
हे सर्व असताना देखील सर्वसामान्य लोकांना देखील गावची, निसर्गाची
माहिती व्हावी आणि ती पर्यटनाच्या दृष्टीने इतरांपर्यत पोहचावी हा आमचा
इथून पुढच्या काळातला उद्देश आहे. सह्याद्रीचे सौंदर्य… म्हसवंडी
Trekkers Attraction दुरगुडी गुहा !!
Trekkers attraction
दुरगुडी गुहा !!
या गुहेचा आकार कमी कमी होत जातो आणि शेवटी एकदम अरुंद होतो जीथे कोनाला जाता येत नाही .
येथील स्थानिक ग्रामस्थ असं सांगतात की गुहा किती खोल आहे याचा कोनीच अंदाज लावु शकत नाही .
या जागेत जवळपास ३०-४० लोकं आरामात बसु शकतात .
धुक्याची चादर आणि वरुन कोसळनारा संतधार पाऊस
पुणे नाशीक हायवे वर बोटा हे गाव आहे .
बोटा येथुन पश्चिमेस म्हसवंडी हे गाव साधारण ८ किलोमीटर आहे
(आळेफाटा – बोटा – आंबीफाटा – म्हसवंडी )
नगर कल्याण हायवे वर पिंपरी पेंढार गाव आहे .
पिंपरी पेंढार गावातुन पुर्वेस म्हसवंडी साठी रस्ता मिळेल .
पिंपरी पेंढार पासुन म्हसवंडी साधारण ४ किलोमीटर आहे .
( हा रस्ता थोडा कच्चा आहे …. पण अंतर कमी आहे सावकाश वाहन चालवल्यास हा रस्ता उत्तम )
२) जिकडे नजर मारालं तीकडे सह्याद्री पर्वतरांगा, त्यावरून फेसाळनारे धबधबे , धुक्यातून डोकी काढनारे सह्याद्रिची सुळके
३) आणि मौज मज्जा या व्यतीरिक्त जर काही शिकायचे असेल तर म्हसवंडी गावात
पाणलोट प्रकल्प प्रशिक्षण , महीला सबलीकरण प्रशिक्षण केंद्र आहे .
( आजपर्यंत या ठीकाणी देशातल्या सर्व राज्यांच्या एक हजारहून अधिक अभ्यास सहलीच्या टीम येउन गेल्या आहेत , तसेच जवळ जवळ 50 हून अधिक देशाच्या विविध टीम येथे भेट देउन गेल्या आहेत )
टीप – या केंद्राला भेट द्यायची असेल तर आधी तसं कळवावे लागते
दिलीप सातकर – 9763029634
शिवाजी बोडके – 9623747800
किरण शांताराम बोडके – 9172863757
नवनाथ ईथापे – 8286117475
– गुहेकडे जाताना स्थानिक ग्रामस्थांच्या पाउलवाटेवरूनच जावे … उगीच अवघड रस्ता शोधून धोका वाढवु नये .
अहमदनगर इतिहासात एक चंगीझखान भटकंती अहमदनगर परिसराची
इतिहासात चंगीझखान नावाची व्यक्ती बद्दल थोडा घोटाळा आहे
कारण चंगीझखान नावाचे सरदार वेगवेगळ्या काळात होवुन गेले. हा चंगीझखान कोण हे सांगता येत नाही परंतु अहमदनगर इतिहासात एक चंगीझखान होवुन गेला हे मात्र निशित
चवथा बादशाह मुर्तीजा निजामशाहच्या पदरी चंगीझखान सरदार होता. मुर्तीजा पोर्तुगीजाच्या ताब्यात असलेला रेवदांडा यास वेडा दिला परंतु पोर्तुगीज लोकांनी निजामशाहच्या सरदारास दारूच्या बाटल्या नजर केल्यामुळे किल्ला ताब्यात येईना ही गोष्ट मुर्तीजा निजामशाहाला कळली तेव्हा त्या ठिकाणी चंगीझखानाची सरदारची म्हनून नेमणूक केली चंगीझखानाने फारच प्रामाणिकपणे आपली कामगिरी बजावली व आपल्या हुशारिने वऱ्हाडाचे राज्य जिंकून ते निजामशाहित सामील केले.
