Saturday, December 12, 2020

पंजाब

 

थोडीसी धूल मेरी, धरती की मेरे वतन की,
थोडीसी खुशबु बोहराईसी मस्त पवन की,
थोडीसी ढूंढने वाली धक-धक धक-धक धक-धक सांसे
जिन मे हो जुनूं जुनूं वोह बूंदे लाल लहू की...

पंजाब म्हटले मला ह्या गाणाच्या ओळी आठवतात. पंजाब म्हटले की आठवतात गुरु नानक, शहिद भगत सिंग, शहिद उधम सिंग, लाला लजपतराय, हिर रांझा...
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वात जास्त क्रांतिकारक पंजाब, महाराष्ट्र आणी बंगाल ह्या तीन राज्यांनी दिले.
भारतीय पायदळातील सर्वात कडव्या मानल्या गेलेल्या तीन रेजिमेंटस् मधील सिख रेजिमेंट ही एक. भारतावरील बहुतेक सर्व आक्रमणे ही उत्तरेकडून झाली. त्याचा सर्वात मोठा परिणाम ईथल्या लोकांवर झाला. फाळणीची झळ ही पंजाब आणी पश्चिम बंगाल ह्या राज्यांना सर्वात जास्त बसली. त्यामूळे ईथल्या लोकांचा पिंडच मूळी थोडासा आक्रमक बनला. पण जेव्हढे पंजाबी देहाने विशाल तेव्हढेच ह्रदयाने ही विशाल. अशा या पंजाबला भेट देण्याचा योग मी दिल्लीत असताना आला.

रात्रिची रेल्वे पकडून सकाळी अमृतसर ला पोहोचलो. ऑक्टोबर चा महिना होता आणी थंडीची सुरुवात होती. सकाळी फ्रेश होण्यासाठी म्हणून हॉटेल घेतले व आवरून बाहेर पडलो. ईथे शहर फिरवायला आणी वाघा बॉर्डर दाखवायला मोठ्या ऑटो रिक्षा (५-६ सीटर) पूर्ण दिवस मिळतात. हे रिक्षा वाले ३०० ते ५०० रुपये घेतात. तशी एक रिक्षा घेतली. हे शहर तसे स्वस्त आहे. अमृतसर ला गेलात तर Brother's Dhabaa मध्ये नक्की जा. ह्यांच्या शहरात बर्‍याच शाखा आहेत. ह्याला "बडे भाई का ढाबा" किंवा""प्रा दा ढाबा" असेही म्हणतात. ईथे अस्सल पंजाबी नाश्ता आणी जेवण मिळते. नाश्ता करून अमृतसर शहर पहायला बाहेर पडलो. रिक्षावाल्याने आधी एक दोन दुसरी मंदीरे दाखविली. छान होती. तिथुन सुवर्णमंदिर पहायला गेलो.

सुवर्णमंदिर :
सुवर्णमंदिराचा परीसर अतिशय स्वच्छ आहे. ईथे तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी कोणीही पैसे मागत नाही. कोणी हार वाले नाहीत, नारळ वाले नाहीत , प्रसाद वाले नाहित, एक्स्ट्रा पैसे देऊन दर्शन लौकर करुन देतो म्हणून लूटणारे नाहीत. पादत्राणे सांभाळणारे लोक सुध्धा अतिशय स्वच्छ निटनेटके आणी चांगल्या घरातले वाटत होते. हे लोक फक्त पादत्राणे सांभाळत नाहीत तर पुसुन, पॉलिश करून स्वच्छ करुन देतात. हे सर्व पाहुन आपल्या ईथला पंढरपुर किंवा शिर्डी ला चालणारा प्रकार आठवला. पादत्राणे देऊन पाय धूवून मंदिराकडे निघालो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एव्हढे मोठे आणी प्रसिध्ध मंदिर असूनही कुठल्याही प्रकरची तपासणी होत नव्हती. फक्त मेटल डिटेक्टर्स लावले होते. मंदिर एका तलावाच्या मध्य भागी आहे. मंदिराचा पहिल्या मजल्याचा बाहेरिल भाग सोन्याच्या पत्र्याने मढविलेला आहे. आतमध्ये गुरु ग्रंथ साहीब चा अखंडपाठ सुरु असतो. वरच्या मजल्यावर बसून तुम्ही तो ऐकू शकता. टेरेस वरून सुवर्णमंदिराच्या परीसराचे दर्शन होते. ईथे तलावात तुम्ही पवित्र स्नान करू शकता. सुवर्णमंदिर रात्रिही रोषणाईमध्ये फार छान दिसते.
मंदिराच्या बाहेर छान तलवारी, खंडा, कृपाण ईत्यादी भेटवस्तु मिळतात.

टिप : ह्या ट्रिपला माझा स्वत: चा कॅमेरा बरोबर नसल्याने प्रकाशचित्रे एव्हडी चांगली नाही आली आहेत.

--
--
--

--
--
--

जालियनवाला बाग :
जालियनवाला बाग सुवर्णमंदिराच्या अगदी जवळच आहे.
ईथे १३ एप्रिल १९१९ साली जनरल डायर ह्या ईंग्लिश अधिकार्‍याने सभेसाठी जमलेल्या नि:शस्त्र, निष्पाप जमावावर गोळीबार करून ३७९ बळी घेतले. अनाधिकृतपणे हाच आकडा १५२६ असा आहे. ईथल्या भिंतींवर गोळीबाराच्या खूणा आपल्याला स्पष्टपणे दिसतात.
ह्या बागेत बळी गेलेल्यांचे एक स्मारक देखिल आहे.

गोळीबाराच्या खूणा

--
--
--
गोळीबारात बळी गेलेल्यांचे स्मारक

--
--
--

वाघा बॉर्डर :
वाघा बॉर्डर अमृतसर पासुन ३० किमी अंतरावर आहे. जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला पंजाबमधील समृद्ध शेती लागते. वाघा बॉर्डर ला भारत - पाकिस्तान सिमेवर रोज संध्याकाळी "रिट्रिट सेरेमनी" हा कार्यक्रम चालतो. त्यात दोन्ही राष्ट्रांचे ध्वज सुर्यास्ताच्या वेळेला खाली ऊतरविले जातात, भारत - पाकिस्तान यांच्या रेंजर्स चे शक्ति प्रदर्शन होते, एकमेकांना चिथावणे असे कार्यक्रम चालतात.
ह्या कार्यक्रमाची वेळ सुर्यास्तानुसार बदलत असते. ईथे गर्दिही खूप असते म्हणून सुर्यास्ताच्या कमीत कमी दोन तास आधी तरी पोहोचावे. तासभर आधी रांगेतुन जवान तुम्हाला कडक तपासणी करून सिमेपाशी सोडतात. ईथे कार्यक्रम बघायला स्टँडस् केले आहेत. ईथे सिमेच्या मुख्य गेटपाशी फुल्ल जल्लोश सुरू असतो. लोक नाचत असतात, गात असतात, ध्वज घेऊन धावत असतात. मोठ्याने देशभक्तिपर गीते लावलेली असतात. लोकांचा ऊत्साह, जोश अफलातुन आणी बघण्यासारखा असतो.


--
--
--

वाघा बॉर्डर

--
--
--

पाकीस्तान

--
--
--


--
--
--

भारतीयांचा उत्साह, जल्लोष...

--
--
--


--
--
--


--
--
--

सोहळा पहाण्यासाठी झालेली भारतीयांची गर्दी

--
--
--


--
--
--


--
--
--


--
--
--

पाकीस्तानातील रीकामे स्टँड्स आणी उत्साहाने प्रवेशद्वारासमोर तिरंगा नाचविणारे भारतीय...

--
--
--

रीट्रीट सेरेमनी

--
--
--

स्वर्णजयंती द्वार

--
--
--

सुवर्णमंदिर रात्री...


अमृतसर 

 अमृतसर म्हणताच डोळ्यापुढे येते ते जलियाँवाला बाग, सुवर्णमंदिर आणि अटारी सरहद्द.

अमृतसरला मध्ये भटकंतीत अग्रक्रम अर्थातच जलियाँवाला बागेचा.
j1

j2

जनरल डायरच्या हत्यारी पलटणी या निमुळत्या बोळातुन आत शिरल्या.

j3

जिथे फुलांच्या कुंड्या ठेवल्या आहेत तिथेच बहुधा फौजा पवित्रा घेउन सज्ज झाल्या असाव्यात

j4

समोरचे विस्तिर्ण उद्यान दिसत आहे जिथे सभेला २०००० लोक जमले होते

j5

या जागेवरुन डायरच्या हुकुमानुसार बेछुट गोळीबार केला गेला

j6

नृशंस गोळीबाराची सजीव प्रतिके

j7
j8

अंदाधुंद गोळीबाराच्या खुणा.

j9
j10
j11
j12
j14
j15
j16
j17
j18
j19
j20
j21

गोळीबारातुन जीव वाचवण्यासाठी अनेकांनी कोपर्‍यातल्या विहीरीत उड्या घेतल्या, अनेक जण अनवधानाने त्या जमिनीलगतच असलेल्या विहीरीत पडले असतील. विहीरीतून १२० मृतदेह काढले गेले.

j23
j24
j25

मृतात्म्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेले स्मारक

j26
j27

दिनांक १३ एप्रिल १९६१ रोजी ही अमरज्योत तेवू लागली

j28
j29

प्रेक्षादालनात लावलेले भीषण संहाराचे तैलचित्र.

j30

या नरसंहाराचा प्रतिशोध घेणार्‍या पंजाब शार्दूल हुतात्मा उधमसिंग यांचे चित्र.
j31

इथे एक छोटेसे संग्रहालय आहे ज्यात अनेक चित्रे, लेखन वृत्तांत वगैरे आहे, हुतात्मा उधमसिंग यांचा रक्षाकलशही आहे. मात्र इथे चित्रणास मनाई आहे.

