विषय ओळख प्रथम परिच्छेद सोडून देव शां. भा. यांच्या महाश्मयुगीन संस्कृति या मराठी विश्वकोशातील लेखावरून.
मानवी मनाचा एक धागा प्रिय आप्त स्वकीयांच्या स्मृतींशी जुळलेला असतो. मृतांचे दहन केल्यानंतर विधी आणि प्रथा पाळल्या जातात तसे दफन केलेल्या व्यक्तींसाठीही विवीध सांस्कृतिक समुदाय प्रथा पाळत जसे मृतव्यक्ती सोबत अन्न आणि इतर वस्तु आणि बर्याचदा प्राणि पुरणे. ज्या समुदायांच्या इतिहासाचे लिखीत माध्यमातून जतन होऊ शकले नाही अशा संस्कृतींच्या प्राचीन दफनभूमींचा पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहास संशोधक संशोधन आणि अभ्यास करत असतात.
प्रागैतिहासिक काळात मोठमोठ्या ओबडधोबड दगडांची रचना करून स्मारके उभी करण्याची पद्धती होती त्या लोकांच्या संस्कृतीला महापाषाण किंवा महाश्मयुगीन संस्कृती (मेगॅलिथिक कल्चर) म्हणतात. मानवी सांस्कृतिक इतिहासात महाश्मयुग वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचे ठरलेले आहे. त्याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत : (१) या संस्कृतीचे अवशेष जगात जवळपास सर्वत्र मिळतात आणि महाश्मयुगीन दफन पद्धतीशी संलग्न असलेल्या काही प्रथा सद्यस्थितीत काही ठिकाणी प्रचलित आहेत. (२) या संस्कृतीचा काळ निरनिराळ्या प्रदेशांत वेगवेगळा आहे. उदा., यूरोपमध्ये या संस्कृतीचा काळ इ. स. पू. तिसरे-दुसरे सहस्रक एवढा असला, तरी भारतात उपलब्ध पुराव्यानुसार तो इ.स.पू. पहिल्या सहस्त्रकाची सुरुवात या आधी फारसा जात नाही.
महाश्मयुगीन संस्कृती समुहां नेमके कोणते होते यांची खुपशी माहिती मिळत नाही. त्यामुळे याबद्दल अभ्यासकात विविध मते प्रचलित आहेत. पण सर्व ठिकाणी ही महाश्मयुगीन स्मारके मानवी दफनाशी संबद्ध दिसतो. यूरोपातील फार मोठा प्रदेश या संस्कृतीने व्यापला आहे तथापि भारताप्रमाणेच यांची वसतिस्थाने उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे या संस्कृतींशी निगडीत असलेले अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित राहिलेले आहेत.
भारतीय उपखंडातील महाश्मयुगीन अवशेषांबद्दल अद्याप फारसे विस्तृत संशोधन झालेले नाही. भारतात महाश्मयुगीन संस्कृतीचे तीन प्रादेशिक विभाग पडतात : (१) दख्खन, (२) उत्तर व वायव्य प्रदेश आणि (३) ईशान्य प्रदेश. (उत्तर भारतात फारसे अवशेष सापडलेले नाहीत) .. बलुचिस्तान आणि मकरान येथील अवशेषही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या भागातील महाश्मयुगीन दफनात एककेंद्रीय चक्राचे चित्रण असलेली मृद्भांडी, लोखंडाच्या वस्तू व घोड्याचे अवशेष सापडतात. या प्रादेशिक महाश्मयुगीन संस्कृतीचा एकमेकींशी काही संबंध होता किंवा कसे व तो असल्यास त्याचे स्वरूप काय होते, याबद्दल निश्चित पुरावा उपलब्ध नाही आणि अवशिष्ट पुराव्याबद्दलही एकमत नाही.
शिळावर्तुळ दफने सर्वांत जास्त ठिकाणी एकवटल्याचे स्थान महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील खैरबांडा हे होय. दफनातील ही विविधता बऱ्याच प्रमाणात स्थानिक रीत्या उपलब्ध असलेल्या-प्रस्तर, शिळा, दगडगोटे, फरशा या सामग्रीमुळे आलेली आहे, हे नमूद करणे आवश्यक आहे. या विविध प्रकारांना इंग्रजीत भिन्न नावे दिलेली आढळतात: केर्न सर्कल, सिस्ट सर्कल, मेनहीर, डॉलमेनॉइड सिस्ट, टोपीकल इत्यादी. .. नागपूरजवळील माहुरझरी येथील शिळावर्तुळाच्या उत्खननात लोखंडी छिन्न्या, भाले, चपट्या कुऱ्हाडी, तलवारी, कट्यारी, त्याचप्रमाणे कढ्या, बांगड्या व नखण्या मिळाल्या आहेत. याव्यतिरिक्त नक्षी असलेली तांब्याची कडी, सोन्याची कर्णफुले व कंठमाला इ. वस्तूही मिळाल्या. यांपैकी एक कट्यार वैशिष्ट्यपूर्ण असून तिचे पाते लोखंडाचे व मूठ तांब्याची आहे. या व्यतिरिक्त घोड्याच्या तोंडावर घालावयाचे व बहुधा चामड्यावर शिवलेले तांब्याच्या पत्र्यांचे बनविलेले अलंकारही घोड्याच्या अवशेषांबरोबर सापडले. मृत्पात्रांत सर्वसामान्यतः वाडगे, थाळ्या, निमुळत्या बुडाची भांडी असून त्यांच्या झाकण्यांवर कळ्यांची अथवा चार पक्ष्यांची आकृती छोट्या आकारात करून त्या झाकण्यांच्या शीर्षावर बसवल्याचे आढळून आले. (१९८० च्या दशकात झालेल्या संशोधनात या संस्कृतींचा काळ ∼2nd century BC to ∼7th century AD. वर्तवण्यात आला होता)
दफनात आढळून आलेल्या पुराव्यांवरून हे लोक भटके होते का? असा प्रश्न पडतो तथापि त्यात फारसे तथ्य नसावे. या लोकांनी तलाव बांधले, भातशेती मोठ्या प्रमाणावर रूढ केली इ. महत्त्वाच्या बाबी द. भारतातील संगम वाङ्मयातील उल्लेखावरून प्रचलित असाव्यात असे दिसते. महाश्मयुगीन दफनपद्धतीच्या काही प्रकारांचा उल्लेखही संगम वाङ्मयात आलेला आहे मात्र घरेदारे व वसाहती यांच्या स्वरूपाबद्दलचा पुरावा अद्याप फारसा उपलब्ध झालेला नाही. अगदी अलीकडे महाराष्ट्रात नागपूरजवळील नैकुण्ड व भागी माहारी या ठिकाणी झालेल्या उत्खननात या लोकांच्या गोल झोपड्यांचे अवशेष त्याचप्रमाणे लोखंड बनवायच्या भट्ट्या व गहू, तांदूळ, जव व वाटाणे या धान्यांचे अवशेष सापडले आहेत.
महाश्मयुगीन संस्कृतीचा भारतातील काळ आतापर्यंत तरी प्रामुख्याने दक्षिण भारतातील या संस्कृतीच्या संदर्भात उपलब्ध झालेल्या कार्बन-१४ कालमापनानुसार बराचसा निश्चित करण्यात आला आहे. विसाव्या शतकाच्या मध्यास सर मॉर्टिमर व्हीलर यांनी ब्रह्मगिरीच्या उत्खननाच्या आधारे महश्मयुगीन संस्कृतीचा काल इ.स.पू.सु. २०० ते इ. स. पहिल्या शतकाचा मध्य असा वर्तविला. काही महाश्मयुगीन दफनांत रोमन नाणी सापडल्यामुळे या दफनांचा अंतिम काल इसवी सनाचे पहिले शतक असा निश्चित करता येतो तथापि हल्लूर (कर्नाटक) व टाकळघाट (महाराष्ट्र) येथील पुराव्यांच्या कार्बन –१४ पद्धतीनुसार आलेल्या सनावळ्या अनुक्रमे इ.स.पू. ९५० ± १०० व ११०५ ± १०० आणि इ.स.पू. ५५५ ± ११५ व ६०५ ± ११० अशा असल्याने महाश्मयुगीन संस्कृतीचा प्रारंभकाल कमीतकमी इ.स.पू.सु. १००० इतका मागे नेता आलेला आहे.
***
याच विषयास अनुसरुन विदर्भातील उबळी (नागपूर) आणि चंद्रपूर येथील अवशेषावर आधारीत संशोधन लेख New chronology for MEGALITHIC BURIALS IN VIDARBHA Nikhil Patelअलिकडे (जुलै २०२२) प्रकाशित झालेला आहे. संशोधकांच्या मते मध्य भारतातील महाअश्मयुगीन संस्कृतीबद्दलचे हे संशोधनामुळे तेथिल संस्कृतीच्या अभ्यासास साह्य्यकारी आहेच पण सोबत दक्षिण भारतीय Neolithic-Chalcolithic सांस्कृतिक काळाच्या (∼500 BC to ∼AD 700) अभ्यासासाठी उपयूक्त ठरू शकेल. या वैदर्भीय अश्मयुगिन दफनभूमींची वैशिष्ट्ये म्हण्जे Cairn म्हणजे वर्तुळाकार दगडांनी झाकलेले असणे, अनेक मानवाशेषांसोबत पुरलेल्या घोड्यांचे अवशेष आणि अन्नावशेष असलेली मातीची भांडी मिळणे. हाडांच्या अवशॅषांच्या अभ्यासास बर्याचदा मर्यादा पडतात अशावेळी दातावरील आवरण आणि मातीच्या भाडंयातील अन्नावशेश आणि हे अवशेष पुरलेली माती यांचा अभ्यास मदतीस येतो. या तिन्ही गोष्टींच्या वैज्ञानिक संशोधनातील काळ एकमेकांशी पुरेसा जुळल्याने (ओव्हरलॅप) असा एकत्रित व पद्धतशीर तौलनिक पडताळणी करणारे हे संशोधन रोचक ठरावे.
उबळी येथिल उत्खननात संशोधकांना nail-parers, spearheads, chisels, bridle bits used for horses, a large number of aurum (archaic gold) micro disc beads, and semi-precious stone beads. The faunal remains here consisted mainly of horse bones and teeth. या गोष्टी मिळाल्या होत्या. तुलनेसाठी १९९५ ९६ काळात चंद्रपूर उत्खनात सापडलेल्या घोड्यांच्या दातांचाही अभ्यास केला गेला.
हे नवे संशोधन म्हणते " However, we here presented new AMS 14 C dates of Megalithic culture in Vidarbha region by dating equine teeth enamel of Ubali burials (Meg-10 and Meg-33) and organic food remains recovered from burial cooking pots. The total age range for Ubali megaliths of the Vidarbha region is AD 250–1016 .. the regional ecosystem of Vidarbha should have experienced water stressed conditions. This scenario is corroborated .. that during early historic times (1st–7th century AD), the Vidarbha region was likely receiving significantly less rainfall .. compared to today.
* पुर्वी वर्तवलेल्या (∼500 BC to ∼AD 700) काळ भाकीता पेक्षा AD 250–1016 हे काळ भाकीत संस्कृतीच्या अधिक काळाची म्हणजे इस्वी 1016 पर्यंत शक्यता वर्तवते.
* The generated isotopic data clearly indicated crop-vegetation values (C 4, millet type).
*
* प्रागैतिहासिक लेखी इतिहास उपलब्ध आहे त्या आधीचा काळ * मी लेख विषयाचा अभ्यासक नसल्यामुळे लेखातील उल्लेखातील त्रुटींबद्दल चुभूदेघे. * या विषयाशी अधिक माहिती उलगडण्यात कुणि मदत करू शकेल तर नक्कीच सहर्ष विनंती आणि स्वागत * विषयास अनुसरून नसलेले, भाषा व्याकरण शुद्धलेखन विषयक प्रतिसाद न देण्यासाठी आभार.
शिवमंदिरांच्या राज्यात – चिखलीचा शिववास
सामना ऑनलाईन
4-5 minutes
>> नीती मेहेंदळे
बुलढाणा जिल्हा म्हणजे पहिले डोळ्यासमोर येते ते लोणारचे
जगप्रसिद्ध तळे. सिंदखेडच्या लखुजी जाधवांची कन्या जिजाऊ बाईसाहेब याही
बुलढाण्याच्या. पण पुरातन हेमाडपंती मंदिरांची रेलचेल असलेला जिल्हा ही
बुलढाण्याची फारशी प्रचलित नसलेली ओळख आहे. खरेच! बुलढाण्यात जवळजवळ तीसेक
किलोमीटरच्या अंतरात अशी मंदिरं दिसतात. यावरून इथे आर्थिक राज्यकर्त्यांची
स्थिती उत्तम असणार यात संदेह नाही. साधारण बाराव्या शतकाच्या आसपास
बांधलेल्या या मंदिरांची मध्ययुगात दुरवस्था झाली असली तरी आजही ती आपलं
पुरातत्वीय महत्त्व सांभाळताना दिसतात.
इतकी मंदिरं एकाच विभागात आढळणं म्हणजे त्या विभागात किती सुबत्ता असावी
याचं निदर्शक आहे. एकाच भागात मध्ययुगात बांधली गेलेली इतकी मंदिरं
अन्यत्र कुठेही निदर्शनास पडत नाहीत. मंदिरं म्हणजे ऐतिहासिक समृद्धीचं
प्रतीक समजली जातात. ही सगळी गावं त्या काळातल्या सत्तेची महत्त्वाची ठाणी
असणार. कालांतराने आधुनिक काळात हा भाग शहरीकरणाच्या नादात दूर गेला आणि ही
गावं एकेकटी मागे राहिली. बुलढाण्याच्या प्रत्येक मंदिराचं आपलं खास
वैशिष्टय़ आहे. चिखली या महत्त्वाच्या शहरापासून जवळ अशीच दोन खास मंदिरं
आहेत. सातगाव भुसारी आणि साकेगावची ही दोन शिवमंदिरं म्हणजे मंदिर
स्थापत्याची उत्कृष्ट उदाहरणं ठरलेली आहेत.
चिखलीपासून पाच सहा किमी अंतरावर असलेल्या सातगाव भुसारी येथे एक
शिवमंदिराचं ठाणं आहे. या परिसरात अजून काही महत्त्वाची मंदिरेही आहेत. हा
खरं तर मंदिरसमूह आहे. त्यातलं विष्णू मंदिरही आवर्जून पाहावं असं आहे. हे
शिवमंदिर बाराव्या शतकात बांधल्याचा अंदाज इतिहासकार व्यक्त करतात. त्या
जवळचं विष्णू मंदिर हे भूमिज असून ते पश्चिमाभिमुख आहे. मंदिराच्या मागील
बाजूस महादेवाचं
मंदिर असून त्याची स्थिती अधिक दुःखदायी आहे. नंदीचे मुख भग्नावस्थेत
आहे. मंडपाचं वितान (छत) तुटलेल्या अवस्थेत आहे. मंदिराची बरीच पडझड झाली
असावी, कारण डागडुजी करताना सिमेंट, विटा वापरल्याने नव्याजुन्याचा ओबडधोबड
मिलाफ बघायला मिळतो. मंदिरात खांबांवर घटपल्लव कोरलेले दिसतात. एपंदर
कोरीव काम लाकडावर करावे इतके अतिशय नाजूक हातांनी केलेले दिसते. मंदिर
परिसर अनेक भग्न मूर्तींच्या अवशेषांनी सजलेला दिसतो.
