Sunday, July 14, 2024

https://thepostman.co.in बॅक अप

 

वाचा दर सहा महिन्यांनी आपला देश बदलणाऱ्या फिझंट आयलंडबद्दल..!


आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आमच्या गावात एकदा दोन भावांची जोरदार भांडणं सुरू होती. ते दोघेही जीव खाऊन एकमेकांशी भांडत होते आणि आजूबाजूचे लोक त्यांचा हा गोंधळ पाहत होते. भांडणाचा विषय एकदम किरकोळ होता. जनावरं बांधण्याच्या जागेवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. बर, ज्या जागेवरून वाद सुरू होता ती जागा सामाईक होती त्यामुळं त्यावर तोडगा कसा काढावा? असा प्रश्न गावातील कारभारी लोकांना पडला होता. त्यावर त्यांनी एक नामी युक्ती काढली. सामाईक जागेवर एक दिवस मोठ्या भावानं जनावरं बांधायची तर एक दिवस लहान. यामुळं दोघांमधील वाद सुटला.

आता तुम्ही म्हणाल, ही काय जागेची भांडणं सांगत बसलीये. आपल्याला हा मुद्दा एकदम शुल्लक वाटत आहे. मात्र, अशाच स्वरुपाचा वाद युरोपमधील दोन देशांमध्ये देखील सुरू होता. तो वाद होता नदीतील एका बेटाच्या हद्दीचा. कित्येक वर्ष सुरू असलेला हा वाद मिटवण्यासाठी त्या दोन देशांनी देखील गावातील कारभाऱ्यांसारखीच शक्कल लढवली. त्यांनी वर्षातील सहा-सहा महिने बेटाचा मालकी हक्क वाटून घेतला. युरोपमधील हे दोन देश कोणते आहेत? खरंच प्रत्येक सहा महिन्यानंतर या बेटाची देश बदलतो का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा…

कुठल्याही नकाशावर आंतरराष्ट्रीय सीमा या द्विमितीय असतात. अक्षांश आणि रेखांश असलेल्या कागदाच्या सपाट शीटवर त्या सहज शोधल्या जाऊ शकतात. वास्तविक जीवनात भूप्रदेश त्रि-आयामी असतात काही सीमा देखील अशा असू शकतात.दाहरण घ्यायचं झालं तर शीतयुद्धादरम्यानच्या फ्रेडरिकस्ट्रास स्टेशनचं घेता येईल. त्याठिकाणी कोणीही फक्त पायऱ्या चढून पश्चिम बर्लिनमधून पूर्व बर्लिनमध्ये जाऊ शकत होतं. 

परंतु जगात एक चार-आयामी सीमादेखील आहे आणि ती काळानुसार मागे-पुढे होते. ही सीमा आहे फिजंट आयलंडची. फिजंट आयलंड हे फ्रान्स आणि स्पेन या दोन देशांच्या दरम्यान वसलेलं आहे. फिझंट आयलंड हे जगातील सर्वात जुनं कॉन्डोमिनियम आहे. 

सॅन सेबॅस्टियनच्या पूर्वेस, बिस्केच्या उपसागरापासून फक्त एक किंवा दोन मैलांवर फ्रान्स आणि स्पेनच्या सीमेदरम्यान बिडासोआ नदीत हे आयलंड आहे. या बेटाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बेटावर फ्रान्स आणि स्पेन या दोन्ही देशांचे हक्क आहेत. याठिकाणी वर्षातील 6 महिने फ्रेंच सरकारची सत्ता असते तर उर्वरित ६ महिने स्पेनची. १६५९ मध्ये पीयरनीसच्या करारावर स्वाक्षरी झाल्यापासून फिझंट आयलंडमध्ये अशीच स्थिती आहे. विशेष म्हणजे हे जगातील सर्वात लहान कॉन्डोमिनियम देखील आहे कारण याचं क्षेत्रफळ फक्त 1.5 एकर इतकं आहे. आपल्याकडील काही मॉलसुद्धा याच्यापेक्षा मोठे आहेत.

१६५९मधील पीयरनीस करारापूर्वी जवळपास ३० वर्षे स्पेन आणि फ्रान्सचा या बेटासाठी वाद सुरू होता. शेवटी फ्रान्स आणि स्पेनच्या प्रतिनिधींनी पीयरनीसमध्ये एकमेकांना भेटून समान हक्काच्या करारावर स्वाक्षऱ्या करून अधिकृतपणे तीस वर्षांचे युद्ध संपुष्टात आणलं. या करारानुसार एक नवीन सीमा देखील काढण्याच आली जी पीयरनीस पर्वताच्या बाजूने जाते आणि नंतर बिडासोआ नदीतून अटलांटिक महासागरातील बिस्केच्या उपसागरापर्यंत जातं. या नवीन सीमेमुळं फ्रान्स आणि स्पेन दरम्यान नैसर्गिक सीमा तयार झालेली आहे. तेव्हापासून फिझंट आयलंड एक कॉन्डोमिनियम बनलेलं आहे.

कॉन्डोमिनियम हा एक असा प्रदेश असतो ज्यावर अनेक राष्ट्रांचं समान वर्चस्व आणि सार्वभौमत्व असतं. अंटार्क्टिका हे देखील कॉन्डोमिनियमचंच एक उदाहरण आहे. सतराव्या आणि अठराव्या शतकात अनेक लहान-मोठे कॉन्डोमिनियम अस्तित्त्वात होते. परंतु त्यांचं अस्तित्व जास्त काळ टिकलं नाही. कारण, कॉन्डोमिनिअम व्यवस्थेच्या यशासाठी सर्व सहभागी पक्षांचे सहकार्य आवश्यक असते. एकदा का सहभागी पक्षांमध्ये काही गैरसमज निर्माण झाला तर कॉन्डोमिनिअमवरून वाद सुरू झालाचं म्हणून समजा. सुदैवानं अद्याप फिजंट आयलंडबाबत असं काही घडलेलं नाही.

कॉन्डोमिनियम प्रदेशावर अनेक राष्ट्रांचं समान वर्चस्व आणि सार्वभौमत्व असतं, ही गोष्ट जरी खरी असली तरी फिजंट आयलंडच्या बाबतीत ही व्यवस्था थोडी वेगळी करण्यात आलेली आहे. याठिकाणी स्पेन आणि फ्रान्स एकाचवेळी आपली मालकी सांगत नाहीत. त्यांनी सहा-सहा महिन्यांचा कालावधी वाटून घेतलेला आहे.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात फ्रेंच प्रतिनिधी, फिझंट बेट स्पॅनियर्ड्सच्या स्वाधीन करण्यासाठी स्पॅनिश अधिकाऱ्यांना भेटतात. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात स्पॅनिश अधिकारी हेच बेट फ्रेंचांच्या ताब्यात देतात. आतापर्यंत सातशेपेक्षा अधिक वेळा ही प्रक्रिया घडली आहे. भूगोल अभ्यासक फ्रँक जेकब्स यांनी याला ‘पिंग-पाँग’ची उपमा दिली आहे.

युद्ध आणि पीयरनीस करारावर स्वाक्षरी होण्यापूर्वी, फिझंट बेटाचा वापर एक तटस्थ ठिकाण म्हणून केला जात असे. फ्रेंच आणि स्पॅनिश सम्राटांमधील बैठका, कैद्यांची देवाणघेवाण करण्यासाठी या ठिकाणाचा वारंवार वापर केला जात असे. त्यामुळं या बेटावर अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत.

याच फिझंट आयलंडवर फ्रेंच राजा लुई तेरावा आणि त्याची स्पॅनिश वधू आना ऑस्ट्रिया यांची भेट झाली होती. त्यावेळी आनाचा भाऊ फिलिप चौथा आणि राजा लुईची बहिण एलिझाबेथ यांची प्रेमकहाणी सुरू झाली. त्यानंतर, लुई आणि आनाचा मुलगा लुई चौदावा हा देखील भावी पत्नी मारिया थेरेसाला (स्पॅनिश) भेटण्यासाठी फिजंट आयलंडवरच गेला होता. त्यानंतर पुढील कित्येक वर्षे याठिकाणी दोन्ही देशांतील वधू-वरांची लग्न जुळवली गेली. त्यातील काही यशस्वी झाली तर काही नाती शेवटपर्यंत टिकली नाहीत.

सध्या फिजंट आयलंडवर पर्यटकांना येण्यास परवानगी नाही. कारण या बेटाचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. पाण्याचा जोरदार प्रवाह आणि त्याच्या देखभालीतील निष्काळजीपणामुळं फिजंटचा सुमारे अर्धा भाग नष्ट झाला आहे. त्यामुळं बेटाची काळजी घेणं गरजेचं आहे. नाहीतर ही ऐतिहासिक जागा काळाच्या ओघात नष्ट होण्यास जास्त वेळ लागणार नाही.

जाणून घ्या मातृसत्ताक कुटुंबपद्धती जपणाऱ्या ‘किहनू’ बेटाबद्दल…!

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


तुम्हाला कधी बाहेर फिरत असताना हे आढळून आलं आहे का की एखाद्या गावात किंवा शहरात असा काही भाग असतो किंवा अशा काही इमारती असतात ज्या अगदी जुन्या पडक्या असतात ? कधी कधी असं वाटतं की या जुन्या पडक्या इमारती किंवा हे जुने भाग काही बोलायचा सांगायचा प्रयत्न करत असतात. हे बघताना एक लक्षात येत की गोष्टी किती पटकन बदलतात. “परिवर्तन” हा शब्द साधा सोपा सरळ दिसतो पण त्याचा अर्थ तेवढाच गहन आहे. इंग्रजीत एक छान वाक्य आहे “There is only one thing which is constant and that’s change”.

आजच्या मानवाची पाळंमुळं ही जुन्या सभ्यतेत आहेत. आधी मानव आला मग सभ्यता आली मग रूढी-परंपरा आल्या मग शासन प्रणाली आली आणि अशा प्रकारे समाज हा टप्प्या टप्प्यात स्थापन आणि विकसित होत गेला. काही ठिकाणी हा समाज पितृसत्ताक होता तर काही ठिकाणी मातृसत्ताक.

कुटुंबातील व्यक्ती, मालमत्ता, आणि व्यवहार यांच्यावर जेव्हा स्त्रीची अधिसत्ता चालते तेव्हा त्याला मातृसत्ताक कुटुंबपद्धती असं म्हटलं जातं. मानवाच्या अप्रगत भटक्या अवस्थेमध्ये पुरुष शिकारी साठी बाहेर जात त्यामुळे कुटुंबातील मालमत्ता, आणि व्यवहार यावर स्त्रीची अधिसत्ता चालायची आणि त्यातूनच मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा उगम झाला असे काही मानवशास्त्रज्ञ म्हणतात. या व्यवस्थेमध्ये कुटुंबाची वंशपरंपरा, मातेकडून अपत्यांना प्राप्त होत असे. मातृसत्ताक कुटुंबपद्धतीमध्ये मुली या वारसदार असत. धार्मिक कार्यात गृहप्रमुख असल्याने स्त्रियांना प्राधान्य असे.

मातृसत्ताक कुटुंबपद्धतीमध्ये वर-वधुकडे राहायला जात. मातृसत्ताक कुटुंबपद्धतीमध्ये पुरुषांचे स्थान गौण नसते. घरातील कामे स्त्रियांकडे व बाहेरील कामे पुरुषांकडे असे श्रमविभाजन असते. मातृसत्ताक कुटुंबपद्धतीमध्ये कुटुंबप्रमुख जरी स्त्री असली तरी घरचा कार्यकारी प्रमुख हा स्त्रीचा सख्खा भाऊ किंवा त्या घरातला थोरला मुलगा असतो.



सिंधू संस्कृती आणि अन्य द्रविडी जमातींमध्ये मातृसत्ताक कुटुंबपद्धती अस्तित्वात होती असं मानणारा मानव शास्त्रज्ञांचा एक गट आहे. वेदोत्तर वाङ्मयामध्ये काही मातृसत्ताक कथाभाग आढळतात. भारतात ईशान्येस खासी व गारो या जमाती तर दक्षिण भारतात तोडा, कादर, व नायर या मातृसत्ताक जमाती आहेत.

तर आज आपण जाणून घेणार आहोत एस्टोनिया (Estonia) देशाच्या किहनू या बेटावर अस्तित्वात असलेल्या मातृसत्ताक समाजाबद्दल जो आता त्याच्या अस्ताकडे मार्गक्रमण करतो आहे.

भूतपूर्व सोव्हिएत संघराज्यांपैकी पश्चिमेकडील बाल्टिक किनाऱ्यावरील हा देश म्हणजे एस्टोनिया (Estonia). टॅलिन (Tallinn) ही एस्टोनियाची (Estonia) राजधानी. एस्टोनिया (Estonia) हा देश प्राकृतिकदृष्टीने कमी उंचीचे पठार आहे. या पठाराचा उत्तरेकडील भाग सपाट व दलदलीचा आहे. या देशाला बरीच नैसर्गिक बंदरे लाभली आहेत. या प्रदेशाचे हवामान सौम्य खंडार्गत आहे. थंडीत तापमान -५℃ ते -८℃ एवढे असते तर उन्हाळ्यात तापमान १७℃ एवढेच असते. या देशाचा उत्तरेकडील समुद्रकिनारा 150 दिवस गोठलेला असतो तर पश्चिमेकडील किनारा हा ५० दिवस गोठलेला असतो. या देशात उन्हाळ्यात पाऊस पडतो.

9व्या शतकात डेन्मार्कने एस्टोनिया (Estonia) जिंकून घेतला. १३४६ मध्ये डेन्मार्कने हा देश जर्मन सरदारांना विकला. नंतर या देशाचा ताबा स्वीडनकडे आला. १९१९ पर्यंत या देशावर विविध युरोपियन देशांची सत्ता होती. अखेर ३१ डिसेम्बर १९१९ रोजी रशियाने एस्टोनियाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. दुसऱ्या महायु*द्धात ना*झींनी एस्टोनियाच्या जनतेचा भरपूर छळ केला. सध्या रशिया एस्टोनियावर आपला हक्क सांगत आहे पण अमेरिकेने याला मान्यता दिली नाही. असा हा एस्टोनियाचा संक्षिप्त इतिहास.

तर या एस्टोनियाच्या दक्षिणेला किहनू (Kihnu) नावाचं एक छोटंसं बेट आहे. या बेटाची लोकसंख्या ही फक्त ७०० आहे. आपल्या शहराच्या एखाद्या प्रभागाची संख्या ही या देशापेक्षा जास्त असेल. तर असं काय खास आहे या बेटाबद्दल? आज जगात कुठेही जा तुम्हाला बहुतांश ठिकाणी पितृसत्ताक कुटुंबपद्धती दिसून येते.

पण पृथ्वीवर अजूनही काही भाग असे आहेत जिथे मातृसत्ताक कुटूंबपद्धती आहे त्यातील एक म्हणजे हे किहनू (Kihnu) बेट. या बेटावर कुटुंब व सामाजिक व्यवहारात अधिसत्ता ही महिलांची आहे. 

किहनू (Kihnu) या बेटावर मासेमारी हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन व मासेमारी करण्याकरिता या बेटावरचे पुरुष हे वर्षभर समुद्रात असतात अशा वेळी घर आणि इतर सामाजिक जबाबदाऱ्या या इथल्या स्त्रियांवर येतात. इथल्या महिला फक्त इथल्या दैनंदिन जीवनात अधिसत्ता गाजवत नाहीत तर त्या या बेटाच्या रूढी, परंपरा, चालीरीती, संस्कृती याचं संवर्धन आणि रक्षणही करतात.

या बेटावर मुलांच्या शालेय शिक्षणाकडेही स्त्रियाच लक्ष देतात. इथल्या महिला या त्यांच्या येणाऱ्या पिढीला त्यांची पारंपरिक वाद्य कशी वाजवावीत याचे प्रशिक्षण लहानपणापासूनच देतात. जर तुम्ही कधी या बेटाला भेट दिली तर तुम्हाला दिसेल इथल्या लोकांचा विशेषतः महिलांचा एक वेगळा व पारंपरिक पोशाख आहे जो त्या केवळ सणासुदीला नाही तर रोज परिधान करतात.

इथले पुरुष बराच काळ बाहेर असल्याने या महिलांना पुरुषांची कामंही लीलया करताना दिसून येतात. उदाहरणार्थ, शेती व बागकाम करणे, वाहन दुरुस्ती करणे, इत्यादी. इथे सामाजिक ऐक्य राहावं या करता सामूहिक प्रार्थनेला आणि कौटुंबिक समारंभाला सर्व महिला एकत्र जमतात.

या बेटाबद्दल अजून एक अजब अशी गोष्ट म्हणजे इथे एखादी महिला ही 60 वर्षांची झाली की तिने तिच्या अंतयात्रेसाठीची तयारी करायची. ऐकून नवल वाटलं असेल ना पण हो ही गोष्ट खरी आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की स्वतःच्या अंतयात्रेची तयारी करायची म्हणजे नक्की काय करायचं ? तर इथल्या सर्व महिला या ख्रिश्चन धर्माच्या अनुयायी आहेत त्यामुळे त्यांच्यात एखादी व्यक्ती वारल्यानंतर त्याला जमिनीत दफन केलं जातं. दफन करताना मृत व्यक्तीला स्वच्छ करून नवीन वस्त्रे घातली जातात. त्यामुळे इथल्या महिला या ६० वर्षाच्या झाल्यावर दफन करतानाची जी वस्त्रे असतात ती स्वतः शिवतात.

ख्रिश्चन धर्मात दफन करण्यासाठी जमिनीत खड्डा खणावा लागतो आता हा खड्डा लवकर खणणं काही एका माणसाचं काम नाही याला किमान 4 माणसं लागतात या खड्डा खणणाऱ्या माणसांना “ग्रेव्ह डीगर” (Grave Digger) असं म्हणतात. तर या ग्रेव्ह डीगर(Grave Digger)बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला हातमोजे (Hand Gloves) तयार करतात.

आज इथली ७०% जनता ही वृद्ध आहे. प्रतिकूल हवामानामुळे इथे शेती किंवा औद्योगिकरण झालेलं नाही ज्यामुळे इथली नवीन पिढी ही उदरनिर्वाहासाठी हे बेट सोडून दुसरीकडे स्थलांतरित होत आहे. ७०% वृद्ध जनता व स्थलांतरित होणाऱ्या तरुण पिढीमुळे या बेटावरची मातृसत्ताक संस्कृती ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. २०००३ साली युनेस्कोने “Masterpiece of the oral and intangible heritage of humanity” अशी मान्यता दिली.

आज जगभरातील स्त्रियांचे प्रश्नांबाबत फक्त चर्चा केली जाते त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावलं उचलली जात नाहीत. स्त्रीला आधीही सक्षम होती आजही आहे आणि कायम राहील, पण स्रीला आपले कर्तृत्व सिद्द करण्यासाठी फक्त जागा आणि संधी हवी असते. अनेकदा जागा व संधी असूनही स्त्रियांना त्याचा उपयोग करता येत नाही.

काहीवेळा स्त्रियांची जागा, संधी व हक्क हिसकावून घेतले जातात आणि याची उदाहरणे वारसाहक्कापासून ते बौद्धिक संपदेपर्यंत घडताना दिसते. त्यामुळे नुसती आंतरराष्ट्रीय संस्थानांकडून “Masterpiece of the oral and intangible heritage of humanity” अशा मान्यता देऊन जगभरातील मातृसत्ताक संस्कृतीचे रक्षण होणार नाही. या संस्कृतीचं रक्षण करणे हे आपलं वौश्विक दायित्व आहे हे समजून विकसित व विकसनशील देशांनी मातृसत्ताक संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी पावलं उचलायला हवीत.

त्यामुळे नुसता आंतरराष्ट्रीय महिला दिन किंवा आंतरराष्ट्रीय कन्या दिन साजरा करून आम्ही स्त्रियांचा कसा सन्मान करतो हे दाखवण्यापेक्षा प्रामाणिक, कष्टाळू, ध्येयवेड्या, व पात्र स्त्रियांना योग्य संधी, प्रोत्साहन, व आधार दिला तर मातृसत्ताक संस्कृतीचं जतन, स्त्रीयांची आर्थिक व सामाजिक प्रगती असे दोन्ही हेतू साधता येतील व हाच स्त्रियांना दिलेला सर्वोच्च आदर असेल.

इथले लोक बर्फाची शेती करून करोडोंची उलाढाल करतायत..!

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


बर्फाने वेढलेल्या डोंगराळ प्रदेशात भटकंती करणे हा प्रकार भारतीयांसाठी फारसा परिचयाचा नाही. मात्र, अमेरिकेत या साहसी क्रीडाप्रकाराची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. अमेरिकेचे स्वित्झर्लंड किंवा बर्फाळ गिर्यारोहणाची मक्का म्हणून ओराय हे क्षेत्र अमेरिकेतील स्थानिक लोकांनी विकसित केले आहे. हे लोक स्वतःला ‘बर्फाचे शेतकरी म्हणवून घेतात.

नैऋत्य कोलोरॅडोमधील केवळ १ हजार लोकसंख्या असलेल्या ओराय या छोट्याशा पर्वतीय शहरातून भटकंती करत असताना, नयनरम्य ‘एन्क्लेव्ह’ हे जगातील सर्वात मोठे बर्फाळ गिर्यारोहण जवळच असल्याचा अंदाजही सहजासहजी येत नाही. सुमारे २०० गिर्यारोहण मार्ग आणि तब्बल १७ हजार फूट उंच जागेवर असलेले ‘ओराय आईस पार्क’ हे नवशिक्या आणि अनुभवी बर्फ गिर्यारोहकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

हिवाळा जवळ येतो त्या वेळी स्थानिक लोक गोठलेल्या पाण्याच्या उंच भिंती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतात. साधारणपणे १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत बर्फाच्छादित गिर्यारोहणाचा साहसी क्रीडाप्रकार लोकप्रिय होत गेला आणि नैसर्गिक ठिकाणांबरोबरच काही मानवनिर्मित आईस पार्क्स उभारले जाऊ लागले. ओराय आइस पार्क हा त्यापैकी सर्वात मोठे आणि लोकप्रिय ठिकाण आहे.

‘बर्फाची शेती’ करून साहसी गिर्यारोहकांना आकर्षित करून घेणाऱ्या या अनोख्या शेतकऱ्यांबद्दल या उद्यानाचे व्यवस्थापक डॅन चेहेल यांनी दिलेली माहिती चांगलीच उत्कंठावर्धक आहे.



बर्फाचा शेतकरी म्हणजे काय?

बर्फाचा शेतकरी खडकाच्या आणि कड्यांच्या पृष्ठभागावर खड्डे खोदून त्यामध्ये पाण्याचा प्रवाह सोडतो. हिवाळ्याच्या हवामानात हे पाणी गोठून त्याचे बर्फ बनते आणि बर्फाळ गिर्यारोहणाचे मार्ग तयार होतात. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये तापमान कमी होताच बर्फाच्या शेतीचा हंगाम सुरू होतो.

उन्हाळ्यात बर्फाळ गिर्यारोहण मार्गांवर वाढलेली सर्व झाडे झुडुपे छाटण्याच्या कामाने बर्फाच्या शेतीचे काम सुरू होते. हे काम सुमारे आठवडाभर चालते. हे काम झाल्यावर बर्फ तयार करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी दीड मैल लांब सिंचन प्रणालीद्वारे पाणी वाहून आणले जाते. गिर्यारोहण मार्गांवर खड्डे खणून त्यात हे पाणी सोडले जाते. काही पाणी हे जमिनीत मुरून जाते. त्यामुळे जमिनीतील रिकाम्या जागा भरल्या जातात आणि जमिनीचे तापमानही घटते.

हिवाळ्यात वाढणाऱ्या थंडीने उरलेले पाणी गोठून बर्फ तयार होते. त्या साठी वेगवेगळ्या भागात कमी-अधिक पाणी देण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या शॉवर हेड्सचा वापर केला जातो. फवारले जाणाऱ्या पाण्याचा थेंबही आवश्यकतेनुसार लहान मोठा असतो. सामान्यतः कमीत कमी आकाराच्या थेंबाची खडकांवर फवारणी केली जाते. त्यामुळे पाणी लवकर थंड होऊन लवकर गोठते. तापमान कमी असलेल्या रात्री जास्त पाणी सोडणे आणि तापमान जास्त असलेल्या रात्री पाण्याचा प्रवाह कमी करणे ही कामे महत्वाची आहेत.

यासाठी वापरले जाणारे पाणी शहराच्या पाणीपुरवठ्यातून वाहून जाणारे किंवा शिल्लक राहणारे असते. हे शहराच्या उंचावरील डोंगराळ भागातून एका झऱ्यातून येते. ते ५ लाख गॅलन क्षमतेच्या पाण्याच्या दोन टाक्यांमध्ये ते साठवले जाते. उन्हाळ्यात त्याचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जातो तर हिवाळ्यात ते आईस पार्ककडे वळविण्यात येते. शेवटी ते कोलोरॅडो नदीत जाते. बर्फाळ गिर्यारोहण मार्ग बनवण्याचे काम साधारणपणे २० नोव्हेंबरच्या आसपास सुरू होते. गिर्यारोहणाची सुरक्षित आणि पुरेसा टिकाऊ बर्फ तयार होण्यासाठी सुमारे २० दिवस ते एक महिना एवढा कालावधी आवश्यक असतो. हवामानानुसार हा कालावधी वाढण्याचीही शक्यता असते.

मुळात गिर्यारोहक असलेले, आणि या पार्कचे व्यवस्थापक डॅन यांनी व्हरमाँटमधील स्टर्लिंग महाविद्यालयात ‘पर्यटन म्हणून बर्फाळ गिर्यारोहणाचे फायदे’ हा संशोधन प्रकल्प पूर्ण केला. जानेवारी २००३ मध्ये त्यांनी २ आठवडे बर्फावर चढण्याचे प्रशिक्षण घेतले. चांगले प्रशिक्षित झाल्यावर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बर्फाळ गिर्यारोहणासाठी नेण्यात आले. प्रत्येक चढाई हे एक साहस होते. माझ्यासाठी स्वतःला जोखून बघण्याचा, अडथळ्यांवर मात करण्याचा आणि मित्रांसोबत भटकंती करण्याचा हा एक उत्तम मार्ग होता, असे डॅन सांगतात.

स्टर्लिंग महाविद्यालयातील प्रशिक्षणाच्या दुसऱ्या वर्षी वर्गातील अनेकांनी ‘माउंटन कल्चर्स सेमिस्टर’चा भाग म्हणून प्रशिक्षकांसह ओरायला भेट दिली. त्यांच्याकडून या ठिकणाची माहिती मिळताच डॅन त्याकडे आकर्षित झाले. त्यांनी लगोलग ओरायला भेट दिली आणि तेच त्यांचे कार्यक्षेत्र बनले. आईस पार्कच्या उभारणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले.

हे आईस पार्क चित्तथरारक आणि विस्मयकारक अनुभव देणारे आहे. याला अमेरिकेचे स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते. बर्फाळ गिर्यारोहण करणाऱ्यांसाठी हे मक्केइतकेच महत्वाचे आहे.

उत्तर अमेरिकेतील सर्वोत्तम बर्फ चढाईच्या ठिकाणांमध्ये हे ओराय आईस पार्क हे प्रमुख ठिकाण आहे. उद्यानात काही दिवस बर्फारोहणाचे प्रशिक्षणही घेता येते. उद्यानात तब्बल १७ हजार फूट उंचीचा कडा चढाईसाठी उपलब्ध आहे. प्रत्येक हंगामात या ठिकाणी बर्फारोहणासाठी ७ ते ८ हजार गिर्यारोहक हजेरी लावतात. बर्फ़ारोहण करणाऱ्यांना जाड पृष्ठभाग असलेला आणि निळा बर्फ आवडतो. काही जणांना हंगामाच्या अखेरीस उपलब्ध असलेला भुसभुशीत बर्फ हवा असतो. हवामान आणि ऋतूनुसार बर्फ वेगळा असतो.

ओराय काउंटीमधील स्थानिक नागरिकांचे अर्थकारण हे बहुतांश पर्यटकांवर अवलंबून आहे. आइस पार्क उभारले जाण्यापूर्वी ओराय हे विशेषतः हिवाळ्यात एक ओसाड शहर मानले जात असे. ९० च्या दशकाच्या सुरुवातीस आईस पार्क सुरू होण्यापूर्वी शहराची अर्थव्यवस्था तशी ठप्पच होती. पार्क मधील वर्दळ जसजशी वाढली, ते अधिकाधिक लोकप्रिय झाले तसतसे शहराच्या अर्थव्यवस्थेला बाळसे चढले. ओराय आईस पार्क हे अमेरिकेतील सर्वात मोठ्या गिर्यारोहण केंद्रांपैकी एक बनले आहे. शहरातील प्रत्येक घरात किमान एक गिर्यारोहक निवारा घेत असतो. स्थानिक लोक अतिशय अगत्यशील आहेत. नवंनवीन गिर्यारोहक शहरात येत राहतात आणि खुल्या दिलाने त्यांचे स्वागत केले जाते.

बर्फाळ गिर्यारोहणाचे क्षेत्र वाढविणे, पाहुण्यांचे जास्तीत जास्त चांगले आदरातिथ्य करणे आणि कर्मचारी आणि गिर्यारोहकांना पुरेपूर सुरक्षितता प्रदान करणे हे पार्क व्यवस्थापनाचे ध्येय आहे. पायाभूत सुविधांची देखभाल करणे आणि सुधारणे हे देखील एक मोठे लक्ष्य आहे, उद्यानाच विस्तार वाढवण्याचा विचार देखील व्यवस्थापन करत आहे. बर्फाचे शेतकरी आणि गिर्यारोहक दोघांसाठीही उंच शिखरावर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोहोचणे अशक्य असलेल्या ठिकाणी पायऱ्या आणि पदपथांच्या स्वरूपात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन नवे अधिक थरार देणारे मार्ग विकसित करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे.

अंटार्क्टिका नाही तर पृथ्वीवरच्या या ठिकाणी जीवन अशक्य आहे..!

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


संपूर्ण विश्वामध्ये पृथ्वीवर मानवी जीवन टिकून राहणे हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. असंख्य उल्कापातांची शक्यता, सूर्याचे प्रचंड तापमान, स्पेसमधील रेडिएशन्स, वादळे या सर्व गोष्टी पृथ्वीवरील सजीवसृष्टीसाठी घातक ठरू शकतात. तरीही गेली हजारो वर्षे या पृथ्वीवर लाखो प्रकारचे सजीव राहत आहेत. पृथ्वीचे मॅग्नेटिक फिल्ड आणि ओझोनचा थर स्पेसमधील सर्व संकटांपासून आपले रक्षण करण्यास समर्थ असल्याने पृथ्वीवर सजीव सृष्टी अबाधित राहिली आहे.

असं असलं तरीही पृथ्वीच्या काही भागांवर अद्याप जीवनाची सुरुवात झालेली नाही. तुमच्या मनात कदाचित नाव आलं असेल ते अंटार्क्टिका खंडाचं. अंटार्क्टिका खंडात माणूस काही काळासाठी का होईना पण राहू शकतो. अंटार्क्टिका खंडात मानवाचं कायमस्वरूपी अस्तित्व नसलं तरी त्याठिकाणी अजिबातच जीवन नाही असे होत नाही. मानवाव्यतिरिक्त अंटार्क्टिका खंडात मासे, पेंग्विन्स अशा प्रकारचे जीव राहतात.

पण पृथ्वीवर एके ठिकाणी मात्र एकाही जीवाचं अस्तित्व नाही. कारण पृथ्वीचा तो भाग जीवनासाठी अतिशय प्रतिकूल आहे. पृथ्वीच्या भू-औष्णिक प्रदेशात पर्यावरणीय परिस्थिती गंभीर आहे की त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे जीवन टिकून राहू शकत नाही. याठिकाणचे वातावरण पृथ्वीच्या सर्वांत वाईट वातावरणांपैकी एक असून हा प्रदेश अत्यंत उष्ण, खारट आणि आम्लयुक्त (ऍसिडिक) आहे.

इथिओपियामधील ‘डनाकिल डिप्रेशन’ येथे असलेल्या ज्वालामुखीच्या विवराच्या बाजूने तलाव पसरलेले आहेत. याठिकाणी हिवाळ्यातही दिवसाचे तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. ईशान्य इथिओपियामधील ‘डॅनाकिल डिप्रेशन’ हे समुद्रसपाटीपासून १०० मीटर खोलवर असलेले ठिकाण आहे. डॅनाकिल डिप्रेशन ग्रेट रिफ्ट व्हॅलीच्या उत्तरेकडील टोकाला आहे. ‘रेड सी’पासून सुरु होणारे हे विस्तृत मैदान या प्रदेशातील नदी, नाले, इत्यादींतील पाण्याच्या बाष्पीभवनामुळे तयार झाले आहे.

सल्फरने तयार झालेले असंख्य झरे, ज्वालामुखी, ऍसिड किंवा तत्सम पदार्थानी भरलेले तलाव आणि विविध रंगांच्या मातीने तसेच क्षारांनी तयार झालेला भूभाग अशा कठीण पर्यावरणामध्ये एकही जीव असण्याची शक्यता नाही. त्या ठिकाणच्या जिवंत ज्वालामुखींमुळे पाण्याचे बाष्पीभवन होते किंवा असलेले पाणीसुद्धा प्रचंड तापते. या जिवंत ज्वालामुखींमुळेच भूगर्भागात असलेले सल्फर आणि लोह भूपृष्ठावर येतात आणि त्यांच्यावर नैसर्गिकरित्या रासायनिक प्रक्रिया होऊन पिवळे, हिरवे आणि नारंगी क्षार तसेच माती तयार होते. 

डॅनकिलच्या प्रदेशात येणाऱ्या सर्व पाण्याचे काही वेळातच बाष्पीभवन होऊन जाते. त्यामुळेच या प्रदेशातून कोणतीही नदी अथवा पाण्याचा स्रोत निघत नाही. या प्रदेशात दहा लाख टनहून अधिक क्षार आहेत. काही हायपरॅसिड क्षारयुक्त तलावांची पीएच व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. म्हणजेच या तलावांमध्ये ऍसिडशिवाय आणखी काहीही असू शकत नाही. कारण रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या हायड्रोक्लोरिक ऍसिडची पीएच व्हॅल्यू साधारण -१.०५ असते. सुमारे तितकीच पीएच व्हॅल्यू या क्षारयुक्त तलावांची देखील आहे.



एका संशोधनातून असा निष्कर्ष समोर आला: “मागील संशोधनाच्या तुलनेत मोठ्या संख्येने नमुन्यांची विश्लेषणे केल्यानंतर, आम्ही हे निश्चितपणे म्हणू शकतो की या उष्ण, हायपरसिड आणि क्षारयुक्त खोऱ्यांमध्ये सूक्ष्मजीव जीवसृष्टी नाही किंवा काळे आणि पिवळे तलाव म्हणून संबोधले जाणाऱ्या तलावांमध्ये मॅग्नेशियम-युक्त समृद्ध मीठ कोठेही नाही.” हा निष्कर्ष फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चमधील जीवशास्त्रज्ञाने काढला आहे.

एका दुसऱ्या संशोधनानुसार, या वाळवंटात आणि भू-औष्णिक प्रदेशाच्या सभोवतालच्या क्षारयुक्त खोऱ्यांमध्ये अतिप्राचीन आणि अभिजात सूक्ष्मजीवांच्या रूपात जीवन अस्तित्वात आहे. हे जीव आर्किया गटातील हॅलोफाइल्स असू शकतात. कारण या जीवांना क्षारयुक्त वातावरण अनुकूल असते. याठिकाणी वाहणारे वारे आणि अभ्यासदौऱ्यासाठी किंवा पर्यटनासाठी येणारे लोक यांमुळे विविध प्रकारचे सूक्ष्मजंतू डनाकिल डिप्रेशन तलावांमध्ये पसरले जातात. पण असे जीव जास्त वेळ जिवंत राहू शकत नाहीत. हा निष्कर्ष अनेक प्रकारच्या चाचण्या केल्यानंतर काढण्यात आला आहे.

संभाव्य सूक्ष्मजीवांच्या बाबतीत आणखी माहिती हवी असल्यास पेशी शोधण्यासाठी सायटोमेट्री, क्षारयुक्त पाण्याचे रासायनिक विश्लेषण, तसेच एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपीसह इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी इत्यादी गोष्टी करण्याची आवश्यकता असते. चाचण्यांमुळे शास्त्रज्ञांना सूक्ष्मजीवांच्या पेशी आणि याच सूक्ष्मजीवांच्या पेशींसारखेच सिलिकॉनयुक्त समृद्ध खनिज कण यांच्यात फरक करण्यात मदत झाली. कालांतराने या पेशी ‘फॉसिलाईझ्ड सेल्स’ किंवा ‘जीवाश्म पेशी’ म्हणून ओळखल्या जातील. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे जीवन नसतानाही या पेशी क्षारयुक्त पाण्यात तयार होऊ शकतात.

अशा प्रकारच्या कठीण पर्यावरणातही जीवन असणे हा आपल्या सौर मालेत किंवा त्याही पलीकडे जीवन असेल याचा पुरावा म्हणून अनेक शास्त्रज्ञांनी वापरला आहे. तसेच द्रव पाण्याची उपस्थिती असूनही निर्जंतुक असणारी पृथ्वीवर डॅलोल खोऱ्यांसारखी अनेक ठिकाणे आहेत असेही या अभ्यासातून समोर आले आहे. हायड्रोजनच्या विघटनास हातभार लावणारे ‘कॅओट्रॉपिक मॅग्नेशियम साॅल्ट्स’सारखे रासायनिक अडथळे असल्याने या खोऱ्यांमध्ये इतर पृथ्वीसारखे जीवन शक्य नाही हे स्पष्ट होते.

डॅनकिल डिप्रेशनच्या आसपासच्या प्रदेशातील स्थानिक लोक मिठाची विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवतात. गेल्या काही वर्षांत याठिकाणी पर्यटकांची आणि अभ्यासकांची ये-जा वाढली असल्याकारणाने पर्यटन-पुरक व्यवसायही याठिकाणी निर्माण होत आहेत.

पृथ्वी ही जीवन आणि उत्क्रांती दर्शवते आणि जीवनाशिवाय उत्क्रांती होऊ शकत नाही. त्यामुळे हे ठिकाण अविश्वसनीय वाटते.

एकेकाळची मिठाची खाण ओस पडली, आज तिथे जगप्रसिद्ध थीम पार्क आहे

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


पर्यटन म्हटलं की आपल्यासमोर उभे राहतात किल्ले, समुद्री किल्ले, बीचेस, संग्रहालये, रिजॉर्टस्, थंड हवेची ठिकाणं, डोंगररांगा, अभयारण्य आणि बरंच काही. इतकंच काय, महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी ‘जेल पर्यटन’देखील सुरु झालं आहे. पण आजवर तुम्ही पर्यटनासाठी एखाद्या खाणीमध्ये गेला आहात काय?

असं म्हणतात खाणकाम हे जगातील सर्वांत धोकादायक कामांपैकी एक आहे. पण युरोपमध्ये चक्क एक मीठाची खाणच पर्यटनासाठी खुली करण्यात आली असून त्याठिकाणी महिन्याला सुमारे ५० हजार लोक भेट देतात. नेमकं काय विशेष आहे त्या खाणीमध्ये, जाणून घेऊया आजच्या या विशेष लेखामधून..

युरोप. मानवी गेल्या काही शतकांमध्ये जीवनाच्या जवळ जवळ सर्वच क्षेत्रात प्रगती केलेला खंड. यामध्ये पर्यटन तरी कसं मागे राहील. सलायना तुर्डा किंवा तुर्डा मीठाची खाण हे ठिकाण पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरण्याचं कारण म्हणजे येथील खाणींमध्ये दिसणारं विहंगम दृश्य. विहंगम दृश्याबरोबरच तिथलं आनंदमय वातावरण आलेल्या पर्यटकांना सहजासहजी बाहेर पाय ठेऊ देत नाही.

तुर्डा मीठाची खाण युरोपमधील सर्वात खोल मिठाची खाण म्हणूनही ओळखली जाते. तुर्डा मीठाची खाण रोमानिया देशातील तुर्डाजवळील ‘दुर्गाउ-वाल्या सरटा’ येथे आहे. याठिकाणाहून मीठाच्या उत्पादनाची सुरुवात मध्ययुगीन काळात सुरू झाली आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सुरूच होती. ही खाण काही काळ बंद होती आणि दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला पुन्हा सुरू करण्यात आली.

नव्वदच्या दशकात, या मीठाच्या खाणीमध्ये मोठा बदल झाला. आता ‘तुर्डा मीठ खाण’ हे एक ऐतिहासिक स्थळ बनले होते. पण अन्य ऐतिहासिक वास्तूंप्रमाणे या खाणीचे रूपांतर कोणत्याही प्रकारच्या संग्रहालयात झाले नाही, तर भूमिगत थीम पार्कमध्ये झाले आहे. सध्या हे थीमपार्क केवळ रोमानियामध्येच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.

मध्ययुगीन काळात या खाणीतून मिठाचे उत्पादन सुरू झाले. ‘ट्रान्सिल्व्हेनिया’चा संदर्भ देणार्‍या हंगेरीतील ‘अर्पाडियन चॅन्सेलरी’ने १७०५ साली लिहिलेल्या दस्तऐवजात “तुर्डा किल्ल्याजवळील मिठाच्या खाणी”बद्दल तपशील आहेत. १ मे १२७१ रोजी हंगेरीच्या दुसर्‍या दस्तऐवजात, तुर्डा येथील मीठाच्या खाणींचा स्पष्ट उल्लेख आहे. मध्ययुगीन काळातील कागदपत्रांमध्ये तुर्डा येथील मीठाच्या खाणीचे संदर्भ अजूनही सापडतात. तुर्डा मीठाच्या खाणीतून मोठ्या प्रमाणात मीठाचे उत्पादन घेतल्याने खाणमालक बरेच श्रीमंत झाले होते.



आधुनिक युगातही मीठाच्या या खाणीतून मीठाचे उत्पादन होऊ शकते, याशिवाय हे एक पर्यटनक्षेत्र देखील आहे. तुर्डा मीठाच्या खाणीतील एका विभागाला ‘फ्रांझ जोसेफ गॅलरी’ म्हणतात. या गॅलरीचे बांधकाम १८५३ मध्ये सुरू झाले. फ्रान्झ जोसेफ गॅलरीच्या बांधकामाचे प्रमुख कारण म्हणजे भू-पृष्ठभागावर मीठ आणण्याचा खर्च कमी करणे. १८७० साली बांधकाम पूर्ण झाल्यावर, ही गॅलरी तब्बल ७८० मीटर्स लांबलचक होती, १८९९ सालापर्यंत ही गॅलरी आणखी १३७ मीटर्स वाढवली गेली.

एकोणिसाव्या शतकातील मिठाच्या खाणीचा आणखी एक भाग म्हणजे रुडॉल्फ खाण. तुर्डा मीठ खाणीतील ही सर्वांत शेवटची खाण आहे, आणि याच ठिकाणाहून खाणीच्या शेवटच्या दिवसांत मीठाचे उत्पन्न घेतले जात होते. ही खाण ४२ मीटर खोल, ५० मीटर रुंद आणि ८० मीटर लांब आहे. आणखी एक विशेषता म्हणजे रुडॉल्फ खाण व्हर्टिकल मीठ वाहतूक क्षेत्राशी जोडलेली होती, या व्हर्टिकल मीठ वाहतूक क्षेत्राला एक मॅन्युअल लिफ्ट होती, नंतरच्या काळात ही लिफ्ट ऑटोमॅटिक करण्याचा प्रयत्न झाला, पण दरम्यान खाणीचे कामकाज बंद झाले.

वर्षानुवर्षे तयार झालेल्या स्टॅलेक्टाईट्स (गुहांमध्ये बर्फासारखी लटकलेली एक निमुळता रचना) सर्वत्र दिसून येतील. हे स्टॅलेक्टाइट्स दरवर्षी २ सेंटीमीटर्सने वाढतात आणि जेव्हा ते ३ मीटर्सचे होतात तेव्हा तुटून पडतात. तुर्डा मीठाच्या खाणीत तेरेझिया नावाची खाण आहे, तेरेझिया खाणीमध्ये मीठाचे सरोवर तयार झाले आहे. ही खाण १२० मीटर लांब असून तलावाची खोली ८ मीटर आहे. सरोवराच्या मध्यभागी खाणीचे कामकाज चालू असताना टाकलेल्या राडारोड्याच्या ढिगाऱ्यामुळे एक बेट तयार झाले आहे.

तुर्डा मीठ खाण १९३२ साली बंद करण्यात आली आणि दुसरे महायु*द्ध सुरू होईपर्यंत त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. यु*द्धाच्या काळात तुर्डा येथील खाणींचा उपयोग विमाने ठेवण्यासाठी केला जात असे. यावरूनच आपल्याला या खाणींच्या भव्यतेचा अंदाज येऊ शकतो. यु*द्धादरम्यानही तुर्डा मीठ खाणीचा वापर होत राहिला. यु*द्धादरम्यान फ्रांझ जोसेफ गॅलरीमध्ये चीज साठवण्यात येत असे.

१९९२ साली, तुर्डा सॉल्ट माईन हे लोकांसाठी थीम पार्क म्हणून मीठ संग्रहालय बनले. या थीम पार्कमध्ये एक ॲम्फीथिएटर, फिरणारा एक भव्य पाळणा (जत्रेमध्ये असतो तसा), तलावात फिरण्यासाठी विविध प्रकारच्या बोटी आहेत. याठिकाणी एक स्पा आणि ब्युटी सेंटर देखील उभारण्यात आले असून ते देखील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या खाणीला दरवर्षी सुमारे ६,५०,००० लोक भेट देतात.