 सुवर्णमंदीर

 घंटाघर चौक प्रवेशद्वार. जालियांवाला बागेपासुन या मार्गाने अगदी ५ मिनिटात आपण या द्वाराशी येउन ठेपतो. डाव्या अंगाला पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था आहे तर पुढे प्रवेशद्वारजवळ सामान सुमान ठेवायचा कक्ष आहे. प्रवेशद्वारासमोरचा परिसर विस्तिर्ण आहे. प्रवेशद्वारासमोरच अगदी उथळ म्हणजे केवळ पाऊल बुडेल अशी कुंडे आहेत. त्यात पाय धुवायचे आणि मग मंदिरात प्रवेश करायचा. प्रवेशद्वाराचे रक्षक हे येणार्‍या प्रत्येकावर दोन गोष्टींसाठी नजर ठेवुन असतात - मस्तक झाकलेले असणे आणि पाय धुवुन मगच प्रवेश करणे.

g1

प्रवेशद्वारासमोर येताच सुवर्णमंदिराचे पहिले दर्शन होते. प्रवेशमार्गावर सर्वत्र देणगीदारांची नावे असलेल्या संगमरवरी पाट्या आहेत. दात्यांमध्ये लष्करी अधिकारी व पलटणींचा मोठा वाटा आहे.

b3

b4

b5

आयताकृती तलावात म्हणजे 'अमृतस्रोवरात' (यावरुनच अमृतसर असे नाव पडले) मंदीर आहे. उजवीकडे कमानदार प्रवेशद्वारातुन मंदिर प्रवेशाचा मार्ग आहे. उंच सोनेरी कळ्स दिसत आहेत ते अकाल तख्त आणि केशरी ध्वज असलेली वास्तु म्हणजे निशान साहिब.

b6

b7

प्रवेशाद्वारालगतची म्हणजे डाव्या अंगाला शिख वस्तु संग्रहालयाची इमारत आहे.

b8

b10

मंदिराकडे पाहुन भाविक माथा टेकतात आणि सरोवराचे पाणी तिर्थ म्हणुन प्राशन करतात. या जागेवर बहुतेक लोक मंदिराच्या पार्श्वभूमिवर स्वतःची छबी टिपुन घेताना दिसत होते.

b11

सरोवर स्वच्छ राखण्यासाठी बहुधा मासे पाळले गेले असावेत. या माशांना खायला न घालण्याच्या व सरोवर स्वच्छ राखण्याच्या सुचना आहेत. आपल्याला सरोवरात अभय असल्याचे मासे मंडळींना माहित असावे, ते बिनदिक्कत कठालगत फिरताना व माणसे जवळ आली तरी वावरताना दिसत होते.

b12

मंदिराची मागची बाजु. शिख धर्मात बोराच्या झाडाला विशेष महत्व असावे. परिसरात बोराची अनेक झाडे आहेत तसेच 'बेरी बाबा बुध साहिब' देखिल एका पुरातन बोरीच्या झाडाखाली आहे.

b14

मागच्या अंगाला दोन उंच मनोरे आहेत व त्यांमध्ये लंगर आहे. या मनोर्‍यांना रामगढिया बुंगे म्हणतात. हे उंच मनोरे रामगढिया वंशातील योद्धा सरदार जस्सासिंह याने मंदिराच्या संरक्षणार्थ उभारले.

b15

b16

'सेवादार' - मंदिराच्या परिसरात गस्त घालणारे रक्षक. अगदी साठी उलटलेले रक्षक देखिल सहजगत्या भाला पेलत फिरताना दिसत होते. एका भिंतीलगत एक घोळका बसला होता, त्यातल्या काहींची पाठ मंदिराकडे झाली होती. रक्षक त्यांच्या पुढ्यात जाउन उभा राहिला व त्याने फक्त पालथ्या पंजाने ताणलेली बोटे गोल फिरवली. ताबडतोब पाठ फिरवुन बसलेले मंदिराभीमुख झाले.

b17

प्रत्येक अंगाकडुन मंदिराचे वेगळे रुप दिसते. मंदीर आणि त्याचे सोनेरी प्रतिबिंब फार मोहक दिसते.

b18

b19

b20

मागच्या अंगाला मंदिराला एक सुंदर सज्जा आहे. अगदी वरच्या बाजुला मधोमध अध्ययन करणारे गुरू आणि चवरी ढाळणारा सेवक पत्र्यावर कोरला आहे

b21

जवळुन पाहिले असता मंदिराच्या बाह्य बाजुवरील नक्षिकाम ताजमहालावरील नक्षींशी विलक्षण साधर्म्य दाखवते.

b22

कळसावरील सोन्याची झळाळी डोळे दिपवते

b23

प्रदक्षिणा करताना सर्व बाजुंनी मंदीर डोळे भरुन पाहुन घेतले.

b24

b25

b26

b27

b28

b29

इतका प्रशस्त् परिसर, हजारो माणसांचा राबता तरीही आश्चर्य कारक वाटावी इतकी शांतता आणि स्वच्छता. प्रदक्षिणेच्या आयताकृती मार्गावर चारही कोपर्‍यांमध्ये भाविकांना पाणी देण्यासाठी जे लोक असतात ते पगारी नोकर असून स्वखुषीने व सेवाभावाने करणारे भक्त आहेत हे त्यांना पाहताच समजते. सर्वत्र अखंड व अथकपणे ओल्या फडक्याने संगमरवरी जमीन पुसली जात असते. प्रत्यक्ष मंदिरात प्रवेश करताना दिंड्या घेउन आलेले आणि आपापले आलेले भाविक यांना प्रवेशासाठी स्वतंत्र रांगा आहेत. प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत मंद आवाजात प्रसन्न अशी धार्मिक गीते वाजत असतात आणि बहुसंख्य भाविक ती स्वतः देखिल गात असतात.

मंदिरात प्रसादाची व्यवस्था आणि पद्धत फारच उत्तम आहे. प्रवेशद्वारासमोर जरा अलिकडे प्रसाद मिळतो. दहा रुपये देउन पावती घ्यायची आणि ती दाखविल्यावर साजूक तुपातला अगदी तूप निथळणारा जाडसर शिरा प्रसाद म्हणुन मिळतो. आम्ही घेतला आणि खायला सुरुवात केली. काही वेळाने लोक आमच्या कडे पाहत् आहेत असे लक्षात आले. एक मुलगी आणि तिची आई आमच्या जवळ आल्या आणि त्यांनी माहिती दिली की तो प्रसाद घेउन दर्शनाला जायचं, आणि दर्शन घेतल्यावर मग प्रसाद खायचा. प्रसादाची पद्धत फारच उत्तम - आत जाताना प्रसाद जमा करायचा, सेवक आपल्या कृपाणाने त्यातला काही भाग काढुन घेतात आणि उरलेला आपल्याला प्रसाद म्हणुन देतात. तो ठेवायला पिश्वीही तत्परतेने दिली जाते. ज्यायोगे भक्तांना चिकट हात घेउन वा हातात द्रोण घेउन मंदिरात जायला लागु नये. आतमध्ये नैवेद्य प्रसाद वगैरे प्रकार नाही. फक्त दर्शन घ्यायचं आणि यायचं

वातावरण अगदी प्रसन्न आणि विलक्षण समाधान देणारं. इथुन पाय निघत नाही. आपण निघतो ते पुन्हा एकदा यायचच अस म्हणत.

लखलखतं सुवर्णमंदीर

इथुन पाय निघत नव्हता हे खरं. फारच त्रोटक दर्शन झालं.

अर्थात मी पुन्हा येण्याची तजवीज करुन ठेवली होती. "झाल ते दर्शन दिवसाचं, पण रात्रीचं दर्शन म्हणजे खरं सुवर्णमंदीर पाहणं" असं सांगुन मी दुसर्‍या फेरीला आलो. दुसरी फेरी मिळावी म्हणुन मी पहिल्या फेरीत 'आता बघुन घेउया, दर्शन रात्रीच्या फेरीते घेउ, गर्दीही कमी असेल" असं सांगुन मंडळींना बाहेर काढलं होतं. म्हणजे दुसरी भेट नकी!

