शिरगावचा किल्ला व बीच : पालघरच्या दक्षिणेला हा किल्ला आहे. हा किल्ला आजही मजबूत आणि सुस्थितीत आहे. हा किल्ला आतून, तसेच बाहेरून स्वच्छ ठेवण्यात आला आहे. किल्ल्याच्या आतील बाजूला फक्त एकच रावणमाडाचे झाड असून, त्याला फुटलेल्या अनेक फांद्या हे या किल्ल्याचे आकर्षण आहे. शिरगावचा किल्ला अत्यंत सुंदर अशा ठिकाणी उभारण्यात आला आहे. हा किल्ला २०० फूट लांब व १५० फूट रुंद आहे. किल्ल्याची तटबंदी तीस ते बत्तीस फूट इतकी उंच, तर रुंदी आठ ते दहा फूट एवढी आहे. तटावर जाण्यासाठी जिने आहेत. या किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. किल्ल्याला एकामागोमाग एक असे दोन भक्कम दरवाजे असून, ते अतिशय सुंदर व सुबक आहेत. या दोन प्रवेशद्वारांच्या मध्ये पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. या ठिकाणी वासे अडकविण्यासाठी केलेल्या खाचा व भिंतीतील नक्षीदार कोनाडे दिसतात. दोन्ही दरवाज्यांवरील दुसऱ्या मजल्यांवर भव्य खिडक्या असलेली सुंदर दालने आहेत.
असावा किल्ला : उंच असलेला आणि संपूर्ण जंगलाने वेढलेला हा किल्ला म्हणजे पालघरच्या दुर्गमालिकेतील जणू शिरोमणीच भासतो. ११व्या शतकाच्या उत्तरार्धात बिंब राजाच्या काळात हा किल्ला बांधला गेला असावा. डहाणूपर्यंत वर्चस्व राहण्यासाठी याची निर्मिती झाली असावी. हा किल्ला २०० वर्षे पोर्तुगीज राजवटीत होता. संभाजी महाराजांच्या काळात १६८३मध्ये हा किल्ला मराठ्यांनी घेतला; पण त्याचा ताबा परत पोर्तुगीजांनी लगेच मिळवला; मात्र चिमाजीअप्पांच्या मोहिमेत वसईपासून उत्तरेची पोर्तुगीज राजवट नामशेष झाली व ब्रिटिश राजवट येईपर्यंत किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला. १८१८मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे कॅप्टन डिकिन्सनने याचा ताबा घेतला. या किल्ल्याचा असावा या नावाने, तसेच विसावागड असाही काही ठिकाणी उल्लेख आढळतो. या किल्ल्याच्या संवर्धनाचा प्रयत्न ‘बा रायगड परिवारा’मार्फत कारण्यात येत आहे. महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची साफसफाई, तसेच माहिती या परिवारामार्फत देण्यात येते. या किल्ल्यावर फारशा वस्तू शिल्लक नाहीत; पण जागोजाग पाण्याच्या टाक्या, गुंफा आहेत. रक्त टाकीची साफसफाई करताना ब्रिटिशकालीन तोफ सापडली आहे. किल्ला जंगलाने वेढलेला असल्याने ट्रेकिंग करताना वेगळाच आनंद मिळतो.

केळवे पाणकोट/समुद्रकिनारा : हा किल्ला नसून, एक छोटासा जहाजाच्या आकाराचा पाणकोट आहे. प्रवेशद्वाराची बाजू डेकसारखी दुमजली आहे. भरतीच्या वेळी हा किल्ला समुद्राच्या पाण्याने वेढला जातो. एका मोठ्या खडकाचा वापर करून हा किल्ला बांधण्यात आला आहे. पोर्तुगीज राजवटीत बांधलेल्या किल्ल्यांपैकीच हा एक आहे. किनाऱ्यावर वर्चस्व असावे या हेतूने अशा किल्ल्यांची निर्मिती पोर्तुगीजांनी केली होती. शितलादेवी मंदिरावरून पुढे गेल्यावर केळवे कस्टम कार्यालयाकडून कोळीवाड्यास जाणाऱ्या वाटेवरूनच या किल्ल्याचे दर्शन होते. किल्ल्याची तटबंदी अद्यापही शाबूत आहे; मात्र किल्ल्यातील बांधकामे भग्नावस्थेत आहेत. समुद्राच्या लाटांच्या सततच्या माऱ्याने किल्ल्याच्या भिंतीची झीज झाली आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार जमिनीपासून १० फूट उंचीवर आहे. किल्ल्याचे दार कल्पकतेने बांधले असून, दरवाज्यामागील अडसर लावण्यासाठी दगडात खाच केलेली आहे. किल्ल्याचा येथील भाग दुमजली बांधलेला आहे. दोन्ही मजल्यावर जागोजागी बंदुकीच्या मारगिरीसाठी जंग्या व तोफांसाठी झरोके ठेवलेले दिसून येतात. पोर्तुगीज-मराठे युद्धाच्या वेळी चिमाजीअप्पांनी पेशव्यांना लिहिलेल्या पत्रात या किल्ल्याची नोंद आढळते. चिमाजीअप्पांनी वसई किल्ल्याची घेराबंदी करण्यासाठी आसपासच्या भागावर नियंत्रण मिळविले. हा किल्ला १० जानेवारी १७३९ रोजी ताब्यात घेतला, तर वसईचा किल्ला २२ मार्च १७३९ रोजी ताब्यात आला.

तारापूरचा किल्ला : माहीमचा राजा भीम यांनी नाईकांकडून हा किल्ला सन १२८०मध्ये जिंकल्याचा उल्लेख आहे. १५३३मध्ये पोर्तुगीजांनी येथे जाळपोळ केली होती. १५५६मध्ये पोर्तुगीजांनी येथे भक्कम किल्ला बांधला. त्या काळी हे ठिकाण भरभराटीला आले होते. ते व्यापाराचे केंद्र झाले होते. मुघलांनी या ठिकाणी अयशस्वी हल्ला केला होता. किल्ल्याला भक्कम तटबंदी आहे. येथे पोर्तुगीजांचा एक शिलालेखही दिसून येतो. वसईच्या मोहिमेवेळी चिमाजीअप्पांनी हा किल्ला जिंकून घेतला. बाजीराव, रामचंद्र हरी, यशवंत पवार आणि तुकाजी पवार, राणोजी भोसले यांनी या वेळी पराक्रम केला होता. कॅप्टन डिकिन्सन यांनी १८१८मध्ये उत्तर कोकणातील सर्वांत मोठे, उत्तम हवेशीर आणि समुद्रकिनारा असलेल्या किल्ल्यांपैकी मध्यवर्ती ठिकाण म्हणून या ठिकाणाचे वर्णन केले आहे.
तारापूर अणुऊर्जा केंद्र : १६० मेगावॉट क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प १९६९ साली सुरू झाला. हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. जवळच चिंचणीचा सागरकिनाराही आहे.


