Saturday, December 12, 2020

गोवा

 

तांबडी सुर्ला ट्रेक - भाग १ - घनदाट अरण्यातली पाऊलवाट

गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात नयनरम्य समुद्रकिनारे, देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी, सळसळतं नाईटलाईफ, आणि एकूणच मस्तीभरा माहोल! पण याच गोव्याची फारशी परिचित नसलेली एक बाजूही आहे. ती म्हणजे पश्चिम घाटातले धबधबे, पुरातन मंदिरे, आणि वन्यजीवन. गेल्या काही वर्षांत चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातल्या दृश्यामुळे दूधसागर धबधबा नको तितक्या प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. पण त्याच्याच आजूबाजूचे इतर धबधबे मात्र अजूनही त्यांचे रांगडेपण जपून आहेत. असाच एक धबधबा म्हणजे तांबडी सुर्ला. तिथलं घनदाट अरण्य, गर्द वृक्षराजीत लपलेला धबधबा, आणि पायथ्याचं प्राचीन शिवमंदिर याविषयी ट्रेकिंग समुदायाकडून बरेच काही ऐकून होतो. बरेच दिवस ती जागा to-do list वर होती. यंदाच्या पावसाळ्यातले ट्रेक ठरवताना अचानक एका परिचित ग्रुपच्या शेड्युलवर तांबडी सुर्ला ट्रेक दिसला. वेळेचं गणित जुळून येतंय असं दिसताच ट्रेक बुक करून टाकला. 

तांबडी सुर्ला ट्रेक फोटो कोलाज 

ठरलेल्या वेळेप्रमाणे पुणे स्टेशनवर ग्रुप लीडर आणि इतर मेम्बर्सना भेटलो. शनिवारी साधारण साडेचारच्या सुमारास आमचा गोवा एक्सप्रेस ने प्रवास सुरु झाला. वाटेतल्या हरएक स्टेशनात थांबत डुगडुगत जाणारी ती गाडी गोव्याला पोहोचायला तब्बल १२ तास घेते! पण थेट कुळें स्टेशन गाठायचे असेल तर हाच एकमेव पर्याय आहे. असो. गाडीत दूधसागरला जाणारा तब्बल ६० जणांचा ग्रुप होता. आणि तांबडी सुर्लाला जाणारे आम्ही फक्त पाच! अश्विनी, अपर्णा, प्रिया, आणि स्मिता अशा मुंबईच्या चार मैत्रिणी एकत्र आल्या होत्या. ट्रेक लीडर म्हणून पुण्याचा हरपाल होता. सगळ्या ग्रुपसोबत लगेचच मैत्री झाली आणि गप्पांचा फड रंगला. मग ट्रेकिंग मधले किस्से, भुता-खेताच्या गोष्टी, आणि काय नि काय. ट्रेनमधल्या गप्पांना विषयांचा कधी अंतच नसतो. कुळें स्टेशन पहाटे साडेचारला येणार होतं. साडेदहाच्या आसपास गप्पा आणि जेवण आवरून आम्ही झोपायच्या तयारीला लागलो. पण एकतर स्लीपर क्लास, त्यात सगळ्या कुडमुड्या स्टेशनांवर थांबणारी गाडी, आणि दूधसागर वाला ६० जणांचा ग्रुप, यांमुळे आज झोप काही नशिबात नाही हे लवकरच कळून चुकले! जरा वेळ डोळा लागतोय तर कुठले तरी स्टेशन हजर! त्यात दूधसागर ट्रेकला जाणाऱ्यांना पहाटे साडेतीनच्या सुमारास धबधब्याजवळच्या कुठल्याशा अडनिड्या स्टेशनावर उतरायचे होते. त्यामुळे त्यांची तर दोन वाजल्यापासूनच खुडबुड सुरु झाली होती. 

तांबडी सुर्ला मंदिराचे स्थान 

गाडी तासभर उशिराने धावत होती. पहाटे पाचच्या सुमारास अर्धवट झोपेतच आम्ही कुळें स्टेशनवर उतरलो. जवळच्याच एका जंगल रिसॉर्टवर एका दिवसाची राहण्या-जेवण्याची सोय केलेली होती. दहा मिनिटांतच आम्ही तिथे पोहोचलो. सात वाजता नाश्ता वगैरे करून ट्रेकला निघायचे असे ठरवून आम्ही आन्हिकं उरकायला रूमवर गेलो. रूममधला पलंग पाहून वाटलं जरा वेळ डुलकी काढूया. तसाही चार मुलींना आवरायला किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही. असे म्हणून मी आणि हरपाल जरा पहुडलो. रात्रभर अर्धवट झोप झाल्याने पटकन डोळा लागला. दारावरची थाप ऐकून खडबडून जाग आली आणि घड्याळात पाहतो तर काय, सव्वासात!! या चौघी जणी सगळं आवरून-सावरून घुश्शातच बाहेर उभ्या होत्या. त्यात नाश्त्याची तर ऑर्डरपण दिलेली नव्हती. बाहेर ड्रायव्हर ताटकळत उभा होता! पाच मिनिटांची डुलकी फारच महागात पडली होती. आम्ही लगेचच नाश्त्याची ऑर्डर दिली आणि घाईघाईत आवरायला लागलो. सगळं होईस्तोवर आठ वाजले. तसा संपूर्ण दिवस हाताशी होता. त्यामुळे तासभर उशीर म्हणजे काही फार काळजीचं कारण नव्हतं. 

भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य प्रवेशद्वार 

एकदाची आमची वरात निघाली. वातावरण प्रसन्न होतं. ऑगस्ट महिना असला तरी पावसाचा जोर फार नव्हता. रात्री कधीतरी एखादी सर येऊन गेलेली असावी. हवेतला तो ओलसर गारवा हवाहवासा वाटत होता. चिंब वनराई आळोखे-पिळोखे देत होती. गर्द झाडीतून जाणारा तो तुळतुळीत डांबरी रस्ता अजूनही झोपल्यागतच वाटत होता. मधेच उतरत्या छपराची, भलामोठा सोपा असलेली टुमदार घरे दिसत होती. अगदी तळकोकणात असावे असे वाटत होते. पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेले गोव्यातले जिल्हे म्हणजे एक वेगळीच दुनिया! पोर्तुगीजांच्या प्रभावाखाली फारसा न आलेला हा भाग गोव्याच्या मूळ संस्कृतीचे दर्शन घडवतो. त्यामुळेच या भागाचे कोकणाशी असलेले साधर्म्य अगदी उठून दिसत होते. हळूहळू घरे मागे पडली आणि घनदाट अरण्य सुरु झाले. इतक्यात ‘भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य’ असा फलक दिसला. तिथून पुढे निघालो आणि आजूबाजूचे रान अजूनच दाट झाल्यासारखे भासू लागले. अर्ध्या तासातच आम्ही तांबडी सुर्ला महादेव मंदिरापाशी पोहोचलो. इथूनच ट्रेक सुरु होतो. सकाळची वेळ असल्याने परिसर अगदी शांत होता. मंदिराबाहेरचे दुकानदार नुकतेच दुकान उघडून चहाचा घोट घेत बसले होते. आम्ही लगेचच ट्रेक सुरु केला.

घनदाट रानातली पाऊलवाट   

मंदिराच्या बाहेरून रानात शिरणारी ती तांबूसराड वाट आम्ही धरली आणि मोठ्या उत्साहात पुढे निघालो. पाचेक मिनिटातच गर्द रानाच्या मध्यात पोहोचलो. रानाचा तो विशिष्ट वास आसमंतात भरून राहिला होता. बाजूनेच एक ओढा खळाळत होता. मी लगेचच कॅमेरा बाहेर काढला. नशिबाने पाऊस नव्हता. इकडे-तिकडे फोटो काढत आमचा ट्रेक सुरु होता. पावसाळी ट्रेकिंग मध्ये वाटेत येणारे ओढे पार करणे म्हणजे एक वेगळेच प्रकरण असते. विशिष्ट दगडांवर पाय टाकत, तोल सावरत, कमीत कमी ओले होत पुढे जायचा उगीच प्रयत्न करायचा. मग शेवटी थोडा भिजलोच आहे अजून भिजूया असे म्हणून पाण्यातच बसकण मारायची! इथला ओढा काही त्याला अपवाद नव्हता. पण आज भिजण्यासाठी धबधब्यावर जायचे होते. म्हणून ओढ्याचा मोह टाळून आम्ही पुढे निघालो. आता वाट लहान-मोठ्या चढ-उतारावरून जात होती. रानातल्या दमट उष्म्यामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या. हवेतली आर्द्रता एवढी होती की चष्म्यावर सतत बाष्प जमा होत होते. अशी आर्द्रता कॅमेराला फारच मारक. मी मुकाट्याने कॅमेरा आत टाकला. 