जपानच्या या बेटाचा काळा इतिहास आजही जगापासून लपवून ठेवला आहे.!

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपण नेहमीच ऐकतो जगभरात अनेक जागतिक वारसा स्थळं आहेत. आपल्या भारतातही अनेक जागतिक वारसा स्थळं आहेत. ताजमहाल, अजिंठा लेणी, एलिफंटा लेणी, हंपी ही त्याचीच काही उदाहरणं.

पण २०१५ साली जेव्हा जपानने त्यांच्या ‘हाशिमा’ नावाच्या बेटाला युनेस्कोने (UNESCO) जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करावं अशी मागणी केली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. दक्षिण कोरियाने याला कडाडून विरोध केला. या विरोधामागे कारणही तसंच होतं. जपानच्या या निर्णयाला दक्षिण कोरियाने का विरोध केला, नेमकं काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊया या लेखातून..

हाशिमा हे जपानमधलं एक बेट. जपानच्या नागासाकी प्रांतात साधारण पाचशे पाच लहान मोठी बेटं आहेत. ही सगळीच बेटं अगदी निर्मनुष्य आहेत, याच बेटांमधलं हाशिमा हे एक बेट. हे बेट नागासाकी शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. हाशिमा बेटाला ‘गुंकानजिमा’ या नावानेही ओळखलं जातं, गुंकानजिमा म्हणजे लढाऊ जहाज! विमानातून या बेटाकडे पाहिल्यास हे बेट एखाद्या ‘बॅटलशिप’सारखं दिसतं आणि म्हणूनच त्याला गुंकानजिमा नाव पडल्याचं म्हटलं जातं.

हाशिमा बेट

जपानमध्ये जे झपाट्याने औद्योगिकीकरण झालं त्याचं प्रतीक म्हणून हाशिमा बेटाकडे बघितलं जातं. १८८७ ते १९७४ या कालावधीत या बेटावर मानवी वसाहत होती. त्याकाळी हे बेट मित्सुबिशी कंपनीच्या मालकीचं होतं. या बेटावर पाण्याच्या खाली असलेल्या खाणींमधून कोळसा काढण्याचं काम सुरू असायचं. बेटावर खाण कामगारांना राहण्यासाठी घरंही देण्यात आली होती, कामगारांना राहण्यासाठी १९१६ साली पहिली पक्की इमारत बांधली गेली. पुढे १९५८ मध्ये या बेटावर साधारण पाच हजारांच्या आसपास माणसं राहत होती.

या खाण कामगारांचं आयुष्य साधंसुधं नव्हतं, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांना राहावं लागत होतं. या कोळशाच्या खाणीत काम करण्यासाठी शेकडो कोरियन लोकांना जबरदस्तीने या बेटावर आणलं गेलं. समुद्राच्या खाली असलेल्या कोळशाच्या खाणीत काम करणं सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. जपानच्या औद्योगिकीकरणाचं प्रतीक असलेल्या हाशिमा बेटाला एक वाईट इतिहास आहे. साल १९४० ते १९४५ दरम्यान पाचशे ते आठशे कोरियन माणसांना जबरदस्तीनं हाशिमा बेटावर आणण्यात आलं.



या कोळशाच्या खाणीत काम केलेल्या काही माणसांपैकीच एक म्हणजे ‘किम हुंग स्योब’. हाशिमा बेटाकडे झालेला त्यांचा प्रवास आपण त्यांच्याच शब्दांत वाचूया!

९७ वर्षीय किम हुंग स्योब म्हणतात “१७ नोव्हेंबर १९४३ साली मला जबरदस्तीने जपानमध्ये नेण्यात आलं. हा दिवस मी कधीच विसरणार नाही. या विषयावर मला बोलायचीही इच्छा होत नाहीये, आम्ही किती त्रास सहन केला हे मी शब्दात मांडू शकत नाही. तिथे सगळ्यात मोठा प्रश्न खाण्याचा होता. तिथे जेवण्याच्या नावावर फक्त सुकलेली रताळी आणि काही धान्य दिलं जायचं. कोरियन कामगारांना ना धड चांगलं अन्न दिलं जायचं ना चांगला पगार! या कामगारांना १२ तासांहून अधिक काळ कोळशाच्या खाणीत घालवावा लागत असे. कोळशाची खाण समुद्राखाली एक हजार मीटर्स खोल असायची.”

‘ली इन उन’ हे ही या खाणीत काम करत असत. ली इन उन म्हणतात “काही कामगारांनी या बेटापासून सुटका मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. हाशिमा बेटावरून मूळ जमीन नजरेस पडत असे. समुद्रापासून काही अंतरावरच जमीन होती. काही कामगारांनी हा त्रास सहन न होऊन पाण्यात उड्या मारल्या आणि पोहत जाऊन, लाकडी तराफ्यांना पकडून समुद्राचा किनारा गाठण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.”

या बेटावर राहत असणाऱ्या जपानी रहिवाश्यांसाठी नवीन आणि अनेक सुखसोयी असलेल्या इमारती होत्या. या उलट कोरियन कामगारांना राहण्यासाठी अतिशय छोट्या खोल्या देण्यात आल्या होत्या. पाचशे-आठशे कामगारांना या छोट्या खोल्यांमध्ये डांबण्यात आलं होतं.

१९६० साली सगळीकडे पेट्रोलियमचा वापर सुरू झाला. पेट्रोलियमच्या वापरामुळे कोळशाचा वापर हळूहळू कमी होऊन, शेवटी संपुष्टात आला. कोळशाचा वापरच बंद झाल्यामुळे इथल्या सगळ्या खाणींचं काम बंद पडलं. काम बंद पडल्यामुळे बेटावर राहत असलेली माणसं बेट सोडून इतरत्र राहायला गेली. काहीच वर्षांनी हे बेट पूर्णपणे निर्मनुष्य झालं. या ओसाड बेटावर आता फक्त काही इमारतींचे भग्नावशेष उरले आहेत.

या बेटावर आता या इमारतींसोबतच एक हॉस्पिटल, दोन शाळा, काही दुकानं, एक मंदिर, काही हॉटेल्स उरली आहेत. या सगळ्या इमारती निर्मनुष्य आहेत. जेव्हा जपानने हाशिमा बेटाला जागतिक वारसा स्थळ घोषित करण्याची मागणी युनेस्कोकडे केली तेव्हा कोरियाने या मागणीला विरोध केला. या बेटाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला तर यात जे कामगार बळी पडले त्यांचा आणि युनेस्कोचाही अपमान करण्यासारखं होईल असं मत कोरियाने व्यक्त केलं.

त्यानंतर २०१५ साली जेव्हा युनेस्कोची सभा घेण्यात आली तेव्हा जपानने सगळ्या जगासमोर पहिल्यांदाच हाशिमा बेटावर कामगारांकडून जबरदस्तीने काम करवून घेतलं गेलंय हे कबूल केलं. इकोमोसने (ICOMOS) सुचवलं की हाशिमा बेटाला जे कोणी पर्यटक भेट देण्यासाठी येतील त्यांना या बेटाचा संपूर्ण आणि खराखुरा इतिहास सांगितला जावा. या साठी जपाननेच पावलं उचलावीत असं सुचवण्यात आलं. सूचनेप्रमाणे जपाननेही ही सगळी माहिती पर्यटकांपर्यंत पोहचवली जाईल हा शब्द दिला.

त्यानंतर या विषयावर जो अहवाल मागवण्यात आला त्यात जपानने चांगली कामगिरी केली नसल्याचं दिसून आलं. जपानमधल्या हाशिमा बेटावर जपानकडून काही सूचनाफलक लावण्यात आले असले तरी या बेटाच्या वाईट इतिहासाबद्दल आणि जबरदस्तीने करवून घेतलेल्या कामाबद्दल कोणीही माहिती देत नसल्याचं लक्षात आलं. या उलट तिथे पूर्वी वास्तव्यास असणाऱ्या जपानी रहिवाश्यांची मुलाखत घेतली जात होती, यात जपानी रहिवाशी ‘कोरियन माणसं सांगत आहेत तसा क्रू*र इतिहास हाशिमा बेटाला नाही’ असं सांगत असल्याचं दिसून आलं.

या प्रकरणानंतर कोरियाने युनेस्कोच्या वार्षिक सभेत पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला. जपानने दिलेला शब्द हा फक्त कोरियापुरता मर्यादित नसून, जपान संपूर्ण जगाला बांधील आहे असं कोरियाने म्हटलं. २००९ सालापासून हाशिमा बेट पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. या बेटावर फिरण्यासाठी सॊबत टुरिस्ट गाईड असणं अनिवार्य आहे. आता उजाड असलेल्या या बेटाला अमानुषतेचा क्रू*र इतिहास आहे, म्हणूनच या बेटाला “नरकाचं बेट” म्हणूनही ओळखलं जातं.

आजही कित्येक लोक ॲझटेकच्या शापित खजिन्याच्या शोधात आपलं आयुष्य पणाला लावतायत

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या दंतकथा, आख्यायिका असतात. प्रत्येक ठिकाणची दंतकथा वेगळी असते, पण अनेक दंतकथांमध्ये जर काही कॉमन असेल तर ते म्हणजे खजिना. अनेक ठिकाणी खजिन्यांबद्दल दंतकथा आणि आख्यायिका सांगितल्या जातात. जगातल्या जवळ जवळ सगळ्यांच भागांत अशा कथा सांगितल्या जातात. अमेरिकाही याला अपवाद नाही.

अमेरिकेच्या काही दंतकथांपैकी ॲझटेकच्या हरवलेल्या प्रचंड खजिन्याच्या दंतकथा सर्वांत जुन्या आहेत. या जुन्या कथांमध्ये अनेक अंधश्रध्दा असून, या कथेमुळे अनेक लोक संपत्तीच्या निष्फळ शोध घेण्यास इथे येतात. एका सम्राटाच्या रक्ताने आणि एका साम्राज्याच्या भग्नावशेषांनी कलंकित असलेला हा खजिना सोने, चांदी आणि रत्नांनी परिपूर्ण असून या खजिन्याने अ*त्याचार आणि हिं*सेला प्रेरणा दिली आहे. हा खजिना आज अमेरिकेत असेल असे काही लोकांचे मत आहे.

सुरुवात झाली ती स्पॅनिश वसाहतवादाच्या प्रयत्नाने

१५१९ साली हर्नन कोर्टीसच्या नेतृत्वाखाली स्पॅनिश सैनिकांची एक तुकडी मॅक्सिकोमध्ये आली. या सैन्यतुकडीत ५०८ सैनिक, १०० खलाशी आणि १४ लहान आकाराच्या तोफांचा समावेश होता. स्पॅनिशांचा ‘सुवर्ण’ इतिहास मानवी रक्ताने आणि प्रचंड विध्वंसाने लिहिला गेला आहे. ज्याठिकाणी ते जात असत त्या ठिकाणची संस्कृती नष्ट करून तिथल्या जनतेचे जबरदस्तीने धर्मांतरण करीत असत. अशाच प्रकारे त्यांनी ॲझटेक लोकांचे ख्रिश्चन धर्मांतरण करण्याचा मोठा प्रयत्न केला. यामुळेच कैक प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेली अमेरिकेची महान संस्कृती नष्ट झाली.

स्पॅनिश सेनापती कोर्टीस काहीच दिवसांत ‘टेनोचीटलॅन’च्या (Tenochtitlán) बाहेरील भागात आला. पौराणिक कथांनुसार, स्पॅनिश लोकांनी दाखवलेली शक्ती फक्त दैवी असू शकते आणि कोर्टीस हा एक देव असल्याचंही ॲझटेकच्या अनेक रहिवाशांना वाटलं. कारण ॲझटेक्सच्या देवांचेसुद्धा पांढरे केस असत आणि ते शरीरानेही जाड असत. पण यात कोणतेही तथ्य नसून निदान ॲझटेकच्या राजकीय आणि खानदानी लोकांना तरी कोर्टीस काही देव नाही याची खात्री होती असा अनेक इतिहासकारांचा विश्वास आहे. असे असूनही, त्याला क्वेत्झलकोटचे प्रतीकात्मक ‘पेनाचो’, म्हणजेच पक्ष्यांच्या पंखांपासून तयार केलेला मुकुट अर्पण करण्यात आले. त्याने इस्तपालपा येथून पुष्पाच्छादित रस्त्यांवरून शहरात प्रवेश केला. 



स्पॅनिश लोकांचे राजधानीत स्वागत करून त्यांना सुवर्ण अर्पण करण्यात आले. ॲझटेकच्या सम्राटाला मात्र हा स्वागत सोहळा चुकीचा वाटत होता. ॲझटेकचा सम्राट आलेल्या स्पॅनिश लोकांना दूर ठेवण्याच्या प्रयत्नात होता. कोर्टीसच्या मागोमागच स्पॅनिश सैन्य येत असल्याची माहिती त्याला मिळाली होती. तेव्हा शहराचे एका मजबूत सैन्यदलापासून बचाव करणे अवघड आहे हे त्याला समजलेच होते. त्याला त्याच्या शहराच्या विनाशाची भीती होती. कोर्टीसने लवकरच सम्राट मॉन्टेझुमाला अटक केली आणि स्पॅनिशांनी टेनोचिट्लान उ*द्धवस्त करायला सुरुवात केली.

टेनोचिट्लानमध्ये अफाट खजिना होता. मॉन्टेझुमाकडे सोन्याचे दोन गळपट्टे (कॉलर्स) आणि सोन्याचेच एक मोठे मगरीच्या डोक्यासारखे मुकुट होते. इतर शिल्पांच्या बरोबरीने सोन्याने बनलेल्या पक्षांच्या प्रतिकृती होत्या. हे सर्व साहित्य मौल्यवान रत्नांनी सजवले होते. तेथे १०० औंस इतके मौल्यवान धातू, सोने आणि चांदी दोन्हीपासून वेगवेगळ्या आकारात बनवलेली चाके होती. मिळालेली लूट आपापसांत वाटून घेण्यासाठी कोर्टीस आणि त्याच्या सैन्याला तीन दिवसांपेक्षा जास्त काळ गेला.

पुढच्या काही महिन्यांतच या राजधीनीतील लोकांना वसाहतवाद्यांच्या भयानक अ*त्याचारांना सामोरे जावे लागले. अझ्टेक साम्राज्याच्या खजिन्याबद्दल नवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे शेकडो लोक मरण पावले. त्यांच्या कथित “दैवत्वामुळे” स्पॅनिश लोक मुक्त हस्ते काहीही करू शकत होते. १५२० सालच्या मे महिन्यात स्पॅनिश विजेत्यांनी टॉक्सकॅटलच्या सणादरम्यान हजारो अझ्टेक खानदानी आणि यो*द्ध्यांची हत्या केली.

हा सण तेझकॅटलिपोकाच्या देवाच्या सन्मानार्थ साजरा केला जात असे. स्पॅनिश लोकांनी मुख्य मंदिरात नागरिकांना बंद करून प्रचंड क*त्तल घडवून आणली. हे ह*त्याकांड मानवी इतिहासातील सर्वांत क्रू*र ह*त्याकांडांपैकी एक आहे. या ह*त्याकांडामुळे विजयी लोकांच्या हुकूमशाही राजवटीविरुद्ध बंड पेटले.

ॲझटेक फाईटबॅक 

संपूर्ण शहराने वेढलेल्या स्पॅनिश लोकांनी मोंटेझुमाला ओलिस म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला. स्पॅनिश लोकांनी किंवा ॲझटेकच्या लोकांनी दगडफेक करून सम्राटाला ठार मारले. तेनोचिट्लानवरील त्यांचा ताबा गमावल्याची जाणीव झाल्यावर स्पॅनिश लोक पळून जाऊ लागले. १ जुलै १५२० रोजी, स्पॅनिश लोकांनी लपत छपत पळ काढला.

शहरातील लोकांना याची खबर लागली आणि पळून जाणाऱ्या स्पॅनिश लोकांवर त्यांनी ह*ल्ला केला. स्पॅनिश लोकांनी लुटलेले मोठ्या प्रमाणावरील धन लोकांनी त्यांना ‘टेक्सकोको तलावा’मध्ये टाकण्यास भाग पाडले. एखादा माणूस मृतदेहांवरून कालवे ओलांडून जाऊ शकला असता, एवढे स्पॅनिश लोकांचे मृतदेह पाण्यामध्ये तरंगत होते. याच रात्रीला इंग्रजीमध्ये ‘द सॅड नाईट’ म्हटले जाते.

टेनोचिट्लानमध्ये त्या रात्रीनंतर खजिना कुठे गायब झाला हे एक गूढच आहे. ज्याठिकाणी स्पॅनिश लोकांनी जाताना तो खजिना टाकला होता त्याच ठिकाणी तो आहे असा काहींचा अंदाज आहे. अजूनही टेक्सकोको तलावांमधील सोने आणि खजिना मिळवण्यासाठी खाजगी खजिना शिकाऱ्यांनी आणि काही स्थानिक अधिकाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. पण ते सगळे प्रयत्न विफल ठरले आहेत.

स्पॅनिशांचे आक्र*मण आणि खजिन्याचा शोध

‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ हे युरोपीय वसाहतवाद्यांच्या बाबतीत तंतोतंत खरं आहे. स्पॅनिश लोकांची एवढी क*त्तल होऊनही कोर्टीस १५२१ साली पुन्हा टेनोचिट्लानमध्ये आला आणि त्याने ते शहर ताब्यात घेऊन तेथील नवीन सम्राट कुआहटॉमॉकला कैद केले आणि याआधी त्यांनी लुटलेला खजिना नेमका कुठे आहे याची माहिती मिळवण्यासाठी त्याच्यावर अनन्वित अ*त्याचार केले. इतके अ*त्याचार सहन केल्यानंतर कुआहटॉमॉकने अत्यल्प प्रमाणातील खजिन्याची माहिती कोर्टीसला दिली. बाकीचा खजिना संपला आहे यावरच सम्राट कुआहटॉमॉक जोर देत होता.

एखाद्या व्यक्तीला खजिन्याबद्दल माहिती असेल अशा साध्या संशयावरूनही कोणावरही स्पॅनिशांनी अ*त्याचार केले. यामुळे त्यांना हा खजिना उत्तरेत कुठेतरी तलावात असल्याची माहिती मिळाली. कोर्टीसने सोने पुनर्प्राप्त करण्याच्या प्रयत्नात सुमारे ५ हजार तलाव शोधले, पण त्याला खजिना किंवा सोन्यासारखे काहीही सापडले नाही. अखेरीस स्पॅनिशांनी सिंचन वाहिन्यांमधून काही सोने पुनर्प्राप्त केले, असाही काहींचा दावा आहे. असा दावा करणाऱ्यांच्या मते, स्पॅनिशांनी खजिना युरोपात पाठवला पण तो खजिना समुद्रातच गहाळ झाला असावा.

अनेक शतकांनंतर मिळालेला सुगावा

यानंतर अनेक वर्षे या खजिन्याबद्दल कोणालाही सुगावा लागला नाही. पण मेक्सिको शहरात १९८१ साली एका बांधकाम कामगाराला सोन्याची वीट सापडली. या सोन्याच्या विटेचे वजन सुमारे साडेचार पौंड (दोन किलो) होते. ॲझटेक्सचा तो अफाट खजिना मेक्सिको भूमीच्या बाहेर गेला नाही या सिद्धांताचा हा एक सर्वोत्तम पुरावा असल्याचे मानले जाते. तर २०१९ साली पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी सापडलेली सोन्याची पट्टी मॉन्टेझुमाच्या खजिन्यातून असल्याचे निश्चित केले.

मेक्सिकोच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्थ्रोपोलॉजी अँड हिस्ट्री’ आणि ‘नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिको’च्या संशोधकांनी सोन्याच्या या विटेचे विश्लेषण केले. सोन्याची रचना टेनोचिट्लानच्या मुख्य मंदिरातून सापडलेल्या इतर अवशेषांशी जुळते हे त्यांनी प्रकर्षाने नमूद केले.

ॲझटेकचे स्थलांतर 

कोस्टा रिकामधील एका आख्यायिकेनुसार, ॲझटेकच्या मुख्य धर्मगुरूंना कोर्टीस आणि त्याचे लोक लवकरच परत येतील याची पूर्ण कल्पना होती. पण सध्या तरी ते बाहेर आहेत याचा फायदा घेत त्यांनी मोंटेझुमाचा मृतदेह बाहेर काढला आणि त्यांच्या राजधानीतून बाहेर जाण्यास सुरूवात केली. सुमारे २ हजार ॲझटेक्सच्या लोकसंख्येने त्यांच्या पूर्वजांच्या अझ्टलान निवासस्थानाच्या शोधात उत्तरेकडे कूच केले. या प्रवासात, त्यांनी ॲझटेक सभ्यतेचा सर्व प्रचंड खजिना आपल्यासोबत घेतला.

चीकोमॉझटॉक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सात लेण्यांचे डोंगर येईपर्यंत हे सर्व लोक उत्तर-पश्चिमेकडे चालत राहिले. चीकोमॉझटॉकच्या सात लेण्या सात अझ्टेक जमातींचे मूळ स्थान म्हणून ओळखल्या जातात. हे ठिकाण सुरक्षित आहे, असं गृहीत धरून त्यांनी गुलामांना मारले आणि तो खजिना तिथे पुरला गेला.

कोर्टीसनंतर १५२७ साली, फ्लोरिडामध्ये वसाहती आणि चौक्या स्थापन करण्यासाठी स्पेनमधूनच ‘नार्वेझ मोहीम’ निघाली. पण या मोहिमेचा शेवट अत्यंत दयनीय झाला. कारण सुरुवातीच्या ६०० लोकांपैकी फक्त चार माणसे वाचली होती. या चार माणसांमध्ये ‘एल्वार न्युझ काबेझा डी वाका’ आणि ‘एस्टेबान डोरान्तेस’ नावाचा गुलाम यांचा समावेश होता.

न्यू स्पेनला परत आल्यांनतर वाचलेल्या या लोकांनी फ्लोरिडामधील शहरे आणि श्रीमंतीचे किस्से सांगितले. यानंतर कोरोनॅडो न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात दिसणाऱ्या सोन्याच्या कल्पित सात शहरे शोधण्यासाठी निघाला. कोणतीही सोन्याची शहरे नाहीत आणि तेथे सोने नाही हे कॉरोनॅडोला तिथे पोहोचल्यावर समजले. परंतु या प्रदेशातील आदिवासी समुदाय अजूनही हजारो अनोळखी लोकांनी अफाट संपत्ती बाळगल्याची चर्चा करतात.

ही आख्यायिका मॅक्सिकोमधून खजिना बाहेर गेल्याचे दर्शवते असा काही लोकांचा विश्वास आहे. उत्तरेकडे जाणाऱ्या संपत्तीची कथा कदाचित खोटी आहे असे पुरातत्त्वशास्त्रज्ञ थॉमस गॅनच्या एका दाव्याने सूचित केले. त्यांच्या मते खजिना उत्तरेऐवजी दक्षिणेकडील ग्वाटेमालाकडे जाण्याची शक्यता जास्त आहे. पण, अनेकांनी पौराणिक कथांमध्ये सांगितल्याप्रमाणे खजिना दक्षिण-पश्चिम युनायटेड स्टेट्समध्ये स्थित असल्याचे मानले, ग्रँड कॅनियन, यूटा आणि एरिझोना या दंतकथांमध्ये सर्वात प्रमुख जागा आहेत.

ग्रँड कॅनियन आणि ॲझटेकचा खजिना

कालांतराने, १८६७ साली जेम्स व्हाईट ग्रँड कॅनियनचे तीव्र उतार पार करण्यात यशस्वी झाला. भूक आणि तहानेमुळे व्याकुळ झालेल्या व्हाईटने घनदाट जंगलातून प्रवास सुरु केला. रियोव्हिलच्या मॉर्मन शेती वस्तीत आल्यानंतर, त्याने एका कसोटीदरम्यान एका गुहेत आश्रय घेतला होता, हे त्याला लक्षात आले.

या गुहेत त्याने सोनेरी अवशेष, प्रचंड मूर्ती, चांदी आणि रत्ने दोन्ही भरपूर प्रमाणात पाहिल्या आहेत. त्याची कथा सार्वजनिक माध्यमांमध्ये आल्यानंतर, एका स्थानिक पत्रकाराने त्याला अझ्टेक कलाकृतींची चित्रे दाखवली आणि व्हाईटने अशाच प्रकारच्या वस्तू पाहिल्याचा त्याने दावा केला.

गोल्ड रश

कोर्टीस प्रमाणेच पायूटच्या मदतीशिवाय लोक खजिना असलेली गुहा शोधू लागले. यानंतर त्यांच्या या शोधाच्या संघर्षाची कथा त्यांनी ‘सॉल्ट लेक मायनिंग रिव्यू’मध्ये प्रकाशित केली आणि सुरु झालं सुप्रसिद्ध ‘गोल्ड रश’. पण हे सर्वच व्यर्थ होते. कारण या लोकांना ना खजिना सापडला, ना कोणती गुहा! त्यानंतर या सर्व भागाचा भूगोल ‘हूवर’ धरणामुळे बदलला आहे. तरी काही लोकांच्या मतानुसार, ही गुहा मिड लेकच्या खाली असेल.

जे लोक उटाच्या विश्रांतीच्या स्थानास अनुकूल आहेत ते १९२० मधील फ्रेडी क्रिस्टल नावाच्या एका खाणकामगाराच्या खजिना शोधण्याच्या कल्पित प्रयत्नांवर प्रकाश टाकतात. क्रिस्टल मेक्सिको सिटीमध्ये होता आणि एका दस्तऐवजाच्या आधारे त्याने जुन्या चर्चचा शोध घेतला.

हा दस्तऐवज म्हणजे एका स्पॅनिश भिक्षूने लिहिलेले हस्तलिखित होते. यामध्ये एक नकाशा होता. हा नकाशा एका ॲझटेकच्या नागरिकाने दिला होता, किंबहुना स्पॅनिश लोकांनी तो त्याच्याकडून छळ करून काढून घेतला होता. अमेरिकेच्या भूगोलाची काहीही कल्पना नसल्याने स्पॅनिश लोक खजिना मिळवण्यात अयशस्वी झाल्याचेही या दस्तऐवजात सांगण्यात आले होते.

१९४८ साली मॉरीन व्हिपलने ‘द सेटरडे इव्हिनिंग पोस्ट’मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणावर एक उल्लेखनीय लेख लिहिला, तेव्हा फ्रेडी क्रिस्टल आणि यूटा अझ्टेक गोल्ड रशची कथा प्रसिद्ध झाली. या कथेचे आधुनिक स्वरूप व्हिपलने आपल्या लेखात लिहिल्याप्रमाणेच आहे. यामध्ये बूबी ट्रॅप्स आणि अवशेषांसारख्या अलंकार आहेत.

मेक्सिकन-अमेरिकन यु*द्धादरम्यान, डॉन जोआक्विन नावाच्या एका उच्चवर्गीय माणसाने सिएरा इस्ट्रेला या ठिकाणी अपाचे जमातीच्या गुलामांना बरोबर घेऊन खजिन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याने या गुलामांनी रिझोनाच्या नैऋत्य दिशेस असलेल्या फिनिक्स याठिकाणी खोदकाम केले. डॉन जोआक्विन या सगळ्या प्रदेशातून बाहेर पडण्यापूर्वी, अमेरिकन सैन्याच्या हस्तक्षेपामुळे गुलामांमध्ये बंडखोरी झाली. यानंतर एक माणूस कथा सांगण्यासाठी जिवंत राहिला आणि त्याने १८८० च्या दशकात खजिना परत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अपयशी ठरला. कारण हे क्षेत्र अजूनही अपाचे जमातींच्या आदिवासींद्वारे नियंत्रित होते.

अजूनही त्याचा शोध सुरूच आहे..

या खजिन्यासाठी इतर अनेक ठिकाणे सुचवण्यात आली आहेत, ज्यामध्ये कासा ग्रांडे, आणि एरिझोना मधील ‘मोंटेझुमा किल्ल्याचा’ उल्लेख सॅन दिएगोमधील सुपरस्टीशन पर्वतरांगा, टेक्सासमधील डेल रिओ आणि अगदी इलिनॉय आणि केंटकी या स्थानांसह केला गेला आहे. पण अजूनही या खजिन्याचा काहीही पत्ता लागला नाही. कित्येक शतकांपूर्वी स्पॅनिश लोकांनी कालव्यांमध्ये टाकलेला हा खजिना नेमका अशा कोणत्या ठिकाणी आहे, ज्याचा शोध अजूनही कोणी लावू शकला नाही?!

जहाज अपघातातून वाचलेल्या दर्यावर्दींनी वसवलेला देश म्हणजे बर्मुडा..!

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


‘हे विश्व अनेक रहस्यांनी कसं भरलेलं आहे’ यावर तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या, वाचल्या किंवा कित्येकदा पाहिल्याही असतील. या विश्वामध्ये होणाऱ्या रहस्यमयी घटनांची कारणपरंपरा शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. कित्येक गोष्टींमागील कार्यकारण भाव आपल्याला सापडतोही. कित्येकदा यामुळेच अनेक शोधही लागतात.

कित्येकदा या रहस्यांमागील कारणांचा मागोवा घेत असताना मानव आपली संपूर्ण क्षमता वापरतो पण त्यानंतरही काही रहस्यांचा उलगडा होत नाही. उदाहरणार्थ, एरिया-५१, व्हॉयनीच हस्तलिखित आणि अशीच अनेक रहस्ये! अशा रहस्यांची यादी बर्मुडा ट्रँगलचे नाव घेतल्याशिवाय संपूच शकत नाही. बर्मुडा ट्रँगलबद्दल तुम्ही आजवर अनेक वदंता ऐकल्या असतील. पण आज त्याबद्दल आणि बर्मुडाच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

बर्मुडा ट्रँगल हा उत्तर अटलांटिक महासागरामध्ये, अमेरिका आणि ग्रेटर अँटिल्सच्या (क्युबा, हिस्पॅनियोला, जमैका आणि प्यूर्टो रिको) आग्नेय (दक्षिण-पूर्व) किनारपट्टीलगत आहे. या जागेचे अंदाजे क्षेत्रफळ ५ लाख ते १५ लाख चौरस मैल आहे. बर्मुडा ट्रँगल जगाच्या कोणत्याही अधिकृत नकाशावर दाखवला जात नाही. तर ‘यूएस बोर्ड ऑफ जिओग्राफिक नेम्स’ बर्मुडा ट्रँगलला अटलांटिक महासागराचा अधिकृत प्रदेश म्हणून मान्यता देत नाही. २०१३ साली ‘वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड’ने सागरी वाहतूक मार्गांचा संपूर्ण अभ्यास करून बर्मुडा ट्रँगल सागरी वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे निर्धारित केले आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या प्रदेशातून विचित्र घटनांच्या बातम्या येत असल्या तरी, १९६४ सालापर्यंत “बर्मुडा ट्रँगल” शब्दप्रयोग कोठेही दिसत नाही. या शब्दाचा वापर पहिल्यांदा ‘विन्सेन्ट गड्डीस’ यांच्या लेखात आला. त्यांनी हा शब्द प्रामुख्याने शेकडो विमाने आणि जहाजे नष्ट होत असलेल्या ‘त्रिकोणी’ प्रदेशासाठी वापरला. अशी जहाजे आणि विमाने नष्ट झाल्यानंतर आजतागायत त्यांचा कोठेही मागमूस लागला नाही.



या प्रदेशातील अशाच दोन घटनांमध्ये अमेरिकेच्या लष्करी वाहनांचा समावेश आहे. मार्च १९१८ मध्ये ‘कोलियर यूएसएस सायक्लॉप्स’ यु*द्धनौका बर्मुडा ट्रँगलच्या प्रदेशामध्ये गायब झाली. ‘कोलियर यूएसएस सायक्लॉप्स’ ही यु*द्धनौका ब्राझीलहून बाल्टीमोरला जात होती. पण ती बाल्टीमोरला पोहोचलीच नाही.

यु*द्धनौकेच्या गायब होण्याची कोणतीही ठळक कारणे दिसून आली नाहीत शिवाय अपघात किंवा ह*ल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. या घटनेच्या सुमारे २७ वर्षांनंतर, बॉ*म्बर्स स्क्वॉड्रन किंवा ‘फ्लाईट १९-चार्ल्स कॅरोल टेलर’ बर्मुडा ट्रँगलवरच्या हवाई क्षेत्रात गायब झाले. या घटनेतही यूएसएस सायकलॉप्सच्या घटनेप्रमाणे, अपघात किंवा ह*ल्ल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. 

चार्ल्स बर्लिट्झच्या ‘द बर्मुडा ट्रँगल’ या ‘बेस्ट सेलर’ पुस्तकातून बर्मुडा ट्रँगलची आख्यायिका सर्वत्र प्रसिद्ध झाली. परंतु आजमितीस बर्मुडा ट्रँगलच्या क्षेत्रातून हवाई आणि समुद्री वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. तसेच बर्मुडा ट्रँगल जगातील सर्वात जास्त प्रवास होत असणाऱ्या सागरी शिपिंग लेनपैकी एक मानला जातो.

या ट्रँगलचे नाव ‘बर्मुडा’ हे पडले, याला कारण म्हणजे याच भागात असलेले ‘बर्मुडा’ नावाचे एक टुमदार पण सुंदर आणि अनेक वर्षे ‘अनएक्सप्लोर्ड’ राहिलेले बेट . एकूण अटलांटिक बेटांपैकी अत्यल्प युरोपियन लोकसंख्या असलेले हे एकमेव ‘अटलांटिक बेट’ आहे. पूर्वी याठिकाणी फक्त उथळ खडक, वारंवार येणारी चक्रीवादळे आणि भयानक आवाज करणारी पेट्रेल पक्षाची प्रजाती याशिवाय काहीही नव्हते. स्पॅनिश लोक त्याला ‘डेमोनोरियम इन्सुलम’ किंवा ‘राक्षसाचे बेट’ म्हणू लागले, इतके हे बेट निर्मनुष्य होते.

बर्मुडा बेटाचे हवेतून दिसणारे चित्र

बर्मुडाचा शोध पहिल्यांदा सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला लागला आणि १५११ साली ‘बर्मुडा‘ जगाच्या नकाशावर अवतरला. स्पॅनिश, पोर्तुगीज आणि ब्रिटिशांना माहिती असूनही यापैकी कोणत्याही क्रू*र वसाहतवाद्याला याठिकाणी दावा तर सांगायचा नव्हताच, पण अशा वसाहतवाद्यांना या बेटाला विश्रांतीचे ठिकाणही बनवायचे नव्हते. परंतु, कालांतराने इंग्लडने या बेटावर दावा केला आणि आजही ‘बर्मुडा‘ हे ‘ब्रिटिश ओव्हरसीज टेरिटरी’ आहे.

खडक आणि धोकादायक वादळे यांमुळे या बेटावर संसाधनांचा आभाव होता. शिवाय वादळं आणि किनाऱ्यावरील उथळ खडकांमुळे याठिकाणी येण्याची हिम्मत खलाशांमध्येही नव्हती. बर्मुडावर वसाहत झाली, तीसुद्धा जहाज अपघातातून वाचलेल्या लोकांची. त्यांनाही येथे राहणे अजिबात पसंत नव्हते आणि लवकरात लवकर त्यांना बाहेर पडायचे होते. 

१६०९ साली, ‘ब्रिटिश व्हर्जिनिया कंपनी’ने व्हर्जिनियामधील नव्या वसाहतींना आवश्यक संसाधनांचा पुरवठा करण्यासाठी एक नवीन जहाज सुरु करून त्याला ‘सी व्हेंचर’ असे नाव दिले. या जहाजाचे नेतृत्व ‘जॉर्ज सोमर्स’ने केले होते. कॅप्टन ‘फ्रान्सिस ड्रेक’ आणि ‘वॉल्टर रॅली’ याच्यासोबत आपण प्रवास केला होता असा जॉर्ज सोमर्सचा दावा होता.

सी व्हेंचरने नव्या जगाच्या शोधासाठी नऊ जहाजांच्या ताफ्याचे नेतृत्व केले. त्याने कंपनीच्या नफ्यासाठी कायमस्वरूपी वसाहती शोधण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रवासादरम्यान, या ताफ्याला वादळाचा जबरदस्त धक्का बसला. ताफ्याचा प्रवास जूनमध्ये सुरु झाला होता आणि हे ‘चक्रीवादळ’ असण्याची दाट शक्यता होती.

खराब हवामानामुळे समुद्रात ताफा विखुरला आणि ‘सी व्हेन्चर’चे प्रचंड नुकसान झाले. प्रमुख जहाजावरील क्रूने काही अंतरावर उथळ खडकांचे ढीग पाहिले. वादळामध्ये हरवून जाण्यापेक्षा किंवा जहाज बुडण्यापेक्षा त्यांनी त्या खडकांजवळील किनाऱ्यावर जाण्याचे ठरवले. यामुळे जहाजातील सर्व दीडशे जणांचे प्राण वाचू शकले. ज्या बेटावर हे लोक स्थिरावले, त्याचंच नाव, ‘बर्मुडा‘.

सर सोमर्स आणि त्याचे कर्मचारी बर्मुडावर नऊ महिने अडकले होते. या काळात त्यांनी ‘सी व्हेन्चर’ची मोहीम पूर्णतः बंद करण्याचे ठरवले आणि बर्मुडा बेटावरील झाडांचा वापर करून दोन नवीन बोटी बांधल्या. या बोटींचा वापर त्यांनी व्हर्जिनियामध्ये असलेल्या ताफ्यात पुन्हा सामील होण्यासाठी केला. चार जणांचा मृत्यू आणि ह*त्येच्या आरोपानंतर, हा क्रू जेम्सटाउन कॉलनीसाठी रवाना होण्यास तयार होता. पण जेव्हा ते व्हर्जिनियामधील जेम्सटाउनच्या किनाऱ्यावर उतरले तेव्हा ती वसाहतसुद्धा निराधार आणि उपाशी होती.

नवीन जगात बर्मुडा त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी किती उपयुक्त आहे हे पाहून, व्हर्जिनिया कंपनीने बर्मुडा बेटांचा युनायटेड किंगडममध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न केले. १६१२ सालापासून हे बेट अधिकृतपणे ‘ग्रेट ब्रिटन’चा एक भाग होता आणि सेंट जॉर्ज शहराचे बांधकाम सुरू करण्यासाठी इंग्लडने तीन लोकांच्या नेतृत्वाखाली एक नवीन गट पाठवला. १६१२ साली या शहराची स्थापना झाली तेव्हा ‘सेंट जॉर्ज’ आणि ‘बर्मुडा’ “नवीन जगातील सर्वांत जुने वास्तव्य असलेले ब्रिटिश शहर” बनले.

सेंट जॉर्ज शहर. काही ऐतिहासिक बांधकामे दिसून येतील.

आज एक श्रीमंत समुदाय बेटावर राहत असूनही, बर्मुडा अजूनही धोकादायक खडक, वादळ आणि चिमुकल्या पेट्रेलचे घर आहे. विसाव्या शतकात जगातील सर्वाधिक जीडीपी बर्मुडामध्ये होती. बर्मुडाचे सर्वात मोठे उद्योग ऑफशोर इन्शुरन्स, पुनर्विमा आणि पर्यटन हे आहेत. जुलै २०१८ पर्यंत, बर्मुडाची लोकसंख्या ७१ हजार १७६ होती. ब्रिटिश ओव्हरसीज टेरिटरीमध्ये ही सर्वाधिक लोकसंख्या होती.

संदर्भ: ज्ञानकोश – ब्रिटानिका 

भटकंती – गुप्त काळातील सोन्याचा साठा असलेल्या रहस्यमयी सोनभांडार गुहा

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारताचा ज्ञात इतिहास सुमारे ५ ते ६ हजार वर्षे जुना असून या इतिहासामध्ये साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान-तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान इत्यादींचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. ऐतिहासिक भारतात सर्वच बाबतीत भरभराटी होती. ज्ञान, संपत्ती, वास्तुकला या क्षेत्रांमध्ये तर जगभरात भारतीयांचा मोठा वाटा राहिला आहे. भरभराटीच्या याच काळात अनेक वास्तू, विद्यापीठे आणि तपश्चर्या करण्याच्या जागांची निर्मिती करण्यात आली. यांच्यामध्येच एक महत्वाचा प्रकार येतो, तो म्हणजे लेणी.

पर्यटक, इतिहासतज्ज्ञ, विविध विषयांचे अभ्यासक यांचा नेहमीच बोलण्याचा आणि साहित्यातून लिखाण करण्याचा आवडीचा विषय म्हणजे ‘लेण्या’. काही वेळा लेण्यांच्या गुप्त कथांमुळे, त्यांनी प्रवासी, संशोधक आणि इतिहासकारांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतातही अशा अनेक लेण्या आहेत. काही लेण्या तर अजूनही न सापडलेल्या आणि डोंगरांच्या पोटात कुठेतरी लपलेल्या आहेत. अशा अनेक रहस्यमयी लेण्यांपैकी एक म्हणजे बिहार राज्यातील राजगीर मधील ‘सोन भंडार’ लेणी. सोन भंडार लेणी ‘वैबर’ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दोन कृत्रिम गुहा आहेत. ही लेणी इसवी सन पूर्व तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील आहे.

प्रवेशद्वारावरील एका खडकावर गुप्त साम्राज्यातील भाषेत/अक्षरांमध्ये लिहिलेल्या शिलालेखानुसार, या लेण्या जैन मुनींनी बांधल्या होत्या. म्हणजेच या लेण्या सुमारे इसवी सन पूर्व चौथ्या शतकात बांधल्या गेल्या आहेत. शिवाय, येथे सापडलेल्या भगवान विष्णूच्या एका शिल्पाने जैन धर्माशी त्याचा संबंध निश्चित केला आहे.

प्रवेशद्वारावरील शिलालेखात, “मुनी वैरदेव, आचार्यांमधील रत्न आणि महान तेजाने दोन शुभ लेण्या बनविल्या गेल्या, ज्या संन्यासींना पात्र आहेत आणि ज्यात अर्हतांची प्रतिमा (म्हणजे तीर्थंकर) ठेवण्यात आली आहे.”असा उल्लेख येतो. तथापि ब्रिटीश राजवटीतील, कनिंघम या भारताच्या ब्रिटिश पुरातत्व सर्वेक्षणकर्त्याने या लेण्यांची कसून तपासणी केली आणि सविस्तर ऐतिहासिक संशोधनानंतर त्यांनी या लेण्या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत असे एका अहवालात नमूद केले.

मग या लेणीबद्दल इतके रहस्यमय आहे तरी काय? याचं उत्तर लेण्यांच्या नावातच आहे. सोन भंडार अर्थात, ‘सोन्याचा साठा!’ या लेणी म्हणजे सोन्याच्या मोठ्या खजिन्याचे गुप्त घर आहे असेही मानले जाते. लेण्यांच्या भिंतीमध्ये मोठ्या प्रमाणात सोने दडलेले असल्याचीही आख्यायिका आहे. गुहेच्या आत खजिन्याकडे घेऊन जाणारा एक रस्ता आहे, परंतु आजवर तो कोणालाही ते सापडला नाही.



तसेच, गुहेच्या एका भिंतीवर तुम्हाला दरवाजासारखी रचना दिसेल आणि त्याच्या पुढे काहीही न वाचता येणारा शिलालेख आहे. हा एक प्रकारचा ‘गुप्त शब्द’ आहे आणि ज्याला तो शब्द वाचता येईल, तो उताऱ्याचा दरवाजा उघडेल. परंतु आजपर्यंत, कोणीही या शिलालेखाचा उलगडा करू शकला नाही.

‘कथितपणे’ लपवलेला खजिना शोधण्याचे अनेक प्रयत्न केले गेले परंतु व्यर्थ. खरं तर, एकदा ब्रिटीश सरकारच्या अधिकाऱ्यांनी गुहेच्या भिंतींना स्फोटके लावून उडवण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. या स्फोटांमुळे लेण्याच्या काही रचनेचे मात्र नुकसान झाले. या सर्व घडामोडींमुळे या लेण्यांभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे.

या लेण्यांचे चेंबर्स अतिशय सुंदर रीतीने पॉलिश केलेले आहेत. हे चेम्बर्स या लेण्यांच्या सौंदर्यात आणि वेगळेपणात भर घालतात. लेण्यांमध्ये आणि आजूबाजूला अनेक शिलालेख आहेत. हे शिलालेख या ठिकाणी यात्रेकरूंनी सोडले असावेत असाही एक समज आहे. शिवाय, गुहेचे संपूर्ण बांधकाम मौर्यन रॉक कट स्ट्रक्चर्ससारखे आहे. तसेच भारतातील शेवटच्या काही उपलब्ध रॉक कट लेण्यांमध्ये, सोन भंडार हे एक आहे. तसेच बिहार राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी हे एक महत्वाचे ठिकाण आहे. या लेण्यांशी संबंधित रहस्य उलगडण्यासाठी जगभरातील प्रवासी त्याला भेट देतात.

समुद्री अंतर किंवा जहाजाचा वेग ‘नॉटिकल माईल’ किंवा ‘नॉट्स’मध्ये का मोजतात..?