प्राचीन राम मंदिर : हे मंदिर शीतलादेवी मंदिरापासून जवळच आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार, येथे राम आणि लक्ष्मण यांना अहिरावण आणि महिरावणाने कैद करून ठेवले होते. हनुमंताने नंतर येऊन त्यांची सुटका केली. १९९४मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. रामनवमीचा मोठा उत्सव येथे साजरा केला जातो.


काळदुर्ग : पालघरच्या
पूर्वेला असलेल्या डोंगरावर समुद्रसपाटीपासून १५५० फूट उंचीवर हा किल्ला
आहे. हा किल्ला दोन थरांत विभागला आहे. एक म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडा
असलेला गडमाथा होय. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. गडाचे
क्षेत्रफळ अर्धा एकर असावे. दुसरा विभाग म्हणजे गडमाथ्याच्या खालचे पठार.
या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे. एक कुंडदेखील आढळते. पठारावरून
गडमाथ्यावर जाण्यास पायऱ्या आहेत. किल्ल्यावरून सर्व घाटमाथ्यावर नजर ठेवता
येते. वाघोबा, भिलोबा व मेघोबा देवांचे दर्शन व वाघोबा धबधब्याचा आनंदही
येथे लुटता येतो. 
सातिवली गरम पाण्याचे कुंड : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या पूर्वेला असलेल्या डोंगरापलीकडे हे ठिकाण आहे. येथे गरम पाण्याची सहा कुंडे आहेत. वांदरी नदीच्या काठावर ही कुंडे आहेत. तसेच वांदरी नदीवर निसर्गरम्य परिसरात बांधलेले छोटे धरणही जवळच आहे.

अशेरीगड : पालघरच्या आसपास अनेक किल्ले आहेत; पण त्यातील हा १७०० फूट उंचीचा किल्ला त्यांच्यातील ‘दादा’ समजला जातो. हा किल्ला ट्रेकिंग करणाऱ्यांसाठीच आहे. अशेरीगडाच्या पठारावर पडक्या वाड्यांचे अवशेष आढळतात. तसेच चर असलेले अनेक चौथरेही येथे आढळतात. सांडपाणी वाहून नेण्यासाठी या चरांची योजना असावी. गडावर मध्यम आकाराची व रुंद तोंडाची गुहा आहे. वारा आणि थंडीपासून संरक्षण मिळेल अशा पद्धतीने ही गुंफा खोदलेली आहे. त्यात झोपण्यासाठी दगडी चौथरेही दिसून येतात. या किल्ल्याच्या परिसरात सागाच्या झाडांचे जंगल आहे. प्रामुख्याने जहाज बांधणीस उपयुक्त ठरणाऱ्या या झाडांच्या लाकडांमुळे या गडाचे इतिहासकाळात फार महत्त्व होते. येथील वरच्या पठारावरून आग्नेय दिशेकडे कोहोजगडाचे दर्शन होते. शिलाहार राजवटीत बांधला गेलेला हा किल्ला इ. स. १२००मध्ये बांधला गेला. पुढे १४व्या शतकात महिकावती नगरी (माहीम) येथील राजा बिंबदेव याने हा किल्ला जिंकून घेतला व या गडाचा उत्तम बंदोबस्त करून येथे आपले लष्करी ठाणे बसविले. इ. स. १५५६ साली पोर्तुगीजांनी अशेरीवर हल्ला करून तो बळकावला. पुढे संभाजीराजांनी इ. स. १६८३मध्ये अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला; पण ऑक्टोबर १६८७मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला.
गुहेच्या वरच्या बाजूला असलेल्या बांधीव तळ्यामध्ये एक अर्धवट बुडालेली तोफ दिसते. याशिवाय आणखी दोन अर्धवट बांधलेली तळी आहेत. पालघरहून कासा या शहराकडे जाणाऱ्या एसटी बसने किंवा या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनाने निघून ‘मस्तान नाका’ या ठिकाणापासून सुमारे १०-११ किलोमीटरवर असणाऱ्या ‘खोडकोना’ गावाजवळ हा किल्ला आहे.



लेबेनॉनचा राजा हिराम याने राजा सॉलोमन याला येथून आणलेली सुगंधी वनस्पती, तसेच मौल्यवान दगड भेट दिले होते. महाभारतातील कथेप्रमाणे श्री परशुराम यांचेही येथे वास्तव्य होते. सोपाराजवळील मेड्स गावाजवळ सम्राट अशोकाने बांधलेला स्तूप आहे. हा स्तूप भारतीय पुरातत्त्व खात्याने संरक्षित केला आहे. येथे स्तुपाच्या मध्यभागी आठव्या शतकातील मैत्रेय व बुद्धाच्या आठ कांस्य प्रतिमा मिळाल्या. तसेच तांबे, चांदी, सोने, दगड, क्रिस्टल आणि गौतमीपुत्र सातकर्णीची (सातवाहन) चांदीची नाणी सापडली. रामकुंडाजवळील जुन्या मुस्लिम कब्रस्तानमध्ये काही अवशेष सापडले. ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आले आहेत.
सिद्धिविनायक मंदिर : विरारमध्ये (पश्चिम) सिद्धिविनायकाचे अतिशय सुंदर मंदिर आहे. या देखण्या मंदिरात भाविकांची गर्दी होत असते.


चक्रेश्वर महादेव मंदिर : हे एक प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर नालासोपारा पश्चिमेतील चक्रेश्वर तलावाच्या एका कोपऱ्यात आहे. बांधकामाचा कालखंड उपलब्ध नाही. मंदिरावर आक्रमणकर्त्यांनी आक्रमण केले, त्या वेळी बऱ्याच मूर्ती जवळच्या चक्रेश्वराच्या तलावात टाकण्यात आल्या. त्यानंतर त्यापैकी काही मूर्ती सापडल्या व या मंदिरात स्थापन करण्यात आल्या. सध्याचे मंदिर नंतर बांधण्यात आले.

सेंट जेम्स चर्च, आगाशी : हे ऐतिहासिक चर्च विरार-अर्नाळा रस्त्यावर असून, ते १५५८मध्ये बांधण्यात आले. पोर्तुगीज हे सर्व युरोपीयन देशांमधील सर्वोत्तम दर्यावर्दी मानले जातात. ते जिथे-जिथे गेले तेथे त्यांनी समुद्राजवळ घरे बांधली. आगाशी हे त्या काळचे लहानसे बंदराचे गाव होते. आगाशीजवळ असलेल्या जंगलांमध्ये पोर्तुगीजांना जहाजबांधणी आणि अन्य बांधकामांसाठी आवश्यक असणारे लाकूडही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे आगाशी हे पोर्तुगीजांचे कायम वास्तव्याचे ठिकाण बनले. सेंट जेम्स चर्च सुरुवातीला दगड आणि विटांनी बांधण्यात आले होते. सन १७३९मध्ये वसई मोहिमेच्या वेळी त्याचा बहुतांश भाग उद्ध्वस्त झाला. परंतु मराठ्यांनी येथील पाद्रींना या भागात धार्मिक उत्सव करण्यास परवानगी दिली होती. सन १७६०मध्ये चर्च पुन्हा बांधण्यात आले आणि सन १९००मध्ये त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला.