हिरवंगार रान आणि खळाळणारा ओढा   

धबधबा आणि महादेव मंदिर

आता चढ सुरु झाला. सकाळी हवाहवासा वाटणारा ओलसर गारवा आता नकोशा दमट उष्म्यात बदलला होता. चार पावलांवर दम लागत होता. चढण फार तीव्र नव्हती. आजूबाजूची गर्द वनराई ती चढण जरा सुसह्य करत होती. आधीच ढगाळ हवा, त्यात उंच झाडांचा विस्तारलेला पर्णसंभार. त्यामुळे रानात अगदीच अंधारलेले होते. सह्याद्रीतल्या अंधारबन ट्रेकची आठवण होत होती. थोड्या वेळातच प्रचंड पाण्याचा घुमणारा आवाज कानावर येऊ लागला. धबधब्याच्या जवळ पोहोचल्याची ती खूण होती. उजवीकडच्या दरी झाडांच्या गर्दीतून वेगाने वाहणारे पाणी अधेमध्ये दृष्टीस पडत होते. आता मात्र कधी एकदा धबधब्याचे दर्शन होतेय असे झाले होते. एक वळण पार केले आणि अचानक दोन झाडांच्या मधून एक फेसाळता पांढरा पडदा दृष्टीस पडला. क्षणभर कळेचना हे पाणी आहे की ढग आहेत! थोडे अजून वर चढलो आणि त्या अखंड जलप्रपाताचे दर्शन झाले. गर्द वनराई नेसलेल्या त्या उंच पहाडावरून पाणी घोंघावत खाली कोसळत होते. पडता पडता त्याच्या अनेक शाखा-उपशाखा बनत होत्या. कातळ-कपाऱ्यांत खेळून त्या पुन्हा मुख्य प्रवाहास बिलगत होत्या. पाण्याचे ते रूप पाहून मी क्षणभर स्तब्धच झालो. सारा थकवा क्षणार्धात दूर झाला. थोडा वेळ ते सारे दृश्य नजरेत सामावून मी कॅमेरा बाहेर काढला. त्या जागेवरून फोटो फेसबुक डीपी काढण्यात आम्ही सारेच मग्न झालो. डाव्या बाजूने एक वाट थोडी खाली उतरत धबधब्याच्या दिशेने जात होती. प्रवाहाच्या थोडं जवळ जाता यावं म्हणून तिथून खाली उतरलो. 

गर्द झाडीतून दिसणारा तांबडी सुर्ला धबधबा 

ती जागा एखाद्या कुंडासारखी होती. तिन्ही बाजूंनी डोंगर होते. समोरच्या डोंगरावरून कोसळणारा धबधबा उजवीकडे दरीत झेपावत होता. इथून पाण्याचा प्रवाह अगदी ढेंगभर अंतरावर होता. बाजूला एक लहानसे डबकेसुद्धा तयार झाले होते. जणू निसर्गाने आमची पाण्यात डुंबायची सोयच करून ठेवली होती. पण पाण्याचा प्रवाह खूपच जास्त होता. शिवाय वाटही निसरडी झाली होती. एक घसरलेले पाउल म्हणजे कपाळमोक्षच! त्यामुळे आम्ही फार पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. तिथल्या दगडावर बसल्या-बसल्या तो धबधबा अनुभवणे म्हणजे अक्षरशः शब्दातीत होते. मुख्य म्हणजे त्या जागी आम्ही सहा जण वगळता बाकी कोणीच नव्हते! मुंबईजवळच्या प्रसिद्ध धबधब्यांजवळ दिसणारी गर्दी आणि गोंगाट इथे नव्हते. अशा शांततेत निसर्ग अनुभवणे आजकाल अप्राप्यच झाले आहे. ती शांतता उपभोगण्यासाठी मी त्या दगडावरच काही मिनिटे ध्यानस्थ झालो. समर्थ रामदासांनी शिवथर घळीचे वर्णन करताना लिहलेल्या ओळी मनात घुमत होत्या - गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे | धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे || प्रत्येक श्वासागणिक त्या धबधब आवाजाचा ताल मी अनुभवत होतो. तेवढ्यात बारीक पाऊस सुरु झाला. धबधब्याचे उडणारे तुषार भिजवत होतेच. आता पाउसही त्यात सामील झाला. पावसाबरोबर आलेल्या गार हवेच्या झोताने आता हुडहुडी भरू लागली. जेमतेम अर्ध्या तासापूर्वी दमट हवेत घामाघूम झालेले आम्ही आता त्या प्रपाताच्या शेजारी कुडकुडत उभे होतो. निसर्गाची किमया म्हणजे अजबच! इथे कॅमेरा काढायला मात्र काही वाव नव्हता. मनसोक्त धबधबा अनुभवून आम्ही तिथून निघालो.


येतानाची उताराची वाट अपेक्षेपेक्षा लवकरच संपली. खालच्या ओढ्याजवळ फोटो काढायला थोडा वेळ थांबलो. पावसाने भिजवले होतेच. त्यामुळे आता ओढ्यात डुंबायची इच्छा होत नव्हती. शिवाय मंदिरातही जायचे होते. लवकरच आम्ही मंदिराबाहेरच्या दुकानांजवळ पोहोचलो. मंदिराचा परिसर भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केला आहे. मंदिरात तुरळक गर्दी होती. प्रवेशद्वारातून आत शिरलो आणि समोरच काळ्या बेसाल्ट पाषाणामध्ये घडवलेले सुबक मंदिर नजरेस पडले. आजूबाजूच्या गर्द हिरव्या रानाच्या पार्श्वभूमीवर ते काळ्या पाषाणातले मंदिर फारच उठून दिसत होते. हे मंदिर बाराव्या शतकात कदंब राजवटीत बांधले गेले. मंदिरासाठी वापरला गेलेला दगड हा त्या परिसरात सापडणाऱ्या लाल खडकाशी मिळता-जुळता नाही. त्यामुळे तो घाटमाथ्यावरून आणला गेला असावा असा कयास आहे. या पूर्वाभिमुखी मंदिराची शैली कर्नाटकातील ऐहोळे येथील मंदिरांवर बेतलेली असून कळस अर्धवट बांधलेला आहे. या शैलीतले गोव्यातले हे एकमेव मंदिर आहे. घनदाट रानात बांधलेले असल्याने हे मंदिर परकीय आक्रमणांपासून सुरक्षित राहिले. मंदिरातले शिवलिंग अजूनही पूजेत आहे. 


तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिर 

आम्ही बूट काढून आत शिरलो. मंदिराच्या पायऱ्या चढताना पायांवर ट्रेकचा परिणाम जाणवत होता. गोव्यातल्या इतर मंदिरांपेक्षा हे तसे लहानसेच होते. मात्र त्यावरची कोरीवकला फारच सुरेख होती. मंडपातले स्तंभ साधेच होते; मात्र भौमितिक आकारांनी त्यांचे साधेपण खुलून दिसत होते. छतावारचे पानाफुलांचे कोरीवकाम फारच सुरेख होते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहाच्या बाहेर असलेले नागांचे शिल्प. साधारण दीड फूट उंचीचे, नागांचे शिल्प कोरलेले दोन आयताकृती दगड गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन बाजूंना ठेवलेले होते. जणू देवाचे द्वारपाल. आतमध्ये शिवलिंगासमोर निरांजन तेवत होते. दोन-चार फुले वाहलेली दिसत होती. त्या निरांजनाच्या मंद प्रकाशात ते गर्भगृह काहीसे गूढ मात्र तरीही प्रसन्न वाटत होते. दर्शनानंतर आम्ही मंदिराबाहेर पडलो. मंदिराच्या बाहेरील भिंतींवरचे कोरीवकाम अजूनच सुंदर होते. तिथे थोडीफार फोटोग्राफी करून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. 


छतावरील सुरेख कोरीवकाम  

द्वारपालांसदृश वाटणारी नागशिल्पे  

रिसॉर्टवर परत आलो तेव्हा सुग्रास भोजन स्वागताला हजर होतेच. आम्ही लगेचच आवरून जेवणावर ताव मारला. जेवता-जेवता सहज माझं पायाकडे लक्ष गेलं आणि पाहतो तर काय, पायावर रक्ताचे ओघळ! ना काही वेदना ना काही जळजळ. हे म्हणजे हमखास जळूचे काम. पश्चिम घाटातली जंगले म्हटली की जळवा आल्याच. आता या ट्रेकमध्ये कोणत्या जागी जळू माझ्यावर पायावर चढली देव जाणे! तिच्या चाव्याने वाहू लागलेलं रक्त काही थांबत नव्हतं. जळवेच्या लाळेत हिपॅरीन नामक पदार्थ असतो जो रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबवतो. मी दर दहा मिनिटाला रक्त पुसत होतो. शेवटी दोनेक तासांनी रक्त वहायचे थांबले. आश्चर्य म्हणजे केवळ मलाच हा जळवांचा अनुभव आला होता. असो. रिसॉर्टच्या मागच्या बाजूने एक नदी वाहत होती. परतीच्या प्रवासाला अजून वेळ होता. नदीकाठी थोडा वेळ घालवला आणि चहापान करून सामान आवरायला घेतले.  

ट्रेकमध्ये जमलेला धमाल ग्रुप 

पाचच्या सुमारास आम्ही रिसॉर्टवरून निघालो. कुळें स्टेशनवरून मडगाव आणि तिथून मत्स्यगंधा एक्स्प्रेसने मुंबई असा बेत होता. ट्रेक संपल्याची हुरहूर मनात होती. पण गोव्यातले एक फारसे परिचित नसलेले ठिकाण अनुभवल्याचे समाधान मनात होते.    

 

 

 

 गोवा बहुतेक सर्वांना माहिती असल्याने जास्त लांबण न लावता फक्त प्रचिच टाकतो आहे. प्रचि १
सुर्योदय, ओझरान बीच

-
-
-
प्रचि २

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४
वागाटोर बीच

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६

-
-
-
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८
शंखांची नक्षी.

-
-
-
प्रचि ९
सुर्यास्त, वागाटोर बीच

-
-
-
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११
अ‍ॅग्वादा किल्ला.

-
-
-
प्रचि १२
सुर्यास्त, कलंगुट बीच.

-
-
-
प्रचि १३
Our Lady of the Immaculate Conception, Panji.

-
-
-
प्रचि १४
श्री शांतादुर्गा, पोंडा.

-
-
-
प्रचि १५
मंगेशी, पोंडा.

-
-
-
प्रचि १६
Besilica of Bom Jesus, Old Goa.

-
-
-
प्रचि १७

-
-
-
प्रचि १८

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २१

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४
Church of St. Francis of Assisi, Old Goa.

-
-
-
प्रचि २५
Church of Saint Cajetao, Old Goa.

-
-
-
प्रचि २६

-
-
-
प्रचि २७

-
-
-
प्रचि २८

-
-
-
प्रचि २९
सुर्योदय, अगोडा बीच.

