मनसुप्त दांडेली _अभयारण्य भटकंती : भाग - १
![]() |
| Crested serpent eagle___PC: Parag Kokane |
मित्र आणि मैत्रिणींकडून भोळी आशा ठेवून लेन्ससाठी केलेली धावपळ
असफल झाल्याने स्वतःलाच दोष देत सव्वा दहाच्या सुमारास पुणे स्टेशन गाठले.
मकरंद दादासोबत पहिलीच भटकंती, ही जमेची बाजू. मकरंद दा ला फक्त
एकदाच पाहिले होते. बाकीचे दोघे म्हणजे पराग दादा आणि वरूण, हे फक्त
व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे पक्षीप्रेमी आहेत एवढेच कळले होते, पण त्यांच्याशी
प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. निसर्गावर भरभरून प्रेम करणाऱ्या या चार
भटक्यांची स्टेशनवर भेट झाली आणि त्यांना भेटून आपण ह्यांच्या समवेत पुढील
चार दिवस सहज काढू अशी खात्री झाली.
नियोजनाची जबाबदारी असलेला
मक्यादा : च्यायला दात आहेत पण चणे नाहीत आणि चणे आहेत पण दात नाहीत असं चाललंय ह्या ट्रीपचं. नक्कीच ब्लॅक पँथर दिसणार आता !!! त्याची अशी अवस्था होती.... आम्हाला हरणं दिसली तरी खूप होतं.
वेळेत आलेल्या मुंबई–हुबळी एक्स्प्रेस व्हाया बेळगावमध्ये आम्ही
स्थानापन्न झालो आणि २-३ संभाषणात मक्यादा जंगलाचा मोगली आहे हे कळून गेले.
वेळेत येऊन वेळेत निघालेली गाडी कर्नाटकमधील प्रसिद्ध बेळगावच्या पुढे
साधारण तासभर अंतरावर असलेल्या लोंढा स्टेशनला तासभर उशीराच पोहोचली.
स्टेशनबाहेर पडायच्या आधी गगनचुंबी भराऱ्या मारणाऱ्या Crested Serpent
Eagle पक्ष्याने दर्शन देऊन भटकंतीची शानदार सुरुवात करून दिली.
दांडेली अभयारण्य : कर्नाटकच्या उत्तर भागात काली नदीच्या काठावर
असलेले हे अभयारण्य १९५६ साली अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. ८८४ चौ.
कि.मी. एवढ्या प्रचंड विस्तारलेल्या भागात अणशी अभयारण्यही समाविष्ट आहे.
पक्षी प्रेमींसाठी अनोखी पर्वणी म्हणजे इथे २०० पेक्षा अधिक पक्ष्यांच्या
प्रजाती आढळतात. तसेच इथे प्राणी प्रेमींना पाहण्यासाठीसुद्धा भरभरून आहे.
हत्ती, वाघ, रानडुक्कर, जंगली कुत्रे, माकडं, हरणं, मुंगूस सारखे प्राणीही
इथे आढळून येतात.
पहिला दिवस : दांडेली गाठून पोट भरपाई करून टिंबर डेपोला सरकार
दरबारी आवश्यक कागदपत्रे जमा करून कुळगी नेचर कॅम्पला मुक्काम आणि
आजूबाजूच्या परिसरात प्राणी-पक्षी दिसताहेत का, यासाठी नशीब आजमावणे.
मक्यादाने आधीच ज्याच्याशी संपर्क केला होता, तो गोविंद आपली
ट्रॅक्स क्रुझर घेऊन ठरलेल्या वेळेत येऊन आमची वाटच पाहत होता. आम्ही
आल्यानंतर आमच्या बॅगा गाडीत लोड करून आमचा प्रवास दांडेली अभयारण्याच्या
टिंबर डेपो येथे असणाऱ्या शासकीय कार्यालयाकडे सुरू झाला. खड्डे विरहित
दर्जेदार रस्त्याने बहुदा माझा पहिलाच प्रवास असावा. मी मनातच कर्नाटक
सरकारचं कौतुक केलं.
माझ्या माहितीप्रमाणे हवेत उडणारी वाहने सोडली, तर जमिनीवर चालणारी
सर्वच वाहने बहुदा मक्यादाने चालविली असतील. त्यामुळे ट्रॅक्सचा ताबा
आपोआप त्याच्याकडेच आला. काही दिवसांनी जर मक्यादा दांडेलीच्या जंगलात
वडापावसाठी दिसला तर फारसं नवल वाटून घ्यायचं नाही. सकाळच्या नाश्त्यासाठी
दांडेलीतल्या कामत हॉटेलमध्ये शिरल्यावर आपण दक्षिण भारतात आलोय ह्याची
पुन्हा एकदा खात्री पटली आणि आम्ही निमुटपणे इडली सांबाराची ऑर्डर देऊन
टाकली. पोटाची टम्मी भरेस्तोवर इडली सांबार खाऊन वरून राहिलेल्या जागेत
आईसक्रीम चापलं. पेशवाई असलेल्या पुण्यात राहत असल्यामुळे अगदी माफक बिल ह्या>>
करून हॉटेल मालकाला दिले आणि चार दिवसांच्या राहण्याची व्यवस्था केलेल्या
दांडेली अभयारण्य कार्यालयाकडे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी टिंबर
डेपोला पोहचलो.
टिंबर डेपो : दांडेली आणि अणशी अभयारण्याचे शासकीय कार्यालय इथेच
आहे. आजूबाजूच्या परिसरात असंख्य प्रजातीचे पक्षी आढळत असल्याने
पक्षीप्रेमी ह्या भागात कायम रेंगाळत असतात.