साकेगावचं साकेश्वराचं मंदिरही असंच सातगावसारखं शिल्पकलेचा उत्तम नमुना
ठरलेलं महत्त्वाचं देऊळ आहे. चिखलीपासून थोडं पश्चिमेकडे 10 किमीवर
साकेगाव येथे मध्ययुगातील बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले दगडी शिव
मंदिर आहे. परिसरातील ग्रामस्थांचे दैवत असलेल्या या मंदिरावर चहूबाजूंनी
अनेक शिल्पे व मूर्ती कोरलेल्या आढळतात. देवळाच्या आत महादेवाची पिंडी असून
त्याच्या आजूबाजूस देवदेवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराबाहेर अजून एक लहानसे
मंदिर असून त्यासमोर गद्धेगाळ आहे व त्यावर शिलालेखही आहे.
हे शिवमंदिर पूर्वाभिमुख असून मुखमंडप, गूढमंडप, अंतराळ व गर्भगृह असे
त्याचे भाग पडतात. सध्या गर्भगृहावरचे शिखर बरेच भव्य असून त्यावर सुंदर
मूर्ती कोरलेल्या दिसतात. दगडी खांबांच्या मुख्य प्रवेशद्वाराची अवस्था आता
वाईट असून त्यावरचे छत पडले आहे. मंदिराचे बांधकाम साधारण बाराव्या शतकात
झाले असावे. या मंदिराला समकालीन कोथळी, धोत्रा नंदई, माळगी, मतला, सातगाव
भुसारी अशी अनेक मंदिरे आसपास आढळतात. मंदिराच्या शिखरावर असलेल्या
शिल्पपटात ब्रम्हा, सरस्वती, शंकर, पार्वती, महिषासुरमर्दिनी, इंद्र,
विष्णू-लक्ष्मीच्या प्रतिमा ठळक दिसून येतात. या दोन्ही मंदिरांवर
हेमाडपंती शैलीचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. पुरातत्व खात्याने या
मंदिरांची जबाबदारी घेतली आहे असे दिसून येते आहे, म्हणजे या पुढचे संवर्धन
शास्त्र्ाशुद्ध होईल अशी प्रामाणिक अपेक्षा आहे. चिखलीजवळ जांभोरा येथेही
असेच शिव मंदिर आढळते. मंदिराचं बांधकाम लहानसं असलं तरी त्याचं प्राचीनत्व
लपत नाही. मंदिरात अनेक कमी उंचीचे खांब असून ते चालुक्य शैलीचे दिसतात.
मंदिरात काही मोजक्या चांगल्या अवस्थेत मूर्ती आहेत, पैकी एक उमासहित शिव
मूर्ती आहे. यांखेरीजही अनेक प्राचीन मंदिरे या परिसरात आहेत, पण
त्यांविषयी पुन्हा कधीतरी.
– megmehen@gmail.com
पोळा विशेष : नंदी मंदिर, महागाव कसबा, यवतमाळ
महागाव कसबा येथील प्राचिन शिवालयाच्या गाभाऱ्यातील शिवलिंगा समोर पूर्वेला नंदी मंदिर कोरीव स्तंभावर डौलात उभं आहे. घुंगरमाळा, बेलपत्री व चाळ अशा आभूषणांनी भव्य असा नंदी आपले लक्ष वेधून घेतो. सदर नंदी हा मैसूरच्या चामुंडेश्वर मंदिरातील जगप्रसिद्ध पाषाणी नंदी मूर्तीची लघुप्रतिकृती आहे. तो नंदी जणू भगवान शंकराची आराधना करतोय. शेतकऱ्यांचा सण असलेल्या पोळ्याच्या दिवशी नंदीची मनोभावे पूजा करतात. मंदिर परिसरात बैल पोळा भरतो. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने घरीच पारंपरिक पोळा सण साजरा केला ..!
माहिती - सुनिल आरेकर
नागपूरच्या
फुटाळा तलावात कारंज्याचा लाईट अँड साऊंड शो अखेर सुरू झाला आहे. इथल्या
चौपाटीचं नूतनीकरण झाल्यानंतर आता इथे एक भव्य अशी प्रेक्षक गॅलरी
उभारण्यात आली आहे, जिथून हा शो पाहता येणार आहे.
नागपूर आणि पूर्व विदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण 'मारबत' व 'बडग्या' मिरवणूक उत्सव
पोळ्याचा दुसरा दिवस लहानग्यांचा 'तान्हा पोळा' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी म्हणजेच श्रावण अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी नागपूर शहरात भव्य, नेत्रदीपक असा 'मारबत व बडग्या'चा उत्सव साजरा केला जातो. काठ्या, बांबू, तरट वापरून मारबत देवीचा व बडग्याचा मोठा पुतळा बनवला जातो. त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळून ते विविध रंगांनी रंगविले जातात. काळी व पिवळी मारबत हे नागपूर शहराचे विशेष आकर्षण आहे. दरवर्षी हा सोहळा पाहण्यासाठी केवळ शहरातीलच नव्हे, तर दूरवरच्या गावखेड्यातील हजारो लोक आपल्या लहानग्यांना घेऊन येथे येतात.
नागपूर शहरातील वैशिष्ट्यपूर्ण व जगविख्यात असा 'मारबत व बडग्याचा उत्सव' मूलतः विदर्भाच्या गावखेड्यातील तेली समाजातील एका जुन्या प्रथेचे विस्तारित व भव्य रूप आहे. या प्रथेत पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी, कडुलिंबाच्या किंवा जंगली तुळशीच्या लहान फांद्या आणल्या जातात. त्यांच्या लहानश्या कोवळ्या पानांना मारबतचे केस समजून घर झाडले जाते आणि संध्याकाळी मातीच्या भांड्यात घराघरातून माश्या, डास, कीटक गोळा करून त्यावर लसूण, मिरची, तांदळाची साळी, मोहाची फुले टाकून ते भांडे गावाच्या वेशीबाहेर नेऊन फोडले जाते. त्यामुळे वर्षभर हे कीटक आणि त्यापासून होणाऱ्या रोगराईपासून गावाची सुटका होईल अशी लोकांची धारणा असते. ही प्रथा विदर्भात पूर्वापार काळापासून चालू असून, पावसाळ्याच्या काळातील रोगराईपासून सुटका करून घेण्यासाठी प्रतिकात्मकरीत्या इथल्या गावोगावी पार पाडली जाते.
मूलतः सामाजिक व सांस्कृतिक स्वरूपात असलेली ही प्रथा १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात राजकीय रूप धारण करू लागली. नागपूरात असा समज आहे की - "बांकाबाई हीने ईंग्रजांशी हातमिळवणी केल्याचा निषेध म्हणून तिच्या नावाची मोठी 'मारबत' व तिच्या पतीच्या नावाचा 'बडग्या' उभारून त्यांची मिरवणूक काढतात व संध्याकाळी त्यांचे दहन करतात." इतवारी येथील बारदाना मार्केटमधून निघणाऱ्या काळ्या मारबतीच्या मिरवणूकीची सुरुवात १८८१ मध्ये, तर मस्कासाथ येथील त-हाणे तेली समाजाच्या पिवळ्या मारबतीची मिरवणूक १८८४ मध्ये सुरु झाल्याचे मानले जाते. 'मारबत' आणि 'बडग्या' यांना वाईट शक्तींचे प्रतीक मानून, सबंध शहरातून त्यांची धिंड काढून, शहराबाहेर त्यांचे दहन करतात. यामागे शहर रोगराई-प्रदूषण व समस्यामुक्त ठेवणे व शहरात स्वच्छता राखणे हा उद्देश असतो. "माश्या-कुशा घेऊन जाऽऽ रे बडग्या, ईडा पिडा रोगराई घेऊन जाऽऽ गे मारबत" अश्या मोठमोठ्या आरोळ्या ठोकून चालणारी ही मिरवणूक ही केवळ नागपूरातच नाही तर संपूर्ण विदर्भात जल्लोषाने साजरी केली जाते.
या मिरवणुकीला जवळपास १०० वर्षाची राजकीय परंपरा आहे. मारोतराव कन्नमवारांनी यशवंतराव चव्हाणांशी हातमिळवणी केल्यामुळे या उत्सवाच्या माध्यमातून त्यांच्याविरोधातील निषेध लोकांनी व्यक्त केला होता. मागील काही दशकात तर हा उत्सव राजकीय, सामाजिक व आर्थिक असंतोष व्यक्त करण्याचे विदर्भातील जनतेचे प्रभावी माध्यम ठरत आहे. त्यामुळेच स्वतंत्र विदर्भाची मागणी, वाढता भ्रष्टाचार, महागाईवाढ, महिलांवरील अत्याचार, बालमजदुरी, फसलेले परराष्ट्रधोरण यांविरुद्ध घोषणा देऊन, ह्या वाईट गोष्टी व समस्या 'घेऊन जाऽऽ गं मारबत' अशी विनवणी मारबतला केली जाते.
(लेखन व संपादन - अमित भगत)
कापरा, यवतमाळ येथील नयनरम्य धबधबा
भारद्वाज शिव मंदिर, भर जहागीर, वाशिम
भारद्वाज महाराज संस्थान या नावाने ओळखले जाणारे ऐतिहासिक भगवान शिव मंदिर हे मुख्यतः मोठ्या दगडांनी बनलेले आहे. त्यासोबतच 200+ वर्षे जुने चिंचेचे मोठे झाड आहे. मंदिराच्या मागे शेकडो वर्षांपासून असलेले भारद्वाज कुंड आहे. विविध ऐतिहासिक वास्तूही आहेत.
प्राचीन काळी या गावाचे नाव भारद्वाजपूर होते कारण येथे ऋषी भारद्वाजांचा आश्रम होता, नंतर त्याचे नाव भर जहागीर असे ठेवण्यात आले. तसेच या मंदिरात अनेक ऐतिहासिक तथ्ये दडलेली आहेत. पर्यटकांसाठी हे ठिकाण आवश्यक आहे.
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
बघुया विदर्भातील काही पुरातन कृष्ण मुर्ती :
जटाशंकर धबधबा, अंबाबरवा, बुलढाणा
सातपुडा डोंगर रांगांमध्ये उगम पावणारा जटाशंकर चा धबधबा जो तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा मध्ये येतो ह्या धबधब्या मध्ये महादेवाचे प्राचीन मंदीर सुद्धा आहे... इथे जाणारा रस्ता अत्यंत मनमोहक आहे एकदा नक्की बघावा...
निमित्ताने
पोहा वेस, कारंजा लाड, वाशिम, जिजाऊ जन्मस्थान , सिंदखेडाजा, बुलढाणा, गड
मंदिर, रामटेक, नागपूर, अंबागड किल्ला, नगरधन किल्ला, या सर्व राज्य
संरक्षित स्मारकाच्या ठिकाणी प्रकाशयोजना सहायक संचालक, पुरातत्व विभाग,
नागपूर व स्थानिक प्रशासन व काही संस्थांच्या मदतीने करण्यात आली. सर्वांचे
धन्यवाद..... जय हिंद
आरमोरी, गडचिरोली येथील हेमाडपंथी मंदिराचे सौंदर्य
बिनागुंडा धबधबा, भामरागड, गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात सौंदर्याने नटलेल्या निसर्गाच्या सानिध्यात असलेला आणि बाराही महिने वाहणारा हा बिनागुंडा येथील धबधबा. गडचिरोली म्हटलं की नक्षलग्रस्त भाग त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सौंदर्य दुर्लक्षितच राहिलं आहे. बिनागुंडा धबधबा यामुळेच अपरीचित राहिला.
बिनागुंडा धबधबा हा भामरागड तालुक्यापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. इंद्रावती, पामुलगोतम आणि परेलकोटा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगम येथे आहे. अशा या निसर्गरम्य परिसरात असलेल्या डोंगर दर्यांमधून खळखळ करत वाहणारा हा बिनागुंडा धबधबा पर्यटकांना साद घालतो आहे.
मित्रांनो आवडल्यास शेयर करा आणि विदर्भातील दुर्लक्षित स्थळांबद्दल तुम्हाला माहीती असल्यास आम्हाला मेसेज करा.
पुरातन बारव आणि अष्टविनायक, कुपटा, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कुपटा या गावात दोन पुरातन मंदिरे आहेत. एक हेमाडपंथी मंदिर गावाबाहेर आहे तर दुसरे शिव मंदिर गावात आहे. या मंदिराशेजारी एक सुंदर बारव आहे. या बारवेला आत उतरण्यासाठी चारही बाजूने पायऱ्या आहेत. प्रवेशमार्गाच्या दोन्ही बाजूस देवकोष्ठ आहेत आणि त्यात सुंदर गणेश प्रतिमा आहेत.
(Photo - Amay Gatule)
पंच धारा धबधबा, रायपूर, वर्धा
कमलेश्वर महादेव मंदिर, लोहारा, यवतमाळ
येळाबारा धबधबा, येळाबारा, ता. घाटंजी, यवतमाळ
बोध बोधी धबधबा, कोथोडा, चंद्रपूर त्या गावाचे नाव मेहेंदी आहे.कोरपण्यापासून ८km अंतरावर आदिलाबाद रोड वर.अगदी गावातच आहे.
नागपंचमी आणि नागपूर
श्रावण शु. पंचमी अर्थात नागपंचमी. हिंदू धर्मातील प्रमुख सण. संपूर्ण भारतात निरनिरळया प्रकारे हा सण साजरा केला जातो.
नागपूर भारतातील प्रमुख शहर. सुमारे तीनशे वर्षापूर्वी नागपूर शहराची स्थापना झाली. नागपूर चे पूर्वीचे नाव फनिंद्रपूर होते असे म्हणतात. याबाबत अनेक दुमत आहे. नाग नदी वरून शहराला नागपूर हे नाव पडले असे काही इतिहासकार मानतात, तर येथे नागफणी चे फार घनदाट जंगल होते त्यावरून शहराला नागपूर हे नाव पडले असावे असाही एक मतप्रवाह आहे.
भारतात कोठेही नाही एवढे नागाचे मंदिर नागपुरात आहे. जुन्या नागपुरात ( मध्य व उत्तर नागपूर) प्रत्येक गल्लीत आपल्याला नाग मंदिर व महादेव मंदिर पाहायला मिळतात. (पूर्वी या भागात जंगल व शेत जमीन असायची, त्यामुळे साप/नाग जास्त प्रमाणात निघायचे. लोकांकडून साप मारल्या जायचे आणि नंतर कोप होऊ नये म्हणून तिथे मंदिर बांधल्या जायचे.)
नाग/ साप हे नागपूर येथील तत्कालीन जीवनाचा एक भाग होता हे यांचा अनेक पाउलखुणा आजही आपल्याला दिसतात.
