Sunday, August 11, 2024

होळकरकालीन राजराजेश्वर मंदिर

 http://maharashtra-bhakti-shakti.blogspot.com/2019/08/blog-post_82.html

 

 || श्रीद्वारकाधिश मंदिर / श्रीमंत शिंदे सरकार वाडा, पंढरपूर.||



|| श्रीद्वारकाधिश मंदिर / श्रीमंत शिंदे सरकार वाडा, पंढरपूर.||

चंद्रभागेत स्नान करून झालेवर वाळवंटातून गावाकडे वर येताना महाद्वार घाटावरून डावीकडे पाहिले की दिसतो भव्य दगडी बुरूजांचा किल्ला. वाटतो मराठेशाहीतला अजिंक्य योद्धा असणारा बुलंद किल्ला. पण तो काही किल्ला नाही. किल्लाच काय पण साधी गढीही नाही. ती आहे, नव्हे तो आहे शिंदे सरकारांनी बांधलेला वाडा. त्यांनी स्थापिलेल्या द्वारकाधिशाचे मंदिर. म्हणजे कृष्ण मंदिर. आपण महाद्वार घाटाकडे पाहिले की उत्तर बाजूला होळकर आणि दक्षिण बाजूला शिंदे यांचे भव्य वाडे दिसतात. जणू भासते सुलतानी सत्तेच्या संकटापासून पंढरीचे रक्षणासाठी सदैव सज्ज असल्यासारखे उभारलेत. जसे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे रक्षणार्थ ते उत्तरेत जरब बसविते झाले. त्यापायी इंदौर अन् ग्वाल्हेरात त्यांनी आपले ठाणे वसविले तसे हे त्यांचे पंढरीतले वाडे. त्यातला हा शिंदे सरकार वाडा.

घाटाच्या वर आले की डावी कडे दगडी कमरेएवढ्या जोत्यावर उत्तराभिमुख घडीव बांधणीचे दो बाजूला असणाऱ्या दगडी खांबावर कोरलेले भव्य दगडी कमानदार प्रवेशद्वार. त्याचा दगडी आम्रफलाचे तोरण. त्याचेवर तडफेने फडकणारा परमपवित्र भगवा ध्वज. ज्याचे रक्षणार्थ मराठ्यांनी आपले प्राण वेचले. केवळ जुन्या काळीच नाही तर आधुनिक भारताच्या मराठा सैन्य तुकडीचा ध्वजही भगवा आहे. शिवाय भारताचे सरसेनापती थोरात यांनी ही आम्ही भगव्या पट्टीसाठी लढतो असे म्हटले आहे. तो भगवा या दारावर दिमाखाने फडकतो. या दगडी बांधणीच्या द्वाराचे वर वीटांचे बांधकामात आहे तो शानदार नगारखाना.

द्वारातून आत जाता समोर उंच छातीएवढ्या जोत्यावर सुंदर बांधणीचे दगडी द्वारकाधिशाचे मंदिर. २४ खांबांवर उभारलेला सभामंडप. त्यांचे वरचे छतही दगडी छावण्याचेच. गाभाऱ्याला प्रदक्षिणा मार्ग. मंदिराभोवती मोकळे पैस अंगण. त्याबाहेर दगडी जोत्याच्या प्रशस्त ओवऱ्या त्यांचे छतही दगडीच. सारे कसे दणकट. बळकट. कायम टिकणारे. चिरंतन. त्यापलिकडे दक्षिणेला उंचवटा त्यावर गर्भागार. गाभाऱ्याचे दाराला चांदीने मढविलेले नक्षीदार काम. त्यातच जय विजय. आत उत्तर भारतीय शैलितील चांदीने मडविलेली छत्री ज्यात चतर्भुज भगवान कृष्णाची मुर्ती. जिने धर्मरक्षणार्थ हाती गदा, शंख, चक्रादी आयुधे धारण केली आहेत. शेजारी संगमरवरी राधा, सत्यभामेच्या सुबक मुर्ती. डाव्या हाती गरूड, गणपती. तर उजवी कडे पूजामुद्रेतील महाराणी बायजाबाई शिंदे यांची २ फुटी मुर्ती. पुर्वी येथे शाळिग्रामही पुजेत होते. या मंडपात महादजी शिंदेंपासून ते विद्यमान ज्योतिरादित्य राजे सिंदिया यांचे राजपोशाखातील फोटो लावले आहेत.

इथला द्वारकाधिश काळा तर त्याची सखी राधा आणि सत्यभामा गोऱ्या आहेत. जशा त्या खऱ्या होत्या. कारण कृष्ण काळ्या पाषाणातून तर दोन्ही देवी संगमरवरातून साकारल्यात. या साऱ्या देवतांना अलंकारही आहेत.
मंदिराभोवती मोठे अंगण. त्याबाहेर चारी बाजूला ओवऱ्या ज्यात भक्तगणांनी येवून खुशाल रहावे. विसावा घ्यावा. शिंद्यांच्या अन्नछत्रात भुक शमवावी. नित्य सुमारे २५ लोक जेवतील अशी अन्नछत्राची तरतूदही ग्वाल्हेर राज्ञी बायजाबाईंनी केली होती.

मंदिरावर चुना वीटकाम केलेले उत्तम शिखर. २ आमलकाचे शिखर असून त्यावर कळस आहे. या वाड्याचे आणि मंदिराचे स्थापत्य अभ्यासायला अनेक अभ्यासक पंढरीत आजही येतात ते वाड्याच्या विविध वैशिष्ठ्यांमुळे.

शिंदे घराण्याचे पंढरपूरचे नाते विशेष आहे. उत्तर हिंदुस्थावर आपला धाक बसविणारे महादजी शिंदे पंढरीचे वारकरी होते. त्यांनी पुज्य मल्लापा वासकरांकडून वारकरी संप्रदायाची माळ घातली होती. त्यामुळेच शिंदे घराण्यात विठ्ठलभक्ती परंपरेने चालत आलू आहे . महाराणी बायजाबाई म्हणजे श्रीमंत दौलतराव शिंद्यांची पत्नी. या राणीसाहेब म्हणजे दुसऱ्या अहिल्यादेवीच. या जनकोजींच्या दत्तक माता. मोठ्या दानी. देव कार्यी सतत अग्रेसर. देवकार्यी आणि दानधर्माला त्यांचा हात कधी मागे नाहीच. त्यामुळे पंढरीस येणाऱ्या भक्तांचे सुविधेकरिता इथे मोठा खर्च करून हे मंदिर आणि १२५ खणांचा भव्य २ चौकी लाकडी असा वाडा त्यांनी सन १८४९ मधे बांधला. त्याकाळी खर्च केला रूपये १,२५,०००/- चा. या वाड्याचे बांधकाम खरेच मजबूत झाले की नाही हे पाहण्यासाठी मजल्यावरून हत्ती फिरवून पाहिल्याच्या गोष्टी अजूनही पंढरीत आवडीने एेकविल्या जातात.

ज्येष्ठ व|| ५ ला देव प्रतिष्ठापना करण्यात आली. ज्याला स्वत: बायजाबाई राणीसाहेब उपस्थित होत्या. त्यावेळी सरकारातून इतका दानधर्म केला की याचकांची दाटी झाली. वाड्याचे दक्षिणद्वारी याचकांची चेंगराचेंगरी झाली पार गोंधळ उडाला. ढालाईतांकडून गर्दीवर नियंत्रण ठेवावे लागले. दाराच चेंगराचेंगरी झाली आणि दार चिणले ते कायमचे. सहस्त्रो ब्राह्मणांच्या पंगती उठल्या. त्यावेळी एकूण सुमारे ७५ हजार रूपये दानधर्मी खर्ची पडले.

यावेळी बायजाबाईंनी विठ्ठल रूक्मिणी ची यथासांग सालंकृत पूजा केली. त्यावेली गंमत झाली. देवाचे ताट अन् आईसाहेबांचे ताट देवापूढे ठेवले गेले. अशी दागिन्याची ताटांची अनावधानाने अदलाबदल झाली. ज्यामुळे देवीचा दागिना देवाला आणि देवाचा देविला वाहिला गेला. आजही ते तसेच वापरले जातात.

शिंद्यांनी दिलेले हिऱ्याचे लफ्फे म्हणजे विठोबाच्या दागिन्यांचे वैभव आहे. या त्यांचे पंढरी भेटीवर स्वतंत्र असा बायजाबाईंचा पोवाडाही रचला गेला होता. मागच्या पिढीपर्यंतचे शाहिर गोंधळी तो पंढरीत सादर करून वाहवा मिळवायचे. कारण त्यात पंढरीचे आणि तत्कालिन व्यक्तिचे साद्यंत वर्णन होते.

बायजाबाईंनंतरही शिदे सरकारांच्या अनेक पिढ्या येथे येवून गेल्या आहेत. राजमाता विजयाराजे, सध्याचे केंद्रिय नेते ज्योतिरादित्य शिंदे हे ही पंढरीत येवून गेले आहेत. मात्र त्यांच्या पुर्वजांनी दिलेले बहुमुल्य दागिने मंदिर समितीने त्यांना इच्छा व्यक्त करूनही दाखविले नाही. पूर्वी अशी पद्धती होती. एखाद्या मान्यवराने देवाचे दागिने पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून देवाचे अनमोल अलंकार अशा व्यक्तिला दाखविले जायचे. आजही तशे दागिने अर्पिण्याची एेपत आणि दानत असताना मंदिर समितीने तेवढे औदार्य दाखविले नाही. ते दाखविले असते तर कदाचित भगवंताचे संपत्तीत मौलिक भरच पडली असती.
या वाड्याचे व्यवस्थापन शिंदेनी आपले परंपरागत बडवे घराण्याकडे दिले होते. त्यामुळे त्यांच्या राहणीमानातही संस्थानी थाट होता. त्याची वै. बाळाकाका शिंदे बडवे यांची आठवण ते सदैव सांगायचे की त्यांचे अन् त्यांचे बंधु रामसखा, कृष्णसखा यांचे मुंजीची भिक्षावळीची मिरवणूक पुढे फरिगदगा, लेझिमवाले यांचे खेळ वाजंत्री उजेडासाठी बत्त्या अशी मोठी साग्रसंगित संस्थानी थाटात निघाली होती अन नव उपनित बटूला घोड्यावरून नव्हे तर हत्तीवरून मिरविले होते. शिंदे सरकरांचे बडवे असल्याने त्या घराण्याला आजही शिंदे बडवे म्हणूनच ओळखले जाते. तसेच सरकार म्हणून आदराने त्यांच्याशी आजही बोलले जाते.

या वाड्याचे पूर्वेच्या दारातून नदीचे वाळवंटीच उतरता येते. जवळच मुबलक पाणी असल्याने पूर्वी इथे घोडे, हत्ती, बैल बारदाना आदी मोकळ्या प्रांगणात असत. वाड्याचे पश्चिम बाजूचे दाराने आत जाता १ चौकात आता तिथे मेवा मिठाई संघाचा कारखाना आहे. बाहेर अनेकांनी रस्त्यालगत दुकाने थाटली आहेत.

पूर्वी गोकुळअष्टमीला ९ दिवस मोठा उत्सव चालायचा. कथा जन्मोत्सवाची धमाल असायची. जेवणावळी झडायच्या. सारा गाव प्रसादाला वाड्याकडे धावायचा. कोणालाही हाकलून दिले जायचे नाही. द्वारकाधिश कृष्णाची पालखी रात्रौ हिलाल, दिवट्यांच्या उजेडात वाजत गाजत मिरविली जायची. दसऱ्यालाही देव शिलंगणाला पालखीने वाजत गाजत जायचे. कायम नेमणूकीचे घडशी, हरकामे, पुराणिक, कथेकरी, कारकून, १ कारभारी असा मोठा सरंजामच इथे होता.देवापुढे पुराणिक ८ महिने महाभारत, रामायण सांगे, तर ४ महिने भागवत चाले.
आता काळमानाने वाड्याचे वैभव ओसरले. संस्थानेच खालसा झाली. तर या संस्थानिकांची देवस्थाने आणि मंदिरे तरी कशी चालणार. त्यातून पुरोगामी लोकांचे देवाच्या मिळकतीवरच चित्त आहे. ते संस्थानिकांसारखे देवसाठी काही खर्च करणे एेवजी मोघलांप्रमाणे देवधन लुटणेस तत्पर वाटतात. तरिही शिंदे घराण्याचे सध्याचे वारसांनी या वाड्याचे पडझड झालेल्या भागाची दुरूस्ती हाती घेतली असून जुना बाज ठेवून जसेच्या तसे लाकडी बांधकाम सध्या चालू इथे. आहे.