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१
संध्याकाळ, अ‍ॅगोडा बीच.

-
-
-
प्रचि ३२

-
-
-
प्रचि ३३
Cuba Goa and beach huts.

-
-
-
प्रचि ३४

-
-
-
प्रचि ३५

-

 सांखळी - एक धार्मिक पर्यटनस्थळ

भारताच्या पश्चिमेकडील गोवा हे एक चिमुकले राज्य. पण आज ते भारतातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांचे आकर्षणस्थान बनले आहे.
सांखळी - एक धार्मिक पर्यटनस्थळ
सिंधुदुर्ग सोडुन जेव्हा आपण गोव्यात प्रवेश करतो.  तेव्हा लागणारे दुसरे रेल्वे स्थानक म्हणजे थिवीम, या थिवीम पासून ५ की. मी वर साखळी हे निसर्गरम्य व धार्मिक पर्यटनस्थळ आहे. येथे जाण्यासाठी थिवीम पासून दर ५ मिनिटांनी खाजगी बसेस उपलब्ध आहेत.या गावाचे नाव साखळी असण्याचेही एक कारण म्हणजे, गावात भव्य व पुरातन अशा मंदीरांची एक साखळीच आहे. सांखळीतील पहिले आकर्षण आहे स्वातंत्र्यसेनानी राण्यांच्या व तसेच याच घराण्यातले माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या घराशेजारी असलेले विठ्ठलाचे एक पुरातन मंदीर, मुळचे राजपुत व मध्ययुगात गोवा येथे स्थायिक झालेल्या राणे यांचे हे कुलदैवत, या मंदीराचे प्रांगण अतिशय भव्य आहे, आषाढी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. लाल माती व निळे आकाश हे यांच्या मधोमध या मंदीराचे दर्शन अवर्णनीय आहे. अभ्यासक अनिरुद्ध बिडवे यांच्या मते, सांखळीच्या विठ्ठल मंदीरातली ही मुर्ती म्हणजे मुळची पंढरपुर येथील उत्सवमुर्ती, उत्सवमुर्ती म्हणजे मुळ मुर्तीची हानी न होण्याकरीता तिच्या ऐवजी तिच्या सारखीच दिसणारी व फक्त उत्सवात वापरली जाणारी दुसरी मुर्ती. फार पुर्वी राण्यांच्या एका पुर्वजाने साक्षात विठोबाचा दृष्टांत झाला म्हणुन पंढरपुरास जाऊन ही उत्सवमुर्ती गोव्यास आणली व तिथेच तिची प्रतिष्ठापना केली तेव्हापासून मुळ पंढरपुरात उत्सवमुर्ती नाही. कालांतराने या राण्याचे पुर्वज तिथेच स्थायिक झाले व गोव्याचे राणे झाले, विट्ठलाचे मुळ मंदीर सन १४८८ साली बांधण्यात आले मात्र सध्या दिसून येणारे मंदीर हे सन १९४२ साली ग्व्हालेरच्या राजमाता गजराराजे यांनि बांधले व या मंदीरावर ग्व्हाल्हेर वास्तुशैलीची छाप आहे. या गजराराजे म्हणजे राणे घराण्याच्या कन्या व सध्याचे शिंदे घराण्याचे वंशज ज्योतिरादित्य यांच्या पणजी. गोव्याच्या राण्यांची पोर्तुगिजांच्या जुलूमी राजवटीविरोधात केलेलि अनेक बंडे प्रसिद्ध आहेत.

येथून पुढे असणारे, दत्त मंदीर गोव्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदीर कसे असावे याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या मंदिरातील काही क्षणच मनातील सर्व क्षीण घालवणारे ठरतात. अतिशय शांतता असणार्‍या या मंदिरातील दत्तमुर्तीही अतिशय सजीव आहे. येथुन थोडे पुढे लागते राधा- कृष्ण मंदीर, या मंदिराचे स्वरुप हे दत्त मंदीरासारखेच आहे.

साखळी पासून एक कि. मी. वर असलेल्या अरवेलम या छोट्यास्या गावात काजू, कोकम, फणस व आंब्याच्या जंगलात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला दिसते अरवलेम येथील पांडवलेणी, हा परिसर पूर्वी दंडकारण्य परिसराचाच एक भाग म्हणुन ओळखला जायचा. अतिशय निबीड असलेल्या या अरण्यात निवासासाठी म्हणून पाडंवांनी ब-याच ठीकाणी काही लेण्या खोदल्या असाव्यात असा स्थानिक प्रवाद आहे , सहापैकी पाच खोल्या मोठ्या असून त्यांत प्रत्येकी एक शिवलींग आहे व सहावी खोली छोटी असून ती द्रोपदीची खोली म्हणून ओळखली जाते, जांभ्या दगडात कोरलेल्या या लेण्या जणू पाच पांडवांचे व द्रोपदीचे प्रतिनिधीत्व करतात.

संधोधनाअंती मात्र या लेण्या ७ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते व या लेण्यांमध्ये ब्राम्ही लिपीतील काही शिलालेखसांखळी - एक धार्मिक पर्यटनस्थळ असून ते शंकर व सुर्याचे प्रतिक आहेत. येथून पाच मिनीटे पुढे चालत गेल्यावर लागते पुरातन रुद्रेश्रर मंदीर, महाशिवरात्रीस येथे मोठी जत्रा भरते. मंदीराच्या परीसरात आर्य नामक जमात मोठ्या प्रमाणात आहे. मंदिराच्या बाजुला डोंगरातील पाय-या चढून गेल्यावर दिसतो येथील प्रसिध्द अरवेलम धबधबा ! अतिशय नयनरम्य असा हा जलप्रपात अगदी मे मध्येही अखंडपणे वाहत असतो. जांभा खडकास मधोमध खड्डा पाडून खाली कोसळणा-या या धबधब्या जवळ जाण्यासाठी पाय-या आहेत व परीसरात बसण्यासाठी आसनांची सोयसुध्दा करण्यात आलेली आहे. नैसर्गिक सौंदर्यांचा येथे पर्यटन विकासासाठी पुरेपुर वापर करून घेतला आहे.  साखळी गावातील नागरीकांनी आपली संस्कृती आजही जपली आहे. पुर्वेकडचा हा गोवा आपल्या कोकणाशी तंतोतत साम्य दाखवतो. अगदी नवख्या छायाचित्रकाराने देखील फोटो काढला तरी त्यास पहीले बक्षीस मिळेल असा हा परीसर मे महिन्याच्या सुट्टीतही खरोखर पाहाण्यासारखा आहे. रस्त्यावर पडलेले कोकम टिपत ती खात फिरताना भर उन्हाळ्यात सुध्दा हिरवेगार असे डोंगर पाहताना कसे वाटते हे शब्दात खरेच सांगता येण्यासारखे नाही. त्यासाठी प्रत्यक्षात साखळी येथे जायला हवे. हा परिसर पाहून माणूस परततो ते परत कधी यायचे हा विचार करतच!

गोव्यातील अनोखे संग्रहालय

 हिंदी महासागरातील भारताच्या राष्ट्रहितांच्या रक्षणाची जबाबदारी भारतीय नौदल पाण्याखाली, पाण्यावर आणि समुद्रावरील आकाश अशा तीनही ठिकाणी सक्षमपणे पार पाडत आहे. यापैकी समुद्रावरील आकाशातील भारतीय नौदलाच्या शक्तीची संपूर्ण ओळख करून घेण्यासाठी गोव्यातील नौवहन संग्रहालय (Naval Aviation Museum) एक महत्वाचे साधन ठरते.

भारतीय नौदलाच्या हवाई शाखेची स्थापना 1958 मध्ये झाली. तेव्हापासूनच्या या शाखेच्या गौरवशाली इतिहासाच्या आठवणी या संग्रहालयात जागृत ठेवण्यात आलेल्या आहेत. बांगलादेश मुक्तिसंग्रामात 4 डिसेंबर 1971 रोजी भारतीय नौदलाने पूर्व पाकिस्तानातील चितगाँग आणि कॉक्स बाजारावर हवाई हल्ले केले होते. भारतीय नौदलातील सी-हॉक आणि एलिझे या लढाऊ विमानांनी ‘भा. नौ. पो. विक्रांत’वरून (INS Vikrant) वरून उड्डाणे केली होती. त्या हल्ल्यांमुळे त्या युद्धाला निर्णायक वळण मिळाले होते. त्यामुळे नौदलाच्या हवाई शाखेची भूमिका, त्याचा गौरवशाली इतिहास यांची माहिती सर्वांना व्हावी यासाठी एक संग्रहालय उभारले जावे अशी संकल्पना ‘भा. नौ. पो. हंस’ (INS Hansa) या तळाचे तत्कालीन कमांडिंग ऑफिसर कॅप्टन (नि.) जे. सी. पुरी यांनी 1971 मध्ये मांडली होती. त्यानंतर नौदलाच्या हवाई शाखेचे मुख्यालय गोव्यात असल्यामुळे ते संग्रहालय या तळाच्या जवळपासचे उभारण्याचा निर्णय झाला आणि गोव्यातील विमानतळाच्या परिसरातच 12 ऑक्टोबर 1998 ला हे अनोखे संग्रहालय सर्वांसाठी खुले झाले.

