सात
आठशे वर्षांचा इतिहास असला तरी काहीसा दुर्लक्षित असा नव्या मुंबईतील
बेलापूरचा हा किल्ला. नुकताच एका प्रतिसादात मी या किल्ल्याचा उल्लेख केला
होता.
किल्ला सिद्धींनी १५६० ते १५७० या काळात बांधला. त्यानंतर पोर्तुगिजांनी
याचा ताबा घेतला. १७३३/१७३७ मध्ये चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली
मराठ्यांनी किल्ल्याचा ताबा मिळवला. त्यानंतर १९ व्या शतकाच्या सुरुवातीला
इंग्रजांच्या ताब्यात गेला (माहिती आंतर्जालाहून साभार)
एक माहितीपर लेख येथे वाचावयास मिळेल.
काल संध्याकाळी अचानक आमच्या 'मॉर्निग वॉक' ग्रुपचा कट्टा येथे झाला.संध्याकाळी पाच वाजता नवी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीसमोर असलेल्या पोलीस चौकीजवळ सर्वजण जमलो. तेथून 'साती आसरा माता' देवस्थानला पोहचलो. महानगरपालिकेपासून पायी अगदी ५-१० मिनिटांच्या अंतरावरील छोटीशी देवराई म्हणता येईल असे हे ठिकाण. शहरी वर्दळीच्या जागेपासून आपण अचानक या शांत-नयनरम्य भागात येतो. (लेखातील काही फोटो गेल्या आठवड्यातील आहेत)
रस्त्यापासून खाली उतरत जाणाऱ्या पायऱ्या.
सुंदर रंगकाम केलेले छोटेसे मंदिर आणि त्यापुढे विहीर.
बाजूला छोटासा तलाव.
अजून एक वेली/झुडुपांमध्ये लुप्त होत चाललेली विहीर.
आजूबाजूला गर्द झाडी व छोटेसे बांबूचे बन.
थोडे थांबून पायऱ्या चढून परत रस्त्यावर आलो. मंदिराच्या विरुद्ध बाजूस सिडकोचे रेस्ट हाउस आहे.
त्याला लागूनच एक कच्ची चढती पायवाट किल्ल्याकडे जाते.
पाचच मिनिटात आपण किल्ल्याजवळ पोहचतो. प्रथम दर्शन होते एका बुरुजाचे.
किल्ला व बाजूची पडकी तटबंदी यामधील जागेतून आपण किल्ल्यात प्रवेशतो. बुरुजाच्या आत महादेवाचे मंदिर आहे.
शिवलिंग व नंदी आहे.मूर्ती मात्र अलीकडच्या काळातील वाटतात. भिंतीवर शिवाजी
महाराजांचे फोटो आहेत. शिजयंतीला एखादा छोटासा उत्सव येथे होत असावा असे
दिसते.
बुरुजाच्या ढासळलेल्या दगडांवर पाय ठेवत बुरुजावर चढून गेल्यावर एक ध्वज आहे त्याला वंदन करून पुढे निघालो.
तटबंदीतून खाडीकडच्या परिसरावर नजर टाकता येते.
काही ठिकाणची किल्याची शाबूत भव्य तटबंदी दिसते.
एक पाण्याचे टाके आहे.
पायऱ्या असलेले उंच दगडी चौथरे आहेत.
या चौथऱ्यावर बसून थोडावेळ गप्पा गोष्टी केल्या आणि निघालो.
आठवड्याचा मधला दिवस असल्यानेच कदाचित सर्व परिसर निर्मनुष्य होता. शहराचा मध्यवर्ती भाग असूनही अतिशय शांत प्रसन्न वातावरणात हा तास दीड तासाचा कट्टा पार पडला.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.