मोरेश्वर मंदिर, सिंदखेड, अकोला
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील सिंदखेड येथील पुरातन मोरेश्वर शिव मंदिर. हे मंदिर बाराव्या शतकातील असून बांधकाम काळ्या पाषाणातील आहे. नंतरच्या काळात नवीन बांधकाम केल्यामुळे मंदिराराचे पुरातन स्वरूप ओळखून येत नाही. महाशिवरात्रीनिमित्त आणि श्रावण महिन्यात येथे भाविकांची गर्दी जमते.
सुमारे दीडशे वर्ष जुने श्रीस्वामीसमर्थ मठ अठराव्या शतकाची आठवण करून देणारे उत्कृष्ट नक्षीदार बांधकाम आणि मठातील राजा रवी वर्माचे जुने आणि दुर्मिळ देवीदेवतांची चित्र बघण्यासारखे आहेत. महाराजांचे भक्त श्री जमादार यांनी अठराव्या शतकात मठाची स्थापना केली होती. महाराजांची अत्यन्त सुरेख मूर्ती गाभाऱ्यात आहे. वाड्याचे बांधकाम अजूनही शाबूत आणि व्यवस्थित मेंटेन आहे. जमादार कुटुंबीय आणि विश्वस्थ अतिशय भक्तिभावाने मठाची उत्तम व्यवस्था ठेवतात. गर्दीपासून दूर शांत अध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी नक्की भेट द्या.
@ आदित्य दामले
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे
शारंगधर बालाजी, मेहकर, बुलढाणा
तिरुपतीमधील श्री बालाजीच्या मूर्तीपेक्षाही सुंदर अन् विलोभनीय अशी जगातील सर्वात उंच शारंगधर बालाजीची मूर्ती विदर्भातील मेहकर गावात विराजमान आहे. ११.२ फूट उंच फूट रुंद अन् अडीच फूट जाडी असलेल्या मूर्तीचे सौंदर्य तिच्या भव्यतेमुळे अधिकच खुलून दिसते. या मूर्तीचा इतिहासही रंजक आहे. पुरातन काळातील ही मूर्ती अठराव्या शतकात गावकऱ्यांना खोदकाम सुरू असताना सापडली. इंग्रज अधिका-यांनी मूर्तीसह शिलालेख अन् दागिने ताब्यात घेतले. ही मूर्ती लंडनच्या संग्रहालयात हलवली जाणार होती, पण गावकऱ्यांनी प्राणांची बाजी लावत तिची रातोरात प्राणप्रतिष्ठा करून टाकली. संतापलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी शिलालेख दागिने लंडनला नेले, पण मूर्ती मात्र ते नेऊ शकले नाहीत. तेव्हा इंग्रजांनी मेहकरच्या ६० गावकऱ्यांना महिने तुरुंगात डांबले होते. यात जानकीराम अप्पा पाठक, रामभाऊ भिते पाटील, अॅड. मा. ल. देशमुख, निंभा गोंधळी, रामा कुणबी, विठ्ठल माळी आदींचा समावेश होता.
औरंगाबादपासून १२५ किमी अंतरावर विदर्भात मेहकर हे गाव आहे. नागपूर-मुंबई महामार्गावर हे गाव असूनही जगाला या अद्भुत मूर्तीसह मंदिराची माहितीच नाही. पैनगंगा नदीकाठी जुन्या लाकडी, परंतु अत्यंत रेखीव वाड्यात हे मंदिर आहे. मोठ्या काळ्या पाषाणावर ही मूर्ती कोरलेली असून तिच्याभोवती प्रभावळ आहे. त्यावर विष्णूंचे १० अवतार चितारले आहेत. मूर्ती मध्ययुगीन आहे.
मूर्तीचा शोध लागण्यापूर्वी हे गाव नृसिंहाचे स्थान म्हणून ओळखले जात होते. येथे लक्ष्मीनृसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. ही मूर्तीदेखील एका भुयारात होती. १५ व्या शतकात ती गावकऱ्यांनी गावात आणली. त्यानंतर ३१९ वर्षांनी गावात शारंगधर बालाजीची मूर्ती सापडली.
इ.स. १८८८ मध्ये पोलिस पाटील रामभाऊ भिते यांच्या गढीत खोदकाम करताना २० फूट लांब फूट रुंद लोखंडी पेटीत ही मूर्ती होती. मूर्तीवर चंदनाचा भुसा होता. सोबत दोन ताम्रपट होते. त्यावर मूर्तीचा इतिहास लिहिलेला होता. तो दिवस होता नागदीपावलीचा. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, गोरज मुहूर्तावर डिसेंबर १८८८ ला मूर्ती सापडल्याने तोच दिवस गेल्या सव्वाशे वर्षांपासून प्रकटदिन म्हणून साजरा केला जातो.
जालन्यापासून वाशीम कडे जाणाऱ्या रस्त्यावर मेहकर आहे। ... आता समृद्धी महामार्ग पण मेहकर जवळुन जाणार आहे। मुकुटाच्या मध्यभागी धनुर्धारी श्रीराम मूर्ती आहे.. शारंगधर म्हणून नाव आहे। ही विशेष माहिती दिलेय श्री Uday Akolkar यांनी।
श्रीकृष्ण मंदिर, देवरी, अकोला
विदर्भातील अकोला जिल्ह्यातील देवाची देवरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरी येथील श्रीकृष्ण मंदिरात अतिप्राचीन व दुर्मिळ श्रीकृष्ण मूर्ती आहे. काळ्या अखंड पाषाणात नक्षीदार कलाकुसरीने कोरलेली ही आहे. खोड्या करणारा नटखट गोपाल कृष्ण दोन्ही हातात बासरी वाजवत आहे. बासरीला रत्नाकार लांब झालर आहे.
मुर्तीच्या डाव्या हाताची करंगळी तुटलेली आहे. गावातील जुन्या लोकांकडून अशी आख्यायिका सांगितली जाते की परकीय जुलमी सत्ताधारीयांच्या तोडफोडी पासून बचाव होण्यासाठी ही मूर्ती ग्रामस्थांनी येथे जमिनीत गाडली होती. काही काळानंतर येथे बैलगाडीचे चाक फसले असता चाकाला दगडाची उट लागल्याचे समजले दगडाला खोदून काढण्याच्या हेतूने खोदकाम करत असताना देवाची करंगळी तुटल्याचे सांगितले जाते.
कृष्णाची कोरीव मूर्ती असल्याचे दिसून आल्यावर मूर्तीची विधिवत स्थापना केली गेली. या घटनेचा निश्चित असा कालावधी सांगता येणार नसला तरी मूर्ती ही हजार वर्ष जुन्या शैलीतील असल्याचे सांगण्यात आले तर जिर्णोद्धार करतांना मंदिर किमान शिवकालीन असल्याचे लक्षात आले. सप्टेंबर 2023 ला गावकऱ्यांनी लोक वर्गणीतून नवीन मंदिर निर्माण केलेले आहे.
(फोटो आणि माहिती - महेंद्र पाटील)
शेषशायी विष्णू मुर्ती
हातात शंख, चक्र, गदा. पायाशी लक्ष्मी सेवा करतांना. सात फण्यांचा नाग आणि त्यावर विष्णु आपल्या उजव्या कुशीवर हे विष्णूचे लोकप्रिय रूप असून त्याला पाण्यात असल्याने जलाशायी, शेषनागावर असल्याने शेषशायी, तर नाभिमध्ये कमळ असल्याने पद्मनाभ अशी नावे आहेत. काही ठिकाणी विष्णु नागावर बसलेल्या अवस्थेत देखील असतो.
अमरावती जिल्ह्यातील मुख्य शहरापासून अवघ्या 14 किमी वर असलेला खोरगडे यांचा सावरखेड वाडा !!
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचा स्क्रॅप पासून बनवलेला भव्य दिव्य पुतळा, चरखा सभागृह, सेवाग्राम, वर्धा
राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी वर्धा
विदर्भातील पहिले फुलपाखरू उद्यान - बटरफ्लाय गार्डन आगरझरी, चंद्रपूर
ताडोबा-अंधारी व्याघ‘ प्रकल्पाच्या रस्त्यावर आगरझरी येथील निसर्गरम्य वातावरणात वनविभागाने तयार केलेले विदर्भातील पहिले फुलपाखरू उद्यान पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे.
चंद्रपूर जिल्हा ताडोबातील वाघांसाठी जगप्रसिद्ध आहे. पण येथे येणारा पर्यटक हा केवळ वाघ बघायलाच येऊ नये. तर त्याने ही वैदर्भीय निसर्गसृष्टीही अनुभवावी. या जंगलातील प्रत्येक जीवांचे कौतुक करावे, वनवैभव आपल्या डोळ्यात साठवून जावे, हे होत असताना त्यांनी येथील काही नाविण्यपूर्ण वस्तूंची आठवणही आपल्यासोबत न्यावी, यासाठी ताडोबाच्या बफरझोनमध्ये असलेल्या आगरझरी गावालगत वनविभागाने भव्य बटरफ्लॉय गार्डन तयार केले आहे.
चंद्रपूर शहरापासून अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे उद्यान सुरू असते. मोठ्यांसाठी 20 रुपये, तर लहान मुलांसाठी 10 रुपये शुल्क घेऊन या उद्योनात सोडले जाते. तत्पूर्वी, पर्यटकांना फुलपाखरांबद्दलची अत्यंत दुर्मिळ आणि महत्वाची माहिती अद्ययावत चित्रांद्वारे दिली जाते, त्यासाठी एक विशेष दालन तयार करण्यात आले आहे.यासोबतच बच्चे कंपनीसाठी खेळणी, सेल्फी पॉईंट, झुलता पुल हेही या उद्यानाचे आकर्षण आहे.
प्रत्येक फुलपाखराला राहायला, अंडी द्यायला आणि खाण्यासाठी विशिष्ट प्रकारचे झाड आणि फुल लागतात, त्यासाठी येथे खासप्रकारची झाडे लावण्यात आली आहे. येथे फुलपाखराच्या अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरू या चारही अवस्था पाहायला मिळतात.
‘गवळी बॅरॉन’ फुलपाखराची नोंद आतापर्यंत ताडोबात झाली नव्हती. ते फुलपाखरूसुद्धा या उद्यानात आढळले असून, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्लू मॉरमॉन’ हेसुद्धा येथे दिसते. ‘ब्लू मॉरमॉन’ हे फुलपाखरू भारतातील आकाराने सर्वात मोठ्या असलेल्या ‘सदर्न बर्डविंग’ या फुलपाखरानंतरचे सर्वात मोठे फुलपाखरू आहे. झाडांना औषध देणे, कटाई करणे इत्यादीसाठी दर मंगळवारी हे उद्यान बंद ठेवण्यात येते.
गाडगेबाबांनी स्वच्छतेची सुरवात केली, पण आपण त्यांच्या नावे स्वच्छता दिवस साजरा करत नाही. खूप विचार करण्यासारखी गोष्ट की महाराष्ट्रातील जनतेला आणि राज्यकर्त्याना गाडगेबाबांचा विसर पडला अस वाटतं. स्वछता दिवस साजरा करतांना गाडगेबाबांच नाव कुठेच घेतल जात नाही ही शोकांतिका आहे.
