Monday, August 29, 2022

आमची अष्टविनायक दर्शन सहल (०९ ते १३ डिसेंबर २०१३)

 https://www.maayboli.com/node/48343

आमची अष्टविनायक दर्शन सहल (०९ ते १३ डिसेंबर २०१३)
अष्टविनायकाची नांवे व ठिकाणे
१. श्री मयुरेश्वर, मोरगाव
२. श्री बल्लाळेश्वर, पाली
३. श्री वरद विनायक, महड
४. श्री चिंतामणि, थेऊर
५. श्री गिरिजात्मज, लेण्याद्री
६. श्री सिद्धीविनायक, सिद्धटेक
७. श्री विघ्नेश्वर, ओझर
८. श्री महागणपति, रांजणगाव

विदर्भातील अष्टविनायक मंदिरे
१. टेकडीचा गणपती, नागपूर शहर.
२. शमी विघ्नेश, अदासा, जिल्हा नागपूर
३. अष्टदशभुज, रामटेक, जिल्हा. नागपूर
४. भृशुंड, मेंढा, जिल्हा भंडारा
५. सर्वतोभद्र, पवनी, जिल्हा भंडारा
६. सिद्धिविनायक, केळझर, जिल्हा वर्धा
७. चिंतामणी, कळंब, जिल्हा यवतमाळ
८. वरदविनायक, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर.

प्रास्ताविक : २०१० साली आम्ही व डोळे पतिपत्नी अतुलकडे दुबईस गेलो होतो त्यावेळी माझा मामेभाऊ श्रीधर नानल केवळ आम्हाला भेटायला म्हणून त्याच्याकडे आला होता व अतुलला वेळ नसल्याचे समजल्यावर त्याने तेथे संपूर्ण एक दिवस आम्हाला त्याच्या गाडीतून दुबई व परिसरातील प्रेक्षणीय स्थळे दाखवायला नेले होते. त्यावेळी गप्पा मारतांना त्याने त्याला अष्टविनायकची सहल करायची फार इच्छा असल्याचे सांगितले व त्यावर मीही अद्याप अष्टविनायक बघितले नाहीत व मलाही त्या सहलीस येणे आवडेल असे म्हटले होते.
त्यांनातर श्रीधर व त्याची पत्नी ह्यांचे आग्रहावरून आम्ही दोघे त्यांच्याकडे १२ ते १६ मार्च २०१३ असे चार ५ दिवस सांगलीस त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो. त्यानंतर पुन्हा त्यांच्या सोबत ऑक्टोबर २०१३ मध्ये आम्ही केरळच्या ट्रीपला जाऊन आलो. त्या दोन्ही वेळी पुन्हा एकदा आमचे अष्टविनाकाच्या दर्शनास जाण्याचे बोलणे झाले. नंतर दिवाळीत फोनवर बोलत असताना आम्ही दोघांनी डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात अष्टविनायक सहलीस जाण्याचे नक्की केले.
शास्त्रानुसार सर्वप्रथम तुम्हाला मोरगावच्या मयूरेश्वराचे दर्शन घेऊन यात्रेस सुरुवात करायची असते,व त्यांनंतर सिद्धटेक,पाली,महड,थेऊर,लेण्याद्री,ओझर,रांजणगाव या क्रमाने आठ गणेशांची दर्शने घेऊन झाल्यावर पुन्हा परत मोरगावच्या गणेशाचे दर्शन घेतल्यावरच ही अष्टविनायकाची यात्रा समाप्त झाली असे मानले जाते.
आम्ही मात्र शास्त्र प्रमाण न मानता श्रीधरने आखलेल्या प्रोग्राम नुसारच ही अष्टविनायक यात्रा पूर्ण केली.
सहलीचा तपशीलवार प्रोग्राम नक्की करतेवेळी असे ठरले की कोणत्याही खासगी कंपनीबरोबर सहलीस जायचे नाही. तसेच घाई गडबड न करता व दगदग न घेता आरामात सहल करायची. भले त्यासाठी रोज दोनच गणपती ह्या हिशोबाने आठ दिवस लागले तरी चालेल.तसेच वेळ पडली तर संध्याकाळी जो गणपती बघू त्याच गावात किंवा मंदिराच्या पुजार्याकडे मुक्काम करायचा.
नंतर आमचे असे ठरले की सांगलीहून श्रीधर त्याची स्वत:ची गाडी (ड्रायव्हरसह) घेऊन पुण्यास मुक्कामाला येईल व दुसर्या दिवसापासून आम्ही अष्टविनायक दर्शनास निघायचे.स्वत:ची गाडी असल्याचा फायदा म्हणजे जाताना वाटेत लागणारी जवळपासची इतर काही मंदिरे / प्रेक्षणीय स्थळे सुद्धा पाहता येतील.
त्याप्रमाणे रविवार ८ डिसेंबरला श्रीधर,त्याची पत्नी सौ.रेखा व त्यांचा ड्रायव्हर गाडी घेऊन सायंकाळी ७ वाजताच रात्रीच्या जेवणास व मुक्कामास आमच्या घरी आले.
दुसरे दिवशी म्हणजे सोमवार ९ डिसेंबरला सकाळी चहा-नाश्ता व आंघोळी उरकून ठीक ७.३ वाजता आम्ही सहलीसाठी प्रस्थान ठेवले.
पुण्याहून निघाल्यावर भोर फाट्याच्या आगोदर हॉटेल नटराजवर पुन्हा एकदा नाष्टा,चहा उरकून आम्ही सोमवार असल्याने पहिल्यांदा श्री क्षेत्र बनेश्वर येथे गेलो. तेथील पेशवेकालीन बनेश्वर मंदिरातील पाण्यात असलेल्या पांच शिलिंगांचे दर्शन व तेथील नयनरम्य उपवन बघून जांभळे , पेरु, अंजीर अशी फळे घेऊन निघालो. त्यानंतर आम्ही केतकावळे येथील तिरूपती बालाजीचे मंदिर ( ह्याला प्रती तिरुपति बालाजी मानतात) पाहायला गेलो. येथे प्रत्येक प्रतिकृती ही तंतोतंत मूळच्या बालाजी मंदिराप्रमाणे असलेली पाहायला मिळते व त्यामुळेच आपण तिरूपतीच्या बालाजीसच आल्याचा आभास होतो.
बालाजीचे दर्शन व प्रसाद गेऊन पुढे आम्ही सासवड रस्त्यावरील श्री क्षेत्र नारायपूर येथील जागृत दत्तात्रेय व पेशवेकालीन शिवमंदिरातील महादेव ह्यांचे दर्शन घेऊन सासवडमार्गे जेजूरीच्या मल्हारी मार्तंड खंडोबाचे दर्शनास गेलो. गडवार असलेल्या मंदिरास १५० पायर्या चढून जावे लागते.
‘अष्टविनायक यात्रा ’
अष्टविनायक ही श्री गणेशाची जागृत अशी आठ ठिकाणे असून ह्यातील पांच गणेश (मोरगाव,रांजणगाव,ठेऊर,ओझर व लेण्याद्री) हे पुणे जिल्ह्यात , सिद्धटेक गणह हा एकाच अहमदनगर जिल्ह्यात तर उर्वरित दोन गणेश (पाली व महड) रायगड जिल्हयांत आहेत. सर्वच्या सर्व आठही ठिकाणचे गणपती हे ‘स्वयंभू ’ आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार जरी अष्टविनायकांची यात्रा करतेवेळी पहिला मानाचा गणपती म्हणून मोरगावच्या ‘मयूरेशराचे’ दर्शन घेऊन तेथील पुजार्याकडून गणेशाला श्रीफळ म्हणजेच नारळ दाखवून परत घेऊन घेऊन यात्रेस सुरुवात करून त्यानंतर ‘सिद्धटेकचा सिद्धेश्वर ’, ’ पालीचा बल्लाळेश्वर ’ , ’ महडचा वरदविनायक ’ , ’ थेउरचा चिंतामणी ’ , ‘ लेण्याद्रीचा गिरिजात्मक ’ , ‘ ओझरचा विघ्नेश्वर ’ , ‘ रांजणगावचा महागणपती ’ ह्याच क्रमाने दर्शन घेत घेत व प्रत्येक ठिकाणी तेथील गणेशास श्रीफळ (नारळ) दाखवून परत घेत शेवटी पुन्हा परत मोरगावला येऊन ‘मयूरेश्वराचे ‘ दर्शन घेतल्यावरच यात्रा पूर्ण झाली असे मानले जाते.
मोरगावचा “ मयूरेश्वर “

