Wednesday, November 4, 2020

मुंबई : इतिहास आणि पर्यटन

 

मुंबई : इतिहास आणि पर्यटन


‘करू या देशाटन’
सदराच्या आजच्या भागापासून माहिती घेऊ या मुंबईतील पर्यटनस्थळांची. सुरुवातीला पाहू या मुंबईचा थोडा इतिहास...
.....
मुंबई ही सर्वच भारतीयांची जान आहे. इथे जो आला तो रमला. मुंबई म्हणजे छोटा भारतच. ही भारताची आर्थिक राजधानी आहे. ६०३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या महानगराच्या दक्षिण-पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला वसईची खाडी (उल्हास नदी), पूर्वेला ठाणे खाडी, मलबार, खंबाला, वरळी, पाली, गिल्बर्ट, शिवडी, अँटॉप इत्यादी छोट्या-मोठ्या टेकड्या आहेत. यामुळे मुंबईला एक नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. पर्यटकांच्या दृष्टीने तर मुंबापुरी खूपच महत्त्वाची आहे. त्यापूर्वी मुंबईचा थोडा इतिहास पाहू या. 

मुगा नावाच्या कोळ्याने सध्याच्या फोर्ट भागात मुंबादेवीचे देऊळ बांधले. त्यावरून मुंबई हे नाव पडले असावे, असे सामान्यपणे मानले जाते. मुंबई बेटाच्या उत्तरेकडील वांद्रे, कुर्ला, ठाणे, घाटकोपर व अंधेरी या बेटावरील प्रमुख भाग म्हणजे साष्टी बेट. उल्हास नदीच्या वसई खाडी व ठाणे खाडी या पलीकडील भूभाग मुख्य कोकण किनारपट्टीपासून वेगळा झाला आहे. त्यातील ठाणे व भाईंदर महापालिकेचा भाग सोडून सध्याचे बृहन्मुंबई क्षेत्र आहे. याला दुसऱ्या एका मतानुसार सहासष्टी (सहासष्ट) याचे हे छोटे रूप आहे. या ठिकाणी सहासष्ट गावे होती म्हणून हे नाव रूढ झाले, असाही एक मतप्रवाह आहे. मुंबईमध्ये फार पूर्वीपासून कोळी वस्ती आहे. रोमन प्रवासी टॉलेमी याने केलेला हेप्टानेशिया हा उल्लेख (इ. स. पू. १५०) बहुधा मुंबईचा असावा, असे मानले जाते. प्रागैतिहासिक काळातील भूपृष्ठाच्या उलथापालथीचे होणारे परिणाम दाखविणारे बेडूक, खैर वृक्ष इत्यादींचे अवशेष येथे दिसून आले आहेत. सध्या बॅकबेच्या किनाऱ्यावर सापडलेल्या अश्मयुगातील दगडी आयुधांच्या अवशेषांवरून प्राचीन काळी येथे मानवी वस्ती असावी, असे दिसते. या भागात कोकणातील आभीर व नंतर त्रैकूटक यांची सत्ता होती. इसवी सनाच्या पाचव्या शतकातील त्रैकूटक राजा कृष्ण याची नाणी मुंबई व साष्टी बेटांवर सापडली आहेत, यावरून तसे म्हणता येते. कान्हेरी येथील बौद्ध गुंफांमुळे या भागाचा इतिहास सातवाहन काळापर्यंत जातो. त्यानंतर कोकणातील मौर्य आणि नंतर चालुक्य यांच्या अंमलाखाली हा भाग होता. पुढे उत्तर कोकणाचे राज्य राष्ट्रकूटांकडून शिलाहारांकडे आले. इ. स. ८००–१२६०च्या सुमारास शिलाहारांच्या काळातच वाळकेश्वराची स्थापना झाली. पाठारे प्रभू, कायस्थ प्रभू त्या काळातच येथे आले. शिलाहारांचा सागरी युद्धात पराभव करून यादवांनी येथे आपला अंमल प्रस्थापित केला. 

मुंबादेवी मंदिरमुंबादेवी मंदिर
रामदेवराव यादवानंतर वीस-पंचवीस वर्षांतच मुंबईवरील हिंदूंचा अंमल संपुष्टात आला. त्यानंतर गुजरातचच्या सुलतानाने या भागावर कब्जा केला. १६२९मध्ये डचांच्या मदतीने इंग्रजांनी मुंबई लुटली होती. पोर्तुगीजांनी गुजरातच्या सुलतानांकडून हा भाग व्यापारासाठी मिळविला व त्यानंतर येथे पाय रोवण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रथम येथे किल्ला उभारला. 
दरम्यान, पोर्तुगीजांनी गोवा, वसई, पालघर, दीव-दमण येथे आपले लक्ष केंद्रित केले होते. या वेळी ज्यू, पारशी लोकही येथे आले. १५३४मध्ये गुजरातच्या सुलतानाने मुंबई आणि वसई पोर्तुगीजांच्या ताब्यात दिली व तेथील मुसलमानी अंमल संपला. पोर्तुगीजांकडून मुंबई विकत घेण्याचा प्रयत्नही इंग्रजांनी केला होता. 

१६४०मध्ये दोराबजी नानाभॉय पटेल हा पहिला पारशी येथे आला. दोराबजी पोर्तुगीजांसाठी व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. जेव्हा मुंबई ब्रिटिशांना देण्यात आली, तेव्हा दोराबजींना करवसुलीचे काम इंग्रजांनी दिले. त्यांचे कुटुंबीय १८३४पर्यंत हे काम करीत होते. पारशी लोकांनंतर ज्यू (बेने इस्रायली) १७४६मध्ये मुंबईमध्ये आले. त्यांना ब्रिटिशांनी धार्मिक स्वातंत्र्य दिले. त्यांनी येथे तेल गाळण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याच वेळी काही लोक अलिबाग येथेही राहण्यास गेले. मुंबईमध्ये ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीत काही जण नोकरी करू लागले. तसेच काही जण सैन्यातही भरती झाले. स्वातंत्र्यानंतर १९४८च्या सुमारास मुंबई व इतर ठिकाणांहून ३० हजार ज्यू पुन्हा इस्रायलकडे गेले. ते तेथेही मराठीत बोलतात. आज जवळ जवळ १० हजार लोक इस्रायलमध्ये मराठी बोलतात. 

माझी इस्रायलची फेसबुकवरील मैत्रीण यारदांना ससोनकर हिने मला बरीच माहिती दिली. तेवढी येथे लिहिणे शक्य नाही. पोर्तुगीजांनी १६६२मध्ये हा भाग इंग्रजांकडे सुपुर्द केला. यादरम्यान जंजिऱ्याच्या सिद्दीने बेटांवर जबरदस्तीने हा भाग पुन्हा ताब्यात घेण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु दोराबजीचा मुलगा रुस्तमजी दोराबजी याने इंग्रजांच्या वतीने या बेटांवरील कोळी लोकांच्या मदतीने हल्ल्यांना यशस्वीरीत्या थोपविले होते. कोळी वसाहती अजूनही बॅकबे रेक्लेमेशन, माहीम, वांद्रे, खार वगैरे ठिकाणी आहेत. कोळ्यांच्या बरोबरीने आगरी व भंडारी समाज फार पूर्वीपासून येथे आहे. साधारण १७९९मध्ये कान्होजी आंग्रे यांचा नातू रघोजी आंग्रे याचा मृत्यू झाल्यानंतर इंग्रजांनी मुंबईमध्ये आपले बस्तान पक्के केले. नंतर पेशवाईतील घरगुती कलहाचा फायदा उठवीत घाटावरून त्यांनी पुण्यामध्ये शिरकाव केला. 

मुंबई बेट व साष्टी बेटाचा मोठा भाग मिळून मुंबई महानगर तयार झाले आहे. मुंबई बेट हे मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, वरळी व माहीम या मूळ सात बेटांचे एकत्रीकरण होऊन तयार झाले आहे. 

गेटवे ऑफ इंडिया - १९२४मधील फोटोगेटवे ऑफ इंडिया - १९२४मधील फोटो


ठिकठिकाणी खाजणे असलेला या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता. ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. जेराल्ड आंजिअर (१६७०–७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र मागे हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याच्यानंतर तो टप्पाटप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली. जेराल्ड आंजिअर हा येथे येण्यापूर्वी सुरतला होता. शिवाजी महाराजांनी सुरतेवर केलेल्या हल्ल्यावेळी तो तेथे होता. त्या हल्ल्यात इंग्रजांचे नुकसान झाले नसले, तरी शिवाजी महाराजांची दहशत मात्र निर्माण झाली. १६७२मध्ये त्याने सुरतेहून मुंबईला मुख्य ठाणे हलविले. इंग्रजी कायदा व न्यायालये, टाकसाळ, रुग्णालय, छापखाना, नगररचना, स्थानिक समाजांच्या पंचायती अशा प्रशासकीय सुधारणा त्याने केल्या. गुजराती बनिया व आर्मेनियन या व्यापारी समाजांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईची रचना करण्याची सुरुवात त्याने केली. 

गेटवे ऑफ इंडिया परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळागेटवे ऑफ इंडिया परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा


खरे तर जेराल्ड आंजिअर याला मुंबईचा आद्य नगररचनाकार असे म्हणावे लागेल. १६६२च्या सुमारास इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स व पोर्तुगालची राजकन्या इन्फंटा कॅथरिन यांच्या विवाहानिमित्त पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना आंदण म्हणून दिली. प्रत्यक्षात जानेवारी १६६५मध्ये इंग्रजांना तिचा ताबा मिळाला. चार्ल्सने १६६८मध्ये ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला मुंबई भाड्याने दिली. मुंबईत आरंभी माझगाव, परळ, वरळी या भागात वस्ती होती. परळ व शिव येथे कुणबी राहत. वरळी येथे कोळी, भंडारी समाज राहत होता. माहीम भागात बरेचसे मुसलमान, थोडे प्रभू व साष्टीमधून आलेले काही ब्राह्मण अशी वस्ती होती. १६७०मध्ये सुरतेहून व्यापाराच्या निमित्ताने गुजराती बनिया येऊ लागले. त्याचबरोबर बोहरी, मुसलमान व्यापारीही येऊ लागले. 

मुंबईच्या प्रगतीचा धावता आलेख 
- १७१५ ते १७२२ : चार्ल्स बून याने फोर्ट विभागाचा व गोदीचा विस्तार केला. तसेच ‘बाँबे मरीन’ या आरमाराची स्थापना केली. 
- त्यानंतर मुंबईत कोर्ट ऑफ ऑयर अँड टर्मिनस व मेयर्स कोर्ट यांची स्थापना झाली. 
- १७४८मध्ये नागरी बांधकामाचे नवे नियम करण्यात आले 
- १७५७मध्ये सांडपाणी व्यवस्था सुरू झाली. 
- १७६१च्या सुमारास फोर्ट विभाग व्यापारी व सरकारी कामकाजाचे केंद्र ठरले. 
- १८०३च्या अग्निप्रलयात मुंबईचा बराच भाग नष्ट झाला. त्यामुळेच उमरखाडी, भुलेश्वर, मांडवी इत्यादी भागांचा विकास होऊ शकला. 
- १८०५ : रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना
- १८०५ : साष्टी व मुंबई बेटे जोडणारा ‘शीव मोसमी पूल’ तयार झाला. - ३ नोव्हेंबर १८३८  :  बम्बई टाइम्स और जर्नल ऑफ कामर्स या नावाने पहिले इंग्रजी वर्तमानपत्र सुरू झाले. ते फक्त शनिवार व बुधवारी प्रकाशित व्हायचे. १८६१मध्ये दी टाइम्स ऑफ इंडिया असे त्याचे नाव बदलण्यात आले. 
- १८५३ : लोहमार्गाची सुरुवात 
- १८५४ : कापडगिरण्यांची सुरुवात. मुंबईत ज्या सूतगिरण्या निघाल्या, त्यामुळे मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढण्यास मदत झाली. श्री कावसजी नानाभाई दावर यांनी १८५४च्या फेब्रुवारी महिन्यात बॉम्बे स्पिनिंग अँड वीव्हिंग कंपनी व पायोनियर स्पिनिंग फॅक्टरी काढली आणि मुंबईच्या औद्योगिकरणाच्या पाय घातला गेला. 
- १८५७ : सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टची स्थापना
- १८६२ साली किल्ला व भोवतीचा खंदक पाडून रस्ते व इमारतींसाठी जागा उपलब्ध करण्यात आली. 
- १८६५ : मुंबई नगरपालिकेची स्थापना
- १८६७ : प्रार्थना समाज
- ९ मे १८७४ रोजी ट्राम वाहतूक सुरू झाली. 
- १८७५ : आर्य समाज
- १८८५ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन
- ७ मे १९०७ रोजी पहिली विजेची ट्राम चालू झाली (३१ मे १९६४ रोजी मुंबईतील ट्राम वाहतूक बंद करण्यात आली). 

मुंबईच्या संक्षिप्त इतिहासानंतर आता पाहू या मुंबईच्या पर्यटनाबद्दल...

मुंबादेवीमुंबादेवी
मुंबादेवी : मुंबादेवी म्हणजेच मुंबईची कुलदेवी, आराध्यदेवता होय. जीव मुठीत घेऊन समुद्रावर आपले जीवन व्यतीत करणाऱ्या कोळी बांधवांची मुंबादेवीवर अपार श्रद्धा असल्याने मुगा नावाच्या कोळ्याने मुंबादेवीचे देऊळ बांधले. ते मुंबईचे मूळ रूप असावे, असा एक तर्क आहे. म्हणून मुंबादेवीला सर्वांच्या श्रद्धेचे ठिकाण मानले जाते. याच देवीच्या नावावरून मुंबईला मुंबई हे नाव मिळाले आहे. मुंबादेवीचे मंदिर दक्षिण मुंबई भागात भुलेश्वर परिसरात आहे. ते ४०० वर्षे जुने आहे. 
मुंबादेवीचे मूळ मंदिर सुरुवातीच्या काळात बोरीबंदर स्थानकाजवळ असलेल्या फणसी तलावाच्या काठावर होते. इ. स. १७३७मध्ये मुंबईभोवतीच्या किल्ल्याचा विस्तार करण्याचे ठरवले गेले, तेव्हा तत्कालीन सरकारने हे मंदिर हलवून ते सध्याच्या काळबादेवी भागात नेण्याचा आदेश दिला. या नवीन मंदिराचे बांधकाम आपली जागा देऊन सन १७५३मध्ये पांडू सोनार नावाच्या प्रख्यात मराठी व्यापाऱ्याने केले. मंदिरातील पूजाअर्चा तेच करीत असत. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार त्याचा ट्रस्ट करण्यात आला व आता मंदिराची देखभाल या ट्रस्टमार्फत होते. 

गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम चालू असतानाचा फोटोगेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम चालू असतानाचा फोटो


गेटवे ऑफ इंडिया :
पर्यटकांचे आणि मुंबईमधील लोकांचे विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. इंडो-सरैसेनिक शैलीमध्ये बांधलेले हे देखणे स्मारक १९११मध्ये अपोलो बंदर येथे किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांच्या आगमन प्रसंगाची आठवण म्हणून बांधण्यात आले. याचे बांधकाम बेसाल्ट दगडांच्या साह्याने करण्यात आले आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या कामाची सुरुवात १९१४मध्ये झाली. दिल्ली येथे १९११मध्ये झालेल्या कार्यक्रमात याची फक्त प्रतिकृती किंग जॉर्ज (पाचवे) यांना दाखविण्यात आली होती. ३१ मार्च १९११ रोजी फक्त पायाभरणीचा कार्यक्रम करून कोनशिला बसविण्यात आली. आर्किटेक्ट जॉर्ज विट्टेट  यांनी बनविलेला आराखडा १९१४ साली मंजूर झाला. प्रत्यक्षात गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम १९२४मध्ये पूर्ण करण्यात आले. हे काम गॅमन इंडिया या ब्रिटिश कंपनीमार्फत करण्यात आले. याच गेटमधून ब्रिटिशांची शेवटची पलटण २८ फेब्रुवारी १९४८ रोजी समारंभपूर्वक बाहेर पडली. त्या वेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली होती. 

२८ फेब्रुवारी १९४८ रोजी ब्रिटिशांची शेवटची पलटण येथून बाहेर पडली.२८ फेब्रुवारी १९४८ रोजी ब्रिटिशांची शेवटची पलटण येथून बाहेर पडली.


स्मारकाभोवती पाच जेट्टी (धक्के) आहेत. पहिली जेट्टी खास भाभा अणुसंशोधन केंद्रासाठी आहे, तर दुसरी आणि तिसरी व्यावसायिक ‘फेरी ऑपरेशन’साठी वापरली जाते. चौथी बंद आहे आणि पाचवी रॉयल बॉम्बे याट क्लबसाठी आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या जेट्टीवरून पर्यटकांना एलिफंटा लेण्यांकडे नेले जाते. अलिबागजवळील रेवस व मांडवा बंदराकडे जाणाऱ्या फेरीबोटीही येथून सुटतात. 

ताज हॉटेलताज हॉटेल


ताजमहाल हॉटेल :
गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच उत्तर-पश्चिम बाजूला टाटा यांच्या ताज ग्रुपच्या पंचतारांकित ताजमहाल हॉटेलची भव्य इमारत आहे. ताजमहाल पॅलेस आणि त्याच्या बाजूला हॉटेलचीच टोलेजंग इमारत आहे. दोन वेगवेगळ्या इमारती दिसत असल्या, तरी या दोन्ही इमारती टाटा यांच्या ग्रुपच्या मालकीच्या आहेत व त्या ताजमहाल हॉटेल म्हणून ओळखल्या जातात. असे म्हणतात, १८६५मध्ये मुंबईतील प्रसिद्ध वॉटसन हॉटेलमध्ये तिथल्या दरबानाने जमशेटजी टाटांना आत जाण्यास मनाई केली होती. कारण ते हॉटेल फक्त इंग्रजांसाठीच होते. हा अपमान सहन न झाल्यामुळे टाटांनी भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय तोडीचे हॉटेल बांधण्याचा निश्चय केला होता. त्यातूनच १६ डिसेंबर १९०३ साली ताज हॉटेलची वास्तू बांधली गेली; पण काही जणांना हे मान्य नाही. काहींच्या मते ‘टाइम्स’च्या संपादकांच्या सूचनेवरून मुंबईत चांगले साजेसे हॉटेल व्हावे या हेतूने ते बांधले गेले. सुमारे ६०० रूम्स व ४४ सूट या हॉटेलमध्ये आहेत. 

या इमारतीचा प्लॅन सीताराम खंडेराव वैद्य व डी. एन. मिर्झा या भारतीय आर्किटेक्ट्सनी केला आहे; मात्र याचे बांधकाम ब्ल्यू. ए. चेंबर्स या इंग्रजी इंजिनीअरने पूर्ण केले. भारतामध्ये प्रथमच सरकता जिना या हॉटेलसाठी बसविण्यात आला. हॉटेलमध्ये वापरण्यात आलेले पंखे, जिने, स्नानगृहातील प्लम्बिंग मटेरियल वगैरे प्रथमच बाहेरील विविध देशांमधून मागविण्यात आले होते. ताज पॅलेसचा घुमट आयफेल टॉवरसाठी वापरलेल्या स्टीलपासून बनविण्यात आला असून, हे स्टील त्या वेळी टाटांकडूनच आयात करण्यात आले होते. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस या हॉटेलचा उपयोग ६०० पलंगांचे हॉस्पिटल म्हणून केला होता. ताज टॉवरच्या जागी पूर्वी तेथे ग्रीन हॉटेल होते. ती जागा टाटांनी विकत घेऊन नवीन बहुमजली हॉटेल उभारले. 

ताज टॉवरताज टॉवर
ताज पॅलेस १९०३मध्ये उभा राहिला, तर ताज टॉवर १९७३मध्ये पूर्ण झाला. जॅकलीन केनेडी, बिल क्लिंटन, हिलरी क्लिंटन, नॉर्वेचे महाराज आणि महाराणी, एडिनबर्गचा ड्यूक, वेल्सचा राजपुत्र, रॉजर मूर, जॉन कॉलिस, अँजेलिना जॉली, बराक ओबामा आदी जगप्रसिद्ध व्यक्तींनी ताज पॅलेसचे आदरातिथ्य घेतलेले आहे. अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी याच ताज हॉटेलवर हल्ला केला होता. 

गेटवे ऑफ इंडिया परिसरात शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद, यांचे पुतळे आहेत. ताज हॉटेलच्या समुद्राकडच्या बाजूला पाण्यापासून धोका होऊ नये म्हणून संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. दिवसभर पर्यटक गेटवे परिसरास भेट देत असतात. सेल्फी काढण्यात मग्न असतात. 

कसे जाल मुंबईत?
मुंबई हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र आहे. जगातील बहुतेक देशांतून, तसेच भारतातील मुख्य शहरांतून येथे हवाई मार्गाने जाता येते. मध्य व पश्चिम रेल्वेने मुंबई संपूर्ण भारताशी जोडलेली आहे. जलमार्गानेही येथे पोहोचता येते. भारतातून कोणत्याही ठिकाणाहून रस्तेमार्गाने मुंबईत जाता येते. मुंबईत राहण्यासाठी सर्व श्रेणीतील हॉटेल उपलब्ध आहेत. खाद्यपदार्थ, जेवणही सर्व प्रकारचे मिळते. मुंबईत पर्यटन करायचे असेल, तर अतिपावसाचा कालावधी सोडून भेट द्यावी. 

मुंबई पर्यटन : राजभवन, वाळकेश्वर आणि परिसर...
‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण मुंबईतील गिरगाव आणि मलबार हिल परिसरातील काही ठिकाणे पाहिली. आजच्या भागात मलबार हिलवरील वाळकेश्वर, राजभवन  यांसह अन्य ठिकाणांची माहिती घेऊ या.
...........
केरळमधील उत्तर मलबारमधील मुस्लिम केई (Keyi) कुटुंबाच्या मालकीची मुंबईत बरीच जमीन होती. केई म्हणजे पर्शियन भाषेत ‘जहाज मालक’. आताचा मलबार हिल व चौपाटीच्या आसपास त्यांच्या मालकीची जागा होती. म्हणून त्या भागाला आता मलबार हिल म्हणून ओळखले जाते. पोर्तुगीज, ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्याशी त्यांचे व्यापार संबंध होते. परंतु जेव्हा ब्रिटिशांनी त्यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी समस्या निर्माण करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनी संपूर्ण क्षेत्र इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात कराराने दिले. मलबार हिल भागात राजभवन, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला, सह्याद्री अतिथीगृह, तसेच अनेक मंत्र्यांची निवासस्थाने आहेत. यातील काही बंगले जुन्या ब्रिटिश शैलीतील आहेत. वृक्षाच्छादित मलबार हिल साधारण १८० फूट उंच आहे. दोन्ही बाजूला समुद्र असल्याने नैसर्गिकदृष्ट्या मुंबईच्या सौंदर्यात भर पडली आहे. या भागात नामवंत उद्योगपतींचे बंगले आणि कार्यालयेही आहेत. 

राजभवनराजभवन


राजभवन :
पहिले राजभवन १७७० ते १७९० दरम्यान फोर्ट भागात (किल्ला) होते. त्यानंतर ते परळ भागात हलविण्यात आले. तेथून ते १८८०मध्ये सर रिचर्ड टेम्पल यांनी मलबार हिल भागात हलविले. ‘प्राइसेस मेमारियल’मधील नोंदीनुसार गव्हर्नर मेडोस १७८८ ते १७९० या काळात अधूनमधून येथे राहायला यायचे. सर ईवान नेपियन १८१२ ते १८१९ या काळात या ठिकाणी एका लहान खोलीत राहत होते. समुद्राची किनार आणि वृक्षराजी असलेल्या ५० एकर जागेवर रीतसर गव्हर्नर निवास बांधण्यात आला. राजभवन परिसरात जलभूषण, जलचिंतन, जललक्षण, जलविहार आणि जलसभागृह या इमारती आहेत. 

राजभवनराजभवन


जलभूषण :
गव्हर्नर माँटस्टुअर्ट एलफिन्स्टन जेथे राहिले होते, त्याच टुमदार बंगलीच्या पायावर जलभूषण उभे आहे. ब्रिटिश लेखक हेबर यांनी याचे वर्णन ‘समुद्राच्या पाण्याने धुतली जाणारी खडकाळ व वृक्षाच्छादित भूभागावरील टुमदार बंगली’ असे केले आहे. लॉर्ड एलफिन्स्टन यांनी बांधलेला रस्ता राज्यपालांचे निवासस्थान असणाऱ्या ‘जलभूषण’ कडे जातो. माँटस्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी आयात केलेले फ्रेंच फर्निचर राज्यपालांच्या भव्य कार्यालयात ठेवले आहे. दुर्मीळ कलाकुसर असलेले अतिशय सुंदर लाकूडकाम, सुबक चित्रकाम असलेल्या तसबिरी आणि लाकडावर केलेले ऐतिहासिक प्रसंगाचे चित्रण यांनी जलभूषण संपन्न आहे. कुंचल्याच्या कुशल फटकाऱ्यांनी कलाकारांनी लेसचा नाजूकपणा आणि मोत्यांचे तेज जिवंत केले आहे. वैभवशाली निवासस्थानात व कार्यालयात भारतीय कलेच्या कलाकारांनीदेखील आपले मानाचे स्थान मिळवले आहे. भारतीय श्रेष्ठ कलाकारांनी रेखाटलेली चित्रेही ‘जलभूषण’मध्ये आहेत. 

जलचिंतन हे राजभवनला भेट देणाऱ्या भारताच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आहे. ते पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आवडीचे निवासस्थान होते. या बंगल्यावरून सागराचे सुंदर दर्शन होते. लयबद्ध किनाऱ्यावर आपटणाऱ्या लाटा आणि संध्याकाळी दिसणारा मोहक सूर्यास्त पाहत असताना मन एकाग्र होत असे. म्हणून या बंगल्याला ‘जलचिंतन’ असे नाव दिले असावे. पं. नेहरू व अन्य पंतप्रधान हे समुद्रातील अंधुक प्रकाशाकडे पाहत चिंतन-मनन करीत ‘जलचिंतन’च्या बाल्कनीत उभे राहत असत. 

राजभवनराजभवन


जललक्षण :
हे निवासस्थान भारताच्या राष्ट्रपतींच्या भेटीसाठी राखून ठेवण्यात आले आहे. येथे मराठा सरदारांच्या तसबिरींचा संग्रह आहे. असे म्हणतात, की सर बॅटल फ्रेरे यांनी १८५७च्या बंडानंतर ही चित्रांची मालिका चित्रित करण्यासाठी थिओडोर जेन्सेन यांची नेमणूक केली होती. आपल्या कुंचल्याने व तैलरंगांच्या साह्याने जेन्सेनने सरदारांचा बाणेदारपणा व डौल प्रत्यक्षात उतरवला आहे. 

ही चित्रे गव्हर्न्मेंट हाउस येथे आणण्यात आली होती. या कलाकारांना राजकीय योग्यतेने प्रोत्साहनही देण्यात आले होते. या आदरांजलीमुळे नेत्यांचा विरोध मावळेल व ब्रिटिश राज्य स्वीकारण्यास त्यांने मन वळविता येईल अशी आशा फ्रेरेला वाटत होती. 

