Tuesday, August 13, 2024

सफर पाकिस्तानचा !

 
  
                                                                                                           
  

पाकिस्तान या विषयावर आपल्या कडे बोलण्या सारखे खूप काही आहे ! खरेतर पाकिस्तानचे नाव काढले कि आपल्या डोळ्या समोर येतो तो २६/११ चा आतंकवाद्यांचा आपल्या "भारत" देशावरचा हमला ! पण पाकिस्तानची अजून एक ओळख आहे, तेथील जागा , भौगोलिक वैशिष्ट्य , तेथील ऐतिहासिक अवशेष ( आपल्या भारताच्या संदर्भातले ) यांच्या बद्दल काळात नकळत का होईना आपल्या कानांवर पडतेच ! जसे आपल्याला शाळेच्या इतिहासात "हडप्पा" आणि "मोहेन्जोडो" येथील संस्कृतीची माहिती करून दिली जाते , सध्या ही शहरे पाकिस्तानात आहेत! सध्या या जागा प्रत्यक्षात जाऊन पाहणे तसे फार (म्हणजे फारच! ) कठीण आहे.. तरी सुद्धा आपण वरळी येथील नेहरू सेंटर मध्ये सकाळी १० ते ५ या वेळात जाऊन तेथील अनुभव प्रत्यक्ष घेऊ शकतो!! प्रस्तुत लेखमालिकेचा उद्देश हा माझा १ सदैव कुतूहलाचा विषय असणाऱ्या पाकिस्तान बद्दल आहे! आपण या लेख मालिकेत पाकिस्तानबद्दल अधिकाधिक जाणून घायचा प्रयत्न करणार आहोत!

                                
                                


आपल्याला माहित आहे पाकिस्तान हा स्वतंत्र  देश होण्याआधी भारताचाच १ भाग होता! आता मात्र तो १ स्वतंत्र "इस्लामी" देश आहे.तसे या देशात आपल्याया बघण्यासारख्या पुष्कळ अश्या जागा / शहरे / वस्तू आहेत  पण तरी सुद्धा प्रामुख्याने या देशातील काही प्रमुख शहरे पुढीलप्रमाणे ( ज्यांचा आपण धावता आलेख घेणार आहोत )
१. लाहोर
२. कराची
३. इस्लामाबाद
४. पेशावर
५. रावळपिंडी
तसे पाकिस्तान मध्ये अनेक अजून शहरे आहेत जिचे छोटे मोठे काहीतरी भारतीय इतिहासाशी जरूर संबंध आहे. आपण या लेख मालिकेत जास्तीत जास्त शहरांचा उल्लेख  करून जास्तीत जास्त माहिती आपल्या "मराठी" भाषेत उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे .चला तर मग पाकिस्तानाची सफर करूया !


                   

मुक्काम पोस्ट "लाहोर" !

सर्वात प्रथम आज आपण "लाहोर" येथे जाऊन तेथील माहिती घेऊ! लाहोर हे जणू दुसरे पंजाबच आहे. खरे तर हे शहर आपल्या पंजाब राज्या पासून ( खासकरून अमृतसर पासून ) अतिशय जवळ आहे! फाळणीच्या सुमारास येथील सुपीक भाग हा पाकिस्तानच्या सध्याचं पंजाब प्रांतात गेला, तोच आहे सध्याचा लाहोर !! सध्याच्या इतिहासातून आपल्याला एवढे निश्चित माहित असेल ( अशी अपेक्षा जरूर करतो ) कि थोर क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू ,सुखदेव यांना लाहोर येथील जेल मध्ये २३ मार्च १९३१ साली सायंकाळी ७ ला फाशी देण्यात आली. वास्तविक अशी परंपरा आहे की कैद्यांना फाशीची शिक्षा ही दिवसा करण्यात येते , परंतु हाती आलेल्या बातमीनुसार गांधीजी या ३ क्रांतीकारकांची फाशी वाचवण्यासाठी व्होईसरॉय कडे मागणी करणार होते, व असे होऊ नये म्हणून त्यांना घाईघाईत फाशी देण्यात आली सायंकाळी! वास्तविक गांधीजींना वाटले असते तर ते त्यांची फाशी वाचवू शकले असते पण त्यांना तसे नाही जमले! इतिहास त्यांच्याशी हा प्रश्न नक्कीच करणार !
             
असो.. या ३ क्रांतिकारकांच्या स्मृतीला वंदन करून आपण आता लाहोर शहरात येउयात! सतलज नदीच्या काठावर वसलेले हे चांगलेच मोठे शहर आहे !! पुराणापासून आपल्याला उल्लेख आढळतो की या शहराची स्थापना भगवान राम यांच्या मुलाने म्हणजेच "लव" याने केली आहे! काही लोकांना हा पुरावा मान्य नसेल परंतु  लाहोर येथील वस्तुसंग्रहालयात मात्र लाहोर हे शहर "लव" यानेच वसवल्याचा उल्लेख आढळतो! लाहोर ला जाण्यासाठी आपल्या कडे तसे खूप रस्ते आहेत ! आपण जी टी रोड ने ( म्हणजेच ग्रांड ट्रंक रोड) ने वाघा बोर्डर वरून लाहोर ला जाऊ शकतो किव्हा ट्रेन ने अमृतसर जंक्शन - अटारी - वाघा असे करत लाहोर ला पोचू शकतो ! मी अटारी , अमृतसर तसेच फक्त अर्धे वाघा ( कारण अर्धे वाघा पाकिस्तानात आहे) येथे स्वतः गेलो आहे !