पुढे चंगीझखानाला बेदरची बरीदशाही नाहीशी करून ते राज्य निजामशाहित सामील करायचे होते परंतु बादशाहच्या मुर्खपणा मुळे ते शक्य झाले नाही. ज्यावेळी चंगीझखानाचा बेदरवर स्वारी करण्याचा बेत होता त्याच वेळेस गोवळकोंड्याचा कुतुबशाहा बेदर पक्षातील असल्यामुळे त्यानी चंगीझखानास लाच देवून स्वारी तहकूब करण्याकरिता आपला वकील चंगीझखानाकडे पाठवला पण तो प्रस्ताव चंगीझखानाने धुडकावून लावला.
चंगीझखान लाचेने वश होत नाही असे पाहून त्या वकीलाने साहेबखान नावच्या नोकरामार्फत मुर्तीजा निजामशाहच्या मनामधे चंगीझखानविषयी द्वेष निर्माण केला की चंगीझखान
वऱ्हाडाचे राज्य आपल्या हताखाली घेत आहे. इतर लोकामार्फत सुध्दा असाच अपप्रचार केल्यामुळे निजामशाहाने चंगीझखानाचे सरदार पद व सैन्य काढुन घेतले व त्यास नजरकैदेत ठेवले. त्या वेळेस वैद्यांकरवी चंगीझखानावर विषप्रयोग करण्याचे बेत होता ही बातमी चंगीझखानास समझली त्या वेळी त्याला खुप दुःख झाले परंतु त्याने काही गडबड न करता बादशहास पत्र लिहले व वैद्यांकरवी आलेला विषाचा पेला प्राशन केला.
बादशाहाला खरी हकीकत कळल्यावर फारच पछतावा झाला
निजामशाहीचा प्रमुख सत्ताकेंद्र असलेला अहमदनगरचा अभेद्य भुईकोट किल्ला
निजामशाहीचा प्रमुख सत्ताकेंद्र असलेला अहमदनगरचा अभेद्य भुईकोट किल्ला
कोट बाग निजाम (अहमदनगरचा किल्ला )
अहमद निजामशहा याने ता.३ रज्जब हिजरी (२८ मे १४९० – अहमदनगर शहर स्थापना दिवस ) रोजी अजमखान वगैरे सरदार बरोबर घेऊन बहामनी सैन्यावर एकाएकी छापा घातला व सेनापती जहांगीर खान व सरदारांची हत्या करून विजय मिळवला.ज्या जागी जय मिळाला तेथे एक इमारत बाग तयार करून त्यास ‘बाग निजाम’ असे नाव दिले.हा अहमदनगर किल्ल्याचा प्रारंभ आहे.पुढे अहमदशहाने अहमदनगर शहराची स्थापना करून तेथे आपली राजधानी केली.त्यावेळी ही इमारत आपली मुख्य राहण्याची जागा करून त्याभोवती एक दगडाचा व विटांचा तट तयार केला.त्यावेळेपासून त्यास ‘कोट बाग निजाम’ हे नाव पडले.हेच अहमदनगरच्या किल्ल्याचे पूर्वीचे नाव होते.
पुढे नवीन नवीन इमारती बनू लागल्या व निजामशाही बादशहांचे रहाण्याचे ठिकाण येथे झाले.पक्का किल्ला बांधताना बऱ्याच ठिकाणावरून आयते घडलेले दगड आणले.त्यासंबंधी दंतकथा नगरच्या आसपासच्या गावात प्रचलित आहेत. इ.स.१४९०मध्ये ज्या जागेवर पुढे किल्ला बांधला ती जागा कायम करण्यात आली.पुढे हुसेनशहाने सध्याचा अस्तिवात असलेला दगडी तट बांधला.