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपण केलेल्या कामाचे महत्त्व फक्त त्या कामावर अवलंबून नसते तर आपण किती प्रमाणात काम केले याला अधिक महत्त्व असते. प्रत्येक कामाचे किंवा वस्तूचे मोजमाप केल्यानेच त्याचे महत्त्व आपल्याला प्रकर्षाने जाणवते. आपण दैनंदिन जीवनात अनेक कामे करतो, पण त्या कामांचं मोजमाप केल्याशिवाय कशालाही पूर्णत्व प्राप्त होत नाही. मग ते तुमच्या वैयक्तिक जीवनातील काम असो किंवा व्यावहारिक जीवनातील. मोजमाप हे सगळीकडेच महत्त्वाचे आहे.

जेव्हा आपण कार किंवा बाईक चालवतो, तेव्हा त्या वाहनाचा वेग मैल प्रति तास किंवा किलोमीटर प्रति तास या एककांमध्ये मोजला जातो. पण बोट किंवा जहाजाच्या बाबतीत मोजमाप बदलले जाते आणि जहाज अथवा बोटीचा वेग मोजण्यासाठी ‘नॉट’ हे एकक वापरतात. हेच एकक विमानाची गती मोजण्यासाठीही वापरली जाते. पण जहाजांच्या स्पीडचे एकक हे ‘नॉट’ आणि समुद्री अंतर नौटिकल माइल्समध्ये का मोजले जाते हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागेल.

गॅलिलियो आणि काही शास्त्रज्ञांनी पृथ्वी गोलाकार असल्याचं सांगितल्यानंतर युरोपातून जागतिक प्रवासाला आणि अनेक भौगोलिक शोधांना सुरुवात झाली. त्यावेळी कोलंबससारख्या जागतिक खलाशांनी जगभर प्रवास करून अनेक खंडं, बेटं आणि देशांची ओळख युरोपीय लोकांना करून दिली.

पण जहाजे किनाऱ्यापासून दूर आणि समुद्राच्या मध्यभागी असताना त्यांना दिशा, अंतिम गंतव्य आणि लागणारा एकूण वेळ इत्यादी गोष्टी ठरवण्यासाठी त्यावेळी उपलब्ध असलेल्या वस्तूंचा उपयोग करावा लागला. कारण साहजिकच त्या काळात जी.पी.एस. आणि ‘रेडिमेड’ नकाशांसारखी अत्याधुनिक साधने नव्हती. अशा वेळेस काही जहाजे समुद्रात हरवणे, जहाजांना गंभीर अपघात होणे असे प्रकार सातत्याने होऊ लागल्याने जहाजाच्या वेगासह इतर काही गोष्टी जाणून घेणे अत्यावश्यक ठरले!



वेग जाणून घेतल्याशिवाय जहाजे कोणत्याही अंदाजाविना किनाऱ्यापासून दूर जात असत आणि दिशाहीन होऊन समुद्रात हरवत असल्याने कित्येकदा ते जीवघेणेही ठरत होते. दिशादर्शनासाठी आणि अंतिम गंतव्यावर पोहोचण्याच्या निर्धारित वेळेसाठी एखादे जहाज नेमके किती वेगाने पुढे सरकत आहे हे जाणून घेणे अत्यावश्यक होते. त्यासाठी काही युरोपियन लोकांनी एक युक्ती शोधून काढली.

‘नॉट’ या इंग्रजी शब्दाचा शब्दशः अर्थ ‘गाठ’ असा आहे. या एककाचा दोरीशी काहीतरी संबंध असल्यासारखे वाटते, आणि ते खरेही आहे. ‘नॉट’ या शब्दाचा उपयोग सतराव्या शतकापासून ‘परिमाण’ म्हणून केला जात आहे. समुद्री मैलाच्या (नौटिकल माईल) लांबीवर ‘नॉट’ आधारित आहे. सतराव्या शतकातील खलाशी आणि नाविक ‘कॉमन लॉग’ किंवा ‘चिप लॉग’ नावाचे साधन वापरून जहाजाची गती ठरवत असत.

कॉमन लॉग किंवा चीप लॉग

‘कॉमन लॉग’ म्हणजे त्रिकोणी लाकडी फिरकी आणि रीळभोवती अडकवलेली दोरी. नॉटिकल मैलाच्या लांबीच्या आधारावर, या लांबलचक दोरीला सुमारे १४ मीटरच्या अंतराने गाठी बांधलेल्या असत. दोरीचे एक टोक आणि रीळ जहाजाला जोडून लाकडी पाचर पाण्यात टाकली जात असे. लाकडी पाचर पाण्यात स्थिर राहावी यासाठी त्या त्रिकोणी आकाराच्या लाकडी पाचरेला तीन कोपऱ्यांमधून दोरीच्या गाठी बांधलेल्या होत्या.

सुमारे २८ सेकंदांचा सॅण्ड क्लॉक

वेळ मोजण्यासाठी सॅण्ड क्लॉकचा उपयोग होत असत. सॅण्ड क्लॉकचा वापर करून, जहाजावरील क्रू-मेम्बर्स पाण्यात सोडलेल्या त्रिकोणी लाकडी तुकड्याशी बांधलेल्या दोरींवरील गाठींची संख्या २८ सेकंदांसाठी मोजत असत. जहाज किती वेगाने प्रवास करत आहे हे ठराविक वेळ निघून गेल्यानंतर मोजल्या गेलेल्या गाठींच्या संख्येवरुन समजत असत. ही प्रक्रिया प्रत्येकी अर्ध्या तासात एकदा होत असत. जहाजावर प्रत्येक अर्ध्या तासानंतर एक बेल होत असे. जहाजाचा एकूण वेग आणि दिशा ठरवण्यासाठी ट्रॅव्हर्स बोर्डचाही वापर होत असत.

ट्रॅव्हर्स बोर्ड

ट्रॅव्हर्स बोर्डवर एकूण आठ ओळी आणि दिशादर्शक असत. समजा २८ सेकंदासाठी केलेल्या एका मोजमापानंतर ५ नौटिकल माइल्स एवढा स्पीड कॅल्क्युलेट झाला तर ५ व्या ओळीत एक काडी लावली जात असे. त्याचवेळी जहाज ज्या दिशेस जात आहे त्या दिशादर्शक ठिकाणी एक काडी लावली जात असे.

प्रत्येकी चार तासाच्या निरीक्षणावरून जहाजाची सरासरी गती ठरवली जात. ‘ट्रॅव्हर्स बोर्ड’च्या साहाय्याने प्रत्येकी चार घड्याळी तासांना (अर्ध्या तासाच्या आठ बेल्सनंतर )किती नॉटस प्रति मैल प्रवास झाला याची नोंद ठेवली जात असे. एका विशिष्ट वेळेनंतर हा ‘ट्रॅव्हर्स बोर्ड’ जहाजाच्या कप्तानाकडे नेला जात. कप्तान या ट्रॅव्हर्स बोर्डची स्वतःकडे असलेल्या नकाशाशी तुलना करून अंतर, गंतव्यापर्यंत पोहोचण्याचा वेळ, वेग इत्यादींची काहीशी किचकट पण अचूक गणना करत असे.

एक समुद्री मैल (नौटिकल माईल) पृथ्वीच्या परिघावर आधारित आहे आणि एक नॉटिकल माईल एक मिनिट अक्षांशाइतके असते. प्रत्यक्ष जमिनीवरील मैल आणि समुद्री मैल नौटिकल मैल यांच्यात फारसा फरक नाही. साधारणतः १ नॉटिकल मैल = १.१५०८ मैल!

प्रवासाच्या संपूर्ण वेळेत खलाशांना जहाजाची अचूक गती वेळोवेळी कळेल अशी कोणतीही स्पीडोमीटरसारखी सोय नव्हती आणि ते किती वेगाने प्रवास करत होते याची सरासरी काढण्यासाठी त्यांना स्वतः दिवसभर गतीचे मोजमाप करावे लागत असे. यामुळे त्यांना जहाजाचे समुद्रातील स्थान आणि गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा वेळ या गोष्टी अधिक अचूकपणे ठरवता आल्या.

आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानात वेग मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांना अजूनही ‘लॉग’ म्हणतात. परंतु आधुनिक काळात मोजमापाच्या पद्धतीमध्ये मोठा बदल घडून आला आहे. अल्ट्रासोनिक सेन्सरचे डॉप्लर मोजमाप वापरून, जहाजाचा वेग कोणत्याही वेळी अचूकपणे मोजला जातो. पण यात ‘नॉट्स’ हे परिमाण मात्र आजही बदललेले नाही. याचा उपयोग आजही अंतर मोजण्यासाठी केला जातो. विमानांची गती पृथ्वीच्या परिघावर आधारित असल्याने त्यांची गती नॉट्समध्ये मोजली जाते तर त्यांचे अंतर नौटिकल माइल्समध्ये मोजले जाते.

पुढच्या वेळी कधीही ‘नॉट’ किंवा ‘नौटिकल माईल्स’ या संज्ञेचा वापर करत असाल किंवा ऐकाल तेव्हा हे एकक कित्येक शतकांपूर्वीच्या खलाशांनी आपल्या बुद्धिचातुर्याने शोधून काढले आहे हे विसरू नका.

भटकंती – छत्रपती संभाजीनगर शहरातला गरिबांचा ताजमहाल ‘बीबी का मकबरा’

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मित्रांनो, ताजमहाल माहीत नाही असा भारतीय शोधूनही सापडणार नाही. या जगामधील सात आश्चर्यांमध्ये गणली जाणारी, प्रेमाचं सर्वोच्च प्रतीक असलेली आग्रा शहरातली ही वास्तू तमाम भारतीयांच्या तसेच जगाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. भारत सफारीवर आलेले परदेशी पाहुणे इथं हमखास भेट देतातच.

आपल्याकडेसुद्धा कित्येक जणांचं आग्र्याला जाऊन ताजमहाल पहायचं स्वप्न असतं. त्याची ती भव्यता, ते उत्तुंग रुप डोळ्यांत साठवायचं असतं. तिथं बसून ताजमहालाचे व त्यासोबत आपलेही फोटो काढायचे असतात. काही लोक तर प्रत्यक्षात बघायला जमलं नाही म्हणून किंवा जरी बघून आले तरीसुद्धा ताजमहालाची छोटी तळहातावर मावणारी प्रतिकृती आपल्या घरी ठेवतात.

पण आपल्या महाराष्ट्रातही ताजमहालाची एक हुबेहूब प्रतिकृती उभारलेली आहे हे तुम्हांला माहीत आहे का? तीही काही शतकांपूर्वी. याचं उत्तर तसं बहुतेक जणांना माहिती असेलच. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातला ताजमहाल म्हणजेच छत्रपती संभाजीनगर शहरातील ‘बीबी का मकबरा’. आग्र्याचा ताजमहाल हे जसं प्रेमाचं प्रतीक आहे, तसं बीबी का मकबरा हे मातृप्रेमाचं प्रतीक आहे.

ताजमहाल हा शाहजहानने आपली प्रिय बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ आग्रा इथं बांधला. तर बीबी का मकबरा हा त्याचा नातू म्हणजेच औरंगजेबाचा मुलगा आझम शहा याने आपली आई दिलरास बानो बेगम (जिला राबिया उल दुरानी म्हणूनही ओळखलं जातं, ही इराणच्या सफवी राजवंशातील होती) हिच्या स्मरणार्थ ताजमहालावरूनच प्रेरित होऊन बांधला. ताजमहालामध्ये जशी शाहजहानच्या बेगम मुमताज महलची कबर आहे, तशी या मकबऱ्यामध्ये औरंगजेबाच्या बेगम राबियाची कबर आहे. याचं बांधकाम सुमारे इ. स. १६६० ते १६७९ पर्यंत चाललं होतं.



ताजमहाल बनवण्यासाठी त्याकाळी सुमारे ३.२० कोटी रु. खर्च आला होता, तर बीबी का मकबरासाठी औरंगजेबाने ७ लाख रुपये इतकी रक्कम मंजूर केली होती. त्यामुळेच याला ‘गरिबांचा ताजमहाल’ असंही म्हटलं जातं.

ताजमहाल हा पूर्णपणे संगमरवरी आहे, तर बीबी का मकबराचा केवळ वरचा घुमट संगमरवरी असून बाकीचा भाग हा लाल आणि काळ्या दगडांबरोबरच संगमरवर आणि पांढऱ्या मातीच्या मिश्रणापासून बनवलेला आहे. या मिश्रणाला स्टको प्लॅस्टर असं म्हणतात जो दिसायला हुबेहूब संगमरवरच वाटतो. या दोन्ही वास्तू मुघल तसेच पर्शियन वास्तुकलेच्या मिलापाची उत्कृष्ट उदाहरणं आहेत. मकबऱ्यासाठी संगमरवर जयपूर इथून मागवण्यात आलं होतं.

‘बीबी का मकबरा’च्या आत मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीभोवतीने आकर्षक अष्टकोनी रचना केली आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमरवराच्या जाळ्या बसवल्या आहेत. त्या कबरीवर छतांच्या खिडक्यांतून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्राचा प्रकाश पडेल, अशी रचना केली आहे. या कबरीपर्यंत उतरून जायला पायऱ्याही आहेत.

बीबी का मकबराच्या समोरील भागाची रचना ताजमहालाप्रमाणेच करण्यात आलेली आहे. इथेही दर्शनी भागात बाग, कारंजे लावण्यात आले आहेत. इथेही ताजमहालासारखाच पदपथ आहे, संरक्षक भिंती आहेत. इमारतीच्या तीन बाजूस खुले पॅव्हेलियन्स आहेत. या मकबऱ्याच्या पश्चिम बाजूला एक मशीद आहे, जी कदाचित नंतर उभारली गेली असावी.

सध्या सुरक्षेच्या कारणास्तव या मशिदीत नमाज पढायला परवानगी नाही. बीबी का मकबरा ही वास्तू औरंगजेबाच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट कलाकृती मानली जाते. त्याकाळी बीबी का मकबरा हा छत्रपती संभाजीनगर शहराच्या केंद्रस्थानी होता.

ताजमहाल व बीबी का मकबरा या दोन्ही वास्तू एकसारख्या दिसत असल्या, तरी त्यांच्यात एक फरक आहे. मकबऱ्याचं मुख्य प्रवेशद्वार ते मकबरा या दरम्यानच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला ६ फूट उंचीची जाळीदार भिंत आहे. ही अशी भिंत ताजमहालाला मात्र नाही. हा या दोन वास्तूंमधला अजून एक फरक.

उस्ताद अतउल्लाह हा इथला मुख्य वास्तुरचनाकार होता. अतउल्लाह हा उस्ताद अहमद लाहोरी याचा मुलगा होता, अहमद लाहोरीनेच ताजमहालाची वास्तुरचना केली होती. या मकबऱ्याचा एकूण आकार हा पूर्व-पश्चिम २७५ मीटर व उत्तर-दक्षिण ४५८ मीटर आहे. या मकबऱ्याचा घुमट हा ताजमहालाच्या घुमटापेक्षा आकाराने लहान आहे. अनेक तांत्रिक उणीवा अन् कमी प्रमाणात झालेला संगमरवराचा वापर या कारणांनी बीबी का मकबरा कधी ताजमहालाच्या बरोबरीचं स्थान मिळवू शकला नाही.

खरंतर ताजमहालापेक्षाही भव्यरित्या ‘बीबी का मकबरा’ची रचना आझम शहाला करायची होती, परंतु औरंगजेबाने त्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम त्यासाठी अपुरी ठरल्याने ते स्वप्न सत्यात उतरू शकलं नाही. अन्यथा आज कदाचित ताजमहालाऐवजी बीबी का मकबरा जागतिक आकर्षणाचं केंद्र बनला असता.

एका वृत्तपत्रातील बातमीनुसार इथं नमाजसाठी परवानगी मिळावी म्हणून अखेरचा मुघल बादशहा बहादूर शाह जफर याचा पणतू असल्याचा दावा करणाऱ्या शहजादा याकूब हबीबुद्दीन तूसी याने सरकारला विनंती केली आहे. त्याच्या मते, मकबऱ्याच्या परिसरातच ही मशीद स्थित आहे, परंतु तिथे नमाज पढायला मनाई असेल, तर हे संविधानाद्वारे दिल्या गेलेल्या अधिकारांच्या विरुद्ध आहे.

ताजमहालात जर कुणीही कधीही नमाज पढू शकत असेल, तर त्याचीच प्रतिकृती असलेल्या या बीबी का मकबरामध्येच नमाजला हरकत का घेतली जातेय? ही दोन्ही स्थळं एकाच धर्माशी संबंधित असताना दोघांसाठी वेगवेगळे नियम कशासाठी? या बाबतीत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अधीक्षकांकडे त्यांनी केलेल्या अर्जावर अशी माहिती मिळाली की, निदान तीन नमाज पढण्याची मुभा दिली जाऊ शकते.

हा बीबी का मकबरा आपण उकाड्याचे दिवस सोडले तर एऱ्हवी वर्षभरात कधीही पाहू शकतो. इथे उन्हाळा कडक असल्यामुळे हिवाळ्याच्या काळात पर्यटकांची जास्त गर्दी असते. पावसाळ्यात देखील तुम्ही छत्रपती  संभाजीनगरला- येऊन हा महाराष्ट्राचा ताजमहाल पाहू शकता.

प्रफुल कुलकर्णी

हिट*लरने जगातलं सगळ्यात मोठं सी व्ह्यू हॉटेल बांधलं होतं, जे तब्बल ७० वर्षांनी सुरु झालं

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एक विद्यार्थी म्हणून आपण इतिहासाचा फक्त अभ्यासच करू शकतो. त्या अभ्यासातून भूतकाळ जाणून घेणे आणि भूतकाळात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती वर्तमानात न होऊ देणे हा इतिहास अभ्यासाचा मुख्य हेतू असतो, किंबहुना तसाच हेतू असावा. आज अनेक तथाकथित इतिहासकार आपला राजकीय किंवा सामाजिक स्वार्थ साधण्यासाठी खोट्या इतिहासाचा प्रचार करतात. अशा इतिहासाला फक्त शब्दांचा कमकुवत आधार असतो, पण कागदोपत्री अथवा तत्सम मजबूत पुरावे  नसतात. पण ऐतिहासिक वास्तू इतिहासाच्या खऱ्या साक्षीदार असतात.

जर्मनी आणि युरोपातील क्रूरतेचा इतिहास म्हणजेच ‘ना*झी’ राजवटीचा इतिहास. या काळात जगामध्ये अनेक बदल झाले. याच ना*झी राजवटीची साक्ष देणाऱ्या अनेक इमारती आजही जर्मनीमध्ये उभ्या आहेत. बाल्टिक समुद्रातील एका बेटावर ‘कोलासस ऑफ प्रोरा’ नावाचे प्रशस्त संकुल आहे. या इमारतींना प्रोरा म्हणूनही ओळखले जाते. या संकुलाचे खरे नाव म्हणजे ‘ब्लॉक’. या इमारती जर्मनीच्या रोजेन बेटावरील बिनझ नगरपालिकेत असून ना*झी जर्मनीने हिट*लरच्या आदेशानुसार १९३६ आणि १९३९ दरम्यान ‘स्ट्रेंथ थ्रू जॉय’ किंवा ‘क्राफ्ट डर्च फ्रायड’ अर्थात ‘केडीएफ’ प्रकल्पाचा भाग म्हणून उभारल्या होत्या.

हे संकुल सुट्ट्यांचा काळ घालवण्यासाठी तयार करण्यात आले होते. जर्मन लोकांच्या विश्रांतीच्या वेळेला नियंत्रित करणे हे या प्रकल्पाचे ध्येय होते. वीस हजार लोकांनी एका वेळी सुट्टी घालवणे हे या प्रकल्पाचे ध्येय होते. प्रकल्पातील सर्व दहा हजार खोल्यांमधून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते, यामुळे या प्रकल्पाची किनाऱ्यालगतची लांबी सुमारे ५ किलोमीटर आहे.

या इमारतींना सुट्ट्यांचे ठिकाण म्हणून जरी उभारले गेले असले, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांचा कधीही सुट्ट्यांसाठी वापर झालाच नाही. ना*झी राजवटीच्या काळात या इमारतींचे बांधकाम अपूर्ण राहिले. दुसऱ्या महायु*द्धानंतर या इमारतींचा वापर लष्करासाठी करण्यात आला. सर्वप्रथम सोव्हिएत सैन्याने, त्यानंतर पूर्व जर्मन व्होल्स्कार्मीने आणि अंतिमतः जर्मन बुंडेसवेहरने या इमारतींचा वापर लष्करासाठी केला. आजमितीस येथे एक मोठे युवा वसतिगृह, एक हॉटेल आणि सुट्टीसाठी अपार्टमेंट्स आहेत.

वर नमूद केल्याप्रमाणे ऐतिहासिक घटनांचे खरे साक्षीदार म्हणजे ऐतिहासिक वास्तू. प्रोरा ना*झी राजवटीची असमर्थता सिद्ध करते. जेव्हा याच राजवटीने १९३९ साली दुसऱ्या महायु*द्धाची सुरुवात केली तेव्हा प्रोराचे बांधकाम बंद करण्यात आले. त्यानंतर प्रोरा कधीही पूर्ण झाले नाही. केडीएफचा एकही पर्यटक “वीस हजार लोकांसाठीच्या समुद्रकिनारी रिसॉर्ट”मध्ये सुट्टी घेताना दिसला नाही.



त्याउलट हे ब्लॉक्स लष्करीदृष्ट्या वापरण्यात आले. वर नमूद केलेल्या सर्व लष्कराचे बरॅक्स या इमारतींमध्ये होती. ऐतिहासिक बर्लिन वॉल पडून जर्मनीचे पुन्हा एकीकरण झाल्यानंतर हे बांधकाम अधिकृतपणे ‘ऐतिहासिक’ म्हणून सूचिबद्ध केले गेले. या संकुलामध्ये संग्रहालये, कलाकारांचे स्टुडियो सुरु करण्यात आले आहेत. पण या महाकाय, कदाचित जगातील सर्वांत लांब संरचनेचे मोठे भाग उद्ध्वस्त झाले.

एकेकाळी मोठ्या प्रमाणात लष्करी आणि ना*झी राजवटीखाली असलेले ‘प्रोरा’ आज टुरिस्ट स्पॉटच्या रूपात उदयास येत आहे. आज अनेक लहान मुलं बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वाळूत खेळताना दिसतात. अनेक जोडपी छप्पर असलेल्या विकर बीचच्या खुर्च्यांवर आराम करताना पाहायला मिळतील, अनेक कुटुंबे याच ठिकाणी पतंग उडवण्याची मजा घेत आहेत. नव्याने तयार केल्या गेलेल्या विशेष वॉच टॉवर्सवरून जीवरक्षक पोहणाऱ्या लोकांवर करडी नजर ठेवून असतात. २०१८ पासून प्रोराला अधिकृतपणे ‘रिसॉर्ट’चा दर्जा मिळाल्याने ‘टुरिस्ट रिसॉर्ट रेल्वे’ आता ओल्ड केडीएफ कॅम्पलाही थांबते.

प्रोराच्या ब्लॉक २ इमारतींचाही आता कायापालट झाला असून, दर्शनी भागावरील पांढरा रंग आपले ठळक अस्तित्व दाखवून देतो. या इमारतींमधील सर्वच खोल्यांना काचेच्या बाल्कनी असून याच विभागात ‘प्रोरा सॉलिटेअर’ नावाचे अपार्टमेंटल हॉटेल आणि स्पा आहे. मूळ प्रोरामध्ये सार्वजनिक स्नानगृहांसह जुळ्या १२.५ चौरस मीटरच्या खोल्या इतक्याच होत्या. पण आता सुट्टी घालवण्यासाठी येणारे पर्यटक २८ ते १२० चौरस मीटर्सच्या प्रशस्त आणि आलिशान हॉलीडे अपार्टमेंटमध्ये राहतात. यामध्ये प्रत्येक खोलीसाठी वेगळे बाथरूम आणि संपूर्णतः सुसज्ज किचनसुद्धा सामाविष्ट आहे.

नव्याने विकसित केलेल्या स्पा-क्षेत्रात सौना (वाफेच्या स्नानाचे ठिकाण) आणि इनडोअर स्विमिंग पुल आहेत. बाहेरील दोन प्रशस्त पूल लहान मुलांसाठी तयार केले आहेत. रिसेप्शन डेस्कच्या मागच्या भिंती झाडांनी झाकल्या गेल्या आहेत. एक प्रचंड स्क्रीन बाल्टिक समुद्राचे विहंगम दृश्य दाखवते. तसेच ब्लॉक II मध्ये, हेअरड्रेसिंग सलून, बुटीक, इटालियन रेस्टॉरंट, फिश सँडविच असलेले बिस्ट्रो, बर्गर रेस्टॉरंट, कॅफे आणि बेकरी आता उघडले आहेत. याठिकाणी सायकलही अत्यंत काळजीने चालवावी लागते एवढी वर्दळ आहे. ब्लॉक III मध्येही आता हॉटेल बांधले जाणार आहे.

ब्लॉक IIIच्या मागे केडीएफ कॉम्प्लेक्सचे ऐतिहासिक केंद्र आहे. याठिकाणी फेस्टिवल हॉल, कॅफे,स्विमिंग पूल , जिम्नॅस्टिक, कॉन्सर्ट हॉल आणि थिएटरची योजना होती. याठिकाणी प्रोरा डॉक्युमेंटेशन सेंटर २००४ पासून मॅचरलऑब (MATCHUrlab) हे कायमस्वरूपी प्रदर्शन पाहणे मजेदार ठरते.

येथील समुद्रकिनाऱ्यावरील रम्य नैसर्गिक आणि शांत वातावरण युरोपातील तसेच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. या ठिकाणी रेल्वेने अत्यंत सुलभतेने पोहोचता येते, तसेच बिनझमधील सुट्ट्यांसाठीच्या ठिकाणांपेक्षा तुलनेने हे ठिकाण कमी खर्चिक आहे. प्रोराच्या अनेक भागांवर सध्या बांधकामे सुरु आहेत.

तरी हॉटेल आणि स्पा यांबरोबरच सुपरमार्केट आणि डॉक्टरांची कार्यालये ऐतिहासिक केंद्रात नियोजित आहेत. याउलट, ब्लॉक IV चे मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये सुट्टीसाठी तसेच इतर अपार्टमेंटस, वृद्धांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. ब्लॉक V च्या समोर “जगातील सर्वात लांब युथ हॉस्टेल” २०११ साली उघडण्यात आले.

प्रोरामध्ये निसर्गसौंदर्याची काहीच कमी नाही. याठिकाणी वनस्पती आणि प्राण्यांमध्ये बरीच जैवविविधता आहे, अनेक वर्षे हे ठिकाण बंद असल्याने कितीतरी प्राणी येथे पाहायला मिळतात.  वटवाघळांच्या काही दुर्मिळ प्रजातींबरोबरच विविध प्राण्यांच्या अशा अनेक दुर्मिळ प्रजातींनी नव्या कोलोससमध्ये आपले बस्तान ठोकले आहे.

प्रोरा नॅचरल हेरिटेज सेंटरचे परस्परसंवादी प्रदर्शन कोलोससपासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. याठिकाणी पर्यटकांना प्रोरामधील जैवविविधतेवर माहिती दिली जाते. नॅचरल हेरिटेज सेंटर म्हणजे एक उंच, गोलाकार मानवनिर्मित इमारतसमान रचना असून, त्याठिकाणी ४० फूट उंच ट्रीटॉप टॉवर आहे. हा टॉवर व्हीलचेअर वापरणाऱ्या दिव्यांगांसाठीही उपलब्ध आहे.

हिट*लर आणि ना*झींचे ज्यू*द्वेष आणि आर्यन प्रेम सगळ्यांनाच ज्ञात आहे. म्हणजेच हा वीस हजार लोकांचा सागरी रिसॉर्टसुद्धा ‘आर्यन’ लोकांसाठीच होता. १९३९ पासूनच्या केडीएफच्या जाहिरातींमध्ये केडीएफ कॉम्प्लेक्सच्या रेखाचित्रासमोर एक गोरे जोडपे दाखवले गेले होते.

प्रोरा, त्याचा भूतकाळ, त्याची वास्तुकला आणि खाजगी गुंतवणूकदारांनी याचे केलेले नूतनीकरण नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. काही पर्यटकांना या नूतनीकरणामुळे हा संकुल जाचक वाटतो, तर काही पर्यटक इतके नैसर्गिक सौंदर्याने नटलेले स्थळ वाया गेले नाही याबद्दल समाधानी आहेत. हे विवादास्पद संकुल येथे येणाऱ्या प्रत्येकालाच विचार करण्यास भाग पाडते. याठिकाणी भेट देणारे सर्वच पर्यटक विचारांची देवाणघेवाण करतात.

भूतकाळ आणि वर्तमान दोघांचाही संगम ‘प्रोरा’मध्ये झाला आहे. हे एक प्रभावी स्मारक तर आहेच परंतु आता हे सुट्टीचेसुद्धा एक आकर्षक ठिकाण आहे. जर्मनीच्या सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर सुट्टी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ‘प्रोरा’ आज खुले आहे. कदाचित इतिहासकाळात ते ज्यासाठी तयार केलं गेलं ते उद्देश आज पूर्ण होत आहे. हे एक अद्वितीय मिश्रण आहे.

न्यूझीलँड तर सगळ्यांना माहिती आहे, पण ओल्ड झीलँड कुठे आहे..?

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दिस इज द वर्ल्ड ऑफ नेम्स अँड फॉर्म्स अर्थात, ‘हे जग नामारूपांचं आहे’ हे अनेकदा आपल्याला शाळेत अभ्यास करताना जाणवलं असेलच. कोणत्याही गोष्टीला माणूस त्याच्या सोयीसाठी किंवा अभ्यासासाठी एक नाव देतो. प्रत्येक नावामागे निश्चितच काहीतरी अर्थ असतो, कोणतंही नाव हे अर्थाविना किंवा त्यामागे काही प्रयोजन असल्याशिवाय देण्यात येत नाही. अगदी गावांच्या नावांमागेही अशीच काही कारणे असतात.

उदाहरणार्थ, पुण्याजवळील आळंदीचे पूर्वीचे नाव अलंकापुरी होते हे आपल्याला उपलब्ध साहित्यातून कळतं. एकनाथांच्या या प्रचलित ओळीतूनही हे स्पष्ट होतं:

सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ।। शिवपीठ हे जुनाट । ज्ञानाबाई तेथें मुगूटं ।।

कालांतराने या गावाचं नाव आळंदी पडलं. कारण तिथे भरभरून तत्त्वज्ञान देणारा ज्ञानदेव बसल्याने, तेथे गेल्यावर किंवा ज्ञानेश्वरांचं साहित्य वाचल्यावर जिज्ञासू माणूस तृप्त होऊन ‘आलं ददाती’ म्हणजेच ‘आता पुरे’ असं म्हणतो. म्हणून आलं ददाती इति आलंदी किंवा आळंदी असं त्या गावाचं नाव पडलं.



अशाच प्रकारे पुणे शहराचे नामकरण मुठा नदीच्या काठावर, कसबा पेठेत वसलेल्या ‘श्री पुण्येश्वर महादेवा’वरून करण्यात आले होते. दुर्दैवाने आज श्री पुण्येश्वर महादेवाचे फक्त नावच राहिले. प्रत्येक गावाच्या नावामागे काहीतरी इतिहास आहे. अर्थ नसलेली किंवा विनाकारण देऊन टाकलेली गावांची नावं आपल्याला क्वचितच आढळून येतात.

बहुधा आपण यापूर्वी कधीही या एका विचित्र प्रश्नाबद्दल विचार केला नसेल. जरी आपण असा विचार केला असला तरी हा प्रश्न मूर्खपणाचा आहे असा विचार करून त्याबद्दलचं उत्तर शोधण्याचं काम आपण कधीच केलं नसेल. तो प्रश्न म्हणजे, जर न्यूझीलंड असेल तर ओल्ड झीलंड कुठे आहे?

या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला सर्व ‘न्यू’ ठिकाणांबद्दल थोडे बोलावे लागेल. अशा ठिकाणांचे नाव बहुधा जुन्या ठिकाणांच्या नावांवरून आले आहे. एक नकाशा घ्या आणि तुम्हाला त्यापैकी बरेच काही सापडेल: न्यूयॉर्क, न्यू मेक्सिको, न्यू हॅम्पशायर, न्यू जर्सी, न्यू ऑर्लिन्स. युरोपियन शोधकांना त्यांच्या मूळ देशातून स्थानाचे नाव घेण्यास आवडत असे. त्याच मूळ देशातील स्थानाला ‘न्यू’ उपसर्ग जोडणे आणि त्या नावाप्रमाणे असलेल्या ठिकाणी ‘न्यू-‘ असे नाव देणे हे काम युरोपीय प्रवासी अनेक वर्षांपासून करत आले आहेत.

हे डच प्रवासी-संशोधकांमध्ये खूप लोकप्रिय होते आणि म्हणूनच नेदरलँड्सवर आधारित ठिकाणांची नावे शोधणे सामान्य आहे. उदाहरणार्थ, न्यू नेदरलँड (आता न्यूयॉर्क), न्यू ॲमस्टरडॅम (आता न्यूयॉर्क शहर), न्यू हार्लेम (आता फक्त हार्लेम). न्यूझीलंडही त्याला अपवाद नाही.

१६४२ साली डच नेव्हिगेटर हाबेल जॅन्झून तस्मान हा न्यूझीलंडमधील सर्वात मोठे बेट असलेल्या दक्षिण बेटावर पोहोचणारा पहिला प्रवासी संशोधक होता. म्हणून जेव्हा डच कार्टोग्राफर या जागेचे नाव ठरवणार होते, तेव्हा त्यांनी हे नाव डच सागरी प्रांताच्या झीलँड वरून ठेवले. याचे मूळ नाव ‘निउ झेलँट’ असे होते.

झीलँड हा नेदरलँडचा सर्वात पश्चिमी आणि अत्यंत कमी लोकसंख्येचा प्रांत आहे. हा प्रांत बेल्जियमच्या अँटवर्पच्या वायव्येस स्थित आहे. पृथ्वीवरील कोणत्याही दोन बिंदूंचे जास्तीत जास्त अंतर १२ हजार ४५० मैल इतके आहे. तर ओल्ड झीलंड अर्थात मूळ झीलँड आणि न्यूझीलँड मधील अंतर ११ हजार ६०० मैल इतके आहे. म्हणजेच जवळपास पृथ्वीवरील कोणत्याही दोन बिंदूंचे जास्तीत जास्त अंतराइतकेच!

नव्याने शोधलेल्या नावांचा हाच युरोपीय ‘ट्रेंड’ बहुधा भारतीयांनी पुढे सुरु ठेवला आणि न्यू दिल्ली, नवी मुंबई, अशी भारतातील शहरांची नावे होऊ लागली.

टुमॉरोलँड फेस्टिवल म्हणजे जगभरातल्या संगीतप्रेमींची जत्राच असते..!

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


‘Music gives a soul to the universe, wings to the mind, flight to the imagination, and life to everything,’ या एका ओळीत ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोनं संगीताचं (म्युझिक) महत्त्व विशद केले आहे. म्युझिकमध्ये प्रचंड ताकद आहे, असं म्हटलं जातं. एका व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या भावना स्वत:मध्ये सामावून घेण्याची क्षमता त्यात आहे. त्यामुळं काही लोकांच्या आयुष्यात म्युझिकला अनन्यसाधारण महत्त्व असतं. इतकं की, चुकून जरी कुठून म्युझिक कानांवर पडलं की, अशी लोकं झिंगल्यासारखी थिरकू लागतात.

अशा म्युझिकवेड्या लोकांना एकाचं ठिकाणी जगातील सर्वोत्तम डीजेच्या तालावर थिरकण्याची संधी मिळाली तर? तुम्हाला प्रश्न पडला असेल, प्रत्यक्षात असं शक्य आहे का? तर याचं उत्तर आहे हो! म्युझिकवेड्या लोकांचा विचार करून बेल्जियममध्ये दरवर्षी ‘टुमॉरोलँड’ नावाचा एक फेस्टिवल भरवला जातो. जगभरातील लाखो लोक याठिकाणी येऊन मनमुराद आनंद लुटतात.

हा टुमॉरोलँड फेस्टिवल म्हणजे नक्की काय आहे? त्याठिकाणी काय होतं? अशा तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ‘टुमॉरोलँड’ नावाचा हा बेल्जियन इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिवल प्रसिद्ध आहे. बेल्जियमच्या फ्लँडर्समधील बूम भागात २००५ पासून आयोजित केला जाणारा हा जगातील सर्वात मोठा आणि इलेक्ट्रॉनिक म्युझिक फेस्टिवल आहे.

याठिकाणी जगातील २०० पेक्षा जास्त देशांतील हजारो संगीत प्रेमी एकाच ठिकाणी एकत्र येतात. दरवर्षी जगभरातील सर्वोत्तम कलाकार, टेक्नोज् आणि स्टेज डिझाईन्स याठिकाणी अनुभवायला मिळतात. 

मनु आणि मिशेल बीयर्स या दोन भावांनी मिळून २००५ साली सुरू केलेला हा म्युझिक फेस्टिवल दरवर्षी सातत्यानं आणखी विस्तारत आहे. हा महोत्सव संपूर्ण जगभरातील संगीत प्रेमींना फक्त ‘Live Today, Love Tomorrow, Unite Forever’ असा उपदेशच देत नाही, तर तो प्रत्यक्ष जगण्याची संधी देखील देतो. हार्डवेल, विनी विसी, लॉस्ट स्टोरीज, ॲलन वॉकर, सॅन होलो, ऑलिव्हर हेल्डन्स सारख्या १००० पेक्षा जास्त जगप्रसिद्ध कलाकार याठिकाणी येऊन आपल्या तालावर लोकांना नाचवतात. इतका सर्वसमावेशक असलेला टुमॉरोलँड हा जगातील एकमेव म्युझिक फेस्टिव्हल आहे.



मनाला समाधान देणाऱ्या संगीताशिवाय, टुमॉरोलँडमध्ये जवळपास १५ नेत्रदीपक स्टेज डिझाईन्स आणि चित्तथरारक आतिषबाजी देखील पहायला मिळते. पहिल्या वर्षी ५०० ते १००० लोकं या फेस्टिवलच्या निमित्तानं एकत्र आले होते.

उत्पादनाच्या दृष्टीनं विचार केला तर २०१९ चा फेस्टिवल आतापर्यंत सर्वात यशस्वी मानला जातो. त्यावर्षी ४ लाख लोक या ठिकाणी आले होते. त्यांनी ३८ हेक्टरवर पसरलेल्या १ हजार पेक्षा जास्त कलाकारांच्या उपस्थितीचा आनंद लुटला. १५ हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी काम केलं होतं. याशिवाय आंतरराष्ट्रीय माध्यमांतील ५०० प्रतिनिधी देखील याठिकाणी आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ दोन आठवड्यांत २० लाख बिअर पाईंट्सची याठिकाणी विक्री झाली होती.

बेल्जियममधील टुमॉरोलँड फेस्टिव्हलची तिकिटं अल्पावधीतचं विकली जातात. लाखो लोकांच्या गर्दीत आपल्या हाती एक जरी टिकीट मिळालं तरी नशिबचं म्हणावं लागतं. खिशाचा विचार केला तर या फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्याकडं संयम आणि पैसे दोन्ही गोष्टी असणं आवश्यक आहे.

या उत्सवाचा भाग होण्यासाठी विविध प्रकारचे आणि दरांचे पासेस दिले जातात. मॅजिकल फ्रायडे पास, इनक्रेडिबल सॅटर्डे पाससारखे सिंगल डे पासेस देखील मिळतात. याशिवाय फुल मॅडनेस नावाचा एक विकेंड पास देखील आहे. त्यामुळं जर आठवड्याभराच्या कामाच्या ताणामुळं तुम्ही वैतागलेले असाल तर टुमॉरोलँड तुमचा शीण घालवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतं. भारतातून त्याठिकाणी जाण्यासाठी, राहण्यासाठी, खाण्या-पिण्यासाठी आणि पुन्हा परत येण्यासाठी एका व्यक्तीला एकूण दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. (तुम्ही कुठल्याप्रकारचा पास खरेदी करता यावर खर्चाचं गणित अवलंबून आहे.)

म्युझिकशिवाय याठिकाणी इतर अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या पाहिल्यानंतर स्वर्गीय अनुभव आल्याशिवाय राहत नाही. इथे येणारी जोडपी टुमॉरोलँडमधील लव्ह चॅपल नक्की भेट देतात. त्याठिकाणी अति रोमँटिक असं काही नाही मात्र, तरी देखील या चॅपलचं त्याठिकाणी असणं जोडप्यांना आनंद देऊन जातं. हा लव्ह चॅपल म्हणजे गुलाबी रंगात रंगवलेली एक छोटीशी रचना आहे. त्याच्या प्रवेशद्वारावर काही नन्स जोडप्यांच्या स्वागताला हजर असतात. आतमध्ये प्रेमाची थीम घेऊन विविध फोटो पॉईंटस् तयार केलेले असतात. त्याठिकाणी पाहिजे तितके फोटोज क्लिक करता येतात.

आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे टुमॉरोलँडमध्ये चलनी नोटा वापरता येत नाहीत. आतमध्ये फक्त नाणी स्वीकारली जातात. त्यासाठी प्रवेशद्वाराजवळचं नोटा देऊन नाण्यांनी भरलेले पाऊच घ्यावे लागतात. ५० युरोमध्ये ३५ प्राचीन दिसणाऱ्या नाण्यांचं एक पाऊच मिळतं. त्याच्यासोबत फेस्टिव्हल परिसराचा एक नकाशा देखील मिळतो. बटव्यासारख्या दिसणाऱ्या पाऊचमधील नाणी देऊन खाण्या-पिण्याच्या वस्तू खरेदी करताना एकदम जादूच्या देशात आल्यासारखं वाटतं.

कुठेही फिरण्यासाठी गेलं की तिथे खाणं-पिणं कसं असेल, याचा पहिला विचार केला जातो.

टुमॉरोलँडमध्ये जाताना जेवणाची अजिबात काळजी करण्याची गरज पडत नाही. कारण या संगीत महोत्सवात जगभरातील विविध खाद्यपदार्थांची मेजवानी असते. त्यामुळं तुम्हाला जगभरातील अनेक फ्लेवर्स एकाच ठिकाणी चाखण्याची सुवर्णसंधी मिळते.

याशिवाय फ्लँडर्स आणि बूम या दोन्ही ठिकाणी शेकडो रेस्टॉरन्टस् आणि फूड स्टॉल्स आहेत, ज्याठिकाणी आपण बेल्जियममधील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन जिभेचे चोचले पुरवू शकतो. सगळ्यात शेवटी पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘खरेदी’! टुमॉरोलँडच्या आतमध्ये खरेदी करण्यास वाव नाही. मात्र, आसपासच्या परिसरात खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्यांना खरेदी करण्याची आवड आहे ते नक्कीचं आपली हौस भागवून घेऊ शकतात.

एकूणच संगीताची आणि फिरण्याची आवड असणाऱ्या लोकांसाठी टुमॉरोलँड हा नक्कीच एक सर्वसमावेशक पर्याय आहे.

भटकंती – ताज नसलेला अहमदनगरचा फराह बख्क्ष महाल

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


लेखक- भूषण देशमुख (अहमदनगर)


मनाला अपार आनंद देणारी, शरीर आणि मनाचा शीण काही क्षणांत दूर करणारी देखणी वास्तू सोळाव्या शतकात निजामशाही राजवटीत अहमदनगरमध्ये बांधण्यात आली. आपल्याकडे येणार्‍या पाहुण्यांची शाही सरबराई करण्यासाठी निजामशाह त्यांना या निसर्गरम्य महालात घेऊन जात. उद्यानात फेरफटका मारून नौकानयनाचा आनंद घेतल्यानंतर पाहुण्यांसाठी नृत्यगायन आणि संगीत मैफली इथं रंगत. कुण्या कवीच्या कल्पनेतून निर्मिलेली ही वास्तू प्रत्यक्षात साकारली ती कविमनाच्या माणसानंच.. ती बघताना आपणही नकळत कवी होऊन जातो..

सीना नदीकाठच्या आमराईत गुलाबाच्या ताटव्यांनी वेढलेला चौरसाकृती तलाव, त्याच्या मध्यभागी अष्टकोनी दगडी चौथरा, त्यावर उभा गुलाबी रंगाचा, मोठ्या कमानी असलेला अष्टकोनी दुमजली महाल, फुलांचा सुगंध आणि जलाशयाचा गारवा घेऊन महालात शिरणार्‍या वार्‍याच्या मोहक झुळूका! कधीकाळी इथं देश-विदेशांतील शायरांचे मुशायरे रंगले असतील, सौंदर्याची उधळण करत नृत्यांगना थिरकल्या असतील, कव्वाली आणि मुजर्‍यांना दाद देताना महालाच्या भिंतींवरही रोमांच उभे राहिले असतील.

नगर-सोलापूर रस्त्यावरील वेड्या बाभऴींनी वेढलेल्या काटवनात असा काही अद्भुत महाल असू शकेल का, असा प्रश्न मला पडला होता. रणगाडा संग्रहालयाकडे जाणार्‍या रस्त्यानं थोडं पुढं जाऊन डावीकडे वळलं की, झाडीतून महालाचं दर्शन होतं. जवळ पोहोचलं, की त्याचं रूप डोळ्यांत भरू लागतं.



निजामशहा भुईकोट किल्ल्यात रहात असत. तिथंच त्यांचे राजप्रासाद आहेत. मात्र, ते अतिशय साधेसुधे आहेत. फेरफटका मारण्यासाठी, थोडा विसावा घेण्यासाठी आणि पाहुण्यांसाठी मात्र त्यांनी देखण्या वास्तू उभ्या केल्या. निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद निजाम-उल-मुल्क बहिरी याच्यापासून ही परंपरा सुरू झाली.

