ट्रेन चली छुक छुक छुक छुक
![]() |
| भारत की सबसे तेज दौड़ने वाली ट्रेन -भोपाल शताब्दी |
![]() |
| भारत की सबसे धीमी वाली ट्रेन -प्रतापनगर -झाम्बुसार पैसेंजर |
![]() |
| भारत की सबसे धीमी वाली ट्रेन नीलगिरि पैसेंजर |
![]() |
| भारतीय रेलवे इंजीनियरों की कारीगरी |
![]() |
| माता वैष्णो देवी कटरा जाने के लिए तैयार ट्रेन |
![]() |
| सबसे लम्बा प्लेटफार्म - खड़गपुर |
![]() |
सबसे लम्बा स्टेशन का नाम |
![]() |
| भारत की शान -रेलवे |
![]() |
![]() |
![]() |
| शाही सवारी - पैलेस ओन व्हील्स |
![]() |
| पुराने दिनों की याद ताज़ा करती -फेयरी क्वीन |
इतिहास बताते किले
स्टाल्कर किला, स्कॉटलैंड
मॉन्ट सेंट माइकल, फ्रांस
फ्रांस के नॉर्मेंडी में एक आइलैंड पर बना ये किला एक किलोमीटर की दूरी में फैला है। फ्रांस की सबसे मशहूर जगहों में एक किले को यूनेस्को ने विश्व धरोहर की सूची में जगह दी है। यहां हर साल करीब 30 लाख पर्यटक पहुंचते हैं।
होहेनजोलर्न किला, जर्मनी
कोकेम किला, जर्मनी
लिचेन्स्टेन किला, जर्मनी
यह किला होनाउ के नजदीक एक चट्टान पर बना हुआ है। इतिहासकारों का मानना है कि इसे 1200 के आसपास बनाया गया है। गौरतलब है कि 1311 में रेचक्रेग युद्ध और फिर 1381 में राउटीन्जेन द्वारा किले को दो बार ध्वस्त किया जा चुका है।
उसके बाद से किले को दोबारा कभी भी ठीक नहीं किया गया। वर्तमान में उर्च के राजा इस किले के मालिक हैं और यहां किसी भी बाहरी को प्रवेश की अनुमति नहीं है।
रॉक ऑफ कैसल, आयरलैंड
रॉक ऑफ कैसलव आयरलैंड की टिपरैरी काउंटी में मौजूद एक ऐतिहासिक जगह है। इसे कैसल ऑफ किंग्स और सेंट पट्रिक्स रॉक्स के नाम से भी जाना जाता है। स्थानीय पौराणिक कथाओं के मुताबिक इस किले की स्थापना डेविल बिट्स पहाड़ पर तब हुई थी, जब सेंट पैट्रिक ने वहां मौजूद गुफा से शैतान को भगाया था। हालांकि, नॉर्मेन आक्रमण के पहले ये मनस्टर के राजा का पुश्तैनी किला रहा था। 1101 में मनस्टर के राजा ने इसे चर्च को दान में दे दिया था।
पेल्स किला, रोमानिया
ये किला रोमानिया के सिनाइया शहर में मौजूद है। इसका निर्माण 1873 में शुरू हुआ था, जो 1914 में पूरा हुआ। इसके निर्माण में आज के समय के मुताबिक 12 करोड़ डॉलर की राशि लगी थी। ये रोमानिया के राजा केरौल प्रथम के शासन में बना था।
जग’ते रहो : ‘ब्युटी’फुल शहर
‘जग’ते रहो : ‘ब्युटी’फुल शहर
माझं शहर म्हणजे ब्यूट. अमेरिकेतल्या मोंटाना राज्याच्या साधारण मध्यावर हे शहर आहे.

निनाद भागवत, ब्यूट, मोंटाना, युएसए
या शहराला ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व आहे. शहर आणि आसपासच्या परिसरात अत्यंत मौल्यवान खनिजांचे (सोने, चांदी, तांबे, शिसे, इत्यादी) प्रचंड साठे आहेत. म्हणूनच हे शहर व आसपासचा परिसर म्हणजे सिल्व्हर बो कौंटी हा ‘जगातील सर्वात श्रीमंत परिसर’ म्हणून ओळखला जातो.
माझं शहर म्हणजे ब्यूट. अमेरिकेतल्या मोंटाना राज्याच्या साधारण मध्यावर हे शहर आहे. आमच्या शहराची अनेक वैशिष्टय़ं आहेत. आत्यंतिक शांतता हे त्यातलं प्रमुख वैशिष्टय़. भौगोलिकदृष्टय़ा समुद्रसपाटीपासून मध्यम उंची. शिवाय उन्हाळ्यात आल्हाददायक, परंतु हिवाळ्यात अत्यंत शीत असं वातावरण. विस्ताराच्या दृष्टीने फार कमी लोकसंख्या म्हणजे अंदाजे ३० ते ४० हजार. त्यामुळे घनता कमी. हे शहर प्रामुख्याने युनिव्हर्सिटी टाऊ न म्हणून ओळखलं जातं. सर्व बाजूंनी पर्वत असल्यामुळे शहर पर्जन्यछायेत येतं. इथे कोरडं हवामान आहे.
या शहराला ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व आहे. शहर आणि आसपासच्या परिसरात अत्यंत मौल्यवान खनिजांचे (सोने, चांदी, तांबे, शिसे, इत्यादी) प्रचंड साठे आहेत. म्हणूनच हे शहर व आसपासचा परिसर म्हणजे सिल्व्हर बो कौंटी हा ‘जगातील सर्वात श्रीमंत परिसर’ म्हणून ओळखला जातो. पहिल्या महायुद्धापूर्वी तिथे प्रचंड वस्ती व खाणकाम होत होतं. परंतु पहिल्या महायुद्धानंतर तांब्याचे भाव गडगड ले आणि लोक पोटापाण्यासाठी दुसरीकडे जाऊ लागले. म्हणून आता फार कमी लोकसंख्या उरली आहे. तसंच एकोणिसाव्या शतकात या अतीखोदकामाचे दुष्परिणामही दिसून आलेले आहेत. उदाहरणार्थ – बर्कलेपिट खाणीत उद्भवलेल्या आम्लयुक्त पाण्याच्या समस्येवर संशोधन सुरू आहे.
मुंबई विद्यापीठातून नागरी अभियांत्रिकीतील पदवी (अर्थात इ.ए. सिव्हिल इंजिनिअरिंग) प्राप्त केल्यावर तिथे भूगर्भशास्त्रीय अभियांत्रिकीत पदव्युत्तर पदवी (एम. एस. इन जिऑलॉजिकल इंजिनिअरिंग) मिळवण्यासाठी गेलो. ‘मोंटाना टेक ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ मोंटाना’ या विद्यापीठातर्फे शिकत असतानाच ग्रॅज्युएट रिसर्च असिस्टंट म्हणून विद्यापीठाच्याच एका प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली. जवळच्याच एका सोन्याच्या खाणीमध्ये मानवरहित यान व औष्णिक अवरक्तछायाचित्रक (ड्रोन अँण्ड थर्मल इन्फ्रारेड कॅमेरा) यांच्या मदतीने खडकांच्या स्थिरतेचं विश्लेषण करणं, अशा प्रकारचं काम करून सहकाऱ्यांबरोबर त्याचा शोधनिबंध सादर केला.