मी ग्रांड ट्रंक रोड च्या प्रेमात !
मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे हा रस्ता शेरशहा ने बांधला आहे , हा रस्ता काबुल पासून कलकत्ता पर्यंत जातो ( म्हणजे पहा किती महत्व आहे या रस्त्याला ) . खरे सांगायचे झाले तर हा रस्ता किती सुंदर आहे हे तो प्रत्यक्ष पहिल्या शिवाय किवा तेथे जाऊन गाडी चालवल्या शिवाय समजणार नाही! माझ्या नशिबाने मला तेथे जायची संधी मिळाली! व त्या रस्त्याच्या मी प्रेमातच पडलो ! भारतातील "वाघा सीमारेषा" हा या रस्त्याचा शेवट आहे! तेथून पुढे १६ किलोमीटर वर अमृतसर व १६ किलोमीटर वर लाहोर आहे! मुख्य म्हणजे वाघा हे अर्धे पाकिस्तानात व अर्धे (कमीच)  भारतात आहे! हा रस्ता आपल्याला लाहोर पासून पुढे पाकिस्तानातील मुख्य शहरे ओलांडून पुढे "काबुल" ला देखील नेतो !याच रस्त्यावून आपण लाहोर येथील शालीमार बागजवळ जातो व पुढे बादशाही मशिदी कडे जातो . ऐतिहासिक उल्लेख प्रमाणे हे मशीद एप्रिल १६७३ साली मोंगल राजा "औरंगजेबाने" बांधली आहे तसेच येथे १० लाख  जण एकत्र नमाज पढू शकतात म्हणजे याच्या भव्यतेची आपल्याला कल्पना आली असेल

क्रिकेट डिप्लोमसी




   

पाकिस्तानचा मायदेशातील भारता विरुद्धचा सर्वाधिक उच्चांक ( कसोटी ) ६९९-५ याच "गद्दाफी स्टेडीयम" वर आहे , त्यांचा पूर्व कर्णधार इंझमाम उल हक़ चा वैयक्तिक उच्चांक ( कसोटी) ३२९ हा देखील याच मैदानावर आहे न्यूझीलंड विरुद्ध! पाकिस्तानचा एकदिवसीय सामन्यातील नीचांक ७५ ( विरुद्ध श्रीलंका ) देखील येथेच आहे! भारत येथे १३-१७ जानेवारी  २००६ साली शेवटचा सामना खेळला , जो अनिर्णीत झाला , तसेच १३ फेब्रुवारी २००६ साली  शेवटचा एकदिवसीय सामना खेळला गेला ज्यात भारताने विजय साकारला. सामनावीर पुरस्कार मिळाला आपला सध्याचा कप्तान "महेंद्र सिंग धोनी ला " . या सामन्यात १ वाईट गोष्ट झाली ती म्हणजे आपला वंडरबॉय " सचिन तेंडूलकर" हा ९५ (१०४ चेंडू ) धावांवर बाद झाला ! त्याचे शतक ५ धावांनी हुकले ! असा आहे भारताच्या क्रिकेटचा संदर्भ आपण सध्या फिरत असलेल्या लाहोरमधील  "गद्दाफी स्टेडीयम" शी !!सध्या आपल्याला माहीतच आहे की पाकिस्तानचा संघ डिसेंबर २०१२ साली भारताच्या दौऱ्यावर येत आहे ! असो !



सांस्कृतिक राजधानी

                                  

लाहोर ही पाकिस्तानची सांस्कृतिक राजधानी आहे! येथील माणूस हा प्रचंड आळशी व तितकाच मेहनती ( विरोधाभास ! ) स्वभावाचा आहे ! कष्ट व आराम करण्याच्या दोन्ही वृत्त्या त्याच्यात आहे ! लाहोर मध्ये तसे फिरण्यासारखे खूप काही आहे.. वाघा बोर्डर वरून सरळ सरळ पुढे आलो की आपल्याला शहरात प्रवेश होतो. लाहोर येथील वस्तू संग्रालयात गणपती बुद्ध इत्यादी हिंदू देवीदेवतांच्या मुर्त्या आढळतात! तेथे ऋषी वाल्मिकी यांचे मंदिर देखील आहे जेथे अजूनही दर्शनाला गर्दी होते ! मुख्य म्हणजे शीख लोकांनी सुद्धा १६६८ ते १८४६ पर्यंत लाहोर व राज्यं केले , मुख्य म्हणजे महाराजा रणजीत सिंग याची तर लाहोर ही राजधानिच होती ! त्यांची समाधी सुद्धा लाहोर लाच आहे तसेच शीख धर्माची गुरुद्वारा डेरा साख़ब, गुरुद्वारा काना काछ, गुरुद्वारा शहीद गंज, जन्म उस्तान गुरु राम दास,  अश्या नावाची धार्मिक स्थळे देखील आहे. येथून आपण नंतर लाहोर चा किल्ला देखील पाहू शकतो जो "सम्राट अकबर " ने १५६०  साली बनवला . येथे देखील दिवाणे आम आणि  दिवाणे खास हा प्रकार आढळून येतो. येथील आलमगीर गेट मधून आपल्याला किल्ल्यात जावे लागते. किल्ल्याचं आत शिश महाल तसेच मोती महाल नावाच्या वस्तू आहेत! हा  सगळा किल्ला "युनेस्को" च्या यादीत आहे.