अष्टविनायकातील पहिला मानाचा गणपती म्हणजे मोरगावचा ‘मयूरेश्वर’ हा होय. कऱ्हा नदीच्या किनार्यायवर सासवड बारामती रस्त्यावर जेजूरीपासून १७ किलोमीटरवर मोरगाव आहे.
असे म्हणतात की प्रत्येक घराघरातून कोणत्याही धार्मिक कार्याचेवेळी म्हटली जाणारी श्री गणेशाची ‘ सुखकर्ता दुःखहारता , ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे तर श्री मयूरेश्वराचे डोळ्यात व नाभीमध्ये हिरे बसवलेले आहेत . प्राचीन काळापासून या मंदिराच्या भोवती तट सदृश गाडदी बांधकाम केलेले आहे.
ह्या गणेश क्षेत्रासंबंधी अशी एक आख्याहिका सांगितली जाते की त्याकाळी मोरगाव परिसरात मोरांची संख्या मोठी होती व सिंदूरासूर ह्या दैत्याचा वध करण्यासाठी श्रीगणेशाने मयुराची वाहन म्हणून निवड केली व मोरावर स्वार होऊन दैत्याचा वध केला त्यामुळे ह्या गणेशास ‘मयूरेश्वर’हे नांव पडले व गावाचे नांव मोरगाव असे झाले. गाणपत्य पंथीयांचे आद्यक्षेत्र होय. मंदिरातील मूर्ती बैठ्या स्वरुपात सिंदूरचर्चित आहे.मंदिर देवस्थानचे पुजारी गजानन बाळकृष्ण धारक यांच्याकडे अधिक चौकाशी केल्यावर असे समजले की सध्याच्या मंदिराची उभारणी इसवी सनाच्या सोळाव्या शतकात करण्यात आली. मंदिराच्या चहुबाजूस दगडी तटबंदी असून पूर्वेकडील महाद्वारासमोर एक मोठा दगडी नंदी आहे. गणेशासमोर नंदी फक्त येथेच पाहावयास मिळतो. भाद्रपद व माघ महिन्यात येथे द्वारयात्रा असते,त्यावेळी मोठ्या संख्येने दुरदूरहून भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.चिंचवडच्या मोरया गोसावींनी ह्या गणेशाची आयुष्यभर अखंड निस्स;म भक्ति व सेवाअर्चा केली,म्हणूनच आजही वर्षातून दोनदा द्वारयात्रेच्यावेळी मोरयागोसावींची पालखी चिचवडहून येथे मोरगावला येत असते. महाराष्ट्र शासनाने अलीकडेच मोरगावचा संपूर्ण परिसर हा “मयूरेश्वर अभयारण्य” म्हणून घोषित केला असून ह्या मयूरेश्वर अभयारण्यात ‘चिंकारा’ जातीच्या हरणांची तसेच मोरांचीही संख्या मोठी आहे.
मोरगाव येथील मोरेश्वराचे दर्शन घेऊन व पुजार्यााकडून गणेशाला श्रीफळ (नारळ) दाखवून घेऊन आम्ही आमच्या यात्रेतील दुसर्या गणेशाच्या दर्शनासाठी ६० किलोमीटर अंतरावरील सिद्धटेकला निघालो.
सिद्धटेकचा ‘सिद्धेश्वर ‘
शास्त्रानुसार हा दुसरा असलेला हा गणेश म्हणजेच सिद्धटेकचा ‘सिद्धेश्वर‘ होय. सिद्धटेक हे एक बेट असून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या उत्तर किनार्यावर आहे. परंतु भीमा नदी ओलांडल्यावर दुसर्या बाजूस पुणे जिल्हा सुरु होतो. आम्ही मोरगावहून पुणे जिल्ह्यातील दौंड मार्गे ‘सिद्धेश्वर’ला जाण्यास निघालो. तेथे आम्ही ५.३० वाजता पोहोचलो.
ह्या सिद्धेश्वराच्या मंदिरास भीमा नदीच्या दक्षिणेकडून बोटीने अथवा नवीन झालेल्या पुलावरून जाता येते.
भगवान विष्णुंना येथ सिद्धि प्राप्त झाली होती म्हणून ह्या स्थानाला सिद्धटेक असे नांव पडले असे समजले.भगवान विष्णुंना ह्या गजाननाकडून अस्त्र प्राप्त झाले व नंतरच त्यांनी मधु आणि कैतन ह्या दोन राक्षसांचा वध केला अशीही एक आख्यायिका आहे. मोरगावचे श्री मोरया गोसावी व केडगावचे नारायण महाराज ह्यांनासुद्धा येथे सिद्धि प्राप्त झाली होती. मंदिराच्या वाटेवर मंदिराजवळच महर्षि व्यासमुनी ह्यांनी यज्ञ केलेली जागा आहे.हा गणपती नवसाला पावतो व इच्छित मनोकामना व काम पूर्ण होते. असे सांगितले जाते की पेशव्यांचे पदच्युत सरसेनापती हरिपंत फडके ह्यांना ह्या जागृत गणपतीचे २१ दिवस दिवस अनुष्ठान केल्यावर त्याच्याच कृपा प्रसादाने त्यांचे हे सरसेनापतीपद पुन्हा प्राप्त झाले होते.हरिपंत फडके ह्यांनीच ह्या मंदिरास जाण्यासाठी सध्या असलेला रस्ता केला.
सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही शासनाने देवस्थानास बांधून दिलेल्या भक्तनिवासात रात्रीचा मुक्काम केला व भक्तनिवासातच असलेल्या कॅंटिनमध्ये रात्रीचे जेवन्ही गेऊन पुन्हा मंदिरात जाऊन शेजारतीस उपस्थित राहिलो.
दुसरे दिवशी आन्हिके आटोपल्यावर त्याच कॅंटिनमध्ये सकाळचा चहा घेऊन पुन्हा एकवेळ श्री गजाननाचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या म्हणजेच यात्रेतील तिसर्याच रांजणगावच्या महागणपतीकडे कूच केले.
रांजणगावचा “ महागणपती ”
शास्त्रानुसार हा आठवा असलेला रांजणगावचा ‘ महागणपती ‘ पुणे जिल्हयाच्या शिरूर तालुक्यात पुणे-अहमनगर ह्या राज्य महामार्गावर असून,पुण्यापासून ५५ किलोमीटर अंतरावरील “महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ रांजणगाव “ ह्या अत्यंत प्रगत अशा औद्योगिक वसाहतीच्या सुरूवातीस आहे. आम्ही दर्शनास गेलेला हा चवथा गणेश होता.
ह्या गणेशाबद्दल अशी एक आख्याकिका सांगितली जाते की महर्षी गृत्समद ह्यांचा उत्श्वासातून निर्माण झालेल्या ‘ त्रिपुरासुर ‘ नामक राक्षसाने आपल्या वडिलांकडून ‘गणेश मंत्र’ शिकून घेतला व त्याचा जप करून गणेशास प्रसन्न करून घेतले व त्यांचे कडून भगवान शंकराखेरीज कोणाकडूनही तुला मरण येणार नाही असा वर दिला,त्यामुळे अल्पावधीत अतिशय उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराने देवाचा छळ करून त्यांना त्राही भगवान करून सोडले,त्यामुळे सर्व देव भगवान शंकरास शरण गेले व त्यांनी भगवान शंकरांची प्रार्थना करून त्यांना ह्या भयंकर उन्मत्त झालेल्या दैत्याचे पारिपत्य करण्याची विनवणी केली.देवांसाठी ह्या उन्मत्त दैत्याचा वध भगवान शंकरांनी केला व त्यासाठी भगवान शंकराच्या मदतीसाथी हाच ‘महागणपती ‘ धाऊन आला होता व श्री गणेशांनी दिलेल्या अस्त्रानेच भगवान शंकरांनी त्या आसुराचा नाश केला. असेही सांगतात की मुळात ह्या गणपतीला दहा शरीरे व वीस हात होते.
इतिहासानुसार इसवी सनाच्या ९ व्या व १० व्या शतकात ह्या मंदिराचे बांधकाम झाले.मंदिर पूर्वाभिमुख असून महाद्वाराचेवर नगारखाना आहे.माधवराव पेशव्यांनी येथे श्री गणेशाची मूर्ती ठेवण्यासाठी मंदिराच्या तळघरात एक खोली तयार केली.नंतर पुढे इंदोरच्या सरदार कीबे ह्यांनी ह्या मंदिराचा जिर्णोद्धार केला.
रांजण येथील महागणपतीचे दर्शन व श्रीफळ प्रसाद दाखवून घेऊन आम्ही आमच्या अष्टविनायक यात्रेतील चवथ्या गणपतीस थेउरला निघालो.
“ थेउरचा चिंतामणी “
धर्मशास्त्रानुसार जरी हा पांचवा गणपती असला तरी आमही आमच्या सोयीनुसार ही अष्टविनायकाची यात्रा केल्याने चवथ्या क्रमांकावर येथे आलो.
पुणे- सोलापूर महामार्गावर हवेली तालुक्यात पुण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर मुळा-मुठा ह्या जोड नद्या व भीमा ह्या तिन्ही नद्या जेथे मिळतात त्या थेउर ह्या ठिकाणी ह्या स्वयंभू ‘चिंतामणी ‘ गणेशाचे मंदिर आहे.
ह्या मंदिराबद्दल मंगला पुराणात अशी कथा आहे की : राका अभिजीत व त्याची पत्नी राणी गुणावती ह्यांना गणा,गुणा किंवा गुणसारा ह्या नांवाचा एक महापराक्रमी पुत्र होता. पण तो अतिशय गर्विष्ठ व तापत डोक्याचा होता.
गणाने कडक तपश्चर्या करून गणेशपिता भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. शंकरांनी प्रसन्न होऊन गणाला स्वर्ग,पृथ्वी व पाताळ ह्या तिन्ही लोकांचे राज्य बहाल करून असा वर दिला की ह्या तिन्ही लोकात त्याला कोणीही मारू शकणार नाही.भगवान शंकरांनी दिलेल्या ‘वरा’ने उन्मत्त झालेला गणा एकदा आपल्या सैन्यासह कपिल मुनींच्या आश्रमात आला.कपिल मुनींकडे इच्छा-प्राप्त करून देणारा दैवी शक्ती असलेले ‘चिंतामणी’ नांवाचे अलौकैक व अद्भुत असे रत्न होते,त्याचा वापर करून कपिलमुनींनी राजा व त्याच्या सर्व सैनिकांना अत्यंत सुग्रास असे पंचक्वांनांचे पोटभर जेवण खाऊ घातले. ते पाहून राजाच्या मनांत ते “चिंतामणी ‘रत्न्न आपल्या जवळ असावे असा लोभ उत्पन्न झाला व त्याने कपिल मुनींकडे त्या ‘ चिंतामणी ‘ रत्नाची मागणी केली,पण कपिल मुनींनी राजाची ती मागणी धुडकावून लावली.त्यामुळे चिडून जाऊन बळाचा वापर करून गणा राजाने ते अद्भुत असे ‘ चिंतामणी ‘ रत्न जबरदस्तीने कपिलमुनिंकडून हिसकावून घेतले. त्यामुळे दु:ख्खी झालेल्या कपिलमुनींनी गणेशाची प्रार्थना करून त्यांचे ते रत्न परत मिळवून द्यावे अशी विनवणी केली. भगवान गणेश व त्याचे सैन्य गाणाच्या स्वप्नात आले व एका सैनिकाने गणाचा शिरच्छेद केला.झोपेतून जागा झालेला गणा आपले सैन्य घेऊन कपिलमुनींना धडा शिकवणच्या उद्देशाने त्याच्या आश्रमाकडे निघाला.परंतु त्याचा पिता अभिजीत राजाने गणाला त्यापासून परावृत्त करण्याखा खूप आटोकाट प्रयत्न केला व कपिलमुनींची क्षमा मागून ते ‘ चिंतामणी ‘ रात्न्न त्यांना परत देऊन टाक असा सल्लाही दिला,पण तो निष्फळ झाला व गणाने कपिलमुनींच्या आश्रमाचा मोडतोड करून विध्वांस केला. तेव्हाड्यात तेथे गणेशाची ‘ शक्ती ‘ असे भगवान शंकर तेथे प्रकटले व त्यांनी ‘शक्ती’ चा वापर करून क्षणार्धात तेथे लाख्खो योध्ये निर्माण केले ज्यांनी गणाच्या सर्व सैन्याचा संहार केला,त्याच वेळी भगवान गणेशाने उन्मत्त राजा गणाचा शिरच्छेद करून ‘ चिंतामणी ‘ हस्तगत करून कपिलमुनींना परत केला,परंतु कपिलमुनींनी तो न स्वीकारता त्यांचे आराध्य दैवत असलेल्या गणेशालाच त्यांचेजवळ रहाण्याची प्रार्थना केली,त्यांची विनंती मान्य करून भगवान गणेशांनी तेथेच वास्तव्यास केले,तेच हे थेउर ! त्या रत्नावरून ह्या गणेशाचे नांव ‘ चिंतामणी ‘ असे पडले.
ओझरचा ‘ विघ्नेश्वर ‘ गणेश
आम्ही दर्शन घेतलेला पांचवा गणपती होता ओझरचा ‘ विघ्नेश्वर ‘ मात्र शास्त्रानुसार ह्याचा क्रमांक आहे सातवा गणेश.
ओझरचे ‘ विघ्नेश्वराचे ‘ स्वयंभू व जागृत असे गणेश मंदिर हे पुण्यापासून ८५ किलोमीटरवर पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० वर जुन्नर तालुक्यात कुकडी नदीवर बांधण्यात आलेया येडगाव धरणाजवळ आहे. अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.
मुद्गल पुराण,स्कंद पुराण व तामीळ विनायक पुराणात असलेल्या पुराव्यानुसार अशी कथा आहे की : अभिनंदन राजाने एकदा यज्ञाचेवेळी प्रत्येक देवतेला भेट म्हणून काही ना काही वस्तु अर्पण केल्या,परंतु त्यावेळी तो इंद्राला दक्षिणा अर्पण करायला विसरला ,त्यामुळे नाराज झालेल्या इंद्राने चार काळांना (काळ व मृत्यु) यज्ञ उधळून द्यायची आज्ञा दिली.काळाने विघ्नासूराचे रूप घेऊन यज्ञात अडथळे आणून तो नष्ट केला.पृथ्वीतलावर धुमाकूळ घालून ऋषि मुनींच्या सत्कृत्यांमध्ये व यागात अडथळे आणून त्यांना त्राही भगवान करून सोडले.त्यमुळे सर्र्व ऋषींनी ब्रह्म व शिव ह्यांना त्यांची मदत करायची याचना केली. ब्रह्म व शिव ह्यांनी ऋषींनागणेशास शरण जाण्याचा सल्ला दिला.ऋषींनी केलेली प्रार्थेना ऐकून गणेशाने त्या दैत्याबरोबर युद्ध सुरू केले व थोड्याच वेळात त्या दैत्याच्या लक्षात आले की हे युद्ध जिंकणे अशक्य आहे,त्यामुळे तो गणेशाला शरण आला व त्याने गणेशाला यापुढे ऋषींच्या यज्ञात विघ्ने व अडथळे न आणण्याचे वचन दिले.त्याने असेही सांगितले की जे भक्त गणेशाची भक्ति करणार नाहीत त्यांनाच विघनाकडून त्रास होईल.ह्या प्रसंगाची आठवण म्हणून विघ्नेश्वराने गणेशाला त्याचे नांव धारण करायची विनंती केली व गणेशाने टी मानी केली व गणेशाला ‘विघ्नेश्वर ‘ असे नांव पडले.दैत्याच्या त्रासातून मुक्त झालेल्या ऋषींनी गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून त्यास ‘ विघ्नेश्वर’ असे नांव दिले.

लेण्याद्रीचा ‘ गिरिजात्मज ‘ गणेश
शास्त्रानुसार सहावा गणेश म्हणजेच हा लेण्याद्रीचा ‘ गिरिजात्मज ’ गणेश होय. मात्र आम्ही भेट दिलेला हा सहावा गणपती.
कुकडी नदीच्या दक्षिण-पश्चिम तीरावर जुन्नर पासून ४.८ किलोमीटरवर मनुष्य वस्तीपासून दूर व अतिशय निर्जन असे हे ठिकाण आहे. पुण्यापासून ७५ किलोमीटर दूर आहे.
जुन्नरजवळ डोंगरात बौद्धांच्या ध्यानधारणेसाठी विहार म्हणून डोंगरात खोदलेल्या गुहांतील ७ व्या गुहेत सपाट जमिनी पायथ्यापासून १०० फुट उंचीवर एक ५७ फुट लांब x ५१ फुट रुंद व ११.१ फुट उंच अशा बिनखांबांच्या विस्तीर्ण सभागृह आहे. सभागृहात वीस दालने आहेत.दोन्ही बाजूस सात व मागील भिंतीकडे सहा.सभागृहात प्रवेश करण्यासाठी समोरचा बाजूस एक मध्यवर्ती दरवाजा असून त्याच्या दोन्ही बाजूस खिडक्या आहेत.गणेश मंदिराचा सभामंडप म्हणून सध्या ह्या सभागृहाचा वापर केला जातो.मंदिरात येण्यासाठी भक्तांनी डोंगरात २८३ दगडी पायर्याू बांधलेल्या आहेत. त्या चढून आल्यावर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी ८ वेगळ्या पायर्याा आहेत.
पालीचा ‘ बल्लाळेश्वर ‘गणेश
शास्त्रानुसार तिसरा गणेश म्हणजे पालीचा ‘ बल्लाळेश्वर’ होय. ‘बल्लाळेश्वर हे जागृत व स्वयंभू देवस्थान रायगड जिल्ह्यातील कर्जत पासून तीस किलोमीटरवरील पाली ह्या खेड्यात सारसगड किल्ला अंबा नदी ह्याचे मध्ये आहे. पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. बल्लाळेश्वर ‘ ह्याचा अर्थ ‘बल्लाळ ‘ चा ईश्वर अष्टविनायकातील हे एकमेव गणेशाचे वैशिष्ट्य असे आहे की ज्याची ओळख त्याच्या एका भक्ताचे नावावरून होते.