या प्रोजेक्टसाठी मी जवळपास आठ महिने काम केलं. कामाच्या वेळी तिथले लोक गांभीर्यपूर्वक कामच करतात. उगाचच मोबाईलवर विनाकारण वेळ घालवला जात नाही. आम्ही खाणीवर अल्पसा काळ असायचो आणि बाकी काम कॉम्युटरवर असायचं. आमचा प्रोजेक्ट बेंचमार्क ठरला आहे. आमच्या कामाच्या दृष्टीने उपयोगी ठरणारे ड्रोनचे डिझाईन आमच्या टीमनेच केलं आहे. आम्ही आम्हाला नेमून दिलेलंच काम करणं अपेक्षित होतं. तिथे पर्यावरणाच्या संदर्भातले सगळे काटेकोर नियम असून ते कायम पाळले जातात. नियम मोडल्यास त्वरित दंड भरावा लागतो. त्यात कोणतीही हयगय केली जात नाही.
अमेरिकन फुटबॉल हा तिथल्या लोकांचा आवडता खेळ. मोंटाना टेक ‘ओरेडिगर्स’ या नावाने यात खूप प्रसिद्ध आहे. हे शहर ‘टूरिस्ट प्लेस’ म्हणून डेव्हलप केलेलं नाही. शहराच्या जवळच ‘लेडी ऑफ द रॉकीज’ नावाचं पर्यटनस्थळ आहे. तसंच आसपास स्कीइंगसाठी अनेक जागा आहेत. जवळपास सर्वानाच शिकारीचा छंद आहे. बदक, हरीण, टर्की यांची साधारणपणे शिकार करतात. थंडी नेहमीच ‘मी’ म्हणत असल्यामुळे गरम कपडे अनिवार्य ठरतात. हिवाळ्यात ३-४ कपडय़ांचं कोटिंग करावं लागतं. अन्यथा ‘फ्रॉस्ट बाईट’चा धोका असतो. तिथे स्पेसचा विचार केला जातोच. व्यवस्थित अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कोणी कोणाकडे जात नाही. मनाला वाटेल तेव्हा थेट उठून कुणाकडे गेलो, असं अजिबात चालत नाही. तसंच फुकटचे सल्ले आणि आगाऊ पणे सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीही तिथे अस्तित्वात नाहीत.
तिथे मी एकटाच महाराष्ट्रीय होतो. एकूण भारतीय अगदीच थोडे असल्यामुळे म्हणजे ४-५ विद्यार्थी, ४-५ फॅकल्टी आणि त्यांची कुटुंबं असल्याने भारतीयांची संस्था वगैरे असल्याचं माझ्या तरी कानी आलेलं नाही. आम्ही ४-५ विद्यार्थी कधीकधी एकत्र जमून टाईमपास करतो. दिवाळीत एका प्राध्यापकांच्या घरी दिवाळी साजरी करण्याचा योग आला. दिवाळी साजरी केली म्हणजे तिथे रात्रीचं जेवण होतं. चांगला जनसंपर्क झाला. बाकी दिवाळीचं असं म्हणून काही खास असं नव्हतं. मी पर्सनली इतर सणवार अजिबात मिस केले नाहीत. माझ्या वास्तव्याच्या पहिल्याच आठवडय़ात मी माझं पाकीट आमच्या मेसमध्ये विसरून आलो होतो. त्यात बऱ्यापैकी रक्कम व मुख्यत: कार्ड्स आणि चालकपरवाना (लायसन्स) होता. आता लायसन्स हरवलं म्हटल्यावर पोलीसकेस करावी लागेल ही भीती होती. पण दुसऱ्याच दिवशी ते परत मिळालं, तेही अगदी जसंच्या तसं. आत्यंतिक प्रमाणिकपणा हा मी तिथे अनेक ठिकाणी अनुभवला. आवर्जून लिहिण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे जवळजवळ सगळे कायमच हसतमुख असतात. एकमेकांना, अगदी अनोळखी लोकांनासुद्धा स्माईल देतात. तसंच एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा कमी दर्जाचं काम करते म्हणून त्याला तुच्छ लेखत नाहीत. साधारणपणे सर्वजण सौजन्याने वागतात.
अमेरिकेत मी एकदा सिअॅटलला कॉन्फरन्ससाठी गेलो होतो. कॉन्फरन्सचा अनुभव छानच होता. भूशास्त्राशी संबंधित क्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञांशी ओळखी झाल्या, एम.एस. नंतर काय करावं, यावरसुद्धा अनेकांशी चर्चा करायला मिळाली. माझ्या क्षेत्रातले काही प्राध्यापक भेटले. त्यांच्याबरोबर काम केल्यास भविष्यात पी.एच.डी. करण्याची संधी मिळू शकते, हे कळलं. काही नवीन कोर्सेसबद्दल माहिती मिळाली. महत्त्वाचं म्हणजे अगदी नासा आणि यू.एस.जी.एस.मध्ये काम करणारे वैज्ञानिकसुद्धा खेळीमेळीतच बोलत होते. आपण एवढय़ा मोठय़ा पदावर काम करतो म्हणून बाकीचे तुच्छ आहेत, असा त्यांचा बिल्कुल आविर्भाव नव्हता. कॉन्फरन्सवरून परत आल्यावर अनेकांशी ईमेलद्वारे संपर्क साधला. माझ्या ईमेलना बरेच सकारात्मक रिप्लाय आले आहेत.
शेती कमी असल्याने तेथील मुख्य खाद्य हे मांसच आहे. ‘मोंटाना इज अ मीट लव्हिंग स्टेट’ हे मला तिथे गेल्यानंतर समजलं. मी भारतात असताना मुख्यत: शाकाहारी असल्याने माझा तिकडचा पहिला आठवडा जवळजवळ उपाशी राहूनच गेला. कालांतराने मिळेल ते खायची सवय लागली. तिथे मांसातसुद्धा गोमांस व डुकराचं मांस हेच जास्त खाल्लं जातं. फिश आणि चिकन त्या तुलनेत कमी खाल्लं जातं. तसंच विश्वविद्यालयाच्या वसतीगृहातच राहात असल्यामुळे मेस बंधनकारक होती आणि स्वत: बनवून खायला किचन नव्हतं. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस जरा त्रासातच गेले.
माझ्याबरोबर शिकणारे सगळेजण अमेरिकनच होते. तुलनेनं जास्तीजण बहिर्मुख असले तरी काहीजण माझ्यासारखे अंतर्मुखसुद्धा आहेत. भारताविषयी बऱ्याचजणांना आकर्षण आहे. आपली संस्कृती, प्रामुख्याने योग आणि इंडियन फूड या विषयांवर आमची बरीच चर्चा झाली. तसंच हिंदू धर्म, अध्यात्म या विषयांवरही चर्चा झाली. तिथल्या मुलींना भारतीय वेशभूषेचं आकर्षण असलेलं दिसलं. तिथले वेगळे असे काही रितीरिवाज जाणवले नाहीत. ऐकीव माहितीनुसार स्थानिक लोक ब्राऊ न लोकांचा (गोरम्य़ांव्यतिरिक्त लोक) विशेषत: मुस्लिम लोकांचा द्वेष करतात. मला एकाने ‘आर यु फ्रॉम सौदी?’, असं विचारलं होतं. तेव्हा त्यांच्याबद्दल थोडा तिरस्कार त्याच्या बोलण्यात जाणवला. पण मी भारतीय आहे, हे समजल्यावर त्याचा स्वर लगेच बदलला आणि अगदी खेळीमेळीत आमचं पुढचं संभाषण झालं. असा अनुभव मला साधारणपणे २-३ वेळा आला. मात्र त्रास असा काही झाला नाही.