  
                  
   
येथे जहांगीर चा मकबरा पाहण्या सारखा आहे.. आपल्याला मोंगल साम्राज्याच्या इतिहासाची जाणीव करून देणारा आहे तसेच येथील ( मागे उल्लेख केल्या प्रमाणे) प्रसिद्ध जागा म्हणजे "शालीमार" उद्यान ! १६४१  साली शाहजान ने ही वस्तू बांधल्याचा उल्लेख आहे! नंतर अआपल्या पाहण्यात येते ती "हुजुरी बाग"  या ठिकाण बद्दल सांगण्या लायक असे आहे की कोहिनूर हिरा हस्तगत केल्याच्या आनंदात अफगाणी शासक "शाह शुजा" याने याची निर्मिती केली! आपण आता जवळ पास सगळा लाहोर फिरलो आहोत ! कमीत कमी "युनेस्को " च्या यादीत सामाविस्था झालेल्या बहुतांश जागा तर पहिल्या आहेत आता आराम करून जेवून रात्रीचे लाहोर पाहू !

                     

रात्रीची भटकंती 

रात्र झाली की आपल्याला खरी आठवण होते ती जेवणाची ! खरे पाहता येथील रस्त्यावरचे जेवण तर आहेच मस्त ( कारण बहुतांश जनतेवर पंजाब चा प्रभाव पडलेला दिसतो) . येथील लोक प्रमुक्ख्याने मतान पेक्षा चिकन खाताना आढळतात .. "निकोल्सन रोड" वर तर अशी अनेक दुकाने आपल्याला पहावयास मिळतील .. लाहोर मध्ये चिकन व त्याच्या सकट खिमा + कलेजी इत्यादींचे खमंग स्टोल आपल्याला रस्त्यावर दुतर्फा पहावयास मिळतात !  खरे पाहता लाहोर मधल्या रस्त्यांवर रात्री याच "चविष्ट" वासांचे साम्राज्य असते ( आता अधिक वर्णन करत नाही.. श्रावण चालू आहे ना ! ) म्हणजे आपण कल्पना करावी की जो "खाण्याचा" शौकीन असेल त्याचे पोट निश्चितच रात्री रिकामे राहणार नाही लाहोर मध्ये !

येथील वस्तीत रात्री झगमगत असतो विशेषतः ईद किवा रमजान महिन्यात विशेषकरून येथील बाजार हा पाहण्या सारखा असतो!!                
       
                                

निरोप !
भारतातील वाघा बोर्डर पासून सुरु झालेला आपला प्रवास आता संपतोय,,आज मी व तुम्ही आपण दोघांनी पाहिलेला व अनुभवलेला "लाहोर" माझ्या डोळ्यात साठवून आता राजा घेतोय! कारण आता रात्री झोप घेऊन आता आपल्याला कराची कडे कूच करायची आहे !
तेव्हा भेटूच !
 
 सफर  पाकिस्तानचा
                 


(कराची-इस्लामाबाद-रावळपिंडी-एबोटाबाद)

लाहोर नंतर आपला मुक्काम आहे कराची ला ! खरे तर इथल्या वातावरणात आणि मुंबईच्या वातावरणात काहीच म्हणजे काहीच फरक नाही आहे! पाकिस्तानची ही राजधानी पण होती.. परंतु नंतर ती रावळपिंडी व शेवटी इस्लामाबाद ला ( काश्मीर पासून जवळ असल्याने?) कायमस्वरूपी स्थलांतरित केली. आपण तेथे सुद्धा जाऊ ( आणि जमल्यास तेथून काहीच अंतरावर असलेल्या "एबोटाबाद" मध्ये पण ! )

                               


खरे तर कराचीला ऐतहासिक दृष्ट्या असे फारसे काही आढळे नाही आपल्याला.. तरीसुद्धा १ मजेची गोष्ट म्हणजे कराची शहर हे ( फाळणीपूर्वी) मुंबई च्या अधिकाराखला होते.. म्हणजेच येथील सगळे कामे मुंबईतून चालायची ! आणि १ आश्चर्याची गोष्ट म्हणजे कराचीचा कारभार हा तेव्हा पंजाबी - उर्दू - हिंदीतून नाही तर चक्क आपल्या शिवरायांच्या "मोडी" लिपी तून चालायचा ! तेथील सरकारी दफ्तरात अजूनसुद्धा अशी कितीतरी जुनी कागदपत्रे पडली असतील "मोडी" लिपी मध्ये !