या द्वारकादिशापुढे पंढरीतील अनेकांची उपनयन, विवाहादी कार्ये साजरी झाली आहेत. त्याच्या सुखद आठवणी समग्र पंढरीवासियांच्या मनात घर करून राहिलेल्या आहेत. त्यामुळे हा वाडा म्हणजे पंढरीचे स्मरणस्थान, वैभव आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. तो जपला पाहिजे.
©आशुतोष अनिलराव बडवे पाटील, पंढरपूर.

 वाफगावचा स्थलदुर्ग (भुईकोट)

वैभव महाराष्ट्राचे!

होळकरांचा वैभवशली इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी


वाफगावचा स्थलदुर्ग (भुईकोट) प्रत्यक्ष पहावे. सध्या हा किल्ला रयत शिक्षण संस्थेला बक्षीस रूपात दिलेला आहे. राजगुरूनगर पासून बारा कि. मी. अंतरावर वाफगाव आहे. गावातच प्रशस्त किल्ला असून त्याच्या एका बाजूस नदी आहे. वाफगावात उतरल्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वोभव स्मृती असे नाव असलेली वेस नजरेस पडते. किल्ल्याच्या प्रमुख प्रवेश द्वरावर शिक्षण संस्थेचे नाव लिहिलेले आहे. महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय वाफगाव. किल्ल्याची तटबंदी व बुरूज मजबुत दगडात असून प्रवेशद्वारावर लोखंडी सुळे असलेला दरवाजा आहे. प्रवेशद्वारा बाहेर तटबंदीच्या कडेला चुन्याचा घाणा दिसतो. गडाला दोन प्रशस्त प्रवेशद्वारे आहेत, त्यास लाकडी दरवाजे आणी दिंडी दरवाजा ही आहे. गडाची तटबंदी दोन टप्प्यात आहे. किल्ल्याच्या आत राजदरबार, राजमहाल, अंधारी विहीर, होळकर कालीन तोफा, काही मंदिरे (विष्णू - लक्ष्मी, विष्णू पंच्याती, मांगीर बुवा), बावडी, राजमहालाची तटबंदी, होळकर कालीन भव्य गुफा पाहाण्यास मिळतात. राजदरबाराचा आतून काही भाग पडला असून राजमहाल हा दुमजली असून मजबूत स्थितीत आहे. राजमहालाच्या आत होळकर कालीन सुबक लाकडी काम पाहावयास मिळते. या महालास राणीचा महाल म्हणून ओळखला जातो. तटबंदीमधील एका विशाल बुरूजात बांधलेली खोल विहिर हे या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे. हा किल्ला महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचे जन्मस्थान आहे. या किल्ल्याचे बांधकाम हे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या राज्यकाळामध्ये सुरू होऊन राणी अहिल्यादेवी यांच्या राज्यकाळात पूर्ण झाले असे सांगतात.

होळकरकालीन किल्ल्याच्या बाहेर राजराजेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे असून या मंदिराची बांधनी राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली आहे. या मंदिरासमोर दगडी मेघडबरीमध्ये नंदीची भव्य वास्तू स्थित असून नंदीच्या गळ्यातील घंटा व रेखीव काम सुरेख आहे. हे मंदिर बंदिस्त स्वरूपात आहे. या मंदिरच्या नक्षीदार बांधकामात महेश्वर किल्ल्याची समरूपता पाहवयास मिळते. मंदिराच्या बाजूच्या चौथऱ्यावर पूर्वी धर्मशाळा होती. मंदिराच्या गाभाऱ्यात आजही होळकर कालीन पूजेच्या पुरातन वास्तू पाहावयास मिळतात. एका कलशावर "तुकोजी होळ"अशी अक्षरे दिसतात. एक नक्षीदार घंटी आणि शिसवी पेटी आहे. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाचे वेगळेच वैशिष्ट्य म्हणजे सध्याच्या लॅच पद्धतीची कुलूप कशी असतात तशी कुलुपाची पद्धत आहे. दरवाजा लोटून घेताच आतून कडी लागते आणि एका लांब चपट्या किल्लीनेच ते उघडता येते.
किल्ले वाफगाव, ता. खेड, जि. पुणे

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 🚩






पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  🚩

चोंडी ता. जामखेड , जि. अहमदनगर
हे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे. याच गावात 31 मे 1725 रोजी अहिल्यादेवींचा जन्म झाला . पुढे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडोजीराव होळकरांशी त्यांचा विवाह झाला. अहिल्यादेवी बालपणापासूनच शुर, चाणाक्ष, तल्लख व कुशाग्र बुद्धीच्या होत्या. पुढे 1754 मध्ये खंडोजीराव होळकर कुंभेर या ठिकाणी झालेल्या लढाईत मारले गेले.सासरे मल्हारराव अहिल्याला म्हणाले, "माझा खंडू गेला म्हणून काय झालं? तुझ्या रूपानं माझा खंडू अजून जिवंत आहे. तू सती जाऊ नकोस." अहिल्यादेवींनी ते ऐकलं.अहिल्यादेवींच्या हाती सत्तेची सुत्रे दिली गेली. त्यांनी अनेक ठिकाणी शत्रुला धुळ चारून लढाया जिंकल्या. अहिल्यादेवी या उत्तम तिरंदाज होत्या. त्या उत्तम न्यायाधिश, उत्तम प्रशासक होत्या. त्यांनी महिलांची फौज निर्माण केली होती .उत्तर भारतात माहेश्वरी येथे 27 वर्षे त्यांनी राज्य केलं.
चोंडी या ठिकाणी आजही त्यांचा राहता वाडा आहे. वाड्यामध्ये अहिल्यादेवींच्या गौरवशाली इतिहासातील अनेक प्रसंगांची शिल्पे बनवण्यात आलेली आहेत. वाड्याबाहेर त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा व स्मृती स्तंभ उभारण्यात आलेला आहे.
एका छोट्याशा गावात सामान्य कुटूंबात जन्माला आलेली मुलगी आपल्या शौर्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर उत्तर भारतात राज्यकर्ती बनू शकते. आजच्या युवकांनी अशा महापुरुषांच्या संघर्षमय जीवनकार्याचा आदर्श घेतल्यास आजचा तरुण परिस्थितीवर रडत बसणार नाही, तर तो परिस्थितीशी धैर्याने लढेन आणि निश्चितच प्रगती करू शकेन. अहिल्याबाई होळकर यांच्या राज्य बरखास्तीचा डाव राघोबा पेशवे यांनी आखला होता.तो चानाक्षपणे अहिल्याबाई होळकर यांनी ऊधळून लावला.
महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा घेऊन
आदर्श राज्यकारभार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी असेच होते. त्यांच्या प्रत्येक कामात दूरदृष्टी दिसून येत .व्यक्तिगत जीवनात अहिल्याबाईंनी अनेक संकटांना तोंड देत सुमारे 28 वर्ष राज्यकारभार केला. पण या सगळ्या कारभारात अहिल्यादेवींनी स्वतःची अशी अर्थनीती व जलनीती ठरवली .महिला असूनही राजसत्तेचे नेतृत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण अहिल्याबाईंनी घालून दिले. राज्यातील शेतकरी कष्टकरी उपेक्षित वर्ग हा त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू होता .शिवाय कसण्यास दिलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी वीस फळझाडे लावावीत त्यातील 11 झाडे सरकारची आणि नऊ झाडे शेतकऱ्यांची असे सूत्र ठरवले होते. अहिल्यादेवींच्या जलनीती मध्येही अर्थनीती प्रमाणेच सर्वसमावेशकता होती. त्याकाळी फड पद्धतीने पाणी वाटपावर अहिल्यादेवींनी भरपूर पैसे खर्च केले. ज्यादा पैसे खर्च करून पाणी दिल्याने उत्पन्न वाढीचा वायदा त्यांनी शेतकऱ्यांशी केला पण शेतकऱ्यांकडून उत्पन्ना एवढाच सारा वसूल केला .शेतीच्या पाण्याचे महत्त्व त्यांनी जाणले होते, पण पिण्याच्या पाण्यासाठीही पुढे अनेक भागात विहिरी बारव ,आड ,घाट यासारख्या योजना त्यांनी त्यांच्या कल्पनेतून उभारल्या त्यापैकी बहुतांश विहिरी आजही सुस्थितीत आहेत.ग्राम व्यवस्थेची घडी त्यानी चांगली बसवली होती.गावोगावी न्याय देणारे पंचाधिकारी नेमले होते.राज्यकारभार करताना जुन्या रूढी-परंपरांना त्यांनी कायमच विरोध केला.पुरूषप्रधान व्यवस्थेत स्वच्छ आणि शिस्तबध्द कारभार करणार्या त्या रणरागिनी होत्या ,प्रचंड आत्मविश्वास, धाडस ,दूरदृष्टी, त्यागी वृत्ती असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. "अशा या थोर,कर्तबगार ,पराक्रमी ,अहिल्यादेवीस आमचे विनम्र अभिवादन "
लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
( अहिल्याबाई होळकर यांचा चांदवड येथील वाडा )



राजराजेश्वर मंदिर : वाफगाव, ता.खेड जि.पुणे(महाराष्ट्र)

वाफगाव : होळकरकालीन राजराजेश्वर मंदिर

राजराजेश्वर मंदिर : वाफगाव, ता.खेड जि.पुणे(महाराष्ट्र)      
संकलन - राहुल वावरे, ८९९९१४३०७४. 

ahilyabai-holkar-rajrajeshwar-mahadev-temple-wafgaon-1
होळकरकालीन श्री राजराजेश्वर महादेव मंदिर, वाफगाव.   



वाफगाव येथील होळकरकालीन किल्ल्याच्या बाहेर राजराजेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे असून या मंदिराचा निर्माण राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे. या मंदिरासमोर दगडी मेघडबरीमध्ये नंदीचे भव्य वास्तू स्थित असून नंदीच्या गळ्यातील घंटा व रेखीव काम सुरेख आहे. हे मंदिर बंदिस्त स्वरुपात आहे. हे मंदिर पाहिल्यावर आपणास होळकर कालीन रेखीव व सुरेख दगडी कामाचा बोध होतो. या मंदिरच्या नक्षीदार बांधकामात महेश्वर किल्ल्याची समरूपता पाहवयास मिळते.

मंदिराच्या बाजूच्या चौथऱ्यावर पूर्वी धर्मशाळा होती. मंदिराच्या गाभाऱ्यात आजही होळकर कालीन पूजेच्या पुरातन वास्तू पाहावयास मिळतात. एका कलशावर "तुकोजी होळ" अशी अक्षरे दिसतात. एक नक्षीदार घंटी आणि शिसवी पेटी आहे. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाचे वेगळेच वैशिष्ट्य म्हणजे सध्याच्या लॅच पद्धतीची कुलूप कशी असतात तशी कुलुपी पद्धत आहे. दरवाजा लोटून घेताच आतून कडी लागते आणि एका लांब चपट्या किल्लीनेच ते उघडता येते.
http://maharashtra-bhakti-shakti.blogspot.com/2019/08/blog-post_82.html

 वाफगाव : होळकरकालीन अंधारी विहिर (बुरुजातील विहिर)

वाफगाव : होळकरकालीन अंधारी विहिर (बुरुजातील विहिर)

अंधारी विहिर(बुरुजातील विहिर) : किल्ले वाफगाव, ता.खेड जि.पुणे(महाराष्ट्र)      
संकलन - राहुल वावरे, ८९९९१४३०७४. 

ahilyabai-holkar-buruj-andhari-vihir-1
किल्ल्याच्या बुरुजातील होळकर कालीन अंधारी विहिर.   