गोंड राजे यांचे नागपूरात जेव्हा आगमन झाले तेव्हा त्यांनी आपल्या राजमुद्रा वर नाग हे प्रतीक कोरले. गोंड राजे हे आदिवासी असल्यामुळे आणि निसर्गासोबत त्यांचा जवळचा संबंध असल्यामुळे त्या काळी नाग पुजा मोठ्या प्रमाणात होत असत. चिटणीस पार्क महाल नागपूर येथील श्री नागोबा मंदिर हे गोंड कालीन आहे असे म्हणतात. आता ह्या मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे.
भोसले यांच्या काळात महाल येथे श्री नागेश्वर महादेव मंदिर बांधण्यात आले. दुसरे रघुजी राजे भोसले यांच्या आईं श्रीमंत चिमाबाई साहेब भोसले यांनी सण १७९१ मध्ये हे मंदिर बांधले.
ज्युनिअर भोसले पॅलेस मॅस्कॉट मोटर्स मागे श्री लाडसावंगिकर यांचे श्री पंचमुखी नाग मंदिर आहे. चार फूट उंच अखंड पांढऱ्या दगडात कोरलेली ही नाग मूर्ती भोसले कालीन (सुमारे २५० वर्षे जुनी ) असुन नागपूर येथील सर्वात मोठी सुंदर मूर्ती आहे.
मॉडेल मिल चौक नागपूर येथे प्रसिध्द श्री नागोबा मंदिर आहे. हे मंदिर सुद्धा फार जुने आहे.
इंग्रज काळात सी पी अँड बेरार प्रांताची राजधानी नागपूर होती. त्या वेळी या प्रांताची राजमुद्रा वर नाग कोरले होते. नागपूर विद्यापीठ असो अथवा नागपूर महानगर पालिका असो, अनेक संस्थांनी आपल्या मुद्रा वर नागपूर चे प्रतीक नागाला उचित मानसन्मान दिला.
आजही आपल्या नागपूर आणि विदर्भात नागपंचमी मोठ्या भावभक्ती ने साजरी करण्यात येते. ग्रामीण भागात शेतकरी आजच्या दिवशी शेतात काम करीत नाही. घरोघरी नागाचे पारंपारिक चित्र भिंतीवर अथवा कागदावर रेखाटल्या जाते. नाग पूजेला नाग मंदिरात जाऊन भक्ती भावाने पुजा करण्यात येते. पूजेला नारळ, दही दूध, लाह्या, फुटाणे, वाटणे, याद्वारे पुजा करण्यात येते. या पूजेत महत्त्व असते ते ' कढई ' प्रसादाचे. कढई प्रसाद म्हणजे रव्याचा शिरा. हा प्रसाद मनोभावे अर्पण करण्यात येते.
घरोघरी परंपरेप्रमाणे अनेक प्रकारचे पक्वान्न केले जातात. सातूचे पीठ, तिळाची करंजी, वडे, साठोळी, पुरणाचे कानोल्हे, चकली इत्यादी अनेक पक्वान्न केले जातात. नाग देवतेला करंजी , वडे, साठोळी यांचा फुलोरा अर्पण केल्या जातो.
नागपंचमी च्या दिवशी तवा वापरावर बंदी असते. काही घराण्यात भात व तुरीचे डाळीचे वरण करण्यात येत नाही.
' नागद्वार ' यात्रा , याच नागपंचमी च्या काळात फार पूर्वी पासुन प्रसिद्ध आहे. याचा नेमका इतिहास माहीत नाही ,परंतु या यात्रेला नागपूर आणि विदर्भातील अनेक भाविक जातात. मध्य प्रदेशातील पचमढी येथून या यात्रेची सुरुवात होते. ही यात्रा फार कठीण आहे. या यात्रेनंतर परत आल्यानंतर भाविक आपल्या घरी कढई प्रसाद करतात. महाप्रसादाने या यात्रेची सांगता करतात.
नागपूरात नागपंचमी च्या दिवशी अनेक औद्योगिक वसाहती आणि दुकाने बंद ठेवली जात असत. आता काही भागात ही परंपरा पाळल्या जात नाही.
नागपंचमी च्या दिवशी मध्य आणि उत्तर नागपूरत निंबु आणि नारळ यांची शर्यत लावल्या जात होत्या. परंतु आता यावर बंदी आहे.
असा हा नागपंचमी सण. आजच्या नवीन युगात आजही परंपरा आणि धार्मिक प्रथा यांचा समतोल साधुन नागपुरात हा सण भक्ती भावाने साजरा करण्यात येते.
धिरज लिंगे, नागपूर.
नागपंचमी विशेष : भद्रनाग मंदिर, भद्रावती !
चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तालुक्याचं ग्रावदैवत म्हणजे भद्रनाग. हा नाग शब्द नेमका कुठल्या अर्थाने वापरावा, यावर मतभेद असले तरी नागांची पूजा वैदर्भीय समाजाचा अविभाज्य भाग आहे. याच नागपुजेचं भद्रनाग मंदिर हे एक प्रतीक मानलं जातं. प्राचीन ग्रंथांमध्ये भांदक नगरी असा उल्लेख असलेलं हे शहर या नागमंदिरामुळे पंचक्रोशीत प्रसिध्द पावलं आहे.
अतिशय छोटं आणि सुबक असलेल्या या मंदिराला आणि इथल्या भद्रनागाच्या मूर्तीला लोकांमध्ये मोठं श्रद्धेचं स्थान आहे. हे मंदिर किमान एक हजार वर्ष जुनं असल्याचे पुरातत्वीय दाखले आहेत. सध्या अस्तित्वात असलेलं मंदिर ११४६ साली बांधण्यात आलं आहे. ११४६ साली भद्रनाग मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आल्याचा शिलालेख या ठिकाणी आज ही आहे. त्यामुळे हे मंदिर त्याआधी सुध्दा अस्तित्वात होतं याची खात्री पटते. हे संपूर्ण भद्रनाग मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आलं आहे. मंदिराचा आकार छोटा असला तरी हेमाडपंथी शैलीची सगळी वैशिष्ठ या मंदिरात आहेत. मंदिराला भक्कम असे ३६ खांब आहेत. आत ९ फण्यांची शेषनागाची सुमारे अडीच फूट उंचीची मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश करताच अतिशय प्रसन्न वाटतं.
विशेष म्हणजे शेषनागाचं हे विदर्भातलं ऐकमेव मंदिर आहे. इथल्या या नागमूर्तीला भारतात तोड नसावी असं अभ्यासकांचं मत आहे.
या मंदिरावर श्रद्धा असणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठी आहे. विदर्भासह, मध्यप्रदेश आणि तेलंगणातून मोठ्या प्रमाणात भाविक भद्रनागाच्या दर्शनाला नित्यनेमाने येतात. विशेषतः सोमवारी आणि बुधवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. सकाळी ५.३०ला मंदिर उघडल्यावर नित्यनेमाने अभिषेक, पूजा आणि महाआरती होते. नागपंचमी आणि महाशिवरात्रीला भाविक सर्वाधिक गर्दी करतात.
भद्रनागाला घरात कुठलंही शुभकार्य निघालं, काही संकट आलं की लोकं भद्रनागाला आवर्जून हजेरी लावतात. इथं नवस बोलण्याची मोठी परंपरा आहे आणि त्यानुसार नवस पूर्ण झाला की लोकं मंदिरात येऊन कढई (शिऱ्याचा प्रसाद) आणि स्वयंपाक करतात. मंदिराच्या आवारात अतिशय जुनी विहीर असून त्यात उतरायला पायऱ्या आहेत. या विहिरीत भगवान शेषनाग हे गुप्त रूपाने राहतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे लोकं या विहिरीचं देखील आवर्जून दर्शन घेतात.
देवावर श्रद्धा ठेवणारे तर इथे नित्यनेमाने भेट देतातच, पण शेकडो वर्ष जुन्या भारतीय संस्कृतीच्या अनेक खाणाखुणा इथे असल्यानं अनेक अभ्यासकांनाही येथे हजेरी लावतात. इथल्या भद्रनागापुढे तुम्ही नतमस्तक व्हा अथवा होऊ नका पण या ठिकाणी असलेलं पुरातत्विय वैभव तुम्हाला नक्कीच भुरळ पाडेल. मंदिराच्या परिसरात असलेली क्षीरसागरात आराम करत असलेली शेषशाही विष्णूची मूर्ती, यक्ष, गंधर्व, योगिनी, त्रिमूर्तीच्या रूपात असलेले ब्रम्हा-विष्णू-महेश, गणपती मूर्तिकला म्हणून पाहायला काय हरकत आहे.
(संदर्भ - सारंग पांडे, एबीपी माझा)
(फोटो - प्रकाश मांजरेकर)
शिवटेकडी, नागभीड, चंद्रपूर
प्राचीन मंदिर बारव, खांबपिंपरी, ता. शेवगाव | Discover Maharashtra
Discover Maharashtra
3 minutes
प्राचीन मंदिर बारव, खांबपिंपरी, ता. शेवगाव –
महाराष्ट्र
देशी हिंडताना अकस्मात कुठलातरी खजिना आपल्या समोर येतो आणि आपले पाय
तिथेच थबकतात. आनंदाला पारावार राहत नाही. नगर जिल्ह्यातल्या शेवगाव
परिसरात भटकत असताना असाच एक शिल्पकलेचा उत्तम नमुना उपेक्षित स्थितीत
आढळून आला. शेवगाव
पासून अवघ्या २३ किमी अंतरावर काटकडी नदीच्या काठी वसलेलं खांबपिंपरी हे
गाव आणि तिथे असलेली बारव, चौसष्ट योगिनींचे शिल्पे व प्राचीन मंदिर पाहून
थक्क व्हायला होतं. गावात प्रवेश करताच उजव्या बाजूस सुमारे साडे आठ फूट
उंचीचा, सेंदूराने माखलेला दगडी खांब झुकलेल्या अवस्थेत पहावयास मिळतो. याच
खांबावरुन ‘पिंपरी’ या गावाचे खांबपिंपरी असे नाव पडले आहे.(प्राचीन मंदिर
बारव)
गावातील तो खांब म्हणजे एका प्राचीन मंदिराच्या बहुधा
सभामंडपाचा खांब असावा. ज्या अर्थी हा खांब इथे आहे, त्याअर्थी इथे एखादं
मोठं मंदिर अस्तित्वात असणार. पण त्याचं काहीही अस्तित्व आज इथे दिसत नाही.
नाही म्हणायला काही मूर्तीचे अवशेष इतस्तत: विखुरलेले आहेत. याच खांबाच्या
समोरील बाजूस एक मोठी बारव बुजलेल्या अवस्थेत पहावयास मिळते. बारवेत
उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. बारवेत खाली उतरल्यावर चारही बाजूस अतिशय बारीक,
सुंदर कोरीवकाम केलेल्या, योग साधनेतील ४९ चौशष्ट योगिनीचे शिल्प आढळून
येतात. तसेच प्रत्येक योगिनीच्या हातामध्ये जपमाळ व इतर आयुधे दिसतात. या
ठिकाणी काळभैरवाचे दुर्मिळ असे शिल्पं देखील आहे. जवळच एक शिवमंदिर असून
गाभाऱ्यात शिवपिंड आहे. सभागृहात नंदी विराजमान असून मंदिराचे शिखर नव्याने
बांधण्यात आले आहे.
भारतात मध्यप्रदेश, राजस्थान ओडिसा या ठिकाणी
चौशष्ट योगिनीचे मंदिर आहेत. मात्र, बारवेतील चौशष्ट योगिनींचे साधना
करतांनाचे हे शिल्प अदभूत व दुर्मिळ असून राज्यातील एकमेव असे आहे. एवढा
अनमोल ठेवा जपला गेला पाहिजे. त्या पाठीमागचा सांस्कृतिक इतिहास समोर आला
पाहिजे. घोटण इथले मल्लिकार्जुनाचे प्राचीन मंदिर हेसुद्धा याच परिसरात
वसलेले आहेत. शेवगाव तालुक्यातील भटकंतीत चुकवू नये असे हे ठिकाण आहे.
Rohan Gadekar
जटाशंकर मंदिर, घोटण, ता. शेवगाव | Discover Maharashtra
Discover Maharashtra
2 minutes
जटाशंकर मंदिर, घोटण, ता. शेवगाव –
अहमदनगर
जिल्ह्याचा शेवगाव तालुका हा सातवाहनांची राजधानी असलेल्या पैठणला खेटून
असल्याने सातवाहन राजवटीतील अवशेष आपल्याला येथे सापडतात.. पुढे १० ते १४
व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या खाणा-खुणा पैठण व
परिसरात विखुरलेले बघायला मिळतात. शेवगाव पासून १० कि.मी. अंतरावर घोटण
गावात असणारी मल्लिकार्जुन, बळेश्वर व जटाशंकर ही प्राचीन मंदिरे ही अशाच
स्थापत्याचे आपल्याला दर्शन घडवते.(जटाशंकर मंदिर, घोटण)
मल्लिकार्जुन
मंदिरा पासून अगदी काही अंतरावर जटाशंकर मंदिर असून ही दोन्ही मंदिरे
पुरातत्व विभागाने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहेत.
पुरातत्व विभागाकडे या मंदिराची नोंद जैन मंदिर अशी असली तरी मंदिरातील
गर्भगृहात शिवलिंग स्थापित असून स्थानिक लोक या मंदिराला जटाशंकर मंदिर
म्हणून ओळखतात. मंदिराची काही प्रमाणात पडझड झाली असून गर्भगृहावरील शिखर
आज अस्तित्वात नाही.
मंदिर पूर्वाभिमुख असून मुखमंडप, सभामंडप,
अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाचे वितान हे उत्तरोत्तर
लहान होत जाणाऱ्या वर्तुळांचे करोटक वितान आहे. सभामंडपात डाव्या बाजूला एक
लहान खोली असून तिथे काही भग्नावशेष विखुरलेले दिसतात. गर्भगृहाची
द्वारशाखा सुभगा प्रकारातील असून गर्भगृहात शिवलिंग प्रस्थापित आहे.
Rohan Gadekar
बळेश्वर महादेव मंदिर, घोटण, ता. शेवगाव | Discover Maharashtra
Discover Maharashtra
2 minutes
बळेश्वर महादेव मंदिर, घोटण, ता. शेवगाव –
अहमदनगर जिल्ह्याचा शेवगाव तालुका हा सातवाहनांची राजधानी
असलेल्या पैठणला खेटून असल्याने सातवाहन राजवटीतील अवशेष आपल्याला येथे
सापडतात.. पुढे १० ते १४ व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या
खाणा-खुणा पैठण व परिसरात विखुरलेले बघायला मिळतात. शेवगाव पासून १०
कि.मी. अंतरावर घोटण गावात असणारी मल्लिकार्जुन, बळेश्वर व जटाशंकर ही
प्राचीन मंदिरे ही अशाच स्थापत्याचे आपल्याला दर्शन घडवते.(बळेश्वर महादेव
मंदिर)
मल्लिकार्जुन मंदिराच्या समोर डाव्या बाजूला बळेश्वर महादेव
मंदिर असून या मंदिरात पुरातत्व विभागाने त्यांचे काही साहित्य, परिसरातील
भग्न मूर्त्या व इतर काही अवशेष ठेवलेले आहेत. त्यामुळे हे मंदिर इतर वेळेस
कुलूप लावून बंद केलेले असते. आपण मागणी केल्यास तिथे देखभालीसाठी असलेले
पुरातत्व विभागाचे पहारेकरी आपल्याला मंदिर पाहण्यासाठी खुले करून देतात.