तेथील जुन्या इमारती ( ब्रिटीशकालीन वैभव जपणाऱ्या ) अजूनही आहेत तश्याच आहेत ! आता आपण तेथे फिरलो तर आपल्याला पाकिस्तान मधील काही श्रीमंत लोकांच्या कोठी दिसून येतील ! रस्त्यावरून चालत चालत आपल्याला आता रस्त्याचं दुतर्फा दोन्ही बाजूस श्रीमंत लोकांचे बंगले तसेच " पॉश " इमारती सुद्धा दिसून येतील!

कराची हे पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे ( आपल्या मुंबई सारखी ) येथून होणारा व्यापार ( आणि दहशदवाद सुद्धा! ) पाकिस्तान साठी खूप महत्वाचा आहे. खरे पाहता पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आलेली आहे. अमेरिकेच्या ताकदीने ती सध्या पूर्णपणे उभी आहे तसेच सौदी अरेबिया येथील काही श्रीमंत लोकांच्या "दान धर्मा"मुळे. कराची चे बंदर हे व्यापार साठी खूप प्रसिद्ध आहे! तेथील अर्थव्यवस्थेचा काना असलेले हे शहर आहे! 

खरे पाहता कराची मधला सर्वात श्रीमंत लोकांचा कोणता रस्ता असेल तर तो तो "क्लिफ्टन एरिया".. तेथे राहणारे बहुतेक लोक हे "गर्भ श्रीमंत आहेत". खरे पाहता कराची मध्ये ऐतिहासिक दृष्ट्या काहीच पाहण्या सारखे नाही आहे पण कराची पाहिल्याशिवाय राहवत पण नाही म्हणूनच आपण ते पहिली ! लेखाच्या सुरवातीला मी मुद्दामूनच कराची चा उल्लेख हा मुंबई सारखाच केला होता कारण येथील वातावरण  हे मुंबई सारखेच आहे ( किंबहुना समुद्राजवळ असल्या कारणाने ). आपण लाहोर वरून विमान त्तालाने किवा बस ने कराची पर्यंत चा प्रवास करू शकता ! येथे रेल्वेने प्रवास केलेला चालत नाही . म्हणजे येथे रेल्वे ला थांबवून तेथील लोकांना लुटायची अतिशय जुनी सवय आहे म्हणून बस ने किवा विमानाने प्रवास केलेला कधीही चांगला!  आता आपण कराचीची अगदी धावत पळत भेट घेतली आहे तिथून आपल्याला जायचे आहे आता इस्लामाबाद ला! आपण आता पी. आय.ए. च्या विमानात बसून कराची ते इस्लामाबाद हे अंतर कापुयात!  
                                                                                     
                              


मुक्काम पोस्ट इस्लामाबाद 

पाकिस्तानच्या राजधानीत आपण आता आलो आहोत ! पाकिस्तान च्या राजकारणात हा पंजाबी लोकांचा प्रभाव तर नेहमीच जाणवतो. म्हणूनच किती प्रयत्न करून "इस्लामी" राष्ट्र तयार करून राष्ट्रीय भाषा म्हणून जरी "उर्दू" असली तरीसुद्धा पाकिस्तानात त्या त्या प्रांतात त्या त्या  प्रदेशातील स्थानिक भाषाच बोलली जाते. जसे कराची नजीक च्या प्रदेशात हे गुजराथी-मारवाडी सदृश भाषा बोलली जाते ( तेथून भारताची सीमा जवळ आहे ) . आता इस्लामाबाद मध्ये आपण येऊन पोहोचलो. सगळ्यात चंगली गोष्ट म्हणजे इस्लामाबाद मध्ये तुम्हाला हॉटेल ची कमतरता जाणवणार नाही. येथील बस स्टोप च्या जवळच अशी बरीच हॉटेल्स आहे जिथे आपण मुक्काम करू शकतो! आता आपण पाकिस्तानचं दारार्या खालच्या भागात आलो आहोत. पण तरी सुद्धा आपण येथे फिरताना आपल्याला १ गोष्ट जाणवते कि येथे  लष्कराच्या सामर्थ्य हे निवडून दिलेल्या सरकार पेक्षा जास्त आहे !
                       