जलविहार : मेजवानी दिवाणखाना (बँक्वेट हॉल) आता जलविहार या नावाने ओळखला जातो. येथील दोन्ही दिवाणखान्यांच्या घुमटाकार छतांवर भारताच्या अशोकस्तंभावरील सिंहाची नक्षी काढली आहे. जमिनीवर अत्यंत किमती असे मुघल काळाची आठवण करून देणारे पर्शिअन गालिचे पसरलेले असून, या गालिच्यांवर प्राचीन भरतकामाच्या कलाकृती आहेत. प्रतिष्ठित व्यक्ती व भेट देणारे राज्याचे प्रमुख यांच्यासाठी येथे राज्यपाल मेजवान्या आयोजित करतात. चांगल्या प्रसंगी जेव्हा अनेक स्तर असलेल्या झुंबरांचा प्रकाश चांदीच्या तबकांमधून परावर्तित होतो तेव्हा पाहुण्यांना जलविहारमध्ये जेवणाचा एक मनोवेधक अनुभव मिळतो. 

राजभवन परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी पडून असलेल्या २२ टन वजनाच्या दोन तोफा आता जलविहार (बँक्वेट हॉल) इमारतीच्या पुढे मोठ्या ओट्यावर सर्वांना दिसतील अशा ठेवण्यात आल्या आहेत. माजी राज्यपाल सीएच. विद्यासागर राव यांच्या सल्ल्यानुसार तोफा पुन्हा साफ करून गंज न येण्यासाठी त्यांच्यावर अँटी ऑक्सिडायझिंग ट्रीटमेंट करण्यात आली. या तोफा हलविण्याचे काम पाच तास चालू होते. 

जलसभागृह : जलसभागृह म्हणजे राजभवनाचा शांत व प्रसन्न असा दरबार हॉल आहे. क्षितिज समांतर असलेल्या फ्रेंच पद्धतीच्या खिडक्यांमधून आत येणारी उगवत्या सूर्याची किरणे येथे चकाकत असतात. शपथविधीसारखे महत्त्वाचे कार्यक्रम या जलसभागृहामध्ये होतात. या भव्य सभागृहाचा वापर राज्यपाल साहित्यिक व कलाकार यांचा गौरव करण्यासाठीही करतात. 

राजभवनाखाली सापडलेला बंकरराजभवनाखाली सापडलेला बंकर


२०१६ साली राजभवन येथे आढळून आलेल्या भव्य भूमिगत बंकरमध्ये नव्याने संग्रहालय तयार करण्यात आले आहे. जवळजवळ १५ हजार चौरस फूट परिसरात असलेल्या राजभवनातील विस्तीर्ण भूमिगत बंकरमध्ये संग्रहालय निर्माण करण्यात आले असून, ते लवकरच सामान्य नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन आरक्षण करावे लागणार आहे. भूमिगत बंकरमध्ये आभासी वास्तवतादर्शक संग्रहालय तयार केले गेले असून, त्याद्वारे लोकांना गतकाळातील बंकरच्या वापराबाबत माहिती देण्यात येणार आहे. या संग्रहालयातील अन्य कक्षांमध्ये राजभवनच्या इतिहासाची झलकदेखील दाखविली जाणार आहे. 

बंकरचा शोध लागला, त्या वेळी तेथे सापडलेल्या खोल्यांना शेल स्टोअर, गन शेल, काडतूस भांडार, शेल लिफ्ट, मध्यवर्ती तोफखाना कक्ष, कार्यशाळा इत्यादी नावे दिसून आली होती. याचा उपयोग युद्धसामग्री दडवून ठेवण्यासाठी करण्यात येत असावा असे दिसून येते. बंकरमध्ये नैसर्गिक प्रकाश, शुद्ध हवा व पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केल्याचेही आढळून आले आहे. 

बाणगंगा तलाव आणि वाळकेश्वर मंदिर (१८५५)बाणगंगा तलाव आणि वाळकेश्वर मंदिर (१८५५)


वाळकेश्वर मंदिर :
वाळकेश्वर व बाणगंगा मंदिर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण मुंबईतील मलबार हिलच्या वाळकेश्वर भागात आहे. वाळकेश्वर मंदिर व लगतचा बाणगंगा तलाव इ. स. ११२७मध्ये शिलाहार राजवटीत बांधला. त्यानंतर १६व्या शतकात पोर्तुगीजांनी हे मंदिर नष्ट केले. परंतु १७१५ साली राम कामत नावाच्या श्रीमंत इसमाच्या औदार्यामुळे हे मंदिर पुन्हा उभे राहिले. वालुकेश्वर म्हणजेच वाळूचा देव व त्यावरून वाळकेश्वर हे नाव रूढ झाले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, श्री रामचंद्राने सीतेचा शोध घेत असताना शिवाची पूजा करण्यासाठी येथे वाळूचे शिवलिंग बनविले व पूजेसाठी पाणी नसल्याने बाण मारला असता गंगा अवतरली व कालांतराने येथे तलाव बांधला गेला आणि त्याचे नाव बाणगंगा पडले. बाणगंगा तलाव आयताकृती असून, त्याला चारही बाजूंनी पायऱ्या बांधल्या आहेत. तलाव खूपच सुंदर दिसतो एका बाजूला तळाकडे येण्यासाठी असलेल्या वाटेवर बाजूला दोन सुंदर मनोरे बांधले आहेत. या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत. बाणगंगेच्या जवळ आणखी एक जुने महादेवाचे मंदिर आहे. ओंकारेश्वर महादेव मंदिर म्हणून ते ओळखले जाते. हा परिसर अतिशय शांत व मनाला आनंद देणारा आहे. 


जिना हाउसजिना हाउस


जिना हाउस :
मुंबईतील मलबार हिलवरील साउथ कोर्ट भागात समुद्राकडे तोंड करून असलेला, पाकिस्तानचे बॅ. मोहम्मद अली जिना राहत असलेला बंगला आहे. आर्किटेक्ट क्लॉड बॅटले यांनी युरोपियन शैलीने यांचे संकल्पचित्र बनवले होते. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याजवळच हा बंगला आहे. पाकिस्तान सरकार त्यावर अधिकार सांगत आहे. 

इब्राहिम जेठा आर्ट गॅलरीइब्राहिम जेठा आर्ट गॅलरी
इब्राहिम जेठा आर्ट गॅलरी : वाळकेश्वर रस्त्यावर मरीन ड्राइव्हकडून राजभवनकडे येताना मुंबईच्या प्रसिद्ध तीन बत्तीच्या आधी इब्राहिम जेठा आर्ट गॅलरी आहे. डोळे दिपून जाणारी मार्बल शिल्पकला, कारंजे, कलश, दिवे, टाइमपीसेस आणि बरेच काही येथे आहे. अनेक सेलिब्रिटी, राजकारणी आणि हौशी लोकांची येथे वर्दळ असते. 

आर्टिस्ट्री : शिवानी विराणी यांनी २००३मध्ये आर्टिस्ट्रीची स्थापना केली. मुंबईच्या मध्यभागी वसलेल्या या गॅलरीमध्ये अनेक विषयांशी संबंधित प्रतिभासंपन्न तरुण भारतीय कलाकारांच्या कलेचे दर्शन होते. सुमारे १०० नवीन व जुन्या कलाकारांच्या कलांचा आस्वाद येथे घेता येतो. यात वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट), अंतर्गत सजावटकार (इंटेरियर डेकोरेटर), चित्रकार, मूर्तिकार, ज्वेलर्स यांचा समावेश आहे. टाटा गार्डनच्या समोरच ही गॅलरी आहे. 

शांती मनोरा/पारशी विहीर : केम्स कॉर्नरवरून मलबार हिलकडे जाणाऱ्या रिज रोडवर पारशी लोकांची स्मशानभूमी आहे. सन १६७२मध्ये शेठ मोदी हिरजी यांनी हा टॉवर बांधला. येथे पारशी लोकांव्यतिरिक्त कोणासही जात येत नाही.

शांतिवनशांतिवन


शांतिवन :
नावाप्रमाणेच हे या भागातील शांती देणारे निसर्गरम्य ठिकाण आहे. नैसर्गिक उतारावर असलेल्या या उद्यानात विविध लतावृक्ष आहेत. बांधीव पायऱ्यांनी याची शोभा अधिकच वाढते. आजूबाजूला फिरणारे मोर लक्ष वेधून घेत असतात. हँगिंग गार्डनच्या मागे हे उद्यान आहे. मलबार हिल भागात प्रियदर्शनी पार्क, चक्रवर्ती उद्यान, आदित्य बिर्ला पार्क अशा अनेक खासगी जागांमध्ये समुद्रकिनारी बागा व निवासी संकुले आहेत. रिज रॉड आणि लीला जगन्नाथ मार्ग यांच्यामध्ये इको पार्क आहे, तसेच अनेक उद्याने आहेत. 

कसे जाल मलबार हिल भागात?
येथे जाण्यासाठी गिरगाव चौपाटीकडून वाळकेश्वर मार्ग, तसेच ऑगस्ट क्रांती मार्गावरून जाता येते. उपनगरी रेल्वेचे जवळचे स्थानक  -चर्नी रोड
 
 
मुंबई पर्यटन : मरीन ड्राइव्ह परिसर
क्वीन्स नेकलेस - मरीन ड्राइव्हक्वीन्स नेकलेस - मरीन ड्राइव्ह


‘करू या देशाटन’
सदराच्या गेल्या भागात आपण मुंबईचा पूर्व किनारा म्हणजेच बंदरे असलेल्या भागाची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील भागाची म्हणजेच मरीन ड्राइव्ह परिसराची....
.........
मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात सूर्यास्त आणि त्यानंतरचा पथदिव्यांचा झगमगाट समुद्रात प्रतिबिंबित होतो. ते चित्र म्हणजे जणू राणीच्या गळ्यातील रत्नहारच. म्हणूनच या परिसराला ‘क्वीन्स नेकलेस’ असेही म्हणतात. हा नजारा पाहण्यासाठी लोकांच्या गाड्या इकडे वळतात. १९२०च्या दशकात पश्चिमी युरोप आणि अमेरिकेत मूळ शैली म्हणून विकसित झालेल्या ‘आर्ट डेको शैली’तील इमारती हे या भागाचे वैशिष्ट्य. 

चर्चगेट स्टेशनचर्चगेट स्टेशन


चर्चगेट स्टेशन :
हे मुंबई उपनगरी/ रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील (वेस्टर्न लाइन) दक्षिणेकडील टर्मिनस आहे. चर्चगेट स्टेशनपासून सेंट्रल रेल्वेमार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, मरीन ड्राइव्ह, हायकोर्ट, मंत्रालय, क्रॉफर्ड मार्केट ही ठिकाणे जवळ आहेत. ब्रिटिशांनी बांधलेल्या मुंबईतील मूळ किल्ल्याला असलेल्या तीन दारांपैकी (गेट) एक प्रवेशद्वार येथे होते. येथून निघणारा रस्ता प्रसिद्ध सेंट थॉमस चर्चकडे जात असे. म्हणून या गेटला चर्चगेट असे नाव पडले. १८६०मध्ये हे गेट पाडण्यात आले. १८७०मध्ये येथे रेल्वे स्टेशन बांधण्यात आले व त्याचे नाव चर्चगेट असे ठेवण्यात आले. १८७२मध्ये रेल्वे कुलाब्यापर्यंत वाढविण्यात आली. तथापि कुलाबा स्टेशन १९३०मध्ये बंद करण्यात आले व चर्चगेट हे दक्षिणेकडील सुरुवातीचे स्टेशन झाले. १८५५मध्ये मुंबई-बडोदा रेल्वेचे काम सुरू झाले. १८६७पर्यंत मुंबईपर्यंतचे काम पूर्ण झाले. ग्रँट रोडच्या पुढे मरीन लाइन्सजवळ ‘बॉम्बे बॅकबे’ नावाचे स्टेशन बांधण्यात आले. १२ एप्रिल १८६७ रोजी ‘बॉम्बे बॅकबे’पासून पहीली उपनगरीय रेल्वेसेवा सुरू झाली. 

चर्चगेट स्टेशन (१९३०)चर्चगेट स्टेशन (१९३०)


सध्या पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय सेवा चर्चगेटपासून डहाणूपर्यंत आहे. विरारसाठी पहाटे सव्वाचार वाजता पहिली लोकल चर्चगेटहून सुटते. शेवटची लोकल मध्यरात्री एक वाजता बोरीवलीकडे जाते. दर १० मिनिटांनी येथून एक गाडी सुटते आणि येते. मध्य आणि पश्चिम रेल्वे दादर स्टेशनवर एकमेकांच्या जवळून धावतात. ठाण्याकडून चर्चगेटकडे जाणारे प्रवासी दादरला गाडी बदलतात. विरार-वसईकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारे प्रवासीही दादरला उतरूनच गाडी बदलतात. २०१०पर्यंत १२ डब्यांच्या लोकल होत्या. त्या आता १५ डब्यांच्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी क्षमता २५ टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईच्या लोकल ट्रेन्स आणि बेस्टच्या बसेस रक्तवाहिनीप्रमाणे मुंबईकरांची अव्याहतपणे सेवा करीत आहेत. 



मरीन ड्राइव्ह :
मरीन ड्राइव्ह बघितल्याखेरीज मुंबईचे दर्शन झाल्यासारखे वाटत नाही. नरीमन पॉइंटपासून बाबुलनाथ आणि मलबार हिलला जोडणारा हा ३.६ किलोमीटरचा ‘सी’ आकाराचा आठपदरी रस्ता समुद्राच्या काठावरच आहे. या रस्त्याचे अधिकृत नाव नेताजी सुभाषचंद्र बोस रोड असे आहे. पूर्वेला रेल्वे, निरनिराळी जिमखाना मैदाने व आर्ट डेको शैलीतील इमारती आणि पश्चिमेला निळाशार समुद्र यामुळे याचे सौंदर्य खुलून दिसते. 

समुद्राच्या कडेने भव्य कठड्यासह संरक्षक भिंत आणि त्याला लागूनच मोठा प्रशस्त फुटपाथ आहे. संध्याकाळी मोकळी हवा व सूर्यास्त अनुभवण्यासाठी येथे लोकांची गर्दी होते. पावसाळ्यात उधाणाच्या वेळी रस्त्यावर पाणी फेकणाऱ्या समुद्राच्या लाटा बघणे ही एक मजाच असते. मरीन ड्राइव्हला ‘क्वीन्स नेकलेस’ म्हणूनही ओळखले जाते. कारण जेव्हा रात्री ड्राइव्हच्या बाजूने कोठेही पाहिले जाते तेव्हा स्ट्रीटलाइट गळ्यातील मोत्याच्या हारासारखे दिसतात. 



हा रस्ता वाळकेश्वर रस्त्यापासून दलदलीत भर टाकून भागोजीशेठ कीर आणि पालनजी मिस्त्री यांनी सिमेंट-काँक्रीटमध्ये बांधला. १९२० ते १९३०च्या दरम्यान श्रीमंत पारशी व्यापारी व उद्योजकांनी आर्ट डेको शैलीतील इमारती येथे बांधल्या. या आर्ट डेको इमारतींपैकी कपूर महल, झेव्हर महल आणि केवल महाल अशा अनेक सुंदर इमारती आहेत. ही बांधकामे १९३७ ते १९३९च्या दरम्यान झाली. (मरीन ड्राइव्ह परिसरातील आर्ट डेको शैलीतील इमारतींबद्दलचा सविस्तर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पंचतारांकित ओबेरॉय (ओबेरॉय हिल्टन टॉवर), दी इंटरकॉन्टिनेन्टल, हॉटेल मरीन प्लाझा, सी ग्रीन हॉटेल आणि इतर काही हॉटेल्स या भागात आहेत. तसेच तारापोरवाला मत्स्यालय, भेळेसाठी गिरगाव चौपाटी असे सर्व काही या मरीन ड्राइव्हवरच आहे. सुप्रसिद्ध गायिका सुरैया, राज कपूर, नर्गिस यांच्यासारखे कलाकार येथे पूर्वी राहत होते. 

तारापोरवाला मत्स्यालयतारापोरवाला मत्स्यालय


तारापोरवाला मत्स्यालय :
सर्व बाजूंनी सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे, अशी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक मिलार्ड यांनी मांडली. ही कल्पना तारापोरवाला या दानशूर कुटुंबाने दिलेले पैसे व जमिनीमुळे नऊ मे १९४७ रोजी २८ वर्षांनी मूर्त स्वरूपात आली. आबालवृद्धांचे आकर्षण असलेल्या तारापोरवाला मत्स्यालयाची इमारत मरीन लाइन्सवर असून, तिची लांबी १०८ फूट व रुंदी ९४ फूट आहे. २७ मे १९५१ रोजी तारापोरवाला मत्स्यालय आणि तारापोरवाला सागरी जीव संशोधन केंद्र यांचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे हस्ते झाले. येथ सागरी आणि गोड्या पाण्यातील विविध जातींचे मासे पाहायला मिळतात. सागरी प्रकारातील हेलिकॉप्टर, अरोवना, ग्रूपर, निळा रंग असलेला स्टिंग्रे, तारा, जोकर, हार्क, ट्रिगर, ग्रूपर, पर्पल फायरफिश, कॉपरबँड बटरफ्लाय फिश, क्लाउन ट्रिगरफिश, ब्लू रिबन असे अनेक जातींचे मासे येथे आहेत. गोड्या पाण्यातील माशांमध्ये रेड डेव्हिल, जग्वार, इलेक्ट्रिक ब्लू जॅक डेम्प्सी, फ्रंटोसा, कॅटफिश यांसारख्या माशांचा समावेश आहे. १००हून अधिक प्रकारांचे मासे, जलजीव, नैसर्गिक खडक आदी प्रकार येथे पाहायला मिळतात. 



मत्स्यालयाची देखभाल मत्स्यव्यवसाय विभाग करतो. मत्स्यालयात  समुद्री पाण्याच्या १६ आणि गोड्या पाण्याच्या नऊ टाक्यांमध्ये ३१ प्रकारचे मासे आहेत. ३२ उष्णकटिबंधीय टाक्यांमध्ये ५४ प्रकारचे मासे आहेत. मत्स्यालयाच्या उष्णकटिबंधीय विभागात गर्भवती माशांसाठी मॉस अॅक्वेरियम, तसेच जलीय वनस्पतींची व्यवस्था केली आहे. बाहेरून आणलेले मासे टँकमध्ये टाकण्यापूर्वी त्यांना वातावरणात समरस होण्यासाठी, तसेच त्यांचे रोगनिदान, उपचार करण्यासाठी गोड्या व खाऱ्या पाण्याची स्वतंत्र युनिट्स तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक टँकमध्ये एलईडी व मेटलहॅलाइड ट्यूब लावून प्रकाशयोजना करण्यात आली आहे. 

मरीन ड्राइव्ह परिसरमरीन ड्राइव्ह परिसर


वानखेडे स्टेडियम :
१९७४मध्ये हे स्टेडियम महाराष्ट्राचे तत्कालीन अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्या प्रयत्नांतून उभे राहिले. त्याची आठवण म्हणून त्यांचेच नाव या स्टेडियमला देण्यात आले. ३३ हजार ८०० प्रेक्षक बसू शकतील, असे हे स्टेडियम आधुनिक सोयींनी युक्त असे आहे. कॅन्टिलिव्हर छप्पर हे स्टेडियमचे मुख्य आकर्षण आहे. टेफ्लॉन फॅब्रिक छप्पर कमी वजनाचे आणि उष्णता प्रतिरोधक आहे. प्रेक्षकांना अधिक चांगले दिसावे यासाठी छतासाठी बीम वापरलेले नाहीत. छतावर एक्झॉस्ट फॅन बसविले आहेत जे स्टँडवरून गरम हवा बाहेर टाकतात. स्टेडियममध्ये उत्तर व दक्षिण स्टँडसाठी २० लिफ्ट आहेत. वानखेडे स्टेडियमच्या पुनर्विकासासाठी संयुक्तपणे प्रकल्प तयार करण्याकरिता मे. शशी प्रभू व असोसिएट्स आणि पी. के. दास असोसिएट्स यांची नेमणूक करण्यात आली होती. १९७४-७५नंतरच्या मोसमामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध भारत असा पहिला सामना येथे खेळला गेला. पतौडीच्या नेतृत्वाखाली हा सामना भारत हरला होता. त्या वेळी क्लाइव्ह लॉइडने नाबाद २४२ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना येथे जिंकला. सचिन तेंडुलकर त्याचा शेवटचा सामना येथे खेळला. या मैदानाच्या अशा अनेक आठवणी आहेत. 



जिमखाने :
मरीन ड्राइव्हवर एकूण सात जिमखाने आहेत. ब्रिटिश सरकारने मुंबईतील सर्वधर्मीयांसाठी जिमखाने उपलब्ध करून दिले होते. 

कॅथोलिक जिमखाना : येथे जास्तकरून विवाह समारंभ होतात.

बॉम्बे ‘वायएमसीए’ जिमखाना : याची स्थापना दोन एप्रिल १८७५ रोजी ग्लासगोचे रेव्ह. ए. एन सॉमरविले यांनी केली. 
ग्रँट मेडिकल जिमखाना : हा जिमखाना खेळासाठी, तसेच समारंभासाठी वापरला जातो. 

विल्सन कॉलेज जिमखाना : येथे क्रिकेटसाठी कायमची राखलेली जागा आहे. हा भाड्याने मिळू शकतो. येथे मंडप, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे वगैरे सोयी आहेत. 

हिंदू जिमखाना : हे मैदान मुख्यतः फुटबॉल, क्रिकेट आणि इतर खेळांचे सामने आयोजित करण्यासाठी वापरले जाते. क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचे वडील येथे ग्राउंडमन होते. जिमखाना मैदानाचे उद्घाटन मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांनी पाच मे १८९४ रोजी केले. 

इस्लाम जिमखाना : हा जिमखाना (सामाजिक आणि क्रीडा क्लब) मरीन ड्राइव्हला लागून आहे. १८९०मध्ये मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांनी जिमखान्यासाठी जागा दिली होती. १९४२पर्यंत जिमखाना हे बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय होते आणि ते संस्थापक सदस्य होते. हे महाराष्ट्र राज्य बिलियर्डस् असोसिएशनचे मुख्यालय आहे. जिमखाना सदस्यत्व सर्व समुदायाच्या लोकांसाठी खुले आहे. 



पारसी जिमखाना :
हा एक जिमखाना पारशी लोकांच्या क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांसाठी तयार केला होता. मुंबईमध्ये जातीय धर्तीवर बांधलेला हा पहिला जिमखाना होता. २०१०मध्ये पारसी जिमखान्याने अन्य समुदाय संघटनांसह क्रिकेटमधील समुदायात रस निर्माण करण्यासाठी एक प्रकल्प जाहीर केला.

लोकमान्य टिळक पुतळालोकमान्य टिळक पुतळा


येथे नतमस्तक झालेच पाहिजे 

लोकमान्य टिळकांवर गिरगाव चौपाटीवर अंत्यसंस्कार झाले. त्यांचे येथे स्मारक आहे. विठ्ठलभाई पटेल यांचे स्मारकही याच परिसरात आहे. 

लोकमान्य टिळक पुतळालोकमान्य टिळक पुतळा


शहीद तुकाराम ओंबळे स्मारकशहीद तुकाराम ओंबळे स्मारक
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तुकाराम ओंबळे यांचे स्मारकही मरीन ड्राइव्ह भागात आहे. फोर्ट भागातून हल्ला करून पळून जाणाऱ्या अजमल कसाबला पकडण्याचा थरार गिरगाव चौपाटीला लागून असलेल्या सुभाषचंद्र रोडवरच झाला. ओंबळे यांनी त्याच्या गोळ्या छातीवर झेलल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळेच कसाबला जिवंत पकडता आले. 

गिरगाव चौपाटी : वाळूत बसून भेळ खात सूर्यास्त पाहण्यासाठी, तसेच आपल्या लहानग्यांना मोकळेपणाने खेळता यावे म्हणून अनेक कुटुंबे येथे येतात. त्यामुळे या चौपाटीला कुटुंबवत्सल म्हणता येईल. ऊन उतरल्यावर समुद्राच्या लाटा पाहत बसणे हे खूप सुखावह असते. उत्तर भारतीय भैयांनी सजविलेले स्टॉल, तेथे मिळणारे भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटिस, शेवपुरी, दहीपुरी, लस्सी, आइस्क्रीम असे नानाविध पदार्थ येथे आलेला माणूस चाखून पाहतोच. तहान भागविण्यासाठी शहाळ्याचे पाणीही असतेच. समुद्र उथळ असल्याने समुद्रात मनसोक्त खेळण्याची हौसही येथे भागविता येते. येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वाळकेश्वर बाजूला नाना-नानी पार्कही आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी घरगुती, तसेच अनेक सार्वजनिक मंडळांच्या महाकाय गणपतींचे विसर्जन या चौपाटीवर केले जाते. लालबागच्या राजाचे विसर्जन हा तर एक सोहळाच असतो. 

गिरगाव चौपाटीगिरगाव चौपाटी


गिरगाव चौपाटी (१८६०)गिरगाव चौपाटी (१८६०)


कसे जाल मरीन ड्राइव्हकडे?
चर्चगेट, मरीन लाइन्स, चर्नी रोड ही उपनगरीय रेल्वे स्टेशन्स या परिसरात आहेत. या स्टेशनवर उतरून मरीन ड्राइव्हवर जाता येते. तसेच बेस्टच्या बसेस आणि टॅक्सी हे पर्यायही आहेत. 
मुंबई पर्यटन : माहीम, सायन, धारावी
माहीम किल्लामाहीम किल्ला
‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात मुंबईतील दादर, परळ वगैरे भागाची माहिती घेतली. आजच्या भागात पाहू या माहीम, सायन (शिव) आणि धारावी.
........
माहीमचे इतिहासकालीन नाव होते महिकावती. महिकावती ही राजा भीमदेवाची राजधानी होती. तेराव्या शतकात या भागावर त्याची सत्ता होती. त्याचा राजवाडा येथे होता. प्रभादेवी येथील एका न्यायालयाचे आणि बाबुलनाथ देवळाचेही बांधकाम त्याच्या कारकिर्दीत झाले. महिकावती देवीचे प्राचीन मंदिर अजूनही तेथे आहे. काहींच्या मतानुसार रामाला आणि लक्ष्मणाला अहिरावण आणि महिरावण या दोघांनी या देवळात बंदी केले होते असा उल्लेख रामायणात आहे, हनुमानाने त्यांची येथून सुटका केली होती, असे म्हणतात. येथे कोळी लोकांची वस्ती आहे. 

माहीम किल्लामाहीम किल्ला


माहीम किल्ला :
माहीम नावाचे दोन किल्ले आहेत. एक पालघरजवळील केळवे येथे व मुंबईमधील माहीममध्ये. हा किल्ला माहीमच्या खाडीजवळ झोपडपट्टीत आहे. अतिक्रमणांनी वेढला आहे. त्यामुळे तो दुर्लक्षित राहिला आहे. या किल्ल्याचे बांधकाम नक्की कोणी केले व कधी केले याची माहिती उपलब्ध नाही. हा किल्ला इ. स. १५१६मध्ये पोर्तुगीज अधिकारी दॉम होआव दे मोनो याने जिंकून घेतला. या किल्ल्याच्या ताब्यासाठी गुजरातचा अली शाह आणि पोर्तुगीजांमध्ये सतत खूप चकमकी होत होत्या. अखेर पोर्तुगीजांनी यावर इ. स. १५३४मध्ये बस्तान बसविले. हाच किल्ला पुढे इ. स. १६६१मध्ये पोर्तुगीजांनी राजकन्येच्या लग्नात हुंडा म्हणून इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सला दिला. माहीम खाडीचे संरक्षण आणि मुंबईची उत्तरेकडील चौकी असा दुहेरी उपयोग या किल्ल्याचा इंग्रजांना झाला. या किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे; मात्र आत कोणतीही वास्तू उभी नाही. 