त्याने सीना नदीकाठी बाग तयार करून तिथं गार्डन पॅव्हेलियन तयार केलं. विविध प्रकारच्या फुला-फळांच्या झाडांनी ही बाग बहरलेली असे. बागेला पाणी देण्यासाठी तिथं बारवही बांधण्यात आली. ही जागा राजाला इतकी आवडली, की त्यानं आपल्या अखेरच्या प्रवासासाठी “बागरोजा”चीच निवड केली.

सध्या सावेडीत असलेला हश्त बिहिश्त बाग पहिल्या राजाच्या काळात सोळाव्या शतकाच्या प्रारंभी तयार करण्यात आला. त्याला तेव्हा “फैज बख्क्ष महाल” (लाभ देणारी वास्तू) असं म्हटलं जात असे. उद्यानातील अष्टकोनी तलावाच्या मध्यभागी असलेली ही हवाखानी आकारानं लहान, पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिच्या कमानींतून हवेची झुळूक आत शिरली, की पंख्यासारखी फिरत राहते.

मलिक अहमदाचा मुलगा बुर्‍हाण गादीवर आल्यानंतर त्यानं या बागेचा विस्तार केला. तलावाशेजारी प्रशस्त हमामखाना बांधला. हमामखाना म्हणजे शाही स्नानगृह. गार आणि गरम पाण्याची, तसंच शौचालयाची सुविधा तिथं आहे. हमामखाना आणि तलावासाठी वडगाव आणि शेंडीच्या तलावांतून खापरी नळानं पाणी आणण्यात आलं होतं. काही भागात तांब्यापासून बनवलेले पाइपही आहेत. हमामखान्यालगत भव्य प्रवेशद्वार आणि टेरेसवर जाऊन परिसराचं निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठवण्यासाठी जिना आहे. या बागेचं सौंदर्य इतकं अनोखं होतं, की आठवं नंदनवन म्हणजे “हश्त बिहिश्त बाग” म्हणून ती ओळखली जाऊ लागली.

हश्त बिहिश्त बागेतच अष्टकोनी महालापासून काही अंतरावर राजस्त्रियांसाठी भूमिगत हमामखाना बांधण्यात आला आहे. तळघरात हवा खेळती राहावी, यासाठी हमामखान्याच्या वरच्या बाजूला चौरसाकृती मनोरा (विंड टाॅवर किंवा विंड कॅचर) तयार करण्यात आला. त्याला “बादगीर” म्हणतात. पर्शियन वास्तुशैली असलेली ही वास्तू महाराष्ट्रात अन्यत्र अभावानंच पहायला मिळते.

याच बागेत राहण्यासाठी म्हणून “लक्कड महाल” बांधण्यात आला. लाकडाचा जास्त वापर करण्यात आल्यानं त्याला हे नाव पडलं असावं, पण मागील काही वर्षांत सगळं लाकूड लांबवलं गेलं. दगडांनाही पाय फुटत आहेत.

अहमदनगरचा चौथा सुलताना मूर्तजा (पहिला) जास्त काळ लक्कड महालातच रमायचा. सुलताना चांदबिबीच्या काळात अहमदनगरवर चाल करून आलेला मोगल बादशहा अकबराचा मुलगा मुरादचा तळही याच बागेत होता.

आपल्या वडिलांनी बांधलेल्या जलमहालापेक्षा अधिक भव्य आणि हवेशीर महाल उभारावा, अशी बुर्‍हाणची इच्छा होती. चंगेजखान आणि न्यामतखानाकडून त्यानं कामाला सुरूवात केली, पण निजामशाहीत वजीर म्हणून मोठं प्रस्थ निर्माण केलेल्या शहा ताहीरला या महालाचा त्रिकोणी आराखडा आवडला नाही. त्यानं तो रद्द करून नव्यानं इमारत बांधण्यास सांगितलं.

दरम्यानच्या काळात बुर्‍हाण, शहा ताहीर यांचं निधन झालं. नंतर गादीवर आलेल्या हुसेनशाहच्या काळात भुईकोट किल्ल्याचं पुनःनिर्माण आणि लढायांची धामधूम सुरू होती. त्यावर मोठा खर्च झाल्यानं फराह बख्क्षचं बांधकाम थांबलं असावं. मात्र, १५६५ साली तालिकोटच्या लढाईत मिळालेला विजय आणि विजयनगरच्या लुटीत मिळालेला मोठा खजिना यामुळे नंतर मुर्तजा (पहिला) निजामशहाच्या काळात काही इमारती उभारण्यात आल्या.

सध्या दिसते आहे ती फराह बख्क्ष महालाची वास्तू १५७६ ते १५८३ दरम्यान उभारण्यात आली असावी. न्यामतखान सिमनानीकडे हे काम सोपवण्यात आलं. तथापि, नंतर सलाबतखान (दुसरा) यानं ते मार्गी लावलं. शेवटच्या कालखंडात निजामशाही अस्थिर झाल्यानं या महालाचं काम थोडं अपूर्णच राहिलेलं दिसतं.

अहमदनगरचं हवामान उष्ण आणि कोरडं. ते अल्हाददायक बनवायचं असेल, तर भरपूर झाडं लावून उद्यानं तयार केली पाहिजेत, तलाव आणि कारंजी बनवली पाहिजेत, इमारती बांधताना त्यात हवा आणि प्रकाश खेळता राहिला पाहिजे, शिवाय बाहेरची उष्णता आत पाझरू नये, अशी स्थापत्त्य रचना करायला हवी, हे तेव्हाचे राजे आणि राज्य चालवणार्‍यांना चांगलं ठाऊक असावं. तेव्हा वीज किंवा पाणी उपसण्यासाठी पंप नव्हते. मोठी धरणं नव्हती. त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा आणि उपलब्ध तंत्रज्ञानाचा चपखल वापर करून जलमहाल बांधण्यात आले.

गर्भगिरीच्या डोंगरावर पडणार्‍या पावसाचं पाणी अडवून, एकत्र करून ते साठवण्यासाठी तलाव, बारवा तयार करण्यात आल्या. गुरूत्वाकर्षणाचं तत्व, जमिनीचा उतार आणि सायफन पद्धतींचा वापर केला गेला. जमिनीच्या उताराचा फार बारकाईने विचार केला गेला असावा. कारण वास्तूंची जागा निवडताना तिथपर्यंत पाणी कसं वाहून आणायचं, हेच मोठं आव्हान होतं.

फराह बख्क्ष महाल अगदी सीना नदीच्या काठी नसला, तरी त्याभोवती उद्यान होतं, तेव्हा ते नदीच्या किनार्‍यावरच असणार. हश्त बिहिश्त महालापासूनही नदी फार लांब नाही. तलावातील पाणी काढून देण्यासाठीही नदीचा उपयोग होत असावा.

फराहबख्क्ष महालासाठी अगदी शहरानजीक किंवा किल्ल्याजवळची जागा निवडण्यात आलेली नाही. कापूरवाडी किंवा भिंगार तलावातून आणलेल्या खापरी नळाबरोबर भंडारा नळ तयार करण्यात आला. हा नळ सध्याच्या जामखेड रस्त्यावरील हत्ती बारवेवरून आणलेला आहे. ही बारव आकारानं मोठी आणि उंचावर असून मोटेनं पाणी उपसून उतारानं कारंजासाठी पाणी आणणं शक्य झालं असावं. हा नळ पूर्व-दक्षिण दिशेकडून, तर कापूरवाडीचा नळ उत्तरेकडून आणण्यात आला.

सोलापूर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या सैन्याच्या ऑटो रेजिमेंट आणि अर्काईव्ज परिसरात हा ऍक्वाडक्ट पहायला मिळतो. महालाच्या मागील बाजूस खापरी नळ आणल्याची खूण दिसते. कोपर्‍यात पाणी कमी-जास्त सोडण्यासाठी व्हाॅल्वसारखी यंत्रणाही असावी.

विस्तीर्ण चौरसाकृती तलाव बांधून त्याच्या मध्यभागी सुमारे सात-आठ फूट उंचीच्या अष्टकोनी दगडी चौथर्‍यावर महाल बांधण्यात आला आहे. आज जिथं वेड्या बाभळी माजलेल्या दिसतात, तिथं मोठी आमराई होती, चिंच व कवठाची झाडं होती, असा उल्लेख काही ग्रंथांत आढळतो.

या आमराईत हापूसची झाडंही असावीत. कारण बुर्‍हाण व हुसेन निजामशाहच्या काळात पोर्तुगीजांचं अहमदनगरला येणं-जाणं वाढलं होतं. वनस्पतींचा अभ्यासक गार्सिओ डाओत्रा तर बुर्‍हाण निजामशाहचे फिजीशियन होता. दख्खनचा आंबा अकबर बादशहाला आवडायचा, म्हणून करंड्या भरून दिल्लीत पाठवल्या जात, अशी इतिहासात नोंद आहे.

महाल असलेल्या चौथर्‍यावर चारही दिशांना कारंजी आहेत, पण आमराईतही कारंजी आणि विहिरी होत्या. यातील एका कारंजाचे अवशेष कुंपणाच्या बाहेर उत्तर-पूर्व दिशेला पहायला मिळतात. उत्तर-पश्चिमेला असून ती नेहमीसारखी गोल नसून चौरसाकृती आहे. आता तिच्यात पाणी साठत नाही.

तलावाच्या काठी फेरफटका मारण्यासाठी गुलाब आणि अन्य सुवासिक फुलांच्या ताटव्यांनी वेढलेली प्रशस्त मार्गिका होती. तलावातील पाण्यात उतरण्यासाठी मार्गिकेलगत एक टप्पा आहे. महालात जायचं ते चालत नव्हे, तर होडीतून. (या तळ्यात राजहंसासारखे पक्षी आणि होडी असलेलं चित्र सुमारे सव्वादोनशे वर्षांपूर्वी नगरचे चित्रकार गंगाराम तांबट नवगिरे यांनी रेखाटलं आहे. सध्या हे चित्र अमेरिकेतील येल विद्यापीठात जपून ठेवण्यात आलं आहे. अमेरिकेतील अभ्यासक डाॅ. होली शेफर हे चित्रं पाहून अहमदनगर शोधत इथवर आली होती. आता तलाव कोरडा पडला असला, तरी चांगला पाऊस झाला की, थोडंफार पाणी साचतं. त्यात पडणारं महालाचं प्रतिबिंब डोळ्यांत साठवून ठेवावसं वाटतं.)

नौकाविहार करत, पक्ष्यांचं कूजन एकत चौथर्‍यापर्यंत यायचं. तिथं स्वागतासाठी थुईथुई नाचणारं कारंज सज्ज असायचं. या अष्टकोनी महालाच्या चारही बाजूला कारंजी आहेत. समोरचं आणि मागच्या बाजूच्या कारंजांचा आकार चौरसाकृती, तर कडेच्या दोन कारंजांचा आकार अष्टकोनी आहे. (आता केवळ खड्डे उरले आहेत. नाही म्हणायाला पाणी आणण्यासाठीची छिद्र तिथं दिसतात. पावसाळ्यात पाणी साचतं. )

महाल अष्टकोनी असला, तरी त्याच्या सगळ्या बाजू सारख्या नाहीत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशांच्या बाजू मोठ्या आणि एकसारख्या आहेत, तर उपदिशांच्या बाजूची रूंदी कमी आहे. महाल दोन मजली, पण सध्याच्या पाच मजली अपार्टमेंटसपेक्षाही उंच असावा.

कुठल्याही बाजूनं वारा वहात असेल, तरी तो आत येणारच, सूर्य कुठल्याही बाजूला असू द्या, त्याचा प्रकाश अंतर्भाग उजळवेल अशा कमानी आणि गवाक्ष या महालाला आहेत. सकाळी सूर्य उगवला की, किरणं महालातून आरपार जातात. त्यांनी तयार केलेली नक्षी बघण्यासारखी असते.

महालात प्रवेश केला, की काॅरिडोअरमध्येही छोटी कारंजी दिसतात. छताकडे नजर फिरवा. चुन्यामध्ये केलेली नक्षी अजूनही आपलं सौंदर्य टिकवून आहे. सूर्यकिरणं आणि शंकरपाळ्यांची ही नक्षी केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नाही, तर प्रकाश आणि ध्वनिपरिवर्तनासाठीही फार उपयुक्त ठरते. आता जरा खाली जमिनीकडे नजर टाका. तिथल्या दरजा भरण्यासाठी चक्क हिरव्या रंगाची काच वापरलेली आहे. टाॅर्चचा प्रकाश टाकला, की काच प्रकाशमान होते. काचेचा असा वापर अन्यत्र कुठे सहसा पहायला मिळत नाही.

आता काॅरिडोअरमधून आपण मध्यभागी असलेल्या रंगमहालात किंवा दिवाणखान्यात प्रवेश करूया. इथं रंगायच्या मैफली. कधी देखण्या नृत्यांगनांचा पदन्यास, तर कधी देश-विदेशांतील शायरांचा मुशायरा. मध्यभागी असलेल्या कारंजाभोवती एका बाजूला गाद्यागिरद्या टाकलेल्या असत. समोर कलाकार आपली अदा सादर करत असतील.

मध्यभागी असलेलं अष्टकोनी कारंजं कधीकाळी संगमरवरी पुष्करणीनं मढवलेलं असावं. त्यातील पाण्यात निरनिराळ्या सुवासाची अत्तरं मिसळली जात असतील. सगळ्या दारांवर मखमली आणि चिकाचे पडदे झुळझुळत असतील. भिंतींमध्ये केलेल्या टेराकोटा पद्धतीच्या कोनाड्यांत दिवे प्रज्ज्वलित केल्यावर तर महालाचा गुलाबी रंग सोन्यासारखा उजळत असेल. आज नुसती कल्पना केली, तरी फराहबख्क्षचं वैभव डोळ्यासमोर उभं राहतं..

या रंगमहालाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे त्याचं छत घुमटाकृती असूनही आवाज अजिबात घुमत नाही. प्रत्येक सूर, स्वर आणि शब्द स्पष्ट ऐकू येतो. शिवाय सगळीकडे आवाज एकसारखा पोहोचतो. एखाद्या कोपर्‍यात आवाज ऐकू येत नाही, असं होत नाही. खाली सुरू असलेल्या संगीत मैफलीचा आवाज वरच्या मजल्यावरील जनानखान्यात म्हणजे स्त्रियांसाठी असलेल्या महालातही अगदी छान पोहोचतो. एखादं गाणं गुणगूणून पहा, म्हणजे याची प्रचिती येईल..

असं सांगतात, या घुमटाच्या मध्यभागी बिलोरी लोलक लावलेलं सुंदर झुंबर होतं. रंगमहालाच्या चारही बाजूनं गवाक्ष आहेत. बारकाईनं पाहिलं, तर लक्षात येतं, त्यांचा आकार व कोन एकसारखा नाही. बाहेरची बाजू मोठी आणि आतली छोटी. शिवाय मध्ये एक स्टेप. हवेचं तापमान नियंत्रित करण्याबरोबर ध्वनिवर्धकाचं काम हे गवाक्ष करत असावेत. त्यामुळं महालात सुरू असलेलं गाणं बाहेरही छान ऐकू येतं.

या महालाच्या बांधकामात साग आणि शिसमच्या तुळयांचा सढळ वापर करण्यात आला आहे. चार शतकांनंतरही हे लाकूड खराब झालेलं नाही. भिंतींना असलेलं चुन्याचं प्लास्टर काही ठिकाणी सहा इंचापेक्षा जाड आहे. नगरचा चुना प्रसिद्ध. गुळ, विविध प्रकारच्या डाळी, तूस, लिद मिसळून तो चाळीस दिवस चांगला मळला जात असे. त्यामुळे सिमेंटपेक्षाही तो जास्त मजबूत बनत असत. प्लास्टर करताना त्यात खापरांचे तुकडे मिसळले जात. शिवाय गुळगुळीतपणा आणि चकाकी येण्यासाठी वरून कवड्या घासल्या जात. त्याला “कवडी प्लास्टर” म्हणत. प्लास्टर धरून ठेवण्यासाठी लाकडी तुळयांवर टोचे आणि खिळे मारलेले दिसतात.

हा महाल राजे आणि त्यांच्या पाहुण्यांना राहण्यासाठी किंवा निवासस्थान म्हणून बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे अन्यत्र असतात, तशी दालनं इथं नाहीत. हा महाल केवळ मौजमजा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठीच बांधण्यात आला. चारही बाजूने वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेले जिने ऑडीटेरियमसाठी योग्य असेच आहेत.

जिने असे आहेत की, त्यावरून ये-जा करणाऱ्यांचा व्यत्यय रंगमहालात सुरू असलेल्या मैफलीत येऊ नये. जिने प्रशस्त आहेत. आगंतुकांना रोखण्यासाठी जिना जिथे संपतो, तेथे वरच्या बाजूला चोरकप्पा तयार करण्यात आला आहे. भाला घेतलेला सैनिक त्यात बसलेला असणार. “हा मजला स्त्रियांसाठी आहे. तुम्ही बिनबुलाये मेहमान आहात,” असं लक्षात येताच तो पाठीमागून भाला टोचून परत जा, असे सांगत असेल. आता चारपैकी केवळ खालचे दोन व वरचा एकच जिना सुस्थितीत आहे.

या महालात त्या काळचे नावाजलेले कलाकार आपली कला सादर करत. त्यांची वाद्ये, पोषाख ठेवण्यासाठी, तसंच रंगभूषा आणि वेशभूषा करण्यासाठी जागा हवी. त्यासाठी एक ग्रीन रूमवजा छोटी खोली तळमजल्यावरील मागच्या कोपर्‍यात आणि वरच्या मजल्यावर आहे. आता तिथे दरवाजा नाही, पण दार लावण्यासाठी असलेली खोबणी वरच्या बाजूला दिसते. काहींच्या मते किल्ल्यातून येणारं भुयार तिथं असावं, पण ते कुणी पाहिलेलं नाही.

या महालाचं छतही नेहमीपेक्षा वेगळं आहे. हा घुमट बाहेरून लक्षातही येत नाही. विजापूरच्या गोल घुमटाएवढा नाही, पण बर्‍यापैकी मोठ्या आकाराचा हा घुमट आहे. त्याच्या चारही बाजूला दुहेरी छत आहे. छतामध्ये तीन-चार फुटांची पोकळी आहे. त्यात हवा खेळत राहते. सूर्यनारायण कितीही कोपला, तरी मधल्या पोकळीमुळं ती उष्णता खाली पाझरत नाही. छताच्या कडेचा काही भाग पडला असल्यानं काही प्रियकर-प्रेयसी या मधल्या जागेत जाऊन प्रेमाच्या आणाभाका घेतात. भिंतीवर त्यांनी काढलेली चित्रे त्यांच्या प्रेमाची साक्ष देतात. अलिकडे काही उत्साही मंडळी प्री-वेड फोटो सेशन करण्यासाठी इथं येत असतात.

फऱाहबख्क्ष महालाच्या छतावर उभं राहिलं की, नगर शहराचं विहंगम दश्य दिसतं. अगदी मांजरसुंभा, मिरावली पहाड, मेहेराबाद आणि सलाबतखान मकबरा सहज दिसतो. पूर्वी सलाबतखान मकबर्‍याचा उपयोग टेहाळणी आणि संदेशवहनासाठी केला जायचा. तिथे मशाली पेटवल्या, धूर केला, की थेट फराहबख्क्ष महालापर्यंत सांकेतिक पद्धतीनं तो संदेश पोहोचवला जात असणार.

डावीकडे रणगाडा संग्रहालयाची झाडी दिसते. त्याच्या मागच्या बाजूला नगरपालिकेच्या काळात बांधण्यात आलेलं बंद पडलेलं जलनिःसारण केंद्र आणि सोलापूर रस्त्याच्या टोकाला एमआयआरीसीच्या इमारतींचं छत दृष्टीस पडतं. खाली नजर टाकली की, तलावाच्या भव्यपण दाखवणार्‍या त्याच्या सीमा दिसतात.

पाण्याची आधीच कमतरता, मोठ्या मुश्किलीनं आणलेलं पाणी जमिनीत झिरपू नये, म्हणून तलाव वाॅटरप्रूफ करण्यात आला होता. त्याची चुनागच्ची उखडली असली, तरी अजून काही ठिकाणी पांढरे पॅचेस दिसतात. महालाच्या अवतीभोवती पूर्वी रणगाडे व चिलखती गाड्या चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जायचं. त्यांच्यासाठी तयार केलेला रॅम्प जवळच आहे. कुंपण करण्याआधी काही वेळा हे रणगाडे तलावातही येत असावेत. त्यामुळं तलावातील चुनागच्ची खराब झाली. नंतर झाडांच्या मुळांनी तलावाची वाट लावली.

या महालाची कमान किती उंच आहे, याची कल्पना छतावरून थोडं पुढं डोकवलं की येते. अक्षरशः डोळेच फिरतात. क्रेनसारखी फारशी साधनं नसताना इतक्या उंच कमानी कशा बांधल्या असतील, हे उमगत नाही. महाराष्ट्रात अन्यत्र इतक्या उंच कमानी अभावानंच असतील.

अनेक प्रकारचे पक्षी इथं पहायला मिळतात. पोपट, कबुतर, मैना, कोतवाल, शिंजीर, सुगरण, कोकिळ, सनबर्डबरोबरच कधी तरी कापशी घार भक्ष्य टिपताना दिसते. पिंजर्‍यात पोपट पाळणार्‍यांनी इथले स्वच्छंदी पोपट एकदा न्याहाळावेत. त्यातला एखादा लिंबाच्या झाडाच्या शेंड्यावर बसून फोटोसाठी तुम्हाला छान पोझही देईल..

अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार फराहबख्क्ष महाल आहे. हा महाल सुंदर असला, तरी तो अपशकुनी आहे, अशी निजामशहाची समजूत झाली होती. कारण बांधकाम झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कालव्यातून (ॲक्वा डक्ट) पाण्याचा इतका मोठा लोंढा आला, की महालात पाणी शिरलं. राजाला हे चिन्ह चांगलं वाटलं नाही. शिवाय ज्याच्या काळात महाल उभा राहिला, तो मुर्तजा दिवाना होऊन वेडाचार करू लागला होता.

या पर्शियन किंवा तिमूर शैलीतील महालाचा आराखडा ज्यानं तयार केला, तो शहा ताहीर मोठा कवी होता आणि प्रत्यक्ष बांधकाम ज्यानं करून घेतलं, तो सलाबतखान (दुसरा) हाही कवी होता. कवींचा आदरसत्कारही तो करत असे. किल्ल्याच्या बांधकामात त्याचाच मोठा सहभाग होता. नगर-पाथर्डी रस्त्यावरचं तिसगाव आणि पुण्याजवळचं तळेगाव यानंच वसवलं. भातोडीचा तलाव सलाबतखानानं तयार केला. शाह डोंगरावरचा दुर्बिण महाल यानंच उभारला, जिथं नंतर तो कायमचा विसावला.

या महालाचं उदघाटन मुशायर्‍यानं झालं होतं. मुक्का मलिक कुम्मी या प्रसिद्ध शायरानं यावेळी दीर्घ काव्य सादर केलं होतं. या महालाच्या सौंदर्याचं वर्णन त्यात होतं. उद्यानातील गुलाब आणि अन्य झाडांचीही माहिती त्यात होती. “सुरूचं झाड असं सरळसोट उभं आहे, की जणू सुलतानाच्या आदेशाची प्रतीक्षा करत असावं.. महाल इतका उंच की, जणू आकाशाला गवसणी घालत आहे”, असं एका कवीनं म्हटलं आहे.

या महालाच्या परिसरात असलेल्या पाण्याच्या खजिन्यावर एक शिलालेख होता. त्यात महाल कधी बांधण्यात आला, याचा उल्लेख आहे. हा शिलालेख आता चंगेजखान महाल म्हणजे जिल्हा न्यायालयाच्या जुन्या वास्तूच्या तळभागात असा लावण्यात आला आहे, की तो सहजासहजी कुणाला दिसू नये. “मुजदे अहमदनगर” पुस्तकात या शिलालेखातील मजकूर देण्यात आला आहे –

नामे ई अजखूबीने आबोहवा

शुद्ध फराबक्ष ई चुनी मशहूरबाद

बूद न्यामतखान च्युं साईएबिना

सइ हाये उ हुमा मशकूरबाद

खास्तं तरखिश अजपीरे खिर्द

गुपत यारब ता अबद मामूरबाद

“सौंदर्य आणि उत्तम हवा यावरून या जागेचं नाव फराबक्ष म्हणजे सुख देणारा असे होते. त्याच नावाने तो प्रसिद्ध असो. ज्याअर्थी न्यामतखान या इमारतीचा कारागीर झाला, त्याअर्थी त्याच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता असावी. मी एका वृद्ध व शहाण्या माणसात त्याची तारीख विचारली. तो म्हणाला, गुप्त यारब, ता. अबद मामूर बाद (हे परमेश्वरा यावत चंद्र दिवाकरौ) येथे वास्तव्य असो.”

या शिलालेखावरून महाल तयार झाल्याची तारीख हिजरी ९८४ म्हणजे इ. स. १५७६ येते. शहा ताहीर यांच्या म्हणून काही काव्यपंक्तीही “मुजदे अहमदनगर”मध्ये देण्यात आल्या आहेत.

दरबावे फराहबक्ष गुजरकुनशाहा

अरवावे निशतरा नजरकुनशाहा

न्यामतखान रा अजबहरे तारीखे बिना

आज बागे फराहबक्ष बदरकुनशाहा

या ओळींचा अर्थ असा – हे राजा, या फराबक्ष बागेमध्ये तू जा. तेथील सुखाची साधने जी आहेत, त्याकडे तू नजर टाक. हे राजा, ही इमारत तयार झाल्याची तारीख तुला पाहिजे असल्यास या फराबागेमधून न्यामतखानास हाकलून दे.

मुर्तजाची बहीण सुलताना चांदबिबी आपल्या सख्यांसमवेत फराह बख्क्ष महालात येत असावी. तिला काव्य, संगीताची आवड होती. वनविहार करतानाची तिची चित्रं प्रसिद्ध आहेत.

असं म्हणतात, की शहाजहान युवराज असताना वडील जहांगीर यांच्याविरोधात बंड करण्याच्या मनःस्थितीत दख्खनमध्ये आला होता. त्यावेळी त्यानं फराह बख्क्ष महाल पाहिला. त्याला तो इतका आवडला, की प्रिय पत्नी मुमताज बेगमच्या निधनानंतर तिच्या स्मरणार्थ वास्तू उभारायची ठरली, तेव्हा शहाजहानला आठवला तो अहमदनगरचा फराहबख्क्ष महाल.

ताजमहाल संगमरवात बांधला गेला. त्याच्यासारखे मिनार आणि भव्य घुमट फराहबख्क्ष महालाला नाही, पण ताज नसलेला हा महाल ताजमहाल आधी सुमारे पन्नास वर्षे बांधला गेला, ही गोष्ट महत्त्वाची आहे. अभ्यासकांनी, वास्तुविशारदांनी फराहबख्क्ष महाल आणि ताजमहालाच्या मोजमापांची तुलना केली, तेव्हा त्यांना त्यात बरंच साम्य आढळलं. दिल्ली, आग्र्यातील इतिहासकार मात्र याबाबत अनभिज्ञ असावेत.

मोगलांनी अहमदनगरच्या किल्ल्यावर आक्रमण केलं, तेव्हा अकबरपुत्र मुराद बरोबर आलेला सरदार खान खनान याचा तळ फराहबख्क्ष महालात होता. या महालाच्या सौंदर्याच वर्णन मुरादला समजलं, तेव्हा तो हश्त बिहिश्त बागेतला डेरा उठवून इथं येऊन राहिला. औरंगजेबानंही इथं भेट दिल्याचा उल्लेख आहे.

सन १७५० मध्ये जर्मन मिशनरी जोसेफ टिफेनथालर यांनी अहमदनगरला भेट दिली होती. या प्रवासाचं वर्णन त्यांनी लॅटिन भाषेत लिहून ठेवलं आहे. त्याचं फ्रेंच भाषांतर १९८६ साली बर्लिनमध्ये प्रसिद्ध झालं. “नगर शहरात सुंदर बागा आहेत. त्यात फराहबाग ही सगळ्यांत मोठी बाग आहे. ही बाग २४०० चौरस मीटर क्षेत्रात पसरली असून तिच्या मध्यभागी ६२४ मीटर परिघाचा सुंदर तलाव आहे. आजूबाजूच्या डोंगरांमधून भूमिगत कालव्यातून या तलावात पाणी येते,” असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.

पेशवाईत सदाशिवराव भाऊ उदगीरच्या मोहिमेवर असताना त्यांचा मुक्काम डिसेंबर १७५९ मध्ये फराहबख्क्ष महालात होता. या महालाच्या सौंदर्याचं वर्णन त्यांनी एका पत्रात केलं आहे. “फराहबाग बहुत उत्तम आहे. तेथे जवळ राहणे यासही स्थळ चांगले आहे,” असे लिहिलेल्या या पत्राची प्रत नगरच्या ऐतिहासिक वस्तु संग्रहालयात आहे. तलावाच्या मध्यभागी असलेल्या फराह बख्क्ष महालाच्या कल्पनेवरून नंतर पुण्यात सवाई माधवरावांच्या काळात “तळ्यातला गणपती”ची निर्मिती (सारसबाग) झाली असावी.

ब्रिटिशांच्या काळात प्रारंभीचे हौशी युरोपियन कलेक्टर काही दिवस या महालात रहात असावेत. महालाचे काही झरोके, गवाक्ष विटांनी बंद केल्याची जुनी छायाचित्रं पहायला मिळतात. या छायाचित्रांत महालाभोवतीच्या तलावात पाणी आणि चौथर्‍यावर उगवलेली मोठी झाडं स्पष्ट दिसतात.

ख्रिस्ती मिशनरी १८३१ साली अहमदनगरला आले, तेव्हा त्यांना शहरात राहण्यासाठी जागा मिळेना. मग त्यांचा मुक्कम फराह बख्क्ष महालात पडला. मिशनर्‍यांचं तथाकथित सेवाभावी कार्य पहिल्यांदा या वास्तूतच सुरू झालं. मिशनर्‍यांचा पहिला दवाखाना, पहिली शाळा आणि पहिलं रेशीम उद्योग केंद्र या महालातच होतं.

“महाराष्ट्रातील ख्रिस्ती मिशन्सचा इतिहास” या पुस्तकात बाळकृष्ण भोसले यांनी म्हटलं आहे – नोव्हेंबर १८३१ मध्ये मिस्टर अलन व मिस्टर रिड हे मिशनरी अहमदनगरला आले. डाॅ. ग्रॅहम या ब्रिटिश वैद्यकीय अधिकार्‍यानं त्यांचं स्वागत करून आपल्या बंगल्यात ठेवून घेतलं. ९ डिसेंबर १८३१ ला मुंबईहून मिसेस ग्रेव्हज, मिसेस रीड व मिस्टर हर्वे निघाले. तेव्हा रेल्वेची सोय नसल्यानं मजल-दरमजल करत २० डिसेंबरला ते अहमदनगरला पोहोचले.

ब्राह्मण समाजातून ख्रिस्ती झालेला बाबाजी रघुनाथ याला त्यांनी सहायक म्हणून घेतलं. अमेरिकन मिशनर्‍यांना मुस्लिम सुलतानाच्या ओसाड पडलेल्या महालात, फर्‍या बागेत जागा मिळाली. तेथील काही खोल्यांची डागडुजी करून त्यांनी आपला संसार थाटला व आपल्या कामालाही प्रारंभ केला. बाबाजीच्या मदतीने त्यांना एक आश्रम स्थापला. निराधार, दरिद्री, अपंग यांच्याकरिता एक आश्रयस्थान त्यांनी तयार केले.

काळाच्या ओघात या देखण्या वास्तूकडं सगळ्यांचंच दुर्लक्ष झालं. उद्यान नाहीसं होऊन तिथं वेड्या बाभळी उगवल्या. तलाव कोरडा पडला. तलावात, चौथर्‍यावर, भिंती आणि छतावर झाडंझुडपं उगवली. त्यांच्या मुळांनी महाल वेढला, भिंतींना तडे गेले, काही कमानी कोसळल्या. तलावाची चुनागच्ची उखडली.

त्यात पूर्वीसारखं पाणी साठेनासं झालं. महालात जे काही मूल्यवान होतं, ते सगळं लांबवण्यात आलं. अगदी भिंतीवरचा पाच-सहा इंच जाडीचा गिलावा फोडून आतल्या सागवानी तुळया चोरण्यात आल्या. महालात कोणाचा वावर नाही, असं पाहून चोर आणि दरोडेखोर तिथं मुक्काम करू लागले. गंजाडी आणि जुगारी अड्डा जमवू लागले. त्यामुळे एकटा-दुकटा पर्यटक किंवा इतिहासप्रेमी तिथं जायला घाबरू लागला.

ढासळणारी शेवटची कमान तग धरून राहावी, यासाठी पुरातत्व विभागानं विटांचं बांधकाम करून त्याला टेकू दिला, पण त्यामुळं महालाला कायमचं वैगुण्य आलं. महालापर्यंत रस्ता तयार करण्यासाठी तलावात दगड-मातीचा भराव टाकण्यात आला. त्यामुळं तलावाचंही सौंदर्य कमी झालं.

१९९० साली अहमदनगरची पंचशताब्दी साजरी झाली आणि या महालाच्या दुर्दैवाचे दशावतार थोडे कमी होऊ लागले. पुरातत्वकडून थोडीफार डागडुजी सुरू करण्यात आली. एकेवर्षी अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त रसिक ग्रूपचे जयंत येलूलकर आणि नगरपालिकेच्या वतीनं २८ मेच्या संध्याकाळी फराह बख्क्ष महालाच्या चौथर्‍यावर गाण्याची मैफल आयोजित करण्यात आली.

संध्याकाळी प्रकाशझोतानं महाल उजळला. कारंजी थुईथुई नाचू लागली. नगरकरांचं स्वागत करण्यासाठी मिलिटरी बँड सुरावट आळवू लागला. सगळं वातावरण सुगंधित, प्रफ्फुलित झालं होतं, उत्साहानं भारलं होतं. चारशे वर्षांपूर्वी महालाचं वैभव कसं असेल, याची झलक सगळ्यांना पहायला मिळाली.

असा काही जलमहाल नगर परिसरात आहे, हे अनेकांना पहिल्यांदाच उमगलं. प्रेक्षकांना बसण्यासाठी ओट्यावर खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी विमलेंद्र शरण यांच्या प्रमुख उपस्थितीत मैफल रंगत गेली. कर्नेलसिंग मांगट यांच्या गझलांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

हळूहळू नगर दर्शन सहली सुरू झाल्या. फराह बख्क्ष महाल हे या सहलींचं प्रमुख आकर्षण बनलं. आशियातलं पहिलं रणगाडा संग्रहालय (CAVALARY TANK MUSEUM) याच परिसरात झाल्यानं रस्ता डांबरी झाला. त्यामुळं पर्यटकांची वर्दळ वाढली. पुरातत्व विभागानं महालाभोवती कुंपण तयार करून गेट बसवलं. त्यामुळे थेट महालापर्यंत जाणारे रणगाडे आणि अन्य वाहनांना प्रतिबंध झाला. देखभाल, दुरूस्तीची काही कामं झाली.

“स्वागत अहमदनगर हेरिटेज वॉक”च्या काही आठवणी संस्मरणीय आहेत. हा नुसता महाल नसून ते सोळाव्या शतकातलं ऑडिटोरिअम आहे, कधी काळी इथं मुशायरे झाले आहेत, मैफली सजल्या आहेत. असा एखादा कार्यक्रम महालातील दिवाणखान्यात करावा आणि तोही वीज आणि साउंड सिस्टिमशिवाय असं खूप दिवसांपासून मनात होतं.

अनेक कलावंतांशी, वादकांशी आणि कवींशी बोलताना मी हा विषय काढायचो. एकदा प्रयोग करून पहावा, म्हणून प्रसिद्ध सुफी गायक श्री. पवन नाईक यांना घेऊन महालात गेलो. नाईक दाम्पत्य व मी असे तिघंच होतो. पवनजींनी तिथं बसून कुठलीही साथसंगत नसताना दोन-तीन अप्रतिम गाणी म्हटली. ती इतकी छान ऐकू आली, की मग ठरलं एक मैफल इथं करायचीच. अशातच एकदा पुण्याहून आलेल्या संगीत अभ्यासक सौ. मालकर यांनीही सुरेख गाणं सादर केलं.

दैनिक दिव्य मराठी आणि यशवंत सामाजिक प्रतिष्ठानमुळं मैफलीचा योग जुळून आला. श्री. पवन नाईक आणि सहकार्‍यांचं सुफी गायन, श्री. मधुकर चौधरी यांचं ब्रह्मवीणा वादन आणि श्री. चंद्रकांत पालवे, श्री. संजीव तनपुरे, श्री. सतीश डेरेकर, श्री. लियाकत अली सय्यद, श्री. किरण डहाळे, प्रा. एन. बी. मिसाळ, श्री. दिलीप शहापूरकर आदींचं कविता वाचन असा कार्यक्रम ठरला.

मधल्या कारंजाभोवती गाद्या, सतरंजा टाकून बैठक व्यवस्था करण्यात आली. जिल्हा परिषदेचे तेव्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शैलेश नवाल, यशवंत फाउंडेशनचे श्री. प्रशांत गडाख आदींच्या उपस्थितीत भल्या सकाळी रंगलेली ही मैफल चिरकाळ स्मरणात राहिली. अशाच काही मैफली नंतरच्या काळातही फराह बख्क्ष महालात रंगल्या. राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक श्री. पोपटराव धामणे व त्यांचे काही शिष्य, सुनील महाजन, डाॅ. शिरीष कुलकर्णी आदी मंडळी त्यात सहभागी झाली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी फराह बख्क्ष महालाला दिलेली भेट ही माझ्यासाठी मर्मबंधातील ठेव आहे. हा महाल पाहण्याचं खूप वर्षांपासून त्यांच्या मनात होतं. वयाची नव्वदी ओलांडल्यावरही बाबासाहेबांचा उत्साह तरूणांना लाजवणारा होता. सीए राजाभाऊ काळे यांच्या घरी ते उतरले होते.

भल्या सकाळीच ते बाबासाहेबांना घेऊन आले. महाल जणू शिवशाहिरांची वाटच पहात होता. बाबासाहेबांच्या वाणीतून तो काळ पुन्हा जिवंत झाला. त्या भेटीत बाबासाहेब म्हणाले, योगायोग बघा, “जाणता राजा” महानाट्याचे परदेशांत कार्यक्रम करण्यासाठी मी जो फोल्डींग सेट नव्यानं तयार करून घेतला आहे, तो अगदी या महालासारखा आहे.

आणखी एक गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली, “फार पूर्वी मी फुलवंती नावाचं नाटक लिहिलं होतं. या महालाचीच पार्श्वभूमी त्याला आहे. त्याविषयी मी कुणाला अजून सांगितलेलं नाही. आज पहिल्यांदा सांगतो आहे. आपण त्यांच वाचन निवडक मंडळींच्या उपस्थितीत इथंच करूया..”

प्रसन्न मुद्रेनं बाबासाहेब दोन्ही हात उंचावून संवाद साधत असत, असं ते दृश्य माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलं आहे..

देश-विदेशांतल्या पर्यटकांनी हा आगळावेगळा महाल पहावा, असं मला नेहमी वाटतं. पण पाहुण्यांना घेऊन गेलं की, लाजेनं मान खाली घालावी लागते. कारंजाच्या कोंडाळ्यात टाकलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या, तंबाखू खाऊन मारलेल्या पिचकार्‍या, भिंतीवर केलेले ओरखडे आणि नावं लिहून केलेलं विद्रुपीकरण पाहिलं, की फार खंत वाटते. ज्यांनी ही महाल बांधला, त्या राजांनं, अभियंत्यांनी कुठं आपलं नाव लिहून ठेवलं नाही..

फराह बख्क्ष महालाकडे जाणार्‍या रस्त्यावर काटवनात एका ब्रिटिश अधिकार्‍याचं थडगं आहे. या थडग्याची उंची तब्बल आठ फूट आहे. त्यामुळे तो मोठा अधिकारी असावा. त्याच्या वरच्या बाजूला शिलालेख आहे. मात्र, तो फुटला असल्यानं काही अक्षरं वाचता येत नाहीत. या लष्करी अधिकार्‍याचं नाव मेजर डब्ल्यू निक्सन असं असून तो १९ व्या रेजिमेंट एन. आय. मध्ये होता. त्याचा मृत्यू ७ नोव्हेंबर १८३१ रोजी झाला. मात्र, मृत्यू कुठल्या कारणाने झाला, हे नमूद केलेलं नाही. पूर्वी तिथं चिंचेचं झाड होतं. काळाच्या ओघात ते नामशेष झालं…

फराह बख्क्ष महाल केंद्रीय पुरातत्व विभागाकडे आहे. या वास्तूच्या माहितीचे फलक त्यांनी लावले आहेत. या महालाची श्री. विलास नवगिरे यांनी तयार केलेली प्रतिकृती “स्वागत अहमदनगर”च्या वतीनं नगरच्या किल्ल्यातील नेता कक्षात ठेवण्यात आली आहे.

या महालाभोवतीची जागा लष्कराची आहे. पुरातत्व विभाग आणि लष्कराच्या समन्वयातून परिसरातल्या काटवनाचं रूपांतर सुरेख अशा उद्यानात नक्की करता येईल. महालाचं जतन, संवर्धन करण्याबरोबर ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचं पर्यटन केंद्र करण्याच्या दृष्टीनं नगरमधील आर्किटेक्ट सूचित मुथा यांनी आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी होईपर्यंत निदान तलावाची डागडुजी करून संध्याकाळी प्रकाशझोतांनी महाल उजळवला गेला, पर्यटकांना बसण्यासाठी कडेला बाक टाकले, तरी खूप काही साध्य होऊ शकेल.


८८३१३३७७७५
bhushandeshmukh07@gmail.com

कोकणातल्या गणेशोत्सवाबद्दलचे हे इंटरेस्टिंग किस्से वाचाच..!

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


गणेशोत्सव सध्या सर्वत्र सुरू आहे. भारतात वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळे सण साजरे केले जातात. तिथलं वैशिष्ट्यच ते सण मानले जातात. बंगालमध्ये दुर्गापूजा, उत्तरप्रदेशात रामनवमी व कृष्णजन्माष्टमी, गुजरातमध्ये नवरात्र, दक्षिण भारतात पोंगल, ओणम तसा आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सव. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक व काही प्रमाणात आंध्र-तेलंगणा व बंगालमध्ये देखील हा गणेशोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातसुद्धा कोकणात पारंपरिक घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या सणाची खरी मजा अनुभवायची असेल, तर ती कोकणातच.

कोकणात बऱ्याच घरांमधले गणपती हे सहसा अनंत चतुर्दशीपर्यंत असतात. बऱ्याच ठिकाणी गौरी गणपती असतात, म्हणजे गौरी विसर्जनाच्या दिवशीच गणपतीचंही विसर्जन होतं. तर काही ठिकाणी प्रथेनुसार दीड, पाच, सात, नऊ दिवसही गणपती असतो. काहीजण तर चक्क एकवीस दिवसांचा गणेशोत्सवही करतात. एकूण काय, तर कोकणी माणूस आणि गणपती बाप्पा यांचं एक वेगळंच नातं आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असला, तरी कोकणी माणूस गणेशोत्सवाच्या काळात हमखास आपल्या गावी येतोच.

एकूणच कोकणात गणेशोत्सव हा सर्व प्रथापरंपरा पाळून अगदी जोरात साजरा होत असला, तरी इथं काही वेगळ्या अशा प्रथाही आहेत. ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना कोकणात फारशी रुजलेली दिसत नाही. त्याला कारण इथे पहिल्यापासूनच असलेला घरगुती गणेशोत्सवाचा प्रभाव.

मात्र प्रत्येक नियमाला अपवाद असतात, तसे या बाबतीतही आहेत. त्यातलं पाहिलं उदाहरण आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं सुप्रसिद्ध असं श्री क्षेत्र गणपतीपुळे. या क्षेत्राच्या पंचक्रोशीत कुठल्याही घरी गणेशोत्सवात गणपती बसवला जात नाही. त्या भागातले सर्व रहिवासी हे त्या मंदिरातील गणपतीचाच पाच दिवसांचा उत्सव साजरा करतात.



दुसरं उदाहरण आहे, तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं. हे खरोखरच हटके असं उदाहरण आहे. तळकोकण भागात प्रामुख्याने घरगुती गणपतीच असतात. इथे तुम्हांला क्वचित असं घर मिळेल, जिथे गणपती बसवला जात नाही. इथे एक गंमत आहे, एखाद्याने नवीन घर बांधलं, की त्या घरात जर गणपती बसवला जात नसेल तर गणपतीच्या आदल्या रात्री कुणीतरी चोरून घरच्यांच्या नकळत बाहेर दारात गणपतीची मूर्ती ठेवून जातात. सकाळी जेव्हा घरचे दार उघडतात, तेव्हा दारात गणपती दिसला की, आता तो आपणहून आलाय तर त्याला परत पाठवायचं नाही, म्हणून मग ती मूर्ती घरात आणून त्याची पूजाअर्चा, आरती वगैरे करतात. तेव्हापासून त्या घरात दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो.