पाली खेड्यात कल्याण नांवाचा एक यशस्वी उद्योगपती आपल्या इंदुमती नामक पत्नीबरोबर रहात होता.त्याचा पुत्र बल्लाळ व खेड्यातील इतर मुले मूर्तीच्या ऐवजी दगड घेऊन पूजेचा खेळ खेळायची. एकदा ही मुले गावाबाहेर गेली असता त्यांना एक मोठ्ठा दगड दिसला. तो पाहून बल्लाळने त्या दगडाचे ‘गणेश ‘ असे नामकरण केले. त्या दिवसापासून बल्लाळ बरोबर इतर मुलेही तहान-भूक विसरून जाऊन रात्रंदिवस त्या “ गणेशाची ‘ (दगडाची) पूजा-अर्चा करू लागली.
दरम्यान एके दिवशी रानात गेलेली मुले वेळेवर न परत आल्याने काळजीत पडलेले त्यांचे पालक बराच वेळ वाट पाहूनही मुले घरी परत न आल्याने सगळेजण कल्याणच्या घरी जाऊन त्याचा पुत्र बल्लाळला दूषणे देऊ लागली,त्यामुळे क्रुद्ध झालेला कल्याण एक छडी घेऊन मुच्या शोधत रानात गेला. इतक्यात त्याचे लक्ष बल्लाळ सांगत असलेल्या गणेश पुराण ऐकण्यात तल्लीन झालेल्या मुलाकडे गेले. रागाच्या भरात कल्याणने मुलांनी बांधलेले ते छोटे मंदिर मोडून नष्ट करून टाकले .ते पाहून भेदरलेली बाकीची मुले बल्लाळला एकट्याला तेथेच रानात सोडून पळून गेली.गणेशाच्या ध्यानात बुडून जाऊन शुद्ध हरपलेल्या बल्लाळचे बखोटे पकडून त्याला बाजूला घेऊन कल्याणने त्याला रक्त येईपर्यन्त मारले व झाडाला बांधले आणि सर्व पूजा साहिती उधळून टाकले. मुलांनी गणेश म्हणून स्थापन केलेला मोठ्ठा दगड उचलून त्याने लांब जमिनीवर भिराकावून दिल्यामुले त्याचे लहान लहान तुकडे झाले.बल्लाळला झाडालाच बांधलेला ठेऊन 'बघू या आता कोणता देव तुला वाचवायला येतोय ते ' 'असे उपरोधाने म्हणत व 'मर आता येथेच ' अशी धमकी देत घरी निघून गेला.
अद्यापही झाडाला बांधून ठेवलेला बल्लाळने, वडिलांनी केलेल्या त्याच्या देवाच्या (गणेशाचा) अपमानाने व्यथित होऊन पित्याची निर्भत्सना करत होता व पार्वती पुत्राचा त्यांनी केलेल्या उपमर्दासाठी त्यांना ‘ते आंधळा,मुक-बधिर व लुळा पांगळा व्हावेत असा शाप देत होता.
जरी तो (बल्लाळ)तहान,भूकेने व्याकुल झाला होता व असह्य वेदनांमुळे क्लांत झाला होता तरीही त्याने मुखाने गणेशाचे नामस्मरण चालूच ठेवले होते.अखेरीस अंगातील त्राण जाऊन त्याची शुद्धच हरपली. थोड्यावेळाने शुद्धीवर आल्यावर त्याने मदतीसाठी आपला देव गणेशाचा धावा सुरू केला. भगवान गणेशही बालकाची आपल्यावरील भक्ती पाहून हेलावले व एका साधूच्या वेषात बल्लाळ समोर प्रकटले आणि त्यांनी बल्लाळची झाडाच्या बंधांनातून मुक्तता केली. गणेशाला समोर पाहून बल्लाळळा तहान-भुकेचा विसर पडला,त्याच्या जखमा भरून आल्या व साधू वेशातील गणेशाला ओळखून भारावलेल्या बल्लाळने गणेशाच्या चरणावर लोटांगण घातले व मुखाने गणेशाची स्तुती करत त्याचाकडून अनुग्रहाची मागणी केली.बल्लाळवर प्रसन्न झालेल्या गणेशाने बल्लाळला हवे ते माग असे म्हटल्यावर बल्लाळ गणेशास म्हणाला “ कायम मी तुझा निस्सीम भक्त राहावा व गणेशाने याच ठिकाणी कायमची वास्तव्य करून राहावे व जे भक्त गणेशास शरण होऊन आश्रयास येतील त्यांची सर्व दु;ख्खे दूर व्हावीत व संकटे निवारण व्हावीत.
तथास्तु म्हणत गणेशाने बल्लाळला असे वचन दिले की आजपासून मी येथे कायमचा वास्तव्य करेन व तुझे नांव मीमाझ्या नांवापुढे धारण करेन.
तेंव्हापासून येथी गणेशाचे नांव : बल्लाळचा ईश्वर म्हणजेच ‘ बल्लाळेश्वर ‘ असे पडले.
महडचा ‘ वरदविनायक ‘
शास्त्रानुसार अष्टविनायक यात्रेतील हा जरी चवथ्या क्रमांकाचा गणपती असला तरी आम्ही आमच्या सोयीनुसार यात्रा केल्याने आमचा हा शेवटचा म्हणजेच आठवा गणपती होता.
याला वरदाविनायक असेही संबोधले जाते. हा गणपती रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात खोपोली आणि कर्जत ह्याच्या मध्यावर असून पुण्यापासून xxx किलोमीटर दूर आहे.
ह्या गणपतीच्या नांवामागची एक कथा अशी आहे की : कौंन्डिण्यपुर नगरचा भीमा नांवाचा एक निपुत्रिक राजा होता.राज्याला वारस म्हणून पुत्र नसल्याने राजा व राणी दोघेही खूपच दु:ख्खी होते. एकदा राजा व त्याच्या पत्नीची अरण्यांत तपश्चर्येसाठी आलेल्या विश्वामित्र ऋषींची भेट झाली.विश्वामित्र ऋषींनी दिलेल्या ‘गजानन ‘ ह्या एकाक्षरी मंत्राचा जप केल्यामुळे राजाला वारस म्हणून ‘रुखमांगद’ नांवाचा पुत्र प्राप्त होतो. वाढता वाढता रुखमांगद एक तरणाबांड देखणा राजकुमार होतो.
एक दिवस मृगयेसाठी अरण्यांत गेलेला राजकुमार रुखमांगद फिरत फिरत वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात येतो. ऋषींची पत्नी मुक्ता प्रथमदर्शनातच देखण्या रुखमांगद राजकुमाराच्या प्रेमात पडते व त्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्याची गळ घालते.पण राजकुमार त्यास स्पष्टपणे नकार देउन आश्रमातून निघून जातो.मुक्ता प्रेमज्वराने व्याकुळ झालेली असते.तिची ती अवस्था ओळखून इंद्र रूख्मांगदाचे सोंग घेऊन तेथे येतो व मुक्ताची इच्छा पूर्ण करतो व त्यातून मुक्ता गरोदर राहते व गृत्समद नांवाच्या मुलाला जन्म देते.
कालांतराने जेंव्हा गृत्समदला आपल्या जन्माचे रहस्य समजते तेंव्हा तो क्रोधित होऊन आपली आई मुक्ता हिला शाप देतो की तू एक अतिविद्रूप व काटेरी फळे असलेले बोरीचे झाड बनून रहाशील. त्यावर मुकताही गृत्समदला उलट शाप देते की तुझ्यापोटी एक दुष्ट राक्षस जन्माला येईल.इतक्यात अचानकपणे दोघांनाही एक आकाशवाणी ऐकू येते की “ गृत्समद हा इंद्राचा पुत्र “ आहे.हे ऐकून दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो पण आता ख्पच उशीर झालेला असतो, शाप परत घेण्याची वेळ निघून गेलेली असते व त्यामुळे मुक्ताचे रूपांतर एका विद्रूप काटेरी बोरीच्या झाडात झालेले असते तर शरमित होऊन पश्चातापाने द:ग्ध झालेला गृत्समद तपश्चर्येने गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी पुष्पक अरण्यात निघून जातो.
गृत्समदाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणेश त्याला असा वर देतो की तुला एक असा पुत्र होईल की ज्याला शकराखेरीज कोणीही पराजित करू शकणार नाही. गृत्समद गणेशाला अशी विनंती-याचना करतो की या पुष्पक वनाला असा वर द्या की जो भक्त या वनात तपश्चर्येला येईल त्याची इच्छा पुन व्हावी व गणेशास अशीही गळ घालतो की त्यांनी येथेच कायमचे वास्तव्य करावे व गृत्समदला ब्रह्मज्ञान द्यावे.
गृत्समदाने येथे देऊळ बांधले व त्यात “ वरदविनायक “ नांवाच्या गणेश मूर्तीची स्थापना केली.तेच हे महडचे ‘वरदविनायक’ मंदिर. हल्ली या मंदिराच्या सभोवतालच्या अरण्याला ‘भद्रक’ असे नांव आहे.
असे म्हटले जाते की जो भक्त माघी चतुर्थीस येथे प्रसाद म्हणून मिळालेला नारळ खाऊन संपवेल त्याला पुत्रप्राप्ती होईल. त्यामुळे नेहमीच माघातील उत्सवाला येथे भक्तांची अलोट गर्दी असते.
श्रीधरच्या कारमधून गेल्याने अष्टविनायकांखेरीज आम्ही वाटेत लागणारी इतरही बरीच देवस्थाने बघितली त्याबद्दल आता थोडीशी माहिती खाली देत आहे.
बनेश्वर मंदिर (नसरापुर)
पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर पुण्याहून जातेवेळी नसरापुर फाटा लागतो तेथून उजव्या बाजूला ५-६ किलोमीटर आत गेल्यावर थोडेसे आतील बाजूस हे प्राचीन (पेशवेकालीन ) श्री-बनेश्वराचे (शंकराचे)अत्यंत देखणे मंदिर आहे. आजूबाजूला गर्द वनराईने वेढलेले असून जवळच एक सरकारी उपवन वाटिकासुद्धा आहे. हे पेशवेकालीन मंदिर ऐतिहासिक तर आहेच पण तेव्हढेच प्रेक्षणीयसुद्धा आहे. येथील शिवलिंग बाजूला केल्यावर आंतिल बाजूस खोलवर हात घातला की झर्याकचे वाहते जिवंत पाणी लागते व त्या पाण्यातच पांच छोटी छोटी स्वतंत्र शिवलिंगे हाताला लागतात. मंदिर व परिसर स्वच्छ व शांत असून वातावरण प्रसन्न व पवित्र वाटे. येथे दर्शन बाजार झाले नसून विनामूल्य व विनात्रास घडते. मंदिराच्या पुढील दर्शनी भागात पाण्याचे एक मोठ्ठे कुंड (हौद)असून त्यात मासे व कासवे सोडलेली आहेत.
हिरवे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी डोंगरकुशीतील एखाद्या शांत परिसराच्या शोधात असाल तर, पुण्याजवळच्या बनेश्वरला जा. डोंगरटेकड्यांनी वेढलेल्या गर्द वृक्षराजीत, पुण्याजवळील नसरापूर गावाजवळ हे शिवालय वसले आहे. एक दिवसाच्या सहकुटुंब सहलीसोबतच टेकर्ससाठीही हे ठिकाण खूपच सोयीचे आहे. मंदिराभोवती दाट बन, म्हणजेच जंगल-झाडी आहे. त्यामुळेच या शिवालयाला 'बनेश्वर' नाव मिळाले आहे. १७व्या शतकात पहिल्या बाजीरावाने हे दगडी शिवमंदिर उभारले. निसर्गसौंदर्याचे वरदान लाभल्यामुळे, शिवभक्तांसोबतच पर्यटकही बनेश्वरकडे आकर्षित होऊ लागले आहेत. .
प्रती बालाजी मंदिर – केतकावळे (पुणे)
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून ३५ किलोमिटर अंतरावर खेड शिवापूर नंतरचा पहिला टोल नाका ओलांडल्यानंतर कापुरहोळ येथे डावीकडे वळून सासवडकडे जाऊ लागल्यावर सुमारे ४ किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र नारायणपूरच्या आगोदर ८ किलोमीटर हे प्रती-बालाजीचे मंदिर आहे.मंदिर हुबेहूब आंध्र प्रदेशातील तिरुमाला येथील मूळच्या वेंकटेश्वराची (बालाजीची) तंतोतंत प्रतिकृती असून आपल्याला मूळ बालाजीचेच दर्शन घेत असल्यासारखे वाटते.
हे मंदिर आंध्र प्रदेशचे थोर सुपुत्र ,वेंकटेश्वरा हॅचरीज् व उत्तरा फूडस् चे निर्माते सुप्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री कै. बी.व्ही. राव ह्यांनी स्वत:च्या मालकीच्या जागेत स्वखर्चाने बांधून भक्तासाठी दर्शनास खुले करून मंदिर त्याच्या संपूर्ण परिसराची सर्व देखभाल व व्यवस्थापनही आज त्यांच्या पाशच्यातही त्यांच्या कन्या अनुराधा देसाई ह्या त्यांच्याच उद्योगांमार्फत पहात असतात हे विशेष ! आणि माझ्यामते हे नक्कीच अतिशय कौतुकास्पद आहे यात काही शंका नाही.
मंदिर व मंदिराचा संपूर्ण परिसर हा अतिशय शांत,स्वच्छ व पवित्र ठेवण्यात आला आहे,त्यामुळेच भक्ताचे मन एव्हढे प्रसन्न होते की मला स्वत:ला तरी मूळच्या वेंकटेश्वर मंदिरा(जे अति श्रीमंत झाल्याने पैशाची सूज आल्याने व जेथे दर्शनाचा एव्हढा किळसवाणा बाजार झाला आहे) पेक्षा या मंदिरातच जास्त प्रसन्न व पवित्र वाटले व मनाला शांती मिळाली.
येथे आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली व भावलीसुद्धा व ती ही की येथे येणार्याि व दर्शन घेऊन बाहेर जाण्यापूर्वी प्रत्येक भक्ताला देवाचा प्रसाद म्हणून एकेक मोठा लाडू मोफत दिला जातो,तसेच येथील अन्नछत्रात जेवणाही मोफत दिले जाते.आजकाल ही गोष्ट अत्यंत दुर्मिळच झाली आहे.कारण आजकाल कुठल्याही मंदिरात गेल्यावर सर्वत्र फक्त दर्शनाचा ‘बाजार’च पाहायला मिळतो.भक्त जसा खिसा सैल सोडेल तसे त्याला दर्शन घडते व पैसे मोजून त्यानुसार प्रसाद मिळतो.सर्वत्र बोकाळलेला हा ओंगळ दरशा-प्रसादाचा बाजार थाटलेला पाहून व देवाचे सेवक असलेल्या बडवे-पुजार्यां ची मग्रुरी,मुजोरी व उन्मत्तपणा पाहून मन उद्विग्न होऊन उबगले जाऊन देवावरचा विश्वास व श्रद्धा यांना तडा जाऊ लागतो.त्यामुळेच असे मंदिर पाहिल्यावर खरोखरच मनाला शांती लाभते,मनाला उभारी येते प्रसन्नता वाटते व उर भक्तीभावाने भरून येतो.

शिव मंदिर नारायणपूर – पुणे
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून ३५ किलोमिटर अंतरावर खेड शिवापूर नंतरचा पहिला टोल नाका ओलांडल्यानंतर कापुरहोळ येथे डावीकडे वळून सासवडकडे जाऊ लागल्यावर सुमारे १०किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र नारायणपूर आहे.हे संत चाङ्ग्देव्महाराजांचे मूळ गांव असून येथे सुप्रसिद्ध एकमुखी दत्त मंदीरा शेजारीच हे अत्यंत सुंदर असे ऐतिहासिक व प्राचीन यादवकालीन असे शिव मंदिर आहे. यालाच ‘नारायणेश्वर’ या नांवानेही ओळखतात. याच्या गाभार्याशत गुप्त शिवलिंग असून ते शिवाजीमहाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी या शिव मंदिराला भेट म्हणून दिलेल्या सोन्याच्या शिवलिंगाने ते आच्छादले (झाकले)आहे. या मंदिराचे कोरीवकाम यादव युगाची साक्ष देते.
एकमुखी दत्त श्रीक्षेत्र नारायणपूर – पुणे
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून ३५ किलोमिटर अंतरावर खेड शिवापूर नंतरचा पहिला टोल नाका ओलांडल्यानंतर कापुरहोळ येथे डावीकडे वळून सासवडकडे जाऊ लागल्यावर सुमारे १०किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र नारायणपूर आहे. येथे सुप्रसिद्ध असे श्रीदत्तात्रेयाचे जागृत मंदिर आहे. सर्वसाधारणपणे दत्तात्रेयास ब्रह्मा,विष्णु व महेश(शिव) अशी तीन मुखे (तोंडे) असतात. पण येथे उभ्या स्थितीत असलेल्या पांढर्याे शुभ्र संगमरवरातील सुबक अशा दत्ताच्या मूर्तीस फक्त एकाच मुख (वादन,तोंड) असल्याने हा ‘एकमुखी दत्त’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याखेरीज भक्तांना येथे भगवान दत्तात्रेयाच्या पादुकांचेही दर्शन घेता येते.
येथील मंदिराशेजारी दत्तात्रेयांना अतिशय प्रिय असा पवित्र औदुंबर वृक्ष असून असे म्हणतात की जो कोणी भक्त या पवित्र औदुंबर वृक्षाचे दर्शन घेईल,त्याला स्पर्श करेल, त्याचे भोवती प्रदक्षिणा घालेल,त्याचे पूजन करेल अथवा त्याच्या खाली / सान्निध्यात बसून ध्यान-धारणा करेल त्याच्या सर्व समस्यांचे निराकरण होऊन त्याच्या मनोकामना पूर्ण होतात.
टेकडीवरील भव्य गणेश थेरगांव – पुणे
जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर देहुरोडजवळच्या थेरगांव हद्दीतील एका छोट्याश टेकडीच्या माथ्यावरील सपाट जागेवर पुण्यातील सर्वात जास्त ५४ फुट उंचीची भव्य गणेशाची मूर्ती रिंफोर्सड कॉंक्रिट मध्ये बनवली असून त्यावर तांब्याचा मुलामा दिलेला आहे. ही गणेशाची मूर्ती १८ फुट उंचीच्या चौथार्यायवर बसवली आहे. एकूण ७४ फुट उंचीचे हे देखणे अ अतिभव्य शिल्प मुंबईहून पुण्यास भेटीसाठी येणार्याी परदेशी पर्यटकांना तीन किलोमीटर दुरवरूनच जणू काही पुण्याचे प्रवेशद्वार बनून स्वागत करते.
वसंतकुमार बिर्ला व सरला बिर्ला ह्यांचे स्वप्न असलेला हा भावी प्रकल्प पूर्ण होऊन १७ जानेवारी २००९ रोजी त्याचे दिमाखदार उद्घाटन झाले.
प्रती शिर्डी साई मंदिर शिरगांव – पुणे
जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय हमरस्त्यावर पुण्यापासून ३२ किलोमीटर अंतरावर थोड्याशा आतल्या बाजूला असलेल्या शिरगांव येथे हे मंदिर असून साई भक्त याला शिरगांवची प्रती शिर्डी म्हणूनच ओळखतात. श्री.प्रकाश केशवराव देवळे ह्यांनी त्यांचे स्प्वप्न म्हणून व साईंच्या आशीर्वादाने केवळ ९ महिन्यात हे साई मंदिर बांधून पूर्ण केले हा एक चमत्कारच मानला जातो. मंदिराचे बांधकाम करणार्या् बर्याशच कामगारांनासुद्धा ह्या ९ महिन्यात चमत्कारांचा अनुभव आला होता.
हे साई मंदिर ११ जून २००३ रोजी विधिवत व समारंभपुर्वक भाविक साई भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
या मंदिरात व शिर्डीच्या मंदिरात बर्या च प्रमाणात साधर्म्य दिसून येते. मंदिराच्या प्रवेश्द्वाराजवळच मंदिराचे गुरुस्थान असून त्याच्या मध्यभागी कडूलिंबाचे झाड असणे हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. येथील मंदिराची रचना, गाभारा,समाधि,साईंची मूर्ती ह्यामध्ये व शिर्डी येतथी रचनेण कमालीचे साधर्म्य असल्याचे साई भक्तांना जाणवते व त्यामुळे आपण शिर्डीतच असल्याचा भास होतो. हीच गोष्ट द्वारकामाईमधील साई धुनीची. ही साई धुनी बारा महीने अहोरात्र सतत अखंड तेवत असते.