सागरकिनारे : नालासोपाराच्या पश्चिमेला निर्मल गावाजवळ कळंब बीच, राजोडी बीच, तसेच तुलसी, अर्नाळा, नवापूर, बीच असे सुंदर, स्वच्छ व गर्दी नसलेले शांत सागरकिनारे आहेत. या बीचेसवर जाण्यासाठी रस्त्यांची सुविधा होणे गरजेचे आहे. तसेच, वाळूउपश्यामुळे होणाऱ्या हानीकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. सागरकिनारे हे पर्यटनाचा मोठा महत्त्वाचा आधार आहेत.

तुंगारेश्वर धबधबा व शिवमंदिर : तुंगारेश्वरचे शिवमंदिर प्राचीन असून, डोंगररांगेत झाडांच्या गर्द हिरवाईत लपून बसलेले आहे. मंदिर नेहमी शिवभक्तांनी गजबजलेले असते. मंदिराभोवती असलेली झाडांची गर्दी पाहिल्यानंतर मन प्रसन्न होते. मुख्य रस्त्यावरून तुंगारेश्वर परिसरात प्रवेस करताच धबधब्याच्या आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध झालेले असते. शहरातील सिमेंटच्या जंगलातून येथे आल्यावर मनाला नक्कीच शांतता मिळते. चालताना त्रास होईलही; पण हिरवीगार वनश्री, पक्ष्यांचा गुंजारव तुमचा उत्साह वाढवतो.

तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य : वसई-विरारच्या पूर्वेस असलेल्या डोंगरावर २१२७ फूट उंचीवर हे ८५.५ चौरस किलोमीटर क्षेत्रावरील अभयारण्य असून, तीन वेगवेगळ्या प्रकारची जंगले येथे आहेत. हा प्रदेश जैवविविधतेने समृद्ध आहे. बिबटे, रानडुक्कर, भुंकणारे हरीण, लंगूर हे प्राणी, तसेच पावशा, सर्पगरुड, महाभृंगराज, श्याम, पिंगळा, सुभग, पर्ण पक्षी, हळद्या हे पक्षी येथे पाहायला मिळतात. येथून पेल्हार धरणाचे विहंगम दृश्यही दिसते. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हे छान ठिकाण आहे. या डोंगरात अनेक जलप्रपात आहेत. सन २००३मध्ये या ठिकाणाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. या निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या उत्तरेस आत्मलिंगेश्वर मंदिर आहे. या छोट्या मंदिरासाठी सुरेख पायऱ्यांचे बांधकाम केलेले आहे. सहलीसाठी हे उत्तम ठिकाण आहे.

या किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे चार हेक्टर असून, तटबंदीमध्ये एकूण दहा गोल बुरूज असून एक चौकोनी आहे. त्यामध्ये खोल्या, तसेच पायऱ्यांचे जिनेही आहेत. यशवंत बुरुज, भवानी बुरुज, गणेश बुरुज, वेताळ बुरुज अशी बुरुजांची नावे असून, गणेश बुरुज हा किल्ल्यातील महत्त्वाचा बुरुज आहे. किल्ल्यापासून स्वतंत्र असा भक्कम हनुमंत बुरुज आहे.

किल्ल्याबाहेर एकाकी किंवा नुसता बुरुज बांधण्याची पोर्तुगीजांची पद्धत होती. त्याचा उपयोग एखाद्या छोट्या किल्ल्यासारखा होत असे. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असून, उत्तरेकडे मुख्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुरुज आहेत. या दरवाजाच्या कमानीवर फुलांच्या वेलबुट्टीचे अत्यंत सुंदर नक्षीकाम असून, दोन्ही बाजूला सोंडेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती व व्याल पशूची प्रतिमा कोरलेली आहे. मूळ किल्ला पोर्तुगीजांनी बांधला असला, तरी मराठ्यांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी आमूलाग्र बदल केले. त्यामुळे मराठा शैलीची छाप त्याच्यावर आहे. येथे असलेल्या शिलालेखावरील ओळी – ‘बाजीराव अमात्य मुख्य सुमति आज्ञापिले शंकरा पाश्चात्यासी वधुनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा’ देवनागरी लिपीतील या ओळींतून बाजीराव पेशव्यांनीच किल्ल्याचे बांधकाम करण्याचे आदेश आगाशी या ठिकाणचे सुभेदार शंकराजी केशव फडके यांना दिल्याचे स्पष्ट होते. तसेच या शिलालेखात बाजी तुळाजी या किल्ल्याच्या स्थापत्य विशारदाच्या नावाचा उल्लेख मिळतो. २३ मे १७३७ रोजी या कोटाचे काम पूर्ण झाल्याचा शिलालेखात उल्लेख आहे.

किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वर, श्रीदत्त व भवानी माता यांची मंदिरे आहेत. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरच दगडी पायऱ्या असलेले सुबक बांधणीचे एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला पायऱ्या आहेत. तळ्यातील पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले, तरी तळ्याची बांधणी अत्यंक सुबक आहे. या मंदिराजवळच पूर्वेकडील तटात एक छोटे मंदिर असून, त्यात नित्यानंद महाराजांच्या पादुका आहेत. तसेच किल्ल्यात एक दर्गा आणि दोन कबरीही आहेत. किल्ल्यात सदर, वाडे, कोठारे अशा बांधकामांचे अवशेषही ठिकठिकाणी दिसून येतात. याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या पाच-सहा विहिरीसुद्धा आहेत.




चौथ्या बुरुजाच्या अलीकडे तटात चोरवाटा आहेत. यशवंत बुरुजाखाली ५५३ फूट लांबीचा भुयारी मार्ग आहे. हा गाळाने भरला आहे. काही धाडसी ट्रेकर्स सरपटत यात जाऊन येतात. खास भुयारी प्रवासाचे कार्यक्रमही राबविले जातात. किल्ल्यात पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली. एका बाजूला अथांग सागर व बाकी तिन्ही बाजूंना दलदल आहे. चिमाजीअप्पांना या किल्ल्यावर मोहीम पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागली. यावरून किल्ल्याचा भक्कमपणा लक्षात येतो. तसेच याचे महत्त्वही कळून येते.
त्या वेळी तुंबळ लढाई झाली. चिमाजीअप्पांनी अतिशय हुशारीने नाकाबंदी करून किल्ल्यावर हल्ला केला व विजय मिळविला. लढाईत पोर्तुगीजांची ८०० माणसे मारली गेली. दारूगोळा संपला आणि पोर्तुगीज शरण आले. मराठ्यांनी किल्ला सर केला. किल्ल्यातील बायका-मुलांना सुखरूप जाऊ दिले. ब्रिटिशांनी हा किल्ला १७७४मध्ये ताब्यात घेतला व सालभाईच्या कराराप्रमाणे मराठ्यांना तो १७८३मध्ये परत केला. नंतर १८१८मध्ये त्यांनी तो परत घेतला. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर किल्ल्याची दुरवस्था झाली.