अभ्यास हीच गोष्ट तिथे करायला मिळाली. आपल्याकडे नुसतीच घोकंपट्टी असते. अनेकजण कॉपी-पेस्ट संस्कृती जोपासताना दिसतात. तर तिथे एखाद्या विषयाचा अभ्यास म्हणजे काय आणि तो कसा करायचा, तो किती सखोल आणि सर्वसमावेशक असला पाहिजे, हे शिकायला मिळालं. आपण स्वत: आणखीन संशोधन करावं आणि आपलं ज्ञान वाढवावं, असं वाटायला लागलं. प्रचंड गोडी वाटायला लागली अभ्यासाची. अशी गोडी भारतात कधीच वाटली नाही. तिथे बहुसंख्य विद्यार्थी स्वत: पैसे कमावून शिकतात. आरक्षण पद्धत नाही. शिक्षण घ्यायच्या आवडीला वयाची मर्यादा आड येत नाही. आपल्या आवडीनुसार आणि तिथल्या उपलब्धतेनुसार विषय निवडता येतात. ठरल्या दिवशीच आपले प्रोजेक्ट किंवा असाईनमेंट सबमिट करावे लागतात. त्यात चालढकल चालत नाही. अगदीच काही अपरिहार्य कारण असेल तर ते प्राध्यापकांना लगोलग सांगावं लागतं. खरंतर ब्यूट शहर म्हणजे माझ्यासाठी काय हे थेट सांगणं कठीण असलं, तरी एक मात्र नक्की की शक्य असेल तर मी कधीच हे शहर सोडणार नाही..\
‘जग’ते रहो : मेलबर्नमधला ‘मी मराठी’
‘जग’ते रहो : मेलबर्नमधला ‘मी मराठी’
गेले वर्षभर मी नोकरीच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियामध्ये आहे.
Updated:

ओमकार देशपांडे, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
आयटीमध्ये असल्याने मला अनेक देशांत फिरायला मिळालं. त्यापैकी मेलबर्नमध्ये वर्क-लाइफचा डोलारा चांगला सांभाळला जातो. लोक वेळेला आणि एकमेकांच्या गोष्टीला खूप किंमत देतात. इथले लोक डॉगसीटिंग करतात. प्रसंगी त्यासाठी हाफ डे घेतात. ही गोष्ट इथल्या लोकांसाठी खूप कॉमन आहे. कामाला न यायला काहीही कारण पुरतं आणि ते पुढं केलं जातं. मात्र कामाच्या वेळी काम गांभीर्याने केलं जातं.
गेले वर्षभर मी नोकरीच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियामध्ये आहे. बायको माधवी आणि मुलगी गार्गी इथे राहायला येईपर्यंत मिळालेल्या फावल्या वेळात शक्य होईल तेवढा परिसर मी पायी फिरून पाहिला. त्यामुळे भवताल समजायला-उमजायला मदत होते. मुख्य मेलबर्न सिटीत फिरलो आणि ‘ग्रेट ओशिअन रोड’ या बेस्ट स्पॉटवर दोन-तीनदा जाऊन आलो. समुद्राला लागून असणाऱ्या या रोडचा ट्रेल या महिन्यात करायचा विचार आहे. एकूणच माणसांची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी घेण्याला इथे पहिलं प्राधान्य दिलं जातं. मीदेखील आता फर्स्ट एड ट्रेनिंग कोर्सला जाणार आहे. लोकांना हा कोर्स करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. सगळ्या गोष्टींकडे गांभीर्याने बघत असल्याने लोक हा कोर्स करतातच. कुठलाही कितीही दुर्गम भाग असला तरी तिथे अॅम्ब्युलन्सची सेवा अतिशय तत्पर आहे. कोणतीही गोष्ट शिकताना सुरक्षेचा विचार हा पहिल्यांदा केला जातो. पादचारी चुकून रस्त्यावर गेले तरी गाडीचालक लगेच थांबतो आणि पादचाऱ्यांना जाऊ देतो. लहानपणापासूनच सगळ्यांना या बाबतीत शिकवण दिली जात असल्याने ते आपसूकच अंगी बाणलं जातं.
मेलबर्न मोस्ट लिव्हेबल सिटी आहे. इथे नवीन लोकांचा स्वीकार सहजगत्या केला जातो. मेलबर्नमध्ये अधिकांशी चायनीज, भारतीय आणि परदेशी लोकही राहतात. लोकांना आपल्यात सामावून घेण्याची कला स्थानिकांना जमली आहे. कुणावर हल्ला वगैरे होण्यासारख्या गोष्टी बहुतांशी वेळा शाळा-कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या भांडणामुळे होतात. आपण सामान्य माणसांच्या ओळखीचे असलो-नसलो तरी ते हसून ग्रीट करतात. सगळे शिष्टाचार व्यवस्थितपणे पाळले जातात. इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी शिकलो, जी भारतात क्वचितच केली जाते ती गोष्ट म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटं आधीच ती व्यक्ती त्या ठिकाणी हजर असते. दोनच मिनिटं उशीर होणार असेल तरी ती व्यक्ती मेसेज करून तसं कळवते. कारण इथं स्वत:चा आणि समोरच्याच्या वेळेला किंमत दिली जाते.
इथले टीव्ही आणि रेडिओ प्रोग्रॅम्स सगळ्यांनी आठ वाजता झोपावं, याच दृष्टिकोनातून डिझाइन केलेले असतात. इथले लोक ते फॉलोही करतात. लवकर झोपल्यामुळे सकाळी सात वाजता कामावर हजर होतात. मला सेट व्हायला बराच वेळ लागला. सगळ्या पद्धती आणि जीवनमान समजून घ्यावं लागलं. सुरुवातीला राहण्यासाठी मी हॉटेल बुक केलं होतं. लोक लहानपणापासूनच स्वयंसिद्ध असल्याने इतरांनाही सगळं माहिती असेल, असं गृहीत धरतात. आपणहून त्यांना विचारल्याशिवाय मदत करत नाहीत. त्यामुळे पहिले दोन महिने घर शोधताना आणि व्यवहार करताना थोडासा त्रास झाला. या गोष्टी शोधेपर्यंत वेळ लागला. बहुतांशी व्यवहार ऑनलाइन होतात. इथली ट्रॅकिंग हिस्ट्री मजबूत आहे. सगळ्या गोष्टी काटेकोरपणे आणि नियमांनुसारच केल्या जातात.
स्थानिक इतर लोकांशी संवाद कमी साधतात, पण कधी काही व्यवहार प्रत्यक्षात करायला गेलात तर तिथले लोक फार विनम्रपणे बोलतात. काही जुजबी चौकशी करतात. आरोग्य व्यवहार आपल्याहून वेगळा आहे. जनरल फिजिशियनकडे पहिल्यांदा जावं लागतं. त्यानं शिफारस केली तरच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होता येतं. ते साधारणपणे औषधं देत नाहीत. आवश्यक असल्यासच देतात. त्या त्या आजाराविषयी सविस्तर माहिती देतात. इथे ‘नर्स ऑन कॉल’ सेवा आहे. बरं नाही असं वाटल्यावर एका टोल फ्री नंबरवर प्रोफेशनल नर्स काही उपाययोजना सांगतात. तरीही बरं वाटलं नाही तर काय करावं, तेही सुचवतात.