![]() |
| Greater racket-tailed drongo — in Dandeli. PC: Parag Kokane |
या परिसरात फिरताना आमची रॅकेट टेल्ड ड्रॉन्गो आणि इतर काही
पक्ष्यांची नजरानजर झाली आणि बोमणहल्ली डॅम भागात दोन तीन फेरफटके मारून
हत्ती दिसण्याची जागा हेरून ठेवली. शेकुरू आणि हॉर्नबिल ह्यांनी प्रथमतः
दर्शन दिले. मक्यादावर गाडी चालविण्याचा पूर्ण विश्वास असलेल्या गोविंदने
संपूर्ण गाडी आमच्या हवाली केली आणि तो 'थेट दोन दिवसांनी भेटतो', असं
सांगून निघून गेला. त्यानंतर आम्ही कुळगी नेचर कॅम्प गाठले. आमची आजची आणि
उद्याच्या राहण्याची व्यवस्था इथे होती.
कुळगी नेचर कॅम्प : कर्नाटक सरकारतर्फे चालविण्यात येणाऱ्या या
कॅम्पमध्ये टेंट तसेच मोठ्या ग्रुपसाठीही राहण्याची उत्तम व्यवस्था आहे.
तुमच्या आवडीनुसार येथे जेवणाचीही उत्तम सोय होते. मात्र त्यासाठी काही तास
आधी तुम्हाला त्यांना कल्पना द्यावी लागते.
भटक्यांसाठी इतकं नेटनेटकं ‘सरकारी’ काही असेल, ह्यावर विश्वास
बसेना. फ्रेश होऊन एक वामकुक्षी घेतली आणि ४च्या ठोक्याला मक्यादाच्या
'हत्ती दाखवतो' ह्या शब्दावर विश्वास ठेवून बोमणहल्ली डॅमच्या परिसराकडे
हत्तींच्या शोधात निघालो. "तिच्यायला मोर!" अशी प्रतिक्रिया
मक्यादाची उमटली. साहजिकच वर्षाला दोन–अडीच हजार मोर बघणाऱ्याला अजून काय
हवं. सोबतीला लांडोर आणि आणखीन दोन-तीन प्रकारचे पक्षी ह्यांनी दर्शन दिले.
महाराष्ट्राचा राज्य प्राणी असूनही महाराष्ट्रात दुर्मिळ दर्शन देणारा
'शेकरू' इथे पावलोपावली दिसत होता. "शेकुरे उदंड जाहली" असं उगाच वाटून
गेलं.
एखादी सुंदरी पटविण्यासाठी अख्या आयुष्यात जितक्या येरझाऱ्या
मारल्या नसतील, त्यापेक्षा जास्त येरझाऱ्या केवळ हत्तीच्या दिसण्यासाठी
मारल्या. नाईलाजास्तव हत्तीचा दमदार चीत्कार ऐकायला मिळाला आणि आम्ही खुश
होऊन कुळगी कॅम्प गाठले. एक बोर्नविटा रीचवून रात्रीच्या जेवणासाठी
कोंबडीचे जीवन सार्थकी लावले.
अजून एक आकर्षण बाकी होतं, ते म्हणजे बंद गाडीतून विजेरीच्या
साहाय्याने रात्री जंगलात फेरफटका मारणे. जय्यत तयारीनिशी हले डुले करत
आम्ही पार्किंगकडे निघालो आणि एखादी भली मोठी काळी मांजर आडवी जावी आणि
योगायोग म्हणून तुम्ही ठरवलेल्या कामाचा सत्यानाश व्हावा, अगदी तसंच घडलं.
आम्ही कॅम्प मध्ये फेरफटका मारण्याचा आनंद घेण्यासाठी निघालेलो
असतांना आमच्यावर आडवी तिडवी बॅटरी मारत आलेल्या एका बाईला आम्ही फेरफटका
मारणार हे काही बघवले नाही. त्यामुळे तुम्हाला आता रात्री भटकण्याची
परवानगी नाही, असे काहीतरी बडबडत होती. आम्ही तिच्या बोलण्याकडे
सोयीस्करपणे दुर्लक्ष करून पार्किंगमध्ये असलेल्या गाडीजवळ पोहचलो. गाडीत
बसलो, गाडी सुरू केली,तर गाडी काय रिव्हर्स यायला तयार नव्हती. रात्रफेरी
रद्द होणार असं वाटत असतानाच त्या बाईनं धमकावलेला एक गार्ड धावत येऊन
'रात्री फिरू नका' असं सांगू लागला. आता मागे फिरणे क्रमप्राप्त होते.
आमच्या हट्टापायी त्या बिचाऱ्या मांजरीचे आडवे जाणे व्यर्थ जाईल, हे काही
मनाला पटेना.
रात्री गाडीत फिरण्यावर ऑब्जेक्शन घेऊन चालत फिरण्याला परमिशन
देणाऱ्या त्या बाईंचा सल्ला किती योग्य आणि किती अयोग्य, ह्यावर चर्चा करून
रात्री आणि भटकण्याचा बेत रद्द करून आम्ही पुन्हा टेंटमध्ये जाऊन विसावलो.
