अष्टविनायक म्हटले की मोरगाव-थेउर-रांजणगाव-महड-ओझर-सिध्दटेक- लेण्याद्री-पाली ही पश्चिम महाराष्ट्रातली ठिकाणं आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात. पुराणातील एका श्लोकामुळे महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थाने उलगडली गेली. यातूनच अष्टविनायक यात्रेला महत्त्व प्राप्त झाले.त्यांची दोन दिवसांत केलेली यात्रा, मग त्याला शास्त्रोक्त यात्रा असे जोडले गेलेले संदर्भ हे आपल्या परिचयाचे असतात. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेला निसर्गसंपन्न प्रदेश म्हणजे विदर्भ. मोठी प्राचीन परंपरा लाभलेला हा प्रदेश.

दंडक राजाची कर्तृत्वभूमी असलेल्या विदर्भाला 'दंडकारण्य' असे संबोधिले जाते. इतिहासाचा आणि प्राचीन शिलालेखांचा अभ्यास केल्यानंतर विदर्भातही वाकाटक साम्राज्याच्या काळापासून गणेशाची उपासना होत असल्याचा दाखला मिळातो. वाकाटक, कलचुरी अशा बलाढय़ राजसत्ता या प्रदेशी नांदल्या. त्यांच्या समृद्धीचे अवशेष आजही उत्खननामधून बाहेर येतात. विदर्भ या सर्वगुणसंपन्न अशा प्रदेशातदेखील मोठय़ा प्रमाणात गणपतीची मंदिरे आणि मूर्ती पाहायला मिळतात. गणपतींच्या २१ महत्त्वाच्या ठिकाणांपकी बरीच ठिकाणे विदर्भात आहेत. त्यातील निवडक आठ देवस्थाने मिळून 'विदर्भातील अष्टविनायक' ही संज्ञा तयार झाली. प्रवासासाठी पुरेशा संधी नसतानाच्या काळात, प्रत्येक भागात गणपतीची देवस्थाने निर्माण झाली आणि स्थलकालसापेक्ष त्यांचा विकास होत गेला. त्याचबरोबर विदर्भातले अष्टविनायकसुद्धा खास बघण्याजोगे आहेत. त्यांच्याशीसुद्धा विविध कथा, दंतकथा जोडल्या गेलेल्या आहेत. काही खास वैशिष्टय़पूर्ण मूर्ती तिथे पाहायला मिळतात. मुद्दाम वेळ काढून या गणपतींचे, त्या रम्य परिसराचे दर्शन घ्यावे. तिथल्या अष्टविनायकांचे दर्शन अमुक एका क्रमाने घ्यावे, असे काही संकेत आढळत नाहीत; परंतु शक्यतो नागपूरच्या टेकडी गणपतीपासून या अष्टविनायकांच्या दर्शनाला सुरुवात करतात. नागपूर मध्यवर्ती ठेवून या सर्व ठिकाणी आपल्या सोयीनुसार यात्रा करावी. विदर्भाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. त्याचा प्रत्यय ठायी ठायी आपल्याला येतोच.विदर्भातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने या अष्टविनायक देवस्थानांचा विकास करण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. विदर्भातील अष्टविनायकांचा घेतलेला संक्षिप्त आढावा...

वरदविनायक- टेकडी गणपती नागपूर
विदर्भातील अष्टविनायकातील पहिला समजला जाणारा गणपती म्हणजे नागपूरचा टेकडी गणपती. ऐन नागपूरमध्ये असलेले हे प्रसिद्ध देवस्थान. शहराच्या मध्यवर्ती भागात टेकडीवर असलेल्या या देवस्थानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडाखाली गणेशाची शेंदूरचíचत प्रतिमा पाहायला मिळते. नागपूर हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव. प्राचीन काळापासून अगदी पुरातत्त्वीय संदर्भ आणि पुरावे नागपूरसंदर्भात उपलब्ध आहेत. ऐतिहासिक भोसले-इंग्रज लढाई ज्या सीताबर्डी परिसरात झाली तिथेच हे गणपतीचे मंदिर आज उभे आहे. रघुजी भोसले यांच्या कार्यकाळात नागपूरला राजधानीचा दर्जा मिळाला. भोसल्यांनी जुम्मा तलाव अर्थात आताच्या गांधीसागर तलावाजवळ राजवाडा बांधण्याचे काम सुरू केले. यासाठी लागणारा काळा बॅसॉल्ट दगड मिळविण्यासाठी सीताबर्डीतील टेकडीचे खोदकाम सुरू झाले. याचदरम्यान, प्राचीन हेमाडपंती मंदिराचे अवशेष आणि याच अवशेषात सध्या प्रतिष्ठापित गणेशमूर्तीही सापडल्याची मान्यता आहे. ही मूर्ती बाराव्या शतकात यादव राजांच्या कार्यकाळातील असून ती स्वयंभू आहे. गजाननाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे, हे विशेष!
