माळशेज घाट कोकणातून जिथे सुरू होतो तिथे सावर्णे हे छोटेखानी आदिवासी खेडेगाव आहे . या गावातून दरीमध्ये काळू नदीच्या काठावर थिदबी व पलिकडे धाकटी थिदबी अशी पन्नास उंबऱ्याची गावं आहेत. ही अगदी हरिश्चंद्रगडाच्या दक्षिण उतारावर वसलेली आहेत.काळू नदी खिरेश्वरहून झेपावते तिथून एकदिड किमी अंतरावर या वस्त्या आहेत. नुकतेच चार वर्षांपूर्वी येथे पर्यटक निवास व साहसी खेळासाठी सुविधा निर्माण केल्या आहेत. याबद्दल सविस्तर माहिती पुन्हा स्वतंत्र देईन. हायवेहून डावीकडे सावर्णे गाव आहे. या गावातून रस्ता नदीकडे जातो व पलिकडे धाकट्या थिदबीला जातो. एक रस्ता गावाकडे जाण्यापूर्वी उजवीकडे जाताना दिसतो तो थिदबी व पूढे निसर्ग पर्यटन केंद्राला जातो व पूढे धबधब्याचे पायथ्याशी जातो . याच रस्त्याला माळशेज घाटातून येणारी शिवकालीन वाट मिळते १९७७ पूर्वी घाट होण्यापूर्वी स्थानिक लोक कामधंद्यासाठी वा बाजारासाठी याच वाटेने मढच्या बाजारपेठेत जात.
काळू नदी तीव्र उताराने येत असल्यामूळे पात्रात मोठमोठ्या दगडी, रांजणखळगे, घळी आहेत. पात्र फार मोठे नसले तरी काही ठिकाणी खोल आहे व खाचखळग्यांचे आहे. सोबतच्या फोटोवरून स्पष्ट होईल. गढूळ पाणी असताना पात्र ओलांडता येत नाही. त्यामुळे धबधब्यापर्यंत सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात जाणे केंव्हाही चांगले. त्यावेळी आकाशही नीळे असते व रानफुले ही बहरलेली असतात.
शेवटचा टप्पा, इथल्या डोहात पोहु शकता
भर पावसाळ्यात नदी दुथडी भरुन वहाते.उंचावरुन धबधब्याचे सर्व टप्पे दिसतात.
काही भागात अजूनही जंगल टिकुन आहे.
पात्रात मोठमोठे दगड
धबधब्याकडे जाणारी वाट नदीच्या पलीकडून असल्यामुळे तोच धोकादायक टप्पा आहे.
काळुचा ओघ
धबधब्याकडे जाणारी वाट
आडराई आणि एम.टी.डी.सी.च्या मागून येणारी धार.इकडे जाताना मोठमोठ्या दगडावरुन जावे लागते.
मोरोशीजवळ रुंद झालेली नदी
कोकणातून दिसणारा भैरवगड आणि वर्हाडी डोंगर सावरणे गावातून दिसणारा भैरवगड
काळु नदी
हरिश्चंद्रगडाचा कोकणकड
हे वालिवरेकडे जातानाचे फोटो आहेत.
बाणाने दाखवलेला जीवधन
माळशेज घाटातून घेतलेला सुर्यास्त
एम.टी.डी.सी.च्या पठारावरुन भैरवगड थोडासा दिसत आहे.
**पन्हाळा येथील छत्रपती शंभू महाराज मंदिर***मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच
वारसा आम्हाला दिला। शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर
जाहला।।देशात "पंतप्रधान"होऊ शकतात , "राष्टपती" होऊ शकतात पण "छत्रपती"
फक्त एकदाच होऊ शकतात !!!
जहाज फिरंगी.
एका कलंदर सैनिकाची गोष्ट.
गोष्ट आहे महादजी शिंदे यांच्या काळातली; म्हणजे साधारण १७९४ च्या आसपासची.
मराठ्यांच्या
इतिहासाशी एका आयर्लंड देशातील आयरिश माणसाचा संबंध आलेला आहे. आयर्लंड हे
आपल्यावर राज्य करणाऱ्या इंग्रजांच्या युनायटेड किंग्डम देशाच्या शेजारी
आहे.
ह्याच नाव होते जॉर्ज थॉमस. ( George Thomas )
मराठा लोक ह्या जॉर्ज थॉमसला 'जहाज फिरंगी' असे म्हणत.
हा 'जॉर्ज' मूळचा आयर्लंड देशातील कौंटी टिपेरायरा भागातील रोस्क्रेया ह्या गावचा रहिवासी होता.
(Roscrea, Tipperary, Ireland)
ह्या जॉर्जचा जन्म एका अतिशय गरीब शेतकरी कुटुंबात झाला होता. हा जॉर्ज लहान असतानाच ह्याचे वडील वारले.
हा कधीही शाळेत गेला नाही त्यामुळे हा निरक्षरच राहिला.
ह्या वेळी आयर्लंड मध्ये तरुण मुलांना पकडून जबरदस्तीने नौदलात भरती करत असत.
पुढे
थोडा मोठा झाल्यावर ह्या जॉर्जलाही बळजबरीने पकडून नौदलात भरती केले गेले.
सुरवातीस हा तिथल्या 'युगहल' बंदरावर ( Youghal ) एक सामान्य कामगार
म्हणून काम करत असे.
वयाच्या २५ व्या वर्षी हा जॉर्ज ब्रिटिश नौदलात भरती झाला आणि १७८२ साली ह्याला इंग्लडमधून भारतातील मद्रास येथे पाठविण्यात आले.
जॉर्ज
भारतात आला त्यावेळी त्याचे वय ३२ वर्ष होते. पण मुळातच महत्वकांक्षी आणि
काही जगावेगळे करण्याची धडपड असणाऱ्या ह्या जॉर्जला ही कामगाराची नोकरी
काही आवडली नाही.
जॉर्ज स्वतः चांगला घोडेस्वार आणि लढवय्या असल्याने पुढे जॉर्जने आपली ब्रिटिश सैन्यातील कामगाराची नोकरी सोडून दिली.
जॉर्जने
जवळ असलेले सर्व पैसे खर्च करून पेंढारी सैनिकांची एक छोटी तुकडी तयार
केली. पेंढारी सैनिक म्हणजे भाड्याचे सैनिक. जो पैसे देईल तिकडे हे पेंढारी
काम करत. हे काही कायमचे पदरी बाळगलेले सैनिक नसत.
जॉर्जने
ह्या पेंढाऱ्यांना आपल्या पदरी ठेऊन स्वतःचे एक छोटे सैन्य तयार केले आणि
आता हा जॉर्ज आजच्या उत्तरप्रदेशातील मीरत जवळील 'सारधाना' येथील 'बेगम
सुमरू' नावाच्या बाईच्या पदरी येऊन नोकरी करू लागला.
ही 'बेगम सुमरू' नावाची बाईही एक भन्नाटच प्रकरण आहे.
हीच खरं नाव 'फर्जाना झेब उन्ननिस्सा.'
ही मूळची काश्मिरी होती. दिसायला सुंदर असल्यामुळे सुरवातीच्या काळात ही नाचगाणे करून आपले पोट भरायची.
नाचगाण्यातून ह्या बाईने बरीच धनदौलत कमावली होती.
कमावलेल्या
पैश्यांच्या जोरावर पुढे ह्या बाईने आपल्या पदरी पेंढाऱ्यांची भाडोत्री
फौज बाळगायला सुरवात केली. ज्या जहागीरदाराला लढाईसाठी फौजेची गरज पडेल
त्याच्याकडून पैसे घेऊन हि बाई आपली भाडोत्री फौज त्या जहागीरदारास
लढाईसाठी देत असे.
पुढे ह्या 'फर्जाना झेब उन्ननिस्साने एका वॉल्टर रेनहार्डट सोम्बरे
(
Walter Reinhardt sombre ) नावाच्या युरोपियन ख्रिश्चन सैनिकाशी लग्न केले
आणी आपला मुस्लिम धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. हिने आपले मुस्लिम
नाव बदलून 'जोंना नोबिलिस सोम्बरे' (Joanna Nobilis Sombre ) असे इंग्रजी
नाव धारण केले.
पण हे नाव उच्चारायला कठीण असल्यामुळे सगळे लोक हिला 'बेगम सुमरू' असेच म्हणायचे.
ही
बाई बरीच खटपटी होती. आपल्या पदरी असलेल्या भाडोत्री पेंढाऱ्यांच्या
फौजेच्या जोरावर हिने मीरत जवळील 'सारधाना' येथे स्वतःची जहागिरी स्थापन
केली होती.
पोटा पाण्याच्या शोधात असणारा जॉर्ज आपली
छोटी पेंढाऱ्यांची फौज घेऊन आता ह्या बेगम सुमरूच्या पदरी नोकरी करू लागला.
कर्तृत्वाच्या जोरावर लवकरच जॉर्ज हा बेगम सुमरूचा आवडता 'जनरल' बनला.
पुढे
ह्या जॉर्जने ह्या बेगम सुमरूची नोकरी सोडून दिली आणि मराठ्यांच्याकडील
महादजी शिंद्यांच्या फौजेत नोकरी पत्करली. महादजी शिंद्यांच्या पदरी
असलेल्या अप्पा खंडेराव ह्याच्या पदरी जॉर्ज राहू लागला.
१७९३
पासून १७९७ पर्यंत म्हणजे चार वर्ष हा अप्पा खंडेरावच्या पदरी आपली
पेंढाऱ्यांची फौज घेऊन नोकरी करत होता. ह्या वेळी मराठ्यांच्या पदरी राहून
ह्याने बऱ्याच लढायांत भाग घेतला. राजस्थान आणि हरियाणा भागातील कछवाह,
शेखावत, ठाकूर, शेखावती आणि शीख ह्यांच्यावर मराठ्यांनी हल्ले करून ह्या
सगळ्यांना जिंकून घेतले होते.
ह्या मराठ्यांच्या मोहिमेत ह्या जॉर्जने आपल्या छोट्या पेंढाऱ्यांच्या फौजेसहित चांगली कामगिरी बजावली होती.
मराठ्यांच्या पदरी नोकरी करून जॉर्जला आता बराच अनुभव आलेला होता.
अप्पा खंडेरावच्या मृत्यूनंतर साधारण १७९७ मध्ये जॉर्ज स्वतंत्र जहागीरदाराप्रमाणे वागू लागला.
अनुभव
आणी युद्धातून मिळालेल्या पैश्यांच्या जोरावर जॉर्जने आपली फौज अधिक
वाढवली. जॉर्ज आता फौज आणि पैसे ह्यांमुळे अधिक शक्तिशाली झाला होता.
जॉर्जने आता महादजी शिंद्यांच्या पदरी असलेली आपली नोकरी सोडून दिली आणि
हरियाणाच्या भागात लुटालूट सुरु करून 'रोहतक' आणि 'हिसार' प्रांत बळकावले.