वाफगावचा किल्ला का पाहायला जावा? याची फक्त तीनच कारणे आहेत. पहिले म्हणजे भुईकोट किल्ल्यामधील दुमजली असलेला राजदरबार, दुसरे म्हणजे किल्ल्याच्या बाहेरील श्री राजराजेश्वर मंदिर आणि तिसरे म्हणजे या भुईकोटातील एका बुरुजामध्ये असलेली विहीर. हि विहीर या भुईकोटातील एक प्रमुख आकर्षण असून तत्कालीन होळकर कालीन पाणी व्यवस्थापनेचा उत्तम नमुना आहे.
 आजही या विहिरीतील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जात असून आतापर्यंत जेवढे दुष्काळ आले तरीही या विहिरीच्या पाण्याने तळ गाठला नाही. विहिरीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, पाण्यात केर कचरा पडू नये तसेच प्राणी पडून त्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून त्या पद्धतीच्या बांधणी असलेल्या असंख्य विहिरी तुम्ही पाहिल्या असतील मात्र या विहिरीचे या व्यतिरिक्त वेगळे पण म्हणजे परकीय शत्रू कडून पाण्यात विष मिसळले जाऊ नये म्हणून हि विहीर किल्ल्याच्या प्रमुख बुरुजात निर्माण करण्यात आली आहे व या विहिरीत जाण्यासाठी फक्त एकच मार्ग असून तो किल्ल्याच्या आतून भुयारी मार्ग प्रमाणे आहे. हि विहीर म्हणजे होळकर कालीन लष्करी व्यवस्थापनेचा एक उत्तंग नमुना म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या विहिरीचा निर्माण या भुईकोट किल्ल्याबरोबरच करण्यात आला. हा किल्ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या राज्यशासन काळात बांधण्यात आला आहे.
किल्ल्याच्या आत श्री विष्णू-लक्ष्मी मंदिर आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या तटबंदीमधून बुरुजाकडील विहिरीकडे जाण्याचा भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. या भुयारी मार्गात गेल्यावर डाव्या बाजूला वळून ५० मी. चालत जावे लागते. जाताना या भुयारी मार्गात खूप अंधार असतो. ५० मी. अंतर चालून गेल्यावर उजव्या बाजूला वळावे लागते व तेथून थेट खाली बुरुजातील विहिरीच्या तळापर्यन्त जाणाऱ्या ३० ते ३५ पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांच्या मधोमध उभे राहण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी दोन टप्पे निर्माण केले आहेत. पायऱ्या उतरत असताना आपल्याला विहिरीचे निखळ पाणी व त्यावरील पडलेला सूर्य-प्रकाश नजरेस पडतो. हा सूर्य प्रकाश बुरुजाच्या वरील बाजूने असलेल्या मोकळ्या भागातून आत येण्याची व्यवस्था केली आहे. या विहिरीला "अंधारी विहीर" या नावाने हि ओळखले जाते. या बुरुजातील विहिरी बद्दल जेवढे लिहिल तेवढे कमीच आहे त्यामुळे हि मराठा कालीन वास्तू कलेचा उच्च कोटीच्या आर्किटेक्टचा अजोड नमूना असलेली हि होळकर कालीन बुरुजातील विहीर प्रत्यक्षात जाऊन पाहण्यात जी मजा आहे ती दुसरी कशात नाही. जर कधी राजगुरूनगरला गेलात तर वाफगावच्या या भुईकोट किल्ल्याला नक्की भेट द्या. राजगुरूनगर पासून वाफगाव हे १२ कि. मी. च्या अंतरावर आहे. 

 वीरगाव : होळकरकालीन बारव

वीरगाव : होळकरकालीन बारव

वीरगाव : ता.अकोले जि.अहमदनगर (महाराष्ट्र)      
संकलन - राहुल वावरे, ८९९९१४३०७४. 

ahilyabai-holkar-veergav-stepwell-1
वीरगाव येथील होळकरकालीन बारव.  

वीरगावच्या पश्चिमेला काळ्या-तपकिरी डोंगर रागांच्या सानिध्यात राणी अहिल्यादेवी होळकर यांनी या बारवेचे बांधकाम केले. राणी अहिल्यादेवी होळकर पुण्याहून इंदोरकडे जाताना हा प्रमुख मार्ग होता. या रस्त्यावर अनेक ठिकाणी बारव बांधण्यात आल्या. परंतु कालौघात त्या नष्ट झाल्या. काही इतिहासात चिरनिद्रा घेण्याच्या मार्गावर आहेत. वीरगावच्या या बारवेचा चिरा अन् चिरा मात्र आजही शाबित आहे.
अकोले-सिन्नर रस्त्यापासून साधारण २०० फूट आतमध्ये शेतात या बारवेचे खोदकाम झाले. बारवेची खोली ५८ फूट असून तळापर्यत जाण्यासाठी ४७ पायर्‍या आहेत. कलथा आकाराची ही बारव पुढे रुंद आणि पाठीमागे जिन्याच्या स्वरुपात आहे. बारवेसाठी वापरलेल्या दगडांचा अनेकांनी जवळपासच्या सर्व डोंगरामध्ये शोध घेतला. मात्र कोणत्याही डोंगराचा दगड बांधकामाशी जुळता मिळता नसल्याचे भागवत गंगाराम आस्वले यांनी सांगितले. यावरून त्याकाळी अनेक योजने दूर वरून हा दगड आणला असावा. जागेवर चुन्याचा घाणा करून या बारवेची निर्मिती झाल्याच्या खाणाखुणा मात्र आढळून येतात. बांधकामासाठी वापरण्यात आलेला दगडही तीन प्रकारचा असून तळचा, मधला आणि वरचा दगड वेगळ्या प्रकारचा आहे. बारवेत दोन आकर्षक कमानी असून राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या हस्तेच विराजमान झालेली गणपतीची मूर्ती दगडी भिंतीच्या कोनाड्यात स्थानापन्न आहे. श्रीगणेशाच्या मूर्तीची घडणही संशोधनात्मक आहे व हि मूर्ती त्या कोनाड्यात इतकी घट बसवलेली आहे कि तुम्ही कितीही शक्ती वापरली तरी ती थोडीपण हालत नाही. प्रत्येक वाटसरूसाठी निवांत विसाव्याचे हे ठिकाण आहेच. शिवाय त्र्यंबकवारीला आळंदीहून निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी जाणार्‍या वारकरी दिंड्यांच्या वास्तव्याचे हे कायमस्वरुपी तीर्थस्थान आहे. 
ऐन उन्हाळ्यात बारवेचे पाणी तळ गाठते. इतर ऋतूत मात्र निळेशार थंडगार पाणी येणार्‍या प्रत्येकाची तहान भागविते. दूरवरच्या अनेक संशोधकांनी या स्थळाला भेटी दिल्या असून सखोल परीक्षणाअंती इतिहासाचा लख्ख भूतकाळ समोर आल्याशिवाय राहणार नाही. त्याच बरोबर वीरगाव मधील दिनेश वाकचौरे व रावसाहेब वाकचौरे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ या बारवेची डागडुजी करून तिच्या पाण्याचा वापर गावासाठी योग्य प्रकारे करत आहेत, त्यांच्या या कृतीचे अनुकरण इतिहासाची हेळसांड करणाऱ्यांनी करणे गरजेचे आहे.
आजपर्यंत(फेब. २०१७) मिळालेल्या माहितीनुसार राणी अहिल्यादेवी होळकर यांनी अकोले तालुक्यात वाशेरे, औरंगपूर, तांभोळ, ब्राह्मणवाडा येथे बारवेचा निर्माण, लिंगदेव येथे लिंगेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व बारवेचा निर्माण, कुंभेफळ येथे शेषनारायण मंदिरचा व भव्य बारवेचा निर्माण केला आहे. शेषनारायण मंदिर भारतात फक्त दोनच ठिकाणी आहेत एक म्हणजे वाराणसी(काशी) आणि दुसरे म्हणजे कुंभेफळ. हा अकोले तालुक्याचा इतिहास लवकरच आपल्यासमोर फोटो व माहीती सहित मांडू. 
 
फोटो आभार : श्री.रामदास अस्वले(वीरगाव). 
माहिती आभार : श्री.ज्ञानेश्वर खुळे. 

 जाम(खुर्द) : होळकरकालीन प्रवेशद्वार

जाम(खुर्द) : होळकरकालीन प्रवेशद्वार

जाम(खुर्द) : ता.महू जि.इंदोर(मध्यप्रदेश)      
संकलन - राहुल वावरे, ८९९९१४३०७४. 
राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाची साक्ष देणारा बुलंद असा "महादरवाजा". 

ahilyabai-holkar-jamgaon-entrygate-1
जाम(खुर्द) येथील होळकरकालीन  संरक्षण प्रवेशद्वार.    

हा मार्गद्वार जामखुर्द या गावापासून ३ कि.मी अंतरावर स्थित असून इंदोर-महू-महेश्वर मार्गावर आहे(जामखुर्द मार्गे). या मार्गद्वाराच्या समोरील व मागील बाजूने दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणार्‍या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे या राज्याच्या आत ’श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ’श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ’विद्या व लक्ष्मी’ होय. या महादरवाज्याला चार भव्य बुरूज असून त्यांची उंची ८० फूट आहे व त्याची लांबी ७५ फूट व रुंदी ७० फूट आहे. या द्वारच्या तटबंदीमध्ये जी उतरती मोठी छिद्रे दिसतात त्यास ’जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही मोठी छिद्रे असतात. या दरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्‍यांच्या देवड्या दिसतात, तसेच संरक्षकांसाठी दुसऱ्या माळ्यावरती राहण्यासाठी केलेल्या खोल्या दिसतात. 
सन १७९१ ला राणी अहिल्यादेवी यांनी या मार्गद्वाराची निर्मिती केली हे तेथील शिलालेखावरून समजते. असे सांगितले जाते कि, डाकू गणपतराव याने किल्ले महेश्वर दरबारी राणी अहिल्यादेवींच्या समोर आत्मसमर्पन केल्यानंतर त्याच्यापासून मिळालेल्या संपत्तीतून राणी अहिल्यादेवी यांनी या मार्गद्वाराची निर्मिती केली.  
या द्वारच्या उत्तरेकडील टेकडीवर पार्वती मंदिर स्थित आहे. या महाद्वाराच्या निर्मिती वेळेस या मंदिराचा निर्मांण राणी अहिल्यादेवी यांनी केला. या महादरवाज्यापासून उत्तरेकडील टेकडीवरील पार्वती मंदिरा पर्यंत तटबंदी बांधलेली आहे तर डावीकडे खोल दरी आहे. हे महाद्वार प्रवाश्यांच्या संरक्षनासाठी उभारलेले आहे तसेच येथे कर वसूल केला जात असे. हा मार्गद्वार जामखुर्द या गावापासून ३ कि.मी अंतरावर स्थित असून जामखुर्द या गावामध्ये राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सेनिकांच्या राहण्यासाठी भुईकोट किल्ल्याचा, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या सोयीसाठी ३ बारवांचा तसेच काही मंदिरांचा निर्माण केला, त्यातील जामबारव प्रसिद्ध असून पुरात्तव खात्याच्या नियंत्रणाखाली आहे.  हा द्वार "जाम घाट" या नावाने प्रसिद्ध आहे.       
जामद्वार वर असलेला शिलालेखाचा उल्लेख खालीलप्रमाणे, याचे वाचन श्री.राज्‍यपाल शर्मा (झालावाड़,राजस्थान) यांनी केले आहे. 
श्री।
श्रीगण्‍ेाशाय नम:।। 
स्‍वस्ति श्रीविक्रमार्कस्‍य संमत् 
1847 सप्‍ताब्धिनागभू:। 
शाके 1712 युग्‍मकुसप्‍तैक मिते 
दुर्मति वत्‍सरे। माघे शुक्‍ल त्रयोदश्‍यां पुष्‍यर्क्षे 
बुधवारे सुबा (स्‍नुषा)* मल्‍लारि रावस्‍य खंडेरावस्‍य वल्‍लभा।। 2।। 
शिव पुजापरां नित्‍यं ब्रह्मप्‍याधर्म तत्‍परा। 
अहल्‍यारग्राबबंधेदं मार्ग द्वार शुशोभनम़।। 3।।
           
     
फोटो : आशिष सोनी.  
  संदर्भ : Indore State Gazatteer Vol.1, Page No.601.
मराठे कालीन होळकर संस्थान, पान क्रं.१९७. 

 जाम(खुर्द) : होळकरकालीन प्रवेशद्वार

जाम(खुर्द) : होळकरकालीन प्रवेशद्वार

जाम(खुर्द) : ता.महू जि.इंदोर(मध्यप्रदेश)      
संकलन - राहुल वावरे, ८९९९१४३०७४. 
राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाची साक्ष देणारा बुलंद असा "महादरवाजा". 

ahilyabai-holkar-jamgaon-entrygate-1
जाम(खुर्द) येथील होळकरकालीन  संरक्षण प्रवेशद्वार.    