हे मंदिर उत्तराभिमुख असून ओसरी व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.
ओसरी
चार स्तंभावर उभी असून चार रिकामी देवकोष्टके आपल्या नजरेस पडतात.
गर्भगृहाची द्वारशाखा सुंदर शिल्पांनी शिल्पांकृत असून शिल्पांची
कालमानामुळे झिज झालेली आपल्याला दिसून येते. गर्भगृहात अनेक मूर्त्या व
भग्नावशेष आपल्या नजरेस पडतात. गर्भगृहात चार स्तंभ असून समोर अर्धा फूट
खोल शिवलिंग स्थापित आहे.
Rohan Gadekar
गणेश संग्रहालय : चिखलदऱ्यात लवकरच सुरू होणार.देशातील विविधाकृती गणेशमूर्तींचे विदर्भातील हा पहिलाच अभिनव उपक्रम - Akoladivya
By Akoladivya
3 minutes
अकोला दि १३ : प्रख्यात व्यवसायी प्रदीप मधुसूदन नंद यांच्या
संकल्पनेतून चिखलदरा येथे येत्या गणेशोत्सवापासून ‘गणेश संग्रहालय’ सुरू
होत आहे.भारतातील विविधाकृती गणेशमूर्तींचे दर्शन या संग्रहालयात
चिखलदऱ्यात येणाऱ्या पर्यटकांना होईल, असे प्रदीप नंद यांनी सांगितले.
या उपक्रमाची माहिती देताना प्रदीप नंद म्हणाले की, लहानपणापासूनच
आपल्याला गणेशमूर्ती बनविण्याचा छंद होता. कालांतराने व्यवसायात
शिरल्यानंतर गणेशमूर्ती बनविण्यासोबतच विविध ठिकाणच्या, विविध आकाराच्या
गणेशमूर्तींचा संग्रह करण्याचा छंद जडला. त्यातून आजमितीस त्यांच्याजवळ
सुमारे दोन हजार गणेशमूर्तींचा संग्रह झाला आहे. १ इंच ते ५ फूट उंचीच्या
विविधाकृती गणेशमूर्तींचा समावेश त्यात असल्याचे ते म्हणाले.
व्यवसायानिमित्त विविध ठिकाणी भ्रमण करीत असताना या गणेशमूर्ती आपण
जमविल्या आहेत. या कामात पत्नी दीपाली नंद यांचीही मोलाची मदत झाल्याचे
ते नमूद करतात. मूर्तींची नोंद करणे, त्यांची निगा राखणे, गणेशमूर्तींची
माहिती संग्रहित करणे अशी कामे दीपाली नंद करतात, असे नंद म्हणाले.काच,
माती, दगड,लाकूड, धातू,फायबर, अशा विविध माध्यमात बनविलेल्या मूर्तींचा
समावेश या संग्रहालयात असल्याचे त्यांनी सांगितले.
चिखलदऱ्यात प्रवेश करतानाच पहिल्याच डाव्या वळणावर असलेल्या आपल्या २
एकर प्रशस्त जागेत उभारलेल्या चार भव्य पिरॅमिडमध्ये हे संग्रहालय राहील,
असे नंद यांनी सांगितले. यासोबतच येथे लहान मुलांसाठी गणपती पार्क उभारला
आहे. त्यात विविध वाद्ये वाजविणाऱ्या, विविध वाहने चालविणाऱ्या,
खेळाडूंच्या स्वरूपातील गणेश मुर्त्या, विदर्भातील व महाराष्ट्रातील
अष्टविनायक गणेशमूर्तींचे दर्शन पर्यटकांना होईल.
चिखलदरा येथे दरवर्षी 3 लाखाहून अधिक पर्यटक येतात त्यातील 2 लक्ष
पर्यटक निश्चित संग्रहालय पाहण्यास येतील.नंद पती पत्नी म्हणतात एक सुवर्ण
संधी पार्टकना देऊ इच्छितात आपल्या जवळील जुने,देखणे अँटिक गणपती आपण कायम
स्वरूपी आमच्या संग्रहालतात ठेऊ शकता.म्हणून ते गणेशभक्तांना आवाहन करतात
देशभरातील गणेशभक्तांकडे वैविध्यता असलेल्या गणेशमूर्ती घरात असतील.
त्यातील काहीजण त्यांचे जतन, संगोपनही करू शकत नसतील.ज्यांना आमच्या
संग्रहालया साठी गणेश मूर्ती देऊ इच्छिणाऱ्या अशा सर्व भक्तांनी आपल्याशी
संपर्क साधल्यास त्यांच्या इच्छेनुसार ( मूल्य वा विनामुल्य) योग्य
आर्थिक मोबदला देऊन त्या गणेश मूर्ती आपल्या संग्रहालयात ठेवण्यासाठी आपण
घेऊ. या गणेशमूर्ती देणाऱ्या भक्तांचे नाव, पत्ता व इतर माहिती त्या
मूर्तीसोबत प्रदर्शित केली जाईल. आमच्या कडे जर त्या व तश्या प्रकारच्या मुर्त्या असल्यास त्या स्वीकारल्या जाणार नाही.
यासाठी डॉ. माधव देशमुख, भ्रमणध्वनी क्र. 09422193645 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन प्रदीप व दीपाली नंद यांनी केले.
सातपुड्याच्या कुशीत वसलेला - रुद्र धबधबा
कुवरदेव, जळगाव जामोद, बुलढाणा
वाघदरा धबधबा, चिचाटी, अमरावती
मेळघाटातील दऱ्या खोऱ्यातुन उगम पावणाऱ्या अनेक नदी नाल्यांवर अनेक लहान मोठे धबधबे आहेत. त्यापैकी काही ऊत्तुंग व सुंदर आहेत. त्यापैकी एक अपरिचित व आडवाटेवरील धबधबा आहे तो वाघदऱ्यातील चिचाटी धबधबा. हा धबधबा शांत सुंदर व उत्तुंग असा आहे. परतवाडा पासून अवघ्या 12 की. मो. अंतरावर असलेल्या विदर्भातील सर्वात उंच धबधबा असलेल्या ' चिचाटी' धबधब्याची व परिसराची हि काही नयनरम्य दृश्य.
खिरपाणी धबधबा, अमरावती
अंजनगाव पासून 10 की. मी. अंतरावर असलेला सुंदर धबधबा
भव्य गणेश मुर्ती, लालपेठ, चंद्रपूर
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज बघुया विदर्भातील चंद्रपूर येथील भव्य गणेश मुर्ती. चंद्रपूर येथील लालपेठ येथे १६ भव्य मुर्त्या असून या मूर्त्यांमध्ये गणेशाच्या दोन मूर्त्या आहेत. त्यातील एक मूर्ती ११ फूट उंच आणि ८ फूट रुंद अशी एकपाषाणीय विशाल मूर्ती आहे. डाव्या सोंडेची ही विशाल गणेश मूर्ती अतिशय सुबक आणि रेखीव असून कमालीची आकर्षक आहे. एका मोठ्या पाषाणाच्या पृष्ठभागावर या गणेश प्रतिमेचे सुंदर कलात्मक कोरीव काम झाले आहे. या तेजःपुंज देखण्या मूर्तीच्या पायाशी त्याच पाषाणात एक सुंदर मूषकसुद्धा कोरण्यात आला आहे. मोकळ्या मैदानात उंच जागेवर काहीशा तिरक्या स्वरूपात उभ्या केलेल्या या भव्य मूर्तीवर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी होणाऱ्या सूर्यकिरणांच्या मुक्ताभिषेकामूळे ही गणेश मूर्ती अधिकच विलोभनीय आणि नितांत सुंदर दिसू लागते.
(माहिती - अमित भगत)
सिध्देश्वर मंदिर, सुदी, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सुदी येथील पुरातन शिव मंदिर
पुरातन शिव व पार्वती मंदिर, विठोली, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील विठोली येथे दोन पुरातन हेमाडपंथी शैलीचे मंदिर आहेत. एका मंदिरामध्ये शिवलिंग आहे तर दुसर्या मंदिरामध्ये माता पार्वतीची मुर्ती आहे. असे सांगितले जाते की येथील पार्वती कुमारिका आहे त्यामुळेच शिव शक्ती एकाच मंदिरात नसून दोन वेगळ्या मंदिरात स्थापित आहेत. अलिकडेच मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे.
अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात नांदगाव पेठ पासून 4-5 किमी अंतरावर हे पुरातन मंदिर वसलेले आहे. अत्यंत शांत आणि निसर्गरम्य परिसरात बोर नदीच्या तीरावर हे शिवालय आहे. दोन नद्यांच्या संगमावर हे मंदिर स्थापित असल्यामुळे या शिव मंदिराला संगमेश्वर हे नाव पडलेले आहे.
खोलेश्वर शिव मंदिर, बार्शीटाकळी, अकोला
बार्शी टाकळी येथे उत्तर वहिनी नदी विद्रुपा च्या काठावर हे सुंदर यादवकालीन श्री खोलेश्वराचे मंदिर आहे. मंदिराचा मुख्य भाग हा यादव कालीन आहे तर मंदिराच्या शिखर भागाचे नूतनीकरण झाले आहे. मंदिरात उत्तर द्वाराने प्रवेश केल्यास प्रथम नंदी दिसतो. तो आता नुकताच बांधलेल्या मंडपात विराजमान आहे. या मंडपाच्या बाजूला असलेल्या स्तंभावर भरवाहक यक्ष मूर्ती पाहायला मिळतात. मंदिराला अंतराळ युक्त दोन गर्भगृह आहेत (पूर्व व उत्तर) तर एक देवकोष्टका सारखा एक छोटा (पश्चिम) गाभारा आहे. मुख्य ( पूर्व ) गाभारा हा जवळ जवळ २० फूट खोल आहे. या गाभाऱ्यात असलेल्या शिवलिंगातून कायम जलरूपात गंगा प्रवाहित असते. दक्षिण गाभाऱ्यात आता काळ्या पाषाणातील देवीची सुंदर मूर्ती आहे. या गाभाऱ्याची द्वार शाखा व द्वारा समोरची चंद्राशीळा पाहण्यासारखी आहे. पश्चिमेकडील गाभाऱ्यात गणपतीची सुखासनात कमळावर आसनस्थ मूर्ती आहे. मंदिराला नूतनीकरणात पाच शिखरे चढवली आहेत. संपुर्ण मंदिराला देवडी युक्त तट आहे. तर तटाच्या उत्तर-पूर्व बाजूला भला मोठा बुरुज आहे. तटाच्या आत एक दत्त मंदिर आहे तर परीसरात संत व सिद्ध पुरूषांच्या समाध्या आहेत.
वर
छतावरील अदभुत मुर्ती पहायला हवी होती. शिवपींडी च्या गाभाऱ्यासमोर वर
छतावर अदभुत मुर्ती आहे.कृष्णाचे एकच तोंड असुन वेगवेगळ्या दिशेने सहा धडे (
शरीरे) जोडली आहेत.कुठुनही पाहील्यास एकसमान शरीर दिसते.
भंडारा जिल्हा कारागृह
भंडारा कारागृहाची स्थापना 1896 साली झालेली आहे. हे कारागृह म्हणजे एक किल्लाच आहे. भक्कम तटबंदी आणि चारही बाजूने बुरुज आहे. आतमध्ये चक्रधर स्वामींचे मंदिर आहे.यादव कालीन किल्ल्याच होता आणि त्या वेळी पण तिथं कारागृह होत
विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पिंजर, अकोला
पिंजर, अकोला येथे गावा बाहेर नदी किनारी विठ्ठल मंदिर आहे, आषाढी एकादशी ला मोठी जत्रा येथे भरते, उंच अशा दगडी तटबंदी ने मंदिर सुरक्षित केले आहे. मंदिराचे बांधकाम समोरुन एखाद्या किल्ल्याप्रमाणे आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कौंडण्यपूर, अमरावती
भगवान श्रीकृष्णाचे अमरावती शहराशी काही विशेष नाते आहे कारण, कौंडिण्यपूर धाम पासून अवघ्या ४४ किमी अंतरावर श्रीकृष्णपत्नी रुक्मिणीचे जन्मस्थळ आहे.
वर्धा नदीकाठी कौंडिण्यपूर वसले आहे. या स्थळाचे कुण्डिनपूर, कुंडिनी इ. नावांनी प्राचीन साहित्यात उल्लेख मिळतात; तसेच हे स्थळ प्राचीन विदर्भाची राजधानी असल्याचे ज्ञात होते. पुराणांतील अनेक कथांत कौंडिण्यपूर गुरफटलेले आहे. कृष्ण-रुक्मिणी, शिशुपाल, नल-दमयंती यांचा संबंध कौंडिण्यपूरशी असल्याचे अनेक कथा सांगतात. हे स्थळ भीष्मक राजाची राजधानी असून त्याची कन्या रुक्मिणी हिचे श्रीकृष्णाने गावाबाहेरील अंबिकेच्या मंदिरातून हरण केले, अशी कथा प्रसिद्ध आहे.
आपले गौरवशाली हिंदुस्तान राष्ट्र जगातील सर्वधर्माचे मूळ स्थान व मानवतेचे ज्ञानपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. आर्य संस्कृती अति प्राचीन आणि सनातन, शाश्वत, चिरकाली प्रगमनशिल व प्रख्यात आहे या आर्य भुमीत आसेतू हिमाचल असलेल्या पुण्य नगरी पैकी प्राचीन वैभवशाली विदर्भाची तत्कालीन समाधी म्हणून कौंडण्यपूर किर्तीवंत आहे, पुरातनकाळी श्री वशिष्ठ ऋषींनी तप केल्यामुळे वर्धा नदी ही वशिष्ठा नावांने तसेच श्री अंबरीश ऋषीचे पुत्र कुंडण (कौंडील्य) ऋषींनी तप केल्यामुळे या तपोवनाला कुंडीनपुर नाव प्राप्त झाले.
प्रभु श्रीरामचंद्राची आजी राजा दशरथाची आई इंदुमती, नलराजाची राणी दमयंती, श्री अगस्ती ऋषीची पत्नी लोपामुद्रा, राजा भिमककन्या माता रुख्मीणी, स्वर्गातुन गंगा पृथ्वीवर आणणाऱ्या श्री भगिरथ राजाची माता केशीनी या पंचसतीचे माहेर तसेच नाथ संप्रदायातील श्री चौरंगीनाथ या सर्वांचे स्थान कौंडण्यपुरच आहे. नाथाची समाधी सुद्धा इथेच आहे. या शिवाय इ.स. १२०० पूर्वीचे श्री गणपती व पंचमुखी महादेवाची पिंड आहे.
वशिष्ठा (वरदा) - आजची वर्धा नदीच्या पात्रात पुंडलिक नांवाचे कुंड आहे. याच कुंडातुन संत श्रेष्ठ श्री सदाराम महाराजांना श्री पांडुरंगाची मूर्ती प्राप्त झाली. तीची प्रतिस्थापना करुन येथे आज भव्य मंदिर उभे आहे. विदर्भातील हे प्रसिद्ध तिर्थक्षेत्र श्री विठ्ठल-रुख्मीणी संस्थान, कौंडण्यपुर म्हणून ओळखले जाते.