आता हा जॉर्ज एखाद्या जहागीरदारासारखे वर्तन करू लागला. सुरवातीस मराठ्यांनी ह्या जॉर्जच्या उचापतींकडे फारसे लक्ष दिले नाही.
जॉर्जने आता हरियाणामधील 'हंसी' हे त्याचे मुख्य लष्करी ठाणे तयार केले आणि असिगढ उर्फ हंसीच्या किल्याची दुरुस्ती आणी मजबुती केली.
जॉर्जने रोहतकच्या दक्षिणेस १० कोसांवर एक ‘जॉर्जगड’ नावाचा किल्लाही बांधला. ह्या किल्यास आपले लोक 'जहाज गड' असे म्हणत.
पुढे
हा पंजाबच्या पतियाला भागातील 'फुलकीयान मिसल' जहागीरदार शिखांच्या मदतीने
मराठ्यांवरच हल्ले करू लागला. ह्या शिवाय ह्याने पंजाब प्रातांतील 'जिंद'
भागावर हल्ले करून जिंदच्या शीख सैन्याचा पराभव केला.
आपल्या पदरी असलेल्या सैन्याचा खर्च भागविण्यासाठी हा जॉर्ज शेजारच्या 'जिंद' आणि 'कैथल' प्रदेशावर कायम हल्ले करून लूट मिळवायचा.
१८०० मध्ये तर ह्या जॉर्जने धाडस करून पटियाला राज्यातील 'सिरसा' शहरावर हल्ला करून मोठी लूट मिळविली होती.
अत्यंत महत्वाचे:
आपल्या लुटीच्या पैश्यांच्या जोरावर जॉर्जने मोठी फौज उभी केली आणि आजूबाजूचा मुलुख जिंकून घेऊन स्वतःस हंसीचा राजाच घोषित केले.
जॉर्जने
त्याच्या ह्या छोट्याश्या राज्यात स्वतःच्या नावाची नाणीही पाडली. ह्या
जॉर्जचे राज्य उत्तरेकडील घर्ग नदीपासून दक्षिणेकडील झज्जर भागातील बेरी
गावापर्यंत आणि 'राहोतक' भागातील 'मेहम'पासून हनुमानगड जिल्ह्यातील
'भंडारा'पर्यंत पसरलेले होते.
जॉर्जने असीगढ म्हणजे
आजचा हंसीच्या किल्याची डागडुजी करून हंसीला आपल्या राज्याची राजधानी घोषित
केले आणि तिथून राज्य चालवायला सुरवात केली.
ह्या जॉर्जचे राज्य १४ परगण्यांत पसरलेले होते.
ह्याने
आपले सैन्य वाढवून आठ बटालियन केले. ह्याच्या सैन्यात ६००० सैनिक असून
त्याच्याकडे चांगल्या ५० तोफा होत्या. शिवाय १००० घोडदळही जॉर्जच्या पदरी
होते.
ह्या शिवाय जॉर्जने जाट आणि १५०० रोहिल्ला मुसलमान सैनिकांना आपल्या राज्यात इनामी जमिनी देऊन आपली लष्करी शक्ती बरीच वाढविली होती.
हा जॉर्ज अभिमानाने स्वतःस 'हंसीचा राजा' आणि शिवाय 'आयर्लंडमधील टिपेरायराचा राजा' अशी बिरुदावली लावत असे.
जॉर्जने जयपूर, बिकानेर, उदयपूर, आणि शिखांच्या राज्यांवर हल्ले करून बरेच विजय मिळविले होते.
आपल्या
आत्मचरित्रात जॉर्ज म्हणतो कि, " मी माझ्या कर्तृत्वाने स्वतःचे राज्य
स्थापन केले. नवीन किल्ले बांधले. जुन्या किल्यांची मजबुती केली. सुरवातीस
मला फार अडचणी आल्या. परंतु मी अडचणींवर मात करत स्वतःची ७ हजार सैनिकांची
फौज उभी केली. मी माझ्या राज्यात स्वतःच्या नावाने नाणी पाडली. एका साध्या
कामगारापासून मी कर्तृत्वाने जहागीरदार बनलो आणी पुढे जहागीरदारापासून मी
पुढे राजा बनलो. मी स्वतःच्या हाताने माझ्या तोफखान्याच्या तोफा ओतल्या. मी
बनविलेल्या तोफा आणी बंदुका ह्या सर्वोत्तम होत्या."
पुढे १७९८ ते १८०१ मध्ये जॉर्जने स्वतःसाठी हिस्सार प्रांतात 'जहाज कोठी' नावाचा महाल तयार केला.
जॉर्ज आता आपल्या राज्याच्या सीमा वाढवू लागला आणि आजूबाजूच्या प्रदेशांवर सारखे हल्ले करू लागला.
मराठ्यांच्या ताब्यातील प्रदेशावरही जॉर्ज आता धाडसाने हल्ले करू लागला. ह्या त्याच्या खटपटींमुळे जॉर्ज मराठ्यांच्या नजरेसमोर आला.
वास्तविक मराठ्यांच्या शक्तीपुढे जॉर्ज 'टिचभरही' नव्हता.
'जहाज
फिरंगी' उर्फ जॉर्जचे वाढते अस्तिव आता दौलतराव शिंद्यांच्या नजरेस येऊ
लागले आणि आता मराठ्यांनी जहाज फिरंगी उर्फ जॉर्ज विरुद्ध आपली आघाडी
उघडली.
दौलतराव शिंद्यांच्या फौजेतील 'जनरल पेरॉन' ह्याने जहाज फिरंगी उर्फ जॉर्ज ह्याच्या राज्यावर हल्ले सुरु केले.
मराठयांनी
त्याच्या या जॉर्जगड उर्फ जहाजगडास वेढा घातला. त्यात जॉर्जचा सेनापती
हॉपकिन्स हा ठार होऊन जहाज फिरंगी उर्फ जॉर्जचा पूर्ण पराभव झाला.
मराठ्यांनी
जहाज फिरंगी उर्फ जॉर्जचे सर्व राज्य एकाच झटक्यात जिंकून घेतले. जॉर्जचे
राज्य जिंकून घेतले तरी जॉर्ज काही मराठ्यांच्या हाती लागेना. जॉर्जला
जिवंत पकडण्यासाठी मराठा फौज आता शोधाशोध करू लागली.
मराठे मागे लागलेले पाहून 'जहाज फिरंगी' उर्फ जॉर्ज आता जीव वाचवून पळत सुटला.
तो एकटाच पळून ३० कोसांवरील हंसीस गेला.
(साधारण ५५ किलोमीटर )
पाठलागावरील
मराठ्यांनी हंसीला वेढा घातल्यावर तिथून पळून जाऊन जॉर्ज उत्तरप्रदेशातील
बुलंदशहर जिल्ह्यात असलेल्या अनुपशहर येथे एका इंग्रज तुकडीच्या आश्रयास
गेला.
मराठे तिथेही त्याच्या पाठलागावर गेले. त्यामुळे तिथून जॉर्ज शेवटी बंगालमध्ये पळून गेला.
बंगालमधून
पुढे तो यूरोपात इंग्रजांच्या सोबतीने जाण्यास निघाला असता बंगालमधील
बहरामपूर येथे २२ ऑगस्ट १८०२ साली गंगेच्या काठी 'जहाज फिरंगी' उर्फ जॉर्ज
हा साथीच्या आजाराने मरण पावला.
मृत्यूनंतर बहरामपूर येथील 'बाबुलबोना' येथे जॉर्जला दफन करण्यात आले.
मृत्यूच्या वेळी जॉर्जला 'ऍलेक' आणी 'ऍनी' अशी दोन अपत्ये होती.
कर्तृत्वाने मनुष्य काय काय करू शकतो?
जॉर्जच्या ह्या इतिहासातून शिकण्यासारखे आहे. इच्छाशक्ती आणी धाडस असेल तर मनुष्य आपल्यास हवे ते यश नक्कीच मिळू शकतो.
पहा;
एक आयरिश पोरगा इकडे येतो काय आणि आपल्या कर्तृत्वाच्या धडाडीने सैन्य उभे
करून स्वतःचे राज्य निर्माण करून त्या राज्याचा राजा बनतो काय..
आहे कि नाही गंमत.
तर असा हा मराठ्यांच्या इतिहासातील 'जहाज फिरंगी.'
लेख कसा वाटला ते मला खाली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि लेख शेअर करायला विसरू नका.
पांडवकुळात हस्तिनापूर ब्रहद्रवा नावाचा राजा होता. त्याने सोमयज्ञ केला. यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला. त्याच्या हाताला मूल लागले. अत्यंत सुंदर व गोंडस दिसणारे हे मुल रडू लागले. राजाने त्याला कुंडाबाहेर काढले व आनंदाने राणीकडे घेऊन गेले. अग्नीने दिलेल्या या मुलाचे नाव "जालंदरनाथ' असे ठेवले. जालंदर नाथ या नावाचा अपभ्रंष होऊन पुढे जालिंदरनाथ हे नाव प्रसिद्ध झाले. त्यांनी पुढे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. जालिंदरनाथांचे जन्मस्थान हस्तीनापूरमध्ये आहे. तर संजीवन समाधी येवलवाडी (ता. पाटोदा, जि. बिड) येथे आहे. येथे जाण्यासाठी पाथर्डी-बीड रस्त्यावरून रायमोहा गावापासून येवलवाडी व पुढे जालिंदरनाथांच्या समाधीस्थळी जाता येते.