दिवस दुसरा : दांडेली-टिंबर मार्केटला पक्षी पाहणे, सिंथेरी
रॉक्स, पणसोली जीप सफारी, बोमणहल्ली डॅम जवळ पुन्हा हत्ती शेधात फेरफटका,
रात्र भटकंती (ठाम निर्धार)
कुळगीतून पुन्हा दांडेली गाठली. रिव्हर्स गियर पडत नाही ह्याची
कल्पना गोविंदला दिली. सकाळचा नाश्ता उरकून टिंबर डेपो गाठला. टिंबर डेपोला
पोहोचून १०-१५ मिनिटे झाली असतील तोच गोविंद, मेकॅनिक घेऊन हजर झाला आणि
गियरचे काम करून घेतले आणि आम्ही टिंबर मार्केट परिसरात घुसलो. तिथे असंख्य
पक्षांनी दर्शन दिले. पक्ष्यांची शाळाच इथे भरते जणू असे दिसत होते. हवेत
उडणाऱ्या पक्षांची हवेतच नावे घेणारा मक्या दा, पराग दा आणि वरुण
ह्यांच्यात माझं काहीच देणंघेणं नसलेल्या मला झेपेल तेवढे रंग आणि ढंग
बघताना कमालीचा आनंद होत होता. कावळा, चिमणी असले काही प्रकार तिथे
नसल्यामुळे तिथले सर्वच पक्षी माझ्यासाठी नवीन होते. नेहमी ऐकू येणाऱ्या
आवाजापेक्षा ही किलबिलाट सुखावणारी वाटली.
अगदीच जवळ येणाऱ्या पक्षांची छबी टिपताना प्रत्येक क्लिकला
शिव्यांचा बाजार भरत होता. १०१ टक्का देतो म्हणून निघायच्या आधी १ दिवस जमत
नाही म्हणून सांगणारे, भाडेतत्वावर का होईना पण मी फिक्स मिळवून देतो असे
ओकून आयत्या वेळेस घाण करणारे, कोणतीही गोष्ट तुझं–माझं न करता आपलं
म्हणायचं तसंच एकही गोष्ट सोबतीशिवाय न होणारी आता तोंडावर डायरेक्ट नाही
म्हणतात. च्यामारी असली वंगाळ लोकं कशाला यादीत ठेवायची?
बराच वेळ असंख्य पक्ष्यांच्या भेटीगाठी करून एकदाचे टिंबर मार्केट
सोडून आमची गाडी सिंथेरी रॉक्सकडे वळली. ४० एक किलोमीटरचा हेमा मालिनीच्या
तुळतुळीत गालासारख्या रस्त्याने सिंथेरी रॉक्स गाठले.
सिंथेरी रॉक्स : कणेरी नदीच्या काठावर असलेले हे ठिकाण आहे. साधारण
३०० फुट उंचीच्या ज्वालामुखीने बनलेल्या ग्रॅनाईटच्या भिंतीवरील वेडेवाकडे
आकार पर्यटकांना भुरळ पाडतात. नदीवरील खडकाचे वैशिष्ट्यपूर्ण आकार लक्षवेधी
असल्याने इथल्या जागेचा पर्यटनासाठी योग्य वापर मायबाप सरकारने करून
आपल्या गंगाजळीत विशेष भर टाकली आहे.
प्रवेश फी भरून आलेल्या पर्यटकांना टाळून आमचा मोर्चा पक्षी
निरीक्षणाकडे आपसूकच वळला. मधमाशी आणि त्यांची जीवनपद्धती उलगडून सांगताना
मक्यादाने आपण मोगली असल्याचं पुन्हा दाखवून दिले. खळाळणाऱ्या नदीच्या
काठावर तासभर घालवल्यावर आम्ही तेथून काढता पाय घेतला, तेव्हा दुपारचे
अंदाजे दीड वाजून गेले असतील.
आता आमचा मोर्चा पणसोलीकडे जीप सफारीकडे वळला. तिकिटाचे सोपस्कार
पार पाडले. पहिली सफारी पाऊणे चार वाजता होती. त्यामुळे मधल्या वेळेत
.......दिलीप प्रभावळकर ह्यांचे हसवा फसवी – पुलंची कमाल तसेच लक्ष्या
यांचे अभिनय कौशल्य मक्यादाने उलगडून दाखवले. ठरलेल्या वेळेत जीप मध्ये
बसलो.
पणसोली जीप सफारी : सरकारी असणाऱ्या जीप त्यांनी आखून दिलेल्या
मार्गावरच पळतात. प्रत्येकी रु. ४५०/- असा खर्च असून दोन तास तुम्हाला
जंगलात फिरवून आणतात.
एकाच वेळेत सुटलेल्या चार-पाच जीप गाड्या धुरळा उडवतच जंगलात
घुसल्या. तासभर उलटला तरी मोर आणि लांडोर व्यतिरिक्त काहीच दिसेना.
त्यामुळे खेमा थोडा उदास होता. वेगवेगळ्या दिशेने सुटलेल्या जीप गाड्या
क्रॉस होताना तुम्हाला काय दिसले? आम्हाला काय दिसले, तर नाराजीचे चेहरेच
दिसत होते.
हा खेळ थांबला तो एका पाण्याच्या साठ्याच्या शेजारी गवतात बसलेल्या
गव्याजवळ. मजबूत शिंग आणि वटारलेले डोळे ह्या व्यतिरिक्त काहीच दिसेना,
त्यामुळे तो कधी उभा राहतो असं झालं होतं. त्याने ह्यासाठी बराच वेळ
घालवला. अगदीच कंटाळून दर्शन दे रे, देरे भगवंता ........... असं गाणं
तोंडातून आपसूकच बाहेर आले आणि जो हास्याचा फवारा फुटला, ते आताही आठवले
तरी हसू आवरत नाही. त्यानंतर लांडगा आणि हरणांनी निवांत दर्शन देऊन सफारी
सार्थकी लावली. निघता निघता सफारीसाठी पाळलेले हत्ती पाहून कुळगी गाठले,
तेव्हा संध्याकाळचे ७ वाजले असतील.