अशाप्रकारे तळकोकणात घरगुती गणेशोत्सव वाढत गेला आहे आणि वाढत जातो आहे. पण तरीसुद्धा इथे एक गाव असं आहे की, ते या सगळ्याला पूर्णपणे अपवाद आहे. ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील कोईळ. संपूर्ण तळकोकणात घरगुती गणेशोत्सवाचं प्रस्थ असताना या गावाचं वेगळेपण उठून दिसतं. गणपती हेच या गावाचं ग्रामदैवत आहे. हा गणपती अत्यंत कडक अन जागृत असा मानला जातो.

गेली सुमारे ३०० वर्षं या गावात गणेशोत्सव काळात कुणीही घरी गणपती बसवलेला नाही, तर सर्वजण मिळून ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरातच सात दिवस गणेशोत्सव साजरा करतात. या गावची गोष्टच न्यारी आहे. या गावात कोणाच्याही घरी गणपतीचा कसलाही फोटो अथवा मूर्ती आढळत नाहीत. अगदी ग्रामदैवत असलेल्या गणपतीचाही नाही. त्या मंदिरात मूर्तीचा फोटो काढायला मनाई आहे.

इतकंच नव्हे, तर जेव्हा या गावात कुणाचं लग्न ठरतं, तेव्हा त्या लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेवरसुद्धा गणपती छापलेला नसतो. आसपासच्या गावांमध्ये लग्नपत्रिकेवरती गणपती छापलेला नसेल, तर ती पत्रिका कोईळ गावातूनच आलेली आहे, हे लोक सहजपणे ओळखतात. कोकणात दर गावात गणपतीची एक तरी चित्रशाळा असतेच, मात्र कोईळ गावात अशी एकही चित्रशाळा नाही. गणेशोत्सव काळात इतर गावचे लोक या गावाच्या हद्दीतून आपल्या घरी गणपती नेत नाहीत.

दशावतार ही तळकोकणातली प्रसिद्ध लोककला. प्रत्येक जत्रेत दशावतारी नाटक हे इथं असतंच. त्याची सुरुवातच होते ती गणेशवंदनाने. गणपतीचा मुखवटा घेऊन एकजण मंचावर येऊन बसतो आणि गणेशवंदन झाल्यानंतर निघून जातो. इथं कोईळ गावच्या जत्रेत दशावतारी नाटक सादर होतंच, मात्र तेदेखील गणपतीशिवायच. गणपतीचा मुखवटा हा नदीपलीकडे दुसऱ्या गावी ठेवला जातो व इकडे नाटक सादर केलं जातं.

तर असं हे आगळंवेगळं गाव. पण एवढंच नाहीय, तर याच जिल्ह्यात एक गाव असंही आहे की, तिथल्या गणपतीच्या मंदिरात देव वर्षातून फक्त साडेचार महिन्यांपुरताच असतो. कसा काय? चला जाणून घेऊया.

या गावाचं नाव थोडं मजेशीर आहे, उभादांडा. हे गाव आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात. या गावात असलेलं हे गणपती मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण इथं गणपतीची स्थापना भाद्रपदातल्या गणेशचतुर्थीला न होता दिवाळीतील लक्ष्मीपूजनादिवशी केली जाते. तर त्याचं विसर्जन होतं ते, होळीच्या आदल्या दिवशी. या दरम्यानचे साडेचार महिने हा गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या नवसाला पावतो. भक्त आपले नवस फेडायला या मंदिरात येतात. गणपती इथं या मंदिरात नसताना त्याचा फोटो त्याजागी ठेवलेला असतो.

हा गणपती एका गुराख्याने स्थापन केला, म्हणून आजही गुराख्याचा गणपती अशी त्याची ओळख आहे. साधारण अडीचशे वर्षांची जुनी परंपरा या मंदिराला आहे. इथली मूर्ती ही पूर्ण शाडू मातीची बनवलेली असते. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला एकही दरवाजा नाही. हे मंदिर कायम भक्तांना खुलं असतं.

माघ महिन्यात संकष्टीला या गणपतीचा उत्सव असतो. तसंच विसर्जनाच्या आदल्या दिवशी महाप्रसाद असतो, त्याचा भरपूर भाविक लाभ घेत असतात. होळीची बोंब या गणपतीच्या कानांवर पडता नये, म्हणून त्याचं विसर्जन हे त्याआधीच केलं जातं.

गणेशाला एकदंत म्हणतात त्याचं कारण छत्तीसगडच्या अरण्यात असलेल्या या गणेशमूर्तीत सापडतं

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


सगळीकडेच गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाववर निर्बंध असले तरी उत्साहात मात्र कोठेही कमीपणा दिसत नाही. पण तरी पूर्वीसारख्या गणेशोत्सवाचा ‘पुनःश्च हरी ओम’ होण्याच्या प्रतीक्षेत आपण सर्वच आहोत. गणेशोत्सवात महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या मंदिरांमध्येही उत्साहाचं वातावरण असतं. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातील अनेक गणेश मंदिरांमध्ये भाद्रपदी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

जगभरात बाप्पाची अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. यामध्ये इंडोनेशिया मधील प्राचीन मंदिरांबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. त्याशिवाय भारतातही काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून ते कोहिमापर्यंत गणपतीची शेकडो मंदिरे आहेत. परंतु एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी एका टेकडीवर असलेल्या एका छोट्या, गूढ मंदिराबद्दल क्वचितच काहींना माहिती असेल.

छत्तीसगड राज्यातील रायपूरपासून सुमारे ३५० किलोमीटर अंतरावर दांतेवाडा जिल्ह्यातील ढोलकल नावाच्या डोंगरावर असे मंदिर आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंचीवर स्थित असून तिथे पोहोचण्यासाठी अत्यंत अवघड प्रवास करावा लागतो.

२०१२ मध्ये एका संशोधक-पत्रकाराने हे मंदिर शोधून काढले. सन १९४३ मध्ये ब्रिटिश भूवैज्ञानिक क्रुकशॅन्कला या जागेबद्दल सर्वप्रथम समजले होते. बैलादीला या खाणीसाठी सर्वेक्षण करताना त्याला ही जागा सापडली होती. क्रुकशॅन्कने तयार केलेल्या दक्षिण बस्तारच्या भूवैज्ञानिक अहवालाचा अभ्यास करून संशोधक-पत्रकार राजीव रंजन प्रसाद यांनी ऐतिहासिक पुराव्यांच्या साहाय्याने ही मूर्ती प्रकाशात आणली. 

स्थानिक आख्यायिकेनुसार अनेक वर्षांपूर्वी ढोलकल टेकडीवर भगवान गणेश आणि परशुराम यांच्यात युद्ध झाले. या लढाईत परशुरामाने आपल्या परशुच्या साहाय्याने गणेशावर भीषण वार केला आणि त्या आघाताने गणेशाचा एक दात तुटला. यामुळेच या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या गावाला ‘फरसापाल’ हे नाव पडले. परशुला स्थानिक भाषेत फरसा म्हणतात, हा परशुचाच अपभ्रंश आहे. दोन मोठ्या देवतांमधील लढाई कोणी जिंकली हे अद्याप एक गूढ आहे.



परशुराम आणि गणेश यांच्यातील लढाईच्या स्मरणार्थ चिंदक नागवंशी राजाने ११व्या शतकात डोंगरमाथ्यावर गणपतीची दगडी मूर्ती स्थापन केली. नागवंशी राजाने स्थापना केली असल्याने या मूर्तीच्या गळ्यात आपल्याला नाग असल्याचे दिसून येईल. या मूर्तीची उंची साधारणतः अडीच ते तीन फूट आहे. ढोलाच्या आकाराची टेकडी असल्याने या टेकडीला ढोलकल असे नाव देण्यात आले आहे. ढोलकलमधील ‘कल’ म्हणजे डोंगरमाथा.

मूर्तीमध्ये बाप्पाला त्याच्या ठराविक ललितासनात सहजतेने बसलेल्या स्थितीत चित्रित केले आहे. गणेशाच्या एका हातात परशु आणि एका हातात तुटलेला दात आहे. स्थानिक रहिवासी वर्षभर गणेशमूर्तीची पूजा करतात आणि माघ महिन्यात माघी गणेशोत्सवादरम्यान, जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात याठिकाणी जत्रा भरते. मंदिर, गर्भगृह, सभामंडप, कळस अशी कोणतीही इमारत याठिकाणी नाही. जगामध्ये अशा प्रकारे स्थापन केलेली बहुधा ही एकमेव गणेशमूर्ती असावी.

पण दगडी गणेशमूर्तीची स्थापना इतक्या उंचीवर करणे म्हणजे मोठे दिव्यच! हे दिव्य कसे पार पडले याबद्दल कोणालाही माहिती नाही. स्थानिक आदिवासी या गणेशाची आपला रक्षक म्हणून पूजा करतात. आदिवासींच्या मते, ढोलकर टेकडीजवळच एका टेकडीवर सूर्यदेवाची मूर्ती स्थापित होती, पण सुमारे १५ वर्षांपूर्वी ती चोरीला गेली.

छत्तीसगडमधील माओवाद्यांनी या गणेशाच्या मूर्तीची चोरी केली होती. ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाने शोध घेतला. थोड्याच वेळात, अनेक तुकड्यांमध्ये विखुरलेली मूर्ती डोंगराच्या खाली सापडली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ८४ वर्षीय अरुण कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या ६२ तुकड्यांमध्ये विखुरलेल्या मूर्तीला जोडून जीर्णोद्धार केला आणि पुन्हा गणेशमूर्तीची ढोलकल टेकडीवर स्थापना करण्यात आली.

काहींच्या मते ही गणेशमूर्ती उंचीवरून पाडली गेली आणि माओवाद्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या घनदाट जंगलात त्याचे तुकडे झाले.

जवळच्याच लहानशा जगदलपूर शहरापासून फरसपाल गावात पोहोचण्यासाठी २ तास लागतात. फरसपाल हे गाव ढोलकर टेकडीवरील गणपतीपर्यंत पोहोचण्यासाठी बेस कॅम्प म्हणूनही वापरण्यात येते. १६ तासांत चढण पूर्ण होते. घनदाट जंगलातून प्रवास करण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घेता येईल. डोंगरमाथ्यावरून दिसणाऱ्या संपूर्ण जंगलाच्या विहंगम दृश्याने शरीराचा थकवा आपसूकच कमी होईल. मग, या अदभुद बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी चालू गणेशोत्सवापेक्षा चांगली वेळ आणखी कोणती असू शकेल!

जगावेगळा ‘मसाई’ समाज: जनावरांचं पितात रक्त, तर थुंकुन दिला जातो नवजात बाळांना आशिर्वाद

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आफ्रिकेच्या केनिया आणि टांझानियातील जंगलांमध्ये राहणारी मसाई ही भटकी जमात आपल्या विचित्र रुढी, परंपरांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. गेल्या ५ हजार वर्षांपासून ही जमात अस्तित्वात आहे. पशुपालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून या जमातीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. गौरक्षणासाठी जंगली प्राण्यांशी दोन हात करायलाही हा समुदाय घाबरत नाही.

या जमातीचे लोक खुप हिम्मतवान मानले जातात. केवळ एका भाल्याच्या साहाय्यानं ते जंगली प्राण्यांची सहज शिकार करतात. या प्राण्यांच्या तोंडचा घास पळवण्यातही ही लोक माहिर आहेत. या जमातीतील पुरुषांना लग्न करायचं असल्यास एका कठीण परीक्षेस सामोरे जावे लागते. जंगलात शस्त्रास्त्रांशिवाय एखाद्या जंगली प्राण्याची शिकार केली, तर आणि तरच या पुरुषाला मुलगी देण्यास वधूपक्ष तयार होतो. अशाप्रकारे लग्न जुळल्यानंतर वरपक्षाकडून वधूपक्षाला कमीतकमी ३० गायी आंदण म्हणून दिली जातात.

त्यांच्या या परंपरेमुळे जंगली प्राण्यांच्या शिकारीचं प्रमाण वाढल्यानं तेथील सरकारची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परंपरांपासून त्यांना परावृत्त करण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारची धडपड सुरु आहे.

घरातील सर्वात वृद्ध व्यक्ती कुटुंबासंबंधी सर्व महत्वाचे निर्णय घेतो. घरातील अविवाहितांना हे निर्णय मान्य करावे लागतात. लग्नानंतर मात्र त्यांचे निर्णय घ्यायला त्यांना स्वातंत्र्य दिलं जातं. लग्नानंतर दाम्पत्याला त्यांचं वेगळं घर थाटावं लागतं. त्यासाठी त्यांच्या कुटुंबांकडून पशुधन दिलं जातं.

मसाई जमातीची वेशभुषादेखील मोठी आकर्षक असते. पुरुष कमरेला लुंगीसारखं लाल किंवा भगव्या रंगाचं वस्त्र गुंडाळतात. त्यावर विविध रंगाच्या शालीसारखा प्रकार खांद्यावर घेतला जातो. हातात भाला, काठी आणि कमरेला धारदार सुरा बांधलेला असतो. तर स्त्रिया खांद्यावरुन पदर घेऊन वस्त्र गुंडाळतात. गळ्यात, हातात मण्यांचे मोठमोठे अलंकार त्या घालतात. मसाई जमातीतील अनेक पुरुष आणि स्त्रियांचे कान या अलंकारांच्या वजनानं फाटून लोंबकळताना दिसतात.



आपल्याला जर वाटेत कुणीतरी भेटलं तर आपण रामराम, नमस्कार करतो किंवा त्यांच्याशी शेक हँड करतो. मात्र, या जमातीतील लोक जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा चक्क थुंकतात. आपल्या आजूबाजूला जर कोणी थुंकलं तर आपल्याला किळस वाटते. मात्र, थुंकणं हा प्रकार देखील त्यांच्या परंपरेचा एक भाग आहे. या जमातीत लोक नवजात बाळांना आशिर्वाद थुंकुन देतात. एवढंच काय लग्नात वडील मुलीच्या माथ्यावर थुंकण्याची विचित्र प्रथा देखील या जमातीत आहे.

या जमातीतील लोक जनावरांचं रक्त पितात. गायीच्या मानेवर बाण मारुन हे रक्त एका बाटलीत जमा केलं जातं. गायीच्या जखमेवर झाडपाल्याचं औषध लावून तिला रानावनात सोडून दिलं जातं. काही वेळा तर गायीची सरसकट कत्तलही केली जाते. त्यानंतर सर्व लोक एकत्र येत हे रक्त पितात. जनावरांचं रक्त प्यायल्यानं रोगप्रतिकार शक्ती वाढते, असा या जमातीचा समज आहे. याशिवाय नशा उतरवण्यासाठी देखील जनावरांच्या रक्ताचं सेवन केलं जातं.

जंगल परिसरात हे लोक झोपड्या बांधून राहतात. गोलाकार मोठ्या कुंपणाच्या कडेने माती, शेण आणि गवताच्या साहाय्यानं झोपड्या उभारतात. या झोपड्यांवर घट्ट विणलेल्या गवताचं छप्पर असतं. या झोपड्यांशेजारी गायी, गुरांसाठी गोठे असतात. मसाई हाच या लोकांचा धर्म. आजच्या या आधुनिक युगात प्राचीन परंपराचं जोखड आपल्या खांद्यावरुन आजही उतरवायला ते तयार नाहीत.

मसाई स्त्रियांचं आयुष्य अत्यंत कष्टाचं असतं. बाळंतपणाच्या चक्रातच या स्त्रियांचं बहुतांश आयुष्य सरुन जातं. त्यामुळे या स्त्रिया तर कुपोषीत राहतातच शिवाय त्यांची अपत्यही कुपोषित जन्माला येतात. या समाजात बालमृत्यूचं प्रमाणही अधिक आहे. जितकी अधिक मुलं आणि पशु, तेवढंचं ते कुटुंब श्रीमंत मानलं जातं. या समाजात घटस्फोट होत नाहीत. त्यामुळे स्त्री पुन्हा लग्न करु शकत नाही. याउलट पुरुषांना अनेक लग्न करण्याची मुभा आहे.

या समाजात मुलींबाबत एक अघोरी प्रकार केला जातो. ११ ते १३ या वयातील मुलींचा खतना केला जातो. हे काम इतर स्त्रिया धारदार शस्त्रानं कुठलीही भुल न देता करतात. हे करताना जी मुलगी ओरडली तर तिला भित्री समजली जाते. यामुळे जंतुसंसर्ग आणि अतिरक्तस्त्राव होऊन कित्येक मुलींना जीव गमवावा लागतो. लग्नानंतर मुलगी तिच्या माहेरी कधीच परतत नाही. लग्नानंतर घरी परत आल्यास ती दगडाची बनते, अशी भाकडकथा या लोकांमध्ये आहे.

जंगलांमध्ये राहणारा हा समाज सरकारी नियम आणि न्यायव्यवस्था मानत नाही. त्यांचे स्वत:चे नियम आणि कायदे आहे, ज्याचं ते काटेकोरपणे पालन करतात.

टांझानियामध्ये मसाई, माकोन्डेय आणि मनाती या ३ मुख्य आदिवासी जमाती आहेत. ५० वर्षांपूर्वीपर्यंत या तीनही जमाती एकमेकांचे कट्टर शत्रु होते. एका जातीचा व्यक्ती दुसऱ्या जातीच्या प्रदेशात चुकुन जरी शिरला तरी त्याला जीवे मारलं जाई. त्या व्यक्तीचं मुंडकं विजयाचं प्रतिक समजून गावाच्या बाहेरच्या सर्वात उंच झाडाला टांगलं जाई.

अनेक धर्मांमध्ये अंत्यविधी अतिशय महत्वाची मानली जाते. मृतदेहावर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार न केल्यास आत्म्यास मुक्ती मिळत नाही, असा समज आहे. प्रत्येक जाती, धर्माच्या मान्यतेप्रमाणे अंत्यविधी केला जातो. मात्र, अंत्यविधीची ही पद्धतच या समाजात अस्तित्वात नाही. एखाद्या मसाईचा मृत्यू झाल्यास त्याला गाडलं किंवा जाळलं जात नाही. त्या व्यक्तीचा मृतदेह उघड्यावर सोडून दिला जातो. मृतदेह गाडल्यानं जमीन खराब होते, असा या लोकांचा समज आहे.

मसाई समाजातील या चित्रविचित्र प्रथांमुळे हा समाज आधुनिक जगापासून अजूनही कोसो दूर आहे. विकासाच्या नावावर झाडांच्या कत्तली होत असताना हजारो वर्षांपासून निसर्गासोबतचं घट्ट नातं हा समाज टिकवून आहे.

भारतातली ही जिप्सी जमात माणसाचा मृत्यू झाल्यावर आनंदोत्सव साजरा करते..!

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एखादी इमारत भक्कमपणे उभी रहावी या साठी त्या इमारतीचा पाया भक्कम केला जातो, आणि ती इमारत काही खांबांच्या आधारे उभी केली जाते, त्याचप्रमाणे जशी समाजाची इमारत स्त्री आणि पुरुष या दोन खांबांच्या आधारे उभी असते, तशीच विश्वाची ही व्यवस्था लय आणि स्थिती या दोन अवस्थांच्या आधारे  उभी असलेली आपल्याला दिसते. या मुळेच प्राचीन भारतीय ग्रन्थांत या दोन अवस्थांना दर्शवणाऱ्या ब्रम्हा आणि महेश या दोन देवतांना महत्वाचं स्थान देण्यात आलं आहे. शिवाय भारतीय तत्वज्ञान जन्म आणि मृत्यू या दोन घटनांना बाकीच्या जगापेक्षा थोड्या वेगळ्या अर्थाने बघते. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे मृत्यू म्हणजे जुनं शरीर सोडून नवीन शरीरात प्रवेश. कदाचित या मुळेच भारताच्या एका भागात “मानवाचा मृत्यू साजरा केला जातो”

प्राचीन काळापासून हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि बंगाल पासून ते कंदहारपर्यंत भारत एक असल्याचे पुरावे मिळतात. राजसत्ता, भाषा, वेशभूषा आणि संस्कृती जरी वेगवेगळ्या स्वरूपांत असल्या तरी त्या मागे काहीतरी एक सामान विचार असल्यासारखं वाटतं. या विस्तीर्ण भूभागावर शेकडो प्रकारचे लोक राहतात, भारतात प्रत्येक २०० किलोमीटरवर रूढी-परंपरा बदलत जातात असं म्हटलं तर अतिशयोक्त वाटायला नको. फक्त ही विविधता आपल्यासाठी गौरवास्पद असायला हवी. या विविधतेचा ‘फौल्टलाईन्स’ म्हणून बाहेरील शत्रूंनी किंवा आतील फितुरांनी गैरवापर करून घ्यायला नको.

भारतातील काही प्रमुख ऐतिहासिक राज्यांपैकी एक असलेलं राजस्थान. राजस्थान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते अवाढव्य राजवाडे, किल्ले, चितोडगड, दूरवर पसरलेलं वाळवंट आणि आणि स्वतंत्र भारताच्या गौरवशाली इतिहासाचा भाग बनलेलं पोखरण. भारताच्या सर्व राज्यांमध्ये अगणित प्रकारच्या आदिवासी जमाती आहेत. राजस्थान हे काही अपवाद नाही.

प्रत्येक आदिवासी संस्कृतीचं काहीतरी वैशिष्ट्य असतं. निसर्गाशी एकरूप झालेल्या या आदिवासी जमातींना बाह्य विश्वातील ज्ञान जरी कमी असलं, तरी आपल्या मुळांना ते धरून असतात. आफ्रिका आणि इतर देशांतील आदिवासीं जमातींपेक्षा भारतातील बहुतांश आदिवासी जमाती काही प्रमाणात वेगळ्या आहेत. मुख्य समाजापेक्षा विलग असूनही भारतातील काही आदिवासी जमातींनी ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध बंड पुकारलं होतं. त्यांच्या प्रत्येक कृत्यामागे आणि रूढीमागे काहीतरी बोध असतो, काहीतरी कार्यकारणभाव असतो, तो बोध किंवा कार्यकारणभाव ओळखण्यासाठी बघणाऱ्याची दृष्टी “साक्षेप” असायला हवी, अर्थात ज्या काही अत्यल्प प्रमाणात अनैतिक आणि अमानवीय रूढी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं समर्थन करण्याचा हेतू नाही. असो.

आपल्याला कदाचित विचित्र वाटेल पण, राजस्थानातील सातीया या भटक्या-आदिवासी जमातीत मानवाचा मृत्यू साजरा केला जातो! बहुतांशी अशिक्षित असलेल्या या जमातीची सुमारे २४ कुटुंबं संबंध राजस्थानात पसरलेली आहेत. हे लोक रस्त्याच्या कडेला तात्पुरत्या झोपड्या उभारून राहतात आणि रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या जनावरांची विल्हेवाट लावून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ही भटकी जमात त्यांना  लागलेल्या दारूच्या व्यसनामुळे कुप्रसिद्ध आहे.



पण या जमातींचं खास वैशिष्टय म्हणजे माणसाच्या मृत्यूनंतर आणि त्याच्या अंतिमसंस्काराच्या वेळी साजरा होणारा उत्सव. या वेळी सर्व लोक नवे कपडे परिधान करून अंतिम यात्रेत सहभागी होतात. अंतिम यात्रा वाजत-गाजत जवळच्या स्मशानभूमीत आणली जाते आणि तो मृतदेह पूर्णपणे जळेपर्यंत मेजवानीचा बेत आखला जातो. स्थानिक दारू मागवली जाते आणि मिठाई वाटली जाते. थोडक्यात स्मशानभूमीत स्मशानशांतते ऐवजी मृत्योत्सव साजरा केला जातो. कारण त्यांच्या मते मुत्यू म्हणजे शरीररुपी पिंजऱ्यातून आत्म्याची झालेली सुटका होय. 

या उलट मानवाचा जन्म हा या जमातींमध्ये एक दुःखद घटना मानली जाते. ज्या प्रमाणे मृत्यू ही शरीररुपी पिंजऱ्यातून सुटका आहे, त्या प्रमाणे जन्म ही शरीररूपी पिंजऱ्यात अडकण्याची घटना आहे. त्यांच्या मते मानवाचा जन्म म्हणजे देवाने पापी आत्म्यांना दिलेली शिक्षा होत. त्यामुळे ज्याप्रमाणे सामान्यतः बाळाच्या जन्मानंतर जगभरात जो उत्सव साजरा होतो, त्याच्या अगदी उलट या जमातीत नव्याने जन्मलेल्या बाळाला अनेकांचे शिव्या-शाप मिळतात, इतकंच काय तर त्याच्यासाठी घरात अन्नही शिजवलं जात नाही.

मुलींच्या जन्माला मात्र अगदी काळजीपूर्वक हाताळलं जातं, याचं  कारण म्हणजे वेश्याव्यवसायाच्या माध्यमातून त्या मुली कुटुंबाचं पैसे कमावण्याचं साधन बनतात, याच जमातीतील एका जाणकाराने दशकभरापूर्वी इंदिरा आवास योजना या सरकारी योजनेतून जमातीतील  लोकांना राहण्यासाठी पक्की घरं उपलब्ध करवून दिली होती, पण त्या लोकांनी ही सरकारी योजनेतून मिळालेली घरं विकल्याच त्यांच्यावर आरोप आहे.

शरीररुपी पिंजऱ्यातून आत्म्याची सुटका या  दृष्टीने मृत्योत्सव साजरा करणं हे एकवेळ काही बाबतीत बरोबर असेलही. पण मानवी जन्माचं दुःख होणं हा मात्र अज्ञानातून आलेला अंधःकार आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर कर्मबंधनात अडकल्याने मानवाचा जन्म होतो, कर्म करणं हे प्रत्येकाला अनिवार्य आहे. सर्वसर्वेश्वर श्री कृष्णालाही कर्मबंधनात अडकून महाभारताच्या रणभूमीवर कर्म करावं लागलं, असं स्वतः तो सांगतो!

मग जर त्या जमातीच्या विचारसरणीनुसार पाप कर्मामुळे मानवजन्म होतो, तर आत्म्याला मिळालेला मानवजन्म म्हणजे त्या आत्म्याला मिळालेली सुवर्णसंधी होय, कारण संपूर्ण पृथ्वीतलावर विचार आणि ज्ञानार्जन  करू शकणारा मानव हा एकमेव प्राणी आहे. सद्विचार आणि सत्कर्माच्या जोरावर मुक्ती कशी मिळवावी याचं उत्तर देणारं मोठं संत-साहित्य भारतात उपलब्ध आहे. पण जर शिक्षणच नसेल तर यांच्यापर्यंत ते कसं  आणि कोण पोहोचवणार?

शिवाय शिक्षणाचा आभाव असल्याने आणि भूमिहीन भटकी जमात असल्याने कोणत्याही आधुनिक साधनांचा संपत्ती मिळवण्यासाठी वापर होऊ शकत नाही.

राज्य आणि केंद्र सरकारांनी अशा भटक्या जमातींकडे जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे. अशा भटक्या जमातींना मुख्य प्रवाहात न आणल्यास भविष्यात सरकार आणि समाजाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. आगीत तेल म्हणजे भारतात असे अनेक राजकीय विचार/पक्ष/व्यक्ती आहेत जे यांच्या गरिबी, अज्ञान आणि अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी नक्षलवादासारख्या देशविरोधी चळवळी उभ्या करतील. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं “शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा” हे वाक्य अर्थपूर्णरित्या अशा भटक्या जमातींपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे.

भटकंती : या श्रीकृष्णमंदिरांना तुम्ही एकदातरी भेट द्यायलाच हवी!

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


श्रीकृष्ण हे आपल्या भारतीय संस्कृतीतलं एक महत्त्वाचं दैवत आहे. कोणत्याही रुपात असला तरी तो आपल्याला तितकाच आवडतो. मग ते त्याचं बालरुप असो, गोकुळात राधेच्या आणि गवळणींच्या खोड्या काढणारं असो, कंस किंवा नरकासुराचा वध करणारं असो, गोवर्धन पर्वताला आपल्या करंगळीवर उचलणारं असो किंवा अर्जुनाला गीता सांगणारं रूप असो, हे सर्व आपल्याला तितकेच मनापासून आवडतात. श्रीकृष्ण हा एकच देव असा आहे, की ज्याला आपण केवळ देव म्हणून न पाहता एक प्रियकर म्हणूनही पाहतो. बाकी सर्व देवांच्या बाजूला त्यांची पत्नी असते जसं शंकरासोबत पार्वती, रामासोबत सीता पण कृष्णासोबत असते त्याची प्रेयसी राधा. आजही आपल्याकडे राधा-कृष्ण यांचं प्रेम हे आदर्श मानतात. आज कृष्णाच्या काही वेगळ्या स्थानांबद्दल जाणून घेऊया.

१. श्रीकृष्ण मठ, उडुपी, कर्नाटक

कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात मंगलोर जवळ उडुपी इथं हे मंदिर आहे. याची स्थापना इ.स. तेराव्या शतकात तत्कालीन वैष्णव सांप्रदायिक गुरु माधवाचार्य यांच्या मार्फत झाली. त्या काळात मुघलांनी मोठया प्रमाणात हिंदूंची देवळं उध्वस्त करण्याचा प्रकार चालवला होता.

अशीच कोणत्यातरी स्थानावरून भक्तांमार्फत ही मूर्ती होडीतून दुसरीकडे नेली जात असताना होडी अचानक वादळात सापडली. जेथे हे वादळ सुरू होतं, त्याच ठिकाणी समुद्रकिनारी माधवाचार्य ध्यानधारणा करत होते. त्यांनी मिळालेल्या दृष्टांतानुसार आपल्या शक्तीने वादळ शमवून ही मूर्ती होडीबाहेर काढून तिथं स्थापन केली.

या मंदिराबद्दल अजून एक कथा सांगतात, ज्यात देव आणि भक्त यांचं नातं आपल्याला दिसून येतं. कनकदास नावाचा एक महान कृष्णभक्त त्या काळात होऊन गेला. त्या काळात प्रचलित असणाऱ्या जातीव्यवस्थेनुसार कनकदास शूद्र असल्याने त्याला मंदिरप्रवेश नाकारला गेला. परंतु खऱ्या भक्ताला अशा छोट्याशा गोष्टींनी कधी फरक पडत नसतो. कनकदासानेदेखील या गोष्टीमुळे दुःखी न होता आपली कृष्णभक्ती श्रध्दापूर्वक तशीच पुढे चालू ठेवली. दररोज तो मंदिर परिसरात येई व आत जाता येत नसल्याने मंदिराच्या पाठीमागे जाऊन तेथून देवाला वंदन करून परत जाई. हा त्याचा रोजचा क्रम चालू होता.

त्याच्या या भक्तीला कृष्ण पावलाच.  एके दिवशी अचानक एक चमत्कार झाला, कनकदास नेहमीप्रमाणे मंदिराच्या पाठच्या भिंतीकडून नमस्कार करून निघणार एवढ्यात त्याच्या समोर अचानक लख्ख प्रकाश पडला. त्याने समोर पाहिलं तर, मंदिराच्या मागच्या भिंतीत एक खिडकी तयार झाली होती अन त्या खिडकीतून तो श्रीकृष्ण हसतमुखाने त्याच्याकडेच पाहत होता. कनकदासाला समोरून दर्शन घेता येत नव्हतं म्हणून देवानं स्वतःच त्याच्यासाठी आपलं तोंड पाठीमागे फिरवलं.



या मंदिरात प्रवेश करायच्या आधी दोन शिवमंदिरं लागतात. त्यांची नावं ‘अनंतेश्वर’ व ‘चंद्रमौळीश्वर’ अशी आहेत. इथल्या प्रथेप्रमाणे श्रीकृष्ण मंदिरात जाण्याआधी या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घ्यायची पद्धत आहे. कन्नड भाषेत ‘उडुपा’ म्हणजे लहान मुलगा. त्यामुळे इथली श्रीकृष्णाची मूर्तीसुद्धा बालगोपाल स्वरुपातच असून त्याच्या एका हातात दही घुसळायची रवी आणि दुसऱ्या हातात त्याची दोरी आहे. कृष्णाला दही, दूध, लोणी हेच पदार्थ आवडतात म्हणूनही असं असू शकेल. या मंदिरात खूप सुंदर असा महाप्रसाद मिळतो. तसंच इथून जवळच वैष्णव संप्रदायाचा मठदेखील आहे, जो त्यांच्या अष्टमठांपैकी एक मानला जातो. उडुपी हे कोकण रेल्वेमार्गावरचं एक स्टेशन आहे. तिथं उतरुन या श्रीकृष्ण मंदिरात जाता येतं.

२. श्री देवकीकृष्ण, माशेल, गोवा –

देवकी ही कृष्णाची जन्मदात्री माता तर त्याचं पालनपोषण केलं यशोदामातेनं, त्यामुळेच कृष्णाला ‘द्वैमातुर’ म्हणतात. श्रीकृष्णाचं बालरुप असलेलं उडुपीनंतरचं भारतातील हे कदाचित एकमेव मंदिर असेल. इथे कृष्णाची आई देवकी त्याला आपल्या कडेवर घेऊन बसली आहे. देवकीचा पुत्र या ठिकाणी तिच्यासोबतच आहे म्हणूनच या मंदिराला ‘देवकीकृष्ण मंदिर’ असं म्हणतात. हे मंदिर गोव्यात फोंडा तालुक्यात माशेल या गावी आहे.

या देवस्थानाची जत्रा पौष महिन्यात दोनदा भरते. त्यापैकी पौष शुद्ध द्वितीयेला होणारी छोटी जत्रा, तर पौष पौर्णिमेला भरणारी ‘मालनीपुनव’ ही मोठी जत्रा मानली जाते. याच्या व्यतिरिक्त या मंदिरात वर्षभर बरेच सण-उत्सव साजरे होत असतात. त्यापैकी नवरात्रोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमी या दोन उत्सवांना विशेष महत्व आहे.

नवरात्रात रोज देवापुढे कीर्तन होतं. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा या दिवशी देवाचा रथोत्सव होतो. येथील आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, श्रीकृष्ण ज्यावेळी पालखीत बसतो त्यावेळी तो देवकी मातेच्या कडेवर बसतो. पण रथात मात्र तो एकटाच चढतो. गोकुळाष्टमी उत्सवाच्या वेळी दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो, ज्यात दही व पोह्यांचे गोळे करून ते सर्वांना प्रसाद म्हणून वाटतात. संध्याकाळी श्रीकृष्णाच्या लीलांवरती आधारित ‘गवळणकाला’ सादर केला जातो.

३. श्री संमोहन कृष्ण, मोहनूर, तामिळनाडू –

तामिळनाडूमधल्या नामक्कल जिल्ह्यातील मोहनूर इथं हे ‘श्री प्रसन्न कल्याण वेंकटेश पेरुमाळ’ म्हणजेच श्री विष्णूचं मंदिर आहे. तामिळ भाषेमध्ये श्री विष्णूला ‘पेरुमाळ’ असं म्हणतात. कुठल्यातरी भक्ताच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन इथं प्रकट झालेला हा देव म्हणजे तिरुपतीचा बालाजीच आहे. या मंदिरात एका गाभाऱ्यामध्ये श्री व्यंकटेश, श्री लक्ष्मी (श्रीदेवी) तसेच श्री पद्मावती (भूदेवी) यांच्या मूर्ती आहेत.

दुसऱ्या एका गाभाऱ्यात आगळीवेगळी अशी श्री संमोहन कृष्णाची मूर्ती स्थापन केली आहे. ही मूर्ती अर्धनारीश्वर रुप घेतलेली आहे. एरव्ही शंकर-पार्वती आपल्याला या रुपात दिसतात. पण इथे मात्र आपल्याला श्रीकृष्णाचं अर्धनारीश्वर रुप पहायला मिळतं. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे सहसा श्रीकृष्णाच्या मंदिरात त्याच्या बाजूला राधा उभी असते. इथे तसं नाही. इथे श्रीकृष्णासोबत त्याची पत्नी रुक्मिणी हीच आपल्याला या अर्धनारीश्वर रुपात दिसते.

उजवीकडे कृष्ण व डावीकडे रुक्मिणी अशी या मूर्तीची रचना आहे. मूर्तीवर वस्त्र व दागिनेसुद्धा त्याच पद्धतीने घातलेले असतात. हे अगदी आगळंवेगळं असं रूप आपल्याला पहायला मिळतं.

या व्यतिरिक्त काही अनोखी कृष्ण मंदिरं तुम्हाला माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा!

स्वतःची सगळी इस्टेट विकली आणि पूल बांधला, जो १७६ वर्षांनंतरही मजबूत आहे

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


तिरुनेलवेली. तामिळनाडूमधील एक महत्त्वाचं शहर. या शहराजवळ वाहते तामराबरणी नदी. फक्त एप्रिल आणि मे महिन्यात कोरडी असणारी आणि इतर वेळेस दुथडी भरून वाहणारी ही नदी दक्षिण भारताची जान आहे. या नदीच्या आजूबाजूचा परिसरही साहजिकच अतिशय सुपीक आहे. इतका की पूर्वीच्या ब्रिटिशांच्या काळात ‘मद्रास प्रांता’चा सगळ्यात जास्त महसूल याच भागातून गोळा व्हायचा.

तिरुनेलवेली आणि पालयामकोट्टाई या दोन जुळ्या शहरांमधून ही नदी वाहते. दोन शहरांना जोडणारा एक पूल मोठ्या दिमाखात या नदीवर उभा असलेला आज पाहायला मिळतो. लंडनच्या थेम्स नदीच्या पुलावरील “लंडन ब्रिज”शी साधर्म्य असणारा हा पूल तिथल्या नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण या पूलाची गोष्ट मात्र फार कमी लोकांना माहिती आहे. कारण जरी ब्रिटिशांनी त्यांच्या काळात हा पूल बांधला असला तरीही त्या मागे एका भारतीय माणसाचा हात आहे, ज्याला आज सगळेच विसरलेत.

तर, पूर्वीच्या काळी, जेव्हा हा पूल नव्हता तेव्हा, नदी ओलांडून जाण्यासाठी होडीचा वापर व्हायचा. आजूबाजूला विराण वस्ती त्यामुळं खून, चोऱ्यामाऱ्या आणि इतर प्रकार सर्रास चालायचे. साधारण १८३६ दरम्यान एक दिवस असाच काही प्रकार त्या ठिकाणी घडला. झालं! तिथला कलेक्टर, एडन, साहेबानं ठरवलं की ते काही नाही! या नदीवर पूल बांधायचाच! तोही तंतोतंत ‘लंडन ब्रिज’सारखा!

हा निर्णय झाला आणि लगेच एक टीम तयार करण्यात आली. याच टीममध्ये एक माणूस होता ज्याचं नाव पुढं या पुलाला देण्यात आलं. त्याचं नाव होतं सुलोचना मुदलियार!

हा सुलोचना चेंगलपट्टूच्या एका प्रचंड श्रीमंत घरात जन्माला आला. त्याचे वडील तर ब्रिटिशांसाठी दुभाषी म्हणून काम करायचे, म्हणजे बक्कळ पैसे कमावलेले. सुलोचनाला पण कलेक्टर ऑफिसमध्ये चांगल्या पदाची नोकरी होती, शिवाय दस्तुरखुद्द कलेक्टर साहेबासोबत त्याचे चांगले संबंध होते.



तर असा हा सुलोचना जर या पूलाच्या बांधकामाच्या टीममध्ये नसता तर नवलंच! टीम तयार झाली. इंजिनिअर लोकांनी नकाशा वगैरे बनवला आणि बांधकामाचा खर्च सांगितला तब्बल ५० हजार रुपये! तेही त्या काळचे! एडननं काय ठरवलं की आता एवढे पैसे तर ब्रिटिश सरकार देणं शक्य नाही मग आपण इथल्या रहिवाशांकडूनच वर्गणी पद्धतीनं पैसे गोळा करूयात. कारण शेवटी हा पूल बांधतो तर त्यांच्या भल्यासाठीच ना!

आता आधीच ब्रिटिशांनी लुटून आपल्या लोकांना गरीब केलं होतं. त्यात हे एवढे पैसे त्या लोकांकडून गोळा करायचे म्हणजे कठीणच! इतक्यात सुलोचनानं विचार केला की आपल्या वडिलांनी दुभाषी म्हणून आणि आपण या कलेक्टर कचेरीत एवढ्या मोठ्या हुद्द्यावर, बक्कळ पैसे कमावलाय. हा सगळा पैसा शेवटी आला तर आपल्या लोकांकडून गोळा केलेल्या करातूनच ना! मग आपण हाच पैसा त्यांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या या पूलासाठी द्यायला काय हरकत आहे?

झालं! ठरलं तर मग! त्यानं लगेच घरी हा विषय बोलून दाखवला आणि घरचेही तयार झाले. दुसऱ्याच दिवशी आपला पठ्ठ्या कलेक्टर साहेबांकडे काही दागिने घेऊन गेला आणि त्यांना सांगितलं की या पुलाच्या बांधकामासाठी लागणारा सगळा खर्च तो उचलणार आहे आणि हे दागिने म्हणजे त्याचं टोकन आहे.

इतका सुंदर पूल बांधायला तब्बल तीन वर्ष लागले. सुलोचनाला त्याची जवळपास सगळीच इस्टेट विकावी लागली, पण पुलाच्या बांधकामात त्यानं कुठलीच कसर ठेवली नाही. म्हणूनच की काय ब्रिटिशांनी या पुलाला सुलोचना मुदलियार पूल असं नाव दिलं आणि त्यालाच या पुलावरून पहिल्यांदा चालण्याचा मान दिला.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी, साधारण १९७०च्या दरम्यान, हा जुना पूल पाडून त्या जागी नवीन बांधण्याचा प्रस्ताव होता पण, हा पूल इतका पक्का होता की त्याला पाडणं शक्यच नव्हतं! त्यामुळे शेवटी याच पूलाला लागून दुसरा पूल उभारण्यात आला. इतके पूर येऊन, इतक्या वर्षांनीही हा पूल असाच उभा आहे! तुम्ही कधी तामिळनाडूला गेलात तर इथं नक्की भेट द्या!

हे आहेत शिखांचे पाच पवित्र तख्त, यातील एक महाराष्ट्रातही आहे..!

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपला भारत देश विविधतेने समृद्ध आहे. धर्म, प्रांत, भाषा, आहार, वेशभूषा इ. सर्वच बाबतीत आपल्याला बऱ्याच ठिकाणी वेगळेपणा जाणवतो. एवढी विविधता असलेला देश संपूर्ण जगाच्या पाठीवर क्वचितच दुसरा एखादा असेल. ‘हिंदू मुस्लिम सीख ईसाई, सब है भाई भाई’ असं म्हणत सर्व जातीधर्माचे लोक इथं आनंदानं एकत्र राहतात. प्रत्येक धर्माची आपली अशी तत्वं, श्रद्धास्थानं असतात.

आपल्या हिंदू धर्मात जसं काशी, मथुरा, अयोध्या, द्वारका किंवा महाराष्ट्रातील अष्टविनायक, देवीची साडेतीन शक्तिपीठं, समर्थ रामदास स्वामींचे अकरा मारुती अशी वेगवेगळी धार्मिक श्रद्धास्थानं आहेत, तशीच ती इतर धर्मांमध्येसुद्धा आहेत. त्यापैकी शीख धर्माच्या पाच प्रमुख स्थानांबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

शीख लोक म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतात ते उंच, धिप्पाड, भरपूर केस-दाढीवाले, पगडी घातलेले सरदारजी आणि घोळदार सलवार कमीजवर ओढणी घेतलेल्या, केसांची लांबलचक वेणी घातलेल्या गोऱ्यापान स्त्रिया. ‘सत श्री अकाल’, ‘वाहे गुरुजी दा खालसा’ वगैरे वाक्यं आपण त्यांच्याकडून नेहमीच ऐकत असतो. त्यांचे ‘सरसो दा साग’, ‘मक्के दी रोटी’, ‘आलू पराठा’, ‘लस्सी’ वगैरे पदार्थ तर जगभर प्रसिद्ध आहेत.

गुरुनानक यांनी स्थापन केलेला हा शीख समाज मुळातच गुरुभक्त. शीख धर्माला अत्यंत समृद्ध अशी गुरुपरंपरा लाभली आहे. गुरुंनाच सर्वोच्च स्थानी मानणारे हे लोक. शीख समुदायात पाच ठिकाणांना अत्यंत पवित्र स्थान म्हणून मानलं जातं. त्यांच्या भाषेत ‘पंज तख्त’ असा त्यांचा उल्लेख करण्यात येतो. तख्त म्हणजे अधिकाराचं आसन. हे पाच तख्त म्हणजे पाच गुरुद्वारा आहेत. 

जाणून घेऊया नेमकी कोणती आहेत ती पाच पवित्र ठिकाणं –



तख्त श्री अकाल साहिब

शीख धर्माचं सर्वोच्च स्थान असलेल्या पंजाबच्या अमृतसर येथील सुवर्णमंदिराच्या समोर काही अंतरावरच हे ठिकाण आहे. पाच तख्तांपैकी सर्वात जुनं ठिकाण म्हणून याचा उल्लेख केला जातो. शिखांचे सहावे गुरू हरगोबिंद यांनी १६०६ साली याची स्थापना केली. अकाल तख्त म्हणजे देवाचं आसन. सुवर्णमंदिर हे अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तर अकाल तख्त हे दैनंदिन जीवनात अडचणींवरती न्याय मिळण्यासाठी आहे, असं मानलं जातं.