स्वच्छतेचे खरे जनक गाडगेबाबा आहेत ज्यांनी झाडू घेऊन परिसरातील घाण आणि कीर्तनाद्वारे लोकांच्या मनातील घाण दूर केली.
महात्मा गांधी आश्रम (बापू कुटी), सेवाग्राम, वर्धा
सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांचा सेवाग्राम आश्रम आहे. आहे. ३०० एकर जमिनीवर हा आश्रम वसलेला आहे. सेवाग्राममध्ये अनेक प्रकारच्या झोपड्या आहेत. त्यात स्वत: गांधी व त्यांचे सहकारी वास्तव्य करीत होते. त्यात गांधींची त्या काळातील जीवनशैली दिसून येते. तेथे असणारी बापू कुटी आणि बा कुटी प्रसिद्ध आहेत. सेवाग्राम येथे देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक भेट द्यायला येतात. सेवाग्रामचे पहिले नाव सेगाव होते, पण महात्मा गांधींनी ते बदलून सेवाग्राम असे केले.
१९३० मध्ये 'मिठाचा सत्याग्रह' करण्यासाठी साबरमती आश्रमातून आपल्या साथीदारासोबत गांधींनी 'दांडी यात्रा' काढली होती. स्वातंत्र्य मिळविल्याशिवाय आश्रमात परतणार नाही, असा त्यांचा संकल्प होता. ब्रिटिश सरकारने मिठावर लादलेल्या कराविरुद्ध गांधीनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर दांडी येथे मीठ तयार केले. या सत्याग्रहानंतर त्यांना अटक करून पुण्याच्या येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आले.
१९३३ मध्ये तरूंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजीनी देशव्यापी हरिजन यात्रा काढली. तोपर्यंत स्वातंत्र्य न मिळाल्याने गांधीजी साबरमती आश्रमामध्ये परतले नाहीत. १९३४ मध्ये जमनालाल बजाज तसेच त्यांच्या साथीदारांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथे गांधींनी वास्तव्य केले. त्यांनतर दोन वर्षांनी १९३६ मध्ये गांधीजी पहिल्यांदा मगनवाडीहून सेगाव (सेवाग्राम) येथे आले व तेथेच त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला. गांधीजी आणि कस्तुरबा यांचासाठी आश्रमामध्ये छोटे घर बांधले. व जातिभेद मोडण्यासाठी हरिजन समाजातील महिलांना स्वयंपाकासाठी ठेवले. गांधीजीनी सेवाग्राममध्ये असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
येथून जवळ पवनारला विनोबा भावे यांचा आश्रम आहे.
भारद्वाज शिव मंदिर, भर जहागीर, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भर जहांगीर येथे असलेल्या पुरातन शिव मंदिराला भारद्वाज महाराज संस्थान या नावाने ओळखले जाते. मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात आहे पण रंग रंगोटी आणि जिर्णोध्दारा मुळे मंदिराचे पुरातन स्वरूप झाकले गेले आहे.
(Photo - Dnyaneshwar Garkal)
मेहकर शहराच्या उत्तरेला पुरातन 'कंचनीचा महाल' हि वास्तू कोणी बांधली, याचा उल्लेख लिखित स्वरूपात आढळत नाही; मात्र कंचनी महालाबद्दलच्या अनेक आख्यायिका परिसरात चर्चिल्या जातात.
कंचनी नावाची एक गणिका, नृत्यांगना होती. तिचा नाच बघायला तत्कालीन श्रमंत लोक येत असत; पण हि कंचनी खूप गर्विष्ट होती. तिने अशी शपथ घेतली होती कि, "मी इतका उंच महाल बांधीन कि, तेथून मी लोणार सरोवरातील कमळजा देवीच्या देवळातला दिवा पाहीन." तिने महालाचे सहा मजले बांधले व सहाव्या मजल्यावरून लोणारच्या कमळजा देवीच्या मंदिरातला दिवा पहिला आणि त्याक्षणी कंचनी दगडाच्या शिळेत परीवर्तित झाली आणि हि शिळा खाली कोसळली.
काही वर्षांपर्यंत हि शिळा कांचनीच्या महालाजवळ पडून होती. सध्या महालाचे अडीच मजल्याचे अवशेष शिल्लक आहेत. कांचनीचा महाल संरक्षित वस्तू व्हावे, अशी मागणी इतिहासप्रेमींची असूनही पुरातत्त्व विभागाकडून दाखल घेण्यात आलेली नाही. शासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे. कंचनी महालाच्या परिसरातील जमिनी खासगी व्यक्तींनी विकत घेऊन त्यांचा निवासासाठी वापर सुरु केला आहे. याचा उपद्रव या पुरातन वस्तूला होऊ शकतो काही घटक हा महाल पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. पण मेहकरचे वैभव, शान असलेली हि वास्तू टिकावी, परिसर सुशोभित व्हावा, संरक्षक भिंत या वास्तू भोवती शासनाने बांधावी अशी नागरिकांची मागणी आहे. मराठीचे प्रसिद्ध कवी मेहकरचे ना. घं. देशपांडे यांनी कंचनीचा महाल ये दीर्घकाव्य लिहिले व याच शीर्षकाचा कविता संग्रह प्रसिद्ध असून, तो खूप गाजला आहे.
चिखलदरा
#अकोला जिल्ह्यातील #मोर्णा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या खानापूर,(ता.पातूर) येथे परिसरातील शिवभक्तांचे जागृत श्रध्दास्थान...ग्रामदैवत श्री.वटेश्वराचे पुरातन मंदिर आहे.मंदिर परिसरात दगडी दीपमाळ असून मंदिरात प्रवेश करतेवेळी "नंदीची जोडी" दिसून येते.मंदिराचे गर्भगृहात वटेश्वराची काळ्या पाषाणाची पिंड आहे. मंदिराचे परिसराला चारही बाजूने विटांची संरक्षक भिंत उभारलेली आहे.मंदिराच्या प्रवेशद्वारावर वडाचे भले मोठे झाडं आहे.महाशिवरात्रीला या ठिकाणी याञा भरण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे.
:माहिती व छायाचित्र :
मेहकर शहराचे जुने नाव मेघंकर कालांतराने पुढे हे नाव मेहकर झाले, शके १८८८ ला खोदकामात सापडलेली रेखीव मूर्ती शहराची ग्रामदेवतां झाली. श्री.शारंगधर बालाजी नावाने ओळखली जाणारी हि मूर्ती बघितल्यानंतर डोळ्याचे पारणे फिटतात, ती अप्रतिम काळ्या पाषाणातील रेखीव कलाकृती पाहून आपोआपच मनुष्य नतमस्तक होतो त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातील काही भाविक दरवर्षी या ठिकाणी भेट देत असतात.
मुर्तीचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. ११ फूट उंच असणारी हि मूती एक अखंड काळ्या पाषाणावर रेखाटलेली आहे मूर्ती इतकी रेखीव आहे की प्रत्येक पैलू हा ठळक दिसतो. ज्याने कोणी हे रेखीव काम केले असेल त्याचा अद्याप शोध लागला नाही. मूर्ती प्रतिष्ठापनेस आज ३ सप्टेंबर २०१९ रोजी १३१ वर्षे झाली तरी मूतीचे तेज कायम आहे आणि दर्शनाला गेल्यावर शारंगधर भगवान आपल्याकडे बघून स्मितहास्य करत असल्याचा भास होतो.
इतकी पुरातन आणि वैशिष्ट्यपूर्ण ही मूर्ती असूनही या ठिकाणाला हवी तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाही, त्याला कारण सुद्धा या मंदिराची कमिटी आहे, याचे एक उदाहरण म्हणजे मागील काही वर्षात या मंदिराकडे थेट तिरुपती येथील बालाजी ट्रस्ट कडून प्रस्ताव आला पण येथील मंडळींनी तो स्वीकारला नाही.
मंदिराचे सर्व हक्क हे तिरुपती ट्रस्ट कडे जाणार असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असावे, पण हे एक कारण बाजूला ठेवले तर हे संस्थान जर तिरुपती बालाजी संस्थानाकडे गेले असते तर या मंदिराचाच नव्हे तर संपूर्ण गावाचा कायापालट होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती आणि प्रसिद्धीही लाभली असती,
ही ऍप डाउनलोड करून या मंदिराची माहिती व गावातील अजून पुरातन वास्तूंची माहिती मिळवा.https://play.google.com/store/apps/details?id=com.mehkar
ताडोबा प्रकल्प
#१९_डिसेम्बर_१६७०
आज आमच्या वऱ्हाडवासियांना मोठा ऐतिहासिक दिवस आहे, आजच्याच दिवशी १६७० ला आमच्या वऱ्हाडभूमी कारंज्यात दस्तुरखुद्द #हिंदुपदपातशहा_राजा_शिवछत्रपती२० हजार सैन्यासह दाखल झाले होते!!!!
त्याच झालं अस कि नोव्हेंबर १६७० ला महाराज दख्खनद्वार बऱ्हाणपूर ला आले! पण तिथे खासा जसवंतसिंह हा कडवा व चिवट राजपूत बऱ्हाणपूर च्या सुरक्षेसाठी सज्ज होता..!! तरी सुद्धा महाराजानी येथील बहादूरपुरा थोडक्यात झटकलाच!!!
आता सह्यांद्रीचा वाघ बाहेर निघाल्यावर मोठी शिकार केल्या शिवाय माघारी तर जाणारच नाही ना!!! मग काय..!!!
महाराज वळले आपल्या गंजात लक्ष्मी खेळणाऱ्या वऱ्हाडात...!!! आणि खणती लागली ती वैभवसंपन्न श्रीमंत अश्या #कारंजा_नगरीला!!!!
तसे आम्ही वऱ्हाडी लोकं कालही संपन्न इरसाल नमुने होतो..!!!
आजही आहोत, अन उद्याही राहणार.! याचंच उदाहरण म्हणजे कारंजा, येथील एका नादखुळ्या व्यापार्याने घराच्या बांधकामासाठी चक्क मौल्यवान कस्तुरी
आता विचार करा जिथं कस्तुरी मातीमोल होती, तिथे सोने-चांदी, माणिकमोती, पाचू यांची काय वाण असणार..?? त्यातही येथील कापड तर तेव्हा विदेशात हि प्रसिद्ध होत!!! आणि म्हणूनच महाराजांनी धो-धो धुतले कारंजा!! ऐवढे कि सर्व लूट न्यायला सुमारे ४ हजार बैल-गाढव लागले, महाराज ३ दिवस मुक्कामी होते, पण या मोहिमेचे विशेष म्हणजे कुठेही शस्त्र वापरायचं काम पडलं नाही, जाळपोळ हि झाली नाही...!!!!
आणि म्हणूनच कदाचित
ततःकारंजनगर श्रीकृष्णेनं यथा पुरा|
भागदत्त पुरं तद्वत लुष्ठयित्वा समागतम ||३१||
(अर्थ:-श्रीकृष्णाने भागलपुर लुटले तसे शिवाजीमहाराजानी कारंजा शहर लुटून आले)
असे वर्णन तत्कालीन #पर्णालंपर्वतग्रहानाख्यांन या ग्रंथात #कवि_जयराम_पिंड्ये यांनी केले असावे.!!!
रयतेच्या सेवेशी...!!!
सुभे वत्सगुल्म वर्हाड प्रांत!!!