यावेळी टाउन हॉलवरुन चालत निघालो आणि अकाल तख्तालगतच्या रस्त्याने दाखल झालो. गर्दी कमी असेल हा भ्रम दूर झाला. मात्र कोलाहल नव्हता. लोक पादत्राणं जमा करुन मंदिराच्या दिशेने जात होते. आम्हीही पादत्राणे जमा केली आणि पाय धुवुन मंदिरात शिरलो.

n1

n2

n3

n4

n5

n6

n7

n8

n9

n10

n11

n12

n14

n15

n16

n17

n18

n19

n20

n21

n22

n23

प्रदक्षिणा करत फोटो काढताना वेळ कसा गेला समजल नाही. अगदी निवांत दर्शन झालं. आता सगळ्यांनाच पोटातली भूक जाणवू लागली होती. आम्ही हात जोडले आणि बाहेर पडलो.



खटकरकलां

 अमृतसरला जायचे तेव्हा खटकरकलांला भेट द्यायचीच असे ठरवले होते.0

अमृतसर चंदिगड महामार्गावर असलेले खटकरकलां हे महान देशभक्त व हुतात्मा भगतसिंग यांचे काका सरदार अजितसिंग यांचे जन्मस्थान. येथे हुतात्मा भगतसिंग यांचे वडीलोपार्जित घर आहे. अमृतसर पासून अंतर १३० किलोमिटर. शहिद भगतसिंगनगर जिल्ह्यात बंगाजवळ खटकरकलां गाव आहे, खटकरकलां गाव चा रस्ता महामार्गावरुन जिथे सुरु होतो तिथे हुतात्मा भगतसिंग स्मृति संग्रहालय आहे.

हे स्थळ दुर्दैवाने पर्यट्कांच्या यादीत नसते व साहजिकच हॉटेलांच्या पर्यटन आयोजकांनाही विशेष महिती नसते असे आढळुन आले. मात्र पर्यटन विकास मंडळाचे अधिकारी अतिशय तत्पर व सुस्वभावी आहेत. मुख्य पर्यटन अधिकारी श्री. बलराज सिंग यांनी आम्हाला चांगली माहिती दिली व संग्रहालय सोमवारी बंद असते हेही सांगितले. जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल व हुतात्मा भगतसिंग यांच्याविषयी आदर असेल तर तिथे अवश्य जा असे त्यांनी आवर्जुन सांगितले. आमचा सारथीही अनेक वर्षे या क्षेत्रात असूनही तिथे गेला नव्हता.

या संग्रहालयात हुतात्मा भगतसिंग, त्यांचे सहकारी, गदर उत्थानातील हुतात्मे व सहभागी व अनेक देशभक्त तसेच हुतात्मा भगतसिंग यांच्या कुटुंबातील अनेक व्यक्तिंचे दुर्मिळ फोटो आहेत. हुतात्मा भगतसिंग यांचे अवशेष ज्यात गुंडाळुन आणले गेले तो ट्रिब्युन चा रक्ताने भरलेला अंक, हुतात्मा भगतसिंग यांच्या वापरातील काही वस्तु, लाहोर प्रथम अभियोगाच्या निकालपत्राची प्रत, हुतात्मा भगतसिंग यांचे हस्तलिखित, त्यांच्या तुरुंगात असताना लिहिलेल्या रोजनिशीतील काही पाने, त्यांच्या फाशीचा हुकुमनामा ज्या लेखणीने लिहिला गेला तो लेखणी, हुतात्मा भगतसिंग यांच्या स्वक्षरीची त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिली गेलेली भग्वदगीतेची प्रत, सरदार अजितसिंग यांचे काही कपडे हा व अन्य बहुमोल खजिना आहे. मात्र आतमध्ये चित्रणास परवानगी नसल्याने यापैकी काही टिपता आले नाही.

1
2

हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा सुखदेव व हुतात्मा राजगुरू यांच्या ५० व्या हौतत्म्यदिनी म्हणजे दिनांक २३ मार्च १९८१ रोजी या संग्रहालयाचे अनावरण केले गेले. आत शिरताच समोर हुतात्मा भगतसिंग यांचा पुतळा आहे.

3

4

5

6

7

8

9

10

परिसरातील छोट्याश्या उद्यानात या तेजस्वी, कर्तृत्ववान व ध्येयवादी घराण्यातील तीन वीर - हुतात्मा भगतसिंग यांचे पिता सरदार किशनसिंग व दोन काका सरदार अजितसिंग व सरदार स्वर्णसिंग यांच्या स्मृत्यर्थ एक स्तंभ आहे, ज्याच्या तीन बाजुंवर एकेकाची अल्प माहिती दिली आहे.

11

त्या पवित्र वास्तुला अभिवादन करुन आम्ही बाहेर पडलो. लगतच खटकरकलांकडे जाणारा रस्ता होता व प्रवेशाला हुतात्मा भगतसिंग स्मरणार्थ उभारलेली कमान होती.

12

साधारण दिड-दोन किलोमिटर अंतरावर हुतात्मा भगतसिंग यांची वडिलोपार्जीत वास्तू आहे. ही वास्तू राष्ट्रिय स्मारक म्हणुन संरक्षित वास्तु घोषीत केली आहे. मात्र आपल्या देशात राष्ट्रिय स्मारकाची नासधूस, नुकसान करणार्‍यास केवळ पाच हजार पर्यंत दंड व वा/ तीन महिन्यांपर्यंत कारावास इतकीच शिक्षा आहे. हुतात्मा भगतसिंग यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या वास्तूतली धूळ मस्तकी लावत ती वास्तू भक्तिभावाने पाहिली. काचेच्या बंद दरवाजांआड काही भांडी कुंडी,कपाटे, पलंग इत्यादी वस्तू आहेत. इतकी वर्षे आपण इथे कधीच का आलो नाही याचा अचंबा करत आमच्या सरदार सारथ्याने या वास्तुचे दर्शन घडवल्याबद्दल आमचे आभार मानले.

13

14

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

26

ही वास्तू तर पाहिली, मात्र आणखी एक दिवस असता तर फिरोझपूर येथील हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा सुखदेव आणि हुतात्मा राजगुरु यांचे स्मारक पाहता आले असते अशी हुरहुर लागली. एकदा लाहोरही करायच आहे.

खादाडी

पंजाबी खाणं म्हटलं की डोळ्यापुढे सरसो का साग, मकई रोटी, छोले भटुरे, आलु गोबी, तडका दाल, पनीर चे नाना चमचमीत पदार्थ, खुसखुशीत रोट्या, नान, पराठे, कुलचे डोळ्यापुढे येतात. जोडीला पंचरंगा आचार आणि मसाला पापड हवेतच. भरल्या पोटी हौसेनं लस्सी हाणणं आलच. त्यात अमृतसर हे कुलचा साठी प्रसिद्ध.

2

लस्सी ही पिण्याची चीज नसून खायची चीज आहे हे इथे समजते.

3

4

लस्सीमध्ये मलई नेहेमीच घालतात पण ग्यानचंदच्या लस्सीमध्ये मलई बरोबरच मस्तपैकी अंड्याएवढा ताज्या लोण्याचा गोळाही असतो. लस्सीच्या ग्लासाबरोबर चमचा का देतात ते इथे खरं समजतं. सकाळ दुपार संध्याकाळ लस्सी ही हवीच. इथली सुरेख हवा आणि रुचकर पदार्थ यामुळे चार घास जास्तीच जातात. खरतर सकाळी नाश्त्याला पराठे, कुलचा वगैरे खायची सवय नाही पण इथे येउन इडली डोसा खायचा म्हणजे हद्द झाली. मिठाया या साजुक तुपात बनतातच पण दाल माखनीमध्येही साजुक तुपाचा घमघमाट असतो. सरसोच्या तेलातल्या जवळपास पिकवलेल्या अगदी ताज्या भाज्या अप्रतिम.

इथे होटेलची आणि खाद्यगृहांची रेलचेल. मी जिथे जिथे गेलो ती सर्व ठिकाणे चविष्ट निघाली. फ्लॉवर ही सर्रास आणि सर्वत्र मिळणारी भाजी पण अमृतसरच्या बिग ब्रदर ढाबामध्ये आलु गोबी खाण्यातली मजा काही औरच. हिरवट देठ शिल्लक असलेले फ्लॉवरचे रस्रशीत तुरे आणि मोहरीचा झणका केवळ अद्वितीय. अमृतसरचा चना अमृतसरी तर लाजवाब. चमचमीत पण जळजळीत नाही असे रुचकर अन्न हे इथले वैशिष्ट्य. आपल्या कडे सर्वसाधारणतः छोले भटुरे मागवले की तेलात चपचपलेल्या भल्या मोठ्या पुर्‍या आणि लाल तवंगाचे छोले मिळतात. इथल्या चविष्ट छोल्यांवर तेलही तरंगत नसते आणि बटुरेही तेलकट नसून खुसखुशीत असतात. वर लोणी हवेच. जोडीला कांदा आणि मिरच्या. सरसो का साग आणि मक्याच्या रोट्या खरोखरच अप्रतिम. सरसोच्या भाजीवर आल्याच्या उभ्या कापांबरोबर ताज्या लोण्याचा गोळा असतो हे खासच. दालही नाना प्रकारची मां की दाल, दाल महारानी दाल माखनी सगळे दाट आणि सौम्य. पंजाबी थाळीही उत्तम होती. मात्र एका माणसाला संपवायला जडच. मी माझी पत्नी बहीण आम्ही पडलो तृणभक्षी. त्यामुळे मांसाहारा विषयी काय लिहिणार? मात्र चिरंजीव, भाची आणि मेव्हणा बोटं चाटत कोंबडीचा फडशा पाडताना दिसले. खासियत म्हणावी तर 'माखन' मधला बटर फिश. या लोकांना हा प्रकार फारच आवडला होता.