सन १८६०मध्ये इंग्रजांनी हा किल्ला कर्नल लिटलवूड या इंग्रज अधिकाऱ्याला भाड्याने दिला. त्याने किल्ल्यात उसाची शेती केली आणि साखर कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या उभारणीसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकले. त्यामुळे किल्ल्यास अधिकच हानी पोहोचली. किल्ल्याकडे कोणी फिरकेनासे झाले. इतिहासाची आवड व पर्यटकांमुळे आता किल्ल्यावर वर्दळ वाढली आहे. आजही किल्ल्याचे अवशेष बघताना पोर्तुगीज शैलीचे बांधकाम आढळून येते. त्याची तटबंदी विस्मयकारक आहे. बालेकिल्ल्यात दारूगोळा कोठार, सैनिकांची वसतिस्थाने आणि वाड्यांचे अवशेष दिसून येतात.




पंजू बेट : वसईच्या दक्षिणेस असलेल्या खाडीच्या तोंडावर हे कुंकवाच्या कुयरीसारख्या आकाराचे बेट आहे. येथे उल्हास नदी समुद्रास मिळते. त्यामुळे उल्हास नदीचे मुख खूप रुंदावले आहे. याच खाडीमध्ये हे सुंदर बेट वसलेले आहे. पंजू हे नाव पाचू (रत्न) यावरून आले आहे. कारण हे पाचूसारखेच दिसते. हे बेट पश्चिम रेल्वेच्या नायगाव आणि भाईंदर स्थानकांदरम्यान आहे. हे एक प्राचीन ऐतिहासिक गाव आहे. चिमाजीअप्पांच्या वसई मोहिमेच्या वेळी या गावाचा त्यांना आधार होता. त्यांचे आर्थिक व्यवहार या गावातूनच होत होते. या गावातील सुमारे २० लोकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे ६०० एकर आहे. लोकांचे मुख्य व्यवसाय शेती, मासेमारी, मिठागरे हे आहेत. या छोट्या बेटावर गोड्या पाण्याचा एक तलावही आहे. मिठागरेही आहेत. गावातील लोक सुसंस्कृत आहेत. नायगाव किंवा भाईंदरकडून येथपर्यंत येण्याचा बोटीचा प्रवास खूप आल्हाददायक आहे.

एक अपरिचित बेट - पाणजू बेट (PANJU ISLAND)
रविवारी सकाळी लवकर निघून कोपर वरून सकाळी साडेपाच वाजताची बोईसर ट्रेन पकडून आधी वसई गाठलं. वसईला पोहचेपर्यंत सकाळी साडेसहा वाजले. वसई स्टेशनवरूनच सकाळचा सूर्योदय टिपला. तिथून नायगवसाठीची लोकल पकडून नायगावला पोहोचलो.

१८९८ सालची शाळाकसे जाल वसईला?

भिवंडी निजामपूर महापालिका : सन २००२मध्ये ही महानगरपालिका अस्तित्वात आली. भिवंडी हे यंत्रमागाचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. भिवंडीत १९२७मध्ये खानसाहेब समदशेठ यांनी पहिला यंत्रमाग सुरूकेला. ‘सोने विका आणि यंत्रमाग घ्या’ अशी त्यांची घोषणा होती. आजमितीला पाच लाख माग येथे आहेत. सध्या या उद्योगावर मंदीची लाट आहे. पूर्वीच्या काळी कामोरी नदीतून वसई खाडीमार्गे भिवंडी ते गुजरात, तसेच दक्षिण भारतातही व्यापार चालत असे. तांदूळ, लाकूड आणि हातमाग कापड या वस्तूंची मुख्यत्वे जहाजाद्वारे ने-आण या ठिकाणी होत असे. म्हणूनच भिवंडीच्या या परिसराला ‘बंदर मोहल्ला’ या नावाने आजही ओळखले जाते. भिवंडीत आजमितीला दिसणारी मोठी कुटुंबे २५० वर्षांपूर्वी व्यापाराच्या निमित्तानेच या ठिकाणी आली असावीत. भिवंडी गावात यापैकी काही कुटुंबीयांची भातशेती आणि सावकारी होती. आजही भिवंडीत भाताच्या काही गिरण्या शिल्लक आहेत. गावातील निजामपुरा, सौदागर मोहल्ला, बंदर मोहल्ला, भुसार मोहल्ला, तांडेल मोहल्ला, दर्गा रोड, सुतार आळी, हमाल आळी, ब्राह्मण आळी आदी परिसरांत जुन्या वास्तू आजही पाहायला मिळतात. भिवंडीतील ब्राह्मण आळीत असणारा १८ खोल्यांचा जोगळेकर वाडा त्यापैकीच एक. याच्या भिंती दोन फूट जाडीच्या आहेत आणि तो चौपाखी कौलारू आहे. अनेक जुन्या वाड्यांची जागा आता अपार्टमेंटनी घेतली आहे.




श्रीगंगा गोरजेश्वर : शहापूर तालुक्यातील आणि टिटवाळ्यापासून जवळच असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी काळू नदीपात्रात हे एक पुरातन शिवमंदिर आहे. या शिवमंदिरात होडीने जावे लागते. हे मंदिर ५०० वर्षे जुने असावे, असे बोलले जाते. त्याचे बांधकाम प्राचीन हेमाडपंती शैलीतले. मंदिरातील शिवलिंगही पाण्यात आहे. मंदिर परिसरातील विविध देव-देवतांच्या मूर्ती, शिल्प आणि घोटीव शिलालेख या मंदिराच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. मंदिराच्या वरच्या बाजूला नदीपात्रात असणाऱ्या मोठ-मोठ्या दगडांवर अवाढव्य अशी सात भोके कोरलेली दिसून येतात. या मंदिरामागे गरम पाण्याची पाच कुंडे आहेत. येथे पर्यटन विभागाने लक्ष देऊन मंदिर परिसरातील गाळ काढावा, तसेच रस्त्याची सुविधा करावी अशी स्थानिकांची मागणी आहे. आसपासच्या गावातून भाविक, तसेच अभ्यासू पर्यटक येथे येत असतात.

वज्रेश्वरी : पूर्वी वडवली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरातील देवतेच्या सन्मानार्थ या शहराचे नाव वज्रेश्वरी करण्यात आले. हे मंदिर थोरले बाजीराव यांचे बंधू चिमाजीअप्पांनी नव्याने बांधले. वज्रेश्वरीला वज्रबाई आणि वज्रयोगिनी म्हणून ओळखले जाते. पृथ्वीवर देवी पार्वती किंवा आदिमायेचा अवतार मानले जाते. तिच्या नावाचा शब्दशः अर्थ ‘वज्राची बाई (गडगडाट)’ असा आहे. हे गाव गरम पाण्याच्या कुंडांमुळे प्रसिद्ध आहे. पौराणिक कथेप्रमाणे, श्रीराम आणि श्री परशुराम यांची येथे भेट झाली असे म्हणतात. पौराणिक कथेत म्हटले आहे, की परशुरामांनी वडवली येथे यज्ञ (अग्नी अर्पण) केला. शिवमंदिरासमोर असलेल्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्याने चर्मरोग बरे होतात अशी भावना आहे.