इतिहासातील गणपती

 

छत्रपती शिवरायांच्या काळातली परंपरा आजही जिवंत; दाभाडे गणपतीचा इतिहास जाणून घ्या!

सकाळ डिजिटल टीम

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोणताच सण धामधुमीत झाला नव्हता. पण यंदा सगळ्या निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्यानं अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव जोरदार साजरा होणार असं दिसतंय. ढोलताशाचा गजर, आकर्षक रोषणाई, सजावटीचं साहित्य या सगळ्या रस्ते खुलून गेले आहेत. उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या गणेशोत्सवाच्या निमित्ताने जाणून घेऊया दाभाडे गणपतीबद्दल.

सरदार खंडेराव दाभाडे आणि पहिल्या महिला सेनापती उमाबाई दाभाडे यांचे वंशज आजही तळेगाव दाभाडेमध्ये पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. दाभाड्यांच्या घरी पूर्वीपासून सात दिवसांचा गणपती बसतो. हा गणपती पालखीतून येतो आणि पालखीतून जातो. एक घरातला आणि एक संस्थानचा असे दोन गणपती बसतात. दाभाडे घराण्याचे पाटील, राजपुरोहित, तिथला भुई समाज, वाजंत्री हे सगळेच वंशपरंपरेने सामील असतात. या सगळ्यांसोबत पालखी गावभर फिरते आणि मग घरी आणून तिची स्थापना केली जाते.

दाभाडे घराण्याचा इतिहास काय?

दाभाडे घराणं मूळचं गुजरातमधल्या बडोद्याजवळ असणाऱ्या दभोई या गावातलं. तिथं राहणारे म्हणून त्यांचं नाव दाभाडे पडलं. मुघलांच्या करामुळे दाभाडे गुजरातमधून निघून नाशकातल्या ओझर इथं स्थायिक झाले. या घराण्याचे बजाजी दाभाडे यांचा मुलगा येसाजी दाभाडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक होते. छत्रपती शिवरायांना विशाळगडावर पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचा मुलगा सरदार खंडेराव दाभाडे आणि त्यांची तिसरी पत्नी उमाबाई दाभाडे हे स्वराज्याच्या उभारणीमधल्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांपैकी आहेत.

 

साताऱ्याच्या खिंडीतील गणपतीचा इतिहास

टिम इ सकाळ

गणपती हा नवसाला पावणारा देव आहे. गणपतीच्या भक्तांची संख्या अफाट आहे. नवसाला पावणाऱ्या गणपतीचे देवस्थान देशभरामध्ये अनेक आहेत. त्याचप्रमाणे सातारा या ऐतहासिक शहरात सुद्धा नवसाला पावणाऱ्या गणपतीचे अतिशय सुंदर देवस्थान आहे. या शहरात दक्षिण बाजूला सज्जनगड रस्त्याच्या डाव्या बाजूस निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं देवस्थान आहे. नवसाला पावणारा असा प्रसिद्ध खिंडीतील गणपती आणि कुरणेश्वर देवस्थान या श्रद्धास्थानी भक्तांची गर्दी होत असते. नागरिकांमध्ये सातारकरच नव्हे तर परप्रांतामधून आलेल्या भाविक आणि पर्यटकांचा देखील समावेश असतो. येथे पर्यटक फक्त देवदर्शनासाठीच येतात असे नाही तर, ते देवदर्शनाबरोबरच निसर्गरम्य परिसराची मौज अनुभवण्यासाठी येतात. वैशिट्य म्हणजे या ठिकाणाचा एक वेगळा इतिहास आहे.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : हे आहे गणपती स्थापनेचे महत्व, भगरे गुरुजी सांगतात...

१६९८ साली सातारा राजधानी झाली. छत्रपती राजाराम महाराजांनी सातारा या शहराला राजधानी घोषित केले होते. तेव्हापासून अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण उतारावर गर्द झाडीत ही दोन ठिकाणं होती. इतिहास आपण जाणतोच, औरंगजेबाने मराठ्यांचं राज्य नष्ट करण्यासाठी साता-यावर स्वारी करून ही राजधानी बळकावण्याचा प्रयत्न केला होता. त्याने साता-याजवळ उत्तरेला करंजे गावी तळ ठोकला.त्याच्या मुलाला म्हणजेच अझिमशहाला सध्याच्या शहापूर ते सज्जनगड भागात तळ देण्यासाठी पाठवलं होत. कपटी औरंगाजेबाने अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला आणि सज्जनगडावर स्वारी केली.

पावसाळ्यात मराठ्यांच्या गनिमी काव्याला बळी पडत हजारो सैनिक मरण पावून हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज यांनी ताराबाईंकडून किल्ला जिंकून सातारा ही राजधानी केली.

Recommended Articles


हेही वाचा: Ganeshotsav 2022 : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू

हे ठिकाण अजिंक्यतारा किल्ल्याच्या कुशीत सातारा शहरापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर आहे. नागमोडी वळणाच्या स्वच्छ आणि हिरव्यागार घाटात हे ठिकाण आहे. शहरातून तिथे जायच असेल तर स्वतःच खाजगी वाहन असणे आवश्यक आहे किंवा शहरातून रिक्षाही मिळू शकते. वेगळेपण असे आहे कि या देवस्थानला पायी जाणा-यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. या भागात गणपतीबरोबरच कुरणेश्वर महादेव मंदिर आणि दत्त मंदिरही आहे.

मुघलांकडून मूर्ती फोडली जाऊ नये यासाठी किल्याला वेढा पडल्यावर देवभक्तांनी पूर्वीच्या देवालयाच्या प्रवेशद्वारात नवी मूर्ती बसवल्याचं सांगितलं गेलं. मूर्तीचे स्वरूप बघता ती मूर्ती दगडाची नसावी असा अंदाज आहे.या मंदिराचं आणि मूर्तींच वैशिष्ट्य म्हणजे, मूर्तीच्या मागे आजही मूळ आहे. ती मोकळी करण्याचा विचार अनेकदा झाला पण नकार दृष्टांत झाल्याने आहे त्याच मूर्तीची पूजा सुरू राहिली आहे.

हेही वाचा: Ganeshotsav 2022: छत्रपती शिवरायांच्या काळातली परंपरा आजही जिवंत; दाभाडे गणपतीचा इतिहास जाणून घ्या!

काही कालावधीनंतर सातारा शहरातील अनेक गणेशभक्त नित्यदर्शनासाठी येऊ लागले.त्यानंतर देवस्थान ट्रस्टची स्थापना करण्यात आली. आता ट्रस्टतर्फे वर्षामध्ये भाद्रपद आणि माघ महिन्यात पाच दिवसांचे दोन उत्सव, मंदिरामध्ये रोज सकाळी आणि सायंकाळी पूजा आणि अभिषेक असे धार्मिक विधी केले जातात. मंदिराचा जीर्णोद्धार, धार्मिक कार्यासाठी दुमजली इमारत, तसेच परिसरात सुशोभित बालोद्यान, वृक्षारोपण, पथदिवे इत्यादी सोयी ट्रस्टतर्फे करण्यात आल्या आहेत.

श्री गणेश मंदिराच्या पूर्वेस दगडी पाय-या उतरून गेल्यावर स्वयंभू महादेवाचं कुरणेश्वर मंदिर आहे. भक्तांच्या सहकार्यातून मंदिरापर्यंत दगडी पाय-या, बालोद्यान, ध्यानकेंद्र, आध्यात्मिक अभ्यासिकाही सुरू आहे. हा परिसर निसर्गरम्य आणि घनदाट झाडीने बहरलेला असल्यामुळे गणेशभक्तांबरोबरच पर्यटकांचंही आकर्षण ठरला आहे.

लेेखन - आकांक्षा मानकर

 

पुणे : गुंडांचा गणपती...

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरातील कसबा पेठेत शिंपी आळीच्या शेवटाला गुंडाचा गणपती नावाचे पेशवेकालीन देऊळ आहे. पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस आंचा नागोजी गुंड नावाचा सहकारी होता. 'त्याच्या घराजवळील गणपती' असा जो दुसरे बाजीराव पेशवे यांच्या १८१०-११ सालामधील रोजनिशीमध्ये उल्लेख आहे, तोच गणपती आज "गुंडाचा गणपती' म्हणून प्रसिद्ध आहे.

पुण्यातले कसबा गणपतीप्रमाणेच कसब्यातील गणपतीचे दुसरे जागृत स्थान म्हणजे गुंडाचा गणपती होय. या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर मूर्तीवरील नजर हटत नाही आणि दर्शनाचा परिणाम दीर्घ काळ मनावर राहतो. दर्शनातच आनंद देणारी ही मूर्ती आहे.सुमारे साडेचार-पाच फूट उंचीची ही मूर्ती पूर्णपणे दगडाची असून शेंदरी रंगात आहे. चतुर्भुज, दोन्ही पाय खाली सोडून बसलेला गजानन, अशी ही मूर्ती आहे. डाव्या खालील हातात मोदक, वरच्या दोन्ही हातांत पाशांकुश आणि उजवा खालील हात अभयहस्त असे मनमोहक रूप आहे.

नागयज्ञोपवित, तसेच अंगभर पीतांबर असलेली मूर्ती दगडी बैठकीवर असून, अत्यंत प्रभावी अशा नजरेने पाहत असल्याचे दिसते. ३ एप्रिल १९७५ रोजी जुन्या मूर्तीचे कवच निघाले, तेव्हा आत अतिप्राचीन सुंदर मूर्ती भंगलेल्या अवस्थेत मिळाली. त्या वेळी या मूर्तीची पाहणी भारत इतिहास संशोधन मंडळ आणि डेक्कन पुरातत्त्व महाविद्यालयातील तज्ज्ञांनी केली होती. तेव्हा ही मूर्ती चौदाव्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे नवीन मूर्तीची स्थापना करण्यासाठी काका वडके यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची स्थापना करण्यात आली होती.

गणेश मूर्तीवरील थर काढून ४ फेब्रुवारी १९७६ रोजी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मूर्तीच्या कवचाचा एक साचा केळकर संग्रहालयाला भेट देण्यात आला. त्यानंतर केशव रघुनाथ देशपांडे यांनी पाषाणातून हुबेहूब मूर्ती तयार केली. या मूर्तीसाठी वारजे येथील गणपती माळावरून दोन टन वजनाचा दगड निवडण्यात आला होता. त्याच नवीन मूर्तीची आज पूजा केली जाते (१८७६पासून). मूळ मूर्ती गाभाऱ्याच्या मागे ठेवलेली आहे.लोकमान्य टिळकांचे गुरू महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या मातुःश्रींनी पुत्रप्राप्तीसाठी येथेच कडक उपासना आणि नवस केला होता.

पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये या गणपतीचा उल्लेख आहे. ही उजव्या सोंडेची श्रींची मूर्ती असून हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या देवस्थानची वहिवाट सन १८५२ ते १९१० पर्यंत चित्राव घराण्याकडे होती. मंदिरातील मूर्ती शिलाहार कालानंतरची पण शिवकालाच्या आधीची असावी,असा अंदाज आहे.

 For More Than 13 Years Rak94

Moin Khan

१३ वर्षांपासून मोईन खानकडून बाप्पाची भक्ती; इतरांसाठी ठरतेय आदर्श

जुने नाशिक : ‘मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना, हिंदी है हम हिंदुस्तान हमारा’ या वाक्यास खऱ्या अर्थाने कोणी अस्तित्वात उतरवले असतील तर तो आहे, मोईन खान. गेल्या तेरा वर्षांपेक्षा अधिक काळापासून अल्ला आणि भद्रकालीचा राजा गणपती बाप्पाची भक्ती करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापुढेही जीवन असेपर्यंत असेच करत राहणार असल्याचा त्याने निश्चय केला आहे.


सर्वधर्म समभाव संकल्पना राबविणारे क्वचितच आढळून येतात. जातीभेद, धर्मभेदाच्या नावावर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करून माणुसकीला काळिमा फासण्याचे काम करत असतात. अशा समाजकंटकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम सामान्य कुटुंबातील मोईन खान याने केले आहे. मोईन महापालिकेच्या पेस्ट कंट्रोल विभागात ठेकेदारीवर औषध फवारणीचे काम करतो. हे करत असताना दैनंदिन भद्रकालीचा राजा गणपती बाप्पाच्या भव्य मूर्तीची साफसफाई करण्याचे काम तो करतो. इतकेच नव्हे तर सकाळी सर्वात प्रथम मूर्तीच्या सफाईनंतर पहिली आरती करून मगच आपल्या कामावर जातो. ड्यूटी संपल्यानंतर लहान- मोठे काम करून त्याठिकाणी वेळ घालवतो. मुस्लिम असूनदेखील दैनंदिन नित्य नियमाने त्यास शक्य होईल त्यापद्धतीने बाप्पाची सेवा करतो. चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच मूर्तीला धुवून काढणे, परिसरातील स्वच्छता करणे, आरती करणे, पूजा साहित्याची मांडणी करणे अशी विविध प्रकारची कामे त्यांच्याकडून केली जातात. नटराज मित्र मंडळाकडून कायमस्वरूपी स्थापना केलेल्या भद्रकालीचा राजा गणपतीचे सर्वांमध्ये विशेष श्रद्धा आहे. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. त्या भाविकांमध्ये देखील मोईनची सेवा आकर्षण ठरत असते. शुक्रवार (ता.१०) गणेशोत्सवात सुरवात होणार त्यानिमित्ताने पंधरा दिवसात पूर्वीपासूनच त्याने बाप्पाची मूर्ती धुणे परिसर स्वच्छ करणे अशा विविध प्रकारच्या कामाची तयारी सुरू केली होती. शुक्रवारी शुक्रवारीदेखील सर्वप्रथम सकाळी त्याची हजेरी लागली.