किल्ल्यातील इमारती व बुरुज
अहमदनगर किल्ल्याचा एक जुना नकाशा ‘मुजदे अहमदनगर’ नावाच्या एका उर्दू पुस्तकात प्रसिद्ध आहे.त्यामध्ये किल्ल्यासंबंधी चोवीस बुरुजांची नावे,आतील पहारा,मध्य भागाचा राजवाडा,जुन्या इमारती,मद्रेसा,गगन महाल,मुल्क आबाद,दिलकशाद महाल,हबशीखाना,चाऊसखाना वगैरे सैनिकांच्या इमारती,विहिरी या सर्वांचा स्थलनिर्देश सापडतो.
बुरुजांची नावे
I. अरबी बुरुज
II. नारंगी बुरुज
III. राज बुरुज
IV. छजा बुरुज
V. दौलतखानी बुरुज
VI. आतषखानी बुरुज
VII. शहा बुरुज
VIII. रहमानी बुरुज
IX. हुसेनी बुरुज
X. कासमखानी बुरुज
XI. बदडी बुरुज
XII. सुभानी बुरुज
XIII. युसुफखानी बुरुज
XIV. जहांगीरखानी बुरुज
XV. फरासखानी बुरुज
XVI. दौलत बुरुज
XVII.फतयावर बुरुज
XVIII.गावसजी बुरुज
XIX. डवरखान बुरुज
XX. अशरफखानी बुरुज
XXI. पोलाद्खानी बुरुज
XXII.अकबरखानी बुरुज
XXIII.कमालखानी बुरुज
ही नावे हुसेन निजामशहाने अहमदशहाच्या,बुऱ्हाणशहाच्या व स्वतःच्या वेळच्या प्रसिद्ध मुत्सद्दी प्रधान व सेनापती यांच्या नावावरून दिली असावीत.निशाणाचा बुरुज ज्याला ‘सोंडबुरुज’ किंवा ‘फत्ते बुरुज’ म्हणतात त्याचे नाव ‘हुसेनी बुरुज’ ते नाव हुसेन निजामशहा यांचे नावावरून दिलेले दिसते.
या किल्ल्याचा दरवाजा एका बुरुजात असून इतर किल्ल्यांप्रमाणे येथे दरवाज्याला दोन्ही बाजूंस २ बुरुज नाहीत.किल्ल्यात जाण्यास पूर्वी एकच दरवाजा होता.खंदक ओलांडण्यास एक पूल असून पुढे गेल्यावर त्याच पुलावरून एका पूर्वेकडील विस्तीर्ण बुरुजास वळसा दिल्यास उत्तराभिमुखी दरवाजा आहे.याच बुरुजाचे नाव ‘अरबी बुरुज’ आहे.एका बुरुजावर बाहेरच्या बाजूने एका दगडावर वाघाचे चित्र दिसून येते;परंतू सुक्ष्म अवलोकन केल्यास ते वास्तविक चित्र नसून मुसलमानी शिलालेख आहे.त्या लेखातील अक्षरांची जुळणी इतकी सुबक व खुबीने केली आहे की,त्यामुळे अक्षरांचा वाघाच्या चित्रांचा आकार आला आहे.अजूनही या शिलालेखाचा अर्थ मिळालेला नाही.