या मंदिराच्या आजूबाजूला पाच ते १० किलोमीटरच्या परिसरात गरम पाण्याची २० ते २२ कुंडे आहेत. सन १७३९मध्ये चिमाजीअप्पांनी वसईचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी वडवली भागात तळ ठोकला होता. तीन वर्षे ही मोहीम चालू होती. चिमाजीअप्पांनी वज्रेश्वरी देवीला प्रार्थना केली होती, की वसई मोहीम फत्ते झाली तर आपण देवीसाठी मंदिर बांधू. स्थानिक दंतकथेनुसार, चिमाजीअप्पांना वज्रेश्वरी देवी स्वप्नात दिसली आणि किल्ला कसा जिंकता येईल हे तिने सांगितले. त्याप्रमाणे वसईत पोर्तुगीजांचा पराभव झाला. त्याचा विजय साजरा करण्यासाठी आणि वज्रेश्वरी देवीला बोललेले नवस पूर्ण करण्यासाठी चिमाजीअप्पांनी मंदिर बांधून घेतले.
पेशवेकालीन वज्रेश्वरी मंदिर
अरुण मळेकर
वज्रेश्वरी माता मंदिराबरोबर गरम पाण्याच्या कुंडांव्यतिरिक्त स्वामी नित्यानंदांचे अनुयायी स्वामी मुक्तानंद यांचा गुरुदेव आश्रम म्हणजे योग प्रशिक्षण, अध्ययन केंद्र आणि त्याच्या रमणीय परिसराचे स्थळदर्शन म्हणजे सामाजिक पर्यटनाचे दिशादर्शक केंद्र आहे. म्हणूनच वज्रेश्वरी स्थळदर्शनात तीर्थाटनाबरोबर पर्यटनाचाही लाभ घेता येतो.
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ठाणे जिल्ह्याला हजारो वर्षांची ऐतिहासिक, सांस्कृतिकप्रमाणे धार्मिक अधिष्ठानाची वैभवशाली पार्श्वभूमी आहे. वनवैभवासह सागरसान्निध्याच्या ठाणे जिल्ह्यला जे वैभव लाभलेय त्यात धार्मिक पार्श्वभूमीच्या मंदिर वास्तूंचाही सहभाग खूप मोठा आहे. त्या मंदिर वास्तूंना अजोड अशा शिल्पाकृतींबरोबर अनेक सत्ताधीशांच्या काळातील त्या शिल्पांवर त्यांची शैलीही पाहावयास मिळते.
अंबरनाथचे एक हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन शिव मंदिर, ठाण्याचे कोपिनेश्वर मंदिर आणि पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील तुंगारेश्वर शिव मंदिर दर्शनातून याचा प्रत्यय येतोच. गेल्या शतकाच्या उत्तरार्धात निर्माण झालेल्या शहाडच्या विठ्ठल मंदिराची शिल्पाकृतीही वाखाणण्यासारखी आहे.
मुंबई-ठाण्यापासून तास-दिड तासाच्या अंतरावरील वज्रेश्वरी माता मंदिर तसे सर्वपरिचित असून अनेक ज्ञाती, परिवारांचे ते श्रद्धास्थानासह कुलदैवतही आहे. त्यामुळेच या स्थानाला महाराष्ट्रातील पावित्र्यासह धार्मिक स्थळांत विशेष स्थान आहे..
वज्रेश्वरी म्हणजे माता पार्वती देवीचे स्वरूप. पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीविरोधात पेशव्यांच्या काळात सरदार चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसई किल्ल्यावर सर्व शक्तिनिशी जी यशस्वी युद्धमोहीम झाली त्याची पार्श्वभूमी या मंदिर वास्तूमागे आहे. इ. स. १७३९ मध्ये सरदार चिमाजी अप्पांनी आपल्या अंगभूत शौर्यासह कल्पकतेने मोहीम फत्ते करून पोर्तुगीजांना पराभूत केले.
‘‘माझी वसई परिक्षेत्राची नियोजित मोहीम यशस्वी झाल्यावर आई वज्रेश्वरी मी तुझे मंदिर उभारीन,’’ असा नवस सरदार चिमाजी अप्पांनी केला होता. त्याला यश आल्याने किल्लास्वरूप ही मंदिर वास्तू उभारली गेली.
वज्रेश्वरी देवी मंदिर म्हणजे पुरातन, पारंपरिक वास्तुशिल्पाचा एक नमुना आहे. इतर प्राचीन मंदिरांप्रमाणे वज्रेश्वरी माता मंदिरालाही आख्यायिका, दंतकथेचे कोंदण आहेच. त्यानुसार, प्रारंभीच्या काळात वज्रेश्वरी मातेचे वास्तव्य आताच्या मंदिर वास्तूच्या नजीकच्या ‘वडवली’ गावात होते. कालांतराने ‘वडवली’ हे नाव मागे पडून वज्रेश्वरी हे नाव अखेर जनमानसात रूढ झाले.
वज्रेश्वरी मंदिर वास्तू किल्ल्याप्रमाणे उंचावर असल्याने दगडी पायऱ्या चढून मंदिरापर्यंत जावे लागते. मूळ मंदिराचे बांधकाम भक्कम दगडाचे आहे. आपण अवाक्यातील पायऱ्या चढून मंदिर वास्तूत प्रवेश करताना मंदिर वास्तूत प्रवेश करताना मंदिर वास्तूला शोभेल असा सभामंडप, गाभारा, प्रमुख गाभारा असे तीन टप्पे लागतात. या तिघांचेही बांधकाम दगडाचे आहे.
या दगडी वास्तूवर सुशोभीकरणासाठी रंगरंगोटी केली जात असे; परंतु पुरातत्त्व खात्याच्या आदेशानुसार रंग देण्याला प्रतिबंध केल्यावर मूळ मंदिर वास्तूच्या शिल्पाकृतीचा बाज कायम राहिल्याने त्याच्या पुरातन बांधकामाची कल्पना येते. मंदिर वास्तूची रचना किल्लासदृश असल्याने त्याच्या पुरातन- पारंपरिक वास्तुरचनेनुसार मंदिर प्रवेशद्वारीच्या नगारखान्याची इमारत मूळ बांधकामाच्या शैलीशी सुसंगत अशी आहे. पेशवेकालीन या मंदिराच्या सभोवताली असलेल्या तटबंदी आणि बुरुजांमुळे मंदिराकडे मार्गस्थ होताना आपण एखाद्या किल्ल्याकडे निघालो आहोत, असाही भास होतो.
या मंदिरातील वज्रेश्वरी देवीच्या हाती खड्ग आणि गदा आहे. तसेच वज्रेश्वरी देवीच्या आकर्षक मूर्तीच्या एका बाजूस रेणुका माता आणि दुसऱ्या बाजूस कालिका माता यांच्याही चित्ताकर्षक मूर्ती दर्शकांचे लक्ष वेधून घेतात. प्रमुख गाभाऱ्यात भाविकांना योग्य प्रकारे दर्शन घडावे अशाच प्रकारे देवीची स्थापना केली असून, त्यासाठी दर्शकांना आगमन-निर्गमनाची सोय आहे.
मंदिर परिसरातील गणेशपुरी अकलोली, दातीवली येथील गरम पाण्याची कुंडे म्हणजे श्रद्धावान भाविकांबरोबर ते पर्यटक तसेच रुग्णांचेही आकर्षण आहे. कुंडातील गंधकयुक्त गरम पाण्याच्या सतत वाहत्या झऱ्यांमुळे त्वचारोगासाठी तो एक इलाज आहे असे मानले जाते.
वज्रेश्वरीला वर्षभर भाविकांचा ओघ असतोच; परंतु वार्षिक उत्सवातील चैत्रातील यात्रा जेव्हा भरते, तेव्हा या उत्सवाचा महोत्सव अनुभवता येतो. नवरात्र उत्सवाची सांगता होताना दसऱ्याची पालखी शोभायात्रा हे येथील खास आकर्षण आहे. या उत्सवाचे औचित्य साधत कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते यांना आमंत्रित करून समाजप्रबोधन कार्याचा वसाही मंदिर व्यवस्थापनाने जपला आहे.
वज्रेश्वरी माता मंदिराबरोबर उपरोक्त गरम पाण्याची कुंडे याव्यतिरिक्त स्वामी नित्यानंदांचे अनुयायी स्वामी मुक्तानंद यांचा गुरुदेव आश्रम म्हणजे योग प्रशिक्षण अध्ययन केंद्र आणि त्याचा रमणीय परिसर स्थळदर्शन म्हणजे सामाजिक पर्यटनाचे दिशादर्शक केंद्र आहे. म्हणूनच वज्रेश्वरी स्थळदर्शनात तीर्थाटनाबरोबर पर्यटनाचाही लाभ घेता येतो..