संजीवनी समाधी जालिंदर देवस्थान येवलवाडी नाथ चैतन्य पुजन सामग्री हिंदुस्थान
#स्वराज्याचे_पाचवे_सरलष्कर_म्हाळोजीबाबा_घोरपडे
जन्म - १६२०
संताजींचे
वडील म्हाळोजींन पासूनच स्वराज्याच्या सेवेस सुरुवात झाली होती त्याची
नोंद,【करवीर सरदारांच्या कैफियत】या पुढील प्रमाणे आहे मुळपुरूष म्हाळोजी
बाबा घोरपडे व शककर्ते शिवराय यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाहीत
सरदार होते हिंदू धर्माचे कामात विकल्प आलेवरुन म्हाळोजीराजे व छत्रपती
शिवाजी राजे यांचे हिंदू धर्माचे संस्थापक करणे बद्दल एकमत होवून बेलभंडार
परस्पर देऊन तह जाहला,तेथून पादशाहाचे हुकूमतीत न चालता राज्याधी व्रुध्दिस
आरंभ करून प्रांत काबीज करत चालले तेव्हा मराठी फौजेचा बंदोबस्त
करण्याबद्दल पादशाहाकडुन मुसलमान सरदार येऊन त्याजबरोबर कितीएक प्रसंग
जाहले त्यात दिवसेंदिवस मराठी फौजेस जय प्राप्त जाहला, छत्रपती शिवाजी
महाराजांच्या अनेक युद्ध मोहिमांत म्हाळोजींनी महत्त्वपुर्ण कामगिरी केलेली
होती त्याचे मुल्यमाप होऊ शकले नाही, छत्रपती शिवरायांच्या शेवटच्या
कारकिर्दीत संभाजीराजांनी केलेल्या बंडानंतर ज्यावेळी युवराजांना
पन्हाळ्यावर आणण्यात आले तेव्हा म्हाळोजीराजे पन्हाळ्याचे सरनोबत होते या
विषयी पुढील प्रमाणे नोंद सापडते, श्री शिवछत्रपती शककर्ते महाराज यांनी
राज्यास प्रारंभ केला त्या समयी घोरपडे यांचा पुरुष म्हाळोजी हे
छत्रपतींपाशी पाचशे स्वारानिशी चाकरीस राहिले, काही दिवसांनी महाराजयांचे
जेष्ठ पुत्र संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते म्हाळोजी घोरपडे यांस
स्वारांसुध्दा पन्हाळ्यास छत्रपतींनी पन्हाळा किल्ल्याचे सरनोबती देऊन
संभाजी महाराज यांसपशी ठेवले पुढे शिवाजीराजे यांचा काळ झाला नंतर संभाजी
महाराज यांनी म्हाळोजीबाबा घोरपडे पन्हाळ्यावर ठेऊन आपण रायगडास गेले पुढे
हंबीररावांच्या निधनानंतर संभाजीराजांनी म्हाळोजी घोरपडे यांना घोडदळाची
सरनोबती दिली, छत्रपती शिवाजी नंतर संभाजींच्या कारकिर्दीत म्हाळोजीराजांनी
अनेक महत्त्वपुर्ण भूमिका बजावल्या एवढेच नाहीतर संभाजीराजांच्या अखेरच्या
काळात त्यांना वाचविण्याकरिता म्हाळोजींनी आपल्या प्राणाची बाजी लावली
छत्रपती संभाजीराजांना पकडण्याकरिता मुकर्रबखान उर्फ शेख निजाम आला तेव्हा
राजांचा मुक्काम संगमेश्वर येथे होता २०० स्वार व १०००पायदळासह त्याने
कोल्हापूरहुन अंबा घाटातून संगमेश्वर गाठले १फेब्रुवारी१६८९ ला त्याने
संगमेश्वरला वेढा घातला तेव्हा संभाजींन जवळ कवीकलशासह फक्त तीनशे स्वार व
काही निवडक अंमलदार उपस्थित होते संभाजींवर हल्ला करण्याकरिता आलेला
मुकर्रबखानाला रोखण्याकरिता म्हाळोजीराजे संभाजीराजांना वाचविण्याकरिता
झालेल्या धुमश्चक्रीत सरनोबती म्हाळोजीराजे धारातीर्थी पडले, या
विषयी【घोरपडे घराण्याच्या वंशावळीत】उल्लेख पुढील प्रमाणे आहे इतक्यात
अवरंगजेब पादशाहा याची फौज चालून आली, सबब म्हाळोजी घोरपडे महाराजांकडे
संगमेश्वरास गेले तेथे पादशाही फौजेची व महाराजांची लढाई होवुन संभाजी
महाराज यांसी धरून नेले त्या गर्दीत म्हाळोजी बाबा ठार जाहले या वेळी
म्हाळोजीराजे सोबत त्यांचे तीन पुत्र अनुक्रमे【संताजी, बहिर्जी,
मालोजी】यांनी विशेष पराक्रम गाजीवला.【महाराष्ट्रातील इतिहासाची साधने】
ह्यात घोरपडे घराण्याच्या इतिहासाविषयी पुढील प्रमाणे माहिती आढळते छत्रपती
संभाजी महाराज यांणी म्हाळोजी घोरपडे यांसी सरंजामी देऊन मुखत्यारी सांगोन
सरनोबताची वस्रे दिल्ही आणी किल्ले पनालेस ठेऊन आपण रायगडास गेले पुढे
राज्यात फौजा येवुन संभाजी महाराज मुलुख सर करित होते इतक्यात अवरंगजेब
पादशाहा याची फौज चालून आली सबब.म्हाळोजी घोरपडे महाराजांकडे संगमेश्वरास
गेले तेथे पादशाहीकडील फौजेची व महाराजांची लढाई होवून संभाजीराजास धरून
नेले त्या गर्दीत म्हाळोजी बाबा घोरपडे ठार जाहले पुढे राजाराम महाराज
छत्रपती यांनी सेनापतीची वस्त्रे संताजीबाबा घोरपडे यांसी दिली,
शके
१६१०,【हिंदुराव घोरपडे घराण्याच्या इतिहासातही वाईच्या युध्दात हंबीरराव
पडल्यानंतर संभाजीराजांनी म्हाळोजी घोरपडे यांना सेनापतीपद दिले व ते १
फेब्रुवारी १६८९ पर्यंत कायम आसल्याचे म्हटले आहे】
अशाप्रकारे
खुद छत्रपती शिवरायांचा वारसा असणार्या म्हाळोजींच्या【संताजी, बहिर्जी, व
मालोजी】या तिन्ही पुत्रांनी स्वराज्याची सेवा केली त्यात विशेष म्हणजे
संताजी घोरपडेंचे स्वपराक्रमाने मराठ्यांच्या इतिहासात वेगळे स्थान राहिले
आहे,
१५ वर्ष ते शहाजीराजे यांचे सोबत होते. १६५४
पासून ते१६८०पर्यत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर स्वराज्य
स्थापनेच्या कार्यात सहभागी होते स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे
यांच्या सोबत स्वराज्य रक्षणासाठी कार्य केले आणि संभाजीराजे यानां
शत्रूपासून वाचविताना संगमेश्वर येथे सतत५२ वर्ष स्वराज्यसेवा बजावून ते
धारातीर्थी पडले, तेव्हा त्यांचे वय-६९ वर्ष होते.आणि तो दिवस होता १
फेब्रुवारी १६८९
भोसले घराण्याचे तिन पिढ्यास़ोबत राहुन सतत ५२ वर्षे स्वराज्यसेवा केली,
म्हाळोजी बाबांना अखंड मानाचा मुजरा
स्वराज्य चरणी तत्पर घोरपडे घराण निरंतर,,
#घोरपडे_घराण्याचा_इतिहास
#महाराष्ट्रातील_शुर_सरदार_घराणे
मुन्नारपासून
तासाभराच्या अंतरावर हा पर्वत आहे. कोल्लूकूमलाई उंचच उंच डोंगरावरून
बघितलं कि दरी अशी ढगांनी गच्च भरलेली दिसते. कोल्लूकूमलाई ही खासगी
मालमत्ता आहे. ‘कोल्लूकूमलाई टी इस्टेट’ या कंपनीच्या चहाच्या बागा इथे
आहेत. कोल्लूकूमलाई टी इस्टेट आणि या पर्वताचं वैशिष्ठय असं कि जगातली ही
सगळ्यात उंचावरची टी इस्टेट आहे. उंची आहे ७१३० फूट किंवा २१६० मीटर.
इतक्या उंचीवर चहाची शेती करणारी कोल्लूकूमलाई टी इस्टेट ही जगातली एकमेव
कंपनी आहे. हे सगळं टी प्लांटेशन ६००० ते ८००० फूट उंचीच्या दरम्यान
डोंगरांच्या उतारावर केलं जातं. चौकशी केल्यावर समजलं यांचा सगळा चहा
एक्स्पोर्ट होतो.
या
सुंदर, रमणीय देखाव्यापर्यंत पोचणं मात्र महाकठीण होतं. एक तासाचा अत्यंत
खडतर आणि पेशन्स बघणारा जीप प्रवास केल्यानंतर कोल्लूकूमलाईच्या टोकावर
पोचता येतं. आम्ही सकाळी सहाच्या दरम्यान निघालो. सूर्योदय बघण्याचे
अप्रतिम ठिकाण एवढीच माहिती आमच्या ड्रॉयव्हरने दिली होती. पहिल्या
पंधरा-वीस मिनिटांच्या प्रवासात काही वाटलं नाही कारण रास्ता छान होता. पण
जसजसे आम्ही टी इस्टेटच्या आवारात पोचलो आणि डोंगर चढायला सुरुवात केली,
आम्ही काय दिव्यातून जाणार आहोत याची अचानक जाणीव झाली. रस्ता असा नाहीच.
एका वेळी एक जीप जाऊ शकेल असा दगड गोट्यांचा प्रचंड खडबडीत रस्ता.
आजूबाजूला पूर्ण काळोख. प्रचंड धक्के देत, शरीराची आदळ आपट करत आमची जीप
निघाली होती. पर्वत निम्मा अधिक होईस्तो हाडं खिळखिळी होण्याची वेळ आली
होती. दोन चार वेळा जीपच्या टपावरच्या रॉडला डोकं आपटून झालेलं होतं. ते
सारखं सारखं आपटून इजा होऊ नये म्हणून वाकून बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
आणि वाकून बसल्याने पाठीची अवस्था बिकट झाली होती. तरी प्रवास चालूच होता.
इतकं काय भारी दिसणार आहे? सूर्योदय काय कधी पहिला नाहीये का? अशी कुरकुर
मनाने सुरु केली होती. पुरे हा छळ, त्यापेक्षा परत जाऊ असलेही विचार मनात
येत होते. आमच्या ड्रायव्हरला बहुदा लोकांच्या या प्रतिक्रियांची सवय
असावी. तो त्याच्या तोडक्या मोडक्या हिंदीत, आलंच पाच मिनिटावर असं म्हणत
गाडी मोठ्या कुशलतेने हाकत होता. एकदाचे आम्ही माथ्यावर येऊन पोचलो. कधी
एकदा त्या जीप मधून उतरतो असं झालं होतं. बघा तो एकदाचा सूर्योदय असं मनात
येतायेत, समोर ढगांनी भरलेली दरी दिसली. सगळा शीण, मनाने केलेली कुरकुर
क्षणात गायब झाली. दोन मिनिटं लागली ते दृश्य मनात स्थिर व्हायला. पुढचा
बराच वेळ कुणी कुणाशी फार न बोलता पुढचं दृश्य बघण्यात दंग झालो होतो.
पटापट फोटो निघत होते.
कोल्लूकूमलाईवरचं ते स्वर्गीय दृश्य आणि तिथपर्यंत नेणारा तो त्रासदायक प्रवास कधीही न विसरता येण्यासारखा अनुभव !
*सिंहाचलमचे ' वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी ' मंदिर
*विशाखापट्टणम
जवळील सिंहगिरीवरील या सिंहाचलम मंदिरासंबधीच्या अनेक आख्यायिका निगडीत
आहेत. हिरण्यकश्यपुने जेव्हा भक्त प्रह्लादाला मारायला शेवटचा प्रयत्न
म्हणून सिंहाद्री पहाडाची निवड केली. आज्ञेनुसार त्यांनी प्रल्हादाला
सिंहाद्री जवळील समुद्रात फेकले. परंतु आधीच भगवान विष्णूंनी त्या
टेकडीवरून समुद्रात उडी मारली आणि प्रल्हादाला सागरातून उचलून वर आणले.
भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाला वाचवलेले स्थान म्हणून ' सिंहाद्री ' चे
विशेष महत्व आहे. भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन हिराण्याक्षाचा नाश केला
आणि नरसिंह अवतारात हिराण्यकश्यपूला ठार मारले. हे दोन्ही अवतार आपल्याला
एकत्रित पाहायला मिळावेत अशी प्रार्थना भक्त प्रल्हादाने केल्याने भगवान
विष्णूंचे वराह नरसिंह रूप सिंहाचलमला बघायला मिळते. हे स्थान पुराणांनुसार
येथील देवाचे पहिले मंदिर भक्त प्रल्हादाने बांधले. आपल्या वडिलांचा
नरसिंहाच्या हातून वध झाल्यावर त्याने हे काम सिद्धीस नेले. परंतु
कृतयुगाच्या अखेरीस ते उपेक्षित झाल्याने, त्याचा -हास होऊ लागला. मूर्तीची
पूजा ही होईना, आणि हळूहळू तिच्यावर मातीचे थर होत होते. पुढे कित्येक
वर्षांनी, दुस-या युगाच्या सुरवातीस चांद्रवंशीय राजा पुरुरवा आपली पत्नी
उर्वशीसह आकाश मार्गाने रथातून जात असताना एका अज्ञात शक्तीने त्याला
सिंहाचलम टेकडीवर खेचून आणले. मातीच्या थर वेष्टनात पूर्ण लपेटलेली देव
मूर्ती त्याने शोधून काढली आणि सर्व माती काढून ती स्वच्छ केली. त्याच वेळी
आकाशवाणी झाली की, " मूर्ती उघडी ठेवू नकोस. ती चंदनाच्या लेपाने झाकून
टाक", असंही सांगितले की देवाची याच स्वरुपात उपासना करावी ; आणि वर्षातून
फक्त एकदा, वैशाख शुद्ध तृतीयेला त्याचे नीजस्वरूप प्रकट करावे. त्या
आकाशवाणीनुसार राजाने काढलेल्या मातीएवढा चंदनाचा लेप त्या मूर्तीवर चढवून
तिची पूजा केली आणि तिच्या भोवती पुन्हा एकदा नव्याने मंदिर बांधले. तेव्हा
पासून त्याची भरभराट होत गेली. सिंहाचलमच्या या 'वराहलक्ष्मी नरसिंह
स्वामी ' मंदिराचा इतिहास अकराव्या शतकापासून सुरु होतो. इतिहास काळात
कलिंग देशाचा राजा नरसिंह देवराज याने पुनरुज्जीवन केले. असं सांगतात की हे
मंदिर मुळात शैवांचे होतं, पण रामानुज या वैष्णव संताच्या प्रभावाने ते
वैष्णवांचे झाले. रामानुज यांनी शैवांची मूर्ती वैष्णवांची करण्याच्या
दिलेल्या आज्ञेनुसार गवंड्यांनी मूर्ती फोडण्यास सुरवात करताच तिच्यातून
रक्त येऊ लागलं, म्हणून मूर्तीवर चंदनाचा लेप लावला गेला. पौराणिक,
ऐतिहासिक दीर्घ परंपरेनुसार मंदिरातील वराह नरसिंहाची मूळ मूर्ती नेहमीच
चंदनाच्या लेपाने आच्छादलेली असते. फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी,
चंदनयात्रेच्या वेळी मूर्तीवरील चंदनाचा लेप काढला जाऊन, ती स्वच्छ करून
देवाचचे मूळ स्वरुपात दर्शन घडते. मुख्य मंदिराकडे जातानाच्या दगडी
पाय-यांच्या दुतर्फा सर्व मंदिरांप्रमाणेच पूजा - अर्चेच्या सामानांची,
प्रसाद यांची दुकाने आहेत .मुख्य मंदीराभोवती उंच तटबंदी आहे. मंदिर
प्राचीन, लक्षणीय कारागिरीचे आहे. तसेच या मंदिराला अनेक मंडप असून ते
नक्षीमय कोरीव स्तंभ छतांनी सुशोभित आहेत. वैशाख व जेष्ठ मंडप खास
समारंभासाठी बांधलेले आहेत. कल्याण मंडप हा खास विवाहासाठी असून चैत्र
महिन्यातील एकादशीला तेथे नरसिंहाचा विवाह सोहळा संपन्न होतो. सभामंडपात
सोळा कोरीव कारागिरीचे नक्षीदार स्तंभ आहेत. मंदिराच्या गाभा-यात
प्रवेशद्वाराजवळ नवग्रह कोरलेले असून आत गेले की शिवलिंगसारखी सारखी मूर्ती
दिसते. ती वराह नरसिंहाची मूर्ती असली तरी तिच्यावर चंदनाचा भोग चढवल्याने
मूळ मूर्तीच दर्शन होत नाही. वैशाख शुद्ध तृतीयेला लेप काढण्यात येतो.
तेव्हा मूळ मूर्तीचे रूप दिसू शकते. अर्थात त्या वेळी येथे उत्सव असल्याने
लाखोंच्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात. वराह नरसिंह मूर्तीच्या मंडपाला
प्रल्हाद मंडप असेही म्हणतात.* *गाभा-याबाहेरील आवारात कप्पूस्तंभ नावाचा
स्तंभ असून त्याला मिठी मारून देवाकडे काहीही मागितले तरी ते मिळते अशी
भाविकांची श्रद्धा आहे. निपुत्रिकांनी या स्तंभाला मिठी मारून संततीची,
पुत्रप्राप्तीची मनोकामना व्यक्त केली, तर तीही पूर्ण होते . वराहनृसिंह
मंदीर गाभा-याच्या बाह्य भिंती अतिशय उत्कृष्ट लावण्यमय शिल्पांनी ओतप्रोत
समजल्या आहेत. हिरण्यकश्यपुचे पोट फाडतानाच्या पारंपरिक नृसिंह मुर्तीखेरीज
कनक नृसिंह, योग नृसिंह , वीर नृसिंह, यासांरख्या विविध रूपांतील
प्रेक्षणीय नृसिंह मूर्ती या बाह्य भिंतीवर पाहायला मिळतात. मंदिराच्या
प्रदक्षिणेत विशेष लक्ष वेधून घेतो तो सिंहासनाधिष्ठीत, घोड्यासाहितचा दगडी
रथ. हे लक्षणीय रथ शिल्प १४ फूट लांब, ११ फूट रुंद व आठ फूट उंच आहे.*
*मंदिराचा ७८ स्तंभांचा कल्याण मंडप सर्वात मोठा म्हणजे १०४ फूट लांब व ४५
फूट रुंद असून त्यात वाद्ये वाजणा-या वादकांच्या सुबक मूर्ती आहेत. येथील
नागस्तंभ, चौरीधारी युवतीचा स्तंभ, असे अनेक कलात्मक खांब आहेत. अत्युत्तम
शिल्प कारीगीरी बरोबर येथे सुमारे ५२५ शिलालेखही आहेत. आंध्रातील तिरुपती
किंवा इतरही काही मंदिराप्रमाणे या देवालयाच्या आवारातही केशवपनाची
व्यवस्था आहे. भव्य गोपुरच्या वराह नृसिंह मंदिराबाहेर सुमारे साठ फूट
उंचीचा ध्वजस्तंभ आहे. सर्व मंदिरे पूर्वाभिमुख असतात. या मंदिराचे मुख
मात्र पश्चिमेला आहे. त्याची कथा अशी सांगण्यात येते... या मंदिराचा
शिल्पकार ते बांधण्यासाठी आपल्या गावाहून निघाला तेव्हा त्याची पत्नी
गर्भवती होती. ऐवढे मोठे मंदिर उभारण्यास कित्येक वर्षे लागली. तोपर्यंत तो
मूर्तिकार कारागीर आपल्या गावी गेलाही नाही. दरम्यानच्या काळात त्याचा
मुलगा खूप मोठा झाला आणि आपल्या पित्याच्या शोधार्थ सिंहगिरीवर आला. दगडी
रथावर बांधलेले ते पूर्वाभिमुख देऊळ पाहून तो इतका प्रभावित झाला की हे
अप्रतिम कलाशिल्प आपल्या मातेने पाहिलेच पाहिजे असं त्याला वाटले. म्हणून
त्याने आपल्या मंत्रसामर्थ्याने त्या शिल्पमंदिर रथाचे दगडी घोडे जिवंत
केले आणि पश्चिमेस असलेल्या आपल्या गावी जाण्यासाठी ते मंदिर फिरवून
पश्चिमाभिमुख केले. मंदिराचा शिल्पकार जेव्हा तेथे आला ; तेव्हा या कृतीने
तो अत्यंत संतप्त झाला. मंदिर फिरवणारा हा आपलाच मुलगा आहे; हे त्याला
माहिती नव्हते. स्वत:च्या मुलाला न ओळखल्याने संयम सुटून त्याने त्याला व
घोड्याला ठार केले. त्यामुळे ते मंदिर तसेच पश्चिमाभिमुख राहील. उदंड
लोककथा असलेले सिंहाचलमचे ' श्रीवराहलक्ष्मी नृसिंह स्वामी वारी मंदिर हे
आंध्र प्रदेशातील एक उत्तम शिल्प कला सौंदर्याने नटलेले अतिशय श्रीमंत
स्थान आहे. विजयनगरच्या राजांनी या देवालयास जमिनी व मोठमोठ्या देणग्या
दिलेल्या असून गेली दोनशे वर्षे वंशपरंपरेने ते याचे विश्वस्त आहेत.*
*त्यांनी या टेकडीवरील परिसरात अनेक फळबागा जोपासल्या असून वर येण्यासाठी
एक हजार उत्तम पाय-यांचा रस्ता आहे. वाटेवर वरपर्यंत दिव्यांची सोयही
केलेली आहे. सिंहाचलमच्या टेकडीवर गंगाधारा नावाने ओळखला जाणारा एक बारमाही
झरा असून, त्या पाण्याने यात्रेकरूंची तहान तर भागतेच; पण त्यात काही
विशेष औषधी गुणधर्म असल्याच मानल जाते.*
*कुलदीप जोशी, नांदेड*
श्री नटराज 𝕝𝕝
नटराज मूर्ती
सर्वांनीच पाहिली असेल. काही जणांना ती मूर्ती पारितोषिक म्हणून मिळाली
असेल. पण किती जणांनी त्याचं नीट निरीक्षण केलं असेल ? कबूल करायला लाज
वाटते, पण मी देखील तसे निरीक्षण केलं नव्हतं. नाहीतर त्या नटराजाच्या
पायाखाली एक लहान मुल असल्याचे माझ्या ध्यानात आलं असतं. पण तसं झालं नाही
हे खरं.
मूर्तीच्या पायदळी असणाऱ्या मुलाचा उल्लेख
अस्वस्थ करून गेला. अनेक विद्वान मंडळींना याबाबत विचारणा केली.. पण उत्तर
मिळालं नाही कारण त्यांनी देखील “मूल” पाहिलं नव्हतं!