या संग्रहालयाचे दोन प्रमुख भाग आहेत - खुले दालन आणि मुख्य इमारतीतील दालने. संग्रहालयाच्या मुख्य फाटकातून आत गेल्यावर खुल्या दालनात ठेवलेले सुपर काँस्टेलेशन हे भव्य विमान दृष्टीस पडते. या विमानाने आधी इंडियन एअरलाईन्समध्ये, त्यानंतर भारतीय हवाईदलात आणि अखेरीस हवाई शाखा सुरू झाल्यावर भारतीय नौदलात सेवा बजावलेली होती. या खुल्या दालनात सुमारे पंधरा विमाने आणि हेलिकॉप्टर्स ठेवलेली आहेत. पहिले विमानवाहू जहाज भा. नौ. पो. विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलात सामील झाल्यावर त्यावर ठेवण्यात आलेले सी हॉक (Sea Hawk) आणइ एलिझे (Elize) ही लढाऊ विमाने या संग्रहालयात ठेवलेली आहेत. यातील प्रत्येक विमान आणि हेलिकॉप्टर तसेच हवाई शाखेतील अन्य साधनांसमोर त्यांच्या संबंधीचे माहितीफलक ठेवलेले आहेत. याच दालनात नौदलाच्या सेवेत राहिलेल्या विमानांची इंजिनेही पाहायला मिळतात.

नौवहन संग्रहालयाच्या दुमजली इमारतीत प्रवेश करताच आपण एक वेगळ्यात विश्वात प्रवेश करतो. या इमारतीचे प्रवेशद्वार भारतीय नौदलातील दुसरे विमानवाहू जहाज असलेल्या – विराटच्या केबिनच्या प्रवेशद्वाराप्रमाणे केलेले आहे. या इमारतीतील काही भागांवर विविध विमाने, हेलिकॉप्टर्सची चित्रे रेखाटलेली आहेत. तसेच नौदलातील विमानांवर, हेलिकॉप्टर्सवर बसवण्यात येणारे बाँब्स आणि क्षेपणास्त्रेही येथील दालनांमध्ये पाहायला मिळतात. बांगलादेश युद्धाच्यावेळी भारतीय नौदलाच्या हल्ल्यात पाकिस्तानी नौदलाच्या झालेल्या हानीबाबतची आणि अमेरिकन नौदलाच्या हेरगिरी करणाऱ्या विमानाच्या भारतीय हवाई हद्दीतील घुसखोरीविषयीची माहिती एका दालनात मांडण्यात आलेली आहे.

सोनोबॉय रुममध्ये सागराच्या पृष्ठभागाखालील लक्ष्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाच्या विमानांवर वापरले जाणारे संवेदक प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. भर समुद्रात असताना आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास नौसैनिकांकडून योजल्या जाणाऱ्या विविध उपायांची माहिती सुरक्षा कक्षात मांडलेली आहे. अशा प्रसंगी वापरली जाणारी जीवनरक्षक साधनेही येथे पाहता येतात. मल्टिमीडिया रुमला स्वप्नपूर्ती करणारे दालन म्हणूनही ओळखले जाते. कारण या दालनात बसवलेल्या सिम्युलेटरच्या मदतीने एखाद्या लढाऊ विमानाच्या कॉकपीटमध्ये बसून लढाऊ विमान उडवण्याचा अनुभव घेता येतो.
नौदलाच्या हवाई शाखेची स्थापना झाल्यापासून 1997 पर्यंत ज्या वैमानिकांनी मातृभूमीचे रक्षण करताना विविध संघर्षांमध्ये असीम त्याग केला, त्या सर्व शहिद वैमानिकांची नावे इमारतीतील व्हरांड्याच्या भिंतीवरील ग्रॅनाईटवर कोरलेली आहेत. संग्रहालयाचा गाभा असलेल्या मुख्य इमारतीतील ध्यान कक्षात ग्रॅनाईटच्या भिंतीवर निळ्या रंगात चित्रे रेखाटलेली आहेत. संग्रहालयाच्या सर्वात मोठ्या कक्षात भारतीय नौदलाच्या हवाई शाखेचा इतिहास सांगणारी आणि गोवा मुक्तिसंग्रामाशी संबंधित अनेक छायाचित्रेही लावलेली आहेत. असे हे आगळेवेगळे संग्रहालय गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्येही लोकप्रिय झाले आहे.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/12/blog-post_24.html

 गोवा.

सुमारे साडे चारशे वर्षे पोर्तुगिज अंमलाखाली राहीलेले आणि १९६१ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३० मे १९८७ रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळालेले भारताच्या नकाशावरील एक छोटेसे राज्य.

निसर्गाचा प्रचंड वरदहस्त आणि थोडासा वेगळाच सांस्कृतीक वारसा लाभलेल्या ह्या चिमुकल्या राज्यात देशी-विदेशी पर्यटकांचा कायम राबता असतो त्यामुळे राज्याच्या महसुलात पर्यटन व्यवसायाचा वाटा फार मोठा आहे.

गोव्याला भेट देणाऱ्या मंडळींपैकी कुणाला तिथले निसर्ग सौंदर्य, सुंदर समुद्रकिनारे, पोर्तुगिज स्थापत्यशैलीतल्या पुरातन वास्तु बघण्यात रस असतो तर कुणाला तिथे स्वस्त दरात मिळणारे मद्य किंवा मत्स्याहार आकर्षित करत असतो. काहीजण फक्त आराम करायला येतात तर काहीजण निव्वळ कुठेतरी फिरायला जायचंय, तर गोव्याला जाऊ अशा विचाराने येतात.

प्रत्येक नावाजलेल्या पर्यटनस्थळाच्या काही काळ्या बाजु असतात त्याला गोवाही अपवाद नाही. पर्यटनाव्यतिरीक्त तिथला वेश्याव्यवसाय, अंमलीपदार्थांची तुलनात्मकरित्या सहज उपलब्धता आणि जुगाराला अधिकृत मान्यता प्राप्त असलेले कॅसिनो ह्या गोष्टीही मोठ्या प्रमाणावर पाहुण्यांना वारंवार गोव्याला येण्यास आकर्षित करतात.

नव्या सहस्त्रकाच्या सुरुवातीपर्यंत गोव्यातील वास्को-द-गामा (वास्को) शहराजवळचा ‘बायना बीच’ वेश्याव्यवसायाचे केंद्र म्हणून (कु)प्रसिद्ध होता.
खरंतर किनाऱ्यावरच्या एखाद्या शॅक मधुन बिअरच्या बाटल्या घेउन आम्हा कॉलेजकुमार मित्रमंडळींना वाळुवर निवांतपणे बसुन बियरचे घुटके घेत, गप्पा गोष्टी करत समोर पसरलेला समुद्र न्याहाळत बसण्यासाठी हे ठिकाण त्यावेळी फार मस्त वाटायचे, पण टपरीवजा बार काउंटर्सच्या सोभोवती डिजे साउंड सिस्टिमवर जोरदार संगीत वाजत असलेल्या ह्या समुद्रकिनाऱ्याचा वापर प्रामुख्याने ओपन एअर पिकअप जॅाईंट म्हणुन होत असल्याने इथे स्थानिक मंडळी आणि कुटुंबीयांसोबत आलेले पर्यटक मात्र फारसे फिरकत नसत.
पुढे तिथे अंमली पदार्थांचा व्यापार, लुटमार, परदेशी महिला पर्यटकांचा विनयभंग, हत्या वगैरेंसारख्या गंभीर गुन्ह्यांचा आकडा वाढु लागल्यावर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेउन सरकारने वेश्याव्यवसायाचे हे केंद्र उध्वस्त केले.
आता तिथे वॅाटर स्पोर्ट्स, आयुर्वेदीक मसाज वगैरेंसाठी बऱ्यापैकी पर्यटक सहकुटुंब येत असले तरी पुर्वीची मजा राहिली नाही त्यामुळे ह्या ठिकाणाचे चैतन्य हरवल्यासारखे वाटते 😀
माहीती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इतर व्यवसायांप्रमाणे ह्या व्यवसायाचे स्वरूपही बदलले असल्याने आता अशा विशिष्ट ठिकाणच्या ‘बाजारा’ ची गरजही उरली नाहीये त्यामुळे विकेंद्रीकरण झाले असले तरी केवळ ‘ह्या’ कारणासाठी गोव्याला भेट देणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही.

साठच्या दशकात अमेरीकेत उदयाला येउन सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत जगभर पोचलेली हिप्पी संस्कृती गोव्यात रूजली, फोफावली नसती तरच नवल!
उत्तर गोव्याच्या बारदेश तालुक्यातील हणजुणे (अंजुना) गांव तर त्यावेळी हिप्पी लोकांचे हक्काचे ठिकाण बनले होते.
स्थानिक लोकजीवनावरील पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आणि नव्याने स्वतंत्र झालेल्या ह्या प्रदेशाला सत्याऐंशी साली स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळेपर्यंत असलेली अकार्यक्षम पोलीस यंत्रणा व अंमलीपदार्थविरोधी कायद्यांचा अभाव अशी हिप्पी जीवनशैलीसाठी पोषक परिस्थिती असल्याने गोवा अमेरिका आणि युरोपातल्या हिप्पींना आकर्षित करत होता. ‘हिप्पी ट्रेल’ (Hippy Trail) अंतर्गत युरोप ते आशिया ६००० मैलांचा प्रवास जमीनीवरून करत फार मोठ्या प्रमाणावर ही मंडळी गोव्यात येत असत.
एकाच ठिकाणी दिर्घकाळ वास्तव्य करणे त्यांच्या विचारधारेत बसत नसले तरी त्यांच्यापैकी कित्येकजण गोव्यत कायमचे स्थाईक झाले आहेत.

ऐंशीच्या दशकात बदललेल्या भूराजकीय परिस्थितीमुळे हिप्पी ट्रेलचे इराण, अफगाणिस्तान व पाकिस्तानातुन जाणारे प्रवासाचे मार्ग बंद झाल्याने आणि युरोप, अमेरिकेत हिप्पी चळवळीला उतरती कळा लागल्यावर पाश्चात्य देशांतुन येणाऱ्या हिप्पींचे प्रमाण घटत जात आज ते अत्यल्प झाले असले तरी गोव्याला जागतीक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यात हिप्पी लोकांनी दिलेले योगदान नाकारता येत नाही, त्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे.