माहीम हलवामाहीम हलवा
माहीम हलवा : काही ठिकाणे अशी असतात, की त्या ठिकाणच्या एखाद्या खाद्यपदार्थाची चव जिभेवरती रेंगाळते. तसाच माहीमचा गोड हलवा. माहीम हलवा हे नाव ठेवले गेले. कारण माहीमचे ‘जोशी बुधाकाका’ यांनी तो तयार केला व माहीम हलवा म्हणून प्रसिद्ध झाला. हा पदार्थ तूप, मैदा (किंवा बारीक रवा), साखर, बदाम-पिस्त्याचे काप आणि वेलची दाणे, खाण्याचे रंग, मँगो पल्प आणि आवडीप्रमाणे चॉकलेट सिरप घालून दूध घालून ढवळून, गुठळ्या मोडून, उकळून थंड करून तुपावर लाटलेला असतो. 

शीतलादेवी मंदिरशीतलादेवी मंदिर
माहीमचे शीतलादेवी मंदिर : साधारण १२५ वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. कोळी बांधवांनी सन १८९० ते ९५च्या दरम्यान हे मंदिर बांधले. सिंधी बांधव लहान मुलांचे जावळ काढण्यासाठी दसऱ्याला येथे येतात. मंदिरातील देवीची मूर्ती पाषाणात घडवलेली असून, तिच्यावर चांदीचा मुखवटा चढवला आहे. अश्विन महिन्यातील नवरात्रौत्सवात अष्टमीला हवन केले जाते. माघ नवरात्रौत्सवात देवीला सोन्याचा मुखवटा चढवून नवचंडिका यज्ञ, अभिषेक इत्यादी कार्यक्रम केले जातात. 

मंदिराशेजारील विहिरीतील पाणी कोळी समाजातील लोक विवाह समारंभात शुभ शकुन म्हणून घेऊन जातात. नवरदेवाच्या अंघोळीसाठीही हे पाणी नेतात. येथे जवळच खोकला देवीचे मंदिर आहे. या देवीच्या दर्शनाने खोकला बरा होतो, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. म्हणून खोकला देवी हे नाव पडले. 

दरगाह हज़रत मखदूमदरगाह हज़रत मखदूम
दरगाह हज़रत मखदूम : माहीम समुद्राच्या बाजूला हजरत मखदूम अली यांचा दर्गा आहे. सन १३७२ ते १४३१ या दरम्यान ते होऊन गेले. ते धार्मिक लेखक होते. त्यांनी सुमारे १००हून अधिक मुस्लिम ग्रंथ लिहिले. त्यातील १० उपलब्ध आहेत. गुजरातच्या सुलतान अहमद शाहच्या बहिणीशी त्यांचे लग्न झाले होते. गुजरातचा सुलतान, मुझफ्फरीद राजघराण्याचा अहमद शहा यांनी त्याची शहराचा काझी म्हणून नेमणूक केली होती. 

सेंट मायकेल चर्च : हे मुंबईतील सर्वांत जुने कॅथोलिक चर्च आहे. एल. जे. रोड आणि माहीम कॉजवेच्या छेदनबिंदूवर हे चर्च आहे. मूलत: पोर्तुगीजांनी सन १५३४मध्ये हे चर्च बांधले होते. या चर्चचे बऱ्याचदा नूतनीकरण झाले आहे. शेवटचे नूतनीकरण सन १९७३मध्ये केले गेले. 

माहीम बीच : हिंदुजा हॉस्पिटलच्या उत्तरेला माहीम बीच असून, जवळच डॉ. कै. रामहरी धोटे उद्यान आहे. कोळी पुतळा माहीम एस. व्ही. रोडवर आहे. स्वामी विवेकानंद उद्यानही त्याच रस्त्यावर आहे. 

धारावी घरगुती उद्योगधारावी घरगुती उद्योग


धारावी :
जगातील सर्वांत मोठी झोपडपट्टी व दाट लोकसंख्येचे ठिकाण म्हणून धारावीची ओळख आहे. धारावीचे क्षेत्रफळ २.१ चौरस किलोमीटर आहे. धारावीमध्ये असंख्य घरगुती उद्योग चालू असतात. सॅक, चामडे, कापड, प्लास्टिक, होजिअरी, कुंभारकाम आणि कापडावरचे ब्लॉक प्रिंटिंग व्यवसाय असे अनेक उद्योग येथे चालतात. येथील एकूण वार्षिक उलाढाल अंदाजे एक अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त आहे. धारावीतील झोपड्यांची किंमतसुद्धा २५ लाखांच्यावर आहे. अनेक झोपड्या या टीव्ही, एसीसह असतात. 

धारावी किल्लाधारावी किल्ला
धारावी किल्ला : याला काळा किल्ला असेही म्हणतात. महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या समोर असलेल्या बस डेपोच्या पूर्वेकडील भिंतीला अगदी लागून हा ‘काळा किल्ला’ उभा आहे. बस डेपोच्या कंपाउंड वॉलला लागून असलेल्या तीन-चार फुटाच्या बोळातून थेट या किल्ल्याकडे जाता येते. 

साधारण त्रिकोणी आकाराच्या या किल्ल्याला दरवाजा नाही; पण किल्ल्यात प्रवेश करायचा झाल्यास शिडीवरून अथवा एके ठिकाणी तुटलेल्या तटबंदीवरून आत प्रवेश करता येतो. किल्ल्याची तटबंदी मजबूत असून, अजूनही शाबूत आहे. तटबंदीच्या दर्शनी भागावर ‘सदर किल्ला मुंबईचे अध्यक्ष व गव्हर्नर ऑनरेबल हॉर्न यांनी सन १७३७मध्ये बांधला’ अशी दगडात कोरलेली पाटी आहें. या किल्ल्यात एक भुयार असल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. 

रिवा किल्लारिवा किल्ला


रिवा किल्ला :
इ. स. १७३७ च्या आसपास हा किल्ला बांधण्यात आला. रिवा किल्ला सायन रेल्वे स्टेशनला बिलगून असलेल्या टेकडीवर आहे. किल्ल्याची ओळख सांगण्यासाठी फक्त एक गोल बुरुज शिल्लक आहे. रिवा किल्ल्यावर काही इमारतींचे अवशेष दिसून येतात. 

शीव किल्लाशीव किल्ला


शीव किल्लाशीव किल्ला
शीव किल्ला : या किल्ल्याचे अवशेष बऱ्यापैकी शाबूत आहेत. येथे चौकोनी आकाराची एक मोठी विहीर (हौद) आहे. हा किल्ला दक्षिण-उत्तर असून, तटबंदी, बुरूज, इमारतीचे अवशेष आणि प्रवेशद्वारे यांवरून किल्ल्याच्या वैभवाची प्रचिती येते. किल्ल्याची दारे तोफ झाल्यावर बंद होत असत. सरकारचे पुरातत्त्व सर्वेक्षण कार्यालय येथे आहे. त्याच्या मागे दोन तोफाही आहेत. येथे एक छोटा धबधबा, तसेच किल्ल्याभोवती उद्यान केल्यामुळे पर्यटकांची पावले वाळू लागली आहेत. 

माटुंगा : मुंबई शहराच्या मध्यभागी माटुंगा आहे. असे म्हटले जाते, की महिकावतीच्या राजाचा माटुंगामध्ये हत्तीखाना होता. हत्तींना म्हणजे संस्कृतमध्ये मातंगा असा शब्द आहे. त्यावरून या भागाला माटुंगा असे नाव पडले असावे, असे मानले जाते. तमिळी व इतर दाक्षिणात्य लोकांची वस्ती येथे आहे. माटुंगा येथे नव्याने विकसित झालेल्या जागेचा लाभ घेण्यासाठी पहिल्यांदा गृहनिर्माण सहकारी संस्था तयार करण्यात आल्या. दादरमधील पारशी आणि हिंदू वसाहती आणि माटुंगामधील तमिळ वसाहती अशा प्रकारे विकसित केल्या गेल्या. माटुंगा येथे विविध धर्मीयांची असंख्य मंदिरे आहेत. मल्याळी आस्तिक समाज अतिक समाज (१०), दक्षिण भारतीय भजन समाज [११], श्री शंकर मठम [१२], श्री कन्यका परमेश्वरी मंदिर, दी चर्च ऑफ मेरी व डॉन बॉस्को चर्च ख्रिश्चन मदत [१३], किंग्ज सर्कलमधील जैन मंदिरे आणि मारुबाई मंदिर. माटुंग्यामध्ये अनेक सांस्कृतिक केंद्रे आहेत, ती म्हणजे म्हैसूर असोसिएशन, गुजराती सेवा मंडळ आणि माटुंगा वेस्टमधील कर्नाटक संघ हॉल. माटुंग्याची फुलांची बाजारपेठ दक्षिण भारतीय फुलांसाठी प्रसिद्ध आहे

डॉन बॉस्को मॅडोनाडॉन बॉस्को मॅडोना
डॉन बॉस्को मॅडोना : पाच उद्यानाजवळ (फाइव्ह गार्डन) हे सुंदर चर्च आहे. सन १९५४मध्ये हे चर्च उभारले गेले. मेरीची १२ फूट उंचीची सोन्याची मुलामा असलेली मूर्ती मुख्य घुमटाच्या शिखरावर उभी आहे. हे बॉम्बे कॅथोलिकांचे श्रद्धास्थान म्हणजे जुन्या काळातील धर्माचे प्रतीक आहे. 

मंचरजी जोशी उद्यान : मंचरजी जोशी यांनी सुमारे ८० वर्षांपूर्वी हे उद्यान विकसित केले. हे ठिकाण दादर, परळ, वडाळ्यापासून जवळ आहे. सकाळी व संध्याकाळी अनेक लोक येथे चालण्याचा व्यायाम करण्यासाठी येतात. या बागेत लहान मुलेही खेळायला येतात. या बागांपैकी एक बाग मैदानामध्ये रूपांतरित झाली आहे. तेथे आउटडोअर व्यायामशाळा आणि खेळाचे मैदान आहे. स्पोर्ट्स ग्राउंड आंतर कॉलनी सामन्यांचे केंद्र असताना फिट राहण्यासाठी सर्व वयोगटातील लोक व्यायामशाळेत येतात. मुलांसाठी एक खास बाग आहे, ज्यामध्ये एक लहान फेरिस व्हील आणि शूटिंग बूथ आहे. 

मंचेरजी जोशी उद्यानमंचेरजी जोशी उद्यान
माहेश्वरी उद्यान किंग्ज सर्कल : छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या डॉ. आंबेडकर रोडवर (व्हिन्सेंट रोड) सात रस्ते मिळणाऱ्या मोठ्या चौकातच हे उद्यान आहे. किंग्ज सर्कल स्टेशनच्या अगदी जवळ असलेले दक्षिण भारतीय एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मुंबईतील सर्वांत जुन्या शाळांपैकी एक आहे. कोळीवाडा, वडाळा किंवा सायन, दादर आणि सी. जी. एस. यांसारख्या ठिकाणीही किंग्ज सर्कल मध्यभागी आहे. येथे भव्य उड्डाण पूल आहे.
 
कसे जाल माहीम, शिव, धारावी भागात?
या भागात जाण्यासाठी माटुंगा, माटुंगा रोड, वडाळा या उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून जावे लागते. मुंबईच्या सर्व भागांतून येथे बेस्ट बस सेवा उपलब्ध आहे.

दक्षिण मुंबईतील विविध बाजार
‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात आपण माहिती घेऊ या दक्षिण मुंबईतील विविध बाजारांची. त्यात मनीष मार्केटपासून बुक स्ट्रीटपर्यंत आणि चोरबाजारापासून जव्हेरी बाजारापर्यंतच्या विविध बाजारांचा आणि परिसरातील मंदिरांचा समावेश आहे.  
..........
खरेदी हा पर्यटनातील भाग असतो. बऱ्याचदा अशी खरेदी प्रवासाची आठवण म्हणून केली जाते. मुंबईमध्ये गेल्यावर अशी खरेदी होतेच. अशी खरेदी करण्याची ठिकाणे कोणती आहेत, याची माहिती घेऊ या. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. येथून देश-विदेशात व्यापार चालतो. मुंबई व उपनगरांत अनेक कारखाने आहेत. रेल्वे, जलमार्गामुळे देश-विदेशातून हरतऱ्हेच्या मालाची आयात व निर्यात सतत चालू असते. त्यामुळे सहाजिकच येथे घाऊक व किरकोळ विक्रीचे बाजार उभे राहिले. भाविक धनिक व्यापाऱ्यांनी या परिसरात काही मंदिरेही उभी केली. कापड कारखानदारीमुळे कापडाच्या बाजारपेठा भरपूर आहेत. दागदागिन्यांचे बाजारही आहेत. धान्य बाजार, मासळी बाजार, हार्डवेअर, नॉव्हेल्टी मिळण्याची ठिकाणेही आहेत. चोर बाजारही आहे. 

बुक स्ट्रीट : फोर्ट भागामध्ये फ्लोरा फाउंटन आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस (व्हिक्टोरिया टर्मिनस) रेल्वे स्टेशन यादरम्यान फुटपाथवर पुस्तकविक्रेते दिसतील. एखाद्या चांगल्या दुकानात मिळाणार नाहीत अशी पुस्तके येथे मिळतात. हे विक्रेते खूप जाणकार आहेत आणि माहितीदेखील देतात. घरात अनेक वर्षे धूळ खात पडलेली पुस्तके रद्दीतून हे गोळा करतात. तसेच दुकानातून विकली न गेलेली पण, जागा अडवून ठेवलेली पुस्तके हे विक्रेते कमी किमतीत विकत घेतात आणि येथे विकतात. तुमच्या मनात असलेले पण दुकानात न मिळणारे पुस्तकही येथे मिळून जाते. नानाविध विषयांची पुस्तके येथे मिळतात.



मनीष मार्केट :
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील मनीष मार्केटमध्ये कमी दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात. या बाजारात जुन्या सेकंडहँड मोबाइलपासून ते नवीन आयफोनपर्यंत सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू विकल्या जातात. पूर्वी तस्करीच्या वस्तू येथे मिळत असत. त्याची जागा आता चायना मेड वस्तूंनी घेतली आहे. पूर्वीच्या टेपरेकॉर्डर, ट्रान्झिस्टर या गोष्टींची जागा आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी घेतली आहे. आता पेनड्राइव्ह, कम्प्युटर्सही विक्रीला ठेवलेले दिसतात; मात्र खरेदी करताना सावधानता बाळगावी. वस्तूंची मांडणी इतक्या सुंदर तऱ्हेने केलेली असते, की बघणारा एकदम मोहित होतो. 

चोर बाजारचोर बाजार
भेंडी बाजार : क्रॉफर्ड मार्केटला लागून असलेल्या एका रस्त्याचा उल्लेख इंग्रजांच्या काळात ‘बीहाइंड द बाजार’ असा होत असे. त्याचाच अपभ्रंश भेंडी बाजार असा झाला असावा, असे म्हणतात. हा बाजार साधारण १५० ते २०० वर्षे जुना आहे. काहींच्या मते, या भागात इंग्रजांनी किल्ला बांधायच्या अगोदर पूर्वीच्या काळी भेंडीची शेती होती. म्हणून याला भेंडी बाजार हे नाव पडले असावे. मुंबईमध्ये व्यापार व उद्योग सुरू झाल्यावर सुरुवातीला या भागात खोजा व बोहरा समाजाच्या लोकांची वस्ती वाढली. त्या वेळी तांदूळ, गहू या धान्यांचा घाऊक बाजार होता. धान्याच्या व्यापाराबरोबर या ठिकाणी कपड्यांचाही व्यापार सुरू झाला. सध्या या भागात पुनर्विकासाचे काम सुरू झाले असून, क्लस्टर विकासाअंतर्गत १७ एकर भागातील ३०० इमारती पाडून त्या जागी हाउसिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. मॉल आणि डिपार्टमेंटल स्टोअरच्या जमान्यातही येथील बाजार आपले अस्तित्व टिकवून आहे. 

मंगलदास मार्केटमंगलदास मार्केट


मंगलदास मार्केट : साधारण दीडशे वर्षांपासून ‘कपड्यांचे होलसेल मार्केट’ म्हणून मंगलदास मार्केट प्रसिद्ध आहे. पूर्वी मुंबईची ओळख कापड गिरण्यांचे गाव म्हणून होती. अर्थात त्यामुळे कापडाचा मोठा घाऊक व्यापार सुरू झाला. मुंबईतील कापड गिरण्या (मिल) बंद झाल्यानंतर सिल्क, पॉलिस्टर अशा कापडांची व तयार कपड्यांची विक्री वाढली. उल्हासनगर व उपनगरात सिंधी लोकांमुळे रेडिमेड व्यवसायात वृद्धी झाली. येथून संपूर्ण भारतात तयार कपडे व कापड निर्यात होते. आता शिंप्याकडे कपडे शिवायला देण्याची प्रथा बंद होत चाललेली आहे. जीन्ससारखे कापड व त्याचे काम करणारे कारागीर सर्वत्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे तरुणाईला आकर्षित करणारे जीन्सचे कपडे येथे होलसेल आणि किरकोळ विक्रेत्याकडेही उपलब्ध होतात. सुटीच्या दिवशी येथे स्थानिक ग्राहक व बाहेरील व्यापाऱ्यांची गर्दी होते. श्यामलदास गांधी मार्गावर हे मार्केट आहे. क्रॉफर्ड मार्केटपासून मेमन स्ट्रीटवरून येथे जाता येते. 

सूर्यनारायण मंदिरसूर्यनारायण मंदिर
श्री सूर्यनारायण मंदिर : सीपी टँकच्या अगदी जवळच पांजरपोळ लेनच्या शेवटी हे सुंदर मंदिर आहे. सुमारे ११७ वर्षांपूर्वी हे मंदिर बांधण्यात आले. दक्षिण मुंबईतील भुलेश्वरच्या मध्यभागी लपलेल्या शहराच्या सर्वांत गर्दीच्या परिसरातील हे मंदिर फारसे परिचित नाही. सन १८९९मध्ये मुंबईचे दानशूर हरजीवन वासनजी मणियार यांना झालेला त्वचेचा आजार सूर्याची आराधना केल्यावर बरा झाला. म्हणुन त्यांनी हे सूर्यमंदिर बांधण्यास सुरुवात केली. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने ते पूर्ण केले. या मंदिरात अनेक पौराणिक प्रसंगांची चित्रे ठेवली आहेत. तसेच ऋषीमुनींचे पुतळेही आहेत. आवर्जून बघावे असे हे मंदिर आहे. 

स्वामीनारायण मंदिरस्वामीनारायण मंदिर
श्री स्वामीनारायण मंदिर, भुलेश्वर : हे मंदिर स्वामीनारायण संप्रदायाचा एक भाग आहे. हे स्वामीनारायण मंदिर मुंबईच्या भुलेश्वर भागात आहे. सध्याच्या मंदिरात तिरंगी रचना आहे आणि लक्ष्मीनारायण देव, घन:श्याम महाराज, हरि कृष्ण महाराज, गौलोकविहारी आणि राधा यांच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत. हे शिखरबंद मंदिर असून, लक्ष्मीनारायण देव गादी (वडताल) अंतर्गत येते. या मंदिरांमध्ये फुलांची जास्त मागणी असल्यामुळे फुले गल्ली (किंवा फुलांचा बाजार) येथे सुरू झाला. 

हार्डवेअर बाजार : नळ बाजारासमोर, मटण स्ट्रीट, चिमणा बुचर स्ट्रीट व सैफी ज्युबिल स्ट्रीट या गल्ल्यांच्या तोंडावर हार्डवेअर बाजार आहे. तेथे सर्व प्रकारचे व आकाराचे खिळे, स्क्रू, हातोड्या, स्क्रू ड्रायव्हर्स, पाने (स्पॅनर), सुतार-लोहारांना लागणाऱ्या कात्र्या, करवती, छिन्नी, तराजू, साखळ्या (चेन्स), वजने, मापे, डंबेल्स, व्यायामशाळेतील लोखंडी सामान, रोलर स्केटिंग, सर्व प्रकारची छोटी छोटी चाके, नट-बोल्ट्स, रंगांचे ब्रश, विविध प्रकारच्या स्प्रिंग्ज, बाथरूम फिटिंग्ज आदी सामान मिळते. 

श्री स्वामीनारायणश्री स्वामीनारायण
चोर बाजार : मुंबईतील कामठीपुरा येथील भेंडीबाजाराजवळ भारतातील सर्वांत मोठा कबाडी बाजार आहे. खरे तर येथील व्यापारी आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी ग्राहकांना ओरडून बोलावत, तसेच वस्तूची जाहिरातही करत असत. एकदा व्हाइसरॉय सँडहर्स्ट रस्त्यावरून जात होते. त्या वेळी ‘रास्ते का माल सस्ते में,’ असे तार स्वरात ओरडत माल विकणाऱ्या फेरीवाल्यांचा (काबाडी लोकांचा) आवाज त्यांच्या कानी पडला. तेव्हा व्हाइसरॉयनी फेरीवाल्यांच्या आवाजाला त्रासिकपणे ‘क्या शोर बाजार है’ असे म्हणून नाक मुरडले होते. त्यावरून त्या जुन्या बाजाराचे नाव ‘शोर बाजार’ पडले. लोकांनी त्याचा ‘चोर बाजार’ असा अपभ्रंश केला. बाजाराच्या नावाच्या संबंधी आणखी एक कथा प्रचलित आहे. त्यानुसार, एक व्हायोलिन आणि राणी व्हिक्टोरियाचे अन्य काही सामान तिच्या मुंबईच्या भेटीदरम्यान तिच्या जहाजातून उतरून जात असताना बेपत्ता झाले होते आणि नंतर त्यांना ‘चोर’बाजारात विक्रीसाठी ठेवलेले सापडले होते. 

हा परिसर मुंबईच्या पर्यटकांच्या आकर्षणांपैकी एक आहे. मुंबईतील लोक गमतीने म्हणतात, ‘तुमच्याकडे चोरी झाली का? मग चोर बाजारात जा. कदाचित तुम्हाला तेथे सापडेल.’ येथे गाड्यांचे स्पेअर पार्टस्, व्हिक्टोरियन फर्निचर, जुन्या-पुराण्या मूर्ती, अँटिक वस्तू, नक्षीकाम केलेली दारे, इलेट्रॉनिक वस्तू, बाजरभावापेक्षा कमी दरात मिळतात. 

भुलेश्वर मंदिर : हे मंदिर सुमारे ६५० वर्षांपूर्वीचे आहे. बाहेरून अत्यंत साधे दिसणारे मंदिर खूपच छान आहे. प्रचलित कथेनुसार, असे सांगितले जाते, की शिव भोला नावाच्या मच्छिमाराच्या स्वप्नात शिवशंकर आले आणि त्यांनी शिवलिंगाचा शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार त्याने शोध घेतला व लिंग सापडले; पण प्रयत्न करूनही ते पूर्ण बाहेर काढता आले नाही. अखेर तेथेच पूजा-अर्चा सुरू करण्यात आली व त्या जागेवर मंदिर बांधण्यात आले. शिवभक्त भोलाच्या नावावरूनच भुलेश्वर असे नाव पडले. मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या वर नगारखाना बांधला असून, तेथे सकाळी नगारा व शहनाईचे वादन सुरू असते. मंदिर परिसरात भगवान गणेश, जलाराम, हनुमान, काळभैरव आणि जुने वटवृक्ष अशी मंदिरे आहेत. 



जव्हेरी बाजार :
भुलेश्वर भागात मंगलदास मार्केटजवळ श्यामलदास गांधी रोडच्या उत्तरेला हा बाजार आहे. हा सुवर्णबाजार भारतात प्रसिद्ध आहे. साधारण १८६४च्या सुमारास हे सोने व्यापाराचे ठिकाण झाले. या वेळी अनेक पेढ्या येथे आल्या. सर्व प्रकारची रत्ने व मौल्यवान दगड या बाजारात उपलब्ध आहेत. रत्न आणि मौल्यवान धातूपासून बनवलेल्या आधुनिक डिझाइनचे, पारंपरिक भारतीय डिझाइनचे दागिने खरेदीसाठी जव्हेरी बाजार सुरक्षित असल्याचे मानले जाते. महागड्या धातूंनी बनवलेल्या फोटो फ्रेम, क्लिप्स, चहाचे सेट्स, डिनरवेअर, खेळणी आणि इतर लक्झरी जीवनशैलीच्या वस्तूंसाठीदेखील प्रसिद्ध आहे. येथून हिरे-रत्ने यांची निर्यातही होते. 

जमादार बापू लक्ष्मण स्मारकजमादार बापू लक्ष्मण स्मारक
जमादार बापू लक्ष्मण स्मारक : ज्यांचे नाव ऐकले, की मुंबईच्या स्मगलर्सना धडकी भरायची, असे जमादार बापू लामखडे यांचे स्मारक बॅलार्ड पियर भागात आहे. त्यांनी एका चिनी प्रवाशाच्या गुप्तांगातून दडवून आणलेले सोने पकडून मोठी खळबळ उडवून दिली. स्मगलिंगच्या जगातील ही पहिलीच अनोखी घटना होती. बापूंनी कुठल्याही खबरीशीवाय केवळ आपल्या तीक्ष्ण निरीक्षणाच्या व दीर्घ अनुभवाच्या जोरावर तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस आणली होती. त्यांच्या कामगिरीबद्दल सरकारतर्फे त्यांचे स्मारक उभे करण्यात आले आहे. 

कसे जाल भुलेश्वर परिसरात?
हा परिसर छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून जवळ आहे. मुंबईमध्ये खरेदी करण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत; पण पूर्वपार चालत असलेले बाजार या भागात एकवटले आहेत. त्यामुळे येथे निवडीला संधी आहे. किमतीमध्ये घासाघीस करता येते. 

- माधव विद्वांस
मुंबई पर्यटन : वांद्रे परिसर
‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात मुंबईतील वांद्रे परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती घेऊ या.
...........
आजच्या भागात मुंबईतील मिठी नदीच्या उत्तरेकडील भाग पाहू या. हा भाग साष्टी बेटात येतो. दक्षिणेस मिठी नदी व उत्तरेस उल्हास नदी, पूर्वेसही उल्हास नदीची शाखा व पश्चिमेस अरबी समुद्र. या भागाला ऐतिहासिक वारसा आहे. साष्टी बेटावर सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याची दुसऱ्या शतकात सत्ता होती. सन ९२० ते १३७८ या कालावधीत यादवांची सत्ता होती. त्यानंतर गुजरातच्या सुलतानांनी हा भाग ताब्यात घेतला. त्यानंतर १६व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी तो ताब्यात घेतला. तो चिमाजी अप्पांनी १७३९मध्ये हल्ला करून मराठा साम्राज्यास जोडला. सन १७७४मध्ये पुण्यातील नारायणरावांच्या खुनानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा घेऊन इंग्रजांनी ठाण्यापर्यंतचा भाग ताब्यात घेतला. तो १९४७पर्यंत त्यांच्या ताब्यातच राहिला. ब्रिटिशांनी व्यापार आणि सत्ता विस्तारासाठी मुंबईचा चांगला उपयोग करून घेतला व मुंबईची भरभराट होत गेली. रोजगाराच्या निमित्ताने सर्व भारतातून लोक येथे येऊ लागले. मुंबई उद्योगासाठी व राहण्यासाठी अपुरी पडू लागली. निवांतपणासाठी श्रीमंत लोकांनी मिठी नदीच्या पलीकडे वस्ती करण्यास सुरुवात केली. 

