Friday, June 30, 2023

रम्य " रामदरा "

 http://misalpav.com/node/25435

शुक्रवारचा दिवस . नेमकी त्यादिवशी ईद. म्हण्जे सुटीचा दिवस. . चौ राला म्हण्जेच धागाकर्त्याला वाटले. चला नवीन स्कूटर घेतलीय. आज जरा मोठी चक्क्कर मारून येऊयात. आता म्हातारं कितीसं लांब जाणार ? उगीच भरकटू नये म्हणून सौ, चौ ला घेतले .( म्हणून पुणे परिसरातील एक रम्य ठिकाण नक्की केले.) " रामदरा" हे स्थान पुण्यापासून साधारण पणे २४ किमी वर आहे.मी चिंचवड, खडकी, येरवडा पूल, कोरेगाव पार्क, हडपसर ओव्हर ब्रीज या मार्गाने गेलो. हा मार्ग मिनयापोलीस, कॅरोलेना, मस्कत, दुबई, मुंबई डोंबिवली ठाकुरली या गावाकडून येणार्‍या यात्रेकरूना ही सोयीचा आहे. ( इथे डोळा बारीक केलेली स्मायली समजणे) . हे ठिकाण तिर्थक्षेत्र असल्याचा बोर्ड लोणी गावात लावलेला आढळला. म्हणजे आम्ही यात्रेकरू होतो तर !


 

हडपसर हे पुणे सोलापूर रस्त्यावर असलेले ठिकाण . तेथून पुढे सोलापूरच्या दिशेला जाताना डाव्या बाजूस हिंदुस्तान पेट्रो चा डेपो आहे. तो दिसला की आपण रस्ता चुकलेलो नाही याची खात्री पटते. पुढे तीन एक किमी गेल्यावर लोणी गाव लागते. तेथून रामदरा रस्ता घेण्यासाठी उजवीकडे वळावे लागते. मग दोन्ही बाजूनी हिरवीगार शेते,मधुन मधून वस्ती, अरूंद पण पक्का डाबरी रस्ता व अधून मधून दिसणारे गाववाले .हा रस्ता पंतप्रधान निधीतून उभारला आहे. रस्ता पक्का असला तरी अरूंद् असल्याला भरधावपणे वहान पिटाळता येत नाही. वळणे वळणे घेत रस्ता रामदरा नक्की आले की नाही याचे गेसवर्क करायला लावतो. व अचानक आपली गाडी रामदर्‍याच्या प्रशस्त पार्किंग मधे शिरते. लोणी ते रामदरा हे अंतर ६ किमी व ७०० मीटर्स एवढे आहे.
.
रामदरा येथे काय आहे ? एका हिरव्या गार टेकडीच्या पायथ्याशी एक तळे आहे, त्यात मधेच घुसलेल्या भू- भागावर एक दगडी बांधकाम असलेले मंदिर आहे. बाजूने वड, पिंपळ, नारळ अशा झाडां सावली परिसरावर धरलेली.
.

.
मंदिराचा कारभार लोणी येथील एक विशवस्त मंडळ पहाते.सायंकाळी साडे सहा नंतर येथे प्रवेश वर्जित आहे. मंदिर शंकराचे आहे.मूळ दगडी मंदिराभोवती च्या जागेत जीर्णोद्धार स्वरूपात कोंक्रिटच्या छताचे काम केलेय.
.
प्रदक्षिणा पथात कोटा स्टोनची फरसबदी असून खाबांना काळ्या संगमरवराचे क्लॅडिंग केले आहे. मंदिराच्या भवताली एक चौथरा बांधून चार कोपर्‍यात देवीची मंदिरे आहेत. ही चारही मन्दिरे मूळ मंदिराचा भाग नाहीत्. ती नंतर बांधलेली आहेत हे समजते. चारही मंदिरात देवीची विविध रूपे पहावयास मिळतात.
.
मुख्य मंदिरात शिरण्या साठी एक उतरता पण फरसबंद अप्रोच आहे. इथे दोन अष्टकोनी आकाराचे ओटे बांधून त्याचे
दोन मिनी मंदिरात रूपांतर केलेले दिसते. देवींच्या चार मंदिराप्रमाणेच ही नंतर बांधलेली मंदिरे आहेत. एकंदरीत 'ऑल इन वन ' चा प्रयत्न जीर्णोद्धारात झालेला आहे. मुख्य मंदिरात आम्ही पोहोचलो त्यावेळी आरती चालू होती, नगारा व घंटा यांच्या काणठळी नादमयतेच्या साथीने काही भक्तगण आरती म्हणत होते. एक नाथपंथीय वाटावा असा गोसावी
आरती. फिरवीत होता.
.
मुख्य मंदिराचा मूळ कळस गायब झाला असावा .कारण मंदिर दगडाचे असले तरी वरचा कळस अलिकडे बांधला असावासे दिसते. मंदिरात कोरीव काम जवळ जवळ नाहीच. काही मूर्ती बाजूच्या भिंतीवर आहेत. पण ते ही जीर्णीद्धारात झाले असावे असे वाटते. अलीकडे दगदी मन्दिरे रंगवून त्या भडक रूप आणण्याचे उद्योग होत असतात.इथे रंगकाम इतर इतके भडक वाटले नाही.
.
प्रक्षिणा पथात अनेक विभूतींच्या मूर्ती खांबांवर स्थापित केलेल्या आहेत.
त्यात वशिष्ट, नारद, दुर्वास , व्यास ,वाल्मिकी,शंकराचार्य , तुलसीदार, मोहिनी, नानक,गोविंदसि़ह, हनुमान,सनतकुमार,हरिहर,ब्रह्मा, यद्नपुरूष, साधु वासवानी, कपिलदेव,मीरा, रामदास सूरदास , नर नारायण, विवेकानंद ई च्या कोरीव प्रतिमा आहेत. अर्थात रंग आहेतच. प्रदक्षिणा पथाच्या बाह्य भितींवर छताखाली सफेद संगमरवराच्या शिळामधे भवत्गीतेचा पंधरावा अध्याय उर्ध्व मूलं पासून कृतकृत्यश्च भारत पर्यंत वाचावयास मिळतो.
.
मंदिराच्या गाभार्‍यात अगदीच लहान वाटावे असे शिवलिंग आहे. त्यामागे बहुदा राम सीता व वर दत्त महारांजांची मूर्त आहे.
.
मंदिराच्या समोर तळ्याकडे तोंड करून तळे व आजूबाजूच्या हिरवाईला निरखण्याचा आनंद लुटता येतो.
.

.
मंदिराकडे जाणार्‍या पदपथात विसावलेली ही माउ- पिले.
.

तलावात आपले अंग साफ करण्याचा उद्यम करणारी ही पांढरी शूभ्र जोडी.
.

.

.
.

.

.
तलावाकाठी दहा फूट रूंदीचा बांध आहे. त्यावरून फिरत फिरत मंदीर निरनिराळा कोनातून पहाता येते.
.
एरवी काळ्या दगडात पहायला मिळणारा नंदी इथे संगमरवरात दिसतो.
.
एका टेकडी च्या पायथ्याशी हे निसर्गरम्य ठिकाण आहे. साहजिकच आरोहणाची आवड असणारे त्याचा फायदा घेउ शकतात.

इथे एक दोन दुकाने आहेत. पण खायला आपले आपण घरून आणलेलेच श्रेयस्कर . बाकी माफक प्रमाणात चणे फुटाणे व फळे खाण्याची मात्र सोय आहे.

.
सरते शेवटी मंदिराचे असे लांबून अवलोकन करीत आपण परतीच्या मार्गाला लागतो.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...