महालांची नावे
I. सोन महाल
II. गगन महाल
III. मुल्क आबाद
IV. मीना महाल
V. रूप महाल
VI. बगदाद महाल
विहिरींची नावे
I. गंगा
II. जमना (यमुना)
III. मछलीबाई
IV. शक्करबाई
किल्ल्यात झालेल्या लढाया
चांदबिबीच्यावेळी किल्ल्यास जे दोन वेढे पडले ते सर्वांत महत्त्वाचे आहेत.पहिला वेढा इ.स.१५९५ च्या नोव्हेंबर महिन्यापासून इ.स.१५९६च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत शहजादा मुराद यांनी दिला होता.त्यावेळी सुलताना चांदबिबी हिने अतुलनीय पराक्रम गाजवून वेढा उठवून मोगलांना तह करण्यास भाग पाडले.अहमदनगरच्या इतिहासात-किंबहुना सर्व हिंदुस्थानच्या इतिहासात हा प्रसंग अत्यंत बहारीचा आहे.दुसरा वेढा इ.स.१६३०च्या जुलै महिन्यात शहजादा दानियल यानी दिला.त्यावेळी आपसातील भाऊबंदकीमुळे चांदबिबीचा खून झाला व अहमदनगरचा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.तो तसाच इ.स.१७५९ पर्यंत होता.मध्यंतरी मलिक-अंबर यांनी तो काही दिवस तो आपल्या ताब्यात घेऊन निजामशाही राज्य चालविले.इ.स.१७५९ मध्ये कविजंग किल्लेदार असताना बंदुकीचा आवाज न निघता किल्ला पेशव्यांच्या ताब्यात गेला.पुढे इ.स.१९९७ मध्ये किल्ला शिंदे यांचे ताब्यात गेला व त्यांच्या ताब्यात असताना अहमदनगरच्या किल्ल्यासंबधी तिसरी महत्वाची गोष्ट घडली.१२ ऑगस्ट १८०३ रोजी जनरल वेलस्ली,जे पुढे ‘ड्यूक ऑफ वेलिंग्टन’ या नावाने प्रसिद्धीस येऊन ज्याने नेपोलियनास जिंकले,त्याने हा किल्ला सर केला.त्याचवेळी भिंगारचे रघुराव बाबा देशमुख यांनी चार हजार रुपये घेऊन किल्ल्याची मारा करन्याची जागा दाखविली.ड्यूक ऑफ वेलिंग्टननी किल्ला सर केल्यानंतर ज्या चिंचेच्या झाडाखाली उपहार केला ती जागा सरकारने कायम ठेवली आहे व या गोष्टींचे कायम स्मारक म्हणून तेथे तोफा रोवून ठेवल्या आहेत.यानंतर तहनाम्याप्रमाणे किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला.परंतू १८१८मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यावर तो इंग्रज सरकारच्या ताब्यात गेला.
किल्यातील राजकीय बंदिवान
निजामशाही नष्ट झाल्यानंतर किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.तेव्हापासून राजकीय बंदिवानांचे ते एक स्थान झाले. ऐतिहासिक कागदपत्रावरून येथे खालील बंदिवान असल्याचा उल्लेख येतो.
१.छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई
२.तुळाजी आंग्रे
३.सदशिवरावभाऊ पेशव्यांचा तोतया
४.छत्रपती प्रतापसिंह महाराज (सातारकर) यांचे चिरंजीव शाहू महाराज(काशीराजे) दुर्वासिंग,परशरामबाबा,भाईसाहेब
५.छत्रपती शिवाजी महाराज (चौथे – कोल्हापूर)
६.दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी आणलेले जर्मन कैदी
७.भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील १९४२च्या ‘चले जाव’ या चळवळीनंतर पंडित जवाहरलाल नेहरू,सरदार वल्लभभाई पटेल,मौलाना अबुल कलाम आझाद,ब.असफअली,डॉ.सय्यद महंमद,पं.गोविंद वल्लभ पंत,शंकरराव देव,पी.सी.घोष,डॉ.पट्टाभी सीतारामअय्या,आचार्य कृपलानी,आचार्य नरेंद्र देव,डॉ.हरेकृष्ण मेहताब.पंडित नेहरूंनी जगद्विख्यात ग्रंथ ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा या बंदिवासात किल्ल्यात लिहिला.
किल्ल्यातील अवशेष
किल्ल्यात हल्ली एक मोठा दरवाजा व एक दिवाणखाना इतकेच एका राजवाड्याचे भाग राहिले आहेत.याशिवाय जमिनीत काही तळघरे सापडली आहेत.या ठिकाणी अहमदनगरचा राजवाडा,चांदबिबीचे महाल,गगन महाल पूर्वी मोठमोठ्या इमारती होत्या,असे एका पर्शियन हस्तलिखित पुस्तकावरून दिसून येते.अहमदनगरचा राजवाडा तांबड्या रंगाचा होता,असे इतिहासात वर्णन आहे.चांदबिबीचा गगन महाल हि सर्वांत उंच इमारत असून,तिच्यावरून शहराचा व आसपासच्या मुलुखाचा सर्व देखावा दिसत असे,अशी दंतकथा आहे. बागरोजा (बाग-इ-रौझा),शहा ताहीरची कबर,नेता कक्ष हे किल्ल्यात पाहण्यास मिळते.
