https://prachinandmordarnbharatitihas.blogspot.com/2023/11/blog-post.html
तातोबा मंदिर, ओढा
नाशिक
हे गोदावरी नदीच्या काठी वसलेलं एक प्राचीन शहर आहे. या शहरात तसेच
परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. यातील काही वास्तू आज चांगल्या स्थितीत
आहेत तर काही काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिकहुन
निफाडकडे जाताना साधारण १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओढा गावातील अशीच एक
ऐतिहासिक वास्तू आज अखेरच्या घटका मोजत आहे.
गोदावरीच्या
कुशीत पहुडलेलं ओढा तसं लहानसं गाव. नाशिकच्या पंचवटीमधील प्रसिद्ध
काळाराम मंदिराचा जीर्णोद्धार करणारे रंगराव ओढेकर याच
गावातील.
गावातील आजमितीला जमीनदोस्त झालेल्या ओढेकरांच्या वाड्याच्या मागील बाजूस
असलेले तातोबा मंदिर आज विस्मृतीत गेले आहे. मंदिराची पडझड होत असून काटेरी
झुडुपांनी मंदिराला वेढा घातला आहे. पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित
स्मारकात समावेश असूनही ही वास्तू पूर्णपणे दुर्लक्षित राहिली आहे.
मंदिराचे
बांधकाम साधारण १३-१४ व्या शतकातील असावे असे वाटते. गावातील तातोबा
नावाची व्यक्ती इथे कायम दिवे लावीत असे त्यामुळे या मंदिराला तातोबा मंदिर
हे नाव पडले असे ग्रामस्थ सांगतात. पण खरं तर हे मंदिर नाही कारण आत
कुठल्याही देवतेची मूर्ती नाही. प्राचीन काळात हा ऋषीमुनींचा मठ असावा व
अध्ययन-अध्यपनासाठी या वास्तूचा वापर होत असावा असे अभ्यासक सांगतात.
मंदिरा समोर कुण्या अनामिक सत्पुरुषाची समाधी आपल्या नजरेस पडते.
स्थानिकांसोबतच
पुरातत्व विभागाने देखील दुर्लक्ष केल्याने आज ही वास्तू नामशेष
होण्याच्या मार्गावर आहे. नाशिकच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या
वास्तू आपला वैभवशाली इतिहास सांगत आहेत. केवळ आवश्यकता आहे तो संवाद
साधन्याची.
रोहन गाडेकर
https://lokmat.news18.com/religion/history-of-siddhivinayak-ganapati-temple-in-odha-nashik-825397.html
भक्तांच्या हाकेला धावून जाणारा बाप्पा, उजव्या सोंडेच्या गणपतीची आहे दूरवर कीर्ती
गोदावरी किनारी ओढा गावालगत वसलेल्या सिद्धिविनायक गणपती मंदिराची
ख्याती सर्व दूर पसरलेली आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारा आणि नवसाला
पावणारा गणपती म्हणून भाविकांची या गणपतीवर अपार श्रद्धा आहे. शेकडो वर्षे
पुरातन हे मंदिर आहे. ओढा गाव आणि परिसरातील गावांना सुखशांती पूर्वी मिळत
नव्हती म्हणून ओढेकर जहागीरदारानी 1680 साली या मंदिराची स्थापना केली आहे.
नंदीच्या शिंगांमधून होत गणपतीचे दर्शन
गणपतीची स्वयंभू मूर्ती असून जागृत देवस्थान अशी या मंदिराची ख्याती
आहे. शेकडो भाविक दररोज गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. या गणपती
मंदिराच्या समोर दोन महादेवाची पुरातन मंदिर आहेत. त्या मंदिरातील
महादेवाच्या समोरील नंदीच्या शिंगांमधून गणपतीचं दर्शन होतं, असं अभ्यासक
मधुकर पेखळे सांगतात.
उजव्या सोंडेच एकमेव गणपती मंदिर
या
परिसरात उजव्या सोंडेच एकमेव गणपती मंदिर आहे. भाविक दररोज मनोभावे या
गणपतीची पूजा करतात. भक्तांनी गणपती समोर व्यक्त केलेली इच्छा अपेक्षा
गणपती पूर्ण करतो असे येथील भक्त सांगतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून या
गणपतीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्यामुळे अंगारकी चतुर्थीला भाविकांची
दर्शनासाठी मोठी रीघ या ठिकाणी असते. भाविक मोठ्या श्रध्देने दर्शनासाठी
येत असतात, असंही मधुकर पेखळे यांनी सांगितले.
बाप्पाला साकडं घालताच नोकरी लागली
गेल्या
पस्तीस ते चाळीस वर्षांपासून ओढा गावातील बाळासाहेब पेखळे गणपती बाप्पाची
निस्वार्थ सेवा करतात. दररोज पुजा पाठ करून ते आपल्या दिवसाची सुरुवात
करतात. 'गणपती बाप्पाची आमच्यावर कृपा आहे. बाप्पा अनेक वेळा आमच्या हाकेला
धावून आला आहे. आमच्या मनोकामना पूर्ण केल्या आहेत. नोकरीसाठी माझा मुलगा
चेन्नईला गेला होता. तिथं त्याने इंटरव्ह्यू देऊन बरेच दिवस झाले होते.
मात्र, त्याचं सिलेकशन होत नव्हतं. मी बाप्पाकडे साकडं घातलं. गणपती बाप्पा
माझ्या मुलाला लवकर नोकरी मिळूदे आणि लगेच काही दिवसातच मुलाला नोकरी
लागली. इच्छा पूर्ण झाली',असं भक्त बाळासाहेब पेखळे सांगतात.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.