अरबी समुद्राला लागून वांद्रे, खार, जुहू, मढ, गोराई हा भाग आहे. वांद्रे, जुहू, खार हे भाग श्रीमंत वस्तीचे समजले वाजतात. चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते, क्रिकेटपटू, उद्योगपती, राजकारणी यांची वसतिस्थाने आहेत. 

वांद्रे/बांद्रा : बंदरगाह या उर्दू शब्दावरून बंदरचे वांद्रे झाले असावे, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. सन १५३४मध्ये, डिएगो दा सिल्विरा या पोर्तुगीज आरमाराच्या कॅप्टनने येथे प्रवेश केला आणि तेथील कोळी वस्ती नष्ट केली आणि हा भाग प्रथमच पोर्तुगीज आधिपत्याखाली आला. त्याचबरोबर धर्मप्रसारही केला गेला. कॅथोलिक धर्मगुरू फादर मॅन्युएल गोम्स यांनी येथे चर्चचे महत्त्व वाढविण्यात मोलाची भूमिका बजावली होती. सन १५८०मध्ये त्यांनी दोन हजार मच्छिमारांना बाप्तिस्मा दिला. फादर गोम्स यांनी सेंट अँड्र्यू चर्चदेखील स्थापन केले. १७७५मध्ये सुरतच्या कराराने वांद्रे हा इंग्रजी प्रांताचा भाग झाला, परंतु पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाच्या वेळी १७७९मध्ये मराठ्यांकडे परत गेला. 

सन १८०२मध्ये बाजीराव (दुसरा) याने इंग्रजाशी बासेन (वसई) करारावर स्वाक्षरी केली आणि पुन्हा वांद्रे ब्रिटिशांच्या स्वाधीन केले आणि ते १५ ऑगस्ट १९४७पर्यंत ब्रिटिशांच्या ताब्यात राहिले. सन १८७६मध्ये वांद्रा गावाला नगरपालिकेचा दर्जा देण्यात आला. त्या वेळी वांद्रेमध्ये शेर्लि, मल्ला, राजन, कातवडी, वरोदा, रणवार, बोरान, पाली आणि चुईम अशी अनेक गावे समाविष्ट झाली. सन १९५०मध्ये मुंबई महानगरात त्याचा समावेश झाला. १२ एप्रिल १९६७ रोजी विरार ते मुंबईदरम्यान दररोज एक ट्रेनसह पहिल्या रेल्वेसेवेचे उद्घाटन झाले. सहा वर्षांनंतर येथे दररोज २४ गाड्या थांबू लागल्या. आता वांद्रे येथे दररोज ९४० गाड्या थांबतात. 

बांद्रा किल्लाबांद्रा किल्ला


बांद्र्याचा किल्ला :
इतिहासकाळात माहीमच्या खाडीमार्गे चालणाऱ्या व्यापारामुळे या भागाला खूप महत्त्व होते. या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी १६४० साली ‘बांद्र्याचा किल्ला’ बांधला. या किल्याचे मूळ नाव कॅस्टिला डी अगुआदा (Castella de Aguada) असे होते. या किल्ल्यावरून वांद्रे-वरळी सागरी पुलाचे सुंदर दर्शन होते. पुरातत्त्व विभागाने या किल्ल्याची चांगली देखभाल ठेवली आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच एक पोर्तुगीज शिलालेख दिसून येतो. हा किल्ला समुद्रसपाटीपासून २४ मीटर (७९ फूट) उंचीपर्यंत आहे. बांद्रा किल्ल्याची पुरातत्त्व विभागाने डागडुजी केलेली आहे. त्यामुळे किल्ला फार सुंदर दिसतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोर्तुगीज भाषेत एक शिलालेख कोरलेला दिसून येतो. या प्रवेशद्वारापासून किल्ल्यात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. किल्ल्यात बांद्रा लँड अँड गार्डन या एका स्थानिक संस्थेने उभारलेली बाग आहे. किल्ल्यात जुने काही अवशेष उरलेले नाहीत. माहीमच्या खाडीमार्गे चालणाऱ्या व्यापारामुळे ह्या भागाला खूप महत्त्व होते. पोर्तुगीज व ब्रिटिश यांच्यामध्ये त्यावेळी प्रचंड व्यापारी स्पर्धा होती. त्यामुळे पोर्तुगीजांनी मुख्य समुद्रावरून होणाऱ्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी सन १६४०मध्ये टेहळणी करणे व गोड्या पाण्याच्या साठ्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली. १७३९ सालच्या चिमाजी अप्पांनी वसईवर केलेल्या स्वारीत ब्रिटिशांनी हा किल्ला पाडून टाकण्याचा सल्ला पोर्तुगीजांना दिला आणि त्याप्रमाणे १७३९च्या मार्च महिन्यात हा किल्ला पोर्तुगीजांनी पाडून टाकला. 

माउंट मेरी चर्चमाउंट मेरी चर्च


माउंट मेरी चर्च :
पोर्तुगीजांनी सन १६४०च्या सुमारास माउंट मेरीचे कॅथोलिक चर्च बांधले होते. सन १७३८मध्ये मराठ्यांनी त्यांच्या हल्ल्याच्या वेळी चर्च नष्ट केले गेले. त्या वेळी समुद्रात टाकलेली व्हर्जिनची मूर्ती समुद्रातून मच्छिमारांकडून शोधून मिळविण्यात आली व तात्पुरत्या स्वरूपात सेंट अँड्र्यूज चर्चमध्ये तात्पुरती स्थापित केली गेली. त्यानंतर सन १७६१मध्ये नव्याने बांधलेल्या माउंट मेरीच्या चर्चमध्ये स्थापन करण्यात आली. सन १९०४मध्ये बांधलेल्या चर्चचे आर्किटेक्ट शाहपूरजी चंदाभॉय होते. जमसेटजी जीजीभॉय यांनी माउंट मेरी चर्चकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे बांधकाम करून दिले होते. म्हणून त्याला बोमनजींच्या पायऱ्या असे म्हणतात. येथे ‘बांद्रा फेस्टिव्हल’ म्हणून मोठा उत्सव साजरा होतो. 

वांद्रे तलाववांद्रे तलाव


वांद्रे तलाव :
हा तलाव ‘मोठा तलाव’, ‘कमळ तलाव’ म्हणून ओळखला जायचा. जवळ असलेल्या नौपाडा गावातील श्रीमंत कोकणी मुस्लिम व्यक्तीने हा तलाव बांधला आहे. हा तलाव एस. व्ही. रोडवर असून, तिन्ही बाजूंनी याला रेलिंग करण्यात आले आहे. एस. व्ही. रोडच्या कडेला पाम झाडे लावलेली असून, बसण्याची सोय केलेली आहे. त्याला विवेकानंद सरोवर असे नाव देण्यात आले आहे. ९०च्या दशकात या तलावात पॅडल बोटिंग सुविधा आणि मत्स्यपालनाचे उपक्रम राबविले होते. परंतु त्यानंतर ते बंद आहेत. हा तलाव महापालिकेच्या ताब्यात आहे. 



वांद्रे-कुर्ला संकुल :
दक्षिण मुंबई महानगर भागात दाट वस्ती व रहदारी असल्याने, वाढत चालल्याने, उपनगरामध्ये मुंबईबाहेरील व्यवसाय जिल्हा बनविण्याची गरज व मागणी वाढली. त्यानुसार २०००च्या दशकात, शहराच्या पूर्व भागात वांद्रे-कुर्ला सीमेजवळ मिठी नदी परिसरातील जमीन संपादित करण्यात आली. तेथे मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले. या नव्याने स्थापन झालेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात ब्लॅकस्टोन, गुगल आणि अॅमेझॉन यांसारख्या अनेक इक्विटी आणि तंत्रज्ञान कंपन्यांना आकर्षित करण्यात आले आहे. मुंबईच्या नरिमन पॉइंट आणि कफ परेड भागात झालेल्या व्यवसायाचे विकेंद्रीकरण करून गर्दी कमी करणे, तसेच रोजगाराच्या संधी वाढविणे हा या संकुलाचा उद्देश आहे. अशा प्रकारचे नव्याने वाढविलेले पहिलेच व्यापारी संकुल आहे. येथे अनेक राष्ट्रीयीकृत, तसेच शेड्युल्ड बँकांची मुख्यालये, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, सेबी, नाबार्ड हेड ऑफिस, आयएल अँड एफएस, अॅमेझॉन डॉट कॉम, एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, डो केमिकल्स, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, फॉर्च्युन २००० आणि जिओगार्डन, मुंबई क्रिकेट असोसिएशन, युनायटेड स्टेट्स मुंबई दूतावास आणि ब्रिटिश उप-उच्चायुक्त यांची मुख्यालये आहेत. संपूर्ण बीकेसीमध्ये अंदाजे चार लाख लोक विविध कार्यालयांमध्ये काम करत आहेत. सन १९७७मध्ये वांद्रे-कुर्ला संकुलाच्या नियोजन व विकासासाठी एमएमआरडीएची ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. यात मिठी नदी, वाकोला नाला आणि माहीम खाडीच्या दोन्ही बाजूंनी एकत्रित ३७० हेक्टर जमीन आहे. पाण्याचा निचरा होण्याच्या व्यवस्थेसह यावर रुंद रस्ते विकसित करण्यात आले आहेत. 

वांद्रे कला पथवांद्रे कला पथ


वांद्रे कला पथ :
वांद्रे यथील चॅपल रोड आणि वेरोनिका स्ट्रीटच्या आसपासच्या भागात भित्तिचित्रणाची रेलचेल असलेला अनोखा कला पथ आहे. येथे विविध प्रकारची भित्तिचित्रे असतात. त्यात लक्षवेधक कार्टून, वारली पेंटिंग, छाप, व्यक्तिचित्रे इत्यादींचा समावेश आहे. गोमेझसारख्या जगभरात नामांकित कलाकारांनी या भिंतींवर कामे तयार केली आहेत. सेंट + आर्ट मुंबई, बॉलिवूड आर्ट प्रोजेक्ट आणि धारावी आर्ट रूम अशा काही संस्था आहेत, ज्या कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) पाठबळ आहे. वांद्रे रेक्लेमेशन येथील एमटीएनएल इमारतीवरील दादासाहेब फाळके यांच्या १२० बाय १५० फूट पोर्ट्रेटचा समावेश आहे. २०१४मधील उत्सवात रणजित दहिया (बॉलिवूड आर्ट प्रोजेक्टमधील) मुनीर बुखारी आणि नीलेश खराडे यांच्यासह इतर कलाकारांनी मुंबई फेस्टिव्हलचा भाग म्हणून तयार केले होते. म्युरलचे अनावरण अमिताभ बच्चन आणि पीयूष पांडे यांनी केले होते. हे आशियातील सर्वांत मोठे भित्तिचित्र आहे. अशा प्रकारची अनेक चित्रे बघताना मजा येते. 



बँडस्टँड बीच :
वांद्रे किल्ल्याजवळच हा बीच आहे. येथील सूर्यास्ताचे चित्र खूपच छान दिसते. मोकळी हवा, पार्किंगची चांगली व्यवस्था, फॅशनेबल माणसांची गर्दी यांमुळे येथे संध्याकाळी उत्साही वातावरण असते. चित्रपट दिग्दर्शक मेहबूब खान यांनी १९५४मध्ये येथे मेहबूब स्टुडिओची स्थापना केली. लवकरच हा परिसर भारतीय चित्रपट उद्योग, बॉलिवूड यांचे केंद्र बनला. येथे सन १९७०च्या दशकात रेकॉर्डिंग स्टुडिओ सुरू करण्यात आला. बीबीआरटी वांद्रे बँडस्टँड प्रोमोनेड मुंबईतील १७ पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आले आहे. सुंदर बाग आणि स्वच्छंद पदपथ असलेली ही मोकळी जागा विविध खासदारांनी दिलेल्या निधीतून आर्किटेक्ट पी. के. दास यांच्यासह बीबीआरटी लँड्स एंड एरिया आणि बीबीआरटी सीनियर सिटीझन्स पार्क व वांद्रे बँडस्टँड रेसिडेन्ट्स ट्रस्ट या रहिवाशांच्या संघटनेच्या प्रयत्नातून सन २०००पासून समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांसाठी ही एक विनामूल्य सुविधा पुरविली आहे. 

बँडस्टँड बीचबँडस्टँड बीच


जॉगर्स पार्क :
मुंबईच्या वांद्रे येथील उद्यानासमवेत समुद्रकिनारी जॉगिंग ट्रॅक आहे. हे कार्टर रोडच्या ओटर्स क्लबच्या पुढे आहे. हे उद्यान २ मे १९९० रोजी लोकांसाठी उघडले गेले होते आणि आठवड्यात दोन हजारांहून अधिक अभ्यागत येतात आणि रविवारी त्यांची संख्या दुप्पट होते. त्याचा जॉगिंग ट्रॅक ४०० मीटर लांबीचा आहे. यात चालण्यासाठी मातीची पट्टी आणि चालणे किंवा जॉगिंगसाठी दोन पक्के ट्रॅक आहेत. या उद्यानाच्या विकासाचे श्रेय शहरातील दिग्गज हॉकी प्रशिक्षक आणि माजी नगरसेवक ऑलिव्हर अँड्रेड यांना दिले जाते. जॉगर्स पार्कची संकल्पना त्यांचीच. त्यांनी डम्पिंग ग्राउंडच्या (कचरा डेपो) रहेजा, लोखंडवाला आणि रिझवी बिल्डर्सच्या आर्थिक मदतीने डम्पिंग ग्राउंडमधून जॉगिंग ट्रॅकमध्ये जागेचे रूपांतर केले. 

सेंट अँड्र्यूची पॅरिश स्कूल : ही शाळा बांद्रा येथे फ्रान्सिस्को डी मेलो यांनी सन १७८०मध्ये स्थापन केली. मुंबईमध्ये इंग्रजांनी वांद्रे येथे स्थापन केलेली ही पहिली शाळा आहे. त्याचे नाव सेंट अँड्र्यू हायस्कूल झाले. 

बांद्रा येथील उद्याने : अल्मेडा पार्क, प्राइम टाइम फाउंटन, रोटरी पार्क, एएलएम पार्क, सेंट अँड्र्यूज टर्फ पार्क, बीबीआरटी, लहान मुलांसाठीचे उद्यान अशी अनेक उद्याने या भागात विरंगुळ्यासाठी उपलब्ध आहेत. 

कसे जाल वांद्रा/बांद्रा भागात? 
वांद्रा पश्चिम द्रुतगती मार्गावर आहे. पश्चिम रेल्वेवरील मुख्य व उपनगरी गाड्यांची सतत ये-जा चालू असते. 

मुंबई पर्यटन : धोबी तलाव परिसर
मेट्रो चौकमेट्रो चौक


‘करू या देशाटन’
सदरात आपण सध्या मुंबईतील पर्यटनस्थळांची माहिती घेतो आहोत. आजच्या भागात माहिती घेऊ या धोबी तलाव परिसरातील ठिकाणांची...
.........
मुंबईतील आताच्या वासुदेव बळवंत फडके चौकाला ‘मेट्रो चौक’ असेही म्हणतात. या परिसरात धोबी तलाव होता. म्हणून या परिसराला धोबी तलाव असेही म्हणतात. हा मुंबईमधील भव्य चौक आहे. येथून गिरगावकडे जाणारा जगन्नाथ शंकरशेठ रोड, भुलेश्वरकडे जाणारा काळबा देवी रोड, क्रॉफर्ड मार्केटकडे जाणारा लोकमान्य टिळक मार्ग, महापालिका व गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा महापालिका मार्ग, ओव्हल मैदान, आझाद मैदान, क्रॉस मैदान अशा मैदानांमधून हायकोर्ट मंत्रालयाकडे जाणारा महात्मा गांधी मार्ग, मरीन ड्राइव्हकडे जाणारा आनंदीलाल पोतदार मार्ग एवढ्या मोठी वाहतूक असलेल्या रस्त्यांची सुरुवात होते. हा भाग मैदानी असल्याने मोकळी हवा भरपूर खेळत असते. क्रॉस मैदानाजवळ खाऊगल्लीही आहे. आजूबाजूला असलेल्या गॉथिक, इंडोसारासेनिक, आर्ट डेको शैलीतील इमारती, मधोमध असलेली वृक्षांची किनार व त्यामधील मैदाने यामुळे हा परिसर एकदम रम्य दिसतो. 

मेट्रो चौकमेट्रो चौक


धोबी तलाव : 
बिना पानी का धोबी तालाब देखो...
ई है ‘बंबई’ नगरिया तू देख बबुआ

धोबी तलाव मेट्रो ते महात्मा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) तेथून मुंबई महापालिका तेथून मेट्रो हा भाग धोबी तलाव वॉर्ड म्हणून ओळखला जातो. तलाव असलेल्या जागेवर सध्या एक सार्वजनिक वाचनालय आहे. तसेच लागूनच मेट्रो सिनेमा थिएटर आहे. ब्रिटिश सैनिकांचे कपडे धुण्यासाठी तेथे असलेल्या गोड्या पाण्याच्या झऱ्यांचा उपयोग करून धोबी घाट बांधण्यात आला होता. सध्या तेथे मेट्रो टॉकीज आहे. शहर विस्तारासाठी किल्ला पाडल्यावर हा तलाव हलविण्यात आला. इंग्रजांची भारतावर पक्कड घट्ट झाल्यावर लष्कराच्या माध्यमातून संस्थानिकांवर ब्रिटिशांनी दबाव ठेवला. मुंबईमध्ये मोठे लष्कर ठेवण्याची आवश्यकता संपली. मुंबईचे औद्योगीकरण व व्यापारीकरण मोठ्या प्रमाणावर होऊ लागले व त्याबरोबरच लाँड्री व्यवसायही सुरू झाला. धोबी तलाव काळाच्या ओघात संपला; पण नाव मात्र तसेच राहिले. 

मेट्रो सिनेमामेट्रो सिनेमा
मेट्रो सिनेमा : हे चित्रपटगृह आर्ट डेको शैलीमध्ये सन १९३८ मध्ये बांधले गेले. हे थिएटर मेट्रो-गोल्डविन-मेयर या कंपनीने (एमजीएम) बांधले आणि चालविले. याचे संकल्पचित्र अमेरिकन आर्किटेक्ट थॉमस डब्ल्यू. लँब आणि मुंबईचे डी. डब्ल्यू. डिचबर्न यांनी केले होते. पहिला सिनेमा सिनेमा पाच जून १९३८ रोजी प्रदर्शित झाला. सुरूवातीला एमजीएमने बनविलेले चित्रपट प्रदर्शित केले. आतील बाजू, मजले, भिंती, छत, तसेच फर्निचर लाल आणि गुलाबी रंगात होते. 

संचालक चार्ल्स गेरार्ड यांच्या मार्गदर्शनाखाली जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी याचे सुशोभीकरण केले. उद्घाटन कार्यक्रमासाठी हॉलिवूडचे अभिनेते ग्रेगरी पेक उपस्थित होते. १९५५मध्ये पहिले फिल्मफेअर पुरस्कार येथेच दिले गेले. १९७०मध्ये हे सिनेमागृह गुप्ता कुटुंबाने ताब्यात घेतले. राज कपूर यांचा ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ येथेच प्रदर्शित झाला. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहामुळे याच्यावर परिणाम होऊन २००५मध्ये ते बंद पडले होते; पण २००६मध्ये मल्टिप्लेक्सप्रमाणे सुधारणा करून चित्रपटगृह सुरू झाले. 

सीपी टॅँकसीपी टॅँक
कावसजी रुस्तुमजी पटेल टँक (सीपी टँक) : मेट्रो सिनेमाच्या समोर हा तलाव होता, तेथे आता कावसजी रुस्तुमजी पटेल सभागृह बांधले आहे. पूर्वी मुंबईत पिण्याच्या पाण्यासाठी अनेक तलाव श्रीमंत पारशी, मुस्लिम व्यापारी, गुजराथी, तसेच यहुदी लोकांनी बांधले होते. हा तलाव १८३१मध्ये बांधण्यात आला होता. १८५६मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्या वेळी जनावरांचे गोठे माहीमला हलविण्यात आले. विहार व तुळशी या तलावांमधून शहराला नियमित पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर या टाक्या (तलावही) हटविण्यात आल्या. कारण डासांचा प्रादुर्भाव होऊ लागला होता. 

एलफिन्स्टन कॉलेजएलफिन्स्टन कॉलेज


एलफिन्स्टन कॉलेजएलफिन्स्टन कॉलेज


एल्फिन्स्टन कॉलेज :
हे कॉलेज मुंबई विद्यापीठाच्या सर्वांत जुन्या महाविद्यालयांपैकी एक आहे. नाना शंकरशेट यांच्या पुढाकारातून १८२४मध्ये बॉम्बे ऑफ नेटिव्ह स्कूल सोसायटीची स्थापना झाली व मुंबईत व्यापाराबरोबर शिक्षणही आले. पुढे याच संस्थेचे एल्फिस्टन एज्युकेशन सोसायटी असे नाव झाले. सन १८५६मध्ये हे कॉलेज सुरू झाले. मुंबई हे सागरी व्यापार आणि व्यापारातील समृद्ध केंद्र होते. या दोन संस्थांच्या स्थापनेपासून मुंबईमध्ये शैक्षणिक सुविधांना सुरुवात झाली. या संस्थेतून शिक्षण घेतलेल्या, तसेच संस्थेशी संबंध असलेल्यांमध्ये लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीरचंद गांधी, बद्रुद्दीन तैबजी, फिरोजशाह मेहता, नानाभाऊ हरिदास, काशिनाथ त्र्यंबक तेलंग, जमशेटजी टाटा आणि प्रख्यात प्राध्यापक दादाभाई नौरोजी यांचा समावेश आहे. या संस्थेची इमारत खूपच देखणी आहे. 

कामा हॉस्पिटलकामा हॉस्पिटल


कामा हॉस्पिटल :
महिला आणि मुलांसाठी महापालिका पथावर एल्फिन्स्टन कॉलेजजवळ हे हॉस्पिटल आहे. २२ नोव्हेंबर १८८३ रोजी ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या हस्ते इमारतीची पायाभरणी केली गेली आणि ३० जुलै १८८६ रोजी ही इमारत पूर्ण झाली. मुनचेरजी कावसजी मुर्ज़बान यांनी मध्ययुगीन गॉथिक शैलीत ही इमारत तयार केली होती. पोरबंदरकडून मिळालेल्या दगडापासून ही इमारत बनविली आहे. पेस्तनजी हार्मूसजी कामा यांनी त्याच्या बांधकामासाठी त्या वेळी एक लाख रुपये देणगी दिली होती. हे हॉस्पिटल २६/११च्या हल्ल्यामुळे चर्चेत आले. अजमल कसाब व त्याचा साथीदार छत्रपती टर्मिनस वर गोळीबार करून येथे आले; पण येथील नर्सच्या हुशारीमुळे मोठा अनर्थ टळला.

गोवन स्पोर्ट्स असोसिएशनगोवन स्पोर्ट्स असोसिएशन
गोवन स्पोर्टस् असोसिएशन : ही संस्था ९० वर्षांपूर्वीची आहे. सन १९२९मध्ये या संस्थेची स्थापना झाली. तत्कालीन सरकारने क्रॉस मैदानाजवळील जमीन लीजवर मैदानासाठी उपलब्ध करून दिली. फुटबॉल हा येथील आवडीचा खेळ आहे. बरोबरीने हॉकीलाही प्रोत्साहन दिले जाते. सरावासाठी मैदान कायम भरलेले असते. मुंबईतील हजारो खेळाडू, शाळा आणि महाविद्यालये यांना खेळाचे मैदान वापरण्याचा फायदा झाला आहे. आंतरशालेय, महाविद्यालयीन, तसेच राज्य पातळीवरील सामने येथे होतात. गोवा स्पोर्ट असोसिएशनचा हॉकीचाही संघ आहे. 

बॉम्बे हॉस्पिटल : गोवन स्पोर्टस् असोसिएशनच्या मैदानाच्या पश्चिमेस भारतातील प्रसिद्ध खासगी रुग्णालय आहे. त्याची स्थापना १९५०मध्ये आर. डी. बिर्ला यांनी केली होती. हे ८३० खाटांचे सुसज्ज असे हॉस्पिटल आहे. अतिदक्षता विभागात ११० जणांची क्षमता आहे. 
क्रॉस मैदान क्रूसीफिक्सक्रॉस मैदान क्रूसीफिक्स
२२ शस्त्रक्रिया दालने आहेत. सुमारे ३२०० कर्मचारी आणि २०० निवासी डॉक्टर आहेत. यात दोन कॅथलॅबही असून, दर वर्षी १८०० शस्त्रक्रिया आणि ४००० अँजियोग्राफी/अँजिओप्लास्टी केल्या जातात. न्यूरो सर्जरी आणि न्यूरोलॉजी विभागातही ऑपरेशन थिएटर आहेत. जवळच मातोश्री बिर्ला सभागृह आहे. 

क्रॉस मैदान क्रूसीफिक्स : मैदानाच्या उत्तर बाजूला क्रूसीफिक्स आहे. येथे तीन मे रोजी संपूर्ण मुंबई आणि गोव्यातून ख्रिश्चन भाविक येतात. मोठा उत्सव साजरा होतो. 

खाऊगल्ली : क्रॉस मैदानाजवळील खाऊगल्ली फास्टफूडसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी व पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. येथील मंच्युरियन, आलू बेबी कॉर्न चाट, पावभाजी, चीज पनीर फ्रँकी आणि बॉम्बे सँडविच हे पदार्थ लोकप्रिय आहेत. त्याबरोबरीने रगडा पॅटिस, समोसे, इतर पदार्थही मिळतात; पण चायनीज साठी ही गल्ली प्रसिद्ध आहे. जवळच बहाई भवन आहे.

बॉम्बे जिमखाना मैदानबॉम्बे जिमखाना मैदान


बॉम्बे जिमखाना मैदान :
हा भारतातील पहिला जिमखाना आहे. सन १८७५मध्ये याची स्थापना झाली. क्लबहाउसचे संकल्पचित्र ब्रिटिश आर्किटेक्ट क्लॉड बॅटले यांनी काढले आहे. लॉबी, टेबल टेनिस क्षेत्र, बॅडमिंटन कोर्ट, रेस्टॉरंट आणि लाउंज म्हणून काम करणारी एक लांब इमारत असलेला हा सुसज्ज असा जिमखाना आहे. येथे हिवाळ्यातील महिन्यांत क्रिकेट खेळले जाते. पावसाळ्याच्या महिन्यांत रग्बी आणि फुटबॉल साठी मैदान वापरले जाते. सी. के. नायडू यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिला कसोटी सामना १५ डिसेंबर १९३३ रोजी येथे खेळला गेला. तात्पुरती शेड करून त्यामध्ये ५० हजार प्रेक्षकांसाठी स्टँड लावले गेले होते. १० डिसेंबर २००२ रोजी अपंगांनी खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना येथे पार पडला. या जिमखान्यामध्ये तीन बॅडमिंटन कोर्ट, पाच स्क्वॅश कोर्ट, सहा टेनिस कोर्ट, बिलियर्डस् आणि स्नूकरसाठी सहा टेबल्स, एक जलतरण तलाव आणि एक फिटनेस सेंटर आहे. या क्लबच्या मेंबरशिपसाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ पुरुषांनाच क्लबमध्ये सदस्यत्व मिळायचे. आता स्त्रियांनाही  मिळते. आझाद मैदान आणि जिमखाना यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस व चर्चगेट येथे जाण्यासाठी छोटी लेन आहे. 