आता हिप्पी गेले असले तरी त्यांच्या संस्कृती/जीवनशैलीचा प्रभाव इथे अजुनही दिसुन येतो. आपल्या परतीच्या प्रवासासाठी किंवा वास्तव्य कालावधी वाढणार असल्यास पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी आपल्या बरोबर आणलेले परदेशी सामान/वस्तु विकण्यासाठी सत्तरच्या दशकात अंजुना बीचवर सुरू केलेले ‘Flea Market’ त्या परिसरात अजुनही टिकुन आहे. नोव्हेंबर ते एप्रिल ह्या कालावधीत दर बुधवारी भरणाऱ्या ह्या बाजाराचे स्वरूप आता बदलले आहे. हिप्पी विक्रेत्यांची जागा तिबेटी, नेपाळी, काश्मिरी, उत्तर आणि दक्षिण भारतीय तसेच स्थानिकांनी घेतली आहे. (कोविड निर्बंधांमुळे हा बाजार आमच्या ह्या गोवा भेटीच्यावेळी बंद होता.)

हिप्पी पर्वात अंजुना आणि आसपासच्या बागा, कळंगुट, हरमल (आरंबोल) अशा समुद्रकिनाऱ्यांवर विविध अंमली पदार्थांच्या नशेत पंग होऊन ट्रान्स मुझिकच्या तालावर रात्रभर रेव्ह पार्ट्या चालत.
आजही अशा पार्ट्या चालू आहेत फक्त ठिकाणे बदलली आहेत आणि पाश्चात्य देशांतून आलेल्या हिप्पींची जागा भारतीय नव-हिप्पींनी घेतली आहे.

Low-to-Medium BPM सायकॅडेलीक ट्रान्स संगीत आवडत असल्याने 2015 मध्ये पुण्यातल्या ‘ब्लु फ्रॅाग’ येथील पार्टीमुळे माहिती झालेल्या ‘गोवा गिल’ ह्या वयोवृद्ध डिजेच्या पुढे गोव्याला वॅगॅटोर येथील Origen Jungle Club मध्ये झालेल्या, तर ‘राजा राम’ ह्या डिजेच्या Hill Top Goa अशा दोन ओपन एअर क्लब्ज मध्ये रात्रभर चालणाऱ्या रेव्ह पार्टीजना आवर्जुन उपस्थितीही लावली आहे. गंमत म्हणजे ‘गोवा गील’ आणि ‘राजा राम’ ही नावे भारतीय वाटत असली तरी हे दोघे मुळचे अनुक्रमे अमेरिकन आणि ॲास्ट्रेलियन डिजे आहेत!

देशी- विदेशी डिजेंच्या अशा पार्टीजचे पास बुक माय शो आणि ॲानलाईन तिकीट विक्री करणाऱ्या तत्सम वेबसाईट्स, फेसबुक पेजेसवर राजरोसपणे उपलब्ध होत असल्याने मुंबई, पुणे, बंगरूळु, हैदराबाद ही महानगरे आघाडीवर असली तरी भारतातल्या जवळपास सर्व शहरांतुन अशा पार्टीजना तरूणाईचा भरघोस प्रतिसाद मिळतो तसेच विदेशी पर्यटकांची उपस्थितीही लक्षणीय असते.

व्यक्तिगत आयुष्यात अशाप्रसंगी "been there... done that..." असा दृष्टिकोन सदैव बाळगूनही का कोणास ठाऊक पण, गांजा पासुन कोकेन पर्यंत नानाविध प्रकारच्या नशा करून भोवताली सायकॅडेलीक संगीतावर थिरकणारी कोवळ्या वयातली कॉलेजवयीन मुलं-मुलीं, तरूण-तरूणी पाहुन येणारी खिन्नता व त्यांना जाणते-अजाणतेपणी हे अमर्याद स्वातंत्र्य आणि पैसा पुरवणाऱ्या त्यांच्या पालकांविषयी मनात उफाळून येणारा लाक्षणिक राग अशा भावना दूर सारून ह्या पार्टीज एंजॅाय करणे सुरूवातीला थोडेसे कठीण गेले असले तरी, 'शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न असुन आपल्याला कोणाच्या खाजगी/वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा वा ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही' ह्याची खूणगाठ मनाशी पक्की केल्यावर ते जमु लागले!

वेगवेगळ्या कारणांसाठी गोव्याला अनेकदा भेट दिलेली असल्याने तिथल्या काही स्मृती ह्या लेखाच्या निमित्ताने डोके वर काढत आहेत त्यामुळे बरंच अवांतर झाले आहे तेव्हा आता मालिकेतील ह्या भागाचा मुख्य विषय, म्हणजे कॅसिनोकडे वळतो 😀

"नऊच्या सुमारास आम्हाला मांडवी नदीच्या किनाऱ्यावरच्या ‘कॅसिनो प्राईड’ च्या तिकीट काउंटरपाशी सोडुन बहिण घरी निघुन गेली आणि आम्ही प्रवेशाची तिकीटे घेऊन मांडवी नदीत नांगरून ठेवलेल्या बोटीवर असलेल्या कॅसिनो पर्यंत पोचवणाऱ्या लॅांचची वाट बघत जेट्टीवरच्या खुल्या प्रतिक्षालयात जाऊन बसलो…"

तिथे दहा-बारा मिनिटे वाट बघितल्यावर लॉंच आली आणि पुढच्या काही मिनिटांत आम्ही ‘कॅसिनो प्राईड’ मध्ये पोचलो!

casino pride

.

कित्येक हॅालिवुड चित्रपटांतुन विशेषत: बॅांड पटांतुन आपल्याला कॅसिनोंचे दर्शन घडत असते. त्यांतून कॅसिनोंची आकर्षक सजावट, तिथला ग्लॅमरस / स्टाईलीश स्री / पुरूषांचा सहज-बिनधास्त वावर, मद्यपान, वेगवेगळ्या प्रकारच्या जुगारी खेळांत होणारी खेळाडूंची हार-जीत अशी दृष्ये आपल्या परिचयाची झालेली असतात.

अशा झकपक,चैतन्यमयी वातावरणाची आवड असल्यास किंवा ते अनुभवायची इच्छा असल्यास त्यासाठी अमेरिकेतील ‘लास वेगास’ (Las Vegas), चीनचा एक प्रांत असलेल्या मकाउ (Macau) अशा कॅसिनोंची पंढरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या ठिकाणी किंवा अन्य कुठल्या देशात जाण्याची गरज नाही, तो अनुभव आपल्याला गोव्यात अगदी सहज घेता येतो.

ग्लॅमरस माहौल, खाणे-पिणे, मनोरंजन, नाईट लाईफ, मौज-मस्तीची आवड/आकर्षण तसेच स्वत:च्या आणि इतरांच्या जीवनशैलीविषयी खुला दृष्टीकोन बाळगणाऱ्यांनी आपल्या गोवा भेटीत एखाद्या कॅसिनोला आवर्जुन भेट द्यावी, त्यांच्यासाठी २४/७ सुरू असणाऱ्या ह्या ठिकाणी घालवलेले दिवसातले काही तास असोत की संपुर्ण रात्र असो, तो चांगल्या आठवणींच्या कप्प्यात जपला जाण्यासारखा एक यादगार अनुभव असेल हे नक्की! पण जर 'जुगार', 'मद्यपान', 'मौजमजा', 'छानछौकी', 'विलासीवृत्ती' विषयी घृणा, तिरस्कार, नावड अशा कुठल्या विशिष्ट किंवा नकारात्मक भावना मनांत असतील तर अशा व्यक्तींनी मात्र (विकतचा) मनस्ताप टाळण्यासाठी चुकुनही तिकडे फिरकू नये!

असो... भारताच्या भुमीवर जुगाराला कायदेशीर मान्यता नसल्याने कायद्यातल्या पळवाटा शोधून गोवा सरकारने मांडवी नदीत नांगरून ठेवलेल्या बोटींवर ‘तरंगत्या’ कॅसिनोंसाठी परवानगी दिल्यावर १९९९ साली पहिला कॅसिनो सुरू झाला आणि आजघडीला गोव्यातल्या कॅसिनोंची संख्या पंधरा-सोळाच्या घरात पोचली आहे. त्यातले बरेचसे आकारमानाने भव्य असे कॅसिनो हे मांडवी नदित नांगरून ठेवलेल्या जहाजे/बोटी/यॅाट्सवर तरंगत्या स्वरूपात असले तरी नंतर कायदे आणखीन वाकवत / त्यातल्या आणखीन पळवाटा शोधत जमीनीवरच्या काही पंचतारांकीत हॅाटेल्स व रिसॅार्ट्स मध्येही लहान-मोठे कॅसिनो सुरू करण्यास परवानगी देण्यात आली व ते यथावकाश सुरूही झाले. पण अशा जमीनीवरील कॅसिनोजमध्ये ‘लाईव्ह टेबल्स’ ना परवानगी नाही, तेथे फक्त ईलेक्ट्रॅानीक/संगणकाधारीत मशिन्सवर जुगार खेळवला जातो आणि प्रवेश शूल्कही तरंगत्या कॅसिनोजपेक्षा कमी असल्याने त्याला पर्यटकांपेक्षा स्थानिकांकडुन मोठा प्रतिसाद मिळु लागला.

"मध्यंतरी स्थानीक कुटुंबातील कमावत्या व्यक्तींनी कॅसिनोत चालणाऱ्या जुगाराच्या नादाला लागुन आपले संसार उध्वस्त केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आणि त्यातुन लोकांमध्ये गोवा सरकारविषयी असंतोष निर्माण झाल्यावर स्थानीकांना अशा जमीनीवरील कॅसिनोजमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली होती."