येथे पुराणवस्तु संशोधनाचा अल्पसा प्रयत्न स.न. १९२८ मध्ये कै. अ. रा. रानडे यांनी केला, नंतर स.न. १९३६ मध्ये पुरातत्व विभागाचे प्रमुख रायबहादुर श्री का.ना. दिक्षीत यांनी केला. या नंतर स.न. १९६२ मध्ये पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. मोरेश्वर दिक्षीत यांनी केला. उत्खनातुन मिळालेल्या वस्तुंन वरुन असे दिसून येते कि ह्या वस्तू ताम्र व पाषाण युगातील असाव्यात तसेच १०००० वर्षा पूर्वीची शेषशाही विष्णु भागवानाची पाषाण मूर्ती देवालयात पहावयास मिळेल. श्री क्षेत्राची जोपासना करण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्य मूर्ती वंदनीय श्री गाडगे महाराज व वंदनीय श्री अच्युत महाराज यांचा सिंहाचा वाटा आहे. सातवाहन काळातील कांही नाणी व मातीची भांडी उत्खननात मिळाली. या पुरातन वास्तुचे संशोधन सातत्याने होणे आवश्यक आहे.
घुई यांचे विठ्ठल मंदिर, महाल, नागपूर
नागपूर येथील हे भोसलेकालीन विठ्ठल मंदिर आहे. घुई हे सुरुवातीपासून या मंदिराचे वहिवाटदार व पुजारी असल्याने घुई यांचे विठ्ठल मंदिर म्हणून हे स्थान प्रसिद्ध आहे. टिळक शाखेचा गुरुपूजन उत्सव याच परिसरात होतो.
(Photo - Atharva Shivankar)
ही आहे हिंगणघाट (वर्धा) येथील विदर्भातील सर्वात उंच ५१ फुट उंच विठ्ठल मुर्ति जी वेणा नदीच्या तिरावर आहे.
विदर्भाचे 'पंढरपूर' धापेवाडा, नागपूर
आदासा नागपूर जिल्ह्यात एक गाव आहे आणि नागपूर शहरात सुमारे 40 कि.मी. अंतरावर आहे, म्हणजेच ते एक तास दूर आहे. हे ठिकाण गावच्या जवळ असलेल्या डोंगरावर वसलेले प्राचीन मंदिर संकुलासाठी प्रामुख्याने प्रसिद्ध आहे.
आदासापासून जवळ जवळ 2 कि.मी., हे धापेवाडा गाव आहे. हे गाव चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले आहे. शहराचे एक वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे विठोबाचे मंदिर, जे नदीकडे दुर्लक्ष करते. उमाजी आबा, दिवाण यांनी राजा बाजीराव भोंसले यांनी बांधले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे धापेवाडाला विदर्भाचे 'पंढरपूर' असेही म्हणतात.
कवडाझरी धबधबा, अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील कवडाझरी येथून ५ किमी अंतरावर असलेला नयनरम्य धबधबा
विदर्भाचे 'पंढरपूर' धापेवाडा, नागपूर
आदासा नागपूर जिल्ह्यात एक गाव आहे आणि नागपूर शहरात सुमारे 40 कि.मी. अंतरावर आहे, म्हणजेच ते एक तास दूर आहे. हे ठिकाण गावच्या जवळ असलेल्या डोंगरावर वसलेले प्राचीन मंदिर संकुलासाठी प्रामुख्याने प्रसिद्ध आहे.
आदासापासून जवळ जवळ 2 कि.मी., हे धापेवाडा गाव आहे. हे गाव चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले आहे. शहराचे एक वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे विठोबाचे मंदिर, जे नदीकडे दुर्लक्ष करते. उमाजी आबा, दिवाण यांनी राजा बाजीराव भोंसले यांनी बांधले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे धापेवाडाला विदर्भाचे 'पंढरपूर' असेही म्हणतात.
पुरातन पायविहीर, रामटेक, नागपूर
रामकुंड बारव, रामटेक किल्ला, नागपूर
गड मंदिर रामटेक येथे किल्ल्यावर एक पुरातन कुंड (बारव) आहे. ही बारव रामकुंड नावाने ओळखली जाते. बारव आयताकृती असून बारवेत उतरण्यासाठी पाच प्रवेश मार्ग आहेत.
सिता कुंड बारव, रामटेक किल्ला, नागपूर
उंच डोंगरावर असलेल्या किल्ल्यात हा कुंड दगडात बांधलेला असून यात नेहमी पाणी असते.
आपली निसर्ग रम्य गडचिरोली लख्खामेडा पाहाडी, रेपणपल्ली, गडचिरोली
पुरातन बारव, कुपटा, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कुपटा या गावात दोन पुरातन मंदिरे आहेत. एक हेमाडपंथी मंदिर गावाबाहेर आहे तर दुसरे शिव मंदिर गावात आहे. या मंदिराशेजारी एक सुंदर बारव आहे. या बारवेला आत उतरण्यासाठी चारही बाजूने पायऱ्या आहेत.
गणेश कुंड बारव, कळंब, यवतमाळ
विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे चिंतामणी गणपतीचे मंदिर म्हणजेच एक बारव (पायविहिर) आहे. यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे ३५ फूट खोल आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारातून पायर्या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते. या कुंडाला गणेशकुंड असे म्हणतात. भूजल पातळीत वाढ झाल्याने बारवेतील पाणी बाहेर येते त्यालाच गावकरी गंगा अवतरण असे म्हणतात. हे कुंड गणपतीने अंकुशाच्या प्रहाराने तयार केले तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली असल्याचे मानतात.
बारवेला आत उतरण्यासाठी तीन प्रवेश मार्ग आहेत. बारवेचा आकार चौकोनात असून आत सात कक्ष आहेत. त्यापैकी मध्यभागी असलेल्या गाभाऱ्यात चिंतामणी गणपतीची सुंदर मुर्ती आहे. बारवेचे बांधकाम काळ्या पाषाणातील दगडात केलेले आहे. बाहेर निघताना बारवेत दोन आकर्षक दगडी स्तंभ दिसतात.
शारंगधर बालाजी, मेहकर, बुलढाणा
तिरुपतीमधील श्री बालाजीच्या मूर्तीपेक्षाही सुंदर अन् विलोभनीय अशी जगातील सर्वात उंच शारंगधर बालाजीची मूर्ती विदर्भातील मेहकर गावात विराजमान आहे. ११.२ फूट उंच फूट रुंद अन् अडीच फूट जाडी असलेल्या मूर्तीचे सौंदर्य तिच्या भव्यतेमुळे अधिकच खुलून दिसते. या मूर्तीचा इतिहासही रंजक आहे. पुरातन काळातील ही मूर्ती अठराव्या शतकात गावकऱ्यांना खोदकाम सुरू असताना सापडली. इंग्रज अधिका-यांनी मूर्तीसह शिलालेख अन् दागिने ताब्यात घेतले. ही मूर्ती लंडनच्या संग्रहालयात हलवली जाणार होती, पण गावकऱ्यांनी प्राणांची बाजी लावत तिची रातोरात प्राणप्रतिष्ठा करून टाकली. संतापलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी शिलालेख दागिने लंडनला नेले, पण मूर्ती मात्र ते नेऊ शकले नाहीत. तेव्हा इंग्रजांनी मेहकरच्या ६० गावकऱ्यांना महिने तुरुंगात डांबले होते. यात जानकीराम अप्पा पाठक, रामभाऊ भिते पाटील, अॅड. मा. ल. देशमुख, निंभा गोंधळी, रामा कुणबी, विठ्ठल माळी आदींचा समावेश होता.
औरंगाबादपासून १२५ किमी अंतरावर विदर्भात मेहकर हे गाव आहे. नागपूर-मुंबई महामार्गावर हे गाव असूनही जगाला या अद्भुत मूर्तीसह मंदिराची माहितीच नाही. पैनगंगा नदीकाठी जुन्या लाकडी, परंतु अत्यंत रेखीव वाड्यात हे मंदिर आहे. मोठ्या काळ्या पाषाणावर ही मूर्ती कोरलेली असून तिच्याभोवती प्रभावळ आहे. त्यावर विष्णूंचे १० अवतार चितारले आहेत. मूर्ती मध्ययुगीन आहे.
मूर्तीचा शोध लागण्यापूर्वी हे गाव नृसिंहाचे स्थान म्हणून ओळखले जात होते. येथे लक्ष्मीनृसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. ही मूर्तीदेखील एका भुयारात होती. १५ व्या शतकात ती गावकऱ्यांनी गावात आणली. त्यानंतर ३१९ वर्षांनी गावात शारंगधर बालाजीची मूर्ती सापडली.
इ.स. १८८८ मध्ये पोलिस पाटील रामभाऊ भिते यांच्या गढीत खोदकाम करताना २० फूट लांब फूट रुंद लोखंडी पेटीत ही मूर्ती होती. मूर्तीवर चंदनाचा भुसा होता. सोबत दोन ताम्रपट होते. त्यावर मूर्तीचा इतिहास लिहिलेला होता. तो दिवस होता नागदीपावलीचा. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, गोरज मुहूर्तावर डिसेंबर १८८८ ला मूर्ती सापडल्याने तोच दिवस गेल्या सव्वाशे वर्षांपासून प्रकटदिन म्हणून साजरा केला जातो.
असा आहे शारंगधर बालाजी
रेखीव मूर्ती, छाती पोट गोमुखाकृती.
मूर्ती चतुर्भुज असून हातात गदा, चक्र, पद्म आहे.
पायाजवळ जय-विजय, लक्ष्मी-कुबेर भूदेवी.
️हातातील शस्त्रांत धनुष्य नाही, पण मूर्ती भोवती प्रभावळीत विष्णूंचे दहा अवतार कोरले आहेत.
डोक्यावर शारंग नावाची धनुष्य धारण केलेली विष्णूंची मूर्ती कोरली आहे. म्हणून हा शारंगधर.
ही मूर्ती आशिया खंडातील सर्वात मोठी श्री बालाजीची मूर्ती आहे. तसा उल्लेख बुलडाणा जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये आहे. तीर्थक्षेत्रांच्या यादीत या मंदिराचे नाव असले तरी याला अद्याप हवी तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाही.
जालन्यापासून वाशीम कडे जाणाऱ्या रस्त्यावर मेहकर आहे। ... आता समृद्धी महामार्ग पण मेहकर जवळुन जाणार आहे। मुकुटाच्या मध्यभागी धनुर्धारी श्रीराम मूर्ती आहे.. शारंगधर म्हणून नाव आहे। ही विशेष माहिती दिलेय श्री Uday Akolkar यांनी।
ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की दर्शनाच्या वेळी आपली मनस्थिती जशी असेल तेच भाव मूर्ती चे मुखावर दिसतात... अनुभव आलेले सांगतात.
इथे खाली पण एक जुने देखीव मंदिर तशीच एक ऐतिहासीक वास्तू आहे... ते पण फोटो आणि माहिती टाकायची असती सर
विदर्भातील दुर्लक्षित स्वर्ग - गडचिरोली
गडचिरोली म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नक्षलवाद, पोलिस, हिंसा अशा प्रतिमा उभ्या राहतात. पण त्या पलिकडे गडचिरोली मध्ये खुप काही आहे, जे आजपर्यंत दुर्लक्षित आहे. गडचिरोली जिल्हा निसर्गाने सजवलेला सुंदर प्रदेश आहे. तर करूया सफर गडचिरोलीची..
श्री सुंदर नारायण मंदिर, धानोरा (पुर्णा), अमरावती
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील धानोरा या गावात हे पुरातन मंदिर आहे. पुर्णा नदीच्या तीरावर वसलेल्या सर्व गावांच्या नावामागे 'पुर्णा' लावले जाते म्हणून हे गाव धानोरा पुर्णा नावाने ओळखले जाते. मंदिर छोटे टुमदार असून एका लहान प्रवेश द्वारातून आत जावे लागते. काळ्या पाषाणात कोरलेली सुंदर नारायणाची म्हणजेच विष्णूची अष्टभुज मुर्ती मन मोहून टाकणारी आहे. गाभाऱ्यात आणखी एक दुर्गा मातेची पुरातन मूर्ती आहे.
नगरधन भुईकोट, नागपूर (किल्ला संवर्धनाचे उत्कृष्ट उदाहरण)
नगरधन भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यात रामटेकपासून वायव्येस सुमारे ७ कि. मी. अंतरावर असलेला हा 'भुईकोट' प्रकारातील एक किल्ला आहे. वाकाटककालीन असलेल्या या किल्ल्यास जुना इतिहास आहे. हा किल्ला आहे. इसवी सनाच्या ४ थ्या शतकात ही जागा 'नंदीवर्धन' म्हणून ओळखली जात होती. नगरधन हा त्याचा अपभ्रंश आहे. नगरधाणचा किल्ला हा इसवी सनाच्या साधारण चवथ्या शतकातील किल्ला असावा. जुन्या आणि नव्याचा संगम असलेला नगरधनचा हा भुईकोट आहे.
नगरधन गावाच्या पश्चिमेस या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. नगरधनच्या भव्य दरवाजावर काही शिल्पे अंलकृत केलेली आहेत. शिरोभागी गणेशाची प्रतिमा आहे. दोन्ही बाजूंना चषक कोरलेले आहेत. दाराच्या बाजूला द्वारपाल कोरलेले असून त्यांच्या खांद्यावर कबुतर दाखवले आहे. पुर्वी निरोपानिरोपी करण्यासाठी कबुतरांचा वापर करीत असत. दाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. पूर्वी आत येणाऱ्यांची चौकशी व झाडाझडती येथेच घेतली जायची. उमलती कमलपुष्पे हे यादवांचे चिन्ह प्रवेशाच्या दोन्ही बाजूंस आहे. प्रवेशदारातून आत गेल्यावर एक आयताकृती कक्ष लागतो. येथे आत हा भुईकोट आहे. तो गोंड राजाच्या वेळचा असावा. येथे एक पायऱ्याची विहीरही आहे..
विदर्भातील रामटेक हे धार्मिक स्थळ म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील भाविकांबरोबर इतर राज्यांमधूनही अनेक भाविकांचा ओघ रामटेकला असतो. रामटेकच्या प्रसिद्ध अशा धार्मिक व पर्यटन स्थळाच्या जवळ असूनही नगरधनचा किल्ला मात्र अनेकांना अपरिचित आहे. रामटेकच्या डोंगरावरुन नगरधनचा किल्ला ओळखू येतो. नगरधाणचा किल्ला रामटेक तालुक्यात असून नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नागपूर ते जबलपूर असा राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग क्र. ७ आहे. या महामार्गावर मनसर हे गाव आहे. या मनसर गावातून पश्चिमेकडे रामटेककडे जाण्यासाठी किंवा भंडारा जिल्ह्यातील तुमसरकडे जाण्यासाठी रस्ता फुटतो. या रस्त्याने रामटेक गाठल्यावर तेथून सहा-सात किलोमीटर दक्षिणेकडे नगरधन गाव गाहे.