आझाद मैदानआझाद मैदान


आझाद मैदान :
आझाद मैदान हे मुंबईमधील ऐतिहासिक मैदान आहे. क्रिकेट आणि राजकीय पक्षांची आंदोलने यामुळे हे मैदान सतत चर्चेत राहिले आहे. २५ एकर क्षेत्र असलेल्या या मैदानाने अनेक क्रिकेटचे सामने पाहिले, अनेक खेळाडूही घडवले. २८ डिसेंबर १९३१ रोजी महात्मा गांधींनी याच मैदानावर मोठी सभा घेतली होती. याच्या दक्षिण बाजूला चर्चगेट ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानचा छोटा संपर्क रस्ता आहे. त्याच्या पलीकडे मुंबई जिमखाना आहे. मैदानाच्या पूर्व बाजूस महापालिका मार्गास लागून मुबई मराठी पत्रकार संघाचे कार्यालय आहे. 

फॅशन स्ट्रीटफॅशन स्ट्रीट


फॅशन स्ट्रीट :
हे मुंबईतील सर्वाधिक खरेदीचे ठिकाण आहे. पर्यटक आणि मुंबईतील ग्राहकांचे आवडते ठिकाण आहे. सांगितलेल्या किमतीच्या अर्ध्या किमतीपर्यंत जेथे खरेदी करता येईल असे ठिकाण म्हणजे फॅशन स्ट्रीट. येथे प्रामुख्याने रेडिमेड कपडे, पादत्राणे, तसेच नॉव्हेल्टीज स्वस्त किमतीत मिळतात. अगदी मंडईत घासाघीस चालते तशी येथे चालते; मात्र खरेदीकरताना सावधानता घ्यायला हवी. आझाद मैदानाच्या पलीकडील महात्मा गांधी रस्त्याकडे क्रॉस मैदानापर्यंत सुमारे ३०० ते ४०० दुकाने आहेत. 

क्रॉस मैदान : हे पूर्वी परेड मैदान म्हणून ओळखले जायचे. वीर नरिमन पथ व महात्मा गांधी पथ जेथे मिळतात त्या ठिकाणी हे मैदान आहे. क्रॉस मैदानाचे क्षेत्रफळ २३ हजार चौरस मीटर असून, येथे क्रिकेट व इतर खेळ खेळले जातात. आसपास फॅशन स्ट्रीटवरील दुकाने आहेत. क्रॉस मैदानामध्ये सह्याद्री प्रतिष्ठानला २०१८मध्ये दोन तोफा आढळून आल्या आहेत. सीकोस्ट कॅनन आणि पोर्तुगीज बनावटीची लहान तोफ यांचा त्यात समावेश आहे. सीकोस्ट तोफेची लांबी ६.३ फूट असून, तिचा व्यास २. ५ फूट आहे. ही तोफ अंदाजे एक टन वजनाची आहे. दुसरी पोर्तुगीज बनावटीची तोफ ६.५ फूट लांबीची आहे. तिचा व्यास १.५ फूट आहे. या दोन्ही तोफा जमिनीवर आहेत. तोफांचे शिवडी किल्ल्यावर जतन करावे अशी विनंती सह्याद्री प्रतिष्ठानने केली आहे. दक्षिणेस १७२५मध्ये भिका बहरामने बांधलेली विहीर आहे व त्याच्या दक्षिण बाजूसच सर हार्मूसजी कावसजी दिनशॉ यांचा पुतळा आहे. क्रॉस मैदानाच्या उत्तर बाजूस टाटा गार्डन आहे. 

कसे जाल धोबी तलाव परिसरात?
येथे जाण्यासाठी चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बेस्टची बस सेवा आण टॅक्सी हे पर्याय आहेत. 

 कोटातला बालाजी ( Balaji Temple in Fort,Mumbai)



   
  आज बऱ्याच दिवसांनी सीएसटीला उतरलो. पाउस मस्त पडत होता. गरमागरम सांबाराने गळा शेकायचा विचार होता . देशपांडेना घाई असल्याने ते सरळ ऑफीसला गेले. मी आपल्या नेहमीच्या गर्दीच्या बोराबाजार स्ट्रीटने चालायला सुरुवात केली . उजव्या बाजुला पंचम पुरीवाला आहे. त्या गल्लीत सहज लक्ष गेल. तिथे एक मंदिर आणि त्यासमोर चारा घेउन बसलेली गायवाली अस नेहमीच दृश्य होते . मंदिरावर व्यंकटेश मंदिर अशी पाटी होती. वाचून पुढे गेलो आणि एकदम मुंबईचे वर्णन हे १८६३ साली गोविंद नारायण  माडगावकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाची आठवण झाली. त्यात कोटातला व्यंकटेश म्हणून एका मंदिराच वर्णन आहे. ते हेच मंदिर आहे का हे पाहाण्यासाठी परत फिरलो. एका एक मजली बसक्या इमारतीच्या तळमजल्यावर मंदिर आहे . पुजाऱ्याशी बोलल्यावर कळल की मंदिर जुनच आहे. (किती ते त्याला माहिती नव्हत)  २००१ मधे नविन मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे . बालाजीच्या पायाशी हनुमान आणि गणपतीची जुनी मुर्ती आहे .घरी जाऊन गुगल भाऊना साद घातली आणि रंजक इतिहास समोर आला . इसवीसन १६५० ते १७२८ याकाळात रामजी कामती (हे नाव कामत असाव कारण इंग्रजी कागदपत्रात याच वर्णन पंचा शेणवी ब्राम्हण अस केलेय म्हणजेच जीएसबी गौड सारस्वत ब्राह्मण) हा हरहुन्नरी माणूस ईस्ट इंडीया  कंपनीच्या ताब्यात असलेल्या मुंबई बेटावर राहात होता. व्यापारी , दर्यावदी आणि योध्दा होता. इंग्रजांबरोबर बऱ्याच युध्दात त्याने भाग घेतला होता. त्यामुळे तो इंग्रजांच्या गळ्यातला ताईत होता . सुरतहून १६९० मध्ये मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रातही  कामत यांचा इंग्रजांचा विश्वासार्ह साथीदार म्हणून गौरव केला होता . इंग्रजानी मलबार हिल ही टेकडी  कामतांना वार्षिक १५/- रुपयाने भाडे तत्वावर दिली  होती  . त्यावेळी त्यानी वाळकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानी  केलेल्या दानातूनच कोटात व्यंकटेशाचे मंदिर बांधले गेेले होते.



     या माणसाच्या यशामुळे त्याचे अनेक शत्रूही तयार झाले होते. त्याच शत्रूनी एकत्र येउन खोटी कागदपत्रे तयार केली आणि कामत हे  कान्होजी आंग्रेना मिळालेले आहेतअसे दाखवले. त्यानुसार कामतांवर खटला दाखल करण्यात आला . त्यांच्या वर करण्यात आलेला आरोप सिध्द झाल्यामुळे कामतांची सर्व मालमत्ता जप्त करुन  त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला .

      इसवीसन १७४३ मध्ये ही केस चीफ जस्टीस पुढे पुन्हा आली तेंव्हा कोर्टात सादर केलेली कागदपत्र खोटी असल्याचे समोर आले. त्यामुळे इंग्रजांनी त्याच्या वारसाना रुपये ४०००/- भरपाई आणि ३०/- मासिक पेंशन चालू केले होते. 



       मुंबईच्या न्यायालयीन इतिहासात कामतांच्या केसला महत्व आहे . चुकीच्या पुराव्यामुळे आणि त्यावर घेतलेल्या निर्णामुळे एका निरपराध माणसाला शिक्षा झाली. या केसवर गुगलवर काही पानही आहेत.

तर कोटातल्या व्यंकटेश मंदिरापासून सुरु झालेली ही काहाणी कामतांचा मला माहित नसलेला इतिहास समजल्यामुळे सुफळ संपूर्ण झाली .


चोर बाजार - मुंबापुरीची खासियत


बहुरंगी, बहुढंगी मुंबईत दोनशे वर्षांपूर्वी काही मजेशीर बाजार होते.

‘मारवाडी बाजार’ भुलेश्वर-क्रॉफर्ड मार्केट रस्त्यावर होता. तेथे उंची शेले, शालू, साड्या, लुगडी, पीतांबर, पागोटी आणि सतरंज्या मिळत.

‘अंग्रेजी बाजार’ फोर्टच्या मेडोज स्ट्रीटवर होता.

‘सट्टा बाजार’ मुंबादेवी तलावाच्या मागे एका मोठ्या इमारतीच्या आगाशीवर (गच्चीवर) भरत असे. मारवाडी लोक तेथे पावसावर सट्टा खेळत. पाऊस कोणत्या दिवशी व किती पडणार यावर सट्टेबाज भाव देत असत. पोलिसांनी त्या सट्ट्यावर कालांतराने बंदी घातली.

त्याशिवाय मुंबईत भाजी बाजार (भायखळा मंडई), कांदेबटाटे बाजार (डंकन रोड), फूल बाजार (भुलेश्वर), तांबाकाटा किंवा तांबट आळी (तांब्या-पितळेची भांडी), लोहार आळी-चाळ (हार्डवेअर), चिऱ्याचा बाजार (धोबी तलाव), कापड बाजार (मंगलदास व मुळजी जेठा मार्केट), पान बाजार (खेतवाडी), बांगडी बाजार, खांड बाजार, बोरा बाजार, क्वाटल बाजार (दावण किंवा दोरखंड), कुंभार तुकडा, गोणपाट बाजार, कॉटन बाजार (कॉटन ग्रीन), क्रॉफर्ड मार्केट तसेच नळ बाजार असे विविध प्रकारचे बाजार १८६५ ते १८७० या काळात बांधले गेले. नळबाजाराशेजारी भिकार बाजारही होता. लोक दारावर भिक्षा मागण्यास आलेल्या भिकाऱ्यांच्या (यामध्ये साधू-बैरागी वगैरे सर्व प्रकार येत) झोळीमध्ये मूठभर धान्य घालत. ते भिकारी गहू, तांदूळ व ज्वारी यांसाठी वेगवेगळ्या झोळ्या ठेवत. दिवसभर जमा झालेले धान्य दिवस मावळताना भिकार बाजारात नेऊन विकत. शहरातील गरीब लोक भिकाऱ्यांनी, साधू-बैराग्यांनी जमा करून आणलेले ते धान्य भिकार बाजारातून स्वस्त दरात खरेदी करत.

काळाच्या ओघात तेथील काही बाजार बंद पडले, तर काही स्थालांतरित झाले.

ग्रँट रोडवरील रिपनचा (ऑल्फ्रेड टॉकिज) नाका म्हणजे मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासातील एकेकाळचा सर्वात गजबजलेला नाका! नाट्य, तमाशा आणि सिनेमाची पंढरी! त्याच्या आसपासचा पिला हाऊस परिसर म्हणजे गरीब जनतेची शारीरिक भूक भागवणारा मोहमयी बाजार! तर ग्रँट रोडच्या पवनपुला (केनेडी ब्रिज) खाली रेल्वे लाइनला खेटून नृत्यसंगीताचा बाजार होता.

मुंबईतील सर्वांत जुना, वर्षानुवर्षे चालत आलेला, गरीब जनतेला, हौशी-छांदिष्ट संग्राहकांना वरदान ठरलेला, आगळावेगळा वैशिष्ट्यपूर्ण बाजार आहे तो म्हणजे जुना बाजार ऊर्फ चोर बाजार!

चोर बाजार हा मुळात जुन्या कपड्यांचा बाजार! तेथे पुढील काळात जुन्यापुराण्या नानाविध तऱ्हांच्या वस्तू विक्रीस येऊ लागल्या. त्या जुन्या बाजाराचे ‘चोर बाजार’ नामकरण कसे झाले? त्याचा किस्सा त्या बाजारातच ऐकायला मिळतो. मरीन लाइन्सच्या सोनापूर भागात, हिंदू दहनभूमीत प्रेते जाळल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असे. त्यामुळे चिराबाजार व धोबीतलाव परिसरातील किरिस्ताव व पारशी लोकांनी त्या स्मशानभूमीस आक्षेप घेतला. त्यांनी स्थानिक ब्रिटिश सरकार जुमानत नाही म्हणून इंग्लंडमध्ये थेट व्हाईसरॉयला पत्रे पाठवली. तेव्हा व्हाईसरॉय जातीने हिंदुस्मशानभूमीमुळे खरोखरच दुर्गंधी पसरते की नाही ते पाहण्यासाठी मुंबईला आले होते. त्यावेळी सँडहर्स्ट रोडवरून जाताना त्यांच्या कानी, नळ बाजाराच्या समोरच्या गल्ल्यांतून, ‘रास्ते का माल सस्ते में’, ‘जुना पुराणा सामान’, ‘बे बे रुपया, कोई भी माल उठाव’, ‘मिठा खाजा, बे पैसा’ असे तारसप्तकात ओरडत माल विकणाऱ्या मुस्लिम फेरीवाल्यांचा (काबाडी लोकांचा) आवाज पडला. लोकवस्ती विरळ असल्याने व गाड्यांची रहदारी नसल्याने रस्त्यांवर शांतता नांदत असे. तेव्हा व्हाईसरॉयनी फेरीवाल्यांच्या आवाजाला त्रासिकपणे ‘क्या शोर बाजार है’ असे म्हणून नाक मुरडले होते. त्यावरून त्या जुन्या बाजाराचे नाव ‘शोर बाजार’ पडले. लोकांनी त्याचा ‘चोर बाजार’ असा अपभ्रंश केला. मुंबईतील शर्विलकांनीही त्यांच्या हस्तकौशल्याने, चलाखीने अनेकांना त्यांचा ‘हिसका’ दाखवून त्या बाजाराचे ‘चोर बाजार’ हे नाव सार्थ केले!

इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया मुंबई भेटीस आली असताना तिच्या मूल्यवान सामानातून तिचे आवडते ‘व्हायोलिन’ गायब झाले होते. काही दिवसांनी, ते चोर बाजारातून जुने सामान म्हणून विक्रीसाठी आले, तेव्हा पोलिसांना सापडले. चाळीस वर्षांपूर्वी राजकुमार या सिनेअभिनेत्याचे चोरीस गेलेले किंमती घड्याळही पोलिसांनी तेथूनच जप्त केले होते.

हैदराबादचे धनाढ्य नवाब सालारजंगचे वंशज अलियावर जंग हे मुंबईचे गव्हर्नर होते. ते वाळकेश्वरला राजभवनात राहत. एके दिवशी, एका चोराने समुद्रमार्गे येऊन, राजभवनच्या मागच्या बाजूने अलियावर जंगसाहेबांच्या शयनगृहात प्रवेश केला आणि तेथील अलमाऱ्यांतील त्यांचे कपडे चोरून पोबारा केला. त्या घटनेने मुंबई पोलिसांची झोप उडाली. पोलिसांना राजभवनात इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही तेथे चोरी झालीच कशी ते कळत नव्हते. मात्र आठ-दहा दिवसानंतर त्या बुद्धिमान चोराचे दुर्दैव आड आले. तो ‘चोरांच्या आळंदीत’ म्हणजे ‘चोर बाजारा’त साहेबांचे कपडे विकताना पकडला गेला. त्याचे दुर्दैव अशासाठी, की त्याने चुकीच्या माणसाचे कपडे चोरले होते. शेरवानी, कुर्ते, कोट, गाऊन्स असे, हैदराबादी नवाबाचे उंची, भारी किंमतीचे कपडे विकत घ्यायला कोणीही माईचा लाल पुढे येईना! फक्त कोटाची सोन्याची बटणे तेवढी विकली गेली! काही वेळा वाटते, की अशा शर्विलकांचे फोटो फ्रेम करून चोरा बाजारात लावले गेले पाहिजे होते. शेवटी चौर्यकर्म हीसुद्धा चौसष्ट कलांपैकी एक कलाच आहे. चोर बाजारातील एक चाचा मला कौतुकाने म्हणाले होते, ‘मालिक ऐसी हुन्नर (कला) बहुत कम लोगोको देता है.’

नळ बाजारासमोरच्या सरदार वल्लभभाई पटेल रोडवरून (जुना सँडहर्स्ट रोड) मौलाना आझाद रोडकडे (जे. जे. हॉस्पिटल रोड) जाणाऱ्या मटण स्ट्रीट, चिमणा बुचर स्ट्रीट, मोची गल्ली या सर्वसाधारण परिसराला चोर बाजार म्हणून संबोधले जाते. त्यामध्ये मिनी मार्केट, मुघल बाजार, चिंधी गल्ली, बोहरी मोहल्ला, गुजर स्ट्रीट, बारा इमाम रोड यांसारखे भाग आहेत.

मॉर्टन नामक ब्रिटिश इंजिनीयरने नळ बाजार मंडई उभी केली. त्यातील मटण आणि मच्छी मंडईच्या समोरील गल्लीला त्यांचे नाव दिले गेले होते. नळ बाजारातील कसाई लोकांनी मॉर्टन स्ट्रीटचे ‘मटण स्ट्रीट’ असे नामकरण केले. मटण स्ट्रीटवर मटणाचे दुकान नव्हते आणि आजही नाही. शेजारीच चिमणा बुचर स्ट्रीट आहे. रस्त्याला कसायाचे नाव असले तरी तेथे बकरे कापले जात नाहीत. तेथे फक्त गाडीचे सुटे भाग (स्पेअर पार्ट) मिळतात. मोची गल्लीत मात्र अजूनही मोची राहतात व तेथे नवे-जुने जुतेही मिळतात.

नळ बाजारासमोर, मटण स्ट्रीट, चिमणा बुचर स्ट्रीट व सैफी ज्युबली स्ट्रीट या गल्ल्यांच्या तोंडावर हार्डवेअर बाजार आहे. तेथे सर्व प्रकारचे व आकाराचे खिळे, स्क्रू, हातोड्या, स्क्रू ड्रायव्हर्स, पाने (स्पॅनर), कात्र्या, करवती (लोहार व सुतार सामान), छिन्नी, तराजू, साखळ्या (चेन्स), वजने, मापे, डंबेल्स, व्यायामशाळेतील लोखंडी सामान, रोलर स्केटिंग, सर्व प्रकारची छोटी छोटी चाके, नट बोल्ट्स, रंगांचे ब्रश, विविध प्रकारच्या स्प्रिंग्ज, बाथरूम फिटिंग्ज आदी सामान मिळते. रोजंदारीवर अथवा कंत्राटावर काम करणारे सुतार, plumber, रंगारी, कडिया, हमाल, मांडव बांधणारे असे कारागिर-बिगारी लोक दोन टाकी परिसरात रस्त्यावर दीड-दोनशे वर्षांपासून दररोज सकाळी उभे असतात. पूर्वी मटण स्ट्रीटच्या तोंडाशी फूटकळ सामानांच्या गाड्या उभ्या असत. त्या गाड्यांवर बटण चाकू, रामपुरी चाकू, खटक्यांचे चाकू, दुहेरी धार असलेले, करवतीसारखे पाने असलेले सुरे, खंजीर, कोयते, कुऱ्हाडी, वस्तरे, फाइट (पुढे टाके असलेल्या लोखंडी अंगठ्या), गुप्त्या (मुठीच्या काठीत लांब धारदार पाते असलेल्या सुऱ्या), विळ्या, नारळ खोवणी, स्वयंपाकघरातील सुऱ्या आदी सामान मिळे. मुंबईतील गुंड लोक प्राणघातक हत्यारे पंचवीस वर्षेंपूर्वीपर्यंत तेथूनच खुलेआम खरेदी करत. नंतर पोलिसांची बंदी आली. पूर्वी त्या रस्त्यावर विविध प्रकारच्या टोप्यांची दुकाने होती. तेथे काश्मिरी, इराणी, बोहरी, तुर्की, फारसी, अरबी या लोकांच्या रंगीबेरंगी टोप्या मिळत.

चोर बाजारात साधारणत: पाचशे स्टॉल्स (टपऱ्या) आणि दुकाने आहेत. काही टपऱ्या दोन ते तीन फूट लहान आहेत. काही जवळपासच्या भागात मोठमोठी गोदामेही आहेत. तेथील व्यापारी कितीही मोठे गिऱ्हाईक असले तरी त्याला त्याच्या गोदामात  घेऊन जात नाहीत. आधी कळवल्यास ‘माल’ दुकानात आणून ठेवतात.

चोर बाजारात अॅण्टिक (दुर्मीळ) वस्तूंची जवळ जवळ पावणेदोनशे दुकाने आहेत. बाजारात काठेवाडी मुस्लिम लोकांचे प्राबल्य आहे. पूर्वी बाजारात काळे जाकिट व लाल गोंड्यांची तुर्की टोपी घातलेले ‘चाचा’ दिसत. सध्या तेथे मन्सुरी, खोडा, मेमन, युपीचे भय्ये, हैदराबादी व्यापारी आहेत. काही बोहरी जुने फर्निचर व काच सामानाच्या धंद्यात आहेत. तेथील दुकानदार स्वत:ची नावे, दुकानाचा नंबर, टेलिफोन नंबर पाटीवर लिहून ती दुकानाबाहेर लावतात. त्या पाट्यांवर दुकानात कोणत्या प्रकारचा माल विकला जातो याचेही चिन्ह बहुधा असते.

‘जरी’चा धंदा हा चोर बाजारातील सर्वात पुरातन धंदा! गेल्या शतकापर्यंत मुंबईतील पाठारे प्रभू, शणवी, खत्री, सोनार, पाचकळशी, सीकेपी, सारस्वत ब्राह्मण अशा समाजातील घरंदाज सधन स्त्रिया जरीचे काठ असलेले शालू व पैठण्या सर्रास नेसत. पाठीवर शेले घेत. पुरुषमंडळीसुद्धा अल्पाक, शार्कस्किनचा कोट परिधान करत. पूजेसाठी भरजरी पीतांबर अथवा कद नेसत. त्यांच्या जुन्या कपड्यांना चोर बाजारात सोन्याचा भाव येत असे. जरीकाठी शालू आणि पैठणी यांतून सोने, चांदी निघत असे.

चाळीत, जुन्या इमारतीत, घराबाहेर, गॅलरीत, गच्चीवर वाळत घातलेले कपडे, तसेच लाँड्रीतून गहाळ झालेले कपडे पहाटेच्या वेळी चोरबाजारात येतात. मध्यमवर्गीय लोक जुने कपडे बोहारणी अथवा वाघरीणींना (काठेवाडी बायकांना) देतात. ते कपडेसुद्धा चोर बाजारात विक्रीस येतात. रेडिमेड गारमेंटचा डिफेक्टिव्ह माल, तसेच उल्हासनगर-धारावीमधून तयार झालेला माल प्रसिद्ध कंपन्यांची लेबले लावून डुप्लिकेट रूपात तेथे येतो. कपडे लाँड्रीचा मार्क नाहीसा करून, मळके डाग पडलेले कपडे धुऊन इस्त्री करून नव्याने पुन्हा बाजारात येतात. सायंकाळच्या मंद प्रकाशात ते जुने कपडे ओळखूही येत नाहीत. त्या व्यवहारात व्यापारीही खूश आणि गिर्हाकईकही खूष!

एका बाजाराचे नाव मुघल बाजार जरी असले, तरी त्या ठिकाणी मुघलकालीन कोणत्याही वस्तू मिळत नाहीत. तो बाजार हरी मशिदीजवळ असून तेथे लहानमोठ्या जहाजावरील फूटकळ सामान विकणारी आठ-दहा दुकाने आहेत. सुकाणू (जहाजाचे गोल स्टिअरिंग व्हिल), विविध प्रकारचे नांगर, दुर्बिणी, जहाज नांगर टाकते त्यावेळी वाजवली जाणारी घंटा, नेव्हिगेशनचे रंगीत दिवे, बॅटरी चार्जर्स, लाइफ जॅकेट्स, जहाजावर वापरली जाणारी दिशा-वारा-पर्जन्य-भरती-ओहोटी-स्टॅबिलिटी यांची दर्शक मीटर्स किंवा यंत्रे आदी सामान विक्रीस ठेवलेले असते. त्यातील बहुतेक सामान परदेशी कंपन्यांचे व टिकाऊ असते. मुघल बाजारात त्या वस्तूंची मोठी गोदामे आहेत.

‘हरी मशिदी’समोर मिनी मार्केट आहे. तेथे फुटकळ वस्तू विकत मिळतात. रस्त्यावर पेन्सिली, बटणे, दो-यांची रिळे, सुया, विणकामाचे साहित्य विक्रीसाठी ठेवलेले दिसते.

कालबाह्य झालेल्या, अपघातात छिन्नविच्छिन्न होऊन गेलेल्या देशी-विदेशी कंपन्यांच्या मोटारगाड्या, मोटर सायकली कमीत कमी किंमतीत हस्तांतरित होत असतात. शेवटी, त्या निकामी, टाकाऊ होत जातात. त्यावर अधिक खर्च करणे व्यावहारिकदृष्ट्या मूर्खपणाचे ठरते. तशा अवस्थेतील एके काळच्या आलिशान गाड्या, हातगाडीवरून शेवटच्या क्रियाकर्मासाठी चोरबाजारात दाखल होतात! बारा इमाम रोडवरील गॅरेजेस म्हणजे तशा गाड्यांचे अस्तित्त्व नष्ट करणारी स्मशानभूमी! मेडिकल कॉलेजमध्ये निष्णात सर्जन शवविच्छेदन करून बेवारस प्रेतांचे अवयव अलगद काढून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देतात, तसे बारा इमाम रोडवरील कुशल मॅकेनिक चार तासांत स्क्रू-ड्रायव्हर, छिन्नी व हातोडा यांच्या साहाय्याने त्या गाड्यांचे पार्ट मोकळे करून मालकांना देतात. गाडीचा उरलेला सांगाडा, सडलेले पत्रे, निरुपयोगी पार्ट भंगारवाल्याला विकून टाकतात. जुन्या गाड्यांचे ते सुटे पार्ट मालकांना कधी कधी दामदुप्पट किंमत मिळवून देतात! पाऊणशे वर्षांपूर्वीच्या हौशी मालकांनी कौतुकाने सांभाळलेल्या काही व्हिंटेज गाड्या मुंबईच्या रस्त्यावर रॅलिजमध्ये धावताना अथवा प्रदर्शनात उभ्या असलेल्या दिसतात. त्याचे श्रेय ‘चोर बाजारा’ला जाते. कारण त्या गाड्यांना लागणारे विविध प्रकारचे सुटे भाग चढ्या भावात का होईना, फक्त चोर बाजारातील गॅरेजवाले पुरवू शकतात. प्रसिद्ध फिल्मी संगीतवादक कलाकार केरसी लॉर्ड याने किस्सा सांगितला होता. पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी हौसेने सेंकड हँड गाडी घेतली होती. त्या गाडीच्या दोन चाकांवर व्हिलकॅप नव्हती. त्यांचा ड्रायव्हर जयसिंग त्या विकत घेण्यासाठी सकाळीच चोर बाजारात गेला. तेथील माणसाने गाडीचा मेक व इतर माहिती घेतल्यावर, ‘आप यही रूको, अभी मैं व्हिलकॅप लेके आता हूँ ’ असे म्हणत पाच मिनिटांत दोन नव्या व्हिलकॅप आणल्या. जयसिंग त्या पॅक करून पैसे देऊन घरी आला. दुपारी तो त्या कॅप चाकांना बसवायला गेला, पाहतो तर काय, पहिल्या दोन्ही चाकांच्या व्हिलकॅप गायब! चोरबाजारातील त्या अनोळखी माणसाने गाडीच्या (लतादीदींच्या) दोन व्हिलकॅप्स काढून त्या जयसिंगलाच विकल्या होत्या!