हेही वाचा: 24 वर्षात पहिल्यांदाच हुकली बाप्पांची मनमाड-मुंबई वारी!

नटराज बंधू मित्रमंडळातर्फे सर्वधर्मसमभाव संकल्पना जपली जाते. गणेशोत्सवाप्रमाणेच पीरबाबाचा संदलदेखील उत्साहात साजरा केला जातो, तर मग आपण का मागे राहायचे भद्रकालीचा राजा बाप्पाची सेवा करून समाधान वाटते.
- मोईन खान, सेवेकरी.

मोईन खानबद्दल परिसरातील रहिवाशांमध्ये मोठ्या आदराची भावना आहे. अशा व्यक्तीची समाजात आवश्यकता आहे.
- नीलेश शेलार, अध्यक्ष, भद्रकलीचा राजा गणेश मंडळ.

उर्जा आणि अध्यात्मिक अनुभव देणारे 'अण्णा गणपती नवग्रह सिध्दपिठम'

टीम ई सकाळ

लेख - सुनील शिरवाडकर

नाशिक : गणेशोत्सवाच्या निमीत्ताने आपण जाणून घेतोय नाशिक मधील गणपती मंदिरांचे विशेष महत्त्व आणि त्याला असलेला इतिहास. आज आपण जाणुन घेतोय भक्तांना दैवी उर्जा आणि आध्यात्मिक अनुभव देणारे, दाक्षिणात्य पध्दतीने बांधलेले हे 'अण्णा गणपती नवग्रह सिध्दपिठम' मंदिराचा नाशिकमधील स्थापनेचा प्रवास.

देवळाली गावाजवळुन वाहणारी वालदेवी नदी. तिच्या वळणावर पलीकडे असलेला हिरवागार निसर्गरम्य परीसर. आणि त्यातच स्थित असलेला तो विशाल गणेश. 'अण्णा गणपती' त्याचं नाव.

अण्णा गुरुजी हे दाक्षिणात्य. त्यांना गणपतीचा द्रुष्टांत झाला. आणि मग त्यांनी या गणेशाची स्थापना करण्याचे ठरविले. त्यासाठी नाशिकची निवड केली. वालदेवीच्या किनारी काही वर्षापूर्वी हे मंदिर उभे राहिले.

४२ फुट उंचीच्या या विशाल गणेश मुर्तीची चार दिशांना चार मुखे आहेत. ही चार मुखे म्हणजे सुख, शांती, आयुष्य आणि आरोग्य यांची प्रतिके आहेत. मागील दोन हातात पाश आणि अंकुश हि आयुधे आहेत, तर पुढील दोन हातांपैकी एक गुडघ्यावरुन खाली सोडलेला. आणि दुसरा हात वरदहस्त! अर्थात आशिर्वाद देणारा आहे.

हेही वाचा: दगडी मोदकाचा प्रसाद देणारे बाप्पा "मदन मदोत्कट"

गणपतीची मुर्ती विराट असल्याने त्याचे मंदिर नाही. ती प्रशस्त मोकळ्या जागेवर आहे. त्याच्या सभोवर मात्र लहान लहान मंदिरे आहेत. त्यात मुख्यत्वे आहे नवग्रहांची नऊ मंदिरे. भगवान दत्तत्रेयांचे मंदिर आहे. अक्कलकोट स्वामींचे आहे.

एका बाजूला भगवान शंकर आहे. पार्वती माता आहे. आणि कार्तिकेय सुद्धा आहे. एका प्रकारे भगवान शंकराचा परीवारच येथे आहे.

जेंव्हा येथे शिवलिंग स्थापना झाली, तेव्हा सव्वा लाख लिटर दुधाचा अभिषेक त्यावर करण्यात आला. तसेच जवळपास एक कोटी रुद्राक्ष त्याला अर्पण करण्यात आले. सध्या अण्णा गुरुजींच्या वतीने आलेल्या भाविकांना हे प्रसादरुपी रुद्राक्ष अर्पण करण्यात येतात.

परंतु सध्या मंदिरे बंद आहेत. पण तरीही त्या बाजुला गेलात तर दुरुनही या विशाल अण्णा गणपतीचे दर्शन होऊ शकते. आपल्या भक्तांना दैवी उर्जा आणि अध्यात्मिक अनुभव देणारे, दाक्षिणात्य पध्दतीने बांधलेले हे 'अण्णा गणपती नवग्रह सिध्दपिठम' नाशिककरांचे नवीन श्रध्दास्थान आहे.

 

सिंधुदुर्ग किल्ल्यातील गणेशोत्सवाचा इतिहास

सकाळ वृत्तसेवा

कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणातील लोक उत्सवप्रिय मानले जातात. ऋण काढून सण करण्याचीही इथे परंपरा आहे. एकूणच इथले सर्व सण पाहता त्यातील सर्वात मोठा व महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव होय. घराघरात साजरा केला जाणारा गणेशोत्सव आता कोकणातही सार्वजनिक स्वरूपात पुढे येतो हे खरे असले तरी अगदी लोकमान्य टिळकांनी पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी म्हणजे 1695 मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर राजाराम महाराजांनी सार्वजनिक स्वरूपात गणपती पुजला होता. अर्थात राजाराम महाराज व लोकमान्य टिळक या दोघांचेही उद्देश वेगळे होते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीतील जनजागृतीसाठी हुशारीने या उत्सवाचा वापर केला, तर राजाराम महाराजांनी आपल्या ताफ्यातील सैनिकांनाही या उत्सवात सहभागी होता यावे यासाठी हा उत्सव सुरू केला. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील उत्सवाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर हिंदू व मुस्लिम समाजाची 18 घरे आहेत. सध्या किल्ल्यावर 18 पैकी सहा घरांमध्ये गणपती पूजन केले जाते; मात्र या सर्वात सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या मंदिरात बसविल्या जाणाऱ्या गणपतीला ऐतिहासिक महत्त्व आहे. अगदी 16 व्या शतकात हा गणपती बसवला गेला. शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूस हा गणपती बसवला जातो. पाच दिवसांनी त्याचे विसर्जन केले जाते. या काळात मंदिराचे पुजारी त्याची विधिवत पूजा करतात. गेली बरीच वर्षे हा गणपती मालवणमधील वायंगणकर बंधूंच्या मूर्तिशाळेत तयार होतो. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी ही मूर्ती वाजतगाजत किल्ल्यावर नेली जाते. होडीतून मूर्ती नेण्याची प्रथा आजही अबाधित आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे हे भारतातील एकमेव मंदिर आहे आणि या मंदिरातील गणेशोत्सवास वेगळे स्थान आहे; मात्र याच काळात इतरत्रही गणेशोत्सव साजरे होत असल्याने तसा किल्ल्यावरील गणेशोत्सव सध्या दुर्लक्षितच आहे. या दरम्यानच्या काळात किल्ल्यावर पर्यटकांची गर्दीही कमी असते. दरम्यान, हा गणेशोत्सवाची पाच दिवसांनी सांगता केली जाते. ही विसर्जनाची जागाही पूर्वांपार ठरलेली आहे. समुद्रात एक दगड आहे. या दगडाला स्थानिक लोक धरणांचा दगड असे म्हणतात. याच भागात मूर्ती विसर्जन केले जाते.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील या सार्वजनिक गणेशाची पूजा सकपाळ कुटुंब करते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेवढ्याच भक्तिभावाने या मूर्तीची पूजा मुस्लिम बांधवही करतात. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील गणेशोत्सवालाही तशीच ऐतिहासिक किनार आहे. त्यामुळेच हा गणेशोत्सव महत्त्वपूर्ण आहे.

 

गणेशाची साडेतीन पीठे

                      आपल्या महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे म्हंटली की प्रामुख्याने  देवीची शक्तिपीठे आठवली जातात . मात्र आपल्या महाराष्ट्रात गणपतीची देखील शक्ती पीठे आहेत . सध्याच्या गणेशोत्सवाच्या  काळात त्यांची माहिती करून घेउया .या साडेतीन गणपतीच्या दर्शनाने मोठे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे . भगवान गणपतीने मयूरेश्वराच्या वध केला असता त्याचे शरीर ज्या ज्या ठिकाणी पडले  त्या त्या  ठिकाणी ही पुण्यक्षेत्रे निर्माण झाली अशी कथा सांगितली जाते . 
                               मोरगाव - 'भूस्वानंदपूर ' म्हणजेच आजचे प्रचलित 'मोरगाव'. गाणपत्य सांप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे. ब्रम्ह, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ॐकार स्वरूपी गणेशाची तिथे स्थापना केली. उन्मत्त सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमलासूर याचाही वध श्री गणेशाने केला. कमलासूराचे शीर  जमिनीत गाडून त्याच्यावर तो आरूढ होऊन बसला. आजही त्याचे प्रतिक म्हणून विजयादशमीच्या दिवशी मोठा   उत्सव होतो. येथे गणेशापुढे नंदी आहे हे याचे वैशिष्ठ्य.   पुण्यापासून ५२ कि.मी. वर मोरगाव क्षेत्र आहे.पुणे ते मोरगाव एस.टी. आहे. 

राजूर - राजूर म्हणजेच पूर्वीचे राजापूर. वरण्य राजाचा राजवाडा या भागात होता. वरण्य राजाला श्री गणेशाने 'गणेशगीता' सांगितली.  कृष्णाच्या तोंडून म्हणजेच प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून अर्जूनाने गीता ऐकली. तद्वत साक्षात गणेशाने आपल्या मुखातून वरण्य राजाला गणेशगीता सांगितली. त्यामुळे गाणपत्य सांप्रदायात या स्थानाला  फार महत्व आहे. राजा वाराण्याने प्रतिष्ठापना केलेल्या या क्षेत्राला राजूरचा 'महागणपती' म्हणतात.  मराठवाड्यातील जालन्यापासून २२ कि.मी. वर हे क्षेत्र आहे. राजूर गावानजीक एका टेकडीवर हे गणेश मंदिर असून येथे वरण्य राजाची मूर्ती आहे. या ठिकाणाला गड म्हणतात. हा गणपती नवसाच्या सामाईला पावतो. येथील मूर्तीपुढे अंदाचे सव्वाशे समया तेवत असतात. शेकडो सामायांतील ज्योतींच्या मंद व मंगल प्रकाशात हि मूर्ती फारच विलोभनीय दिसते. पराशर ऋषींच्या आश्रमातून श्री गणेशाला वरण्य राजाने चैत्र शु.प्रतिपदेला राजूर,राजापूर येथे आणले. म्हणून गुढीपाडव्याला या गणेशाचे दर्शन घेणे हि पर्वणी मानली जाते. 
 पद्मालय - येथे दोन गणेश मूर्ती आहेत. महान दत्तभक्त सहस्त्रार्जुनाने स्थापन केलेला 'प्रवाळ गणेश' आणि त्याच्या शेजारी शेषाने स्थापन केलेला 'धरणीश्वर गणेश'. यातील गणेशाची मूर्ती एक उजव्या सोंडेची व दुसरी डाव्या सोंडेची आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावापासून ८ कि.मी. वर पद्मालय आहे. हे मंदिर डोंगरावर असून तेथील तलावात विविध प्रकारची पद्म कमले फुलतात. म्हणून या क्षेत्राला 'पद्मालय' असे नाव पडले.     समुद्रामान्थानाच्या वेळी शेष समुद्रतळाशी होता. अमृत कुंभ देवांना आपल्यामुळे मिळाला असा अहंकार त्याला निर्माण झाला. त्याचा अहंकार पाहून संतप्त होऊन शिवाने त्याला खडकावर आपटले. त्याच्या डोक्याचे दहा तुकडे झाले. नारदाने त्याचे सांत्वन करून त्याला गणेश उपासना करावयास सांगितले. त्यानुसार त्याने ती केली. गणेश त्यावर प्रसन्ना झाले व तू सहस्त्रवदन होशील आणि माझा सहवास तुला लाभावा यासाठी मी तुला माझ्या उदरावर धारण करीन. तसेच पृथ्वी,तू तुझ्या फण्यावर फुलासारखी तोलून धरशील असा आशीर्वाद दिला. म्हणून शेषाने स्थापन केलेल्या मूर्तीला 'धर्निश्वर गणेश' म्हणतात. 
चिंचवड - चिंचवड हे गणपती क्षेत्र पुराणोक्त नाही. महान गाणपत्य साधू मोरया गोसावीच्या मुले याला महत्वाचे स्थान प्राप्त झाले. मोरया गोसाव्यांना मोरगाव येथे करा नदीत स्नान करताना गणेश तांदळा स्वरुपात आला. तो घेऊन ते मोर्गावी वारी करीत असत.

सध्या तो तांदळा चिंचवड येथे देऊळवाड्यात आहे. मोरया गोसावींनी मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १३८३ रोजी जिवंत समाधी घेतली. 

 http://ajinkyatarte.blogspot.com/2019/09/blog-post_66.html

 गणरायाच्या प्राचीन मंदिरांच्या अनोख्या कहाण्या
    दिनांक :15-Sep-2021



 महाराष्ट्राला सांस्कृतिक प्राचीन परंपरा लाभलेली आहे. गेल्या अनेक शतकांचा प्राचीन वारसा महाराष्ट्र पुढे घेऊन जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक स्थाने ही भौगोलिक, नैसर्गिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक दृष्टीने वेगवेगळी आणि महत्त्वाची आहेत.महाराष्ट्रात अनेक जागृत, स्वयंभू देवस्थाने आढळतात. महाराष्ट्रातील अष्टविनायक हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत. तसेच विदर्भातील अष्टविनायक म्हणून ओळख असणारी गणपती मंदिरेही खूप प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश गणेशस्थाने ही स्वयंभू, जागृत असल्याचे सांगितले जाते. या सर्व मंदिराच्या कथा-कहाण्या, सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व अगदी वेगवेगळे आहे. चला तर मग जाणून घेऊया याबाबत माहिती...
 

 
'जयति गणपती' म्हणजेच कसाब गणपती
'शिक्षणाची पंढरी' म्हणून ओळख असणारे पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवतच. शिवाजी महाराजांच्या वाडा अर्थात शनिवार वाड्यालाच लागूनच कसबा गणपतीचे प्राचीन भव्य व देखणे मंदिर आहे. शहाजी राजांनी पुण्याला राजवाडा बांधला होता. जिजाबाईंच्या हस्ते कसबा गणपतीची स्थापना केली होती. या गणपती मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणून या गणपतीला 'जयति गणपती' असे म्हणतात. आधी मूर्ती अतिशय लहान होती मात्र शेंदूराने न्हाऊन निघालेली कसबा गणेशाची मूर्ती तीन फूट उंचीची झाली आहे.