सुरुवातीला इथे अगदी साधेसुधे मंदिर होते. बुटकी भिंत आणि चार खांबांवर उभारलेले छप्पर असे याचे स्वरूप होते. परंतु आता हे एक भव्य देवस्थान झालेले आहे. मंदिराचा गाभारा म्हणजे एक मोठा हॉल असून त्यात मध्यावर झाड आणि त्याखाली गणपतीची मूर्ती आहे. सभोवती रेलिंग बसवलेले आहे. मुख्य गणपती जवळजवळ पाच फूट रुंद आणि तीन फूट उंच असून इथे फक्त गणेशाचे तोंडच दिसते. त्यालाच डोळे आणि गंध लावून पूजा केली जाते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असले तरी मूर्ती मात्र उत्तराभिमुख आहे. मोठे मंदिर, आजूबाजूला इतर लहान मोठी मंदिरे, मोठा दरवाजा, पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनांसाठी पार्किंग असे सर्व अद्ययावत सुविधांनी युक्त असे हे देवस्थान झाले आहे. गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागील भिंतीला लागून एक शिविपडी आहे. या शिवपिंडीचे वैशिष्टय़ म्हणजे इथे शिवलिंगाच्या ठिकाणी नंदी बसवलेला दिसतो.पहाटे साडेचारपासून विविध पूजाविधी इथे सुरू होतात. मंगळवार आणि शनिवार हे भक्तांसाठी जास्त महत्त्वाचे दिवस समजले जातात. या दोन दिवशी इथे मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. मंदिर परिसर अत्यंत रमणीय असून वड, पिंपळ आदी विविध वृक्षांची इथे मोठय़ा प्रमाणावर दाटी दिसते. त्यामुळे इथे विविध जातींचे पक्षिगण पाहायला मिळतात. इथून थोडय़ाच अंतरावर दुसऱ्या एका टेकडीवर फौजी गणपती मंदिर असून या दोघांना भाऊ-भाऊ असे म्हटले जाते.
मंदिराची लोकप्रियता खूपच मोठी आहे. क्रिकेट विक्रमादित्य आणि राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणपती मंदिराच्या परिसरात आता मोठया प्रमाणावर विकास करण्यात आला असून सामाजिक कार्यांसाठीही देवस्थानच्या उत्पन्नाचा उपयोग करण्यात येतो. वड-पिंपळाच्या महाकाय वृक्षांनी टेकडीचा परिसर समृध्द आहे. आजवरच्या कोणत्याही शासकीय गॅझेटियरमध्ये या मंदिराचा समावेश नाही.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूर
अठरा हातांचा गणपती-रामटेक
विदर्भाचे भूषण रामटेक हे श्रद्धास्थान. हे गाव नागपूरहून सुमारे ४६ कि.मी. अंतरावर आहे. गणेशाचे मंदीर हे रामटेकच्या मध्यभागी आहे. त्या रामक्षेत्री सुंदर अठराभुजा गजानन असून पंचफण्यांचा शिरावर नाग सावली करीत असे. कंठभूषण नागाचे, नागपट्टीही कटीचे. विदर्भातील अष्टविनायकांपकी एक असलेल्या रामटेकच्या अष्टादशभुज गणपतीचे वर्णन हे अशा पद्धतीने केलेले आहे. मुळात रामटेक हे स्थान अनेकार्थानी प्रसिद्ध आहे. याचा संबंध थेट रामायणाशी जोडलेला आहे. वनवासात असताना रामांचा मुक्काम या ठिकाणी होता असे समजले जाते. त्याचसोबत वाकाटक या बलाढय़ राजवंशाची राजधानी असलेल्या नंदिवर्धन या नगराजवळच हे ठिकाण आहे. कविकुलगुरू कालिदास यांनी आपल्या सुप्रसिद्ध ‘मेघदूत’ या काव्याची रचना याच रामटेक इथे केली असे समजले जाते. रामटेक या ठिकाणी आल्यावर कोणीही व्यक्ती मंत्रमुग्ध होऊन जाते. सापुतारा पर्वतरांगेवर वसलेले हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य आहे. वळणावळणाचे रस्ते, डोंगरावरून वाहणारे निर्झर आणि गर्द झाडी यांनी हा प्रदेश व्यापलेला आहे. वाकाटक, परमार, यादव, भोसले या राजवटींनी या ठिकाणी विविध मंदिरे बांधली.विदर्भातील अष्टविनायकातील एक स्थान यातलेच एक आहे आणि ते म्हणजे अष्टदशभुजा गणपतीचे मंदिर. नागपुरातील चांदरायण कुटुंबीयांच्या पूर्वजांनी हे मंदीर बांधले असून अठराभूजा असलेले हे गणेशाचे एकमेक मंदिर असावे, असेही जाणकार सांगतात. मंदिराला तीन उत्तराभिमुख गाभारे असून तीनही गाभाऱ्यात गणपतीच्याच मूर्ती स्थापित केलेल्या दिसतात. या तीनही गाभाऱ्यांवर गणेशपट्टीच्या ठिकाणी कीíतमुखे कोरलेली दिसतात.एकाच मंदिरात विघ्नहर्त्याच्या तीन रूपांचे दर्शन होत असल्याने भाविकांना तिन्ही लोकींचा आनंद अनुभवण्यास मिळतो.
