चिरंतन प्रेमाचे प्रतिक ताज महल,
सौंदर्याचे प्रतिक ताज महल,
मानवनिर्मित सर्वश्रेष्ठ कलाकृती ताज महल,
जगातील सात आश्चर्यापैकी एक ताज महल,
प्रेमात पडल्यावर असे काहीबाही विचार मनात येतात. काही वर्षांपुर्वी जेव्हा मी हिच्या प्रेमात पडलो
होतो (डोक्यावर, असे लोक सांगतात. मला नीटसे आठवत नाही) तेव्हा मलाही असे
काहिसे वाटायचे. त्यामुळे राजस्थानच्या ट्रिप वरुन परत येता येता ताज महल
पहायचे ठरविले.
ताज महल यमुनेच्या तिरावर स्थित आहे. ताज महाल मोगल सम्राट शहाजहांन ने
त्याच्या आवडत्या राणी मुमताझ महल ची आठवण म्हणून बांधला. (मी का ही बडबड
करतो आहे. सर्वांना माहित आहे हे) ह्याचे बांधकाम १६३२ ला सुरू झाले आणी
१६५३ ला पुर्ण झाले. हा पुर्णपणे संगमरवरात बनला असुन ह्यासाठी लागणारा दगड
राजस्थानातुन आणण्यात आला होता.
टिप १ : शुक्रवारी ताज महल बंद असतो. दिल्लीतील कार वाले ही माहीती तुम्हाला सांगत नाहीत कारण त्यांचे भाडे बुडते.
टिप २ : ताज महल बघुन बाहेर आल्यावर खुप जणांना ताज महल ची प्रतिकृती
घेण्याचा मोह अनावर होतो. ईथे जर का तुम्ही दुकानात शिरुन भाव करायला
सुरुवात केलीत आणी जर का तुम्ही मागत असलेला भाव दुकानदाराला पटला नाही तर
त्याच दुकानदाराचा एखादा लहान मुलगा तुम्हाला मागुन येऊन धक्का मारतो आणी
ती प्रतिकृती तुमच्या हातुन खाली पडुन फुटते आणी झक मारत त्याची दुकानदार
मागेल ती किंमत तुम्हाला द्यावी लागते. त्यामुळे"खाया पिया कुछ नही, ग्लास
तोडा बारा आना" अशी तुमची गत होते. तेव्हा सावधान.
प्रवेशद्वार
-
-
-
ताज महल
-
-
-
एक प्रयत्न
-
-
-

-
-
-

-
-
-

-
-
-

-
-
-
संगमरवराची जाळी
-
-
-

-
-
-
ताज महल ची मागील बाजू
-
-
-

-
-
-
मिनाराचा क्लोज अप
-
-
-

-
-
-

-
-
-

-
-
-
ताज महलचे प्रवेशद्वार, आतल्या बाजूने...
-
-
-
यमुना

-
-
-
आग्र्याचा किल्ला:
हा किल्ला "लाल किल्ला" म्हणून पण ओळखला जातो. हा भुईकोट किल्ला आहे. हा
ताज महल पासुन २.५ किमी लांब आहे. हा किल्ला ९४ एकरांवर बनलेला असुन
तटबंदिची ऊंची ७० फूट आहे. हा किल्ला लाल दगडापासुन (Red Sandstone) बनलेला
आहे. ही एके काळी हिंदुस्तानाची राजधानी होती. हुमायुन, अकबर, जहांगीर,
शाह जहांन आणी औरंगजेबाने येथे राहुन हिंदुस्तानावर राज्य केले.
प्रवेशद्वार
-
-
-

-
-
-

-
-
-
प्रवेशद्वाराचा पॅनोरमा
-
-
-
-
-
-

-
-
-

-
-
-

-
-
-

-
-
-

-
-
-

-
-
-

-
-
-

-
-
-

-
-
-

-
-
-

-
-
-
किल्ल्यावरून दिसणारा यमुनेच्या तिरावरील ताज महल
-
-
-
सिकंदरा:
सिकंदरा येथे अकबराचे थडगे आहे. सिकंदरा आग्र्यापासुन ६ किमी वर आहे.
ह्याचे बांधकाम अकबराने ईसवीसन १६०० मध्ये सुरु केले आणी अकबराचा मुलगा
जहांगीर ह्याने ते १६१३ मध्ये पुर्ण केले.

-
-
-

-
-
-

-
-
-
ईस्माइल प्लिज... 

-
दिल्ली-आग्रा प्रवासात ढाब्यावर मोल्-भाव करुनच माल घ्यावा- कंडक्टर ने
दिलेली सुचना. मी रोटी, पराठा, पाणी बाटली ची किंमत विचारली, पण एक छोटी
वाटी दही कितीला? हे विचारायचे विसरलो. त्याची किंमत सर्वात जास्त लावली
म्हणे यु. पी. त दही टंचाई आहे! मथुरे शेजारी 
बस ने गेलात, तर बसवाला ढाब्यावर दोन तास अन ताजमहल ला ४५ मिनिटे थांबवतो फक्त. खाजगी गाडी नेणे उत्तम.
बसवाला एका 'राजस्थली' एम्पोरीयम समोर गाडी नेतो. या राजस्थली चा
राजस्थान सरकारच्या 'राजस्थली' शी संबंध नाही.(सरफरोश वाले!:) ) मला हे
आतील एका सेल्स गर्ल शी बोलताना लक्षात आले, अन मग आम्ही खरेदी थोडक्यात
उरकली. मोठ्या वस्तु असतील तर ५०% अॅडव्हान्स द्या अन मग वस्तु कुरियर ने
पाठवु मग्च ५०% नंतर व्हीपीपी ने द्या, असे सांगितले जाते. त्यावर विश्वास
ठेवु नका. ही ही माहिती एका सेल्स गर्ल चीच! (मी तिला फक्त ह्या दुकानाचा
राजस्थान सरकार च्या-राजस्थली शी काय संबंध एवढेच विचारले, ती हसली, अन मग
हे सगळे सांगितले.)
_____
ताज अप्रतीम आहे, पण ज्या प्रदेशात आहे, तो कु-वर्णनीय आहे!
प्रवासात खुप काळजी घ्या.
हा घ्या पेठा 

या ताजमहलाचे आणखीण एक वैशिष्ट्य म्हणजे महलाच्या मुख्य दरवाजावर (अथवा लागून असलेली) जी काही उर्दूतील कलाकुसर (उर्दूतील काही लिखाण) आहे ती खालपासून वर पर्यंत एकाच साइजची दिसते. कारण नक्षीकाम करताना कलाकारांनी (त्यांना कामगार का म्हणायचे?) या कलाकुसरीच्या अक्षरांचा आकार खाली सगळ्यात कमी व मग वरपर्यंत वाढवत सर्वात वर सर्वात मोठा आकार ठेवलाय. पण पाहताना मात्र हे या अक्षरांच्या आकारातील फरक अजिबात कळत नाही.
आणखीन एक मुख्य घुमटाच्या बाजूचे चार खांब (मिनार) हे अंशतः बाहेर झुकले आहेत, यामुळे या घुमटाला आधार मिळतो व भूकंपात पण वास्तू टिकून राहू शकते.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.