Saturday, September 26, 2020

आवास मधील ‘पांडवा देवी किंवा पाणबा देवी’

 

कोकणातील निसर्गरम्य गावांपैकी एक गाव म्हणजे ‘आवास’. ‘आवास’ या शब्दाची फोड केली तर देवांचे वास्तव्य ज्याठिकाणी असते ती जागा म्हणजे ‘आवास’. रायगड जिल्ह्यातील ‘आवास’ गाव हे खरोखरच देवांचे वास्तव्य असलेले ठिकाण आहे कारण गावामध्ये आपल्याला सिद्धेश्वर, खंबाळेश्वर, मारुती, गणपती, राम, शांतेश्वरी अशी बरीच मंदिरे आहेत परंतू या मंदिरांंमध्ये एक अत्यंत वेगळे मंदिर आपल्याला पहायला मिळते ते म्हणजे ‘पांडवा देवी किंवा पाणबा देवी’ या देवीचे एक मंदिर आपल्याला पहायला मिळते.

महाराष्ट्रामध्ये आपल्याला पांडवाच्या संबंधित खूप आख्यायिका ऐकायला मिळतात. अशीच एक आख्यायिका आपल्याला ‘आवास’ मधील ‘पांडवा देवी किंवा पाणबा देवी’ हिच्या संबंधित ऐकायला मिळते. ‘पांडवा देवीचे’ हे मंदिर ‘आवास’ येथील समुद्र किनाऱ्याजवळ आहे. ‘आवास’ येथील समुद्रकिनाऱ्याजवळ एक पुळण आहे तिथेच हे ‘पांडवा देवीचे’ छोटेखानी सुंदर मंदिर आहे. मंदिर एकदम साधे आहे. या ‘पांडवा देवीचे’ महत्व आजही तेथील कोळी समाजामध्ये खूप आहे.

Panba Devi‘पांडवा देवी’ किंवा ‘पाणबा देवी’ या मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण शिखर.

या ‘पांडवा देवी’ किंवा ‘पाणबा देवी’ संबंधी एक आख्यायिका ‘आवास’ येथे सांगितली जाते ती आख्यायिका पुढीलप्रमाणे:-

पांडवाना आवास येथे प्रतिकाशी वसवावी असे वाटले. ते एका संध्याकाळी एका दगडी होडीमध्ये बसून आवास इथे आले. परंतु आवास येथील सगळी मंदिरे ही एका रात्रीमध्ये जर बनवली तर आवास प्रतिकाशी होणार होते परंतु ‘पाणबा देवी’ किंवा ‘पांडवा देवी’ हिला काही हे पटले नाही. म्हणून ‘पाणबा देवी किंवा ‘पांडवा देवी’ हीने एका कोंबड्याचे रूप घेतले आणि ती मध्य रात्री आरवली. हा कोंबड्याचा आवाज ऐकून पांडवांनी मंदिर उभारणीचे काम थांबविले. थोड्यावेळाने जेव्हा पांडवाना लक्षात आले कि आपली फसवणूक झाली आहे तेव्हा भीम खूप चिडला आणि त्याने ‘पांडवा देवी किंवा पाणबा देवी’ हिच्या श्रीमुखात ठेवून दिली. भीमाचा तो फटका इतका जबरदस्त होता कि, या ‘पाणबा देवी’ किंवा ‘पांडवा देवीचे’ तोंड कायम वाकडे राहिले आणि अजूनही ते तोंड तसेच वाकडे आहे. तसेच या ‘पाणबा देवी’ हिला छप्पर देखील मिळणार नाही अशी शापवाणी दिली.

‘पांडवा देवी’ किंवा ‘पाणबा देवी’ येथील मंदिरासमोरील दीपमाळ आणि ‘पांडवा देवी’ किंवा ‘पाणबा देवी’ हिची मूर्ती.

अशी ही आख्यायिका या ‘पांडवा देवी’ बाबत पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. या पांडवा देवीच्या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिरात असलेली ‘दगडी होडी’. ‘पांडवादेवी’ मंदिरामध्ये असलेली दगडी होडी ही नक्कीच मंदिराचे आकर्षण आहे. ‘पांडवादेवी किंवा पाणबादेवी’ हिची होडी म्हणून गावामधले लोकं या होडीची रोज पूजा देखील करतात. गावापासून थोडेसे दूर समुद्राच्या काठावर असलेले ही ‘पाणबादेवी’ मंदिरातील ‘दगडी होडी’ नक्कीच ‘आवास’ गावाचे आकर्षण आहे.

असे हे ‘आवास’ गावातील ‘पांडवा देवी’ किंवा ‘पाणबा देवी’ मंदिर हे महत्वाचा वारसा आहे. या ‘पाणबादेवी’ पूजा  गावकरी मोठ्या भक्तीभावाने करतात. असे हे ‘आवास’ येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेले ‘पांडवा देवी’ किंवा ‘पाणबा देवी’ मंदिर नक्कीच आपल्या ‘आवास’ येथील भेटीमध्ये बघण्यासारखे आहे.

Panba Devi Hodi‘पाणबादेवी’ मंदिरातील ‘दगडी होडी’.

______________________________________________________________________________________________

कसे जाल:-

पुणे – लोणावळा – खोपोली – पेण – पोयनाड – किहीम – आवास. 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...