नावाप्रमाणेच इथली मूर्ती अत्यंत वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण अशी आहे. अठरा हातांची गणपतीची मूर्ती काहीशी दुर्मीळच म्हणायला पाहिजे. पापधुपेश्वर तीर्थाकडे जाताना वाटेत गवळीपुरा इथे हे मंदिर वसले आहे. अंदाजे पाच फूट उंचीची, पद्मासनात बसलेल्या गणपतीची ही देखणी मूर्ती अठरा हातांची आहे. देवाच्या अठरा हातात पाश, अंकुश, खट्वांग, त्रिशूल अशी विविध आयुधे दाखवली आहेत. पैकी एका हातात मोदक आणि दुसऱ्या हातात मोरपंखाची लेखणी दिसते. अठरा विज्ञानाचे ज्ञान असलेला हा गणपती असल्यामुळे याला अठरा हात दाखवले आहेत, असे स्थानिक सांगतात. तर अठरा सिद्धींमुळे या गणपतीचे पूजन विघ्नेश्वर म्हणून करतात, असे पुराणात सांगितले आहे. उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे याला सिद्धिविनायक असेही म्हटले जाते. श्री गणेशाच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग आहे. गळ्यातही नाग आहे. कंबरेला नागपट्टा आहे. या प्राचीन मंदिराचा आता जीर्णोद्धार केलेला असल्यामुळे नवीन बांधकाम केलेले मंदिर आपल्याला दिसते. अठरा हातांची ही मूर्ती इथून जवळच असलेल्या रामसागर खिंडशी तलावात रघुजी भोसल्यांच्या काळात सापडली, असे इथे सांगितले जाते.ही मूर्ती अकराव्या अथवा बाराव्या शतकातली असावी. मंदिरात महागणपती आणि त्यांच्या बाजूला रिद्धी-सिद्धींच्या मूर्ती आहेत. तसेच देवी महालक्ष्मीची मूर्तीसुद्धा मंदिरात पाहायला मिळते. गणेश मंदिरासमोरच एक छोटेसे हनुमानाचे मंदिर आहे.
या मंदिरात वर्षभर भाविकांचा राबता असतो. प्रत्येक चतुर्थीला भाविकांची मांदियाळी असते. अद्याप या मंदिरात अग्रपूजेचा मान चांदरायण कुटुंबाकडेच आहे. रामटेकच्या प्रसिद्ध शोभायात्रेची सुरुवात श्री अठराभूजा गणेश मंदिर येथूनच पूजा, आरती नंतर होते.
नावाप्रमाणेच इथली मूर्ती अत्यंत वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण अशी आहे. अठरा हातांची गणपतीची मूर्ती काहीशी दुर्मीळच म्हणायला पाहिजे. पापधुपेश्वर तीर्थाकडे जाताना वाटेत गवळीपुरा इथे हे मंदिर वसले आहे. अंदाजे पाच फूट उंचीची, पद्मासनात बसलेल्या गणपतीची ही देखणी मूर्ती अठरा हातांची आहे. देवाच्या अठरा हातात पाश, अंकुश, खट्वांग, त्रिशूल अशी विविध आयुधे दाखवली आहेत. पैकी एका हातात मोदक आणि दुसऱ्या हातात मोरपंखाची लेखणी दिसते. अठरा विज्ञानाचे ज्ञान असलेला हा गणपती असल्यामुळे याला अठरा हात दाखवले आहेत, असे स्थानिक सांगतात. तर अठरा सिद्धींमुळे या गणपतीचे पूजन विघ्नेश्वर म्हणून करतात, असे पुराणात सांगितले आहे. उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे याला सिद्धिविनायक असेही म्हटले जाते. श्री गणेशाच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग आहे. गळ्यातही नाग आहे. कंबरेला नागपट्टा आहे. या प्राचीन मंदिराचा आता जीर्णोद्धार केलेला असल्यामुळे नवीन बांधकाम केलेले मंदिर आपल्याला दिसते. अठरा हातांची ही मूर्ती इथून जवळच असलेल्या रामसागर खिंडशी तलावात रघुजी भोसल्यांच्या काळात सापडली, असे इथे सांगितले जाते.ही मूर्ती अकराव्या अथवा बाराव्या शतकातली असावी. मंदिरात महागणपती आणि त्यांच्या बाजूला रिद्धी-सिद्धींच्या मूर्ती आहेत. तसेच देवी महालक्ष्मीची मूर्तीसुद्धा मंदिरात पाहायला मिळते. गणेश मंदिरासमोरच एक छोटेसे हनुमानाचे मंदिर आहे.
या मंदिरात वर्षभर भाविकांचा राबता असतो. प्रत्येक चतुर्थीला भाविकांची मांदियाळी असते. अद्याप या मंदिरात अग्रपूजेचा मान चांदरायण कुटुंबाकडेच आहे. रामटेकच्या प्रसिद्ध शोभायात्रेची सुरुवात श्री अठराभूजा गणेश मंदिर येथूनच पूजा, आरती नंतर होते.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूरहून भरपूर आणि सतत बससेवा उपलब्ध.
जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूरहून भरपूर आणि सतत बससेवा उपलब्ध.