हा मार्गद्वार जामखुर्द या गावापासून ३ कि.मी अंतरावर स्थित असून इंदोर-महू-महेश्वर मार्गावर आहे(जामखुर्द मार्गे). या मार्गद्वाराच्या समोरील व मागील बाजूने दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणार्‍या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे या राज्याच्या आत ’श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ’श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ’विद्या व लक्ष्मी’ होय. या महादरवाज्याला चार भव्य बुरूज असून त्यांची उंची ८० फूट आहे व त्याची लांबी ७५ फूट व रुंदी ७० फूट आहे. या द्वारच्या तटबंदीमध्ये जी उतरती मोठी छिद्रे दिसतात त्यास ’जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही मोठी छिद्रे असतात. या दरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्‍यांच्या देवड्या दिसतात, तसेच संरक्षकांसाठी दुसऱ्या माळ्यावरती राहण्यासाठी केलेल्या खोल्या दिसतात. 
सन १७९१ ला राणी अहिल्यादेवी यांनी या मार्गद्वाराची निर्मिती केली हे तेथील शिलालेखावरून समजते. असे सांगितले जाते कि, डाकू गणपतराव याने किल्ले महेश्वर दरबारी राणी अहिल्यादेवींच्या समोर आत्मसमर्पन केल्यानंतर त्याच्यापासून मिळालेल्या संपत्तीतून राणी अहिल्यादेवी यांनी या मार्गद्वाराची निर्मिती केली.  
या द्वारच्या उत्तरेकडील टेकडीवर पार्वती मंदिर स्थित आहे. या महाद्वाराच्या निर्मिती वेळेस या मंदिराचा निर्मांण राणी अहिल्यादेवी यांनी केला. या महादरवाज्यापासून उत्तरेकडील टेकडीवरील पार्वती मंदिरा पर्यंत तटबंदी बांधलेली आहे तर डावीकडे खोल दरी आहे. हे महाद्वार प्रवाश्यांच्या संरक्षनासाठी उभारलेले आहे तसेच येथे कर वसूल केला जात असे. हा मार्गद्वार जामखुर्द या गावापासून ३ कि.मी अंतरावर स्थित असून जामखुर्द या गावामध्ये राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सेनिकांच्या राहण्यासाठी भुईकोट किल्ल्याचा, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या सोयीसाठी ३ बारवांचा तसेच काही मंदिरांचा निर्माण केला, त्यातील जामबारव प्रसिद्ध असून पुरात्तव खात्याच्या नियंत्रणाखाली आहे.  हा द्वार "जाम घाट" या नावाने प्रसिद्ध आहे.       
जामद्वार वर असलेला शिलालेखाचा उल्लेख खालीलप्रमाणे, याचे वाचन श्री.राज्‍यपाल शर्मा (झालावाड़,राजस्थान) यांनी केले आहे. 
श्री।
श्रीगण्‍ेाशाय नम:।। 
स्‍वस्ति श्रीविक्रमार्कस्‍य संमत् 
1847 सप्‍ताब्धिनागभू:। 
शाके 1712 युग्‍मकुसप्‍तैक मिते 
दुर्मति वत्‍सरे। माघे शुक्‍ल त्रयोदश्‍यां पुष्‍यर्क्षे 
बुधवारे सुबा (स्‍नुषा)* मल्‍लारि रावस्‍य खंडेरावस्‍य वल्‍लभा।। 2।। 
शिव पुजापरां नित्‍यं ब्रह्मप्‍याधर्म तत्‍परा। 
अहल्‍यारग्राबबंधेदं मार्ग द्वार शुशोभनम़।। 3।।
           
     
फोटो : आशिष सोनी.  
  संदर्भ : Indore State Gazatteer Vol.1, Page No.601.
मराठे कालीन होळकर संस्थान, पान क्रं.१९७. 

 राणी अहिल्यादेवी होळकर यांचे समाधीस्थळ : किल्ले महेश्वर

राणी अहिल्यादेवी होळकर यांचे समाधीस्थळ : किल्ले महेश्वर

किल्ले महेश्वर, जि.खरगोण (मध्यप्रदेश)      
संकलन - राहुल वावरे, ८९९९१४३०७४. 
महेश्वर किल्ल्यावरील राणी अहिल्यादेवी यांची समाधी.
होळकरशाहीची दुसरी राजधानी किल्ले महेश्वर जि.खरगोण(मध्यप्रदेश) येथे १३ ऑगस्ट १७९५ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांचे निधन झाले. किल्ल्याच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी त्यांचे दहन(अग्नी देणे) करण्यात आले त्या ठिकाणी या दहन वास्तूचा निर्माण करण्यात आला व त्यानंतर किल्ल्यावर ज्या ठिकाणी अंत्यविधीकार्य पार पडले त्या ठिकाणी त्यांच्या समाधीचा निर्माण करण्यात आला. त्यांची समाधी "अहिल्येश्वर छत्री मंदिर" यानावाने सुप्रसिद्ध आहे. राणी अहिल्यादेवी होळकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे अंत्यविधीकार्य श्रीमंत संताजी होळकर यांनी पार पाडले, ते श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(दुसरे) यांचे धाकटे बंधू होय. किल्ल्यावरील राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या समाधी वास्तूचा निर्माण श्रीमंत तुळसाराणी साहिब होळकर यांनी केला. त्या महाराजाधिराज थोरले यशवंतराव होळकर यांच्या धर्मपत्नी होय.


 राणी अहिल्यादेवी होळकर यांचे दहनस्थळ : किल्ले महेश्वर

राणी अहिल्यादेवी होळकर यांचे दहनस्थळ : किल्ले महेश्वर

किल्ले महेश्वर, जि.खरगोण (मध्यप्रदेश)      
संकलन-राहुल वावरे, ८९९९१४३०७४. 

ahilyabai-holkar-Cremation-ground-maheshwar-1
महेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले राणी अहिल्यादेवींचे दहनस्थळ.  

होळकरशाहीची दुसरी राजधानी किल्ले महेश्वर जि.खरगोण(मध्यप्रदेश) येथे १३ ऑगस्ट १७९५ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांचे निधन झाले. किल्ल्याच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी त्यांचे दहन(अग्नी देणे) करण्यात आले त्या ठिकाणी या दहन वास्तूचा निर्माण करण्यात आला व त्यानंतर किल्ल्यावर ज्या ठिकाणी अंत्यविधीकार्य पार पडले त्या ठिकाणी त्यांच्या समाधीचा निर्माण करण्यात आला. त्यांची समाधी "अहिल्येश्वर छत्री मंदिर" यानावाने सुप्रसिद्ध आहे. राणी अहिल्यादेवी होळकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे अंत्यविधीकार्य श्रीमंत संताजी होळकर यांनी पार पाडले, ते श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(दुसरे) यांचे धाकटे बंधू होय. किल्ल्यावरील राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या समाधी वास्तूचा निर्माण श्रीमंत तुळसाराणी साहिब होळकर यांनी केला. त्या महाराजाधिराज थोरले यशवंतराव होळकर यांच्या धर्मपत्नी होय.

 अहिल्यादेवी होळकर आणि जेजुरी मधील कार्य

अहिल्यादेवी होळकर आणि जेजुरी मधील कार्य

फोटो : जॉन्टी राऊत(जेजुरी)

१. श्री खंडोबा देवस्थान, जेजुरी जि.पुणे(महाराष्ट्र) :-
जेजुरी …… श्री मल्हारी मार्तंड देवस्थान म्हणजेच श्री खंडोबा यांचे मंदिर.जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जेजुरी गडाचा विकास अनेक राजघराण्यानी केला मात्र सिंहाचा वाटा तो फक्त इंदोर (मध्यप्रदेश) येथील श्रीमंत होळकर राजघरण्याचाच. जेजुरीचा खंडोबा हे होळकर राजघराण्याचे कुलदेवत होय. खंडोबा यांचे मंदिर सन १६०८ रोजी बांधण्यात आले.त्यानंतर श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी सन १७३५ मध्ये जेजुरी गडाच्या पुननिर्माणाचे कार्य चालू केले. सन १७३९ ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर (प्रथम) व चिमाजी आप्पा यांनी पोर्तीगीजवर विजय मिळवल्यानंतर दोन पोर्तीगीज घंटा खंडोबाच्या चरणी अर्पण केल्या. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी सन १७४२ ला गडावरील दगडी कमानीचे आणि नंतर सन १७५८ ला गडावरील नगारखाण्याचे काम पूर्ण केले.सभोवारच्या सभामंडप, ओवऱ्या व इतर वास्तू श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी बांधल्या.पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७७० ला जेजुरी गडाच्या किल्लेसदृष्य तटबंदीचा निर्माण केला.पश्चिम, उत्तर व पूर्वेकडील तटबंदीवर होळकरांचे शिलालेख आढळतात.निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत.देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे.

 जेजुरी गडाची अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील बांधलेली तटबंदी.
जेजुरी गडाचे तेलचित्र.
फोटो : Google वरून. 

२. होळकर वाडा, जेजुरी :-
श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम) यांनी सन १७६८ मध्ये पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नेतृत्वाखाली या वाड्याचे काम पूर्ण केले.सध्या या वाड्या मध्ये राणी अहिल्यादेवी यांचे स्मारक असून होळकर कालीन दुहेरी बांधकाम पहावयास मिळते.त्याच बरोबर होळकर कालीन असलेले दगडी व लाकडी कलाकसुरीचे हि दर्शन होते.वाड्यामध्ये सभागृह पहावयास मिळते.वाड्याच्या बाहेर व आत तुलसी वृंदावन असून वाड्यात दत्त मंदिर हि आहे.हे दत्त मंदिर पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी या वाड्याबरोबरच निर्माण केले. या वाड्याचा निम्मा भाग हा महाराजा यशवंतराव होळकर प्राथमिक शाळेस सन.१९९६ रोजी देण्यात आलेले आहे.वाड्याच्या प्रवेशद्वारा पासून ते शेवटच्या भिंती पर्यंत होळकर वस्तूकलेचे दर्शन होते.त्या काळी केले जाणारे बांधकाम पाहून जीव थक होतो.या वाड्यावर खासगी देवी अहिल्याबाई होळकर चारीतेज ट्रस्ट,इंदोर(मध्यप्रदेश) यांचे नियंत्रण असते.या वाड्याच्या समोर होळकर कालीन विठ्ठल मंदिर आहे.हे विठ्ठल मंदिर पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी या वाड्याबरोबरच निर्माण केले.

३. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) प्रतिसमाधी,जेजुरी :-
इ. स १७९० च्या सुमारास या समाधीची उभारणी पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. हि समाधी मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर म्हणून ओळखले जाते.पूर्वाभिमुख असलेल्या छत्री मंदिराचे बांधकाम अतिशय प्रमाणबद्ध व रेखीव असून मंदिराचे मंडप व गर्भगृह असे दोन प्राकार आहेत पैकी मंडपाचे छत घुमटाकार आहे व त्यावर आतील बाजूने चित्रे रंगविली आहेत. मंडपामध्ये वातानुविजनासाठी सुरेख कोरीव काम केलेल्या दगडी खिडक्या आहेत. गर्भगृहात लाकडी मेघडंबरीमध्ये खालील बाजूस संगमरवरी शिवलिंग असून मागील कट्ट्यावर मध्यभागी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांची(प्रथम) संगमरवरी बैठी मूर्ती आहे,तर त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांच्या पत्नी गौतमाबाई व बनाबाई यांच्या मूर्ती आहेत.मंदिरासमोर चौथ-यावर कोरीव नंदीचे भव्य शिल्प आहे, नंदीच्या गळ्यातील घंटा, साखळी व झुलीवरील नक्षी सुबकरित्या कोरलेली असून मंदिराच्या बाजूला द्वारकाबाई व बनाबाई यांच्या दोन स्मारक घुमटी आहेत. या स्मारक घुमटी अनुक्रमे सन १७७२ व सन १७७३ ला निर्माण केली आहेत.

