मुघल काळा पासुन या शहराला ऐतिहासिक महत्व आहे. येथून जवळच काही अंतरावर असलेल्या जामोद या गावाला शहाजहानची प्रेयसी मुमताज गरोदरपणात आजारी पडली होती. त्यानंतर काही दिवसातच तिचा येथून ५० कि.मी. असलेल्या मध्यप्रदेशातील बुरहाणपूर येथे मृत्यू झाला होता.
सातपुड्यातील धारणी तालुक्यात तापी आणि गडगा नदीच्या संगमावर अपरिचीत असलेल्या आमनेर किल्ल्याची वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीने किल्ल्याचे संवर्धन आणि जनमाणसांचे लक्ष वेधण्यासाठी श्रमदानातुन स्वच्छता मोहीम ठेवण्यात आली होती.
मोहीम आटोपुन मी, मध्यप्रदेशातील तुकईथड-खकनार- डोईफोडिया-जलगांव जामोद-शेगांव-वाशिम या आडवाटेने मोटारसायकलने प्रवास करत पक्षी आणि निसर्ग निरिक्षण करतांना परतीच्या प्रवासात या भागातील अनेक ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मिळाली. त्यापैकी जलगांव (जामोद) येथील किल्ला-वजा गढी पहाण्याचा योग आला.
ही गढी जलगांव (जामोद) ते बुरहाणपूर या रोडवर ४ कि.मी. अंतरावर आहे. ह्या गढीचा मुख्य दरवाजा, गढीवरील दोन मजले, एक तळघर आणि दोन विहीरीचे अवशेष बघायला मिळतात.
(फोटो आणि माहिती - मिलिंद सावडेकर)







.jpg)



.jpg)


.jpg)

.jpg)


.jpg)

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.