किल्ला संरक्षण खात्याच्या अख्यारीतीत असल्यामुळे किल्ला पाहण्यास ओळखपत्र (आधारकार्ड) आवश्यक आहे.मध्यंतरी महाराष्ट्रातील गडकिल्ले जागतिक वारसा स्थळांमध्ये समविष्ट व्हावीत यासाठी युनेस्कोने किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली.किल्ल्याचे खंदक स्वच्छ करून त्यात जलपर्यटन करण्याचे कामही अद्यापही प्रतीक्षेत आहे.
संदर्भ : अहमदनगर शहराचा इतिहास | सरदार ना.य.मिरीकर
सुल्ताना चांदबिबी | डॉ.शशी धर्माधिकारी
फोटो साभार : Dinesh Ishwar Nangare & Amit Rane
संकलन : पीयूष रजनी अविनाश गांगर्डे
#दुर्गजागर
#दुर्गजागर_२
#जागर_इतिहासाचा
नागेश्वर शिवमंदिर, कर्जत
bhandardara Kajva Mohotsav MTDC (काजवा महोत्सव )

अवकाळी पावसाच्या ढगांनी आकाशात आपली जागा व्यापताच येथे जमीनीवर जणू चांदण्यांचा सडाच उतरतो. मान्सूनपूर्व पावसाची चाहूल लागताच काजव्यांची किरकिर रात्रभर सुरु राहते आणि निसर्गप्रेमींची पाऊले आपोआप भंडारदराच्या खोऱ्याच्या दिशेने पडू लागतात. भंडारदरामध्ये काजव्यांचा हा अनोखा चमत्कार पाहणे अलौकिकच असते. पर्यटकांना काजव्यांच्या या आश्चर्यचकित करणाऱ्या जैवप्रकाशाचे दर्शन घडविण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) घडवून आणली आहे. भंडारदराच्या खोऱ्यांमध्ये सध्या काजवा महोत्सव सुरु असून हा महोत्सव आपल्या शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ इथे अधिकच वाढला आहे. गेल्या मे महिन्याच्या २० तारखेपासून सुरु झालेल्या या महोत्सवाची सांगता २० जून रोजी झाली.
‘काजवा’ हा काही आपल्यासाठी नवीन नाही. मग या काजवा महोत्सवात एवढे विशेष काय आहे की पर्यटकांची ही एकच गर्दी भंडारदरामध्ये होत आहे. हे पाहण्यासाठी स्वत: भंडारदराच्या खोऱ्यांमध्ये भटकंती केली आणि काजव्यांचा अविस्मरणीय देखावा पाहून नेत्र सुखावले. भंडारदरातील जंगलात जिथे नजर जाईल तिथे काजव्यांची लुकलुक दिसत होती. विशेष म्हणजे, या काजव्यांमध्ये कमालीचे समन्वय पहायवास मिळाले. कि्रकेट मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीत क्रीडारसिक ज्याप्रमाणे खेळाडूंना आळीपाळीने दाद देतात, अगदी तसाच नजारा इथे पहावयास मिळत होता. एका झाडामागून एका झाडावरील काजव्यांचा जैवप्रकाश चमकत जात होता. हे पाहणे अविस्मरणीय. मुंबईपासून १८५ कि.मी. दूर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथे पर्यटकांसाठी अगणीत खजाना दडला आहे. नाशिक-अहमदनगर मार्गे आटगाव - कसारा बुद्रुक - इगतपूरी- शिर्डी सिन्नर घोटी मार्गे भंडारदराला आस्वाद घेण्यासाठी जाणे सोयीस्कर पडते.
‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात शंकर महादेवन ‘मन मंदिरा’चा सूर छेडल्यानंतर जे काजव्यांचे दर्शन घडते, ते साक्षात येथे पहावयास मिळते. किंबहूना चित्रपटापेक्षाही कित्येक पटीने हे दर्शन विलोभनीय आहे. पण काजवे पाहण्यासाठी भंडारदराच का? हा प्रश्न वाचकांना पडणे साहजिकच आहे. कोकण आिण पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना काजवा काही नवीन नाही. एवढेच काय, विदर्भातही काजव्यांचा मेळा भरलेला काही ठिकाणी पहावयास मिळतो. परंतु, भंडारदराची बातच निराळी. इतर ठिकाणी तुरळक संख्येेने काजव्यांचे दर्शन घडते. तर भंडारदरात लाखों, कोटींच्या संख्येने काजव्यांचा सडा पडलेला दिसतो. येथे कजव्यांना पोषक असणाऱ्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काजव्यांची चादरच पसरलेली दिसून येते. खोऱ्यांचे भंडार असल्यामुळेच याला भंडारदार म्हटले गेले आिण खोऱ्यांत खेळती हवा नसल्या कारणामुळे काजव्यांना प्रजननासाठी ही जागा पोषक ठरते. येथे हिरडा, बेहड, सदडा अशी वनौषधी झाडांसह आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत आणि या झाड्यांवरच काजवा टिकाव धरू शकातो. या झाडांची पानं ही काजव्यांचा अन्न असते. त्यामुळे भंडारदरात इतर ठिकाणांच्या तुलनेत काजव्यांचे प्रमाण कित्येक पटीने अधिक असते.
विद्युत दिव्यांची रोषणाई केल्यासमान प्रत्येक झाडांवर काजव्यांचा जैवप्रकाश मन मोहून जातो. मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि पावसाळा सुरु होण्यापूर्वीचे काही दिवस हा कालावधी काजव्यांचा प्रजननाचा काळ असतो. या दिवसांत काजवे मोठ्या संख्येने प्रजननासाठी बाहेर येतात. नर-मादीला आकर्षिक करण्यासाठी आपल्याजवळील नैसर्गिक प्रकाशाने ते एकमेकांना इशारे करतात. त्यांचा एकमेकांना आकर्षिक करण्याचा हा जो काही प्रयत्न असतो, तो अलौकिक असतो. हे पाहण्यासाठी दूरदूरुन पर्यटक भंडारदराच्या खोऱ्यांमध्ये भटकंती करतात आणि अगदी सहजच त्यांना जैवप्रकाशाची चादर टिमटिम करताना दिसून येते. पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने येथे चांगली सोय केली आहे. येथील काजव्यांची अफाट संख्या पाहता एमटीडीसीने पर्यटन विकासाच्या दृष्टीने येथे गेल्या चार वर्षापासून काजवा महोत्सव भरविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी येथील स्थानिकांशी हातमिळवणी करुन पर्यटनवृद्धीसाठी एमटीडीसीने एक पाऊल पुढे टाकले आहे. एमटीडीसीच्या या निर्णयाचा फायदा येथील स्थानिकांना मिळत आहे. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला आहे. भंडारदरा आणि आजूबाजूच्या गावांमध्ये बहुतांशी आदिवासी वस्ती आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही. यांना प्रशिक्षण देऊन ‘गाईड’ म्हणून एमटीडीसीने सेवेत रुजू केले आहे. तर काहींना हॉटेल व्यवसाय टाकण्यासाठी परवानगी देखील दिली आहे. या काजवा महोत्सवाला येथील स्थानिक केशव खाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. किंबहुना त्यांच्यामुळेच हा महोत्सव येथे दरवर्षी भरतो. आजमतीस दरदिवशी सुमारे ४०० ते ६०० पर्यटक येथे भेटी देतात आणि या अलौकिक महोत्सवाचा आनंद घेतात. २० तारखेला हा महोत्सव संपत आहे. याचा अर्थ असा नव्हे की येथे काजव्यांचे दर्शन होणार नाही. जोपर्यंत मुसळधार पाऊस होत नाही, तोपर्यंत काजवे येथे लुकलुक करत राहणारच, यात शंका नाही. शिवाय खोल दऱ्या, मोठेधरण, सरोवर, धबधबे, एतिहासिक किल्ला व पुरातन मंदिर आहेच पर्यटकांना खुणवायला. त्यामुळे तुम्ही कधीही येथे जा, निसर्गाने तुमच्यासाठी नवीन काहीतरी वाढून ठेवले असेल, हे नक्कीच!