फ्रेश होवून अंडाकरीवर ताव मारून एलियन ह्या विषयावर चर्चा सत्र
रंगले आणि नंतर दबक्या आवाजाने आम्ही १०.३० च्या सुमारास रात्र भटकंतीसाठी
निघालो. आता रिव्हर्सचा घोळ नको, म्हणून मक्यादाने गाडी अगोदरच सरळ लावून
ठेवली होती. क्षणाचाही विलंब न करता कालचे अधुरे काम पूर्ण करण्यासाठी
आम्ही गुपचूप निघालो. ह्यावेळेस जंगलाने निराश केले नाही. ज्या हत्तींसाठी
इतका वेळ वाया घालविला त्या जंगली हत्तीने सहजासहजी दर्शन दिले, सोबत हरणे
आणि ससेही दिसले आणि तृप्त मानाने ३० एक किलोमीटर फेरफटक्याची रात्र भटकंती
आटोपती घेवून आम्ही टेंटमध्ये शांत झोपी गेलो.
पहिल्या दिवसाचा अनुभव माझ्यासाठी खूप नवीन होता. पदवीधर
असणाऱ्यांच्यात आपण बालवाडीत असल्यासारखं प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या दिवशी
जी अवस्था होते, तशीच माझी अवस्था होती. त्याहून वेगळी अजिबात नव्हती.
निसर्गात भटकायचं म्हणजे कमालीचा संयम हवा. प्राणी–पक्षी तुम्हाला
तुमच्या सोयीनुसार दिसतील असं अजिबात नसतं. त्यांचे उपकार आणि आपले नशीब
ह्यांच्या योग्य समतोलावर तुमच्या समोर निसर्गाचं अद्भुत देणं तुमच्या समोर
येतं आणि डोळे विस्फारून पाहावं, इतकं ते कमालीचं असतं.
___________________________पुढील भाग लवकरच_________________________
![]() |
हॉटेल कामत
|
![]() |
| टिंबर डेपो, आणि आमची traks क्रुझर |
![]() |
| टिंबर डेपो |
![]() |
| कॅसल रॉक |
![]() |
| Velvet-fronted nuthatch |
Blue-tailed bee-eater — in Dandeli.__PC: Parag Kokane
![]() |
Common emerald dove — in Dandeli. PC: Varun lele
|
![]() |
| Forest wagtail — at Dandeli Wildlife Sanctuary. |
Crested serpent eagle
Grey junglefowl — in Dandeli. PC: Parag Kokane
Magpie robin sub adult male — at Dandeli Wildlife Sanctuary.
Malabar pied hornbill — in Dandeli. PC: Parag Kokane
Grey junglefowl
Indian Pitta__PC Parag Kokane
Jackal — at Pansoli Wildlife Sanctuary.
शेकुरे उदंड जाहली — at Dandeli Wildlife Sanctuary.
मनसुप्त दांडेली _अभयारण्य भटकंती : भाग - २
मनसुप्त दांडेली_अभयारण्य भटकंती : भाग-1: http://unadbhatkantee.blogspot.in/2017/05/blog-post_22.html?view=magazine
दिवस तिसरा : अणशी नेचर कॅम्प आणि आजूबाजूच्या परिसरात भटकंती.
दांडेलीच्या जंगलाचे तसे दोन भाग पडतात. त्यातील एक भाग म्हणजे कुळगी, ज्यात पर्णझडी वृक्ष जास्त आहेत तर दुसरा भाग म्हणजे अणशी, जिथे दाट आणि हिरवीगार झाडे. सकाळी साडे आठला नाश्ता कार्यक्रम आटपून मध्येच गोविंदला घेऊन अणशीकडे प्रस्थान केले. ज्या एकाच लेखकाचे एकच पुस्तक ह्या तिघांनी आणलेले होते, ते 'बर्डस ऑफ इंडियन सबकॉन्टिनेन्ट' (लेखक : इन्स्कीप अँड ग्रीमेट) ह्या पुस्तकाच्या कव्हर पेजवर नवरंग / इंडियन पिट्टा याचा फोटो दिसला आणि भरल्या मनाने कुळगी मागे सोडून दाट झाडीतून वळणदार रस्त्याने अणशी नेचर कॅम्प गाठले. आज होळी असल्याने ठिकठिकाणी लहान मुले रस्त्यात आडवी येऊन रंगाच्या धाकाने टोल वसुली करीत होती. असले उद्योग आपण लहानपणी केले असल्याने त्यांचेही फार कौतुक वाटत होते.
गर्द झाडीने व्यापलेल्या प्रशस्त जागेत अणशी नेचर कॅम्प विसावलेले आहे. कुळगीच्या मानाने इथले तंबू मोठ्या आकारातले आहेत. चहा, पोहे असा खादाड कार्यक्रम उरकल्यावर आम्ही कॅम्पच्या मागच्या बाजूच्या नदीवर फेरफटका मारण्यास निघालो. तास दीड तासांच्या भटकंतीत अनेक पक्ष्यांनी आणि एका धावत्या सापाने दर्शन दिले. शेवटी थकून नदीच्या पात्रात काहीवेळ विश्रांती म्हणून आमचा उगाच टाईमपास चालू होता.
