ब-याच दिवसापासून या जागेबद्दल एकून होतो, पण जाण्याचा योग येत नव्हता, आज एकदाचा तो दिवस मावळता-मावळता उगवला,
पनवेलच्या जे.एन.म्हात्रे सेवाभावी ट्रस्ट मार्फत हे ठिकाण तयार करण्यात आले असून खूपच नियोजनबद्ध आणि खूपच चांगल्या दर्जाचे आहे. सेवा-सुविधांबाबत खूपच विचारपूर्वक नियोजन करण्यात आले आहे आणि खूप भव्य अशा जागेवर आहे.
पाच मंदिरांचा समुह, भक्त निवास, कॅन्टीन, गार्डन, भव्य पार्कीग असा संपूर्ण परिसर आहे. सढळ हाताने खर्च करून उभारल आहे सर्वकाही... नढाळेश्वर महादेव मंदिर नावाने प्रसिध्द असलेले हे ठिकाण मुंबई-पुणे हायवेवर आहे.(जुना हायवे) पनवेल पासून पंधरा किमी अंतरावर आहे.
एक सारखीच दिसणारी - एकाच आकारातील एकूण पाच मंदिर उभारण्यात आली आहेत.
सुरवातीलाच भव्य असे प्रवेद्वार आहे.
प्रवेश्वद्वार.....
एक...झलक....
सर्वात प्रथम साईबाबांचे मंदिर आहे. जसे कि प्रतीशिर्डी,......
दुसरे मंदीर आहे-मयुरेश्वर गणेश मंदिर.....
तिसरे मंदिर आहे-संकटमोचन हनुमान मंदिर.....
चौथे मंदिर आहे-नढाळेश्वर महादेव मंदिर......
पाचवे मंदिर आहे-भवानी माता मंदिर......
या सर्व मंदीराचे एक वैशिष्ट असे आहे कि, सर्वात पहीले मंदिर ज्या ठिकाणी संपते, तिथून दुसरे मंदिर चालू होते, अशा प्रकारे पायरीसारखे एकामागे एक अशी रचना करण्यात आली आहे.
मंदिराच्या कळसावर त्या-त्या देवतेप्रमाणे ध्वज लावण्यात आले आहेत. मंदिराला कोणताही कलर देण्यात आला नसला तरीसुध्दा पांढ-या रंगातील सर्व मंदिरे खूपच सुंदर दिसतात.
सुरवातीला अशी दिपमाळ आहे...
प्रत्येक मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला अशी मुर्ती आहे.....
सर्वात शेवटी तुळशी वृदांवन......
आणि विजयस्तंभ......
संपुर्ण परिसर.....
.................धन्यवाद..............



















No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.