जेवण झाल्यावर आणि फिरता फिरता खायचे पदार्थ म्हणजे गुलाब जांब आणि त्याही पेक्षा जिलबी. कुव्याची जिलबी, लॉरेन्स रोडची जिलबी अशी नाना प्रसिद्ध ठिकाणं मात्र सगळ्याच जिलब्या उत्तम आणि अर्थातच साजुक तुपातल्या. मिठाई मध्ये पतीसा छान मिळत असं ऐकुन होतो. प्रत्यक्ष घ्यायला गेलो तेव्हा समजलं की पतीसा म्हणजे जवळपास सोनपापडीच, फक्त जरा पातळ आणि साजुक तुपामुळे मृदुमुलायम. वर बदाम पिस्त्याचे काप मुबलक लावलेले हे सांगायलाच नको.

27
28

या सर्वांपेक्षा सवाई अशी रात्री हॉलगेट वर जाऊन खाल्लेली दाट चविष्ट मलई कुल्फी, बदाम कुल्फी, पान कुल्फी आणि अर्थातच माझी आवडती केशर पिस्ता कुल्फी, त्यावर रबडी आणि शेवया.

29
30
31
32

इथे दोन हॉटेल मला जरा विशेष आवडली ती म्हणजे अटारीच्या अगदी अलिकडचं सरहद आणि जालंदर जवळचं हवेली.

सरहद हे विस्तिर्ण आणि आल्हाददायक झुळुक देणार हॉटेल. या मालकाच्या डोक्यात हिंदुस्थान पाकिस्तान मैत्रीचं प्रचंड कौतुक. कदाचित त्याचे नातेवाईक तिकडे पलिकडे राहिले असावेत. आमचा सारथी सांगत होता की सिमेच्या आरपार जा ये करण्या साठी अनेक भुयारे होती. खलिस्तान पर्वात ती सर्व नष्ट केली गेली. असतीलही. देश विभागला गेला कुण्या इकडच्यांचे जिवलग तिकडे राहिले आणि तिकडच्यांचे इकडे. इथे प्रवेश करताच लक्ष वेधुन घेतात ते खास ट्रक शैलीत रंगवलेले टेम्पो. वाहतुकीचे आणि सामानाचे. त्या कलाकारानं आपलं नाव कलाकृतींवर लिहिलं होतं आडोश्यासाठी उभ्या केलेल्या पत्र्यांवरही त्याची कलाकारी दिसत होती. बाहेर ऐसपैस जागेत टेबल खुर्च्या मांडलेल्या. नुसताच परिसर नाही जेवणही उत्कृष्ठ होतं.

5
6
7
8
9
10
11
12
14

हवेली हे अमृतसर दिल्ली, अमृतसर चंदिगड मार्गावरचं 'थांबलच पाहिजे' अस हॉटेल. हॉटेल ला लागुन हवेली विलेजही आहे. वर्दळीची सहज व्यवस्था होइल अस प्रशस्त आवार. गाड्या उभ्या करायला बाजुलाच एक छोटं मैदान आणि जालंदरच्या अलिकडे अगदी महामार्गावरचं सोयिस्कर ठिकाण. इथे एका शाळेची सहलही आलेली होती, नाश्ता संपवुन त्यांना वहनात बसवायचं काम शिक्षिकांना लागलं होतं. प्रवेश करताच उजव्या हाताला एक विहीर आणि हीर रांझा स्टाइलमध्ये केलेले पाणी पिणारा आणि पाणी पाजणारी यांचे पुतळे. अगदी उथळ विहीर ही शोभेची होते. बाहेरुन विहीरीचा आभास आणि आंत पाण्याचा हौद. मात्र येणारे तमाम पर्यटक त्या विहीरीचं पाणी काढायला रहाटावर जात होते. पर्यट्कांच्या फोटोशूटची ती प्रसिद्ध जागा असावी. डाव्या अंगाला फरसाण, मिठाया, जिलब्या, असे अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल होते; पानाची गादी होती. हॉटेलची सजावट मोठी कलात्मक होती. मुख्य भोजनकक्षा बाहेर वरांडा होता. एका टोकाला सांझा चुल्ह्यावर रोट्या भाजणार्‍या युवती तर दुसर्‍या टोकाला म्हणजे प्रवेशद्वाराजवळ चोपडी घेउन बसलेले लालाजी. वरांड्यात शिवराय पसार झाले तसे भले मोठे पेटारे.

आत प्रवेश करताच डावीकडे साक्षात टाटा ट्रकची आक्खी केबीन! मंद प्रकाश योजना. निवांत कारभार, उंच भव्य छत आणि बसायल ऐसपैस जागा. लख्ख पितळेची भांडी चकाकत होती. भिंतीवरच्या फळीवर जुना रेडीओ आणि बाजुला यंत्रावर चारा कापणारे सरदार दांपत्य. या सर्वाला साजेसं सुग्रास जेवण आणि दाट मलईदार लस्सी. कोचावर रेंगल्या वर जराशी डुलकी काढावी असा विचार प्रबळ होत होता.

15
15a
16
18
19
19a
20
21
22
23
24
25

खटकरकलांहून निघालो तेव्हा वाटेत उसाचे मळे लागले. आम्ही सारथ्याला विचारले की जवळपास गुर्‍हाळ असेलच? गुर्‍हाळ नाही पण आपल्या शेतावरचा गूळ विकणारी दिसली. उतरुन जवळ जाउन पाहतो तर काय, मस्त रवाळ पिवळा धमक गुळाचा बारिक भुगा. लाळ गळायचीच बाकी होती. पोळी वर साजूक तूप् चोपडायचं, त्यावर हा गूळ पसरयचा आणि गुंडाळी करुन हाणायची या कल्पनेनच भूक चाळ्वली. शेजारी आणखी एक प्रकार पाहायला मिळाला. 'गुळाची मिठाई' ताजा गुळ वड्या पाडण्या आधी त्यावर खोबर्‍याचे काप, धने, तीळ, बडिशेप असे पेरायचे आणि मेदुवड्या एवढे चपटे गोळे करायचे. हा प्रकार भरपेट जेवण झाल्यावर अन्नपचनास उत्तम असे त्या बाईने म्हणजे लक्ष्मीने सांगितले. ते खरे असावे. हवेलीमध्ये बडेशेपेबरोबर असे गुळाचे तुकडेही मुखवास म्हणुन दिले होते. तुम्ही मुंबईकर का असे लक्ष्मीने माझ्या पत्नीकडे - किंबहुना तिच्या पोशाखाकडे पाहुन विचारले. म्हणाली तुम्ही बरं काहीही मनाप्रमाणे नेसू शकता. आम्हाला ओढणी डोक्याव्रर घेउनच वावरावे लागते.

33
34
35
36
37

इथली जमीन सकस आणि भाज्याही रसरशीत. प्रवासात बंगा गावाजवळ एक शेतकरी त्याच्या वाफ्यातली पालेभाजी घेउन आला होता. कसले अजस्त्र मुळे! पण ताजे आणि रसरशीते. पाहिल्यावर याचा चट्का करुन कधी खातोय असे व्हवे असे. कोवळा पाला कोशिंबिर करुन खायला झकास. मग भरले तेही गाडीत.

39
40

सरहद मधुन बाहेर पडल्यावर उसाचा रस दिसला. आम्ही गाडी थांबवली मात्र नुकतीच लस्सी पिउन झाली असता त्यावर रस पिण्यास महिला वर्गाने सक्त मनाई केली आणि आमची अक्कल काढली. ती हौस राहुनच गेली.

खरेदी

खरंतर मुंबईत राहणार्‍याला बाहेर गेल्यावर आठवण म्हणुन घ्यायच्या शोभेच्या वस्तूंव्यतिरिक्त काहीही घेण्यासारखे नसते. सगळं काही इथे मिळतं. मात्र हा विचार मनातच ठेवावा लागतो. उगाच बौद्धिक ऐकण्यापेक्षा आलीया भोगासी असावे सादर असं मनातल्या मनात म्हणत आपण निमूटपणे जायचं. ज्यांना आवडतं त्यांनी खरेदीला जावं, आम्हाला काही घ्यायचं नसल्यामुळे आम्ही फिरुन येतो वगैरे चालत नाही. जावे लागतेच आणि आपल्या मताला फारशी किंमत नसली तरी आपले मत द्यावेही लागते.