ट्रीप चालू होण्याआधी पुणे स्टेशनला जेव्हा मी पोहचलो होतो, तेव्हाच पराग दा बोललेला, की Brown fish owl दिसला तर माझी अख्खी ट्रीप वसूल होईल. गेले अडीच दिवस आम्ही हे अधून मधून ऐकतच होतो. पण.....
अगर किसी चीज को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती है. असंच, हो अगदी असंच घडलं आणि Brown fish owl आमच्या समोरच्या मोकळ्या फांदीवर येऊन बसला. कित्येक दिवस उपाशी असल्यानंतर समोर पंचपक्वान्नाची थाळी नकळत तुमच्या समोर यावी आणि तुम्ही त्यावर तुटून पडावं असं झालं. हातातला मोबाईल झपकन खाली ठेवून ... (टाकलाच खाली...) आणि खाली ठेवलेला कॅमेरा क्षणाचाही विलंब न करता उचलून क्लिक्सचा अक्षरशः बाजार उठवला.
पुण्यातून निघाल्यापासून तोच Brown fish owl दिसावा अशी आशा ठेवतो काय? तीन दिवसांनतर ती आशा सोडून इतर जे पक्षी दिसले त्यामुळे तो विस्मरणात जातो काय आणि ध्यानीमनी नसताना तुमच्या अगदी समोर तो येऊन बसतो काय? तो ही मोकळ्या फांदीवर!!
दांडेलीच्या जंगलाचे तसे दोन भाग पडतात. त्यातील एक भाग म्हणजे कुळगी, ज्यात पर्णझडी वृक्ष जास्त आहेत तर दुसरा भाग म्हणजे अणशी, जिथे दाट आणि हिरवीगार झाडे. सकाळी साडे आठला नाश्ता कार्यक्रम आटपून मध्येच गोविंदला घेऊन अणशीकडे प्रस्थान केले. ज्या एकाच लेखकाचे एकच पुस्तक ह्या तिघांनी आणलेले होते, ते 'बर्डस ऑफ इंडियन सबकॉन्टिनेन्ट' (लेखक : इन्स्कीप अँड ग्रीमेट) ह्या पुस्तकाच्या कव्हर पेजवर नवरंग / इंडियन पिट्टा याचा फोटो दिसला आणि भरल्या मनाने कुळगी मागे सोडून दाट झाडीतून वळणदार रस्त्याने अणशी नेचर कॅम्प गाठले. आज होळी असल्याने ठिकठिकाणी लहान मुले रस्त्यात आडवी येऊन रंगाच्या धाकाने टोल वसुली करीत होती. असले उद्योग आपण लहानपणी केले असल्याने त्यांचेही फार कौतुक वाटत होते.
गर्द झाडीने व्यापलेल्या प्रशस्त जागेत अणशी नेचर कॅम्प विसावलेले आहे. कुळगीच्या मानाने इथले तंबू मोठ्या आकारातले आहेत. चहा, पोहे असा खादाड कार्यक्रम उरकल्यावर आम्ही कॅम्पच्या मागच्या बाजूच्या नदीवर फेरफटका मारण्यास निघालो. तास दीड तासांच्या भटकंतीत अनेक पक्ष्यांनी आणि एका धावत्या सापाने दर्शन दिले. शेवटी थकून नदीच्या पात्रात काहीवेळ विश्रांती म्हणून आमचा उगाच टाईमपास चालू होता.
ट्रीप चालू होण्याआधी पुणे स्टेशनला जेव्हा मी पोहचलो होतो, तेव्हाच पराग दा बोललेला, की Brown fish owl दिसला तर माझी अख्खी ट्रीप वसूल होईल. गेले अडीच दिवस आम्ही हे अधून मधून ऐकतच होतो. पण.....
अगर किसी चीज को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती है. असंच, हो अगदी असंच घडलं आणि Brown fish owl आमच्या समोरच्या मोकळ्या फांदीवर येऊन बसला. कित्येक दिवस उपाशी असल्यानंतर समोर पंचपक्वान्नाची थाळी नकळत तुमच्या समोर यावी आणि तुम्ही त्यावर तुटून पडावं असं झालं. हातातला मोबाईल झपकन खाली ठेवून ... (टाकलाच खाली...) आणि खाली ठेवलेला कॅमेरा क्षणाचाही विलंब न करता उचलून क्लिक्सचा अक्षरशः बाजार उठवला.
पुण्यातून निघाल्यापासून तोच Brown fish owl दिसावा अशी आशा ठेवतो काय? तीन दिवसांनतर ती आशा सोडून इतर जे पक्षी दिसले त्यामुळे तो विस्मरणात जातो काय आणि ध्यानीमनी नसताना तुमच्या अगदी समोर तो येऊन बसतो काय? तो ही मोकळ्या फांदीवर!!
मागच्या कितीतरी जन्माचा पुण्यसंचय असल्याशिवाय असं होणं शक्य नाही.
परागदाने लागलीच एक पार्टी जाहीर करून टाकली (अजून ती मिळालेली नाही हे
वेगळंच.)
Brown fish owl विषयी : हे घुबड महाद्वीपीय आशिया आणि काही किनाऱ्याकडील उबदार बेटे, उष्णकटिबंधीय व आर्द्र हवामानामध्ये आढळते. घुबड प्रजातीतला हा पक्षी 125 ते 140 सें.मी. आकाराचा असतो.
Brown fish owl विषयी : हे घुबड महाद्वीपीय आशिया आणि काही किनाऱ्याकडील उबदार बेटे, उष्णकटिबंधीय व आर्द्र हवामानामध्ये आढळते. घुबड प्रजातीतला हा पक्षी 125 ते 140 सें.मी. आकाराचा असतो.