चिंधी गल्लीशेजारच्या मोची गल्लीत पादत्राणांचा (चपला, बुटांचा) बाजार आहे. त्यास चप्पल बाजार म्हटले जाते. तेथे चपला-बूट बनवून विकले जातात. महाराष्ट्रात हजारो देवळे आहेत. देवळाबाहेर भाविकांचे जोडे चोरणारे शेकडो भुरटे चोर, त्यांनी चोरलेले जोडे मोची गल्लीत विकतात. दंगलीच्या काळात चोरलेला मालही तेथे येतो. पाश्चात्य कंपनींच्या ब्रँडेड शूजना (बुटांना) मोठी मागणी आहे. त्यांच्या किंमतीही फार असतात. ते शूज चोरून, चप्पलबाजारात आणले जातात. बाजारात पाश्चात्य कंपनीचे नकली शूजही पाहायला मिळतात. तेथे कमी किंमतीत तशा प्रकारचे शूज मिळतील.

काही वेळा चांगला शेलका मालही बाजारात हाती लागतो. बाजारातील फेरीवाले आणि मोची सांगली, कोल्हापूर, मिरज या भागातील असल्याने त्यांच्याशी मराठीत बोलणे श्रेयस्कर! मातृभाषेत बोलल्यामुळे व्यवहारात आपलेपणा येतो. मी त्या बाजारात चपला व बूट आणण्यास गेलो होतो. मी दुकानात बसलेल्या मावशींना सांगितले, की मी येथे नेहमी येत असल्याने भावासाठी उगाच घासाघीस करत नाही. मला जुने पण चांगल्या प्रतिष्ठित कंपनीचे जोडे व चामड्याची मजबूत चप्पल हवी आहे. तेव्हा लॉटमधील माल मला तुम्हीच काढून द्या. तिने मला खरोखरीच चांगला माल काढून दिला. बूटाचे अडीचशे व चप्पलेचे शंभर रुपये असे तिने फक्त साडेतीनशे रुपये माझ्याकडून घेतले. मी तोच माल एखाद्या दुकानातून घेतला असता तर मला कमीत कमी दीड हजार रुपये तरी द्यावे लागले असते. इतक्या स्वस्तात माल विकणे तुम्हाला कसे परवडते असे विचारल्यावर, ती म्हणाली, “आम्ही खानदानी मोची म्हणजे चांभार. आम्ही स्वत: माल बनवतो पण आम्हाला चामड्याची साधी चप्पल चारशे रुपयांच्या खाली देणे परवडत नाही. पण चोरांना माल फुकटच मिळालेला असतो. ते आम्ही देऊ ती किंमत घेऊन आनंदाने जातात. मी ही चप्पल पन्नास रुपयांत, तर बूट दीडशे रुपयांत घेतले. यात माझा व गिऱ्हाईकाचा असा दोघांचाही फायदा असतो. पूर्वी देवळातून चोरलेला माल यायचा, पण आजकाल तो माल कमी झाला आहे. सध्या कार्यक्रमाचे हॉल असतात तेथून माल येतो. तुला जो माल दिला तो सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपातील होता.” गिऱ्हाइकाने व्यापाऱ्यावर विश्वास दाखवला तर तोही त्याच्यावर विश्वास ठेवतो.

मुस्लिम बांधवांचा ‘जुम्मा’ किंवा शुक्रवार हा प्राथनेचा दिवस असतो. त्या दिवशी चोरबाजारातील सर्व दुकाने व स्टॉल्स दिवसभर बंद असतात. परंतु दर शुक्रवारी, भल्या पहाटेपासून बाजाराला जाग येते. दूरदूरचे फेरीवाले त्यांचे किंमती सामान पाट्या, हातगाड्या-टेम्पोत भरून बाजारात घेऊन येतात. बाजार सकाळी सात वाजेपर्यंत नटूनथटून तयार असतो. फेरीवाल्यांच्या रस्त्यावर बसण्याच्या जागा ठरलेल्या असतात. त्यासाठी ते स्थानिक दुकानदारांना दिवसाचे भाडेही देतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, शेजारच्या राज्यांतून अनेक लोक जुन्या, दुर्मीळ वस्तू विकण्यास बाजारात येतात. त्या मालाला ग्राहकांची चांगली मागणी असते. चोखंदळ ग्राहक त्यातील निवडक, शेलका माल पडेल त्या किंमतीस उचलण्यास तयार असतो. कारण ती दुर्मीळ वस्तू पुन्हा हाती लागेल याची शाश्वती नसते. तेथे येणारा बहुतेक माल जुना, वापरलेला अथवा चोरलेला असल्याने त्याची किंमतही बरीच कमी असते. ग्राहकाला तेथील सौंदर्यपूर्ण, कलात्मक वस्तूंची भुरळ पडते. तेथे हौसेला मोल नसते. वस्तू पाहताक्षणी आवडणे सर्वांत महत्त्वाचे असते. ग्राहक त्यांच्या पूर्वजांची आठवण म्हणून, छंद जोपासण्यासाठी, त्यांचा स्वत:चा संग्रह वाढवण्यासाठी, तर कधी घराच्या सजावटीसाठी ती खरेदी करत असतात. तेथील प्रत्येक वस्तूच्यामागे इतिहास दडलेला असतो. अँटिक अथवा जुन्या वस्तूची किंमत तिच्या दुर्मीळपणावर ठरते. विक्रेत्याची पैशांची गरज आणि ग्राहकाला वस्तूची गरज यावर सौदा ठरवला जातो. त्या दुर्मीळ वस्तूची किंमत काहीही असू शकते. त्यावेळी ग्राहकाचे ‘लक’ महत्त्वाचे असते.

मुंबईत दोन-तीन शतकांपूर्वी पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच, यहुदी यांसारखे अनेक पाश्चात्य लोक राहत होते. भारताचे अनेक देशांबरोबर व्यापारी संबंध होते. ती विदेशी मंडळी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांच्या चीजवस्तू भारतात सोडून मायदेशी परत गेली. त्यांनी वापरलेल्या त्या चीजवस्तू या ना त्या मार्गाने चोर बाजारात आल्या. त्याशिवाय अनेक इतिहासप्रसिद्ध शहरांतील संस्थानांचे जुने राजवाडे, जमीनदारांचे बंगले, नबाबांच्या हवेल्या लिलावात निघतात. कधी जीर्ण होऊन जमीनदोस्त होतात. पुन्हा नव्याने बांधल्या जातात. बाजारातील व्यापारी तेथील कलाकुसरीचा सर्व माल खरेदी करतात. कित्येक जण वडिलोपार्जित जुन्या वस्तू जागेच्या अडचणीमुळे, नादुरूस्त झाल्यामुळे नाममात्र किंमतीत फेरीवाल्यांना विकतात. फॅशन बदलते तशा जुन्या वस्तू ‘आऊटडेटेड’ होतात. काही वेळा हलाखीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे घरचे सामान विकण्याची परिस्थिती येते. फेरीवाले विक्रीस निघालेले असे सामान, अगदी पीनपासून मोठमोठी झुंबरे, हवेल्यांच्या खिडक्या दारांपर्यंतच्या वस्तू चोरबाजारात विकायला आणतात. त्यामुळे तेथे रेडिओग्राम, चेंजर, साखळी लावलेली शोभिवंत घड्याळे, जातिवंत लाकडाचे कोरीव नक्षीकाम केलेले फर्निचर, तांबा, पितळ, ब्राँझ, जस्त आदी धातूंपासून बनवलेल्या सुबक वस्तू, पेंटिंग्ज, चित्रे, राजेरजवाड्यात दिसणारे नक्षीकाम केलेले पेटारे, रांजण, गुडगुड्या, पक्ष्यांचे मोठाले पितळी पिंजरे, कलात्मक पुतळे, मूर्ती, चहाचे पेटारे, चौकोनी बरण्या, पोर्सिलीनच्या प्लेट्स, कपबश्या, कटग्लासेस, लायटर्स, अॅश ट्रेज, दारूचे मग्ज, चलनी नाणी यांसारख्या असंख्य वस्तू पाहायला मिळतात.

चोर बाजारात भारतीय पुरातत्त्व खात्याने निर्बंध घातलेल्या हस्तिदंती, प्राण्यांची हाडे, कातडी, केस व शिंगांपासून बनवलेल्या वस्तू, देवादिकांच्या पंचधातूंच्या मूर्ती, शिल्पे अशा काही संरक्षक वस्तू सोडून बाकी सर्व सामान तेथे मिळते. पुरातत्त्व विभागाची माणसे अधुनमधून बाजाराची पाहणी करण्यास येतात. तेथे बाजारात आलेली कोणतीही जुनी दुर्मीळ वस्तू दुरुस्त करणारे, जुनी वस्तू नवीन करण्यात वाकबगार असणारे कसबी कारागीर आहेत. बाजारात एकदा विकलेली वस्तू कोणी परत घेत नाहीत. खरेदी-विक्रीची पावतीही दिली जात नाही. परदेशी लोकांना विमानतळावर दाखवायला कच्ची पावती देतात. परंतु त्यावर खरी किंमत लिहिलेली नसते.

पाच वर्षांपेक्षा जुन्या वस्तूंना सेल्सटॅक्स लागत नाही. काही व्यापारी विकलेली वस्तू अस्सल असल्याचे सर्टिफेकेट देतात.

भारतात शंभर वर्षांपेक्षा जुन्या वस्तू परदेशी पाठवण्यावर बंदी आहे. लोकांना त्यांच्या संग्रही अशा वस्तू असल्यास त्या सरकारकडे रजिस्टर कराव्या लागतात. तसे कायदे अनेक आहेत. पंरतु ते राबवण्यासाठी यंत्रणा अपुरी आहे. त्यामुळे चोरबाजारात माल कोठून येतो व तो नंतर कोठे जातो यावर काहीच नियंत्रण नाही. अनेक जण ‘असली माला’च्या नावाखाली म्हणून नकली माल विकतात. शेलका, किंमती माल त्यांच्या गोदामात असतो. विश्वास पटल्यावर तो आणून दाखवला जातो. बाजारात परदेशी गिऱ्हाइके मोठ्या प्रमाणावर येत असल्याने बाजारातील व्यापारी त्यांच्याशी मोडक्यातोडक्या इंग्रजीत बोलतात. त्यांपैकी काहींच्या वेबसाइटही आहेत. त्यांचा व्यवसाय इंटरनेटमुळे ग्लोबल झाला आहे. बाजारात दर शुक्रवारी कनिष्ठ, मध्यमवर्गीय, विविध वस्तूंचे छांदिष्ट, हौशी, संग्राहक, इतिहास समाजशास्त्राचे अभ्यासक, हिंदुस्थानी कारागिरी-कलाकुसर यांविषयी कुतूहल असणारे विदेशी नागरिक, बंगले, फ्लॅट, हॉटेल्स, रेस्टॉरंट यांच्या सजावटीसाठी विविध वस्तू घेणारी उच्चवर्गीय व्यापारी मंडळी, स्टुडिओत सेट लावणारे तंत्रज्ञ, कारागीर इत्यादी मंडळी पंढरीच्या यात्रेकरूंसारखे नित्यनेमाने, भक्तिभावाने तेथे येतात. बाजारातून, जुन्या काळाची वातावरण निर्मिती करण्यासाठी हंड्या, झुंबरे, दिवे, गालिचे, मोठी पेंटिंग्ज, पोर्ट्रेट, टेलिफोन, ग्रामोफोन, भिंतीवरील घड्याळे, सिनेमाची पोस्टर्स, जुन्या गाड्या आदी वस्तू सर्रास खरेदी केल्या जातात.

चोर बाजारातील व्यापाऱ्यांची दुसरी-तिसरी पिढी चालू आहे. गिऱ्हाईकांशी पहिल्यासारखा आपलेपणा दाखवला जात नाही. तेथील बुजूर्ग दुपारच्या नमाजाला गेल्यावर, तेथे बसणारी तरुण मुले मिळेल त्या किंमतीत माल विकून टाकतात. आजकाल पाश्चिमात्य गोरे लोक तेथे मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसतात. कॉलेजच्या पोरीही हौसेने जुन्या दुर्मीळ वस्तूंच्या शोधात तेथे येतात.

चोरबाजाराचाही पुनर्विकास होणार आहे. काही श्रीमंत बोहरी लोक त्यासाठी प्रयत्नशील आहेत. रस्त्यांवर, उघड्यावर बसणारे व्यापारी कदाचित टॉवरमध्ये जातील! पण तेथे गिऱ्हाईके जातील का? याची त्यांना शंका आहे.

- अरुण पुराणिक

मुंबई पर्यटन : दादर, वरळी परिसर...
‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण भायखळा परिसराची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या दादर, वरळी परिसरातील पर्यटनस्थळांची....
...........
भायखळ्याच्या उत्तरेकडील भागात म्हणजे दादर, वरळी परिसरात पूर्वी कापडगिरण्या होत्या. त्यामुळे कामगार व जास्त करून मराठी कामगार वस्ती मोठी आहे. दादर हा भाग मुंबईची सांस्कृतिक ओळख देतो. तसेच अनेक राजकीय व सामाजिक चळवळींचे हे ठिकाण आहे. १९३७पर्यंत शिवाजी पार्क व आसपासचा परिसर विकसित झाला. ही सार्वजनिक जागा भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतच्या आंदोलनांनी गाजली, तर स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राजकारणाची साक्षीदार ठरली. १६व्या शतकात, हा परिसर खालचा माहीम (lower Mahim) म्हणून ओळखला जात असे. कारण ते मुंबईच्या सात बेटांपैकी एक असलेल्या माहीमच्या बेटावर स्थित होते. संपूर्ण पोर्तुगीज काळात ते बेट सर्वांत महत्त्वाचे होते. पोर्तुगीज फ्रान्सिस्काने १५९६मध्ये नोसा सेन्होरा डे साल्वाओ नावाचे एक चर्च बांधली, जे आज ‘पोर्तुगीज चर्च’ म्हणून ओळखले जाते. मध्य मुंबई, मुंबई उपनगरे आणि दूरच्या शहरांच्या रहिवाशांसाठी दादर पश्चिमेकडील बाजार हे खरेदीचे लोकप्रिय ठिकाण आहे. पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागांत महिला आणि मुलांच्या कपड्यांच्या दुकानांची रेलचेल आहे. 

सिद्धिविनायक, प्रभादेवीसिद्धिविनायक, प्रभादेवी
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर : प्रभादेवी भागातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील हे मंदिर गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. आसपास राहणाऱ्या काही लोकांचा रोज दर्शन घेण्याचा शिरस्ता आहे, तर काही जण चतुर्थीला येथे येतातच. अनेक राजकीय मंडळी निवडणुकीचा फॉर्म भरण्यापूर्वी येथे येतात. अभिनेते, निर्माते चित्रपटनिर्मिती व प्रदर्शनापूर्वी देवदर्शनासाठी येतात. नवपरिणित जोडपीही येतात. देव दर्शनाने सकारात्मक ऊर्जा नक्कीच निर्माण होते. 

या मंदिरात एक छोटासा मंडप आहे. गर्भागृहातील लाकडी दाररावर महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. गर्भागृहातील आतील छप्पर सोन्याने मढवले गेले आहे. गर्भागृहात गणेशाची मध्यवर्ती प्रतिमा ठेवण्यात आली आहे. या मूर्तीमध्ये चार हातांमध्ये अनुक्रमे कमळ, परशू, मोदक आणि आशीर्वाद देणारा वरदहस्त आहे. रिद्धी आणि सिद्धी या दोन्ही देवी-देवता पवित्रता, पूर्ती, समृद्धी आणि श्रीमंत असल्याचे दर्शवितात. 

श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या वरच्या मजल्यांमध्ये निवासी खोल्यांचा समावेश आहे. परिसरामध्ये हनुमान मंदिरही आहे. हे मंदिर भक्तांकडून येणाऱ्या देणग्यांमुळे श्रीमंत देवस्थान समजले जाते. मंदिराचा कारभार विश्वस्तांमार्फत चालविला जातो. देवस्थान संस्थेमार्फत अनेक लोकोपयोगी कामांसाठी देणग्या दिल्या जातात. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या नागरिकांना मदतही दिली जाते. 

प्रभादेवी मंदिर : हे प्रभादेवी भागातील जुने मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती कर्नाटकातील असून, १२व्या शतकातील आहे. सध्याचे मंदिर सन १७१५मधील आहे. इतिहासकारांच्या मते प्रभादेवी मंदिरातील मुख्य देवता मूळतः शाकंभरी देवी म्हणून संबोधली जात असे. बिंबाराजा यादव याची ती कुलदेवी होती. स्थानिक लोककथांनुसार, प्रभावती देवी पाठारे प्रभू समाजातील श्याम नायक नावाच्या भक्ताच्या स्वप्नात दिसली व त्यानेच हे मंदिर बांधले. 

शिवाजी पार्कशिवाजी पार्क


छत्रपती शिवाजी महाराज उद्यान :
हे मैदान ‘शिवतीर्थ’ म्हणूनही ओळखले जाते. समुद्राच्या सान्निध्यात असलेले हे उद्यान १९२५मध्ये महापालिकेमार्फत उभारले गेले. तत्कालीन नगरसेविका अवंतिका गोखले यांच्या मागणीवरून मैदानाचे नाव छत्रपती शिवाजी पार्क ठेवण्यात आले. या ठिकाणी १९२७मध्ये दादर हिंदू जिमखान्यामार्फत पहिले टेनिस कोर्ट स्थापन करण्यात आले. सुमारे २७ एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रावर हे मैदान विस्तारले आहे. यातील निम्म्याहून अधिक क्षेत्र सुमारे ३१ संस्थांच्या ताब्यात आहे. त्यात शिवाजी पार्क जिमखाना आणि बंगाल क्लब यांसारखे सर्वांत मोठे क्लब आहेत. उर्वरित जागेवर खेळांचे मैदान, मुलांचे पार्क, नाना-नानी पार्क, स्काउटचे मंडप, एक गणेश मंदिर आणि ग्रंथालय यांचा समावेश आहे. संपूर्ण मैदानाच्या बाजूने वृक्षराजीच्या असलेला बांधीव पादचारी मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरेख पुतळा येथे आहे. पूर्वेकडील उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार फक्त पादचाऱ्यांसाठी आहे. या प्रवेशद्वारावर शिवसेना नेते बाळ ठाकरे यांच्या दिवंगत पत्नी मीनाताई ठाकरे यांचा दिवा ठेवण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्यावर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. या मैदानाने अनेक ऐतिहासिक सभा पाहिल्या.

शिवाजी पार्कमधील शिवाजी महाराजांचा पुतळाशिवाजी पार्कमधील शिवाजी महाराजांचा पुतळा


१९१०नंतर मात्र नागरिकांनी केलेल्या जनहितयाचिकेमुळे हे मैदान शांतात क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. शिवाजी पार्कवरून केळुस्कर मार्गावरील कोहिनूर चौकासमोरच शिवसेनेचे मुख्यालय आहे. तसेच राम गणेश गडकरी यांचे स्मारकही आहे. शिवाजी पार्क मैदान भारतीय क्रिकेटचे जन्मस्थळ मानले जाते. दिवंगत अण्णा वैद्य आणि रमाकांत आचरेकर यांच्यासारख्या प्रशिक्षकांनी जोपासलेले क्रिकेट क्लबचे हे घर आहे, ज्यांनी भारतासाठी अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स तयार केले आहेत. यामध्ये मुंबईमधील सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, सुहास गुप्ते, विजय मांजरेकर, रमाकांत देसाई, बाळू गुप्ते, एम. एस. पाटील, दिलीप सरदेसाई, अशोक वाडेकर, पद्माकर शिवलकर, एकनाथ सोलकर, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, संदीप पाटील, अजित आगरकर, प्रवीण अमरे, विनोद कांबळी आणि संजय मांजरेकर अशी कितीतरी नावे घेता येतील. 

चैत्यभूमी स्तूपचैत्यभूमी स्तूप


दादर चौपाटी :
शिवाजी पार्कपासून अगदी जवळ ही चौपाटी आहे. हा एक छोटा किनारा आणि कमी गर्दीचे ठिकाण आहे. लोक येथे सूर्यास्त दृश्य आणि वांद्रे-वरळी सीलिंक पुलाचे सुंदर दृश्य पाहण्यास येतात. संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर सागरी सेतूवरील पथदिव्यांच्या प्रकाशाने आसमंत उजळून जातो. वांद्र्यापासून वरळीपर्यंत सागरी सेतू असल्याने समोर आकाशदिव्यांची माळ असल्यासारखे वाटते.

चैत्यभूमी प्रवेशद्वार, अशोकस्तंभचैत्यभूमी प्रवेशद्वार, अशोकस्तंभ
चैत्यभूमी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चैत्यभूमी उभारण्यात आली. बौद्ध स्तूप आणि चैत्य स्वरूपात हे स्मारक आहे. या ठिकाणी सहा डिसेंबर १९५६ या दिवशी डॉ. आंबेडकरांना लाखो अनुयायांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. त्यानंतर सहा डिसेंबर या दिवशी चैत्यभूमीवर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दर वर्षी लाखोंच्या संख्येने लोक येत असतात. हे एक चैत्यस्मारक असून, तेथील स्तूप आंबेडकरवादी जनतेचे आणि बौद्ध अनुयायांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. चैत्यभूमी स्तूपाच्या आतील भागात बुद्धमूर्ती व बाबासाहेबांचा पुतळा ठेवण्यात आला आहे. एका चौरस दालनावर एक लहान घुमट असे चैत्यभूमीचे रूप आहे. हे दालन जमिनीवर आणि तळमजल्यात विभागले आहे. चौरस आकाराच्या संरचनेत दीड मीटर उंचीची वर्तुळाकार भिंत आहे. वर्तुळामध्ये संगमरवरी फरशीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा आणि गौतम बुद्धाची मूर्ती आहे. वर्तुळाकार भिंतीत दोन दरवाजे आहेत. तळमजल्यावर एक स्तूप आहे आणि तेथे भिक्खूंसाठी विश्रांतीची जागा आहे. चैत्यभूमीचे मुख्य प्रवेशद्वार सांचीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराप्रमाणेच उभारण्यात आले आहे. तसेच अशोकस्तंभाची प्रतिकृतीही उभारण्यात आली आहे. चैत्यभूमीचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्नुषा मीरा आंबेडकर यांनी पाच डिसेंबर १९७१ रोजी केले. 

वरळी किल्लावरळी किल्ला


वरळी किल्ला :
वरळी हा दादरचे दक्षिणेकडील एक परिसर आहे. बहुधा वारली या शब्दावरून हे नाव आले असावे. वरळी येथे किल्ल्याची बांधणी पोर्तुगीजांनी १५६१ साली केली. खाली रुंद व वर निमुळत्या तटबंदीच्या भिंती, त्यावर त्रिकोणाकृती बुरुज आणि ह्या बुरुजावर घंटा बांधण्यासाठी मनोरा इत्यादी पोर्तुगीज स्थापत्याची वैशिष्ट्ये ह्या किल्ल्यात दिसून येतात. मुंबई बेट पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे हस्तांतरित झाले, त्या वेळी ह्या किल्लाचा ताबा ब्रिटिशांना मिळाला. ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या दरम्यान सप्तवार्षिक युद्धात वरळी किल्ल्यावर जादा शिबंदी आणि तोफा ठेवण्यात आल्या होत्या, असे उल्लेख मिळतात. वरळी कोळीवाड्यातील छोट्याशा रस्त्याने किल्ल्यापर्यंत जाता येते. किल्ल्याच्या दरवाज्याकडे जाणाऱ्या पायऱ्या सुरुवातीला जोत्याच्या उंचीपर्यंत आणि नंतर दरवाज्याच्या उंचीपर्यंत जातात. त्यामुळे भारदस्त वाटते. किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात चौकोनी विहीर आहे. विहिरीचा आतील भाग तोंडाच्या आकारापेक्षा मोठा असून, विहिरीला वर्षभर पाणी असते. पोर्तुगीजांनी मुंबई परिसरात बांधलेल्या किल्ल्यांपैकी गोड्या पाण्याची विहीर असलेला हा एकमेव किल्ला आहे. तटबंदीवर खाचा ठेवून तोफा ठेवण्यासाठी जागा करण्यात आलेली दिसून येते. वांद्रे-वरळी सी-लिंकवरून जाताना ह्या किल्ल्यावरील मनोरा लक्ष वेधून घेतो, घंटा बांधण्यासाठी हा मनोरा बांधला होता. 

वरळी किल्ला घंटाघर मनोरावरळी किल्ला घंटाघर मनोरा


पिरामल संग्रहालय :
हे वरळी भागात मध्यभागी असलेले एक अत्याधुनिक संग्रहालय आहे. येथे प्रेक्षकांना आकर्षक, माहितीपूर्ण आणि शिक्षणाच्या दृष्टीने उपयुक्त कलांचे सादरीकरण केले जाते. या संग्रहालयात नियमितपणे पिरामल संग्रहातील आणि इतर संग्रहातून आलेल्या नावीन्यपूर्ण कलाकृती पाहायला मिळतात. पिरामल आर्ट फाउंडेशन ही डॉ. स्वाती पिरामल आणि अजय पिरामल आणि पिरामल कुटुंबीयांनी भारतीय कलेचा संग्रह, जतन आणि प्रदर्शन यांसाठी स्थापन केलेली संस्था आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून कलेबद्दल दुर्मीळ माहिती असलेले ग्रंथालयही चालवले जाते. फाउंडेशन आर्काइव्हल प्रोजेक्ट्स, आर्टस् मॅनेजमेंट प्रोग्राम आणि महत्त्वपूर्ण ललित कला प्रदर्शनांना नियमितपणे प्रोत्साहन दिले जाते.

वांद्रे-वरळी सी-लिंकवांद्रे-वरळी सी-लिंक


वांद्रे-वरळी सागरी मार्ग :
हा मुंबई शहरामधील एक महत्त्वाचा, पहिला सागरी पूल आहे. हा पूल मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईतील वरळी येथे जोडतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला ५.६ किलोमीटर लांबीचा हा पूल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला असून, याचे संकल्प चित्र डीएआर कन्सल्टंट्स या कंपनीने तयार केले आहे. ह्या पुलाच्या बांधकामासाठी १ ६०० कोटी रुपये इतका खर्च आला असून, ३० जून २००९ रोजी वांद्रे-वरळी सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा पूल मुंबई आणि भारतातील स्टील वायर वापरून केलेला पहिला पूल आहे. या पुलावरील दिव्यांसाठी नऊ कोटी रुपये खर्च झाला आहे. त्याचे बांधकाम करण्यासाठी ३६ हजार किलोमीटर स्टीलच्या दोऱ्या, पावणे सहा लाख टन सिमेंट काँक्रीट वापरण्यात आले आहे. चार हजार कामगार येथे काम करत होते. या पुलामध्ये वापरल्या जाणाऱ्या खास स्टीलच्या तारा चीनकडून घेतल्या गेल्या. या तारांवर विशेष रंगासह, त्या गंजण्यापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिकचे आच्छादनही देण्यात आले आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव या पुलाला देण्यात आले आहे. वांद्रे-वरळी सागरी मार्गाच्या उत्तर टोकापासून पश्चिम द्रुतगती महामार्गाची सुरुवात होते. १९९९मध्ये शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचा पायाभरणी सोहळा पार पडला. असंख्य अडथळे पार करीत १० वर्षांनंतर हा पूल पूर्ण झाला. या पुलामुळे वांद्रा-वरळी हा प्रवास १० ते १५ मिनिटांत पूर्ण होतो. पूर्वी त्यासाठी ५० ते ६० मिनिटे लागायची. तसेच अनेकदा वाहतूककोंडीही व्हायची. हे एक पर्यटन केंद्रही झाले आहे. 