अमृतसरला पंजाबी पेहरावाचे कापड फार उत्तम मिळते, अतिशय रास्त दरात मिळते - आपल्या पेक्षा खूपच स्वस्त मिळते, मुख्य म्हणजे घासाघीस होते व सर्वात कळस म्हणजे निवडलेल्या कापडाचे कपडे त्वरित शिवून मिळतात इत्यादी मौलिक माहिती आमच्या महिला वर्गाने प्राप्त करुन घेतली होती. कुठल्या भागात उगाच भपका असतो आणि कुठे कपडे उत्तम व रास्त भावात मिळतात या विषयी अर्थातच पक्की माहिती करुन घेण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे आम्ही कापड खरेदीला निघालो. आमच्या सारथ्याने आम्हाला त्याच्या विश्वासाच्या दुकानात नेले. बाजारपेठेत अगदी रस्त्यालगतच असलेले हे दुकान दुमजली होते. ऐसपैस गाद्या पसरल्या होत्या. (स्त्रीयांना ठाण मांडायला आणि त्यांच्या नवर्‍यांना/ मुलांना रेलायला- लोळायला). आम्ही आत जाताच स्वागत झाले आणि ताबा विक्रेत्याने घेतला. घेण्याची घाई करु नका, आधी फक्त बघून घ्या असे त्या विक्रेते मंडळींनी धूर्तपणे सुचवले. बायका 'जरा बाजुला ठेवा, यातुनच काय घ्यायचे ते निवडु' असे म्हणत असल्या तरी प्रत्यक्षात जे जे बाजुला ठेवलेले आहे ते सर्व घेतले जाणार हे त्यांना पूर्ण माहित असते.

1
2
3

दुकान हरतर्‍हेच्या कापडाने भरले होते. गच्च भरलेले खण उपसले जात होते, हळुहळु रिकामे होत होते आणि आहे त्या ठिकाणी असलेलं कापड कमी पडत की काय म्हणुन बाहेरुनही ताजी कुमक येतच होती.

4
5
6

असाच एक गठ्ठा आला आणि विकेत्यांनी एकदम काहीतरी अद्भुत दाखवत असल्याच्या आविर्भावात नवी ठाणें उघडली. 'कराची' - "बस्स् तुम्ही दिल्ली, मुंबई कुठेही कितीही उत्तम दुकानात जा, हा कपडा मिळणार नाही हे निश्चित" विक्रेत्याने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले. ती कापडं खरीच कराचीहुन येतात की त्या पध्द्तीच्या कापडाला कराची म्हणतात कोण जाणे. पण संच सुंदर होते आणि किमतीही बर्‍या वाट्ल्या. आता खेळ रंगात आला होता. अंतिम फेरीसाठी निवडलेले कपडे कोपर्‍यात जात होते, ठेवलेले परत दाखवले जात होते. विक्रेते आणि ग्राहक - दोघांनाही खरेदी चढली होती.

7
8
9

अखेर निवड अंतिम करण्यात आली. किमती पुन्हा ऐकवल्या गेल्या. त्यावर जोरदार आक्षेप हरकती घेण्यात आल्या. 'काय हो तुम्ही फारच किमती सांगता" आणि तिकडुन ' अहो, निर्धास्त राहा आम्ही एक पै जास्त घेणार नाही, आम्ही तुम्हाला खुष केलं तरच तुम्ही आणखी परिचितांना आमच्याकडे पाठवाल' वगैरे वगिरे. मात्र कापडं खरोखरच छान होती आणि इथल्या तुलनेत किंमतीनी खूपच वाजवी होत्या. मग एकदा निवडलेले पेहराव पुन्हा एकदा उलगडुन पाहिले गेले.

10
11
12
14
15
16
17
18
19

सगळे कपडे निवडुन झाल्यावर त्या महाभागांनी आणखी एक ठाण उघडलं - 'अहो इथे येउन कशिद्याच्या ओढण्या घेतल्या नाहीत तर मग ती काय खरेदी म्हणायची?' इती विक्रेता. पंजाबी पोशाख घेताना त्याला ओढणी असते वा नसल्यास कापडाला साजेलशी जुळत्या रंगाची ओढणी घेतली जाते इतपतच माझे ज्ञान मर्यादित होते. इथे नवी महिती मिळाली. कशिद्याची ओढणी घ्यायची मग त्यावर पोशाख शिवायला एकरंगी कापड घ्यायचं. अरे देवा! म्हणजे अजुन हे बाकी होतं

20

अखेर खरेदी संपली, घासाघीस झाली. अखेर अंतिम रक्कम जवळच्या शून्यांत रकमेवर आणली गेली. पैसे चुकते झाले. मापं देउन झाली. संध्याकाळपर्यंत कपडे हॉटेलवर पोचते करण्याचे आश्वासन मिळाले आणि आम्ही बाहेर पडलो.

इकडे महिला आघाडी कापडात दंग असताना आम्ही पुरुष मंडळी आमच्या खरेदीला सटकलो आणि यांची खरेदी संपायच्या आत परत आलो. आमची खरदी म्हणजे निव्वळ चविष्ट खरेदी.

21

अमृतसरमध्ये हॉलगेटला शिरल्यापासून इंग्रजीत 'पापर वरियान' असे लिहिलेली अनेक दुकाने दिसली होती. पापर वरियान म्हणजे पापड आणि वड्या. उत्तर आणि पूर्वेत ड आणि र ची हमखास अदलाबदल होते. कचोरीची कचोडी होते आणि वडीची होते वरी. आमच्या कंपनीतला एक बंगाली वडापावचा उच्चार बोरापाब करायचा ते आठवले. इथले पंजाबी मसाल्याचे पापड मस्त झणझणीत पण पापडखार जरा जास्तच असतो. वडी हा प्रकार जरा नवा होता. या वड्या म्हणजे आपण सांडगे करतो तशा पण चमचमीत मसालेदार वड्या होत्या. या वड्या पुलाव वा कढीमध्ये टाकायच्या. पुलावाला मस्त वास लागतो. मात्र मला वडी खायला फारशी आवडली नाही. वडीमुळे भाताला सुरेख गंध आला होता हे खरे.

दुकानांमध्ये पापड, वड्या, लोणची, मसाले व सुकामेवा यांची रेलचेल होती. इथलं लोणचही मस्त मोहरीच्या तेलातलं आणि सणसणीत. कमल काकडी, लसूण, आंबा, लिंबु, काश्मिरी लाल मिरच्या, मिश्र लोणंचं अशी अनेक लोणची होती. अनेक प्रकारचे मसालेही होते. पंजाबी मसाला, चना मसाला, गरम मसाला, मटन मसाला, चहा मसाला असे नाना मसाले होते. सुकामेव्यात खास म्हणजे अक्रोड मुबलक दिसत होते. हे दुकनदार मोठे उद्योगी. त्यांनी आम्हाला आपल्या दुकानात मिळणार्‍या पदार्थांची छापील यादीच दिली. ठराविक रकमेचा माल मागवला तर आम्ही कुरिअरने पाठवतो असे त्यांनी सांगितले.

22
23
24
25

पंजाबी पोशाख करायचा म्हणजे पंजाबी जुती हवीच! हॉल गेटला जुतीची भरपूर दुकानं. आमच्या सारथ्यानं आम्हाला हॉल गेट्च्या बरोबर समोर असलेल्या एका दुकानात नेलं. इथे बायका व पुरुष दोन्हींसाठी जुतीचे मुबलक प्रकार होते. आम्हाला फारसा उत्साह नव्हता, पण महिला आघाडी जोरात होती. आपण कुठल्या रंगाचे कपडे निवडले ते आठवुन त्या रंगाच्या जुत्या पाहायच्या होत्या.

26
27
28
29
30
31
32
33

खरेदी संपली, संध्याकळचे साडेसात वाजुन गेले होते. मंडळींनी न विसरता कपड्यांच्या दुकानात फोन लावला आणि कपडे पोचते केले का अशी चौकशी केली. 'आमचा मास्टर निघतोच आहे' असे उत्तर मिळताच, नको, आम्हीच तिथे येतो असे सांगत आमचा मोर्चा पुन्हा कापड दुकानाकडे वळला. कपडे शिवुन तयार असल्याचे समजतास महिला गटात आनंदी आनंद झाला. कपडे ताब्यात घेउन हॉटेलला पोचतात आम्ही निमूट्पणे खाली लॉबीत बसलो आणि स्त्रीवर्ग कपडे आजमावायला वर गेला. बोलावणे येताच आम्ही वर गेलो. मंडळी नव्या कपड्यात दंग होती. आवडते कपडे ठरल्या बरहुकुम मिळाल्याचा आनंद चेहेर्‍यावर दिसत होता.