गोरक्षनाथ गड प्रदक्षिणा

नाथ संप्रदायाचे महत्त्व,हठयोग,उपासना भारतभर अनेक ठिकाणी नित्यनेमाने होत असते.त्यातही महाराष्ट्रात गोरक्षनाथ गड (ता. नगर) ते डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) या दरम्यान ही डोंगररांग गर्भगिरी नावाने ओळखली जाते.अधिकतर नाथांची समाधी स्थळं इथे आहेत हे विशेष आहे.नगरमध्ये कानिफनाथ यांची समाधी मढीमध्ये आहे.त्याचबरोबर प्रथम नाथ मच्छिंद्रनाथ -गोरखनाथ ही गुरू शिष्याची जोडगोळीच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली आहे.
डोंगरगण जवळील मांजरसुंभा डोंगरापुढे गोरक्षनाथ गड आहे.
याबाबत कथा अशी -
नवनाथाच्या कथेनुसार भ्रमंती करीत असताना मच्छिंद्रनाथ फिरत फिरत स्त्री राज्यात गेले. तेथेच त्यांनी निवास केला. तेथील राणीने त्यांना आपल्या महलात ठेवून घेतले. मात्र, आपल्या गुरूंना मूळ रूपात आणण्यासाठी गोरक्षनाथ तेथे गेले. त्यांनी गुरूंना आपल्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले. तेथून निघताना राणीने त्यांना सोन्याची वीट दिली.
भ्रमंती करीत असताना गुरूंच्या झोळीत गोरक्षनाथांना वीट दिसली. त्यांनी ती वीट फेकून दिली. तो परिसर म्हणजे नगर जिल्ह्यातील इमामपूर घाटाचा भाग होय. हे करीत असताना गोरक्षनाथांनी संपूर्ण डोंगरच सोन्याचा केला. मात्र, नंतर यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून तो डोंगर पुन्हा जसा होता तसा केला. हा डोंगर म्हणजेच गर्भगिरी डोंगर आहे.
नाथपंथाचे अभ्यासक टी.एन. परदेशी म्हणतात, ही जातक कथा आहे. परंतु याकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर सर्व नाथ हे सिद्ध पुरूष होते. त्यांना रसायनशास्त्राचा अभ्यास होता. त्यांची संपूर्ण ठाणी पाहिली तर ती उष्णोदकाशेजारी आहेत. तेथे गरम पाण्याचे झरे आढळतात. भारतातील पहिला रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन याच परिसरात होऊन गेला. त्याची प्रयोगशाळा शेवगाव तालुक्यात आहे. आजही मच्छिंद्रनाथांच्या गडावर स्थानिक लोक वनौषधी घेऊन बसलेले असतात. त्या कोणत्याही रोगावर उत्तम इलाज करतात. मात्र, त्याचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास झाला पाहिजे. गर्भगिरी डोंगर सोन्याचा झाला, याचा दुसरा अर्थ तेथील विपुल प्रमाणात सापडणाऱ्या वनौषधीमुळे तसा घेतला जातो.(संदर्भ सकाळ वृत्तपत्र अशोक निंबाळकर १ सप्टेंबर २०२०)
तर अशा या आध्यात्मिक क्षेत्रास नगरकर वर्षातून अनेकदा भेटी देतात.उंच डोंगरावर असलेले नाथ मंदिर अतिशय शांत , स्वच्छ, उत्तम प्रकारे बांधलेले आहे.वाहन थेट पर्यंत मंदिरापर्यंत जाते.