इस्लामाबाद हे शहर आधीपासून मात्र मुळीच नव्हते. या शहराची मुद्दामून निर्मिती करण्यात आली आहे.फ्रेंच वास्तुकार ली कार्बूजियर याने या नगराची स्थापना करण्यास मोलाची भूमिका बजावली आहे! विशेष म्हणजे याच महोदयांनी भारतातील चंडीगड या शहराच्या निर्मितीत सुद्धा मोलाचा वाटा उचललेला म्हणूनच आपल्याला इस्लामाबाद व चंडीगड या २ शहरात साम्य दिसून आले तर काही नवल नाही ! २००९ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या  ६,७३,७६६ एवढी आहे ! शहरात प्रवेश केल्यापासून आपण पाकिस्तानची "संसद" पाहू शकतो जेथून जवळच प्रधानमंत्री निवास आहे! विशेषतः येथे उद्यानांची संख्या जास्त आहे येथील "फातिमा जिना " उद्यान सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे ! इस्लामाबाद ची ओळख म्हणून एका ठिकाणाला विसरून चालणार नाही ते म्हणजे "फैज़ल मस्जिद" ! अश्या प्रकारे आपण हा प्रदेश सुद्धा पाहिलात.. घाईघाईत का होईना पण आता आपण रावळपिंडीत सुद्धा १ चक्कर मारून येऊ! हे शहर साफ मात्र नाही आहे ! तेथे भारतीय चित्रपट सृष्टीतील कलाकारांबद्दल प्रचंड आकर्षण आहे ! तेथील बाजारात भारतात प्रदर्शित झालेल्या किवा प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या अनेक चित्रपटांचं संगीत  मिळते.. येथे आपल्या चित्रपटांच्या "पायरसी" चे प्रमाण मात्र जास्त आहे! येथे मुख्य प्रवास आपल्याला "बस" मधूनच करावयाचा आहे! पाकिस्तानात बस म्हणजेच सर्वात स्वस्त आणि मस्त असा वाहतुकीचा उपलब्ध मार्ग आहे ! येथे पाकिस्तानची राजधानी असूनसुद्धा येथील बहुतेक भाग हा ग्रामीण आहे! आता माझी नजर वळली आहे येथून काही अंतरावरच दूर असलेल्या " एबोटाबाद" या शहर कडे !




इस्लामाबाद ते "एबोटाबाद"
                           


खरे तर हे शहर "जगभरात" चर्चेत आले जेव्हा आंतरराष्ट्रीय आतंकवादी ओसामा बिन लादेन हा येथील एका प्रचंड आवाराच्या बंगल्यात अमेरिकेच्या "नेव्ही सील कमांडो " नी केलेल्या कारवाईत ठार झाला! तेव्हा पासून हे शहर ( विशेषतः गुगल अर्थ वर ) अतिशय चर्चेत आले होते ! खरे तर हे शहर १ थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे ( परंतु पाकिस्तानची बर्यापैकी मोठी असणारी लष्करी छावणी देखील याच ठिकाणी आहे ) विशेषतः पाकिस्तानचे लष्कर याच भागात असते , येथे अनेक निवृत्त अधिकाऱ्यांचे बंडले देखील आहे.एबोटाबाद या शहरात जानेवारीच्य सुमारास हिमवृष्टी होते . तसेच येथील सर्वात उंच जागेचे नाव भारतातील एका शहराचे आहे ते म्हणजे " सिमला टेकडी" . येथून आपल्याला सर्व एबोटाबाद दिसत आहे उंच वरून !  "एबोटाबाद"या शहराची स्थापना ब्रिटीश अधिकारी मेजर जेम्स एबट याने जानेवारी १८५३ साली केली! तसेच त्याने तेथे ब्रिटीश सैन्याची छावणी उभारली , सध्या तिथे पाकिस्तानची स्वतःचं सैन्याची छावणी आहे. येथून काही अंतरावरच आहे ओसामा बिन लादेन ची ती हवेली, जिथे तो १ मे २०११ ला चकमकीत ठार झाला! छायाचित्रात दाखवलेल्या हवेलीत ओसमा बिन लादेन याला ठार मारण्यात आलेले.  इतकी उंच हवेली या भागात आणखीन कोणाचीच नव्हती, तसेच येथून कचरा कधी घराबाहेर टाकला जायचा नाही तो जाळला जायचा तसेच इतक्या मोठा हवेलीत तेलीफोने किवा इंटरनेट कनेक्शन नव्हते , म्हणूनच अमेरिकेच्या एजंट न या हवेली वर शक झाला! व पुढचा इतिहास आपल्याला माहितच आहे!
                             
   
निरोप !

आपण खरेच आज पाकिस्तान मधून खूप काही बघितले आहे! आता माझ्याबरोबर आपणही नक्कीच थकलेले असणार! आता सध्या आराम करून आपण उद्या पाकिस्तान मधल्या शेवटच्या दिवसाची तयारी करूया! कारण उद्या आपण ज्या जागेवर जाणार आहोत ते जागा आता आपण पाहिलेल्या शहरांसारखी मुळीच नाही ! अनेक धोके , क्षणा क्षणाला मृत्यू ची जाणीव तसेच जीव हातात घेऊन आता उद्या आपण प्रवासाला निघणार आहोत! ही जागा म्हणजे इस्लामाबाद पासून १५० किमी अंतरावर असलेले १ शहर , वायव्य सरहद्द प्रांतातले प्रमुख शहर " पेशावर " !
 
 सफर पाकिस्तानचा !