सुवर्णमंदिरापासून या ठिकाणापर्यंत येण्यासाठी रस्ता आहे. याचं मूळ नाव अकाल बंगा असं होतं. गुरू हरगोबिंद यांचं बालपण याच परिसरात गेलं होतं. जेव्हा त्यांनी आपल्या भावांसोबत मिळून याची स्थापना केली, त्यावेळी त्यांनी अध्यात्मिक (पीरी) व सांसारिक (मीरी) अधिकारांचं प्रतीक म्हणून दोन तलवारी घातल्या. महाराजा रणजीतसिंग यांचे सेनापती हरीसिंग नलवा यांनी या ठिकाणाला सोन्याचा मुलामा दिला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात झालेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार च्या वेळी भारतीय लष्कराने सुवर्णमंदिरावर हल्ला केला, त्यात अकाल तख्तचं नुकसान झालं होतं.

तख्त श्री केशगढ साहिब

पंजाब-हिमाचल सीमेजवळ पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यात सतलज नदीच्या काठावर शिवालिक टेकड्यांच्या रम्य परिसरात हे ठिकाण आहे. आनंदपूर या ठिकाणी असल्याने याला आनंदपूर साहिब असंही म्हणतात. याची स्थापना १६६५ मध्ये शिखांचे नववे गुरू तेगबहादूर यांनी केली. ते त्याआधी कीरतपूर येथे राहत होते, पण काही मतभेदांमुळे ते तिथून माखोवाल या गावी जाऊन राहिले. १६७५ साली औरंगजेबाच्या आदेशानुसार सक्तीनं इस्लाम धर्म स्वीकार करायला लावला जात असताना गुरू तेगबहादूर यांनी त्याला नकार दिला म्हणून त्यांची छळ करून हत्या करण्यात आली.

शिखांचे दहावे गुरू गोबिंदसिंग यांनी १६९९ साली याच ठिकाणी खालसा पंथाची स्थापना केली.

मुख्य गुरुद्वाराशिवाय या परिसरात इतरही अनेक ऐतिहासिकमहत्त्वाचे गुरुद्वारा आहेत.

तख्त श्री दमदमा साहिब

याला तख्त श्री दरबार साहिब किंवा फतेहगढ साहिब असंही नाव आहे. तात्विक अधिकाराचं स्थान म्हणून हे ओळखलं जातं. पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यात तलवंडी साबो इथं हे ठिकाण आहे. गुरू गोबिंदसिंगांनी युद्धकाळात इथं विश्रांतीसाठी मुक्काम केला होता, म्हणूनच हे स्थान दमदमा साहिब म्हणून ओळखतात. गुरू गोबिंदसिंगांनीच ‘गुरू की काशी’ म्हणून याला गौरवलं आहे. याच ठिकाणी शिखांच्या गुरू ग्रंथ साहिबची निर्मिती झाल्याचं म्हटलं जातं.

तख्त श्री पाटणा साहिब

शिखांचे दहावे गुरू गोबिंदसिंग यांचं जन्मस्थान असलेलं हे ठिकाण बिहारची राजधानी पाटणा इथं असून त्याला तख्त श्री हरमंदिर साहिब या नावानेही ओळखलं जातं. इथंच गुरू गोबिंदसिंग यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी झाला. आनंदपूरला जायच्या आधीची काही वर्षं ते इथं राहत होते. या ठिकाणाला साक्षात गुरुनानक तसंच गुरू तेगबहादूर यांनी भेट दिलेली आहे. महाराजा रणजीतसिंग यांनी हा गुरुद्वारा उभारला.

तख्त श्री हजूर साहिब

गुरू गोबिंदसिंग यांची समाधी असलेलं हे ठिकाण तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब या नावानेही प्रसिद्ध आहे.

इतर चारही तख्त उत्तर भारतात आहेत, पण हे एकच ठिकाण असं आहे, जे आपल्या महाराष्ट्रात नांदेड इथं आहे. महाराजा रणजीतसिंग यांच्या विनंतीवरून सिकंदर जाह व असफ जाह (तिसरा) यांनी अठराव्या शतकात हा गुरुद्वारा गोदावरीच्या काठावर बांधला.

याच ठिकाणी गुरू गोबिंदसिंग यांनी घोषणा केली की, त्यांच्या पश्चात गुरू ग्रंथसाहिबलाच गुरू मानण्यात यावं. गुरू गोबिंदसिंगांनीच अबचलनगर हे नाव या ठिकाणाला दिलं. २००८ साली ऑक्टोबर महिन्यात गुरू ग्रंथसाहिबच्या गुरुपदाला ३०० वर्षं पूर्ण झाली, त्यानिमित्त इथे एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हाचे भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग देखील यावेळी उपस्थित होते. या गुरुद्वाराच्या परिसरात असलेल्या बागेत एका लेझर शो द्वारे शिखांची गुरुपरंपरा दाखवली जाते. याशिवाय परिसरामध्ये ऐतिहासिक महत्त्व असलेले इतरही काही गुरुद्वारा आहेत.

भटकंती – प्राचीन भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना ‘हवा महल’

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


भारतात राजे महाराजांनी बांधलेले अनेक महाल आहेत जे हिंदुस्थानी स्थापत्यशास्त्राचं उत्तम उदाहरण समजले जातात. यांची रचना अभ्यासनासाठी जगभरातून अभ्यासक येत असतात. मग तो आग्र्याचा ताजमहाल असो की जलमहाल. जगभरात ख्याती असणारा असाच एक महाल म्हणजे हवामहल.

भारताची पिंकसिटी जयपूरमधील हवामहल एक अशी इमारत आहे जिच्या रचनेपासूनच आश्चर्यांची जंत्री चालू होते. या महालात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर आजही संशोधन चालू आहे. महाराजा सवाई प्रतापसिंह यांनी बांधलेल्या या इमारतीची रचना अशी आहे की याठिकाणी थंडगार हवा सतत खेळत रहाते. महाराज सवाई प्रतापसिंह हे श्रीकृष्णाचे भक्त होते. त्याच्या मुकुटाला डोळ्यासमोर ठेवून या महालाचं डिझाईन बनविलं गेलं आहे. भारतीय स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमूना म्हणून या महालाकडे बघितलं जातं.

राजस्थानमधील प्राचीन वास्तूंपैकी ही इमारत असून या महालाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे की तो इतर इमारतींसारखा जमिनीत खोलवर असणार्‍या पायावर बांधलेला नसून त्याला पायाच नाही. हवा महल जगातील सर्वात उंच मात्र बिन पायाची इमारत म्हणून ओळखली जाते.

एवढेच नाही तर, जयपूरमधे उन्हाची तलखी काय असते हे नव्यानं सांगण्याची गरजच नाही मात्र तुम्ही जेंव्हा हवामहलमधे पाऊल ठेवता तेंव्हा बाहेरच्या उन्हाचा कडाका आत जाणवतही नाही उलट थंडगार हवेची झुळूक तुम्हाला सतत जाणवत रहाते.

आज आपण याच महालाबद्दलच्य अजबगजब गोष्टी जाणून घेऊयात.



पाच मजल्याचा हा महाल बाहेरून बघितला तर लक्षात येईल की तो मुकुटाप्रमाणे दिसतो. १७९९ मधे महाराजा सवाई प्रतापसिंह यांनी याची उभारणी केली. हवा महालमधे एकूण पाच मजले आणि ९५३ छोट्या छोट्या खिडक्या आहेत. ज्याला झरोके म्हणलं जातं तशी या खिडक्यांची रचना असून यातून महालात हवा खेळती रहाण्याची सोय केलेली आहे. या झरोक्यांची रचना करण्याच्या मागचा आणखीन एक उद्देश म्हणजे राजपूत राजघराण्यातील पडदाशिन स्त्रियांना स्त्यावरून जाणार्‍या मिरवणूका बघता याव्यात तसेच शहरात साजरे होणारे उत्सव त्यांना इथून बघता यावेत.

खानदानी राजपूत स्त्रिच्या पायाचं नखही परपुरुषाला दिसता कामा नये असा दंडक होता त्यामुळे या स्त्रियांसाठी ही खास सोय करण्यात आलेली होती. या झरोक्यांमधून राजघराण्यातल्या स्त्रिया अगदी विनासंकोच बाहेर बघून शकत मात्र बाहेरून आतलं काहीही दिसत नसे. 

हवामहलची अशी ही कुशल रचना केली आहे वास्तुकार लालचंद उस्ताद यांनी. सवाई प्रतापसिंह यांच्या कालखंडातील निष्णात वास्तुकार म्हणून लालचंद यांची ख्याती होती.

हा महाल बांधताना लालचंद यांनी एक गंमत करुन ठेवलेली आहे. ती म्हणजे, या महालाच्या सर्वात वरच्या मजल्यावर ज्याला हवा मंदिर म्हणून ओळखलं जातं, त्याला जाण्यासाठी जिनाच नाही.

लाल दगडात सुंदर कोरीवकाम केलेला हा महाल आपल्या रुपासाठी प्रसिध्द आहे. रॉयल सिटी पॅलेसचा विस्तार करण्यासाठी या महालाची बांधणी केली होती. राजस्थानमधील झुनझुनू शहरातील महाराजा भूपालसिंग यांच्या खेतरी महालाला महाराजा सवाई प्रतापसिंह यांनी एकदा भेट दिली आणि या महालाच्या रचनेनं त्यांना इतकं प्रभावित केलं की अशाच प्रकारचा एखादा महाल आपणही बांधावा असं त्यांच्या मनानं घेतलं. या विचारातूनच हवा महालाची कल्पना पुढे आली.

मुघल आणि राजपूत शैलीतील हे बांधकाम या दोन्ही स्थापत्यशास्त्रांचा एक सुंदर मिलाफ़ आहे. महालाच्या पहिल्या मजल्यावरील शरद मंदिरात राजघराण्यातील विविध सणवार आणि उत्सव साजरे केले जात. दुसर्‍या मजल्यावरील रतनमंदिर असून हे मंदिर काचकामाचा उत्तम नमूना आहे. उरलेल्या तीन मजल्यांवर प्रकाश मंदिर, विचित्र मंदिर आणि हवा मंदिर यांची उभारणी केलेली आहे.

या महाल आणि मंदिरात गुलाबी शहर जयपूरचे विविध रंग पहायला मिळतात. गंमतीची बाब म्हणजे या महालात जाण्यासाठी समोरच्या बाजूनं प्रवेशद्वारच बनविलेलं नाही. सिटी पॅलेसच्या बाजूनं याचं शाही प्रवेश द्वार बनविण्यात आलेलं आहे. थोडक्यात हवामहलची जी चिरपरिचित छायाचित्रं आहेत ती वास्तवात महालाच्या मागील बाजुची आहेत.

सिटी पॅलेसच्या तीन दोन मजली इमारतींच्या चौथ्या बाजूला हा हवामहल आहे. सिटी पॅलेसमधून हवामहलमधे जातानाही राजस्त्रियांचं दर्शन बाहेरच्या कोणाला होणार नाही पुरेपुर खबरदारी घेतलेली आहे. 

हवामहलाच्या पहिल्या दोन मजल्यांवर विस्तृत प्रांगण आहे तर इतर मजल्यांवर खोल्या असून सर्वात वरच्या दोन मजल्यांवर जाण्यासाठी इतर महालात असतात तसे जिने नाहीत तर रॅम्पची सोय करण्यात आलेली आहे. हे या महालाचं एक खास वैशिष्ट्य आहे.

आज जगभारत औत्सुक्याचा विषय असणारी ही वास्तू ज्या लालचंद उस्तानी बांधली त्यांच्याविषयी मात्र दुर्दैवानं फ़ारशी माहिती उपलब्ध नाही. 

हिंदुस्थानातील असे अनेक उत्तमोत्तम आणि वास्तुशास्त्राचे उत्तम नमूने असणारे महाल आहे ज्यांची उभारणी कोणत्या महाराजांनी केली हे इतिहासाच्या पानांवर नोंदवलं आहे मात्र ते उभारण्या मागे ज्यांची कल्पना आणि कष्ट आहेत त्यांची नावं काळाच्या पोटात गुडूप झालेली आहेत. इतर वास्तुकारांप्रमाणेच हवामहल ज्यांच्या कल्पनेतून साकारला ते लालचंद उस्ता जगाला केवळ नावानी माहित आहेत.

हा विजयस्तंभ शेकडो वर्षांच्या पावसाने गंजला नाही की नादीरशहाच्या तोफांनी भंगला नाही

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार धर्मरक्षण आणि धर्मप्रसार हे प्रत्येक राजाच्या आद्य कर्तव्यांपैकी एक मानले जात होते. राज्यातील प्रजेच्या हक्कांसाठी, सुरक्षेसाठी तसेच राज्यविस्तारासाठी यु*द्ध करणे ही राजधर्माची स्वाभाविकता असली तरी प्रसंगी धर्मासाठी मरायची तयारी राज्यकर्त्यांनी ठेवणं हेही त्यावेळी एक महत्कार्य मानलं जात असे.

त्यावेळची भारतातील बहुतांश प्रमुख साम्राज्ये ही हिंदू सम्राटांच्या अधिपत्याखाली असल्याने आणि इतर धर्मियांच्या राजवटींचं अशुभ सावट नसल्याने त्यावेळी धर्माच्या नावाखाली लढाया होणे हे फारच दुर्मिळ होतं. पण अशाही परिस्थितीत कित्येक यु*द्धं एका धार्मिक बाबींमुळे लढली गेली, ती म्हणजे – हिंदू धर्मातील संप्रदायवाद!

शास्त्रपुराणांनुसार, हिंदू धर्मामध्ये शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य आणि सौर्य असे पाच संप्रदाय प्रमुख मानले जातात. यातील बहुतांश पंथांना राजाश्रय लाभला असल्याने जनमानसात त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. प्रत्येक संप्रदाय हा एका विशिष्ट देवतेची व तिच्याशी निगडीत दैवी अवतारांचीच उपासना करत असल्याने आपल्या देवतेपुढे आणि संप्रदायापुढे इतर संप्रदाय गौण असल्याचा गैरसमज हळूहळू वाढत गेला आणि याचं रुपांतर पुढे रक्तरंजित लढायांमध्ये झालं. यातील शैव आणि वैष्णव पंथामध्ये लढल्या गेलेल्या लढाया प्रसिद्ध आहे. 

रक्तरंजित संघर्षांनंतर मिळालेल्या विजयानंतर अनेक स्मारके उभारली गेली ज्यांकडे फक्त सांप्रदायिकतेचा वारसा म्हणून नव्हे तर यु*द्ध जिंकलेल्या राजाच्या शौर्याची परिसीमा म्हणूनही पाहिले जाते. भारतावरील हिंदू सम्राटांचं अधिपत्य मावळतीला लागलेलं असताना इस्लामी राजवटींनी आक्र*मक पवित्रा घेत भारतभर आपली सत्ता स्थापन केली. त्यावेळी कित्येक धार्मिक प्रतिकांची, स्मारकांची नासधूस आणि लूट करण्यात आली. त्यांचं रुपांतर मशिदींमध्ये केलं गेलं.



या लूटमारीच्या खुणा आपल्या अंगावर बाळगणारा असाच एक विजयस्तंभ दिल्लीच्या मेहरौली शहरात उभा आहे. या स्तंभाचं वैशिष्ट्य म्हणजे शतकानुशतके संततधार पावसाच्या सरी अंगावर झेलणाऱ्या या ‘लोखंडाच्या’ स्तंभाला गंज चढत नाही!! 

पदार्थविज्ञानातील, विशेषतः धातुशास्त्रातील भारतीयांची रुची आणि संशोधनाचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून या लोहस्तंभाकडे पाहिले जाते. तिसऱ्या शतकातील भारतीय कारागीरांच्या अचाट बौद्धिक सामर्थ्याचे व उत्तम तांत्रिक कौशल्याचे प्रदर्शन करणारा हा लोहस्तंभ आज जगभरातील शास्त्रज्ञ, संशोधक आणि इतिहासकारांच्या कुतुहुलाचा विषय ठरत आहे.

तब्बल सहा हजार किलोहून अधिक वजनाचा आणि २३ फुटांहून अधिक उंचीचा हा लोहस्तंभ भारतातील प्रमुख साम्राज्यांपैकी एक असलेल्या सामर्थ्यवान आणि वैभवशाली गुप्त साम्राज्याच्या विष्णूभक्तीचं प्रतिक मानलं जातो.

भारतात कला, विज्ञान आणि साहित्याचा उत्कर्ष गुप्तांच्या राजवटीत झाला असे मानण्यात येते. या राजवटीतील दुसरा चंद्रगुप्त (इ. स. पू. ३७५-४१५) याचा कार्यकाळ हा भारताच्या सुवर्णयुगाची नांदी ठरला. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अतुल्य पराक्रमाच्या जोरावर दुसऱ्या चंद्रगुप्ताने एक प्रभावशाली साम्राज्य स्थापन केले. या आपल्या एकछत्री सत्तेच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याने एक विजयस्तंभ बनवला आणि त्यावर आपल्या पराक्रमाची गाथा सांगणारा शिलालेखही कोरला.

दुसरा चंद्रगुप्त हा वैष्णव पंथाचा अनुयायी असल्याने त्याने उदयगिरी, मध्य प्रदेशमधील ‘विष्णूपाद’ टेकडीवर असलेल्या विष्णू मंदिरासमोर हा ध्वजस्तंभाच्या स्वरूपातील विजयस्तंभ स्थापन केला.

या विजयस्तंभाला कधीही गंज न लागण्याचं कारण होतं त्यावर असलेलं फॉस्फरसचं गंजप्रतिबंधक आवरण!

तब्बल ९८ टक्क्यांहून अधिक लोखंड या खांबाची रचना करताना वापरले होते. स्तंभ घडवताना त्याच्या इरोजन प्रोसेसमध्ये चुनखडीचा वापर होत नसल्याने यात सध्याच्या लोखंडापेक्षा अधिक प्रमाणात फॉस्फरस वापरले गेले आहे. फॉस्फरसच्या समावेशामुळे आणि त्याच्या केमिकल रिक्शन या स्तंभावर उच्चप्रतीचे गंजप्रतिबंधक आवरण तयार झाले. त्यामुळे गंज लागण्यासाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक प्रक्रियेचा या खांबावर तीळमात्रही परिणाम झाला नाही.

आज धातुशास्त्रात इतकी प्रगती होऊनही पुन्हा असे स्तंभ बनवणं हे प्रचंड आव्हानात्मक मानलं जातं. त्यामुळे या एकमेवाद्वितीय लोहस्तंभावर इस्लामी राजवटीची नजर पडणे साहजिकच होते. भारतात इस्लामी राजवटीचा पाया घालणाऱ्या कुतुबुद्दीन ऐबक याच्या जावयाने म्हणजेच इल्तुतमिशने आपल्या सासऱ्याच्या स्मृतीप्रित्यर्थ अपुऱ्या राहिलेल्या जगप्रसिद्ध कुतुबमिनारचे बांधकाम पूर्ण केले.

इल्तुतमिश हा दिल्ली सल्तनतीची सुरुवात करणारा सुलतान मानला जातो, ज्याने आपल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत मोहंमद घोरीच्या स्वप्नातील भारतातल्या तुर्की साम्राज्याची मुहूर्तमेढ दिल्लीत रोवून बंगालपर्यंत एकछत्री अंमल प्रस्थापित केला. तिथेच त्याने कुव्वत-उल-मस्जिदही बांधली, जिच्या प्रांगणात हा ‘वैष्णवांचा विजयस्तंभ’ आज पर्यटकांना पाहायला मिळतो. मेहरौलीमधील हे ऐतिहासीक स्थळ सध्या कुतुब काँप्लेक्स/परिसर या नावाने प्रसिद्ध आहे.

कुतुब परिसरात उभ्या असलेल्या या लोहस्तंभाच्या कलाकुसरीने मढलेल्या शिखरावर एकेकाळी गरुडाची मूर्ती स्थापित केली असावी असा अंदाज त्याच्या शिखरावर असलेल्या विशिष्ट खाचेवरून बांधला जातो. अशा खाचा कित्येक वैष्णव ध्वजस्तंभावर असल्याचं निरीक्षणात आढळून आलेलं आहे.

स्तंभ मूळ जागेवरून हलवताना ही मूर्ती उ*द्ध्वस्त अथवा विस्थापित झाली असावी किंवा हिंदू धर्माचं प्रतिक असल्याने त्या मूर्तीला जाणीवपूर्वक हटवलं गेलं असावं असाही इतिहास संशोधकांचा कयास आहे.

भारतातील इस्लामी राजवटीच्या सुरुवातीचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या कुतुब परिसरात हिंदूंचा विजयध्वज आहे ही बाब नादीरशहाच्या वर्मावर घाव घालत होती. १७३९ साली कर्नालच्या लढाईत त्याने दिल्लीवर ताबा मिळवला. त्यानंतर त्याने या स्तंभावर जवळून तोफेचा मारा केला, ज्यामुळे हा स्तंभ किंचितसा झुकला पण अभंग राहिला. याउलट त्याला घासून मागे गेलेल्या तोफगोळ्याच्या ठिकऱ्यांमुळे मशिदीच्या काही भिंती कोसळल्या आणि स्तंभ हटवू पाहणाऱ्या नादीरशहाची चांगलीच फजिती झाली. आपल्या आततायीपणामुळे मशिदीला आणखी नुकसान पोहोचू नये असा विचार करून त्याने लोहस्तंभ उ*द्ध्वस्त करण्याचा निर्णय मागे घेतला.

असा हा गेल्या कित्येक वर्षांपासून आस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत खंबीरपणे उभा असलेला, पुरातन भारतीय धातुशास्त्राची महती सांगणारा, कधीही न गंजणारा लोहस्तंभ या पृथ्वीतलावरील अलौकिक आणि अद्भुत आश्चर्यांपैकी एक आहे, यात दुमत नाहीच!

जगातलं पहिलं एक्स्पेरिमेंटल व्हिलेज ‘ऑरोविल’ आपल्या स्वागतासाठी तयार आहे

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


तुम्ही लहान असताना ‘मिकी माऊस क्लब हाऊस’ नावाचं कार्टून पाहिलंय? ज्यांना मिकी माऊस आवडतो त्यांनी तर ते नक्कीच पाहिलं असेल. आपल्या खास तयार केलेल्या क्लब हाऊसमध्ये मिकी आणि त्याचे साथीदार मिळून दररोज काहीतरी नवीन ऍडव्हेंचर करतात. त्यातून त्यांना नवीन काहीतरी शकण्यास मिळतं. मिकीचं क्लब हाऊसची रचना पाहून मला नेहमी वाटायचं, यार…किती परफेक्ट प्लॅनिंग करून हे घर आणि आजूबाजूचा परिसर तयार केलाय. आपलंही अशाच एखाद्या परफेक्ट शहरात घर असावं, हे मला नेहमी वाटायचं.

पण, या तर झाल्या सर्व व्हर्च्युअल गोष्टी. भारतात मिकीचं घर असलेल्या टाऊनसारखं एक खरंखुरं टाऊन पाच दशकांपूर्वीचं उभं राहिलेलं आहे! ‘ऑरोविल’, असं या टाऊनचं नाव आहे. हे शहर कुणा व्यक्तीच्या मालकीचं नाही तर संपूर्ण मानवतेच्या मालकीचं आहे. त्याचे दरवाजे वय, राष्ट्रीयत्व, आर्थिक परिस्थिती, धार्मिक दृष्टिकोन यांचा विचार न करता सर्वांसाठी खुले आहेत. योगी श्री ऑरोबिंदो यांचं तत्वज्ञान डोळ्यासमोर ठेवून तयार केलेलं हे शहर शांतता, सौहार्द, ज्ञान आणि प्रगतीसाठी प्रयत्न करतं. अशा या ठिणाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

जगभरातील सुमारे ५० हजार लोकसंख्या राहू शकेल अशी, व्यवस्था असलेली ऑरोविल हे एक सार्वत्रिक शहर आहे. ‘मानवी एकतेच्या प्रयोगासाठी’ या शहराची निर्मिती करण्यात आलेली आहे. मानवी एकतेचा विचार करून तयार केलेलं हे शहर, अशा प्रकारचा जगातील एकमेव प्रयोग आहे.

ऑरोविल हे पाँडिचेरीतील विलुप्पुरम जिल्ह्यात वसलेलं आहे. याची स्थापना १९६८मध्ये मीरा अल्फासा यांच्या संकल्पनेतून झाली आहे. ६०च्या दशकाच्या सुरुवातीला भारत सरकारसमोर ही संकल्पना मांडण्यात आली होती. शासनानं ही संकल्पना युनेस्कोच्या जनरल असेंब्लीमध्ये मांडली आणि जगभरातील राष्ट्रांनी तिचं स्वागत केलं. फ्रेंच आर्किटेक्ट रॉजर एन्गर यांनी हे टाऊन डिझाइन केलेलं आहे.

याठिकाणी जगभरातील ५४ देशांतील जवळपास २ हजार ८०० नागरिक कायमचे वास्तव्याला आहेत. जे जागतिक एकतेसाठी काम करत आहेत. दक्षिण चेन्नईच्या पूर्वेकडील किनारपट्टीपासून १५० किलोमीटर अंतरावर पाँडिच्या समुद्रकिनाऱ्यावर वसवलेलं हे शहर पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. तिथली जीवनशैली, उष्णकटिबंधीय हवामान, फ्रेंच वसाहत काळातील संस्कृती, मेडिटेरियन कॅफेंमधील खाण्याचा आस्वाद घेण्यासाठी लोक येथे येतात. काही लोक येथील अध्यात्मिक जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी येतात. ‘ऑरोविल’मध्ये अनेक गोष्टी सुरू आहेत. ज्याचा तुम्हीही एक भाग होऊ शकता.



संपूर्ण ‘ऑरोविल’ एका मातृमंदिराच्या भोवती बांधलं गेलं आहे. हे मंदिर म्हणजे १२ पाकळ्यांनी वेढलेला मोठा गोल आकाराचा एक ध्यान कक्ष (मेडिटेशन हॉल) आहे. हा जगातील सर्वात मोठा काचेचा गोल आहे. हे मंदिर तयार करण्यासाठी ३७ वर्षांचा कालावधी लागला.

२१ फेब्रुवारी १९७१ला त्याचा पाय घालण्यात आला होता तर २००८ मध्ये त्याचं काम पूर्ण झालं. मातृमंदिर हे कोणत्याही विशिष्ट धर्माचं किंवा संप्रदायाचं नाही. पूर्वपरवानगी घेऊन जगातील कोणतीही व्यक्ती त्याठिकाणी येऊन बसू शकते. ऑरोविल हे सतत वाढणारं शहर आहे. गेल्या ५० वर्षांच्या काळात जगभरातील अनेक वास्तुविशारदांनी याच्या निर्मितीमध्ये स्वखुशीनं आपलं योगदान दिलं आहे. याच्या आर्किटेक्चरमध्ये अनेक प्रयोग करण्यात आलेले आहेत.

बिल्डिंग टेक्नॉलॉजी, बिल्डिंग मटेरियल आणि इको-फ्रेंडली आर्किटेक्चरचा वापर तयार करून बांधलेल्या इथल्या इमारती अगदी सहजपणे आजूबाजूच्या वातावरणाशी सुसंवाद साधत असल्याचा भास होतो. बांधकाम आणि इमारत तंत्रज्ञान, आर्किटेक्चरल रिसर्च आणि नाविन्यपूर्णतेसाठी असंख्य आजवर अनेक पुरस्कार मिळाले असून भविष्यातील बांधकामांसाठी अनुदानही मिळालेलं आहे.

‘द ऑरोविल अर्थ इन्स्टिट्युट’ ही संस्था वास्तूशास्त्रातील ज्ञान हस्तांतरित करण्यासाठी जगभरातील ३५ हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे.

बऱ्याचदा आपल्याला आपलं रूटीन काम आणि आयुष्य रटाळ वाटू लागतं. अशावेळी काही तरी नवीन काम करण्याची इच्छा निर्माण होते. मात्र, अनेक कारणांमुळं ते करणं शक्य होत नाही. अशा व्यक्तींसाठी ‘ऑरोविल’ हे एकदम ‘परफेक्ट’ ठिकाण आहे. या ठिकाणी स्वयंसेवी काम करण्याच्या अनेक संधी आहेत. वैकल्पिक आरोग्य सेवा, पर्यावरण संवर्धन, इमारत देखभाल, नवीकरणक्षम ऊर्जा, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, आर्किटेक्चर, सेंद्रिय शेती अशा कितीतरी प्रकारच्या अल्प आणि दीर्घ मुदतीच्य सेवा करण्याची संधी याठिकाणी मिळते. ऑरोविलच्या परिसरात आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये असंख्य प्रकल्प सुरू आहेत. पाणी साठवण, वनीकरण, कचरा व्यवस्थापन, सेंद्रिय शेती आणि ग्रामीण विकासाच्या कामांमध्ये हातभार लावण्यासाठी जगभरातून अनेक तरूण, विद्यार्थी आणि प्रौढ व्यक्ती येतात.

ऑरोविलमधील एकूण लोकसंख्येमध्ये ६००हून अधिक मुलं आहेत. त्यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विस्तारला जावा यासाठी शिक्षण पद्धती अगदी मनोरंजक केली आहे. येथे वयाच्या १४व्या वर्षापर्यंत स्ट्रक्चरल स्कूलींग दिलं जातं. याठिकाणची शिक्षण पद्धती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी मान्यता दिलेली आहे. याठिकाणी अनेक बालवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत. फ्रान्स, जर्मनी, इटली आणि भारतातील शिक्षक याठिकाणी मुलांना शिकवतात. तर, रशिया, दक्षिण आफ्रिका, पेरू याठिकाणीच्या मुलांसह काही स्थानिक मुलं इंग्रजी माध्यमात धडे गिरवतात.

संस्कृती आणि भाषेची विविधता असलेल्या मुलांचं असं एका छताखाली संगोपन होणं हे वैश्विक एकतेसाठी नक्कीच फायद्याचं आहे. जवळपासच्या खेडेगावांमध्ये देखील येथील शिक्षक जाऊन मुलांना शिकवतात.

या ठिकाणी राहणाऱ्या ‘जागतिक समुदाया’मध्ये कलेला अत्यंत आदरणीय स्थान आहे. याठिकाणी अनेक कलाकार आणि सर्जनशील लोक राहतात. आपल्या अंगातील कलांचे प्रदर्शन करण्यासाठी ऑरोविल एक उत्तम व्यासपीठ आहे. परफॉर्मिंग आर्ट्सचं सादरीकरण करण्यासाठी अनेक सेंटर्स उभारलेली आहेत. नृत्य, शास्त्रीय संगीत, कविता, छायाचित्रणासारख्या अशा अनेक कलागुणांना याठिकाणी वाव दिला जातो. त्यामुळे जर तुम्ही एक कलाकार असाल तर ही जागा नक्कीच तुमच्यासाठी खास ठरू शकते. ऑरोविलमधील हेल्थकेअर देखील खूप आकर्षक आहे.

‘मातृवम हीलिंग फॉरेस्ट’ नावानं औषधी वनस्पतीचं सात एकरात परसलेलं जंगल याठिकाणी तयार केलेलं आहे. त्यांचा वापर करून वैद्यकीय उपचार केले जातात. होमिओपॅथी, आयुर्वेद आणि समग्र उपचार पद्धतींचे इतर प्रकारही येथे लोकप्रिय आहेत.

चेन्नईपासून तीन तासाच्या आणि पाँडीपासून ३० मिनिटाच्या अंतरावर असलेली ही ‘एक्सपरिमेंटल टाऊनशीप’ फक्त एका पर्यटन स्थळापेक्षा नक्कीच जास्त आहे. याठिकाणी येणारी प्रत्येक व्यक्ती बाहेर पडताना खूप काही शिकून आणि शिकवून बाहेर पडू शकते. त्यामुळं जर काहीतरी नवीन अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठीचं बनलेलं आहे.

या गावाच्या कुंभकर्णी झोपेच्या आजाराचा शास्त्रज्ञांना अखेर उलगडा झालाय

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


रामायणातील ‘कुंभकर्ण’ आपल्या सर्वांना माहितच आहे. तो वर्षातील फक्त सहा महिने जागा असे, उर्वरित सहा महिने तो गाढ झोपेत असायचा. त्याच्या या सवयीमुळं आपल्याकडे एक वाक्प्रचार देखील रूढ झाला. अनेक घरांमध्ये सकाळी-सकाळी हा वाक्प्रचार ऐकायला मिळतो. ‘अरे कुंभकर्णासारखे काय झोपले आहात? उठा आता’, असं एखादी आई जोरात ओरडताना ऐकायला मिळतंच. एखाद्याला सारखी खूप झोप येत असेल किंवा झोपेत कितीही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती उठत नसेल तर, हा वाक्प्रचार वापरला जातो. एखादी व्यक्ती जर खरंच सहा-सहा महिने झोपू लागली तर..? नक्कीच ही गोष्ट आश्चर्यचकित करणारी आहे.

पण, कझाकिस्तानमध्ये एक गाव आहे. या गावातील एखाद-दुसरी व्यक्ती नाही तर अर्ध्यापेक्षा जास्त लोकं कुंभकर्णासारखे झोपत असल्याचा प्रकार समोर आला होता.

अगदीचं सहा महिने नाही मात्र, जवळपास ६-६ दिवस हे लोक झोपेच्या अधिन होत. कलाची असं या गावाचं नाव असून आता तर त्याला ‘स्लिपिंग व्हिलेज’ म्हणूनच ओळखलं जातं.

उत्तर कझाकिस्तानमधील आसिल जिल्ह्यात कलाची हे छोटसं गाव वसलेलं आहे. २०१४मध्ये गावाची लोकसंख्या ६८० होती. जवळजवळ दोन वर्ष झोपेच्या एका विचित्र समस्येने त्रस्त होते. या समस्येमुळं लोक अचानक झोपी जात. झोपेतून उठल्यानंतर त्यांना काही आठवतही नसे. गावातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या या विचित्र प्रकारानं ग्रस्त झाली होती. प्रशासनानं तत्काळ या मागच्या कारणांचा शोध सुरू केला होता. तोपर्यंत कलाची गावातील नागरिकांची अवस्था पाहता. स्थलांतर करण्यासाठी शेजारच्या अनेक गावांनी त्यांना परवानगी दिली होती.

गावातील लहान मुले आणि प्रौढ व्यक्ती या झोपच्या अधीन झाले होते. स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार २०१२ ते २०१५ याकाळात १६० नागरिकांना अशा प्रकारचा त्रास झाला. दीर्घकालीन झोपेतून उठल्यानंतर लहान मुलांना अंथरुणात साप, पंखांचे घोडे, फुलपाखरे अशा गोष्टी असल्याचे भास होत असत तर, प्रौढांना संभोग करण्याची तीव्र इच्छा होतं असल्याचं निदर्शनास आलं होतं.



एकदा काही गावकऱ्यांनी एका गरीब व्यक्तीला गावातील सरकारी दवाखान्यात दाखल केलं होतं. तो व्यक्ती अर्धवट झोपेत होता आणि त्याची विजार पूर्णपणे ओली झालेली होती. ती अर्धवट शुद्धीत असलेली व्यक्ती संभोग करण्यासाठी याचना करत असल्याची माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं.

२०१२ मध्ये पहिल्यांदा कलाची गावातील एका व्यक्तीला झोपची ही विचित्र समस्या जाणवली होती. ती व्यक्ती दुचाकीवर प्रवास करत असताना तिला डोळ्यांवर झोप जाणवत होती. तिनं तोंडावर पाणी मारण्यासाठी रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली तर तो तिथेच झोपी गेला.

त्यानंतर हळूहळू गावात असे प्रकार वाढताना दिसू लागले. शासन आणि प्रशासनानं तत्काळ याठिकाणी शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्स पाठवले. मात्र, या ‘स्लिपिंग सिकनेस’मुळं ते देखील गोंधळात पडले होते. त्यांनी गावातील लोकांची रक्ततपासणी केली. त्यानंतर पाणी, माती आणि हवेच्या देखील शेकडो चाचण्या करण्यात आल्या होत्या. 

२०१४ मध्ये कझाकस्तानचे अध्यक्ष नूरसुल्तान नजारबायेव यांनी कलाची गावातील समस्येत वैयक्तिक लक्ष घातलं होतं. तर, पंतप्रधान करीम मासीमोव्ह यांनी संशोधनाचं संयोजन करण्यासाठी एक कमिशन देखील स्थापन केलं होतं. वर्षाच्या अखेरीस जगभरातील सुमारे २० हजार प्रयोगशाळांनी गावात येऊन हवा, माती, पाणी, अन्न, प्राणी, बांधकाम साहित्य आणि रहिवाशांवर विविध चाचण्या केल्या होत्या.

जेव्हा शास्त्रज्ञ झोपेच्या आजाराचे शास्त्रीय धागेदोरे शोधण्यात व्यस्त होते. त्यावेळी गावकरी आणि शेजारील गावांमधील लोक देखील आपापले तर्क लावत होते. गावाजवळील डोंगरात असलेली सोव्हिएत काळातील युरेनियमची खाण, या सर्व समस्येच्या मागे असल्याचा अंदाज अनेक गावकऱ्यांनी व्यक्त केला होता. जरी ही खाण आता बंद असली तरी त्यातून निघणाऱ्या रेडिएशनमुळेचं गावकऱ्यांची ही अवस्था आहे. मात्र, प्रशासनानं याचं खंडन केलं होतं.

कलाची गावाजवळ सोव्हिएत काळातील ‘Krasnogorskiy’ नावाची खाण आहे. त्या ठिकाणावरून सोव्हिएत युरेनिअमचं उत्खनन करत असे. अणूउर्जा निर्मितीसाठी त्याचा उपयोग केला जाई. मात्र, ही खाण १९९० पासून बंद आहे असून त्याठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम सुरू नाही. कलाची गावाप्रमाणं इतर देखील गावं खाणीच्या जवळ आहेत. त्याठिकाणी अशी कुठलीही समस्या समोर आली नाही. त्यावेळी खाणीत काम करणारे अनेक लोक अद्याप हयात आहेत. त्यांच्यापैकी कुणालाही झोपेचा आजार जडलेला नाही, असा दावा प्रशासनाचा होता.

शेवटी २०१५ मध्ये, कलाची गावातील लोकांच्या झोपेचं रहस्य उलगडण्यात शास्त्रज्ञांना यश आलं. विषारी कार्बन मोनॉक्साइडच्या जास्त पातळीमुळे झोपेची समस्या निर्माण झाल्याचं समोर आलं.

कलाचीमध्ये करण्यात आलेल्या विविध चाचण्यांमध्ये कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोकार्बनची पातळी सामान्य ठिकाणांपेक्षा १० पटीनं जास्त होती. हे प्रमाण युरेनिअमच्या खाणीमुळेचं वाढली होती, हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं. त्यानंतर याबाबत कझाकिस्तान सरकारनं एक अधिकृत निवेदनही प्रसिद्ध केलं होतं. 

जानेवारी २०१६मध्ये रेडिएशन सिक्युरिटीसाठी असलेल्या राष्ट्रीय अणु केंद्राचे संचालक सर्जी लुकाशेन्को यांनी देखील कबूल केलं की, कलाची गावामध्ये कार्बन मोनोऑक्साइडची पातळी दहापट जास्त होती. यामुळे हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं आणि त्यांना अतिझोपेची समस्या सुरू झाली.

यासर्व प्रकारानंतर कलाची गावातील अनेक नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं. प्रशासनानं देखील काही सुरक्षेच्या उपाययोजना करता येतील का? याबाबत कार्यवाही सुरू केली. या विचित्र समस्येमुळं कलाची गाव मात्र, झोपेचं गाव म्हणून प्रसिद्ध झालं.

उत्तम वास्तुकलेचा नमुना असूनही हे शहर आज ओस पडलंय..!

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


भूतप्रेत, पिशाच्च ह्या सगळ्या मानवी संकल्पना आहेत. कुणी याला अंधश्रद्धा मानतं तर कुणीचा यावर विश्वास असतो. बरेचदा आपल्या मित्रमैत्रीणींमध्ये, कुटुंबात हा विषय निघाला की निरनिराळे गमतीदार किस्से ऐकायला मिळतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुभवानुसार तिखटमीठ लावून गोष्टी सांगतो. कधी आपला विश्वास बसतो, कधी नाही!

या मागे युक्तीवाद असाही केला जातो की, ज्याप्रमाणे या ब्रम्हांडात चांगल्या शक्ती आहेत, तशा वाईट शक्ती देखील आहेत. या सगळ्या संकल्पना मानवी विचारांच्या पलीकडे आहेत. पण जर एखाद्या शहरात माणसं नाही तर भुतं राहतात असं कुणी म्हणालं तर?

क्रँको हे शहर ‘भूतांचं शहर’ अर्थात ‘सिटी ऑफ घोस्ट’ म्हणून ओळखलं जातं. २०१० साली ‘वर्ल्ड मॉन्युमेंट फंड्स’च्या यादीत या शहराचं नाव समाविष्ट करण्यात आलं.

२० व्या शतकाच्या शेवटी तेथील सर्व नागरिकांनी या शहराचा त्याग केला. इटली या देशाच्या दक्षिणी टोकावर हें सुंदर व सुबक पण निर्जीव शहर वसलेलं आहे. टोरांटोच्या खाडीपासून ४० किलोमीटरच्या अंतरावर ‘बूट ऑफ इटली’च्या कमानीवर स्थित आहे.



शहराच्या संरक्षणासाठी हे शहर उभं एका डोंगरावर बांधलं आहे. शहराची बांधणी वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे.

आक्रमकांपासून वाचवण्यासाठी योग्य ती काळजी शहराच्या बांधणीत विचारात घेतली गेली. त्यामुळे कुठल्याही शत्रूची या शहराकडे बघण्याची हिंमत कधी झाली नाही. या शहराची बांधणी जशी बुलंद आहे, त्याच प्रमाणे तिथले एकेकाळचे रहिवासी देखिल तितकेच बुलंद होते. शहराने अनेक बिकट प्रसंग बघितले.

या सगळ्या प्रसंगाशी सामना करून जवळपास १९ व्या शतकापर्यंत आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं. शतकाच्या शेवटी पूर , दुष्काळ व इतर नैसर्गिक आपत्तीग्रस्तांनी शहराचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. जवळपास १३०० नागरिकांनी आपलं वास्तव्य दक्षिण अमेरिकेत हलवलं. त्यानंतरसुद्धा भूस्खलन १९७२ चा पूर, १९८० चा भूकंप यामुळे शहराची परिस्थिती अधिक बिकट होत गेली व शेवटी १८०० नागरिकांना हलवण्यात आले. हे स्थलांतर कुणाच्याच इच्छेनुसार होत नव्हतं, पण दुसरा उपाय नसल्यामुळे जड अंतःकरणाने नागरिकांनी शहर सोडलं. पण एका व्यक्तीने शहर सोडण्यास नकार दिला. आयुष्याचे शंभर वर्ष आपल्या जन्मभूमीवर घालवेल असं सांगून त्याने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला!

पुराव्यांनुसार जवळपास ८व्या शतकापासून वसाहत होती. काही ग्रीक साधू येथे राहत. त्यावेळी ‘सोन्याचा डोंगर’ अर्थात ‘माउंटेन ऑफ गोल्ड’ म्हणून अशा या शहराचा उल्लेख आढळतो. पण इथे सोनं म्हणजे नागरलेली जमीन किंवा सुपीक जमीन या अर्थाने!

इ.स पूर्व १०६०, साली अर्लाण्डो नावाचा राजा तेथे राज्य करत होता असा उल्लेख आहे. त्यानंतर सत्ता नोबेलमन एर्बर्टोकडे गेली. तेराव्या शतकात तिथे एक विद्यापीठाची स्थापना झाली. यामुळे शहराची लोकसंख्या वाढत गेली.

१६०० साली शहरात पहिल्यांदा लँडस्लाइड म्हणजेच भूस्खलेन झालं. यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली. या संकटातून शहर पुर्ण सावरलं नव्हतं तर आणखी एक भयंकर संकट शहरावर कोसळलं. १६५६ साली मृत्युने थैमान घातला ‘ब्लँक डेथ’ या आजाराची साथ पसरली. या आजाराने अनेकांचे बळी घेतले आणि लोकसंख्या कमी होत गेली.

१८१५मध्ये या शहराला दोन जिल्ह्यांमधे विभागाण्यात आलं. १८१६ साली इटलीच्या एकीकरणानंतर सूत्र कार्मिन क्रोकोकडे गेले.

आज हे शहर अनेक हॉलीवूडच्या चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी वापरलं जातं. पण या शहराचे सौन्दर्य टिकवण्यासाठी एकावेळी ३५ लोकांनाच तिथे राहण्याची परवानगी मिळते. २००७ साली पूर्वी राहत असलेल्या नागरिकांनी एकत्र येवून क्रँको सोसायटीची स्थापना केली. ‘या शहराच्या आठवणी कायम आमच्या मनांत कोरल्या गेल्या आहेत’, असं मत स्थानिक व्यक्त करतात.

या स्त्रीने आपण राजघराण्याचे वारस असल्याचे खोटे सांगून सरकारकडून महाल बळकावला होता

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


हॉरर सिनेमांमध्ये एक गोष्ट साधारणपणे दिसून येते, ती म्हणजे घनदाट जंगलामध्ये असलेला पडका आणि शापित वाडा! कित्येक चित्रपटांमध्ये आपण असे वाडे पाहिले आहेत. मात्र, दिल्लीमध्ये असलेला ‘मालचा महल’ हा खराखुरा शापित वाडा म्हणून प्रसिद्ध (किंवा कुप्रसिद्ध) आहे. ‘विलायत महल’ या नावानेही ओळखला जाणारा हा महाल खरंतर एक प्रकारचं फार्म हाऊसारखा होता. स्वातंत्र्यपूर्व काळातील राजे-महाराजे जंगलात शिकारीसाठी गेल्यावर या महालात राहत.

