Saturday, September 26, 2020

अलिबाग येथील ‘भूचुंबकीय वेधशाळा’

 

जेव्हा इंग्रज भारतात आले आणि त्यांनी त्यांची राजवट भारतामध्ये पक्की केली तेव्हा त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये बांधल्या आणि काही नवीन संशोधने देखील केलेली आपल्याला पहायला मिळतात. विविध प्रयोग करण्यासाठी इंग्रजांनी काही संशोधनशाळा भारतामध्ये मध्ये बांधल्या. अश्याच काही संशोधन शाळांपैकी एक महत्वाची ‘भूचुंबकीय वेधशाळा’ आपल्या महाराष्ट्रातील ‘अलिबाग’ येथे उभारली गेली. आता ही ‘भूचुंबकीय वेधशाळा’ ही अलिबाग येथे का उभारली गेली हे देखील पाहणे आपल्यासाठी महत्वाचे आहे.

संपूर्ण जगामध्ये पृथ्वीच्या भूगर्भीय गुणधर्माचा अभ्यास करण्याचे काम हे साधारणपणे १५ व्या शतकापासून सुरु झाले.  विल्यम गिल्बर्ट याने साधारण १६ व्या शतकात ‘भूचुंबकाचा’ अभ्यास करून ६ धडे असलेले ‘De Magnete, Magneticisque Corporibus, et de Magno Magnete Tellure’ या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले आणि याच्यानंतर ‘भूचुंबकीय’ क्षेत्रांचा अभ्यास करणे याला गती मिळाली. ‘जिओमॅॅग्नेटीझम’ याचा अभ्यास तसा भारतामध्ये खऱ्या अर्थाने सुरु झाला तो इ.स. १८२२ साली जेव्हा ‘मद्रास’ म्हणजेच आत्ताचे ‘चेन्नई’ येथे इ.स. १८२२ साली ‘वेधशाळा’ उभारली गेली. त्याच्यानंतर ‘सिमला’ आणि ‘त्रिवेंद्रम’ येथे अश्याच ‘भूचुंबकीय वेधशाळा’ उभारल्या गेल्या याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये इ.स. १८४१ साली मुंबईमधील कुलाबा येथे असलेल्या वेधशाळेमध्ये ‘भूचुंबकीय नोंदी’ घेणे सुरु झाले.

Alibag 1अलिबाग येथील इ.स. १९०४ पासून कार्यरत असलेली ‘भूचुंबकीय वेधशाळा’.

जेव्हा मुंबईमध्ये घोड्याने ओढल्या जाणाऱ्या ‘ट्राम’ ऐवजी विजेवर चालणाऱ्या ‘ट्राम’ सुरु करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने जेव्हा घेतला तेव्हा ‘कुलाबा’ येथील ‘भूचुंबकीय वेधशाळा’ अन्यत्र हलविण्याचे ठरले याचे मुख्य कारण असे कि वीजप्रवाहामुळे ‘भूचुंबकीय’ नोंदीमध्ये पडतो. इ.स. १९०४ साली ‘कुलाबा’ येथे असलेली ‘भूचुंबकीय वेधशाळा’ ही ‘अलिबाग’ येथे हलविण्यात आली. ‘अलिबाग’ येथे इ.स. १९०२ मध्ये ‘भूचुंबकीय वेधशाळाची’ इमारत ही  बांधण्यात आली. जवळपास ७ एकर परिसरामध्ये ही वेधशाळा आहे. इ.स. १९०४ सालापासून या ‘भूचुंबकीय वेधशाळेमध्ये’ नोंदी घेण्यास सूरुवात झाली आणि मुंबई मधील ‘कुलाबा’ वेधशाळेतील नोंदी थांबविण्यात आल्या.

‘कुलाबा वेधशाळेची’ उभारणी आणि कार्यपद्धती ही एल्फिन्स्टन महाविद्यालयातील प्राध्यापक ‘ऑर्थर बेडफोर्ड ऑलेंबर’ यांनी ठरवून दिली. पुढे ‘भूचुंबकीय वेधशाळेमध्ये’ ‘चार्ल्स चेम्बर्स’ यांनी नव्या पद्धती अमलामध्ये आणून कुलाबा येथील ‘भूचुंबकीय वेधशाळा’ नावारूपाला आणली. कुलाबा येथील ‘भूचुंबकीय वेधशाळा’ ही एन. एफ .मूस यांच्या काळामध्ये ‘ट्राम’ योजना आमलात येणार होती यामुळे होणाऱ्या वीजप्रवाहामुळे ‘भूचुंबकीय’ नोंदीमध्ये फरक पडतो म्हणून ‘अलिबाग’ येथे ‘भूचुंबकीय वेधशाळा’ स्थलांतरित केली. ‘भूचुंबकीय वेधशाळा’ याच्या इमारत बांधणीसाठी ‘पोरबंदर सँँडस्टोन’ हा दगड वापरण्यात आलेला आहे. हा ‘पोरबंदर सँँडस्टोन’ वापरण्याचे मुख्य   कारण म्हणजे हा ‘पोरबंदर सँँडस्टोन’ कोणत्याही ‘भूचुंबकीय’ नोंदीमध्ये व्यत्यय आणत नाही.

Alibag 3‘अलिबाग’ येथील ‘भूचुंबकीय वेधशाळा’ ही जवळपास १७९ वर्षे ‘भूचुंबकीय’ निरीक्षणांंची नोंद करत आहे.

शाळेमध्ये’ ज्या खोलीमध्ये ‘भूचुंबकीय’ निरीक्षणे ठेवली जातात ती खोली कायम विद्युतप्रवाहापासून सुरक्षित राखली जाते. तसेच या खोलीचे तापमान हे देखील बदलणार नाही याची संपूर्ण काळजी  घेतली जाते. अशी ही ऐतिहासिक वारसा असलेली ‘अलिबाग’ येथील ‘भूचुंबकीय वेधशाळा’ ही जवळपास १७९ वर्षे आजही सातत्याने ‘भूचुंबकीय’ माहितीची नोंद अविरतपणे करत आहे. अश्या या ऐतिहासिक ‘भूचुंबकीय वेधशाळेबद्दल’ कोणाला माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी ‘भूचुंबकीय वेधशाळा’ यांची रीतसर परवानगी घ्यावी लागते. अशी ही ऐतिहासिक ‘भूचुंबकीय वेधशाळा’ हा संपूर्ण भारताचा एक महत्वाचा वारसा आहे. अश्या या ऐतिहासिक ‘भूचुंबकीय वेधशाळेला’ अलिबाग येथे  गेल्यावर नक्की भेट द्यावी.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-

१. Gazeteer of Bombay Presidencey Bombay : Government Central Press, 1883.

टीप:-

‘भूचुंबकीय वेधशाळा’ बघायची असल्यास वेधशाळेची रीतसर परवानगी घ्यावी लागते. 

कसे जाल:-

पुणे – लोणावळा – खोपोली – अलिबाग. 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...