आज आपल्या प्रवासाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे !! आणि माझ्या मते हा सर्वात कठीण आणि अवघड असा प्रवास आहे! काल आपण एबोटाबाद वरून इस्लामाबाद येथे मुक्काम केला आहे आणि आज आपण इस्लामाबाद पासून १५० किमी अंतरावर असलेल्या पेशावरला जाऊ ! खरे तर माझ्या मनात "खासकरून" या प्रदेश बद्दल खूप म्हणजे खूप उत्सुकता आहे! आणि सर्वाधिक उत्सुकता आहे पेशावर ला पोचून सर्वात आधी ती "खैबरखिंड" पाहण्याची! कारण तिथूनच मुघल भारतात आलेले! पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांना जोडणारी एकमेव जागा म्हणजे हे खैबरखिंड! खरे पाहता भारतीयांना येथे जाण्यास मज्जाव केला जातो.. १ किस्सा जरूर येथे नमूद करावासा वाटतो, भारताचा क्रिकेट संघ हा पाकिस्तानच्या दौर्यावर गेलेला तेव्हा आपल्या वंडरबॉय सचिन तेंडूलकरने ही "खैबरखिंड" पाहण्याची इच्छा व्यक्त केलेली परंतु सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानी सरकारकडून या साठी मंजुरी मिळाली नाही! असो ! आपल्याला आज पहावयास मिळते का ते आधी पाहू !

                                 

या साठी आपण इस्लामाबाद येथील बस डेपो कडे आधी कूच करू आणि तेथून मग पेशावर कडे जायला प्रस्थान करू ! बस सुरु झाल्यावर आपण दोन्ही बाजूनी पहिले तर आपल्याला दिसून येईल की रस्ता हा चौपदरी आहे  मग दुपदरी आणि नंतर अतिशय खराब होत होत जातो ! परंतु येथे पोचावयास आपल्याजवळ आणखीन कोणतेच दुसरे साधन नाही ! त्यामुळे आपल्याला बस नेच पुढे पुढे जावे लागणार! खरे तर १५० किमी चा प्रवास खूप मोठा आहे. तोवर आपल्याला १ गोष्ट सांगतो म्हणजे रस्त्यातला प्रवास हा अतिशय सोपा होऊन जाईल! कसे आहे गप्पा मारत मारत प्रवासाची लांबी कमी होते असे म्हणतात !  पेशावर हे प्रसिद्ध आहे तेथील "पठाण" जमाती साठी आणि येथील सर्वात लोकप्रिय व्यक्ती जर कोणी असेल तर ते भारताचे ( व पाकिस्तानचे ) नेते "खान अब्दुल गफारखान" उर्फ "सरहद गांधी" !

                                       

"सरहद गांधी" ! 

होय बरोबर ऐकलेत आपण , खान अब्दुल गफारखान यांना "सरहद्द गांधी:" असेच म्हंटले जायचे! इंग्रज देखील त्यांना किंग खान ( शाहरुख खान च्या आधीचे, आणि पहिले  व अस्सल किंग खान!)  असे संबोधत असत ! त्यांचा जन्म १८९० साली पेशावरलाच  झाला ( नेमकी जन्मतारीख उपलब्ध नाही ) . खान अब्दुल गफार खान हे आधी स्वतंत्र  धर्मनिरपेक्ष भारताच्या  पक्षातले होते, त्यांनी वायव्य सरहद्ध प्रांतात ( म्हणजे पेशावर नजीक अफगाणिस्तान च्या परिसरात ) भारताला स्वातंत्र्य करण्याचे आंदोलन सुरु ठेवलेले परंतु शुद्ध "अहिंसक" मार्गाने . म्हणूनच यासाठी त्यांनी १९२० साली खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली! ही संघटना अहिंसक तत्वांवर चालणारी होती! गांधीजींचे ते पक्के दोस्त होते ! विशेषतः ते दिसायला पण गांधीजी सारखेच होते .. त्याला जर आपण लांबून पहिले तर ते गांधीजीच दिसत असत! त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय उदार होते, तसेच भारदस्त ही . त्यांची शरीर बळकट होते आणि उंची ६ फुटांहून अधिक म्हणजेच ते पठाण शोभत होते ! एकदा त्यांना सरकार ने अटक केली परंतु त्यांच्या हातात हातकडी घालण्यासाठी त्यांच्या हाताच्या  मापाच्या हातकड्याच नव्हत्या ब्रिटीश सरकारकडे! गोरेपान असलेले धडधाकट गफारखान यांचे हात त्या छोट्या हातकड्यांमुळे लालेलाल झाले त्यामुळे त्यांनी अटक झाल्यानंतरही तेथून हलले नाही! तेव्हा ब्रिटीश सरकारतर्फे त्यांच्या साठी खास "बग्गी" ची व्यवस्था करण्यात आली तेव्हा सन्माने त्यांना बग्गीतून तुरुंगात नेण्यात आले!विशेष म्हणजे पेशावर भागात ( वायव्य सरहद्द प्रांत ) येथे कोंग्रेस चे सरकार आले ते यांच्या मुळेच ! परंतु दुर्दैवाने फाळणी नंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी ( शहरात ) पेशावर येथे जावे लागले! तेथे गेल्यावर त्यांनी पाकिस्तान कडे आपल्या स्वतंत्र पठाणी अनुयायांसाठी स्वतंत्र पख्तुनिस्तानाची मागणी आजन्म केली! खरे पाहता ते भारत व पाकिस्ताना या दोन्ही देशांचे सुपुत्र होते!