भागाबाई चा वाडा, खेर्डा, अकोला
अकोला जिल्ह्य़ातील बार्शीटाकळी तालुक्यातील खेर्डा (भागाई) येथे हा ऐतिहासिक वाडा शेवटच्या घटका मोजत आहे. हा वाडा महल्ले घराण्याच्या भागाबाई यांचा आहे. भागाबाई यांच्या नावावरून गावाला खेर्डा भागाई म्हणून ओळखले जाते. वाड्याच्या आत देवीचे मंदिर आहे. सर्वांचे लक्ष वेधून घेणारे लाकडी नक्षीदार खांब आणि दरवाजे आहेत.
ढोरे पाटील हवेली, चतारी, अकोला
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चतारी येथे ही पुरातन हवेली आहे. ही हवेली ३०० वर्षे जुनी असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. ही हवेली हतेसिंग ढोरे यांनी बांधली होती. सध्या ही हवेली स्व पुंडलिक पाटील ढोरे आणि लहान भाऊ स्व. पंढरी पाटील ढोरे यांच्या मालकीची आहे.
हवेली पुर्ण विटांनी बांधलेली आहे. विटांमध्ये सुंदर कोरीव काम असलेले प्रवेशद्वार, खिडक्या आहेत. ही हवेली दोन मजली होती. यात सुंदर लाकडी कोरीवकाम केलेले खांब, दारे, झरोके होत्या पण आता काळाच्या ओघात नष्ट होत आहेत. हवेली ची खूप पडझड झालेली आहे. पण जेव्हा ही हवेली वापरात असेल तेव्हा हिचे बांधकाम पाहून मन थक्क होत असेल.
(Photo - Vaibhav Dhore)
अमरावती शहरापासून जवळच 20km अंतरावर असलेले पुरातन डोनज गणपती मंदिर आहे.
कारंजा बहिरम, अमरावती येथील पुरातन गणेश मुर्ती
भव्य गणेश मुर्ती, लालपेठ, चंद्रपूर
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज बघुया विदर्भातील चंद्रपूर येथील भव्य गणेश मुर्ती. चंद्रपूर येथील लालपेठ येथे १६ भव्य मुर्त्या असून या मूर्त्यांमध्ये गणेशाच्या दोन मूर्त्या आहेत. त्यातील एक मूर्ती ११ फूट उंच आणि ८ फूट रुंद अशी एकपाषाणीय विशाल मूर्ती आहे. डाव्या सोंडेची ही विशाल गणेश मूर्ती अतिशय सुबक आणि रेखीव असून कमालीची आकर्षक आहे. एका मोठ्या पाषाणाच्या पृष्ठभागावर या गणेश प्रतिमेचे सुंदर कलात्मक कोरीव काम झाले आहे. या तेजःपुंज देखण्या मूर्तीच्या पायाशी त्याच पाषाणात एक सुंदर मूषकसुद्धा कोरण्यात आला आहे. मोकळ्या मैदानात उंच जागेवर काहीशा तिरक्या स्वरूपात उभ्या केलेल्या या भव्य मूर्तीवर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी होणाऱ्या सूर्यकिरणांच्या मुक्ताभिषेकामूळे ही गणेश मूर्ती अधिकच विलोभनीय आणि नितांत सुंदर दिसू लागते.
(माहिती - अमित भगत)
चौमुखी गणेश, जवळगाव, यवतमाळ
भारतीय संस्कृतीत गणरायाचे सर्वोच्च स्थान आहे. आपणास एकमुखी गणेशाचे लोभस रूप ज्ञात आहे. परंतु नेर तालुक्यातील ऐतिहासिक दुर्लक्षित जवळगाव येथे प्राचीन व दुर्मिळ गणेशाची चतुर्मुखी पुरातन मूर्ती आढळली आहे. विदर्भात अशा तीनच प्रतिमा असल्याने याला प्राचीन काळात विशेष महत्त्व असावे. म्हणून याबाबत पुरातत्त्व विभागाकडून संशोधनाची गरज आहे.
नेर तालुक्यात प्राचीन गणेशाचे स्थान असूनही ते उजेडात आलेच नाही. तालुक्याला मोठा सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा आहे. काही गोष्टी काळाच्या ओघात लुप्त होत असून, त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. जवळगाव येथे आढळलेली प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण असून, ती यासाठी वेगळी आहे की, एकाच पाषाणात चार गणपती प्रतिमा अंकित केलेल्या आहेत. अशा प्रतिमेला प्रतिमाशास्त्रात 'सर्वतोभद्र' असे म्हणत असून, जवळगावची प्रतिमा याच प्रकाराची आहे. ती प्रतिमा उत्तमस्थितीत असून, पूर्वी उघड्यावर असलेली ही प्रतिमा ग्रामस्थांनी लहान मंदिरात स्थानापन्न केली आहे. काळ्या पाषाणात उत्कीर्ण केलेली ही प्रतिमा अंदाजे ७०० वर्षे प्राचीन आहे. चारही प्रतिमा चतुर्हस्त असून, अर्धपर्यकासनात बसलेली आहेत. हातात हस्तिदंत, परशु, अंकुश, मोदक धारण केलेले दाखविले आहे. या प्रतिमेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे चारही प्रतिमांच्या मस्तकावर सुंदर नक्षीकाम केलेला भव्य व सुंदर मुकुट आहे. या मुकुटामुळे दुरून बघितल्यास ही गणेशाची सर्वतोभद्र प्रतिमा छोट्या मंदिराची प्रतिकृती वाटते.
गणपतीच्या इतर अलंकारात अतिशय ठळक दिसणारा अलंकार म्हणजे 'सर्प उदरबंध'. हाताला केयूर व बाजूबंध आहेत, अशी ही सर्वतोभद्र प्रकारातली प्रतिमा आहे. अशा प्रतिमा जेथे चार वाटा मिळतात, अशा ठिकाणी स्थापन केल्या जात असाव्यात, असे तज्ज्ञ सांगतात. म्हणजे वाटसरूंना चार दिशा दाखविण्यासाठीही अशा प्रतिमांचा प्राचीन काळात शुद्ध व्यावहारिक उपयोग होत असावा. याला पूरक असा संदर्भ ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत आढळतो. ज्ञानेश्वरीत 'चतुष्पथीचे गणपती' म्हणून जो उल्लेख येतो, तो अशा प्रतिमांसंदर्भात असावा, असे सांगतात.
या मंदिराच्या बाजूला हेमाडपंथी शिवालय आहे. बाजूलाच पूर्वी श्री विष्णूचेही मंदिर होते. सोबतच गणपतीचेही मंदिर होते. परंतु, आता विष्णू व गणपतीच्या मंदिराचे केवळ अवशेष आहेत. परंतु, श्रीविष्णू व गणपतीच्या मूर्ती सुस्थितीत आहेत. गावाच्या पश्चिमेस आणखी एक हेमाडपंथी मंदिर असून, त्यात श्रीविष्णूची व गरुडाची मूर्ती स्थानांतरित केली आहे. दोन्ही हेमाडपंथी मंदिर गावचा ऐतिहासिक वारसा जपून आहे. गावात एक गढी असून, त्याचाही मोठा इतिहास आहे. गावात एक भवानी मातेचे अर्धपीठ असून, जेठसिंगच्या वंशजांनी ते तुळजापूरवरून आणल्याचे गावातील ज्येष्ठ नागरिक महादेव गुघाणे व ग्रामपंचायत सदस्य बाळू घोडे यांनी सांगितले. नेरमधील मानाच्या गणपती मठासोबतच आता या चौमुखी गणेशाची प्रतिमा मिळाल्याने याचाही विकास व्हावा, अशी अपेक्षा भाविक लोकप्रतिनिधींकडून व्यक्त करीत आहेत.
(Photo - Abhishek Shukla)
४० हजार वर्षांपूर्वींचा इतिहास समोर, ३२ भित्तीचित्रं, दगडी शस्त्रं, पुरातत्व विभागाला खजिना सापडला
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या खोऱ्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाद्वारे सुमारे ४० हजार वर्षांपूर्वींच्या प्रागैतिहासिक गुफा शोधण्यात आल्या आहे. बावनथडी नदीच्या काठावर सापडलेल्या या गुफांमध्ये प्रागैतिहासिक काळातील चित्र आणि दगडी शस्त्र सापडले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्व विभागातील प्रमुख डॉ. प्रभाष शाहू यांच्या मार्गदर्शनात पीएचडी करणाऱ्या विवेक राऊत, शांतनू इंगळे आणि प्रवीण मेश्राम यांच्या चमूने हे शोधकार्य केले आहे. भंडारा जिल्ह्याची सीमा उत्तरेकडे मध्य प्रदेशच्या बालाघाटला लागून आहे. बालाघाटच्या परिसरात यापूर्वी प्रागैतिहासिक गुफा सापडल्या आहेत. सध्या प्राप्त झालेल्या गुफा, वैनगंगा नदीची उपनदी असलेल्या बावनथडी नदीवर आंतरराज्य सिंचन योजनेच्या अंतर्गत राजीव सागर धरणाचे कार्य सुरू आहे.
धरणाच्या कालव्याशेजारी या गुफा नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाला सापडल्या आहेत. 'विदर्भातील प्रागैतिहासिक स्थळे आणि वस्तूंवर संशोधन करण्यासाठी हा शोध महत्त्वाचा आहे. प्रागैतिहासिक काळातील मानवी वस्ती, राहणीमान, कला याबाबत या भित्तीचित्रांवर संशोधन केल्यावर अधिक माहिती मिळू शकेल. विदर्भातील प्रागैतिहासिक इतिहास समजण्यासाठी या स्थळांचे तात्काळ संवर्धन आणि दस्तावेजीकरण करावे लागेल', असे पुरातत्व विभागप्रमुख डॉ. प्रभाष शाहू यांनी सांगितले.
मिळाले ३२ पिक्टोग्राफ
प्रागैतिहासिक गुफांमध्ये ३२ भित्तीचित्र सापडले आहे. यामध्ये मानवी चित्र ते पशुचित्र यांचा समावेश आहे. लालसर राखडी गडद आणि पांढरा रंग यांचा चित्रे काढण्यासाठी वापर करण्यात आला आहे. गुफेमधील काही चित्र इसवी पूर्व सुमारे ४० हजार वर्षांपूर्वीची (अप्पर पॅलोलिथिक) तर काही चित्रे इसवी पूर्व दहा हजार ( मेसोलिथिक) काळातील आहेत. पाषाणयुगीन काही दगडी हत्यारेही येथे सापडली आहेत.
२००४ मध्ये चिमूरमध्येही सापडल्या
प्रागैतिहासिक काळातील गुफांमध्ये भित्तीचित्र यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमध्ये सापडले होते. पारसगढ-नागभीडच्या पर्वत शृंखलांमध्ये २००४ साली हा शोध लागला. स्थानिक भागात यांना सीतामाई डोंगरी म्हणून ओळखले जाते. भंडारामधील सापडलेले भित्तीचित्र देखील याच काळातील असल्याची शक्यता आहे.
सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स
श्री वराह जयंती निमित्त :
रामटेक, नागपूर
वणी, यवतमाळ
भटाळा, चंद्रपूर
गवराळा, चंद्रपूर
शेंदुर्जन, बुलढाणा
विदर्भातील विष्णू अवतार वराह मुर्ती :
नागपूर आणि पूर्व विदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण 'मारबत' व 'बडग्या' मिरवणूक उत्सव
पोळ्याचा दुसरा दिवस लहानग्यांचा 'तान्हा पोळा' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी म्हणजेच श्रावण अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी नागपूर शहरात भव्य, नेत्रदीपक असा 'मारबत व बडग्या'चा उत्सव साजरा केला जातो. काठ्या, बांबू, तरट वापरून मारबत देवीचा व बडग्याचा मोठा पुतळा बनवला जातो. त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळून ते विविध रंगांनी रंगविले जातात. काळी व पिवळी मारबत हे नागपूर शहराचे विशेष आकर्षण आहे. दरवर्षी हा सोहळा पाहण्यासाठी केवळ शहरातीलच नव्हे, तर दूरवरच्या गावखेड्यातील हजारो लोक आपल्या लहानग्यांना घेऊन येथे येतात.
नागपूर शहरातील वैशिष्ट्यपूर्ण व जगविख्यात असा 'मारबत व बडग्याचा उत्सव' मूलतः विदर्भाच्या गावखेड्यातील तेली समाजातील एका जुन्या प्रथेचे विस्तारित व भव्य रूप आहे. या प्रथेत पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी, कडुलिंबाच्या किंवा जंगली तुळशीच्या लहान फांद्या आणल्या जातात. त्यांच्या लहानश्या कोवळ्या पानांना मारबतचे केस समजून घर झाडले जाते आणि संध्याकाळी मातीच्या भांड्यात घराघरातून माश्या, डास, कीटक गोळा करून त्यावर लसूण, मिरची, तांदळाची साळी, मोहाची फुले टाकून ते भांडे गावाच्या वेशीबाहेर नेऊन फोडले जाते. त्यामुळे वर्षभर हे कीटक आणि त्यापासून होणाऱ्या रोगराईपासून गावाची सुटका होईल अशी लोकांची धारणा असते. ही प्रथा विदर्भात पूर्वापार काळापासून चालू असून, पावसाळ्याच्या काळातील रोगराईपासून सुटका करून घेण्यासाठी प्रतिकात्मकरीत्या इथल्या गावोगावी पार पाडली जाते.
मूलतः सामाजिक व सांस्कृतिक स्वरूपात असलेली ही प्रथा १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात राजकीय रूप धारण करू लागली. नागपूरात असा समज आहे की - "बांकाबाई हीने ईंग्रजांशी हातमिळवणी केल्याचा निषेध म्हणून तिच्या नावाची मोठी 'मारबत' व तिच्या पतीच्या नावाचा 'बडग्या' उभारून त्यांची मिरवणूक काढतात व संध्याकाळी त्यांचे दहन करतात." इतवारी येथील बारदाना मार्केटमधून निघणाऱ्या काळ्या मारबतीच्या मिरवणूकीची सुरुवात १८८१ मध्ये, तर मस्कासाथ येथील त-हाणे तेली समाजाच्या पिवळ्या मारबतीची मिरवणूक १८८४ मध्ये सुरु झाल्याचे मानले जाते. 'मारबत' आणि 'बडग्या' यांना वाईट शक्तींचे प्रतीक मानून, सबंध शहरातून त्यांची धिंड काढून, शहराबाहेर त्यांचे दहन करतात. यामागे शहर रोगराई-प्रदूषण व समस्यामुक्त ठेवणे व शहरात स्वच्छता राखणे हा उद्देश असतो. "माश्या-कुशा घेऊन जाऽऽ रे बडग्या, ईडा पिडा रोगराई घेऊन जाऽऽ गे मारबत" अश्या मोठमोठ्या आरोळ्या ठोकून चालणारी ही मिरवणूक ही केवळ नागपूरातच नाही तर संपूर्ण विदर्भात जल्लोषाने साजरी केली जाते.
या मिरवणुकीला जवळपास १०० वर्षाची राजकीय परंपरा आहे. मारोतराव कन्नमवारांनी यशवंतराव चव्हाणांशी हातमिळवणी केल्यामुळे या उत्सवाच्या माध्यमातून त्यांच्याविरोधातील निषेध लोकांनी व्यक्त केला होता. मागील काही दशकात तर हा उत्सव राजकीय, सामाजिक व आर्थिक असंतोष व्यक्त करण्याचे विदर्भातील जनतेचे प्रभावी माध्यम ठरत आहे. त्यामुळेच स्वतंत्र विदर्भाची मागणी, वाढता भ्रष्टाचार, महागाईवाढ, महिलांवरील अत्याचार, बालमजदुरी, फसलेले परराष्ट्रधोरण यांविरुद्ध घोषणा देऊन, ह्या वाईट गोष्टी व समस्या 'घेऊन जाऽऽ गं मारबत' अशी विनवणी मारबतला केली जाते.
(लेखन व संपादन - अमित भगत)
तान्हा पोळा
भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. महाराष्ट्रात व त्यातल्या त्यात विदर्भात, पोळा हा एक शेतकऱ्यांचा मोठा सण आहे. त्या दिवशी बैलांना कामकाजापासून सुट्टी असते. त्या दिवशी बैलांना न्हाऊ-माखू घालतात. त्यांना गोड पुरणपोळीचे जेवण घालतात, त्यांना सजवतात व मिरवतात. त्या दिवशी त्यांची घरोघरी पूजा होते.
लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत. ते त्यांना आवरू पण शकत नाहीत. म्हणून त्यांच्या हौस-मजेसाठी तान्हा पोळा' साजरा करण्यात येतो. त्या दिवशी, लहान मुले लाकडापासून तयार केलेला बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच या लाकडाच्या बैलाचा तान्हा पोळा साजरा करतात. नागपूरकर भोसल्यांच्या शासनकाळात हा सण सुरू झाला. विदर्भात बहुधा सर्व ठिकाणी हा सण साजरा होतो.
तान्हा पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !
संगमेश्वर मंदिर, सावंगी, बाभुळगाव, यवतमाळ
(Photo - Harshal Bhamburkar)
राम कृष्ण मंदिर, माना, अकोला
मूर्तिजापूर तालुक्यातील माना या गावात श्री रामकृष्ण मंदिर असून या मध्ये प्रभू श्री रामचंद्र व श्री कृष्ण ची अप्रतिम कोरीव मूर्ती स्थपित असुन ह्या दोन्हीही मूर्ती अतिशय प्राचीन आहे.1932 मध्ये गावात खोदकाम करताना प्रभू श्री रामचंद्र ची मूर्ती सापडली तत्कालीन ब्रिटिश सरकारने ही मूर्ती नागपूर येथील संग्रहालय मध्ये नेण्याचा प्रयत्न केला परंतु गावकऱ्यांनी सत्याग्रह करून तो प्रयत्न हाणून पाडला कालांतराने 1952 गावांमध्ये खोदकाम सुरु असताना श्री कृष्णा ची देखणी मूर्ती सापडली.या दोन्हीही मूर्ती माना गावाचे मध्यभागी श्री रामकृष्ण मंदिर मध्ये स्थपित आहे.
माना हे गाव पौराणिक असुन सातवाहन पैकी बाब्रुवाहन ची राजधानी मणिपूर असल्याचा उल्लेख आहे, माना गाव उमा नदीच्या काठावर वसलेले असून गावात खोदकाम करताना अनेक पौराणिक अवशेष मिळतात.
(फोटो आणि माहिती - सुनिल शर्मा)
श्रीकृष्ण मंदिर, चिकणी (कान्होबा), यवतमाळ
येथील श्रीकृष्ण मंदिर अती प्राचीन काळापासून, मुघल साम्राज्याच्या आधीपासून येथील मंदिराची ख्याती आहे. येथील विशेषता म्हणजे मंदिरातील श्रीकृष्णाची मनमोहक मूर्ती. सुवर्ण कसोट दगडामध्ये कोरीव काम केलेली मूर्ती तुम्हाला गोकुळ, वृंदावन, मथुरा व काशी येथे पण पाहायला मिळणार नाही. मूर्तीच्या सभोवताल एकाच अखंड शिळेवर श्रीकृष्णाचे सर्व अवतार आणी संपूर्ण श्रीकृष्ण चरित्र नक्षीकाम करून रेखाटले आहे, जे थक्क करणारे आहे (झूम करून पाहिल्यास काही प्रमाणात नक्षीकाम दिसेल सुद्धा ). हजारो वर्षांपूर्वीची ही मूर्ती आजही जशीच्या तशी चमकदार आणी तेजोमय मन मोहून टाकणारी आहे.
गायी, गोपिका आणि बासरी वाजवताना कृष्ण !!
कपिलेश्वर मंदिर, सातेफळ, यवतमाळ
(Photo - Dr Vilas Wahane)
कृष्ण मुर्ती, खेडमक्ता, ब्रम्हपुरी, चंद्रपूर
या वर्षाच्या सुरवातीलाच चंद्रपूरमध्ये खोदकामावेळी आढळलेली श्रीकृष्णाची मूर्ती. घराच्या बांधकामासाठी खड्डा खोदणं सुरू होतं. सात फूट खोल खड्डा खोदून झाला होता. अन् काळा दगड लागला. तो दगड बाहेर काढल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तो केवळ दगड नसून श्रीकृष्णाचे सुरेख शिल्प होतं. ब्रह्मपुरी तालुक्यात येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर यांना ही मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती बाराव्या शतकातील असून चालुक्य काळातील असल्याचं इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांनी सांगितलं. श्रीकृष्णाचे शिल्प सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
एक आगळं वेगळं शिव मंदिर, पुर्णानगर, अमरावती
(Photo - Dr. Vipin Tongale)
तपोनेश्वर मंदिर समूह, तपोना, यवतमाळ
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात, यवतमाळ दारव्हा रोडवर बोरी अरब (बोरी चंद्रशेखर) या गावाजवळून अवघ्या 2 km अंतरावर हे एक सुंदर प्राचीन मंदिर समूह काळाच्या व प्रशासनाच्या माऱ्यात आजही टिकून आहे.
हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील हे मंदिर समूह यादवकालीन आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा समूह व चंद्रपूर जिल्ह्यातील सोंडो समूहा प्रमाणे येथे मंदिर समूह आहेत. येथे एकच मंदिर नसून छोटे मोठे 7 मंदिरे आहेत त्यातील 4 प्राचीन आहेत, माझ्या लहानपणी मी इथे नेहमी भेट द्यायचो, पूर्वीच्या काळी इथे नक्कीच यापेक्षा जास्त मंदिरे असतील, काळाच्या ओघात ती नामशेष झाली, त्याचे अवशेष व खानाखुणा परिसरात पसरलेल्या आढळतात. तपोवन म्हणजे जंगलात तपश्चर्या करण्यासाठी निर्माण केलेला भाग, त्यासाठी इथे पाण्याने सदैव भरून असलेले एक सुंदर जलकुंड (अनसूया कुंड) आहे ज्यात अंघोळ करून मंदिर समूहात तपश्चर्या करायची. (खोली साधारणतः 30 ते 35 फूट) बाजूला एक मोठी विहीर आहे, मुख्य मंदिर बरेचशे शिल्लक आहे, त्यातील पिंड ही बरेचदा पाण्याखाली असते, काळ्या दगडांच्या चिऱ्यांचे व प्रस्तर खडकांचे मंदिराचे बांधकाम आहे. स्तंभ, पाद, स्तंभशीर्ष व प्रत्यक्ष स्तंभ अशी रचना आहे. या स्तंभावर छत तोललेले आहे शिखर द्विजंघायुक्त आहे. दोन वैशिष्टपूर्ण चतुर्भुज असलेल्या मुर्त्या चांगल्या स्थितीत आहेत. मुर्त्या शिवस्वरूप भैरव क्षेत्रपाल च्या आहेत, दोन्ही चांगल्या स्थितीत आहेत. (अंदाजे 900 च्या आसपास च्या राष्ट्रकूट कालीन असाव्यात) या एकाच मंदिरावर आता कळस शिल्लक आहे बाकीचे ढासळले, सर्वच मंदिरात शिवलिंग आहे, आधुनिक मंदिरात हनुमान, दत्त अश्या प्रतिमा आहेत. दोन प्रचिन नंदी, एक वीरगळ, स्तंभावर असणारे स्त्री शिल्प, नृत्यांगना, स्त्री प्रतिमा, एक वैशिष्टपूर्ण पिंड, एक चतुर्भुज शिव अशी शिल्पे आहेत, या सर्वांचे योग्य जतन होणे गरजेचे आहे. स्थानिकांनी पुढाकार घेऊन संपूर्ण परिसराला कंपाऊंडसह काही कामे केली आहेत, मात्र कुंड पूर्वीपेक्षा जास्त कोसळले आहे त्याची दुरुस्ती व एका मंदिरावरील कळस तसेच छोट्या मंदिराची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे.
- हरीश ससनकर
इतिहास अभ्यासक (चंद्रपूर)
त्यानिमित्ताने विदर्भातील काही शिव मंदिरांचे दर्शन
डोंगर, नदी, देवस्थान, धबधबा असलेलं एक सुंदर निसर्ग रम्य ठिकाण.
(Photo
:- @mohiiiiiit___ )
वऱ्हाडातील पवित्र मानल्या जाणाऱ्या रोठ सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
श्रावण म्हटलं कि सणांचा महिना. त्यापैकी आज असलेले "रोठ"!
या सणाची विशेषता ही कि हा सण दरवर्षी फक्त रविवारी च येतो.
असो शेवटी ते लहानपण!
आज तेच रोठ आहेत.
आजच्या दिवशी सकाळी स्त्रिया एकदम लवकर म्हणजे चार-पाच वाजता उठून लवकर स्वयंपाकाची तयारी करतात...
आणि स्वयंपाकही विशेष असतो.
पुरण पोळी खीर वगैरे अशी पक्वान्न बनवली जातात...
आता मिक्सर आलेत पण आधीच्या स्त्रिया सकाळीच पाट्यावर पुरण वाटायच्या आणि खळ्ळम खुळ्ळम आवाजाने पाच पाच वाजताच जाग यायची..
आणि तो स्वयंपाक हा सूर्योदय होण्याआधी पुर्ण झाला पाहीजे...
श्रावण पंचमी नंतरचा पहिला रविवार म्हणजेच "रोठ" सण साजरा करण्याची परंपरा असते. नागपंचमी नंतरचा रविवार म्हणजे सूर्यनारायणाचा.. रवि म्हणजे सूर्य.. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. घरातील गृहिणी सुर्य नारायणाच्या अगोदर उठून "पुरणाचे रोठ" तयार करुन पुरणपोळीचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो. पुरणाच्या पोळीवर दोन पुरणाचे दिवे लाऊन पुजा केली जाते. तांब्याचा कळस मांडला जातो पण त्यात नारळ नसते. आजच्या दिवशी फक्त गोड पदार्थ खाल्ले जातात. पुरणाचा रोठ सुर्य मावळायच्या आत संपवला जातो. विदर्भात "रोठ" पूजनाची परंपरा पूर्वजांपासून आता पर्यंत चालू आहे.. खांदेशातही हा सण साजरा केला जातो तिथे हा सण कानुबाई म्हणून साजरा करतात..
ती पुजा होताच सर्वांना जेवणं आटपायचे असतात. रोठ करे गोठ आणि पोट भरे सट.. असा वऱ्हाडी डायलॉग यासाठीच प्रसिद्ध असावा..
आणि विशेष म्हणजे आपण ज्या पुरणपोळ्या बनवतो त्या किती धान्याच्या बनवायच्या ते माप सुद्धा ठरलेले असते...
आपल्या सणांची थोडीफार माहीती आपल्याला असावी फक्त यासाठी लिहीलेला हा लेख... आपली संस्कृती.. आपली परंपरा.. आपणच जपली पाहिजे..
धन्यवाद
आपला नम्र विजय
आज श्रावण पंचमी नंतरचा पहिला रविवार म्हणजेच "रोठ" सण साजरा करण्याची परंपरा असते. नागपंचमी नंतरचा रविवार म्हणजे सूर्यनारायणाचा.. रवि म्हणजे सूर्य.. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. घरातील गृहिणी सुर्य नारायणाच्या अगोदर उठून "पुरणाचे रोठ" तयार करुन पुरणपोळीचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो. आजच्या दिवशी फक्त गोड पदार्थ खाल्ले जातात. पुरणाचा रोठ सुर्य मावळायच्या आत संपवला जातो. "रोठ" पूजनाची परंपरा पूर्वजांपासून आता पर्यंत चालू आहे आणि पुढेही चालू राहील....
एकाच नावाची 1-2 गावे बघितली असतीलच पण 10 पेक्षा अधिक गावे म्हणजे आश्चर्यच...!
Correction - 7) पवनी, गडचिरोली 442606
भवानी माता मंदिर, कोल्ही, हिंगणघाट, वर्धा
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात कोल्ही गावातील एका शेतात पुरातन मंदिराचे अवशेष आणि मुर्त्या आहेत. येथे आधी पुरातन मंदिर असावे जे कालौघात नष्ट झाले असावे. स्थानिक या ठिकाणाला भवानी मातेचे मंदिर म्हणून ओळखतात.
(Photo - Sanket Bhoyar)
देउळघाट किल्ला, ता. आणि जि. बुलढाणा
देऊळघाट येथील किल्ला व किल्ल्याची भिंत आहे. हा किल्ला नवाबांचा होता त्यांचे वंशज आजही आहेत. तसेच किल्ल्याच्या बाजूने जाधव देशमुखांची गढी होती. तीचे अवशेष उरले आहेत. जाधव देशमुखांची घरे व वाडे बघायला मिळतील.
(Photo - Tushar Patil)
पुरातन हेमाडपंती मंदिर, येवती, राळेगाव, यवतमाळ
( Photo -
@VillageBeauty21 ) प्रतिक गावंडे
महेश्वर मंदिर, पिंपरी कलगा, यवतमाळ
सदर मंदिर यादव काळातील असल्याचे निदर्शनास येते. या मंदिरात लक्ष्मी- विष्णूच्या चार मूर्ती आहेत. तसेच मंदिराच्या आवारात काही मूर्ती आहेत. मूर्तीकलेचा अदभुत नमुना या ठिकाणी बघावयास मिळतो. महेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला आणखी एक शिव मंदिर आहे. मंदिरालगतच तीन छोटी मंदिरे जवळ जवळ आहेत. खांबावर कीर्तीमुख कोरले आहे. आजूबाजूला खोदकाम करीत असताना सापडलेल्या मूर्ती येथे ठेवण्यात आलेल्या आहेत.
(माहीती आणि फोटो - विवेक चांदुरकर)
देशमुख गढी, तामसी, बार्शीटाकळी, अकोला
श्रावण शु. पंचमी अर्थात नागपंचमी. हिंदू धर्मातील प्रमुख सण. संपूर्ण भारतात निरनिरळया प्रकारे हा सण साजरा केला जातो.
नागपूर भारतातील प्रमुख शहर. सुमारे तीनशे वर्षापूर्वी नागपूर शहराची स्थापना झाली. नागपूर चे पूर्वीचे नाव फनिंद्रपूर होते असे म्हणतात. याबाबत अनेक दुमत आहे. नाग नदी वरून शहराला नागपूर हे नाव पडले असे काही इतिहासकार मानतात, तर येथे नागफणी चे फार घनदाट जंगल होते त्यावरून शहराला नागपूर हे नाव पडले असावे असाही एक मतप्रवाह आहे.
भारतात कोठेही नाही एवढे नागाचे मंदिर नागपुरात आहे. जुन्या नागपुरात ( मध्य व उत्तर नागपूर) प्रत्येक गल्लीत आपल्याला नाग मंदिर व महादेव मंदिर पाहायला मिळतात. (पूर्वी या भागात जंगल व शेत जमीन असायची, त्यामुळे साप/नाग जास्त प्रमाणात निघायचे. लोकांकडून साप मारल्या जायचे आणि नंतर कोप होऊ नये म्हणून तिथे मंदिर बांधल्या जायचे.)
नाग/ साप हे नागपूर येथील तत्कालीन जीवनाचा एक भाग होता हे यांचा अनेक पाउलखुणा आजही आपल्याला दिसतात.
गोंड राजे यांचे नागपूरात जेव्हा आगमन झाले तेव्हा त्यांनी आपल्या राजमुद्रा वर नाग हे प्रतीक कोरले. गोंड राजे हे आदिवासी असल्यामुळे आणि निसर्गासोबत त्यांचा जवळचा संबंध असल्यामुळे त्या काळी नाग पुजा मोठ्या प्रमाणात होत असत. चिटणीस पार्क महाल नागपूर येथील श्री नागोबा मंदिर हे गोंड कालीन आहे असे म्हणतात. आता ह्या मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे.
भोसले यांच्या काळात महाल येथे श्री नागेश्वर महादेव मंदिर बांधण्यात आले. दुसरे रघुजी राजे भोसले यांच्या आईं श्रीमंत चिमाबाई साहेब भोसले यांनी सण १७९१ मध्ये हे मंदिर बांधले.
ज्युनिअर भोसले पॅलेस मॅस्कॉट मोटर्स मागे श्री लाडसावंगिकर यांचे श्री पंचमुखी नाग मंदिर आहे. चार फूट उंच अखंड पांढऱ्या दगडात कोरलेली ही नाग मूर्ती भोसले कालीन (सुमारे २५० वर्षे जुनी ) असुन नागपूर येथील सर्वात मोठी सुंदर मूर्ती आहे.
मॉडेल मिल चौक नागपूर येथे प्रसिध्द श्री नागोबा मंदिर आहे. हे मंदिर सुद्धा फार जुने आहे.
इंग्रज काळात सी पी अँड बेरार प्रांताची राजधानी नागपूर होती. त्या वेळी या प्रांताची राजमुद्रा वर नाग कोरले होते. नागपूर विद्यापीठ असो अथवा नागपूर महानगर पालिका असो, अनेक संस्थांनी आपल्या मुद्रा वर नागपूर चे प्रतीक नागाला उचित मानसन्मान दिला.
आजही आपल्या नागपूर आणि विदर्भात नागपंचमी मोठ्या भावभक्ती ने साजरी करण्यात येते. ग्रामीण भागात शेतकरी आजच्या दिवशी शेतात काम करीत नाही. घरोघरी नागाचे पारंपारिक चित्र भिंतीवर अथवा कागदावर रेखाटल्या जाते. नाग पूजेला नाग मंदिरात जाऊन भक्ती भावाने पुजा करण्यात येते. पूजेला नारळ, दही दूध, लाह्या, फुटाणे, वाटणे, याद्वारे पुजा करण्यात येते. या पूजेत महत्त्व असते ते ' कढई ' प्रसादाचे. कढई प्रसाद म्हणजे रव्याचा शिरा. हा प्रसाद मनोभावे अर्पण करण्यात येते.