 
दशभुज गणेश
कोकण आणि श्री गणेशाचे खास नाते आहे असं म्हणता येईल. गुहागरकडून तवसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच सागरी महामार्गावर हेदवी गावा नंतर दगडी बांधकाम केलेलं गणेश मंदिर दिसतं. ते म्हणजे हेदवीचे दशभुज गणेश मंदिर. हे मंदिर पेशवेकालीन असावे आणि माधवराव पेशव्यांच्या काळात ते बांधले गेले असावे असा कयास आहे. या मंदिरातील गणेश मूर्ती दहा हातांची आहे म्हणूनच या गणपतीला दशभुज गणेश म्हंटलं जातं. चक्र, त्रिशूल, धनुष्य, गदा, आशीर्वाद देणाऱ्या हातात महाळुंग फळ, कमळ, पाश, नीलकमळ, दात आणि धान्याची लोंबी अशा गोष्टी हातात दिसतात. सोंडेमध्ये अमृतकुंभ आहे. या मूर्तीची निर्मिती काश्मीर मधील पाषाण वापरून केली गेली आहे असं सांगितले जाते. अशा प्रकारची दशभुज मूर्ती केवळ नेपाळमध्ये पाहायला मिळते, असे सांगितले जाते.

 
सिद्धिविनायक महागणपती
महाराष्ट्रात मुंबईजवळील टिटवाळा गावात असलेले गणपतीचे मंदिर आहे. येथे पूर्वी कण्वऋषींचा आश्रम होता. शकुंतलेने याच महागणपतीची पूजा केली असे सांगितले जाते आणि म्हणुनच या महागणपतीस विवाहविनायक असे म्हटले जाते. हे देऊळ प्राचीन असून याची मूळ बांधणी शकुंतलेने केली असल्याची आख्यायिका आहे. हे देऊळ एका सरोवरात बांधलेले होते. कालौघात यात गाळ साचून देऊळ पूर्णपणे गाडले गेले व सरोवरही नाममात्र राहिले. माधवराव पेशवे यांच्या राज्यकाळात पडलेल्या दुष्काळादरम्यान पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी सरदार रामचंद्र मेहेंदळे यांनी या तळ्याचे उत्खनन करवले त्यादरम्यान हे देऊळ जसेच्या तसे सापडले व देवाची मूर्तीही अभंग स्वरूपात मिळाली. वसईची लढाई जिंकल्यावर माधवराव पेशव्यांनी या देवळाचे पुनरुत्थान करवले व मूर्तीची पुनर्स्थापना केली. त्याचवेळी देवळासमोर लाकडी सभामंडप बांधला. १९९५-९६मध्ये या सभामंडपाचे पुनर्नवीकरण केले गेले.


​कड्यावरचा गणपती
दापोलीहून केळशीकडे जाताना साधारण १८ किमी अंतरावर असलेल्या आंजर्ले गावात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे टेकडीवर असलेले हे श्रीगणेशाचे जागृत देवस्थान `कड्यावरचा गणपती' म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराची स्थापना सहाशे वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. १४३० च्या सुमारास केली, असावी असे मानले जाते. मंदिरातील श्री गणेशाची सुबक मूर्ती साडेतीन ते चार फुटांची असून मूर्तीच्या बाजूला कोरलेल्या प्रतिमा या ॠद्धि-सिद्धीच्या आहेत. या मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडी होते व मंदिराचा इ.स. १७८० मध्ये जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर सध्याचे मंदिर उभे राहिले आहे. हे मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे.

 
रेडीचा द्विभुज गणपती
सदानंद नागेश कांबळी हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एका मायनिंगच्या कंपनीमध्ये कामाला होता. ८ एप्रिल १९७६ रोजी एका विशिष्ठ ठिकाणी झोपले असताना पहाटेच्या सुमारास त्यांना स्वप्न पडले. सध्या मंदिर असलेल्या ठिकाणी आपली मूर्ती असल्याचा गणपतीने दृष्टांत दिला. त्यानुसार, कांबळी यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने तेथे खोदकाम सुरू केले आणि खोदताना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा भाग व कानाचा भाग आढळून आला. एका महिन्यानंतर, १ मे १९७६ रोजी गणपतीची पूर्ण मूर्ती दिसू लागली. अखंड जांभ्या दगडात कोरलेली ही मूर्ती सहा फूट उंच व तीन फूट रुंद आहे. मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. द्विभुज मूर्तीचा एक हात आशीर्वाद देत असून दुसऱ्या हातात मोदक आहे. गणपतीच्या समोर एक भला मोठा उंदीरही आहे. तोही याच खोद कामात सव्वा महिन्यांनी सापडला. द्विभुज ही गणपतीची भव्य दिव्य, आकर्षक व प्रसन्न मूर्ती सर्वच भक्तांना भाराऊन टाकते. ही गणपतीची मूर्ती पांडवकालीन असावी, असा अनेकांचा कयास आहे.
 

 
- दिप्ती राखुंडे  


https://www.tarunbharat.net/Encyc/2021/9/15/Unique-stories-of-ancient-temples-of-Ganarayana.html







 

 

विदर्भातील अष्टविनायक

 अष्टविनायक म्हटले की मोरगाव-थेउर-रांजणगाव-महड-ओझर-सिध्दटेक- लेण्याद्री-पाली ही पश्चिम महाराष्ट्रातली ठिकाणं आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात.  पुराणातील एका श्लोकामुळे महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थाने उलगडली गेली. यातूनच अष्टविनायक यात्रेला महत्त्व प्राप्त झाले.त्यांची दोन दिवसांत केलेली यात्रा, मग त्याला शास्त्रोक्त यात्रा असे जोडले गेलेले संदर्भ हे आपल्या परिचयाचे असतात. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेला निसर्गसंपन्न प्रदेश म्हणजे विदर्भ. मोठी प्राचीन परंपरा लाभलेला हा प्रदेश. 


        दंडक राजाची कर्तृत्वभूमी असलेल्या विदर्भाला 'दंडकारण्य' असे संबोधिले जाते. इतिहासाचा आणि प्राचीन शिलालेखांचा अभ्यास केल्यानंतर विदर्भातही वाकाटक साम्राज्याच्या काळापासून गणेशाची उपासना होत असल्याचा दाखला मिळातो. वाकाटक, कलचुरी अशा बलाढय़ राजसत्ता या प्रदेशी नांदल्या. त्यांच्या समृद्धीचे अवशेष आजही उत्खननामधून बाहेर येतात. विदर्भ या सर्वगुणसंपन्न अशा प्रदेशातदेखील मोठय़ा प्रमाणात गणपतीची मंदिरे आणि मूर्ती पाहायला मिळतात. गणपतींच्या २१ महत्त्वाच्या ठिकाणांपकी बरीच ठिकाणे विदर्भात आहेत. त्यातील निवडक आठ देवस्थाने मिळून 'विदर्भातील अष्टविनायक' ही संज्ञा तयार झाली. प्रवासासाठी पुरेशा संधी नसतानाच्या काळात, प्रत्येक भागात गणपतीची देवस्थाने निर्माण झाली आणि स्थलकालसापेक्ष त्यांचा विकास होत गेला. त्याचबरोबर विदर्भातले अष्टविनायकसुद्धा खास बघण्याजोगे आहेत. त्यांच्याशीसुद्धा विविध कथा, दंतकथा जोडल्या गेलेल्या आहेत. काही खास वैशिष्टय़पूर्ण मूर्ती तिथे पाहायला मिळतात. मुद्दाम वेळ काढून या गणपतींचे, त्या रम्य परिसराचे दर्शन घ्यावे. तिथल्या अष्टविनायकांचे दर्शन अमुक एका क्रमाने घ्यावे, असे काही संकेत आढळत नाहीत; परंतु शक्यतो नागपूरच्या टेकडी गणपतीपासून या अष्टविनायकांच्या दर्शनाला सुरुवात करतात. नागपूर मध्यवर्ती ठेवून या सर्व ठिकाणी आपल्या सोयीनुसार यात्रा करावी. विदर्भाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. त्याचा प्रत्यय ठायी ठायी आपल्याला येतोच.विदर्भातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने या अष्टविनायक देवस्थानांचा विकास करण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. विदर्भातील अष्टविनायकांचा घेतलेला संक्षिप्त आढावा...
 
विदर्भातील अष्टविनायक

वरदविनायक- टेकडी गणपती नागपूर

  विदर्भातील अष्टविनायकातील पहिला समजला जाणारा गणपती म्हणजे नागपूरचा टेकडी गणपती. ऐन नागपूरमध्ये असलेले हे प्रसिद्ध देवस्थान. शहराच्या मध्यवर्ती भागात टेकडीवर असलेल्या या देवस्थानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडाखाली गणेशाची शेंदूरचíचत प्रतिमा पाहायला मिळते. नागपूर हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव. प्राचीन काळापासून अगदी पुरातत्त्वीय संदर्भ आणि पुरावे नागपूरसंदर्भात उपलब्ध आहेत. ऐतिहासिक भोसले-इंग्रज लढाई ज्या सीताबर्डी परिसरात झाली तिथेच हे गणपतीचे मंदिर आज उभे आहे. रघुजी भोसले यांच्या कार्यकाळात नागपूरला राजधानीचा दर्जा मिळाला. भोसल्यांनी जुम्मा तलाव अर्थात आताच्या गांधीसागर तलावाजवळ राजवाडा बांधण्याचे काम सुरू केले. यासाठी लागणारा काळा बॅसॉल्ट दगड मिळविण्यासाठी सीताबर्डीतील टेकडीचे खोदकाम सुरू झाले. याचदरम्यान, प्राचीन हेमाडपंती मंदिराचे अवशेष आणि याच अवशेषात सध्या प्रतिष्ठापित गणेशमूर्तीही सापडल्याची मान्यता आहे. ही मूर्ती बाराव्या शतकात यादव राजांच्या कार्यकाळातील असून ती स्वयंभू आहे. गजाननाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे, हे विशेष! 


 टेकडी गणपती नागपूर














टेकडी गणपती नागपूर

      सुरुवातीला इथे अगदी साधेसुधे मंदिर होते. बुटकी भिंत आणि चार खांबांवर उभारलेले छप्पर असे याचे स्वरूप होते. परंतु आता हे एक भव्य देवस्थान झालेले आहे. मंदिराचा गाभारा म्हणजे एक मोठा हॉल असून त्यात मध्यावर झाड आणि त्याखाली गणपतीची मूर्ती आहे. सभोवती रेलिंग बसवलेले आहे. मुख्य गणपती जवळजवळ पाच फूट रुंद आणि तीन फूट उंच असून इथे फक्त गणेशाचे तोंडच दिसते. त्यालाच डोळे आणि गंध लावून पूजा केली जाते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असले तरी मूर्ती मात्र उत्तराभिमुख आहे. मोठे मंदिर, आजूबाजूला इतर लहान मोठी मंदिरे, मोठा दरवाजा, पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनांसाठी पार्किंग असे सर्व अद्ययावत सुविधांनी युक्त असे हे देवस्थान झाले आहे. गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागील भिंतीला लागून एक शिविपडी आहे. या शिवपिंडीचे वैशिष्टय़ म्हणजे इथे शिवलिंगाच्या ठिकाणी नंदी बसवलेला दिसतो.
    पहाटे साडेचारपासून विविध पूजाविधी इथे सुरू होतात. मंगळवार आणि शनिवार हे भक्तांसाठी जास्त महत्त्वाचे दिवस समजले जातात. या दोन दिवशी इथे मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. मंदिर परिसर अत्यंत रमणीय असून वड, पिंपळ आदी विविध वृक्षांची इथे मोठय़ा प्रमाणावर दाटी दिसते. त्यामुळे इथे विविध जातींचे पक्षिगण पाहायला मिळतात. इथून थोडय़ाच अंतरावर दुसऱ्या एका टेकडीवर फौजी गणपती मंदिर असून या दोघांना भाऊ-भाऊ असे म्हटले जाते.
  मंदिराची लोकप्रियता खूपच मोठी आहे. क्रिकेट विक्रमादित्य आणि राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणपती मंदिराच्या परिसरात आता मोठया प्रमाणावर विकास करण्यात आला असून सामाजिक कार्यांसाठीही देवस्थानच्या उत्पन्नाचा उपयोग करण्यात येतो. वड-पिंपळाच्या महाकाय वृक्षांनी टेकडीचा परिसर समृध्द आहे. आजवरच्या कोणत्याही शासकीय गॅझेटियरमध्ये या मंदिराचा समावेश नाही.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूर 

अठरा हातांचा गणपती-रामटेक

विदर्भाचे भूषण रामटेक हे श्रद्धास्थान.  हे गाव नागपूरहून सुमारे ४६ कि.मी. अंतरावर आहे. गणेशाचे मंदीर हे रामटेकच्या मध्यभागी आहे. त्या रामक्षेत्री सुंदर अठराभुजा गजानन असून पंचफण्यांचा शिरावर नाग सावली करीत असे. कंठभूषण नागाचे, नागपट्टीही कटीचे. विदर्भातील अष्टविनायकांपकी एक असलेल्या रामटेकच्या अष्टादशभुज गणपतीचे वर्णन हे अशा पद्धतीने केलेले आहे. मुळात रामटेक हे स्थान अनेकार्थानी प्रसिद्ध आहे. याचा संबंध थेट रामायणाशी जोडलेला आहे. वनवासात असताना रामांचा मुक्काम या ठिकाणी होता असे समजले जाते. त्याचसोबत वाकाटक या बलाढय़ राजवंशाची राजधानी असलेल्या नंदिवर्धन या नगराजवळच हे ठिकाण आहे. कविकुलगुरू कालिदास यांनी आपल्या सुप्रसिद्ध ‘मेघदूत’ या काव्याची रचना याच रामटेक इथे केली असे समजले जाते. रामटेक या ठिकाणी आल्यावर कोणीही व्यक्ती मंत्रमुग्ध होऊन जाते. सापुतारा पर्वतरांगेवर वसलेले हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य आहे. वळणावळणाचे रस्ते, डोंगरावरून वाहणारे निर्झर आणि गर्द झाडी यांनी हा प्रदेश व्यापलेला आहे. वाकाटक, परमार, यादव, भोसले या राजवटींनी या ठिकाणी विविध मंदिरे बांधली. 
 