वरद विनायक, केळझर, सिद्धिविनायक एकचक्रा
विदर्भातील अष्टविनायकांपैकी तिसर्या क्रमांकावर असलेले वर्धा जिल्ह्यातील केळझर गाव श्री सिद्धीविनायकासाठी प्रसिद्ध आहे. साधारण सव्वा मीटर उंचीची गणेशमूर्ती शेंदूरव्याप्त आहे. मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली असून इतर बारकावे शेंदुरामुळे दिसत नाहीत. ही मूर्ती नृत्याच्या मुद्रेत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. नागपूर-वर्धा राष्ट्रीय महार्माग क्रमांक 3 वर वर्धा जिल्ह्यात केळझर देवस्थान असून मोगलांच्या काळात या गावाला विशेष महत्त्व आले. गोंड राजा कोकशाहकडून खंडणी वसूल करण्यासाठी मोगलांच्या सैन्याचे मुख्यालय केळझरमध्ये असल्याचे संदर्भ ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आढळतात.केळझर गावाची प्राचीनता महाभारतकालीन आहे, असे म्हणतात. रामायण आणि महाभारत हे प्रत्येक भारतीयाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. अनेक स्थाने, अनेक गावे यांचा संबंध रामायण आणि महाभारताशी जोडला गेलेला आढळतो. त्यातूनच तयार होतात अनेक कथा, उपकथा, दंतकथा आणि मग त्या विशिष्ट स्थानाचे महत्त्व अजून उजळून निघते. एकचक्रा हे नावसुद्धा पांडवांशी संबंधित आहे. बकासुर नावाच्या राक्षसाचा भीमाने वध केला आणि याच एकचक्रा गावातील लोकांची त्या राक्षसाच्या तावडीतून सुटका केल्याची कथा सर्वपरिचित आहे. एकचक्रा नावाचे अजून एक गाव पश्चिम बंगालमध्ये असून पांडवांनी बकासुराचा वध त्याच एकचक्रानगरीमध्ये केला असेही सांगितले जाते.
नागपूर-वर्धा रस्त्यावर सुमारे २५ कि.मी. अंतरावर केळझर किल्ला आहे. या केळझर किल्ल्यावरच हे प्राचीन गणेशाचे देवालय वसले आहे. स्थानिक याला पांडवकालीन गणेशस्थान असेही म्हणतात. पांडवांनी बकासुर वधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रानगरी म्हणून ओळखले जायचे. अर्थातच या गणेशालासुद्धा एकचक्रागणेश असे म्हणतात. केळझरच्या किल्ल्यावर उंच जागेवर हे गणेश मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पुष्कर्णी आहे. ही पुष्कर्णी चौकोनी असून दगडांनी भक्कम बांधलेली आहे. विहिरीतील पाण्यापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधून काढल्या आहेत. रस्त्याच्या दक्षिणेकडे एक तलाव आहे. या तलावात बाहुबलीची काळ्या दगडाची एक मूर्ती सापडली होती.गणेश मंदिरातील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची असल्यामुळे याला सिद्धिविनायक असे म्हणतात. भाद्रपद आणि माघी चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो. मंदिराजवळच धर्मशाळा बांधलेली आहे.अलीकडच्या काळापर्यंत गणेशाच्या मंदिरात रेडयाचा बळी देण्याची प्रथा सुरू होती. मात्र आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : वर्धा, बडनेरा, अमरावती, नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूर, वर्धा, यवतमाळहून सतत बससेवा उपलब्ध.
जवळचे रेल्वेस्थानक : वर्धा, बडनेरा, अमरावती, नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूर, वर्धा, यवतमाळहून सतत बससेवा उपलब्ध.
भृशुंड, मेंढा (जिल्हा-भंडारा) –
भंडारा शहरापासून 61 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महार्माग क्रमांक 6 वर मेंढा हे उपनगर आहे. तेथे घुमटीत गणेश प्रतिमा आहे. या भागाचे प्राचीन नाव शांडिल्यग्राम असल्याचा उल्लेख आढळतो. वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराचा इतिहास काही दुर्मीळ पुस्तकांमध्ये आढळतो.गणेशमूर्ती साधारण अडीच मीटर उंच आणि दीड मीटर रुंद असून तिला ॠषि-मुनींप्रमाणे दाढीमिशा असल्याचे दिसते. मूर्तीवर भरपूर शेंदूर असल्याने बारकावे दिसत नाहीत. उंदरावर गणेश वामललितासनात विराजमान असून सोंड उजव्या बाजूला वळलेली आहे. पायाशी नागाचे वेटोळे, त्यावर गणेशाचे वाहन उंदीर आणि त्यावर हा गणपती विराजमान झालेला आहे. मूर्ती चतुर्भुज असून, एक हात वरद मुद्रेत तर इतर हातात अंकुश, पाश आणि मोदकांनी भरलेले पात्र दिसते. मूर्तीच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग शिल्पित केलेला दिसतो. नेसलेले वस्त्र, जानवे कंबरपट्टापण दिसतो. मंदिराच्या आवारात एका चौथऱ्यावर अंदाजे आठ फूट उंचीची मारुतीची मूर्ती आहे. शिवाय परिसरात अनेक समाध्या दिसतात. या गणपतीला भृशुंडगणपती हे नाव कसे मिळाले याबद्दल एक सुंदर कथा आपल्याला गणेशपुराणात मिळते. नामा कोळी लोकांना त्रास देत असे. तो या परिसरात वाटमारी करीत असे. एकदा तो गणेशतीर्थ या ठिकाणी अंघोळीला गेला असता मुद्गल ऋषी तिथून चालले होते. ते तोंडाने गजानन गजानन असे नामस्मरण करीत होते. नामा कोळ्याने त्यांना मारण्यासाठी आपली तलवार उपसली आणि तो आता वार करणार एवढय़ात ती तलवार गळून जमिनीवर पडली. नामा कोळ्याला पश्चात्ताप झाला आणि आपली पापे धुण्यासाठी काय करावे याची याचना त्याने मुदगल ऋषींकडे केली. मुदगल ऋषींनी त्याला सांगितले की ते परत येईपर्यंत नामा कोळ्याने श्री गणेशाय नम: असा जप सुरू करावा. तसेच त्यांनी एक वाळकी काठी दिली आणि तिला रोज पाणी घालायला सांगितले. जेव्हा त्या काठीला पालवी फुटेल तेव्हा मी परत येईन, असे आश्वासन मुद्गल ऋषींनी दिले. नामा आता मंत्राचा जप करू लागला. अनेक वष्रे अशीच गेली आणि मुदगल ऋषी तिथे परत आले. त्यांना त्या काठीच्या जागी एक भलामोठा वृक्ष आणि एक मुंग्यांचे वारूळ दृष्टीस पडले. वारुळातून श्री गणेशाय नम: असा आवाज येत होता. ऋषींनी ते वारूळ बाजूला करून पाहिले तर त्यांना नामा कोळी नामस्मरण करताना आढळला. तो गणेशसाधनेत इतका गणेशमय होऊन गेला होता की त्याला नाकाच्या ठिकाणी गणपतीप्रमाणे सोंड फुटली होती. मुदगल ऋषींनी त्याचे तप आणि त्याची सोंड पाहून त्याचे नामकरण भृशुंड ऋषी असे केले. या भृशुंड ऋषींनीच इथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. मुदगल ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला की आणि जो कोणी या ठिकाणी दर्शनाला येईल त्याला सर्व शक्ती प्राप्त होतील असे सांगितले.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूर आणि भंडाऱ्याहून सतत बससेवा उपलब्ध.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूर आणि भंडाऱ्याहून सतत बससेवा उपलब्ध.