घरोघरी परंपरेप्रमाणे अनेक प्रकारचे पक्वान्न केले जातात. सातूचे पीठ, तिळाची करंजी, वडे, साठोळी, पुरणाचे कानोल्हे, चकली इत्यादी अनेक पक्वान्न केले जातात. नाग देवतेला करंजी , वडे, साठोळी यांचा फुलोरा अर्पण केल्या जातो.
नागपंचमी च्या दिवशी तवा वापरावर बंदी असते. काही घराण्यात भात व तुरीचे डाळीचे वरण करण्यात येत नाही.
' नागद्वार ' यात्रा , याच नागपंचमी च्या काळात फार पूर्वी पासुन प्रसिद्ध आहे. याचा नेमका इतिहास माहीत नाही ,परंतु या यात्रेला नागपूर आणि विदर्भातील अनेक भाविक जातात. मध्य प्रदेशातील पचमढी येथून या यात्रेची सुरुवात होते. ही यात्रा फार कठीण आहे. या यात्रेनंतर परत आल्यानंतर भाविक आपल्या घरी कढई प्रसाद करतात. महाप्रसादाने या यात्रेची सांगता करतात.
नागपूरात नागपंचमी च्या दिवशी अनेक औद्योगिक वसाहती आणि दुकाने बंद ठेवली जात असत. आता काही भागात ही परंपरा पाळल्या जात नाही.
नागपंचमी च्या दिवशी मध्य आणि उत्तर नागपूरत निंबु आणि नारळ यांची शर्यत लावल्या जात होत्या. परंतु आता यावर बंदी आहे.
असा हा नागपंचमी सण. आजच्या नवीन युगात आजही परंपरा आणि धार्मिक प्रथा यांचा समतोल साधुन नागपुरात हा सण भक्ती भावाने साजरा करण्यात येते.
देशमुख गढी, दगड धानोरा, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात दगड धानोरा येथे असलेली ही गढी म्हणजे पांढर्या मातीचा वापरात असलेला किल्ला आहे. त्यात पाच भव्य बुरुज आहेत आणि चारही बाजूंनी 40 फूट संरक्षण भिंती आहेत. हा वाडा आजही देशमुख घराण्याच्या वापरात आहे. देशमुख घराण्यातील नोंदीनुसार ते सुमारे 650 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.
नागपूरपासून जवळच असणाऱ्या कामठी येथे भव्य ड्रॅगन पॅलेस टेम्पल उभारण्यात आले आहे. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने उभारण्यात आलेली ही वास्तू बघता क्षणी नजरेत भरणारी आहे. सुमारे १० एकरच्या परिसरात येथे बौद्ध धर्माशी संबंधित विविध प्रार्थनास्थळे आहेत. तथागत बुद्धांची मूर्ती, ध्यान केंद्र इत्यादी गोष्टींचा समावेश असलेले ड्रॅगेन पॅलेस हे देश-विदेशातील बौद्धधर्मीय पर्यटकांचे आकर्षण स्थळ झाले आहे. नागपूरचे लोटस टेम्पल म्हणूनही ही वास्तू प्रसिद्ध झाली आहे.
नाईक (मस्के) गढी, खडकदरी, ता. पुसद, जि. यवतमाळ
फोटो साभार: अविनाश मस्के नाईक, पुसद
येवलेंची गढी, धानोरा, अकोला
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली , अजिंठा डोंगर जंगलाने व्यापलेल्या पर्वत रांगा मधील अकोला पासुन ३८ किमी दुर व अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील काटेपुर्णा नदीच्या तिरावर बसलेले अकोला जिल्ह्यातील शेवटचे गांव धानोरा व काटेपुर्णा नदीच्या पलिकडचे तिरापासुन वाशिम जिल्हा सुरुवात होते... या गावाची "येवलेची गढी" प्रसिद्ध आहे, सन १६७० मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी कारंजा (लाड) येथुन आक्रमण करुन परत जात असतांना सैन्य दलातील महत्वाच्या घोड्याला ज्या वर कधी कधी दस्तुरखुर्द छत्रपती शिवाजी महाराज सवारी करत होते त्या पैकी एका घोड्याच्या पायाला ईजा झाली होती, महाराजांचे सैन्य हे दऱ्या डोंगरातुनच आक्रमण करण्या करिता जात होते....रस्त्यात धानोरा गावी "दामाजी पाटील येवले" हे वैद्य होते हे महाराजांच्या कानावर होते वैद्य दामाजी पाटील येवले हे महाराजांचे कट्टर समर्थक होते....वैद्य असुन ते माणसां सोबत घायाळ पक्षी व प्राण्यावर सुद्धा उपचार करत होते व त्यांची ख्याती परिसरात सर्वत्र होती...महाराजांनी थोडासा रस्ता बदलुन थोड्या प्रमाणात जखम झालेल्या घोड्यावर उपचार करण्याचे ठरविले व धानोरा येथे दामाजी पाटील येवले यांच्या गढीवर जावुन त्यांच्या घोड्यावर उपचार केला व नंत्तर ते मार्गस्थ झाले, महाराजांची गुप्तचर यंत्रणा फार मजबुत होती....छत्रपती शिवाजी महाराज ज्या वाटेने आले होते तो रस्ता दऱ्या खोऱ्यांचा असुन या गढीपासुन ३ किलोमिटर दुर घनदाट जंगलात "पांडव लेणी" आहे...पांडवांना महाभारतात ज्या वेळी १२ वर्ष वनवास व १ वर्ष अज्ञातवास झाला होता तर १ वर्षाच्या अज्ञात वासात ते याच ठिकाणी थांबल्याची नोंद काही ग्रंथांमधे दिसते तर अर्जुनाचा पुत्र "बब्रुवाहन" यांचे गांव जे राजाकिन्ही म्हणुन राजधानी होती ती पण या गावापासुन फक्त ९ किलोमिटर डोगरातुन वाटेने आहे....वरिल गढी पाहील्या नंत्तर लक्षात येते कि याचे बांधकाम कसे केले असावे, आता जरी भग्नावस्थेत असेल तरी सुद्धा जे काही शिल्लक अवषेश आहेत...त्या वरुन गढी किती प्रशस्त होती याचा अनुभव येतो....छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेली ही गढी आजही ताठ मानेने ऊन वारा पाऊस झेलुनही उभी आहे.....
(माहीती - रवी गजानन येवले पाटील)
भवानी माता मंदिर, पवनी, हिंगणघाट, वर्धा
केशवराज मंदिर, किन्ही राजा, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील किन्ही राजा या गावाला पुरातन वारसा लाभलेला आहे. गावात पुर्वी ऐतिहासिक गढी होती ती आता नामशेष झालेली आहे. गावात प्राचीन तलाव आहे. गावात चार पुरातन मंदिर अस्तित्वात होती. भवानी माता मंदिर, महादेव मंदिर, खंडोबा मंदिर आणि केशवराज मंदिर.
नागपूर हे 1850 -1950 दरम्यान "मध्य प्रांत आणि बेरार" ची राजधानी होते.
मध्य प्रांत आणि बेरार हा ब्रिटिश भारतातील एक प्रांत होता. मध्य भारतातील मुघल आणि मराठ्यांकडून ब्रिटीशांनी मिळवलेल्या विजयांचा या प्रांतात समावेश होता आणि सध्याच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यांचा बराचसा भाग व्यापला होता. त्याची राजधानी नागपूर होती. 1861 मध्ये सौगोर आणि नेरबुड्डा प्रदेश आणि नागपूर प्रांत यांच्या विलीनीकरणाद्वारे मध्य प्रांताची स्थापना झाली. हैदराबाद संस्थानातील मराठी भाषिक बेरार प्रदेश प्रशासनासाठी 1903 मध्ये मध्य प्रांतात जोडण्यात आला आणि नंतर 24 ऑक्टोबर 1936 रोजी नवीन मध्य प्रांत आणि बेरार तयार करण्यात आला. 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतर, अनेक संस्थानांचे मध्य प्रांत आणि बेरारमध्ये विलीनीकरण करण्यात आले, जे 1950 मध्ये भारताचे संविधान लागू झाल्यानंतर, मध्य प्रदेश हे नवीन भारतीय राज्य बनले.
1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतर, मध्य प्रांत आणि बेरार भारताचा भाग बनले, आणि 1950 मध्ये मध्य प्रदेश हे भारतीय राज्य बनण्यासाठी त्याच्या अधिकाराखालील संस्थानांमध्ये विलीन करण्यात आले. 1956 मध्ये, मध्य प्रदेशातील मराठी भाषिक भाग, जे बेरार आणि नागपूर विभागांचा समावेश करून ते मुंबई राज्याचा भाग बनले. 1960 मध्ये, मुंबई राज्याची पुनर्रचना करण्यात आली, ज्यामध्ये मराठी भाषिक भाग महाराष्ट्र बनले आणि गुजराती भाषिक भाग गुजरात बनले. 2000 मध्ये, मध्य प्रदेशचा पूर्व भाग छत्तीसगड हे नवीन राज्य बनण्यासाठी वेगळे झाले.
सौजन्य - विकिपीडिया
पुरातन मंदिरांच गाव - चांडोळ, ता. जि. बुलढाणा
चांडोळ ह्या गावाला पूर्वी चंपावती नगर म्हणूनही ओळखले जायचे हे गाव बुलडाणा शहरापासून ३६ की अंतरावर आहे. ह्या चांडोळ गावाची ओळख पूर्वी मंदिरांचं गाव म्हणून एके काळी होती. चांडोळ गावात हेमाडपंथी शैलीत बांधलेले काळ्या पाषाणातील एकूण ४ मंदिरं आहे.
१) नृसिंह मंदिर :
राज्यभर नृसिंह मंदिर बोटावर मोजण्याइतकी आहेत; त्यापैकी बुलडाणा जिल्ह्यात चांडोळ, जानोरी, उमरद व मेहकर ह्या चार ठिकाणी नृसिंह मंदिर आहेत. नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.
मंदिराच्या दर्शनी भागावर एक अतिशय दुर्मिळ अशे बारा ज्योतिर्लिंगाचे शिल्प कोरलेले असून असे शिल्प कदाचितच एखाद्या मंदिरावर असावे. सभामंडपातील खांबावर काही देखनिय शिल्प कोरलेले आहे. ह्या नरसिंह मंदिरात तीन गर्भगृह असून दोन गर्भगृहात शिवलिंग तर मुख्य गाभाऱ्यात भगवान नरसिंहाची मूर्ती आहे. गाभाऱ्यातील नृसिंहाची मूर्ती प्राचीन सिंहरूपातील हिरण्य कपशुचा वध करतानाची आहे. वेरूळच्या १५ व १६ व्या क्रमांकाच्या लेण्यांत नृसिंह-हिरण्यकश्यपू युद्धाचा प्रसंग दर्शविला आहे. हे मंदिर आजही चांगल्या स्थितीत असून मंदिरात आल्यावर आपल्याला अत्यंत शांतता जाणवते.