पूर्ण समाधानाने कॅम्प गाठले आणि कॅम्पपासून ५५ कि.मी.वर असलेले
कारवार गाठून हॉटेल अमृतला माश्यांच्या हव्यासापायी भुकेचे डोहाळे पुरवायचे
ठरवले. साधारण दोन वाजून गेले असतील. आम्ही कारवारला दाखल झालो... आणि
होळीनिमित्त कारवार शहर बंद होते आणि त्यात हॉटेल अमृतही बंद झालं! सर्व
मासे नदीला मिळाले...... शहरात शोधून शोधून सापडलेल्या एका हॉटेलात चिकन
तंगडी तोडून हायवेवरील मत्स्यालय पाहून समुद्र किनारा गाठला. पोहण्याची
इच्छा नसल्याने थोडा वेळ रेंगाळून तिथून काढता पाय घेतला आणि अणशीकडे
पुन्हा यायला निघालो. येताना गाण्यांच्या मैफिली रंगल्या. आपल्या श्रवणीय
आवाजाने वरूणने प्रवास जिवंत केला.
कॅम्प साईटला पोहोचून आम्ही जेवणाचा कार्यक्रम उरकला. मक्यादा, पराग दा आणि वरुण ह्यांनी आज मिळवलेल्या खजिन्याची लिस्ट अपडेट केली. गाडीतून फेरफटका मारताना कोणतेही मांजर आडवे गेले नाही, पण एका अनामिक प्राण्याच्या हालचालीशिवाय काही अनुभव न घेता पुन्हा कॅम्प साईटवर येऊन आम्ही झोपी गेलो.
कॅम्प साईटला पोहोचून आम्ही जेवणाचा कार्यक्रम उरकला. मक्यादा, पराग दा आणि वरुण ह्यांनी आज मिळवलेल्या खजिन्याची लिस्ट अपडेट केली. गाडीतून फेरफटका मारताना कोणतेही मांजर आडवे गेले नाही, पण एका अनामिक प्राण्याच्या हालचालीशिवाय काही अनुभव न घेता पुन्हा कॅम्प साईटवर येऊन आम्ही झोपी गेलो.
![]() |
| Indian Pitta__PC Parag kokane |
![]() |
| Bar-winged flycatcher-shrike_PC: Parag Kokane |
दिवस चौथा : सकाळी आम्ही पुन्हा प्राणी-पक्ष्यांच्या शोधात निघालो... आज मात्र उरले सुरले बरेच पक्षी अगदीच सहजासहजी सापडत होते. पक्ष्यांच्या हंटिंग पार्टीवर अभ्यास करणारी एक तरुणी, मक्या दाच्या ओळखीने जंगलात भटकताना भेटली. हंटिंग पार्टीविषयी मक्यादाकडून जाणून घेऊन अभ्यासाचा असाही एक भाग असतो, ह्याचं नवलच वाटलं.
पक्ष्यांची मिक्स्ड हंटीग पार्टी - म्हणजे वेगवेगळ्या जातीचे पक्षी तात्पुरते एकत्र येऊन शिकार करतात.
अजून एक नवल घडलं, ते म्हणजे ब्लॅक कॅप्ड किंगफिशर, कॉमन किंगफिशर आणि व्हाईट थ्रोटेड किंगफिशर हे एकाच फांदीवर येऊन बसले. अजून एक सरप्राईज म्हणजे स्टॉर्क बिल्ड किंगफिशर नकळत दिसला आणि गम्मत म्हणून त्याचा आवाज मक्यादाच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या app मधून वाजविण्यात आला. यामुळे गम्मत अशी झाली, की तो समोर येरझाऱ्या घालू लागला. दगडाच्या आड बसून ही गम्मत बघण्याची मजा वेगळीच.
नदीच्या काठावर पक्ष्यांसोबत बराच वेळ घालवल्यानंतर आम्ही परतीच्या
प्रवासासाठी आवराआवर केली. वाटेत गोविंदला घेऊन लोंढा स्टेशन गाठले.
गोविंदचा निरोप घेऊन उलटी सुलटी जोडून पुण्याकडे निघणाऱ्या ट्रेनमध्ये
बसलो.
निघताना चार दिवसाचा हिशोब मागितलात, तर तो न मोजता येणारा. मला लेन्स जरी मिळाली नसली, तरी आता काहीच फरक पडत नव्हता.
निघताना चार दिवसाचा हिशोब मागितलात, तर तो न मोजता येणारा. मला लेन्स जरी मिळाली नसली, तरी आता काहीच फरक पडत नव्हता.
भटकताना आमच्या चाहुलीने असंख्य पक्षी उडाले,
तसेच हेही मित्र यादीतून कायमचे उडाले.
(अतिशय वाईट कविता)
अनुभव नसताना पहिल्या दिवसाचा संयम, अचानक-भयानक दिसलेले प्राणी, शंभराहून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे सापडलेले आणि नोंदवलेले पक्षी. अपेक्षा नसतानाही Brown fish owl ने तुमच्या समोरच्या झाडाच्या मोकळ्या फांदीवर येऊन बसणे काय? मोबाईलमध्ये लावलेल्या त्याच पक्ष्याच्या आवाजावर तोच पक्षी घिरट्या घालणे काय? 'दर्शन दे रे'च्या किस्स्यावर हसून फुटणे काय? मानवी मांजर आडवे जाऊन येणारे अडथळे काय? अचानक होणारे हत्ती दर्शन काय ?............................
ह्या साऱ्या प्रश्नांच्या उत्तरांच्या आठवणी झिंग चढवणाऱ्या, पण उतरवणाऱ्या नव्हेत.