नगरधन गावाच्या बाहेर (गाव ओलांडल्यावर) नगरधनचा किल्ला आहे. नागपूरपासून वाहनाने दीड तासात नगरधनपर्यंत पोहोचता येते.
नगरधनचा भुईकोट हा प्रथमदर्शनी आपल्याला मोहवून टाकतो. नगरधन किल्ल्याने कात टाकून नवे रूप धारण केले आहे. याची तटबंदी व आतील भाग नव्याने दुरुस्त केलेला आहे. लालसर पण काळ्यारंगाची झाक असलेल्या चिऱ्यांनी किल्ल्याची तटबंदी व दरवाजा बांधून काढल्यामुळे त्याचे सौंदर्य कैकपटींनी वाढलेले आहे. दारातून आत शिरल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवर चढल्यावर तटबंदीवरुन फेरी मारता येते. या रुंद तटबंदीवर निरीक्षणासाठी मनोरे केलेले आहेत. येथून रामटेक किल्ल्याचे उत्तम दर्शन होते. किल्ल्याच्या आत वाड्याचे तसेच इतर निवासस्थानांचे अवशेष आहेत. किल्ल्यामध्ये तीन मजली खोल विहीर आहे. या मजल्यावर कमानीयुक्त खोल्या असून पायऱ्या उतरून तिथपर्यंत पोहोचता येते. किल्ल्यामध्ये मंदिर, तसेच काही ठिकाणी प्राचीन अवशेषही पहायला मिळतात.
(साभार - Anup Lambat Patil)
सोमेश्वर महादेव मंदिर, राजुरा, चंद्रपूर
जागतिक
योग दिन निमित आपले आरोग्यासाठी योग आणि आपला ऐतिहासिक वारसा संवर्धन
संदेश देण्यास इको-प्रो व भारतीय पुरातत्व विभाग द्वारा गोंडराजे
समाधीस्थळ, चंद्रपूर व किल्ला परकोट भिंत व बुरुजवरुन योगा करण्यात आला..
जागतिक योग दिना निमित्त लोणार सरोवर, बुलढाणा येथे योग दिन साजरा करण्यात आला.
रान बारव, लोणार, बुलढाणा
रान बारव म्हणजे रानात, शेतात असणारी बारव होय. लोणार मध्ये असणार्या अनेक पुरातन वास्तू पैकी ही एक बारव आहे. ही जया बारव आहे, जया बारव म्हणजे ज्या बारवेला तीन बाजूंनी पायर्या असतात. ही आयताकृती बारव लोणार मध्ये मोठा मारुती मंदिराजवळच एका शेतात आहे आणि खाजगी आहे.
रामकुंड बारव, लोणार, बुलढाणा
जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या सभोवताल खूप प्राचीन मंदिरे आहेत त्यापैकी एक सर्वात सुंदर म्हणजे रामगया मंदिर. प्रभु श्रीराम वनवासात असताना येथून गेले म्हणून या मंदिराला 'रामगया' म्हणुन ओळखले जाते. रामगया मंदिराच्या बाजूला उत्खननात एक चतुष्कोणी बारव सापडली. तिला रामकुंड किंवा पुष्कर तिर्थ म्हणून ओळखले जाते. असे सांगितले जाते की प्रभु श्रिरामांनी आपल्या बाणांच्या साहाय्याने या कुंडात गौतमी गंगा प्रकट केली होती. याच कुंडात रामांनी आपले पिता दशरथ राजा यांचे श्राद्ध केले होते. म्हणून आजही लोणार घाटावर कित्येक जमातीचे लोक शतकानुशतके दहासी (तेरसे) पिंडदान करत आले आहेत.
पुरातन शिव मंदिर, नागझरी, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात वसलेले एक प्राचीन शिवालय. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीत असून मंदिराची पडझड झालेली आहे. गाभाऱ्यात पंचमुखी शिवलिंग स्थापित आहे. मंदिराच्या जवळच एक गोमुख कुंड आहे. गोमुखातून सतत पाणी वाहत असते. परिसरात एक छोटा धबधबा सुद्धा आहे.
पुरातन पायविहिर, कुरणखेड (काटेपुर्णा), अकोला
मॉ चंडिका देवी मंदिराच्या पायथ्याला ही पाय विहीर आहे , अष्टकोनी आकारात असलेल्या या पायविहिरीच्या पायऱ्या पुन्हा बांधल्या जात आहेत , व खोली वाढवली जात आहे .
अश्विन राजपुत या पत्रकार मित्राने त्याच्या गावच्या बारवेचे फोटो पाठवले. ही अतिशय सुंदर वेगळ्या बांधणीची बारव. हीचे संवर्धन करण्याची तळमळ या पत्रकार मित्राने बाळगली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सामाजीक संस्थांना, इतिहासप्रेमी दोस्तांना विनंती या बारवेचे काम सुरू करा. सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला तर कामं मार्गी लागतात याची कितीतरी उदाहरणं आता महाराष्ट्रात समोर येत आहेत. Mukund Pathak मित्रवर्य तुमचा जिल्हा आहे लक्ष घाला...
पुरातन बारव, शेगाव, बुलढाणा
संतनगरी शेगाव मध्ये ही पुरातन बारव स्थित आहे. शेगाव - नागझरी रोड वर एका शेतामध्ये ही सुंदर बारव आहे. बारव बाहेरून आयताकृती आणि आत उतरल्यानंतर चौकोनी बांधलेली आहे. बारवेत नेहमी पाणी असते आणि त्याचा उपयोग शेतीसाठी करण्यात येतो. बारवेची थोडी डागडुजी केल्यास शेगाव मध्ये भेट देणाऱ्या भाविकांसाठी हे निश्चितच एक पर्यटन स्थळ बनू शकते.
पुरातन पायविहीर, भिवापूर, नागपूर
नागपूर जिल्ह्य़ातील भिवापूर येथे अतिशय सुंदर अशी ही पायविहीर आहे. विहिरीचे बांधकाम, नक्षीकाम थक्क करणारे आहे. गावातील ग्रामदैवत असलेल्या भिमा देवी मंदिराच्या समोरच ही पुरातन बारव आहे. येथे अशी आख्यायिका आहे की पांडव वनवासात असताना येथे काही काळ वास्तव्यास होते आणि त्यावेळी भिमाने येथे देवीची स्थापना केली होती, त्यावरूनच या देवीचे नाव भिमादेवी असे पडले आहे. गावात एक पुरातन तलाव आहे. येथे किल्ला सुद्धा होता पण तो आता नामशेष झाला आहे. पण ही पायविहीर अजून सुस्थितीत आहे. या विहिरीची साफसफाई केल्यास हे एक पर्यटन स्थळ बनू शकते. आपण सर्वांनी मिळून हा सुंदर वारसा जपला पाहिजे.
गाव चीतोडा ता.खामगाव येथे पण खूप मोठी पुरातन बरव आहे
पुरातन पायविहीर, अडेगाव, चंद्रपूर
आपल्या जंगलांच्या आणि वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी आपण बोलायलाचं हवं. परंतु याचवेळी आपल्याला लाभलेल्या समृद्ध वाराश्याच्या इतर पैलूंकडेही लक्ष द्यायला हवं. या गोष्टी मग केवळ नैसर्गिकदृष्ट्याच महत्त्वाच्या असतील असे नाही तर त्या पुरातत्त्वीय किंवा ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाच्या असू शकतात.
आपल्या इतिहास आणि वास्तुकलेचं मनोहर दर्शन घडवणारी अशीच एक गोष्ट आहे बारव (Step well). ताडोबातही अशा काही बारवा आहेत. पाणी पुरवठा करण्याबरोबरच या बारवा मंदिर, सामुदायिक केंद्र तसेच व्यापार मार्गावरील विश्रांतीस्थळ म्हणूनही वापरल्या जात असत. बारवीला गुजरातीत वाव, तर हिंदीत बावली किंवा बावडी म्हणतात.
प्रत्येक बारव ही असामान्य अभियांत्रिकी आणि वास्तुकलेचा नमुना असते. प्रत्येक बारवीचा आकार (गोल, चौकोनी, अष्टकोनी किंवा इंग्रजीतील एल या अक्षराप्रमाणे) आणि प्रवेशद्वारांची संख्या वेगवेगळी असते. भारतात हजारो बारवा होत्या परंतु ब्रिटीश काळात एकाच ठिकाणाहून संपूर्ण गाव/शहराला पाणी पुरवठा करण्याची पद्धत सुरू झाल्याने आपल्या या अप्रतिम संरचानांचे महत्त्व कमी झाले. परिणामी आडेगावातील दुसऱ्या बारवेप्रमाणे अनेक बारावा नष्ट करण्यात आल्या.
या बारावांशी अनेक कथा-कहाण्या जोडलेल्या असतात. त्यापैकीच एक आडेगावच्या बारवेशी संबंधित आहे ती अशी की, चंद्रपूरच्या प्रसिद्ध महाकाली मंदिरातून एक 20 किलोमीटर पेक्षा लांब गुप्त मार्ग थेट या बारवेत निघतो!
कैसर ए हिंद दरवाजा, भंडारा
'कैसर ए हिंद' हे भंडारा शहराचे हे ऐतिहासिक स्मारक आहे. हे स्मारक भंडारा येथील मुख्य बस स्टँड जवळ आहे. खूप लोकांना हे माहित नाही आहे. हे स्मारक तुम्हाला बसस्थानकावरून सहज दिसू शकेल. ते भंडारा येथील सिव्हील हॉस्पिटलकडे जाणार्या मार्गाने आहे. हे स्मारक नष्ट होण्यापूर्वी त्याचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे.
भंडारा शहराला ऐतिहासिक वारसा म्हणून लाभलेला व शहराची शान समजला जाणारा १५० वषांपूर्वी बांधलेला भव्यदिव्य पांडे महाल स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. यादवराव पांडे यांनी हा महाल बांधला आहे. ते मूळचे उत्तर प्रदेशातील. इंग्रजांच्या काळात सुभेदार, मालगुजार म्हणून ते सावकारीचा व्यवसाय करीत असत. जवळपास ९६ गावांचे ते मालगुजार होते. एक चांगले उत्कृष्ट महालाप्रमाणे निवास असावे या कल्पनेतून त्यांनी मुरुमांच्या दगडांच्या पायऱ्यांवर विटा व चुन्याचा वापर करून एक 'भव्य वास्तू उभी केली, ज्याला तब्बल २० वर्षे लागली आणि इ.स. १८९६ मध्ये तो पूर्ण झाला. असा महाल विदर्भात कुठेही नाही असे अनेक तज्ज्ञ सांगतात.
महालाला एक भव्य प्रवेशद्वार इतके उंच आहे को ज्यातून अंबारी ठेवलेला हत्ती जात असे. प्रवेशद्वार लाकडाचा असून अत्यंत मजबूत, वजनी व उंच, ज्याला उघडणे व बंद करण्यासाठी २५-३० माणसे लागतील. कलात्मक व नक्षीकाम केलेले सागवानी व शिशमचे मोठमोठे खोबर, विदेशातून आणलेली काचेची मोठी झुंबरे, हुंड्या, लाकडाचे नंदी बैल, हत्ती घोडे, इटालियन मार्बल्स व टाइल्स, भव्य आरसे (बेल्जियम येथून आणलेले), उत्कृष्ट फर्निचर, दिवाणखाणे, टाके इ. दिवाणखाण्यात व इतर निवासस्थानी आहेत. प्रत्येक कक्षात संगमरवरी फरशा असून महालाच्या पहिल्या मजल्यावर निवास व इतर स्थानी दारे, खिडक्या, तावदाने यांना निळ्या व लाल काचा लावलेल्या आहेत. कक्षांच्या भिंतीवर भव्य चित्र काढलेले आहे. महालात जवळपास १०० वर खोल्या आहेत. नैसर्गिक वातानुकूल अशा खिडक्या आहेत.
प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला रंगमहाल. भिंतीवर वाघ, हरीण, सांबर, रानगवे, रानम्हैस, चितळ, अस्वल, काळवीट यांची मोठाली शिंगे व मुखवटे, ट्रॉफोज इ. दुर्मीळ वस्तू जागोजागी लावलेल्या होत्या पण ते आता दिसत नाही. या हॉलच्या दोन्हीकडे भिंतीवर २५-३० फूट उंचीचे व १५ फूट रुंदीचे भव्य आरसे लावलेले आहेत. त्या काळच्या चित्रकारांनी काढलेली भव्य तैलचित्रे रंगमहालाच्या आकर्षणात भर घालतात.
राजा रवि वर्मा यांचे महाभारत व रामायणाचे चित्र देवघरासमोर चांगल्या अवस्थेत दिसून येते. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे कचेरी असून त्या काळात मुनिम, आवारी, वारकरी, दिवाणी सावकारांची कामे येथे होत असत.
कचेरीजवळून प्रवेश केल्यावर आत देवघर आहे. देवघराजवळ चारही कोपऱ्यात आरसे असून तेथे यादवराव पांडे यांचे भव्य चित्र व अर्धपुतळादेखील आहे. पांडे हे गणेशभक्त असल्यामुळे येथे दरवर्षी गणेशोत्सव साजरा होत असतो. गणेशोत्सवातील दहाही दिवस जनतेला देवघर खुले असते. महालाच्या गच्चीवर कोरोव काम केलेल्या खांबांवर उभारलेले विश्रांतीस्थळ आहे. अधूनमधून पर्यटक व इतिहासप्रेमी नागरिक या महालाला भेट द्यायला येत असतात.
(लेख - सईद शेख)
पूर्वजांचे ‘रेकॉर्ड’ ठेवणारा भाट
भाट' हा शब्द मराठीत 'स्तुतिपाठक' या अर्थाने रुढ आहे. हा एक भटका समाज असून 'भाट' किंवा 'पुस्तके' या नावानं ओळखला जातो. पूर्वजांच्या किंवा आपल्या मालकाच्या वंशावळी, त्या संदर्भातील इतर नोंदी लेखी स्वरूपात ठेवणे हा भाटांचा पिढीजात व्यवसाय आहे.
भाटांकडे असणाऱ्या नोंदींची वैशिष्ट्ये-
आपले पूर्वज कोण होते? त्यांचे मूळ गाव, त्यांचं नाव, जात-पोटजात, पूर्वज कोठे राहत होते? कुलदैवत कोणते? अगदी खापर पणजोबा काय करायचे, तुमचे कुटुंब मुळचे कुठले? परिवार या गावात कसा आला? इत्यादी रंजक माहितीचा इतिहास या 'पुस्तक्यांकडे' सापडतो की अशी माहिती शासनाच्या कोतवाल बुकातही सापडणार नाही.
भाट लोक वंशावळ वाचण्याच्या आधी श्रीगणेश व इतर देवतांना वंदन करून वाचायला सुरुवात करतात. एका विशिष्ट सुरात वंशावळीतील नावे वाचून दाखवतात. नवीन पिढीतील मुलांची नावे याची नोंद करतात.