34


सुवर्ण मंदिर - अमृतसर













परिक्रमावरून चालताना सोनेरी हरिमंदिराचं प्रतिबिंब त्या तलावात दिसतं. खरंतर त्या तलावावरून त्या शहराला ‘अमृतसर’ असं नाव पडलंय. ‘सर’ म्हणजे तलाव. त्या तलावात पाणी नाहीच. ते अमृत आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे.
या तलावाबद्दल अनेक कहाण्या सांगितल्या जातात. तशा जुन्या कुठल्याही वास्तूला आख्यायिका जोडलेल्या असतातच. हा तलाव म्हणे रामायणातच्या काळापासून आहे. रामाने सीतेचा त्याग केल्यावर सीता या तलावाजवळ राहिली. तिथंच लव-कुशांनी रामाचा घोडा अडवला. त्याचा पराभव केला. तिथे एक झाड आहे. त्या झाडाला ‘दुख भंजनी बेरी’ म्हणतात. त्या झाडाखाली राम शेवटच्या घटका मोजत पडला होता. त्या वेळी लव-कुशला कळलं की आपल्या हातून ‘पितृहत्या’ होतेय. त्यांनी या तलावातलं अमृत रामाला पाजलं. राम पुन्हा खडखडीत बरा झाला. एक झाड मी तिथे पाहिलं ते तेव्हाचंच असं लोकं म्हणतात. ते झाड इतकी वर्ष कसं जगलं? वगैरे प्रश्न विचारू नये. श्रद्धेच्या पुस्तकात त्याचं उत्तर नसतं.
हल्ली रामाचा संबंध आला की थोडी भीतीच वाटते. कुठून ‘जय श्री राम’ आवाज येईल आणि कुठली वास्तू कधी वादग्रस्त ठरेल सांगता येत नाही. पण इतिहास सांगतो की या तलावाभोवतीची जागा शिखांचा चौथा गुरू रामदास याला मोगल सम्राट अकबराने दिली. या रामदासाचा मुलगा अर्जुन शिखांचा पाचवा गुरू झाला. त्यानं हे मंदिर या तलावाभोवती बांधलं. हिंदूंची गंगा तसा हा शिखांचा तलाव. तिथल्या पाण्यात डुबकी मारली की ६८ तीर्थक्षेत्रांचं पुण्य मिळतं म्हणे. इतकं स्वस्तात मिळणारं पुण्य घ्यायची माझी खूप इच्छा होती, पण अंगातले दोन स्वेटर उतरवायला मन धजावत नव्हतं. मी फक्त पाय पाण्यात बुडवले आणि हरिमंदिराकडे निघालो. पण तरीही किमान १७ तीर्थक्षेत्रांच्या (साधारण एक-चतुर्थाश) पुण्ण्याची मिळकत माझ्याकडे असावी. श्रद्घा ही फार मोठी गोष्ट आहे. त्या तलावातल्या पाण्याच्या स्पर्शासाठी त्या थंडीतही भक्तगण आसुसलेले होते. तो तलाव पहिल्यांदा १९२३ साली पूर्ण रिकामा केला गेला. पाणी स्वच्छ करावं हा त्यामागचा हेतू होता. ती ‘कारसेवा’ चालली असताना हजारो शीख देशभरातून आले व सोन्याची फावडी आणि चांदीची घमेली घेऊन गाळ काढण्यात आला. त्या श्रमदानात हिंदू-मुस्लीम सामील झाले. असं म्हणतात की, गुरू गोविंदसिंगांचा तो प्रसिद्ध पांढरा ससाणा निळ्या आकाशातून अवतरला व मंदिराच्या सोनेरी मुकुटावर बसला. अजूनही हयात असलेली त्या काळची माणसं या ससाण्याच्या आठवणी सांगत असतात.
या मंदिराची एक गंमत आहे. त्यासाठी जागा दिली अकबराने. त्याच्या पायाचा दगड बसवला लाहोरच्या हजरत मियाँमीरने. मंदिरात अर्थातच मूर्ती नाही. कारण शीख एकेश्वरवादी. तिथे त्यांच्या पवित्र ग्रंथाची पूजा होते, पण त्या ग्रंथात फक्त गुरूनानक किंवा इतर गुरूंचे विचार नाहीत. त्यात कबिराचे दोहे आहेत, नामदेवाच्या ओव्या आहेत, थोडक्यात, त्या काळातल्या सर्व देवपुरुषांच्या रचना आहेत. त्याची भाषा फक्त गुरुमुखी आहे. त्या मंदिरात सण साजरे होतात हिंदूचे. दिवाळीला तर खास रोषणाई असते. खजिन्यातल्या दागिन्यांनी मंदिर सजवलं जातं. थोडक्यात हे मंदिर म्हणजे सर्वधर्मसमभावाचं खरं प्रतीक आहे. पण तरीही या मंदिराला इस्लामी धर्मवेडाचा फटका बसलाय. जहांगीरने हे मंदिर बांधणाऱ्या गुरू अर्जुनाचं डोकं उडवलं. अहमदशहा अब्दालीने तर हे मंदिर वारंवार तोडलं. धर्मवेडाबरोबर ‘लूटमार’ हाही त्यामागचा हेतू असू शकेल. कारण त्या काळी मंदिरात प्रचंड संपत्ती असायची. अहमदशहा अब्दालीने हे मंदिर सात वेळा जमीनदोस्त केलं आणि शिखांनी ते सातही वेळा पुन्हा बांधलं. या मंदिराबरोबर अकाल तख्तही तोडलं जायचं. हे अकाल तख्त १६०६ साली गुरू हरगोविंदने बांधलं, यामागचा हेतू? शिखांची राजकीय व धार्मिक सूत्रं तिथून हलवली जावी. याच अकाल तख्तामधून नंतर जर्नेलसिंग भिंद्रनवालेला भारतीय सैन्याने बाहेर काढलं.
हे मंदिर खऱ्या अर्थाने सुवर्णमंदिर झालं महाराजा रणजितसिंगच्या काळात. त्याने पंजाबात चाळीस वर्षं
राज्य केलं. इतर ठिकाणाहून भरपूर खंडणी वसूल केली आणि तो पैसा या मंदिरात ओतला. त्यांनी हे मंदिर
संगमरवरात बांधलं आणि मंदिराचा अर्धा भाग गोल्ड प्लेटिंग केलेल्या तांब्याच्या पत्र्याने सजवला. ते मंदिर काही पूर्णपणे सोन्यात बांधलेलं नाही पण वरच्या भागाला सोन्याचा पत्रा लावल्यामुळे ते चकाकतं. परिक्रमावरून तलावात त्या मंदिराकडे जाणारा रस्ताही संगमरवरी आहे. कठडा संगमरवरी आहे. दिव्यांचे खांब संगमरवरी आहेत आणि सोनेरी मुकुट घालावा तसे कंदील त्या दिव्यावर बसवले आहेत. मंदिरात एक कोपरा किंवा एक भाग असा नाही की जिथे कोरीव काम नाही. मार्बलमधलं फुलांचं डेकोरेशन तर निव्वळ अप्रतिम. हे काम मुस्लीम कलाकारांवर सोपवलं होतं. जिथे ‘गुरुग्रंथ’ ठेवलाय तिथली कनॉपी (छत्रीच्या आकाराची) मोती व पाचूने सजवलेली आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर ‘शिशमहल’ आहे. वर गच्चीत सोनेरी घुमट व त्या घुमटांची इतर छोटी पिल्लं पाहिली की पूर्वी या देशात सोन्याचा धूर निघत होता हे पटतं. मंदिराच्या खजिन्यात जी संपत्ती आहे त्याची मोजदाद कित्येक कोटींत होईल.
रणजितसिंगने एकदा सुवर्णमंदिर उभारल्यावर त्यावर पुन्हा जमीनदोस्त व्हायची पाळी आली नाही. कारण तोपर्यंत भारतातली इस्लामी साम्राज्य कोसळायला लागली होती. पुढे गोरा साहेब आला. साहेबाने मंदिराला वगैरे हात लावला नाही. जालियनवाला बागेची माती रक्ताने रंगवणारा जनरल डायर या सुवर्णमंदिरात कराकरा बूट वाजवत फिरला. शिखांच्या धार्मिक भावना त्या बुटाखाली चेचल्या गेल्या. पण त्या मंदिराचा दगड जागचा हलला नाही.
पण धर्माचे मठाधिपती कधीकधी किती विचित्र वागतात पाहा! या मंदिराचा पाया मुस्लीम संताने बसवलेला त्यांना चालला. मंदिरातली कलाकुसर मुस्लीम कारागिरांनी केलेलीही त्यांना चालली, पण ज्या रणजितसिंगने मंदिरावर सोनं चढवलं, त्याने एका मुस्लिम सुंदरीशी लग्न केलेलं त्यांना आवडलं नाही. अकाल तख्तच्या प्रमुखाने राजाला काय शिक्षा ठोठावली असेल? त्याला आम जनतेसमोर झाडाला बांधलं आणि चाबकाने फटके मारले. पंजाबच्या त्या सर्वात पराक्रमी राजाने ते चुपचाप सहन केले.
‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हे शीख धर्माचं एक मूलभूत तत्त्व आहे. सुवर्णमंदिरात त्याचा ठायी ठायी प्रत्यय येतो. तिथे ‘गुरू का लंगर’मध्ये कुणीही कधीही पोटभर जेऊ शकतो. फुकट खाणावळ असली तरी पाणचट डाळ, कच्च्या चपात्या किंवा आंबलेली भाजी तिथे दानधर्माच्या नावाखाली वाटली जात नाही. मी काही तिथे जेवलो नाही पण प्रसादाचा नुसता शिरा हातात घेतल्यावर हात तुपाळले. भक्तांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून तिथे अद्ययावत हॉस्पिटलसुद्धा आहे.
त्या मंदिराच्या आवारात एक छोटी म्युझियमवजा आर्ट गॅलरी आहे. १९७१च्या भारत-पाक युद्धात वापरलेल्या बॉम्बचे शेल्स, काही बंदुका, गुरुमुखातलं जुनं साहित्य, जुनी नाणी वगैरे गोष्टी आहेत. पण महत्त्वाचा आहे तो सुंदर चित्रांद्वारे रंगवलेला शिखांचा इतिहास. तो इतिहास आपल्याला विचार करायला लावतो.
नानकांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला. त्यांनी शीख धर्माची स्थापना केली. पण हा धर्म म्हणजे हिंदू धर्माचे एक बंडखोर बाळ होतं. हिंदू संस्कृतीचा पगडा त्या धर्मावर आहेच आहे. नानकांनी आणि त्यानंतरच्या शीख गुरूंनी इस्लामला कधी शत्रू मानलं नाही. पण काही मोगल राजांनी शिखांना शत्रू मानलं. गुरू अर्जुनाची हत्या जहांगीरने केली. त्यांचा नववा गुरू तेगबहाद्दूरचं शीरही मोगल सम्राटाने उडवलं. म्हणून तर त्यांचा दहावा आणि शेवटचा गुरू गोविंदसिंगने शिखांना हातात तलवार घ्यायला लावली आणि त्यांच्यातला पुरुषार्थ जागा केला. शीख आक्रमक बनले. इतके की, एका इंग्रज तत्त्ववेत्याला कुणी तरी विचारलं की शीख म्हणजे नक्की कोण? तेव्हा तो म्हणाला , ‘‘आक्रमक, दुष्ट हिंदूंना शीख म्हणतात.’’ इस्लामचे अनुयायी आणि शीख यांच्यातून कालपरवापर्यंत विस्तव जात नव्हता. जहांगीरने पेटवलेली दुश्मनीची आग १९४७ च्या फाळणीपर्यंत विझली नव्हती. उलट शीख व हिंदूचे संबंध सलोख्याचे होते. शिखांच्या नव्या पिढीने तर पगडी, कृपाण या गोष्टी ‘जुन्यापुराण्या’ मानून त्या सोडायला सुरुवात केली होती. फार वर्षांपूर्वी खुशवंतसिंगसारखा अभ्यासक म्हणाला होता, ‘‘तरुण पिढी जर धर्माबद्दल अशीच उदासीन राहिली तर पुढच्या शतकात पगडीधारी शीख पाहायला मिळेल की नाही हे सांगता येणार नाही.’’