मग
मीच शोध घ्यायचा ठरवलं आणि इंटरनेटवर शोध घेतल्यावर एक लेख सापडला. खूप
आनंद झाला. शेफाली वैद्य यांचा ‘साप्ताहिक विवेक’च्या १० मार्च २०२१ च्या
अंकात नटराजाच्या मूर्तीबाबत एक दीर्घ लेख आला आहे. तो लेख वाचून आपल्या
धार्मिक प्रतीकांबाबत निर्माण झालेली कुशंका तर दूर झालीच शिवाय
नटराजाविषयी सविस्तर माहिती देखील मिळाली.
या लेखात शेफाली वैद्य लिहितात:-
“भगवान
शिवशंकरांच्या ह्या सर्व रूपांमध्ये भारतीय शिल्पकारांचे, कलाकारांचे आणि
भक्तांचे एक आवडते रूप म्हणजे नृत्यमग्न शिवांचे – म्हणजे नटराजाचे. शिवाची
जी विविध रूपे आहेत, त्यांपैकी नर्तकरूपातील शंकराला नटराज असे म्हणतात.
‘नट्’ म्हणजे संस्कृतमध्ये ‘नृत्य करणे’ आणि नटराज म्हणजे सर्व नटांचा
(नर्तकांचा) राजा. नृत्यमग्न अवस्थेतल्या श्री शिवशंकरांना नटेश, नटेश्वर व
नर्तेश्वर असेही म्हटले जाते. भारतीय मूर्तिकारांचे हे अत्यंत आवडते रूप.
दक्षिण भारतातल्या शिवमंदिरांमधून आपल्याला एकाहून एक सुंदर आणि भव्य अशा
अक्षरशः हजारो श्री नटराज मूर्ती दिसून येतात. त्यातील चिदंबरम येथे महर्षी
पतंजली यांनी तयार केलेली मुळ मुर्ती आहे. विशेषतः तामिळनाडूमध्ये चोळ
राजांनी बांधलेल्या भव्य शिवालयांमधून खूप सुरेख नटराज मूर्ती कोरलेल्या
आहेत”.
“श्री शंकरांचे नटराज रूप हे अखिल विश्वाच्या
नियमबद्ध हालचालींचे लयबद्ध प्रतीक आहे. भगवान शंकर जेव्हा तांडव नृत्य
करतात, तेव्हा ते नृत्य सृष्टी (निर्माण) स्थिती, संहार, तिरोभाव
(विश्रांती) आणि शेवटी अनुग्रह (मोक्ष) या त्यांच्या पंचक्रियांचे प्रतीक
मानले जाते. शिव डमरू वाजवतात तेव्हा त्या नादब्रम्हाने सृष्टीचे सर्जन
होते, त्यांची अभयमुद्रा हे स्थितीचे, हातातला अग्नीप हे नाशाचे, सभोवतालचे
प्रभामंडळ हे तिरोभावाचे व उचललेला पाय हे अनुग्रहाचे प्रतीक समजले जाते,
म्हणूनच अगदी स्वित्झर्लंड मधल्या भौतिकशास्त्रात प्रगत संशोधन करणार्या
अत्याधुनिक पार्टिकल लॅबमध्येदेखील नटराजाची भव्य मूर्ती विराजमान आहे.
प्रख्यात भारतीय आनंद कुमारस्वामी ह्यांनी ‘दि डान्स ऑफ शिवा’ ह्या
जगद्विख्यात शोधनिबंधात शिवाच्या नटराज स्वरूपाचे फार सुरेख आणि
अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नटराज हा आद्य
नर्तक, नृत्याची अधिष्ठात्री देवता, नृत्यकलेचा प्रवर्तक आणि पहिला
नृत्यगुरू आहे. तो नर्तन करणारा आहे, नर्तन करवणारा आहे आणि स्वतःचेच नृत्य
पाहाणारा रसिक प्रेक्षकही आहे. अखिल ब्रह्मांड हाच शिवाचा रंगमंच आहे."
“नटराजाची
मूर्ती सामान्यत: पुढील स्वरूपात कोरलेली आढळते – एका पद्मपीठावर अपस्मार
किंवा मूलयक (अपस्मार, मुलयक म्हणजे अज्ञानी दानव किंवा राक्षस) नावाचा एक
बुटका, कुरूप पुरुष पालथा पडलेला असतो. हा अपस्मार म्हणजे अविद्येचे,
अज्ञानाचे व अहंकाराचे प्रतीक. चतुर्भुज किंवा त्याहूनही अधिक हात असलेला
श्री नटराज आपला उजवा पाय त्याच्या पाठीवर देऊन मंदस्मित करीत एका पायावर
उभा असतो. नटराजाच्या मूर्तीला संपूर्ण व्यापणारे एक प्रभामंडळ
पद्मपीठापासून सुरू होते. त्या प्रभामंडळाला बाहेरच्या बाजूला ज्वालांकुर
असतात. नटराजाने डावा पाय उचलून धरलेला असतो. शरीर त्रिभंगात असते.
मूर्तीच्या सर्वात मागच्या बाजूच्या हातात एक डमरू व डाव्या हातात अग्नी
असतो. पुढच्या बाजूचा उजवा हात अभयमुद्रेत व डावा हात दंडहस्त वा गजहस्त
मुद्रेत उचललेल्या पायाकडे निर्देश करत असतो.”
“नटराजाच्या
मस्तकावर कलात्मकरित्या बांधलेल्या जटांचा मुकुट असतो. मुकुटावर नाग,
कवटी, गंगा, चंद्रकोर असतात. नृत्यमग्न शिवाच्या जलद हालचालीमुळे
जटामुकुटातून काही बटा मोकळ्या सुटून मानेमागे वार्यावर भुरभुरत असतात.
मागचे दोन्ही हात व मस्तकाचा वरचा भाग हे बहुधा प्रभावळीला स्पर्श करीत
असतात. नटराज त्रिनेत्र व सालंकृत असतात. गळ्यात अनेक हार, बाहुभूषणे,
हाता-पायात वाळे, कंकणे व हातापायांच्या बोटांत अंगठ्या असतात. कटिवस्त्र
म्हणून कधी मृगाजिन तर कधी व्याघ्रचर्म दाखवलेले असते. शिवाच्या गळ्यात
यज्ञोपवित असते. नृत्य कशा प्रकारचे आहे त्याप्रमाणे त्यांची मुद्रा रौद्र
किंवा शांत असते.”
नटराजाच्या पायदळी जे आहे ते “मुल”
नाही. तो आहे अपस्मार मुलयक, जो अविद्येचे, अज्ञानाचे व अहंकाराचे प्रतीक
आहे. या अशा अज्ञानरुपी राक्षसावर श्री शिवांचे नृत्य करणे म्हणजे
अज्ञानावर विजय आहे. तसेच श्री नटराजाच्या एका हातात अग्नी आहे, तो विश्वात
झालेल्या अनीतीने झालेल्या अप्रिय सर्जनाला पुनर्निर्माणाचे आवाहन करुन
ब्लँक होल मध्ये जसे सर्व विश्व नष्ट करण्याची शक्ती आहे त्याप्रमाणे भस्म
करुन टाकतात. त्यांच्या मुर्तीच्या कडेने चक्र आहे जे गतिमानतेचे प्रतिक
आहे. ही माहिती या लेखामुळे कळली. नटराजाची नृत्यमुद्रा आकर्षक आहे एवढंच
कळत होतं. पण त्या मूर्तीतील बारकावे आणि प्रतीकं बघून थक्क झालो. किती
बारकाईने विचार करून मूर्ती घडविली आहे !! हे सारं समजल्यावर आपल्या
संस्कृतीचा अभिमान वाटला. आणी कळलं आंतरराष्ट्रीय सर्न येथील लँब समोर श्री
नटराजाची मुर्तीच का बसवली आहे.
◆◆◆
डॉक्टर देवेंद्र साठे
जेम्स डग्लस, खाफीखान,
साकी मुस्तैदखान, मेहमूद हाशिम खालीखान यांसारख्या परकीयांना देखील आपल्या
वैभव संपन्नतेवर लिखाणास भाग पाडणारे “किल्ले राजगडाची सुवेळा माची"...... |
सुवेळा माची ही तर दुर्गरचनेचा अनोखा आविष्कारच माचीच्या तीन टप्प्यांत
उतरलेल्या डोंगरी सोंडेलगत बुरुजाचे केलेले पहिले बांधकाम त्यालगत साधारण दोन
मीटर अंतर सोडून बाहेरच्या बाजूस पुन्हा मजबूत तटबंदी असे चिलखती बांधकाम....
या
बांधकामाचं वैशिष्ट्य हे की बाह्य चिलखती बांधकामाची उंची आतल्या
बांधकामापेक्षा जास्त आधीच दुर्गम भाग त्यामुळे शत्रू सैन्य आले किंवा
तोफेच्या माऱ्यात हा बुरुज ढासळला तरी आतला चिलखती बुरुज शाबूत राहीलच पण
बाह्य बांधकाम पडल्यावर शत्रू आत आलाच तर दोन बुरुजा दरम्यानच्या अरुंद दोन
मीटर जागेत अडून हालचालींवर मर्यादा येऊन गडाच्या सैनिकांच्या हातात अलगद
लागून त्यांना ठार मारणे सुलभ जाईल ही रचना आजही थक्क करते....
संरक्षणाच्या
दृष्टीने महत्वाच असणारे चिलखती बुरुज ह्या तीनही माच्या म्हणजे एक
स्वतंत्र किल्लाच असे हे दुर्गबांधणीतील अद्भूत अचंबित करणारे बांधकाम
आपल्याला पहायला भेटते....
This sculpture from the 1800’s is called "The Double Statue of
Mephistopheles and Margarita". There is a large mirror behind the
sculpture so you can see both figures and appreciate the full view of
this unusual creation. The statue was created from a single piece of an
ancient sycamore tre हे शिल्प सालारजंग म्युझीयम मध्ये आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, क्रांती चौक औरंगाबाद
रोषणाई केलेला दिल्ली दरवाजा
दिल्ली दरवाजा
रंगीन गेट
औरंगाबाद शहरातील दरवाजे
डॉ. सलिम अलि तलाव औरंगाबाद
सरदार
सलाबत खान II चा मकबरा आहे. (सलाबत खान टोंब), सामान्यतः चांदबीबीचा
महाल, चांद बीबी पॅलेस ( चुकीचे नाव) म्हणून ओळखला जातो. मकाबर्याच्या
बाजूला अजून चार कबरी आहेत, ऐकीव माहिती नुसार त्या सालाबत खान यांच्या
पत्नींच्या आहेत. महाराष्ट्रतील अहमदनगर शहरापासून १३ किमी अंतरावर
सोनेवाडी च्या टेकडी वरील सखल भागावर वसलेली ही तीन मजली दगडी रचना आहे
.समुद्रसपाटीपासून सुमारे 3080 फूट उंचीवर, शहरापासून 700-800 फूट उंचीवर
आहे, जे आजूबाजूच्या लँडस्केपचे चांगले दृश्य देते आणि शहरातील जवळजवळ
कोठूनही दृश्यमान आहे. असे मानले जाते की ही रचना सात मजली असावी परंतु
केवळ तीनच मजले बांधण्यात आले आहेत. इमारत सपाट असून आठ बाजूंनी प्लॅटफॉर्म
आहे. सुमारे बारा फूट उंच आणि 100 यार्ड रुंद असलेल्या दगडी टेरेसच्या
साध्या कल्पनेने, हे थडगे एका अष्टकोनाच्या मध्यभागी मोठ्या सन्मानाने उभे
असलेले दिसते. थडग्याला टोकदार छिद्रे आहेत म्हणून सूर्योदय आणि
सूर्यास्ताच्या वेळी त्यावर सूर्यप्रकाश पडतो.