भाटांच्या दप्तरात 'सांकेतिक' लिपीत लिहिलेला बहुतेकांचा लेखाजोखा आजही उपलब्ध आहे. त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय इतर कुणीही करू नये, म्हणून सांकेतिक लिपीत नोंदी करण्याची त्यांची पध्दत असावी. खरं तर असा प्रकार असतो किंवा होता, याबाबत आजही फारसे कुणाला माहीत नाही.
मुक्ताई मंदिर, सालबर्डी, अमरावती
विदर्भ आणि मध्य प्रदेश राज्याच्या सिमेवर सालबर्डी येथे असलेले मुक्ताई चे प्राचीन मंदिर.
मोर्शी तालुक्यातील सालबर्डी येथे नदी आणि डोंगराळ भागात निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे मंदिर पुरातन असून याचे बांधकाम हेमाडपंथी शैलीत आहे. जवळच प्राचीन मुक्ताई गुफा सुद्धा आहे.
ढाणकीची
(ता. उमरखेड, जि. यवतमाळ) बारव तरूणांनी काल स्वच्छ केली. त्यांचे
मन:पुर्वक अभिनंदन.. स्वच्छ पाण्याने त्यांना आशीर्वाद दिला...
ढाणकी बारवेची स्वच्छता सुरू...
ढाणकी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ येथली बारव स्वच्छता मोहिम आज पहाटे सुरू झाली. आठच दिवसांपुर्वी या बारवेचा फोटो मी टाकला होता. Vishnu Fulewar या तरूणाने पुढाकार घेतला. आज बारवेचे काम सुरू झाले. गावोगावचे तरूण असे उत्साहानं बारव बचाव मोहिमेत सहभागी होत आहेत हे मोठे आशादायी चित्र आहे. महाराष्ट्र बारव मोहीम आता सगळ्यांनी मनावर घेतली आहे. यपुढच्यावर्षी महाशिवरात्रीला किमान ५०० बारवांवर दीपोत्सव होवू शकेल अशी आशा निर्माण झाली आहे. ५० बारवा सुंदर पर्यटन स्थळ म्हणुन विकसित होणार आहेत. या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वज्ञात अज्ञात व्यक्तींचे मन:पुर्वक धन्यवाद.. साथी हाथ बढाना..
श्रीकांत उमरीकर, महाराष्ट्र बारव बचाव मोहिम, औरंगाबाद, 9422878575.
आनंदेश्वर मंदिर, लासूर, अमरावती
गुगुळादेवी मंदिर, गिरोली खुर्द, देऊळगाव राजा, बुलढाणा
सिंदखेडराजा या गावाचे नाव काढले की महाराष्ट्राचा भव्यदिव्य इतिहास ज्यांनी घडविला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीची- जिजाऊंची- आठवण, त्यांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री शिवाजी राजे यांचं हे आजोळ. लखुजीराव जाधवांची जहागीरदारी इथे होती. त्यांचे कन्यारत्न म्हणजे जिजामाता- राष्ट्रमाता होय. जाधवांचं नव्हे, तर बुलडाणा जिल्ह्यातील बर्याच लोकांचं कुलदैवत गुगुळादेवी आहे ही नवसाला पावणारी आहे. सामान्य महापराक्रमी दिग्विजयी इतिहासात अजरामर राहणारं राष्ट्रीय वृत्तीचं संतान आपणास व्हावं म्हणून जिजाऊनं तिला नवस केला. तिची ओटी भरली. आजही ज्यांना संतान होत नाही ते गुगुळा देवीला नवस करतात.
महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, सप्तशृंगी ही असली तरी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील गिरोली या गावानाजीकचे ‘श्री गुगलादेवी मंदिर’. ह्या मंदिराला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे. हे मंदिर सातवाहन कालखंडात बांधले गेले. या मंदिराला ३०० वर्षाचा इतिहास आहे. अतिप्राचीन कालखंडात या मंदिराची स्थापना केल्या गेली आहे. या मंदिराची भिंतीची जाडी ४ फूट आहे. देवगिरी यादवांच्या कालखंडात हेमाडपंथी साज मिळाला. हे मंदिर स्थापत्य पद्धतीत चुना, सिमेंट न वापरता दगड एकमेकात एखाद्या टेलिस्कॉप प्रमाणे बसवून पक्के केले आहेत. या मंदिराबाहेर अंदाजे दोन ४० फूट उंच भव्य दीपमाळा आजही उभ्या आहेत. दीपमाळा ही देवगिरी यादव कालखंडाची ओळख आहे. या दोन दीपमाळापैकी एक दीपमाळा आतून पोकळ असून त्याच्या आत स्पायरल पद्धतीचा जिना आहे. ही दीपमाळा अद्भूत असून आतून पोकळ असलेली दीपमाळा आजवर कुठेही आढळून येत नाही. ती एकमेव बुलढाणा जिल्ह्यातील गुगलादेवी येथेच आहे.
सिंदखेड राजाजवळ गिरोली गावाच्या घनदाट जंगलात हेमाडपंथी असलेलं गुगुळादेवीचं मंदिर, देवालयाच्या गर्भगृहात गुगुळाची अर्ध तांदळा शेंदूरलिपीत प्रतिमा आहे. हरिणीसारखे डोळे, उंच कपाळ चेहर्यावरचं तेज डोळ्यात साठविता येत नाही. हे देऊळ अत्यंत प्राचीन असावे यात शंका नाही. जवळच्या पहाडावर एक नैसर्गिक गुहा आहे. तोंड अर्धवर्तुळावर आहे. हेमाडपंथी सभामंडप असून, शिवलिंग व नंदी आहे. गुहेच्या समोर पाषाणयुगीन मानवाने तयार केलेली हत्यारे दिसतात. त्यावरून स्थळाची कल्पना करता येते. प्राचीनत्व, पौराणिक व ऐतहासिक असं महत्त्व या देवीला प्राप्त झालं आहे. सिंदखेडराजा नावाच्या पंचक्रोशीत गुगलादेवी इतके प्राचीन व जागृत देवस्थान कुठेही नाही.
या गुगलादेवी मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे की नवरात्री मध्ये अखंड ९ दिवस ५५१ दीप प्रजल्वित केले जातात. हे अखंड दीप भाविक लावतात ते सतत ९ दिवस तेवत ठेवले जातात. त्यामुळे मंदिर हे प्रकाशमय झालेले असते. अखंड दीपमाला लावण्याची पद्धत ही प्राचीन असून त्याला ३०० वर्षाचा इतिहास आहे, पुर्वी मंदिरे जे कुठे तरी जंगल पहाडात असायची तिथे सर्व अंधार असायचा आणि नवरात्रात अखंड दीप ठेवण्या पाठीमागे भाविकांची वेगळीच भावना आहे मनातील मनोकामना पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे त्यामुळे हे अखंड दीप लावले जातात. मंदिर परिसरात एक प्राचीन काळातील विहीर असून त्या विहिरीतील पाण्याने स्नान केले तर आजही आपले त्वचा रोग पूर्ण पणे बरे होतात. हे विशेष आहे.
वर्हाडातील प्रत्येकाने बहीरम बुवाची यात्रा ऐकले असेल वा बघितले असेल आपली स्वतःची ओळख जपत बहिरम याठिकाणी मोठ्या थाटात डिसेंबर-जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात पारंपारिक यात्रा भरते मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर भैरवनाथ म्हणजे बहिरम बाबा यांचे प्राचीन मंदिर आहे.
बहिरम जवळच करजगाव नावाचे पंचक्रोशीत प्रसिद्ध असे गाव आहे या गावाचा इतिहास जुना आहे मागील भागात आपण याच गावचा गढीवजा किल्ला बघितला या वास्तू पेक्षाही वेगळा व जुना इतिहास या गावाला लाभलेला आहे तो इतिहास व गावातील प्रथा परंपरा अजुनी तिथल्या लोकांनी जपून ठेवल्या आहेत या गावाच्या मध्यभागी श्री भुईघर महादेव मंदिर किंवा अय्या बुवा मठ हे प्राचीन ठिकाण आहे फारसे कुणाला माहीत नसलेले हे ठिकाण म्हणजे मानवनिर्मित गुहाच आहे स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार अय्या बुवा हे दोन पिढ्या तीन पिढ्यान अगोदर होऊन गेलेले आहे व हे मंदिर त्यापेक्षा ही पुरातन आहे बाहेरून बघितले असता साधे मंदिर दिसत असून मंदिराच्या आत प्रवेश केल्यास 2000 स्क्वेअर फूट मोकळी जागा आपल्याला दिसते खाली जागेच्या मधोमध शंकर पिंड, नंदी व दोन मारुतीच्या मुर्त्या शेंदुर लावलेल्या आपणास निदर्शनास येते मूर्तीच्या मागे चौकोनी विहिरीसारखा भाग असून आत उतरण्याकरीता दोन फुट रुंदीच्या पायऱ्या आहेत अंदाजे दहा ते 15 फूट विहिरी सारखे आत मध्ये उतरल्यानंतर दोन्ही बाजूला मंदिरात जाण्याकरिता रस्ते आहेत दक्षिण दिशेच्या कमानीतून आत प्रवेश केला असता भुलभुलय्या सारख्या अनेक कमानी आपल्या दृष्टीस येतात आतील भूयाराचि उंची पाच फूट आहे व कमान त्यापेक्षा छोटी अशा अनेक कमानीतून वाट काढत आपण पुढे गेल्यास आपणास नाग देवतेचे दर्शन होते चार बाय चार च्या खोलीमध्ये आपण दर्शन घेऊन पुढे निघालो की आपल्या दृष्टीस पडते ते महादेवाची मूर्ती व शिवलिंग, महादेवाची मूर्त आता एवढ्यात कोणीतरी बांधलेले आहे तिथून समोर गणपती मूर्ती व हनुमंताची मूर्ती आपल्याला दिसते संपूर्ण मंदिर हे दगडी कामात आहे जमिनीच्या आत मंदिर बांधण्याचा उद्देश त्याकाळील लोकांनाच माहीत, आतून चूना कलर मारला असल्यामुळे मंदिराचं बांधकाम नेमकं कोणत्या काळातला आहे हे लक्षात येत नाही व स्थानिकांना त्याबद्दलची फारशी माहिती सुद्धा नाही भुयाराच्या आत मध्ये लाईटची व्यवस्था असल्यामुळे लगेच मंदिर बघता येते असे हे आगळ्यावेगळ्या बांधकामाचे भुलभुलय्या दुर्लक्षित मंदिर एकदातरी बघावे असेच आहे
शिवा श्रीकृष्णराव काळे
स्वराज्य सेवा प्रतिष्ठान
8275217180
बुद्ध पौर्णिमा विशेष : ऐतिहासिक बुध्द लेणी, विज्जासन, भद्रावती, जि. चंद्रपुर
105 फुट उंच हनुमान मुर्ती, नांदुरा, बुलढाणा
राष्ट्रगीत सुरू होण्याआधी एखादे देशभक्तीपर गाणं वाजवून मुलचेरा गावात कार्यक्रमाची सुरुवात होते. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटाआधी काही सेकंद देशभक्तीपर गाणं वाजतो. घड्याळाचा काटा ८ वाजून ४५ मिनिटांवर येतो. त्यानंतर 'परेड सावधान... एक साथ राष्ट्रगीत सुरू कर' अशी सूचना येते आणि हा आवाज मुलचेरामध्ये ( Mulchera Village Gadchiroli ) जिथपर्यंत पोहोचतो तेथील गावकरी सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रगान सुरू करतात. यावेळी आजूबाजूच्या छोट्या-मोठ्या वाहनांना देखील आपसूक ब्रेक लागून वाहन चालक सुद्धा उत्स्फूर्तपणे याचा हिस्सा होतात. राष्ट्रगीत संपलं की सगळे 'भारत माता की जय' असा एकच जयघोष करतात आणि त्यानंतर देशाप्रती भावना व्यक्त करून आपल्या दिवसाची सुरुवात करतात. दुकानदार आपले दुकान उघडतात आणि बाजारपेठा सुरू होतात.
राष्ट्रीय प्रेरणा घेऊन दुकान उघडण्याची सुरुवात नेमकी कधीपासून झाली ? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तालुका मुख्यालयात असलेल्या मुलचेरा पोलीस स्टेशन येथे काही महिन्यापूर्वी रुजू झालेले ठाणेदार अशोक भापकर यांनी १५ ऑगस्ट २०२२ पासून या उपक्रमाला सुरुवात केली. १५ ऑगस्ट पूर्वीच त्यांनी याविषयी व्यापारी वर्ग, युवा पिढी, तसेच पत्रकार बांधवांसोबत निसंकोच चर्चा करून सदर उपक्रमाला सुरुवात करण्याचा ठरवलं होतं. दररोज सकाळी राष्ट्रगीत गाण्याने जनतेमध्ये देशभक्ती वाढेल आणि समाजातही एकोपा निर्माण होईल या उद्देशाने सर्वांनीच या निर्णयाचा स्वागत केला.
एखाद्या शाळेच्या किंवा हायस्कूलच्या परिपाठाप्रमाणे मुलचेरा गावाने हा उपक्रम १५ आगस्ट २०२२ पासून अखंड चालू ठेवला आहे. हा उपक्रम सुरू झाल्यापासून गावात भांडण तंटे कमी होऊन एकोपा वाढला आहे. तसेच गावातील लोकांची काम करण्याची क्षमता आणि उत्साह यामध्ये सुद्धा लक्षणीय बदल झाला आहे. मुलचेरा गाव हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेत समाविष्ट असून असून कदाचित महाराष्ट्रातील हे एकमेव गाव असेल जिथे राष्ट्रीय गीताने दिवसाची सुरुवात होते. हा सन्मान गडचिरोलीकारांना मिळाला असून मुलचेरा गावाची लोकप्रियता वाढत आहे.
चौमुखी गणेश, कळंब, यवतमाळ
यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब गावात विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे चिंतामणी गणपतीचे मंदिर आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे ३५ फूट खोल आहे.
श्री.चिंतामणीचे दर्शन घेण्याआधी चौमुखी गणेश प्रथमदर्शनी दिसतो.
(साभार - वंदू श्री गणेशा)
श्री चौमुखी गणपती, केळापूर, जि. यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्य़ातील पांढरकवडा - केळापूर हे गाव प्राचीन गावांपैकी एक असून माता जगदंबेच्या मंदीरामुळे प्रसिद्ध आहे. देवीच्या दर्शनाकरीता येणारे भाविकही तेथून जवळच असलेल्या चौमुखी गणेशाचे दर्शन घेतात. श्री चौमुखी गणपती, केळापूर हे राष्ट्रीय महामार्गापासून थोड्या अंतरावर आहे. अशी आख्यायिका
आहे की, एकेकाळी केळापूरला चंद्रहास राजा राज्य करीत होता. त्याकाळात ही चौमुखी श्री गणेशाची मूर्ती स्थापीत केली असावी. चार ते पाच फूट उंच असलेल्या चौमुखी श्री. गणेशाची मूर्ती अतिशय देखणी व रेखीव पूर्व-पश्चिम,उत्तर-दक्षिण अशा चारही दिशांना शेंदूरचर्चीत मुखवटे असून चारही बाजूंनी श्री गणेश आपले रक्षण करतो अशी येथील गावकऱ्यांची श्रद्धा आहे. ही गणपती देवता अनेक घराण्याची कुलदैवत आहे. आजही अनेक भक्तगण मूर्तीचे दर्शन घेण्याकरीता येथे येतात. येथील मूर्तीचे साम्य श्री क्षेत्र कळंब येथील चिंतामणी मंदिरात उतरण्यापूर्वी उजव्या हातावर चौमुखी गणपती आहे तशीच मूर्ति व तेवढीच प्राचीन असावी असे वाटते. दुसरे बाजीराव पेशवे दक्षिणच्या स्वारीवर जातांना या गावी थांबले होते आणि त्यांनी या गणेशाची पूजा केली अशी आख्यायिका आहे. सदर मंदिराचा विकास होऊन तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त व्हावा अशी येथील लोकांना वाटते.