फिटनेसच्या बाबतीत इथल्या लोकांनी प्रेरणा दिली आणि मी जिमला जाऊ लागलो. आमच्या कंपनीत लोकांना पर्सनल ट्रेनर ट्रेनिंग देते. ऑफिस मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या बाजूलाच असून तिथे किंवा अन्य ग्राऊंडवर जाऊन व्यायाम करता येतो. इथे फिटनेसला पहिलं प्राधान्य दिलंच जातं. दिवसातल्या कुठल्याही वेळी रनिंग, जॉगिंग करणारे लोक दिसतात. ठरावीक वेळीच खातात-पितात आणि डाएट चार्ट काटेकोरपणे पाळतात. जवळपास सगळे जण सडपातळ बांध्याचे आहेत. जिमला जाऊन व्यायाम करायला वेळ नसेल तर मोबाइल जिम ही संकल्पना राबवली जाते. म्हणजे सगळ्या साधनांसहित घरी येऊन शिकवलं जातं. आपल्याहून अधिक प्राधान्य योग करण्याला दिलं जातं. जिम इतकीच योग सेंटर्सची संख्या आहे. जिममध्येही अधिक शुल्क आकारून योग शिकवला जातो. हे योग शिकवणारे भारतीय असतील, असा माझा समज होता, पण ते अभारतीय आहेत.
इथे बाहेर खाणं महाग आहे. हॉटेलमध्ये शाकाहारी पदार्थ फार कमी मिळतात. त्यामुळं पर्यटकांचे थोडेसे हाल होऊ शकतात, मात्र स्थानिकांना शाकाहारी पदार्थ मिळणारी ठिकाणं उदाहरणार्थ – इस्कॉनतर्फे चालवली जाणारी हॉटेल्स माहिती असतात. स्थानिकांच्या जेवणात बीफ-पोर्कचा कायम समावेश असतो. माझ्या परिचयाच्या बहुतांशी लोकांना भारतीय पदार्थ आवडतात. वीकएण्डला सहकारी मित्रांना घरी बोलावतो, तेव्हा त्यांना भारतीय पदार्थ खायला घालतो. मात्र सुरुवातीला त्यांना बोलावल्यावर त्यांनी मला जेवायला बोलवण्यामागचं कारण विचारलं होतं. कारणाशिवाय इतरांकडे जात नाहीत. त्यांच्या पदार्थात मसाले नसतात, पण त्यांना त्याविषयी क्रेझ वाटते. काही जण बऱ्यापैकी तिखट खातात. अनेकदा ते फ्रोझन फूड खातात. इथे सुशी खूपच चांगली आणि विविध प्रकारची मिळते. सिडने, पर्थ आणि मेलबर्नमध्ये चायनीज लोकांची संख्या आणि व्यवहार वाढत असून मुख्य शहरात चायनाटाऊन असतंच. ऑथेन्टिक चायनीज खाणं जमतं, त्यांना इथले पदार्थ आवडतात. इथल्या एअरपोर्टवर बोर्ड आणि उद्घोषणाही चिनी भाषेत व्हायला लागल्या आहेत.
मुलं पालकांसोबत राहात नाहीत. केवळ ख्रिसमससारख्या निमित्ताने पालकांकडे जाणं-येणं होतं आणि हा कार्यक्रम पक्का ठरलेला असतो. आयटीमध्ये असल्याने मला अनेक देशांत फिरायला मिळालं. त्यापैकी इथे वर्क-लाइफचा डोलारा चांगला सांभाळला जातो. लोक वेळेला आणि एकमेकांच्या गोष्टीला खूप किंमत देतात. इथले लोक डॉगसीटिंग करतात. प्रसंगी त्यासाठी हाफ डे घेतात. ही गोष्ट इथल्या लोकांसाठी खूप कॉमन आहे. कामाला न यायला काहीही कारण पुरतं आणि ते पुढं केलं जातं. मात्र कामाच्या वेळी काम गांभीर्याने केलं जातं. त्यांची कारणं कायमच खरी असतात. इथे शुक्रवार दुपारपासून पबमध्ये जाणं किंवा एन्जॉय करण्याकडे लोकांचा कल असतो. वीकएण्डचे प्लॅन्स ठरलेले असतात. वीकएण्डला घरी असणं कमी असतं. हे प्लॅन हवामानाचा अंदाज घेऊन ठरवतात. कारण मेलबर्नचं हवामान बेभरवशी आहे. एका दिवसात चार ऋतू दिसू शकतात. बऱ्याच जणांना वाचनाची आवड आहे. म्युझिक कॉन्सर्ट वगैरेंना लोक आवर्जून हजेरी लावतात. कितीही गरीब माणूस असला तरी भीक न मागता रस्त्यावर आपली कला लोकांपुढे सादर करून पैसे जमवले जातात. ऑनलाइन साइटवर रजिस्टर करून त्यानुसार लोक एकत्र जमतात. आपल्या आवडीचे विषय त्या साइटवर नोंदवायचे आणि त्यानुसार अपडेट्स येतात. त्यासाठी सोईसुविधा कोणत्या असतील तेही कळतं. एक किस्सा आठवतोय की, ऑफिसमध्ये आम्हांला दिलेल्या ड्रॉइंग बोर्डवर कंपनीविषयीच्या भावना व्यक्त करायच्या होत्या. चित्र काढून झाल्यावर त्याविषयी बोलायचंही होतं. तेव्हा मी काढलेलं चित्र अधिकाऱ्यांसह सगळ्यांना आवडलं. ते रिसेप्शनला लावून ठेवलं आहे. इथं फूटी हा मुख्य खेळ आहे. रग्बी आणि फूटबॉल यांचं हा खेळ मिश्रण असून इथे विभागवार संघ आणि स्पर्धा होतात. अंतिम सामन्याच्या वेळी सुट्टी असते, एवढी फूटीची क्रेझ आहे. क्रिकेटही आवडतं. मला ऑस्ट्रेलियन ओपनमधली रॉजर फेडररची मॅच ‘याचि देही याचि डोळा’ बघता आली. तो फारच सुरेख अनुभव होता. लोक खेळवेडे असून फेसबुक वगैरेंवर त्यांचे ग्रुप्स आहेत. दर शनिवारी त्यांचे संघ जमून ते सातत्याने खेळतात. फोटोग्राफी करण्याजोग्या अनेक नितांत सुंदर जागा आहेत, त्यामुळे ती शिकायचं डोक्यात आहे. इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली आहे. इथली ट्राम जणू जीवनवाहिनी आहे. ती सर्वदूर पोहचली आहे. मेलबर्न ट्राम म्युझियममध्ये मजा आली. पहिल्या ट्रामच्या तांत्रिक बाजूविषयी मी कुतूहल दाखवल्याने म्युझियम बंद व्हायची वेळ पाच असूनही तिथल्या कर्मचाऱ्याने आपुलकीने आणि हसतमुखाने सगळी सविस्तर माहिती दिली. एवढं होईपर्यंत पाच वाजून दहा मिनिटे झाली होती आणि मी मागच्या एक्झिटनं बाहेर पडलो..