------  लोकप्रभा

 अमृतसर से लौटकर

अमृतसर यानि अमृत + सर,  मतलब अमृत का सरोवर । इस शहर को रामदासपुर और अम्बरसर भी कहा जाता  रहा है ! अमृतसर वास्तव में तुंग नाम का एक गाँव हुआ करता था , लेकिन सन 1574 ईस्वी में गुरु रामदास जी ने इस गाँव को 700 रुपये में गाँव वालों से खरीद लिया और एक झील बनाई जिसे अमृतसर कहा गया और वो ही नाम अब इस शहर को मिल गया ।

अक्टूबर -नवम्बर 2013 में अलग अलग लोगों के विचारों से संकलित पुस्तक लाहौर -1947 पढ़ रहा था ! उसमें आजादी से पहले और तुरंत बाद का जो द्रश्य वर्णित किया गया है उसमें अमृतसर का भी जिक्र है ! पुस्तक पढ़ते समय कभी कभी दुःख हुआ और आँखों में आंसू तक भी आये ! दिल में अमृतसर की वही तस्वीर बिठा रखी  थी , और उसी तस्वीर की हकीकत और 1984 के समय के ऑपरेशन ब्लू स्टार के अवशेषों को देखने का विचार मन में पाले हुए गोल्डन टेम्पल एक्सप्रेस में परिवार सहित 25 जनवरी का रिजर्वेशन करा लिया ! 25 जनवरी का आरक्षण कराने के दो मकसद थे , पहला ये कि अगले दिन कॉलेज की छुट्टी थी और दूसरा ये कि छब्बीस जनवरी होने के कारण वाघा बॉर्डर पर अच्छी खासी भीड़ होने और पूरा आनंद उठाने की उम्मीद थी । रेल आरक्षण कराने में एक परेशानी हो गयी , हमारा वापिस लौटने का आरक्षण राउरकेला मुरी एक्सप्रेस से तो कन्फर्म था लेकिन अमृतसर जाने का आरक्षण गोल्डन टेम्पल में हमें वेटिंग मिली 4 और 5 ! हमने 59 दिन पहले गोल्डन टेम्पल ट्रैन में आरक्षण कराया था लेकिन हमारी सीट जाने वाले दिन यानि 25 जनवरी को ही कन्फर्म हो पायी । देर आये दुरुस्त आये ।

जैसे ही हमारा टिकेट कन्फर्म हुआ , मैंने तुरंत अपने रिश्तेदार श्री राजदीप सारस्वत जी से दिल्ली संपर्क किया , वो BSF में हैं और उनकी ड्यूटी अभी दिल्ली में ही है ! असल में ये संपर्क वाघा बॉर्डर के लिए BSF से पास लेने के लिए किया गया था जिससे हम आसानी से बच्चों के साथ परेड देख सकें | राजदीप जी ने हमें अमृतसर में रहने वाले श्री आर के .साहू जी का नंबर दिया ! हमने उनसे बात करी तो उन्होंने हमें आश्वस्त कर दिया कि आप जब बॉर्डर पर जाओगे तो आपको पास मिल जाएगा ! प्रसन्नता हुई !

गोल्डन टेम्पल गाजियाबाद स्टेशन पर बिलकुल ठीक समय पर आ पहुंची यानि ठीक 8 बजकर 5 मिनट पर । बच्चे साथ में थे लेकिन गोल्डन टेम्पल में आरक्षण तो कन्फर्म मिल गया लेकिन हम दौनों पति पत्नी की सीट अलग अलग दे दीं । बहुत से लोगों से बात करी लेकिन ज्यादातर तो अपने परिवार  के साथ थे वो जा नहीं सकते थे और कोई एक आध जो सिंगल था वो अपनी सीट बदलने को तैयार नहीं था । एक भाईसाब मिले भी अकेले , लेकिन उन्होंने मना कर दिया , बोले मुझे लुधियाना तक जाना है ,आप वहाँ मेरी सीट पर आ जाइयेगा । लेकिन उनका सीट न बदलने का असल कारण बाद में पता चला । असल में उनके सामने वाली सीट पर एक बेहद खूबसूरत और युवा महिला अपने छोटे से बच्चे के साथ मुम्बई से ही यात्रा कर रही थी , और ऐसे मौके को देखकर भला कोई हमारे लिए सीट कैसे छोड़ देता ? खैर सहारनपुर तक हमें अलग अलग ही बैठना पड़ा । टी टी ई से कई बार बात करी लेकिन वो कुछ कर नहीं पाया । सहारनपुर जाकर हमें पास पास की सीट मिल गयीं और आगे का रास्ता सुगम हो गया ।  अमृतसर पर करीब 6 बजे गोल्डन टेम्पल एक्प्रेस पहुँच गयी । जो लोग दिल्ली या आसपास के हैं और अमृतसर जाना चाहते हैं उनसे यही कहूंगा कि वो प्राथमिकता इसी ट्रेन को दें । औसतन बहुत सही समय पर चलती है ।

अमृतसर स्टेशन से बाहर निकलते ही , बल्कि ये कहूं कि स्टेशन पर ही आपको बहुत से लोग मिल जायेंगे जो आपसे गाड़ियों के लिए भाव ताव करने लगेंगे । उस वक्त यानि 25 जनवरी को अमृतसर में अच्छी खासी ठण्ड होनी चाहिए थी , जैसा कि फेसबुक के मित्र श्री विक्रमजीत सिंह जी ने बताया था कि जनवरी में बहुत सर्दी रहती है , लेकिन सच कहूं तो  ग़ाज़ियाबाद जैसी ही ठण्ड थी या उससे भी कम रही होगी । बाहर साइन बोर्ड लगा है वहाँ वो उस दिन 11.6 टेम्परेचर बता रहा था और ग़ाज़ियाबाद में एक दिन पहले का टेम्परेचर 10 डिग्री था । खैर ये ठीक ही था कि मौसम कुछ गर्म रहने की उम्मीद थी । स्टेशन से बाहर निकलकर इण्डिका गाडी किराए पर ले ली | 1500 बोला था उसने लेकिन बात 1200 रुपये में तय हो गयी और सीधे हम चल दिए दुर्गियाना मंदिर की धर्मशाला । वहाँ जाने का कार्यक्रम बस इतना था कि वहाँ जाकर नहायेंगे कपडे बदलेंगे और सामान छोड़कर चलेंगे । कौन लादेगा इतना सामन । केवल 60 रुपये की ही तो पर्ची कटवानी थी , सौदा सस्ता लगा तो पहुँच गए । वहाँ से करीब 8 :30 बजे हम दुर्ग्याणा मंदिर , जो बिलकुल पास है , के दर्शन के लिए निकल गए । बहुत ही सुन्दर मंदिर है । उसे भी गोल्डन टेम्पल की तरह सोने का बना रहे हैं वो लोग , और कुछ पर सोने की परत लग भी गयी है । वहाँ पहली बार मैंने किसी मंदिर में 100 रुपये का दान किया । हाहाहा ।

