमच्यासाठी एक SURPRISE GIFT दिली.
देवभूमी उत्तराखंड इथील चारधाम यात्रेच PACKAGE
भाग्यश्री TRAVELS ह्या नामवंत यात्रा कंपनीच्या चारधाम यात्रेत आम्ही दि. १८ जून पासून सहभागी झालो
आणि सुरु झाला देवभूमिचा प्रवास!
चारधामची यात्रा कशी असते हे समजून घ्याचा सोपा मार्ग म्हणजे आपला डावा पंजा समोर धरायचा.
अंगठा म्हणजे हरिद्वार तर चार बोटे म्हणजे यमुनेत्री, गंगोत्री, केदारनाथ, आणि बद्रीनाथ.
चारधाम यात्रेची सुरुवात होते हरिद्वार पासून.हरिद्वार म्हणजे खरोखरचे देव्भूमि चे प्रवेशद्वार.रात्रीची गंगा आरती (हरिकी पौधी) म्हणजे एक विलक्षण अनुभव.विशाल गंगेच्या घाटावर जमलेला तेव्हडाच विशाल जनसमुदाय.३ ते ४ लाख लोकांच्या उपस्थितीत होणारी गंगा आरती. हिंदू जनमानसात गंगेला असलेल्या अढळ स्थानाची प्रचीती आली.
हरिद्वारहून निघून नितांत सुंदर अश्या DOON VALLY तून १४ तासांचा दीर्घ प्रवास करत आम्ही स्यानाचात्ती ह्या ठिकाणी पोहोचलो.यमुनोत्रीचा प्रवास इथून सुरु होतो.७ किमीचा अतिशय अवघड ट्रेक करून यमुनोत्री दर्शन होते.खडतर प्रवासाची झलक अनुभवून आम्ही परत स्यानाचात्ती ह्या मुक्कामाच्या जागी पोहोचलो.
हरिद्वारहून निघून नितांत सुंदर अश्या DOON VALLY तून १४ तासांचा दीर्घ प्रवास करत आम्ही स्यानाचात्ती ह्या ठिकाणी पोहोचलो.यमुनोत्रीचा प्रवास इथून सुरु होतो.७ किमीचा अतिशय अवघड ट्रेक करून यमुनोत्री दर्शन होते.खडतर प्रवासाची झलक अनुभवून आम्ही परत स्यानाचात्ती ह्या मुक्कामाच्या जागी पोहोचलो.
त्यानंतर पुढचा प्रवास उत्तराकाशिमार्गे पवित्र गंगोत्री.उत्तरकाशी येथील काशीविश्वेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिरापैकी एक.शिवलिंग आणि त्रिशूल अगदी पाहण्यासारखे.अंदाजे १०० फुट उंचीचे हे त्रिशूल धातुशात्राचा चमत्कार समजले जाते.आणि विशेष म्हणजे हे अजस्त्र त्रिशूल बोटाच्या स्पर्शानेही हलवता येते.
पवित्र गंगोत्री म्हणजे मोक्ष प्राप्तीचे द्वार.
भगीरथाने महत्प्रयात्नाने स्वर्गालोकीची गंगा पृथ्वी तलावर आणली.त्यामुळे हिंदू जनमानसात ह्या स्थानाला अनन्यसाधारण महत्व आहे.गात्र गोठवणाऱ्या थंड पण पवित्र गंगेच स्नान करून आम्ही पूर्वज आणि पुढच्या पिढीसाठी पवित्र गंगोत्रीच्या उगमस्थानी परमेश्वराची मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना केली. हा विधी एक वेगळाच आत्मिक समाधान देवून गेला.
पुढचा प्रवास परत उत्तरकाशी मार्गे केदारनाथ.अंदाजे ४०० किमीचा प्रवास,२ दिवसाच्या प्रवासानंतर केदारनाथ.
१४ किमी च्या खडतर ट्रेक नंतर दर्शन होते केदारनाथाचे.पांडवांना येथून स्वर्गप्राप्ती झाली अशी आख्यायिका
शब्द तोकडे पडावेत असे हिमालयाचे दर्शन क्षणोक्षणी बदलणारे निसर्गाचे रूप उन सावल्यांचा खेळ सूर्यप्रकाशात झलालणारी हिमशिखरे सगळेच शब्दातीत!जगत्गुरू आद्य शंकराचार्य समाधीस्थळ आणि तेथील स्फटिक शिवलिंग अगदी पाहण्यासारखे. येतानाचा परतीचा प्रवास म्हणजे परमेश्वराने मुक्तहस्ते उधळण केलेला निसर्ग डोळ्यात साठवायचा यथाशक्ती प्रयत्न.
आता कूच करायची ती श्रीक्षेत्र बद्रीनाथ.हिंदू धर्मशास्त्रातील पवित्र चारधाम पैकी एक.१२००० फुट उंचीवर असणारे श्री विष्णूचे हे पवित्र मंदिर.उत्तुंग हिमशिखरे त्यात वसलेले पवित्र स्थान आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.यात्रेची सांगता आणि उंचीवरच्या हवेतील ऑक्सिजनची कमतरता ह्यामुळे थकवा जाणवू लागतो.
बद्रीनाथ नंतर सुरु होतो परतीचा प्रवास.
भारतातील आध्यात्मिक केंद्र र्हीशिकेश दर्शन करून हरिद्वार मार्गे दिल्ली आणि मग इंडिगोच्या पुष्पक विमानाने स्वग्रही पुणे.अश्याप्रकारे चारधामची सांगता झाली
हिंदू धर्माशात्रात पवित्र समजले जाणार्या चारधामाचे दर्शन,गर्द हिरवाई, हिमालयाच्या कुशीतील नितांतसुंदर निसर्ग सौंदर्य,खळाळत वाहणाऱ्या पवित्र भागीरथी मंदाकिनी, अलकनंदा आणि त्यांचा संगम होऊन वाहणारी विशाल गंगा,प्रदूषणरहित हवा यामुळे खडतर प्रवासाचा काहीच त्रास जाणवला नाही.
विशेष आभार मानायला हवेत ते टीम भाग्यश्रीचे उत्कृष्ट भोजन, निवास व्यवस्था, तत्पर यात्रा व्यवस्थापक, यामुळे यात्रा सुसह्य झाली.बसच्या १२-१२ तासाच्या प्रवासाची सुरवात ईश्वराच्या आराधनेने व्हायची.मधल्या काळात सहप्रवाशांच्या विचारांची देवाणघेवाण,विविध गुणदर्शन यात वेळ कसा जायचा हे समजायचे नाही.
याचे श्रेय जाते आमचे यात्रा व्यवस्थापक श्री कोन्धालकर यांना.
ह्या देवभूमीच्या प्रवासातील निसर्ग मी माझ्यापरीने छायाचित्रा द्वारे टिपण्याचा प्रयत्न केला आहे
सोबत त्याची लिंक जोडत आहे.
https://picasaweb.google.com/chandbhasale/CHARDHAM?authkey=Gv1sRgCNuHs4P4_vDD


आपले म्यान्गोवाले डॉट कॉम चे-- उचित ध्येय गाठून समाधानपूर्वक अवघड अशी चारधाम यात्रा यशस्वी-रित्या पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन....!!!! .त्यामुळे '' अभी तो जीत '' अपनी हो गई है /त्या यात्रेचे सचित्र दर्शनाने व थोडक्यात पण ओघवत्या वर्णनाने त्यातही---'' चार चांद '' लागल्याचे प्रतिबिंबित होते.
Replyडॉ .अरविंद व सौ.जयश्री वैद्य
सध्या अमेरीका
१ ऑगस्ट २०११