रियासी
हे नाव ऐकून कदाचित डोक्यात प्रकाश पडणार नाही. ते साहजिक आहे, कारण
जम्मू-काश्मीरमध्ये असूनही रियासी हे ना तीर्थक्षेत्र आहे ना हिलस्टेशन.
किंबहुना, कटरा (वैष्णोमाता मंदिर) हा अतिप्रसिद्ध शेजारी लाभल्यामुळे
रियासीचे नाव अधिकच विसरले जाते. पण तरीही एकदा जाऊन पहावी (अगदी दोन दिवस
राहून) अशी जागा आहे.
शिव खोरीच्या रस्त्यावर लागणारे रियासी गाव चिनाब नदीच्या तीरावर वसलेले
आहे. पीरपंजाल पर्वतरांगा इथे सपाट मैदानाला येऊन मिळतात. त्यमुळे नदीचा
प्रवाह सुसाट असतो. सिंधु पाणीकरारानुसार चिनाबवर धरण बांधता येत नाही.
नदीच्या वेगवान प्रवाहावर "राफ्टिंग" करण्याची सोय आहे.
फोटो पाहून कदाचित रियासी हे एक थंड हवेचे ठिकाण असावे असा समज झाल्यास नवल नाही. पण तो चुकीचा ठरेल. उन्हाळ्यात येथील तापमान उत्तर भारतातील अन्य शहरांशी स्पर्धा करत ४० डिग्रीच्याही वर जाते. पण त्याही दिवसांत येथील रात्री सुखद असतात.
रियासीपासून सलाल जलविद्युत प्रकल्प अगदी जवळ आहे. पर्वतरांगांनी वेढलेले हे धरण फारच सुंदर दिसते. विशेष परवानगी घेतल्यास अगदी भूगर्भात पाच मजले खाली बसवलेली जनित्रे पाहता येतात. चिनाब नदीचा प्रवाह एका प्रचंड भुयारातून वळवून, जनित्रांद्वारे विद्युतनिर्मिती करून, ते पाणी ४ किलोमीटर खाली पुन्हा नदीपात्रात सोडले जाते. पण छायाचित्रणावर प्रतिबंध असल्यामुळे जास्त फोटो काढता आले नाहीत.

रियासी गावातून बाहेर पडून चिनाब पार केली की लगेच येते सिहाड बाबाची गुहा. येथील जलप्रपाताची उंची पाहून डोळे फिरतात.
शहरापासून १० किलोमीटरवर धनसर बाबाची गुहा हे आणखी एक नितांतसुंदर स्थळ
आहे. अमाप नितळ पाणी, शांतता आणि स्वच्छता यामुळे मन प्रसन्न होते. (धनसर
बाबा मंदिर-गुहा कटरापासून फक्त १५ किलोमीटरवर आहे).
रियासी गावाला लागूनच भीमगड किल्ला आहे. खरेतर लहानखुरा असल्यामुळे त्याला गढी म्हणणे योग्य होईल. पण दिसायला फार छान आहे. राज्यसरकारने विशेष प्रयत्न करून पर्यटकांसाठी या किल्ल्याची डागडुजी केली आहे. अशा वेळी न चुकता महाराष्ट्रातील किल्ल्यांची दुर्दशा आठवून अफाट वाईट वाटते.

माझ्या लटपटत्या मराठीची अधिक दुर्दशा पाहून मिपाकरांना वाईट वाटू नये, म्हणून इथेच थांबतो आणि राहिलेले वर्णन छायाचित्रांवर मर्यादित ठेवतो..!
इकडे आलात तर जरूर भेटा..! जय माता दी!!!! :) :)
-----
अंतर: कटरापासून ३० किलोमीटर. जम्मूपासून सुमारे १०० किलोमीटर.
प्रवासः रस्त्याने. लवकरच कटरा - उधमपूर रेल्वे सुरू होईल. (रियासीवरून जाते).
हवामानः तीव्र उन्हाळा. अन्य दिवसांमध्ये सुखद हवामान.
जवळपास अन्य पाहण्याजोगे: सिहाड बाबाची गुहा, नौदेवी मंदिर, धनसर बाबाची गुहा, सलाल जलविद्युत प्रकल्प, शिव खोरी.
------
रियासीची काही अन्य छायाचित्रे:
१. बहरलेला आंबा

२. रंगात आलेला खोखोचा सामना (किल्ल्यावरून काढलेला फोटो)

३. मधाची शेती

४. देवाचा पार

Rest and the rest, in Reasi
June 30, 2014 by chalatmusafir
The name Reasi won’t ring a bell in most minds. Quite naturally, since it is neither a pilgrim destination nor a holiday hotspot, in spite of being a part of the state of Jammu and Kashmir. It is also overshadowed by its incredibly famous neighbour, Katra (base of Vaishno Mata shrine). But Reasi too possesses enough attributes of its own that can entice an accidental tourist. Soon it will be connected by rail. Perhaps that will help its cause!
Reasi is charmingly small and nestles comfortably in a collective embrace of Pir Panjal foothills and River Chenab, in the lap of a really tiny fortress, known as Bhimgarh. Major restoration work is underway at the fortress.
The landscape is truly bewitching. But it would be a folly to mistake Reasi for a hill station. In summers, the place boils over at 42’C and is eminently avoidable.
A number of tiny shrines dot the countryside around Reasi. Most of them are caves in mountains which earned their name after some ascetic who made his home there. (Shiv Khori is, of course, the best-known among them).
Such as Sihad Baba shrine, just across River Chenab.
Salal dam and hydropower project on Chenab is situated close to Reasi. Surrounded by mighty mountains, it makes a magnificent sight.
The valleys around the town are quite serene. Low population density makes it a very quiet place even in daytime. In fact, a heavenly, calming silence is the overbearing impression that one is likely to retain after a visit.
Vignettes:
A venerated local deity
School girls playing kho kho (Photo clicked from the top of the Bhimgarh fort)
Bee-boxes laid out for collecting honey.
Mango tree in blossom (It is the month of May)
A view of River Chenab on way to Salal hydropower project
A temple and pond
Shar
















No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.