Monday, August 8, 2022

पावसाळी भटकंती - कुंडमळा

 शनिवारी ऑफिस मध्ये खूपच कंटाळा आला होता म्हणून मोबाइल वर व्हिडिओस बघ नोटिफिकेशन्स बघ अस चालला होता तेवढयात गूगल ला एक लेख दिसला पुण्यापासून ३० किमी अंतरावर भेट द्या या ठिकाणाला. जवळच असल्यामुळे उत्सुकता चाळवली. तळेगाव जवळ बेगडेवाडी रेल्वे स्टेशन पासून साधारण १ ते १.५ किमी जवळ हे ठिकाण आहे फोटो मध्ये अहमेडनगर जवळ असणारे निघोज आणि महाड जवळच्या वाळण कुंड सारखे दिसत होते. आणि दुचाकी वर अर्ध्या दिवसात होण्या सारखा ठिकाण होत. रविवारी सकाळी सगळं यावरून ९ वाजता घरून निघालो रावेत जवळ नाष्ट्या साठी थांबलो. नाश्ता झाल्यावर मिपाकर मार्गी यांनी केलेला सायकल मार्ग रावेत - किवळे जवळ एक लोखंडी पूल होता तो बघून जाऊ असा विचार करून गाडी तिकडे घेतली . अगदी ५ ते १० मिनिटांमधे त्या पुलावर पोचलो. तिथलं दृश्य अतिशय रमणीय होता. पुलावरून नदीचा विस्तीर्ण जलाशय आणि दोन्ही बाजूने हिरवळ आणि त्यात पक्षी पोहोताहेत. चांगला कॅमेरा असायला हवा होता असा राहून राहून वाटत होता. पुलावरून चार चाकी गाडी गेली कि पूल खूप हालत होता. कधीही पड्तोय कि काय अस वाटत होत. तिथून निघून अगदी १५ ते २० मिनिटांमध्ये कुंड मळ्याजवळ पोहोचलो रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती. बरेच जण बेगडेवाडी रेल्वे स्टेशनहुन चालत जाताना पण दिसत होते. आधी यायला नाही म्हणणारा माझा मुलगा तिथला तो छोटासा पण मनमोहक धबधबा पाहून खुश झाला आणि पाण्यात उतरायला तयार झाला . तिथे गेल्या गेल्या माझ्या मनात आला कि खूप पावसात याचा वेगळा रूप आणि पाऊस नसताना एक वेगळा रूप दिसत असेल. २ - ३ तास तिथे घालवल्यावर आम्ही तिथून निघालो येताना ऊन पाऊस असा खेळ चालू होता म्हणून थेट घरीच आलो.

पूल

पवना नदि

पवना नदि

धबधबा


सकाळी घोराडेश्वरला जा (जुन्या मुंबई पुणे महामार्गाला लागुनच आहे) अर्ध्या तासात पायर्‍या चढून वर पोचाल. तेथे गुहेमधे शंकराचे सुंदर मंदीर आहे. गुहेपासून थोडे पुढे चालत गेलात की लांबवर गहुंजे क्रिकेट स्टेडीयम आणि द्रुतगती महामार्ग दिसेल. घोराडेश्वर डोंगर उतरुन खाली आलात की मिसळ-पाव, चहा भजी वगैरे मिळेल. कुंडमळा तिकडुन ४ - ५ किमी असेल. गाडीने १०-१५ मिनिटात पोचाल. सुंदर ठिकाण आहेत. खायला भजी, वडा वगैरे. मोठी हॉटेल्स नाहीत. पण तुम्ही सकाळी ६.३०-७ ला जरी निघालात तरी घोराडेश्वर आणि कुंडमळा करुन दुपारच्या जेवणासाठी पिंचि मधे किंवा पुण्यात जावु शकता.

हो जवळच घोरडेश्वर म्हणून छोटा ट्रेक आहे तो करू शकता. तिथे नाश्ता लिंबू पाणी वडा पाव अस खायला आहे आणि हायवे ला खूप हॉटेल्स आहेत. वेळ असेल तर वडगाव मावळ ला दोन समोर समोर हॉटेल आहेत तिथल्या मिसळ ची चव घेऊन बघा

http://www.misalpav.com/node/50547




















No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...