फोटो - अमित उपाध्ये
माहिती साभार - दै. लोकदूत
सिद्धेश्वर गणपती मंदिर, पुर्णा नगर, अमरावती
परतवाडा रोडवरील आणि अमरावतीपासून २७ किमी असलेल्या पुर्णा नगर या गावी हनुमान मंदिरासमोर पुरातन श्री गणपतीचे चतुर्मुखी मंदिर श्री सिद्धेश्वर या नावाने ओळखल्या जाते. सदर मुर्ती सिंदूर वर्णीय असून पुरातन सुबक व सुंदर आहे.
आतापर्यंत पाहिलेली चौथी मुर्ती असून दुर्मीळ आहे. यामध्ये विदर्भातील कळंबच्या चिंतामणी मंदिरातील चौमुखी गणपती, चौमुखी गणपती केळापूर, तर नांदेड जिल्ह्य़ातील मुगूट या गावी चौमुखी गणपती पहायला मिळतो. तसेच पंचानन गणेश पवनी, पंचमुखी गणेश भातकुली, पंचमुखी गणेश साखरखेर्डा, पंचमुखी गणेश ओंकारेश्वर, मध्यप्रदेश येथे पहायला मिळतात.
(फोटो आणि माहिती - मिलींद बरबडे) - वंदू श्री गणेशा
पांडे महल गणपती, भंडारा
पितळी भांड्यानंतर भंडाऱ्याची दुसरी कोणती ओळख असेल, तर ती पांडे महाल. इतके घट्ट आणि अतूट अशा नात्यांचे वैभव या महालाच्या उदरात दडले आहे. कधी ज्या महालात साक्षात लक्ष्मी वास करायची इतकी श्रीमंती होती. त्या महालाची लकाकी काळाच्या ओघात केव्हाच काळवंडली आहे. मात्र या महालाचे एक गूढ असे आकर्षण असल्याने लोकांची पावले आपसूकच सात दिवस वळू लागतात. त्याला निमित्त असते येथील परंपरागत गणेशोत्सवाचे. या औचित्याने का होईना कोणालाही हेवा वाटावा, अशा भव्य महालातील श्रीगणेश विराजित असलेला देव्हारा व श्रीदर्शन घेऊन बाहेर पडतात. मात्र, या भव्यदिव्य महालातील त्या ओसाड आणि पडझड झालेल्या, काळवंडलेल्या भिंतीचे औदासिन्य पाहून त्यांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न मात्र कायम छळत राहतात.
महालातील श्रीगणेश उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. तो थाटमाट, रुतबा व शानशौकत आता फक्त गोष्टींत ऐकण्यापुरती उरली आहे. एका अनामिक ओढीने दरवर्षी लोक येथे आवर्जून हजेरी लावतात. उत्सवाच्या निमित्ताने आतमध्ये साफसफाई झाल्याने सध्या हा परिसर चकाकला आहे. येथील भव्य आरसे, झुंबर, काळ्याकुट्ट लाकडी कमानी महिरपीचे आकर्षण लोकांना वाटत असते. या वातावरणाला एकाकीपणा आणि औदासिन्यांची किनार आहे. जणू काही महालातील मूक आणि अबोल वस्तूही गजबज पाहून लोकांशी हितगूज करण्यासाठी आतुर असल्याचा भास होतो.
भंडाराच्या मध्यभागी असलेला पांडे महाल हा स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. ही एक अतुलनीय आणि अप्रतिम कलाकृती आहे. मालगुजार यादवराव पांडे यांच्या काळात या १५० वर्षे जुन्या वाड्याची पायाभरणी झाली होती. हा वाडा महाल म्हणून ओळखला जातो. येथे १०० हून अधिक खोल्या आहेत. २५ ते ३० फूट उंच आणि १५ फूट रुंद असे परदेशातून आणलेले आरसे आहेत. झुंबर, हात, लाकडी हत्ती, घोडे, बैल, इटालियन संगमरवरी फरशा, दिवाणखाना, कारंज्याचा हौद, निळ्या, लाल खोल्या, निवास, यादवराव पांडे यांचे पितळ, मार्बलचे लाइव्ह पोर्ट्रेट, पांडे कुटुंबाची वंशावळ, चित्रकार राजा रावीची जगप्रसिद्ध चित्रे वर्मा हॉलवेमध्ये लागली आहेत. यादवराव पांडे हे गणेशाचे परम भक्त होते, त्यांनी १२८ वर्षांपूर्वी गणेशमूर्तीची स्थापना केली होती. दरवर्षी येथे श्रीप्रतिष्ठापना करून उत्सव साजरा केला जातो, ही परंपरा आजतागायत सुरू आहे. देवघर पितळेचे आहे. ज्यात क्रिस्टल काच लावले आहेत. उत्सवानिमित्त मातीपासून बनवलेली जुनी फळे, लहान आकारातील प्राणी सजावटीसाठी समोर ठेवले जातात.
यादवराव पांडे यांना नृत्याची आवड होती. इथल्या रंगमहालमध्ये नृत्याचे कार्यक्रम व्हायचे. नर्तिका महताब जामा स्वतःला आरशात न्याहाळत नृत्य करायची. पॅलेसच्या वरच्या भागात लॉन टेनिस, बॅडमिंटन खेळ, विश्रांतीची व्यवस्था होती. महालाच्या तळघरात अनेक गोष्टी आश्चर्यकारक पाहण्यासारख्या आहेत. तळघरातून गुप्त मार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात जातो. असा अप्रतिम राजवाडा संपूर्ण विदर्भात नाही.
हे वैभव जपायला हवे...!
शहराचे ऐतिहासिक वैभव असणाऱ्या महालाचा एक भाग विकला गेला आहे. यावरून बरेच वादळ उठले होते. कधीतरी ही वास्तू पाडून त्याजागी सिमेंट कॉंक्रीटच्या टोलेजंग इमारतीही पुढील काळात उभारल्या जातील. आता कसेतरी गणेशोत्सवानिमित्ताने का होईना महालाचे ओझरते दर्शन घेता येते. भविष्यात महाल इतिहास जमा होऊन त्याबद्दलच्या सुरस कथा केवळ गोष्टीतच सांगितल्या जातील की काय? अशी आशंका आहे.
वारसा संग्रहालयात रूपांतरित व्हावा
ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सईद शेख यांनी सांगितले की, हा अमूल्य वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी अॅड. महेश पांडे, आनंद पांडे यांच्यासह आम्ही खूप प्रयत्न केले. अनेक वेळा पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. अखेरच्या घटका मोजणारा हा वारसा संग्रहालयात रूपांतरित व्हावा, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या अनमोल ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे, हीच आमची आणि नागरिकांचीही अपेक्षा आहे.
लेखन - उदय राऊत
छायाचित्रे - मनिष आठले (मुखपृष्ठ)
संकलन - डिजिटल भंडारा (Digital Bhandara)
लोणार येथील मोठा मारूतीचे आधी आणि नंतरचे रूप
वरदविनायक गणेश, गवराळा-भद्रावती, चंद्रपूर
शमी विघ्नेश गणपती, आदासा, नागपूर
भृशुंड गणेश, मेंढा, भंडारा
नुकताच वणी, येथील सप्तशृंगी मातेच्या मुर्ती वरील शेंदूराचा जाड थर काढण्यात आला आहे त्यामुळे मातेचे सुंदर रूप, आयुध, अलंकार स्पष्ट दिसायला लागले आहेत.
काही वर्षा आधी लोणार, बुलढाणा येथील मोठा मारुती मंदिरातील हनुमान मुर्ती वरील शेंदूर थर काढण्यात आला होता आणि बजरंगाचे अद्भुत रूप दिसून आले.
याप्रमाणेच विदर्भातील काही मुर्ती वरील शेंदूर थर काढल्यास त्या मुर्तींचे विलोभनीय दर्शन घेता येईल. त्यामध्ये विदर्भातील तीन अष्टविनायक प्रतिमांचा समावेश आहे.
यापूर्वी
आपल्या विदर्भातील वणी येथील जैताई देवीची पण खोळ पडून सुंदर मूर्ती प्रकट
झाली होती.अमरावतीच्या एकवीरा देवीची पण खोळ पडून छान मूर्तीचे दर्शन
झाले.
कलालकुंड धबधबा, चिखलदरा, अमरावती
खंडेश्वर मंदिर, नांदगाव खंडेश्वर, अमरावती
शिव! अर्थात शंकर. लोप किंवा नाशाचे प्रतिक. आणि म्हणूनच नाविन्याला, सृजनाला प्रेरणा देणारे. शिवलिंगाची आराधना आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे अगदी पाच पंचवीस उंबर्याच्या गावांमध्येही शिवालय असतेच. या मंदिराची नावही भक्तांनी प्रेमाने ठेवलेली. कुठे हा सोमेश्वर, कुठे कोंडेश्वर, कुठे आदिनाथ. अशी कितीतरी नावांनी भक्त त्याची आराधना करतात. असेच एक पुरातन सुरेख मंदिर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. विदर्भातून आणि मध्यप्रदेशातून खूप भक्त इथे दर्शनाला येतात. गावाचे नावच शंकरावरून दिले आहे, नांदगाव खंडेश्वर.
नांदगाव खंडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातले तालुक्याचे ठिकाण. अमरावतीपासून अवघे ३६ किमी अंतरावर ४५० उंबर्याच्या गावात मध्यवस्तीत शंकराचे एक मंदिर आहे. त्याला म्हणतात खंडेश्वर. खंडेश्वर गावात मध्यवस्तीत आल्यावर एक उंच टेकाड आहे. वर जाण्यासाठी पूर्वी येथे दगडी पायर्या होत्या. आता तिथे सिमेंटच्या पायर्या बांधल्या आहेत. या २५-३० पायर्या वर चढून गेलं की एक काळ्या दगडांचा भव्य परकोट लागतो. या परकोटामधून आत शिरले की प्रशस्त प्रांगणाच्या मध्यभागी थोड्या उंचावर एक आखीवरेखीव मंदिर दिसते.
खंडेश्वराचे अर्थात शिवाचे हे मंदिर इथे असलेल्या शिलालेखानुसार सुमारे ८५० वर्षापूर्वी बांधले आहे. राजा रामदेवराय यांचे पंतप्रधान हेमाद्रीपंत यांनी या मंदिराचे बांधकाम शके ११७७ म्हणजे इ. स. ११५४ मध्ये केले असल्याचा उल्लेख मंदिराच्या भिंतीवर कोरलेल्या शिलालेखात आहे.
हे मंदिर हेमाडपंथी शैलीतले आहे. कोरीव दगडांचे बांधकाम आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या बांधकामात विटांचा वापर करण्यात आला आहे. या विटा विशिष्ट पद्धतीने बनविलेल्या आहेत. आकाराने मोठ्या असलेल्या या विटा पाण्यात टाकल्या की पाण्यावर तरंगतात.
राज परिवार, राज नर्तकी, शिव पार्वती आणि परिवार यांच्या अत्यंत कोरीव आकृती, दागिने, वस्त्रांचा पोत, नाजुकपणा या सर्व वैशिष्ट्यांसह खांबावर कोरल्या आहेत. नाजुक कोरीव काम केलेले हे खांब या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. दगडी कोरीव खांबांनी सुशोभित केलेल्या या प्रशस्त सभामंडपामध्ये एकूण तीन मंदिरे आहेत. पूर्वेकडे मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या गाभार्यात तीन चार पायर्या खाली उतरून मग आपण शिवलिंगापाशी पोहचतो. काळ्या पाषाणातले भव्य शिवलिंग इथे आहे. या गाभार्याच्या वरच्या बाजूला आणखी एक गाभारा आहे. त्याला ध्यानगृह म्हणतात. असे म्हणतात की हे ठिकाण पुर्वी ऋषींच्या तपसाधनेसाठी बांधण्यात आले होते. सध्या हे ध्यानगृह बंद करण्यात आले आहे. त्यानंतर मंदिराच्या उत्तरेला शिव पार्वतीच्या कोरीव मूर्ती असलेले एक मंदिर आहे आणि दक्षिणेला नरसिंहाचे मंदिर आहे. या तिन्ही मूर्ती अत्यंत कोरीव आहेत.
या तिन्ही मंदिरांना मिळून एकच भव्य सभामंडप आहे. त्यासमोर एक मोठा नंदी आहे. मंदिराच्या आवारात एक शंभर फूट उंचीची दीपमाळ दृष्टीस पडते. या दीपमाळेच्या वर चढून जायला पायर्या आहेत या पायर्या चढून वर गेले की नांदगाव खंडेश्वर आणि आजूबाजूच्या खेड्यांचे एक विहंगम दर्शन होते.
या ठिकाणाला आणि महादेवाला खंडेश्वर का म्हणतात याची एक दंतकथा स्थानिक सांगतात. त्याप्रमाणे पूर्वी या ठिकाणी कौंडिण्य ऋषींचा आश्रम होता. त्यांच्या शिष्यांमध्ये खंड्या नावाचा एक त्यांचा पट्टशिष्य होता. या पट्टशिष्याच्या आराधनेसाठी शिवलिंगाची स्थापना केली आणि या महादेवाचे नाव पडले खंडेश्वर.
या खंडेश्वराला पहाटे आणि संध्याकाळच्या वेळेस नित्य पूजा बांधली जाते. महाशिवरात्री हा इथला मुख्य उत्सव. तेव्हा इथे मोठी यात्रा भरते. याशिवाय श्रावण सोमवारचेही इथे खूप महत्त्व आहे. श्रावण सोमवारी हजारो भाविक इथे दर्शनाला येतात. स्थानिक लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की, श्रावण सोमवारी कोंडेश्वर, खंडेश्वर आणि बोंडेश्वर यांचे दर्शन घेणार्याला काशीला गेल्याचे समाधान मिळते. यापैकी बोंडेश्वराच्या खाणाखुणा आज सापडत नसल्या तरी कोंडेश्वर आणि खंडेश्वराला पायी जाणार्यांची संख्या खूप मोठी आहे.
आठ-साडे आठशे वर्षापूर्वीचे हे मंदिर आजही यथास्थित आहे. त्याचे कोरीव काम, मंदिराचा रम्य परिसर हे सारे अनुभव घ्यावा असेच आहे. गुरुंनी शिष्याच्या उपासनेसाठी स्थापन केलेला असा हा खंडेश्वर कित्येकांचे आराध्य दैवत आहे.
(फोटो - शुभम भगवे)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.