दुर्ग्याणा मंदिर के दर्शन करने के पश्चात हमारा ध्येय गोल्डन टेम्पल जाने का था और कार वाले ने तुरंत ही गाडी मोड़ दी गोल्डन टेम्पल की तरफ ! अत्यंत सुन्दर । जितना सुना , समझा था उसे भी कई गुना सुन्दर । तालाब (सर ) एकदम साफ़ स्वच्छ । वहाँ लाइन में थोडा समय जरुर लगता है लेकिन वो समय अखरता नहीं है । आस पास का माहौल बहुत अच्छा लगता है । अंदर जाने के भी कई रास्ते हैं । व्यवस्था अच्छी है । मुख्य स्थान अति सुन्दर है , पूरा स्वर्ण जड़ित । मुख्य द्वार , जहां से मंदिर का रास्ता शुरू होता है वहाँ दौनों ओर जो बिजली के लट्टू लगे हैं वो भी स्वर्ण जड़ित हैं । अंदर घुसते ही लगता है कि एक सर्वाधिक सुन्दर जगह के दर्शन हो रहे हैं , वहाँ गुरबानी का पाठ लगातार चलता रहता है । प्रकाश ही प्रकाश । ऊपर के लिए सीढ़ियां हैं लेकिन वो इतनी छोटी और रपटीली हैं कि गिरने का अंदेशा बना ही रहता है । हालाँकि वहाँ लोग लगातार साफ़ सफाई करते रहते हैं लेकिन फिर भी लगता है कि कोई न कोई जरुर ही फिसलता होगा ।

​दुर्ग्याणा मन्दिर में पानी के बीच से बना मंदिर तक का रास्ता
गोल्डन टेम्पल के दर्शन करने के पश्चात पास में ही स्थित वीरों के निशाँ की धरती जलियाँवाला बाग़ देखने की उत्सुकता थी । कौन भारतीय होगा जिसको अपने स्वतंत्रता के वीर सिपाहियों से लगाव और उनके प्रति सम्मान न होगा ? एक इतिहास आँखों में उतर आता है उस जगह पर , मैं अपने बच्चों को भी उस जगह से परिचित करना चाहता था , आखिर मेरे बाद देश का भविष्य वही  तो हैं । वहाँ दीवारों पर लगे गोलियों के निशान आज तक उस वक्त की याद दिलाते हैं ! और वहाँ स्थित शहीदी कुआँ मेरे बच्चों को बहुत आकर्षित कर रहा था । सही बना रखा है । उसी परिसर में वहाँ के शासन प्रशासन ने एक म्यूजियम भी बना रखा है जो स्वतंत्रता आंदोलन के समय के देश विदेश के अखबार और महान वीरों के चित्रों से सुसज्जित है । देखने लायक है ।


yogi saraswat
​दुर्ग्याणा मन्दिर 
    



​दुर्ग्याणा मन्दिर में लगी महावीर हनुमान की सुन्दर प्रतिमा



दुर्ग्याणा मन्दिर



​दुर्ग्याणा मन्दिर में पानी के बीच से बना मंदिर तक का रास्ता

Golden Temple at Night
​स्वर्ण मंदिर , रात के समय में ! ये फ़ोटो इंटरनेट से ली गयी है !
 


​                                  स्वर्ण मंदिर



क्रमशः  


अमृतसर से लौटकर पार्ट-2


इस यात्रा वृतान्त को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक करिये !

जलियाँवाला बाग़ में शहीदी कुआं देखकर उस वक्त का मंज़र आँखों में एक काल्पनिक तस्वीर बनाने लगा और अपने पुरखों पर गर्व से सीना फूल गया । वो भी लोग थे जो देश और हमारी खातिर अपने प्राणों का बलिदान कर गए , न परिवार देखा न दौलत । नमन , ऐसे महान सपूतों को । शहीदी कुआं में , जनरल डायर के सिपाहियों की गोलियों से बचकर भाग रहे लोग एक एक कर गिरते चले गए और उसी में समा गए । वहीँ कुछ ऐसी दीवारें हैं जिन पर आज भी जनरल डायर के सिपाहियों द्वारा चलाई गयी गोलियों के निशाँ दीखते हैं । अब इस हत्याकांड की यादों को जिन्दा रखने के लिए एक स्मारक बना दिया है सरकार ने । उस दिन 26 जनवरी थी , इस उपलक्ष्य में वहाँ कोई कार्यक्रम भी हो रहा था ।

बॉर्डर पर पहुंचे तो गाडी को पहले ही पार्क करना पड़ा , बोले आगे जाने की मनाही है , और इशारा करते हुए बोले वो रहा आपका कमान गढ़ गेट । असल में कामनगढ़ गेट पर ही हमें श्री भूपेंद्र सिंह जी मिला था जो हमें आगे लेकर जाते ! कामनगढ़ गेट पर महिला सिपाही तैनात थी , हमने उनसे भूपेंद्र जी के विषय में पूछा तो उन्होंने इशारा कर दिया कि वो आ रहे हैं , शायद साहू साब ने उन्हें बता दिया होगा । खैर ! भपेंद्र सिंह हमें एक एक चीज , एक एक जगह दिखाते हुए चलते गए और हम अपने आपको धन्य मानते हुए ख़ुशी ख़ुशी हर जगह को देखते गए और सोचते गए कि अगर हम बिना जानकारी के आते तो शायद वो जगहें देखना सम्भव नही हो पाता जिंहें हमने आज देखा । सबसे बढ़िया जगह हमें वो लगी जिसे वो जीरो पॉइंट कहते हैं और जहां से भारत और पाकिस्तान की सीमाओं का निर्धारण होता है ! वहाँ एक पत्थर लगा है जिस पर एंगल बना है , उसी एंगल के अनुरूप सीमा का निर्धारण किया गया है वहाँ । एक एक जगह जानकारी देती हुई और जोश जगाती हुई । करीब 3 :30 बजे गणतंत्र दिवस के कार्यक्रम शुरू हो गए थे और हम अपनी सीट पर आकर बैठ गए । अमृतसर और आसपास से आये बच्चों ने बेहतर कार्यक्रम आयोजित किये । वहीँ न्यूज़ नेशन की कोई रिपोर्टर भी उन प्रोग्राम्स को कवर करने आई थी ! करीब 5 बजे शाम को मुख्य परेड शुरू हुई ! परेड से पहले से ही दौनो ओर से जिंदाबाद के नारे गूँज रहे थे ! इधर वंदे मातरम् , भारत माता की जय , हिंदुस्तान जिंदाबाद और उधर से एक ही आवाज समझ में आ रही थी पाकिस्तान जिंदाबाद ! पूरी ताकत लगाकर बोल रहे थे दौनों ओर के लोग । इसका असर ये हुआ कि मेरे बच्चे अमृतसर से लौटने के बाद भी करीब 15 - 20 दिन तक यही नारे लगाते रहे ! एक कहता हिंदुस्तान। । दूसरा कहता जिंदाबाद !  कभी कभी मैं भी इनके देश प्रेम में शामिल हो जाया करता हूँ ।  

परेड की शुरुआत BSF के बैंड से हुई जो शायद गणतंत्र दिवस के उपलक्ष्य में बजाया गया होगा । उसके बाद BSF के दो सिपाही पूरी तरह से अत्याधुनिक हथियारों से लैस होकर आये फिर दो महिला सिपाहियों ने भारतीय नारी की शक्ति का परिचय दिया और फिर धीरे धीरे भारतीय सीमा सुरक्षा बल के जवानों ने अपनी चुस्ती फुर्ती और ताकत का वो प्रदर्शन किया जिसके लिए वो जाने जाते हैं । जय हिन्द !

करीब 5 : 30 बजे परेड ख़त्म हुई और हम सीधे श्री भूपिंदर सिंह से अनुमति लेकर गाडी में बैठे और सीधे दुर्ग्याणा मंदिर होते हुए वापस रेलवे स्टेशन ! 7 :30  बजे की ट्रेन थी , राउरकेला मुरी एक्सप्रेस । अगली सुबह 6 बजे गाजियाबाद और फिर वापिस 8 बजे अपने काम पर यानि कॉलेज में !

जय हिन्द , जय हिन्द की सेना !


जलियाँवाला बाग़ में स्थित शहीदी कुआँ

जलियाँवाला बाग़ में स्थित शहीदी कुआँ

जलियाँवाला बाग़ 


जलियाँवाला बाग़ में आज भी गोलियों के निशान बाकी हैं

जलियाँवाला बाग़ में स्थित स्मारक 

वाघा बॉर्डर पर भारत की महिला शक्ति

वाघा बॉर्डर पर भारत की शान को दिखता वीर सैनिक

वाघा बॉर्डर 

वाघा बॉर्डर पर पाकिस्तान के सैनिक से आँख मिलाता वीर सिपाही

वाघा बॉर्डर पर भारत और पाकिस्तान के झंडे उतारते समय




वाघा बॉर्डर पर भारत के वीर सैनिक ,परेड करते हुए

यह दृश्य आँखों में समा जाता है 


































 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...