मी आपल्या सणांना मिस करतो. मेलबर्नमध्येही सगळे सण साजरे होतात. पण शेवटी आपले सण आपल्या लोकांसोबत साजरे करायची मजा वेगळी असते. कदाचित मी अजून तसा नवीन असल्यामुळे ग्रुप झाला नसेल, म्हणूनही असेल पण आपण सणांच्या दिवशी मोठय़ांचे आशीर्वाद घेऊन मित्रांना भेटायला जातो. एकदम सहज त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-बाबांना नमस्कार करतो. तितकी सहजता इकडे नाही. मुळात सगळे लोक एकमेकांच्या घरी अपॉइंटमेंट घेऊन जातात. दिवाळीला फेडेरेशन स्क्वेअरला खूप गर्दी असते. अजून एक अनुभव आठवतो आहे, आम्ही एकदा मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडजवळ फिरत असताना अचानक कुठून तरी नाशिक ढोलचा आवाज ऐकू आला. आम्ही दोघेही एकमेकांकडे बघू लागलो. पण पाच सेकंद काही बोललो नाही आणि ऐकत होतो की, नक्की आपल्याला आवाज ऐकू येतोय की भास होतोय.. आम्ही आवाजाच्या दिशेने चालू लागलो आणि मेलबर्न ग्राऊंडच्या जवळ आल्यावर भगवा झेंडा नाचताना बघून एक वेगळीच मजा आली. किती तरी वेळ आम्ही तो नाशिक ढोल ऐकत होतो. नंतर आम्हाला लक्षात आलं की ऑस्ट्रेलियाचा फेमस खेळ फूटीचा सामना होता आणि त्यांनी मराठी ढोल-ताशे पथकाला तिकडे बोलावलं होतं, त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी. आपलं मराठीपण सर्व देशांत पसरलेलं पाहून खूप गर्व वाटला आणि अनपेक्षित अशा नाशिक ढोलमुळं अख्खा दिवस एक वेगळीच ऊर्जा अंगात संचारली होती..\
जग’ते रहो : रम्य ही स्वर्गाहून लंका
जगाच्या नकाशावर विशाल अशा भारताखालोखाल श्रीलंका हा देश एखाद्या छोटय़ाशा ठिपक्यासारखा आहे.

निवेदिता पराडकर-मोने, कोलंबो, श्रीलंका
श्रीलंका म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतं ते रामायण, त्यातला रावण आणि त्याची सोन्याची लंका किंवा हल्लीच्या काळातील श्रीलंकेचे महान क्रिकेटपटू जयसूर्या, मुरलीधरन, संगकारा किंवा तिथला निळाशार समुद्र, हिरवेगार लांबचलांब चहाचे मळे आणि अर्थातच सीफूड.. पण या सगळ्यापलीकडची श्रीलंका आम्हाला बघायला मिळाली. इथली माणसं, संस्कृती, त्यांचे आहार-विहार, इथला निसर्ग आणि अशा बऱ्याच गोष्टींनी या देशाला समृद्ध केलं आहे.
जगाच्या नकाशावर विशाल अशा भारताखालोखाल श्रीलंका हा देश एखाद्या छोटय़ाशा ठिपक्यासारखा आहे. त्याचं क्षेत्रफळ आपल्या महाराष्ट्राएवढं असून पूर्ण देशाची लोकसंख्या आपल्या मुंबईएवढी आहे. श्रीलंका हा इतर काही साऊ थ-ईस्ट आशियातल्या देशांप्रमाणे एक बुद्धिस्ट देश आहे. इथे मोठी अशी दोनच शहरं आहेत. एक कोलंबो आणि दुसरं कँडी. बाकी सगळी गावं किंवा छोटी शहरं आहेत. अमेयच्या नोकरीनिमित्त आम्ही जेव्हा इथे पहिल्यांदा कोलंबोला राहायला आलो तेव्हा मनात अनेक शंका आणि विचार घेऊ नच.. इथली माणसं कशी असतील, इथं राहताना, फिरताना आम्हाला कसला प्रॉब्लेम तर येणार नाही ना? हे आणि असे अनेक. पण इथल्या लोकांनी आमच्या या सगळ्या शंका अगदी सहज दूर केल्या. इथली माणसं बोलायला अतिशय नम्र, प्रेमळ आणि सदा हसतमुख असतात. नेहमी मदतीसाठी तत्पर. त्यामुळे अमेयच्या ऑफिसमध्ये किंवा शेजारीपाजाऱ्यांनी आमचं नेहमीच मोकळ्या मनानं स्वागत केलं. आदरातिथ्य केलं. इथली एक चांगली आणि मजेशीर गोष्ट म्हणजे इथले लोक कोणालाही ‘अरे-तुरे, ए बॉस, शुक-शुक किंवा विचित्र आवाज काढून हाका न मारता आपल्यापेक्षा मोठय़ा व्यक्तीला ‘अय्ये’ म्हणजे मोठा भाऊ तर लहानाला ‘मल्ली’ म्हणजे लहान भाऊ आणि स्त्रियांना ‘नंगी’ म्हणजे लहान बहीण असं म्हणतात. यावरून त्यांच्या संस्कृतीतच आदर करणं हा गुण आहे हे दिसून येतं.
माणसांबरोबरच निसर्गाचाही तेवढाच आदर इथले लोक करतात. आपल्याकडून पर्यावरणाची हानी होणार नाही याची प्रत्येक जण दक्षता घेतं आणि त्यामुळेच रोजच्या जीवनातही प्लास्टिकऐवजी काचेच्या पाण्याच्या बाटल्या, काच-स्टीलचे डबे, कापडी बॅगा यांचा वापर होताना दिसतो. आपला परिसर, रस्ते कसे स्वच्छ राहतील याची सगळेच जण आवर्जून काळजी घेतात. म्हणूनच मी या देशाला क्लीन कंट्री आणि ग्रीन कंट्री म्हणते. श्रीलंकेला निसर्गाचं खूप मोठं वरदान लाभलेलं आहे. सगळीकडे हिरवीगार झाडं नजरेस पडतात. इकडे आपल्यासारखे उंचच उंच टॉवर्स न दिसता बहुतेक बैठी घरं दिसतात. तीसुद्धा प्रशस्त, ऐसपैस, चहूबाजूंनी झाडांनी वेढलेली. आम्हालाही अशा मोठय़ा घरात, घर कसलं दुमजली बंगलाच म्हणा ना, राहायची संधी मिळाली. मुंबईत पहिल्यापासून फ्लॅट सिस्टीममध्ये राहिल्यामुळे हा बदल आल्हाददायक होता.
पर्यटनासाठी इकडे खूप सुंदर, नयनरम्य अशी ठिकाणं आहेत. जाऊ तिकडे निसर्ग अक्षरश: वेड लावतो. इकडचा निसर्ग बघून आपल्या गोवा, केरळची आठवण येते. आम्ही कँडी आणि एल्ला ही दोन हिल स्टेशन्स फिरून आलो. इथे ट्रेन जर्नी म्हणजे डोळ्यांना एक सुखद अनुभव आहे. नारळाची उंचच्या उंच डोलणारी झाडं आपल्या ट्रेनबरोबर रस्त्यावरून पळत असतात. कँडीला जाताना आम्ही हा अनुभव घेतला. एल्लाला कारने जातानाही एका बाजूला हिरवेगार चहाचे मळे दूरवर पसरलेले दिसतात. एल्लामध्ये ‘नाइन आर्क ब्रिज’, ‘लिटिल अॅडम्स पीक’ आणि ‘रावणाज केव्हज’ अशी बरीच आकर्षणे आहेत. ‘रावणाज केव्हज’ ही डोंगरात मोठी खडकाळ गुहा आहे. असं म्हणतात की सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवण्याआधी रावणाने काही काळ इकडे ठेवलं होतं. या अंधाऱ्या गुहेत सीता कशी राहिली असेल असा विचार मनात येऊ न जातो. रामायणाची आठवण म्हणून आम्ही वपर्यंत ही जागा बघून आलो. अजून एक जरूर बघण्यासारखं ठिकाण म्हणजे ‘गल्ले फोर्ट’. हा किल्ला म्हणजे आतमध्ये एक छोटंसं शहरच वसलंय. इकडे वेगवेगळ्या पाश्चात्त्य म्हणजेच पोर्तुगीज, डच आणि इंग्रज अशा तीन संस्कृती गेली पाच शतकं नांदल्या आहेत. त्या सगळ्यांचा प्रभाव त्यावर दिसून येतो. याला युनेस्कोचा वर्ल्ड हेरिटेज असा किताबही मिळालाय. याच्या तटावर बसून सूर्यास्त आणि अवखळ समुद्र एकत्र बघण्यात एक वेगळी मजा आहे. इकडे फिरताना मात्र भाषेची फार अडचण आम्हाला जाणवली नाही. प्रमुख भाषा सिन्हला किंवा तमिळ या असल्या तरी लोकांना प्रमाणात इंग्रजी भाषा समजते. अगदी रिक्षावालेही बऱ्यापैकी इंग्रजी बोलतात.
