https://www.maayboli.com/node/31792
कंपनीच्या मेहेरबानीने शनिवार-रविवार असे दोन दिवस सुट्टी मिळते. तेव्हा कुठे तरी भटकंतीसाठी जायचे म्हटल्यावर 'गोल्डन पॅगोडा' ला जायचे ठरले. खुप दिवसांपासुन जायचे होतेच. तर ह्या वेळी कॅन्सल न होणारा बेत ठरवुन निघालोच.
गोराई पासुन १५ मिनिटांवर (आम्ही कारने गेलो होतो) 'गोल्डन पॅगोडा' चे काम
सुरु आहे. त्याचा जवळ जवळ अर्धाच भाग तयार झाला आहे. खुप मोठ्या परिसरात
बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम सुमारे १९९७-२००० ला सुरु झाले आणि अजुन
पुर्ण झालेले नाही. यावरुन त्याच्या भव्यतेचा अंदाज येईल.
त्याच्या पायथ्याशी कच्च्या रस्त्यावर गाडी थांबवुन घेतलेला फोटो.

एकुण तीन डोम पैकी एकाच डोमचे काम पुर्ण झाले आहे.
थोडे वर चढुन गेल्यावर वरील डोमच्या दोन्ही बाजुस अश्या सेम मुर्त्या आहेत. ते द्वारपाल वैगेरे असावेत असे वाटले.

प्रवेशद्वाराची रचना उंचावर आहे. (फोटोत माझी लेक आहे :-))

प्रवेशद्वाराच्या जिन्यांवरुन द्वारपालांचा फोटो.
पॅगोडाचा सोन्याचा कळस.
कळसाचे टोक. संपुर्ण कळस सोन्यापासुन तयार केला आहे असे सांगतात.
सर्व बांधकाम, डिझाईन्स, स्तंभावरील नक्षीकाम अगदी एखाद्या थाई बुद्ध पॅगोडा सारखेच आहे.
आत प्रवेश केल्यावर अती भव्य असा विपस्यना हॉल आहे. त्या डोमची उंची ३० मिटर आहे. हॉलचा आतील घुमट ८५ मिटर असुन जवळ जवळ ६००० स्क्वे. मिटर आहे. एकावेळी ८००० लोक त्या हॉलमधे विपस्यनेसाठी बसु शक्तील अशी अरेंजमेंट केलेली आहे. हॉलच्या आतील घुमटामधे गौतम बुद्धाचे हाड (बोन) पुरले असल्याचे नमुद केले आहे. तिथे बरेच लोक विपस्यनेसाठी - ध्यानधारणेसाठी बसले होते. त्यामुळे फोटो काढायला परवानगी नव्हती.
हॉलच्या बाहेर अशोक स्तंभाची प्रतिकृती उभारली आहे.

तिथुन पुढे - भव्य आणि शांत भगवान बुद्ध मुर्ती.
तिथेच एक पुस्तकांचे आणि फोटोंचे दालन आहे. बौद्ध धर्मावरील अनेक पुस्तकं, ग्रंथ आणि ऐतिहासिक फोटो तिथे विक्रीसाठी ठेवलेले आहेत.
पुढच्या एका दालनात गौतम बुद्धांच्या जीवनपटावर काढलेली अत्यंत सुन्दर
चित्रे आहेत. बुद्धांच्या जिवनातील प्रत्येक प्रसंग अतिशय सुंदर रेखलेला
आहे. ती चित्रे पहायलाच अर्धा तास लागतो. तिथेही फोटो काढण्याची परवानगी
नव्हती. आणि चित्रे पाहताना आम्ही सुद्धा फोटो काढण्याचे विसरुनच गेलो. आणि
तसंही ती चित्रे प्रत्यक्षच पाहण्यासारखी आहेत.
पुढे एक फुल फ्लेज उपहारगृह आहे. तिथेच पोटपुजा करुन परतीचा रस्ता धरला.
अजुन बरेच काम बाकी आहे. तेव्हा संपुर्ण बांधकाम झाल्यावर परत भेट द्यायचे मनोमन ठरवुनच निघालो.
तळटीपः
१. कृपया फोटोंवरील तारखेकडे दुर्ल़क्ष करणे. कॅमेरॅत तारीख बदलायची राहुन गेली होती.
फोटो ऑगस्ट २०११ चे आहेत.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.