लातूर जिल्ह्यात उदगीरचा भुईकोट किल्ला...
लातूर
जिल्ह्यातील उदगीर हे ऐतिहासिक शहर आहे तेथील उदयगिरी हा बालघाटाच्या
डोंगर रांगेत वसलेला किल्ला महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांपैकी एक आहे
उदगीरचे प्राचीन नाव उदयगिरी असे होते काही ठिकाणी त्याचा उल्लेख
‘उदकगिरी’ नावाने करण्यात आला आहे उदगीर नगरीचे पुराण काळापासून उल्लेख
सापडतात त्यामुळे उदगीरला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक असे दुहेरी महत्त्व
आहे सदाशिवराव (भाऊ) पेशवे यांनी १७६० मध्ये निजामा विरुद्ध उदगीर जवळ
झालेली लढाई जिंकल्याची ऐतिहासिक घटना प्रसिद्ध आहे..
प्रतिष्ठाण
(पैठण) ही सातवाहनांची राजधानी होती.. राजधानीकडे जाणाऱ्या रस्त्यावर
वसलेल्या उदगीर गावाची बाजारपेठ भरभराटीस आली पुढील काळात त्या भागावर
चालुक्यांचे वर्चस्व आले त्यांची राजधानी बदामी येथे होती त्यांच्या काळात
हा किल्ला बांधला असावा त्यानंतर राष्टकूट, चालुक्य (कल्याणी) देवगिरीचे
यादव यांची सत्ता या भागावर होती यादवांचा राजा सिंघनदेव यांच्या इ.स ११७८
च्या शिलालेखात उदगीर नगराचा उल्लेख आहे सहावा भिल्लम यादव हा उदगीरचा शासक
असल्याचा उल्लेख आढळतो..
उदगीर
हे यादवांचा शेवट झाल्यानंतर बहामनी काळात व्यापारी केंद्र म्हणून
भरभराटीस आले बहामनी घराण्याचा नववा राजा महमदशहा बहामनी याने २२ सप्टेंबर
१४२२ मध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलवली बिदर हे राजधानीचे ठिकाण
असल्यामुळे त्या काळात उदगीरचे महत्व वाढले महमुदशहा बहामनीने इ.स १४९२
मध्ये कासीम बरीदला उदगीर, औसा, कंधार हे किल्ले जहागिर म्हणून दिले इ.स
१५२६ मध्ये बहामनी राज्याचे विघटन होऊन पाच शाह्या उदयास आल्या त्यापैकी
औसा येथील सुभेदार कासीम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली. बिदर राजधानी
असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील उदगीर, औसा, कंधार हे प्रमुख किल्ले
होते..
फोटोग्राफी : @s_akki9
This is halali dam overflow. It rained 10 inches in one day due to deep
depression over M P. These pics are taken from jungle side of this
dam. Administration closed entry gate because of increased water levels.
It is 40 kms away from bhopal on vidisha highway. MP tourism resort is
also there. Enjoy view
मित्रमंडळी नमस्कार
मंडळी मी 2018 मध्ये युरोप टूर ला गेलो होतो. युरोप शहर बघण्यासाठी फारच
छान सुरवातीला र्जमनी गाडले नंतर Prayag, Italy, आणि पॉरिस Switzerland या
ठिकाणी मस्त भटकंती केली. मुख्य म्हणजे या ठिकाणी भटकंतीला खूपच
मज्जा आली होती. निसर्ग मस्तच बघण्यासाठी सुरेख मी दोन महिने Tren bus
saykal या साधनांचा आधार घेत भटकंती केले होती . तिथे एक अॅप आहे जो कोनी
कुठेही व्हिकेंड फिरवायला जातो तो सांगतो की मी याठिकाणी जात आहे.तसे आपण
बघायचे आवडीचे ठिकाण असल्याने आपण जर हो सांगीतलं की तो वेळ सांगतो तो
त्या दिवशी वेळेवरच घराबाहेर येतो पण हॉर्न वाजवत आपण बाहेर येऊन उभेच
यायचे क्षमु वेळे आधी पाच मिनिटे तयार असायचो भाषा येत नसे पण ते संभाळून
घेत असत खूप जण अशाप्रकारे मित्र जमलेले होते मग काय संध्याकाळी कित्येकदा
बसायचो काही फोटो पोस्ट करत आहे ठिकाणाची नाव लिहीत बसतं नाही भेटल्यावर सविस्तर गप्पा होतील धन्यवाद Garmany, Italy, Switzerland, Paris .& Prayag
पंचरथी महादेव मंदिर, देवळी कराड
नाशिक
जिल्ह्यातील कळवण तालुक्यात कळवण पासून ३० कि.मी. अंतरावर असणारे देवळी
कराड हे पश्चिम पट्ट्यातील शेवटचे गाव. निसर्गाने भरभरून वरदान दिलेला हा
परिसर. पश्चिमेला अजिंठा-सातमाळा डोंगररांग व शेजारून वाहणारी गिरणा नदी,
या नदीच्या काठावर वसलेले हे गावं आणि गावातील पुरातन पंचरथी महादेवाचे
मंदिर आपल्याला एक विलक्षण अनुभव देऊन जाते.
गावात
प्रवेश करताच डाव्या हाताला एका टेकडीच्या पायथ्याशी असलेले हे मंदिर लगेच
आपले लक्ष वेधून घेते. रथाप्रमाणे आकार असलेले हे नागर शैलीचे मंदिर
सिन्नर मधील गोंदेश्वर मंदिराची आपल्याला आठवण करून देते. या मंदिराच्या
समोर पिंपळाचे भले मोठे झाड पाहायला मिळते. नुकताच या मंदिराचा परिसर
सुशोभीकरण करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर आणखी आकर्षक वाटते. मंदिर
पूर्वाभिमुख असून उंच जोत्यावर उभारण्यात आले आहे. मुखमंडप, सभामंडप,
अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आपल्याला दिसून येते. सध्या मंदिरा
समोर पत्रे टाकून नवीन सभामंडप उभारण्यात आला आहे.
पायरी
चढून गेल्यानंतर प्रथम आपल्याला मंदिराचा कक्षासनयुक्त मुखमंडप लागतो.
त्यापुढे सभामंडप असून येथे नंदी विराजमान आहे. सभामंडपाचे वितान संवरणा
पद्धतीचे आहे. सभामंडपात डाव्या हाताला असणाऱ्या देवकोष्टकात श्री गणेशाची
आकर्षक अशी मूर्ती आहे. गणेशाचे दर्शन घेऊन आपण गर्भगृहात प्रवेश करतो.
येथे प्राचीन असे शिवलिंग आपल्या नजरेस पडते. तर समोर भगवान उमा-महेश्वर
आलिंगन मूर्ती दिसून येते.
मंदिराच्या
बाह्य अंगावर कीर्तीमुख, भौमितिक नक्षी, वेलबुट्टी इत्यादींचे शिल्पांकन
आहे. मुखमंडपातील कक्षासनाच्या बाह्य भागावर युगल शिल्पे, मिथुन शिल्पे,
मैथुन शिल्पे यांचे शिल्पांकन दिसून येते. गर्भगृहातील अभिषेकाचे पाणी ज्या
वारी मार्गाने बाहेर पडते तिथे मकर मुखाची योजना करण्यात आली आहे. समोर
पिंपळाच्या वृक्षाखाली व परिसरात वीरगळ व काही भग्नावशेष दिसून येतात.
मंदिर राज्य पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक घोषित केलेले असून मंदिराची
चांगल्या प्रकारे निगा ठेवण्यात आलेली आहे. मंदिर स्थापत्यातील नागर
शैलीचा सुंदर आविष्कार अनुभवण्यासाठी एकदा देवळी कराडला अवश्य भेट द्या.
*आज २३ ऑगस्ट* *आज #जागतिक_वडापाव_दिन.* रस्त्यावरून कितीही लगबगीने चालत असाल तरी, तळलेल्या खमंग वड्याच्या वासाने बेधुंद झाला नाही असा एकही माणूस मुंबई- पुणे व इतर शहरात सापडणे कठीणच. अनेक नोकरदारांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. वडापावचं मुळात वैशिष्ट्यच हे आहे की, त्यासाठी प्लेट लागत नाही, चमचे लागत नाहीत, टेबल असलंच पाहिजे अशी गरज असत नाही, खुर्चीचा तर प्रश्नच उद्भहवत नाही. जितकं लवकर बनतो, तितक्याच लवकर खाल्लाही जातो आणि प्रसंगी चालताचालता, बोलताबोलता, उभ्याउभ्याने, प्रवासात किंवा अगदी काही खरेदी करताकरता आपण तो खाऊ शकतो. वडा-पावचा वडा पहिल्यांदा मुंबईत गिरणी कामगारांच्या डोक्यातुन भूक भागवण्यासाठी सुचलेली कल्पना आहे. वडापाव सुरू झाला, त्यावेळी तो १० पैशाला विकला जायचा. आज अगदी आठ रुपयांपासून मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत वडापाव मिळतो. दादर स्टेशनाबाहेर २३ ऑगस्ट १९६६ रोजी अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली. याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. वडा-पावला टक्कर देण्यासाठी मॅक-डीने ‘मॅक आलू टिक्की’ हा बर्गर स्वरूपातील वडापावचा परदेशी भाऊच जन्माला घातला. बटाट्याची पॅटी आणि पाव हे बेसिक तसेच ठेवत त्याला थोडा चकाचक लूक देऊन हा परदेशी वडापाव विकला जाऊ लागला. २३ ऑगस्ट २००१ रोजी धीरज गुप्ता या व्यक्तीनं वडापावला इंडियन बर्गरचं रुप देत, जंबो वडापाव फूड चेन सुरु केली. त्यानिमित्तानंच त्यांच्या ९ शहरातल्या शाखा हा जागतिक वडापाव दिन साजरा करतात. इतरांनीही त्यांचं अनुकरण करायला सुरुवात केली आहे. आज मुंबईत दिवसाला जवळपास १८ ते २० लाख वडापाव खपतात. अमेरिकेच्या ऱ्होड आयलंडमधील ब्राऊन विद्यापीठात हॅरिस सॉलोमन या विद्यार्थ्याने वडापाव या विषयावर पी.एच.डी. केली आहे. हल्ली या वडापावची अनेक नामकरणे झाली आहेत. भाऊंचा वडा, कृष्णा वडा, जम्बो वडा, गोली वडापाव अशा नावानी त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे. महाराष्ट्राची ओळख असलेला वडापाव पोस्टाच्या तिकीटांवरही येणार आहे. भारतीय पोस्ट खात्यानं प्रदर्शित केलेल्या भारतातील २४ खाद्यपदार्थांच्या पोस्ट तिकीटांमध्ये महाराष्ट्रातील मोदक आणि वडापाव पदार्थांना स्थान दिलं आहे.