मानस मंदिर, आसनगाव : शहापूर तालुक्यातील आसनगाव जवळ अत्यंत सुंदर जैन मंदिर आहे. माहुली किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निसर्गरम्य ठिकाणी ही सुंदर वस्तू जैन समाजाने निर्माण केली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर हे ठिकाण आहे.





डोंगरी किल्ला/ धारावी किल्ला : या डोंगरी किल्ल्याचे अस्तित्व आता राहिलेले नाही. किल्ल्यावर थोडेफार एका बुरुजाचे, तटबंदीचे अवशेष शिल्लक राहिले आहेत; मात्र अरबी समुद्र ३६० अंशांमध्ये पाहता येतो. एका पॉइंटवर जणू समुद्र आपल्या सर्व बाजूंनी आहे असे वाटते. या किल्ल्यासमोरच वसईचा प्रसिद्ध किल्ला आहे. हा परिसर आता हॉटेल, रिसॉर्टस् यांनी गजबजू लागला आहे. मुंबईहून तासा-दीड तासात रेल्वेने, रस्त्यावरचे ट्रॅफिक टाळून तेथे जाता येते. लागूनच उत्तन बीच आहे, तसेच वेलंकनी बीच आणि दक्षिणेला गोराई बीच आहे. या भागात पोर्तुगीजांनी बांधलेल्या चर्चेसचे अवशेष, तसेच सुस्थितीतील चर्चही आहेत.


धारावी देवी मंदिर : १७३७मध्ये बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजीअप्पा यांच्याकडे वसई मोहिमेचे नेतृत्व होते. त्या वेळी धारावी येथे त्यांनी किल्ला बांधला. त्या वेळी खोदकाम करीत असताना देवीची एक मूर्ती सापडली. तिचे मंदिर येथे बांधण्यात आले. स्थानिक विश्वस्तांमार्फत मंदिराची चांगली व्यवस्था केली जाते. कोळी व आगरी समाजाचे हे कुलदैवत समजले जाते. येथील परिसर निसर्गरम्य असून सुंदर बगीचा, लहान मुलांसाठी खेळाची साधने, कारंजे अशा गोष्टी उपलब्ध आहेत. सहलीसाठी हे उत्तम ठिकाण आहे.






घोडबंदर : १५३०मध्ये पोर्तुगीज ठाणे येथे आले व १५५०मध्ये त्यांनी किल्ला बांधला. पोर्तुगीज शैलीतील कमानी व भिंतींच्या बांधकामाचे अवशेष अद्यापही दिसून येतात. येथे कोयंडे किंवा बिजागऱ्यांची गरज नसलेला वैशिष्ट्यपूर्ण दरवाजा आहे. बुरुजाच्या माथ्यापर्यंत असलेल्या खाचांमधून हा दरवाजा वर-खाली सरकवून उघड-बंद करता येत असे. या बुरुजाच्या माथ्यावरून उल्हास खाडी व आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते. दूरवरचा प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. घोडबंदर किल्ल्याची तटबंदी आजमितीस शिल्लक नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार येथपर्यंत आहे



कसे जाल मीरा भाईंदर परिसरात?
https://www.saamana.com/article-by-niti-mehandale/
शिवमंदिरांच्या राज्यात – धर्माचं त्रिवेणी संगमक्षेत्र शूर्पारकनगरी