____________________________________________________________________
आयुष्याच्या एका शांत सायंकाळी ही सारी स्मरणे पुन्हा आठवेन आणि पुन्हा नव्याने जगेन.
____________________________________________________________________
____________________________________________________________________
![]() |
| Black-capped kingfisher__PC: Parag Kokane |
![]() |
| Crested serpent eagle__PC Parag Kokane |
![]() |
| Malabar pied hornbill |
![]() |
| Malabar Woodshrike__PC: Parag Kokane |
![]() |
| Nilgiri flowerpecker__PC: Parag Kokane |
![]() |
| Orange minivet__PC: Parag Kokane |
![]() |
| Red vented bulbul_PC: Parag Kokane |
![]() |
| Red whiskered bulbul__PC: Parag Kokane |
![]() |
| वेडं कोकरु खुप थकलं; येताना घरी वाट चुकलं ! अंधार बघून भलतंच भ्यालं दमून दमून झोपेला आलं ! शेवटी एकदा घर दिसलं वेडं कोकरु गोड हसलं ! |
![]() |
| White-bellied treepie__PC Parag Koakne |
![]() |
| Velvet-fronted nuthatch_PC: Parag Kokane |
![]() |
| Tickell's blue flycatcher_PC Parag Kokane |
![]() |
| अणशी कॅम्प |
![]() |
| अणशीतील फेरफटका |
![]() |
| सहभागी भिडू |
*एकूण चार दिवसीय दांडेली अभयारण्य भटकंती त्यातले दोन दिवस कुळगी आणि दोन दिवस अणशी
* अतिशय नियोजनपूर्व आखणी मकरंद केतकर ह्यांनी केल्यामुळे आम्हाला फारसा त्रास झाला नाही, म्हणून त्यांचे करावे तितके कौतुक थोडेच.
* चार दिवसाच्या भटकंतीसाठी लागणारी क्रुझर ट्रॅक्ससहीत सर्व खर्च रु. ६७००/- प्रत्येकी
* दोन्ही नेचर कॅम्पमधील एका टेंटमध्ये दोघे राहतील अशी व्यवस्था आहे, ग्रुपसाठी वेगळी व्यवस्था आहे.
* जंगल भटकंतीसाठी गाडी, मिनी बस, जीप तसेच गाईड; या सगळ्यांची व्यवस्था सरकारी दफ्तरातून होऊ शकते.
*जंगलात लागणाऱ्या आगीमुळे ह्या भागातील ट्रेकिंग बंद करण्यात आलेले आहे.
* भेटीसाठी उत्तम काळ: दर्दी भटक्यांसाठी वर्षाचे बारा महिने आणि पर्यटकांसाठी फेब्रुवारी ते ऑक्टोबर महिना.
संपूर्ण ट्रीप मकरंद केतकर, पराग कोकणे, अरुण लेले हे अभ्यासू आणि जंगलातल्या प्राणी-पक्ष्यांचे विशेष ज्ञान असलेले भिडू सोबत असल्याने माझ्या ज्ञानात झेपेल तेवढी भर पडली, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार.
दांडेलीतील कुबेर खजिना.
हे पक्षी जे सहजासहजी दिसत नाहीत त्यांची नावे आहेत. बाकी रोजच्या रोज दिसणाऱ्या पक्ष्यांची नावे जाणीवपूर्वक वगळलेली आहेत.
1. Grey Junglefowl
2. Crested serpent eagle
3. Crested hawk eagle
4. Booted eagle
5. Brahminy kite
6. Shikra
7. Orange minivet
8. Small minivet
9. Golden fronted leafbird
10. Common iora
11. Coppersmith barbet
12. White cheeked barbet
13. Black hooded oriole
14. Golden oriole
15. Brown capped woodpecker
16. Lesser flameback woodpecker
17. Heart spotted woodpecker
18. Velvet fronted nuthatch
19. Tickel’s blue flycatcher
20. Ultramarine flycatcher
21. Black naped monarch
22. Asian fairy bluebird
23. Indian grey hornbill
24. Malabar grey hornbill
25. Malabar pied hornbill
26. Common woodshrike
27. White rumped shama
28. Plum headed parakeet
29. Rose ringed parakeet
30. Malabar parakeet
31. Blue tailed bee eater
32. Common bee eater
33. Forest wagtail
34. White browed wagtail
35. Dark fronted babbler
36. Scimitar babbler
37. Bar winged flycatcher shrike
38. Long tailed shrike
39. Yellow fronted green pigeon
40. Grey fronted green pigeon
41. Yellow footed green pigeon
42. Blue rock pigeon
43. Imperial wood pigeon (Call only)
44. Rufous treepie
45. White bellied treepie
46. Red rumped swallow
47. Ashy wood swallow
48. House swift
49. Yellow tit
50. Great tit
51. Oriental white eye
52. Crimson backed sunbird
53. Vigor’s sunbird
54. Purple rumped sunbird
55. Purple sunbird
56. Chestnut tailed starling
57. Common Mynah
58. Jungle Mynah
59. Hill mynah
60. Jungle crow
61. House crow
62. Greater coucal
63. Red whiskered bulbul
64. Red vented bulbul
65. Yellow browed bulbul
66. Spotted dove
67. Emerald dove
68. Laughing dove
69. Thick billed flowerpecker
70. Nilgiri flowerpecker
71. Magpie robin
72. Indian roller
73. Indian peafowl
74. Little cormorant
75. White throated kingfisher
76. Common Kingfisher
77. Black capped kingfisher
78. Stork billed kingfisher
79. Blue capped rock thrush
80. Orange headed ground thrush
81. Malabar whistling thrush
82. Cattle egret
83. Little egret
84. Western reef egret
85. Pond heron
86. Black drongo
87. Racket tailed drongo
88. Ashy drongo
89. White bellied drongo
90. Chestnut shouldered petronia
91. Asian paradise flycatcher
92. Red breasted flycatcher
93. Red wattled lapwing
94. Indian pitta
95. Brown fish owl
96. Clamorous reed warbler
97. Common greenshank
98. Common sandpiper
99. Open billed stork
100. Black headed ibis
101. White breasted waterhen
102. Nightjar (Unidentified)
103. Srilankan Frogmouth (Call)
* अतिशय नियोजनपूर्व आखणी मकरंद केतकर ह्यांनी केल्यामुळे आम्हाला फारसा त्रास झाला नाही, म्हणून त्यांचे करावे तितके कौतुक थोडेच.