आजघडीला गोवा सरकारच्या महसुलात कॅसिनोंपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा प्रचंड मोठा आहे. गोव्यातील खाण उद्योगावर प्रतिबंध आल्यानंतर महसुलात झालेली मोठी घट भरून काढण्यास ह्या कॅसिनोंनी सर्वात जास्त हातभार लावला आहे. कॅसिनोंमुळे स्थानिकांतही जुगारी वृत्ती वाढून कित्येक संसार उध्वस्त झाल्यामुळे बहुतांश स्थानिकांची मानसिकता कॅसिनोविरोधी असली आणि वेळोवेळी त्याविरोधात आवाज उठवला जात असला तरी दुर्दैवाने ते बंद करण्याची हिंम्मत कुठलाही राजकीय पक्ष वा नेता दाखवू शकलेला नाही हि वस्तुस्थिती आहे. विरोधात असताना कॅसिनो बंद करण्याच्या घोषणा/आश्वासने सर्वच राजकीय पक्ष/नेते नेहमी देत असतात, पण सत्तेवर आल्यावर मात्र त्यांची भाषा बदलते. ह्याला आपल्या स्वच्छ चारित्र्य आणि साध्या रहाणीसाठी कित्येकांच्या मनात आदराचे स्थान मिळवणारे गोव्याचे माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर हे देखील अपवाद नाहीत. त्यांनीही विरोधात असताना कॅसिनो वरून बरीच आग पाखड केली होती पण सत्तेत आल्यावर महसुलाचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या विरोधात कारवाई करणे कसे अशक्य आहे वगैरे वगैरे असा सूर लावला होता. अर्थात ह्यात त्यांचा काही दोष आहे असेही नाही पण सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांची आगतिकता त्यातून स्पष्ट होते. थोडक्यात सांगायचे तर कॅसिनो बंद केल्यास गोव्याची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघेल अशी परिस्थिती आज आहे!

असो,
कॅसिनो म्हणजे ‘जुगारी अड्डा’ हे एक पक्के समीकरण आहे, किंबहुना जुगार हाच कुठल्याही कॅसिनोचा मुख्य व्यवसाय /उद्दिष्ट असले तरी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करूनही पर्यटकांना सहकुटुंब ह्याठिकाणी आपला वेळ मजेत घालवतां येतो.
जुगार खेळण्यासाठी असलेल्या गॅम्बलींग एरीया व्यतिरीक्त खान-पान आणि करमणुकीसाठी चांगले उपहारगृह, बार, बुफे लंच / डिनरसाठी डायनिंग एरिया, नाच-गाण्याचे व अन्य मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांसाठी विशेष विभाग, सेल्फी पॉईंट, निवांत बसण्यासाठी (आकारमानानूसार बोट/जहाज/यॅाट ज्यावर कॅसिनो असेल त्याचा) ‘डेक’ अशा अनेक गोष्टी ह्या ठिकाणी उपलब्ध असतात त्यामुळे एका नव्या पैशाचाही जुगार न खेळता गॅम्बलींग एरीया पासुन ते कॅसिनोचे अन्य मजल्यांवरील इतर सर्व विभाग पहात फिरत, खाण्या-पिण्याचा आस्वाद घेत नाच-गाणे बघण्यात चार-पाच तास किंवा संपुर्ण रात्र कशी पसार होते त्याचा पत्ताही लागत नाही!

मांडवी नदीतल्या तरंगत्या कॅसिनोंसाठीचे प्रवेश शुल्क हे प्रत्येक कॅसिनोगणिक वेगवेगळे असते. सर्वसाधारणपणे किमान प्रवेश शुल्क सोमवार ते शुक्रवार प्रतिव्यक्ती १५०० रुपये तर शनिवार आणि रविवार साठी प्रतिव्यक्ती २००० रुपये एवढे असते. तिथे भेट देण्याआधी आपण प्रत्येक कॅसिनोचे प्रवेश शुल्क, उपलब्ध सेवा/सुविधा, नियमावली, ड्रेसकोड, त्या दिवसासाठीच्या विशेष ऑफर्स / पॅकेजेस विषयींची माहिती त्यांच्या वेबसाईटवर बघून, त्यांची तुलना करून आपल्यासाठी योग्य कॅसिनोची निवड करू शकतो. वर उल्लेख केलेल्या बुफे लंच / डिनर अशा खान-पान आणि करमणूकीसाठीच्या बहुतांश गोष्टी कॅसिनोच्या प्रवेश शुल्कात समाविष्ट असतात आणि तिथले उपहारगृह आणि बार त्याला अपवाद असले तरी गॅम्बलिंग एरियामध्ये टेबलवर विनामूल्य अमर्याद 'ड्रिंक्स' आणि 'स्नॅक्स' पुरवले जातात (त्यासाठी खेळण्याची सक्ती नाही, फक्त गॅम्बलिंग टेबलजवळ बसणे वा उभे राहणे आवश्यक असते.)

काही कॅसिनोजमध्ये सहसा (किंवा शनिवार/रविवार असल्यास) प्रवेश तिकिटासोबतच तर काहींमध्ये थोडेफार अधिकचे पैसे भरून खेळण्यासाठी ठराविक रकमेच्या OTP (one time play) चिप्स दिल्या जातात. कॅसिनोत 'जुगार' खेळण्यासाठी देण्यात आलेल्या अशा 'प्रोत्साहनात्मक' ओटीपी चिप्स रुपी कागदी कूपन्सचा उपयोग खरंतर अतिशय मर्यादित स्वरूपात करता येतो आणि त्या थेट 'एनकॅश'करता येत नाहीत. रुलेट (Roulette) आणि स्पिन व्हील (Spin Wheel / Wheel of fortune) अशाप्रकारच्या खेळांत आणि त्यातही फक्त 'एकास एक' चा (१:१) भाव देणाऱ्या 'बेट्स' खेळण्यासाठी काही निवडक टेबल्सवर त्यांचा वापर करता येतो. असे असले तरी संयम राखत 'टुकू टुकू' खेळून नशिबाची साथ मिळाल्यास आपण प्रवेश शुल्कासाठी भरलेली रक्कम वसूल करण्यात तरी यशस्वी होऊ शकतो, फक्त एक पथ्य मात्र पाळायचे, 'आपण इथे जुगार खेळण्यासाठी आलो नसून केवळ एक छानसा अनुभव घ्यायला आलेलो आहोत' हे कदापि विसरायचे नाही, आणि आपल्याला मिळालेल्या 'प्रोत्साहनात्मक' ओटीपी चिप्स जरी आपण गमावल्या तरी अधिकचे पैसे खर्च करून चुकूनही नवीन चिप्सची खरेदी करायची नाही. अगदी टेबलवर अन्य कोणी कितीही जिंकत असताना दिसत असले तरीही!
---
असो, तर ‘कॅसिनो प्राईड’ मध्ये पोचल्यावर आम्ही गॅम्बलींग एरीयामध्ये प्रवेशकर्ते झालो. दोघांना मिळालेल्या एकूण १००० रुपये दर्शनीमूल्याच्या ओटीपी चिप्स वापरून तिथे 'रुलेट' खेळत असताना माझे व्हिस्कीचे दोन पेग्स आणि भावाची दोन ग्लास बियर रिचवून झाली आणि मिळालेल्यापैकी ओटीपी 'पेपर कूपन्सना' सहाशे रुपये मूल्याच्या 'कॅश' करता येण्यायोग्य 'प्लास्टिक' प्लेयिंग चिप्स मध्ये परावर्तित करण्यात यश मिळवून आम्ही साडे दहा-पावणे अकराच्या सुमारास बुफे डिनरचा आस्वाद घेण्यासाठी लिफ्टने वरच्या मजल्यावरील डायनिंग हॉलकडे मोर्चा वळवला.

Roulette

Roulette

.
अगदी 'आहाहा' म्हणावे अशाप्रकारचे नसले तरी बऱ्यापैकी चांगल्या खाद्यपदार्थांचा समावेश असलेले जेवण झाल्यावर मनोरंजन कक्षात कोकणी भाषेतील गाण्यांवर झालेला समूहनृत्याचा कार्यक्रम बघून पुन्हा आम्ही गॅम्बलींग एरीयामध्ये आलो.
'बिगिनर्स लक' (Beginner's luck) म्हणतात त्याप्रमाणे आमच्या बंधुराजांचे नशीब जोरावर होते आणि आता जास्त परतावा देणाऱ्या बेट्स खेळण्यासाठी हातात प्लास्टिक चिप्सही होत्या. ह्या भांडवलाच्या जीवावर त्याने रुलेट मध्ये दीड-दोन तासात बऱ्यापैकी माया जमवल्यावर मग आम्ही 'Spin Wheel', 'Baccarat', 'Black Jack', अंदर बाहर, इंडियन फ्लश आणि स्लॉट मशिन अशा वेगवेगळ्या देशी-विदेशी जुगारी खेळांमध्ये नशीब आजमावत पहाटे चार पर्यंत टाईमपास केल्यावर मग 'कॅसिनो प्राईड २' ह्या त्याच ऑपरेटरच्या मांडवी नदीतील आकाराने थोड्या लहान असलेल्या दुसऱ्या कॅसिनोमध्ये जायला निघालो.

Baccarat

Baccarat

.
Black Jack

Black Jack

.
मी आतापर्यंत गोव्यातल्या पाच वेगवेगळ्या कॅसिनोंना भेट दिली आहे पण त्यातले 'कॅसिनो प्राईड' (Casino Pride), 'डेल्टीन रोयाल' (Deltin Royale) आणि 'डेल्टीन जॅक' (Deltin Jaqk) हे तीन माझ्या विशेष आवडीचे आहेत. ह्या तिघांची आपापली काही वैशिष्ट्ये आहेत. 'कॅसिनो प्राईड' मला आवडतो कारण त्याचे भव्य स्वरूप आणि सर्व आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज असूनही ह्याचे प्रवेश शुल्क तुलनेने सर्वात किफायतशीर आहे आणि विशेष म्हणजे एकाच तिकिटात आपण ह्याच कंपनीच्या इथे असलेल्या दोन कॅसिनोंना भेट देऊ शकतो! 'कॅसिनो प्राईड' वर कंटाळा आला तर 'कॅसिनो प्राईड २' वर जायचे, तिथे कंटाळा आला तर पुन्हा 'कॅसिनो प्राईड' वर परत यायचे, त्यासाठी दोन्ही ठिकाणी विशेष लॉन्च सेवा विनामूल्य उपलब्ध आहे.