पण यंदा नगर ट्रेकेथॉन-३ ने गोरक्षनाथ गड प्रदक्षिणा हा उपक्रम घेतला.यासाठी ट्रेक कॅम्प ने अनेक महिने मेहनत घेतली.यासाठी डोंगर खाच खळग्यांतून ,दाट दाटीतून ,अनवट वाटेवर अनेक रिबीन,ध्वज लावून प्रदक्षिणेसाठी वाट सज्ज केली.यासाठी ७५०+ लोकांनी रजिस्ट्रेशन केले.
उत्साहाने १७/११/२०२४ ला पहाटे ६ वाजता गोरक्षनाथ गडावरून पांढऱ्या रंगाचे एकसारखे टी शर्ट घातलेले ट्रेकर यांची शुभ्र लाटच उसळत होती.आधी डोंगर उतरून सपाट माळरानावर पोहचायचे होते.आता हळूहळू तांबडा फुटलं होतं.जसजसे पुढे जात होतो .तसतसा सूर्यही डोंगराहून घरंगळत येतोय असं मोहक दृश्य होते.रस्त्याने बोरीची झाडं लागली.झाडाला गदगदा हालवून बोरी गोळा करण्याचा लहानपणीचा इवलासा आनंद परत मिळाला.आंबट चिंबट बोरांच्या चवीसह इतरत्र शमीचे झाडं अनेक त्यांच्या अनोख्या चपट्या वाळलेल्या लाल शेंगा पहिल्यांदाच पाहत होतं.कुठतरी अजूनही पाण्याच्या थोड्याशा ओघळाने शेवाळ होते.थोडीफार फुलं होती पण ती पाहताना प्रकर्षाने सह्याद्रीच्या डोंगरांची,भटकंती आठवण येत होती.सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याची तोड कशालाच नाही,हे मात्र खरं आहे.



आता पुन्हा थोडी चढाई परत उतरण लागली.चार किलोमीटर मध्यावर प्रदक्षिणा आली होती.आता शेतं लागली.तुरीच्या शेंगांनी लगडलेली तुरीची पिकं लागली.हिरव्यागार कांद्याची पात दूरवर पसरली होती.

शेतांना मागे टाकत दाट जंगलासारख्या दाट झाडीतून जातांना अनेकांना मोरपिस सापडले.परत एकदा एनर्जी ड्रिंक,फळांची पुरवणी घेत प्रदक्षिणेच्या शेवटच्या टप्प्यात पोहचलो.यात पूर्वी गडावर चढण्यासाठीचा पायऱ्यांची वाट बनवली गेली होती.आता ती अधिक वापरात नाही. मधोमध पायऱ्या आणि दोन्ही बाजूला दाट झाडी यातून चालताना सुरुवातीला स्वर्गारोहण करतोय असं वाटतं होतं.मात्र या पायऱ्या चढावर आणि संपतच नव्हत्या आधीच ६ किमीची पायी चालणं झालं होतं.त्यात ही सरळ चढाई दमछाक करणारी ठरली.
आयोजक ट्रेकर उत्साह वाढवायला,मदतीचा हात पुढे करत उभे होतेच.अखेर विश्रांतीला थांबत चढत असं करत पुन्हा गडाच्या मुख्य पायऱ्यांपाशी पोहचलो.गडावर चढले.
मंदिराच्या गाभाऱ्यात गोरखनाथांचे दर्शन घेऊन कृतार्थ वाटले.८ किलोमीटरची गोरक्षनाथ गड प्रदक्षिणा ३ तासात जवळपास पूर्ण झाली.
हा उपक्रम पहिल्यांदा राबविण्यात गेला.आम्ही पहिले ट्रेकर आहोत ज्यांनी गोरक्षनाथ प्रदक्षिणा पूर्ण केली आहे.
फिनिशर मेडल मिरवत घरी कूच केलं, आयुष्यात अजून एक सुंदर रविवार संपन्न झाला होता.
-भक्ती














































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.