दिल्लीच्या बिस्तदरी रोडवर असणाऱ्या बुद्ध जयंती पार्कमध्ये असलेला हा महाल, आज अतिशय पडक्या स्थितीत आहे. याठिकाणी गेलेले लोक एकतर अतिशय घाबरलेल्या अवस्थेत परतले आहेत, किंवा गायबच झाले आहेत.

विलायत महालमध्ये गेलेले कित्येक पत्रकार गायब झाल्याचं बोललं जातं. मात्र, यात कितपत तथ्य आहे हे कोणालाच माहिती नाही.

हा विलायत महाल होता कोणाचा, तिथं कोण रहायचं आणि असं काय झालं होतं की आज या महालाकडे सगळे भुताटकीच्या दृष्टीने पाहतात?

यासाठी आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळात जावं लागेल. १३२५मध्ये दिल्लीचा तेव्हाचा शासक फिरोज शाह तुघलकाने हा महाल बांधला होता. मात्र, याला विलायत महाल हे नाव स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मिळालं. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सर्व संस्थानांचं विलिनीकरण झालं, आणि बरेच राजवाडे सरकारजमा झाले.



यानंतर १९७०मध्ये ‘बेगम विलायत महल’ या महिलेने हा महाल आपला असल्याचा दावा केला. आपण अवधच्या राजघराण्यातील असून या वाड्यावर आपला हक्क असल्याचा दावा या बेगमने केला. आपण अवधचे नवाब वाजिद अली शाहची नात असल्याचं या महिलेचं म्हणणं होतं.

सरकारने जप्त केलेली आपली सर्व संपत्ती परत करावी, अशी मागणी बेगम विलायतने केली होती. मात्र, सरकारने तिची मागणी फेटाळली. यानंतर तिने आधी लखनऊ आणि मग दिल्लीच्या रेल्वे स्थानकांमधील व्हीआयपी वेटिंग रुममध्ये राहून आंदोलन सुरू केलं. तिच्यासोबत तिची दोन मुलं, १३ श्वान आणि सात नोकरही होते. तब्बल नऊ ते दहा वर्षं ते याठिकाणी राहिले. या दरम्यान त्यांनी विविध अधिकाऱ्यांना, देशाच्या पंतप्रधानांना आणि अगदी पार इंग्लंडची राणी एलिझाबेथलाही पत्रं लिहिली होती. अखेर १९८४मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या सर्वांची भेट घेतली. त्यानंतर प्रशासनाला आदेश देऊन १९८५मध्ये हा महाल त्यांना देण्यात आला. मात्र, त्यानंतरही बेगम विलायतने आपल्या इतर संपत्तीसाठी मागणी सुरुच ठेवली.

सरकारने त्यांना महाल तर दिला. मात्र, या महालाला ना खिडक्या होत्या ना दरवाजे. स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षांपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या या महालाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. त्यातच जंगलात असलेल्या या महालामध्ये साप-विंचू आणि वटवाघळांनी घर केलं होतं. दिल्लीच्या इतर भागामध्ये वीज आणि पाणी पोहोचली असली, तरी या महालापर्यंत या सुविधा पोहोचल्या नव्हत्या. तरीही बेगम विलायत आपल्या दोन मुलांसह तिथं रहायला गेली. त्यानंतर त्या तिघांचा इतर जगाशी संपर्कच तुटला. अशा परिस्थितीमध्ये राहिल्यानंतर त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला नसता तर नवलच!

यानंतर १९९३मध्ये बेगम विलायतचा मृत्यू झाला. तिने ‘ड्रिंक ऑफ सायलन्स’ पिऊन आत्महत्या केली होती. वेगवेगळे विषारी पदार्थ, आणि तिच्याकडे असलेले हिरे-मोती यांचा चुरा एकत्र करुन तिने हे ‘पेय’ बनवलं होतं असं म्हणतात. यानंतर तिच्या मुलांनी तिचा मृतदेह जतन करुन ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वर्षभराने त्यांनी तिचा मृतदेह (सांगाडा) दफन केला.

हे लोक या महालात येण्याच्या आधीपासूनच लोकांना या महालाबाबत कुतूहल निर्माण झालं होतं. या महालामध्ये खजिना असल्याच्या अफवाही पसरल्या. त्यामुळे लोकांनी याठिकाणी शिरुन खजिन्याच्या शोधात ठिकठिकाणी खड्डे खणून ठेवले होते. हे प्रकार तिघे याठिकाणी रहायला आल्यानंतरही थांबले नव्हते. त्यामुळे १९९०मध्ये दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरनी त्यांना बंदूक बाळगण्याची परवानगी दिली होती. यानंतर त्यांनी महालाच्या गेटवर बोर्डच लावला : ‘एन्ट्री रिस्ट्रिक्टेड. कॉशन ऑफ हाऊंड डॉग्ज. इंट्रूडर्स शाल बी गनडाऊन’. यानंतर इकडे भटकणाऱ्यांची संख्या कमी झाली.

विलायतच्या मृत्यूनंतर महालामध्ये केवळ विलायतचा मुलगा रियाज उर्फ सायरस आणि मुलगी सकीना महल राहू लागले. आधीच लोकांशी कमी असलेला संबंध नंतर तर पूर्णपणेच तुटला.

सकीना आणि सायरस हे केवळ पत्रकारांशी बोलत, तेही अगदी कमी. बीबीसीच्या एका पत्रकाराने आत प्रवेश मिळवण्यासाठी आपल्या सहा वर्षांच्या मुलाची मदत घेतली होती. लहान मुलाला सोबत पाहून तरी सायरस आपल्यावर गोळी चालवणार नाही, अशी अपेक्षा ठेऊन तो पत्रकार आत गेला होता.

न्यूयॉर्क टाईम्सच्या एका पत्रकाराने सांगितलं, की हे दोघेही कोणाला भेटण्यास तयार होत नसत. अगदी क्वचित कधीतरी ते पत्रकारांना भेटत होते. मात्र, त्यातही ते केवळ विदेशी पत्रकारांना संधी देत. ए‌ॅलेन बॅरी या पत्रकाराची आणि सायरस यांची वारंवार भेट होऊन चांगली मैत्री झाली होती. २०१६मध्ये पहिल्यांदा भेट झाल्यानंतर पुढे सुमारे दीड वर्षांपर्यंत कितीतरी वेळा ए‌ॅलेनने सायरसची भेट घेतली होती. या सर्व भेटींदरम्यान सायरसने आपली बहीण सकीनाचा कितीतरी वेळा बोलण्यात उल्लेख केला होता. मात्र, ए‌ॅलेनला ती कधीही भेटली नाही. मग काही महिन्यांनंतर त्यानं सांगितलं, की २०१३मध्येच सकीनाचा मृत्यू झालाय. त्यानंतरही ए‌ॅलेन आणि सायरसमध्ये काही भेटी झाल्या. मात्र, २०१७मध्ये एका कामासाठी ए‌ॅलेना भारताबाहेर गेल्यानंतर तीनच महिन्यांनी सायरसचाही मृत्यू झाला.

ए‌ॅलेन बॅरीने पुढे सायरसच्या जीवनावर ‘द जंगल प्रिंस ऑफ दिल्ली’ असा लेख लिहिला. हा लेख पुढे पत्रकारितेतील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्काराच्या शर्यतीतही पोहोचला होता. हा लेख प्रकाशित झाल्यानंतर बॅरीने या कुटुंबाची अधिक माहिती घेण्यास सुरू केलं. त्यासाठी ती लखनऊला गेली, जिथे अवध साम्राज्य होतं, आणि विलायतचं कुटुंब काही काळासाठी राहिलं होतं. तिथं विलायतबाबत चौकशी केल्यानंतर तिला समजलं, की ती राजघराण्याची वारस असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. स्थानिकांनीही हे मान्य करण्यास नकार दिला, की ती राजघराण्याशी संबंधित होती.

पुढे बॅरीला हेही समजलं, की सायरसचा एक मोठा भाऊही होता, जो आता इंग्लंमध्ये होता. हा शाहिद विलायतला पैसे पाठवत असे. या कुटुंबाचं खरं आडनाव महल नसून, ‘बट’ असल्याचंही त्याने सांगितलं. तसेच, आपला राजघराण्याशी कोणताही संबंध नसून, आपले वडील लखनऊ विद्यापीठात रजिस्ट्रार होते; आणि आपला मोठा भाऊ पाकिस्तान एअर फोर्समध्ये होता अशी माहितीही शाहिदने दिली.

पुढे असंही समोर आलं, की विलायत ही मूळची काश्मिरी होती. फाळणीच्या वेळी ती आपल्या कुटुंबीयांसह पाकिस्तानला गेली होती. याठिकाणी पाकिस्तानी पंतप्रधानांसोबत झालेल्या एका घटनेनंतर तिला वेड्यांच्या इस्पितळात ठेवण्यात आलं होतं. तिथं तिच्यावर शॉक थेरपीही वापरण्यात आली होती.

याठिकाणाहून सुटल्यानंतर ती आपल्या मुलांसह भारतात आली होती. याच्या काही दिवसांनंतरच शाहीद पळून गेला होता. तेव्हापासून ती सायरस आणि सकीनासोबत राहत होती. मात्र मग ज्याप्रकारे तिनं “मालचा महाल” मिळवला, आणि त्यात कित्येक वर्षं राहिलीही; ते पाहता तिला वेडी म्हणायचं की नाही हाच प्रश्न पडतो.

हा ‘विलायत महाल’ आज अगदीच मोडकळलेल्या अवस्थेत आहे. बेगम विलायत आणि त्यानंतर तिच्या दोन मुलांच्याही याठिकाणी झालेल्या मृत्यूमुळे या महालाभोवती गूढ वलय निर्माण झालंय. ज्याचीच परिणीती भुताटकीच्या कथांमध्ये होत आहे. २०१९मध्ये ‘इंडियन ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज’, म्हणजेच इनटॅचनं, या महालाची डागडुजी करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे मांडला होता. यावर अद्याप निर्णय बाकी आहे. मात्र, याची डागडुजी झाल्यानंतर दिल्लीमध्ये हे एक आकर्षक पर्यटनस्थळ होईल, हे नक्की!

हॉंगकाँगमधील या ‘कॉफिन होम्स’मध्ये माणसं अगदी किड्यामुंगीसारखं जगतायत

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


मुंबईच्या धारावीतील झोपडपट्टी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे असं म्हणतात. त्याठिकाणी १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या राहते. धारावीला अनेक समस्यांचं मूळ मानलं जातं होतं. मात्र, धारावीकर आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळं धारावीनं कात टाकली आहे. याठिकाणी अनेक गृहउद्योग सुरू आहेत. १ मिलीयन युसएस डॉलर्स इतका एकट्या धारावीचा वर्षभराचा टर्नओव्हर आहे. एवढंच काय पण, कोरोनाच्या महाभयंकर महामारीवर धारावीकरांनी सर्वात अगोदर नियंत्रण मिळवलं. या सर्व सकारात्म गोष्टींकडे आपण सहज दुर्लक्ष करतो आणि झोपडपट्टी, तेथील रहिवासी आणि प्रशासनावर टीका करतो.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लागलेला धारावी हा शाप आहे, असं अनेकजण म्हणतात. मात्र, आपल्या आशिया खंडात एक असं शहर आहे ज्याला संपूर्ण जगाच्या आर्थिक उलढालीतील एक महत्त्वाचं केंद्र समजलं जातं. त्याठिकाणी हजारो लोक अक्षरश: किड्या-मुंग्यांप्रमाणं राहत आहेत, हे आपल्याला माहित आहे का?

हॉंगकॉंग!

हाँगकाँग म्हटलं की, लक्झरी ब्रँडनी, उंची दागिन्यांनी आणि निऑन रंगांमध्ये चकाकणाऱ्या शॉपिंग स्ट्रिस्ट्स आपल्या डोळ्यांसमोर येतात. गगनचुंबी इमारतींमध्ये सुरू असलेले कोट्यवधी रुपयांचे व्यवसाय, दिवसागणिक डेव्हलप होणारं तंत्रज्ञान या गोष्टी हाँगकाँगच्या अविभाज्य घटक आहेत. या सर्व गोष्टींमुळं हाँगकाँग शहर हे जगातील सर्वात मोठं आर्थिक केंद्र बनलं आहे. मात्र, या ग्लॅमरस दर्शनी भागाच्या मागे काही अतिशय विदारक गोष्टी लपलेल्या आहेत.



या शहरात जवळपास २ लाख लोक एका खुराड्याच्या आकाराच्या जागांमध्ये राहतात. २ लाखांमध्ये ४० हजार लहान मुलांचाही समावेश आहे. हे लोक ज्या घरांमध्ये राहतात त्या घरांना ‘कॉफिन होम’, म्हटलं जातं.

७.५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या हाँगकाँगमध्ये जमिनीचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळं हाँगकाँगमधील गृहनिर्मिती व्यवसाय प्रचंड महाग झाला आहे. इंटरनॅशनली विचार केला असता, याठिकाणी घर घेण्यासाठी सर्वात जास्त रक्कम मोजावी लागते. घर भाडे थकल्याने मालकांना घराबाहेर काढलेल्या हजारो लोकांना रिकामे पडलेले क्वाटर्स आणि झोपड्यांमध्ये रहावे लागत आहे. स्वयंपाकघर आणि शौचालय एकत्रच असलेल्या या कॉफिन होम्समध्ये राहण्याशिवाय दुसरा पर्याय या लोकांकडे नाही.

हे ‘कॉफिन होम’ एखाद्या क्युबिकलप्रमाणं असतात. त्यात फक्त एक बेड आरामात बसेल इतकीचं जागा असते. अनेक कॉफिन होम्सला गजांच्या भिंती असतात त्यामुळं त्यांना ‘केज होम’ असंही म्हटले जाते. अशा प्रकारच्या निवासस्थानांचा उगम हाँगकाँगमध्येच झाला आहे. साधारण १९५० आणि ६०च्या दशकादरम्यान ‘कॉफिन होम’ ही संकल्पना उदयाला आली.

चिनी गृहयुद्धात चीनच्या मुख्य भूमीवरील लोक मोठ्या संख्येने हाँगकाँगमध्ये गेले. यामुळं तेथील अर्थव्यवस्था आणि जन्मदर दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. घरांच्या वाढत्या मागणीला सामोरं जाण्याच्या प्रयत्नात, हाँगकाँग सरकारनं अनेक सार्वजनिक गृहनिर्माण वसाहती बांधल्या. मात्र, तरीही चिनी स्थलांतरित कामगारांचा अतिरिक्त भार सरकार हाताळू शकलं नाही, त्यावेळी तिथं घरं किंवा कामगार संरक्षणविषयक धोरणं आणि कायदे नव्हते. परिणामी भाडे शुल्क कमी असलेल्या कॉफिन होम्सच्या संख्येमध्ये वाढ झाली.

प्रामुख्यानं शाम शुई पो, माँग कोक, तो क्वा वॅन आणि ताई कोक त्सुई या जुन्या जिल्ह्यांमध्ये अशा वसाहती अस्तित्त्वात आहेत. अतिशय कमी उत्पन्न असणारे, वयस्कर, ड्रग ऍडिक्ट आणि कमी कुशल मजुर प्रामुख्यानं या घरांमध्ये राहतात.

हाँगकाँग विधानपरिषदेच्या अहवालांनुसार, जे लोक अनुदानित भाडे आणि वीज माफी यांसारख्या समाजकल्याण योजनांसाठी आपली पात्रता सिद्ध करू शकत नाहीत, असेच लोक कॉफिन होम्समध्ये राहतात.

येथील बहुतांशी रहिवासी हे पुरुष आहेत. या घरांची सुरक्षा व्यवस्था अतिशय कमकुवत असते. ‘कॉफिन होम्स’ नावानं कुप्रसिद्ध असलेल्या या घरांना हाँगकाँग सरकारनं मात्र, ‘बेड स्पेस अपार्टमेंट्स’ म्हणून मान्यता दिलेली आहे. ‘बेड स्पेस अपार्टमेंट’ अध्यादेशानुसार एका घरामध्ये १२ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती भाडेतत्वार बेड घेऊ शकतात. कॉफिन होम्स चालवणं त्याठिकाणी कायदेशीर ठरवण्यात आलं असून घरमालकाला त्याअगोदर विशेष परवाना काढवा लागतो.

आपल्याकडे ग्रामीण भागात कोंबड्या किंवा शेळ्यांची नवजात पिल्ल सुरक्षित ठेवण्यासाठी खुराड्यांचा वापर केला जातो. या कॉफिन होमची या खुराड्यांशी एकदम अचूक तुलना होऊ शकते. अपार्टमेंटमधील एका फ्लॅटची अनेक भागांमध्ये विभागणी केली जाते. एका भागामध्ये दोन किंवा तीन बेड असतात. त्यांची देखील लोखंडाच्या किंवा स्टीलच्या गजांनी विभागणी केलेली असते. म्हणजे एक बेड बसेल इतकी आणि त्याच्या बाजूची थोडीशी जागा हेच तुमचं घर असतं. त्याला दरवाजे नसतात.

एक प्रौढ व्यक्ती मोठ्या मुश्किलीनं त्याठिकाणी आपल्या गरजेच्या वस्तूंसह झोपू शकतो. या इतक्याशा जागेसाठी सुद्धा महिन्याकाठी जवळपास २ हजार ४०० हाँगकाँग डॉलर्स द्यावे लागतात.

नैसर्गिक प्रकाशाचा अभाव असलेली आणि कोंदट वातावरण असलेल्या या घरांचं तापमान देखील खूप जास्त असतं. साधारण ३४ अंश सेल्सियस तापमानात लोकांना रहाव लागतं. अनेकांचं तर किचन आणि टॉयलेट हे एकचं असतं. माशा, झुरळं, पाली, उंदीर आणि ढेकणांचं तर या ठिकाणी साम्राज्यच पहायला मिळतं.

‘कॉफिन होम्स’मध्ये राहणारे अनेकजण एकाकीपणाचे बळी ठरतात. कोंदड आणि अस्वच्छ घरांमध्ये राहिल्यानं अनेकजण मानसिक आजार आजारांना बळी पडतात. काही वृद्ध तर फक्त पिंजऱ्यात राहून आपल्या मृत्यूची वाट पाहत असतात.

हे सर्व दृश्य पाहून मी त्या दिवशी घरी आल्यानंतर धायमोकलून रडलो, अशी प्रतिक्रिया बेन लॅम या फोटग्राफरनं दिली. बेन यांनी चार वर्षांच्या काळात १००पेक्षा जास्त अपार्टमेंट्सला भेटी दिल्या आहेत. जेकब चेउंग दिग्दर्शित ‘केजमॅन'(१९९२) या चित्रपटात या घरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची असाह्य परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे.

संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार आणि सामाजिक व सांस्कृतिक हक्कांच्या आंतरराष्ट्रीय कराराच्या सार्वत्रिक घोषणापत्रानुसार कॉफिन होम्समुळं व्यक्तीच्या वास्तव्याच्या हक्कांचं उल्लंघन होतं. हाँगकाँगमधील अनेक नागरिक आणि सामाजिक संस्थांनी गरीब आणि निराधार लोकांसाठी आणखी सरकारी घरे बांधण्याची विनंती केलेली आहे. सीएनएननं या कॉफिन होम्सच्या वातावरणाविषयी वार्तांकन केलेले आहे. त्यांनी या घरांना एका बुटाच्या खोक्याची उपमा दिली आहे.

बाहेरून सुंदर दिसणाऱ्या आणि जगातील सर्वांत श्रीमंत शहराच्या झगमगाटामागे इतका घट्ट काळोख दडलेला असेल याची कुणी सहसा कल्पनाही करवत नाही!

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मानवाने डोळे विस्फारणाऱ्या वास्तुरचना उभ्या केल्या आहेत. आपण त्याचं तोंड भरून कौतुकही करतो. मात्र, आज उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान, अजस्त्र यंत्रसामग्री हे काहीही नसताना आपल्या पूर्वजांनी शेकडोच नव्हे तर हजारो वर्षांपूर्वी सध्याच्या वास्तूंपेक्षाही अवाक करणाऱ्या भव्य, देखण्या आणि मुख्य म्हणजे मजबूत वास्तू कशा उभारल्या असतील; ही कुतूहलाची बाब आणि कौतुकाचीही!

इजिप्तचे पिरॅमिड्स, भारतातली हजारो वर्षं जुनी मंदिरं, अजंठा, वेरूळसारखी लेणी अशा अनेक वास्तू आज आपल्याला ज्ञात आहेत आणि आपण पुरातन वारसा म्हणून त्यांचे जतनही करतो आहोत. मात्र, काळाच्या उदरात गडप झालेली अशी अनेक आश्चर्य अजून आपल्याला अज्ञात आहेत. काही उघडकीला येत आहेत.

त्यातलीच एक आश्चर्यकारक वास्तू म्हणजे जपानमध्ये समुद्राच्या तळाशी आढळलेली पिरॅमिड्स! या पिरॅमिड्सचं किमान वय १० हजार वर्षं किंवा त्याहूनही अधिक असू शकतं, असा काही तज्ज्ञांचा दावा आहे.

ओकिनावा जिल्ह्यात योनागुनी बेटाजवळ सन १९८६ मध्ये समुद्राच्या तळाशी एक वास्तुसमूह आढळून आला. एका स्थानिक डायव्हरने तो सर्वप्रथम पाहिला आणि त्याबाबत सागरी भूगर्भशास्त्रज्ञांना माहिती दिली. त्यानंतर सन १९९५ मध्ये त्याची पुरातत्व विभागाकडे अधिकृत नोंद करून त्यावर संशोधन करण्यात येत आहे.

या वास्तुसमूहामध्ये एका वाड्याचे अवशेष, कमान, पाच मंदिरं, एक मोठी स्टेडियमसदृश वास्तू, त्रिकोणी आकाराचे सार्वजनिक स्नानगृह, रंगमंच अशा वास्तूंचे अवशेष आहेत. या सर्व गोष्टी रस्ते आणि जलवाहिन्यांनी जोडलेल्या आहेत काही ठिकाणी संरक्षित भिंतींचे अवशेष आढळून येतात.



याशिवाय मुद्दाम खणलेले खड्डे, पायऱ्या, कासवाच्या आकाराचा खडक, गच्ची यांसह प्राचीन ‘काइडा’ लिपीमधील एक शिलालेखही सापडला आहे. पायऱ्यांवरून उतरत २५ मीटर खोल जाणारं पिरॅमिड ही इथली सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. हा संपूर्ण वास्तुसमूह ४५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उभा आहे. याशिवाय ओकिनावाच्या मुख्य बेटावर अशाच प्रकारच्या आणखी ५ वास्तूंचे अवशेष आढळून आले आहेत.

ज्येष्ठ सागरी भूगर्भशास्त्रज्ञ प्रा. मासाकी किमुरा यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांचा एक समूह या वास्तुसमूहावर संशोधन करत आहे. हे अवशेष किमान ५ हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा संशोधकांचा दावा आहे. पाण्याखाली आढळून आलेले हे दगडी बांधकामांचे अवशेष सुमारे २ हजार वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेल्या ‘अटलांटिस’ या शहराचे अवशेष आहेत, असंही एक मत आहे. प्रा. किमुरा आणि त्यांचे सहकारी मागच्या १५ वर्षांहून अधिक काळ या जागेचा अभ्यास करत आहेत.

मात्र, योनागुनीमध्ये जे काही सापडलं आहे ते मानवनिर्मित आहे, या प्रा. किमुरा यांच्या दाव्यांशी सर्व तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नाही. अनेक शास्त्रज्ञांच्या मते भूगर्भात घडणाऱ्या घडामोडींमुळे ही संरचना नैसर्गिकरित्या तयार झाली आहे. या दोन मतांवरून अभ्यासक आणि संशोधकांमध्ये मतमतांतरं आहेत. पायऱ्या किंवा गच्चीसारख्या दिसणाऱ्या या सर्व संरचना नैसर्गिक आहेत. भूस्तरांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या घडामोडींमुळे घडून येणाऱ्या रचनांचे हे उत्तम उदाहरण आहे. विशेषतः समुद्राच्या तळाशी असलेल्या पाण्याच्या दबावामुळे खडक तासले जाऊन अशा रचना आकाराला येतात, असाही काही संशोधकांचा दावा आहे.

प्रा. किमुरा यांच्या दाव्यानंतर वादाच्या फैरी मोठ्या प्रमाणावर झडल्या. तरीही ते आपल्या मतांबाबत ठाम आहेत. ‘मी या संरचनेबद्दल पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझी देखील ही नैसर्गिक रचना असल्याची धारणा होती. मात्र, पाण्याखाली उतरून प्रत्यक्ष पाहणी केल्यावर माझं मत बदललं’, असं ते सांगतात.

या संरचनांवर असलेला मानवी संरचनांचा प्रभाव लक्षात घेता त्या पूर्णपणे नैसर्गिक असल्याचं प्रा. किमुरा यांना मान्य नाही. समुद्राच्या तळाशी असलेल्या मानव आणि प्राणीसदृश आकृतींची प्रतिकृती त्यांनी प्रयोगशाळेत साकारली आहे. त्यावरून या आकृत्या आशिया खंडातील संस्कृतीतली प्रतीकं असल्याचं सूचित होतं. त्या मानवी आकृतीचं चिनी किंवा प्राचीन ओकिनावन राजाच्या प्रतिमेशी साधर्म्य आहे. हे शहर भूकंपामुळे जमिनीखाली गाडलं गेलं असेल आणि कालांतराने ही जमीन समुद्राच्या उदरात आली असेल, अशी शक्यता हा वास्तुसमूह मानवनिर्मित असल्याचं मत असणारे संशोधक वर्तवतात. पॅसिफिक समुद्रात अशी अनेक उदाहरणे आढळतात.

यापूर्वी एप्रिल १७१७ मध्ये योनागुनी जीमा येथे जगातल्या सर्वात मोठ्या त्सुनामीची नोंद झाली आहे. त्यावेळी ही महालाट तब्बल १३१ फूट (४० मीटर) पेक्षा जास्त उंचीच्या खडकावर धडकली होती. असंच काही यापूर्वी घडलं असावं. किनार्‍यावर सापडलेल्या अवशेषांमधून १ हजार ६०० वर्षांपूर्वीचा कोळसा मिळाला आहे. हा मानवाच्या प्राचीन अधिवासाचा संकेत आहे. मात्र, या ठिकाणी मानवी रहिवासाचे सुस्पष्ट पुरावे मिळणं कठीण होत आहे.

मातीची भांडी आणि लाकूड समुद्राच्या तळाशी टिकत नाही, तरीही संशोधकांना त्या जागेवर अधिक संशोधन करण्यात स्वारस्य आहे. काही ठिकाणी रंग दिलेला गायीसारख्या आकाराच्या भाग दिसून येतो. या भागावर अधिक लक्ष केंद्रित केलं तर ठोस काही तरी हाताशी लागण्याची शक्यता आहे.

कोबे विद्यापीठातील भूकंपशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक टोरू ओची हे प्रा. किमुरा यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेला दुजोरा देतात. जमिनीवर किंवा पाण्याच्या खाली असलेल्या भूभागावर नैसर्गिक घडामोडींचा असा परिणाम झाला नसल्याचं तिथे पाण्याखाली जाऊन पाहणी करून आलेल्या प्रा. टोरू सांगतात. प्रा. किमुरा यांच्या दाव्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. या रचना भूकंपामुळे किंवा नैसर्गिक प्रक्रियांमुळे तयार झालेल्या नाहीत हे उघड आहे, अशा शब्दात ते प्रा. किमुरा यांचं समर्थन करतात.

शासकीय पातळीवर या स्थळाबाबत उदासीनता दाखवली जात असल्याची खंत सांस्कृतिक क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांकडून व्यक्त होत आहे. जपान सरकारचा सांस्कृतिक विभाग आणि ओकिनावा जिल्हा प्रशासन योनागुनीमधल्या अवशेषांबाबत पुरेसे गंभीर असल्याचे दिसत नाही. त्यांना हा एक महत्वाचा सांस्कृतिक वारसा ठरू शकतो, याची जाणीवच नाही. कोणत्याही सरकारी यंत्रणेने या स्थळावर संशोधनही केलेले नाही किंवा त्याच्या जतनासाठी यंत्रणाही विकसित केलेली नाही. हे सगळं काम हौशी संशोधक आणि प्राध्यापकांवर सोडून दिलं आहे, अशी टीका होत आहे.

योनागुनी जिमा हे जपानच्या रिऊक्यू द्वीपसमूहाच्या दक्षिणेच्या टोकाजवळ, तैवानच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे ७५ मैल (१२० किलोमीटर) अंतरावर असलेले एक बेट आहे. योनागुनीला जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे नोंद करणे आवश्यक आहे. नोंदणी करून कोणीही पर्यटक आणि संशोधक या ठिकाणी मुक्तपणे डुबकी मारू शकतात.

योनागुनीच्या ही संरचना नैसर्गिक आहे की मानवनिर्मित, याबाबत संशोधकांमध्ये मतभेद आणि वादविवाद होत असले तरीही ते स्वागतार्हच आहेत. कारण त्यातून जगातलं एक आश्चर्यकारक कोडं उलगडायला मदत होणार आहे. ते मानवनिर्मित आहेत असं सिद्ध झालं तरीही एका अज्ञात संस्कृतीची आणि त्यांच्या कर्तृत्वाची ओळख होणार आहे. ही संरचना नैसर्गिक असेल तर निसर्गाच्या शक्तीची मानवाला पुन्हा एकदा जाणीव होईल.

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


मानवाने अश्मयुगापासून आतापर्यंत जगण्याच्या संघर्षात अनेक महत्वाचे टप्पे पार पाडले आहेत. त्याच प्रमाणे, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या आहेत. त्यातून आकाराला आल्या आहेत अनेक प्रकारच्या अभूतपूर्व वास्तू आणि रचना! वेगवेगळ्या कालखंडात साकारलेल्या अशा अद्भुतरम्य वास्तुरचना उजेडात येण्यामागच्या कथाही त्यांच्या निर्मितीच्या कथांइतक्याच अद्भुतरम्य आहेत.

तुर्कस्तानच्या जवळ जवळ केंद्रभागी असलेल्या कॅपाडोशिया या परिसरात घर असलेल्या एका माणसाला त्याच्या घरात एक खोली वाढवायची होती. त्यासाठी त्याने १९६३ साली घराला लागून असलेली एक जुनी दगडांची भिंत पाडण्याच्या कामाला सुरुवात केली. काम जसजसं पुढे सरकू लागलं तसतसं एक अद्भुत रहस्य उलगडत असल्याची जाणीव त्या माणसाला झाली आणि त्या कामात सहभागी असलेल्या अन्य लोकांनाही!

या जमिनीच्या खाली कातळ कोरून तयार केलेली एक विस्तीर्ण गुहा असल्याचं या भिंत पाडण्याचं काम करणाऱ्या लोकांना लक्षात आलं.

या गुहेत उतरल्यानंतर एकमेकांना जोडणाऱ्या अनेकविध गुहांचं एक शहर; अशा अनेक प्राचीन नगरांची एक मालिकाच जमिनीखाली असल्याचं त्यांना आढळून आलं. या मानवी वसाहतीचं एकूण क्षेत्रफळ तब्बल तीन लाख चौरस फूट होतं.

ही भूमिगत शहरं इ.स.पू. आठव्या आणि सातव्या शतकात फ्रिगियन लोकांनी बांधली होती, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. त्या काळातल्या वास्तुकारांनी या प्रदेशातील ज्वालामुखीपासून बनलेल्या मऊ खडकांमध्ये कातळ कोरून तयार केलेल्या गुहांमध्ये विस्तीर्ण वसाहत उभी केली होती. कॅपाडोशियामध्ये सुमारे २०० वसाहती आहेत.



प्रामुख्याने परकीय आक्रमकांपासून स्थानिक नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी ही भूमिगत वसाहत उभारण्यात आली होती. त्या काळात हजारो नागरिक बाहेरच्या जगापासून; विशेषतः आक्रमकांपासून सुरक्षित असं संपूर्ण गुप्ततेत त्यांचं जीवन व्यतीत करत होते. विशेषतः चौदाव्या शतकात या भूमिगत लेण्या आणि गुहांनी ख्रिश्चन नागरिकांना तैमूरच्या नेतृत्वाखालील मंगोलियनांच्या आक्रमकांपासून सुरक्षित ठेवले.

अगदी विसाव्या शतकातही स्थानिक लोक ऑटोमन साम्राज्याच्या काळात या भूमिगत वसाहतींच्या आश्रयाला गेले. ग्रीस आणि तुर्कस्तान यांच्यात लोकसंख्येची अदलाबदली झाल्यानंतर साधारणतः सन १९२३ पासून ही भूमिगत वसाहत ओसाड होऊन जमिनीखाली गाडली गेली. त्यानंतर सन १९६३ पर्यंत ती अज्ञातच राहिली.

कॅपाडोशियामधल्या या भूमिगत शहरांपैकी सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेलं शहर म्हणजे डेरिंक्यु! हे शहर बायझेंटाईन साम्राज्याच्या काळात उभारण्यात आलं होतं. तेथील स्थानिक रहिवाशांनी सन ७८० आणि ११८० च्या काळात अरब आणि बायझेंटाईन युद्धांदरम्यान मुस्लिम अरबांपासून स्वसंरक्षणासाठी त्याचा वापर केला. हे शहर जमिनीखाली सुमारे ६० मीटर (१९७ फूट) खोल बहुमजली लेण्या आणि गुहांनी बनलेलं होतं.

त्याकाळी सुमारे २० हजार नागरीक, आणि त्यांच्याकडचं पशुधन यांना या वसाहतीत आश्रय मिळाला. त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या गरजेएवढे अन्नधान्य साठवण्याची क्षमता या वसाहतीत होती. कॅपाडोशिया हे भूमिगत वसाहत समूहामधलं आणि संपूर्ण तुर्कस्तानमधलं सर्वात खोल भूमिगत शहर आहे. डेरिंक्यु हे शहर सन १९६९ मध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी खुलं करण्यात आलं. मात्र, या शहराचा केवळ निम्म्या भागातच प्रवेश करण्याची परवानगी आहे.

या शहरात स्थानिकांची मोठी वसाहत असताना शहराला दोन मोठे दगडी दरवाजे होते. धोक्याच्या वेळी ते आतून बंद केले जात. या शहराच्या रहिवाशांना जरी या भूमिगत वसाहततीत लपून रहावं लागत असलं तरी त्यांची दिनचर्या निर्विघ्नपणे पार पडत होती.

वाइनचे साठे, जनावरांचे गोठे आणि तबेले, धान्य कोठारं अशा सुविधा या शहरात असल्याचं त्यांच्या अवशेषांवरून दिसून येतं. डेरिंक्यु शहरात धार्मिक शिक्षण देणारी एक सुसज्ज प्रशालाही होती. त्यामध्ये अध्ययन आणि अध्यापनासाठी अनेक स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. बोगद्यांच्या जाळ्याने डेरिंक्यु हे इतर भूमिगत शहरांशी जोडलेलं आहे.

कायमाकली हे या परिसरातलं आणखी एक महत्वाचं भूमिगत शहर! या शहराला प्राचीन काळात एनीगुप या नावाने ओळखलं जायचं. या भूमिगत शहराचा उपयोगही अरब आणि बायझेंटाईन यांच्या युद्धांच्या काळात अनेक शतकं स्थानिक रहिवाशांसाठी आश्रयस्थान म्हणून केला गेला. याच्या विशिष्ट प्रकारच्या विस्तारामुळे ते तुर्कस्तानमधलं सर्वांत मोठं भूमिगत शहर बनलं. कायमकली भूमिगत वसाहतीची लोकसंख्या सुमारे साडेतीन हजार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

सन १९६४ साली हे शहर पर्यटकांना भेट देण्यासाठी खुलं करण्यात आलं. सन १९८५ मध्ये या भूमिगत शहराला युनेस्कोकडून ‘जागतिक वारसा’ हा दर्जा देण्यात आला. या शहराचा विस्तार जमिनीखाली २० मीटर (६६ फूट) खोल आहे. हे शहर जमीन सपाटीपासून ८ पातळ्या खोलवर आहे. या पैकी वरच्या ४ पातळ्यांपर्यंत पर्यटक, अभ्यागतांना जाता येतं.

त्या काळच्या नियमानुसार शहरातली सर्वांत श्रीमंत कुटुंबं जमिनीच्या पृष्ठभागाजवळच्या टप्प्यांमध्ये राहत असत. कायमकली वसाहतीत गोठे, तबेले, शेतकऱ्यांची घरं, एक चर्च, आजही वापरात असलेली काही गोदामं आणि सामुदायिक स्वयंपाक घरही आढळून येतं. या स्वयंपाकघरात संपूर्ण शहराच्या लोकसंख्येला पुरेल एवढं जेवण बनवलं जात असे.

या अनोख्या भूमिगत शहरांमधून फेरफटका मारताना अनेक ठिकाणी मोठमोठे गोलाकार दगड रस्त्यांच्या बाजूला पडलेले दिसून येतात. जर या भूमिगत शहरात आक्रमकांनी चुकून प्रवेश केलाच तर त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी म्हणून किंवा बंद करण्यात आलेल्या दरवाज्यांना अधिक बळकटी देण्यासाठी म्हणून या दगडांचा उपयोग केला जात असे. आक्रमक शहरात घुसले तरी त्यांना चकवण्यासाठी अनेक प्रकारचे भुलभुलैय्ये या शहरांमध्ये तयार करण्यात आले आहेत. अंधाऱ्या गुहा, पुढे जाऊन बंद होणारे रस्ते, जिने, केवळ स्थानिकांनाच सापडू शकतील अशा चोरवाटा यांचा त्यात समावेश आहे.

या भूमिगत शहरांना पाण्याचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी अनेक विहिरी बांधण्यात आलेल्या आहेत. या विहिरींवर सर्वात खालच्या पातळीवरच्या माणसांचं नियंत्रण असायचं. या विहिरी वरून येणाऱ्यांना सहजपणे दिसून येऊ नयेत, यासाठी त्यांच्या मुखाजवळ मोठमोठाल्या शिळा आणि लाकडी ओंडके ठेवले जात. त्यामुळे आक्रमकांनी शहरात प्रवेश करण्यात यश मिळवलं तरी पाण्याचे स्रोत सुरक्षित राहत असत.

डेरिंक्युच्या तुलनेत कायमकली शहरातले बोगदे अधिक अरुंद, तीव्र उताराचे आहेत. या दोन्ही शहरांना एक ९ किलोमीटर लांबीचा बोगदा जोडतो, परंतु तो वापरण्यासाठी अभ्यागतांना परवानगी नाही. मात्र, केवळ १० मिनिटांच्या ड्राईव्हने एका शहरातून दुसऱ्या शहरात जाता येतं. त्यामुळे एकाच दिवसात दोन्ही भूमिगत शहरांची सफर करणं शक्य आहे.

या भूमिगत शहरात जाण्यासाठी नेवसेहीर या जवळच्या शहरातून नियमितपणे शेअर टॅक्सी किंवा मिनीबस उपलब्ध होऊ शकते. नेवसेहीरपासून एका चांगल्या पक्क्या रस्त्याने खाली जाणारा हा सरळ प्रवास आहे. कायमाकलीपर्यंत जाण्यासाठी २० मिनिटं, तर डेरिंक्युला जाण्यासाठी ३० मिनिटं लागतात.

या ठिकाणी भेट देण्यासाठी प्रवेश शुल्क आकारण्यात येतं. या ठिकाणी जाण्यासाठी गाईड्सही उपलब्ध होऊ शकतात.

अशा या अनोख्या ठिकाणांना आणि वास्तूंना भेट देणं हे केवळ मनोरंजनाचा आणि पर्यटनाचाच भाग आहे असे नाही. अशा ठिकाणी भेट दिल्यानंतर इतिहास आणि संस्कृतीकडे बघण्यासाठी एक नवी दृष्टी आपल्याला प्राप्त होते. माणसाचा एकूण प्रवास जाणून घेण्यासाठी ही दृष्टी निश्चितपणे मार्गदर्शक ठरते.

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


भारताच्या नैऋत्य (साऊथ ईस्ट) भागातील अंदमान-निकोबार बेटांचा समूह देशाचा अविभाज्य भाग असले तरीही मुख्य भूमीपासून ते साधारणतः हजारो किलोमीटर लांब आहेत.  ही बेटे सेल्युलर जेलसाठी प्रसिद्ध असली तरीही याच भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींचे जीवन देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथील अनेक आदिवासी जमाती अजूनही आधुनिक जीवन न जगता पारंपरिक आणि निसर्गाशी जवळीक साधणारं जीवन व्यापन करीत आहेत. अशाच प्रकारचे पण आगळे वेगळे जीवनपद्धती असणाऱ्या एका आदिवासी जमातीचे अस्तित्वमात्र देशांतर्गत वादांमुळे आज धोक्यात आलं आहे.

अंदमानचा काही भाग थायलंड आणि म्यानमार या देशांमध्येसुद्धा येतो. समुद्रातील सीमारेषा निश्चित नसल्याने अंदमान सागरातील काही भागांवर थायलंडबरोबरच म्यानमारही आपला अधिकार सांगत आला आहे. पण या सीमावादामध्ये अंदमान सागरातील बेटांवर हजारो वर्षांपासून राहणारे आदिवासीमात्र भरडून निघत आहेत. तुम्ही कांतारा सिनेमा पहिलाच असेल, त्यामधील स्थानिकांची जी व्यथा असते तशीच या आदिवासींचीही आहे. त्यांना त्यांच्या निसर्गाशी संबंधित जीवनपद्धतीचे पालन करू दिले जात नाही. काय आहे नेमकं हे प्रकरण, जाणून घेऊया या लेखातून…

मोकन हे सेमी-नॉमॅडीक पद्धतीत मोडणारे ऍस्ट्रॉनेशियन आदिवासी, मरगुई या सुमारे ८०० बेटांच्या बेटसमूहांवर राहत आहेत. हे आदिवासी सुमारे ४ हजार वर्षांपासून येथे वास्तव्य करत आहेत. मरगुई या बेटसमूहावर आणि येथील समुद्रावर थायलंड आणि म्यानमार दोन्ही देश आपापला हक्क सांगतात. सुमारे ४ हजार वर्षांपूर्वी दक्षिण चीनमधून थायलंड, म्यानमार आणि मलेशिया याठिकाणी स्थलांतर केलेले हे लोक वर्षातील बहुतेक काळ काबांग  नावाच्या स्वहस्ते तयार केलेल्या होड्यांमध्ये राहतात.

मोकन लोक होड्यांचे समूह तयार करून सतत एका बेटावरून दुसऱ्या बेटावर स्थलांतर करीत असतात. या स्थलांतरांना दैनंदिन गरजा, वाऱ्यांची दिशा, रोगराई, सुरक्षा असे अनेक घटक कारणीभूत आहेत. सुरुवातीपासूनच ते संपत्ती, ऐषाराम आणि जगातील प्रगत तंत्रज्ञानापासून अलिप्त राहिले आहेत. वर्षभरातील मे ते ऑक्टोबर महिन्यांदरम्यान नैऋत्य मोसमी वारे पाऊस घेऊन येतात. वादळी वारे आणि पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी मोकन जमातीतील लोक मरगुई बेटसमूहाच्या पूर्वेकडील भागांमध्ये तात्पुरत्या झोपड्या तयार करून राहतात.



या जमातीतील लोक वनातील फळे, कंदमुळे, मध इत्यादींवर आपला उदरनिर्वाह करतात. तर औषधोपचार, बांधकाम आणि इंधनासाठी १५० हून अधिक वेगवेगळ्या झाडांचा उपयोग केला जातो, आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर खऱ्या अर्थाने ते ‘इको-फ्रेंडली’ जीवन जगत आहेत. 

आश्चर्यकारक बाब म्हणजे मोकेन मुलांची दृष्टी युरोपियन मुलांपेक्षा ५०% अधिक शक्तिशाली आहे असे स्वीडनमधील एका युनिव्हर्सिटीने केलेल्या वैज्ञानिक अभ्यासातून दिसून आले. शेकडो वर्षांपासून ते पाण्याखालीही डोळे उघडे ठेऊन शिकार करतात, त्यासाठी त्यांना लक्षही केंद्रित करावे लागते. याचे कारण म्हणजे ही मुलं आपले अन्न खोल समुद्रातून मिळवतात आणि पिढ्यन्पिढ्यापासून त्यांची ही क्षमता वाढतच गेली आहे..! आणखी खोल समुद्रात जायचे असल्यास हे लोक झाडाच्या सालीपासून आणि लाकडापासून तयार केलेले गॉगल्स वापरतात..

मोकन जमातीच्या लोकांना शांततामय आणि निसर्गसान्निध्य जीवन जगायचे आहे हेच या सगळ्यावरून लक्षात येतं. देशांच्या सीमा आणि वादांपासून कैक मैल लांब असणाऱ्या या नैसर्गिक आणि सागरी लोकांचे अस्तित्व मात्र आज राजकीय आणि आर्थिक कारणांनी धोक्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्सुनाम्या आल्यानंतर राबवलेल्या नियमांमुळे आणि सरकारी धोरणांमुळे या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचं आढळून आलं आहे. विविध तेल कंपन्या समुद्रात करीत असलेले ड्रिलिंग्स, सरकारने पर्यटनाच्या नावाखाली बळकावलेल्या जमिनी, बेसुमार मासेमारी आणि अशी अनेक कारणे या लोकांच्या अस्तित्वास धोका निर्माण करीत आहेत.