श्रीमंत मल्हारराव होळकर यांची जेजुरी येथील समाधी.
फोटो : Pratham VN

श्रीमंत मल्हारराव होळकर यांची जेजुरी येथील समाधीचे तेलचित्र.
फोटो : Google वरून
४. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव,जेजुरी :-
पाण्याने तुडुंब भरलेला तलाव, मावळतीला निघालेला सूर्य आणि पश्चिमेकडून येणा-या सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेला जेजुरगड, पक्षांचा किलबिलाट असे मनाला प्रसन्नता देणारे विहंगम दृश्य मनाचा थकवा नाहीसा करते. भाविक आणि पर्यटकांच्या दृष्टीने जेजुरीतील सायंकाळ निवांत घालविण्यासाठी अतिशय रमणीय ठिकाण म्हणून ज्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलावाचा.श्रीक्षेत्र जेजुरी नगररचनेचा, जल व्यवस्थापनेतील महत्वाचा दुवा म्हणजे १८ एकर क्षेत्रावर व्यापलेला होळकर तलाव, हा जलसाठा म्हणजे जेजुरी गावाच्या दृष्टीने अमृतकुंभच आहे. टेकडीच्या सोंडेवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या या तलावावर जेजुरी गावाचा पाणी पुरवठा वर्षानुवर्षे अवलंबून होता, आणि आजही या तलावातून झीरपणा-या पाण्यावर परिसरातील विहिरी व कूपनलिकांना पाण्याची कमतरता कधीच भासत नाही.जेजुरी गावाच्या नैऋत्य दिशेकडील डोंगरातून ओढ्याद्वारे वाहत येणा-या पाण्यावर इसवी सन १७७० मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी हा तलाव व जननी तीर्थ बांधले, त्या सोबतच तलावाच्या पूर्व-उत्तर बाजूस देवपूजेसाठी फुलबाग निर्माण केली तर दक्षिण बाजूस चिंचेच्या झाडांची बाग तयार केली ज्याचा उपयोग यात्रा काळातील भाविकांच्या निवा-यासाठी होतो. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या तलावाला पाच ठिकाणांवरून खाली उतरण्यासाठी बांधीव पाय-या आहेत तर दोन ठिकाणी मोटेद्वारे पाणी उपसण्याची थारोळी आहेत.तलावाच्या पूर्वेकडील भिंतीमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठ्याचे नियंत्रण करणा-या दटट्याची व्यवस्था आहे, तलावाचे पाणी भूमिगत नळाद्वारे गावातील तीन हौदाना व गायमुखाला(जननी तीर्थ) पुरविले जात होते.

होळकर तलाव

५. जननी जलकुंड (गायमुख किवा चिलावती कुंड) :-                                                                                    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलावाच्या बाजूला हे जलकुंड स्थित होते.या जलकुंडाचा पुननिर्माण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी होळकर तलाव्या बरोबरच सन १७७० रोजी केला.होळकर तालाव्यातील पाणी भूमिगत नळाद्वारे या जलकुंडामध्ये जात असत. या जलकुंडामध्ये संगमरवरी चार गोमुखातून पाणी पडत असत म्हणून या कुंडाला गायमुख म्हणत असत.बहुकोनी असलेल्या या जलकुंडास दोनी बाजूने प्रवेशद्वारे होती. त्याच बरोबर या जलकुंडात उतरण्यासाठी चारी बाजूने पायऱ्या होत्या.या जलकुंडाच्या चारी बाजूने संगमरवरी गोमुखे होती,या गोमुखातून जलकुंडात पाणी पडत असत . होळकर तालाव्यातील दट्ययाद्वारे या पाण्याचे भूमिगत नळांद्वारे नियंत्रण केले जात असत.हा एक अभियात्रीकेचा भाग होता. हे जलकुंडा नष्ट करून या जागी जेजुरी नगरपालिकेने सध्या भाविक निवास बांधलेले आहे.

 किल्ले वाफगाव : महाराज यशवंतराजे होळकर यांचे जन्मस्थळ

किल्ले वाफगाव : महाराज यशवंतराजे होळकर यांचे जन्मस्थळ

किल्ले वाफगाव, वाफगाव ता.खेड जि.पुणे(महाराष्ट्र)

इतिहास :-
होळकरांच्या वैभवशाली इतिहासाचे उदाहरण म्हणजे वाफगावचा भुईकोट किल्ला होय. हा किल्ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपल्या राज्यकाळात बांधला. हा किल्ला श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचे जन्मस्थान आहे. या भुईकोट किल्ल्यातच सुभेदार मल्हारराव होळकर यांची जेष्ठ कन्या उदाबाई होळकर यांचा विवाह होळकरांचे सरदार बाबुराव वाघमारे-पाटील यांच्याशी झाला होता व त्यानंतर सरदार बाबुराव वाघमारे व उदाबाई यांना येथून ३० कि. मी. अंतरावर असलेल्या खडकी-पिपळगाव(ता.आंबेगाव जि.पुणे) येथील वाडा व जमिनीची जहागीरदारी आंदण स्वरूपात देण्यात आली होती. तेथे आजही उदाबाई यांची समाधी, हत्ती दरवाजा, नदीघाट व आदी असंख्य होळकर कालीन वास्तू उपेक्षित अवस्थेत आहेत. या भुईकोट किल्ल्यात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर, राणी अहिल्यादेवी होळकर, श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम), श्रीमंत महाराजाधिराज यशवंतराव होळकर(प्रथम) यांनी अनेक वेळा दक्षिण मोहिमांच्या दरम्यान मुक्काम केला आहे तसेच या किल्ल्यात पूर्वी होळकरांची टाकसाळ हि होती. सध्या हा भुईकोट किल्ला रयत शिक्षण संस्थेला बक्षीस रुपात दिला आहे. या किल्ल्यावर रयत शिक्षण संस्था वाफगाव याचे नियंत्रण असते.



किल्ल्यात पाहण्याची ठिकाणे :-
किल्ल्याच्या आत राजदरबार, राजमहाल, अंधारी विहीर(बुरुजातील विहीर), होळकर कालीन तोफा, काही मंदिरे (विष्णू-लक्ष्मि, विष्णूपंच्याती, मांगीर बुवा), बावडी, राजमहालाची तटबंदी, होळकर कालीन भव्य गुफा तसेच किल्ल्याच्या बाहेरील असलेले राजराजेश्वराचे मंदिर पाहण्यासारखे आहे. पूर्वी गावाला तटबंदी होती मात्र आज तटबंदी काळाच्या ओघात नष्ट झाली आहे मात्र मुख्य वेस आजही शाबूत आहे व त्याचे नामकरण "अहिल्याबाई होळकर वैभव स्मृती" असे केले आहे. गावाच्या पूर्वेस नदी आहे व नदीच्या पात्रात राणी अहिल्यादेवी निर्मित एक दगडी बारव आहे तसेच नदीच्या पलीकडे चिंचेचा मळा आहे त्या भागात एक सुंदर कमानीयुक्त विहीर आहे.(पक-पक-पकाक या मराठी चित्रपटामधील)

किल्ल्याची माहिती :-
हा किल्ला एकूण ८ एकर जागेत विस्तीर्ण असून या किल्ल्याच्या बांधकामात घडीव दगड व विटांचा उपयोग केला आहे. या किल्ल्याला एकूण ७ बुरुज असून प्रत्येक बुरुजावर खिडक्या व छरी आहेत. तोफ किवा बंदुका यांचा शत्रूवर मारा करायला यावा या उद्देशाने या खिडक्या व छरी बुरुजावर आहेत. किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार हे मजबुत दगडात असून दारांवर लोखंडी अणुकुचीदार सुळे आहेत. हे लोखंडी अणुकुचीदार सुळे पट्ट्यानवर मजबूत बसवलेले आहेत.

किल्ल्याचे प्रवेशद्वार

प्रमुख प्रवेशद्वारतून अपुन आत गेल्यावर राजमहाल लागतो. हा राजमहाल बंदिस्त तटबंदीत असून दुमजली बांधण्यात आलेला आहे. राजमहालाच्या आत होळकर कालीन सुबक लाकडी काम पाहवयास मिळते. तसेच या महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जात असताना विष्णूपंच्याती हे मंदिर लागते. या मंदिरातील सर्व मुर्त्या या राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या विद्यमानाने स्थापन झालेल्या आहेत. या सारख्या मुर्त्या आपल्यालाला महेश्वरच्या किल्ल्यावर बघायला मिळतात. हा महाल "राणीचा महाल" म्हणून ओळखला जात असतं. या राजमहालाच्या समोर एक होळकर कालीन भव्य बारव स्थित असून या बारवेची निर्मिती राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केली. या बारवेच्या तळापर्यंत पायरया आहेत. या बारवेच्या बाजूलाच विष्णू-लक्ष्मि यांचे मंदिर स्थित आहे. हे मंदिर होळकराच्या धर्मनिरषेपचे उत्तम उदाहरण आहे कारण हे मंदिर मजिद सारखे दिसायला आहे. या मंदिरासमोरच आंधरी विहीर(बुरुजातील विहीर) असून हि विहीर किल्ल्याच्या एका बुरुजात स्थित आहे. या विहिरीच्या तळाला अंधार असून खूप गार वाटते तसेच या विहिरीत प्रकाश येण्यासाठी वरील बाजूने व्यवस्था केली आहे. या विहिरीच्या पाण्याचा आजही पिण्यासाठी उपयोग होतो. या किल्ल्याचे सर्वात आकर्षण हा राजदरबार आहे. राजदरबारचे बांधकाम हे दुहेरी असून या मध्ये दगड व विटांचा उपयोग केलेला आहे. राजदरबाराला आतील बाजूने असंख्य खिडक्या असून या राजदरबारावरच होळकरांचे बांड निशाण फडकवण्याची जागा आहे. राजदरबारावर पाकळ्याची आकर्षक तटबंदी आहे. राजदरबाराचे आतील द्वार हे सिमेंटने कायमचे बंद केलेले आहे. हे पाहून इतिहास प्रेमीना जरूर दुख होते. राजदरबाराचा आतून काही भाग पडला आहे. या किल्ल्यात होळकर कालीन तोफ हि बघायला मिळतात. या किल्ल्याच्या बाहेर राजराजेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे असून या मंदिराचा निर्माण राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे. या मंदिरासमोर दगडी मेघडबरीमध्ये नंदीचे भव्य वास्तू स्थित असून नंदीच्या गळ्यातील घंटा व रेखीव काम सुरेख आहे. हे मंदिर हि बंदिस्त स्वरुपात आहे. हे मंदिर पाहिल्यावर आपणास होळकर कालीन रेखीव व सुरेख दगडी कामाचा बोध होतो. या मंदिरच्या नक्षीदार बांधकामात महेश्वर किल्ल्याची समरूपता पाहवयास मिळते. मंदिराच्या बाजूच्या चौथऱ्यावर पूर्वी धर्मशाळा होती. मंदिराच्या गाभाऱ्यात आजही होळकर कालीन पूजेच्या पुरातन वास्तू पाहावयास मिळतात. एका कलशावर "तुकोजी होळ" अशी अक्षरे दिसतात. एक नक्षीदार घंटी आणि शिसवी पेटी आहे. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाचे वेगळेच वैशिष्ट्य म्हणजे सध्याच्या लॅच पद्धतीची कुलूप कशी असतात तशी कुलुपी पद्धत आहे. दरवाजा लोटून घेताच आतून कडी लागते आणि एका लांब चपट्या किल्लीनेच ते उघडता येते. पूर्वीच्या काळी सर्व वाफगावालाच दगडी कोट होता आज आपल्यालाला काही दगडी कोट हे गावामध्ये प्रवेश करताना नजरेस पडतात. होळकर प्रेमीनी या किल्ल्याला एकदा आवश्य भेट द्यावी.

किल्ल्याच्या आतील राजदरबार
  
होळकर कालीन तोफा 

  होळकर कालीन पोलादी नक्षीकाम 
                                                       महाराजाधिराज यशवंतराजे होळकर  
                                                      अधिक फोटो पहा : किल्ले वाफगाव 
कसे यावे :-
राजगुरुनगर पासून १२ कि. मी. अंतरावर वाफगाव आहे. तेथे जाण्यासाठी एस. टी बसची सुविधा आहे. वाफगावच्या प्रमुख ठिकाणी उतरल्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैभव स्मृती असे लिहिलेली वेस नजरेस पडते. तेथून काहीच अंतरावर किल्ला आहे. किल्ल्याच्या प्रमुख प्रवेश द्वरावर शिक्षण संस्थेचे नाव लिहिलेले दिसते(महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय,वाफगाव).

इतर :-
"पक-पक-पकाक" या मराठी चित्रपटाचे ७०% शुटींग व "पिपाणी" या मराठी चित्रपटाचे १००% शुटींग या किल्ल्यामध्ये झाले आहे. सन २०११ पासून दरवर्षी या किल्ल्यामध्ये श्रीमंत महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांची जयंती ३ डिसेंबर ला साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासात अज्ञान राहिलेल्या या राजाला वंदन करण्यासाठी जीवनात एकदा तरी अवश्य या जयंतीला उपस्थित रहा. 