अर्थात 'कॅसिनो प्राईड' ची शिफारस मी फक्त मित्रा-मित्रांचा ग्रुप जाणार असेल तरच करतो, पण जर बरोबर स्त्री/स्त्रिया असतील तर मात्र प्रवेश शुल्क बऱ्यापैकी जास्त असले तरी 'डेल्टीन रोयाल' किंवा 'डेल्टीन जॅक' अशा ठिकाणी जाण्याची आग्रही शिफारस करेन. बाकी गोष्टींत/सोयी-सुविधांमध्ये फारसा फरक नसला तरी ह्या दोन ठिकाणी येणारा क्राऊड तुलनेने 'क्लासी' असल्याने स्त्रियांना सहज/मोकळेपणी वावरण्यासाठी कॅसिनो प्राईडपेक्षा इथले वातावरण पोषक/अनुकूल असते. पण बरोबर जर सगळेच पुरुष असतील तर कॅसिनो प्राईड हे माझ्यामते 'बेस्ट' आणि एकदम 'पैसा वसूल' ठिकाण आहे.

असो, 'कॅसिनो प्राईड' वरून लॉंचने आम्ही पहाटे सव्वा चार-साडे चारच्या सुमारास 'कॅसिनो प्राईड २' वर पोचलो तेव्हा तिथली गर्दी बऱ्यापैकी ओसरली होती. चालू असलेल्या टेबल्सवर तुरळक खेळाडूंची उपस्थिती असल्याने ह्याठिकाणी निवांतपणे बसून, शेजारी लावलेल्या स्टूलवर पद्धतशीरपणे सर्व्ह केलेल्या मद्याचा आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत, अधून मधून बेट्स टाकत रुलेट खेळण्याची मजा घेता आली. काही बेट्स मध्ये हार तर काहींमध्ये जीत असा सिलसिला चालू होता. साडे सहाच्या सुमारास बहुतांश टेबल्स खेळाडूंअभावी बंद होऊ लागल्यावर आम्हीही तिथून काढता पाय घेतला आणि बहिणाबाईंना आम्हाला पिकअप करण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता काल आम्हाला सोडलेल्या ठिकाणीच परत यायला सांगितले असल्याने तो पर्यंतचा जवळपास दोन तासांचा वेळ घालवण्यासाठी पुन्हा 'कॅसिनो प्राईड' वर आलो.

आता इथलीही गर्दी ओसरल्याचे दिसले. गॅम्बलिंग एरियामध्ये तुरळक टेबल्स चालू होती आणि उपस्थितांपैकी बहुतांशजण पेंगुळलेले दिसत होते तर जुगारात बऱ्यापैकी पैसे हारलेले 'ग्रेट गॅम्बलर्स' झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केविलवाणे प्रयत्न करताना दिसत होते. एकंदरीत रात्री इथे असलेले उत्साही, चैतन्यमयी, जोशपूर्ण वातावरण आता मात्र अगदीच निरुत्साही, ढेपाळलेले वाटायला लागले होते. किनाऱ्यावर परतण्यासाठी पर्यटकांची लॉंचसाठीची रांगही वाढत चालली होती. हाताशी अजून जवळपास तासाभराचा वेळ होता म्हणून आतल्या उपहारगृहातून चहा खरेदी करून आम्ही बाहेर ओपन डेकवर टाईमपास करण्यासाठी येऊन बसलो.
एकंदरीत रात्र मजेत गेली होती, खाऊन पिऊन प्रवेश शुल्कासाठी भरलेली रक्कम वसूल होऊन बंधुराजांचे भाग्य बलवत्तर असल्याने २२०० रुपयांची अतिरिक्त कमाईही झाली होती!
कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत, आल्हाददायक हवा खात थोडावेळ घालवल्यावर लॉंचसाठीची गर्दी कमी झाल्याचे पाहून आम्ही तिथून निघालो आणि काही मिनिटांत किनाऱ्यावर पोचलो. ठरलेल्या वेळी बहीणही तिथे आली आणि वीस-पंचवीस मिनिटांचा प्रवास करून आम्ही तिच्या करमळीच्या घरी पोचलो. तिने तयार करून ठेवलेला इडली सांबार भरपेट खाऊन रात्रभराच्या जागरणामुळे झोप अनावर झाल्याने सरळ झोपून गेलो.

"कॅसिनोमध्ये फोटो काढण्यास मनाई असल्याने ह्या भागात फोटो खूपच कमी टाकले आहेत, हि कमतरता पुढील भागांतून, जे गोव्यातले किल्ले आणि समुद्रकिनारे ह्यावर असतील त्यातून भरून काढण्यात येणार आहे 😀 तसेच लेखात जे फोटो दिले आहेत ते 'कॅसिनो प्राईड'च्या वेबसाईटवरून साभार घेतले आहेत."

क्रमशः

 http://www.misalpav.com/node/50541

गाभा: 

हिंदू धर्मात अनेक प्रसिद्ध प्रथा आणि सण आहेत. पण काही सण आणि परंपरा काही विशेष भागापुरत्याच असल्याने किंवा विशिष्ट जात, समुदाय इत्यादी मध्येच मर्यादित असल्याने इतर लोकांना जास्त माहिती नसते. अश्या प्रकारच्या काही प्रथा परंपरा आपल्याला ठाऊक असतील तर धाग्यावर जरुर लिहा.

गोव्यांतील वेताळ मंदिरे

राजन पर्रीकर ह्यांनी जबरदस्त छायाचित्रे काढली आहेत जरूर पहा. राजन पर्रिकरनी हि छायाचित्रे इतर ठिकाणी टाकण्यास मनाई केल्याने मी चित्र इथे टाकले नाही फक्त लिंक दिली आहे.

http://blog.parrikar.com/wp-content/uploads/2016/01/19-16584-post/Vetal-...

इतर :
http://blog.parrikar.com/wp-content/uploads/2013/01/Vetal-Loliem-Babu-Go...

वेताळ ह्या देवतेची मंदिरे गोव्यांत जागो जागी पाहायला मिळतात. पैगीण गावातील वेताळ मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. वेताळाची मूर्ती म्हणजे अक्राळ विक्राळ दैत्यासारखी असते. बहुतेक वेळा पूर्ण नग्न असते आणि इंग्रजीतील शब्दप्रयोग वापरायचा असेल तर वेल-हँग असते. लांबट आणि खाली असलेला पुरुषी अवयव म्हणजे "अधोरेतस" दर्शवण्यासाठी आहे असे जाणकार सांगतात. शिव हा ऊर्ध्वरेतस असतो. कधी मंदिर असते तर कधी अशीच जंगलात एकटी मूर्ती असते. बरगड्या नेहमीच बाहेर दिसतात आणि पोट अगदी आंत. कमरेचा बंध फार मोठा असतो आणि त्याला एक छोटी घंटा असते. गळ्यांत नागाची रुद्रमाला (मुंडकी) आणि बाजूना नागाचे केयूर आणि अंगद हि आभूषणे असतात. हिंदू धर्मातील इतर मूर्तीप्रमाणेच काही गोष्टींवर मुर्तीकाराने विशेष लक्ष दिले आहे असे वाटते. उदाहरणार्थ कानाच्या पाळी वजनाने जवळ जवळ तुटल्या आहेत असे वाटते. काही ठिकाणी बरगड्यांच्या खाली विंचू असतो. डोक्यावर कधी कधी सर्प असतात. वेताळ बरोबर असलेल्या सर्पांना वत्स असा शब्द आहे. [१]

लोळिये गांवातील (वर दाखवलेली नग्न मूर्ती) गोव्यांतील सर्वांत मोठी मूर्ती असून उंची सुमारे २ मीटर आहे. गोव्यांतील इतर सर्व मूर्ती समभंग असल्या तरी हि एकमेव मूर्थी त्रिभंग स्थितींत आहे. हाय एकाच मूर्तीला प्रभावळ सुद्धा आहे.

बहुतेक वेळा वेताळाची पूजा अर्चा ह्यांत ब्राह्मण शिवाय आदिवासी किंवा इतर जातींचा जास्त सहभाग असतो. बहुतेक ठिकाणी ग्रामदेवता पंचायतन सिस्टम मध्ये वेताळ देवालयाना सुद्धा स्थान मिळाले आहे आणि काही ठिकाणी चित्पावन ब्रह्मन् पूजा अर्चा करतात पण अनेक प्रकारच्या पूजा, प्रथा साठी "घाडी" ह्या ब्राह्मणेतर माणसाची आवश्यकता मात्र नेहमीच असते. घाडी चा इंग्रजी शब्द असेल shaman. घाडीचे इतर जवळचे शब्द आहेत गुरव, जल्मी,रावळ इत्यादी.

घाडीमध्ये कधी कधी अवसर इत्यादी येतो आणि जनावरांचा बळी देण्याचे काम सुद्धा त्याच्यावर असते.

ज्या प्रमाणे इतर देवतांना पाकळी लावून प्रसाद घेतला जातो त्याच प्रकारे इथे सुद्धा अर्चक प्रसाद लावू शकतो. लोकांच्या मनातील वेताळ देवाविषयी भय-पूर्वक आदर स्पष्ट दिसतो. नवस वगैरे करताना विशेष काळजी बाळगली जाते कारण नवस फेडता आला नाही तर वेताळ माफ करत नाहीत अशी लोकांत श्रद्धा आहे. त्याशिवाय ज्या लोकांनी पारंपरिक पद्धतीने ह्या देवाला विशेष मान दिला पाहिजे तो नाही दिला तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा पूर्ण विध्वंस वेताळ करतो असे म्हणतात. सांगायचं मुद्दा असा कि इतर मंदिरांत ज्या प्रमाणे लोक आनंदात जाऊन येतात त्याप्रमाणे इथे जात नाहीत, इथे थोडे भय मनात घेऊनच जावे लागते.