“एवढ्या मोठ्या प्रमाणात मासेमारी केल्यानंतर समुद्रातील मासेच संपले तर काय करणार?” असा करूण प्रश्न तेथील स्थानिक हुक सुरियन कटाले विचारतात. अनेक मोकन आदिवासींनी नाईलाजाने आपले पारंपरिक जीवन सोडून हस्तनिर्मित पारंपरिक वस्तू विकायला सुरुवात केली आहे, काही लोक होडी चालवण्याचं काम करीत आहेत तर काही लोक पर्यटन क्षेत्रात कचरा गोळा करण्याचं काम करताहेत. याठिकाणी नॅशनल पार्क्स तयार झाल्याने होड्या, घरे बांधायला आवश्यक असणाऱ्या लाकडांचीदेखील वानवा आहे. बाहेरून येणाऱ्या आणि पर्यावरणाबद्दल फक्त “बोलाची कढी आणि बोलाचा भात शिजवणाऱ्या” लोकांमुळे आज या निसर्गपुत्रांना त्यांच्याच भूमीत गुलामासारखे जीवन जगावे लागत आहे हीच दुर्दैवाची बाब.

असे असले तरीही काही मोकन कुटुंबे आजतागायत, कठीण परिस्थितीमध्येसुद्धा आपल्या पारंपरिक जीवनपद्धतीचे पालन करताहेत. परंपरेनुसार ही कुटुंबे वर्षांतील ७ ते ८ महिने समुद्रात आपापली काबांग’ घेऊन जातात. तेथील स्थानिक हुक सुरियन कटाले यांच्या मते समुद्र हेच त्यांचे विश्व आहे!

अशी हे समुद्रच अवघं विश्व असणारे या जमातीतील लोक काबांग  होडी तयार करता येते अशांना अतिशय आदराने वागवतात. “जर त्याला काबांग बनवता येते, जर तो  काबांग वलवत असेल आणि जर तो कासवाची शिकार करण्यात निपुण असेल तरच मी त्याला माझी मुलगी देईल अन्यथा माझी मुलगी अविवाहित राहिली तरी बेहत्तर!” अशी म्हण तेथे प्रचलित आहे.

मोकन लोकांची ही विद्या पिढ्यांपिढ्या शाश्वत असून लहान मुलांना याचे प्रशिक्षण दिल्यानेच पुढे चालू राहू शकेल. पण सध्याच्या परिस्थितीमुळे शतकानुशतके चालत आलेले ज्ञान आणि परंपरा पुढे चालवणे कठीण होऊन बसले आहे. “सध्याच्या पिढीला काबांग होडी कशी तयार करायची हे देखील माहिती नाही, ही प्राचीन कलाकुसर आता फक्त तीन ते चार जणांनाच जमते” असं तेथील स्थानिक हुक सुरियन सांगतात.

आजही मोकन जमातीतील लोक निसर्गाच्या अगदी जवळ राहणारे मानले जातात, जेव्हा डिसेंबर २००४ साली त्सुनामी आली, तेव्हा काही ज्येष्ठ मोकन लोकांनी दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे अनेक मोकन लोकांबरोबरच पर्यटकांचेही प्राण वाचले होते, फक्त एका दिव्यांग असलेल्या मोकनला यात आपल्या प्राणाला मुकावे लागले. समुद्रच त्यांचे विश्व आणि जगण्याचे साधन असल्याकारणाने त्यांना त्याबद्दल असलेले ज्ञान वाखाणण्याजोगे आहे.

जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत । पायाविण भिंत तातडीची ।।

विकासाच्या चुकीच्या संकल्पनांमुळे, शाश्वत विकासाच्या ध्येयांबद्दल अज्ञान असल्याने विकासाचा फक्त “देखीचा पर्वत” केला जात आहे. यातून भासणारा विकास ही फक्त ‘पायाविना उभारलेली भिंत’ असून निसर्गाची एक धडक बसली तरी ती कोसळेल.

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपल्यापैकी सर्व जणांना शाळेत असताना भूगोलात नकाशावाचन हा धडा होता. भूगोलाचा तो तास आजही आठवतो का, जेव्हा तुम्हाला संपूर्ण जगाच्या नकाशात भारताचा नकाशा सांगा असं विचारल्यावर दक्षिण आफ्रिकेचा नकाशा तुम्ही दाखवला होता. बहुतेक सर्व विद्यार्थ्यांनी हेच केलं होतं म्हणून शिक्षक हसलेही असतील. हे असं प्रत्येक वर्षी त्यांनी अनुभवलेलं असतं. मग हळूहळू जगाच्या नकाशावरील वेगवेगळे देश समजू लागतात.
कोणता देश छोटा, कोणता मोठा, कोणाचं वैशिष्ट्य काय हे हळूहळू समजत जातं. पण एकदा शाळा संपली की नकाशा आणि इतर गोष्टी आपोआप विस्मरणात जातात. जगाचा नकाशा कधी लक्ष देऊन बघितला आहे का? संपूर्ण जगाच्या नकाशात केंद्रस्थानी ब्रिटन आहे. काय आहे याचे कारण? जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
ब्रिटीश लोक जगातील प्रसिद्ध दर्यावर्दी होते. तिथले लोक अतिशय धर्माभिमानी आणि कर्मठ होते. सामाजिक नीतीनियम इतके कठोरपणे पाळले जात होते की तेव्हा चुकीला माफी नसल्यातच जमा होती. 
ज्या काळात समुद्र ओलांडणे हे ब्रिटनमध्ये पाप मानले जायचे त्यावेळी त्यांनी समुद्रातून प्रवास करून जगातील कित्येक भूभाग शोधून काढले. 
भारतावर तर दीडशे वर्षं राज्य केलं. म्हणूनच म्हटलं जायचं की ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधीही मावळत नव्हता. म्हणजे जगभर त्यांचेच साम्राज्य होते. व्यापाराच्या निमित्ताने ब्रिटिशांनी जग पालथं घातलं आणि जगावर राज्य केलं ही गोष्ट तर निर्विवाद सत्य आहे. लोकांवर असलेला अंधश्रद्धांचा पगडा उतरवण्यात, व्यापार, उदीम  या सर्व गोष्टी जागतिक पातळीवर सुधारणा करण्यात अर्थातच ब्रिटीश लोकांचे योगदान मोठे आहे. मग जेव्हा जगाचा नकाशा तयार केला तेव्हा ओघानेच सम्राटांचा शब्दच शेवटचा मानला जाणार नाही का?

जगभरातील साम्राज्याचे मुख्य केंद्र ब्रिटन हेच होते. थोडक्यात जगाची राजधानी होती ग्रेट ब्रिटन. त्यामुळे अनेक नकाशे बनवताना या राजधानीलाच केंद्रबिंदू मानून नकाशे तयार केले गेले.

पृथ्वीवरील अक्षांश, रेखांश या काल्पनिक रेषा मानल्या जातात आणि त्या सरळ नाही तर वर्तुळाकार आहेत, हे आपल्याला माहिती आहेच. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणचे विषुववृत्तापासूनचे उत्तर किंवा दक्षिणेकडील अंशात्मक अंतर अक्षांश याप्रमाणे मोजले जाते. अक्षांश या आडव्या रेषा आहेत. त्या वर्तुळाकार आहेत आणि विषुववृत्ताला छेदणाऱ्या काल्पनिक रेषांना रेखावृत्त असे म्हणतात.

हे मुख्य रेखावृत्त ब्रिटनमधील ग्रीनिच या शहरातून गेले आहे. इथून जगाचे दोन विभाग झाले आहेत. विमान प्रवास करताना इथे वेळ बदलली जाते. येथे जगातील प्रमाणवेळ ठरलेली आहे. कुणी ठरवली ही प्रमाणवेळ? कोणाचं होता हा निर्णय? त्याचा परिणाम काय झाला? आज हीच वेगळी माहिती तुमच्यासाठी.

 १८८४ साली जगातील २२ सत्ताधीशांनी एकत्र येऊन  हा निर्णय घेतला, की ग्रीनिच शहरातून मुख्य रेखावृत्त जाईल. 

असं का केलं त्यांनी?



साधारणपणे १८०० साली वसाहतवाद सगळीकडे पसरत होता. त्यामुळे नकाशा बनवण्याची गरज अगदी टोकाला पोचली होती.  कारण आंतरखंडीय प्रवास करायचा तर त्यासाठी नकाशा असणे आवश्यक होते. युरोपियन व्यापारी व्यापारासाठी बाहेर पडताना त्या वसाहतींवर आपली सत्ता कशी प्रस्थापित करता येईल हा छुपा हेतू ठेवूनच होते. आता गरज होती ती व्यापार सहजपणे होण्याची. बहुतेक नकाशे हे ब्रिटनच्या अधिपत्याखालीच तयार केले होते आणि ब्रिटनसोबत सलोख्याने हे व्यवहार केले की सारे सुटसुटीत होणार होते.

त्याशिवाय अजून एक प्रश्न होता तो म्हणजे प्रमाणवेळ बनवण्याचा. औद्योगिक क्रांतीमुळे रेल्वेमधून बरेच लोक कामानिमित्त प्रवास करत. त्यांना वेळेवर इच्छित जागी पोहोचवणे तसे कठीण होत होते. कारण प्रत्येक देशाची वेळ ही वेगवेगळी होती. अमेरिकेतच दहा वेळा दिसायच्या. इतर देशांचीही तीच कथा. मग वेळ प्रमाणित करणे अत्यावश्यक होते. म्हणून मग एक मोठी आंतरराष्ट्रीय परिषद घ्यायचे ठरले. ती परिषद होती आंतरराष्ट्रीय रेखावृत्त परिषद.

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे ही परिषद १८८४ च्या ऑक्टोबर महिन्यात घेतली गेली. या परिषदेत जगातील २५ प्रभावी राष्ट्रांनी आपले प्रतिनिधी पाठवून सहभाग दर्शवला. यामध्ये प्रमुख विषय प्रमाणवेळ निर्धारित करणे आणि मुख्य रेखावृत्त ठरवणे हे होते. 

२२ दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर या परिषदेत अनेक निर्णय घेतले गेले. त्यातील मुख्य निर्णय होतं मुख्य रेखावृत्ताची जागा ठरवणे. याची जागा ग्रीनिच शहरात निश्चित करण्यात आली. २२ विरुद्ध २५ मतांनी हा ठराव पास झाला. 

डॉमिनिकन रिपब्लिकफ्रान्स आणि ब्राझील या राष्ट्रांनी या गोष्टीला विरोध केला. फ्रान्सच्या मते मुख्य रेखावृत्त हे जगाच्या मधोमधच असले पाहिजे. त्यासाठी विविध पर्याय दिले गेले. पण त्याला मान्यता मिळाली नाही.

 हा निर्णय होऊन आज १०० वर्षे उलटली. पण आजही याचा परिणाम आपल्या  जीवनावर झालेला दिसतो. आजही आपण ग्रीनिच हेच आपले मुख्य रेखावृत्त मानतो आणि बहुतेक सर्व सॅटेलाईट सिस्टिम्स आजही हीच प्रमाणवेळ मानून आपली कामे अचूक पद्धतीने करत आहेत. त्यावेळी जर हे वेळेचे प्रमाणीकरण केले गेले नसते तर या सिस्टिम्स चालणे जवळपास अशक्य झाले असते.

इतिहास हा खूप लोकांना आवडत नाही. त्याला भूतकाळात रमणे असे म्हणून हेटाळणीही पण केली जाते. दरवेळी फक्त लढाया, रक्तरंजित युद्धे हाच इतिहास नसतो. कधी कधी प्रगतीची मुळे एखाद्या निर्णयात दडलेली असतात. हा ग्रीनिच प्रमाणवेळ आणि मुख्य रेखावृत्त करण्याचा निर्णय हा असाच एक. इतिहासात घेतले गेलेले निर्णय आपल्या जीवनावर काहीवेळा कसे सकारात्मक परिणाम करतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.

जयपूरमधील टेकड्यांमध्ये वसलेला हा ‘गलता’ कुंड कधीही आटत नाही!

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


भारताला हजारो वर्षांची धार्मिक परंपरा आहे जी आपल्या ऋषींनी प्रयत्नपूर्वक, श्रद्धेने निर्माण केली. हिंदू धर्मातल्या विविध पंथांची प्रत्येकाची उपासना पद्धती वेगळी, उपास्य दैवत वेगळे, त्यांची उपासना करण्याचं स्थान वेगळं, अशा विविधतेतून आपली परंपरा विकसित झाली. मूळ भारताच्या म्हणजेच सध्याच्या अफगाणिस्तान, पाकिस्तानपासून अगदी आपल्या देशाच्या शेवटच्या टोकापर्यंत, पहायला गेलं तर मंदिरं आणि त्यांचे स्थापत्य हा वैशिष्ट्याचा भाग आहे.

आपल्याकडे जशी स्वयंभू दैवतांची मंदिरं आहेत तशीच बाकीची ध्यान, दर्शन यासाठी बांधली गेलेली मंदिरं आहेत. आणि त्यातलंच एक आपल्याला फारसं ज्ञात नसलेलं पण एक आगळंवेगळं, महत्त्वाचं असं तिर्थस्थळ, मंदिर म्हणजेच जयपूरचं गलताजी मंदिर !

संत गालव यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ज्या भागात, ज्या परिसरात तपश्चर्या केली तो हा गलताजी मंदिराचा परिसर. संत गालव यांच्या तपश्चर्येचा काळ हा शंभर वर्षांचा होता असं सांगितलं जातं. त्यांच्या तपस्येचं फळ म्हणून स्वतः देवाने त्यांना दर्शन तर दिलंच पण या भागात मुबलक असा पाण्याचा साठा निर्माण केला. 

संत गालव यांच्या स्मरणार्थच या मंदिराची उभारणी केली गेली आणि त्यांच्या नावावरूनच या मंदिराला, या मंदिर परिसराला गलता मंदिर म्हटलं जातं.

जयपूर शहर हे सांस्कृतिक परंपररेसाठी आणि त्याच्या कलात्मक बांधणीसाठी ओळखले जाते आणि आज जयपूर हे एक उत्तम, प्रसिद्ध असं पर्यटनस्थळ आहे. याच जयपूरमध्ये १८व्या शतकात एक राजा होऊन गेला, तो म्हणजे राजा सवाई जयसिंग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात ज्या मिर्झा राजा जयसिंगचा उल्लेख येतो त्याचा हा वंशज. जयपूर शहराला एका अर्थाने ओळख प्राप्त करून देण्यात महत्त्वाचा वाटा राजा सवाई जयसिंगाचा आहे.



जयपूर, दिल्ली येथे येणाऱ्या जंतरमंतर या वेधशाळा असो किंवा आधुनिक बांधकाम कलेचा उपयोग करून बांधलेलं आणि रचलेलं जयपूर शहर असो, या सर्वांची निर्मिती सवाई जयसिंग आणि त्याच्या पुढच्या काळात केली गेली.

त्याच जयसिंगाने हे गलताजी मंदिरही बांधले जे मूळ जयपूर शहरापासून अगदी १० किलोमीटरच्या अंतरावर आहे. जे फक्त एकच मंदिर नसून सुंदर, सुबक अशा विविध मंदिरांचा समूह आहे. जयपूरला ‘पिंकसिटी’ म्हणून ओळखलं जातं ते तिथे बांधल्या गेलेल्या गुलाबी रंगी दगडांच्या इमारतींमुळे. याच गुलाबी दगडांपासून गलता मंदिराची बांधणी केली गेली आहे.

मंदिर परिसरात पाण्याचे ७ तलाव (कुंड) आहेत. या सर्व सातही कुंडांना गोमुखी अशा रचनेतून पाण्याचा पुरवठा सातत्याने होत असतो. त्यातल्या सगळ्यात मोठ्या आणि तेवढ्याच जास्त खोल असणाऱ्या तलावाला ‘गलता कुंड’ म्हटलं जातं. यामध्ये उतरणंही तसं साहसाचंच मानलं जातं. त्यामुळे मकर संक्रांत, कार्तिक महिन्यात, एकादशी, पौर्णिमा, अशा सणाच्या, उत्सवांच्या वेळी येणारे काही धाडसी प्रवासी, भाविक या तलावात उतरण्याचं धाडस करतानाही दिसतात.

त्याचं कारणही तसंच महत्त्वाचं आहे. या पाण्यात उतरणं, त्यात स्नान करणं हे पवित्र मानतात आणि याचे औषधी गुणही आहेत असं स्थानिकांकडून सांगितलं जातं. यामध्ये मारलेली एक डुबकी,केलेली एक अंघोळही आपल्या पापांचं निवारण करते असं मानलं जातं.

या कुंडाचं/तलावाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की हा गलता कुंड कधीच आटत नाही. हा कुंड कायम पाण्याने भरलेला असतो.

या स्वतंत्र मंदिराच्या परिसरातही अनेक मंदिरांचा समूह आहे असंही म्हणता येईल. विस्तीर्ण अशा परिसरात विविध मंदिरं आहेत त्यात सर्वात उंचीवर एक सुर्यमंदिरंही दिसून येतं. मंदिर परिसरात एक असं मंदिर आहे जे सहसा आपल्याला इतरत्र दिसून येत नाही ते म्हणजे ब्रह्मदेवांचं मंदिर.

सामान्यपणे विष्णूचे बाकी अवतार, महादेव, तसेच बाकीची देवांची मंदिरं आपण बघितली आहेत, अगदी ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिदेव दिसतात अशा श्री दत्तगुरूंची मंदिरंही आहेत. पण फार क्वचित दिसणारं असं ब्रह्मदेवासाठीचं असं स्वतंत्र मंदिर या गलता मंदिर परिसरात आपल्याला दिसून येतं. या मंदिराची निर्मिती चौदाव्या शतकात केली गेली.

सुर्यमंदिर किंवा अगदी ब्रह्मदेवाचं स्वतंत्र मंदिर आहे हे आपण बघितलं पण या गोष्टीही फिक्या वाटतील असं एक आश्चर्यही या ठिकाणी आहे, ते म्हणजे या भागात असणारं विष्णू मंदिर. ज्याला ‘रामगोपाल’ मंदिर असं म्हटलं जातं. नावावरून आपल्या लक्षात येतं ते म्हणजे राम आणि कृष्ण दोन्ही देव जे विष्णूचे दोन अवतार आहेत, त्यांचं हे मंदिर.

खरंतर राम अवतार हा त्रेतायुगातला तर कृष्ण अवतार हा द्वापारयुगातला. हे दोन स्वतंत्र अवतार एकाच ठिकाणी, एकाच मंदिरातच नाही तर, एकाच मूर्तीमध्ये दिसून येतात ती मूर्ती आहे, या ‘रामगोपाल’ मंदिरात. हे मंदिर त्याच्या स्थापत्यशास्त्रासाठीही ओळखलं जातं.

अशीही एक आख्यायिका सांगितली जाते की संत तुलसीदासांच्या प्रार्थनेमुळे स्वतः श्रीकृष्ण हे श्रीरामचंद्रांच्या रुपात येथे प्रकट झाले होते, त्याचमुळे या मंदिरात रामगोपाल दोघेही दिसून येतात. तुलसीदासांनी त्यांच्या ‘रामचरितमानस’चा काही भागही येथेच लिहिला असे सांगितले जाते.

अनेक मंदिरांच्या या परिसरात सीताराम मंदिर, हनुमान मंदिर अशीही मंदिरं आहेत आणि या मंदिराच्या मुख्य आकर्षणाचा किंवा आश्चर्याचा भाग म्हणजे येथील हनुमान मंदिराच्या परिसरात असणारी अगणित माकडं. या भागात गेल्यावर सहज नजरेला पडतं की, मंदिराचा परिसर हा माणसांपेक्षा माकडांनीच जास्त गजबजलेला असतो.

माणसांच्या मागे लागणारी, न भिणारी, अशी माकडं हनुमंताच्या मंदिराच्या आसपासच मोठ्या प्रमाणात दिसतात. हे मंदिर मुळात माकडांच्या विविध जाती-प्रजातींसाठी ओळखलं जातं. कोणत्याही देवासाठी काही करणं हे पुण्याचं लक्षण मानलं जातं तसच याठिकाणी या हनुमान मंदिर परिसरातल्या या ‘माकडांना, त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लाला काही खायला देणं’ हेही पवित्र तलावात स्नान करण्याएवढंच पुण्याचं आणि आपल्या पापांचा नाश करणारं समजलं जातं.

जयपूर शहराच्या बांधणी काळातच या मंदिरांची निर्मितीही केली गेली. स्वतः जयसिंग परिवार हा बड्या गोष्टींचा शौकीन, त्यामुळे त्यांनी या शहरात आणि भारतभरातही भव्य अशा वास्तूंची उभारणी केली केली जी खरोखरच नेत्रदीपक आहेत. त्याचवेळी हे गलताजी मंदिर बांधलं गेलं त्यामुळे त्यातही या भव्यतेचा नमुना दिसून येतो.

ही मंदिरे किंवा हा एकूण परिसर हा आपल्या नेहमीच्या पारंपरिक मंदिरांसारखा नाही हे विशेष. राजस्थानी किंवा कोणत्याही भव्य अशा महाल किंवा हवेलीसारखी रचना या मंदिर समूहाची केल्याचं दिसतं. यांची रचना, भव्यता, त्याच्या भिंतीवर असणारी चित्रकला, रंगसंगती, कलाकुसर याही बाबी इतर मंदिरांपेक्षा वेगळ्या ठरतात.

संत गालव यांच्या वास्तव्यामुळे आलेलं पावित्र्य, आजही या भागात दिसणारे साधू, योगी, तसेच भजन-मंत्रजप करणारे भाविक अशांनी हा परिसर भरलेला असतो. त्यामुळे भाविकांनी आणि विशेषतः ज्यांना फिरण्याची, अशी आगळीवेगळी ठिकाणं बघण्याची हौस आहे अशांनी या मंदिराची सफर एकदा तरी करावी, इथे असलेली नैसर्गिक शांतता, पवित्र वातावरण अनुभवावं.

जयपूरमधील टेकड्यांमध्ये वसलेला हा ‘गलता’ कुंड कधीही आटत नाही!

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


भारताला हजारो वर्षांची धार्मिक परंपरा आहे जी आपल्या ऋषींनी प्रयत्नपूर्वक, श्रद्धेने निर्माण केली. हिंदू धर्मातल्या विविध पंथांची प्रत्येकाची उपासना पद्धती वेगळी, उपास्य दैवत वेगळे, त्यांची उपासना करण्याचं स्थान वेगळं, अशा विविधतेतून आपली परंपरा विकसित झाली. मूळ भारताच्या म्हणजेच सध्याच्या अफगाणिस्तान, पाकिस्तानपासून अगदी आपल्या देशाच्या शेवटच्या टोकापर्यंत, पहायला गेलं तर मंदिरं आणि त्यांचे स्थापत्य हा वैशिष्ट्याचा भाग आहे.

आपल्याकडे जशी स्वयंभू दैवतांची मंदिरं आहेत तशीच बाकीची ध्यान, दर्शन यासाठी बांधली गेलेली मंदिरं आहेत. आणि त्यातलंच एक आपल्याला फारसं ज्ञात नसलेलं पण एक आगळंवेगळं, महत्त्वाचं असं तिर्थस्थळ, मंदिर म्हणजेच जयपूरचं गलताजी मंदिर !

संत गालव यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ज्या भागात, ज्या परिसरात तपश्चर्या केली तो हा गलताजी मंदिराचा परिसर. संत गालव यांच्या तपश्चर्येचा काळ हा शंभर वर्षांचा होता असं सांगितलं जातं. त्यांच्या तपस्येचं फळ म्हणून स्वतः देवाने त्यांना दर्शन तर दिलंच पण या भागात मुबलक असा पाण्याचा साठा निर्माण केला. 

संत गालव यांच्या स्मरणार्थच या मंदिराची उभारणी केली गेली आणि त्यांच्या नावावरूनच या मंदिराला, या मंदिर परिसराला गलता मंदिर म्हटलं जातं.

जयपूर शहर हे सांस्कृतिक परंपररेसाठी आणि त्याच्या कलात्मक बांधणीसाठी ओळखले जाते आणि आज जयपूर हे एक उत्तम, प्रसिद्ध असं पर्यटनस्थळ आहे. याच जयपूरमध्ये १८व्या शतकात एक राजा होऊन गेला, तो म्हणजे राजा सवाई जयसिंग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात ज्या मिर्झा राजा जयसिंगचा उल्लेख येतो त्याचा हा वंशज. जयपूर शहराला एका अर्थाने ओळख प्राप्त करून देण्यात महत्त्वाचा वाटा राजा सवाई जयसिंगाचा आहे.



जयपूर, दिल्ली येथे येणाऱ्या जंतरमंतर या वेधशाळा असो किंवा आधुनिक बांधकाम कलेचा उपयोग करून बांधलेलं आणि रचलेलं जयपूर शहर असो, या सर्वांची निर्मिती सवाई जयसिंग आणि त्याच्या पुढच्या काळात केली गेली.

त्याच जयसिंगाने हे गलताजी मंदिरही बांधले जे मूळ जयपूर शहरापासून अगदी १० किलोमीटरच्या अंतरावर आहे. जे फक्त एकच मंदिर नसून सुंदर, सुबक अशा विविध मंदिरांचा समूह आहे. जयपूरला ‘पिंकसिटी’ म्हणून ओळखलं जातं ते तिथे बांधल्या गेलेल्या गुलाबी रंगी दगडांच्या इमारतींमुळे. याच गुलाबी दगडांपासून गलता मंदिराची बांधणी केली गेली आहे.

मंदिर परिसरात पाण्याचे ७ तलाव (कुंड) आहेत. या सर्व सातही कुंडांना गोमुखी अशा रचनेतून पाण्याचा पुरवठा सातत्याने होत असतो. त्यातल्या सगळ्यात मोठ्या आणि तेवढ्याच जास्त खोल असणाऱ्या तलावाला ‘गलता कुंड’ म्हटलं जातं. यामध्ये उतरणंही तसं साहसाचंच मानलं जातं. त्यामुळे मकर संक्रांत, कार्तिक महिन्यात, एकादशी, पौर्णिमा, अशा सणाच्या, उत्सवांच्या वेळी येणारे काही धाडसी प्रवासी, भाविक या तलावात उतरण्याचं धाडस करतानाही दिसतात.

त्याचं कारणही तसंच महत्त्वाचं आहे. या पाण्यात उतरणं, त्यात स्नान करणं हे पवित्र मानतात आणि याचे औषधी गुणही आहेत असं स्थानिकांकडून सांगितलं जातं. यामध्ये मारलेली एक डुबकी,केलेली एक अंघोळही आपल्या पापांचं निवारण करते असं मानलं जातं.

या कुंडाचं/तलावाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की हा गलता कुंड कधीच आटत नाही. हा कुंड कायम पाण्याने भरलेला असतो.

या स्वतंत्र मंदिराच्या परिसरातही अनेक मंदिरांचा समूह आहे असंही म्हणता येईल. विस्तीर्ण अशा परिसरात विविध मंदिरं आहेत त्यात सर्वात उंचीवर एक सुर्यमंदिरंही दिसून येतं. मंदिर परिसरात एक असं मंदिर आहे जे सहसा आपल्याला इतरत्र दिसून येत नाही ते म्हणजे ब्रह्मदेवांचं मंदिर.

सामान्यपणे विष्णूचे बाकी अवतार, महादेव, तसेच बाकीची देवांची मंदिरं आपण बघितली आहेत, अगदी ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिदेव दिसतात अशा श्री दत्तगुरूंची मंदिरंही आहेत. पण फार क्वचित दिसणारं असं ब्रह्मदेवासाठीचं असं स्वतंत्र मंदिर या गलता मंदिर परिसरात आपल्याला दिसून येतं. या मंदिराची निर्मिती चौदाव्या शतकात केली गेली.

सुर्यमंदिर किंवा अगदी ब्रह्मदेवाचं स्वतंत्र मंदिर आहे हे आपण बघितलं पण या गोष्टीही फिक्या वाटतील असं एक आश्चर्यही या ठिकाणी आहे, ते म्हणजे या भागात असणारं विष्णू मंदिर. ज्याला ‘रामगोपाल’ मंदिर असं म्हटलं जातं. नावावरून आपल्या लक्षात येतं ते म्हणजे राम आणि कृष्ण दोन्ही देव जे विष्णूचे दोन अवतार आहेत, त्यांचं हे मंदिर.

खरंतर राम अवतार हा त्रेतायुगातला तर कृष्ण अवतार हा द्वापारयुगातला. हे दोन स्वतंत्र अवतार एकाच ठिकाणी, एकाच मंदिरातच नाही तर, एकाच मूर्तीमध्ये दिसून येतात ती मूर्ती आहे, या ‘रामगोपाल’ मंदिरात. हे मंदिर त्याच्या स्थापत्यशास्त्रासाठीही ओळखलं जातं.

अशीही एक आख्यायिका सांगितली जाते की संत तुलसीदासांच्या प्रार्थनेमुळे स्वतः श्रीकृष्ण हे श्रीरामचंद्रांच्या रुपात येथे प्रकट झाले होते, त्याचमुळे या मंदिरात रामगोपाल दोघेही दिसून येतात. तुलसीदासांनी त्यांच्या ‘रामचरितमानस’चा काही भागही येथेच लिहिला असे सांगितले जाते.

अनेक मंदिरांच्या या परिसरात सीताराम मंदिर, हनुमान मंदिर अशीही मंदिरं आहेत आणि या मंदिराच्या मुख्य आकर्षणाचा किंवा आश्चर्याचा भाग म्हणजे येथील हनुमान मंदिराच्या परिसरात असणारी अगणित माकडं. या भागात गेल्यावर सहज नजरेला पडतं की, मंदिराचा परिसर हा माणसांपेक्षा माकडांनीच जास्त गजबजलेला असतो.

माणसांच्या मागे लागणारी, न भिणारी, अशी माकडं हनुमंताच्या मंदिराच्या आसपासच मोठ्या प्रमाणात दिसतात. हे मंदिर मुळात माकडांच्या विविध जाती-प्रजातींसाठी ओळखलं जातं. कोणत्याही देवासाठी काही करणं हे पुण्याचं लक्षण मानलं जातं तसच याठिकाणी या हनुमान मंदिर परिसरातल्या या ‘माकडांना, त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लाला काही खायला देणं’ हेही पवित्र तलावात स्नान करण्याएवढंच पुण्याचं आणि आपल्या पापांचा नाश करणारं समजलं जातं.

जयपूर शहराच्या बांधणी काळातच या मंदिरांची निर्मितीही केली गेली. स्वतः जयसिंग परिवार हा बड्या गोष्टींचा शौकीन, त्यामुळे त्यांनी या शहरात आणि भारतभरातही भव्य अशा वास्तूंची उभारणी केली केली जी खरोखरच नेत्रदीपक आहेत. त्याचवेळी हे गलताजी मंदिर बांधलं गेलं त्यामुळे त्यातही या भव्यतेचा नमुना दिसून येतो.

ही मंदिरे किंवा हा एकूण परिसर हा आपल्या नेहमीच्या पारंपरिक मंदिरांसारखा नाही हे विशेष. राजस्थानी किंवा कोणत्याही भव्य अशा महाल किंवा हवेलीसारखी रचना या मंदिर समूहाची केल्याचं दिसतं. यांची रचना, भव्यता, त्याच्या भिंतीवर असणारी चित्रकला, रंगसंगती, कलाकुसर याही बाबी इतर मंदिरांपेक्षा वेगळ्या ठरतात.

संत गालव यांच्या वास्तव्यामुळे आलेलं पावित्र्य, आजही या भागात दिसणारे साधू, योगी, तसेच भजन-मंत्रजप करणारे भाविक अशांनी हा परिसर भरलेला असतो. त्यामुळे भाविकांनी आणि विशेषतः ज्यांना फिरण्याची, अशी आगळीवेगळी ठिकाणं बघण्याची हौस आहे अशांनी या मंदिराची सफर एकदा तरी करावी, इथे असलेली नैसर्गिक शांतता, पवित्र वातावरण अनुभवावं.

यूकेमधील हे ‘पॉयझन गार्डन’ अशा वनस्पतींचे घर आहे ज्या कोणाचाही काटा काढू शकतात

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


इंग्लंडच्या नॉर्थम्बरलँड परगण्यात असलेल्या ऍल्नविक कॅसल इथे एक अनोखं उद्यान विकसित करण्यात आलं आहे. या बागेत झाडं, आहेत. फुलं, फळं आहेत. मात्र, त्यांच्याबद्दल माहिती मिळाली की त्याच्या सौंदर्याचा आनंद घेण्यापेक्षा भीतीने पोटात गोळा उठल्याशिवाय रहात नाही. कारण ही बाग आहे विषारी वनस्पतींचे उद्यान!

या विषारी उद्यानाला भेट देताना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली फिरण्याची आवश्यकता आहे. बागेच्या काळ्या लोखंडी प्रवेशद्वारावर लावलेल्या कवट्या आणि हाडे अभ्यागतांचे स्वागत करतात. ‘टूर गाइड’च्या बरोबर आत जाऊन वनस्पतींचं निरीक्षण करू शकतो. मात्र, या वनस्पतींचं निरीक्षण करताना त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावं लागतं.

या बागेतल्या ‘जायंट हॉगवीड’ला चुकून जरी ओझरता का होईना स्पर्श झाला तर तब्बल सात वर्षांपर्यंत त्वचेची गंभीर जळजळ होऊ शकते आणि त्या ठिकाणच्या त्वचेला सूर्यप्रकाशाचा असह्य त्रास होऊ शकतो.

गर्भ पाडण्यासाठी बेलाडोना या वनस्पतीची दोन-चार फळं खाणंही पुरेसं आहे. हेन्बेनचं सेवन केल्याने भ्रम निर्माण होतो आणि त्याचा वास घेतल्याण डोकं हलकं होतं. थोडक्यात नाश चढते. या बागेत अभ्यागतांना वनस्पतींचा वास घेण्यास मनाई आहे,

ही जगातील एकमेव विषारी बाग असल्याचा दावा नॉर्थम्बरलँड परगण्याच्या डचेस आणि या उद्यानाच्या निर्मात्या जेन पर्सी करतात.या बागेच्या माध्यमातून लोकांना प्रशिक्षित करणे, वनस्पती कशी प्राणघातक ठरू शकते, मृत्यू किती भयावह आणि वेदनादायक असू शकतो याची माहिती देणे हा उद्देश आहे.



नॉर्थम्बरलँडच्या ११ व्या शतकात उभारलेल्या किल्ल्याच्या दुर्लक्षित परिसराचा पुनर्विकास करताना वनस्पतींच्या साहाय्याने काहीतरी वेगळं करायचं ठरवलं होतं. त्यातून विषारी वनस्पतींचं उद्यान विकसित करण्याची कल्पना प्रत्यक्षात आली. मध्ययुगीन काळात उभारण्यात आलेल्या औषधी वनस्पतींच्या बागांपासून प्रेरणा घेऊन ही बाग विकसित करण्यात आली आहे. मात्र, घातक विषारी वनस्पतींवर भर दिल्याने ती एकमेव आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

जीवघेण्या वनस्पतींनी भरलेल्या बागेतून वावरणं हा छाती दडपवणारा अनुभव आहे. तरीही प्रवेशद्वारावर लावलेली हाडं आणि कवट्यांचं चेतावणी चिन्ह लोकांना बागेपासून दूर ठेवायला पुरेसं ठरलेलं नाही. हे उद्यान सामान्य अभ्यागतांसाठी सन २००५ मध्ये खुले केल्यापासून जगभरातल्या अभ्यासकांनी, वैद्यक तज्ज्ञांनी, पर्यटकांनी भेट दिली आहे. निसर्ग, इतिहास आणि चक्क मृत्यूबद्दलची उत्सुकता लोकांना या बागेत ओढून आणते.

वास्तविक ज्या वनस्पतीमध्ये रोगापासून मुक्ती देणारे औषधी गुणधर्म असतात त्याच वनस्पतींमध्ये जीवघेणे विषारी गुणधर्मही असतात. मला मात्र, वनस्पतींच्या औढाढी गुणधर्माबद्दल अजिबात रस नव्हता. जीवघेण्या विषारी गुणधर्मांबद्दलच मला उत्सुकता होती. एखादी वनस्पती माणसाचा जीव कशा आणि किती प्रकारांनी घेऊ शकतात हे मला जाणून घ्यायचं होतं, असं डचेस पर्सी सांगतात.

या विषारी वनस्पतींच्या बागेत शिकता येणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषारी वनस्पतींपैकी अनेक वनस्पती सहजपणे कुठेही आढळणाऱ्या, ज्या वनस्पती बहुतेकदा आपल्याला माहिती असतात. मात्र, त्यांच्या विषारी गुणांपासून आपण अनभिज्ञ असतो. ऍल्नविक कॅसलमध्ये लागवड केलेल्या फॉक्सग्लोव्ह, एरंडेल आणि लॉरेल अशा अनेक प्रजाती घरासमोरच्या बागांमध्येही आढळून येतात किंवा कुठेही माळरानावरही उगवतात.आपल्या आहारात असलेल्या वनस्पतींमध्येही विषारी घटक काही प्रमाणात असतात. बेलाडोनाच्या कुळातील बटाटे हिरवे असताना धोकादायक असतात. काजूच्या सालांचा मानवी त्वचेवर हानिकारक दुष्परिणाम होतो. म्हणूनच सोललेले काजूच सहसा विकले जातात.

जैविक दृष्टीकोनातून वनस्पतींमध्ये विषारी द्रव्य निर्माण होण्याची एक तार्किक संगती आहे. जीवाणू, बुरशीजन्य रोग, कीटक किंवा तृणभक्षी प्राणी यांच्यापासून दूर राहून टिकून राहण्यासाठी पळून जाण्याचा पर्याय वनस्पतींकडे उललब्ध नाही. भक्षकांशी लढण्याचा किंवा पळून जाण्याचा कोणताही मार्ग नसताना, विषारी बनणे हीच जगण्याची रणनीती बनली, हे विषारी वनस्पतींच्या संशोधक ‘प्लांट्स दॅट किल आणि प्लांट्स दॅट क्युअर’ या पुस्तकांच्या लेखिका. डॉ. एलिझाबेथ डॉन्सी सांगतात.

वनस्पतींमध्ये अनेक संरक्षण यंत्रणा विकसित झाल्या आहेत त्या मुळे वनस्पतींचं भक्षण करणं किंवा नुसतं त्यांच्या जवळ जाणं ही धोकादायक ठरतं. डॉ डॉन्सी म्हणतात. काही वनस्पतींमध्ये काही संयुगं अशी असतात की त्यामुळे रोगांचा प्रतिकार करण्याची त्यांची क्षमता वाढते. काही वनस्पती अशा आहेत त्यांना खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कीटकांच्या तोंडाचा भाग चिकटून बसतो. काही वनस्पतींची चव घाणेरडी असते म्हणून प्राणी त्यांना तोंडही लावत नाहीत. काही वनस्पती खाल्ल्याने प्राणी आजारी पडतात.

विष तयार करण्यासाठी अनेक वनस्पती अमीनो सिडवर अवलंबून असतात. सर्व वनस्पती आणि प्राणी प्रथिनं तयार करण्यासाठी ‘अमीनो सिड’चा वापर करतात. ही सेंद्रिय संयुगं विषारी अल्कलॉइड्स तयार करून त्या काही वनस्पतींना प्राणघातक बनवतात. खसखसच्या झाडातील मॉर्फिन आणि स्ट्रायक्नाईनच्या झाडातील स्ट्रायक्नाईन हे दोन्ही घातक विषारी अल्कलॉइड आहेत. टर्पेनेस हे संयुग पाइन आणि लॅव्हेंडरसारख्या वनस्पतींना सुगंध देतात. सिटिक आम्ल वनस्पती आणि प्राणी चरबी तयार करण्यासाठी वापरतात. हे देखील वनस्पतींच्या विषारी पदार्थांसाठी प्रारंभिक बिंदू म्हणून काम करू शकतात.

वेगवेगळे विष वेगवेगळ्या प्रकारे हानी पोहोचवतात. त्यांच्यापैकी बरेच जण मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरमध्ये व्यत्यय आणतात. एक तर शरीराचे कार्य चालवणाऱ्या संदेशांना रोखतात किंवा चक्क चुकीचे संदेश पाठवून! वनस्पतींना विषारी बनवणार्‍या समान संयुगाचे आश्चर्यकारक औषधी फायदे आहेत. न्यूरोट्रांसमीटरवर प्रभाव टाकून वनस्पतींच्या विषाच्या लहान डोसमुळे रुग्णांमध्ये वेदनेची जाणीव नष्ट करता येते. ही अशी गोष्ट वैद्यक तज्ज्ञांना शतकानुशतके माहित आहे

मूळ ‘अपोथेकरी गार्डन’ ही वैद्यकीय विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींबद्दल जाणून घेण्यासाठी उभारण्यात आली. बागेतील प्रत्येक वनस्पतीचे औषधी गुणधर्म उपचारात्मक परिणाम समजून घेण्यासोबतच विद्यार्थ्यांना त्यांच्या घातक गुणधर्मांबद्दलही माहिती दिली जात असे. या पैकी बर्‍याच वनस्पतींमध्ये अत्यंत विषारी गुणधर्म असतात, असं डॉ. डॉन्सी सांगतात. औषधी वनस्पती कधी प्राणघातक ठरते हे जाणून घेणे वैद्यक तज्ज्ञांची आवश्यक असते. मात्र, अनेकांनी या माहितीचा दुरुपयोगच केल्याचं इतिहास दाखवून देतो.

इटलीच्या दौऱ्यावर असताना पर्सी यांना एका विषारी वनस्पतींच्या बागेला भेट देण्याचा योग आला. ही बाग माणसांना वाचवण्याच्या नाही, तर मारण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आली होती. मेडिसिसने त्यांच्या शत्रूंना मारण्याचे अधिक प्रभावी मार्ग अंमलात आणण्यासाठी विषारी वनस्पतींची बाग उभारली होती.

पंधराव्या ते अठराव्या शतकादरम्यान इटलीमध्ये मेडिसिसकडे प्रचंड शक्ती होती आणि त्यांनी ती आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी कोणत्याही बऱ्या वाईट मार्गांचा अवलंब केला होता. अगदी स्वतःच्या कुटुंबातीलही प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्यासाठीही त्यांनी विषप्रयोग केला होता.

इटलीमध्ये एका प्रवेशद्वारावर कवटी आणि हाडांचा क्रॉस असलेलं चिन्ह होतं. ही कल्पना मला आवडली आणि स्कॉटलंडमधील सौत्रा मध्ययुगीन रुग्णालयाच्या अवशेषांना भेट देताना ५०० वर्षे जुने स्पंज हेनबेन, अफू आणि हेमलॉकमध्ये भिजवलेले आढळून आले, असे पर्सी सांगतात. प्रत्येक स्पंजमध्ये ४८ ते ७२ तासांपर्यंत एखाद्या रुग्णाला भूल देण्यासाठी योग्य प्रमाणात असते विष असते.

जगातल्या सर्वांत प्राणघातक वनस्पतींची लागवड करणे आव्हानात्मक काम आहे. बर्‍याच झाडांना स्पर्श करणं किंवा वास घेणंही धोकादायक असल्याने, त्यांची काळजी घेण्यासाठी माळीकाम झाडांची देखभाल करणाऱ्यांना खूप काळजी घ्यावी लागते. त्यांनी हातमोजे, फेस शील्ड आणि हॅझमॅट सूट घालणं आवश्यक आहे. काही प्रकारच्या वनस्पती वाढवण्यासाठी विशेष प्रकारच्या परवानग्या आवश्यक असतात. अल्नविक उद्यानाला इंग्लंडमध्ये मादक पदार्थांच्या वनस्पती पिकवण्याचा परवाना आहे आणि वर्षातून एकदा गांजासारख्या वनस्पती नष्ट करण्याची अटही आहे.

अन्य वनस्पती उद्यानं आणि औधाशी वनस्पतींच्या बागांपेक्षा वेगळी आहे. धोकादायक आणि विषारी वनस्पतींच्या मागावर असलेल्या बेकायदेशीर धंदेवाल्यांपासून तिचं रक्षण करावं लागतं. सहल मार्गदर्शक केवळ अभ्यागतांना हानीपासून दूर ठेवण्यासाठी प्रशिक्षित असणं पुरेसं नाही. त्यांच्यात उत्तम संवादकौशल्य असणं आवश्यक आहे. त्यांना वनस्पतींचे विषारी गुणधर्म, इतिहास कथन करण्याची कला त्यांना अवगत करणं गरजेचं ठरतं.

विषारी वनस्पतींचा इतिहास आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म मनोरंजक निश्चितपणे नाहीत. उलट ते अस्वस्थ करणारे असतात. तरीही विषारी वनस्पतींच्या बागेमध्ये सांगितल्या जाणाऱ्या कथा या पाहुण्यांना अल्नविक परत परत येण्यासाठी प्रोत्साहित करतात. स्पिरिन हे विलोच्या झाडाच्या सालापासून बनतं अशा गोष्टी लहान मुलांच्याच काय पण मोठ्यांच्याही पचनी पडायला कठीण असतात. मात्र, जेव्हा पाहुणे व्हिक्टोरियन आणि त्यांच्या ह*त्याकांडाबद्दल जाणून घेतात तेव्हा ती अकल्पित गोष्ट ठरते. अर्थात, त्यांना बाहेर जाऊन इतरांचे जीव घेण्यासाठी प्रोत्साहित करणार नाहीत, अशी आशा करूया. उलट त्यांना वनस्पतींची शक्ती जाणून घेण्यास आणि निसर्गाच्या वैविध्याबद्दल तोंडात बोट घालायला लावणारे ठरते हे मात्र निश्चित!























No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...