 जेजुरी मधील अहिल्यादेवी होळकर तलाव

जेजुरी मधील अहिल्यादेवी होळकर तलाव

होळकर तलाव,जेजुरी(ता.पुरंदर जि.पुणे) : राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील अभियांत्रिकेचा व पाणी व्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमूना आहे.
  जेजुरी पुण्यश्लोक अहिल्यादेवीं होळकर यांच्या कर्तुत्वाने पावन झालेली भूमी. याच जेजुरीमधील राणी अहिल्यादेवींच्या काही कार्यामधील एक उत्कृष्ट नमुना म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव .या तलाव्याचा निर्माण पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७७० केला. हा तलाव लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सासरे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व सासू श्रीमंत गौतमीबाई होळकर यांच्या स्मरणार्थ निर्माण केला म्हणून या तलावास "मल्हार-गौतमेश्वर तलाव" या नावाने देखील ओळखले जाते.जेजुरी गडाच्या बाजूला हा भव्य तलाव स्थित असून एकूण १८ एकर जागेमध्ये पसरलेला आहे.
अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला भव्य तलाव 
 हा तलाव आकाराने चोकोनी असून चारीही बाजूने मजबूत घडीच्या दगडाने बांधलेला आहे. या तलाव्याच्या एका बाजूला चिंचणीची बाग असून जेव्हा आपल्या नजरेस हा तलाव पडतो तेव्हा आपल्या डोळ्याचे प्रारणे फिटून जीव थक्क झाल्याशिवाय राहत नाही. डोंगरावरील अनेक झऱ्याचे पाणी एकत्र करून शिस्तबद्ध पदधतिने तलाव्यामध्ये सोडण्यात आलेले आहे. डोंगरातील पाणी ज्या ठिकाणी तलाव्यात येते त्या ठिकाणी दगडांची खाली-वर या प्रकारे विशिष्ट्य पदधतीने मांडणी केलेली दिसते. तलाव्यामध्ये उतरण्यासाठी पूर्व व उत्तरेच्या बाजूला पायऱ्यांची सोय केलेली आहे. त्याचप्रकारे तलाव्यातील पाणी हे शेतीसाठी वापरण्यात यावे यासाठी पूर्व,उत्तर व दक्षिण या बाजूंना दगडी मोटेची सोय केलेली दिसते.तसेच तलाव्याच्या उत्तर व दक्षिण बाजूला तलाव्याला लागुनच दोन चौकोनी आकाराच्या विहिरी आहेत. या विहिरीचे बांधकाम दगडामध्ये असून त्यामधील दक्षिण बाजूच्या विहिरीवर शेतीसाठी पाणी उपसण्यासाठी दगडी मोटेची सोय केलेली आहे. याच विहिरीतील पाण्याचा उपयोग चिचणीच्या बागेसाठी होत असावा. तलाव्याच्या उत्तर बाजूला थोड्या अंतरावर अधुरे काम झालेले मंदिर पहावयास मिळते. या मंदिरामध्ये काही कोरीव पादुका पहावयास मिळतात तर काही कोरीव दगडी शिळा मंदिरासमोर हि बघायला मिळतात. या मंदिरासमोर एक छोटी दीपमाळ हि आहे.

तलावाच्या उत्तर बाजूला असलेली विहीर 
तलावाच्या दक्षिण बाजूला असलेली विहीर(चिंचेच्या बागेशेजारी) 
तलाव्याची पूर्व कडील बाजू हि तलाव्याची प्रमुख बाजू असून याच बाजूने दटयांच्या सहाय्याने तलाव्यातील पाणी हे गायमुख या जलकुंडामध्ये व जेजुरीतील तीन हौदामध्ये भूमिगत नळांद्वारे पोहचवले जात होते. त्यामुळे धुणे, अंघोळी व जनावरांसाठीचे पाणी दूरवर उपलब्ध होत होते. त्याचा वापर करून ते पुढे शेतीसाठी वापरले जात. त्यामुळे पाणी प्रदूषण होऊ नये म्हणून, पाणी वापरल्यानंतर त्याचा पुढे शेतीसाठी पुनर्वापर व्हावा हा विचार होता. 
तलावाच्या याच दटयांच्या माध्यमातून पाणी भूमिगत नळांना मिळत असे 
दटयांच्या बाजूला तलाव्याच्या बंधरयावरच भूमिगत नळांद्वारे जाणाऱ्या पाण्यावरील हवेचा दाब कमी व्हावा व या भूमिगत नळांद्वारे पाण्याचा प्रवाह व्यवस्थित व्हावा यासाठी खास चौकोनी दगडात मांडणी केलेली दिसते,ती आज हि आहे. पूर्वकडील बाजूला असलेल्या दटयांची मांडणी हि आज ही पहावयास मिळते तसेच त्या दटयांमधील भूमिगत नळही नजरेस पडतात. फक्त पूर्वकडीलच बाजूने तलाव्याच्या तळापर्यंत पायऱ्यांची सोय केलेली आहे आणि याच पायऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या भिंतीवर महाराजा होळकर इंदौर स्टेटचा संगमरवरी बोर्ड पहावयास मिळतो. दोन ठिकाणी तलाव्यामध्ये महाराजा होळकर इंदौर स्टेटचा बोर्ड आहे. पूर्वकडील एका बाजूने आपून तलाव्यात उतरल्यावर भव्य होळकर कालीन शिवपिंड पहावयास मिळते व या शिवपिंडेच्या बाजूला असलेल्या पूर्वेकडील तटबंदीवर विविध आकाराच्या दगडांची लक्षणीय मांडणी केलेली आहे.हि शिवपिंड राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विद्यमानाने तयार झालेली असावी. या तलाव्याचा आजही फक्त जेजुरीच नाही तर आसपासच्या गावांना ही शेतीसाठी पाण्याचा उपयोग होतो. हा तलाव तयार करताना जो नवलात या प्रकारचा दगड सापडला त्याच दगडापासून जेजुरीगडाच्या पायऱ्या होळकर काळात बनवल्या गेल्या.
तलावात चारही बाजूने अशा प्रकारेचे मजबूत दगडी बांधकाम बघायला मिळते.   
तलाव्यामध्ये असलेला महाराजा होळकर इंदौर स्टेटचा बोर्ड 
 सन १९३९ ला या तलाव्यातील पाण्याचा उपयोग जेजुरीत पिण्यासाठी होऊ लागला. ही प्रमाणात आजही होत आहे. या तलाव्यामध्ये भव्य दगडी चौथरा पहावयास मिळतो. पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या अनेक कार्यामधील एक उत्तम कार्य असलेला हा होळकर तलाव अभीयांत्रीकेचे भाग आहे. अशाप्रकारे विविध गुणांनी नटलेला हा होळकर तलाव आज घाणीच्या साम्रज्यात अडकलेला दिसतो. जेजुरी देवस्थान यांच्या वतीने येणाऱ्या यात्रेकरूंच्या अपुऱ्या सोयीमुळे तलाव्याच्या पश्चिम बाजूला मोठ्याप्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसते. मात्र जो पर्यंत सूर्य,चंद्र आणि वारा आहे तो पर्यंत हा होळकर तलाव आपल्याला इंदोरची राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्तृत्वाची आणि व्यक्तिमत्वाची जाणिव करून देत राहणार हे नक्कीच.आजच्या या कलयुगात हि होळकर कालीन वास्तू दिमाखात उभी आहे.

*महत्त्वाचे:-
१. गायमुख या जलकुंडाचा निर्माण राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७७० ला केला होत मात्र त्या गायमुखाच्या भिंतीचा वापर करून आज त्यावर भक्त निवास उभारले आहे. गायमुखाच्या पूर्वीच्या काही भिंती बाहेरील व आतील बाजूस पहावयास मिळतात. गायमुख या जलकुंडाचा तुम्ही ३d मौडेल असलेला Video हि पाहू शकता : गायमुख एक इतिहासात विलीन झालेले जलकुंड.

२.चिचणीच्या बागेचा निर्माण राणी अहिल्यादेवी होळकर यांनी भक्तांच्या सोयी केला होता.

 होळकर वाडा : खडकी-पिंपळगाव, ता.आंबेगाव जि.पुणे(महाराष्ट्र)

होळकर वाडा : खडकी-पिंपळगाव, ता.आंबेगाव जि.पुणे(महाराष्ट्र)

हा वाडा पाहिल्यानंतर काय बोलावे अन काय नाही हे कळणारच नाही कारण या वाड्याचे फक्त प्रवेशद्वारच स्थित आहे . या वाड्याच्या सर्व भिंती या पडलेल्या आहेत. हा किल्लेसदृश वाडा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी आपल्या राज्यकाळात बांधला. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांची मुलगी श्रीमंत उदाबाई होळकर-वाघमारे यांचा विवाह बाबुराव मानाजी वाघमारे-पाटील यांच्याशी झाल्यानंतर हे खडकी गाव श्रीमंत उदाबाई यांना चोळीबांगडी म्हणून होळकर कुटुंबियांनी बक्षीस स्वरुपात दिले. श्रीमंत उदाबाई या श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व श्रीमंत गौतमाबाई होळकर यांच्या कन्या होत्या.


येथे पाहण्यासाठी काही होळकर कालीन वास्तू स्थित आहेत त्यामध्ये महादेव मंदिर व त्यामधील नंदी, लक्ष्मी नारायण मंदिर, काळभेरनाथ मंदिर, बिरोबा मंदिर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला नदी घाट, तसेच श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांचे नातू अवचितराव वाघमारे-पाटील(श्रीमंत उदाबाई आणि बाबुराव मानाजी वाघमारे-पाटील यांचे पुत्र) यांनी पितृ उध्दर्तीर्थ बांधलेली समाधी. हि समाधी होळकर कालीन स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे. या समाधी नक्षी कामामध्ये मध्ये मराठा व राजपूत कलाकृती दिसून येते व तसेच या समाधी गर्भगृहा मध्ये एक महादेव पिंड असून होळकर कालीन शिलालेख नजरेस पडतो. येथील प्रवेशद्वार वरील व बिरोबा मंदिरावरील होळकर कालीन दगडी नक्षीकाम आज हि पाहण्यासारखे आहे. येथील होळकर कालीन नदीघाट हा गावाची शोभा वाढवताना दिसतो. नदीघाट पाहण्यासाठी जाताना येणाऱ्या वेशीवर होळकर कालीन भव्य शिलालेख आढळतो. हा नदीघाट खूपच भव्य दिव्य आहे. येथील समाधीवर झाडे झुडपे येताना दिसतात ते वेळेत साफ केले नाहीतर येणाऱ्या काळात त्याचा समाधी मंदिरावर विपरीत परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही. येथील असलेल्या या होळकर कालीन वास्तूमुळे या गावास पर्यटनाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे येथील असलेल्या या वास्तूची लवकरात लवकर डागडुजी होणे आवश्यक आहे. येथे येण्याचा पुण्यावरून मार्ग :- पुणे-राजगुरुनगर-मंचर-पिंपळगाव(महाळूगे)-खडकी .
वाड्याचे प्रवेशद्वार(हत्ती दरवाजा) 
बाबुराव व उदाबाई वाघमारे(होळकर) यांची संयुक्त समाधी  
समाधीच्या आतील होळकर कालीन शिलालेख 
घोडगंगा नदीवरील होळकर कालीन नदीघाट 
तेथील समाधीमधील असलेल्या शिलालेखावरील उल्लेख पुढील प्रमाणे :- 
श्री गणेशाय नम : प्रतापि महाराज मळहारराजा जसि लक्षुमिगौतमा नाम तया उदरी रत्नकन्या विराजे उदाबाई हे नाम पृथ्वीत गाजे . सके १७११ सौम्य नाम संवत्सरे चौत्र शुद्ध ९ नवमी मंदवासरे ते दीवसी बाबूरावा वल्द(वडील) मानाजी पाटील वाघमारे मोकदम तक्षिम दिड मौजे खडकी तर्फे महाळुंगे तस्ये भार्या उदाईवा पुत्र अवचितराव पाटील वाघमारे याणी पित्रु उद्धारार्थ परलोकसाधनार्थ छत्रीचे काम केले असे .

 होळकर वाडा(रंगमहाल) : चांदवड जि.नाशिक(महाराष्ट्र)

होळकर वाडा(रंगमहाल) : चांदवड जि.नाशिक(महाराष्ट्र)

होळकर कालिन कलेचा एक सुंदर अविष्कार म्हणजे चांदवडचा किल्ले सदृश्य होळकर वाडा म्हणजेच रंगमहाल.....