 
विदर्भातील अष्टविनायकातील एक स्थान यातलेच एक आहे आणि ते म्हणजे अष्टदशभुजा गणपतीचे मंदिर. नागपुरातील चांदरायण कुटुंबीयांच्या पूर्वजांनी हे मंदीर बांधले असून अठराभूजा असलेले हे गणेशाचे एकमेक मंदिर असावे, असेही जाणकार सांगतात. मंदिराला तीन उत्तराभिमुख गाभारे असून तीनही गाभाऱ्यात गणपतीच्याच मूर्ती स्थापित केलेल्या दिसतात. या तीनही गाभाऱ्यांवर गणेशपट्टीच्या ठिकाणी कीíतमुखे कोरलेली दिसतात.एकाच मंदिरात विघ्नहर्त्याच्या तीन रूपांचे दर्शन होत असल्याने भाविकांना तिन्ही लोकींचा आनंद अनुभवण्यास मिळतो.
 नावाप्रमाणेच इथली मूर्ती अत्यंत वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण अशी आहे. अठरा हातांची गणपतीची मूर्ती काहीशी दुर्मीळच म्हणायला पाहिजे. पापधुपेश्वर तीर्थाकडे जाताना वाटेत गवळीपुरा इथे हे मंदिर वसले आहे. अंदाजे पाच फूट उंचीची, पद्मासनात बसलेल्या गणपतीची ही देखणी मूर्ती अठरा हातांची आहे. देवाच्या अठरा हातात पाश, अंकुश, खट्वांग, त्रिशूल अशी विविध आयुधे दाखवली आहेत. पैकी एका हातात मोदक आणि दुसऱ्या हातात मोरपंखाची लेखणी दिसते. अठरा विज्ञानाचे ज्ञान असलेला हा गणपती असल्यामुळे याला अठरा हात दाखवले आहेत, असे स्थानिक सांगतात. तर अठरा सिद्धींमुळे या गणपतीचे पूजन विघ्नेश्वर म्हणून करतात, असे पुराणात सांगितले आहे. उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे याला सिद्धिविनायक असेही म्हटले जाते. श्री गणेशाच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग आहे. गळ्यातही नाग आहे. कंबरेला नागपट्टा आहे. या प्राचीन मंदिराचा आता जीर्णोद्धार केलेला असल्यामुळे नवीन बांधकाम केलेले मंदिर आपल्याला दिसते. अठरा हातांची ही मूर्ती इथून जवळच असलेल्या रामसागर खिंडशी तलावात रघुजी भोसल्यांच्या काळात सापडली, असे इथे सांगितले जाते.ही मूर्ती अकराव्या अथवा बाराव्या शतकातली असावी. मंदिरात महागणपती आणि त्यांच्या बाजूला रिद्धी-सिद्धींच्या मूर्ती आहेत. तसेच देवी महालक्ष्मीची मूर्तीसुद्धा मंदिरात पाहायला मिळते. गणेश मंदिरासमोरच एक छोटेसे हनुमानाचे मंदिर आहे.
 या मंदिरात वर्षभर भाविकांचा राबता असतो. प्रत्येक चतुर्थीला भाविकांची मांदियाळी असते. अद्याप या मंदिरात अग्रपूजेचा मान चांदरायण कुटुंबाकडेच आहे. रामटेकच्या प्रसिद्ध शोभायात्रेची सुरुवात श्री अठराभूजा गणेश मंदिर येथूनच पूजा, आरती नंतर होते.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूरहून भरपूर आणि सतत बससेवा उपलब्ध.

वरद विनायक, केळझर,  सिद्धिविनायक एकचक्रा

विदर्भातील अष्टविनायकांपैकी तिसर्‍या क्रमांकावर असलेले वर्धा जिल्ह्यातील केळझर गाव श्री सिद्धीविनायकासाठी प्रसिद्ध आहे. साधारण सव्वा मीटर उंचीची गणेशमूर्ती शेंदूरव्याप्त आहे. मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली असून इतर बारकावे शेंदुरामुळे दिसत नाहीत. ही मूर्ती नृत्याच्या मुद्रेत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. नागपूर-वर्धा राष्ट्रीय महार्माग क्रमांक 3 वर वर्धा जिल्ह्यात केळझर देवस्थान असून मोगलांच्या काळात या गावाला विशेष महत्त्व आले. गोंड राजा कोकशाहकडून खंडणी वसूल करण्यासाठी मोगलांच्या सैन्याचे मुख्यालय केळझरमध्ये असल्याचे संदर्भ ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आढळतात.केळझर गावाची प्राचीनता महाभारतकालीन आहे, असे म्हणतात.
         रामायण आणि महाभारत हे प्रत्येक भारतीयाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. अनेक स्थाने, अनेक गावे यांचा संबंध रामायण आणि महाभारताशी जोडला गेलेला आढळतो. त्यातूनच तयार होतात अनेक कथा, उपकथा, दंतकथा आणि मग त्या विशिष्ट स्थानाचे महत्त्व अजून उजळून निघते. एकचक्रा हे नावसुद्धा पांडवांशी संबंधित आहे. बकासुर नावाच्या राक्षसाचा भीमाने वध केला आणि याच एकचक्रा गावातील लोकांची त्या राक्षसाच्या तावडीतून सुटका केल्याची कथा सर्वपरिचित आहे. एकचक्रा नावाचे अजून एक गाव पश्चिम बंगालमध्ये असून पांडवांनी बकासुराचा वध त्याच एकचक्रानगरीमध्ये केला असेही सांगितले जाते.














नागपूर-वर्धा रस्त्यावर सुमारे २५ कि.मी. अंतरावर केळझर किल्ला आहे. या केळझर किल्ल्यावरच हे प्राचीन गणेशाचे देवालय वसले आहे. स्थानिक याला पांडवकालीन गणेशस्थान असेही म्हणतात. पांडवांनी बकासुर वधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रानगरी म्हणून ओळखले जायचे. अर्थातच या गणेशालासुद्धा एकचक्रागणेश असे म्हणतात. केळझरच्या किल्ल्यावर उंच जागेवर हे गणेश मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पुष्कर्णी आहे.  ही पुष्कर्णी चौकोनी असून दगडांनी भक्कम बांधलेली आहे. विहिरीतील पाण्यापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधून काढल्या आहेत. रस्त्याच्या दक्षिणेकडे एक तलाव आहे. या तलावात बाहुबलीची काळ्या दगडाची एक मूर्ती सापडली होती.गणेश मंदिरातील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची असल्यामुळे याला सिद्धिविनायक असे म्हणतात. भाद्रपद आणि माघी चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो. मंदिराजवळच धर्मशाळा बांधलेली आहे.अलीकडच्या काळापर्यंत गणेशाच्या मंदिरात रेडयाचा बळी देण्याची प्रथा सुरू होती. मात्र आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. 
 जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : वर्धा, बडनेरा, अमरावती, नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूर, वर्धा, यवतमाळहून सतत बससेवा उपलब्ध.

 भृशुंड, मेंढा (जिल्हा-भंडारा) –

भंडारा शहरापासून 61 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महार्माग क्रमांक 6 वर मेंढा हे उपनगर आहे.  तेथे घुमटीत गणेश प्रतिमा आहे. या भागाचे प्राचीन नाव शांडिल्यग्राम असल्याचा उल्लेख आढळतो. वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराचा इतिहास काही दुर्मीळ पुस्तकांमध्ये आढळतो.गणेशमूर्ती साधारण अडीच मीटर उंच आणि दीड मीटर रुंद असून तिला ॠषि-मुनींप्रमाणे दाढीमिशा असल्याचे दिसते. मूर्तीवर भरपूर शेंदूर असल्याने बारकावे दिसत नाहीत. उंदरावर गणेश वामललितासनात विराजमान असून सोंड उजव्या बाजूला वळलेली आहे. पायाशी नागाचे वेटोळे, त्यावर गणेशाचे वाहन उंदीर आणि त्यावर हा गणपती विराजमान झालेला आहे. मूर्ती चतुर्भुज असून, एक हात वरद मुद्रेत तर इतर हातात अंकुश, पाश आणि मोदकांनी भरलेले पात्र दिसते. मूर्तीच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग शिल्पित केलेला दिसतो. नेसलेले वस्त्र, जानवे कंबरपट्टापण दिसतो. मंदिराच्या आवारात एका चौथऱ्यावर अंदाजे आठ फूट उंचीची मारुतीची मूर्ती आहे. शिवाय परिसरात अनेक समाध्या दिसतात.
 
     
 










      या गणपतीला भृशुंडगणपती हे नाव कसे मिळाले याबद्दल एक सुंदर कथा आपल्याला गणेशपुराणात मिळते. नामा कोळी लोकांना त्रास देत असे. तो या परिसरात वाटमारी करीत असे. एकदा तो गणेशतीर्थ या ठिकाणी अंघोळीला गेला असता मुद्गल ऋषी तिथून चालले होते. ते तोंडाने गजानन गजानन असे नामस्मरण करीत होते. नामा कोळ्याने त्यांना मारण्यासाठी आपली तलवार उपसली आणि तो आता वार करणार एवढय़ात ती तलवार गळून जमिनीवर पडली. नामा कोळ्याला पश्चात्ताप झाला आणि आपली पापे धुण्यासाठी काय करावे याची याचना त्याने मुदगल ऋषींकडे केली. मुदगल ऋषींनी त्याला सांगितले की ते परत येईपर्यंत नामा कोळ्याने श्री गणेशाय नम: असा जप सुरू करावा. तसेच त्यांनी एक वाळकी काठी दिली आणि तिला रोज पाणी घालायला सांगितले. जेव्हा त्या काठीला पालवी फुटेल तेव्हा मी परत येईन, असे आश्वासन मुद्गल ऋषींनी दिले. नामा आता मंत्राचा जप करू लागला. अनेक वष्रे अशीच गेली आणि मुदगल ऋषी तिथे परत आले. त्यांना त्या काठीच्या जागी एक भलामोठा वृक्ष आणि एक मुंग्यांचे वारूळ दृष्टीस पडले. वारुळातून श्री गणेशाय नम: असा आवाज येत होता. ऋषींनी ते वारूळ बाजूला करून पाहिले तर त्यांना नामा कोळी नामस्मरण करताना आढळला. तो गणेशसाधनेत इतका गणेशमय होऊन गेला होता की त्याला नाकाच्या ठिकाणी गणपतीप्रमाणे सोंड फुटली होती. मुदगल ऋषींनी त्याचे तप आणि त्याची सोंड पाहून त्याचे नामकरण भृशुंड ऋषी असे केले. या भृशुंड ऋषींनीच इथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. मुदगल ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला की आणि जो कोणी या ठिकाणी दर्शनाला येईल त्याला सर्व शक्ती प्राप्त होतील असे सांगितले.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूर आणि भंडाऱ्याहून सतत बससेवा उपलब्ध.

 शमी विघ्नेश -आदासा

नागपूर शहरापासून आदासा मंदिर नागपूर ते कळमेश्वर महामार्गावर असून अंदाजे ४० किमी.अंतरावर आहे.नागपूर - छिंदवाडा लोहमार्गावर पाटणसावंगी या स्थानकापासून १२ कि.मी. अंतरावर आदासा हे क्षेत्र आहे.  तसेच कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडय़ापासून ४ कि.मी.वर असलेल्या एका उंच टेकडीवर हे पुरातन गणेश मंदिर असून मंदिर पूर्वाभिमुख आहे. पुराणात उल्लेखित या क्षेत्राचे प्राचीन नाव म्हणजे ”अदोष क्षेत्र”. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील आदासा गाव जवळ उंच पर्वतावर विघ्नहर्त्याचे प्राचीन मंदिर आहे. आदासा हे क्षेत्र अतिप्राचीन असून या क्षेत्राची महिमा वामन पुराणात आढळून येते. येथील गणपतीची प्रतिमा ही प्राचीन असून वामनाने ही मूर्ती स्थापित केल्याचा उल्लेख वामन पुराणात दिसून येतो. येथील गणपती हा ”शमी विघ्नेश वक्रतुंड गणपती” नावाने प्रसिद्ध आहे.मंदिरात गणेशाची भव्य अशी मूर्ती दृष्टीस पडते. या गणपतीच्या मूर्तीला ‘शमी विघ्नेश’ म्हणतात. ती महाराष्ट्रातील सर्वांत उंच गणेशमूर्ती आहे ही जवळपास ६ मीटर उंच आहे. मूर्तीवर शेंदुराचे लेपन मोठय़ा प्रमाणावर असल्यामुळे मूर्तीची वैशिष्टय़े समजत नाहीत. परंतु ही मूर्ती नृत्यगणेशाची आहे असे अभ्यासक सांगतात. मूर्ती नृत्याच्या मुद्रेतील असून संधारा प्रकारची आहे.ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती वाटते. या गणेशमंदिराचे बांधकाम पाषाणाचे आहे. या परिसरात महादेव, भैरव आणि हनुमंतासह इतर दैवतांचीही मंदिरे आहेत. त्यासोबतच, काही बांधकामांचे भग्नावशेषही परिसरात विखुरलेले आहेत. येथील शंकराच्या मंदिरात असलेली पिंड दक्षिणाभिमुख आहे. इतर पिंडी उत्तराभिमुख असतात. परिसरात बारा ज्योतिर्लिंगही मांडण्यात आले आहेत.  स्थानिक हस्तकलांची आणि इतर उत्पादनांची बाजारपेठ मंदिर परिसरात तयार झाली आहे.गणेश पुराणात वर्णन केलेल्या मूर्तीपैकी ही एक आहे.वामन पुराणात या गावाचे नाव अदोष क्षेत्र असे आढळते. गाणपत्य संप्रदायाच्या भाविकांसाठी या स्थानाचे विशेष महत्त्व आहे. 
 
 शमी विघ्नेश गणपती, आदासा
       याबद्दलची कथा अशी की महापाप, संकष्ट आणि शत्रू या तीन दानवांनी जगाला त्राही त्राही करून सोडले होते. या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी शंकर-पार्वतीरूपी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली गणेशाची आराधना केली. तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रकट झाला आणि त्याने त्या तीनही दानवांचा संहार केला. ज्या स्थळी ही कथा घडली त्या ठिकाणी मुदगल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थान केली. तेच हे अदोष क्षेत्र.






















        या ठिकाणाची दुसरी कथा अशी की प्राचीन कथे नुसार राजा बळीने इंद्र पद प्राप्त करण्या साठी  १०० यज्ञा चा  संकल्प केला. या साठी राजा बळीने सत्कार्य आणि अटल भक्ती केली. राजा बळीच्या इंद्रपद प्राप्त करण्या साठी सुरु असलेल्या यज्ञाची माहिती जेव्हा देवलोकात पसरली तेवा सगळे देव चिंतीत झाले. राजा बळीच्या हे यज्ञा चा विध्वंस करण्या करिता भगवान विष्णूने वामन अवतार घेतला व स्वताला शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी भगवान विष्णूने वामन अवतारात याचा अदोष क्षेत्रात भगवान गणेशाची आराधना केली. पुढे याच भगवान गणेशाच्या कृपेने वामनाने राजा बळीचा विध्वंस केला. भगवान गणेशाने दिलेल्या वरदान मुळे वामनाने राजा बळीचा विधवंस केला म्हणून वामनाने या ठिकाणी वक्रतुंड नावाने गणपतीची मूर्ती स्थापित केली. आज जी आपल्याला या ठिकाणी दिसते ती मूर्ती तीच आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून हे क्षेत्र वामनवरद वक्रतुंड क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले.
  मंदिर टेकडीवर वसलेले असल्याने तेथून आजूबाजूचा परिसर नयनरम्य दिसतो. गणेशाच्या २१ स्थानांपकी हे एक जागृत गणेश स्थान आहे. इथे माघ शुद्ध चतुर्थीला मोठा उत्सव असतो. अविवाहित लोकांची या गणेशाच्या उपासनेने लग्न जमतात असे मानले जाते.मंदिर व्यवस्थापनाने अतिशय नीटनेटकी अशी इथली व्यवस्था केलेली दिसते. पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, पूजा-प्रसादाची वेगळी व्यवस्था, नारळ फोडण्यासाठीचे यंत्र अशा अद्ययावत सोयी भक्तांसाठी इथे केलेल्या आढळतात.जवळच असलेले 'प्रति पंढरपूर' अर्थात धापेवाडा क्षेत्र आणि ताजुद्दीन बाबांचे वाकी क्षेत्रही पर्यटकांमध्ये विशेष प्रसिध्द आहे.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूरहून भरपूर आणि सतत बससेवा उपलब्ध.