>> नीती मेहेंदळे
बोािरिवलीजवळच्या कान्हेरी लेण्यांमध्ये एका शिलालेखात शूर्पारक चा व्यापारी गुंफा बांधायला दान देतो आहे असा उल्लेख आहे. हे शूर्पारक म्हणजे प्राचीन काळातलं सोपारा, हल्ली नाला-सोपारा अशा नावाने ओळखलं जातं. नाला आणि सोपारा अशी जुळी गावं इथे आहेत. वसईचा काही भाग घेऊन झालेलं शूर्पारक हे बंदराचं गाव म्हणून दूरदूरपर्यंत ख्यातनाम होतं. ही सर्व लेणी प्राचीन व्यापारी मार्गांवरचे थांबे आहेत. शूर्पारक (आजचे सोपारा), चेऊल (आजचे चौल), श्रीस्थानक (आजचे ठाणे) अशी बंदरं तेव्हा सशक्त व्यापार उदीम चालवत होती. अशा सधन स्थानांवर मंदिरं बांधण्याची प्रथा प्रचलित होतीच. चौलचंपावती व कल्याणप्रमाणे सोपाऱयातही अशी प्राचीन मंदिरं आज काही प्रमाणात टिकून आहेत. त्यात चव्रेश्वराचं मंदिर अधिक समृद्ध वारसा बाळगून आहे. हे शिवमंदिर असून इथला नंदीही मोठा देखणा आहे. मंदिराच्या आवारात मोठय़ा मूर्ती इतस्ततः विखुरलेल्या दिसतात. त्यात ब्रह्माची उभी मूर्ती अतिशय सुबक घडवलेली आहे. दंपती, उमा महेश्वर, भारवाही यक्ष, वराह इत्यादी अनेक मूर्ती तसेच काही स्तंभाचे तुटलेले भाग, वीरगळही दिसतात.
सोपाऱयाची महती इथे थांबत नाही. बौद्ध धर्म अंगिकारलेल्या मौर्य सम्राट अशोकाच्या अनेक शिलालेखांपैकी एक शिलालेख सोपाऱयातही आहे. अशोकाने बांधवून घेतलेला एक स्तूपही इथे आहे. आता जरी हे सगळं जीर्ण अवस्थेत असलं तरी ते इतिहासात आपलं स्थान नोंदवून आहे. जवळच बौद्ध विहारही आहेत.
या दोन धर्मांची मोहोर इथे ठसलेली असताना ख्रिश्चन धर्माचा प्रसारही इथे काळयोगे झालेला दिसतो. अनेक चर्चेस आणि तिकाटण्यांवर क्रॉसेस उभारलेले दिसतात. आश्चर्य म्हणजे वर्षानुवर्षे हे तिन्ही धर्म इथे मूळ रोवून असले तरी सुखाने नांदत आहेत.
थोडं दक्षिण दिशेला जात राहिलं तर वसई गावात पारनाक्यावर सिद्धेश्वराचं प्राचीन शिवमंदिर दिसतं. मंदिर जरी पेशवेकालीन असलं तरी ते त्याहून प्राचीन असण्याची शक्यता आहे. मंदिराच्या परिसरात त्याचं प्राचीनत्व सिद्ध करणारी एक स्मारकशिळा अलीकडेच निदर्शनास आली. ती शिलाहारकालीन असल्याचे सांगितले गेले आहे व काळ बाराव्या शतकाच्या आधीचा असावा असे वर्तवले गेले आहे. त्यावर तब्बल सहा ओळींचा देवनागरी भाषेतला शिलालेख असल्याचे लक्षात आले आहे. त्याचे वाचन झाले की त्या शिळेचा व योगाने मंदिराचं कालमापन होईल. कारण कालनिश्चितीसाठी पुरातत्व भागाच्या दृष्टिकोनातून या लेखाचे महत्त्व निश्चित मोठे आहे.
वसईमध्ये निर्मळ हे हिंदू धर्मातील एक पवित्र स्थान मानले जाते. या ठिकाणाची कथा पार पद्मपुराण स्पंदपुराणात कथन केली गेली आहे. या भागात प्राचीनकाळी नरकासुर आणि विमलासुर राक्षस राहत होते. भगवान परशुरामाने कोकण भूमी निर्माण केली आणि ब्राह्मणांना दान केली. उत्तर कोकण भागातल्या या असुरांचा निःपात करण्यासाठी त्याने दोन बाण सोडले. असुरांचा वाढ होऊन त्या बाणांतून दोन तलाव निर्माण झाले. एक निर्मल आणि दुसरा विमल. एका तलावाकाठी निर्मळेश्वर किंवा सुळेश्वर मंदिर तसेच दुसऱया तलावाकाठी विमलेश्वर स्थापन केले. आज हे विमलेश्वर आहे तिथेच शंकराचार्यांची समाधी आहे. सुळेश्वराच्या मंदिराचे क्षेत्र विमलेश्वरहून लहान आहे. मंदिरात शिवलिंग असून सुळेश्वरी देवीची मूर्ती आहे जी नवसाला पावते असा ग्रामस्थांचा समज आहे. विमलेश्वर मंदिराच्या आवारात काही काळ्या पाषाणातल्या भग्न मूर्ती आहेत. त्यात एक देवीची असून दुसरी अर्धंखंडित ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. सिद्धेश्वर मंदिरातल्या ब्रह्माच्या आणि या मूर्तीत बरेच साम्य दिसते. शिवाय काही पादुका कोरलेल्या समाधी आजूबाजूला दिसतात. त्या बहुतेक शंकराचार्यांच्या शिष्यगणांच्या असाव्यात.
परशुरामाची अजून एक कथा वसईजवळच्या तुंगारेश्वर प्रचलित आहे. परशुरामाने तुंग राक्षसाचा वध केला ते हे ठिकाण तुंगारेश्वर. निसर्गाच्या कुशीत वसलेलं क्षेत्र तुंगारेश्वर हे एक भव्य शिवमंदिर असून शेजारी खोडियार मातेचेही मंदिर आहे. थोडय़ाच अंतरावर चिंचोटीचा प्रसिद्ध धबधबा आहे. शिव मंदिराच्या मागील बाजूस रामपुंड असून तुंगारेश्वर मंदिराहून तसेच पुढे चालत गेले की एक मोठे परशुराम पुंड आहे. जवळ एक सुळका आहे. या ठिकाणहून वसई, नालासोपारा, ठाणे आणि तानसा नदीचा सुखकारक भवताल दिसतो. हा रस्ता सरळ पारोळ गावात उतरतो. इथेही एक पुरातन शिवमंदिर आहे. मंदिर आता जरी भग्नावस्थेत असले तरी त्याच्या इतिहासाच्या खुणा शिलाहार काळ असल्याचा अंदाज वर्तवतात.
z megmehen@gmail.com
https://pudhari.news/yatra/463975/mahashivratri-special-jata-shankar-temple-in-kokner/ar
पर्यटक आणि भाविकांना खुणावतेय कोकणेरचे जटाशंकर मंदिर!

पालघर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर सूर्या नदी काठावर वसलेल्या कोकणेर गावात पेशवेकालीन पुरातन जटाशंकर मंदिर आणि नैसर्गिक गरम पाण्याच्या झर्यांसाठी प्रसिद्ध आहे. स्वयंभू शिवमंदिर असल्याने श्रावणातील सर्व सोमवार, मकर संक्रांत आणि महाशिवरात्रीला जटाशंकर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. शनिवारी 18 रोजी हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत आहे त्यानिमित्त छोटासा केलेला लेखप्रपंच….

पालघर ते मनोर हमरस्त्यावरील चहाडे आदिवासी नाका येथून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पुरातन काळातील दगडी बांधकाम असलेल्या पेशवेकालीन मंदिराचा जीर्णोद्धार पालघर – नवली, मासवण आणि कोकणेरच्या ग्रामस्थांनी मिळून मिती वैशाख शुद्ध 3 चंद्रवासरेसा 1972 शके 1837 रोजी करण्यात आला आहे. त्यानंतर गेल्या दहा वर्षांपूर्वी मंदिराचे सुशोभीकरण आणि विस्तारीकरण करण्यात आले.
मंदिराच्या मागच्या बाजूस उत्तरेला साईबाबा मंदिर आणि गगनगिरी महाराजांचा सप्तश्रृंगी मठही आहे. मठाची स्थापना 1983 साली करण्यात आली आहे. जटाशंकर मंदिराच्या मागच्या बाजूच्या भिंतींना लागून भग्नावस्थेतील मूर्त्या आणि शिलालेख आहेत.