शमी विघ्नेश -आदासा
नागपूर शहरापासून आदासा मंदिर नागपूर ते कळमेश्वर महामार्गावर असून अंदाजे ४० किमी.अंतरावर आहे.नागपूर - छिंदवाडा लोहमार्गावर पाटणसावंगी या स्थानकापासून १२ कि.मी. अंतरावर आदासा हे क्षेत्र आहे. तसेच कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडय़ापासून ४ कि.मी.वर असलेल्या एका उंच टेकडीवर हे पुरातन गणेश मंदिर असून मंदिर पूर्वाभिमुख आहे. पुराणात उल्लेखित या क्षेत्राचे प्राचीन नाव म्हणजे ”अदोष क्षेत्र”. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील आदासा गाव जवळ उंच पर्वतावर विघ्नहर्त्याचे प्राचीन मंदिर आहे. आदासा हे क्षेत्र अतिप्राचीन असून या क्षेत्राची महिमा वामन पुराणात आढळून येते. येथील गणपतीची प्रतिमा ही प्राचीन असून वामनाने ही मूर्ती स्थापित केल्याचा उल्लेख वामन पुराणात दिसून येतो. येथील गणपती हा ”शमी विघ्नेश वक्रतुंड गणपती” नावाने प्रसिद्ध आहे.मंदिरात गणेशाची भव्य अशी मूर्ती दृष्टीस पडते. या गणपतीच्या मूर्तीला ‘शमी विघ्नेश’ म्हणतात. ती महाराष्ट्रातील सर्वांत उंच गणेशमूर्ती आहे ही जवळपास ६ मीटर उंच आहे. मूर्तीवर शेंदुराचे लेपन मोठय़ा प्रमाणावर असल्यामुळे मूर्तीची वैशिष्टय़े समजत नाहीत. परंतु ही मूर्ती नृत्यगणेशाची आहे असे अभ्यासक सांगतात. मूर्ती नृत्याच्या मुद्रेतील असून संधारा प्रकारची आहे.ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती वाटते. या गणेशमंदिराचे बांधकाम पाषाणाचे आहे. या परिसरात महादेव, भैरव आणि हनुमंतासह इतर दैवतांचीही मंदिरे आहेत. त्यासोबतच, काही बांधकामांचे भग्नावशेषही परिसरात विखुरलेले आहेत. येथील शंकराच्या मंदिरात असलेली पिंड दक्षिणाभिमुख आहे. इतर पिंडी उत्तराभिमुख असतात. परिसरात बारा ज्योतिर्लिंगही मांडण्यात आले आहेत. स्थानिक हस्तकलांची आणि इतर उत्पादनांची बाजारपेठ मंदिर परिसरात तयार झाली आहे.गणेश पुराणात वर्णन केलेल्या मूर्तीपैकी ही एक आहे.वामन पुराणात या गावाचे नाव अदोष क्षेत्र असे आढळते. गाणपत्य संप्रदायाच्या भाविकांसाठी या स्थानाचे विशेष महत्त्व आहे.
याबद्दलची कथा अशी की महापाप, संकष्ट आणि शत्रू या तीन दानवांनी जगाला त्राही त्राही करून सोडले होते. या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी शंकर-पार्वतीरूपी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली गणेशाची आराधना केली. तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रकट झाला आणि त्याने त्या तीनही दानवांचा संहार केला. ज्या स्थळी ही कथा घडली त्या ठिकाणी मुदगल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थान केली. तेच हे अदोष क्षेत्र.
या ठिकाणाची दुसरी कथा अशी की प्राचीन कथे नुसार राजा बळीने इंद्र पद प्राप्त करण्या साठी १०० यज्ञा चा संकल्प केला. या साठी राजा बळीने सत्कार्य आणि अटल भक्ती केली. राजा बळीच्या इंद्रपद प्राप्त करण्या साठी सुरु असलेल्या यज्ञाची माहिती जेव्हा देवलोकात पसरली तेवा सगळे देव चिंतीत झाले. राजा बळीच्या हे यज्ञा चा विध्वंस करण्या करिता भगवान विष्णूने वामन अवतार घेतला व स्वताला शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी भगवान विष्णूने वामन अवतारात याचा अदोष क्षेत्रात भगवान गणेशाची आराधना केली. पुढे याच भगवान गणेशाच्या कृपेने वामनाने राजा बळीचा विध्वंस केला. भगवान गणेशाने दिलेल्या वरदान मुळे वामनाने राजा बळीचा विधवंस केला म्हणून वामनाने या ठिकाणी वक्रतुंड नावाने गणपतीची मूर्ती स्थापित केली. आज जी आपल्याला या ठिकाणी दिसते ती मूर्ती तीच आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून हे क्षेत्र वामनवरद वक्रतुंड क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले.