वांद्रे-वरळी सी-लिंकवांद्रे-वरळी सी-लिंक


वरळी समुद्रकिनारा :
सुमारे साडेतीन किलोमीटर लांबी असलेला हा सुंदर किनारा आहे. भरपूर लांबी असल्यामुळे येथे खूप मोकळे जाणवते. येथे वाळूत खेळण्यासाठी जागा नाही. समुद्राच्या लाटा संरक्षक कठड्यावर आपटत असतात. फेरीवाल्यांची गर्दी नसते. येथे कुल्फी छान मिळते. संपूर्ण किनारा बांधलेला आहे. त्याला बांधीव कठडा आणि प्रशस्त चेकर्डने झाकलेला पादचारी मार्ग आहे. बसायला बाके आहेत. संध्याकाळी व सकाळी चालण्याचा व्यायाम करण्यासाठी भरपूर लोक येथे येत असतात. सागरी पुलावरील विद्युत रोषणाईमुळे याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. पावसाळ्यात मोठ्या भरतीच्या लाटा बघण्यासाठी येथे गर्दी होते. सूर्यास्ताच्या वेळी वातावरण खूपच आल्हाददायक असते. आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनचा पुतळा येथे एका बाकावर बसविण्यात आला आहे. त्याच्या शेजारी बसून सेल्फी काढणाऱ्यांची गर्दी असतेच. समुद्राच्या समोरच असलेला पांढऱ्या शुभ्र रंगाचा सर जीजीभॉय यांचा टुमदार बंगलादेखील आपले लक्ष वेधून घेतो. पुढे गेलो, की वरळी सी लिंककडे जाणारा मार्ग आहे. तेथे त्यामुळे प्रचंड रहदारी असते. याच परिसरात आरेची ‘वरळी दुग्धशाळा’ असून, हे लहान मुलांच्या सहलीचं ठिकाण आहे. 

कॉमन मॅनचा पुतळाकॉमन मॅनचा पुतळा


कॉमन मॅनचा पुतळाकॉमन मॅनचा पुतळा


कसे जाल दादर, वरळी भागात?
या भागात दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकावरून बेस्ट बसने जाता येते. उपनगरातून थेट बस व टॅक्सी सेवाही आहे. 
मुंबई पर्यटन : दादर, परळ, वडाळा परिसर


‘करू या देशाटन’
सदराच्या गेल्या भागात आपण दादरच्या मध्यवर्ती भागासह वरळीपर्यंतचा भाग पाहिला. आजच्या भागात माहिती घेऊ या दादर पूर्व ते परळ, वडाळ्यापर्यंतच्या पर्यटनस्थळांची. 
...........
परळ हे पूर्वीच्या सात बेटांपैकी एक होते. या बेटावर १४०० वर्षांपूर्वी संस्कृती नांदत होती. लोकांना माहीत नसलेला संस्कृतीचा वारसा आजही पाहायला मिळतो. आचार्य दोंदे मार्गावर गोलानजी टेकडी परिसरात आपल्या पूर्वजांचा हा वारसा पाहायला मिळतो. ब्रिटिश राजवटीत परळमध्ये सुरुवातीला गव्हर्नर बंगला होता. त्यामुळे मुंबईची सर्व सूत्रे अगदी सुरुवातीला येथूनच हलविली जात असत. १७७१मध्ये मुंबईचे गव्हर्नर विल्यम हॉर्नबी परळ येथे राहायला गेले. १८५१च्या सुमारास मुंबईमध्ये कापडगिरण्या होऊ लागल्या. परळ भागात जास्त कापडगिरण्या उभ्या राहिल्या. हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला. 

मुंबईची पहिली ट्राम परळ टीटीपासून १८७४मध्ये कुलाब्याच्या दिशेने घोड्यांनी ओढत नेली होती. स्वातंत्र्यलढ्यात हा भाग अग्रेसर राहिला. भायखळ्यापासून दादर, नायगाव, वडाळा, शिवडी या भागात गिरण्यांची धुराडी धूर ओकू लागली होती. सुमारे ६४ गिरण्या या भागात होत्या. ९० टक्के कामगार मराठी होते. त्यामुळे एक ग्रामीण मराठी बाज येथे दिसायला लागला. साम्यवादी चळवळीचा येथेच उदय झाला. भजने, रामायण-महाभारत-पुराणांतील प्रसंग रंगवणारे भारूड, दशावतारी नाटके, बाल्या डान्स, चाळींमध्ये होणाऱ्या स्पर्धा, रेकॉर्ड डान्स, कबड्डीचे सामने येथे भरू लागले. विवेकानंद व्याख्यानमाला, बाबासाहेब पुरंदरे यांची शिव व्याख्यानमाला, असे कार्यक्रमही होऊ लागले. ग्रामीण भागातील लोक जास्त असल्याने तमाशा-वग-गवळण-नाटके सुरू झाली. शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख यांचे फड गाजू लागले. 

चंडिकादेवीचे मंदिरचंडिकादेवीचे मंदिर


१०० वर्षांच्या कालखंडानंतर या सगळ्याला दृष्ट लागली आणि १९९०च्या दशकाच्या सुरवातीलाच गिरणी कामगार संप झाला आणि या भागाला ग्रहण लागले. काळ बदलतो, वेगळ्या दिशा सापडतात; पण मनावर झालेली खोल जखम कशी भरून निघणार? मी माझ्या मित्राकडे डिलाइल रोडवरील हरहरवाला बिल्डिंगमध्ये जायचो. एका खोलीत २५ ते ३० जण राहायचे. रात्रपाळीचे दिवसा झोपायचे, दिवस पाळीचे रात्री, असे त्यांचे जीवन होते. काळ बदलला. माझा मित्र आता नाही; पण त्याचा मुलगा आयटी क्षेत्रात आहे. नोकरीसाठी जर्मनीत गेला. काळाप्रमाणे बदल होतो आहे. परळ हा मध्यमवर्गीय चाळींची वसाहत असलेला भाग होता. आता त्याचे रूप बदलून जुन्या चाळवजा इमारती पाडून तेथे आता टॉवर उभे राहू लागले आहेत. 

लालबागचा राजालालबागचा राजा
लालबागचा राजा : महाराष्ट्रातील गणपती उत्सव आणि गोकुळाष्टमी हे दोन्ही उत्सव जगप्रसिद्ध झाले आहेत. अनेक परदेशी पाहुणे हे पाहण्यासाठी व त्यात भाग घेण्यासाठी येतात. गणेशोत्सवाला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक रूप दिले. मुंबईकरांनी याचे वेगळे वैशिष्ट्य जपले आहे. लालबागचा राजा हा या उत्सवाचा नावाप्रमाणे राजा झाला आहे. राजाची मिरवणूक पाहण्यासाठी भक्त अनंतचतुर्दशीला सकाळीच जमा होऊ लागतात. लालबागचा राजा ही ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ची लोकप्रिय गणेशमूर्ती आहे. या मंडळाची स्थापना लालबाग मार्केटमध्ये १९३४मध्ये झाली. १९३२मध्ये पेरू चाळ येथील बाजारपेठ बंद करण्यात आली. म्हणूनच, मच्छीमार व विक्रेते जे मोकळ्या जागेवर बसले होते, त्यांनी आपल्या मार्केटला कायमस्वरूपी जागा मिळण्यासाठी गणेशाला साकडे घातले. तत्कालीन स्थानिक नगरसेवक कुवरजी जेठाभाई शहा, डॉ. व्ही. बी. कोरगावकर, रामचंद्र तावटे, नाखवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यू. ए. राव आणि स्थानिक रहिवाशांनी यासाठी प्रयत्न केले. जमीनदार राजाबाई तय्यबअली यांनी बाजाराच्या बांधकामासाठी भूखंड देण्यास सहमती दर्शविली. त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर मच्छीमार व इतर व्यापाऱ्यांनी १२ सप्टेंबर १९३४ रोजी गणेश मूर्तीची स्थापना केली. मच्छिमारांच्या प्रथेप्रमाणे मूर्ती सजली होती. भाविकांच्या इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्या दिवसापासून ही मूर्ती नवसाचा गणपती म्हणून लोकप्रिय झाली आहे. याच्या दर्शनासाठी लोक १२-१२ तास रांगेत उभे राहतात. नेते, अभिनेते, उद्योगपतीही येथे दर्शनासाठी येत असतात. उत्सवकाळात रोज लाखो लोक येत असतात. 

बारादेवीबारादेवी
बारादेवी मंदिर : परळ-शिवडी रस्त्याचे काम चालू असताना एक अपूर्णावस्थेत असलेली मूर्ती सापडली. (याला सप्तशीव असेही म्हणतात). साधारणतः इ. स ५००च्या आसपासची असावी. या मूर्तीशिल्पावर मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या पायाजवळ वादक दिसून येतात. डाव्या पायाजवळ दोन वादक असून, एका वादकाचे कोरीव काम अर्धवट आहे. दुसरा वादक बर्मीस हार्पसारखे तंतुवाद्य वाजवत आहे असे दिसते. असे वाद्य ब्रह्मदेश किंवा म्यानमार या देशात वापरले जाते. उजव्या पायाजवळ तीन वादक आहेत. एक वादक बासरी वाजवत असून, दुसरा वादक पिपासारखे चिनी वाद्य वाजवताना दिसतो. शिल्पकाम पूर्ण झालेले नसावे. ही मूर्ती ११ फूट उंच व पाच फूट सहा इंच रुंद मूर्ती आहे. जरी ती अपूर्ण असली, तरी शिल्पकाम अतिशय सुंदर आहे. पावसाळ्यात उत्खननस्थळावरून हलवताना त्याचा एक भाग खराब झाला होता. त्यामुळे ती उपासनेसाठी अयोग्य बनली. छत्रपती शिवाजी संग्रहालयात (त्या वेळच्या प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयात) मूर्ती देण्यास स्थानिकांनी नकार दिला आणि म्हणून ती घाईगडबडीत बांधलेल्या खोलीत बसविण्यात आली. संग्रहालयात एक प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. या मंदिराच्या मागेच चंडिकादेवीचे मंदिर आहे. ती परळची गावदेवी म्हणूनही ओळखली जाते. हे मंदिर व त्यातील शिल्पे इ. स. १३००मधील आहेत. पुढे चंडिका मंदिरामागील अंगणात विसावलेल्या इ. स. १३००मधील शिल्पांचा संग्रह आहे. शूर योद्धे आणि पडलेल्या राजांचे वीरगळ (हीरो स्टोन) येथे दिसून येतात. त्यावर सिंह आहेत. एक गायीचे वासरू, पाळणा इत्यादी शिल्पे दिसून येतात. बारादेवी मंदिराच्या दक्षिणेस वाघेश्वरी मंदिर असून, येथेही पुरातन शिल्पे आहेत. आसपासच्या परिसरात भग्न मूर्तींचे अवशेष दिसून येतात. 

हाफकिन इन्स्टिट्यूटहाफकिन इन्स्टिट्यूट


हाफकिन इन्स्टिट्यूट :
वॉल्डेमार मॉर्डिकाय वुल्फ हाफकिन या रशियन शास्त्रज्ञाने १८ जुलै १८९२ रोजी पटकी (कॉलरा) या रोगाची प्रतिबंधक लस तयार केली. हाफकिन यांनी कॉलरा प्लेगच्या लसीचा अगोदर स्वतःवर प्रयोग केला होता. या लशीची परिणामकारकता तपासण्यासाठी ते फ्रान्सहून मार्च १८९३मध्ये पटकीची साथ सुरू असलेल्या कोलकाता येथे आले. त्यांच्या लशीचा उपयोग जवळपास ४० हजार रुग्णांना झाला. त्यांच्या या कामगिरीमुळे १८९६मध्ये मुंबईत उद्भवलेल्या प्लेगच्या साथीवर लस शोधण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांना बोलावले. सुरुवातीला त्यांनी आपले संशोधन ग्रँट मेडिकल कॉलेजमधील एक खोली असलेल्या लहान प्रयोगशाळेत सुरू केले. अल्पावधीतच (तीन महिन्यांत) त्यांना लस तयार करण्यात यश मिळाले. नंतर त्यांना कामासाठी प्रयोगशाळा अपुरी पडू लागली. त्यामुळे विविध जागांत स्थलांतर करीत शेवटी १० ऑगस्ट १८९९ रोजी ‘गव्हर्न्मेंट हाउस’ या इमारतीत हाफकिन यांची ‘प्लेग रिसर्च लॅबोरेटरी’ स्थिरावली. १९०६मध्ये या प्रयोगशाळेचे नाव बदलून ‘बॉम्बे बॅक्टेरिऑलॉजिकल लॅबोरेटरी’ असे ठेवण्यात आले. हाफकिन यांच्या सेवानिवृत्तीनंतर १० वर्षांनी म्हणजे १९२५मध्ये त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ या प्रयोगशाळेचे नाव ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’ असे करण्यात आले. 

हाफकिन इन्स्टिट्यूटहाफकिन इन्स्टिट्यूट


१९७५मध्ये या संस्थेचे विभाजन पुढीलप्रमाणे करण्यात आले. 

१ - लशी व इतर उत्पादने यांची निर्मिती करणारा ‘हाफकिन जीव-औषधी निर्माण महामंडळ’ हा स्वतंत्र व स्वायत्त विभाग
२ - ‘हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था’ हा संशोधन विभाग. 

हाफकिन इन्स्टिट्यूटच्या सध्याच्या इमारतीचे बांधकाम १६७३मध्ये पोर्तुगीजांनी फ्रान्सिस्कन मठासाठी केले होते. १७१९मध्ये गव्हर्नर कून यांनी ती वास्तू ताब्यात घेतली. १७५०पासून तिचा वापर गव्हर्नरचे ग्रीष्मकालीन निवासस्थान म्हणून केला जाई. १८९९मध्ये ती वास्तू हाफकिन यांच्या ताब्यात देण्यात आली. 

शिवडी किल्लाशिवडी किल्ला


शिवडी किल्लाशिवडी किल्ला
शिवडी किल्ला : मुंबईचा पश्चिम किनारा हा मुंबईकरांना व पर्यटकांचा जास्त माहिती असतो. मुंबईचा पूर्व किनारा मात्र दुलक्षित आहे. पर्यटन विभागच्या प्रयत्नातून आता पूर्व किनाऱ्यावरील ठिकाणे उजेडात येत आहेत. शिवडी हा किल्ला ब्रिटिशांनी मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर सन १६८०मध्ये बांधला. मुंबई बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग होत होता. या किल्ल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. जवळील खारफुटी वनामध्ये येणारे फ्लेमिंगो आकर्षण ठरत आहेत. पोर्तुगीजांनी मुंबई ब्रिटिशांना दिल्यावर ब्रिटिशांनी सुरतहून मुंबईत तळ हलवण्याची योजना आखली. आफ्रिकन वंशाच्या सिद्दींनी त्यांच्यावर हल्ले सुरू केले. सिद्दींनीदेखील इंग्रजांना शत्रू म्हणून घोषित केले. सन १६७२मध्ये सिद्दींनी केलेल्या हल्ल्यांचा सामना करत मुंबईत अनेक किल्ले बांधण्यात आले त्यातच हा किल्ला पूर्व किनाऱ्यावरील सिद्दीच्या आक्रमणामुळे महत्त्वाचा होता. तोफांसह येथे लष्कर सिद्ध असायचे. यात ५० शिपायांची एक चौकी होती आणि सुभेदार देखभाल करायचे. त्यात आठ ते दहा तोफासुद्धा होत्या. किल्ल्यावर आता कोणतीही बांधकामे शिल्लक नाहीत. आता किल्ल्याच्या तटबंदीच्या बांधकामाची दुरुस्ती व बगीचा, तसेच सांग्रहालय करण्याचे काम प्रस्तावित आहे. येथे पक्षी निरीक्षणाची सोय करण्यात येणार आहे. 

शिवडी मॅन्ग्रूव्ह पार्कमधील फ्लेमिंगो (फोटो : विकिपीडिया)शिवडी मॅन्ग्रूव्ह पार्कमधील फ्लेमिंगो (फोटो : विकिपीडिया)


शिवडी मॅन्ग्रूव्ह पार्क :
१५ जानेवारी १९९६ रोजी बॉम्बे पोर्ट ट्रस्टने हे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले. शिवडी आणी ट्रॉम्बेदरम्यान दलदलीमध्ये १५ एकर खारफुटी असून, त्या वनाचा समावेश या उद्यानात आहे. मध्यंतरी बरीच वर्षे येथे पक्षी येणे बंद झाले होते. किंगफिशर, गुल्स (काळे डोके असलेले आणि तपकिरी डोळे असलेले), तसेच ब्लॅक-टेल गोडविट्स आणि कॉमन सँडपीपर्स, लिटल एस्प्रेट्स इत्यादी पक्षी पाण्यातून विहार करताना आढळतात. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील शिवडी (सेवरी) स्थानकातून येथे पोहोचता येते. 

शिवडी मॅन्ग्रूव्ह पार्कशिवडी मॅन्ग्रूव्ह पार्क


परळ भागातील उद्याने :
शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे उद्यान, लाल मैदान, भिवजीभाई नारे उद्यान, शहीद भगतसिंग मैदान

केईएम हॉस्पिटलकेईएम हॉस्पिटल


केईएम हॉस्पिटलकेईएम हॉस्पिटल
के. ई. एम. हॉस्पिटल : आचार्य दोंदे मार्गावर १९२६मध्ये स्थापन झालेले सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज (जीएसएमसी) आणि किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) हॉस्पिटल या भारतातील वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या संस्था आहेत. वैद्यकीय महाविद्यालय (शाळा) सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि सुपरस्पेशलिटी वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण देते; पदवी आणि पदव्युत्तर शारीरिक आणि व्यावसायिक थेरपीमध्ये, विविध मास्टर्स आणि पीएचडी कोर्स आणि एक नर्सिंग स्कूलसुद्धा येथे चालविले जाते. येथे ५५० डॉक्टर्स, ४०० कर्मचारी, १८०० कॉट्स असून रुग्णांना अत्याधुनिक सेवा पुरविली जाते. दर वर्षी सुमारे १.८ लाख रुग्णांवर येथे उपचार केले जातात. 

कसे जाल परळ, शिवडी भागात?
दादर, परळ, शिवडी या रेल्वे स्थानकांवरून येथे जाता येते. तसेच बेस्ट बसेसची सेवाही उपलब्ध आहे.

 

मुंबई पर्यटन : भायखळा परिसर
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयडॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय


‘करू या देशाटन’
सदराच्या गेल्या भागात आपण मुंबईतील ब्रीच कँडी, महालक्ष्मी परिसर पाहिला. या भागात पाहू या भायखळा परिसरातील ठिकाणे. त्यात राणीची बाग, भाऊ दाजी लाड संग्रहालय, रॉयल ऑपेरा हाउस अशा स्थळांचा समावेश आहे. 
................
जिजामाता उद्यान क्लॉक टॉवर (फोटो : विकिपीडिया)जिजामाता उद्यान क्लॉक टॉवर (फोटो : विकिपीडिया)
भायखळा परिसरात नागपाडा, कामाठीपुरा, जेकब सर्कल, कोलबंदर, आर्थर रोड जेल इत्यादी ठिकाणे आहेत. भायखळा या नावाबद्दल अनेक मते आहेत. एका मतानुसार, भाया नावाच्या एक माणसाचे धान्याचे खळे येथे होते. म्हणून भायाचे खळे आणि त्यावरून भायखळा असे नाव पडले. ही जागा मुंबईच्या सात बेटांचे विलीनीकरण होण्यापूर्वी दलदलीची जागा होती. त्यात थोडीफार शेती होती, थोडाफार भाजीपाला होत असे. येथील भाजी कमी दर्जाची समजली जात असे. परंतु पावसाळ्यात अलिबागकडून भाजीपाल्याची आवक बंद व्हायची. त्यामुळे हळूहळू येथे भाजीबाजार भरू लागला. इंग्रजांनी भायखळा परिसरातील भाजीबाजार कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतला व सरकारने धोंडिबा मेहेर यांना भाजी मंडई उभारण्यासाठी राणीच्या बागेसमोर सुमारे साडेतीन एकर जागा दिली. पूर्वी ती मेहेर मंडई या नावाने ओळखली जायची. भाजीची मागणी पाहून पुणे जिल्ह्याच्या जुन्नर परिसरातील अनेक शेतकरी या भागात स्थायिक झाले. शेतकरी, माथाडी, आडते असे व्यावसायिक येथे आले. 

जिजामाता उद्यान : पूर्वी या बागेला राणीची बाग (क्वीन्स गार्डन्स) असे नाव होते आणि तिचे मूळ नाव व्हिक्टोरिया गार्डन असे होते. हे भायखळा प्राणिसंग्रहालय म्हणूनही ओळखले जायचे. या उद्यानात जाताना प्रवेशद्वारावर एक मोठा क्लॉक टॉवर आहे. मुंबईतील फोर्ट भागातील काळा घोडा येथील मूळ घोड्यावर स्वार असलेल्या किंग एडवर्ड सातवा याचा पुतळा येथे ठेवण्यात आला आहे. सन १८३५मध्ये ब्रिटिश प्रशासनाने शिवडी येथे फलोत्पादक संस्थेला बोटॅनिकल गार्डनसाठी मोठा भूखंड मंजूर केला. ती जमीन नंतर युरोपीयन दफनभूमीसाठी संपादित केली गेली व ही बाग भायखळ्यात ३३ एकरावर सध्याच्या प्राणिसंग्रहालयाच्या ठिकाणी हलविली गेली; मात्र १८९०मध्ये येथे प्राणिसंग्रहालय करण्याचे ठरले. त्यासाठी १५ एकर जमीन वाढविण्यात आली. बोटॅनिकल गार्डनऐवजी संपूर्ण परिसर प्राणिसंग्रहालयासाठी वापरला जाऊ लागला. मूळच्या बोटॅनिकल गार्डनचा प्राण्यांसाठी चांगला वापर करण्यात आला व त्यामुळे हे उद्यानही राहिले. 

जिजामाता उद्यानातील पांढरा मोरजिजामाता उद्यानातील पांढरा मोर


प्राणिसंग्रहालयात सुमारे १८० सस्तन प्राणी, ५०० पक्षी आणि ४० सरपटणारे प्राणी आहेत. हत्ती, घोडे, वाघ, सिंह, विविध प्रकारची हरणे, माकडे, मोर, पाणघोडे, अस्वल, कोल्हे, मगरी अशी अनेक जंगली श्वापदे येथे पाहायला मिळतात. त्यामुळे लहान मुलांना आनंद मिळतो. ४८ एकर क्षेत्रात पसरलेल्या या प्राणिसंग्रहालयात सुमारे तीन हजार प्रजातीची दुर्मीळ झाडे आहेत. जिजामाता उद्यानातील पेंग्विन हेही आता मोठे आकर्षण आहे. आयात केलेल्या पेंग्विनसाठी खास बर्फाळ वातावरण कृत्रिमरीत्या तयार करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट २०१८ रोजी पहिला पेंग्विन येथे जन्माला आला. 

पेंग्विनपेंग्विन


पेंग्विनचे पिल्लूपेंग्विनचे पिल्लू


डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय :
राणीच्या बाग परिसरातच असलेले भाऊ दाजी लाड संग्रहालय पर्यटकांकडून दुर्लक्षित होते. आवर्जून बघावे असे हे संग्रहालय आहे. राणीची बाग होण्यापूर्वीपासून हे संग्रहालय आहे. सन १८५५मध्ये भाऊ दाजींच्या प्रयत्नातून हे संग्रहालय सुरू झाले. 

मुंबईच्या जडणघडणीत डॉ. भाऊ दाजी लाड हे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे. अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाचे संस्थापक, कुष्ठरोगावर औषधाचा शोध घेणारे पहिले भारतीय म्हणून मान्यता असलेले डॉ. रामकृष्ण विठ्ठल उर्फ भाऊ दाजी लाड यांचा जन्म सात सप्टेंबर १८२२ रोजी गोव्यात मांद्रे गावी, एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील मातीच्या मूर्ती घडवणारे मूर्तिकार होते. बालपणी लहानग्या रामकृष्णाची बुद्धिबळातील चमक पाहून एका इंग्रज गृहस्थांनी रामकृष्णाच्या वडिलांना त्याला इंग्रजी शाळेत पाठवण्यासाठी राजी केले. शिकण्यासाठी लाड मुंबईतील एल्फिन्स्टन विद्यालयात दाखल झाले. शालेय अभ्यासातही चमक दाखवून त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या. या काळातच लाडांचे वडील वारले. वडिलांच्या पश्चात त्यांनी आपल्या आईची व धाकटा भाऊ नारायण यांची जबाबदारी घेतली. नारायण दाजी लाडदेखील शिकून पुढे डॉक्टर बनले. भाऊ दाजी यांना त्यांच्या कामामुळे मुंबईतील एतद्देशीय व इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका इत्यादी परदेशांतील वैज्ञानिक सोसायट्यांनी मानद सभासदत्व बहाल केले. पूर्वीच्या सेंट्रल इकॉनॉमिक म्युझियमचेच रूपांतर राणी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात करण्यात आले. या व्हिक्टोरिया वस्तुसंग्रहालयातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन स्वातंत्र्यानंतर १९७५ला या वस्तुसंग्रहालयाला डॉ. भाऊ दाजी लाड यांचे नाव दिले गेले. 

या संग्रहालयामुळे मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासाची ओळख होते. अनेक दुर्मीळ मूर्ती, नक्षीदार भांडी, नकाशे, विविध धातूंची भांडी, हस्तिदंतावर केलेली कलाकुसर, लाकडावर, प्राण्यांच्या हाडांवर, शंख-शिंपल्यांवर केलेली कलाकुसर, विविध धातूंपासून बनविलेल्या मूर्ती, राधा-कृष्ण आदींची विविध शैलीतील चित्रे अशा अनेक वस्तू येथे पाहण्यास मिळतात. 

डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयडॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय


सुरेख मांडणी हे या संग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे. येथे प्रामुख्याने म्हैस आणि गवा यांच्या शिंगापासून बनविलेल्या वस्तू, नक्षीकाम, मातीची भांडी (टेराकोटा) पाहायला मिळतात. याच दालनाच्या मध्यभागी माउंट स्टुअर्ट एलफिस्टन (मुंबईचा गव्हर्नर १८१९-१८२७), प्रिन्स अल्बर्ट, क्वीन व्हिक्टोरिया (ब्रिटनची राणी १८३७-१९०२) आणि डेव्हिड ससून यांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. मुंबईच्या अनेक भागांत असलेले ब्रिटिशकालीन पुतळे येथे जतन करून ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये लॉर्ड हार्डिंग्स (गव्हर्नर जनरल; मूळ ठिकाण - अपोलो बंदर, मुंबई), एडविन एस. मॉन्टाग्यू (मॅजेस्टी प्रिन्सिपल अँड सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया; मूळ ठिकाण - मरीन लाइन्स मैदान), डॉ. थॉमस ब्लाने (पब्लिक सर्व्हिस; मूळ ठिकाण - फोर्ट), सर रिचर्ड टेम्पल बॅरोनेट (गव्हर्नर ऑफ बॉम्बे; मूळ ठिकाण - एस्प्लेनेड, मुंबई), लॉर्ड मक्यूस ऑफ व्हॅलेस्टी (गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया; मूळ ठिकाण - फोर्ट, मुंबई), लॉर्ड सँडहर्स्ट (गव्हर्नर जनरल; मूळ ठिकाण एस्प्लेनेड, मुंबई), क्वीन व्हिक्टोरिया (ब्रिटनची राणी; मूळ ठिकाण - फोर्ट.) हे सर्व पुतळे संग्रहालयाबाहेर ठेवण्यात आले आहेत. 