जटाशंकर मंदिराच्या पूर्वेला पन्नास मीटर अंतराववरून वाहणार्या सूर्या नदीच्या काठावर नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असलेली आणि सूर्या नदीच्या पात्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने बुडालेली कुंडे अस्तिवात आहेत. कुंडाच्या भिंतीपासून तीन फूट वर पाण्याची पातळी असल्याने कुंडे बुडालेल्या अवस्थेत आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मासवण पुलालगतच्या कोल्हापूर टाइपच्या बंधार्याच्या झडपा काढल्यानंतर नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी होऊन कुंडे उघडी पडतात. त्यामुळे मे महिन्यापासून ते दिवाळीपर्यंतच्या कालावधीत या कुंडातील गरम पाण्यात आंघोळीचा लाभ घेता येतो. पावसाळ्यात सूर्या नदीला पूर आल्यास कुंडे पाण्यासाठी जात असतात.

कोकणेर गावच्या हद्दीतील गरम पाण्याच्या नैसर्गिक झर्यांचा इतिहास पाहता, शंभर वर्षांपूर्वी सूर्या नदीकाठच्या भागात गरम पाण्याचे झरे आढळून आले होते. त्याकाळी ग्रामस्थांनी दगड बांधकाम करून गरम पाण्याचा वापर सुरू केला होता. परंतु, सूर्या नदीला आलेल्या पुरात नदीकाठ खचल्याने कुंडे पाण्यात गेली होती. अलीकडच्या काळात आमदार निधीतून नदीकाठच्या भागात कुंडांचे बांधकाम करण्यात आले. परंतु, सूर्या नदीवरील बंधार्यामुळे नदीपात्राची पाणी पातळी वाढल्याने कुंडातील गरम पाण्याचा लाभ भाविकांना घेता येत नसल्याची खंत ग्रामस्थांनी बोलून दाखवली आहे.

मासवण पुलालगतच्या बंधार्याची वरच्या बाजूची एक झडप कायमस्वरूपी अथवा मकर संक्रांतीपर्यंत काढून ठेवल्यास सूर्या नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. वर्षाचे बारा महिने गरम पाण्याच्या कुंडांचा वापर करता यावा, यासाठी ग्रामसभेचा ठराव घेऊन प्रशासनाकडे मागणी केली जाणार असल्याची माहिती कोकणेरच्या सरपंच मालिनी इभाड यांनी दिली.
संकलन – मंगेश तावडे, नविद शेख (पालघर)
Vasai Fort
Pune-Vasai-Arnala-Dahanu
Dahanu-Bordi
Bordi-Surat-Sivassa
Silvassa-Jawahar
Jawahar-Pune
PUNE- VASAI 180 KMS 4.5 HRS
VASAI FORT
Type: Sea Fort
Base Village: Vasai
Where: 180 KMs from Pune
Route: Pune-Mumbai-Vasai
Time visited: November 2012
Time to see: 3+ hrs. Car can be taken to most of the
points.
History as on internet:
The fort of
Vasai was built in 1414 by Sardar Bhandari Bhendale. In 1530 Sultan of Gujrat
captured the Fort but in 1534 it was conquered by Portuguese. With strong
ramparts, the Fort is decagonal with bastion at each of the corner. There are
entrances to the fort from both seaside and landside. In 1737, the Marathas
tried to capture the fort, but failed. Later Bajirao Peshwa chose Chimajiappa
for the mission. He planned for it and decided to attack from swamp side of the
fort. They broke the rampart on the northern side. The army broke inside but unfortunately
mines burst late and many soldiers died. The fierce battle continued over two
days. The ammunition ended, over 800
Portuguese lost their lives and finally the Portuguese had no option other than
to surrender to Chimajiappa.
Shopping: Vasai is famous for Sukeli - preserved Bananas, which is sort of soft dry fruit like Anjir. (Around 7-8 dried bananas are wrapped in banana leaves which was around Rs60 probably around 0.25kg ) Available in the main market.
Vasai fort is just not like any other fort but a huge area with several structures inside. Located in old vasai, the fort is along the coast. Apart from few church buildings, ammunition storeroom, residence of soldiers, there isn’t much to see around. It takes around 2 hours to see the fort completely and you can roam around in car to most of the spots.
Statue of Narveer Chimajiappa lies on the left side on the way to the fort.
After the statue, turn side for Archaeology department office. The staff is friendly but they unfortunately they don’t have any guides. The main roads are all tar roads and you can see various building by driving down.
Just adjacent to Archaeology office is dilapidated building
probably a church.
Another huge church lies opposite of Archaeology office.
One more church is locate few meters away in a narrow lane.
The double floored structure reminds of once hustling town with several buildings magnificent architecture.
The 4th church worth seeing is one with ‘charkri jina’
or round staircase. Not sure but this church is said to have a huge bell in the
tower above which Chimajjiappa brought it and installed in Temple of Menavali
near wai.
After Vasai Fort visit we proceeded to Arnala. Arnala is a small fishing village about 20kms from Vasai or 17 kms from Virar. The fort is on a small island which houses a village. The road to the beach was extremely narrow occupied by fisherman with huge dry areas for fishes on both side. There was absolutely no space for car park. Couldn’t really see any passenger boats and all were mostly fishing boats. Since this was family trip I decided to skip and proceed with next destination- Dhanau.
Dahanu Bordi
Pune-Vasai-Arnala-Dahanu
Dahanu-Bordi
Bordi-Surat-Sivassa
Silvassa-Jawahar
Jawahar-Pune
Type: Beach
Base Village: Dahanu
Where: 200 KMs from Pune
Route: Pune-Mumbai-Dahanu
Time visited: November 2012
Shopping: Chikoo Chips (Dried Chikoo), Chikoo pickle and Chikoo chocolates.
Dhanu-Bordi is coastline known for peaceful tranquility. Not very commercialized all you can do is laze around and enjoy the beach whenever there is high tide.
While travelling to Dahanu, all the hotels fall on the left side slightly out of town.. The Dahanu village falls on the right side. Towards the end of the village lies Dahanu Fort. The Fort has a history spanning 400 years, when the Portuguese took over the west coast and segregated the Thane region into two divisions. Headed by Chimaji Rao Appa, the Marathas took over the fort in 1739. The fort still is in amazing condition but has several offices inside. We didn’t venture inside.
We reached Dahnu by around noon and stayed at Pearline hotel. Dahanu has only 3-4 options to stay and Pearline offers best stay options and quality food. All the 3 hotels are beach facing. But the beach is muddy at several places and you cannot go too far, hence can be best enjoyed in high tide only.
The
swimming pool at Pearline is well maintained.
It was low tide in the evening and we were not able to go and enjoy the
beach. After enjoying swim in the
swimming pool, we had a hearty dinner.
In the morning we enjoyed the beach. Since we got the booking only for a day we proceeded to Bordi.
BORDI
Bordi village and the beach are at a distance of 2 km from Gholvad railway station. There are very few hotels here, Goolkush Hotel, Jayee Resort, Tapovan and Anand Resort, to be more specific. The tariffs of all these are almost the same.
Anand Resort
Anand Resort the only veg hotel in Dahanu-Bordi area has two options to stay inside the chikoo garden. The older hotel although well maintained is of average quality and need a realistic upgrade. But the food quality is excellent and so is the well maintained orchard with swimming pool.
With emus and different pets around Crazy crab hotel could
be good option if you drink and enjoy nonveg.
After a relaxing day at Anand Resort early morning we proceeded to Surat-Silvassa.



















































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.