२) खोलेश्वर किंवा खोल महादेव मंदिर :
ह्या मंदिराचा गाभारा जमिनीत खोलवर असल्यामुळे ह्याला कदाचित खोल महादेव हे नाव पडले असावे मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर काही देवी देवतांची शिल्प आहे.
गाभाऱ्यात उतरण्यासाठी पायऱ्या एकदम सरळ असल्यामुळे आपल्याला सावकाशच खाली उतरावे लागते गाभाऱ्यात एक मोठे शिवलिंग असून आतमध्ये आपल्याला गारवा जाणवतो.
मंदिराचे बांधकाम बाहेरून अर्धे दगडात तर अर्धे विटात केलेले आहे. मंदिर परिसरात अनेक शिल्प तुटलेल्या अवस्थेत आहेत.
३) गढीतला महादेव मंदिर :
चांडोळ येथे असलेल्या ४ हेमाडपंती मंदिरांपैकी हे एक मंदिर. सध्या खुप दुरावस्था झालेली आहे. स्थानिक सोडले तर इतर लोकांना येथे मंदिर आहे कळणार सुध्दा नाही. एका गढीच्या भिंतीला लागून हे मंदिर आहे. त्यामुळे या मंदिराला गढीचा महादेव म्हणतात. जवळच एका पत्र्याच्या मंदिरात एक विरगळ आहे.
४) महादेव मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर :
चांडोळ हे एक ऐतिहासिक गाव आहे. येथे एक पुरातन गढी होती. गावाला वेस (दरवाजा) होती. दरवाज्याची एक भिंत अजून उभी आहे. येथे असलेल्या गढीच्या वर दोन भव्य हेमाडपंथी मंदिरे होती. एक महादेवाचे तर दुसरे महालक्ष्मीचे मंदिर होते. आता गढी पुर्णपणे नष्ट झाली आहे आणि त्यावरील पुरातन मंदिरेही उध्वस्त झाली आहेत.
खोलेश्वर शिव मंदिर, बार्शीटाकळी, अकोला
बार्शी टाकळी येथे उत्तर वहिनी नदी विद्रुपा च्या काठावर हे सुंदर यादवकालीन श्री खोलेश्वराचे मंदिर आहे. मंदिराचा मुख्य भाग हा यादव कालीन आहे तर मंदिराच्या शिखर भागाचे नूतनीकरण झाले आहे. मंदिरात उत्तर द्वाराने प्रवेश केल्यास प्रथम नंदी दिसतो. तो आता नुकताच बांधलेल्या मंडपात विराजमान आहे. या मंडपाच्या बाजूला असलेल्या स्तंभावर भरवाहक यक्ष मूर्ती पाहायला मिळतात. मंदिराला अंतराळ युक्त दोन गर्भगृह आहेत (पूर्व व उत्तर) तर एक देवकोष्टका सारखा एक छोटा (पश्चिम) गाभारा आहे. मुख्य ( पूर्व ) गाभारा हा जवळ जवळ २० फूट खोल आहे. या गाभाऱ्यात असलेल्या शिवलिंगातून कायम जलरूपात गंगा प्रवाहित असते. दक्षिण गाभाऱ्यात आता काळ्या पाषाणातील देवीची सुंदर मूर्ती आहे. या गाभाऱ्याची द्वार शाखा व द्वारा समोरची चंद्राशीळा पाहण्यासारखी आहे. पश्चिमेकडील गाभाऱ्यात गणपतीची सुखासनात कमळावर आसनस्थ मूर्ती आहे. मंदिराला नूतनीकरणात पाच शिखरे चढवली आहेत. संपुर्ण मंदिराला देवडी युक्त तट आहे. तर तटाच्या उत्तर-पूर्व बाजूला भला मोठा बुरुज आहे. तटाच्या आत एक दत्त मंदिर आहे तर परीसरात संत व सिद्ध पुरूषांच्या समाध्या आहेत.
(Photo - @victorious_abhi & @goprobae )
विदर्भातील वाडे, महाल, हवेली
पुरातन शिव मंदिर, घोटी, घाटंजी, यवतमाळ
(Photo - Dilip Mohurle)
पुरातन विठ्ठल - रुख्मिणी मंदिर, सावंगी (जोड), वर्धा
वर्धा- वेणा या दोन नद्यांचा संगम हिंगणघाट तालुक्यातील सावंगी जोड या गावाजवळ झाला आहे. याच संगमावर चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या तिन्ही जिल्ह्याच्या सीमा एकत्र येतात. या संगमावर निसर्गरम्य परिसरात विठ्ठल मंदिर वसलेले आहे. येथे पुरातन शिल्प आढळून आले आहेत. याच संगमाच्या काही अंतरावर वरोरा तालुक्यातील दिंदोडा बॅरेज प्रकल्प प्रस्तावित आहे.
(Photo - Mohit Jaiswal)\
श्री बालाजी मंदिर, वाशिम
विदर्भातील वाशिम हे शहर अतिशय प्राचीन काळात वसलेल्या शहरांपैकी एक आहे. ते तीर्थक्षेत्र असल्याचा उल्लेख पद्मपुराणात आढळतो. इथे वत्स नावाचे ऋषी वास्तव्यास होते व देव मंडळी इथे गुल्म ( समुदाय ) करून राहिली, म्हणून नाव वत्सगुल्म पडले. ह्या नावाचा अपभ्रंश होऊन वाशिम वा बासम हे नाव प्रचलित झाले. ज्योतिषतज्ञानी पृथ्वीची जी मध्यरेषा कल्पीली आहे ती वत्स गुल्म म्हणजेच वाशिमवरुन जाते. वाशिम इथे मध्य रेषेवर खूण म्हणून पूर्वीच्या शास्त्रज्ञानी मध्यमेश्वर नावाच्या शिवलिंगाची स्थापना केली होती. ह्याशिवाय वाशिम शहर श्री बालाजी मंदिरासाठी पण प्रख्यात आहे. श्री बालाजी मंदिर, वाशिम त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
नागपूरकर भोसले यांच्या कारकीर्दीतील प्रमुख सरदारात भवानीपंत काळू हे एक होते. यांच्या वडिलांचे नाव काळोपन्त असे होते. भवानीपंतांच्या काळातच भवानीपंत मुनशी नावाचा अजून एक सरदार भोसल्यांकडे होता. एकाच नावाचे दोन सरदार असल्याने नामसाधर्म्या मुळे गोंधळ होऊ नये म्हणून भवानीपंत काळोजी, काळू असा उल्लेख होऊ लागला. पुढे हेच त्यांचे आडनाव झाले. भवानीपंत काळू हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण असून मंगरुळपिर तालुक्यातील खडी धामणी इथे वतनदार पटवारी होते. जानोजी भोसल्यांच्या कारकिर्दीत भवानीपंतास विशेष महत्व मिळाले. भवानीपंतांची पहिली महत्वाची कामगिरी ओरिसात झाली.तेथील जमीनदारांचे बंड भवानीपंतानी मोडून शांतता प्रस्थापित केली. थोरले माधवराव आणि राघोबा दादा यांच्यातील संघर्षात जानोजी भोसल्यानी राघोबा दादाचा पक्ष घेऊन पेशव्यास नडणे सुरू केले होते. जानोजी भोसल्यांचा दिवाण देवाजीपंत चोरघडे -साडे तीन शहाण्यातील एक- हा जानोजीस माधवराव विरुद्ध भडकवीत, कारस्थाने करीत असे. मराठा दौलतीचे सर्व घटक मध्यवर्ती सत्तेशी एकनिष्ठ असले पाहिजे ह्या भूमिकेतून थोरल्या माधवरावांनी जानोजीस धडा शिकविण्यासाठी इ. स.1768 अखेर नागपूरवर स्वारी केली. माधवरावांशी चर्चेला आलेल्या देवाजी पंतास माधवरावानी त्याचे पूर्वोद्योग लक्षात घेऊन अटक करून आपल्या ताब्यात ठेवून जानोजीवर सर्व बाजूनी चढाई करून त्यास जेरीस आणले. 23 मार्च 1769 रोजी दोन्ही पक्षात तह झाला. माधवरावांनी जानोजीस ' इतःपर देवाजीपंत तुमचे आमचे जाबसालात नसावा, नाश करील, सबब आम्ही त्यास समागमे नेऊन पारिपत्य करतो असे ' सांगितले. पण जानोजीनी माधवरावांस दंड भरून, देवाजी पंतास शासन करण्याची हमी देऊन पेशव्यांच्या कैदेतून सोडविले आणि दिवाण पदावरून पण दूर केले. देवाजी पंताच्या जागी जानोजीनी भवानी पंत काळू यांची नेमणूक केली. यावरून भवानीपंताचे कर्तृत्व ध्यानात येईल.
भवानीपंत काळू ऑगस्ट 1777 मध्ये चिमणराजे भोसलेनी थकीत खंडणी वसुलीसाठी बंगालवर काढलेल्या मोहिमेत सहभागी होते. मोहीम प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी तत्कालीन वत्सगुल्म म्हणजेच हल्लीच्या वाशिम इथे एका राजपूत स्त्रीच्या अन्त्य संस्कारासाठी जमीन खोदत असताना अनेक मूर्ती सापडल्या ज्यात सांप्रत वाशिम येथील बालाजी मंदिरात स्थानापन्न असलेली बालाजीची मूर्ती सुद्धा होती. त्याकाळी वत्सगुल्म-वाशिम भागावर तीन सत्तानचा ताबा होता. पूर्वेकडील भाग निजामा कडे, मधला भाग पेशव्यांकडे व पश्चिमेकडील भाग नागपूरकर भोसले यांच्याकडे होते. मूर्ती सा पडण्याची घटना नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यातील पश्चिम भागात घडली. ही गोष्ट भवानीपंत काळूना कळताच ते ताबडतोब लष्करासहित वाशिम इथे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सापडलेल्या विष्णु, बालाजी च्या मूर्तीस बंगाल स्वारीत यशस्वी झालो तर तुझे भव्य देवालय इथेच, वत्सगुल्मला बांधीन असा नवस केला. बालाजीनी भवानीपंतांची कामना पुरी केली. बंगाल मोहिमेवरून परतल्यावर मोहिमेचा सर्व वृत्तान्,व हिशोब, वसूली दरबारात सादर केल्यावर त्यांनी वत्सगुल्म येथील हकीकत पण सांगितली.
मंदिराच्या बांधकामास श्रावण शुद्ध 13 शके 1700 म्हणजे 6 ऑगस्ट 1778 रोजी सुरुवात झाली. देवाळाचे गर्भगृह आणि सभा मंडप बांधून झाल्यावर मंदिरात श्री बालाजी व इतर सापडलेल्या सर्व मूर्तीनची प्राण प्रतिष्ठा भवानीपंत काळूणच्या हस्ते मोठ्या समारंभ पूर्वक श्रावण वद्य 10 शके 1705 अर्थात 22 ऑगस्ट 1783 रोजी करण्यात आली.