सह्यादीच्या पर्वतरांगेत मुंबई - आग्रा महामार्गावर वसलेल्या चांदवड शहराला ऐतिहासिक वारसा असून येथेच पुण्यश्लोक राणी श्रीमंत अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यशासन काळात (१७६७-१७९५) किल्ले सदृश्य होळकर वाड्याचा(रंगमहाल) निर्माण केला. वाड्यामधील लाकडी कोरीव काम आजही लक्ष वेधून घेते. पूर्वीच्या काळी हा वाडा होळकर वाडा म्हणून ओळखला जात असेे, परंतु येथील दरबार हॉलमध्ये असणाऱ्या रंगीत चित्रांमुळे या वाड्याला रंगमहाल असे हि नाव पडले. हा वाडा बघताना तत्कालीन वैभवाच्या खुणा दृष्टीस पडतात, परंतु त्याचे योग्यप्रकारे जतन होत नसल्याने पर्यटकांबरोबरच चांदवडकरांमधून नाराजीचा सूर उमटत आहे तसेच या वाड्यामधील रंगचित्रे हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पुरात्त्वत खात्याने या वाड्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. होळकर वाडा ही वास्तू चांदवडचे वैभव आहे. या महालाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सुरुवातीलाच मोकळा भूभाग लागतो. थोड्या अंतरावरच वाड्याच्या मुख्य इमारतीस सुरुवास होते. दर्शनी बाजूच्या दोहींकडून दोन जिने आहेत. ते दुसऱ्या मजल्यावरील दरबार सभागृहात जातात. या भव्य सभागृहात अनेक निसर्गचित्रे पशु-पक्षी, तत्कालीन महिला-पुरुष, मुले, त्यांची वेशभूषा अशी चित्रे आहेत. इतिहासकाळात न्यायदान व आस्थापनासाठी याच सभागृहाचा उपयोग केला जात असे. काळाच्या ओघात काही जुने वाडे, वेशी आणि तटबंदी पडून गाव विस्तारलेलं असलं तरीही आज दोन-तीन वेशी आपल्याला बघायला मिळतात. चांदवड शहर पूर्वी सात वेशींमध्ये बांधलेलं होतं. दिल्ली दरवाजा , धोडंबे (धोडप) दरवाजा , बाजार वेस , जुनी सरकारी वेस , आनकाई वेस , ढोलकीची वेस (शिवाजी चौकातली) , गुजरात गल्ली वेस अशा वेशींपैकी काही आज पाहावयास मिळतात तर काहींना वाढत्या गावाने फोडून टाकलं आहे. एसटी स्टॅण्ड कडून गावात जातांना आठवडे बाजार वेस आपलं स्वागत करते. या वेशीवर जरी हल्ली फ्लेक्स बोर्ड झळकत असले तरी मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना पूवीर्चे शिलालेख आढळतात. एक मराठीतला तर दूसरा फारसी भाषेत कोरलेला आहे. मराठीतला शिलालेख थोडं बारकाईने बघितला तर वाचता येतो. इथूनच चांदवड आपल्याला त्याच्या प्राचीनत्त्वाची प्रचिती देतं. गावात काही प्रसिद्घ आणि शिल्पकलेचे अद्वितीय नमुने असलेले साखळीवाडा , तर्टेवाडा , गोखलेवाडा , वैद्यवाडा असे जुने वाडेही होते , असं म्हणावं लागतं. कारण तेही पोखरून नेस्तनाबूत झालेत. या सर्वात आजही आपलं अनोखं सौंदर्य घेऊन उभा आहे तो म्हणजे किल्ले सदृश्य होळकर वाडा म्हणजेच रंगमहाल. गावातल्या बच्चालाही विचारलं रंगमहाल कुणीकडे , तरीही लगेच तो बोट करून रस्ता दाखवतो. आजुबाजूला दोन भव्य बुरुज , तटबंदी आणि मध्यभागी उंच असं दगडी प्रवेशद्वार. रंगमहाल इतका मोठा अगदी जवळजवळ पुण्याच्या शनिवार वाड्याएवढा असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. उत्तरेकडे तोंड असलेल्या प्रवेशद्वाराची कोरीव कमान , छोट्या खिडक्या , आत पहारेदाराच्या खोल्या आणि वर अंबारीसारखे घुमट असलेली तटबंदी असा रंगमहालाचा रुबाबदार थाट दिसतो. प्रवेश द्वाराचा लाकडी दरवाजा आजही शाबूत असून तोही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने घडविलेला दिसतो. परकीय आक्रमण झाल्यास दरवाजा हत्तीच्या धडकेने तोडला जाऊ नये म्हणून त्यावर लांब व टोकदार असे लोखंडी खिळे बसविलेले दिसतात. दरवाजाच्या भव्यतेवरून आतल्या रंगमहालाचा पसारा किती असावा याचा अंदाज येतो. आत प्रवेशताच समोर मुख्य महाल नजरेत पडतो. इथं बऱ्यापैकी लोकांची वर्दळ दिसून येते. ही वर्दळ रंगमहाल बघण्यासाठी नाही तर ह्यात चालणाऱ्या पोस्ट ऑफिस , ग्रामीण कार्यालयं व कोर्टकचेरीच्या कामांसाठी आलेल्यांची असते. रंगमहालासारख्या वास्तूचा वापर सरकारच्या सार्वजनिक कामासाठी होतोय हे बघून कलेचा पुरातन वारसा जतन व्हावा अशी प्रामाणिक इच्छा असणाऱ्या कलाकाराला निश्चितच दु:ख होतं. पण तरीही आज इतक्या सुस्थितीत असलेला महाल बघून आनंदही होतो. मुख्य इमारतीत आत गेल्यावर लाकडाचे भव्य खांब त्यावरील नक्षीकाम , गोलाकार कमानी , बारीक कलाकुसरीची वेलबुट्टी , लाकडाला कोरून केलेल्या जाळीच्या भिंती असं किती बघावं नि किती नाही असं होतं. आत गेल्यावर आपण महालातच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या चौकात येऊन पोहोचतो. हा जवळपास ६० बाय ६५ फूट एवढा चौक असून त्याच्या अवतीभोवती नजर फिरविल्यास लाकडावर किती बारीक आणि देखणं नक्षीकाम होऊ शकतं याचा प्रत्यय येतो. खुल्या चौकाच्या चारही बाजूंना वेगवेगळी दालनं , त्या दालनांचे लाकडी खांब आणि त्या खांबांच्या वरच्या भागावर काष्ठशिल्प , आडव्या तुळईंवरच्या बारीक वेलबुट्टी आणि असे कोरीव लाकडी खांबांचे एकावर एक तीन मजले असा हा भव्यदिव्य सेटच उभारलेला आहे. या काष्ठशिल्पात आपल्याला अनेक वेगवेगळी फुलं , पोपट , मोर इ. पक्षी तसंच हत्ती , सिंह , वानर अशा अनेक प्राण्यांच्या कलात्मक प्रतिमा कोरलेल्या दिसतात. रंगमहालाच्या भिंतीही जुन्या विटांच्या आणि दगडी बनावटीच्या भक्कम अशा बनविलेल्या आहेत. संपूर्ण बांधकाम चुन्यात केलेलं आहे. या मध्यभागाच्या चौकात आपण या सर्व कलात्मकतेत हरवूनच जातो. इथं दर्शनी भागातल्या एका दालनात होळकरांची राजगादी ठेवलेली असून राजमाता राणी श्रीमंत अहिल्यादेवी होळकर जेव्हा चांदवड येत तेव्हा याच राजगादीवरून न्यायनिवाडा करत असत तसेच होळकर वंशीयांचे जुने फोटोही याच दालनात लावलेले आहेत. हल्लीच इथं अहिल्यादेवींच छोटे स्मारक बसवून त्यासमोर कारंजा बसवून थोडं सुशोभिकरणही केलेलं आहे.वाड्याच्या पाठीमागे घोड्यांची पाग व पाण्याच्या सोयीसाठी निर्माण केलेली भव्य बारव स्थित आहे. हि बारव तीन माजली खोल आहे. मुळातच चांदवड शहर हे बारावांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय चांदवड शहरात व परिसरात लोकमाता राणी श्रीमंत अहिल्यादेवी होळकर यांनी काही लोककल्याणकारी कामे केली त्यामध्ये श्री चंद्रेश्वर महादेव मंदिराचा जीर्नोधार, श्री रेणुकामाता मंदिराचा जीर्नोधार व पाण्याच्या सोयीसाठी बारव व तलावाचा निर्माण, चांदवड टेकडीवर श्री खंडोबा मंदिराचा निर्माण, श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराचा निर्माण, श्री कालिकामाता मंदिराचा निर्माण केला.

 होळकरशाहीतील दुर्ग : किल्ले थाळनेर

होळकरशाहीतील दुर्ग : किल्ले थाळनेर

किल्ले थाळनेर : थाळनेर, ता.शिरपूर जि.धुळे(महाराष्ट्र)      
संकलन - राहुल वावरे, ८९९९१४३०७४. 