* चार दिवसाच्या भटकंतीसाठी लागणारी क्रुझर ट्रॅक्ससहीत सर्व खर्च रु. ६७००/- प्रत्येकी
* दोन्ही नेचर कॅम्पमधील एका टेंटमध्ये दोघे राहतील अशी व्यवस्था आहे, ग्रुपसाठी वेगळी व्यवस्था आहे.
* जंगल भटकंतीसाठी गाडी, मिनी बस, जीप तसेच गाईड; या सगळ्यांची व्यवस्था सरकारी दफ्तरातून होऊ शकते.
*जंगलात लागणाऱ्या आगीमुळे ह्या भागातील ट्रेकिंग बंद करण्यात आलेले आहे.
* भेटीसाठी उत्तम काळ: दर्दी भटक्यांसाठी वर्षाचे बारा महिने आणि पर्यटकांसाठी फेब्रुवारी ते ऑक्टोबर महिना.
संपूर्ण ट्रीप मकरंद केतकर, पराग कोकणे, अरुण लेले हे अभ्यासू आणि जंगलातल्या प्राणी-पक्ष्यांचे विशेष ज्ञान असलेले भिडू सोबत असल्याने माझ्या ज्ञानात झेपेल तेवढी भर पडली, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार.
दांडेलीतील कुबेर खजिना.
हे पक्षी जे सहजासहजी दिसत नाहीत त्यांची नावे आहेत. बाकी रोजच्या रोज दिसणाऱ्या पक्ष्यांची नावे जाणीवपूर्वक वगळलेली आहेत.
1. Grey Junglefowl
2. Crested serpent eagle
3. Crested hawk eagle
4. Booted eagle
5. Brahminy kite
6. Shikra
7. Orange minivet
8. Small minivet
9. Golden fronted leafbird
10. Common iora
11. Coppersmith barbet
12. White cheeked barbet
13. Black hooded oriole
14. Golden oriole
15. Brown capped woodpecker
16. Lesser flameback woodpecker
17. Heart spotted woodpecker
18. Velvet fronted nuthatch
19. Tickel’s blue flycatcher
20. Ultramarine flycatcher
21. Black naped monarch
22. Asian fairy bluebird
23. Indian grey hornbill
24. Malabar grey hornbill
25. Malabar pied hornbill
26. Common woodshrike
27. White rumped shama
28. Plum headed parakeet
29. Rose ringed parakeet
30. Malabar parakeet
31. Blue tailed bee eater
32. Common bee eater
33. Forest wagtail
34. White browed wagtail
35. Dark fronted babbler
36. Scimitar babbler
37. Bar winged flycatcher shrike
38. Long tailed shrike
39. Yellow fronted green pigeon
40. Grey fronted green pigeon
41. Yellow footed green pigeon
42. Blue rock pigeon
43. Imperial wood pigeon (Call only)
44. Rufous treepie
45. White bellied treepie
46. Red rumped swallow
47. Ashy wood swallow
48. House swift
49. Yellow tit
50. Great tit
51. Oriental white eye
52. Crimson backed sunbird
53. Vigor’s sunbird
54. Purple rumped sunbird
55. Purple sunbird
56. Chestnut tailed starling
57. Common Mynah
58. Jungle Mynah
59. Hill mynah
60. Jungle crow
61. House crow
62. Greater coucal
63. Red whiskered bulbul
64. Red vented bulbul
65. Yellow browed bulbul
66. Spotted dove
67. Emerald dove
68. Laughing dove
69. Thick billed flowerpecker
70. Nilgiri flowerpecker
71. Magpie robin
72. Indian roller
73. Indian peafowl
74. Little cormorant
75. White throated kingfisher
76. Common Kingfisher
77. Black capped kingfisher
78. Stork billed kingfisher
79. Blue capped rock thrush
80. Orange headed ground thrush
81. Malabar whistling thrush
82. Cattle egret
83. Little egret
84. Western reef egret
85. Pond heron
86. Black drongo
87. Racket tailed drongo
88. Ashy drongo
89. White bellied drongo
90. Chestnut shouldered petronia
91. Asian paradise flycatcher
92. Red breasted flycatcher
93. Red wattled lapwing
94. Indian pitta
95. Brown fish owl
96. Clamorous reed warbler
97. Common greenshank
98. Common sandpiper
99. Open billed stork
100. Black headed ibis
101. White breasted waterhen
102. Nightjar (Unidentified)
103. Srilankan Frogmouth (Call)











































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.