मंदिराचा वास्तु विशेष: ह्या मंदिरातील गर्भगृहात बालाजीच्या मूर्ती समोरील भिंतीवर वरच्या बाजूस एक कोनाडावजा खिडकी आहे. मंदिर हिंदू परंपरेनुसार पूर्वाभिमुख असले तरी पश्चिम-पूर्व रेषेशी
उत्तरेच्या दिशेने विशिष्ट कोनात मध्यरेषा निश्चित करून मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. ह्या विशिष्ट वास्तुशास्त्रीय रचनेमुळे सूर्याने उत्तरायणात प्रवेश केल्यापासून ते दक्षिणायन सुरू होईपर्यंत म्हणजे 21 डिसेंबर ते 22 जून ह्या काळात बालाजीच्या मूर्तीवर सूर्य किरणे पडतात.
भवानीपंतांना मिळालेले यश उत्तरायण काळातच मिळाले होते. उत्तरायण सुरू होताच ते नागपूरहून निघाले आणि उत्तरायणाच्या उत्तरार्धात कटक प्रांती पोहोचले. फारसे युद्ध, रक्तपात न होता दक्षिणायन सुरू होण्यापूर्वीच तह होऊन अकल्पित यश मिळाले. आपल्या कारकीर्दीतील संस्मरणीय काळ कायम स्मरणात राहण्यासाठी त्यांनी अशी वास्तुरचना करून घेतली.
मंदिराच्या बाहेरील भागात एक शिलालेख पण आढळतो. त्यावर बालाजी मंदिरास,रयतेस कुणी त्रासजा पोहोचवू नये म्हणून ताकीद देण्यात आली आहे. तो मजकूर खालील प्रमाणे आहे.
श्री
श्री निवास
( वत्सगुल्म ) उर्फ खैरताबाद हवेली कसबे वासिम येथील वसूल महसूल व पटी पटियान वगैरा व खैराती सदावर्त हिंदुवान व मुसलमान अज सलाह नवाब हशमत जंग बहादर जागिरदार व सेनासाहेब सुभा व सरदेशमुख व जमीनदार मूकरर केली से अगर मुसलमानन व हिंदुवा न जो कोन्ही येथील एक कवडीची तमा बुलरुका ठेवील व रयतेस इजा देईल हिंदुस शेपत कासि मध्ये मात्रा गमन व गोहत्याचे पातक असे व मुसलमान तमा ठेवील तो महमंदचे उमदाचा नसे व मक्केत सुवर हत्तेचे पातक असे. आज दारोगी मिरजा मजिदीबेग तयारी तलाव व देऊळ व आबादी पेठ मजकूर सन 1189 ता छ 11 रजब सके 1700 श्रावण शुध 13 त्रयोदसी नारायन मुरहार राजनकर महाजन पेठ मजकूर ||छ॒ हस्ता
अकशेर श्री रूसतमजी कारीगर.
संदर्भ:
1-मराठ्यांचा इतिहास खंड तीन. संपादक अ. रा. कुलकर्णी व ग. ह. खरे.
2-मराठी रियासत खंड 5 गो. स. सरदेसाई
3-वाशिम च्या श्री बालाजी देवस्थानाचा इतिहास
संकलक - श्री ज्ञा. ना. काळू व बी. डी . काळू.
फोटो - सौरभ ठाकरे पाटिल
सौजन्य - डिस्कवर महाराष्ट्र (https://www.discovermh.com/balaji-temple-washim)
चिचाटी धबधबा, मेळघाट, अमरावती
मराठी मधील पहिला ग्रंथ, काव्य, कथाचे उगम स्थान, रिद्धपुर म्हणजे महानुभाव संप्रदायाची काशी, मंदिराचं गाव, गोविंदप्रभूंचे कर्मस्थान असे हे ठिकाण अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात जरी असले तरी चांदुर बाजार या तालुक्याच्या ठिकाणा पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे.
रिद्धपुर हे गाव देवगिरीच्या यादवांच्या काळात महत्वाचं ठिकाण होते, वऱ्हाड प्रांतातील महत्वाचा परगणा होता एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळख होती. येथिल प्राचीन इतिहास आपल्या उराशी घेऊन आजही हे गाव आपले एक वेगळे अस्तित्व घेऊन उभे आहे. ह्या गावात श्री गोविंद प्रभु ने बर्याचलिला केल्यात त्यांचे अस्तित्व आजही बघायला मिळतात. त्यातीलच एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे रिद्धपूर येथील सासु सुनेची विहीर. श्री गोविंद प्रभू यांच्या आज्ञेवरून केशव नायक या व्यक्तीने ही विहीर बांधली असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
विहिरीची रचना ही अनोख्या पद्धतीने असून ताऱ्यासारखे आहे. विहिरीला आत उतरण्याकरीता तिन्ही बाजूनि पायऱ्या आहेत. एक फूट रुंदीच्या 10 पायऱ्या नंतर ऐक मोठी पायरी अशा तीन टप्यात तीस पायऱ्या आहेत. ज्या खाली उतरतांना निमुळत्या होत जातात व एका बाजूला चौकोनी विहीर आहे ज्यात मुख्य झरा असावा, एका आख्यायिकेनुसार विहीर ज्यांच्या मालकीचे आहे तेथील सासु सुना नेहमी पाण्याकरिता भांडत असे सदर प्रकरण हे श्री गोविंद प्रभु पर्यंत गेले त्यांनी त्या दोघींचे भांडण सोडवत विहिरीचे दोन भाग करण्यास सांगितल तेव्हापासून या विहिरीला सासु सुनेचे विहीर म्हणून ओळखल्या जाते.
बाराव्या शतकात पाण्याची गरज व उपयुक्तता जाणून ह्या विहीरीचे बांधकाम केले आहे. अशा प्रकारच्या विहिरी फार तर राजस्थानमध्ये आढळतात ज्यांना पुष्करणी सुद्धा म्हणतात. ह्या विहिरीच्या बांधकामाकरिता खरप प्रकाराच्या दगडाचा उपयोग केलेला आहे. ही विहीर नसून एक मोठे कुंड किंवा तलावच वाटतं त्या काळातील बांधकाम शास्त्र किती प्रगत होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही सुंदर विहीर आहे. आजूबाजूला खारे पाणी असताना गोड्या पाण्याच्या मुख्य स्त्रोत जिवंत झरा हेरून त्या ठिकाणी विहीर बांधली गेली आहे. कितीही दुष्काळ पडला तरी या ठिकाणचे पाणी आटत नाही असे लोक म्हणतात. हा एक चमत्कारच आहे. रिद्धपूर गावाजवळ मोठी नदी नसून त्या काळात बाराही महिने या विहिरीचा उपयोग होत असे. हे परंपरागत जलव्यवस्थापन प्रगत व्यवस्थेचे उदाहरण आहे. बाराव्या शतकापासून 19 व्या शतकापर्यंत ज्या वीहिरीने गावाची तृष्णा भागवली ती विहीर आज खितपत पडली आहे, काळाच्या ओघात विहीरीची उपयुक्तता संपली म्हणून ही विहीर दुर्लक्षित आहे. यामुळे या जिवंत संस्कृतीचा श्वास गुदमरतोय, परंपरागत चालू असलेल्या जल स्तोत्रांचा उपयोग व्हायला पाहिजे. एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी पुरवठा केला जातो तर दुसरीकडे अश्या पारंपरिक जलस्त्रोता कडे दूर्लक्ष केल्या जाते. ही दुफळी दूर करण्याकरिता लोकसहभागातून अशा प्रकारच्या विहिरींचे साफसफाई व संवर्धन व्हायला पाहिजे, तेव्हाच कुठे हा ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा ही विरासत आपण जपू शकू व या ऐतिहासिक वारशाला न्याय देऊ शकु.
महानुभवांची काशी म्हणून रिद्धपुरला भेट दिल्या नंतर एकदातरी या सुंदर विशेष रचना असलेल्या सासू सुनेच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या विहिरीला जिने आपल्या पूर्वजांची सात शतक तृष्णा भागवली तिची कृतज्ञता व्यक्त करण्या करिता भेट द्यायला हवी.
(माहिती - शिवा श्रीकृष्णराव काळे)
प्रभु श्रीराम मंदिर, रामटेक, नागपूर
प्रभु श्री राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूरपासून ५५ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. येथून आजूबाजूच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. येथे श्रीरामाचे सेनागण म्हणजे वानरांचा मुक्त संचार आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे.या मंदिरात कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेस यात्रा भरते. त्या रात्री १२ वाजता उंच कळसावर त्रिपुर प्रज्वलित केला जातो.
इ.स.२५० मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता. सातवाहनांच्या कालात प्रवरपूर (सध्याचे मनसर) हे एक महत्त्वाचे ठिकाण होते. इ.स. ३५० मध्ये त्यांचा पडाव करून वाकाटकांनी सत्ता काबीज केली. त्याच काळात कालिदास झालेत असा समज आहे. संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे 'मेघदूत'. कविकुलगुरू कालिदासाने हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले आहे. सन १९७०-१९७१ मध्ये, रामटेक गडमंदिर परिसरात, महाराष्ट्र शासनाने 'कालिदास स्मारकाची' निर्मिती केली. आज या कालिदासांच्या नावाने येथे संस्कृत विद्यापीठ सुरू आहे. या ठिकाणी दरवर्षी 'कालिदास महोत्सव साजरा होत असतो.
जवळच, तोतलाडोह हे धरण आहे. रामटेकच्या दक्षिणेला असलेला वाकाटककालीन नगरधनचा किल्ला, त्यांची राजधानी होता.
Pic by- @rahulmohanty_
@j_jishnu_j
@snapshot.maverick
@photofreak_nihar
@ek_ramtekkar @Abhijit Sahoo




































































.jpg)















































.jpg)
































































































































































































.jpg)











.jpg)








.jpg)
















































































































































































































































































.jpg)










































.jpg)




.jpg)


















































.jpg)























.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.