जेकब सर्कलजेकब सर्कल


जेकब सर्कल :
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या मध्ये महालक्ष्मी स्थानकाच्या पूर्वेला हा गजबजलेला चौक आहे. या ठिकाणाला संत गाडगे महाराज चौक असे नाव देण्यात आले आहे. तसेच सात रस्ता चौक म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते. मध्यभागी छोटे उद्यानही करण्यात आले आहे. शाळा, बस स्टॉप, रुग्णालये, शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट्स, बँका, एटीएम आणि इतर महत्त्वाच्या बाबी येथे आहेत. येथे मोनोरेल स्टेशन आहे. 

खडा पारशीखडा पारशी
आर्थर रोड जेल : मुंबई सेंट्रल जेल हे आर्थर रोड जेल म्हणूनही ओळखले जाते. सुमारे दोन एकर क्षेत्रावर हे कारागृह आहे. १९२६मध्ये याची निर्मिती करण्यात आली. कच्ची कैद, शिक्षेतील दर्जा पाहून कोठडी ठरविली जाते. अट्टल गुन्हेगार व अतिरेक्यांसाठी सुरक्षित असा अंडासेलही येथे आहे. ८०० कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात दोन हजार कैदी ठेवले जातात. ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्सच्या ‘शांताराम’ या पुरस्कारप्राप्त पुस्तकात या कारागृहाचा उल्लेख आहे. त्याने मुंबईतील या कारागृहाचे छान वर्णन केले आहे. 

खडा पारशी : मुंबई शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारी कारंजी, पुतळे अशी अनेक स्मृतिस्थळे आहेत. अनेक थोरामोठ्यांची आठवण त्यांचे पुतळे करून देत असतात. पारशी समाजातील सामाजिक कार्यकर्ते शेट करसेटजी माणेकजी यांच्या स्मरणार्थ १८७५मध्ये त्यांच्या मुलांनी पुतळा उभारला. पारशी पेहरावातील उंच स्तंभावर उभारलेला हा पुतळा भायखळ्यातील आकर्षण ठरले आहे. पुतळा बिड व ब्राँझ धातूपासून तयार केलेला आहे. पुतळ्याच्या पायथ्याशी असलेला चौथरा नक्षीकाम करून आकर्षक करण्यात आला आहे. सध्या हे स्मारक महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेले असून, त्याचे सुशोभीकरणही केले आहे. 

ग्लोरिया चर्चग्लोरिया चर्च
ग्लोरिया चर्च : माझगाव टेकडीच्या पायथ्याशी मूळ चर्च सन १६३२मध्ये पोर्तुगीज राजवटीत देजा सौजा ई लिमा कुटुंबाने बांधले. १९११मध्ये ते पाडण्यात आले व दोन वर्षांनी पुन्हा गॉथिक पद्धतीने मूळ चर्चपासून साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर भायखळा येथे सध्याच्या जागी बांधण्यात आले. चर्चच्या सौंदर्याने बऱ्याच चित्रपट निर्मात्यांना त्याच्या आवारात चित्रपटांचे चित्रीकरण करण्यास प्रेरित केले. त्यापैकी प्रमुख म्हणजे १९७७मध्ये प्रदर्शित झालेला मनमोहन देसाई यांचा ‘अमर अकबर अँथनी’ हा चित्रपट होय. 

‘वायएमसीए’ मैदान : ‘वायएमसीए’ची स्थापना लंडनमध्ये सहा जून १८४४ रोजी झाली. औद्योगिक क्रांतीच्या समाप्तीच्या वेळी मोठ्या शहरांमध्ये उद्भवलेल्या आरोग्यदायी सामाजिक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून शहरातील तरुणांना मोकळ्या जागेत खेळता यावे, यासाठी या संस्थेची लंडनमध्ये स्थापना केली गेली. मुंबई ‘वायएमसीए’ची स्थापना धोबी तलावाजवळील कावसजी हॉल येथे झालेल्या जाहीर सभेच्या शेवटी २५ एप्रिल १८७५ रोजी झाली. रेव्ह. ए. एन. सॉमरविले यांनी या सभेला संबोधित केले होते. दुसऱ्या दिवशी भारत सोडण्यापूर्वी ‘वायएमसीए’ची स्थापना पाहायला आवडेल, असे त्यांनी सांगितले व इच्छुकांना बैठकीनंतर थांबण्यास सांगितले. काही चर्चेनंतर सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आणि बॉम्बे वायएमसीएची औपचारिक स्थापना झाली. शहर विकास निगमकडून ९९ वर्षांच्या कराराने २६१९ चौरस यार्ड जागा क्लबला मिळाली. ११ मार्च १९१५ रोजी तत्कालीन बॉम्बेचे राज्यपाल लॉर्ड विलिंग्डन यांनी इमारतीचे उद्घाटन केले. १९७१मध्ये जुनी इमारत पाडून, तेथे नव्याने इमारत बांधून वायएमसी इंटरनॅशनल हाउस असे नाव ठेवण्यात आले. 

मराठा मंदिरमराठा मंदिर


मराठा मंदिर :
मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ हे चित्रपटगृह आहे. या चित्रपटगृहात ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट सलग १९ वर्षे सुरू होता व हा एक जागतिक विक्रम झाला. येथे अनेक चित्रपट दीर्घ काळ चालले. रेल्वे स्टेशन व बस स्थानक जवळ असल्यामुळे सामान्य माणसाला येथे येणे सोपे पडते. 

रॉयल ऑपेरा हाउसरॉयल ऑपेरा हाउस


रॉयल ऑपेरा हाउस :
गिरणी चौपाटीजवळ हे वारसा ठिकाणच्या यादीत असलेले चित्रपटगृह आहे. या भागाला ऑपेरा हाउस असे नाव पडले. ही देखणी इमारत युरोपीयन आणि भारतीय वास्तुशास्त्रीय शैलींचे मिश्रण आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत १९११मध्ये किंग जॉर्ज पंचम यांनी या इमारतीचे उद्घाटन केले होते. त्यानंतर येथे नाटक, संगीत मैफली होऊ लागल्या. कालांतराने येथे हिंदी चित्रपटही प्रदर्शित होऊ लागले. १९८०च्या दशकात घरातील व्हिडिओ प्लेयर लोकप्रिय होऊ लागले, तसतसे मुंबईतील सिनेमाघरांचे नुकसान होऊ लागले. त्यापाठोपाठ दूरदर्शनही सुरू झाले आणि सन १९९३मध्ये हे चांगले थिएटरही बंद करावे लागले. वारसा वास्तू असल्याने याच्या विकसनालाही परवानगी मिळत नव्हती. अखेर २००८मध्ये बाहेरील भागाचे नूतनीकरण सुरू झाले व २०१६मध्ये ते पूर्ण झाले. २३ वर्षांनी ऑपेरा हाउसचे मालक महाराजा जयेंद्रसिंहजी जडेजा आणि गुजरातच्या गोंडलच्या महाराणी कुमुद कुमारी जडेजा यांनी सोप्रानो पेट्रीसिया रोजारियो आणि तिचा नवरा पियानोवादक मार्क ट्रूप यांचा खासगी कार्यक्रम येथे आयोजित केला होता. (रॉयल ऑपेरा हाउसबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

रॉयल ऑपेरा हाउसरॉयल ऑपेरा हाउस


कसे जाल भायखळा परिसरात?
हे मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण आहे. मध्य रेल्वेवरील भायखळा स्थानकावरून येथे जाता येते. उपनगरातून थेट बेस्टची बससेवाही उपलब्ध आहे.


मुंबई - घारापुरी - नेहरू सायन्स पार्क


भल्या पहाटे 5 ला उठून सर्व आवरले. नेटवरून बुकिंग केलेली ऑनलाईन रेल्वे तिकीटे घेतल्याची खात्री केली. सामानाची आवाराअवर करून चिंचवडला 6.35 ची सिंहगड एक्सप्रेस पकडण्यास निघालो. वेटिंग लिस्टवर नाव होते. रविवार आणि सोमवारी संक्रांत आल्याने गाडीला चांगलीच गर्दी होती. गाडीत सतत वावरणारे चाय, कटलेट, वडापाव विकणा:यांचा साहजिकच गर्दीतील उभ्या असणा:यांना प्रवाशांना त्रस होत होता. एका बाईने तर परत एकडे याला तर खाली फेकून देईल, अशी धमकीच या विक्रेत्यांना दिली. आमचेही पोट असते. म्हटल्यावर गर्दीतील गडबड गोंधळ जरा कमी झाला. कल्याण आल्यावर बसायला जागा मिळाली. एकूण 2 तास मजेत गेले. छत्रपती शिवाजी टर्मिनल्सला बरोबर 10 ला गाडी पोचली. येथे 26/11 नंतर येथे चांगला बंदोबस्त केलेला आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) :

मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ही वास्तू सध्या मध्य रेल्वेची मुख्यालय म्हणून परिचित असून मुंबईतील नाही तर भारतातील सर्वात महत्त्वाचे असे ते रेल्वे स्थानक आहे. येथून दिल्ली, कोलकाता, चेन्नई, कोकण, पुणो  यासारख्या ठिकाणी रेल्वे जातात. या वास्तूचा निर्मिती-आराखडा फ्रेडरीक विल्यम स्टीव्हन्स यांनी 1887-88 या काळात निर्माण केला. कामाला सुरु वात 1889 ला होऊन ते 1897ला पूर्ण झाले. या वास्तूवर कोरीव काम केलेले आहे. वेगवेगळे प्राणी देखील कोरलेले आहे. 1996 ला या इमारतीचे व्हिक्टोरीया टर्मिनस हे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असे करण्यात आले. नुकताच प्रदर्शित झालेला ‘रावण’ या हिंदी चित्रपटातील एका दृश्यात सीएसटीची इमारत फोडून ट्रेन बाहेर येते असे कॉम्प्युटरद्वारे चित्रीत केले आहे.  स्टेशनच्या बाहेर येऊन गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारी टॅक्सी पकडली. 25 रुपयांत गेटवे ऑफ इंडिया आले.  जरा वेळ फोटोग्राफी करून 10.30 ला घारापुरीकडे जाणारी लाँचचे तिकीट काढले. 

घारापुरी :

घारापुरीला पोहोचण्यासाठी आपल्याला गेट वे ऑफ इंडियाहून लॉँच पकडावी लागते.   यात पब्लिक लाँच व लक्झरी लाँच असे दोन पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत.   आम्ही मात्र, पब्लिक लाँचचे 150 रुपये माणसी तिकीट काढले. 20 रुपये जादा देऊन बोटीच्या वरच्या मजल्यावर समुद्राचा नजरा पाहण्यासाठी गेलो.

 गेटवे ते घारापुरी बेटापर्यंतच्या एका तासाच्या लाँच प्रवासात मोठमोठी मालवाहू जहाजे दिसतात. समुद्री पक्षी या जहाजांच्या शेजारी  घिरटय़ा घालताना किंवा समुद्रात मासे पकडताना दिसतात. समुद्रातून जाताना एक लांबलचक पाइपलाइनही दिसते. ती तेलशुद्धीकरण प्रकल्पांमध्ये वाहून नेणा:या तेलाची पाईप लाईन असल्याचे लाँचवरील चालकाने सांगितले. समुदाचा खारा वारा अंगावर घेत, आजुबाजूची छोटी जहाजे व मोठी जहाजे पाहत तासाभरातच घारापुरी आली. 1534 मध्ये घारापुरी बेट पोतरुगिजांनी ताब्यात घेतले. पुढे शिवाजीमहाराजांच्या काळात मराठय़ांनी ते जिंकले. त्यानंतर इ.स. 1774 मध्ये घारापुरी बेट इंग्रजी सत्तेच्या हाती जाऊन 1947 पर्यंत ते त्यांच्या सत्तेखालीच होते.

घारापुरीच्या समोरच तुर्भे येथील अणुभट्टीचा गोल घुमट दिसतो.  घारापुरी बेट हे एखाद्या उंच टेकडीसारखे आहे. घारापुरीच्या नवीन जेट्टीवर (प्रवाशांना उतरण्यासाठी समुद्रात तयार केलेला छोटासा पूल) उतरलो. येथून घारापुरीचा डोंगर 2 किलोमीटरवर आहे. हे अंतर चालत जाण्याएवढे असले तरी महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून येथे प्रवाशांना नेण्यासाठी छोटय़ा रेल्वेची घारापुरी ग्रामपंचायतीने सोय केली आहे. केवळ 1क् रुपयांत र्टिन तिकीट आपणाला मिळते. वाटेत आवळे, बोरं, काकडी, कै:या असा रानाचा मेवा विक्रीसाठी उपलब्ध होता.  दुपारचे 12 वाजले होते. प्रथम पोटोबा करून लेण्या पाहण्यासाठी निघालो. लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 120 ते 125 पाय:या चढाव्या लागतात. या पाय:यांच्या दोन्ही बाजुला अनेक हस्तकलेच्या वस्तू, दगडात कोरीव काम केलेले हत्ती, जुन्या काळी वापरत असलेल्या वस्तू, मोत्यांच्या माळा, महिलांसाठी पसेर्स विकायला ठेवलेल्या होत्या. या वस्तू बहुधा मुंबईतच तयार केलेल्या असणार कारण मुंबईत इतरत्र फिरल्यावर या वस्तू नक्कीच दिसतात. दगडातील कोरीव काम केलेल्या वस्तूंच्या किंमती विचारून आपल्याला धक्काच बसतो. विदेशी पर्यटकांची मात्र, येथे चांगलीच लुबडणूक होते. टेकडीवर पोहचण्यास सुमारे अर्धा तास पुरतो. लेणीपर्यंत जाणारी चढण फार मोठी नाही; पण वृद्ध अथवा अपंगांना पायथ्यापासून डोली-खुर्चीची सोय आहे. (अर्थातच पैसे देऊन) काही कालावधीसाठी राहण्यासाठी येथे राज्य पर्यटन खात्याची निवास व्यवस्था आहे. त्याचप्रमाणो खाण्यापिण्यासाठी सरकारी हॉटेल्स तर काही छोटी खासगी हॉटेल्स आहेत! एक पिकनिक स्पॉट म्हणून घारापुरीला आता ओळखले जाते. खरे तर जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी लेण्या पाहून त्यांचा अभ्यास करायला हवा. मात्र, गंमत म्हणून येथील कोरीव काम केलेल्या मूर्तीबरोबर आपला स्वत:चा व मित्रमैत्रिणींचा फोटो काढणारे जास्त अशी परिस्थिती सध्या सर्वच लेण्यांमध्ये दिसून येते. लेणी पाहण्यासाठी आलेल्यांची पर्यटकांची संख्या प्रचंड आहे. लेणी पाहायला आलेल्यांमध्ये विदेशी पर्यटकांची संख्या खूपच असते. घारापुरीचे प्राचीनकाळी ‘श्रीहरी’ असे नाव होते. या बेटावर शैव संप्रदायाच्या लेण्या आहेत. मुंबईपासून 10 ते 12 कि.मी. अंतरावर समुद्रात घारापुरी या बेटावर या लेण्या आहेत. इ.स. 3 ते इ.स. 7 या काळात या लेणींची निर्मिती झाली असे मानले जाते.  पूर्वी या बेटाच्या दक्षिणोला एक मोठा दगडी हत्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असे. त्या हत्तीवरूनच या लेणींना ‘एलिफंटा केव्हज’ हे नाव मिळाले. हा हत्ती सध्या मुंबईतीलच जिजामाता उद्यान (जुने नाव राणीची बाग) येथे आहे. या लेणींचादेखील ‘जागतिक वारसा’ च्या यादीमध्ये समावेश झाला आहे. मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, मुस्लिम व पोर्तुगीज साम्राज्याच्या ताब्यात हे बेट होते. भौगोलिकदृष्टया रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात हा परिसर येतो. अजंठा, वेरूळ, कार्ला, भाजे सारख्याच येथेही गुफा आहेत. जुन्या काळच्या ध्यानधारणा करण्यासाठी खोल्या आहेत. एकूण पाच गुंफा आहेत. कोरीव काम फारच छान आहे.  काही मूर्ती भग्न अवस्थेत आहेत. काहींचे हात, पाय, चेहरा विद्रुप केलेला आहे.

लेण्या :

सहाव्या शतकात काळय़ा पाषाणात कोरलेल्या या लेण्यांमुळे घारापुरी लेण्यांना वल्र्ड हेरिटेजचा वारसा लाभला आहे.  शिवशंकराची अनेक रुपे या या लेण्यांमध्ये साकारली आहेत. महाराष्ट्रात वेरु ळ, जोगेश्वरी, अंबेजोगाई या ठिकाणी शैव लेण्या आहेत. येथील गाभा:याच्या मंडपात मोठय़ा आकाराचे शिविलंग असून चारही दिशेला प्रवेशद्वार आहे.
पहिली गुफा सर्वात मोठी आहे. लेण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे भव्य अशी महेशमूर्ती (सदाशिव) त्रिमूर्ती. ब्रम्हा, विष्णू आणि महेश (शिवशंकर) यांच्या मूर्तीने जगभरातील पर्यटकांना मोहित केले आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या बोधचिन्हासाठी त्याचा वापर केला गेला आहे. छातीपासूनची ही शिवाची मूर्ती भव्य आणि उंच असून त्यातून उत्पत्ती - स्थिती आणि लय ही शंकराची तीन रूपं दाखविली आहेत. लेण्यातील महामंडप 130 फूट लांबी- रुंदीचा आणि 17 फूट उंचीचा आहे. सभामंडपाचं छत 26 खांबांवर आधारलेले आहे. प्रत्येक शिल्प पौराणिक कथा पार्श्वभूमी असून शिल्पकारांनी त्याला वास्तव रूप आहे.
या मूर्तीच्या डावीकडे गंगावतरण शिल्प आहे. भगीरथ गंगा पृथ्वीवर आणली तो प्रसंग 5 मी. उंचीच्या शिल्पातून साकारला आहे. शिवपार्वती विवाह सोहळय़ाचा प्रसंग दाखिवणारे शिल्प आहे. या शिल्पाच्या शेजारीच अंधकारसुरवधमूर्ती शिल्प आहे. शिवाच्या तांडव नृत्याचे शिल्पही आहे. प्राचीन भव्य शिविलंग, डोंगर माथ्यावरील निसर्गरम्य सान्निध्यातील सीतागुंफा हेदेखील आवर्जून पाहण्यासारखे आहे.
गुंफा क्र . 2, 3, 4 त्या मानाने लहान आहेत. पाचव्या गुफेत फार पडझड झालेली दिसली. उन, वारा, पावसामुळे गुफेत माती भरली गेली आहे. शेवटच्या दोन्ही लेणींमध्ये आतमध्ये कोणतेही कोरीव काम नाही. या लेण्यात खूप मोठय़ा प्रमाणावर मातीचा ढिगारा दिसला.  या ठिकाणी मात्र, महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष आहे.   सिंहाची आयाळ, घोडय़ाचे शरीर, वरती शिंगे असे त्याचे रूप आहे. हे सहाव्या शतकातील लेणो आहे. त्यानंतरचे तीन क्र मांकाचे लेणो हे  खोदलेले व चांगल्या स्थितीत आहे. तर दोन क्रमांकाचे लेणो हे मात्र अर्धवट सोडण्यात आले आहे.  शिवपार्वती विवाह शिल्पकृती, चतुर्भुज द्वारपाल, गणोशमूर्ती, अर्धनारीनटेश्र्वराची कार्तिकेय ही शिल्पदेखील आहेत.  ‘साइट म्युझयिम’ लेण्यांच्या परिसरातच आहे. मुंबईच्या परिसराचा आणि महाराष्ट्रातील अन्य लेण्यांचा इतिहासही येथील भिंतींवर पाहण्यास मिळतो. सर्व लेणी पहायला साधारणपणो तीन तास लागतात. 

लेण्या पाहून पुन्हा जेट्टीवरील कोणत्याही सोडण्यात येणा:या लाँचमधून पुन्हा गेटवे ला आलो. तेथून चालत चर्चगेट स्टेशनपर्यंत निघालो. वाटेत मुंबई विद्यापीठाची इमारत दिसली. शेजारीच राजाभाई टॉवरही सुरेख आहे. तेथे दोन-चार फोटो काढून चर्चगेटच्या बाहेरील मार्केटही पाहिले. रविवार असल्याने ट्रेनला गर्दी कमी होती.

संध्याकाळी 7 ला आत्याच्या घरी मुक्कामाला गेलो. दुस:या दिवशी आत्याचा पाहुणचार घेऊन दुस:या दिवशी सकाळी 10 ला घर सोडले. ते महालक्ष्मी येथील नेहरू सायन्स सेंटर पाहण्यासाठी. फास्ट लोकल व स्लो लोकल कुठल्या स्टेशनवर थांबते याचा अंदाज आला नाही. त्यामुळे महालक्ष्मी स्टेशनवर गाडी थांबली नाही. सहप्रवाशांनी मग बॉम्बे सेंट्रलला उतरून परत मागे येणारी लोकल पकडा अथवा टॅक्स करून नेहरू सायन्स सेंटरला जाण्याचा सल्ला दिला. मग  ट्रेन न पकडता बॉम्बे सेंट्रलमधून बाहेर येऊन टॅक्सी केली. 58 रुपयांमध्ये महालक्ष्मीमधील नेहरू सायन्स सेंटरला टॅक्सीने सोडले. 11 वाजता 25 रुपये माणसी तिकीट काढून नेहरू सायन्स सेंटरमध्ये प्रवेश केला.

नेहरू सायन्स सेंटर :

 

इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल म्हणजे काय?, भूकंप कसे होतात?, शॉक कसा बसतो, पृथ्वी गोल आहे काय? सूर्यमाला कशी आहे? ती कशी फिरते? अॅम्पिअर, व्होल्ट काय आहे?  वेग, अंतर, दाब कसं मोजतात? आपल्याला दिसतं कसं? प्रकाशाचा वेग काय आणि कसा असतो?  अशा प्रश्नांची उत्तरं देणारं शास्त्न म्हणजे विज्ञान आणि या विज्ञानाची प्रात्यक्षिके स्वत: करायला मिळणो म्हणजे आनंदच. येथे विज्ञानाची गंमत-जंमत अनुभवण्यासाठी विविध प्रकारचे एकूण  11 मोठी दालने आहेत. त्यातील प्रत्येक दालतना विज्ञानाचे छोटे छोटे प्रयोग करायला मिळतात. लहान मुलांचं कुतूहल किंवा चौकस बुद्धी मोठी असते. ती अजून वाढवावी यासाठी या सायन्स सेंटरची निर्मिती केली आहे. लहान असताना एकदा येथे गेलो होतो. आज बरेच वर्षानी नेहरू सायन्स सेंटरला हे सर्व पाहण्यासाठी गेलो.
 सकाळी 11.15 ला येथे पोचलो. वाटतेच सी सॉ, झोपाळा असलेलं गार्डन आहे. ही विज्ञानाची बाग आहे ही. तिथून थोडंसं पुढे गेलो तर पूर्वीच्या काळी  इलेक्तिट्रक इंजिन, वाफेचं इंजिन, स्टीम लॉरी, घोडय़ांची ट्रामगाडी, इलेक्ट्रिक ट्राम, लढाऊ विमान ठेवलेले दिसले. मुख्य इमारतीकडे जाण्यापूर्वी विज्ञान क्षेत्रत मोठी कामगिरी केलेले जगदीशचंद्र बोस, श्रीनिवास रामानुजन, चंद्रशेखर वेंकटरमण, सत्यंद्रनाथ बोस, होमी जहांगीर भाभा अशा काही शास्त्रज्ञांची अर्ध पुतळे उभारले आहेत.
‘विज्ञान ओडिसी’ नावाची एक नवीन रंगीत इमारत दिसली. येथे थ्रीडी सिनेमा पाहायला मिळतात. मात्र, त्याचे वेगळे तिकीट काढायला लागते. ते येथेच उपलब्ध असते.
एक टाचणी तळहाताला जोरात टोचली तर टोचते. मात्र, अनेक टाचण्या घेऊन त्या एकत्रितरित्या टोचल्या तर त्या टोचत नाहीत. या संबंधी टाचणाचा येथे प्रयोग आहे. मजा म्हणजे या टाचण्यांना आपण स्वत: हात लावून पाहू शकतो.
‘लाइट अँड साइट’ हे असेच एक दालन कोणतीही वस्तू आपल्या डोळय़ांना कशी दिसते? प्रकाश व रंगाचा संबंध काय? विविध रंग कसे दिसतात? ध्वनीचा आपल्या मेंदूवर कसा परिणाम होतो किंवा आवाज आपल्याला कसा ऐकायला येतो?  हे ‘साऊंड अँड हिअरिंग’ दालनात पाहायला मिळाले. स्पर्शाचं, वासाचं, चवीचं ज्ञान कसं होतं, जिभेवर कुठल्या ठिकाणी कुठल्या चवीचे ज्ञान होते. याचे बटण दाबून मोठय़ा जिभेच्या प्रतिकृतीवर लाईटींग होऊन आपल्याला पाहायला मिळते.  याविषयीची मानवी शरीराच्या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण माहितीही या ठिकाणी मिळेल. ‘सायन्स फॉर चिल्ड्रन’ या गॅलरीत साबणाचे बुडबुडय़ांसारखे काही मजेशीर प्रयोग करून छोटय़ा छोटय़ा प्रयोगांतून विज्ञान कळत जाईल.
अवर टेक्नॉलॉजी हेरिटेज.’ त्यात शून्याचा शोध कसा लागला? पायथागोरस सिद्धान्त, वर्तुळाचं क्षेत्रफळ कसे? पूर्वीच्या मूळ गणिताविषयी, तसेच अन्य मानवी संबंधाविषयी या ठिकाणी माहिती आहे. संगणकाचा शोध कसा लागला. टायपराईटरचा शोध,  ‘प्रिहिस्टॉरिक अॅनिमल लाइफ’ यात प्रागेएतिहासिक काळातील डायनोसर व बुली मॅमथ (हत्ती) पाहून मोठे आश्चर्य वाटते. या दालनात या प्राण्यांचे आवाज येत असतात.
वेळ कमी असल्याने भराभरा पाहता येतील तेवढी विज्ञानावर आधारित प्रयोग पाहत गेलो.

  •  येथे जाण्यासाठी महालक्ष्मी स्टेशनवर 10 मिनिटात टॅक्सीने जाता येते. टॅक्सीभाडे 15 रुपये पडते.
  •  येथून जवळच महालक्ष्मीचे मंदिरही आहे.
  •  नेहरू सायन्स सेंटर हे वर्षातील सर्व दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेर्पयत उघडे असते. फक्त होळीच्या दुस:या दिवशी आणि दिवाळीत काही दिवस बंद असते.
  • तिकीट दर : 25 रुपये प्रत्येकी
  • http://www.nehrusciencecentre.org








 


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...