मंदिर टेकडीवर वसलेले असल्याने तेथून आजूबाजूचा परिसर नयनरम्य दिसतो. गणेशाच्या २१ स्थानांपकी हे एक जागृत गणेश स्थान आहे. इथे माघ शुद्ध चतुर्थीला मोठा उत्सव असतो. अविवाहित लोकांची या गणेशाच्या उपासनेने लग्न जमतात असे मानले जाते.मंदिर व्यवस्थापनाने अतिशय नीटनेटकी अशी इथली व्यवस्था केलेली दिसते. पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, पूजा-प्रसादाची वेगळी व्यवस्था, नारळ फोडण्यासाठीचे यंत्र अशा अद्ययावत सोयी भक्तांसाठी इथे केलेल्या आढळतात.जवळच असलेले 'प्रति पंढरपूर' अर्थात धापेवाडा क्षेत्र आणि ताजुद्दीन बाबांचे वाकी क्षेत्रही पर्यटकांमध्ये विशेष प्रसिध्द आहे.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूरहून भरपूर आणि सतत बससेवा उपलब्ध.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूरहून भरपूर आणि सतत बससेवा उपलब्ध.
चिंतामणी गणेश -कळंब
भक्तांच्या सर्व चिंतांचे हरण करणारा चिंतामणी वसला आहे नागपूर-यवतमाळ राज्य महार्माग क्रमांक 3 वर कळंब या गावी. प्रसिद्ध एकवीस गणपती क्षेत्रांपकी एक पीठ असलेले प्राचीन कदंबपूर म्हणजेच आजचे कळंब होय. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर आहे. कळंब गावचे प्राचीन नाव कदंबसारक किंवा कदंबगिरिग्राम असल्याचे उल्लेख वाकाटक नृपती प्रवरसेन दुसरा याच्या ताम्रपटात आलेले आहेत. कदंब ऋषींचा सुद्धा या स्थानाशी संबंध जोडला जातो.
इथले गणपती मंदिर काहीसे निराळे आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे ३५ फूट खोल आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारातून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते. या कुंडाला गणेशकुंड असे म्हणतात. यातून सुमारे दर १२ वर्षांनी आपोआप पाणी वर येते. हे कुंड गणपतीने अंकुशाच्या प्रहाराने तयार केले तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली असल्याचे मानतात.त्याचे पाणी औषधी असल्याचे सांगतात. कोणतेही त्वचारोग त्या पाण्याने दूर होतात, असे इथे सांगितले जाते. गणेश कुंडाच्या समोरच मुख्य गाभार६यात देवेंद्रवरद श्री चिंतामणीची दक्षिणाभिमुख मूर्ती आहे. ही श्री गणेशाची जगातील एकमेव दक्षिणाभिमुख मूर्ती असल्याचे मानले जाते. तीन जिने उतरून आपल्याला तिथे जावे लागते. मूर्तीवर खूप मोठय़ा प्रमाणात शेंदूर साचलेला असल्यामुळे मूर्तीची वैशिष्टय़े समजत नाहीत. जवळच एक चौकोनी पावनकुंड असून या ठिकाणी एक निसर्गनवल पाहायला मिळते. इथे जमिनीखाली पाण्याचे प्रवाह आहेत. त्या पाण्याची पातळी वाढायला लागून या गाभाऱ्यात पाणी साठू लागते आणि गणेशमूर्तीच्या पायाला पाणी लागले की पुन्हा ते ओसरते. असा प्रसंग बारा वर्षांतून एकदा घडतो.
जवळच असलेल्या एका छोटय़ा गाभाऱ्यात शिविलग प्रस्थापित केलेले आहे. तसेच वरच्या पातळीत काही प्रतिमा कोरलेल्या दिसतात. एका खांबावर चारही बाजूंनी गणेश प्रतिमांचे अंकन केलेले पाहायला मिळते. मंदिरासमोर उभारलेल्या ध्वजस्तंभाचा हा अवशेष असल्याचे जाणवते.
लोककथा
ब्रह्मदेवाने एक लावण्यवती स्त्री निर्माण केली, तिला आपली मुलगी मानले. त्याने या मुलीचे नाव अहल्या ठेवले. अहल्येच्या लावण्याने देव, दानव, मानव, यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग वगैरे सगळेच मोहित झाले होते. अहल्येचा विवाह करावा असे जेव्हा ब्रह्मदेवास वाटले तेव्हा त्याने एक पण जाहीर केला त्यानुसार जो कोणी प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्यालाच अहल्येशी विवाह करता येणार होता. पण ऐकून सारेच पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. हा पण आर्यवर्तातल्या महर्षी गौतम यांच्या कानावरही आला. त्यांनी प्रसूत होणाऱ्या आश्रमातील गायीस प्रदक्षिणा घालून ब्रह्मदेवाकडे शास्त्राप्रमाणे अहल्येची मागणी केली. ब्रह्मदेवाने शास्त्राधार मान्य करून महर्षी गौतम यांना आपली कन्या प्रदान केली.