पैगीण गावांतील वेताळ मंदिराची फार छान कथा आहे. मंदिर अत्यंत पुरातन असून वैदिक पद्धतीने आचरण करणाऱ्या लोकांपेक्षाही हे मंदिर जुने आहे. गोव्यांतील बहुतेक भागांत वेळीप, कुणबी, गावडे, धनगर इत्यादी लोकांचे वास्तव्य होते. ब्राह्मण किंवा इतर आधुनिक हिंदू लोक हळू हळू आले. नवीन लोक बहुतेक करून नदी च्या जवळपास राहायचे तर मूळ निवासी बहुतेक जंगलांत आंत. निसर्गपूजा, प्राणिपूजा सर्वांसाठीच होती.

तर म्हणे वेताळ हा प्रचंड दैत्य एका एका गावांचा विध्वंस करीत जात होता. हळू हळू बातमी पसरून ह्या भागातील लोकांचा जो बुधवंत होता त्याच्या कडे पोचली. वर उल्लेख केलेले लोक छोटया छोट्या गावांत राहत असत आणि त्यांचा गावप्रमुख म्हणजे बुधवंत (बुद्धिमान). तर ह्या वेताळाला आधीच गाठून त्याच्याशी काही तरी तडजोड करावी हा विचार है बुधवंताने केला. त्याप्रमाणे वेताळाला त्याने वाटेत गाठले. वेताळाने त्याच्या समोर काही अटी ठेवल्या.

१. मला गर्भ खायला पाहिजे
बुधवंतने हि भयानक अट तात्काळ मान्य केली.
२. मला दोन पायाच्या जनावराचा बळी पाहिजे.
बुधवंत ने दोनच का ? मी दहा पायाच्या जनावराचा बळी देतो असे सांगितले . वेताळ ने असला प्राणी पाहिलेला नसल्याने त्याने ते मान्य केले.
इत्यादी इत्यादी

प्रत्यक्षांत बुधवंत ने त्याला गर्भ म्हणून केळ गर्भ, खेकडा इत्यादी गोष्टी दिल्या.

ह्या वेताळा चा उत्सव ३ वर्षांनी येतो. दुसऱ्या वर्षाला वेताळाची सेना पंचक्रोशींत फिरून सर्व देवळांना आमंत्रण देते. हे आमंत्रण कुठल्यातरी अगम्य भाषेंत एका कपड्यावर लिहिले आहे शब्दांचे अर्थ सुद्धा लोकांना ठाऊक नाहीत. पण चाल मात्र परंपरागत आठवणीत आहे आणि त्यावरून हि वेताळाची स्तुती असून वेताळाची सेना क्ती पराक्रमाची आहे असे लिहिले असावे असे वाटते. See video : https://www.youtube.com/watch?v=Gb28RjsY6Ww

वेताळ देव इतर सर्व देवाना पुढील वर्षी आपल्या उत्सवाला यावे असे आमंत्रण देतो.

पुढच्या वर्षी गड्यांची जत्रा होते. दोन महा प्रचंड खांब्यावर एक प्रचंड चक्र बसवलेले असते. जमिनी पासून किमान २५-३० फूट उंचीवर रहाट गाड्या प्रमाणे हे चक्र वाटते. गडे हे ठराविक परिवारातील लोकच बानू शकतात. ह्यांना २४ तास मौन व्रत घ्यावे लागते. जत्रेच्या दिवशी ह्यांना भरपूर मान सन्मान. नंतर ह्यांचा पाठीची चामडी ओढून त्यांत गरा म्हणजे एक हुक (मासे पकडण्यासाठी वापरतात तसा ) खुपसला जातो. वेदनेने ब्र निघू नये म्हणून तोंडांत सुपारी धरायला दिलेली असते.

नंतर ह्यांना त्या खांब्यावर चढवले जाते आणि चक्राला बांधले जाते. नंतर काही लोक चक्र फिरवतात आणि तोंडाने मोठमोठ्याने आवाज काढतात. पूर्वीच्या काळी हे चक्र नंतर वरून खाली कोसळत असत आणि कुणी मेला तर त्याला नरबळी समजत असत. (असे म्हणतात).

ह्या शिवाय जत्रेंत काही लोकांना अवसर सुद्धा येतो. रेड्याचा बळी देण्यासाठी अनेक रेडे आणले जातात आणि अवसराने प्रश्न करतंच एखादा रेडा पुढे येतो आणि त्याला बळीसाठी निवडले जाते.

जत्रेंत सर्व जातीच्या लोकांना एकत्र काम करावे लागते आणि भेद भाव असत नाही. प्रत्येक जातीला काही ना काही विशेष कर्तव्य असते. गांवात महार वगैरे नसले तरी कुठून तरी त्यांना बोलावले जाते आणि बळीचा रेडा मारण्यासाठी दिला जातो त्या शिवाय ते मागतील तितके तांदूळ, मसाले, वस्त्रे इत्यादी दिले जातात.

काळाच्या प्रवाहांत तग धरून राहिलेली हि एक सुंदर परंपरा आम्हाला आमच्या पूर्वजांशी जोडते.

[१] http://blog.parrikar.com/wp-content/uploads/2011/11/vetal.pdf

हे वेताळ नसून मूळचे असितांग भैरव आहेत.
पोटात विंचू असलेल्या मूर्ती ह्याही वेताळाच्या/ भैरवाच्या नसून त्याच्या शक्तीच्या- चामुंडेच्या असतात.

कुठेच मिळनार नाही कारण अतिसंग भैरव नावाचं रूप अस्तित्वात नाही. आहे ते असितांग.

कदंब-शिलाहारांच्या काळात ह्या मोठ्या प्रमाणावर उभारल्या गेल्या. कालांतराने ह्यांचे मूळचे भैरव स्वरुप विस्मरणात जाऊन वेताळ हे नाव चिकटले.

 ह्या वेताळा चा उत्सव ३ वर्षांनी येतो. दुसऱ्या वर्षाला वेताळाची सेना पंचक्रोशींत फिरून सर्व देवळांना आमंत्रण देते.

ह्याला टका म्हणतात. यंदा टका ऑलरेडी सुरु झालेला आहे. आता पुढल्या वर्षी जत्रा.

टका आणि जत्रा पैंगिण च्या वेताळाची असते. ते देउळ खूप जुनं आहे, एकेक खांब म्हणजे लाकडी कोरीवकामाचा एक अप्रतिम नमुना आहे.
आता हे खांब जुने झाल्याने मोडकळीला येउ लागले आहेत. यातल्याच एका खांबावर प्रसाद पाकळी घेतात.

पाळोळे हा समुद्र किनारा जवळ आहे आणि तिथे भरपूर हॉटेल्स वगैरे आहेत. तिथे राहा. वेताळ मंदिरा बरोबर बाजूचे अत्यंत जुने नवदुर्गा मंदिर पहा, ऐतिहासिक परशुराम मंदिर सुद्धा पहा. वेताळ मंदिरा पासून जवळच गाल्जीबाग हा सुंदर आणि निवांत समुद्र किनारा आहे.

ही लिंक ही बघाच. ज्या ठिकाणी हा लोलयेचा बेताल आहे ते आमच्या पुरोहितांच घर आणि आवार

गोव्यातील काही विशेष ठाऊक नसलेली पण गजब पर्यटन स्थळें 

बामन बुडा धबधबा - कुस्के काणकोण

फोटू : https://www.tripadvisor.com/LocationPhotoDirectLink-g306996-d7721322-i12...

नेतुर्ली नावाच्या दुर्गम भागांत हा धबधबा आहे ५ वर्षांत पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला आहे.

इतर फेमस जवळच्या गोष्टी : पाळोळे समुद्र किनारा
इतर कमी फेमस गोष्टी : मल्लिकार्जुन देऊळ, चेडयेचे मळ (शेकडो वर्षां पूर्वीचे तांत्रिक स्थान), साळावली धरण, रिवण येतील पुरातन मंदिरे, आणि पुरातन काळांतील दगडावरील चित्रे
राहावे कुठे : चावडी हे सर्वांत जवळचे शहर तेथून नेतुर्ली आणि पुढे रिवण द्वारे सांगे ला जावे

------

वटवाघूळांची गुफा - अरबी समुद्र वास्को

Pequeno / Bat Island in Goa
The Pequeno Island in Goa also known as the Bat Island is located just a kilometer away from Baina beach of Vasco-da-Gama. The island forms a great surprise for those seeking adventures.

त्यामानाने हि जागा विशेष प्रसिद्ध नाही पण एकदा येण्यासारखी आहे. विमानतळावरून सरळ बायना बीचवर जावे. तेथून आपणाला बेटावर घेऊन जाणाऱ्या बोटी भेटतील.

------

मये तलाव

डिचोली मध्ये हा प्रचंड तलाव आहे. बोटिंग करण्याच्या फार छान सुविधा आहेत. तेथून आपण नार्वेचे सप्तकोटेश्वराचे मंदिर सुद्धा पाहून येऊ शकता. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार शिवाजी केला होता असे सांगितले जाते.

-----

गलजिबाग - काणकोण

अतिशय निर्मनुष्य आणि स्वछ समुद्र किनारा आहे. भरपूर पार्किंग इत्यादी उपलब्ध. कर्नाटकाला जवळ असल्याने भरपूर दारूचे अड्डे उपलब्ध आहेत. पण राहण्याची सर्वांत जवळची सोय १५ ते वीस किलोमीटर दूर आहे.

इथे एक जुन्या प्रकारची नदी पार करणारी नाव सुद्धा आहे (होती). अ 





 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...