Friday, August 4, 2023

माळवा सहल

 https://www.maayboli.com/node/56633

नोव्हेंबर डिसेंबर महीने हे पिकनीक ट्रीप साठी अगदी योग्य असतात. तीन चार दिवसचीच सुट्टी होती आणि इंदौर कधीच खुणावत होत, मुख्य म्हण्जे तिथला सराफा. म्हणून तिथेच जायच निश्चित केलं त्याविषयी थोडं

सकाळी अवंतिका एक्सप्रेस ने इंदौर ला पोचलो. हवा थंड होती. हॉटेल वर जाऊन जरा स्थिरस्थावर झालो आणि दुपारी इंदौर दर्शनाला बाहेर पडलो. शहरातली देवळं, राजवाडे वैगेरे पाहिले. जैन धर्मी यांच देऊळ असलेलं शीश महाल फार आवडला. रात्री प्रसिद्ध सराफा ला गेलो . तिथे एक वेगळीच दुनिया दिसत होती. खाण्याच्या शौकिनांना अगदी पर्वणीच . भुट्टेका कीस, दहीवडा यातच पोट गार झाल पण तरी खूप काही खायच दिसत होत म्हणून मग रबडी, साबुदाणा खिचडी असं थोडं थोडं चवीपुरतच घेतलं

राजवाडा
From indore

खजराना गणेश टेंपल

From indore

दुसर्‍या दिवशी धुक्याची दुलई पांघरलेले इंदौर

From indore

इंदूरच्या प्रसिद् पोहे आणि जिलेबीचा ब्रेकफास्ट करुन मांडूला जायला निघालो. उत्तम गव्हासाठी प्रसिद्ध माळव्यातली अशी शेती बघुन डोळे आणि मन दोन्ही सुखावले .

From indore

मांडुचा जहाज महाल

From indore

From indore

मांडुतलीच एक मस्जीद

From indore

हा आहे राणी रुपमतीचा महाल. ह्याला रुपमतीचा मंडप म्हणतात.

From indore

मांडु बघुन नंतर लगेच महेश्वरला आलो . तिथे अहिल्यादेवीचा राजवाडा अगदी नर्मदेच्या काठावरच आहे आणि तो खूप बघण्या सारखा आहे. त्यांच देवघर आणि देव खूप छान आहे ते नक्की बघाव. इथे महेश्वरी साड्या फार सुंदर मिळतात. फोर्ट मध्येच सराकारी दुकान आणि लूम असं दोन्ही आहे.

From indore

From indore

अहिल्या फोर्ट

From indore

रात्रीच्या मुक्कामाला श्री ओंकारेश्वरला आलो. इथल्या श्री गजानन महाराज, शेगाव यांच्या भक्त निवास बद्दल खूप वाचल होत म्हणून इथेच मुक्काम केला. आणि ह्या ट्रिप मधल हे भक्त निवासच सर्वात आवडल. सकाळ संध्याकाळ आरती, भजन आणि इतक सुंदर वातावरण एखाद्या रिसॉर्ट पेक्षाही सुंदर वाटत होतं. दोन रात्री आणि एक दिवस आम्ही इथे राहिलो.

From indore

From indore

From indore

From indore

From mayboli

table style="width:auto;">From indore

ही कचराकुंडी पहा म्हणजे कल्पना येईल.

From indore

मेंटेनंस चोवीस तास.
From indore

ओंकारेश्वरची नर्मदा मैय्या. अधिक निळं काय आहे आकाश की पाणी ?

From indore

From indore

मंदिरात जाण्यासाठी अलीकडेच बांधलेला हा पुल . नदीच्या पात्रात एकही खांब नसलेला. वरच्या लोखंडी कांबीनी तोलुन धरलेला. हा फक्त पादचार्‍यांसाठीच आहे.

From indore

ओंकारेश्वर मंदिर

From indore

शेवटच्या दिवशी उज्जैन ला श्री महांकाळेश्वराचे दर्शन घेतले. शहरात फेरफटका मारला आणि संध्याकाळी अवंतिका एक्स्प्रेस मध्ये घरी येण्यासाठी बसलो.