इथली अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे इकडे लोक सकाळी आठलाच ऑफिसला हजर असतात. सक्ती म्हणून नाही तर ते याच गोष्टीला प्राधान्य देतात आणि संध्याकाळी साडेपाच-सहापर्यंत घरी परततात. त्यामुळे अर्थातच त्यांना फिटनेस आणि रिक्रिएशनसाठी खूप वेळ मिळतो. संध्याकाळी ऑफिसनंतर हे लोक जॉगिंग, व्यायाम, सायकलिंग किंवा मैदानी खेळ खेळताना दिसतात. कोलंबोत असलेलं ‘इण्डिपेण्डन्स स्क्वेअर’ हे ठिकाण संध्याकाळी फिटनेसप्रेमींनी फुललेलं दिसतं. ‘लवकर उठे, लवकर निजे त्याला आरोग्य धनसंपदा लाभे’ हे अगदी तंतोतंत खरं आहे, हे यांच्याकडे बघून पटतं. इथल्या तरुणाईवर पाश्चात्त्य संस्कृतीचा जास्त प्रभाव दिसून येतो. टीव्हीवरील कार्यक्रमांपुरतंच मर्यादित न राहता ही मंडळी हॉलीवूड मूव्हीज, नेटफ्लिक्स, वेस्टर्न म्युझिक यांत जास्त रमते. आम्ही भारतीय आणि मुंबईकर म्हटल्यावर आमच्याबद्दल त्यांना कुतूहल वाटतं. मुंबईत तुम्हाला शाहरुख खान, सलमान खान रोज दिसत असतील ना, असे प्रश्न आम्हाला सुरुवातीला विचारले जायचे. बॉलीवूड, रजनीकांत याबद्दल त्यांना फार उत्सुकता आहे.
सिन्हला नवीन वर्ष म्हणजेच ‘अवरुधू’ आणि ‘वेसाक’ म्हणजे बुद्धपौर्णिमा हे दोन मोठे सण लोक दणक्यात साजरे करतात. आजूबाजूचा सगळा परिसर, गाव, शहर, दिव्यांच्या रोषणाईत सजून जातो. जणू काही ही त्यांची दिवाळीच. या सणांना पारंपरिक पदार्थ बनवले जातात. पारंपरिक पेहरावात सगळे जण खूप छान दिसतात. सणांना इकडे पुरुष लुंगी आणि कुर्ता घालतात, तर स्त्रिया साडी नेसतात. पण इथली साडी नेसायची पद्धत ही आपल्यापेक्षा वेगळी आहे. साडी अंगाभोवती गुंडाळून कमरेजवळ फ्रिल बाहेर काढून नेसली जाते. अजून एक इथला मासिक सण म्हणजे पोया, आपली पौर्णिमा. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला सगळ्यांना इकडे सुट्टी असते आणि तो दिवस लोक मेडिटेशन करण्यात घालवतात. पोयाच्या मासिक सुट्टीमुळे आणि इतर बऱ्याच सणांमुळे श्रीलंका हा जगातला सर्वात जास्त सार्वजनिक सुट्टय़ा असणारा देश आहे.
त्यांचे हे सण बघून आम्हीही आपला गुढीपाडवा दणक्यात साजरा केला. आमच्या १०-१२ मित्रांना आम्ही घरी जेवायला बोलावलं. त्यात हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बुद्धिस्ट आणि स्वीडिश अशा अनेक धर्मीय मित्रमंडळींचा समावेश होता. हा गुढीपाडवा आमच्या कायमचा लक्षात राहील. सगळे जण गुढी म्हणजे काय, ती का उभारायची, हे जाणून घेत होते. आमच्या आग्रहाखातर सगळे पारंपरिक पेहरावात आले होते. गुढीपाडवा मस्त आनंदात साजरा झाला मात्र त्या गुढीसाठी सगळं सामान जमवताना आमची जी तारांबळ उडाली होती ती आता आठवली की हसायला येतं. मराठी सण म्हणून आम्ही अगदी टिपिकल मराठमोळं म्हणजेच पुरी-भाजी, शेवयांची खीर आणि मसालेभात असा बेत केला होता. सगळ्यांनीच जेवणावर ताव मारलेला बघून आम्हाला आनंद झाला आणि आमचा पाडवा हिट झाला.
श्रीलंकेच्या खाद्यपदार्थामध्ये प्रामुख्याने भात मोठय़ा प्रमाणात खाल्ला जातो. भात आणि त्यावर तीन-चार भाज्या हे त्यांचं जेवण. पोळी फक्त मैद्यापासून बनवलेली. पण आपल्यासारखी पोळीभाजी इथे खाल्ली जात नाही. तांदुळापासून बनवलेले स्टिंग हॉपर्ससुद्धा इकडे ब्रेकफास्ट किंवा जेवणात खाल्ले जातात. शेवयांसारखा गोल-गोल छोटय़ा चकत्या असलेला हा पदार्थ खोबऱ्याच्या लाल चटणीबरोबर टेस्टी लागतो. आपल्यासारखं स्ट्रीट फूड इथे जास्त मिळत नाही. काही खायची इच्छा झालीच तर थेट मोठय़ा रेस्तराँमध्येच जावं लागतं. त्यातून तुम्ही शाकाहारी असाल तर फारच कमी पर्याय उपलब्ध असतात. मांसाहारी पदार्थ खूप आणि चांगले मिळतात. परंतु बाहेर खाणं हेसुद्धा थोडं महागच असल्यामुळे कधीतरीच बाहेर खाल्लं जातं. त्यातल्या त्यात बाहेर छोटय़ा गाडय़ांवर एकच मिळणारा पदार्थ म्हणजे कोत्तु. हा शाकाहार आणि मांसाहार अशा दोन्ही प्रकारांत मिळतो. मैद्याच्या पोळीचे तुकडे करून त्याबरोबर भाज्या एकत्र करून त्याला फोडणी दिली की कोत्तु तयार होतो. तो खाताना आपल्या फोडणीच्या पोळीची आठवण येते. हे पदार्थही आता आम्हाला आपलेसे वाटायला लागले आहेत.. या सुंदर, निसर्गाने नटलेल्या, निरनिराळे पैलू असणाऱ्या देशाच्या आम्ही प्रेमात कधी पडलो, हे आम्हालादेखील कळलं नाही. ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ म्हणतात ना ते काही खोटं नाही.
बेभान ट्रेकिंग!
ट्रेकिंग हे वेड गेल्या एक-दोन वर्षांत खूप प्रमाणात वाढलं आहे.