नंतर ते १९७० साली भारतात आले व देशभर फिरले भारतातील लोकांनी त्यांना "थैली" अर्पण केली (पुरस्कार) ! तथापि त्यांनी भारत सरकारकडे पाकिस्तान सरकार हे त्यांना हीन  दर्जाची वागणूक देत असल्याची तक्रार केली! या दोन्ही देशाच्या महान सुपुत्राकडे  पाकिस्तानी सरकारने मात्र कायम कानाडोळाच केला, परंतु भारत सरकारने याची दाखल घेत त्यांना भारताचा "सर्वोच्च" नागरी सन्मान "भारतरत्न" प्रदान केला १९८७ साली ! ते  भारतरत्न पुरस्कार मिळालेले पहिले अभारतीय आहेत. खरेच अश्या महान नेत्याच्या हा गौरव यथायोग्य होता! पुढच्याच वर्षी त्यांना पाकिस्तान सरकारने त्यांच्या राहत्या घरात नजरबंद केले, व पुढे त्याच वर्षी २० जानेवारी १९८८ साली त्यांची प्राणज्योत मावळली! त्यांच्या इच्छे नुसार अफगाणिस्तान येथील जलालाबाद येथे त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. विशेष म्हणजे तेव्हाचे आपले पंतप्रधान "राजीव गांधी " हे देखील त्यांच्या अंतिम संस्कारास उपस्थित होते! "सरहद्द गांधी" यांची ही कहाणी खरेच मनाला चटका लाऊन जाते! अरे.. बोलता बोलता आपण पेशावर ला पोचलो सुद्धा! खरेच गप्पा मारता मारता प्रवास कसा संपतो ते समजत पण नाही!


                        

मुक्काम पोस्ट पेशावर!
                   

पेशावरला पोहोचताच माझ्या स्मृती जाग्या झाल्या की या प्रदेशावर आपल्या मराठ्यांचे सुद्धा १ वर्ष राज्य होते , ८ मे १७५८ ला ला झालेल्या लढाईत आपल्या मराठ्यांनी विजय मिळवला आणि पठाण आणि अफघाण लोकांच्या प्रदेशात मराठ्यांचा भगवा शानने फडकत होता ! येथे आपण बस डेपो च्या पुढे आलो की लागतात इमारती त्या तश्या जुन्याच आहेत खरे पाहता येथील प्रदेशाचा विकास झाला नाही आहे मुखत्वे या प्रदेशात शिक्षणाचा आभाव आहे , शिक्षणाला महत्व नसल्याने येथील लोक हे गरीब आहे (पण मनाने तितकेच मोठे देखील आहेत !) येथील लोकांच्या मनात भारतीय लोकांबद्दल सदैव कुतूहल सहानुभूती तसेच प्रेम ( "सरहद्द गांधींमुळे ?) आहे ! म्हणून पठाणी माणूस तसा मनाचा राजाच म्हणायला हवा! आता "सरहद्द गांधींची " आठवण काढली आहे तर त्यांच्या खाणाखुणा शोधायला आपण आधी निघू! परंतु दुर्दैवाने आता त्यांच्या खाणाखुणा फारश्या राहिल्या नाही आहेत पेशावर मध्ये  ( पाकिस्तान च्या प्रभावामुळे ?) , पण मला त्यांच्या नावाचा १ चौक मात्र दिसला आहे आणि सध्याच्या पेशावर मध्ये त्यांची स्मृती जपणारे बहुदा हेच स्मारक आहे. परंतु त्याच्यावर सरहद्द गांधी असे लिहिले नाही आहे तर फ्रंटीयर लीडर  (म्हणजे "सरहद्द नेते ") असे लिहिले आहे! तरीसुद्धा खान अब्दुल गफारखान उर्फ सरहद्द गांधी या नावाचा दबदबा येथे मात्र आजही जाणवतो ! येथे आपल्या इतिहासाशी संबंधित वस्तू म्हणजे "महाबत"खानाचे थडगे. हा महाबतखान जहांगीर बादशाहच्या सैन्यात होता त्याने अंतिम श्वास येथे घेतला आता येथे १ मस्जिद पण आहे! थोड्याच अंतरावर पेशावारचे वास्तुसंग्रालय आहे

                              

त्यात पुरातन वस्तूंचा संग्रह पहावयास मिळतो! पेशावर मधील इमारतींवर मुघल तसेच पश्तू ( अफघाणी) वास्तुशैली चा प्रभाव आपल्याला दिसतो! येथे सुद्धा नवीन पेशावर व जुने पेशावर असे २ भाग आहेत. येथील नमक मंडी हा भाग प्रसिद्ध आहे तेथील बाजारपेठे साठी ! अफगाणिस्तान सरहद्द जवळ असल्याने तेथील बहुतेक माल हा येथील बाजारपेठेत उपलब्ध होते विशेषतः खजूर तसेच सुका मेवा मुबलक प्रमाणात येथे आढळतो. येथे शिक्षणाची फारशी काही "चांगली" सोय नाही आहे तरीसुद्धा इस्लामिया विद्यापीठ येथील युवक\युवतीं साठी गुरुकुल चे काम करत आहे! बाजारपेठेत फिरत असताना आपण पठाणी माणूस हा किती मस्तमौला आणि दिलदार असतो याची ख्याती तर ऐकली व आता पहिली आहे ! परंतु आता वेळ खरेच कमी आहे आपल्याला निघायचे आहे खैबरखिंड बघायला! हा भाग म्हणजे "खतरे पे खतरे" आहेत! कारण याच भागात आहेत अफगाणिस्तानी लोकांचे रेफ्युजी कॅम्प !
                               

