Tuesday, January 23, 2024

डब्लिन डायरी

 https://maitri2012.wordpress.com/

 

 

 

डब्लिन मधल्या छोट्या छोट्या गोष्टी

डब्लिन हे कॅलिफोर्निया राज्यातील आल्मेडा काऊंटीतील अमाडोर व्हॅलीमधले  अनेक टेकड्यांच्या सान्निध्यातले एक उपनगर आहे.

इथल्या नागरिकांना घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला आवडते. कोणी रस्त्यावर घाण टाकत नाहीत त्यामुळे सगळे रस्ते आणि  पदपथ चकाचक असतात. या गावात एक्कावन्न टक्के लोक भारतीय आहेत. तेही शिस्त पाळतात. सार्वजनिक जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असतात. त्यामुळे गुन्हेगार सटकू शकत नाही. ताबडतोब शिक्षा केली जाते. लाग-वग  चहा-पाणी  चिरी-मिरी  चालत नाही.

परवा  सकाळचीच गोष्ट. एका कारला पोलिसाने थांबायला सांगितलं. तो थांबला. पोलीस त्याच्या जबरदस्त मोटार सायकलवरून उतरला. कमरेचं पिस्तूल उजव्या हातात घेतलं.  डाव्या हाताने  गाडीची काच खाली करायला सांगितली, गाडीवाल्याकडे कागदपत्र मागितले. त्याने दिले. त्यावर नजर टाकली. कागद परत  दिले. पुन्हा मागे आला. पुन्हा नवे कागदपत्र मागितले. कारवाल्याने तेही दाखवले. तेही पाहिले आणि परत दिले. पोलीस निघून गेला. मी कारवाल्याला विचारले. त्याने पाच बोटांची खूण केली आणि तो निघाला. मला त्या प्रसंगाचे छायाचित्र घेण्याची उबळ आली होती पण पोलिसांच्या हातातले पिस्तूल पाहून ती दाबली.

एका सकाळी मी  मॉर्निगवोकला जात होतो . एक तरुण गोरी मुलगी कुत्र्याला घेऊन चालली होती. त्या अगदी छोट्या कुत्र्याने मागचा उजवा पाय वरती केला. थोडा पुढे गेल्यावर गवतावर थोडा थांबला आणि शी केली. त्या मुलीने एक प्लॅस्टिकची पिशवी काढून ती शी उचलली विशिष्ट आकाराची कचऱ्याची पेटी  दिसल्यावर  त्यात तिने  ती टाकून दिली.

Dust Bin


For dogs

घरासमोरच्या फुटपाथपर्यंतचा मोकळा भाग फुलझाडांनी सजवणे सर्वांनाच आवडते. तिथेही स्वयंचलित पद्धतीने पाणी फवारण्याची सोय केलेली असते. रात्रीच्या वेळी तिथे छोटे दिवे लावलेले असतात. रस्त्याच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार ठेवणे हे अंगी मुरलेले आहे. अगदी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मनातसुद्धा ते ठसलेले असते. सगळ्या हिरवळीमध्ये प्लास्टिकच्या पाईपचे जाळे असते. त्यात स्प्रिंकलर्स बसवलेले असतात. सकाळी सहा वाजता ते सगळे पाणी उडवू लागतात आणि पंधरा मिनिटांनी थांबतात. हे सगळं स्वयंचलित असतं. ते कोणाला चालू किंवा बंद करावे लागत नाही. दर गुरुवारी पालिकेचे कर्मचारी येऊन गवत छान पद्धतीने कापून जातात.