ये मौसम का जादू है मितवा.. असंच काहीसं असतं पावसाळा आणि पावसाळ्यातल्या ट्रेकिंगचं. पावसाळी वातावरणाची जादू अनेक तरुणांच्या मनावर होते आणि मग ते निघतात ट्रेकिंगला. पावसाळा आणि ट्रेकिंग हे समीकरण म्हणजे तरुणांचा आवडता विषय. पावसाळा सुरू झाला आणि ट्रेकिंगचा प्लॅन झाला नाही असं शक्यतो होत नाही. ट्रेकिंग हे वेड गेल्या एक-दोन वर्षांत खूप प्रमाणात वाढलं आहे. आणि हेच हेरून अनेक छोटय़ा-मोठय़ा इव्हेंट कंपनी, ट्रेकिंग संस्था वर्षभरात अनेक छोटय़ा-मोठय़ा ट्रेकचं आयोजन करतात. मात्र अनेकदा ट्रेकिंग आवड आहे म्हणून करण्यापेक्षा नुसतंच थ्रिल वाटतं किंवा मित्रमैत्रिणींबरोबर जाऊन सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठीच केलं जातं. आणि त्यामुळे साहजिकच कुठलीही काळजी न घेता केले जाणारे ट्रेकिंग अनेकांसाठी जीवघेणे ठरत असल्याबद्दल ट्रेकर्स संस्थांनीही चिंता व्यक्त केली आहे.
पुण्याचे ‘गिरीदर्शन ट्रेकर्स’चे सदस्य सतीश मराठे सांगतात की, आत्ताची मुलं ट्रेकिंग मनापासून आवडतंय म्हणून जात नाहीत तर नुसती हौस आहे म्हणून जातात ज्यात प्रामाणिकपणा नाही. कोणत्याही गोष्टींची त्यांना माहिती नसते. अगदी छोटय़ा आणि प्राथमिक गोष्टी म्हणजे कुठल्याही ठिकाणी गेल्यावर कोणती काळजी घ्यायला हवी किंवा तिथे गेल्यावर स्वत:ची सुरक्षितता तरी कशी बाळगायला हवी, याचा विचार ते अजिबातच करत नाहीत. मुख्य म्हणजे आज ट्रेकिंग ग्रुप्स इतके वाढले आहेत की, त्यांच्यासोबत ट्रेकिंगला जाणं हा अगदी सहज आणि सोप्पा मार्ग त्यांच्यासाठी आहे. फक्त तरुण जमा करून त्याचा धंदा कसा होईल हे बघितले जाते, वरून ट्रेकिंग ग्रुप काढायचा असेल तर त्याला काही कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही, तसेच अनुभव नसलेल्यांना देखील काही ट्रेकिंग ग्रुप मार्गदर्शक म्हणून ठेवतात मग सोशल मीडियावरून कुठे आणि कसे जायचे एवढंच फक्त कळवलं जातं त्यामुळे सुरक्षितता काय घ्यायची ही माहिती त्यात नसते. सोशल मीडियावरून फार फार तर कोणत्या गोष्टी जवळ ठेवायच्या हे सांगितले जाते, पण त्या गोष्टींचा उपयोग सुरक्षिततेसाठी कसा करायला हवा हे माहीतच नसतं. फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून काही क्षणातच ट्रेकिंगची पोस्ट फिरते आणि मुलं तिथे लगेचच गर्दी करतात, ही आजची परिस्थिती आहे, असं ते म्हणतात.
अनेकदा चार ते पाच हजार तरुण आणि इतर मंडळी देवकुंड, कळसुबाई, माहुली, लोहगड, लोणावळ्याला जातात. इथे ट्रेकिंग करणं हे सर्वात कठीण आहे. देवकुंडला जायला १५ सप्टेंबपर्यंत बंदी आहे, कारण तिकडच्या धबधब्याजवळ मुलं मजा करायला जातात, पण त्या परिसरात या सीझनमध्ये खूप पाऊस असतो. त्यामुळे धबधब्याच्या पाण्यात वाढ होते. मग पाणी वाढलं की प्रवाहाची गती व दिशा कळत नाही. कळसुबाईसारख्या ठिकाणी एका वेळेस एका शिडीवरून तीन हजार तरुण वरखाली करतात मग अशा वेळेस स्वत:ची सुरक्षितता कशी करायची? याची माहितीही घेतली जात नाही. मग अपघात होतात. अपघात कसेही होतात. डोक्यावर दगड पडणे, पाय घसरून पडणे, पाण्यात बुडून, वाहून जाण्याच्या केसेस खूप आहेत. तुम्ही पडताय या भावनेने देखील आणखीन अपघात होऊ शकतो, अशी माहिती देतानाच त्यांनी आपला अनुभवही सांगितला. ‘आम्ही ट्रेकिंगला एका घाटावर गेलेलो. तर तिथे धबधब्यात गुडघ्याच्या वर पाणी होतं. अतिउत्साहाच्या भरात एका मुलाने उडी मारली आणि पाय फ्रॅक्चर झाले. एक मुलगी अशाच अतिउत्साहात पाय घसरून पडली होती. सेल्फीच्या नादात गवतात वगरे जातात. कुठूनही सापासारखे प्राणी येऊ शकतात. साप चावल्यावर फक्त फर्स्ट एड पुरेसे नसते, हॉस्पिटलमध्येच उपचार करणं गरजेचं असतं याची जाणीव नसते. रॅपलिंग करण्याची फॅशन सध्या आहे, पण त्यासाठी जी दोरी लागते ती फार सांभाळून आधी तपासून घ्यावी लागते, कारण पावसाच्या पाण्यामुळे त्याची इलॅस्टिसिटी (लवचीकता) जाऊ शकते. या बाबी खरंतर कोणी लक्षात घेत नाही, कारण या मुलांचा ट्रेकिंगवर अंधविश्वास असतो. स्वत:ची तयारी व सुरक्षिततता ही आपणच घ्यायला हवी याची पुसटशीही कल्पना नसते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
तरुण मुलांच्या असं वागण्यामागची मानसिकता काय असते याबद्दल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर सांगतात, ‘मीसुद्धा हे करू शकतो असे दाखवायचा प्रयत्न ट्रेकिंगद्वारे होतो. मी ट्रेकिंगला का जातोय/ जातेय? ते मला आवडतं म्हणून की दाखवायला आणि जर मला आवडतं म्हणून मी जातोय वा जातेय तर त्यात मूळ हेतू इतरांना दाखवणे हा नसावा आणि इतरांना दाखवणं असेल तर मी शौर्यवान आहे हे इतरांना भासवून दिलं जातं. जर सोशल मीडियावर मिरवणं आहे तर त्यात न्यूनगंड आहे. इतरांनी कौतुक करावं ही भावना आहे, पण त्यावर सगळेच टाळ्या वाजवू शकत नाहीत. ती शक्यता कमी असते मग परत त्या मुद्दय़ावरून स्वत:वरच यावं लागतं. येथे इतरांना दाखवणं वरचढ आहे. जर मला ट्रेकिंग येत नाहीये आणि ते शिकायचं आहे तर ते मला शिकू देत, पण मला येतंच नाहीये आणि ते दाखवायचंय तर त्यात आत्मभान गरजेचे असते. ज्याला ट्रेकिंग शिकण्याची इच्छा आहे. ते आपल्याला झेपणार की नाही? मला काय खबरदारी घ्यावी लागेल याचा विचार करतात. पण फक्त मिरवायला हवंय तर त्यात गंभीरपणा नाही. या वयात कल्पनेत रमणं असते पण एखाद्या घटनेकडे पाहताना त्याचा परिणाम काय होईल याची तपासणी केली जात नाही. एखादी गोष्ट ती व्यक्ती कुठल्या दृष्टिकोनातून करतेय ही बाब महत्त्वाची ठरते.’