राजमाता गजानन कुंजविहार (ही काही जुनी ठिकाणं)
खरंतर आता जागोजागी मिळतात... वेगवेगळ्या चवी [23/08, 1:43 p.m.] +91 86898 55050: कुंजविहार👌🏻👍🏻 [23/08, 3:07 p.m.] +91 92261 02768: कुर्ला, कमानी... रामेश्वर [23/08, 3:26 p.m.] +91 91580 28280: Rameshwar मध्ये आहे का !! [23/08, 4:16 p.m.] +91 92261 02768: रामेश्वर वडापाव, कुर्ला वेस्ट [23/08, 4:47 p.m.] +91 77383 99203: Joshi vadevale ,Rohit Vadevale ,SP Vadevale [23/08, 4:48 p.m.] +91 98702 95691: ठाण्यात 'बबन चा वडा' म्हणून पण एक प्रसिद्ध आहे [23/08, 4:57 p.m.] +91 98909 05886: श्री वडेवाले कोथरुड मैत्री वडापाव धायरी अन्नपूर्णा वडापाव माणिकबाग सिंहगड रोड पुणे (अंदाजे १९९० पासून) श्रीकृष्ण वडापाव सहकारनगर पुणे (अंदाजे १९८५ पासून) [23/08, 5:07 p.m.] +91 98701 65950: *जागतिक वडापाव दिनानिमित्त !!* २३ ऑगस्ट २०२२ मी मुंबईचा वडापाव असा मी मुंबईचा वडापाव जगात झालंय माझं नाव
खाऊ लागलो भाव कारण वाढू लागला माझा भाव आज मी झालो ५६ वर्षाचा अजूनही मी लज्जतदार+ चविष्ट माझं नाव असा मी मुंबईचा वडापाव जगात झालंय माझं नाव
लुसलुशीत पाव लाल- हिरवी- पिवळी- गोड चटणी आणि तरीही सोबतीला मिरची आणि मी कुरकुरीत तळलेला वडा मी म्हणजे मुंबईकरांचा विक पॉइंट वडा अस्सल देशी फास्ट फूडचा ताव असा मी मुंबईचा....
जन्म माझा १९६६ सालचा दादर स्टेशन बाहेर गाडीवरचा जन्मदाते श्री अशोक वैद्यांच्या हातचा आणि माझे नामांतर झाले बटाटावडा पाव तेव्हा मी मिळे १० पैशाला, आणि आता तर १०- ५०-८०/- रुपयांचा अधिक भाव असा मी मुंबईचा.....
दादर- परळ- गिरगावाची शान वरळीचा तर मी अभिमान रोजंदारीचा नी पोटाचा मला बहुमान मला रेल्वे स्थानक- एस टी डेपो- बस आगारात मान कमी वेळात सर्वांना सापडे मी वडापाव असा मी मुंबईचा.....
आहे मी गरिब- श्रीमंतांचा लाडका महिला पुरुष वयांत भेदभावाचा ना तडका पोटाची खळगी भरायला नसे कोणी कडका नाष्टात- जेवनात, जिथं कमी तिथं मी भडका कमी पैशात पोटभरणारा मी वडापाव असा मी मुंबईचा.....
किर्ती काॅलेज बाहेर बेसनाच्या चुरासह वडापाव ठाण्याच्या कुंजविहारचा जम्बो वडापाव ठाण्याच्या दुसरा ठिकाणचा गजानन वडापाव कल्याणचा वंझे कुटुंबाचा खिडकी वडापाव वरळीच्या मांजरेकर चा वडापाव असा आहे नावलौकिक मी शिववडा पाव असा मी मुंबईचा.....
परदेशात ही मी फिरु लागलो बर्गरला मी टक्कर देऊ लागलो चीज- नाचो- शेजवान- मेयोनिज- जम्बोकिंग अशा नावांत मी दिसू लागलो असा मी आहे ब्रॅण्डेड वडापाव असा मी मुंबईचा.....
अमेरिकेच्या 'हॅरिस सोलोमन' तिशीच्या विद्यार्थ्याने माझ्या *वडापाव* या विषयावर पी. एच. डी. केली मुंबईच्या रिझवी काॅलेजचे '२ माजी विद्यार्थ्यांने' लंडनमध्ये *श्री कृष्ण वडापाव* नावाचे हाॅटेल काढले त्यांनी दर वर्षाला ४ कोटींहून अधिक कमाई केली इंटरनेटवर माझे स्टाॅल- हाॅटेलचे पत्ता दिसे सर्व क्षेत्रात पसंतीस दिसे मी वडापाव असा मी मुंबईचा.....
कोरोनात केला मला तडीपार सर्वांचीच झाली उपासमार आली आठवण सर्वांना माझी फार आणि आता लाॅकडाऊन उघडल्यावर आनंदीत झाले सर्व वार मी पुन्हा आदराने वावरु लागलो, मारा आता ताव असा मी मुंबईचा......
*सर्व धर्म एकच वडापाव !* 🚩
आपल्या सर्व भारतीयांना आणि, परदेशातील खवय्यांना भारतामुळे *जागतिक ५६ वा वडापाव दिनाच्या* हार्दिक हार्दिक खमंग शुभेच्छाऽऽऽ !! 👌😜
~@ शब्दश्री विलास देवळेकर🙏 [23/08, 5:35 p.m.] किल्ला राजेंद्र सातपुते इस्लामपूर: वरील ठिकाणा पैकी काही ठिकाणी मी वडा खाल्ला आहे. पण आपण जर कधी पेठ नाका येथून सांगली येथे जाणार असल्यास आष्टा येथील चंदू वडा व याच मार्गावर डिग्रज जवळ असलेला जैन वडा पण अवश्य खावा. या दोन्ही सारखी चव तुम्ही निश्चितच पहिली नसणार.इतर सर्व ठिकाणच्या वड्या पेक्षा दुप्पट मोठा असतो. [23/08, 9:55 p.m.] Tikona Aniruddha Surve: दहिसर पूर्व, मुंबई विद्या मंदिर दहिसर canteen चा पंडितांचा वडापाव चंगू मंगू वडापाव [23/08, 10:19 p.m.] Tikona Aniruddha Surve: बोरीवली पूर्व, मुंबई तांबे पल्लीनाथ वडापाव [23/08, 10:25 p.m.] Dayanand Wagh: मुंबई मध्ये लालबागला भारतमाता थिएटर समोर महाराष्ट्र लाडू सम्राट मध्ये वडापाव मिळायचा. सध्या आहे कि नाही माहित नाही. [23/08, 10:27 p.m.] Jane Bhi Do Nayan Patil: atta hi aahe ladu samart [23/08, 10:32 p.m.] Dayanand Wagh: 👍🏻👍🏻होते त्याच ठिकाणी आहे का जागा बदललीय. आता पूर्णपणे बदलले असणार. मी बघितलय त्याला साधारण तीस एक वर्षे झाली असतील. 👍🏻👍🏻 [23/08, 10:33 p.m.] +91 98690 35549: Thanyacha Durga vadapav famous aahe [23/08, 10:33 p.m.] +91 98690 35549: Ani shraddha vadapav suddha famous aahe [23/08, 10:35 p.m.] किल्ला दिनेश परब: मध्ये काही वर्ष बंद पडले होते, नतर पुन्हा नवीन चालु झाले. बसून मराठमोळे पदार्थ खाता येतात आणी मिठाई पार्सल पण आहे. सणासुदीला रांग लागते [23/08, 10:39 p.m.] Dayanand Wagh: पियुष मिळते काय?? [23/08, 10:40 p.m.] Dayanand Wagh: आमच्याइथे कराड मध्ये कुठेही मिळत नाही. [23/08, 10:48 p.m.] किल्ला दिनेश परब: गोरेगाव मध्ये सप्रे टिपिकल मराठमोळ खाण्याच ठिकाण आहे, सगळं वडापाव, साबुदाणा वडा, थालीपीठ आणी अर्थात पियुष पण 👍🏻 [23/08, 10:53 p.m.] +91 98690 35549: Thanyat kutirodyag mandir madhe chan piyush milte [23/08, 11:49 p.m.] +91 98927 84689: Ghantali road वर आपटे बाईंचा वडापाव पण खूप प्रसिद्ध होता. Pandamic मुळे बंद झाला. तसेच गडकरी रंगायतन मधे पण वडा छान मिळतो. नाटक बघण्या बरोबर लोकं वडा खायला पण येतात. 🤪 [23/08, 11:51 p.m.] +91 92261 02768: Ghansoli रेल्वे स्टेशन च्या बाहेर पण 👌👌👌 [23/08, 11:54 p.m.] +91 98215 35693: Aaram hotel at VT is good taste of wadapav [24/08, 12:05 a.m.] +91 90298 35380: गडकरी चे खरे आहे [24/08, 12:09 a.m.] +91 90298 35380: कोपरखैरणे स्टशन पच्छिम स्काय वॉक खाली [24/08, 12:11 a.m.] +91 98927 84689: त्याचा वडा पांढरा असतो without हळद. Even ghatkopar च्या Rcity Mall मधे भगत ताराचंद चे श्रोत्र नावाचे restaurant आहे. तिथे स्टार्टर म्हणून वडा असतो. अप्रतिम चव आहे. [24/08, 12:13 a.m.] +91 87795 86349: https://www.loksatta.com/photos/trending-gallery/3087108/list-of-most-popular-vada-pav-in-mumbai-on-23rd-august-world-vada-pav-day-scsg-91/
Shared by Loksatta android app. Click here to download https://loksatta.page.link/hThpbc6PERzDvDfK8 [24/08, 12:20 a.m.] +91 87795 86349: *जागतिक वडापाव दिनानिमित्त !!* २३ ऑगस्ट २०२२ मी मुंबईचा वडापाव असा मी मुंबईचा वडापाव जगात झालंय माझं नाव
खाऊ लागलो भाव कारण वाढू लागला माझा भाव आज मी झालो ५६ वर्षाचा अजूनही मी लज्जतदार+ चविष्ट माझं नाव असा मी मुंबईचा वडापाव जगात झालंय माझं नाव
लुसलुशीत पाव लाल- हिरवी- पिवळी- गोड चटणी आणि तरीही सोबतीला मिरची आणि मी कुरकुरीत तळलेला वडा मी म्हणजे मुंबईकरांचा विक पॉइंट वडा अस्सल देशी फास्ट फूडचा ताव असा मी मुंबईचा....
