Sunday, September 20, 2020

माचू पिक्चू - भाग ६

फोटो: अपूर्ण मंदिर
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: इथे वरती वेगवेगळी झाडे/वनस्पती आहेत जी इंका लोक वापरत असत. कोकाची पाने ते वेदनशामक म्हणून वापरत असत.
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: Intihuatana सनडायल
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: पवित्र दगड (Sacred Rock) हा एकच मोठा दगड आहे आणि तो पवित्र मानला जातो. बरोबर मागे जसा पर्वत दिसतो, तसाच ह्याचा आकार दिला आहे.
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: वॉटर मिरर. आकाशातील तारे इंकाज थेट न बघता त्यांचे प्रतिबिंब ते इथे बघत असत.
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: Condor (दक्षिण अमेरिकेत आढळणारे एक गिधाड) याचे मंदिर. Condor ला पुढील जन्माचे प्रतीक समजतात.
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: Condor याचे मंदिर २
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: Condor याचे मंदिर ३. यात पक्षाचा डोळा आणि चोच स्पष्ट दिसत आहे.
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: हुआना पिक्चू
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: पॅनोरमा
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: पॅनोरमा २. मागे हुआना पिक्चू
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: इंका लोकांचे ३ देव Condor, Puma, Snake दाखवणारा पुतळा (Agues Calintes इथे)
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

ट्रेल संपवून खाली Agues Calintes गावात आलो आणि मस्तपैकी पिस्को सावर आणि बियरचा आस्वाद घेतला.

फोटो: पिस्को सावर
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

मी काही इंका लोकांसारखा पिल्ग्रिमेजसाठी गेलो न्हवतो, पण मला स्वतःलाच जरा स्वतःचा फिटनेस बघायचा होता, थोडे आत्मपरीक्षण करायचे होते, आरामाच्या कोशातून जरा बाहेर पडायचे होते. आणि इंका ट्रेल हा माझ्या बकेटलिस्टवर बरेच वर्ष होता. त्यामुळे हा प्रवास शारिरीकदृष्ट्या त्रासदायक होता, पण अतिशय समाधान देणारा होता आणि त्या आठवणी मला आयुष्यभर साथ देणार्‍या आहेत.

फोटो: हे माझे सन्मान पदक (Medal of Honor)
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: स्मरणिका (Souvenir) टी शर्ट. I survived the Inca Trail !!
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

माचू पिक्चूला जायला मला ट्रेनचा पर्याय होता किंवा दुसरा पर्याय इंका ट्रेलचा पण होता. मला बर्‍याच जणांनी सांगितले होते की कशाला इतकी कटकट करून चालत जातोस? आरामात ट्रेनने जा. पण शेवटी वाटले तेच केले. रॉबर्ट फ्रॉस्ट्ने त्याच्या कवितेत हे अगदी अचूक मांडले आहे.

The Road Not Taken

TWO roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both
And be one traveler, long I stood
And looked down one as far as I could
To where it bent in the undergrowth; 5

Then took the other, as just as fair,
And having perhaps the better claim,
Because it was grassy and wanted wear;
Though as for that the passing there
Had worn them really about the same, 10

And both that morning equally lay
In leaves no step had trodden black.
Oh, I kept the first for another day!
Yet knowing how way leads on to way,
I doubted if I should ever come back. 15

I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I—
I took the one less traveled by,
And that has made all the difference.

(समाप्त)

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...