कुठेही जायचं असलं की आपल्याकडे सहसा पालकांकडून परवानगी घेतली जाते. पण अनेकदा घरातले पाठवणार नाहीत या भीतीने तरुणाई न सांगताच अनेक गोष्टी करते. आणि अनेकदा त्या गोष्टीमध्ये अडकल्यावर त्यांना बाहेर पडण्यासाठी किंवा मदतीसाठी घरचे नसतात. अनेकदा ट्रेकिंगचं नियोजनच नसतं. फक्त एखादी जागा किंवा गड ठरवला जातो आणि तिकडची माहिती न घेता, घरच्यांना न सांगता मुलं ट्रेकिंगला जातात. या तरुणाईच्या वागण्याबद्दल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख सांगतात, ‘ट्रेकिंगला जाताना मुलं आवश्यक नियोजन करत नाहीत, आवश्यक माहिती काढत नाहीत, ज्या जागेवर जातोय त्या जागेवरचा धोका लक्षात घेत नाहीत, आई-वडिलांनाही सांगत नाहीत. यामागचं कारण म्हणजे त्यांच्यात असलेला जोश. अनेकदा त्यांना सोशल मीडियावर माझं आयुष्य कसं व किती रोमांचक आहे हे ट्रेकिंगमधून इतरांना भासवून द्यायचे असते. नेमकं सेल्फी काढण्यासाठी धोकादायक स्थळ निवडतात. ट्रेकिंगला जाताना म्हणून संभाव्य स्थितीचे व वास्तवाचे भान ते राखत नाही आणि मग विविध जीवघेणे प्रयोग अनेकदा केले जातात. सोशल मीडियावर जे वैयक्तिक आयुष्य आहे ते अजून फुलवायचा प्रयत्न केला जातो. यामागे स्पर्धा असते. त्यातून ट्रेकिंगला जाणं व मिरवणं असं सगळं येतं. अठरा व त्यापुढील वयात असे प्रयोग जास्त केले जातात.’
ट्रेकिंगला जायचं ठरलं की अनेकदा आपण एखाद्या संस्थेसोबत, ट्रेकिंग ग्रुपसोबत जायचा विचार करतो. आपण अनुभवी लोकांसोबत गेलो तर आपल्याला काही होणार नाही असा साधा विचार त्यामागे असतो. पण तरीही आपण अनेक बातम्या ऐकतो ज्यात असे ट्रेकिंग ग्रुपबरोबर गेलेल्यांनाही काही तरी अपघात झाला आहे. अशा वेळी सगळे आरोप त्या संस्थेवर केले जातात. पण अनेकदा त्यांनी काळजी घेऊ नही तरुण पिढी त्यांचं ऐकत नाही आणि त्याचा शेवट वाईट होतो. अनेक वर्षांपासून नियमितपणे ट्रेकिंगचं आयोजन करणाऱ्या ‘वंडरिंग शूटर’चे मकरंद चोथे सांगतात, अनेकदा तरुण मुलंमुली एखादा दिवस आणि जागा ठरवतात. बॅग भरतात आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकून ट्रेकिंगला निघतात. महाराष्ट्रात कळसुबाई आणि विकट गड अशा सोप्या जागेची निवड सहसा केली जाते. पावसाळ्यात तर इथे मेळा लागलेला असतो. जो तो ट्रेकिंगसाठी इथे येतो. पण त्यामुळेच अनेक अपघातही होतात. अशा ठिकाणी एक मार्ग असतो, त्यामुळे एकाच मार्गावरून येणं-जाणं होतं. बाजूला बांधलेली सुरक्षा जाळी किंवा पोल एवढे रिलायबल नसतात. आजची तरुणाई खूप कमी पेशन्स असलेली आहे, त्यामुळे त्यांना लगेच वरती चढायचं असतं आणि लगेच खाली यायचं असतं. आणि अशामुळेच अनेकदा अपघात होतात. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आम्ही जागेनुसार एका ट्रेकिंग ग्रुपमध्ये किती माणसं घ्यायची हे ठरवतो. आमचा एक माणूस पुढे दुसरा मध्ये आणि तिसरा मागे असतो. त्यामुळे प्रत्येकावर नीट लक्ष ठेवता येतं. आम्हाला ट्रेकला सुरुवात केल्यावर अध्र्या तासातच कोण ट्रेक पूर्ण करू शकेल याचा अंदाज येतो. अशा वेळी एखाद्याला जमत नसेल तर आम्ही त्याची समजूत काढून त्याला ट्रेक न करण्यासाठी तयार करतो. अनेकदा लोकांना ट्रेक जमत नसेल तरीही ट्रेक करायची इच्छा असते. अशा वेळी आम्ही त्यांना संभाव्य गोष्टीचा धोका सांगतो आणि त्यांना ट्रेकमध्ये पुढे घेऊ न जात नाही. अशा लोकांना समजून सांगणं थोडं कठीण असतं, पण या गोष्टी नाही केल्या तर ते जीवावर बेतू शकतं.’
तरुण पिढी सोशल मीडिया, सोशल लाइफ, पीअर प्रेशर अशा सगळ्या गोष्टींत अडकून पडलेली आहे. पण आताच्या पिढीने केवळ अट्टहास म्हणून न करता एखादी गोष्ट जमत नसेल तर ती आधी आत्मसात करून मगच आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेचा विचार करून पूर्ण करावी. सोशल लाइफच्या नादी लागून आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्याची वाताहत होणार नाही, याची काळजी ज्याची त्याने घ्यायलाच हवी.
ट्रेकिंग हे शंभर टक्के सुरक्षित नाही. आज ट्रेकिंग ही गरज नसून अट्टहास बनला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मुलं आई-वडिलांना, घरच्यांना न सांगताच ट्रेकिंगला जातात, कारण त्यामागे इतर दोस्त करतात म्हणून मीही, हा हट्ट आहे. पण.. ट्रेकिंगसाठी माझं रिस्क मॅनेजमेंट वेगळं असून इतरांचे वेगळे आहे हे समजून घ्यायची गरजच त्यांना वाटत नाही. ट्रेकिंगला जाताना त्या ठिकाणी मज्जा, मस्ती, चेष्टा-मस्करी चालते मग अपघात होतात. टेकडीवर हेडफोन्स लावून गाणी ऐकत ट्रेकिंग करतात, तर नेटवर्कसाठीही वाट्टेल त्या ठिकाणी जातात. मग बेपत्ता होतात. इतरांवर इम्प्रेशन म्हणूनही जातात. सेल्फी काढतात, या गोष्टी किती धोकादायक आहेत याचा विचार नसतोच. ही एक अॅक्टिव्हिटी आहे, जीवनावश्यक अॅक्टिव्हिटी नाही. जे सुखरूप ट्रेकिंग करून येतात, त्यांनीही सुरक्षितता बाळगलेली असते, त्यांच्याकडे अनुभवही असतो. इथे तरुणाई हा विचार करत नाही आणि अपघातांना बळी पडते. दर वीकेण्डला कोणाला ना कोणाला तरी अपघात होतोच, त्यामुळे ट्रेकिंग जितकं गंभीररीत्या पाहायला हवं तितकं पाहिलं जात नाही.
– सतीश मराठे, गिरीदर्शन ट्रेकर्स, पुणे</p>





























No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.