पृथ्वी प्रदक्षिणेसाठी गेलेल्या मंडळीतील देवराज इंद्र सर्वप्रथम परत आल्यावर त्याला अहल्येच्या विवाहाची बातमी कळली. पण विवाह झाला असल्याने काही उपाय नव्हता. अहल्येच्या लावण्याने इंद्र घायाळ झाला होता. महर्षी गौतम आपल्या आश्रमात नाहीत असे पाहून इंद्राने गौतमाचा वेष धारण करून अहल्येशी दुराचार केला. महर्षी गौतम यांना हे कळताच त्यांनी इंद्राला महारोगी होण्याचा शाप दिला. इंद्राने महर्षी गौतम यांची क्षमा मागितल्यावर गौतम ऋषींनी गणेश षडाक्षर मंत्राचा उपदेश इंद्रास केला आणि विदर्भात करंब (कळंब) येथे जाऊन श्री चिंतामणीची तपश्चर्या करण्यास सांगितले. इंद्राच्या तपश्चर्येने श्री गणेश प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या अंकुशाने एक कुंड निर्माण केले. या कुंडातील पाण्याने स्नान करून इंद्राचा रोग नाहीसा झाला. तेव्हापासून या पाण्याने पापक्षालन होते असे मानतात. स्नान झाल्यावर इंद्राने तेथेच गणेशाची स्थापना केली आणि गणेश अभिषेकासाठी स्वर्गातून गंगेला पाचारण केले आणि तिला आदेश दिला की दर १२ वर्षांनी तिने पृथ्वीवर येऊन श्री गणेशाच्या पायाला स्पर्ष करून जावे. तेव्हापासून दर १२ वर्षांनी कळंबच्या मंदिरातील कुंडातून गंगा वर येते आणि देवाच्या चरणांना स्पर्श करून निघून जाते. हे दृश्य पाहण्यासाठी मंदिरात लाखो लोक जमतात.
गेल्या शतकात सन १९१८, १९३३, १९४८, १९५८, १९७०, १९८३ आणि १९९५ या वर्षी मंदिरातील कुंडातून गंगा अवतरली आहे.मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर असलेल्या सभामंडपाची निर्मिती बालगंधर्व यांनी केली आहे. यवतमाळ येथे झालेल्या एका कार्यक्रमाची संपूर्ण मिळकत त्यांनी या कामी खर्च केली.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : वर्धा, बडनेरा, अमरावती, नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूर, वर्धा, यवतमाळहून सतत बससेवा उपलब्ध.
पंचमुखी गणपती ( सर्वतोभद्र ) पवनी
भंडारा जिल्ह्यात वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या भंडारा शहरापासून 50 आणि नागपूरहून 87 किलोमीटर अंतरावर असलेल्या पवनी गावात असलेला हा गणपती म्हणजे विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आगळावेगळा गणपती म्हणायला हवा. इथे गणपतीची मूर्ती नसून, त्याऐवजी मंदिरात एक उभा पाषाण आहे आणि त्याला पाच बाजूंनी पाच तोंडे आहेत. हा एक स्तंभ आहे. यास गणेशपट्ट असेही म्हणतात. येथे राहणार्या श्री भट यांचे घरासमोर ओसरीमध्ये हा सुमारे ९० सेंटीमीटर. उंचीचा स्तंभ आहे. याचे चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत. तर कर्णछेदरेषेवर पाचवी प्रतिमा आहे. मूर्तीवर शेंदुराची खोळ असल्याने बारकावे स्पष्ट दिसत नाहीत.याच्या सर्व बाजूंनी गणपतीची तोंडे असल्यामुळे कोणत्याही बाजूने याचे दर्शन घेता येते. सर्व दिशांनी किंवा सर्व बाजूंनी ज्याचे दर्शन घेता येते तो सर्वतोभद्र किंवा अशा मूर्तीला सर्वतोभद्र मूर्ती असे म्हटले जाते.याला सर्वतोभद्र गणपती, भद्रा गणपती, पंचानन, विघ्नराज अशा विविध नावांनी संबोधले जाते.
केवळ विदर्भाच्याच नव्हे, तर सर्ंपूण महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात प्राचीन स्थळ असा लौकिक असलेले पवनी हे स्थळ आहे. पवनी गावाभोवती तटबंदी बांधलेली दिसते. शहराच्या उत्तर दिशेला वैनगंगा नदी वाहते. इतर दिशेला दगडी तटबंदी आहे.परिसरातील इतर गावांसाठीची एक महत्त्वाची व्यापारी पेठ, असे या गावचे महत्त्व आहे.गावाच्या मध्यवर्ती भागात घरगुती वाटावे असे गणेशाचे मंदिर असून, त्यात ही गणपतीची मूर्ती प्रस्थापित केलेली दिसते. मंदिराच्या समोर एक गरुडखांब आहे. बांधकामात कोकणातल्यासारखे इथे चिरे वापरलेले दिसतात. हे मंदिर पालांदूर गावच्या श्रीहरिस्वामी जोशी यांनी बांधल्याचे सांगतात.या मंदिराची मालकी गेल्या १३ पिढय़ांपासून भट कुटुंबाकडे आहे. या मंदिराशिवाय पवनी गावात विविध ठिकाणी इतर दैवतांची मंदिरेही असून पुरातत्त्व अभ्यासकांसाठी हे एक आकर्षणाचे केंद्र आहे. सम्राट अशोकाच्या शासनकाळात बांधलेला आणि ह्युआन त्सँगच्या पुस्तकात उल्लेख असलेला स्तूपदेखील अभ्यासनीय आहे.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूर आणि भंडारा येथून सतत बससेवा उपलब्ध.