Sprinklers

गावात बगीचे, मैदाने आणि खेळाच्या सोयी केलेल्या असतात. अगदी लहान मुलं कसरतीचे खेळ शिकतात. त्यांना शिकवणारेही दिसतात.अमेरिका अनेक खेळात प्राविण्य का मिळवते हे प्रत्यक्ष पाहिल्यावर लक्षात येते. सर्व मैदानात लहान मोठ्यांना तसेच बरोबर आणलेल्या कुत्र्यांना पाणी पिण्याची आणि प्रसाधनाची व्यवस्था केलेली असते. बगिच्यात दिसणारी पिण्याच्या पाण्याच्या नळाची कल्पक रचना. वरचा नळ मोठ्या माणसांसाठी, मधला मुलांसाठी आणि सगळ्यात खालचा कुत्र्यांनी पाणी पिण्यासाठी केलेला असतो.

Water Fountain


Dog drinking water

अनेक ठिकाणी पायवाटा आहेत तिथे तीन फूट उंच गोलाकार खांब आठ दहा फूट अंतरावर दिसतात. ते कशासाठी असतील असा प्रश्न होता. पण एकदा रात्री पाहता त्यातून प्रकाश पडताना दिसला.

Lamp along Walkway  


Bench

दाखवलेले बसायच्या बाकांचे प्रकार आपल्या देशात कामाचे नाहीत. लाकडांचा लाकडी झुमका आहे त्यात लाकडाचे ओंडके नीटपणे बसवलेले असतात. कारण ते बसवून जाणाऱ्यांची पाठ फिरली की नाहीसे होणार.  अमेरिकेत प्रचंड प्रमाणात जंगलं असून लाकडांचे प्रमाणही खूप आहे. त्यांना लाकडे चोरून  काही करता येत नाही.


Bench

दरेक सोसायटीत अश्या पोस्टाच्या पेट्या बसवलेल्या असतात. त्यात पोस्टमन पत्रं आणून क्रमांकानुसार आणून ठेवतो. तसेच टाकायची पत्रंही शेजारच्या खणात ठेवून द्यायची म्हणजे दररोज घेऊन जातो. डब्लिन गावात एकाच पोस्ट ऑफिस आहे. विशेष टपाल पाठवायचं असलं तरच तिथे जावं  लागतं

Post Boxes

 

लोकांना टेकड्यावर राहायला आवडते. तिथल्या घरांची किंमत जास्त असते. अश्या टेकडीवरून तळरस्त्यावर जायला काँक्रीटची स्वतंत्र पायवाट बनवलेली असते तिच्या बाजूला दिवे बसवलेले असतात. त्यामुळे रात्रीही या वाटेवरून जात येते.

Concrete Path with ramp

जिथे आग विझवण्यासाठी असलेला हायड्रंट बसवलेला असतो त्या फुटपाथला लाल रंग लावलेला असतो. त्या ठिकाणी कोणी कार उभी करू नये, असा संकेत असतो. त्याप्रमाणे कोणी फुटपाथला लागून गाडी उभी करत नाही.

Red patch

रस्ता ओलांडायचा असेल तर खांबावर  एक बटन असते ते दाबले की कालांतराने समोरच्या फुटपाथवरच्या खांबावर ” आता चालत जा “अशी खूण दाखवली जाते. सर्व फुपाथवरून ज्या ठिकाणाहून रस्ता ओलांडायचा असेल तिथे एक पिवळ्या रंगाची मोठी टाईल बसवलेली असते त्याच्यावर जाऊन उभे राहायचं आणि जा अशी खूण  दिसली की रस्ता ओलांडायचा. ही भारताच्या तिप्पट आकाराच्या देशात सर्वत्र पाळली जात असावी कारण मी दोन राज्यात तसे पाहिले.

Push to walk


Yellow tile

कॅलिफोर्निया राज्यात पाण्याचा तुटवडा असल्याने सांडपाणी शुद्ध करून ते  बगिच्यात झाडांना, तसेच  लॉनवर वापरले जाते. त्यासाठी वेगळी सोय केलेली असते.

Don’t drink

जाहिराती
Report this ad

[ सर्व प्रकाशचित्रे लेखकाची आहेत. ]

– ©️ प्रकाश पेठे

prakashpethe@gmail.com

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...