ahilyabai-holkar-thalner-fort-dhule-1
होळकरशाहीची श्रीमंती असलेला केल्ले थाळनेर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे 
किल्ले थाळनेर ता.शिरपूर जि.धुळे, होळकरशाहीची श्रीमंती असलेला किल्ले थाळनेर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या किल्ल्याचा निर्माण फारुकी राजवटीमध्ये करण्यात आला. त्या काळात हा किल्ला फारुकी घराण्याची राजधानी होता, त्यानंतर हा किल्ला मुघल राजवटीमध्ये गेला व नंतर हिंदवी स्वराज्यात सन १७५० ला हा किल्ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर सरकार यांच्या ताब्यात आला. सुभेदार मल्हारराव होळकर व राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकाळात या किल्ल्याची नव्याने बांधणी करण्यात आली मात्र थाळनेरचा कारभार खऱ्या अर्थाने भरभराटीला आला तो राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात. थाळनेर आजच्या घडीला एक छोटेसे गाव असले तरी तत्कालीन होळकरशाहीच्या काळात एक श्रीमंत परगणा होता. वास्तविक आज थाळनेर हे तालुक्याचे ठिकाण हवे होते मात्र तसे न होता ते एक शिरपूर तालुक्यातील खेडे गाव आहे, हा एक योगा योगच म्हणावा लागेल. शिरपूर तालुक्यासहित खानदेशात राणी अहिल्यादेवी होळकर यांचे आजही खूप मोठ्या प्रमाणात लोककल्याणकारी कार्य पाहायला मिळते व या सर्व कामांचा लेखाजोखा हा किल्ले थाळनेर मध्ये ठेवला जात होता. तसेच किल्ले थाळनेर हा सातपुडा डोंगररांग व महाराष्ट्र पठाराच्या मध्यभागी येत असल्यामुळे तेथे राणी अहिल्यादेवी यांच्या काळामध्ये एक आरक्षित लष्करी फोज तोफांसहित सज्ज असतं. १८ व्या शतकात राणी अहिल्यादेवी होळकर यांनी महेश्वर ते पुणे अशी टपाल व्यवस्था सुरु केली होती याचे पुरावे मिळतात व या टपाल व्यवस्थेच्या मार्गावर प्रमुख पाच ठाणी(Check Post) होती त्यामधील किल्ले थाळनेर हे एक प्रमुख ठाण होते. किल्ले थाळनेर होळकर रियासतीच्या अंतर्गत येण्या अदोगर त्याचे नाव "स्थलकनगर" असे होते मात्र १८ व्या शतकात राणी अहिल्यादेवी होळकर यांनी तापी नदीच्या काठी असलेल्या थळेश्वर महादेव मंदिराचा नव्याने निर्माण केल्यानंतर या मंदिरावरून "थाळनेर" हे नाव रूढ झाले ते आजही. इ.स. १८१८ ला मराठा-इंग्रज युद्धामध्ये ब्रिटीश जनरल सर थॉमस हिसॉप जेव्हा थाळनेरचा किल्ला घेण्यासाठी गेला, त्यावेळी खानदेशच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित प्रतिकार त्याला इथे झाला. यात किल्ल्यावरील २५० मराठी लोक तर इंग्रजांचे २५ जण ठार झाले. यामध्ये लढाऊ बाण्याचे तेथील किल्लेदार तुळशीराम मामा यांनी प्राणपणाने किल्ल्याचे रक्षण करताना ब्रिटिशांशी दोन हात केले. अखेर ब्रिटिश सैन्यापुढे त्यांचा पाडाव लागला नाही. तुळशीराम मामांना फाशी देण्यात आली. त्या वेळी ब्रिटिश सैन्याला कडवी झुंज देणारे तुळशीराम मामा व अन्य त्यांचे साथीदार खान्देशातील पहिले हुतात्मे ठरले.
अशाप्रकारे फारुकी राजवटीपासून होळकरशाहीच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असणारा हा किल्ला व थाळनेर गाव आज अतिशय दुर्लक्षित आणि उपेक्षित अवस्थेत आहे. जसा काळ लोटला तसा हा किल्ला नष्ट होत गेला त्याला जबाबदार कोण? आज मोठ्या प्रमाणात किल्ला नष्ट झाला आहे मात्र जेवढ्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्याचं वेगळंच वैशिष्ट्य आहे व त्या जपल्या गेल्या पाहिजेत. 
तापी नदी थाळनेर गावाजवळ इंग्रजी (U) आकाराचे वळण घेते. तेथे असलेल्या १०० मीटर उंच टेकडीवर थाळनेरचा किल्ला वसलेला आहे. थाळनेरचा किल्ला हा राज्य संरक्षणाच्या दृष्टीने अभेद्य असा होता. इतिहासकार पर्सी ब्राऊन या किल्ल्याचा उल्लेख ‘बादशाही किल्ला’ म्हणून करतो. थाळनेरचा किल्ला बांधताना जी जागा निवडली आहे, ती कौशल्यपूर्वक निवडलेली दिसते. या गावातून वाहणाऱ्या तापी नदीच्या काठी हा किल्ला बांधला आहे. या किल्ल्याची रचना अशी काही चमत्कारिक आहे की तेथे एकाच्या आत दुसरा असे एकमेकांच्या पाठीमागे नागमोडी वळणांनी बांधलेले असे पाच दरवाजे आहेत. पहिल्या दरवाजातून शत्रू आत आला तर त्याच्यावर आतील दुसऱ्या दरवाजाच्या तटावरून मारा करण्याची सोय करण्यात आली आहे. या किल्ल्याच्या भिंतीची उंची सुमारे ६० फूट असून या किल्ल्यातील सगळ्या तोफांचा मारा बहुतेक पूर्वेच्याच बाजूला आहे कारण पश्चिमेच्या बाजूला तापी नदीचे खोल पात्र, उत्तर आणि दक्षिण या दिशांनी तुटलेले कडे या कारणांमुळे या तीन बाजूंचे संरक्षण प्रत्यक्ष सृिष्टदेवताच आपल्या अजिंक्य तोफांनी करत आहे. या व्यतिरिक्त किल्ल्याची पाताळेश्वर मंदीराच्या बाजूची ६० फूट उंच भाजलेल्या विटांमध्ये बांधलेली भिंत व २ बुरुज उभे आहेत. बाकी सर्व बाजूच्या भिंती व बुरुज नष्ट झालेले आहेत. किल्ल्यावर दोन छोट्या देवळ्या आहेत. एकात सप्तशृंगी देवीची अलिकडची मुर्ती आहे व दुसरे देऊळ रिकामे आहे. अनेक होळकर कालीन तोफा जमिनीत गाडल्या गेल्या आहेत. असा हा वैभवशाली किल्ला आज जवळजवळ उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तापी नदीला सतत येणा-या पुराने त्याची भिंत पडली असून गावातील लोक स्वत:ची घरे बांधण्यासाठी आतील माती वाहून नेत आहेत. 
अशाप्रकारे राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला होळकरशाहीची श्रीमंती असून तुळशीराम मामा व अन्य हुतात्म यांचा हा किल्ला शौर्यचे स्मारक आहे. तो जपला पाहिजे. स्थानिक प्रशासन, स्थानिक जबाबदार व्यक्तीं व राज्य पुरातत्व खात्याने याकडे लवकर लक्ष देऊन या किल्ल्याचा विकास केला पाहिजे नाही तर हा किल्ला होता असाच एक इतिहास होऊन बसेल आणि तेथील पुरातत्व खाते हे नावाप्रमाणे पुरावे लागेल. हा किल्ला पुरातत्व खाते यांच्या ताब्यात आहे. खानदेशात अजून एक होळकरशाहीचा लष्कर भुईकोट आहे त्याची पण अशीच अवस्था आहे. तत्कालीन काळात तेथे सेनिकांची व हत्ती, घोडे, उंट व तोफांची प्रशिक्षण कवायती होत असतं. त्या किल्ल्याचे नाव आहे किल्ले सुलतानपूर ता.शहादा जि.नंदुरबार. आजच्या घडीला हे दोन्ही किल्ले उपेक्षित अवस्थेत कसेबसे तग धरून उभे आहेत. 
फोटो आभार : सचिन हाटले 
माहिती आभार : १.स्थानिक नागरिक,थाळनेर, २.इंदोर स्टेट गॅझेट भाग-१, ३.दिव्य मराठी वृत्तपत्र, ४.ट्रेकसिटीज संकेत स्थळ, ५.phd-"अहिल्याबाई होळकर यांचे नेतृत्व एक राजकीय अभ्यास"-प्रकरण २. 
 

 तोफे वरील फार्सी लेख (परंडा किल्ला) :





तोफे वरील फार्सी लेख (परंडा किल्ला) :
तोफेवरील लेख (परंडा किल्ला):
परंडा किल्ल्यावरील मुख्य दरवाजाच्या बुरुजावर एक सुंदर तोफ आहे. त्यावर तिचे नाव फार्सी मध्ये कोरले आहे. ते पुढली प्रमाणे.
मैदान (میدان)
मलिक (ملک)
तोप (توپ)
नावाप्रमाणे ही तोफ रणभूमीची राणी शोभते खरी.
परंडा किल्ला छोटेखानी असला तरी त्याच्या सुरक्षेची काळजी पूर्ण व्यवस्थित घेतलेली दिसते. दुहेरी तटबंदी, बुरुजांचे कोंदण आणि त्यावर दिसायला सुंदर पण तोंडातून आग ओकणाऱ्या अजस्त्र आकाराच्या तोफा. यातील एका तोफेवर तिचे नाव , बनवणाराचे नाव आणि शासकाचे नाव कोरले आहे. हे सर्व लेख फार्सी भाषेत आहेत.
.
.
तोफेचे नाव :
सदर तोफेवर तिचे नाव आहे ज्याच्या मुळे तोफेची उग्रता पण लक्षात येते.
तोफेवर कोरलेले नाव पुढील प्रमाणे :
अझदहा पैकर (اژدها پیکر )
तोप (توپ )
म्हणजेच " आग ओकणारी तोफ "
याचा खरा अर्थ असा होतो की एक काल्पनिक प्राणी ज्याच्या तोंडातून आग बाहेर पडते.
मागे पहिली ती तोफ युद्धमैदानातील राणी होती तर ही आगीच्या ज्वाळा फेकण्यासाठी प्रसिद्ध आहे.
तोफेचा आकार बघून कल्पना पण करवत नाही की हिला बत्ती दिल्यानंतर काय आवाज होत असेल आणि हीच्यातून निघालेल्या तोफगोळ्याची तीव्रता काय असेल.
.
तोफ बनवणाऱ्याचे नाव :
तोफेवर दुसरा लेख आहे तो तोफ कोणी बनवली याची माहिती देतो. तो लेख असा :
महमद (محمد)
हुसैन ( حسین )
अमल अरब ( عمل ارب)
म्हणजेच ही तोफ महमद हुसैन अरब याने बनवली किंवा त्याच्या देखरेख खाली बनवली. याचा बाप म्हणजे महमद अली अरब हा मुघल काळात प्रसिद्ध असा तोफ बनविणारा कारागीर होता.

.
आता महत्वाचा प्रश्न की तोफ कोणाच्या सांगण्यावरून बनवली आहे. तर त्यासंबंधी देखील एक लेख तोफेवर सापडतो. तो पुढील प्रमाणे :
आलमगीर बादशहा गाजी (عالمگیر بادشاه غازی)
औरंगजेब बहादुर (اورنگزیب بهادر)
ही तोफ बनवली गेली ती औरंगजेब याच्या आज्ञेवरून.
त्याचे अखबारात म्हणजे बातमी पत्रे वाचली की समजून येत परंडा किल्ला त्याच्या दृष्टीने किती महत्वाचा होता. बादशहाचा धान्यसाठा , दारूगोळा परंडा किल्ल्यात होता आणि त्याचा हत्तीखाना परंडा भागात होता.
५ ऑक्टोंबर १७०० ची एक नोंद आहे ज्यात औरंगजेब सांगतो की परंडा येथून रसद आणा आणि त्यापैकी धान्याच्या गोण्यानी भरलेले ५ हजार बैल बेदरख्त खानाच्या फौजेत पाठवा. ५ हजार बैल ओढतील इतकं धान्य विचार पण करवत नाही आणि इतक धान्य तिथून आणायचं तर तिथे एकूण किती असेल हे कल्पनेच्या पलीकडे आहे. त्यामुळे अशा किल्ल्याच्या सुरक्षेसाठी आग ओकणारी तोफ हवीच.
आधी पाहिलेली मैदान मलिक ही पण औरंगजेब याच्या सांगण्यावरून बनवली होती कारण तिच्या वर पण त्याच्या नावाचा लेख आहे.
पोस्ट आणि माहिती - ओंकार खंडोजी तोडकर

 होळकर वाडा – खडकी-पिंपळगाव ता.आंबेगाव जि.पुणे












होळकर वाडा – खडकी-पिंपळगाव ता.आंबेगाव जि.पुणे
हा वाडा पाहिल्यानंतर काय बोलावे अन काय नाही हे कळणारच नाही कारण या वाड्याचे फक्त प्रवेशद्वारच स्थित आहे . या वाड्याच्या सर्व भिंती या पडलेल्या आहेत . हा किल्लेसदृश वाडा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) यांनी आपल्या राज्यकाळात बांधला (ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही गावकरयाकडून सांगितले जाते). श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांची मुलगी श्रीमंत उदाबाई होळकर – वाघमारे यांचा विवाह बाबुराव मानाजी वाघमारे – पाटील यांच्याशी झाल्यानंतर हे खडकी गाव श्रीमंत उदाबाई यांना चोळीबांगडी म्हणून होळकर कुटुंबियांनी बक्षीस स्वरुपात दिले.
श्रीमंत उदाबाई या श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) व श्रीमंत गौतमाबाई होळकर यांच्या कन्या होत्या.
येथे पाहण्यासाठी काही होळकर कालीन वास्तू स्थित आहेत त्यामध्ये महादेव मंदिर व त्यामधील नंदी ,लक्ष्मी नारायण मंदिर ,काळ भेरनाथ मंदिर ,बिरोबा मंदिर ,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला नदी घाट,तसेच श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) यांचे नातू अवचितराव वाघमारे – पाटील( श्रीमंत उदाबाई आणि बाबुराव मानाजी वाघमारे – पाटील यांचे पुत्र ) यांनी पितृ उध्दर्तीर्थ बांधलेली समाधी . हि समाधी होळकर कालीन स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे .या समाधी नक्षी कामामध्ये मध्ये मराठा व राजपूत कलाकृती दिसून येते व तसेच या समाधी गर्भगृहा मध्ये एक महादेव पिंड असून होळकर कालीन शिलालेख नजरेस पडतो.
येथील प्रवेशद्वार वरील व बिरोबा मंदिरावरील होळकर कालीन दगडी नक्षीकाम आज हि पाहण्यासारखे आहे. येथील होळकर कालीन नदीघाट हा गावाची शोभा वाढवताना दिसतो . नदीघाट पाहण्यासाठी जाताना येणाऱ्या वेशीवर होळकर कालीन भव्य शिलालेख आढळतो . हा नदीघाट खूपच भव्य दिव्य आहे. येथील समाधीवर झाडे झुडपे येताना दिसतात ते वेळेत साफ केले नाहीतर येणाऱ्या काळात त्याचा समाधी मंदिरावर विपरीत परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही . येथील असलेल्या या होळकर कालीन वास्तूमुळे या गावास पर्यटनाचा दर्जा प्राप्त झालेला आहे . त्यामुळे येथील असलेल्या या वास्तूची लवकरात लवकर डागडुजी होणे आवश्यक आहे . येथे येण्याचा पुण्यावरून मार्ग :- पुणे – राजगुरुनगर – मंचर – पिंपळगाव (महाळूगे) – खडकी .
तेथील समाधीमधील असलेल्या शिलालेखावरील उल्लेख पुढील प्रमाणे :-
श्री गणेशाय नम : प्रतापि महाराज मळहारराजा जसि लक्षुमिगौतमा नाम तया उदरी रत्नकन्या विराजे उदाबाई हे नाम पृथ्वीत गाजे . सके १७११ सौम्य नाम संवत्सरे चौत्र शुद्ध ९ नवमी मंदवासरे ते दीवसी बाबूरावा वल्द ( वडील ) मानाजी पाटील वाघमारे मोकदम तक्षिम दिड मौजे खडकी तर्फे महाळुंगे तस्ये भार्या उदाईवा पुत्र अवचितराव पाटील वाघमारे याणी पित्रु उद्धारार्थ परलोकसाधनार्थ छत्रीचे काम केले असे .











































No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...