वरदविनायक गौराळा-भद्रावती
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावाजवळील गवराळा येथील असलेले एक मंदिर. हे गाव भद्रावतीहून सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे.नागपूरपासून भांदक (प्रचलित नाव भद्रावती) 130 किलोमीटर अंतरावर आहे. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील भद्रावती म्हणजे भांदक या ठिकाणी विदर्भातल्या अष्टविनायकांपकी एक असलेला वरदविनायक एका टेकडीवर वसलेला आहे. हे मंदिर असलेली टेकडी पूर्वी गायींना चरण्यासाठी राखीव होती म्हणून या ठिकाणाला गौराळा असे नाव पडले. या संपूर्ण परिसराला प्राचीनतेचा स्पर्श लाभलेला आहे. वाकाटक या बलाढय़ राजवटीखाली असलेला हा प्रदेश मोठा समृद्ध होता. तत्कालीन स्थापत्याचे जे काही अवशेष आज पाहायला मिळतात त्यात या ठिकाणाचा समावेश होतो. टेकडीवर चढत असताना वाटेत काही भग्न मूर्ती पाहायला मिळतात. याच टेकडीच्या मागच्या अंगाला एक गुहा खोदलेली असून त्यात काही सुंदर शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात. त्यात गणपती, शेषशायी विष्णू, त्रिविक्रम या मूर्ती आहेतच, परंतु तिथेच दोन मीटर उंचीची केवल नरसिंहाची सुंदर मूर्ती कोरलेली दिसते. ही मूर्ती पाहून रामटेक इथल्या नरसिंहाच्या मूर्तीची आठवण होते.
गणपती मंदिराला १६ खांब असलेला भव्य सभामंडप आहे. गणपती मंदिर आणि मूर्ती दोन्ही उत्तराभिमुख आहेत. मुख्य गाभारा काहीसा खालच्या पातळीत असल्यामुळे काही पायऱ्या उतरून प्रवेश करावा लागतो. आत अंदाजे आठ फूट उंचीची गणेशाची बसलेल्या स्थितीतली मूर्ती आहे. उजवा पाय मुडपून जमिनीवर आहे तर डावा पाय दुमडून शेजारी उभ्या स्थितीत दिसतो. देवाला दोनच हात असून दोनही हातात मोदकपात्र दिसते. गणपतीच्या पोटात काही धन असेल असे वाटल्यामुळे काही चोरांनी त्याची नासधूस केली होती. आता ते पूर्ववत केलेले आहे. गणपतीच्या मस्तकाभोवती प्रभामंडळ कोरले असून त्यावर मुकुट कोरलेला दिसतो. प्रसन्न अशी गणपतीची मूर्ती आणि हा सगळाच परिसर आवर्जून पाहावा असा आहे.हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली पद्धतीचे आहे.मंदिराचे बांधकाम १२व्या शतकातले वाटते, पण मूर्ती त्याहून प्राचीन असावी
काही वर्षांपूर्वी मंदिर कोसळले आणि पुरातत्त्व विभागाच्या वतीने पुन्हा त्याची उभारणी करण्यात आली. अडीच मीटर उंच आणि 1.10 मीटर रुंदीच्या या मूर्तीवरही शेंदुराचे थर असून मंदिर परिसरात मोठया संख्येने प्राचीन मूर्तींचे अवशेष आढळून आले आहेत. त्यापैकी काही नागपूरच्या संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. मूर्तीच्या दोन्ही हातात मोदकपात्रे आहेत. ही मूर्ती वाकाटकांच्या काळातील असावी, असा अंदाज आहे.
या ठिकाणाशी एक पौराणिक कथा निगडित आहे. गृत्समद ऋषींचा, ते इंद्र आणि मुकुंदा नावाची ऋषीपत्नी यांचा अनौरस पुत्र आहेत असे हिणवून अपमान केला गेला. त्यामुळे उद्विग्न होऊन ऋषी या ठिकाणी कठोर तपश्चय्रेला बसले. श्रीगणेश त्यांना प्रसन्न झाला आणि त्यांच्यावरील सर्व किटाळ दूर केले. ऋषींनी त्याप्रीत्यर्थ या ठिकाणी ही वरदविनायकाची प्रतिमा प्रस्थापित केली, असे वर्णन गणेशपुराणात केलेले आहे.भांदक अर्थात भद्रावती ही प्राचीन नागरी असून इथे झालेल्या विविध उत्खननामधून अनेक पुरातत्त्वीय अवशेष, विविध मूर्ती मिळालेल्या आहेत.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : वर्धा, चंद्रपूर, बल्लारशा, नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूर, वर्धा, वरोरा आणि चंद्रपूरहून सतत बससेवा उपलब्ध.
जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : वर्धा, चंद्रपूर, बल्लारशा, नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूर, वर्धा, वरोरा आणि चंद्रपूरहून सतत बससेवा उपलब्ध.
9850339240




















































































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.