 चिंतामणी गणेश -कळंब

भक्तांच्या सर्व चिंतांचे हरण करणारा चिंतामणी वसला आहे नागपूर-यवतमाळ राज्य महार्माग क्रमांक 3 वर कळंब या गावी. प्रसिद्ध एकवीस गणपती क्षेत्रांपकी एक पीठ असलेले प्राचीन कदंबपूर म्हणजेच आजचे कळंब होय. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर आहे. कळंब गावचे प्राचीन नाव कदंबसारक किंवा कदंबगिरिग्राम असल्याचे उल्लेख वाकाटक नृपती प्रवरसेन दुसरा याच्या ताम्रपटात आलेले आहेत. कदंब ऋषींचा सुद्धा या स्थानाशी संबंध जोडला जातो.













विदर्भातील अष्टविनायक | चिंतामणी गणेश मंदिर, कळंब
    इथले गणपती मंदिर काहीसे निराळे आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे ३५ फूट खोल आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारातून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते. या कुंडाला गणेशकुंड असे म्हणतात. यातून सुमारे दर १२ वर्षांनी आपोआप पाणी वर येते. हे कुंड गणपतीने अंकुशाच्या प्रहाराने तयार केले तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली असल्याचे मानतात.त्याचे पाणी औषधी असल्याचे सांगतात. कोणतेही त्वचारोग त्या पाण्याने दूर होतात, असे इथे सांगितले जाते. गणेश कुंडाच्या समोरच मुख्य गाभार६यात देवेंद्रवरद श्री चिंतामणीची दक्षिणाभिमुख मूर्ती आहे. ही श्री गणेशाची जगातील एकमेव दक्षिणाभिमुख मूर्ती असल्याचे मानले जाते. तीन जिने उतरून आपल्याला तिथे जावे लागते. मूर्तीवर खूप मोठय़ा प्रमाणात शेंदूर साचलेला असल्यामुळे मूर्तीची वैशिष्टय़े समजत नाहीत. जवळच एक चौकोनी पावनकुंड असून या ठिकाणी एक निसर्गनवल पाहायला मिळते. इथे जमिनीखाली पाण्याचे प्रवाह आहेत. त्या पाण्याची पातळी वाढायला लागून या गाभाऱ्यात पाणी साठू लागते आणि गणेशमूर्तीच्या पायाला पाणी लागले की पुन्हा ते ओसरते. असा प्रसंग बारा वर्षांतून एकदा घडतो.

     जवळच असलेल्या एका छोटय़ा गाभाऱ्यात शिविलग प्रस्थापित केलेले आहे. तसेच वरच्या पातळीत काही प्रतिमा कोरलेल्या दिसतात. एका खांबावर चारही बाजूंनी गणेश प्रतिमांचे अंकन केलेले पाहायला मिळते. मंदिरासमोर उभारलेल्या ध्वजस्तंभाचा हा अवशेष असल्याचे जाणवते.
लोककथा
     ब्रह्मदेवाने एक लावण्यवती स्त्री निर्माण केली, तिला आपली मुलगी मानले. त्याने या मुलीचे नाव अहल्या ठेवले. अहल्येच्या लावण्याने देव, दानव, मानव, यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग वगैरे सगळेच मोहित झाले होते. अहल्येचा विवाह करावा असे जेव्हा ब्रह्मदेवास वाटले तेव्हा त्याने एक पण जाहीर केला त्यानुसार जो कोणी प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्यालाच अहल्येशी विवाह करता येणार होता. पण ऐकून सारेच पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. हा पण आर्यवर्तातल्या महर्षी गौतम यांच्या कानावरही आला. त्यांनी प्रसूत होणाऱ्या आश्रमातील गायीस प्रदक्षिणा घालून ब्रह्मदेवाकडे शास्त्राप्रमाणे अहल्येची मागणी केली. ब्रह्मदेवाने शास्त्राधार मान्य करून महर्षी गौतम यांना आपली कन्या प्रदान केली.
     पृथ्वी प्रदक्षिणेसाठी गेलेल्या मंडळीतील देवराज इंद्र सर्वप्रथम परत आल्यावर त्याला अहल्येच्या विवाहाची बातमी कळली. पण विवाह झाला असल्याने काही उपाय नव्हता. अहल्येच्या लावण्याने इंद्र घायाळ झाला होता. महर्षी गौतम आपल्या आश्रमात नाहीत असे पाहून इंद्राने गौतमाचा वेष धारण करून अहल्येशी दुराचार केला. महर्षी गौतम यांना हे कळताच त्यांनी इंद्राला महारोगी होण्याचा शाप दिला. इंद्राने महर्षी गौतम यांची क्षमा मागितल्यावर गौतम ऋषींनी गणेश षडाक्षर मंत्राचा उपदेश इंद्रास केला आणि विदर्भात करंब (कळंब) येथे जाऊन श्री चिंतामणीची तपश्चर्या करण्यास सांगितले. इंद्राच्या तपश्चर्येने श्री गणेश प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या अंकुशाने एक कुंड निर्माण केले. या कुंडातील पाण्याने स्नान करून इंद्राचा रोग नाहीसा झाला. तेव्हापासून या पाण्याने पापक्षालन होते असे मानतात. स्नान झाल्यावर इंद्राने तेथेच गणेशाची स्थापना केली आणि गणेश अभिषेकासाठी स्वर्गातून गंगेला पाचारण केले आणि तिला आदेश दिला की दर १२ वर्षांनी तिने पृथ्वीवर येऊन श्री गणेशाच्या पायाला स्पर्ष करून जावे. तेव्हापासून दर १२ वर्षांनी कळंबच्या मंदिरातील कुंडातून गंगा वर येते आणि देवाच्या चरणांना स्पर्श करून निघून जाते. हे दृश्य पाहण्यासाठी मंदिरात लाखो लोक जमतात.
        गेल्या शतकात सन १९१८, १९३३, १९४८, १९५८, १९७०, १९८३ आणि १९९५ या वर्षी मंदिरातील कुंडातून गंगा अवतरली आहे.मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर असलेल्या सभामंडपाची निर्मिती बालगंधर्व यांनी केली आहे. यवतमाळ येथे झालेल्या एका कार्यक्रमाची संपूर्ण मिळकत त्यांनी या कामी खर्च केली.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : वर्धा, बडनेरा, अमरावती, नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूर, वर्धा, यवतमाळहून सतत बससेवा उपलब्ध.
 
​पंचमुखी गणपती ( सर्वतोभद्र )  पवनी
      भंडारा जिल्ह्यात वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या भंडारा शहरापासून 50 आणि नागपूरहून 87 किलोमीटर अंतरावर असलेल्या पवनी गावात असलेला हा गणपती म्हणजे विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आगळावेगळा गणपती म्हणायला हवा. इथे गणपतीची मूर्ती नसून, त्याऐवजी मंदिरात एक उभा पाषाण आहे आणि त्याला पाच बाजूंनी पाच तोंडे आहेत. हा एक स्तंभ आहे. यास गणेशपट्ट असेही म्हणतात. येथे राहणार्‍या श्री भट यांचे घरासमोर ओसरीमध्ये हा सुमारे ९० सेंटीमीटर. उंचीचा स्तंभ आहे. याचे चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत. तर कर्णछेदरेषेवर पाचवी प्रतिमा आहे. मूर्तीवर शेंदुराची खोळ असल्याने बारकावे स्पष्ट दिसत नाहीत.याच्या सर्व बाजूंनी गणपतीची तोंडे असल्यामुळे कोणत्याही बाजूने याचे दर्शन घेता येते. सर्व दिशांनी किंवा सर्व बाजूंनी ज्याचे दर्शन घेता येते तो सर्वतोभद्र किंवा अशा मूर्तीला सर्वतोभद्र मूर्ती असे म्हटले जाते.याला सर्वतोभद्र गणपती, भद्रा गणपती, पंचानन, विघ्नराज अशा विविध नावांनी संबोधले जाते. 
  








 केवळ विदर्भाच्याच नव्हे, तर सर्ंपूण महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात प्राचीन स्थळ असा लौकिक असलेले पवनी हे स्थळ आहे. पवनी गावाभोवती तटबंदी बांधलेली दिसते. शहराच्या उत्तर दिशेला वैनगंगा नदी वाहते. इतर दिशेला दगडी तटबंदी आहे.परिसरातील इतर गावांसाठीची एक महत्त्वाची व्यापारी पेठ, असे या गावचे महत्त्व आहे.गावाच्या मध्यवर्ती भागात घरगुती वाटावे असे गणेशाचे मंदिर असून, त्यात ही गणपतीची मूर्ती प्रस्थापित केलेली दिसते. मंदिराच्या समोर एक गरुडखांब आहे. बांधकामात कोकणातल्यासारखे इथे चिरे वापरलेले दिसतात. हे मंदिर पालांदूर गावच्या श्रीहरिस्वामी जोशी यांनी बांधल्याचे सांगतात.या मंदिराची मालकी गेल्या १३ पिढय़ांपासून भट कुटुंबाकडे आहे. या मंदिराशिवाय पवनी गावात विविध ठिकाणी इतर दैवतांची मंदिरेही असून पुरातत्त्व अभ्यासकांसाठी हे एक आकर्षणाचे केंद्र आहे. सम्राट अशोकाच्या शासनकाळात बांधलेला आणि ह्युआन त्सँगच्या पुस्तकात उल्लेख असलेला स्तूपदेखील अभ्यासनीय आहे.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूर आणि भंडारा येथून सतत बससेवा उपलब्ध.

वरदविनायक गौराळा-भद्रावती

        चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावाजवळील गवराळा येथील असलेले एक मंदिर. हे गाव भद्रावतीहून सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे.नागपूरपासून भांदक (प्रचलित नाव भद्रावती) 130 किलोमीटर अंतरावर आहे. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील भद्रावती म्हणजे भांदक या ठिकाणी विदर्भातल्या अष्टविनायकांपकी एक असलेला वरदविनायक एका टेकडीवर वसलेला आहे. हे मंदिर असलेली टेकडी पूर्वी गायींना चरण्यासाठी राखीव होती म्हणून या ठिकाणाला गौराळा असे नाव पडले. या संपूर्ण परिसराला प्राचीनतेचा स्पर्श लाभलेला आहे. वाकाटक या बलाढय़ राजवटीखाली असलेला हा प्रदेश मोठा समृद्ध होता. तत्कालीन स्थापत्याचे जे काही अवशेष आज पाहायला मिळतात त्यात या ठिकाणाचा समावेश होतो. टेकडीवर चढत असताना वाटेत काही भग्न मूर्ती पाहायला मिळतात. याच टेकडीच्या मागच्या अंगाला एक गुहा खोदलेली असून त्यात काही सुंदर शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात. त्यात गणपती, शेषशायी विष्णू, त्रिविक्रम या मूर्ती आहेतच, परंतु तिथेच दोन मीटर उंचीची केवल नरसिंहाची सुंदर मूर्ती कोरलेली दिसते. ही मूर्ती पाहून रामटेक इथल्या नरसिंहाच्या मूर्तीची आठवण होते.

         गणपती मंदिराला १६ खांब असलेला भव्य सभामंडप आहे. गणपती मंदिर आणि मूर्ती दोन्ही उत्तराभिमुख आहेत. मुख्य गाभारा काहीसा खालच्या पातळीत असल्यामुळे काही पायऱ्या उतरून प्रवेश करावा लागतो. आत अंदाजे आठ फूट उंचीची गणेशाची बसलेल्या स्थितीतली मूर्ती आहे. उजवा पाय मुडपून जमिनीवर आहे तर डावा पाय दुमडून शेजारी उभ्या स्थितीत दिसतो. देवाला दोनच हात असून दोनही हातात मोदकपात्र दिसते. गणपतीच्या पोटात काही धन असेल असे वाटल्यामुळे काही चोरांनी त्याची नासधूस केली होती. आता ते पूर्ववत केलेले आहे. गणपतीच्या मस्तकाभोवती प्रभामंडळ कोरले असून त्यावर मुकुट कोरलेला दिसतो. प्रसन्न अशी गणपतीची मूर्ती आणि हा सगळाच परिसर आवर्जून पाहावा असा आहे.हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली पद्धतीचे आहे.मंदिराचे बांधकाम १२व्या शतकातले वाटते, पण मूर्ती त्याहून प्राचीन असावी










      काही वर्षांपूर्वी मंदिर कोसळले आणि पुरातत्त्व विभागाच्या वतीने पुन्हा त्याची उभारणी करण्यात आली. अडीच मीटर उंच आणि 1.10 मीटर रुंदीच्या या मूर्तीवरही शेंदुराचे थर असून मंदिर परिसरात मोठया संख्येने प्राचीन मूर्तींचे अवशेष आढळून आले आहेत. त्यापैकी काही नागपूरच्या संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. मूर्तीच्या दोन्ही हातात मोदकपात्रे आहेत. ही मूर्ती वाकाटकांच्या काळातील असावी, असा अंदाज आहे.
या ठिकाणाशी एक पौराणिक कथा निगडित आहे. गृत्समद ऋषींचा, ते इंद्र आणि मुकुंदा नावाची ऋषीपत्नी यांचा अनौरस पुत्र आहेत असे हिणवून अपमान केला गेला. त्यामुळे उद्विग्न होऊन ऋषी या ठिकाणी कठोर तपश्चय्रेला बसले. श्रीगणेश त्यांना प्रसन्न झाला आणि त्यांच्यावरील सर्व किटाळ दूर केले. ऋषींनी त्याप्रीत्यर्थ या ठिकाणी ही वरदविनायकाची प्रतिमा प्रस्थापित केली, असे वर्णन गणेशपुराणात केलेले आहे.भांदक अर्थात भद्रावती ही प्राचीन नागरी असून इथे झालेल्या विविध उत्खननामधून अनेक पुरातत्त्वीय अवशेष, विविध मूर्ती मिळालेल्या आहेत.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : वर्धा, चंद्रपूर, बल्लारशा, नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूर, वर्धा, वरोरा आणि चंद्रपूरहून सतत बससेवा उपलब्ध.
संदर्भ :-
१)  https://maharashtratimes.com/astro/religion-festival-news/know-about-ashtavinayak-of-vidarbha-and-its-significance-and-history/articleshow/75820847.cms
२)  https://www.loksatta.com/lokprabha/vishesha/ganpati-temple-in-vidarbha-1298147/
३)  https://www.bhampak.com/ashtavinayak-in-vidarbha/
४)  https://www.discovermh.com/ashtavinayak-in-vidarbha/
५) https://www.evivek.com/Encyc/2016/12/19/VIDHRABHATIL-GANPATI.html














9850339240

 

 


 

 

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...