Wednesday, August 10, 2022

डाकोटा

      अमेरिकेतील एका सुंदर शहराला भेट देण्याचा योग आला.नेवाडा राज्यातील लास वेगस हे शहर होत ते.जगातील सर्वात मोठा मान्यताप्राप्त जुगार इथे चालतो.कॅसिनो म्हणतात त्याला.विशेष म्हणजे हे शहर फक्त ह्या मिळणाऱ्या उत्पन्नातून चालते.बाकी कुठलेही उत्पन्नाचे साधन किंवा कंपन्या नाहीत.परंतु डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असा हा भाग त्यांनी बनविला आहे.20 ते 25 गगनचुंबी हॉटेल्स तेथे आहेत.सर्व हॉटेल्स मध्ये कॅसिनो चालतो.दिवसाला करोडोंची उलाढाल होते.मी स्वतः खेळलो परंतु शेवटी प्लस मायनस करत 5 डॉलर हरल्यावर निघून आलो.लालच बुरी चीज है.हे आठवून तिथून निघालो.तिथे त्यांनी युरोप उभेऊभ उभा केला आहे.युरोप देशात गेल्यासारखे वाटते. खाली काही फोटो पाठवीत आहे.

 

 












     वरील फोटो मधील सर्वात मोठे आच्छर्य म्हणजे वर दिसणारे आकाश खरे नाही.ते बनविले आहे.जरा ही नकली आकाश दिसत नाही.संपूर्ण परिसर वातानुकूलित. लायटिंग कोरीवकाम लय भारी.फ्लोरिंग पण असे वाटते की ओले आहे.ह्या सगळ्या वास्तू मधून एक छोटा तलाव बांधला आहे आणि त्यात बोटिंग चालते व बोट चालविणारे युरोपातील गाणी म्हणतात.सर्वच नयनरम्य.त्यात मोठमोठी दुकान आहेत अगदी सोने हिरा पासून कपडे,चपला,शोभिवंत वस्तू युरोपातील,खाणे पिणे,ऑर्केस्ट्रा, बार एकापेक्षा एक असे बरेच काही.
 इथे रोज रात्री पाण्यात रंगीबेरंगी कारंज्याचा मुझिकल शो असतो👇
 अजून एक शो इथे होतो रोज रात्री. दिवसा धबधबा दिसतो आणि रात्री त्यातून लाव्हारस वाहतो अशी सजावट त्यांनी लायटिंग आणि आग द्वारे दाखविली आहे ती सुध्दा पाहण्यासारखी अप्रतिम👇
 आम्ही २०१६ आणि २०१९ मधे अमेरीकेत San Diego प्रत्येकी ३/४ महिने होतो तेंव्हा Las Vegas/ Zion Canyon / Bryce Canyon / Joshua Tree / San Jose / Julian / Big Bear असे चार राज्यांतील खूप ठिकाणी फिरलो होतो

आता मार्च पासून East Coast मधे New Jersey ला आहे
ह्यावेळी New York, Boston with Harward University / Chicago, Wisconsin, North Dakota, Thadore Nattional park, Yellow Stone National park, Mount Rushmore in South Dakota, Philadelphia, Lake George, Lake placid असे एकूण १२ राज्यांतून प्रवास केला
Yellow stone National park चा अनुभव अविस्मरणीय आहे त्याची माहिती, फोटो व videos काही दिवसांपूर्वी पोस्ट केले होते

Mount Rushmore National memorial चे फोटो व video
पोस्ट करत आहे










Mount Rushmore National memorial, Black hills,
South Dakota

1) George Washington
2) Thomas Jefferson
3) Theodore Roosevelt
4) Abraham Lincoln  
 अमेरीकेच्या ह्या चार प्रेसिडेंट्स चे चेहरे ६० फूट उंचीची शिल्प कोरली आहेत प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूस अमेरिकेच्या प्रत्येक राज्याचा झेंडा लावलेला आहे रोज रात्री राष्ट्रगीत होते तेंव्हा ते चारही चेहरे प्रकाशाने उजळून टाकण्यात येतात. आम्ही संध्याकाळीही गेलो होतो… रात्री ९ वाजता तो प्रकाश सोहळाही पाहिला
  ती शिल्प कशी तयार गेली याची डॅाक्युमेंटरी दाखवली जाते…स्किल आहे, टेक्नॅालाजी वापरुन जे केल आहे ते पाहून थक्क व्हायला झाल पण त्याचवेळी आपल्या देशातील लेण्यांची, सुबक कोरीव काम केलेली देवालये आठवली. कुठलीही टेक्नॅालाजी न वापरता ती केली गेली याचं जास्त अप्रूप वाटल
फक्त त्यांना जपण्यात आपण अजून कमी पडतो… ते झाल पाहिजे
  मागच्या वर्षी आम्ही ईथेच राहीलो होतो . फारच सुंदर अखाद्य राजवाड्यासारखे भव्य आहे हे ‘ Bellagio ‘ आणि तिथला नयमरम्य fountain show!!
तुम्हीं केललं वर्णन अगदी तंतोतंत . स्वप्ननगरीच आहे Las Vegas !!   ते खूप मोठे गिफ्ट स्टोर आहे
हाती बनवलेली सुंदर पेंटींग्ज आणि इतरही खूप छान वस्तू तिथे मिळतात
आणि काही घ्यायच नसेल तरी आतील प्राचीन संस्कृतीचा अनुभव घेऊ शकतो
तो अनुभव घेताना आपणही नकळत त्या काळात जाऊन पोचतो





























 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...