ही बस उज्जैन दर्शनची

From indore

तीन रात्री आणि चार दिवसाचा हा खरोखर छोटा ब्रेक मनाला ताजतवान करणारा ठरला.

 

भरत, लाल महाल, अनापूर्णा देवीच मंदिर, छत्र्या सगळं पाहिलं .

वर्षु, शीश महाल फार आवडला. काय कला कुसर केलीय. डोळे दीपले अगदी . तसा तो फार काही जूना नाहीये पण आपल्याकडे अजून ही इतक्या उच्च दर्जाची कलाकृती करणारे कलाकार आहेत याचा अभिमान वाटला. तसेच बाओबाब ची झाडं पाहिली.गोरख चिन्च लगेच विकत घेतली.

केश्वे, एकाच वेळी खाण, पर्स सांभाळण आणि फोटो काढ़ण हे तिन्ही शक्य नव्हत महणून फोटो नाही काढू शकले सराफा मध्ये. खाण्यावर केंद्रित केल सगळ लक्ष.

ही ट्रिप माझ्या सदैव लक्षात राहिल त्याला कारण ही तसच आहे ह्या ट्रिप मध्ये माझ्या यजमानानांच पैशाच पाकीट दोन वेळा पडल पण दोन्ही वेळा ते तिथल्या लोकांनी आम्हाला शोधत शोधत येऊन परत दिल. माळव्यातल्या माबोकारांची आणि एकूणच आपल्या सगळ्यांची मान अभिमानानी ऊंच व्हावी अशी ही घटना आहे. म्हणजे पाकीट पडलं म्हणून नव्हे ते परत मिळलं म्हणून.

महेश्वरचा किल्ला फार सुंदर आहे आणि तिथली नर्मदा नदी ही फार सुंदर आहे नर्मदेच्या तीरावर एम पी टूरिज़म च हॉटेल आहे ते ही फार छान आहे. साड्यांचे फोटो नाहीयेत काढ़ते आणि डकवते

ह्या ट्रिप मध्ये इंदूरला एक दिवस राहून दोन दिवस ग. म भक्त निवासात राहायच कारण ते अतिशय सुंदर आहे. ओंकारेश्वर इतर धार्मिक स्थळां सारखच आहे पण ह्या भक्त निवासात प्रवेश करताच आपण एका वेगळ्याच जगात आहोत अस वाटत. पण तिकडच बुकिंग आधी होत नाही तिथे गेल्यावरच करायच. जेवणाची सोय ही अतिशय छान आहे.

मंदिरात नावेनी पण जाता येत. आम्ही जाताना नावेनी गेलो होतो तेव्हा गजानन महाराजांच्या गोष्टीची आठवण झाली. नर्मदा नदी फार छान आहे. पाणी अगदी निळशार आहे नदीच. ओंकारेश्वरला चहुबाजुनी छोट्या छोट्या टेकड्या आहेत आणि मंदिर ही टेकडीवरच आहे. मंदिरात मला रूईच्या फुलांचे हार विकायला दिसले. ते अतिशय सुंदर दिसत होते.

महाकाळेश्वराच मंदिर ही खूप मोठं आणि छान आहे पण फोटो नाही काढून देत . नेहमी गर्दी आणि दर्शनासाठी भली मोठी लाईन असते त्यामुळे हातात वेळ राखूनच जावे. तसेच उज्जैनच्या एका देवळात ( नाव नाही लक्षात ) दारुचा प्रसाद चढवितात त्यामुळे देवळाच्या बाहेर एरवी मिठाईची दुकान असतात इथे छोट्या छोट्या दारुच्या बाटल्यांची. !!!

ती उज्जैन दर्शनची बस आमच्या बरोबरच होती पण सतत हुलकावण्या देत होती पण अखेर मिळवलाच फोटो. !!!!

 १.महेश्वरच्या रम्य घाटावर एक संध्याकाळ आणि एक सकाळ अवश्य घालवा.
२.ओंकारेश्वरला सर्वात उंचावर असलेल्या पांडवकालीन शिवमंदिराला आवर्जून भेट द्या.(अंदाजे 200 पायऱ्या) आणि सकाळच्या प्रहरी नर्मदेत एक डुबकी जरूर मारा.

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...