जन्म माझा १९६६ सालचा दादर स्टेशन बाहेर गाडीवरचा जन्मदाते श्री अशोक वैद्यांच्या हातचा आणि माझे नामांतर झाले बटाटावडा पाव तेव्हा मी मिळे १० पैशाला, आणि आता तर १०- ५०-८०/- रुपयांचा अधिक भाव असा मी मुंबईचा.....
दादर- परळ- गिरगावाची शान वरळीचा तर मी अभिमान रोजंदारीचा नी पोटाचा मला बहुमान मला रेल्वे स्थानक- एस टी डेपो- बस आगारात मान कमी वेळात सर्वांना सापडे मी वडापाव असा मी मुंबईचा.....
आहे मी गरिब- श्रीमंतांचा लाडका महिला पुरुष वयांत भेदभावाचा ना तडका पोटाची खळगी भरायला नसे कोणी कडका नाष्टात- जेवनात, जिथं कमी तिथं मी भडका कमी पैशात पोटभरणारा मी वडापाव असा मी मुंबईचा.....
किर्ती काॅलेज बाहेर बेसनाच्या चुरासह वडापाव ठाण्याच्या कुंजविहारचा जम्बो वडापाव ठाण्याच्या दुसरा ठिकाणचा गजानन वडापाव कल्याणचा वंझे कुटुंबाचा खिडकी वडापाव वरळीच्या मांजरेकर चा वडापाव असा आहे नावलौकिक मी शिववडा पाव असा मी मुंबईचा.....
परदेशात ही मी फिरु लागलो बर्गरला मी टक्कर देऊ लागलो चीज- नाचो- शेजवान- मेयोनिज- जम्बोकिंग अशा नावांत मी दिसू लागलो असा मी आहे ब्रॅण्डेड वडापाव असा मी मुंबईचा.....
अमेरिकेच्या 'हॅरिस सोलोमन' तिशीच्या विद्यार्थ्याने माझ्या *वडापाव* या विषयावर पी. एच. डी. केली मुंबईच्या रिझवी काॅलेजचे '२ माजी विद्यार्थ्यांने' लंडनमध्ये *श्री कृष्ण वडापाव* नावाचे हाॅटेल काढले त्यांनी दर वर्षाला ४ कोटींहून अधिक कमाई केली इंटरनेटवर माझे स्टाॅल- हाॅटेलचे पत्ता दिसे सर्व क्षेत्रात पसंतीस दिसे मी वडापाव असा मी मुंबईचा.....
कोरोनात केला मला तडीपार सर्वांचीच झाली उपासमार आली आठवण सर्वांना माझी फार आणि आता लाॅकडाऊन उघडल्यावर आनंदीत झाले सर्व वार मी पुन्हा आदराने वावरु लागलो, मारा आता ताव असा मी मुंबईचा......
*सर्व धर्म एकच वडापाव !
आपल्या सर्व भारतीयांना आणि, परदेशातील खवय्यांना भारतामुळे *जागतिक ५६ वा वडापाव दिनाच्या* हार्दिक हार्दिक खमंग शुभेच्छाऽऽऽ !! ~@ शब्दश्री विलास देवळेकर
वडापाव डे च्या निमित्ताने हे पण वाचा.
जगातील वडापाव दिना निमित्त
वडा पाव : एक पोषक व परिपूर्ण आहार
महाराष्ट्रातील
आवडत्या पदार्थांपैकी एक असणारा वडापाव हा मराठी संस्कृतीचा एक भाग
असल्याचे म्हटले जाते मुंबईत सुरु झालेलं हे स्ट्रीट फूड पाहता पाहता
संपूर्ण जगात प्रसिद्ध झालं. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनी
वडापावची चव चाखली आहे.
वडापाव मनापासून आवडत नाही असा माणूस जरा विरळच सापडेल
पण
हल्ली तळलेला बटाटा म्हणून बरेच लोक घाबरतात तो खायला पण तो खरेच चांगली
पोषणमूल्य देणारा आहे म्हणून पूर्णपणे हद्दपार करण्याआधी हे नक्की वाचा
वडापाव मधून आपल्याला कुठली पोषणमूल्यं मिळतात ते पाहू.
Ø बटाट्या मधून आपल्याला विटामिन बी व सी आणि फाइबर्स मिळतात.
Ø बटाट्या मध्ये एन्टीऑक्सिडेंट असतात जी कॅन्सर प्रोटेक्टीव व heart protective आहे.
Ø शिवाय बटाट्यामध्ये पोटॅशियम मिळतं जे ब्लडप्रेशर सारख्या आजारापासून बचाव करू शकते.
Ø वड्यात मटार घातला तर प्रोटीन, फायबर, लोह व कॅल्शिअम पण वाढवता येतील.
Ø
भाजीला फोडणी देतो तेव्हा फोडणी करताना आपण त्यात जिरे, मोहरी, मिरची,
कोथिंबीर असे सगळे पदार्थ घालतो जे एंटीऑक्सीडेंट व फायबर म्हणून कार्य
करतात.
Ø बटाटा हा अतिशय ऊर्जा देणारा पदार्थ असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते.
Ø आपण वडा डाळीच्या पीठामध्ये बुडवतो म्हणजे प्रोटीन मिळते आणि वडा तळतो म्हणजे फॅट मिळते.
Ø म्हणजेच वडा पाव मध्ये प्रोटिन, कर्बोदक आणि फॅट तसेच व्हिटॅमिन्स व मिनरल्स या सगळ्या गोष्टी मिळतात.
एका वडा पाव मधून साधारणपणे 300 ते 350 कॅलरीज मिळतात.
बाहेरील खाल्लेला वडापाव आपल्या शरीराला घातक आहे का ?
Ø
हो, कारण हॉटेल किंवा स्टॉल वरती वडा तळण्यासाठी तेलाचा वारंवार उपयोग
होतो व त्यामुळे ट्रान्स् फॅट नावाचा शरीरास घातक घटक तयार होतो जो
हृद्यरोगास कारणीभूत ठरतो.
Ø
आता वड्याबरोबर पाव आलाच, पाव मैद्याचा बनलेला असतो,त्याचा वापर शक्यतो
टाळावा कारण मैद्याच्या पदार्थांमध्ये फायबर नसतात.मल्टीग्रेनचा ब्रेड
किंवा ब्राऊन ब्रेड खावा ज्यामुळे आपल्याला फायबर व पोषणमूल्य पण मिळतात.
वडापाव
आपल्याला आता इथून पुढे धोकादायक पदार्थ नसून पोषणमूल्य देणारा व ऊर्जा
टिकवून ठेवणारा एक पदार्थ म्हणून बघता येईल जर तो योग्य प्रमाणात, योग्य
वेळेला व योग्य ठिकाणी खाल्ला तर. अशाप्रकारे वडा पाव एक परिपुर्ण आहार
म्हणून शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर आपण नक्कीच आपला आहार विषयीचा
दृष्टीकोन बदलू शकतो.
Dr Pranita Ashok
MBBS MD PhD (Topic : Nutrition & Metabolism)
Dr. Pranita's Obesity and Diet Clinic, Pune
डॉ
प्रणिताज आहार विषयक अभियांना च्या फ्री डायट टिप्स टेलिग्राम अँप वर
पोस्ट केल्या जातात ज्यामुळे आहारविषयी अनेक गैरसमज दूर होण्यास मदत मिळते
त्याला जॉईन होण्यासाठी टेलिग्राम अँप डाउनलोड करा व खालील लिंक वर क्लीक
करा
For Free Basic Nutrition Course / Free daily diet tips or
Diet counseling inquiry
Whats app your name to
9545085085
बटाटे वडाचे बाहेरील बेसनाचे पातळ कव्हर असलेला, एकसंधता (छान बॉंडिंग)
असलेला, आत आवश्यक धने, मस्त कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, काही
ठिकाणी कांदा, मसालेदार आरोमा असा स्टफ असलेला पौष्टिक चविष्ट असा वडा फार
क्वचित मिळेल, आणि असाच असणे अपेक्षित आहे.
"वेळ
कोणाकडे आहे" ह्या फसव्या कारणास्तव जाड कव्हर, नुसता बटाटा (अर्धवट
शिजलेला सुध्दा) असा वरच्यावर तेलकट वडा सुद्धा देतात हातात. सोबत लालेलाल
भुकटीचा/ चटणीचा मारा..
हिटलरने काढलेली चित्र
दक्षिण दिल्लीमध्ये दोन ऐतिहासिक विहिरींचा शोध लागला आहे. या
विहिरींमधील पाणी औषधी असून त्यामुळे विविध प्रकारचे चर्मरोग बरे होतात,
असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे आता पुरातत्व विभागाने या
विहिरींच्या संरक्षणासाठी योजना आखली असून त्यांचा लवकरात लवकर जीर्णोद्धार
करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. दिल्लीत अशा किमान बारा विहिरीत
असाव्यात, असे अनुमान आहे. सध्या या दोन विहिरींवर लक्ष केंद्रित करण्यात
आले आहे. या विहिरींच्या पाण्यात जंतूनाश करणाऱया रसायनांचे प्रमाण अधिक
असल्याचे आढळून आले आहे. सध्या या विहिरी वापरात नसल्याने पाण्याचा उपसा
होत नाही. तसेच त्या पडलेल्या अवस्थेत आणि दुर्लक्षित आहेत.
या विहिरींचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यातील पाण्याचा हा अद्भूत गुण समोर
आला आहे. दिल्लीतील मेहरोली येथे ‘राजोंकी बावली’ (राजांची विहीर) नामक
स्थान असून तेथे या प्रकारची एक विहीर आहे. ही विहीर आता संरक्षित जागा
म्हणून घोषित करण्यात आली आहे. विहिरीच्या पायऱया आणि प्रवेशद्वार नव्याने
बांधण्यात आले आहे. दुसरी विहीर ‘गंधकीकी बावली’ म्हणून ओळखली जाते. या
विहिरीच्या पाण्याने स्नान केल्यास चर्मरोग दूर होतात. अनेक लोक या
विहिरीवर आंघोळीसाठी सातत्याने येत असतात. अशा दिल्लीत बारा विहिरी असून
सर्व विहिरींचा शोध सुरू आहे. दोन विहिरींच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण
होत आले आहे. आता या विहिरींमधील झरे मोकळे झाले असून त्या भरू लागल्या
आहेत. त्यात साठलेला कचरा आणि चिखल उपसण्यात आला आहे. या विहिरींमधील
पाण्याची चाचणी सातत्याने केली जात असून औषधी गुणधर्म सिद्ध झाल्याचे
सांगण्यात येत आहे. अशाच विहिरी दिल्लीच्या सीमारेषेवरील राज्यांमध्ये असू
शकतील, असे अनुमान असून तेथेही पुरातत्व विभागाकडून संशोधन सुरू आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.