खैबरखिंड !                                 

"भारतावर आक्रमण करायचे आहे" हा प्रश्न मुघल \पश्तू  बादशहांना पडायचा तेव्हा ते खैबरखिंडी मार्गे भारतात ( आताचा पाकिस्तान) यायचे! बाबर ने सर्वात आधी ही खिंड पार करून जेव्हा भारतात पाय ठेवले तेव्हा त्याने लगेच पहिले काम केले ते म्हणजे पेशावरला कायमचा "किल्ला" बांधला तो म्हणजे पेशावरचा किल्ला ( आपल्याकडे पहावयास तेव्हढा वेळ नाही आहे! क्षमस्व ) येथून पुढे काही अंतरावरच आहे खैबर खिंड! सध्या याच्या प्रवेशद्वाराचे नुतनीकरण करण्यात आले आहे! संपूर्ण नागमोडी असणारी ही खैबरखिंड पार केली की आपण एकतर पाकिस्तान किवा अफगाणिस्तान येथे येऊन पोहोचतो! पहिल्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे हा सुद्धा "जी. टी. रोड" चा १ भाग आहे! आता मात्र येथे अफगाणिस्तान शरणार्थी कॅम्प आहे ! जिथे पहा तिथे मुजाहीर लोक आहेत! टोयोटा गाडी ला "जीप" बनवून आणि हातात अत्याधुनिक हत्यारे घेऊन रस्त्यावर फिरताना आपल्याला सहज सापडतात! येथे अश्या प्रकारचे आतंकवादी कॅम्प तर सर्रास पहावयास मिळतात! जर आपल्याला कोणी थांबवून आपली चौकशी केली तर झाले काम तमाम! कारण या भागात पाकिस्तान सरकारचे पण काही "फारसे" चालत नाही ! येथील "धर्मप्रेमी" लोक आपल्या आपल्या कायद्यानुसार येथील कारभार चालवतात! म्हणून शक्य ते डोळ्यात भरून आपण खैबरखिंड पाहून निघुयात! तरी जाता जाता त्या भागाचे सौंदर्य आपले लक्ष वेधते! काय म्हणत असेल ही खैबरखिंड ? हिंदुस्थानात जेव्हा जेव्हा परकीय आक्रमण झाले तेव्हा तेव्हा ची साक्षीदार असलेली ही खैबरखिंड आता आपल्या नजरेपासून हळू हळू लांब लांब होत चाललेली! खरेच आपल्या सारख्या भारतीयांना खैबरखिंड पाहणे खूप म्हणजे खूप दुर्मिळ आहे! कारण हा भाग तसा फारसा सुरक्षित नाही आहे! संध्याकाळ व्हायच्या आत आता आपल्याला पेशावर बस स्टोप ला पोहोचणे गरजेचे आहे! आपली संध्याकाळची "इस्लामाबाद" साठीची बस आहे! तेथून आपण इस्लामाबाद विमानतळावरून मुंबई साठी निघणार आहोत!
                           

शेवट ? नव्हे सुरवात !

आता आपण बस मध्ये बसून माझ्या सारखाच हा विचार करत आसल की हे ३ दिवस किती मस्त गेले, घाईघाईत का होईना पण आपण अर्ध्याहून अधिक पाकिस्तान बघितला! आणि सर्वात जास्त म्हणजे आपले आभर की आपणही मला माझ्या या "भटकंतीत" साथ दिलीत!  तुमच्या आमच्या सारख्या भटक्या लोकांना प्रवास म्हंटले की अंगात एक वेगळीच शक्ती संचारते! म्हणून "पाकिस्तान" का होईना आपण १ देश फिरलो याचे समाधान माझ्या व तुमच्या चेहऱ्यावर आहे! उद्या सकाळपर्यंत आपण मुंबईत पोचू सुद्धा ! कसा वाटला हा एका शेजारील देशाचा प्रवास ते कळवायला विसरू नका !  पुन्हा भेटूयात एका नव्या देशाच्या \प्रदेशाच्या भटकंतीत !
.

.
जाता जाता आपल्या मागील २ दिवसांच्या आठवणी !
पाकिस्ताननामा-१  - लाहोर (दिवस पहिला)

पाकिस्ताननामा २ - कराची -इस्लामाबाद-रावळपिंडी-एबोटाबाद (दिवस दुसरा)


 
 
http://ninadgaikwad.blogspot.com/search?updated-max=2012-10-12T02:09:00-07:00&max-results=3&start=3&by-date=false

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...